Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

५ धर्मांधांना फाशी, तर ७ धर्मांधांना जन्मठेप

कथित आरोपांवरून हिंदूंच्या संतांना आणि हिंदुत्ववाद्यांना नाहक अपकीर्त करणारी
प्रसारमाध्यमे निष्पाप जनतेचे नाहक बळी घेणार्‍या धर्मांधांविषयी मात्र चर्चासत्र घेत नाहीत. यावरून प्रसारमाध्यमे केवळ हिंदु धर्मियांनाच कलंकित करण्याचे षड्यंत्र कसेरचत आहेत, हे उघड होते !
मुंबईतील पश्‍चिम उपनगरीय लोकलगाड्यांमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट प्रकरण
     मुंबई - ११ जुलै २००६ या दिवशी पश्‍चिम उपनगरीय लोकलगाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १२ पैकी पाच धर्मांधांना फाशीची, तर उर्वरित सात धर्मांधांना कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिक्षा झालेले हे बाराही आरोपी सिमी या प्रतिबंधीत जिहादी संघटनेशी संबंधित आहेत.

खासदारांवर होणारा वारेमाप खर्च थांबवा ! - पॅट्रीओटिक फोरम

राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग करून जनतेसमोर आदर्श ठेवणारे पूर्वीचे राजे, तर कुठे विविध सुविधा 
लाटून राज्यकर्ते कसे नसावेत, याचा आदर्श जनतेसमोर ठेवणारे आताचे लोकप्रतिनिधी !
     नवी देहली - भारतातील खासदारांची तीन वैशिष्ट्ये आहेत. एकतर ते राजकारणी, म्हणजेच स्वार्थी असून त्यांच्यावर कुठलीच बंधने नाहीत. दुसरे म्हणजे स्वत:चे पगार, भत्ते, सोयी, निवृत्ती वेतन ते स्वत:च ठरवतात. तिसरे असे की, भारतात लोकशाही असल्याने त्यांच्या कमाईत हस्तक्षेप करण्याचा कुणालाही अधिकार नाही. देहली येथील पॅट्रीऑटिक फोरम्ने लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांना पत्र लिहून खासदारांनी विविध सुविधा लाटून जनतेची कशी लूट चालवली आहे, याकडे लक्ष वेधले, आणि ते थांबवण्याचे आवाहन केले आहे.

मंगळुरू येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सनातन संस्थेला पाठिंबा !

संस्थेवरील बंदीच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा निर्धार !
कर्नाटकमध्ये सनातन संस्थेवरील बंदीला विरोध 
मंगळुरू (कर्नाटक) येथील बैठकीला
उपस्थित हिंदु धर्माभिमानी
     मंगळुरू (कर्नाटक) - सनातन संस्थेवरील बंदीच्या विरुद्ध समस्त हिंदुत्ववादी संघटनांची एक बैठक शहरातील बाळंभट सभागृहात पार पडली. या बैठकीत सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १ ऑक्टोंबर या दिवशी आंदोलन करण्याचा निश्‍चय करण्यात आला. या सभेत चिरंजिवी युवक मंडळ कानर्प, हिंदू महासभेचे श्री. धर्मेंद्र, श्रीराम सेनेचे कर्नाटक राज्य दक्षिण प्रांत उपाध्यक्ष श्री. कुमार मालेमार, हिंदु युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर चंद्र, पतंजली योग समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री. जगदीश शेट्टी, बेळ्तंगडीचे श्री. जयराज साल्यान, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. विजयकुमार, तसेच सनातन संस्थेचे श्री. विनोद कामत यांच्यासह ४२ हिंदुत्ववादी उपस्थित होते.

नवजात बालकांची फटाक्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

समाजासाठी हानीकारक असणार्‍या फटाक्यांवर निर्बंध घालण्यासाठी 
अशी याचिका दाखल करावी लागते, हे दुर्दैव !
     नवी देहली - आमच्या फुफ्फुसांचा पूर्ण विकास न झाल्याने फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदुषण आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी येथील तीन नवजात बालकांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली आहे. भारतात नवजात बालकांनी याचिका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. (फटाक्यांमुळे पैशांचा चुराडा होतो. देश आर्थिक संकटात असतांना अशा प्रकारे पैशांचा अपव्यय जनतेला परवडणारा नाही ! - संपादक) देहली येथील अर्जुन गोपाल (वय दोन मास), आरव भंडारी (वय तीन मास) आणि झोया राव भासीन (वय १४ मास) यांनी ही याचिका दाखल केली असून त्यांच्या वतीने त्यांचे पालक न्यायालयासमोर त्यांची बाजू मांडणार आहेत. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली आहे. दिवाळी, दसरा आणि अन्य सणासुदीच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांत देहली हे जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर म्हणून समोर येत आहे. वाढत्या प्रदुषणासमवेतच पिक जळणे, उघड्यावर सांडपाणी सोडणे यांमुळे मानवी स्वास्थ्यावर होणारे विपरित परिणाम यांचाही अभ्यास केला जावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. 

प्रवेश करण्यापूर्वी शिंपडले जाईल गोमूत्र आणि लावला जाईल टिळा

गुजरातमध्ये अन्य धर्मियांना गरब्यात प्रवेश करण्यावर पायबंद घालण्यासाठी नियमावली सिद्ध
     मांडवी (गुजरात) - गुजरातमध्ये नवरात्रोत्सव पुष्कळ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्रीच्या काळात तेथे गरब्याचे आयोजन करण्यात येते. या वेळी आयोजकांनी गरब्यात सहभागी होण्यासाठी येणार्‍यांकरिता नियमावली सिद्ध करण्यास आरंभ केला आहे. एका आयोजकांनी केलेल्या नियमावलीनुसार गरब्यात येणार्‍या प्रत्येकाला टिळा लावण्यात येणार आहे आणि गोमूत्र शिंपडून त्याचे स्वागत करण्यात येणार आहे. गरब्यात हिंदु देवतांना न मानणार्‍या मुसलमानांना सहभागी करवून न घेण्याच्या दृष्टीने अशी नियमावली बनवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सनातन हिंदु समाज या बॅनरखाली २७ सप्टेंबरला येथील गरबा आयोजकांची बैठक झाली. त्यात या नियमावलीसंदर्भातील निर्णय घेण्यात आला. गरबा आयोजक रघुवरसिंह जडेजा म्हणाले, मातेच्या उत्सवाचे पावित्र्य टिकून रहावे आणि देवतांना न मानणार्‍या अन्य धर्मियांना पायबंद घालण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. यासमवेतच गरब्याची छायाचित्रे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. जर कुणी अशा प्रकारे गरब्याची छायाचित्रे काढतांना आढळला, तर त्याचा छायाचित्रक अथवा भ्रमणभाष संच जप्त करून पोलिसांकडे देण्यात येईल.

सनातन संस्थेला समस्त हिंदुत्ववादी संघटनेचा पाठिंबा

     गुळेदगुड्ड (कर्नाटक) - सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी होत असलेल्या मागणीच्या विरोधात २७ सप्टेंबर या दिवशी मुरुघमठ येथे सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन बैठक घेतली. या बैठकीत अटलबिहारी वाजपेयी संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धर्मस्थळ मंजुनाथ संघ, हिंदू जागरण वेदिका, सहज स्थिती योग, सेवा भारती संघ तसेच भारतीय जनता पक्ष यांच्या पदाधिकार्‍यांसह ३९ धर्माभिमानी उपस्थित होते. या बैठकीत सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्याचे ठरले.

सनातन संस्थेवरील बंदीच्या विरुद्ध हुब्बळ्ळी येथे श्रीराम सेनेची बैठक

     हुब्बळ्ळी (कर्नाटक) - सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात श्रीराम सेनेच्या वतीने येथील (पांजरपोळ) कार्यालयात धर्माभिमान्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु महासभा तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमध्ये या वेळी मानवी साखळी करून रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सनातन संस्था निर्दोष आहे ! - अधिवक्ता अमृतेश, सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

सनातन संस्थेवरील आरोपांच्या विरोधात बेंगळुरू येथे 
धर्माभिमानी अधिवक्त्यांकडून सांकेतिक आंदोलन 
डावीकडून पहिली ओळ अधिवक्ता मोहन, अधिवक्ता
रामदास केसरकर, अधिवक्ता अमृतेश, अधिवक्ता
विश्‍वनाथ एच्.आर्, पाठीमागे डावीकडून हर्षवर्धन शेट्टी,
अधिवक्ता कॅप्टन अरविंद शर्मा आणि गुरुप्रसाद
     बेंगळुरू - विचारवंतांच्या हत्येेप्रकरणी सनातन संस्थेवर खोटे आरोप करण्यात येत असल्याविषयी आणि संस्थेवर होत असलेल्या बंदीच्या विरोधात २८ सप्टेंबर या दिवशी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य श्री. अमृतेश यांच्या नेतृत्वाखाली बेंगळुरू येथील उच्च न्यायालयाच्या आवारात सांकेतिक आंदोलन करण्यात आले.
     या वेळी श्री. एन्. पी. अमृतेश म्हणाले, सनातन संस्था निर्दोष आहे. गुन्ह्याचे अन्वेषण करून आरोपीला शोधणे, हे पोलिसांचे दायित्व आहे. ते पोलिसांनी योग्य रीतीने पार पाडावे. या प्रसंगी सनातन संस्थेचे कायदाविषयक सल्लागार आणि अधिवक्ता रामदास केसरकर, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद, समितीचे हासन जिल्हा समन्वयक श्री. हर्षवर्धन शेट्टी आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे इतर अधिवक्ता सदस्य उपस्थित होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनचे विरोधक सौरभ लोटलीकर यांची धमकी ! (म्हणे) रामनाथी येथील सनातनचा आश्रम ७ दिवसांच्या आत बंद करा अन्यथा आंदोलन !

देश-विदेशातील जिज्ञासू सनातनच्या रामनाथी आश्रमात येऊन साधनेचा लाभ घेत असतांना कावळ्याच्या शापाने गाय मरेल, या भरवशावर असणारे येथीलच काही लोक आश्रम बंद करण्याची मागणी करतात !
     फोंडा - रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेचा आश्रम ७ दिवसांच्या आत बंद करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनाचा भाग म्हणून आश्रमासमोरून मोर्चा काढण्यात येईल आणि मोर्च्याच्या काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला शासन उत्तरदायी राहील, अशी धमकी रामनाथी येथील सनातनचे विरोधक सौरभ लोटलीकर यांनी त्यांच्या घरी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (पोलीस या धमकीची दखल घेतील का ? - संपादक) या वेळी सौरभ लोटलीकर यांची आई शर्मिला लोटलीकर, रामनाथ नाईक, दिनेश रामनाथकर आणि सिद्धार्थ रामनाथकर उपस्थित होते.

आय.एस्.आय.एस्. कडून दसरा-दिवाळीच्या काळात देहलीवर आक्रमण करण्याची शक्यता ! - गुप्तचर विभाग

या आतंकवादी संकटाचा सामना करण्यासाठी भारताची काय सिद्धता आहे ?
    नवी देहली - आय.एस्.आय.एस्. ही आतंकवादी संघटना दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात देहलीवर आक्रमण करण्याची शक्यता आहे, अशी चेतावणी भारतीय गुप्तचर विभागाने देहली आणि राजस्थान पोलिसांना दिली आहे. ही आक्रमणे एकांड्या शिलेदाराकडून होण्याची अथवा सिमी संघटनेच्या कार्यपद्धतीनुसार २-३ अतिरेक्यांकडून होण्याची शक्यता आहे.
१. देहली पोलिसांनी आतंकवादी कारवायांविरुद्ध स्थापन केलेल्या विशेष विभागाला गुप्तचर विभागाने पाठवलेल्या चेतावणीविषयी अवगत केले आहे.
२. सिमी, लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन या संघटनांचे देहलीत गुप्त जाळे (स्लीपर सेल) पसरले असून या संघटना आय.एस्.आय.एस्.ला मिळाल्या आहे. त्यामुळे देहली हे आतंकवाद्यांच्या आक्रमणासाठी अधिक योग्य वातावरण आहे.

आसाममध्ये आय.एस्.आय.एस्.ला मिळणार्‍या वाढत्या प्रतिसादामुळे पोलीस प्रशासन सतर्क

संपूर्ण जगाला इस्लामी राष्ट्र बनवायला निघालेल्या आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी 
संघटनेचे भारत लक्ष्य असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यादृष्टीने हळूहळू या संघटनेने 
तिची पाळेमुळे भारतात घट्ट करण्यास आरंभ केला आहे. या संकटाचा गांभीर्याने विचार करून 
शासनाने कठोर पावले उचलायला हवीत, हीच जनतेची अपेक्षा !
     गौहत्ती (गुवाहाटी) - भारताच्या उत्तर पूर्व भागात असणार्‍या आसाम राज्यात आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेला मिळणार्‍या प्रतिसादात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आंतरजालावरील विविध संकेतस्थळांवर असणारी आय.एस्.आय.एस्. संबंधित वृत्ते आणि छायाचित्रे यांचा प्रभाव येथे वाढत चालला आहे, अशी माहिती आसामचे पोलीस महासंचालक खगन शर्मा यांनी दिली. येथे धार्मिक कट्टरतावादी लोकांची संख्या अधिक असल्यानेच आय.एस्.आय.एस्.विषयीचे येथील लोकांतील स्वारस्य वाढत जात आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

बांगलादेशमध्ये इटालियन व्यक्तीची हत्या

आय.एस्.आय.एस्.ने स्वीकारले दायित्व
शेजारी राष्ट्रात आय.एस्.आय.एस्.ने हात-पाय पसरवणे, हे भारतासाठी धोकादायक !
     ढाका (बांगलादेश) - येथील डिप्लोमॅटीक क्वार्टर भागात एका इटालियन नागरिकाची गोळी मारून हत्या करण्यात आली. सेसारे टवेला असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या हत्येचे दायित्व आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेने स्वीकारले आहे. त्यामुळे आय.एस्.आय.एस्.ने आता भारताच्या शेजारी असलेल्या देशात हात-पाय पसरवण्यास आरंभ केला असल्याच्या वृत्तांना बळकटी मिळाली आहे. यांसदर्भात आय.एस्.आय.एस्. या संघटनेने एक ऑनलाईन स्टेटमेंटद्वारे हे दायित्व स्वीकारले असून बांगलादेशात असे कृत्य केल्याचा या संघटनेचा हा पहिलाच प्रकार उघड झाला आहे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या ब्लॉगवर चंद्रग्रहणाविषयी माहिती देणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण लेखाला एका दिवसात ८७ सहस्र ११७ जिज्ञासूंनी दिली भेट !

     मुंबई - २८ सप्टेंबर या दिवशी चंद्रग्रहण होते. त्या दिवशी पौर्णिमा होती. या काळात चंद्र हा लालसर रंगाचा झाला. त्यामुळे इंटरनेटवर या चंद्राला ब्लड मून अशी उपमा देण्यात आली होती आणि त्याविषयी सर्वत्र माहिती प्रसारित करण्यात येत होती. याची दखल घेऊन ब्लड मून : अ साईन ऑफ द एण्ड ऑफ टाइम्स ? (रक्त चंद्र : काळाचा शेवट असल्याचे लक्षण ?) या मथळ्याखाली लेख स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या www.spiritualresearchfoundation.org या संकेतस्थळावरील ब्लॉगवर प्रसारित करण्यात आला होता. त्यामध्ये ग्रहणाच्या काळात आध्यात्मिक स्तरावर होणारे परिणाम यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली होती. २८ सप्टेंबर या एका दिवशी या ब्लॉगला ८७ सहस्र ११७ जिज्ञासूंनी भेट दिली. प्रतिदिन भेट देणार्‍या वाचसंख्येपेक्षा ही वाढ तिप्पट होती.

बडोदा (गुजरात) येथे जागरूक महिलेने श्री गणेशाचे विडंबन थांबवले

     बडोदा (गुजरात), ३० सप्टेंबर - येथे सौ. सोनाली पोत्रेकर यांच्या संकुलात साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवात श्री गणेशाच्या आरतीनंतर देण्यात येणार्‍या आक्षेपार्ह घोषणा सौ. पोत्रेकर यांनी थांबवल्या आणि सर्व भाविकांना श्री गणेशाचे महत्त्व सांगितले. त्यांच्या या कृतीला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
    सौ. पोत्रेकर यांच्या संकुलात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात श्री गणेशाच्या आरतीला संकुलातील अनेक सदस्य येतात. एकदा आरतीनंतर एक स्टार बे स्टार गणपती छे सुपर स्टार (एक स्टार दोन स्टार गणपती आहे सुपर स्टार !), ही घोषणा एका वृध्द महिलेने दिल्यानंतर लहान मुलांकडून मोढांमा च्युइंगम, गणपति हमारो सिंघम (तोंडात च्युइंगम, गणपती आमचा सिंघम !); एक फूल बे फूल गणपति छे ब्युटीफूल (एक फूल दोन फूल गणपति आहे ब्युटीफूल !); एक सिंग दो सिंग गणपति है हनि सिंग (एक सिंग दोन सिंग गणपति आहे हनी सिंग !) , अशा घोषणा दिल्या जात होत्या. यातून श्री गणेशाचे विडंबन होते, असे सौ. पोत्रेकर यांच्या लक्षात आले. या संदर्भात त्यांनी एकदा निषेध नोंदवला; परंतु घोषणा देणार्‍या मुलांच्या पालकांना याविषयी काहीच वाटले नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांनी ध्वनीक्षेपकावरून उपस्थितांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली आणि त्यांना नम्रपणे प्रार्थना करून शास्त्र सांगितले. यानंतर १०० हून अधिक भाविकांनी टाळ्या वाजवून सौ. पोत्रेकर यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच लहान मुलांकडूनही आक्षेपार्ह घोषणा देणे बंद झाले.

सनातनचे प्रवक्ता पूर्वकल्पना देऊन कार्यक्रमातून निघून गेले असतांनाही एबीपी न्यूजकडून सनातनचे प्रवक्ता कार्यक्रमातून पळून गेल्याचा कांगावा !

हिंदूंनो, खोटारडेपणाची परिसीमा गाठणार्‍या अशा वृत्तवाहिन्यांचे खरे स्वरूप जाणा !
एबीपी न्यूजकडून सनातनच्या प्रवक्त्यांचा हेतूपुरस्सर अवमान !
      मुंबई - सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना एबीपी न्यूज वाहिनीकडून नियोजनपूर्वक अवमान केल्याचा अनुभव आला. अन्य दूरचित्रवाहिन्यांवर चर्चासत्रासाठी जावे लागणार असल्याची पूर्वकल्पना श्री. वर्तक यांनी एबीपी न्यूजला दिली होती. त्यानुसार श्री. वर्तक यांना एबीपी न्यूजवरील कार्यक्रम चालू असतांना निघून जावे लागले; मात्र श्री. वर्तक कार्यक्रमातून उत्तर न देता पळून गेले, असा कांगावा एबीपी न्यूजच्या सूत्रनिवेदकाने केला. (टीआर्पी वाढण्यासाठी वाटेल ते करून एका आध्यात्मिक संस्थेचा बळी देण्यास निघालेल्या अशा वृत्तवाहिन्या म्हणजे लोकशाहीला कलंकच ! - संपादक)

संमोहनशास्त्राविषयी अपसमज पसरवणार्‍या प्रा. श्याम मानव यांनी क्षमा मागावी ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

टीव्ही ९ मराठीवरील चर्चासत्रात मागणी 
     मुंबई - अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे संमोहनाच्या आधारे मेंदूचे प्रोग्रॅमिंग करून त्यांच्याकडून गुन्हे करवून घेत असल्याचा आरोप केला आहे. सनातन संस्था मानवी बाँब बनवते, हा आरोप धादांत असत्य असून संमोहनशास्त्रामध्ये अशा प्रकारे प्रोग्रॅमिंग करता येत नाही. असे असतांना प्रा. मानव यांनी सनातन संस्था आणि संमोहनशास्त्र यांचीही अपकीर्ती केली आहे. संमोहनशास्त्राविषयी प्रा. मानव यांचे मत हे अत्यंत घातक आहे आणि त्यामुळे सामान्य लोकांचा संमोहनशास्त्रावरील विश्‍वास उडून जाऊ शकतो. त्यामुळे प्रा. मानव यांच्यावर ड्रग्ज अ‍ॅण्ड रिमेडीज् अ‍ॅक्टच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. एका लोकहितोपयोगी उपचारपद्धतीचा अपप्रचार केल्याविषयी त्यांनी कान पकडून सर्वांची क्षमा मागितली पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले.

मी मराठी वृत्तवाहिनीवरही अंनिसवाल्यांची पलायनपरंपरा चालूच !

सनातनचे संमोहनविषयक आव्हान प्रा. श्याम मानव यांनी स्वीकारलेच नाही ! 
चर्चासत्रात बोलतांना डावीकडून
श्री. अभय वर्तक आणि प्रा. श्याम मानव
     मुंबई - सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे साधकांना साधनेच्या नावाखाली संमोहित करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्ये करून घेतात, असा धादांत खोटा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांनी केला होता. त्या संदर्भात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी त्यांना आव्हान दिले की, तुम्ही समाजातील कोणत्याही १० व्यक्ती घेऊन त्यांच्याकडून संमोहनाद्वारे कुकृत्य करून घेऊन दाखवावे अन्यथा सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी जाहीर क्षमायाचना करावी. या संदर्भात सरळसरळ पलायनवाद स्वीकारणारे प्रा. मानव म्हणाले,माझे भांडण तुमच्याशी नाही. तुमच्या डॉ. जे.बी. आठवले यांच्याशी आहे.

कृत्रिम हौदामध्ये विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती पालिकेकडून पुन्हा नदीमध्ये अयोग्यरित्या विसर्जित

पुणे महानगरपालिकेचा धर्मद्रोह आणि श्री गणेशभक्तांची फसवणूक !
 कृत्रिम हौदामध्ये विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींची पुन्हा विटंबना केली जाते, हे सनातन सांगते, ते सत्य आहे, हे दर्शवणारी घटना ! 
ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसून लोकांना हौदातील गणेशमूर्तींचे पुढे काय होते, याचे भान व्हावे, यासाठी ही छायाचित्रे प्रसिद्ध करत आहोत.
मध्यरात्री ट्रकमधून मूर्ती टाकतांना
     पुणे, ३० सप्टेंबर - अनंत चतुर्दशीच्या दिवशी, म्हणजेच २७ सप्टेंबर या दिवशी अनेक भाविक आणि मानाच्या ५ गणेशोत्सव मंडळांबरोबर काही गणेशोत्सव मंडळांनी दुष्काळी परिस्थितीचे कारण पुढे करत पुणे महानगरपालिकेच्या कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते. प्रत्यक्षात हौदामध्ये विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती महानगरपालिकेने २८ सप्टेंबर या दिवशी रात्री उशिरा पुणे-मुंबई महामार्गावरील वाकड येथील पुलावरून मालवाहू डंपरमधून नदीमध्ये फेकल्या. यावरून महानगरपालिकेने भाविक आणि श्री गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या आश्‍वासनाला हरताळच फासला आहे. (भाविकांची अशी घोर फसवणूक करण्यामागील भूमिका महानगरपालिका आयुक्त स्पष्ट करतील का ? महानगरपालिकेचा श्री गणेशमूर्ती हौदामध्ये विसर्जित केल्यानंतर त्या मूर्तीची माती शेतीसाठी वापरली जाते, असे सांगणार्‍या महानगरपालिकेचा हा कारभारात काळेबेरे असून तो अपारदर्शी आहे, असे म्हटले जाते, ते या चुकीच्या कृतीवरून सिद्ध होते. - संपादक) 
नदीच्या पात्रात घाणीत पडलेल्या गणेशमूर्तीचे अवशेष  
     विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना नद्या जतन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानंतर पुण्याचे महापौर श्री. दत्तात्रय धनकवडे आणि महानगरपालिका आयुक्त श्री. कुणाल कुमार यांनी आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत पुण्यातील मानाचे ५ गणपति, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति, अखिल मंडई गणपति मंडळ आणि इतर मंडळांनीही कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. 
१. पुणे महानगरपालिकेच्या वतीने २८ सप्टेंबर या दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ओंकारेश्‍वर पूल घाट, वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर घाट, भिडे पुलाजवळ आणि एस्.एम्. जोशी पूल या ठिकाणच्या कृत्रिम हौदांजवळ अनेक मालवाहू डंपर ट्रक हौदातील श्री गणेशमूर्ती काढण्यासाठी उभे होते. या वेळी महानगरपालिकेचे कर्मचारी आणि इतर कामगारही उपस्थित होते. 

५ ऑक्टोबरपर्यंत थडगे न काढल्यास हिंदू संघटित होऊन थडगे उद्ध्वस्त करतील ! - हिंदुत्ववाद्यांची शासनाला चेतावणी

दगडफेकीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप यांचा मोर्चा ! 
मोर्च्यात खडकगल्लीतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
      बेळगाव, ३० सप्टेंबर (वार्ता.) - अनंतचतुर्दशीच्या दिवशी ११.३० वाजता खडकगल्ली परिसरातील घरे आणि दुकाने यांच्यावर दगडफेक करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी आणि दगडफेकीच्या निषेधार्थ राजकीय पक्ष, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० सप्टेंबरला मोर्चा काढण्यात आला. यात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम सेना, बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती यांचा समावेश होता. 

अवैध मांस वाहतूक करणार्‍या अजिज पटवेगारवर अटकेची कारवाई : श्रीशिवप्रतिष्ठानची पोलीस ठाण्यात तक्रार

    मिरज, ३० सप्टेंबर (वार्ता.) - मांसाची अवैध वाहतूक केल्याच्या आरोपाखाली अजिज अहमद अब्दुल जब्बार पटवेगार (वय २६, गुरुवार पेठ, मिरज) याला मिरज शहर पोलिसांनी अटक केली होती. पटवेगार याला नंतर जामीन संमत करण्यात आला आहे. त्याच्याकडून ३६० किलो मांस आणि मोटारगाडी जप्त करण्यात आली आहे. हे मांस गाय आणि बैल यांचे असल्याची तक्रार श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. दिलीप शेगणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. हे मांस तपासासाठी भाग्यनगर येथे पाठवण्यात आले आहे.
१. बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गोहत्या होऊ नये, यांसाठी श्रीशिवप्रतिष्ठानचे गोरक्षक दल आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते लक्ष ठेवून होते. बुधवारच्या बाजारातही त्यांनी गायींची खरेदी करणार्‍यांवर लक्ष ठेवले.

नंदुरबार येथे आदर्श गणेशोत्सव चित्रफीत आणि प्रदर्शन यांना चांगला प्रतिसाद

प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू
हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम
      नंदुरबार (वार्ता.) - गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीने आदर्श गणेशोत्सव कसा असावा आणि कसा नसावा, या विषयीची चित्रफीत आणि धर्मशिक्षण देणारे प्रदर्शन आयोजित केले होते. त्याला जवळजवळ १० सहस्र नागरिकांनी याचा लाभ घेऊन उदंड प्रतिसाद दिला. २४ सप्टेंंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत हे प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रदर्शनाचा शुभारंभ माजी नगरसेवक मोहन रायभान माळी यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

दुर्गाडी घंटानाद प्रकरणी १५० आंदोलनकर्त्यांना अटक आणि सुटका !

     हिंदूंनो, तुमच्याच मंदिरात तुम्हाला पूजेसाठी मज्जाव करण्यात येत आहेे, हा धार्मिक अन्याय किती काळ सहन करणार आहात ? काँग्रेसप्रमाणे भाजपच्या राज्यात तुमच्यावर अन्याय होऊ देणार्‍यांना खडसवण्यासाठी संघटित व्हा !
     कल्याण, ३० सप्टेंबर (वार्ता.) - येथील दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिराचे दरवाजे नमाजाच्या वेळी बंद ठेवले जातात. तेथे जाऊन पूजा करण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्याच्या निषेधार्थ प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही घंटानाद आंदोलन केले. (हिंदूंनो, वारंवार आंदोलन करावे लागू नये, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! - संपादक) आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना मज्जाव करत पोलिसांनी १५० आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सुटका केली.  
१. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना पूजा करण्यास पोलिसांकडून अटकाव करण्यात येतो. याविरोधात शिवसेना गेली २५ वर्षे घंटानाद आंदोलन करत आहे.

ऐन गणेशोत्सवात संभाजीनगर येथील क्लोज्ड सर्किट टीव्ही यंत्रणा बंद

पोलीस प्रशासनाचा कूर्मगतीचा कारभार !
     संभाजीनगर, ३० सप्टेंबर - संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाडा आतंकवादी कारवायांमुळे संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. यापूर्वी मराठवाडा भागात ऐन सणासुदीच्या काळातच आतंकवाद्यांनी घातपात केला होता. असे असतांना संभाजीनगर येथील क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणा बंद पडली. त्यामुळे गणेशोत्सवात संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक संवेदनशील भागातील ध्वनीचित्रकांचा (कॅमेरा) नियंत्रण कक्षाशी (कंट्रोल रूम) असलेला संपर्क तुटला.

जनावरे धुणे, तसेच कचरा टाकणे यांसाठी चंद्रभागा नदीचा सर्रास वापर

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केवळ गणेशमूर्तींच्या विसर्जनाने प्रदूषण होत असल्याचा कांगावा करणारे प्रशासन आणि ढोंगी पर्यावरणवादी चंद्रभागा नदीचे अशा प्रकारे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी का प्रयत्न करत नाहीत ? 
 चंद्रभागा नदीत धुतल्या जाणार्‍या म्हशी
     पंढरपूर - येथील चंद्रभागा नदीत शहरातील शेकडो जनावरे प्रतिदिन नदीमध्ये धुतली जातात, नदीपात्रात कित्येक ठिकाणी कचर्‍याचे ढीग पडलेले आहेत. नदीपात्राच्या कडेला झोपडीत रहाणारे प्रातर्विधी तेथेच करतात, तसेच कुत्रे, गाढव, म्हशी यासांरख्या प्राण्यांचा अखंड वावर तेथे चालू असतो. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने येथे फलक लावण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, नदी स्वच्छ ठेवण्यासाठी वाहने, कपडे, जनावरे धुणे या गोष्टी टाळाव्यात. यांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल ! 

सनातन संस्थेची अपकीर्ती थांबावी आणि संस्थेवर बंदी येऊ नये, या मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील हिंदुत्ववादी संघटना आणि पक्ष यांचा स्तुत्य प्रयत्न 
सनातन संस्थेच्या पाठीशी असणार्‍या सर्वच हिंदुत्ववादी संघटना आणि पक्ष यांचे आभार ! 
 तहसीलदारांना निवेदन देतांना कार्यकर्ते आणि पदाधिकारी
      चोपडा (जिल्हा जळगाव) - येथे सकाळी ११ वाजता हिंदुत्ववादी संघटनांनी मिळून सनातन संस्थेची अपकीर्ती थांबावी आणि बंदी येऊ नये, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी बजरंग दलाचे उपतालुका प्रमुख सर्वश्री प्रवीण जैन, विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दलाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक राजेश पाटील, भाजपचे राजेश शर्मा, मनसेचे अनिल वानखेडे, स्वराज्य निर्माण सेनेचे सुनील सोनगुरे, शिवसेना शहर प्रमुख महेंद्र धनगर, युवासेना शहर प्रमुख प्रदीप बारी, हिंदु एकता ग्रुपचे अजय जैन यांसह मेघुराया मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शहरातील माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

जिंतूर (जिल्हा परभणी) येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांचे आक्रमण

हिंदूंनो, शांततेत उत्सव पार पाडण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे, हे जाणा !
    जिंतूर, ३० सप्टेंबर - शहरातील नेमगिरी रस्त्याकडे जाणार्‍या टी पॉइंटवर नेवाती मोहल्ला येथे एका गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी आक्रमण करून वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी ८ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. (शासन अशा धर्मांधांच्या मुसक्या केव्हा आवळणार ? - संपादक) येथील गजानन गणेेशोत्सव मंडळाची मिरवणूक चालू असतांना २७ सप्टेंबर या रात्री १०.४५ वाजता ही घटना घडली. धर्मांधांनी मिरवणुकीत नाचणार्‍या भाविकांना मारहाण करून वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख करीम आवेज खाँ, महेबूब खाँ पठाण, इरफान खाँ, शेख वाजेद मजहर खाँ, रफीक खाँ, गफार खाँ, शेख जावेद यांचा समावेश आहे.

चिंचवड येथे नदीतील गणेशमूर्ती खाणीत फेकल्या !

      चिंचवड, ३० सप्टेंबर (वार्ता.) - येथील बिर्ला रुग्णालयाच्या समोरील घाटावरून नदीत विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती बाहेर काढून खाणीत फेकण्यात आल्या. विसर्जनाच्या सलग दुसर्‍या दिवशीही हाच प्रकार पालिका कर्मचार्‍यांकडून करण्यात आला. या गणेशमूर्ती ट्रकमधून वाहून नेण्यात येत होत्या. (हिंदूंनो, देवतेची होणारी विटंबना रोखण्यासाठी कृतीशील व्हा ! - संपादक)

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तपत्रांची माहिती कळवा !

      कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत. 

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत १५० भ्रमणभाषची चोरी

     पुणे - पुणे शहरातील मध्यवस्तीमध्ये नुकतीच श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक पार पडली. या वेळी मिरवणुकीतील गर्दीचा अपलाभ उठवून चोरट्यांनी १५० भ्रमणभाष चोरल्याचा अंदाज आहे. विश्रामबाग, खडक, फरासखाना आणि स्वारगेट या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भ्रमणभाष चोरीच्या घटना घडल्या आहेत. (असुरक्षित पुणे शहर ! - संपादक) सर्वाधिक चोर्‍या या विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजे बेलबाग चौक आणि टिळक चौक या ठिकाणी झाल्या आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, शांततेत उत्सव पार पाडण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे, हे जाणा !
    जिंतूर (जिल्हा परभणी) येथील नेवाती मोहल्ला येथे एका गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी आक्रमण करून वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी ८ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Maharashtrake Parbhani jileme Ganesh visarjanki rallypar dharmandoka akraman.
- Shasan aisi dharmandopar lagam kab lagayega ?
जागो !
महाराष्ट्रके परभणी जिलेमे गणेश विसर्जनकी रॅलीपर धर्मांधोंका आक्रमण 
- शासन एैसी धर्मांधोंपर लगाम कब लगाएगा ?

घटनेतील तरतुदींच्या अधीन राहून सनातनच्या संदर्भात काही गोष्टी आढळल्या, तर शासन विचार करेल ! - सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, भाजप, महाराष्ट्र

      कोणती संस्था छोटी किंवा मोठी, कोणत्या संस्थेचा कोण प्रमुख आहे, कोणती संस्था काय कृत्य करते यापेक्षा जे जे समाज किंवा देश यांसाठी विघातक असेल, त्याचा निश्‍चितपणे अभ्यास केला जातो. प्रत्येक शासनाचे ते कर्तव्य आहे. जर सनातन संस्थेच्या संदर्भात घटनेमध्ये असणार्‍या तरतुदीच्या अधीन राहून काही गोष्टी आढळल्या, तर शासन विचार करेल. शासन एखाद्या संस्थेच्या संदर्भात दोषपूर्ण वागत नाही. तर ज्या दोषपूर्ण गोष्टी असतील, तर न्याय देण्याच्या दृष्टीने आणि त्या संस्थेच्या चुका असतील, तर त्यांना दंडित करण्याच्या दृष्टीकोनातून त्याचा विचार करावा लागेल.

लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्ववादी यांचा सनातन संस्थेला खंबीर पाठिंबा !

सनातनला गोवण्याचे हे षड्यंत्र आहे ! - श्री. अनंत गुढे, माजी खासदार, शिवसेना, अमरावती.
     हिंदूंना नेहमीच अपकीर्त करून हिंदु समाजावर दबाव आणला जातो. कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनला प्रथमपासूनच दोषी ठरवले गेले. ज्याप्रमाणे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडून पोलिसांना काहीच पुरावे सापडले नाहीत, त्याप्रमाणे संशयित समीर गायकवाड आणि सनातन संस्था निर्दोष आहेत. माझा सनातनला नेहमीच पाठिंबा होता आणि भविष्यातही मी सनातनच्या पाठीशी आहे.

सर्वसाधारणतः श्राद्धकर्म कसे असते ?

१. अपसव्य करणे : देशकालाचा उच्चार करून अपसव्य करावे, म्हणजे जानवे डाव्या खांद्याऐवजी उजव्या खांद्यावर घ्यावे. 
२. श्राद्धसंकल्प करणे : श्राद्धाला योग्य जे पितर त्यांची षष्ठी विभक्ती योजून अमुकश्राद्धं सदैवं सपिण्डं पार्वणविधीना एकोद्दिष्टेन वा अन्नेन वा आमेन वा हिरण्येन सद्यः करिष्ये, असा संकल्प श्राद्धकर्त्याने करावा. 
३. यवोदक आणि तिलोदक तयार करावेत. 
४. प्रायश्‍चित्तासाठी पुरुषसूक्त, वैश्‍वदेवसूक्त इत्यादी सूक्ते म्हणावीत. 
५. ब्राह्मणांना प्रदक्षिणा घालाव्यात आणि नमस्कार करावा. त्यानंतर श्राद्धकर्त्याने ब्राह्मणांना प्रार्थना करावी, आपण सर्वांनी हे कर्म सावधान, शांतचित्त, दक्ष आणि ब्रह्मचारी राहून करूया.

चर्चासत्रांचा गोंधळ !

     वृत्तवाहिन्यांवर रात्रीच्या वेळी चर्चासत्रांचे कार्यक्रम असतात. त्यात चर्चा अल्प आणि आरडाओरड्याचा कार्यक्रम असे अधिक असते. वाहिन्यांचा टीआर्पी वाढवणे हा उद्देश या चर्चेत सनसनाटी विषय घेण्यामागे असतो. सर्व वाहिन्यांचे मालक, संपादक हे तथाकथित साम्यवादी आणि समाजवादी विचारसरणीचे असल्याने हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करणे आणि स्वतः पुष्कळ बुद्धीमान असल्याचा आव आणत दुसर्‍याच्या अंगावर ओरडून स्वतःचेच खरे करणे, हेच त्यांचे ध्येय असते.

गुजरात राज्यातील सुरत, बडोदा आणि कर्णावती येथील धर्माभिमान्यांचा धर्मप्रसारासाठी लाभलेला उत्तम प्रतिसाद !

१. जिज्ञासू आणि धर्माप्रती प्रेम असलेले श्री. आणि सौ. त्रिवेदी ! : श्री. चिराग त्रिवेदी हे जिज्ञासू प्राध्यापक असून आध्यात्मिक वृत्तीचे आहेत. ते ज्या महाविद्यालयात शिकवतात, तेथील जवळपास ४०० विद्यार्थ्यांना धर्माविषयीची माहिती सांगून ते योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतात. सौ. त्रिवेदी यासुद्धा जिज्ञासू वृत्तीच्या आहेत.
२. नामजपाला आरंंभ करणारे कर्णावती येथील श्री. किरण सोनी ! : श्री. सोनी हे राजीव दीक्षित यांच्या कार्याने प्रभावित होऊन काही सहकार्‍यांसह कर्णावतीमध्ये स्वदेशी जागरणाचे कार्य करतात. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना समितीच्या कार्याशी ओळख करून दिली. ते जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याच्या सेवेत सहभागी झाले. नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व समजल्याने त्यांनी आता नामजप करण्यास आरंभ केला आहे. त्यांच्यात भाव असून राष्ट्राप्रती प्रेम जाणवले.

मुल्ला-मौलवी यांनी आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात मुसलमान समाजात जागृती करावी !

     आयएस्आयएस्ला इस्लामी स्टेट निर्माण करायचे आहे. त्यासाठी ते इस्लाम न मानणार्‍या निरपराध्यांना प्रतिदिन कंठस्नान घालीत आहेत. या संघटनेचा धोका अखिल मानवजातीला असल्याने मुल्ला-मौलवी यांनी मुसलमान तरुणांना धर्मांध न बनवता योग्य मार्गाने नेण्याचा विडा उचलायला हवा. त्यातच सगळ्यांचे कल्याण आहे.
आयएस्आयएस् म्हणजे इस्लामच्या नावाखाली निर्माण झालेला नवा भस्मासूर !
     आयएस्आयएस्ची भीती कुणाला ? हिंदुस्थानातील मुसलमान धर्मगुरूंनी घेतलेल्या भूमिकेवर अमेरिकेने पसंतीची मोहोर उठवली आहे. हिंदुस्थानातील सहस्रोंहून अधिक मुल्ला-मौलवी एकत्र जमले आणि त्यांनी एकमताने निर्णय घेतला की, आयएस्आयएस् या आतंकवादी संघटनेला आपल्या देशात अजिबात थारा मिळता कामा नये. इराक आणि सिरिया या देशांमध्ये आयएस्आयएस्ने जो भयंकर उत्पात अन् हिंसाचार घडवला आहे, त्यामुळे इस्लामचे काय भले झाले, हा प्रश्‍नच आहे. इस्लामच्या नावाखाली लाखो मुसलमानांच्या हत्या चालू आहेत. बॉम्बस्फोट घडवून एकाच वेळी शेकडो लोक मारले जात आहेत आणि हे सर्व मुसलमान आहेत.

संमोहनाच्या आधारे अशक्य गोष्टीही शक्य करता येतात, हा शोध लावणार्‍यांना नोबेल पारितोषिक का देत नाही ?

     विविध वृत्तवाहिन्यांवर जाऊन प्रा. श्याम मानव सांगत आहेत, संमोहनाला अध्यात्माची जोड देऊन व्यक्तींना संमोहित करता येते. त्यांच्या मेंदूचे प्रोग्रॅमिंग केल्यानंतर त्यांच्याद्वारे गुन्हेगारी कृत्ये करवून घेतली जातात. कृत्ये झाल्यानंतर पुढे त्या व्यक्तीच्या मेंदूतील प्रोग्रॅमिंग पुसले जाते. ते कृत्य करणार्‍यालाही आपण काय केले ?, हे लक्षात येत नाही. त्यामुळे डॉ. दाभोलकर, पानसरे किंवा कलबुर्गी यांचे मारेकरी सापडले, तरी खर्‍या सूत्रधारापर्यंत पोहोचणे अवघड आहे. प्रा. मानव जे सांगतात, ते खरे असेल, तर हे एक मोठे संशोधन आहे. या संमोहन पद्धतीचा शोध लावणार्‍यांना नोबेल पारितोषिक का देऊ नये ? अमेरिका, चीन, रशिया इत्यादी देश याचा वापर का करत नाहीत ?

पानसरे हत्या प्रकरणात संमोहनाच्या सूत्रावरून वृत्तवाहिन्यांवर विनोदाची मालिका !

१. एका वृत्तवाहिनीवर प्रा. श्याम मानव यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक हे स्वतःच संमोहित झालेले आहेत, असे विधान केले. वस्तूतः संमोहित झालेली व्यक्ती ज्याने तिचे संमोहन केले आहे, तिचे सोडून अन्य कुणाच्याही प्रश्‍नांची उत्तरे देत नाही. प्रत्यक्षात श्री. वर्तक मात्र नियमितपणे पत्रकार परिषदा घेतात, तसेच सर्व पत्रकारांच्या प्रश्‍नांची उत्तरेही देत असतात. त्यामुळे प्रा. मानव यांचे हे विधान त्यांच्या संमोहनतज्ञ असण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करते. 
२. कृषीमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी सनातन संस्थेवर बंदी घालायची, तर एम्आयएम्वरही बंदी घालावी लागेल, असे विधान केले. त्या संदर्भात प्रतिक्रिया देतांना खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी श्री. खडसे यांनाच संमोहित केले आहे, असे हास्यास्पद विधान केले.

सनातनच्या विरोधकांवर प्रा. श्याम मानव यांनी संमोहन केले आहे का ?

     गेल्या काही दिवसांपासून विविध वृत्तवाहिन्यांवर पत्रकार, काही राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी, साम्यवादी आदी लोक सातत्याने कोणतेही पुरावे न देता सनातन संस्थेवर आरोप करत आहेत. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणीही करत आहेत. संमोहनातील तज्ञ असलेल्या प्रा. श्याम मानव यांनी या सर्वांना संमोहित तर केले नाही ना ?

भारताच्या शत्रूने भारताचा खोटा इतिहास लिहिणे आणि मेकॉॅलेच्या मानसपुत्रांमुळे आजही तोच इतिहास शिकवला जाणे

     जगातील बरेचसे देश कधी ना कधी पारतंत्र्यात होते; परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांनी त्यांचा इतिहास त्यांच्या दृष्टीने लिहिला. याला एकमात्र अपवाद भारत देश आहे. आजही देशाच्या शत्रूंनी लिहिलेला देशाच्या शत्रूंचा इतिहास आपल्याला शिकवला जातो. जर्मनीचे एक विद्वान पॉक हैमर यांनी भारताचा प्रचलित इतिहास वाचून भारतावर लिहिलेल्या इंडिया : रोड टू नेशनहुड या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे, जेव्हा मी भारताचा इतिहास वाचतो, तेव्हा मला वाटत नाही की, तो भारताचा इतिहास आहे. हा तर भारताला लुबाडणार्‍या आणि हत्याकांडे करण्यार्‍या आक्रमकांचा इतिहास आहे, असे वाटते. ज्या दिवशी भारतियांना सत्य इतिहास समजेल, त्या दिवशी ते जगाला दाखवून देतील की, ते कोण आहोत. अनेक दशकांच्या श्रमानंतर विदेशी शक्तींनी भारताचा खोटा इतिहास लिहून घेतला आणि तो मेकॉॅलेच्या मानसपुत्रांच्या साहाय्याने आजही भारतात शिकवला जात आहे. 
- श्री. सतीश त्रिपाठी (एप्रिल २०१२)

आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणार्‍यांना छळणे, ही भारतात रूढी बनत आहे !

      कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य श्री स्वामी जयेंद्र सरस्वती यांना खुनाच्या खोट्या आरोपावरून अटक केली. योगऋषी रामदेवबाबा आणि त्यांचे भक्त यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. संत आसारामजी बापू गेली २ वर्षे तुरूंगात आहेत. या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्थेचा होणारा छळ अपेक्षितच आहे. संत आणि सनातन संस्था यांना छळणार्‍यांना ईश्‍वर कडक शिक्षा केल्याशिवाय रहाणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.

सहनशील आणि अंतर्मुख असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला टाकवे, पुणे येथील चि. मनन श्रेेय टोंपे (वय २ वर्षे ८ मास) !

चि. मनन टोंपे
१. गर्भारपण 
     'मनन गर्भात असतांना मला काहीच त्रास झाला नाही. 'नामजप आणि उपाय अधिकाअधिक करावे अन् धर्माचरणाने वागावे', असे वाटत होते. गर्भ आठ मासांचा असतांना माझ्या वडिलांना पोटाचा कर्करोग असल्याचे कळले. त्या परिस्थितीतही माझे मन स्थिर होते. 
२. जन्मानंतर 
     मननचा जन्म झाल्यावर तो शांत होता. त्या सुमारास माझ्या वडिलांची प्रकृती बरीच खालावल्यामुळे मी तणावामध्येे होते; पण अशा परिस्थितीतही तो शांत असल्यामुळे मला त्याचा काहीही त्रास झाला नाही. तेव्हा मला श्रीकृष्णाविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. 

कुंभमेळ्यातील सिंहस्थ पर्वणीच्या निमित्ताने राष्ट्र-धर्म प्रसारकार्याच्या प्रयत्नांसाठी पराकाष्ठा करतांना साधकांना लाभलेली संतसंगाची आणि आध्यात्मिक उन्नतीची पर्वणी !

श्री. शंकर नरुटे
१. कुंभमेळ्याच्या माध्यमातून राष्ट्र-धर्माचा प्रसार 
करतांना संताचा संकल्प आणि त्यांचे ईश्‍वरी सामर्थ्य अनुभवले ! 
     'सनातनच्या संतांच्या मार्गदर्शनानुसार कुंभमेळ्याच्या माध्यमातून लक्षावधी लोकांपर्यंत राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांचे कार्य पोचले. त्यातून समाजात धर्माचे चैतन्य कार्यरत झाले आणि जगभर अध्यात्मशास्त्राचा प्रसारही झाला. पू. स्वातीताई, पू. जाधवकाका आणि पू. पिंगळेकाका यांनी स्वतःच लक्ष घातल्यामुळे कार्याची व्याप्ती कित्येक पटींनी अधिक असल्याचे लक्षात आले. 

पू. भगवंतकुमार मेनरायकाका यांनी साधकांवर उपाय करतांना कु. अनास्तासिया वाले हिने काढलेल्या सूक्ष्म-चित्राचे परीक्षण करतांना श्री. अनिल बोकील यांना जाणवलेली सूत्रे !

     'दैनिक 'सनातन प्रभात'च्या २०.८.२०१५ या दिवशीच्या अंकात पृष्ठ ३ वर एस्.एस्.आर्.एफ्.चे पू. सिरियाक वाले आणि पू. (सौ.) योया वाले यांची कन्या कु. अनास्तासिया वाले (वय ११ वर्षे) हिने पू. भगवंतकुमार मेनरायकाका उपाय करत असतांना सूक्ष्मातील प्रक्रियेचे चित्र काढले. या सूक्ष्म ज्ञानविषयक चित्रावर एक हात ठेवून आणि चित्राच्या मागील कोर्‍या भागावर दुसरा हात ठेवून काय जाणवते, हा प्रयोग करण्यास सांगण्यात आला होता. हा प्रयोग पुणे येथील श्री. अनिल बोकील यांनी केल्यावर त्यांना जाणवलेली सूत्र येथे देत आहोत. 

कोणी सनातन संस्थेविषयी माहिती विचारल्यास संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा संपर्क क्रमांक द्या !

सनातनच्या साधकांना सूचना आणि हितचिंतक अन् वाचक यांना विनंती 
     सध्या कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात चालू असलेल्या घटनांवरून विविध प्रसारमाध्यमांतून सनातन संस्थेवर टीका केली जात आहे. तसेच 'सनातन संस्थेवर बंदी यावी', यासाठी काही जण आकाशपाताळ एक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच प्रसारमाध्यमातून सनातन संस्थेबद्दल चुकीची माहिती प्रसारीत करून समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने साधकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास साधक, हितचिंतक, कार्यकर्ते यांनी त्यांना सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा ७७७५८५८३८७ हा भ्रमणभाष क्रमांक देऊन त्यांच्याशी संपर्क करण्यास सांगावे.

बालपणापासूनच समंजस वृत्ती असलेली, आई-बाबांना सेवेत सर्वतोपरी साहाय्य करणारी, ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. सायली वाघुळदे (वय २० वर्षे) !

कु. सायली वाघुळदे
    मूळची डोंबिवली, ठाणे येथील आणि गेल्या ४ वर्षांपासून रामनाथी आश्रमात राहून पूर्ण वेळ सेवा करणारी कु. सायली वाघुळदे हिच्याविषयी ६५ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेले तिचे वडील श्री. दत्तात्रेय वाघुळदे, आई सौ. किरण दत्तात्रेय वाघुळदे अन् बहीण सौ. मंजिरी मांजरेकर यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.   
    एका संतांनी कु. सायलीविषयी काढलेलेउद्गार : कु. सायलीची ही धारिका वाचतांना एक संत म्हणाले, अरे वा ! एवढी चांगली सूत्रे असतांना आधीच का लिहून दिली नाहीत ? सायली नेहमी शांत आणि आनंदी असते. ती आणि तिची सेवा एवढेच असते.
- कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. समंजसपणा
१ अ. आईविना आजीजवळ रहाणे : कु. सायली २ वर्षांची असतांना तिची आई गोव्यात नुकतेच दैनिक सनातन प्रभात चालू झाले होते; म्हणून त्या सेवेसाठी गेेली होती. तेव्हा सायली तिच्या आजीजवळ (वय ७५ वर्षे) १ मास राहिली.

दगडांच्या कलाकृतीविषयीची सेवा करतांना उत्साह अन् तळमळ यांचे मूर्तीमंत रूप असलेले प.पू. पांडे महाराज यांचा मिळालेला सत्संग आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

प.पू. पांडे महाराज
१. सेवाभाव
१ अ. सेवेविषयी उत्सुकता : ४.८.२०१५ या दिवशी मी दगडांच्या कलाकृती विषयीच्या सेवेसाठी प.पू. पांडे महाराज (प.पू. बाबा) यांच्याकडे गेलो असता ते पुष्कळ उत्साही आहेत, असे जाणवले. त्यांनी आम्हाला (सौ. गौरीताई आफळे आणि मला) सेवेची व्याप्ती सांगितली आणि उद्यापासून सेवा चालू करूया, असे सांगितले. त्यांनी जमवलेले ४०० दगड रामनाथी येथून येणार होते. त्या दिवशी त्यांनी ३ वेळा आम्हाला रामनाथीहून दगड आले का ?, असे विचारले. त्यावरून आमच्यात सेवेविषयी उत्साह कसा असावा ?, हे शिकायला मिळाले.
मूळ दगड (अ) आणि  प.पू. महाराजांनी  त्यावर साकारलेली शिवपिंड (आ)
१ आ. सेवा नियोजनबद्ध आणि साधकांचा विचार करून करणे : मी आणि सौ. गौरी आफळे पहिल्या दिवशी बाबांकडे गेल्यावर त्यांनी सांगितले, आपण प्रदर्शनातील २०० दगड तपासून घेऊया. जी आकृती अस्पष्ट असेल, ती प्रदर्शनात ठेवायला नको किंवा तिच्यात पालट करून ती प्रदर्शनात ठेवूया. त्याप्रमाणे प.पू. बाबांनी सेवेचे नियोजन करून ठेवले होते. ते म्हणाले, प्रथम हर्षल दगड सामान्य माणसाच्या दृष्टीने पाहील. मग सौ. गौरी कलेच्या दृष्टीने पाहील आणि शेवटी मी म्हणजे अनुभवी व्यक्ती म्हणून पाहीन. साधकांना आकृती सहजतेने दिसली पाहिजे. त्यांना ती शोधावी लागू नये, अशा प्रकारे दगडावर क्रमांक टाकून बाण दाखवा, म्हणजे त्यांना आकृती पहाणे आणखी सोपे होईल, असेही त्यांनी सांगितले.   

लाभली गुरुमाऊली संभाजीनगरला ।

     'संभाजीनगर जिल्ह्यातील कार्य बंद करावे लागेल, अशी स्थिती होती; पण पू. स्वातीताईंनी (पू. (कु.) स्वाती खाडये यांनी) आम्हाला एक संधी दिली; म्हणून साधकांनी त्यांच्या चरणी वाहिलेले काव्यरूपी कृतज्ञतापुष्प पुढे देत आहोत. 
पू. स्वातीताईसारखी लाभली । 
गुरुमाऊली संभाजीनगरला । 
पू. स्वातीताई येतात संभाजीनगरला । 
आणि प्रगतीसाठी । 
करतात मार्गदर्शन आम्हाला ॥ १ ॥ 
आम्ही सर्व जण अपराध, चुका । 
करून ठेवतो समष्टी साधनेमध्ये । 
तरीपण पू. स्वातीताई । 
क्षमा करून पुनःपुन्हा । 
समष्टी साधनेची संधी देतात । 
आम्हा अडाणी जिवांना ॥ २ ॥ 
खरंच आम्ही किती भाग्यवान जीव आहोत । 
श्रीकृष्णाने अशी गुरुमाऊली दिली । 
 संभाजीनगरमधील अज्ञानी जिवांना ॥ ३ ॥ 
पू. स्वातीताई, 
श्रीकृष्णाच्या चरणांपर्यंत । 
पोचायचेच आहे । 
आम्हा सर्व अडाणी जिवांना ॥ ४ ॥ 
तुमच्यामधील साधनेची तळमळ पाहून । 
कंठ दाटून येतो हो पू. ताई । 
आम्ही सर्व जीव । 
क्षमायाचना करत आहोत । 
तुमच्या चरणी हो पू. ताई ॥ ५ ॥ 
पू. ताई केलीत क्षमा । 
आम्हा सर्व क्षुुद्र अडाणी जिवांना । 
आणि दिलीत संधी । 
तुम्ही समष्टी साधनेची आम्हा अज्ञानी जिवांना ॥ ५ ॥ 
कशी करू कृतज्ञता व्यक्त । 
काहीच कळत नाही या अडाणी जिवांना । 
कोटी कोटी प्रणाम करतो । 
श्रीकृष्ण आणि सर्व पू. संतांना । 
आणि पू. स्वातीताईंना ॥ ६ ॥ 
- सौ. मंदा कदम आणि संभाजीनगरमधील सर्व साधक (१९.१२.२०१४) 
 पू. (कु.) स्वाती खाडये

साप्ताहिक सनातन प्रभातच्या पृष्ठसंख्येत वाढ !

दीपावलीच्या शुभमुहुर्तावर... वाचक आणि विज्ञापनदाते यांना आनंदवार्ता !
    राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची संख्या वाढत असल्याने सध्या या आघातांची वृत्ते येण्याचा ओघ प्रचंड आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्र आणि धर्म यासंदर्भात स्फूर्तीदायक प्रसंग घडतांना दिसत आहेत. या सर्व गोष्टींविषयी हिंदूंना अवगत करणे आवश्यक आहे. यासाठीच साप्ताहिक सनातन प्रभातची पृष्ठसंख्या वाढवत आहोत.
वर्ष १७ अंक क्र. ५० (२९ ऑक्टोबर २०१५ ते ४ नोव्हेंबर २०१५) पासून प्रत्येक अंक १६ पानी ! 
मूल्य ८ रुपये : (वार्षिक वर्गणी : ४०० रुपये)
प्रती आठवड्याला वाचकांना मिळणारे लिखाण
  • हिंदु धर्मावरील संकटांची वृत्ते / राष्ट्र आणि धर्म विषयक विविध लेखांची पर्वणी !   
  •  राष्ट्र आणि धर्माविषयी संतांचे मार्गदर्शन अन् हिंदु राष्ट्र स्थापनाविषयक दिशादर्शन
  •  भावी पिढी सुसंस्कारीत होण्यासाठी संस्कारविषयक मार्गदर्शन   
  •  ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना आणि धर्मशिक्षण, साधकांचे प्रयत्न/ अनुभूती   
  •  सनातन आश्रमभेटीच्या वेळी संत, हिंदुत्ववादी, जिज्ञासू यांनी दिलेले अभिप्राय
  •  याशिवाय दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील, अशी चौफेर विषयांवरील विविध सदरे !

साधकांनो, वर्ष २०१६ च्या 'सनातन पंचांगां'चे वितरण १५.११.२०१५ या दिवसापर्यंत पूर्ण करून त्याची येणे बाकी ३०.११.२०१५ या दिवसापर्यंत मुख्य कार्यालयात पाठवा !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना 
     'सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. धर्मप्रसाराचे प्रभावी माध्यम असणारे पंचांग लवकरात लवकर सर्व जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सेवा श्रीगुरूंनी साधकांना उपलब्ध करून दिली आहे. 
     महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तसेच दक्षिण आणि उत्तर भारतातील काही राज्ये यांना वर्ष २०१६ च्या सनातन पंचांगांचा पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी लवकरच त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पंचांग वितरण आणि येणे बाकी (वसुली) यांच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे. 

भारतातून अन्य देशांत जात असल्यास पुढील संगणकीय पत्त्यावर कळवावे !

साधकांना सूचना 
     'काही साधकांना स्वतःच्या, तसेच कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी विदेशात राहून नोकरी करावी लागते. त्यामुळे ते विदेशात स्थायिक होऊन कुटुंबीय आणि नातेवाईक यांना भेटण्यासाठी अधूनमधून भारतात येतात अन् काही काळ येथे वास्तव्य करून पुन्हा विदेशात परततात. 

वाचक, हितचिंंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात यथाशक्ती हातभार लावण्याची अमूल्य संधी !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असणारे सनातनचे आश्रम
आणि सेवाकेंद्रे यांमध्ये संगणक अन् भ्रमणसंगणक यांची आवश्यकता !
    हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे ध्येय शीघ्रतेने साकार होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, तसेच उत्पादने आणि सनातन प्रभात नियतकालिके या माध्यमांतून जनसामान्यांमध्ये राष्ट्र अन् धर्म यांच्या संदर्भात जागृती केली जाते. राष्ट्र-धर्म कार्याच्या अंतर्गत विविध सेवांसाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले संगणक आणि भ्रमणसंगणक यांचा वापर केला जातो.

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी,
तसेच चालक-साधकांची तातडीने आवश्यकता ! 
    सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यातील चैतन्य अन् सात्त्विकता यांचा लाभ व्हावा, यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. याचाच एक भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये धर्मरथाद्वारे उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात येते. यामध्ये ग्रंथ आणि उत्पादने यांची माहिती सांगणे, हिशोब ठेवणे, तसेच ग्रंथप्रदर्शनाचे नियोजन पहाणे आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे.

ज्ञानाविषयीच्या चौकटींच्या संदर्भात देवाला केलेली प्रार्थना

     एक साधक मला म्हणाला, "सध्या तुम्ही देत असलेल्या विषयांच्या चौकटी 'दैनिक सनातन प्रभात'मध्ये प्रसिद्ध होत आहेत." त्या वेळी माझ्याकडून पुढील प्रार्थना झाली, 'प्रभु, मला असेच चौकटीत ठेव. सतत तुझ्या चौकटीतच (म्हणजे आज्ञेत रहाणे, हाताबाहेर न जाणे) रहाता येऊ दे, अशी तुझ्या चरणी परत परत प्रार्थना !' - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.५.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको
रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।
भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

     निश्‍चिंत होऊन सर्व भार भगवंतावर सोपवल्यानंतरच त्याचेे साहाय्य मिळते ! 
     द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीने लज्जारक्षणास्तव अनेकांकडे साहाय्य मागितले. नंतर तिने वस्त्र दातांत पकडले. येथे तिने दातांचे साहाय्य घेतले; परंतु तिने हतबल होऊन जेव्हा श्रीकृष्णाचा धावा केला, तेव्हा श्रीकृष्ण साहाय्याला धावला. म्हणजे भगवंताची आळवणी करतांना मायेचा थोडा जरी संबंध असला, तरी भगवंत साहाय्याला येत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्यावर पूर्णतः श्रद्धा ठेवून सर्व सोपवून देता, तेव्हा तो मार्गदर्शन करतो.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे ज्ञान 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      माणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की, मी विश्‍वातील अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या युवा क्रांतीकारकांना संमोहित करून त्यांना कृती करण्यास भाग पाडले, असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी उद्या म्हटले, तर आश्‍चर्य वाटणार नाही. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.९.२०१५)
    काही साधक आणि साधिका यांना पूर्णवेळ साधना करायची असते; पण त्यांना घरच्यांचा तीव्र विरोध असतो. तेव्हा व्यक्तीस्वातंत्र्यवाले त्यांच्या साहाय्याला धावून का येत नाहीत ? त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य केवळ निधर्मीपणासंदर्भातच आहे का ? 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.४.२०१५)

शिकवण आणि समज !

    सनातनच्या साधकाला कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक झाल्याला १४ दिवस झाले. १४ दिवसांच्या पोलिसी चौकशीत समीर गायकवाड हा हत्या प्रकरणातील सूत्रधार असावा किंवा त्याचा दुरान्वयेही या प्रकरणाशी संबंध असावा, असे काहीही समोर आलेले नाही. प्रसारमाध्यमांनी त्यांचा टीआर्पी सांभाळण्यासाठी काही गोष्टींचा पराचा कावळा केला; तरी त्याचा पोलिसी तपासाच्या दृष्टीने काहीच लाभ नसतो. प्रत्यक्षात न्यायालयात सरकार पक्षाकडून मांडण्यात आलेली सूत्रे ही किती तकलादू होती, हे समीर गायकवाड यांच्या अधिवक्त्यांनी केलेल्या युक्तीवादातील सूत्रांतून आपल्या सर्वांच्या लक्षात आले. १४ दिवसांत प्रसारमाध्यमांनी मात्र सनातनद्वेषाचा कंड शमवून घेतला, असेच म्हणावे लागेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn