Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कौटुंबिक छळामुळेच आम्ही घरातून बाहेर पडलो ! - प्रीती आणि प्रिया चौरसिया

डावीकडून अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे,
प्रीती चौरसिया, प्रिया चौरसिया आणि श्री. ईश्‍वरलाल खंडेलवाल
सनातन संस्थेवर तरुणींच्या संमोहनाचा आरोप करणार्‍या एबीपी न्यूजचा बुरखा फाडला !
सनातनला अपकीर्त करू नका ! - डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे, प्रीती आणि प्रिया
प्रसारमाध्यमांनी केलेल्या एकतर्फी वृत्तांकनामुळे मानहानी झाल्याने साधिका उद्विग्न !
     दादर (मुंबई) - सनातन संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे संमोहन केले जात नाही. आम्ही संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहोत. घरातून बाहेर पडून स्वतःचे आयुष्य आनंदाने जगत आहोत. अशा वेळी प्रसारमाध्यमांनी आमच्या नातेवाइकांकडून माहिती घेऊन गेले ४ दिवस आमची अपकीर्ती केली. त्यामुळे आमचे वैयक्तिक जीवन ढवळून गेले आहे. आम्हाला लोक विचारतात, तुमच्याविषयी जे माध्यमांमध्ये दाखवले जात आहे, ते खरे आहे का ? अशा प्रश्‍नांमुळे आम्हाला जो त्रास झाला, त्याचे दायित्व कोण घेणार ? आम्ही आमच्या घरच्यांच्या छळाला कंटाळून निघून आलो आहोत.

पोलिसांकडून श्रीराम सेनेचे मारुति सुतार यांच्यासह तीन जणांना अटक !

      बेळगाव - येथे झालेल्या दंगलप्रकरणी पोलीस करत असलेल्या कामात हस्तक्षेप करणे, तसेच अन्य खोटे आरोप ठेवून बेळगाव पोलिसांनी श्रीराम सेनेचे श्री. मारुति सुतार आणि अन्य तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर १४३, १४७, १४८, ३५३, १५३ (अ), ५०४, ५०६ सह १४९ अशी कलमे लावण्यात आली आहेत. या सर्वांना न्यायालयासमोर उपस्थित केले असता त्यांना १४ ऑक्टोबरअखेर न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून त्यांच्या

धर्मांध नगरसेवक मुजम्मिल डोणीला अटक

बेळगाव दंगल प्रकरण !
पोलीस अधिकार्‍यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड !
      बेळगाव - येथे अनंत चतुर्दशी या दिवशी धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी येथील मुजम्मिल डोणी या धर्मांध नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. येथील ३५ क्रमांक वॉर्डचे ते नगरसेवक आहेत. त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता १४ झाली आहे.
      मार्केेट यार्डचे पोलीस निरीक्षक गोगाक यांच्यावर या दंगलीत आक्रमण झाले

(म्हणे) सनातन संस्था करते साधकांचा ब्रेनवॉश !

सनातन संस्थेवर बिनबुडाचे आरोप
श्याम मानव यांचे पुन्हा तेच ते आणि तेच ते !
      मुंबई - सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. आठवले हे संमोहनशास्त्रातील ज्ञानाचा वापर करून साधकांचे ब्रेनवॉश करतात, असा आरोप केल्यावर त्या संदर्भात कोणताही वस्तुनिष्ठ पुरावा मांडता येऊ शकत नाही, असे परस्परविरोधी वक्तव्य करून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक प्रा. श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत केला. (परस्परविरोधी विधाने करून स्वतःचे हसे करून घेणारे मानव म्हणे संमोहनतज्ञ ! - संपादक) या वेळी त्यांनी सनातन संस्थेवर पानसरे हत्या प्रकरणाचे भांडवल

धर्मशास्त्रविरोधी भूमिका घेणार्‍या पुणे महानगरपालिकेचे पितळ उघडे

हौदात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती वाकड येथील
नदीत फेकून त्यांची विल्हेवाट लावल्याचे प्रकरण
सनातनला खलनायक ठरवू पहाणारी प्रसिद्धीमाध्यमे, कथित पर्यावरणवादी यांना
महानगरपालिका-प्रशासनाच्या धर्मभावना दुखावणार्‍या भूमिकेविषयी काय म्हणायचे आहे ?
      पुणे - प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन व्हावे, हे धर्मशास्त्र सांगते. कथित पर्यावरणवाद्यांकडून मात्र गणेशमूर्तींच्या नदीतील विसर्जनामुळे जलप्रदूषण होते, असा कांगावा केला जातो. मोठ्या प्रमाणात केला गेलेला हा अपप्रचार हिंदूंचा बुद्धीभेद करून त्यांना धर्माचरणापासून परावृत्त करतो. तसे होऊ नये, यासाठी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भाविकांचे प्रबोधन करून त्यांना गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यामागचे शास्त्र सांगण्यात येते.

कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या गणेशमूर्तींची दुर्दशा !

ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश
नसून लोकांना हौदातील गणेशमूर्तींचे पुढे काय होते, याचे भान व्हावे,
यासाठी ही छायाचित्रे प्रसिद्ध करत आहोत.
पुणे - गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते, असा कांगावा करणार्‍या कथित पर्यावरणवाद्यांकडून भाविकांचा बुद्धीभेद केला जातो. या अपप्रचाराला बळी पडून महानगरपालिकेच्या वतीने प्रतीवर्षी कृत्रिम हौद, तसेच टाक्या उभारण्यात येत आहेत. या हौदांमध्ये विसर्जित झालेल्या गणेशमूर्तींची नंतर विटंबना होण्याचे प्रकार घडून येतात. यंंदाच्या वर्षीही या कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या गणेशमूर्तींंची दुर्दशाच झाली असल्याचे पहायला मिळाले.

देवगड, सिंधुदुर्ग येथील सौ. मीनाक्षी शेखर इचलकरंजीकर (वय ६४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर (उजवीकडे) यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करतांना श्री. हेमंत मणेरीकर
      सिंधुदुर्ग : देवगड, सिंधुदुर्ग येथील सौ. मीनाक्षी शेखर इचलकरंजीकर यांनी आध्यात्मिक त्रास असूनही त्यावर मात करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे पू. स्वाती खाडये यांनी दूरभाषवरून येथे घोषित केले. या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. हेमंत मणेरीकर यांनी सौ. मीनाक्षी शेखर इचलकरंजीकर यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या साधकांना भावाश्रू आवरले नाहीत.

संभाजीनगर येथे धर्मांध रिक्शाचालक आणि पोलीस यांच्यातील वादानंतर पोलिसांवर दगडफेक

धर्मांधांच्या मुसक्या आवळण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे !
धर्मांधाकडून पोलिसाच्या डोक्यात दगडाने वार
संभाजीनगर - वाहन न लावण्याच्या परिक्षेत्रात धर्मांधांकडून रिक्शा लावण्यात आली होती. ती काढण्याविषयी सांगण्यास गेलेले वाहतूक पोलीस आणि धर्मांध रिक्शाचालक यांच्यातील वाद विकोपास गेला. त्यामुळे त्याने रिक्शा पेटवून पोलिसांवरच दगडफेक केली. (कुरापतखोर धर्मांध ! कोणत्याही कारणाने दंगल घडवून आणण्यास सिद्ध असलेल्या धर्मांधांना चोख प्रत्युत्तर देणारी पोलीस यंत्रणा हवी. - संपादक) यामध्ये दोन पोलीस कर्मचारी गंभीर घायाळ झाले.

आयएन्एस् कोची युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

      मुंबई - अत्याधुनिक अशा स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि संपूर्ण भारतीय बनावटीची आयएन्एस् कोची ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते २९ सप्टेंबर या दिवशी मुंबईतील माझगाव गोदीत या नौकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
युद्धनौकेची वैशिष्ट्ये 
१. या युद्धनौकेची बांधणी मुंबई येथील नौदलाच्या माझगाव गोदीत करण्यात आली आहे. 
२. ही युद्धनौका स्टेल्थ (शत्रूच्या रडारला चुकवण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान) प्रकारातील, म्हणजे शत्रूच्या रडारवर न दिसणारी आहे.
३. या युद्धनौकेवर २५० ते ३०० किलोमीटर क्षेत्रातील लक्ष्याचा अचूक भेद करू शकणारी १६ ब्रम्होस क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. 

झारखंडमध्ये धर्मांधांकडून दंगल माजवण्याचा प्रयत्न

  • ४ मंंदिरांच्या आवारांत फेकले मांस 
  • ३ धर्मांधांना अटक
     रांची (झारखंड) - झारखंडमध्ये ४ प्रमुख मंदिरांच्या आवारांत मांस फेकल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून तीन मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. याविषयी पुढील तपास चालू आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
     शेजारच्या बिहार राज्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झारखंडमध्ये धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी मंदिरांच्या आवारांत मांस फेकण्यात आल्याची शक्यता पोलीस पडताळून पहात आहेत. सर्वप्रथम रांची शहरात एका मंदिराच्या समोर २५ सप्टेंबर या दिवशी मांस फेकण्यात आले होते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी तेथे हिंसा भडकली होती आणि सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर लोहर्दगा, पलमु आणि छत्रा जिल्ह्यांमध्येही मंदिरांच्या समोर मांस फेकण्यात आले होते. 
     या घटनांनंतर २७ सप्टेंबर या दिवशी श्रीराम समिती आणि बजरंग दल यांनी बंदची हाक दिली होती. त्यामुळे लोहर्दगा शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती, असे पोलीस अधीक्षक चोथे यांनी सांगितले. याप्रकरणी तपास चालू आहे, असे पोलीस प्रवक्ते एस्.एन. प्रधान यांनी सांगितले.

(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी न घालण्याच्या निर्णयाचा मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पुनर्विचार करावा !

भाकपच्या गोवा राज्य मंडळाची मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याकडे सनातनद्वेषी मागणी !
     पणजी - सनातन संस्थेवर बंदी न घालण्याच्या निर्णयाचा मुख्यमंत्री पार्सेकर आणि भाजप शासन यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआयच्या) गोवा राज्य मंडळाने मुख्यमंत्री पार्सेकर आणि गोवा शासन यांच्याकडे केली आहे.
भाकपने पुढे म्हटले, 
१. श्रीराम सेनेवर राज्यात बंदी घालता येते, तर ज्याचे सदस्य आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असतात, असा आरोप आहे आणि जे हिंदुत्वाला विरोध करणार्‍या पुरोगामी विचारवंतांना ठार करतात, अशा उजव्या विचारसरणीच्या संस्थेवर अशी बंदी का घालता येत नाही ? (सनातन संस्थेचा एकही सदस्य आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी नाही किंवा कोणालाही मारलेले नाही. केवळ सनातनद्वेषापोटी आरोप करून भाकप लोकांची दिशाभूल करत आहे. सनातन संस्था अध्यात्माचा प्रसार करणारी संस्था आहे. संस्थेचा हेतू राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ कार्य करणे, असा आहे. त्यामुळे चीन आणि रशिया यांचे समर्थक असलेल्या साम्यवाद्यांना राष्ट्रप्रेमी संस्थेच्या कार्याचा त्रास होत असल्याने ते अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करतात ! - संपादक)

काश्मिरींची खरोखर चिंता असेल, तर पाकव्याप्त काश्मीर तात्काळ मुक्त करा !

भारताचे पाकला खडे बोल
      नवी देहली - पाक हा आतंकवादाचा सर्वांत मोठा पुरस्कर्ता आहे, अशी जळजळीत टीका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी केली आहे. तसेच जर पाकला काश्मिरी नागरिकांची खरोखर चिंता असेल, तर त्यांनी काश्मीरवरील अधिकार सोडून द्यावा आणि पाकच्या कह्यात असणार्‍या काश्मीरला (पाकव्याप्त काश्मीर) मुक्त करावे, असा सल्लाही त्यांनी पाकला ट्विटरवरून दिला.
विकास स्वरूप म्हणाले, 
१. आम्ही लवकरात लवकर काश्मीरला मुक्त करण्याची मागणी करत आहोत. (पाक या मागणीला केराची टोपली दाखवेल, हे सांगायला कुणा तज्ञांची आवश्यकता नाही. पाककडे मागणी करण्यापेक्षा काश्मीरमुक्तीसाठी पाकवर दबाव आणणेच आवश्यक आहे ! - संपादक)

गणरायाचे विविध प्रकारे होणारे विडंबन रोखण्यासाठी जनजागृती करूया !

१. काही मंडळांकडून मल्हारी रूपातील श्री गणेश, मातीच्या फुलदाण्या आणि इतर शोभिवंत वस्तू
२. प्लॅस्टिकचे डबे आणि वस्तू यांपासून श्री गणेश मूर्ती बनवण्यात आल्या होत्या.
फ्रुटी या आस्थापनाद्वारे शहरात लावण्यात आलेल्या विज्ञापनाच्या फलकांवर आंब्याला श्री गणेशाचे रूप देण्यात आले होते.
पुणे डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्ट आणि तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाच्या वतीने विसर्जन
मिरवणुकीत उभारण्यात आलेल्या अवयव दान जनजागृती रथामध्ये श्री गजानन हे
अवयवदानाचे मूर्तीमंत उदाहरण असून गजराजाचे अनुकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीच्या चित्ररथामध्ये श्री गणेशाला मानवी रूपात दाखवण्यात आले होते. यामध्ये श्री गणराय आरामदायी आसंदीवर बसलेले असून त्यांच्या तोंडी वाट पहातोय स्मार्ट सिटीच्या स्वप्नपूर्तीची असे वाक्य लिहिण्यात आले आहे.  
(देवतांचे मानवीकरण आणि विडंबन होऊ नये यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे, हेच यातून स्पष्ट होते. - संपादक) 
ही छायाचित्रे कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली नसून समाजाला विडंबनाची कल्पना यावी यासाठी प्रसिद्ध केली आहेत.

भाजप शासनाने सनातन संस्थेच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करावे !

डावीकडून शिवसनेचे गोवा राज्य प्रमुख श्री. रमेश नाईक, सनातन प्रभात
नियतकालिक समूहाचे माजी संपादक डॉ. दुर्गेश सामंत, हिंदु जनजागृती समितीचे
डॉ. मनोज सोलंकी आणि गोव्यातील धर्माभिमानी श्री. महेश पारकर
गोवा येथील पत्रकार परिषदेत सौरभ लोटलीकर यांच्या सनातनवरील आरोपांचे खंडन
     पणजी, १ ऑक्टोबर (वार्ता.) - काल बांदोडा, फोंडा येथील रामनाथ युवा संघाचे सौरभ लोटलीकर यांनी सनातन आश्रम गावातून बाहेर काढा, आश्रमावर बंदी आणा, अशी मागणी करत गंभीर आरोप केले. सध्या सनातनला विरोध केल्याने कोणालाही प्रसिद्धी मिळते, हे पाहून लोटलीकर स्वत:च्या प्रसिद्धीचा हव्यास भागवून घेत आहेत. यातून भविष्यात राजकीय हेतू साध्य करण्याचाही त्यांचा उद्देश असावा. सनातन संस्थेचे संपूर्ण कार्य संवैधानिक मार्गाने चालू आहे. सनातन संस्था साप्ताहिक सत्संग, संस्कारवर्ग, ग्रंथसंपदा यांच्या माध्यमातून हिंदु धर्मप्रसाराचे कार्य करत आहे. सांप्रदायिक ऐक्य आणि हिंदू संघटनांचे संघटन यांसाठी सनातन संस्था हिंदु जनजागृती समितीला पूरक कार्य करत आहे.

चीनच्या गुआंग्शीमध्ये २ घंट्यांत पार्सल बॉम्बचे १५ स्फोट

६ जण ठार, तर १५ जण घायाळ
     गुआंग्शी (चीन) - चीनच्या गुआंग्शी येथे ३० सप्टेंबर या दिवशी २ घंट्यांच्या अवधीत पार्सल बॉम्बचे १५ स्फोट झाले. या साखळी बॉम्बस्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले असून १५ जण घायाळ झाले आहेत. या आक्रमणाचे दायित्त्व अजून कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारली नाही.
१. एशिया वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार दुपारी ३ वाजून १५ मिनिटे ते सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गुआंग्शी येथील झुआंग ऑटोनॉमस भागात हे स्फोट झाले. या स्फोटात एका इमारतीचीही हानी झाली आहे.
२. या स्फोटात बस स्थानक, रुग्णालय, कारागृह, सुपर मार्केट आणि छात्रालय यांना लक्ष्य करण्यात आले.
३. सर्वाधिक स्फोट लियुझोऊ शहरात झाले. 
४. स्थानिक प्रशासन आणि शिन्हुआ न्यूजनुसार, आतंकवाद्यांनी या स्फोटासाठी एका एक्स्प्रेस डिलिव्हरी कंपनीचा वापर केला. हे पार्सल बॉम्ब ठरवलेल्या ठिकाणी पोहोचवण्यात आले. त्यानंतर स्फोट घडवून आणले.

आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात रशियाही सरसावला !

आय.एस्.आय.एस्.च्या अफगाणिस्तानवरील आक्रमणानंतर केला 
हस्तक्षेप भारतीय राज्यकर्ते यातून बोध घेतील का ?
     मॉस्को (रशिया) - संपूर्ण जगाला धोका बनलेल्या आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेच्या विरोधात आता रशियानेही पुढाकार घेतला आहे. रशियाने सिरियातील आय.एस्.आय.एस्.च्या कह्यात असणार्‍या होम्स शहरावर हवाई आक्रमण केले. आय.एस्.आय.एस्.ने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणानंतर रशियाने हे पाऊल उचलले असून त्यासाठी रशियाच्या संसदेनेही अनुमती दिली आहे.

सनातनचे आव्हान न स्वीकारणारे प्रा. मानव हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटून काय बोलणार, हा प्रश्‍नच !

अभय वर्तक यांनी झी २४ तासवर उघड केला प्रा. श्याम मानव यांच्या सूत्रांचा फोलपणा !
श्री. अभय वर्तक चर्चासत्रात पुरावे दाखवतांना
     मुंबई - सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (वय ७४ वर्षे) हे खोलीतून बाहेर पडत नाहीत. त्यांना आधाराविना उठता अथवा चालता येत नाही. ते गेली ८ वर्षे सामाजिक जीवनापासून लांब आहेत. ते सनातनच्या कोणत्याही पदावर नाहीत. बर्‍याच साधकांनी त्यांना पाहिलेलेही नाही. असे असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना संमोहित केले, असे समजणे चुकीचे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले इतरांना संमोहित करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्ये करवून घेत आहेत, असा धादांत खोटा आरोप प्रा. श्याम मानव करत आहेत. आजवर एकाही संमोहनतज्ञाने अशा प्रकारचा कोणताही दावा केलेला नाही; मात्र प्रा. मानव परात्पर गुरु डॉ. आठवले असे काहीतरी विपरित करू शकतात, असे सांगून दिशाभूल करत आहेत. प्रा. मानव सनातन संस्थेच्या आमच्यासारख्या सामान्य साधकांच्या प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकत नाहीत, अशा वेळी ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेटून काय बोलणार, हा प्रश्‍नच आहे. त्यांनी समाजातील १० लोक घेऊन त्यांना संमोहित करून गुन्हे घडवून दाखवण्याचे आव्हान आजवर स्वीकारलेले नाही, असे सांगत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पुन्हा एकदा प्रा. मानव यांच्या (अ)मानवतावादाचा बुरखा फाडला.

श्याम मानव हे तर्कशास्त्री नव्हे, तर कुतर्कशास्त्री !

सुदर्शन वाहिनीचे प्रमुख संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांच्याकडून 
अंनिसचे प्रा. श्याम मानव यांचे खरे स्वरूप उघड !
श्री. सुरेश चव्हाणके
     नवी देहली - सनातन संस्थेचे कार्य मी जवळून पाहिले. सनातन संस्था हिंदु धर्माचे कार्य अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे करणारी अशी ही एक संस्था आहे. तिच्यावर होत असलेले हे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. ते राजकीय लाभ डोळ्यांसमोर ठेवून होत आहेत. सनातनवर आरोप करणारे श्याम मानव हे तर्कशास्त्री नसून कुतर्कशास्त्री आहेत, असे परखड मत सुदर्शन वाहिनीचे प्रमुख संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी मांडले. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर सनातन संस्थेवर चहु बाजूंनी विविध आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांबरोबरच संस्थेच्या बंदीचीही मागणी जोर धरत आहे. सनातनने सर्व आरोपांचे खंडन केले आहे. सनातनची नेमकी बाजू काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सुदर्शन वाहिनीने सनातन का सच हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात श्री. चव्हाणके बोलत होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. दुर्गेश सामंत, हिंदु जनजागृती समितीचे देहलीचे प्रवक्ता श्री. सुरेश मुंजाल आणि संमोहन उपचारतज्ञ डॉ. आशा ठक्कर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

येरळा नदीपात्रात (जिल्हा सांगली) श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर परत उघड्यावर आलेल्या मूर्तींचे हिंदु धर्माभिमान्यांकडून पुन्हा नदीत विर्सजन !

    निमणी (तासगाव तालुका), १ ऑक्टोबर (वार्ता.) - २९ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता येरळा नदीच्या पात्रात (जिल्हा सांगली) विसर्जित केलेल्या सर्व गणेशमूर्ती नदीच्या पाण्याची पातळी अल्प झाल्याने उघड्यावर पडलेल्या आढळून आल्या. श्री गणेशमूर्तींची ही विटंबना रोखण्यासाठी या मूर्ती हिंदु धर्माभिमान्यांनी पुन्हा नदीत विसर्जित केल्या.

श्याम मानव यांच्याविरुद्ध भाजपचे डॉ. उपेंद्र डहाके यांच्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

     कल्याण - अखिल भारतीय अंनिसचे प्रा. श्याम मानव हे संमोहन शास्त्राविषयी जनतेत चुकीची माहिती प्रसारीत करून जनतेला गुन्हे करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, तसेच मान्यताप्राप्त उपचारपद्धतीच्या संदर्भात गैरसमज पसरवत आहेत. या गुन्ह्याच्या प्रकरणी प्रा. मानव यांच्या विरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी कल्याण पोलीस ठाणे आणि साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे दाखल केली आहे.
     संमोहन उपचारपद्धत वैद्यकीय शास्त्रानुसार मान्यताप्राप्त आहे. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून शेकडो मानसोपचार तज्ञ, डॉक्टर, संमोहन उपचार तज्ञ मानसिक रोग बरे करण्यासाठी वापर करतात.

सनातन आश्रमाला कंडोम पुरवल्याविषयी पत्रकार परिषदेत केलेला खुलासा !

     वर्ष २००९ मध्ये आश्रमात २९०० कंडोम खरेदी केल्याचा आरोप होत आहे, या विषयीच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना डॉ. सामंत म्हणाले की, सनातनच्या आश्रमात अनेक विवाहित स्त्रीपुरुष रहातात. सनातन संस्था संसारात राहून साधना करायला शिकवते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे टप्प्याटप्याने गाठण्यास सनातन संस्था शिकवते. मी विवाहित आहे आणि मी आश्रमात रहातो. डॉ. सोलंकी हेही विवाहित आहेत. वर्ष २००० ते २००९ या ९ वर्षांत आश्रमाला तेथील आरोग्य खात्याकडून २९०० कंडोम अधिकृतरित्या पुरवण्यात आले होते.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी खड्डे खोदणे आणि बुजवणे यासाठी जनतेचे पैसे वाया

संगमनेर (जिल्हा नगर) नगरपालिकेचा अजब कारभार !
    संगमनेर, १ ऑक्टोबर - भंडारदरा धरणातून प्रवरा नदीमध्ये पाणी सोडल्याविना श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा संगमनेरची गणेश मंडळे आणि उत्सव समितीने घेतला होता. त्यामुळे श्री गणेशमूर्ती विसर्जन वहात्या पाण्यात कि कृत्रिम खड्ड्यात होणार, या गोंधळात अडकलेल्या संगमनेर नगरपालिकेने ऐनवेळी प्रवरा नदीपात्रात विसर्जनासाठी जेसीबीद्वारे खड्डे खोदले होते. २६ सप्टेंबर या रात्री धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर ते खड्डे परत बुजवण्यात आले होते. त्यामुळे नगरपालिकेचे २ लक्ष रुपये वाया गेले आहेत. (नागरिकांच्या करातून गोळा झालेले जे पैसे वाया गेले, त्याला उत्तरदायी कोण ? - संपादक) नगरपालिकेने प्रवरा नदीमध्ये केलेले खड्डे आणि पालिकेत असलेले ठेकेदारांचे अड्डे हा विषय नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. खोदणे आणि बुजवणे या घडामोडीत संगमनेर नगरपालिकेचे पर्यायाने जनतेचे पैसे मात्र वाया गेले.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा !
    पंढरपूर येथील ७०० वर्षे चालू असलेली चातुर्मासातील श्रीमद्भागवत प्रवचनाची श्री रुक्मिणी मंदिरातील परंपरा भागवत सांगायला प्रवचनकार न मिळाल्याने शासकीय मंदिर समितीने यंदा बंद केली. त्याचप्रमाणे अन्य वेळी चालणारी कीर्तनेही बंद करण्यात आली आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Pandharpurke Vitthal mandirme 700 sal purani Bhagvat pravachanki
parampara band ki gai. - kya ab yah mandirbhi band karenge ?
जागो !
    पंढरपूरके विठ्ठल मंदिर में ७०० साल पुरानी भागवत प्रवचन की परंपरा बंद की गयी.
- क्या अब यह मंदिर भी बंद करेंगे ?

श्राद्धविधीत पितरांना अन्न निवेदन करणे

     हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.
     २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्त श्राद्धविधीत पितरांना अन्न निवेदन करण्याची पद्धत आणि शास्त्र याविषयी माहिती पाहू.

हिंदु जनजागृती समितीचे देहली, हरियाणा, तसेच उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे प्रसारकार्य !

१. हिंदु धर्माभिमान्यांसह झालेल्या बैठका आणि राष्ट्रीय हिंदू आंदोलने !
१ अ. देहली 
१ अ १. हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर श्री गणपति फूड्सच्या उत्पादनाच्या वेष्टनावर असलेले गणपतीचे चित्र काढून टाकण्याचे मालकांनी दिले आश्‍वासन ! : देहलीतील श्री गणपति फूड्स या आस्थापनाचे मालक श्री. सुधीर जैन यांच्याशी प्रथम भ्रमणभाषवर संपर्क केला. नंतर २३.७.२०१५ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. कार्तिक साळुंखे, श्री. चंद्रप्रकाश आणि सनातन संस्थेचे श्री. सुदर्शन गुप्ता यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्या वेेळी श्री. जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आश्‍वासन दिले की, त्यांनी छापलेल्या २ लक्ष प्लास्टिक वेष्टनांवरील गणपतीचे चित्र या उत्पादनाची बांधणी (पॅकिंग) करतांना काढले जाईल.

दंगलींची वृत्ते वाहिन्यांना वर्ज्य !

     जळगाव जिल्ह्यात धर्मांधांनी बकरी ईदच्या दिवशी दंगल घडवली. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होत असल्याच्या घटना वरचेवर वाचनात येतात; पण वृत्तवाहिन्यांवर मात्र यातील एकही घटना येत नाही. निधर्मी वृत्तवाहिन्यांनी या वृत्तांना तिलांजली दिली असल्याने आपल्या राज्यात काय घडत आहे, ते सर्वांपर्यंत पोहोचतच नाही. लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभातील धर्मांधांविषयीच्या पराकोटीच्या भित्रेपणाचे हे निर्देशक आहे. धर्मांधांविषयी वृत्त प्रकाशित केल्यास, दाखवल्यास आपल्या कार्यालयाचे काय होईल ? याची भीती प्रसारमाध्यमांना असल्याने ते अशा विषयांना बगल देतात. आमच्यावर अन्याय होत असतांना आपण कुठे असता ? का नाही आमच्या किंकाळ्या सर्वांपर्यंत पोहोचू देत ? का नाही तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देत ? अशा रोखठोक प्रश्‍नांची सरबत्ती त्या वाहिन्यांवर अत्याचारग्रस्त हिंदूंकडून जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हिंदूंचा आवाज समाजात तळागाळापर्यंत पोहोचणार नाही. काही निवडक वर्तमानपत्रेच अशा वृत्तांची दखल घेतात.

भारतीय संस्कृतीविषयी विविध महापुरुष आणि विद्वान यांनी काढलेले उद्गार !

१. संविधान नव्हे, तर भारतीय संस्कृतीच अंतःकरणाची शुद्धी करू शकणे
     वैदिक संस्कृती हीच विश्‍व संस्कृती तथा मानव संस्कृती आहे. ती कोणत्याही देशकाळानुसार परिच्छिन्न नाही. तिचा दृष्टीकोन इतका उदार आणि उदात्त आहे की, तो सर्वांना स्वीकृती देतो. 
    भारतीय संस्कृती अंतःकरणावर संस्कार करते. कायदा बाह्य असतो आणि संस्कृती आंतरिक. ही गोष्ट लक्षात ठेवावी की, शासकीय कायदा हृदयावर लागू पडत नाही. हृदयाच्या शुद्धीसाठी संविधानाकडे पाहू नये, तर आपल्या संस्कृतीकडे पाहिले पाहिजे. 
- ब्रह्मलीन स्वामी श्री अखंडानंदजी सरस्वती

७०० वर्षांची भागवत प्रवचनाची, तसेच कीर्तनाची परंपरा बंद पाडली ! - भागवताचार्य श्री. वा.ना. उत्पात

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा पुन्हा एकदा धर्मद्रोह !
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर) - संत नामदेवांचे समकालीन शिष्य, श्री रुक्मिणीमातेचे पुजारी आणि भक्त संत परिसा भागवत यांच्या वेळेपासून गेली ७०० वर्षे चालू असलेली चातुर्मासातील श्रीमद्भागवत प्रवचनाची श्री रुक्मिणी मंदिरातील परंपरा शासकीय मंदिर समितीने यंदा बंद केली. भागवत सांगायला प्रवचनकार न मिळाल्याने ही परंपरा बंद झाली. (भागवत प्रवचनाची परंपरा बंद होणे, ही घटना हिंदु धर्मियांसाठी लज्जास्पद आहे. प्रवचनकार आणि कीर्तनकार यांची परंपरा असणार्‍या महाराष्ट्रात भागवत सांगण्यासाठी प्रवचनकार मिळाला नाही, हे कुणाला तरी सांगून खरे वाटेल का ? काहीतरी खोटी कारणे देऊन हिंदु धर्मातील परंपरांना लाथाडणारे मंदिर समितीचे कार्यकर्ते श्री विठ्ठलाची अवकृपाच ओढवून घेत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन मंदिर समितीला याविषयी विचारले पाहिजे ! - संपादक) त्याचप्रमाणे अन्य वेळी चालणारी कीर्तनेही बंद करण्यात आली आहेत.

या अग्निदिव्यातूनच उजळणार आहे सनातनची महती ।

     राजकारणी अन् प्रसारमाध्यमे ।
    सनातनवर करत आहेत खोटे आरोप ।
     त्या विरोधात लढा देणारे सनातनचे प्रवक्ते ।
    सत्य परिस्थिती मांडून विरोधकांची उडवत आहेत झोप ॥ १ ॥

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तपत्रांची माहिती कळवा !

    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत.

पवित्र आर्य संस्कृतीची अवहेलना रोखणे आणि तिचे स्वतः आचरण करून अशांत जगालाही दुःख दूर होण्यासाठी आर्य संस्कृतीचा मार्ग दाखवणे, हे भारतियांचे कर्तव्यच !

     भारतीय लोक आज आपल्या घरची महान संस्कृती आणि तिचे पावन सिद्धांत यांच्यापासून अनभिज्ञ राहून परमुखापेक्षी (परकीय संस्कृतीच्या मागे लागणे) बनत आहेत. आपल्या पवित्र आर्य संस्कृतीची अवहेलना करून केवळ अर्थ (धन) आणि अधिकार यांच्या मागे लागून, उन्मत्त होऊन ते सनातन धर्माच्या विनाशातच आपले कल्याण आहे, असे समजत आहेत. त्यामुळे ते पुढील आयुष्यात पाप आणि दुःख यांच्या दलदलीत फसत आहेत. त्यांनी शीघ्र सावध व्हावे ! येथील निवासींचे तर हे परमकर्तव्य आहे. 
    पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या मागे लागणार्‍या लोकांनी आपल्या आर्य संस्कृतीला समजून घेऊन ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. भारताची अध्यात्मप्रधान संस्कृती हीच भारत देशाला स्वतःचा अभिमान वाटावा, अशी आहे. या अध्यात्म संस्कृतीला जाणून ती या अशांत जगाला दिल्यानेच जगाचे दुःख दूर होईल आणि ज्या योगे भारत आपल्या कर्तव्याचे पालन करू शकतो. 
-हनुमान प्रसाद पोद्दार

सनातनच्या विरोधकांवर प्रा. श्याम मानव यांनी संमोहन केले आहे का ?

    गेल्या काही दिवसांपासून विविध वृत्तवाहिन्यांवर पत्रकार, काही राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी, साम्यवादी आदी लोक सातत्याने कोणतेही पुरावे न देता सनातन संस्थेवर आरोप करत आहेत. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणीही करत आहेत. संमोहनातील तज्ञ असलेल्या प्रा. श्याम मानव यांनी या सर्वांना संमोहित तर केले नाही ना ?

संमोहनाच्या आधारे अशक्य गोष्टीही शक्य करता येतात, हा शोध लावणार्‍यांना नोबेल पारितोषिक का देत नाही ?

    विविध वृत्तवाहिन्यांवर जाऊन प्रा. श्याम मानव सांगत आहेत, संमोहनाला अध्यात्माची जोड देऊन व्यक्तींना संमोहित करता येते. त्यांच्या मेंदूचे प्रोग्रॅमिंग केल्यानंतर त्यांच्याद्वारे गुन्हेगारी कृत्ये करवून घेतली जातात. कृत्ये झाल्यानंतर पुढे त्या व्यक्तीच्या मेंदूतील प्रोग्रॅमिंग पुसले जाते. ते कृत्य करणार्‍यालाही आपण काय केले ?, हे लक्षात येत नाही. त्यामुळे डॉ. दाभोलकर, पानसरे किंवा कलबुर्गी यांचे मारेकरी सापडले, तरी खर्‍या सूत्रधारापर्यंत पोहोचणे अवघड आहे. प्रा. मानव जे सांगतात, ते खरे असेल, तर हे एक मोठे संशोधन आहे. या संमोहन पद्धतीचा शोध लावणार्‍यांना नोबेल पारितोषिक का देऊ नये ? अमेरिका, चीन, रशिया इत्यादी देश याचा वापर का करत नाहीत ?

पानसरे हत्या प्रकरणात संमोहनाच्या सूत्रावरून वृत्तवाहिन्यांवर विनोदाची मालिका !

१. एका वृत्तवाहिनीवर प्रा. श्याम मानव यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक हे स्वतःच संमोहित झालेले आहेत, असे विधान केले. वस्तूतः संमोहित झालेली व्यक्ती ज्याने तिचे संमोहन केले आहे, तिचे सोडून अन्य कुणाच्याही प्रश्‍नांची उत्तरे देत नाही. प्रत्यक्षात श्री. वर्तक मात्र नियमितपणे पत्रकार परिषदा घेतात, तसेच सर्व पत्रकारांच्या प्रश्‍नांची उत्तरेही देत असतात. त्यामुळे प्रा. मानव यांचे हे विधान त्यांच्या संमोहनतज्ञ असण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करते.
२. कृषीमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी सनातन संस्थेवर बंदी घालायची, तर एम्आयएम्वरही बंदी घालावी लागेल, असे विधान केले. त्या संदर्भात प्रतिक्रिया देतांना खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी श्री. खडसे यांनाच संमोहित केले आहे, असे हास्यास्पद विधान केले.     

दैनिक सनातन प्रभातची एका वाचकाला जाणवलेली वैशिष्ट्ये

१. दैनिक सनातन प्रभात आल्यावर प्रसन्नता वाटणे
    सकाळी उठल्यावर जर चांगल्या माणसाचे दर्शन झाले, तर दिवस चांगला जातो, असे म्हणतात आणि हे खरे आहे. आम्ही दैनिक सनातन प्रभातची उत्सुकतेने वाट पहातो. तो आल्यावर आम्हाला प्रसन्नता वाटते.
२. साधकांच्या निष्काम साधनेमुळे चैतन्य निर्माण करणारे,
ताजेतवाने करणारे विचार दैनिक सनातन प्रभातमधून मिळणे
    सकाळी उठल्यावर मनाला तरतरी आणणारे, चैतन्य निर्माण करणारे, ताजेतवाने करणारे विचार सनातन प्रभातद्वारे मिळत असल्याने आमचा दिवस चांगला जातो. दैनिक सनातन प्रभातच्या प्रत्येक शब्दात जे चैतन्य आहे, ते साधकांच्या निष्काम साधनेमुळे त्यात आले आहे, असे वाटते आणि तेच कार्य करत आहे. याउलट इतर नियतकालिके वाचून उभारी, समाधान आणि चैतन्य मिळत नाही. आम्ही नुसती पाने उलटवतो.

वाचा रविवारच्या अंकात

  • सनातनवर झालेले धादांत खोटे आरोप आणि त्या आरोपांविषयी सनातनने केलेला परखड प्रतिवाद
  • सनातनच्या साधिकांवर झालेले आरोप आणि त्या आरोपांचा साधिकांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेला परखड प्रतिवाद
  • सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे संत, धर्माचार्य, हिंदुत्ववादी आणि धर्माभिमानी हिंदू
  • आपली प्रत आजच राखून ठेवा !

प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या आणि प्रेमभाव हा स्थायीभाव असल्याने साधकांशी आपुलकीचे नाते निर्माण करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केलेेल्या नागपूर येथील सौ. नम्रता विनय शास्त्री (वय ६४ वर्षे) !

सौ. नम्रता शास्त्री
     नागपूर येथील साधिका सौ. नम्रता शास्त्री नागपूर केंद्राचे केंद्रसेवक म्हणून दायित्व पहात आहेत. गुरुपौर्णिमा २०१५ ला त्यांचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. नागपूर येथील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. प्रसन्न व्यक्तिमत्त्व
१ अ. हवाहवासा वाटणारा सहवास : सौ. शास्त्रीकाकू नेहमी प्रसन्न असतात. त्यांच्या घरात गेल्यावरही पुष्कळ प्रसन्न वाटते. सर्वांची विचारपूस करणे आणि मनमोकळेपणा यांमुळे त्यांचा सहवास सर्वांना हवाहवासा वाटतो.
१ आ. बोलणे ऐकावेसे वाटणे : सध्या त्यांच्या बोलण्यात अनेक सुंदर शब्दांचा संचय असतो. जणू काही सरस्वतीमाता ते शब्द उच्चारत आहे, असा भास होतो. त्यांचे बोलणे सदैव ऐकावेसे वाटते.
- सौ. नमिता काकडे

प्रत्येक कृती श्रीकृष्णाला जोडून भावविश्‍वात रमणारी ५१ टक्के पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील चि. गिरिजा नीलेश टवलारे (वय २ वर्षे ४ मास) !

चि. गिरिजा टवलारे
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भवती असल्याचे कळण्यापूर्वीच संतांचे दर्शन होणे : चि. गिरिजा हिच्या वेळी गर्भवती असल्याचे कळण्याच्या २ - ३ दिवस आधी पू. नंदकुमार जाधवकाका यांची भेट झाली होती. आमच्या घरी त्यांचे अल्पाहाराचे नियोजन होते. त्यामुळे गिरिजाला आरंभीपासूनच संतांचे आशीर्वाद मिळाल्याचे जाणवले.
१ आ. त्या नऊ मासांमध्ये (महिन्यांमध्ये) मला बाळकृष्णाच्या चित्राकडे बघावे, त्याच्याशी बोलावे, असे वाटायचे आणि तशी कृतीसुद्धा व्हायची.
१ इ. मला दूरचित्रवाणी बघणे, चित्रपटांमधील गाणी ऐकणे इत्यादी गोष्टींचा कंटाळा येत असे.

आश्रमात परतण्यासाठी व्याकूळ झालेल्या साधिकेने व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत !

    संत तुकाराम महाराजांनी पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी माघारी फिरतांना कन्या सासुरासी जाये..., अशा शब्दांत मनाची व्यथा एका अभंगात व्यक्त केली आहे. विठ्ठलभक्तांसाठी विठ्ठलच आई आणि पंढरपूरच माहेर वाटते. समस्त विश्‍व त्यांच्यासाठी केवळ सासर वाटत होते. साधकांसाठी गुरु हीच माऊली असते आणि आश्रम हेच आध्यात्मिक माहेर असते. सर्व साधक सहोदरांप्रमाणेच अतिशय जवळचे असतात. त्यामुळे काही दिवस देवद आश्रमात वास्तव्य करून पुन्हा घरी परतलेल्या साधिकेलाही अशाच प्रकारची आलेली अनुभूती येथे देत आहोत.    
१. आश्रमातील प्रत्येक साधक म्हणजे देवाने निर्माण केलेले अद्भूत फूल आहे, असे वाटणे
    मी ऑक्टोबर २०१४ मध्ये पहिल्यांदाच देवद आश्रमात काही दिवस रहायला आले. तेथे सेवा केल्यानंतर मन स्थिर, शांत आणि प्रसन्न झाले. साधकांमध्ये प्रेमभाव, आदर आणि आत्मीयता अनुभवायला मिळाली. आश्रमातील वातावरणही पुष्कळ सात्त्विक आणि शांत आहे. आश्रमातील प्रत्येक साधक म्हणजे ईश्‍वराने निर्माण केलेले अद्भुत असे फूल आहे. प्रत्येकाचा रंग, रूप आणि सुगंध असे वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक साधक वेगळा आहे, तरीही एक आहे. जसे वेगवेगळी फुले घेऊन हार बनवला जातो. तसेच प.पू. डॉक्टरांनी प्रत्येक साधकाला साधनेच्या माध्यमातून एका माळेत गुंफले आहे आणि ते साधक पूर्णपणे श्रीगुरूंना अन् श्रीकृष्णाला समर्पित असे जीवन जगत आहेत.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज यांच्या सेवेत असतांना
त्यांचा लाभलेला चैतन्यदायी सत्संग !

१. पूजा करतांना भावपूर्ण आणि एकाग्रतेने देवाचे स्मरण करावे !
    प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीतील देवपूजा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी प.पू. महाराजांनी सांगितले, आपण पूजा करतांना भावपूर्ण करायला पाहिजे. जेवढे भावपूर्ण आणि एकाग्रतेने देवाचे स्मरण करू, तेवढा भाव आणि चैतन्य आपण करत असलेल्या पूजेमध्ये उतरत असते. त्याचा इतरांमध्ये भाव वाढण्यासाठी, मन एकाग्र होण्यासाठी लाभ होतो आणि चैतन्य जाणवते.
२. प्रत्येक सेवा ही देवाची पूजा आहे, असा भाव ठेवायला हवा !
    एकदा पूजा करतांना त्यांनी मला विचारले, तू देवपूजा करत होतीस आणि सचिनदादा (प.पू. महाराज यांच्या खोलीची स्वच्छता करणारा साधक श्री. सचिन हाके) फरशी पुसत होता. तुम्हा दोघांमध्ये काय भेद आहे ? प्रथम मला काही सुचले नाही. नंतर लगेच देवाने सुचवले की, मी भगवंताची पूजा करत होते, तर सचिनदादाही भगवंताचीच पूजा करत होता. तेव्हा प.पू. महाराजांनी प्रत्येक कृतीमध्ये असाच भाव ठेवण्यास सांगितले.

नोकरी करून उरलेल्या वेळेत तळमळीने सेवा करणारे पनवेल येथील श्री. आनंद जोशी !

    एक दिवस पनवेल येथील साधक श्री. आनंद जोशी यांना पुण्याला जायचे होते. त्या दिवशी लवकर उठून त्यांनी स्वतःचे सर्व आवरले आणि दैनिक वितरणाची सेवा करून सकाळी ६ वाजता पुण्याला गेले. रात्री ८.३० वाजता पुण्याहून परत आल्यावर त्यांनी मला संपर्क करून विचारले, मी आश्रमात उत्पादन विभागात सेवेला जाऊ का ? त्या वेळी उत्पादन विभागात तातडीच्या सेवेसाठी साधकांची आवश्यकता होती. मी त्यांना म्हटले, काका, तुम्ही एवढा प्रवास करून आलात, तर दमला असाल ना ? त्यावर ते म्हणाले, सेवेतून चैतन्य मिळते. पटकन स्वयंपाक करतो आणि जेवून जातो. त्या दिवशी त्यांच्या घरी कोणी नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतःच जेवण बनवले आणि जेवण करून रात्री १० वाजता सेवेला गेले. रात्री २-३ घंटे सेवा करून दुसर्‍या दिवशी सकाळी परत नोकरीवर गेले. या सर्व धावपळीतून त्यांची सेवेची तळमळ आणि सेवेविषयी असलेला भाव शिकायला मिळाला.
    साधकांमध्ये अशी सेवेची तळमळ निर्माण करणार्‍या श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.
- सौ. अनुराधा मुळ्ये, पनवेल (१४.४.२०१५)

देवाची आवड असणारा, कुटुुंबियांना साधनेचे स्मरण करून देणारा आणि कृष्णमय झालेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला धुळे येथील चि. श्रीकृष्ण बागुल (वय ३ वर्षे) !

    धुळे येथील सनातनचे साधक श्री. पंकज बागुल यांचा मुलगा चि. श्रीकृष्ण याचा २.१०.२०१५ या दिवशी तिसरा वाढदिवस आहे. लहानपणापासूनच त्याला देवाचे वेड आहे. सनातनचे साधक किंवा संत घरी आल्यावर त्याला आनंद होतो. तो घरी आलेल्या साधकांकडे आणि पाहुण्यांकडे पाहून स्मितहास्य करून त्यांना नमस्कार करतो. त्याला पाहिल्यावर बाहेरची व्यक्तीही म्हणते की, हे ईश्‍वरी बाळ आहे ! त्याची श्रीकृष्णावर आणि प.पू. डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा असून तो कितीही रडत असला अन् त्याला या दोन्ही प्रतिमा दाखवल्या, तरी त्याचे रडणे थांबते. श्रीकृष्णची आई, वडील आणि आजी यांना जाणवलेली त्याची वैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
तृतीय वाढदिवसानिमित्त चि. श्रीकृष्ण पंकज बागुल
याला सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. राधिका पंकज बागुल (श्रीकृष्णची आई)
१ अ. श्रीकृष्णाच्या कृपेनेे नवीन जन्म मिळाला, अशी श्रद्धा असणे : जन्मतः श्रीकृष्णाला पुष्कळ गंभीर आजार होता; पण श्रीकृष्णाच्या कृपेनेे तत्परतेने वैद्यकीय उपचार उपलब्ध झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यामुळे श्रीकृष्णाच्या कृपेनेे त्याला मिळालेला हा नवीन जन्मच आहे.

प्रेमभाव, तत्त्वनिष्ठता आणि श्रीकृष्णाप्रती अपार भाव या गुणांचा समुच्चय असणार्‍या देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. रोहिणी ताम्हनकर (वय ५२ वर्षे) !

सौ. रोहिणी ताम्हनकर
१. काकू सतत हसतमुख आणि आनंदी असतात.
२. निरीक्षणक्षमता

अ. त्या देवदला आल्यावर आश्रमात सेवेसाठी जातात. तेथे सेवा करतांना अल्प वेळातच त्यांना सहसाधकांचा स्वभाव, त्यांच्या चुका, गुण-दोष हा भाग लक्षात येतो आणि त्या त्यांना त्यासाठी साहाय्यही करतात.
- सौ. मनीषा गाडगीळ (सौ. ताम्हनकर यांची विहीण)
आ. कुठेही गेली, तरी आई एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा
आहे ?, हे लगेच ओळखते. 
इ. सेवा करतांनाही ती प्रत्येक सेवेच्या संदर्भात निरीक्षण करून त्यातील बारकावे विचारते.

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना

दीपावली आणि कार्तिकी एकादशी यांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ,
सात्त्विक उत्पादने, तसेच ध्वनीचित्र-चकत्या यांचे अधिकाधिक वितरण करा !
    नोव्हेंबर २०१५ मध्ये दीपावली आणि कार्तिकी एकादशी असणार आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच ध्वनीचित्र-चकत्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोेचवण्याची सुवर्णसंधी गुरुकृपेमुळे लाभत आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेल्या प्रसारसाहित्याचे अधिकाधिक वितरण करावे.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

आजचा अंक संग्रही ठेवा किंवा वितरकांकडे जमा करा !
    सनातन प्रभातच्या आजच्या अंकात समाजात विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे असल्याने साधकांनी हा अंक संग्रही ठेवावा आणि त्यातील सूत्रांचा अभ्यास करावा. वाचकांना हा अंक वाचून झाल्यानंतर संग्रही ठेवायचा नसल्यास त्यांनी तो जवळच्या वितरकांकडे जमा करावा !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

सूर्याला प्रदक्षिणा कशी घालाल ?
    मनाला पृथ्वीच्या ठिकाणी नेऊन 
त्याद्वारे सूर्याला प्रदक्षिणा घालायची. 
मनाला तेवढे व्यापक केले नाही, 
तर प्रदक्षिणा होत नाही !
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवादी यांनाही संमोहित केले, असे म्हणतील !
१. भुंगा फुलाकडे आकृष्ट होतो, तेव्हा फुलाने भुंग्याला संमोहित केले, असे म्हणता येईल का ?
२. एखाद्या मुलाचे मुलीवर प्रेम असले किंवा मुलीचे मुलावर प्रेम असले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले, तर एकाने दुसर्‍याला संमोहित केले, असे म्हणता येईल का ?
३. कोणाला एखाद्या विषयाची आवड असली, तर त्या विषयाने त्याला संमोहित केले, असे म्हणता येईल का ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.१०.२०१५)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आध्यात्मिक प्रगती होण्याचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप पालटत जातो आणि शाश्‍वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अढळपद
अशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी ऊठ म्हणून
सांगणार नाही. असे बोला की, हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही.
भावार्थ : ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर ऊठ असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बेळगावकडे दुर्लक्ष होतेय् !

    अनंतचतुर्दशी नुकतीच पार पडली. बेळगाव येथील हिंदूंच्या पाचवीला काय पूजले गेले आहे की, ज्यामुळे त्यांना त्यांचे सण-उत्सव साजरे करण्यात आडकाठी यावी ! धर्मांधांनी या शहरात केलेल्या दंगलीत हिंदूंची अपरिमित हानी झाली. पोलीस निरीक्षक रमेश गोकाक धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत घायाळ झाले. त्यांच्या डोळ्याजवळ जखम झाली. पोलीस जेथे घायाळ होतात, तेथील कलहाचा अंदाज करणे कठीण नाही. पोलीस अधिकारी दंगल न करण्याचे किंवा कायदा हातात न घेण्याचे आवाहन करत होते, तेव्हा दंगलखोर धर्मांध त्यांच्या सवंगड्यांना सांगत होते, पोलिसांचे ऐकू नका. पोलीस प्रशासनाला जेथे आव्हान दिले जाते, तेथे कायदा-सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ होणार नाही तर काय ? पोलिसांनी आवश्यक ती कारवाई केली नाही, याचे कारण उघड आहे. पोलीस धर्मांधांच्या दबावाला घाबरतात, ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn