Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज ज्ञानेश्‍वरी जयंती

गोहत्येला मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे उत्तरप्रदेशात तणाव !

भाजपचे कृषी राज्यमंत्री संजीव बालियान यांचा मुसलमानधार्जिण्या समाजवादी शासनावर आरोप
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशच्या समाजवादी शासनाकडून गोहत्येला दिले जाणारे प्रोत्साहनच राज्यातील दादरी प्रकरण आणि राज्यातील तणाव यांसाठी कारणीभूत आहेत, असा आरोप भाजपचे केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बालियान यांनी केला आहे. (हिंदूंनी उत्तरप्रदेशच्या समाजवादी पक्षाला निवडून दिल्यामुळे त्यांना गायींची हत्या उघड्या डोळ्यांनी पहावी लागत आहे ! - संपादक)      कथितरित्या गोमांस खाणे आणि ते घरी ठेवल्याच्या शंकेवरून दादरी येथे १ ऑक्टोबर या दिवशी इखलाख याची हत्या करण्यात आल्याचे म्हटले जाते. या प्रकरणी पोलिसांकडून काही हिंदूंवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या संदर्भात बालियान म्हणाले, केवळ मुसलमानांना संतुष्ट करण्यासाठी राज्य शासनाकडून हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. गायींच्या रक्षणाचे सूत्र अतिसंवेदनशील आहे.

नव्या कायद्याखाली ३ सहस्र ७७० कोटींचे काळे धन उघड

अशा भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई होणे शासनाकडून अपेक्षित आहे !
     नवी देहली - काळा पैसा घोषित करण्यासाठी नवीन कायद्यान्वये केंद्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीपर्यंत देशातील ६३८ लोकांनी त्यांच्याकडील ३ सहस्र ७७० कोटी रुपयांचे काळे धन उघड केले. काळे धन असणार्‍या ज्या नागरिकांनी या मुदतीत त्यांच्याकडील काळे धन उघड केलेले नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची घोषणा महसूल सचिव हसमुख आधिया यांनी केली आहे.

अयोध्येत धर्माभिमानी हिंदूंकडून वाहिनीचा निषेध

  • एबीपी न्यूज वाहिनीवरील सनातनची मानहानी
  • सनातनविषयी समाजात जागृती करण्याचा निर्धार
     अयोध्या (उत्तरप्रदेश) - एबीपी वृत्तवाहिनीवर ऑपरेशन संमोहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रसार करणार्‍या सनातन संस्थेची मानहानी करण्यात येऊन संस्थेवर आधारहीन आरोप करण्यात आल्याच्या विरोधात येथील उदासीन संप्रदायाच्या आश्रमात हिंदु धर्माभिमान्यांकडून एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व हिंदुत्ववाद्यांकडून एबीपी वृत्तवाहिनीचा निषेध करण्यात आला, तसेच या संदर्भात हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी गावा-गावांमध्ये जाऊन सभांचे आयोजन करण्यात येईल, असा निर्धार उपस्थित धर्माभिमान्यांनी केला. या प्रसंगी महंत संत रामदास, कानपूर येथील महंत सुदर्शन दास यांची वंदनीय उपस्थित होती. त्याबरोबच श्री. विधीपूजन पांडे यांच्यासह अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.
      या वेळी सनातन संस्थेचे डॉ. नंदकिशोर म्हणाले, अनेक वेळा हिंदु धर्मविरोधी शक्तींकडून सनातनवर आरोप करण्यात आले; परंतु प्रत्येक वेळी या आरोपातून संस्था निर्दोष ठरली आहे. यापुढेही संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य चालूच राहील. 
        हिंदू महासभेचे श्री. मनीष पांडे म्हणाले, अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केवळ हिंदु संघटनांची मानहानी करण्यासाठीच केले जात आहे.

सनातन संस्थेवर बंदी नाही !

श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा निर्वाळा !
      पणजी - सनातन संस्था ही आतंकवादी संघटना असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. गोव्यातील मागील काँग्रेस शासनाने या संस्थेवर बंदी घालण्यासाठी बनवलेल्या प्रस्तावातील आरोपांत चौकशीअंती तथ्य आढळून आलेले नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सनातनवर बंदी घालण्याची प्रसारमाध्यमांची अट्टाहासी मागणी पुन्हा एकदा फेटाळून लावली आणि सनातन संस्थेवर बंदी घालू शकत नाही, असा निर्वाळा दिला.
      राजभवनवर १ ऑक्टोबर या दिवशी राजेंद्र आर्लेकर याच्या मंत्रीपदाचा शपथग्रहण समारंभ झाल्यानंतर पत्रकारांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना गाठून सनातन संस्थेवर बंदी घालणार का ?, असे विचारले. या वेळी या शक्यतेला मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे नकार दिला.

सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणार्‍या काँग्रेस आणि साम्यवादी यांचा शिवसेनेच्या तमिळनाडू शाखेकडून निषेध

सनातन संस्थेला खंबीर पाठिंबा देणार्‍या तमिळनाडू शिवसेनेचे आभार !
      चेन्नई - सनातन संस्था ही हिंदूंची आध्यात्मिक संस्था आहे. थोर संतांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कार्य शिस्तबद्धपणे चालू आहे. ज्यांना संस्थेविषयी माहिती आहे, ते लोक अशी मागणी कधीच करणार नाही. सर्व हिंदु संघटना, धर्माभिमानी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक सनातनच्या पाठीशी आहेत, हे सनातन संस्थेच्या बंदीची मागणी करणार्‍या लोकांनी लक्षात ठेवावे, असे मत शिवसेनेच्या तमिळनाडूतील शाखेने मांडले आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या काँग्रेस आणि साम्यवादी यांचा तमिळनाडू शिवसेनेने निषेध केला आहे.
     कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांकडून अजून अन्वेषण चालू आहे. श्री. समीर गायकवाड यांची पोलिसांकडून चौकशी चालू आहे. सनातनचे साधक आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्नरत आहेत आणि अवैध कारवायांमध्ये त्यांचा कधीच सहभाग नसतो. सनातनला या प्रकरणी गोवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी लोकांचीच आधी चौकशी केली पाहिजे. निष्पाप साधक समीर गायकवाड यांची मुक्तता करण्यात यावी आणि खर्‍या गुन्हेगारांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी तमिळनाडू शिवसेनेचे प्रमुख जी. राधाकृष्णन् यांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

काम करा, अन्यथा स्वेच्छानिवृत्ती घ्या !

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची कामचुकार अधिकार्‍यांना चेतावणी
     नवी देहली - अधिकार्‍यांची लालफितशाही खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी नीट काम करावे, अन्यथा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी, अशी चेतावणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या रोड अ‍ॅसेट व्यवस्थापन कार्यशाळेत कामचुकार अधिकार्‍यांना दिली आहे. कामाच्या धारिका अडवून ठेवणार्‍यांविषयी गडकरी म्हणाले, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आराखडा उभारण्याच्या प्रयत्नांत त्यांनी अडथळा आणू नये. आम्हाला सकारात्मक विचार असलेले लोक हवेत. त्यामुळे कामचुकार अधिकार्‍यांना दंड ठोठावण्यात येईल. वेळ पडल्यास अधिकार्‍यांना बाहेरचा रस्ताही दाखवला जाईल. जग भारतीय महामार्गांत गुंतवणूक करण्यास तयार आहे; मात्र आम्ही अर्थसंकल्पीय तरतुदींचाच वापर करू शकत नसल्याचे चित्र आहे.

जामा मशिदीचे उत्तराधिकारी शाबान बुखारी करणार हिंदु युवतीशी निकाह !

मौलाना असलम जावेद कासमी यांचे बुखारींना आवाहन
युवतीला मुसलमान करण्यापेक्षा स्वत:च्या मुलाला हिंदु करा !

असा बुखारींना उलेमांनी दिलेला सल्ला हा हिणकस सल्ला नाही कशावरून ?
      नवी देहली - शाही इमामच्या मुलाचा विवाह एका हिंदु कुटुंबातील मुलीशी ठरला आहे. या चांगल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; मात्र हिंदु मुलीला त्यांनी बलपूर्वक मुसलमान करण्यापेक्षा स्वतःच्या मुलाला हिंदु धर्मात सहभागी करत हिंदु प्रथा- परंपरेनुसार दोघांचा विवाह करावा, असे आवाहन ऑल इंडिया मजलिस उलेमाचे रामपूर जिल्हाध्यक्ष मौलाना असलम जावेद कासमी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात केले आहे.
     येथील जामा मशिदचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांचे उत्तराधिकारी २० वर्षीय शाबान बुखारी यांचा विवाह १३ नोव्हेंबर या दिवशी एका हिंदु युवतीशी होणार आहे. या विवाहासाठी सदर युवतीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. शाबान यांना मागील वर्षी इमाम सैयद अहमद बुखारी यांनी त्यांचे उत्तराधिकारी घोषित केले होते.

राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेवर सौदी अरबच्या नियुक्तीने वादंग !

    न्यूयॉर्क - मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात आघाडीवर असलेल्या सौदी अरब या देशाची राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर टीकेचे मोहोळ उठले आहे. यु.एन्. वॉच या सेवाभावी संस्थेने ही नियुक्ती म्हणजे मानवाधिकारांवर पेट्रोलने मिळवलेला विजय आहे, असे म्हटले आहे. सौदी अरब हा देश पेट्रोलनिर्मितीत जगात अग्रेसर आहे.
     या समितीला जगातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ञांची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत. अशा महत्वाच्या समितीवर होणार्‍या नियुक्त्या नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. चीन, कतार, रशिया, व्हेनेझुएला यांसारखे मानवाधिकार क्षेत्रात अवमानित झालेले देश या समितीवर प्रतिनिधित्व करतात. सौदी अरबातील मुक्त संवादाचा प्रणेता रीफ बदावी याला
     १ सहस्र चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. अनेक गुन्ह्याखाली मुंडकी उडवण्याची अघोरी शिक्षा देण्यात येते. यासाठी नुकतेच ८ जल्लादांची नेमणूक करण्यासाठी सौदी शासनाने जाहिरात दिली आहे. सध्या कारागृहात असलेल्या रीफ बदावी याची पत्नी इंसाफ हैदर या पतीच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय मोहीम चालवत आहेत. त्यांनीही राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेवर सौदी अरबच्या नियुक्तीवर टीका केली आहे.

इस्रायलच्या पंतप्रधानांचा पाकिस्तानी पंतप्रधानांसोबत भोजन घेण्यास नकार !

भारतीय राज्यकर्त्यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांकडून राष्ट्राभिमान शिकावा !
    न्यूयॉर्क - राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी येथे आलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी ज्या उपाहारगृहात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे सहकारी जेवण घेणार होते, त्याच उपाहारगृहात जेवण घेण्यासाठी केलेले आरक्षण रहित केले आणि शरीफ यांच्यासह भोजन घेण्यास नकार दिला आहे. 
    नवाझ शरीफ यांनी येथील सेराफिना ऑलवेज या उपाहारगृहात भोजनासाठी आरक्षण केले होते. तेथेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचेही जेवणासाठी आरक्षण होते; मात्र नवाझ शरीफ त्याच वेळी तेथे भोजन घेण्यास येणार आहेत हे कळल्यावर नेतान्याहू यांनी त्यांचे आरक्षण रहित केले. वर्ष २०१४ मध्ये नवाझ शरीफ यांनी राष्ट्रसंघाच्या खुल्या बैठकीत इस्रायलवर कडक शब्दांत टीका केली होती. त्यामुळेच नेतान्याहू यांनी आरक्षण रहीत केले असल्याचे बोलले जात आहे, मात्र इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने 
     बेंजामीन नेतान्याहू यांनी सुरक्षेच्या कारणांसाठी भोजनाचा कार्यक्रम रहित केल्याचा खुलासा केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आता स्वामी विवेकानंद कथित पुरोगाम्यांच्या चुकीच्या इतिहासलेखनाचे बळी !

     छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मनमानी इतिहासलेखन करून त्यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा रंगवण्याच्या प्रयत्नांनी जोर घेतल्यानंतर आता कथित पुरोगाम्यांकडून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची मोडतोड करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे शिवरायांचे हिंदवी स्वराज्य या मंडळींना पचनी पडत नाही, त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचा हिंदुत्वप्रसार त्यांना रुचेनासा झाला.

सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीला विरोध

कर्नाटकमध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन
धर्मद्रोही के.एस्. भगवान यांना अटक करावी !
     हुब्बळ्ळी (कर्नाटक) - सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात आणि धर्मद्रोही के.एस्. भगवान यांना अटक करावी, यासाठी श्रीराम सेना, अय्यप्पा स्वामी भक्त मंडळ, हिंदू महासभा, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि इतर हिंदुत्ववादी संघटना यांनी ३० सप्टेंबर या दिवशी संघटितपणे मोर्चा काढला. या मोर्च्याच्या शेवटी येथील राणी चेन्नमा चौकात के.एस्.भगवान यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांच्या माध्यमातून संरक्षणमंत्री आणि राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी २५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

शाळांमध्ये नीतीमूल्यांचे शिक्षण देणार : विद्यार्थ्यांना शिकवणार स्वामी

विवेकानंद आणि आर्य चाणक्य हरियाणा राज्यशासनाचा स्तुत्य निर्णय
देशभरातच राष्ट्र आणि धर्म प्रेम जोपासण्याचे शिक्षण दिल्यास राष्ट्राभिमानी 
पिढी निर्माण होण्यास आणि देशाचा खर्‍या अर्थाने विकास होईल !
    चंदिगड - गुजरातच्या पाठोपाठ हरियाणा शासनाने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये नीतीमूल्यांचे शिक्षण समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षा बचाव आंदोलन समितीचे निमंत्रक श्री. दिनानाथ बत्रा यांनी लिहिलेली नीतीमूल्यांचे शिक्षण या विषयावरील पाठ्यपुस्तके तेथे येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहेत. हरियाणाचे शिक्षणमंत्री रामविलास शर्मा यांच्या विनंतीवरून श्री. बत्रा यांनी नैतिक शिक्षा या विषयावर ८वी ते १२वीच्या वर्गांसाठी सहा पाठ्यपुस्तके लिहिली आहेत. सर्व पाठ्यपुस्तकांचा आरंभ सरस्वती वंदनाने करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय नीतीमूल्ये आणि राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी ही पाठ्यपुस्तके लागू करण्यात येणार आहेत. बोधकथा, दोहे, निबंध, कविता इत्यादींच्या माध्यमातून नीतीमूल्यांचे शिक्षण देण्यात येणार आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये रहिम यांचे दोहे, विक्रमादित्य, चाणक्य, ए.पी.जे. अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद आणि स्वामी भारती कृष्ण यांच्यावरील निबंध अंतर्भूत करण्यात आले आहेत. 

अमेरिकेत महाविद्यालयात गोळीबार, १३ ठार

अमेरिकेत भौतिक विकासाने उच्चांक गाठला असतांना गुन्हेगारीतही प्रचंड वाढ झाली आहे. यातून बोध 
घेऊन भारताने पाश्‍चात्त्य आणि अमेरिकी प्रभावाखाली जाणार्‍या नागरिकांना रोखले पाहिजे !
आक्रमणकर्त्याने धर्म विचारून झाडल्या गोळ्या !
     ऑरेगॉन (अमेरिका) - अमेरिकेच्या ऑरेगन राज्यातील उम्पक्वा कम्युनिटी महाविद्यालयात १ ऑक्टोंबर या दिवशी एका बंदूकधार्‍याने केलेल्या गोळीबारात १३ विद्यार्थी ठार झाले, तर १९ जण घायाळ झाले आहेत. या गोळीबाराला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात बंदूकधारी ठार झाला आहे. त्याच्याकडून ४ बंदुका कह्यात घेण्यात आल्या आहेत. गोळीबार करणारा २६ वर्षीय क्रिस हार्पर मर्सर हा याच महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी होता. नेमका हा युवक कोणत्या धर्माचा होता आणि त्याला ख्रिस्त्यांचे काय वावडे होते, हे समोर आलेले नाही.
    द न्यूयॉर्क टाइम्सनुसार कोर्टनी मूर नावाच्या विद्यार्थिनीने सांगितले की, ती वर्गामध्ये बसली असता खिडकीतून एक गोळी आली आणि तिच्या शिक्षकाच्या डोक्याला लागली. त्यानंतर हा बंदूकधारी वर्गामध्ये घुसला. त्याने विद्यार्थ्यांना धर्म विचारला आणि नंतर जवळ उभ्या असलेल्या काही विद्यार्थ्यांना गोळ्या घातल्या. यातून ती कशीबशी वाचली, असे ती म्हणाली. 

सौदी अरबमध्ये नास्तिकांना अतिरेकी ठरवून शिक्षा होणार !

भारतातील तथाकथित पुरोगाम्यांचे यावर काय म्हणणे आहे ?
     रियाध (सौदी अरेबिया) - इस्लामची जन्मभूमी समजल्या जाणार्‍या सौदी अरब या देशात नास्तिकांना अतिरेकी ठरवणारा नवीन कायदा पारित करण्यात आला असून नास्तिकांना अत्यंत कडक शिक्षा ठोठावण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. 
      सौदी अरबमध्ये राजकीय विरोधाला मुळीच वाव नाही. अहिंसक आंदोलनांवरही बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरबमध्ये अनेक मुसलमान तरुण आय.एस्.आय.एस्.च्या सैन्यात भाग घेण्यासाठी सिरियात गेले आहेत. ते परत आल्यावर सौदी अरबमधील साम्राज्यवादाविरुद्ध लढा देतील, अशी भीती राज्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे त्यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरबमधील नागरिक विदेशात जाऊन लष्करी प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत. असे अतिरेकी तरुण आणि राजकीय विरोधक यांना २० वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. आता अशा वर्गवारीत नास्तिकांचा समावेश शासनाने केला आहे. इस्लाम धर्म न मानणार्‍या तसेच इस्लाम धर्मावर किंचित का होईना टीका करणार्‍याला अत्यंत कडक शिक्षा होण्याची शक्यता आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, स्वधर्म रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
     उत्तरप्रदेशात घरी, शेतात आणि काही भागांमधून गायी कापल्या जात आहेत, तसेच उत्तरप्रदेश शासनाचे गोहत्येला मिळणारे प्रोत्साहनच येथील तणावाला कारणीभूत आहे, असा आरोप केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बालियान यांनी केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
UP shasanse gauhatyako bhadhava mil raha hai ! - kendriya rajyamantri Sanjeev Baliyan
kya gauhatya na roknewala UPshasan Hinduoki raksha kar payegi ? 

जागो !

उत्तरप्रदेश शासनसे गौहत्याको बढावा मिल रहा है, ऐसा केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बालियान ने कहा.
क्या गौहत्या न रोकनेवाला उत्तरप्रदेश शासन हिंदूआें की रक्षा कर पायेगी ?

सनातन संस्थेचे कार्य आध्यात्मिक असून संस्था हिंसेचा पुरस्कार करत नाही ! - अधिवक्ता रामदास केसरकर, मानद विधी सल्लागार, सनातन संस्था

डावीकडून श्री. गुरुप्रसाद, अधिवक्ता रामदास केसरकर, अमृतेश एन्.पी.
     बेंंगळुरू (कर्नाटक) - कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड यास संशयित म्हणून पोलिसांनी अटक केली, तेव्हापासून साम्यवादी पक्ष आणि पुरोगामी सनातन संस्था हिंसाचारी संघटना असल्याचा कांगावा करत आहेत. गेली १६ वर्षे सनातन संस्था आठवड्याचे सत्संग, संस्कारवर्ग, ग्रंथ प्रकाशन या माध्यमातून आध्यात्मिक कार्य करत आहे. त्यामुळे लाखो लोकांनी साधना करण्यास प्रारंभ केला. साधना करून अनेक लोक सुखी आणि तणावमुक्त झाले आहेत. सनातन संस्थेचे कार्य आध्यात्मिक आहे, ती हिंसेचा पुरस्कार करत नाही. समीर गायकवाड हा सनातनचा साधक असून तो निर्दोष आहे, असे सनातनला वाटते. न्यायालयात सत्य समोर येईलच. तोपर्यंत या घटनेस संस्थेला उत्तरदायी धरणे उचित होणार नाही, असे उद्गार सनातन संस्थेचे मानद विधी सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांनी बेंगळुरू प्रेस क्लब येथे आयोजित एका पत्रकार परिषदेला संबोधित करतांना काढले. या पत्रकार परिषदेला कर्नाटक येथील हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता अमृतेश एन्.पी. आणि कर्नाटकातील हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद उपस्थित होते.

संमोहनाद्वारे मानवी बॉम्बचा शोध लावल्याविषयी प्रा. मानव यांना नोबेल द्यावे !- सनातन संस्था

प्रा. श्याम मानवांकडूनच महाराष्ट्राचे तालिबानीकरण !
     मुंबई - प्रा. श्याम मानव यांनी १ ऑक्टोबरला मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्था संमोहनाच्या द्वारे मानवी बॉम्ब बनवत असून त्याद्वारे महाराष्ट्राचे अफगाणिस्तान होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. त्यांच्या या अतिरंजित कल्पनेवर हॉलीवूडमध्ये आगामी जेम्स बाँडपट निश्‍चितच निघू शकेल ! किंवा प्रा. श्याम मानव यांना या संशोधन केल्याविषयी नोबेल पारितोषिक मिळायला हरकत नसावी, असा टोला सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी प्रसिद्धी पत्रकातून लगावला आहे.
     सनातन संस्थेच्या कृत्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर भारताचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांनी १ ऑक्टोबरला एका पत्रकार परिषदेतून केली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली (करवीर तालुका) येथे मूर्तीदान नको, मूर्तीविसर्जन करा, अभियानास चांगला प्रतिसाद !

      केर्ली (जिल्हा कोल्हापूर) - हिंदु जनजागृती समितीने श्री गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ली या गावात श्री गणेशमूर्तीदान नको, तर श्रीगणेशमूर्ती विसर्जन करा, ही मोहीम राबवली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. सदरची मोहीम कशी झाली आणि त्या संदर्भातील प्रतिक्रिया येथे देत आहोत.
१. गावात १९ सप्टेंबर या दिवशी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था-निर्मित श्री गणेशमूर्ती दान करू नका या विषयी प्रबोधनपर ध्वनीचित्र चकती दाखवण्यात आली.

सनातनच्या कु. प्रियांका स्वामी यांच्या भ्रमणभाषवरील संपर्कामुळे वृत्तवाहिन्यांचे पितळ पडले उघडे !

कु. प्रियांका स्वामी 
      गेले २ दिवस एबीपी माझा, आयबीएन् लोकमत आणि टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिन्या कु. प्रियांका स्वामी यांचे वडील श्री. राजेंद्र स्वामी यांची मुलाखत दाखवत होत्या. कु. स्वामी यांना सनातनच्या साधकांनी संमोहित केल्याचे या वृत्तवाहिन्यांचे पत्रकार वदवून घेत होते. तेही या चर्चेत सहभागी झाले होते. त्यांनीही सनातन संस्थेवर अनेक आरोप केले; मात्र या कार्यक्रमात कु. प्रियांका स्वामी या भ्रमणभाषवरून सहभागी झाल्या. कु. स्वामी यांनी सांगितले, मला समाजकार्याची आवड होती. मी सज्ञान आणि सुशिक्षित आहे. मला आश्रमात राहून पूर्णवेळ समाजकार्य करण्याची संधी मिळते. मी माझ्या पालकांशी भ्रमणभाषवरून संपर्कात असते. सनातन संस्थेत काहीही चुकीचे सांगितले जात नाही. तेथे अयोग्य काही चालत नाही. त्यामुळे श्री. राजेंद्र स्वामी यांनी मी समाजकार्यासाठी कु. स्वामी यांना अटकाव करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे सनातनवर होत असलेल्या तरुणींच्या संमोहनाच्या आरोपाचेही खंडण झाले.

दुष्काळग्रस्तांच्या साहाय्यासाठी १ कोटी रुपये देण्याचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय

हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा आणि लवकरात लवकर 
ती भक्तांच्या स्वाधीन होण्यासाठी प्रयत्न करा !
      पंढरपूर - येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दुष्काळग्रस्तांच्या साहाय्यासाठी १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत नित्यपूजा, हंगामी कर्मचार्‍यांना देण्यात येणारे वेतन आणि महागाई भत्ता यांविषयीही निर्णय घेण्यात आला.
     यापूर्वी भाविकांना श्री विठ्ठलाची नित्यपूजा करण्यासाठी ५१ सहस्र रुपये द्यावे

५ ऑक्टोबरपर्यंत थडगे न काढल्यास हिंदू थडगे काढतील ! - श्री. मारुति सुतार

बेळगाव येथे दंगलीच्या निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांनी काढलेल्या मोर्च्यातील भाषणे
      बेळगाव - धर्मांधांनी थडग्याकडे प्रशासन आणि लोकांचे लक्ष लागू नये, यासाठी हिंदूंच्या घरावर दगडफेक करून दंगल घडवली. शासन आणि हिंदू यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत. शासनाने ५ ऑक्टोबरपर्यंत थडगे न काढल्यास सर्व हिंदू संघटित होऊन थडगे उद्ध्वस्त करतील, अशी चेतावणी हिंदु धर्म प्रचारक मारुति सुतार यांनी दिली. अनंतचतुर्दशीच्या दिवशी धर्मांधांनी खडकगल्ली परिसरातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक केली. त्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ सप्टेंबरला हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप यांनी मोर्चा काढला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारे आमदार फिरोज सेठ यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, असेही ते पुढे म्हणाले.

(म्हणे) महाभारतासारखे खोटे वाङ्मय नष्ट करायला हवे ! - राजा ढाले

     पुणे, २ ऑक्टोबर (वार्ता.) - सर्व प्रकारच्या थापा एकत्र करून महाभारत तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ते खोेटे वाङ्मय नष्ट करायला हवे, असे प्रतिपादन दलित पँथर्सचे संस्थापक सदस्य राजा ढाले यांनी केले. (अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांविषयी असे बोलण्याचे धैर्य राजा ढाले यांनी दाखवावे. - संपादक) ते पुढे म्हणाले अनेक विद्यापिठांमध्ये ज्ञानेश्‍वरीचे शिक्षण दिले जाते. तेही बंद करण्याची आवश्यकता आहे. पुराणांमुळे माणसे गुलाम होतात. विद्यापिठांमधून महाभारत आणि ज्ञानेश्‍वरी कसले शिकवता ! समतेचा विचार करणार्‍यांची संख्या वाढवणारे शिक्षण हवे, अल्प करणारे नाही. तसे होत नाही; म्हणून आज परिवर्तनाचा विचार मांडणार्‍यांच्या गोळ्या झाडून हत्या केल्या जातात, महापालिकेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या हस्ते ढाले यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. (महाभारतकालीन, तसेच रामायणकालीन काही ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाणे यांचे पुरावे आजही सापडत आहेत. असे असतांना महाभारतामध्ये थापा असल्याचे सांगणे, तसेच त्याला खोटे वाड्.मय संबोधून नष्ट करण्याची भाषा करणे, हा निव्वळ हिंदुद्वेषाचाच उमाळा आहे. अध्यात्म आणि हिंदुत्व ही भारताची ओळख पुसू पहाणार्‍या ढालेंसारख्या व्यक्तींचा जनतेच्या कराच्या पैशातून पुणे महानगरपालिकेकडून सत्कार होणे, हा अधर्माला राजाश्रय मिळवून देण्याचाच प्रकार आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेचा निषेध करावा, तेवढा थोडाच आहे. - संपादक)

भाजपचे नवी मुंबईचे सरचिटणीस संतोष पाचलग यांना जागृत हिंदु पुरस्कार

   
सौ. नाईक यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना श्री. संतोष पाचलग (मध्यभागी)
  ठाणे - विश्‍व हिंदु परिषद प्रेरित हिंदु जागृती गणेशोत्सव मंडळ, ठाणे यांच्या वतीने भाजपचे नवी मुंबईचे सरचिटणीस श्री. संतोष पाचलग यांचा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षात जागृत हिंदु पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. माधवी नाईक यांनी पुरस्कार दिला. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनेश जोशी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
      या वेळी श्री. पाचलग म्हणाले, सन्मान घेण्याएवढी माझी योग्यता नसली,

प्रबोधनानंतर भाविकांची कृत्रिम हौदाकडे पाठ !

वडगाव शेरी (पुणे) येथील धर्माभिमान्यांची उत्स्फूर्त प्रबोधन चळवळ
      वडगाव शेरी (पुणे) - गणेशचतुर्थीनिमित्त वडगावशेरी येथील नदीघाटावर महानगरपालिकेच्या वतीने लोखंडी कृत्रिम हौद ठेवण्यात आले होते. त्याविषयी कळताच धर्माभिमानी श्री. देवीलाल चौधरी यांनी स्थानिक धर्माभिमान्यांना त्याविषयी कळवले. त्यानंतर धर्माभिमानी युवकांनी तत्काळ एकत्र येऊन प्रबोधन चळवळ आरंभली. या वेळी उपस्थित धर्मप्रेमी युुवक भाविकांना धर्मशास्त्रानुसार नदीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करणे कसे योग्य आहे, याविषयी प्रबोधन करत होते. परिणामस्वरूप भाविकांनी कृत्रिम हौदाकडे पाठ फिरवली. बहुतांश भाविकांनी गणेशमूर्तींचे नदीमध्ये विसर्जन केले. सर्वश्री रोहित गलांडे, आकाश गलांडे, अमोल जाधव, सर्जेराव ढोकळे, साईराज पवळे, अमित पिल्ले, देवीलाल चौधरी यांनी पुढाकार घेऊन प्रबोधन चळवळ राबवली. (धर्मरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे कृतीशील होणार्‍या सर्व धर्माभिमानी युवकांचे अभिनंदन ! असे युवक हीच हिंदु धर्माची शक्ती ! - संपादक)

सोलापूर येथे श्री गणेशोत्सव मंडळांची काळी सूची सिद्ध करणार

हिंदूंच्या सण-उत्सवाच्या वेळी तेढ निर्माण करणार्‍या
अल्पसंख्यांकांच्या संदर्भातही पोलीस काळ्या सूचीचे धोरण अवलंबतील का ?
     सोलापूर, २ ऑक्टोबर - गणेशोत्सव शांततेत पार पाडणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे, याविषयीच्या सूचना सोलापूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिल्या होत्या. असे असतांनाही काही गणेश मंडळांनी सूचनेचे पालन न करता समाजात तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल, असे कृत्य केले. त्या मंडळांचा गोपनीय अहवाल करून गणेशोत्सव मंडळांची एक काळी यादी सिद्ध करण्यात येत आहे. सध्या या मंडळांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही; परंतु भविष्यात मात्र या काळ्या सूचीचा संदर्भ मंडळाला कोणताही उत्सव साजरा करतांना देण्यात येणार्‍या अनुज्ञप्तीच्या वेळी करण्यात येईल. तसेचर त्या मंडळांवर पोलीस जास्त लक्ष ठेवतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळसिंग रजपूत यांनी दिली.

सनातनच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड येथील हिंदुत्वनिष्ठांची बैठक !

सनातनला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी निवेदने
देण्याचा, तसेच स्वाक्षरी चळवळ राबवण्याचा निर्धार
     चिंचवड, २ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या साधकाला संशयित म्हणून कह्यात घेतले गेले. त्यानंतर निर्माण झालेला कथित पुरोगाम्यांचा वैैचारिक आतंकवाद आणि मिडिया ट्रायल यांमुळे सनातनवर आगपाखड होऊ लागली. सनातनविरुद्ध युद्धपातळीवर कुप्रचार चालू असतांना अनेक हिंदुत्ववादी ठामपणे सनातनच्या पाठीशी उभे आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील हिंदुत्वनिष्ठांनीही १ ऑक्टोबर या दिवशी केंद्राई गोशाळा येथे बैठक घेऊन सनातनला सक्रीय पाठिंबा दर्शवला.

नंदुरबार येथे सनातनवरील बंदीच्या मागणीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून निवेदन

निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     नंदुरबार - सनातन संस्था अध्यात्मप्रसार करणारी आणि राष्ट्रप्रेमी संस्था असून कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड यांना केवळ संशयावरून अटक केली आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध होणे बाकी आहे. असे असतांनाच सनातनवर बंदी घाला, अशी मागणी पुरोगामी आणि राजकीय व्यक्ती करत आहेत. या मागणीचा नंदुरबार येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला आहे. याविषयी १ ऑक्टोबरला निवासी उपजिल्हाधिकारी निलेश सागर यांना निवेदनही देण्यात आले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा वासनांधांना कठोर शासन करायला हवे !
     जामनेर - येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या अन्सार शहा शब्बीर शहा (वय २५ वर्षे) या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कारानंतर मुलीने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र तिला वेळीच रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले.

(म्हणे) सनातनवर बंदी घाला ! - भारिप बहुजन महासंघ

पुणे आणि संभाजीनगर येथे सनातनच्या विरोधात मोर्चा
     पुणे, २ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातनच्या हिंदुत्वाच्या कार्याचा धसका घेऊन भारिप बहुजन महासंघाच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी सनातनविषयी असणार्‍या पराकोटीच्या पूर्वग्रहातून सनातनवर बंदीची मागणी करण्यात आली. हिंदुत्वविषयी असणार्‍या द्वेषामुळे या प्रसंगी सनातन संस्थेसह सर्वच हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे असल्याने त्यांच्याकडून सनातनवर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. सनातनवर कारवाई झालीच पाहिजे, मनुवाद, हो बरबाद, हिंदुत्ववाद हो बरबाद, सनातनी होश मे आओ, सनातनच्या प्रमुखाची चौकशी झालीच पाहिजे, अशा प्रकारच्या घोषणा या वेळी देण्यात येत होत्या. (कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, हे जाणून घेतले, तर भारिप कार्यकर्त्यांना त्यांच्या मर्यादा लक्षात येतील. कोणतेही कारण आणि पुरावा नसतांना एखाद्या संघटनेवर बंदीची मागणी करणे, हे घटनाद्रोही आहे, हे उठताबसता आंबेडकरांचे नाव घेणार्‍या कार्यकर्त्यांच्या लक्षात येऊ नये, दुर्दैवी आहे. - संपादक)

इसिसमध्ये गेलेला आतंकवादी अरीब मुंबई पोलीस मुख्यालयावर आक्रमण करणार असल्याचे ट्विट

सनातनमुळे भारताचा अफगाणिस्तान होणार
नाही, तर अशा धर्मांध युवकांमुळे होईल, हे लक्षात घ्या !
     मुंबई - आतंकवादी संघटना इसीसला सोडून भारतात परतलेला कल्याणमधील युवक अरीब मजिद मुंबई पोलीस मुख्यालयावर आत्मघाती आक्रमण करण्यासाठी भारतात परतला आहे, असे मॅग्नेट गॅस नावाने हँडल केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विटर हँडल फहद शेख वापरत होता. फहद आणि अरीब महाराष्ट्रातील कल्याणमधील त्याच चार युवकांपैकी एक आहेत, जे मे २०१४ मध्ये आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी भारतातून सीरियात गेले होते. अरीब सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तुर्कीच्या मार्गाने तो भारतात आला आहे.

मुसलमान महिलांना निवडणूक लढवण्यास बंदी !

कोल्हापूरमध्ये मज्लिसे शुरा उलेमा ए चा फतवा 
स्त्रीमुक्तीवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     कोल्हापूर - निवडणूक लढवणे, हे मुसलमान धर्माच्या विरोधात असल्यामुळे मुसलमान महिलांनी निवडणूक लढवू नये, असा फतवा कोल्हापुरातील मुसलमान धर्मगुरूंच्या मज्लिसे शुरा उलेमा ए कोल्हापूर, या संघटनेने काढला आहे. 
     कोल्हापूरमध्ये १ नोव्हेंबर या दिवशी महापालिका निवडणूक होणार आहे. अनेक पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली असून येत्या पाच दिवसांत इतर उमेदवारांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात साधारणत: १५० मशिदी असून या मशिदींच्या मौलानांची मज्लिसे शुरा उलेमा ए, ही संघटना आहे. या संघटनेने मुसलमान महिलांनी कुराण, बुखारी शरीफ, शरहुस्सुन्नह, तिमर्जी शरीफ या धार्मिक ग्रंथांतील काही दाखले देत महिलांनी मुक्तपणे समाजात वावरणे चुकीचे असल्याचेही म्हटले आहे. धर्मगुरूंच्या या संघटनेने हे निवेदन अनेक ठिकाणी वितरीत केले. इच्छूक महिला उमेदवारांनाही ते देण्यात आले; मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सध्या सर्वच पक्षाच्या वतीने लढण्यासाठी कोल्हापुरातील १५ ते २० प्रभागात मुसलमान महिला इच्छूक आहेत. कोल्हापुरात असा फतवा प्रथमच निघाला आहे. यापूर्वी येथील महापालित तीन ते चार मुसलमान महिलांनी प्रतिनिधित्व केले आहे.

विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदुत्ववाद्यांचे सनातन संस्थेच्या बंदीची मागणी करणार्‍यांच्या निषेधार्थ आंदोलन

     विजयपूर - सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, हिंदु धर्माचरण, प्रत्येक व्यक्तीने सरळ रीतीने आध्यात्मिक जीवन कसे जगावे, याविषयी समाजात प्रबोधन करण्यात येते. कर्नाटकातील प्रा. कलबुर्गी आणि महाराष्ट्रातील कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात सनातन संस्थेला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
     त्यासमवेतच सध्या संस्थेच्या साधकांचीही नाहक चौकशी करण्यात येत आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असतांना या दोन्ही प्रकरणांच्या नावाखाली सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात येत आहे. कट रचला जात आहे.

धर्मद्रोही नाशिक महानगरपालिकेने भाविकांकडून दान म्हणून घेतलेल्या गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून वाहून नेऊन विहिरीत फेकून दिल्या !

  • गणेशमूर्तींची प्रशासन पुरस्कृत विटंबना !
  • धर्मद्रोही नाशिक महानगरपालिकेने अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची अशी विटंबना करण्याचे धाडस दाखवले असते का ?
     नाशिक, २ ऑक्टोबर (वार्ता.) - धर्मद्रोही नाशिक महानगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारून भाविकांकडून सहस्रावधी गणेशमूर्ती दान घेतल्या. या मूर्तींची विल्हेवाट लावतांना महानगरपालिकेने त्या कचर्‍याच्या गाडीतून वाहून नेऊन त्या एका विहिरित अक्षरश: फेकून दिल्या. 
     नाशिकच्या धर्मद्रोही महानगरपालिकेने अनंत चतुदर्शीच्या दिवशी शहरात ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन केले होते. या संकलन केंद्रात भाविकांनीही मोठ्या प्रमाणात मूर्ती दिल्या. तथापि महानगरपालिकेकडून या सर्व गणेशमूर्ती कचरा नेतात त्या डंपरमधून वाहून नेण्यात आल्या. याशिवाय नदीत विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती बाहेर काढून त्याही या डंपरमध्ये भरल्या जात होत्या. या प्रत्येक डंपरवर गणेशमूर्ती संकलन केंद्र असे लिहिलेला फलक लावला होता. या सर्व गणेशमूर्ती डंपरद्वारे येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या समोर असलेल्या एका वसाहतीच्या आतमधील काहीशा निर्जन जागेत एका विहिरीजवळ आणल्या जात होत्या.

एका हिंदूची फळविक्रेता म्हणून निवड करून हिंदूंनी त्याच्याकडून फळे खरेदी केली ! - निपाणी (जिल्हा बेळगाव) येथील घटना

मुसलमान विक्रेत्यांकडून फळे विकत न घेण्याचा हिंदूंचा निर्धार
      निपाणी (जिल्हा बेळगाव) - येथे बर्‍याच ठिकाणी मुसलमान विक्रेत्यांकडून फळांची विक्री केली जाते. या विक्रेत्यांकडून हिंदूंना फळे खरेदी करावीशी वाटत नाही. पूजा आणि उपवासासाठी फळे हवी असतात; मात्र ही फळे मुसलमानांकडून घ्यावी लागत असतांना हिंदूंसाठी या पैशाचा उपयोग होत नाही. या कारणास्तव गावातील हिंदूंनी श्री. अमित हावळ या धर्माभिमानी हिंदु तरुणाची फळ विक्रेता

गणेशोत्सव मंडळांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या ! - विश्‍व हिंदु परिषद

जामखेड (जिल्हा नगर) येथे मोठ्या स्वरात
ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून गुन्हे प्रविष्ट
     जामखेड (जिल्हा नगर), २ ऑक्टोबर (वार्ता.) - गणेशविसर्जनाच्या दिवशी येथील जवळपास १६ गणेशोत्सव मंडळे आणि मिरवणुकीत सहभागी असणार्‍या सर्वच डीजे मालकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. निर्धारित पातळीपेक्षा ध्वनीवर्धकाचा अधिक आवाज असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या कारवाईचा निषेध करत गणेशोत्सव मंडळांवर दाखल केलेेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन ३० सप्टेंबर या दिवशी तहसीलदार प्रदीप कुलकर्णी यांना देण्यात आले. या प्रसंगी विश्‍व हिंदु परिषदेेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अन्य हिंदुत्ववादी उपस्थित होते.

लाचखोर उपजिल्हाधिकारी नितेश ठाकूर फरार

     मुंबई - कोट्यवधींची माया गोळा करणारा लाचखोर उपजिल्हाधिकारी नितेश ठाकूर हा भारतातून नेपाळमार्गे पळून गेला असल्याचे वृत्त आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका अधिकार्‍याने ही माहिती दिली. लाचखोर ठाकूरकडे १४४ कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ठाकूरची १३४ कोटींची मालमत्ता आधीच जप्त केली आहे, अशी माहिती एसीबी अधिकार्‍यांनी दिली.

धर्मद्रोह्यांनी पसरवलेल्या कलुषित दृष्टीकोनांमुळेच सनातनच्या विरोधात वादंग ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक
माझा कट्टा कार्यक्रमात अभय वर्तक यांनी
साधला एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी संवाद !
      मुंबई - अखिल भारतीय अंनिसचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम मानव किंवा डॉ. दाभोलकर हे रझा अकादमीच्या धर्मांधांनी महिला पोलिसांचे कपडे फाडले, तर त्यांना विचारत नाहीत. त्यांनी माध्यमांच्या ओबी व्हॅन पेटवल्या, तरी त्यांविषयी ब्रही काढला जात नाही; मात्र सनातन प्रभातमध्ये अत्याचारी पोलिसांना साधना करण्याची शिक्षा करा !, असे म्हटल्यावर त्याविषयी अनेक जणांकडून ओरड केली जाते. आज सनातन संस्थेच्या साधकांच्या अनुभूती ऐकल्या किंवा सनातनने एखाद्याची आध्यात्मिक पातळी घोषित केली, तर ते हसण्यावारी नेले जाते; मात्र त्यामागील शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न होत नाही.

धर्मनिष्ठ विचार असल्यामुळे सनातन संस्थेला सातत्याने लक्ष्य करणे थांबवा !

  • आयबीएन् लोकमतवर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी घातले पुरोगाम्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन !
  • प्रा. श्याम मानव यांनी पोलिसांचे अन्वेषण भरकटवण्यासाठी सनातनवर संमोहनाचे आरोप केल्याचा चर्चेचा सूर !
  • सनातनच्या कर्नाटक प्रसारसेविका कु. प्रियांका स्वामी यांच्या सहभागामुळे चर्चेतील विरोधाचे खंडण !
चर्चासत्रात बोलतांना अधिवक्ता
श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर
      मुंबई - सनातन संस्था जे काही लिखाण करते, ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करते. भारतीय संविधानाच्या आधीन राहून योग्य ती टीका करण्यात चुकीचे काही नाही. सनातन संस्था किंवा हिंदू जर कट्टरतावादी असते, तर आज सनातनविषयी होत असलेल्या आरोपांची अशी चर्चा करता आली असती का ? सनातन संस्थेची विचारसरणी धर्मनिष्ठ असल्यामुळे प्रत्येक पुरोगाम्याची हत्या झाली की, त्याविषयी सनातन संस्थेकडे बोट दाखवले जाते. हे थांबलेच पाहिजे. आमचे तर म्हणणे असे आहे की, सर्व पुरोगाम्यांना शासनाने संरक्षण द्यावे; अन्यथा उद्या एखाद्या पुरोगाम्याचा अपघाती मृत्यू झाला, तरी त्याचा आरोप सनातनवर केला जाईल आणि त्याची मिडीया ट्रायल होईल, असे झणझणीत अंजन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी तथाकथित पुरोगामी आणि हिंदुद्रोही प्रसारमाध्यमे यांच्या डोळ्यांत घातले. ते आयबीएन् लोकमत वाहिनीवरील बेधडक कार्यक्रमातील सनातनवर कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहेेत का ? या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते.

पोलीस अन्वेषणाविषयी न्यायालयाने ओढलेले ताशेरे दृष्टीआड करून चालणार नाही !

एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील चर्चेतील निष्कर्ष
श्री. संदीप शिंदे
      सनातनचा साधक समीर गायकवाड प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडे तांत्रिक पुरावे असल्याचे सांगितले होते; त्या आधारावर त्याला अटक केली होती; मात्र आतापर्यंत तपास जैसे थे असल्याचा ताशेरा न्यायालयानेे ओढला आहे, तो दृष्टीआड करून चालणार नाही. पोलिसांचे हे तांत्रिक पुरावे कुठे आहेत, असा प्रश्‍न पडतो, असा निष्कर्ष एबीपी माझा या वृत्तवाहिनीने २९ सप्टेंबर २०१५ या दिवशी झालेल्या चर्चेत काढला. या चर्चेत पुरोगामी अधिवक्ते असीम सरोदे, कॉ. उदय नारकर, अंनिसचे हमीद दाभोलकर, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर आणि सनातनचे प्रवक्ता श्री. संदीप शिंदे सहभागी झाले होते. डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी नागोरी आणि खंडेलवाल यांची सुटका पुराव्यांअभावी झाल्याने समीर गायकवाड याच्याही संदर्भात तसे होईल का, अशा संशय व्यक्त करत हे चर्चासत्र घेण्यात आले.

सव्य-अपसव्य, प्रदक्षिणा-अप्रदक्षिणा कर्म

    हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.

समीर गायकवाडच्या अटकेचे भांडवल !

      कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून पोलिसांनी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला अटक केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात पुरोगाम्यांनी जाणीवपूर्वक हल्लकळ्ळोल माजवला. त्याच वेळी पोलिसांनीही समीर गायकवाडच्या अटकेने पानसरे हत्याकांड प्रकरणी सबळ पुरावे मिळाल्याचा दावा करण्याचा सपाटा लावला. वास्तवित तेे तथ्य नाही, हे आता उघड होत आहे; परंतु याचा प्रत्यय कोल्हापुराच्या न्यायालयात आला होता. पोलिसांना समीर गायकवाडची आणखी सात दिवसांसाठी पोलीस कोठडी पाहिजे होती; मात्र त्यासाठीची सबळ कारणे देणे पोलिसांना शक्य झाले नाही, याचा अर्थ पोलिसांनी सबळ पुराव्याशिवाय ही अटक केली काय ? ही शंका अधोरेखित झाली आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीने पुणे जिल्ह्यात केलेले प्रसारकार्य !

१. १५ ऑगस्टनिमित्त जनजागृती चळवळ
      पुणे जिल्ह्यात १५ ऑगस्टच्या निमित्ताने जनजागृती चळवळ राबवण्यात आली. 
१ अ. थेरगाव, चिंचवड येथे १५ ऑगस्टच्या सायंकाळी मार्गावर पडलेले राष्ट्रध्वज उचलण्याची मोहीम राबवण्यात आली. 
१ आ. समितीचे सर्व उपक्रम शाळेत घ्यायला अनुमती देणारे वारजे येथील प्रगती विद्यामंदिराचे मुख्याध्यापक ! : वारजे येथील प्रगती विद्यामंदिर या शाळेत १५ ऑगस्टचे निवेदन दिल्यावर मुख्याध्यापकांनी लगेचच सर्व उपक्रम घेण्याची अनुमती दिली. त्यांनी प्रभातफेरी, क्रांतीकारकांचे प्रदर्शन, राष्ट्रध्वज उचलणे, या सर्व उपक्रमांत सहभागी होण्याची सिद्धता दाखवली. त्यांनी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करायचा ?, याविषयीचा फलक द्यायला सांगितला. त्याच्या छापील प्रती (प्रिंट) काढून गणपतीच्या काळात मुलांच्या प्रभातफेरीचे नियोजन करणार असल्याचे सांगितले. 
     गणेशोत्सवाच्या काळात ते शाळेत क्रांतीकारकांचे प्रदर्शनही लावणार आहेत, तसेच येथून पुढे सर्व उपक्रम तुम्ही शाळेत घेऊ शकता, असे त्यांनी सांगितले.

पुणे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसार करतांना वाचक, हितचिंतक आणि जिज्ञासू यांच्याकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

१. साप्ताहिक सनातन प्रभातचे स्वतः वर्गणीदार होऊन दुकानात येणार्‍या लोकांना वर्गणीदार 
बनवण्यास इच्छुक असलेले सुगरण स्वयंपाकघर या दुकानाचे मालक श्री. गोखले !
      कोथरूड येथील सुगरण स्वयंपाकघर या दुकानाचे मालक श्री. गोखले यांना साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार व्हायचे होते. त्यासाठी ते साधकांना शोधतच होते. साधक त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आधी साप्ताहिकाची वर्गणी दिली आणि मग सर्व माहिती ऐकून घेतली, तसेच त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये माहितीपत्रक आणि साप्ताहिकाचे अर्ज ठेवण्याची विनंती केली, जेणेकरून त्यांच्याकडे येणार्‍या लोकांना वर्गणीदार करता येईल. 

कौटुंबिक सुखाच्या प्राप्तीसाठी विज्ञानयुगातही श्राद्ध करणे आवश्यक ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे
     बिकानेर (राजस्थान) - श्राद्ध करणे, हे पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम आहे; परंतु सध्या या विधीला गांभीर्याने घेतले जात नाही. खरे पाहता आपल्या धर्मात प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीनुसार श्राद्ध करण्याचे वेगवेगळे पर्याय दिले आहेत. श्राद्ध एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. त्यामुळे पितरांना पुढची गती मिळते. पितरांना गती मिळाल्याने त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सुखी होऊ शकतो, तर त्यांच्या दु:खी होण्यामुळे आमच्या कुटुंबातही दु:ख वाढेल. त्यामुळे श्राद्ध करणे विज्ञानयुगातही आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. येथील आनंद निकेतनमध्ये २७ सप्टेंबर या दिवशी समितीतर्फे आयोजित कौटुंबिक समस्या, पितरांचा संबंध आणि श्राद्धपक्ष या विषयावर उपस्थितांना संबोधित करतांना श्री. शिंदे बोलत होते.

सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात श्रीश्रीश्री गुरुदेवानंद स्वामीजी, गुरुदेवदत्त संस्थानम्, ओडियुरु क्षेत्र यांचे आशीर्वचन !

    बुद्धीवाद्यांनी हिंदूंच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचवू नये. भारतीय संस्कृतीविषयी अनुकूलता असावी, संधी द्यावी. आमचे कर्तव्य आम्ही करत असतांना कोणत्याही रीतीने अडथळा येऊ नये, अशी प्रार्थना करतो - श्रीश्रीश्री गुरुदेवानंद स्वामीजी, गुरुदेवदत्त संस्थानम्, ओडियूरु क्षेत्र, कर्नाटक.

येईल लवकर हिंदु राष्ट्राची पहाट ।

श्री. अशोक सारंगधर
बोलता बोलता झाली १२ वर्षे ।
स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेला ।
कळले नाही मनाला ।
एक तप गेले वाया ॥ १ ॥

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया ।
आहे खरे गुह्य ज्ञान ।
गुरुकृपेने आम्हा कळले ।
साधक आहेत भाग्यवान ॥ २ ॥

सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊन लेकरांच्या प्रगतीसाठी तळमळणार्‍या पू. बिंदाताईंचे यत्न फळास यावेत, यासाठी सौ. स्वराली आेंकार पाध्ये हिने भावसंदेशातून केलेली प्रार्थना !

सौ. स्वराली पाध्ये
    रामनाथी आश्रमातील ग्रंथ विभागात सेवा करणार्‍या सौ. स्वराली आेंकार पाध्ये हिने (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ यांना एक भावसंदेश पाठवला आहे. त्यामध्ये तिने पू. बिंदाताईंची भाववैशिष्ट्ये आणि त्यांच्या अस्तित्वाने साधकांच्या साधनेला मिळणारी दिशा यांविषयी सुरेख वर्णन केले आहे. पू. ताईंना अपेक्षित असे घडता येण्यासाठी तिने त्या संदेशातून गुरुचरणी केलेली विनवणी पुढे देत आहे.
प्रत्येकाचे मन ती जाणते ।
आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी
ती तळमळते ॥ १ ॥

प्राणशक्ती अल्प असल्यास करावयाचा उपाय

    प्राणशक्ती अल्प असल्यास श्री गणपतीचा ॐ ॐ श्री गणेशाय नमः ॐ ॐ । किंवा ॐ ॐ श्री गणपतये नमः ॐ ॐ ।, हा नामजप करावा. या वेळी अंगठ्याचे टोक करंगळीच्या टोकाला किंवा मुळाशी लावावे किंवा करंगळीचे टोक तळहाताला जेथे सहजपणे टेकेल, तेथे लावावे. ही मुद्रा करून एका हाताने अनाहतचक्र आणि दुसर्‍या हाताने मणिपूरचक्र येथे न्यास करावा.

लाघवी स्वभावामुळे सर्वांशी मायेने वागणारा आणि राष्ट्र-धर्म यांप्रती प्रेम असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सातारा येथील कु. पार्थ महेश गायकवाड (वय ९ वर्षे) !

कु. पार्थ गायकवाड
१. प्रेमभाव
१ अ. सर्वांशी प्रेमाने वागणे : आम्ही रहात असलेल्या ठिकाणी एक अपंग मुलगा आहे. चालता येत नसल्यामुळे त्याच्याशी कोणी खेळत नाही; परंतु पार्थ नेहमी त्याच्याशी खेळतो. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांनाही तो समजून घेतो आणि प्रेमाने त्यांची विचारपूस करतो. एकदा घरात त्याची आजी रडत होती. ते पाहिल्यावर तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या गालावरून हात फिरवून तिला म्हणाला, रडू नकोस.

अत्यंत खडतर जीवन कंठून उतारवयात गुरुकार्याला समर्पित होणार्‍या पू. सुदामराव शेंडेआजोबा यांचा जीवनप्रवास

पू. सुदामराव शेंडे
     पू. शेंडेबाबांची नुकतीच हर्नियाची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे स्वास्थ आणि एकूणच तेथील दिनचर्या अवलोकनार्थ आम्ही सहपरिवार देवद आश्रमात आलो होतो. कष्टाने साधलेले संतपद भूषवणार्‍या शेंडेबाबांच्या पूर्व इतिहासात डोकावणे अनुचित वा अप्रस्तुत होणार नाही. या जाणिवेने थोडे खोलात शिरणे अगत्याचे आहे, असे वाटले; म्हणून प्रस्तुत लिखाण केले.
१. जन्म
    श्री. सुदामरावांचा जन्म १६.१०.१९३७ या दिवशी विटा, ताणखाणापूर जि. सांगली येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे मामा रामचंद्र भोसले यांनी स्वतः त्यांची जन्मकुंडलीही बनवली.

ईश्‍वराच्या श्रद्धेच्या बळावर शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासावर मात करणार्‍या अन् सतत भावावस्थेत असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या देवगड, सिंधुदुर्ग येथील सौ. मीनाक्षी शेखर इचलकरंजीकर (वय ६४ वर्षे) !

सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर
१ ऑक्टोबरला देवगड जि. सिंधुदुर्ग येथील सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले; तसेच २ ऑक्टोबर या दिवशी त्यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या कुंटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. श्री. शेखर इचलकरंजीकर (पती), जामसंडे, देवगड, जि. सिंधुदुर्ग.
अ. काटकसरीपणा : सौ. मीनाक्षी हिच्यात आधीपासून काटकसरीपणा हा गुण आहे. ती प्रत्येक वस्तू काटकसरीने वापरते. बर्‍याच वर्षांत तिने स्वतःसाठी काही वस्तू, विशेषतः कपडे खरेदी केलेले नाहीत.
१ आ. घर हे आश्रम आहे, असा भाव ठेवून ती घरातील सर्व कामे सेवा म्हणून करते.
१ इ. घरी येणार्‍या प्रत्येकाला नामजप करायला सांगणे : ती घरी येणार्‍या प्रत्येकाला नामजपाचे महत्त्व सांगून नामजप करण्यास सांगते. त्यामुळे घरी येणार्‍यांपैकी जवळजवळ सगळे जण नामजप करू लागले आहेत. बागकामाला येणार्‍या बर्‍याच स्त्रिया नामजप करू लागल्याने त्यांच्या घरातील पुरुषांची व्यसने सुटली, तसेच घरातील भांडणे बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांतील बरेच जण नामजप करण्यासाठी घरी येतात. (ते घरी येतात. थोडा वेळ देवासमोर बसून नामजप करतात आणि जातात.) त्यांतील काही जणांना अर्पणाचे महत्त्व पटल्याने ते जमेल तेवढे मासिक अर्पणही देतात.

साधकांना सूचना, वाचक आणि हितचिंतक यांना विनंती

रविवार, ४ ऑक्टोबरला दैनिक सनातन प्रभातचा सनातनचे अग्नीदिव्य विशेषांक !
      कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून सनातन संस्थेवर बंदी आणावी, सनातनमध्ये मुलींना संमोहित करून कोंडून ठेवले जाते, अशी आवई उठवण्यात येत आहे. या प्रकरणातील वस्तूस्थिती लोकांपर्यंत जाण्यासाठी रविवार, ४ ऑक्टोबरला सनातनचे अग्नीदिव्य हा कृष्णधवल विशेषांक प्रसिद्ध करत आहोत.
या विशेषांकात वाचा !
१. सनातनच्या साधिकांविषयी प्रसारमाध्यमांवर केलेला अपप्रचार आणि त्या अपप्रचाराला साधिकांनी पत्रकार परिषदेतून दिलेले प्रत्युत्तर
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर होणारे आरोप आणि त्यांचे खंडण

आपत्काळाची तीव्रता वाढली असल्यामुळे आवश्यकतेनुसार नामजपात पालट करा !

सर्वांसाठीचे उपाय याविषयीची सूचना !
१. सनातनचे साधक सध्या ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । हा श्रीकृष्णाचा नामजप करत आहेत; मात्र आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने सूक्ष्मातून होणारे त्रासही सर्वत्र वाढत आहेत. त्यासाठी ज्या साधकांना श्रीकृष्णाच्या नामजपाने लाभ होत नसेल, त्यांनी ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा जप न्यास न करता करावा. हा जप करतांना अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावण्याची मुद्रा करून हात मांडीवर किंवा खुर्चीच्या हातांवर ठेवावेत. हा जप ५ - ६ दिवस करूनही लाभ न झाल्यास पुन्हा श्रीकृष्णाचा जप करावा.

साधकांनो, सहस्रो वाचकांना सनातन प्रभात नियतकालिकांमधील अमूल्य ज्ञानाचा लाभ होण्यासाठी ३१.१०.२०१५ या दिवसापर्यंत शेष नूतनीकरण पूर्ण करून गुरूंची कृपा संपादन करा !

    सनातन प्रभात नियतकालिके म्हणजे वाचकांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी स्फुल्लिंग चेतवणारी चैतन्यदायी ज्योतच आहे. बरेच वाचक आणि हितचिंतक या नियतकालिकांचा लाभ घेऊन साधक होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतांनाही काही राज्ये आणि जिल्हे यांमधील साधकांकडून या नियतकालिकांचे नूतनीकरण वेळेत होत नसल्याचे लक्षात येत आहे. सर्व नियतकालिकांचे आगामी ३ मासांचे आवृत्तीनुसार शेष नूतनीकरण खाली देत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्माभिमानी यांना नम्र विनंती !
     भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनात वापरत असलेल्या नोटांवर पेनने लिहिलेले असल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत, असे क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत सूचित केले होते. अशा नोटा बँकेच्या दृष्टीने कागदासमान असल्याने बाजारात त्या कोणी स्वीकारणार नाही, अशी सूचनाही बँकेने २ वर्षांपूर्वी काढली होती.
    आतापर्यंत लोकांकडून या सूचनेचे पालन झालेले नसल्याने या संदर्भात कडक धोरण अवलंबण्याचे बँकेने ठरवले आहे.

धर्मरथांवर ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी, तसेच चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी ! 
    सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यातील चैतन्य अन् सात्त्विकता यांचा लाभ व्हावा, यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. याचाच एक भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये धर्मरथाद्वारे उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात येते. यामध्ये ग्रंथ आणि उत्पादने यांची माहिती सांगणे, हिशोब ठेवणे, तसेच ग्रंथप्रदर्शनाचे नियोजन पहाणे आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे.

संतसेवेची सुवर्णसंधी !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक दाम्पत्याची आवश्यकता !
     पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक दाम्पत्याची आवश्यकता आहे. जे सेवक दाम्पत्य या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
खरा शिष्य
रंगाच्या जशा अनेक छटा असतात, तशाच
 शिष्यत्वाच्याही अनेक पायर्‍या असतात.
१. मला कोणी शिव्या दिल्या, मारले, माझी कुणी हत्या (खून) केली, तरी त्याच्यावर तुम्ही दया केलीत, तर मी समजेन की, माझ्या गुरूने तुम्हाला सिद्ध (तयार) केले.
भावार्थ : शिव्या देणे, मारणे, हत्या करणे इत्यादी सर्व प्रकृतीतील आहे. हे समजून ते करणार्‍याविषयी राग न येणे, एवढेच नव्हे, तर करुणाकर भगवंताप्रमाणे त्याच्यावर दया करणे, हे शिष्याच्या खर्‍या प्रगतीचे लक्षण होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कर्तव्य 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परंपरांच्या विरोधात जाऊन समाजसुधारणा करणारे पुरोगामी आणि साम्यवादी पापाच्या पायावर उभे असणे

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
      हे साम्यवादी आम्हा परपंरावाद्यांचा जड, यांत्रिक आणि निर्जीव असा उपहास करतात. आम्हाला कालप्रवाहाची उपेक्षा करणारे आहोत, अशा शिव्याही हासडतात. खरे तर हे पुरोगामी, हे साम्यवादीच त्या अर्थाने परंपरावादी आहेत. स्वत:ला गोरगरिबांचे कैवारी म्हणवणारे वरकरणी कितीही समाजकल्याण आणि लोकहित यांच्या गोष्टी करू देत, योजना बनवू देत, ते सर्व पापाच्या पायावरच उभे आहेत. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १७.११.२०११)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
विज्ञानाचा खरा लाभ करून न घेतल्याने झपाट्याने पराकोटीच्या अधोगतीला गेलेला मानव !
      विज्ञानामुळे मानवाला यंत्रे, सोयी इत्यादी उपलब्ध करून दिल्यामुळे मानवाचा दैनंदिन कामातील बराच वेळ वाचला; पण त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे मानव सुखलोलुप झाला. त्याने रिकामे मन, म्हणजे भुताचे घर !, ही म्हण सार्थ केली आहे. तो ईश्‍वरापासून दूर गेला आहे. त्याने रिकामा वेळ साधनेसाठी वापरला असता, तर त्याला लाभ झाला असता. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.१.२०१५)

हिंदूंच्या धर्मकार्यात प्रशासकीय हस्तक्षेप !

      सध्या सनातन संस्थेचे नाव वाहिन्यांवर सातत्याने झळकत आहे. त्यामुळे गणेशोत्सव विसर्जनातील अपप्रकार रोखण्यासाठी सनातन गेली २० वर्षे सांगत असलेल्या वहात्या पाण्यात विसर्जन करा आणि गणेशमूर्ती दान करू नका या सूत्रास वाहिन्यांवर विशेष प्रसिद्धी मिळाली आणि वाहिन्यांनी सनातनचा वहात्या पाण्यातच विसर्जन करण्याचा अट्टाहास का ? असे म्हणून सनातनला पुन्हा एकदा प्रतिगामी ठरवून टाकले. पूर्जा-अर्चा केलेल्या श्री गणरायाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व वहात्या पाण्यात उतरून त्याचा लाभ संपूर्ण वातावरणाला मिळतो हे सर्वाधिक पर्यावरणपूरक धर्मशास्त्र समजून घेण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हते आणि नाही. विज्ञानातील बॅक्टेरिया, अणू-रेणू, पेशी हे सर्व माणासाला डोळ्यांनी दिसत नसले, तरी विज्ञान सांगते म्हणून सर्वजण त्यावर विश्‍वास ठेवतात आणि बुद्धीच्या पलीकडे असणारे अध्यात्मशास्त्र जाणणारे त्यातील सूक्ष्मातील समाजाला पुरक ठरणार्‍या गोष्टी सांगत असतांना मात्र बुद्धीवाद्यांना त्यावर विश्‍वास ठेवायचा नसतो. याच बुद्धीवाद्यांच्या नादी लागून महापालिकेने काही वर्षांपासून गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद सिद्ध केले आणि यंदा तर ठिकठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये तळी किंवा नदी या ठिकाणी विसर्जन करू नका, अशा प्रकारचे फलक लावले आणि तशी पत्रकेही काढली. हिंदूंच्या धार्मिक कार्यातील हा हस्तक्षेप हिंदूंच्याच संमतीने सर्रास चालू झाला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn