Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

खोटारड्या श्याम मानव यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा ! - अभय वर्तक, सनातन संस्था

पत्रकार परिषदेत बोलतांना अधिवक्ता
संजीव पुनाळेकर (डावीकडे) आणि श्री. अभय वर्तक
व्यक्तीला संमोहित करून गुन्हा करता येतो, हे
सिद्ध करा अन्यथा जाहीर क्षमायाचना करा !
- सनातनचे आव्हान
     मुंबई - श्याम मानव यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत. त्याला विज्ञानाचा आधार नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे इरेक्शन हिप्नोसिसद्वारा मानवी बॉम्ब बनवला जाऊ शकतो, हे असत्य आहे. या प्रकारची कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. संमोहनशास्त्रात तशी क्षमताच नाही, असे विज्ञान आणि संमोहनतज्ञ सांगतात. सनातन संस्था संमोहनाच्या बळावर ब्रेन वॉशिंगकरून मानवी बॉम्ब बनवू शकते, सनातनवाले (संमोहनाच्या बळावर) माणसांचे मुडदेही पाडू शकतात, असे निवळ सुडापोटी आरोप करून श्याम मानव समाजाची दिशाभूल करत आहेत आणि संस्थेची अपकीर्ती करत आहेत; म्हणून श्याम मानव यांच्यावर ड्रग्ज अ‍ॅण्ड मेडिकल अ‍ॅक्टच्या अंतर्गत विज्ञानाच्या शाखेविषयी लोकांच्या मनात भय उत्पन्न करणे, लोकांच्या मनात शंका निर्माण करणे या कलमांखाली गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली जावी, अशी मागणी आम्ही करत आहोत, असे जाहीर आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी महाराष्ट्र शासनाला केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगून धर्मकर्तव्य बजावण्यास प्रवृत्त केले; म्हणून धर्मद्रोही आणि देशद्रोही उद्या गीता शिकवणार्‍यांबरोबर गीता सांगणार्‍या श्रीकृष्णालाही देशद्रोही म्हणतील ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.९.२०१५)

सनातनचा साधक समीर गायकवाड यांच्या बाजूने उत्कृष्टपणे युक्तीवाद मांडणारे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन आणि अधिवक्ता एम्.एम्. सुहासे !

अधिवक्ता
श्री. समीर पटवर्धन
अधिवक्ता
श्री. एम्.एम्. सुहासे
प्रतिकूल परिस्थितीत सनातनच्या पाठीशी
खंबीरपणे उभे रहाणार्‍या अधिवक्त्यांचे आभार !

कॉ. पानसरे हत्या प्रकरण
      २६ सप्टेंबर या दिवशी कोल्हापुरातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आणि सनातनचा साधक समीर गायकवाड यांच्या बाजूने सनातनचे अधिवक्ता श्री. एम्.एम्. सुहासे (सांगली) आणि अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी मांडलेला युक्तीवाद देत आहोत...
समीर गायकवाड याला १० दिवस पोलीस कोठडी म्हणजे त्याच्या
व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ! -
समीरचे अधिवक्ता श्री. एम्.एम्. सुहासे
     समीर याला संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. त्याच्याकडून भविष्यात पानसरे यांच्या विचारांचा खून होण्याची शक्यता आहे, असे शासकीय अधिवक्त्यांचे सूत्र हास्यास्पद आहे. त्याच्यावरील आरोप अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. अटक केलेल्या दिवशी, तसेच ७ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतरही हत्येसाठी वापरलेली शस्त्रे, मोटारसायकल शोधण्यासाठीच पोलीस कोठडी मागितली होती आणि आजही त्यासाठीच कोठडी मागत आहेत, यावरून त्यांच्याकडून अन्वेषण होत नसल्याचे स्पष्ट होते.

सनातन संस्थेच्या सेवेसाठी आणि रक्षणासाठी आम्ही सिद्ध आहोत ! - भाजपचे आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

टी. राजासिंह
     भाग्यनगर (हैद्राबाद) - सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे खरे हिंदु असतील, तर त्यांनी सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा विचार करण्यापेक्षा सनातन संस्थेशी जोडले जाऊन कार्य करावे, देशाच्या हितासाठी अन् धर्माच्या हितासाठी कार्य करावे; सनातन संस्थेच्या सेवेसाठी आणि रक्षणासाठी आम्ही येथे सिद्ध आहोत. केवळ आम्हीच नाही, तर आमच्यासारखे असे अनेक हिंदूही याकरता सिद्ध आहेत, अशी चेतावणी भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी सनातनच्या विरोधकांना दिली.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी बेळगावात धर्मांधांकडून पूर्वनियोजित दंगल !

     हिंदूंच्या प्रत्येक सणाच्या वेळी दंगलीचे नियोजन करणार्‍या धर्मांधांवर पूर्वनियंत्रण का ठेवले जात नाही ? हिंदुत्ववाद्यांना आतंकवादी म्हणून हिणवणारे पुरोगामी हिंदूंवर धर्मांधांची आक्रमणे होतात, त्या वेळी कुठे जातात ?
     बेळगाव - अनंतचतुर्दशीच्या रात्री येथील धर्मांधांनी पूर्वनियोजित दंगल करून हिंदू आणि पोलीस यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. (हिंदूंनो, अजून किती सणांच्या वेळी धर्मांधांच्या हातून मार खात रहाणार, ते एकदाचे ठरवून टाका ! - संपादक) खडक गल्लीमध्ये २७ सप्टेंबर या दिवशी रात्री साडेअकरा वाजता अचानक दगडफेक चालू झाली. दगड, बाटल्या, विटा कोठून आले, हेच रस्त्यावरील लोकांना समजेनासे झाले. (धर्मांध दंगलीची पूर्वसिद्धता करून हिंदूंच्या सणांच्या वेळी दंगल घडवतात, हे माहीत असूनही पोलीस त्यांना आधीच कह्यात का घेत नाहीत ? हिंदुत्ववाद्यांना गणेशोत्सवाच्या वेळी मात्र तडीपारीची नोटीस दिली जाते. - संपादक) या दगडफेकीत पोलीस निरीक्षक रमेश गोकाक घायाळ झाले, तसेच अन्य चार पोलीसही घायाळ झाले. खंजर गल्लीतील कथित थडग्याच्या सूत्रावर ही दंगल चालू झाल्याचे समजले असले, तरी दंगलीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

(म्हणे) हिंदुत्ववादी संघटना असल्यानेच सनातनविषयी एकनाथ खडसे यांची सौम्य भूमिका !

एम्आयएम्चे असदुद्दीन ओवैसी यांचा कंठशोष
      मुंबई - कृषीमंत्री श्री. एकनाथ खडसे २८ सप्टेंबरला म्हणाले होते, सनातन संस्थेवर बंदी आणता येणार नाही. तोच नियम लावायचा झाला, तर मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एम्आयएम्) आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर बंदी आणावी लागेल. त्या विरोधात ओवैसी यांनी २९ सप्टेंबरला कंठशोष केला आहे. ओवैसी म्हणाले की,
१. श्री. खडसे हे हिंदुत्ववादी पक्षाचे असल्यानेच ते हिंदुत्ववादी सनातन संस्थेविषयी सौम्य भूमिका घेत आहेत. (तसे काही असते, तर सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक झाली असती का ? त्यानंतर सनातन संस्थेची प्रसारमाध्यमांनी अपरिमित मानहानी केली असती का ? - संपादक)

साम्यवाद्यांंना कापून त्यांना नदीत फेकून देऊ !

तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मंडल यांची चेतावणी
कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची
मागणी करणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ? आता पुरो(अधो)गामी
विचारवंत तृणमूल काँग्रेसवरही बंदी घालण्याची मागणी करतील ?
     कोलकाता - साम्यवाद्यांना कापून नदीत फेकून देऊ, अशी चेतावणी तृणमूल काँग्रेसचे बीरभूम जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांनी दिली आहे. या चेतावणीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन धरले आहे. यापूर्वीही मंडल यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकावे लागले, तर तेही करा, असा आदेश दिला होता, तर काही मासांपूर्वी मंडल यांनी एका सभेत कॉग्रेसला भिकार्‍यांचा पक्ष असे संबोधले होते.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातनच्या आश्रमांवर लक्ष ठेवण्यापेक्षा पोलिसांनी जनतेचे बळी घेणार्‍या आतंकवाद्यांवर लक्ष ठेवले असते, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

     गोवा पोलिसांकडून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर दोन दिवसांपासून बारकाईने लक्ष ! : रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर गेल्या दोन दिवसांपासून गोवा पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलिसांकडून आश्रमात येणार्‍यांवर जाणार्‍यांवर लक्ष ठेवले जात आहे, तसेच आश्रमात येणार्‍या वाहनांचे क्रमांक नोंद करून घेतले जात असल्याचे समजते 

गुडगाव (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लव्ह जिहाद आणि धर्मांतर या विषयावर मार्गदर्शन

१ सहस्राहून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती
डावीकडून सौ. लीना पांडे, कु. कृतिका खत्री
आणि श्री. संजय चोपडा
     गुडगाव (हरियाणा) - श्री सनातन धर्म प्रचारिणी सभेच्या वतीने श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने ५ सप्टेंबर या दिवशी येथील मौलसरी एवेन्यू, डी.एल्.एफ्.फेस ३ येथे भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री यांनी हिंदु धर्मावर होत असलेले आघात - लव्ह जिहाद आणि धर्मांतर या विषयावर प्रबोधन केले. या कार्यक्रमाचा १ सहस्रहून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. 
क्षणचित्रे 
१. या कार्यक्रमात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले.
२. कार्यक्रम संपल्यावर कु. कृतिका खत्री यांनी एवढ्या लहान वयात प्रखरपणे भाषण करणे, ही ईश्‍वराची कृपा आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

युनायटेड हिंदु फ्रंट आणि राष्ट्रवादी शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करावे या मागणीसाठी नवी देहलीस्थित नेपाळच्या दुतावासासमोर करण्यात आली निदर्शने !


हिंदु जनजागृती समितीकडून नमामि गंगा कार्यक्रमाचे पू. जटाशंकर मिश्रा यांची भेट

डावीकडून श्री. रमेश शिंदे, पू. जटाशंकर मिश्रा आणि श्री. उमेश खेतान
    झुंझुनू, २९ सप्टेंबर - शासनाच्या नमामि गंगे या कार्यक्रमाच्या अंतर्गत श्री गंगा महाआरतीच्या आयोजनासाठी पू. जटाशंकर मिश्रा यांचे शहरात आगमन झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली. या भेटीत श्री. शिंदे यांनी पू. मिश्रा यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. त्या वेळी सनातन संस्थेचे श्री गंगाजीकी महिमा आणि देवनदी गंगाकी रक्षा करें हे ग्रंथ पू. जटाशंकर मिश्रा यांना भेट देण्यात आले.

उजिरे (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटित !

     उजिरे (कर्नाटक) - सनातन संस्थेवर करण्यात येत असलेल्या आरोपांच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांकडून येथील श्री सीताराम कलामंदिर येथे एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला चिरंजीवी युवक मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल, धर्मजागरण समिती, कोय्यूरु भजन मंदिर, बेळ्तंगडी अधिवक्ता संघ, जय श्रीराम मित्र मंडळ, तालुका अधिवक्ता संघ, हिंदु जनजागृती समिती, आदी हिंदुत्ववादी संघटनांचे ३४ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
      चिरंजीवी युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. जयराज सालियान म्हणाले, सनातन संस्था ही वैध मार्गाने कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेवर आरोप करणे, ही लज्जास्पद गोष्ट आहे. बहुसंख्य हिंदू असलेल्या राष्ट्रातच आम्हाला कोणी किंमत देत नाही. ही दुःस्थिती पालटण्यासाठी आपण सर्वांनी संघटीत होणे अत्यावश्यक झाले आहे. या बैठकीनुसार ६ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषद, १२ ऑक्टोबर या दिवशी आंदोलन सभा आणि बेळ्तंगडी तालुक्यात हिंदु विधीज्ञ परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सनातन संस्थेला विरोध करणे हे षड्यंत्र ! - श्री. धर्मेंद्र, राज्य प्रवक्ता, हिंदू महासभा

डावीकडून श्री. नवीन, श्री. कुमार मालेमार, श्री. धर्मेंद्र, श्री. वीरप्पा, श्री. कीर्तन
मंगळुरू (कर्नाटक) येथे हिंदुत्ववाद्यांकडून सनातनच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद
     मंगळुरू (कर्नाटक) - सनातन संस्था हिंदु धर्माच्या आचार-विचारांविषयी शास्त्रीय माहिती देऊन समाजाला धर्माचरणाकडे घेऊन जात आहे. असे महान कार्य करणार्‍या संस्थेच्या विरोधात बंदी आणण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. अध्यात्मप्रसार करणारी सनातन संस्था आम्हाला धर्मरक्षण कार्यात आधारभूत वाटते. त्यामुळे या संस्थेवरील बंदीच्या विचारांचा आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना सडेतोडपणे विरोध करतो, असे प्रतिपादन हिंदू महासभेचे राज्य प्रवक्ता श्री. धर्मेंद्र यांनी पत्रकार परिषदेत केले. हत्येसारखे खोटे आरोप लावून सनातन संस्थेची मानहानी करण्यात येत असल्याच्या विरोधात येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मंगळुरू येथे २९ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेण्यात आली.

(म्हणे) ब्राह्मणांविरोधात यादव समाजाने एकजूट दाखवावी !

जात्यंधता पसरवणारे नेते व्यापक जनहित काय साधणार ?
लालूप्रसाद यादव यांचे जात्यंध विधान
     पाटलीपुत्र (पाटणा) - यादवांनी हुशारी बाळगत एकता राखून ठेवायला हवी. विशेषतः ब्राह्मणांविरोधात यादवांनी एकजूट राखण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ब्राह्मणांचाच संघ आहे, अशी जात्यंध टीका बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केली. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या प्रचारसभेत त्यांनी हे विधान केले.

गोव्यातील लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्ववादी यांचा सनातन संस्थेला पाठिंबा !

श्री दिलीप परुळेकर
प्रसिद्धीमाध्यमांनी उगाच समाजाची दिशाभूल करू नये ! 
- दिलीप परुळेकर, पर्यटनमंत्री, गोवा
     सनातन संस्थेचे कार्य मी जवळून पाहिले आहे. गेली अनेक वर्षे समाजात चांगले परिवर्तन घडवून आणण्यासाठी सनातन कार्यरत आहे. एखाद्या सदस्यामुळे संपूर्ण संस्थेला वेठीस धरणे चुकीचे आहे. जेवणात एखादा पदार्थ करपला, तर आपण सगळेच जेवण फेकून देत नाही. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी संशयितांना गुन्हेगार ठरवून अपप्रचार करणे चुकीचे आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी आगाऊपणा न करता सत्यपरिस्थिती लोकांसमोर ठेवावी. उगाच समाजाची दिशाभूल करू नये.

जळगाव येथे जिल्हा प्रशासन आणि जैन समूह यांच्या वतीने कृत्रिम हौदात गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा धर्मद्रोही उपक्रम

निर्माल्य गोळा करण्यासाठी वापरलेली कचर्‍याची घंटागाडी
पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली अशास्त्रीय मोहिमा राबवणार्‍या जिल्हा प्रशासनाने बकरी ईदच्या दिवशी गोहत्या न होण्यासाठी जाहीर मोहीम का राबवली नाही ? ईदच्या दिवशी मुसलमानांच्या प्रबोधनासाठी जैन समाज रस्त्यावर का उतरत नाही ? पर्यावरणाची काळजी (?) असणार्‍या जैन समूहानेे अनेक वर्षांपासून चालू असलेल्या अवैध पशूवधगृहाच्या विरोधात आवाज का उठवला नाही ?
     जळगाव - येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्हा प्रशासन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण श्रद्धाकुंभ या नावाने कृत्रिम हौदात मातीची मूर्ती विसर्जित करण्याचा अशास्त्रीय धर्मद्रोही उपक्रम राबवण्यात आला. यात प्रत्येक ठिकाणी १ सहस्र लिटर क्षमतेच्या प्रत्येकी २ प्लास्टिक टाक्या ठेवल्या होत्या. सायंकाळी ५ पर्यंत जैन समूहाच्या चार ठिकाणच्या कृत्रिम हौदात केवळ ५० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी केलेल्या प्रबोधनाचा परिणाम म्हणून अल्प मूर्तींचे हौदात विसर्जन करण्यात आले.

समीर गायकवाड यांच्या ब्रेन मॅपिंगवरील सुनावणी ३ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
     कोल्हापूर, २९ सप्टेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी २८ सप्टेंबर या दिवशी श्री. समीर गायकवाड यांच्यावर ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यासाठी शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार या प्रकरणाचे अन्वेषण महत्त्वाचे असल्याने आजच हा अर्ज संमत करावा, अशी मागणी अधिवक्ता बुधले यांनी न्यायालयात केली; मात्र ही मागणी फेटाळून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर्.डी. डांगे यांनी ३ ऑक्टोंबरपर्यंत या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. ब्रेन मॅपिंग संदर्भात मुदत वाढ मिळावी, अशा मागणीचा अर्ज श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात सादर केला.

डॉल्बीच्या आवाजाने गणेश मंदिराशेजारील श्रीगणेश मंदिराचा सज्जा कोसळला !

      मिरज, २९ सप्टेंबर (वार्ता.) - शहरात रविवारी २२१ मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढल्या. त्यातील सुमारे ७० मंडळांनी डॉल्बी लावले होते. यांच्या आवाजामुळे गणेल तलावाजवळ असलेल्या गणेश मंदिराचा सज्जा कोसळला, तर बेडगमध्ये एक तरुण बेशुद्ध पडला. गणेश मंदिराचा सज्जा कोसळल्याने पोलिसांनी एकही पथक तलावावर येऊ दिले नाही. याविषयी पोलीस अधीक्षक श्री. सुनील फुलारी म्हणाले, शहरात डॉल्बीच्या नियमांचे पालन झाले आहे. मिरजेत कोणतीही तक्रार नाही.

डॉ. सदानंद मोरे यांनी समस्त वारकरी संप्रदायाची क्षमा मागावी ! - धर्माचार्य ह.भ.प. वक्ते महाराज

जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांचा अवमान केल्याचे प्रकरण
जगद्गुरूंच्या अवमानाच्या विरोधात तत्परतेने निषेध
व्यक्त करणारे महाराज आणि वारकरी यांचे अभिनंदन !
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २९ सप्टेंबर (वार्ता.) - जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांच्याविषयी साप्ताहिक विवेकवारीत २६ जुलै २०१५ या दिवशी डॉ. सदानंद मोरे यांनी अवमानकारक लिखाण केल्याविषयी येथे नुकताच त्यांचा महाराज आणि वारकरी यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. डॉ. सदानंद मोरे यांनी समस्त वारकरी संप्रदायाची क्षमा मागावी, अशी मागणीही या वेळी धर्माचार्य ह.भ.प. वक्ते महाराज यांनी केली.
    निषेध पत्रात म्हटले आहे की, शंकराचार्यांनी समतेचा सिद्धांत मांडला असतांना डॉ. मोरे यांनी विषमतेचा संदेश मांडून समस्त वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत; म्हणून राष्ट्रीय वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष धर्माचार्य ह.भ.प. वक्ते महाराज, ह.भ.प. तुनतुने महाराज, भागवताचार्य वा.ना. उत्पात, ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, विनायक बडवे, ह.भ.प. अनिल महाराज बडवे, ह.भ.प. भक्तराज महाराज, नागेश जोशी, सौ. रेखाताई कुलकर्णी, ह.भ.प. गोविंद महाराज हंडे यांसह महाराज आणि वारकरी यांच्या वतीने डॉ. सदानंद मोरे यांचा निषेध करण्यात आला. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावालाही विरोध केल्यामुळेडॉ. मोरे यांचा निषेध करण्यात आला.

समीर गायकवाड यांची कळंबा कारागृहात पाठवणी : सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार

      कोल्हापूर, २९ सप्टेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित श्री. समीर गायकवाड यांना २८ सप्टेंबर या दिवशी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर्.डी. डांगे यांनी दिला होता. या वेळी श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी श्री. समीर गायकवाड याला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. याविषयी न्यायाधीश आर्.डी. डांगे यांनी त्यांना अर्ज देण्यास सांगितल्यानंतर श्री. पटवर्धन यांनी तसा अर्ज न्यायालयात दिला होता. त्याप्रमाणे श्री. समीर गायकवाड यांची प्रथम येथील बिंदु चौकातील कारागृहात त्यानंतर कळंबा येथील कारागृहात पाठवणी करण्यात आली आहे. अर्ज दिल्याप्रमाणे तेथील पोलिसांवर श्री. समीर गायकवाड यांना सुरक्षा पुरवण्याचे दायित्व आले आहे.

(म्हणे) धर्मांध संघटनांवर बंदी घालण्याचा प्रारंभ सनातन संस्थेपासून करावा ! - निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील

      पुणे, २९ सप्टेंबर (वार्ता.) - एकनाथ खडसे यांनी सनातनवर बंदी घालणे अशक्य असल्याचे सांगून सनातनवर बंदी घातली, तर एम्आयएम्वरही बंदी घालावी लागेल, असे वक्तव्य केले होते. प्रत्यक्षात ओवैसी यांनी कोणाचीही हत्या केलेली नाही. सनातन संस्थेच्या २ कार्यकर्त्यांना ठाणे येथील बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षाही झाली आहे. शासनाने धर्मांध संघटनांवर बंदी घालण्याचा प्रारंभ सनातन संस्थेपासून करावा, अशी मागणी निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केली. (पोलिसांना हटवल्यास हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याचे ओवैसी यांचे वक्तव्य कोळसे-पाटील यांना विखारी वाटत नाही; मात्र सनातनच्या विचारांमध्ये द्वेष दिसतो, यातूनच त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. कोणतेही पुरावे नसतांना पूर्वग्रह बाळगून एखाद्या संघटनेवर बंदीची मागणी करणे हाच पुरोगाम्यांचा विवेक का ? - संपादक)

आतंकवादी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी देखावा आणि स्वाक्षरी मोहीम

कल्याण येथील विजय तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम
      कल्याण - येथील विजय तरुण मंडळाने आतंकवादी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी देखावा आणि स्वाक्षरी मोहीम राबवली. आतंकवादी याकूब मेमनची फाशी रहित करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या ४० जणांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करावा, याची राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडे मागणी करणारे अर्ज ५ सहस्र राष्ट्र्र्राभिमानी नागरिकांनी आतापर्यंत भरले असून अर्ज भरण्यासाठी उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे मंडळाचे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे कल्याण-डोंबिवली महानगर अध्यक्ष श्री. विजय साळवी यांनी सांगितले.

भगतसिंगसारख्या व्यक्ती निर्माण झाल्यासच देश आणि धर्म वाचेल ! - ठाकूर अजयसिंह सेंगर

      नवी मुंबई - देशात आज भगतसिंग यांसारख्या व्यक्ती निर्माण झाल्यासच देश आणि धर्म वाचू शकेल. शहीद भगतसिंग यांचे देशभक्तीपर विचार आजच्या युवकांनी अंगीभूत करावे, असे प्रतिपादन ठाकूर अजयसिंह सेंगर यांनी न्यू पनवेल येथील पृथ्वी सभागृहामध्ये महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने आयोजित शहीद भगतसिंगजी यांच्या जयंती कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले, देशात वाढलेली गरिबी, बेरोजगारी आणि अविकसितपणा यांना दुर्बळ राज्यघटना उत्तरदायी आहे. यातील बहुपक्ष राजकीय पद्धतीमुळे देश हा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अध:पतन यांकडे वाटचाल करत आहे. देशाचा विकास करायचा असल्यास राज्यघटना त्वरित बदलून द्विपक्ष राजकीय प्रणाली अस्तित्वात आणावी.

म्हणे) गणेशमूर्तीचे विसर्जन नदीत करण्यासाठी सनातनच्या कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी !

आयबीएन् लोकमतला सनातनद्वेषाची कावीळ !
     सनातन गेल्या २० वर्षांपासून वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे धर्मशास्त्र फलक, ध्वनीचित्र-चकत्या, ग्रंथ, नियतकालिके आदी माध्यमांतून मांडत आहे. मुळात हिंदु धर्मशास्त्रानुसार साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा सर्वाधिक पर्यावरणपूरकच असतो. त्यामुळे प्रदूषणाची अन्य अत्यंत गंभीर सूत्रे सोडून केवळ गणेशमूर्ती विसर्जनावर आक्षेप घेणार्‍यांच्या संदर्भात सनातन धर्मशास्त्र सांगून प्रबोधन करते; मात्र सनातनला प्रतिगामी समजणार्‍या तथाकथित बुद्धीवाद्यांना आणि माध्यमांना हे लक्षात घ्यायचेच नाही, त्याला कोण काय करणार ? - संपादक

(म्हणे) अधिक अधिवक्ते आणून न्यायालयाचा धार्मिक आखाडा करण्याचा डाव !

कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणात अधिवक्ता असीम सरोदे यांची मुक्ताफळे
      कोल्हापूर, २९ सप्टेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांची भ्याडपणे हत्या केल्यानंतर त्या खुनासंदर्भात पकडण्यात आलेल्या समीर गायकवाड याच्या वतीने न्यायालयात ३० पेक्षा अधिक अधिवक्त्यांनी वकीलपत्र प्रविष्ट करणे, ही धक्कादायक गोष्ट आहे. संशयित समीर याला समर्थन देण्यासाठी न्यायालयाचा धार्मिक, राजकीय आखाडा म्हणून वापर करायची इच्छा असलेल्यांचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे, अशी मुक्ताफळे अधिवक्ता असीम सरोदे यांनी एका निवेदनाद्वारे उधळली आहेत. (कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड याच्या बाजूने ३० हून अधिक अधिवक्ते उभे राहिल्यानंतर असीम सरोदे यांच्या पोटात गोळा आला आहे. न्यायालयात ३० पेक्षा अधिक अधिवक्ते समीरच्या बाजूने उभे राहिले, तर दुसरीकडे पानसरे यांच्या बाजूने ३०० अधिवक्ते असल्याचे बोलले जाते. मग हा पुरोगामी आखाडा आहे का ? हे अधिवक्ता सरोदे यांनी स्पष्ट करावे. दुसर्‍याला दोष देण्यापेक्षा पुरोगामी मंडळींच्या वागण्याचा सरोदे यांनी अभ्यास करावा ! त्यांनी आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे, ही मनोवृत्ती सोडून द्यावी ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे
तृणमूल काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी करतील का ?
     साम्यवाद्यांना कापून नदीत फेकून देऊ, अशी चेतावणी बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाचे बीरभूम जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांनी दिली आहे. या चेतावणीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Trunmul congresske neta Anubrat Mandal ne kaha,
camunistonko Katkar nadime baha denge.
    Sanatan Sanstha par bandi ki mang karnewale ab kya kahenge ?
जागो !
    तृणमूल कांग्रेस के नेता अनुब्रत मंडल ने कहा, कम्युनिस्टों को काटकर नदी में बहा देंगे !
    सनातन संस्था पर प्रतिबंध लगाने की मांग करनेवाले अब क्या कहेंगे ?

इस्लामपूरचे ईश्‍वरपूर नामकरण करण्याचा विषय विषयपत्रिकेत घ्या ! - श्रीशिवप्रतिष्ठानचे १० सहस्र नागरिकांच्या स्वाक्षर्‍यांचे नगर परिषदेला निवेदन

मुख्याधिकार्‍यांना निवेदन देतांना श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते
     ईश्‍वरपूर, २९ सप्टेंबर (वार्ता.) - उरुण इस्लामपूरचे नाव पालटून ते उरुण ईश्‍वरपूर करा. हा विषय येणार्‍या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घ्या, या मागणीसाठी ईश्‍वरपूर नगरपरिषेदचे मुख्याधिकारी श्री. दीपक झिंजाड यांना श्रीशिवप्रतिष्ठानच्या पुढाकाराने १० सहस्र नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. हेच निवेदन नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी यांनाही देण्यात आले. प्रथमत: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी सर्वांनी एकत्र येऊन प्रेरणामंत्र म्हणून घोषणा दिल्या. यानंतर सर्वांनी एकत्र येऊन मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले. निवेदन देऊन झाल्यावर पुतळ्याजवळ येऊन अभियानाची सांगता केली.

पितृपक्षातील श्राद्ध !

     हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.

संमोहन आणि संमोहन-उपचार यांविषयीचे अपसमज !

डॉ. (सौ.) आशा ठक्कर
     प्रा. शाम मानव सध्या सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर करत असलेल्या बेछूट आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी विशद केलेले संमोहन व संमोहन-उपचार यांबद्दलचे अपसमज येथे देत आहोत.
संकलक : डॉ. (सौ.) आशा ठक्कर, मडगाव, गोवा
डॉ. (सौ.) आशा ठक्कर यांचा परिचय
      डॉ. (सौ.) आशा ठक्कर या मानसोपचार या विषयात एम्.डी आहेत. त्यांनी १ वर्षे विविध मानसिक उपचार पद्धतींचा अभ्यास केला आहे. त्यानंतर त्यांनी संमोहन उपचार शिकून घेतले. डॉ. (सौ.) ठक्कर यांनी मुंबई आणि गोवा येथील शासकीय रुग्णालयांत वरिष्ठ डॉक्टर म्हणून सेवा केली. वर्ष १९९१ पासून त्या मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ म्हणून रुग्णांवर उपचार करत आहेत.

अंनिसचे प्रा. श्याम मानव यांचे अज्ञान कि बौद्धिक दिवाळखोरी !

      परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर गेली अनेक वर्षे एकाच प्रकारचे आरोप करणारे अंनिसचे प्रा. श्याम मानव सध्या अनेक वृत्तवाहिन्यांवर जाऊन सनातनवर बेछूट आरोप करत आहेत. त्याविषयीचे खंडण येथे देत आहोत ! 
श्याम मानव हे स्वतः संमोहनशास्त्र शिकवायचे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते
त्यांनी संमोहनावस्थेत ब्रेनवॉशिंग केलेले आहेत, असे म्हणायचे का ? 
      जयंत आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ. कुंदा आठवले हे संमोहनशास्त्रात पारंगत आहेत. त्यामुळे ते समूह आणि व्यक्ती यांना संमोहित करू शकतात. कोणत्याही कार्यात ही पद्धत भयानक असून समोरच्या व्यक्तीला भ्रमिष्टावस्थेत नेण्यासाठी ही पद्धत अत्यंत परिणामकारक आहे. या पद्धतीमुळे मानवी बाँबही सिद्ध होतील. सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समिती या संस्थांमध्ये कार्यकर्त्यांचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉशिंग करण्यात येते. हे कार्यकर्ते केवळ आदेशाचे पालन करतात. त्यांना स्वतःचा असा मेंदू आणि विचारशक्ती नसते. त्यामुळे पुरोगामी विचारवंत आणि समाजसुधारक यांना पुढील लढाई माणसांशी नव्हे, तर अशा यंत्रमानवांशी करायची आहे.- प्रा. श्याम मानव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (दैनिक सनातन प्रभात (२७.८.२०१३))
श्याम मानव संमोहनतज्ञ असल्याने त्यांनी संमोहनाचा वापर करून धर्मद्रोही विचारांचा 
प्रचार केला, असे कुणाला वाटले, तर त्यात काय चुकीचे ?
     इच्छेविरुद्ध संमोहन करता येत नाही. संमोहित व्यक्ती नैतिक मूल्यांच्या विरोधात वागत नाही. संमोहित व्यक्ती स्वत:चा जीव धोक्यात घालत नाही...; पण एखादी संघटना काहींना संमोहित करून देशविघातक कृत्य करू शकते.. - प्रा. श्याम मानव, संस्थापक आणि संयोजक, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (दैनिक सनातन प्रभात, (४.७.२०१४))
प्रा. श्याम मानव म्हणजे हिंदुविरोधी भोंदू सुधारक !
     स्वतःला पुरोगामी, निधर्मी आणि तत्त्ववादी म्हणवणारे प्रा. श्याम मानव स्वतःच मोठे भोंदू बाबा आहेत. केवळ हिंदु धर्माशी खुन्नस ठेवायची आणि स्वतःच्या जिवावर बेतली की, शेपूट घालायचे हीच या हिंदुविरोधी वळवळ्यांची मानसिकता असल्याचे सत्य मला उमगले. तुम्ही सुद्धा अशा भोंदू सुधारकांना ओळखा. त्यांचा पुरोगामित्वाचा बुरखा फाडण्याची संधी मिळाल्यास मुळीच दवडू नका. - श्री. रेणुकादास मुळ्ये, संपादक, दैनिक लोकयोद्धा (दैनिक सनातन प्रभात (६.१०.२०१३))
प्रा. श्याम मानव यांंनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींविषयी अनुद्गार काढून त्यांचा घोर अपमान करणे !
     कुलकर्ण्यांच्या १२ वर्षांच्या पोराने रेड्याला बोलायला लावले, हे थोतांड आहे आणि भिंत चालवली हा चमत्कार नाही, अशा अश्‍लाघ्य शब्दांत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख प्रा. श्याम मानव यांंनी वारकरी संप्रदायाचा प्राण असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींविषयी अनुद्गार काढून त्यांचा घोर अपमान केला. या वेळी काँग्रेसचे ऊर्जामंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी वारकर्‍यांची माफी मागितली.
     (चूक प्रा. मानव यांनी केली असतांना श्री. वळसे-पाटील यांनी त्याविषयी माफी का मागावी ? - संपादक) (दैनिक सनातन प्रभात, १७ जानेवारी २००६)
१. संमोहनशास्त्र इतके प्रभावशाली असते, तर जगभरातील संमोहनशास्त्र जाणणार्‍यांपैकी एकाचाही समाजावर परिणाम का झाला नाही ? 
२. तसे असते, तर जगात संमोहन उपचारतज्ञ म्हणून नाव असणारे प.पू. डॉ. आठवले यांनी साधनेची वाटचाल का चालू केली असती ?
३. राजकारण्यांच्या सभेला पैसे देऊन माणसे गोळा करावी लागतात. संतांना तसे का करावे लागत नाही ? श्याम मानवांच्या सभांना किती उपस्थिती असते ? याचा त्यांनी विचार करावा आणि साधनेकडे वळावे !

धर्माच्या प्रांतातील अंधश्रद्धा घालवण्यासाठी धर्म सोडून देण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या !

     जनसामान्यांना विज्ञान कळत नाही. धर्मतत्त्वज्ञानही गहन वाटते. त्यांना हवा असतो विपत्तीत आधार; पण अज्ञानामुळे ते कशाचाही आधार घेतात. अंधश्रद्धा म्हणून त्यांना झोडपून त्यांच्या पायाखालची वीट काढून घेण्यापेक्षा त्यांना समजेल अशा भाषेत त्यांना धर्म समजावून सांगितला पाहिजे. धर्मशिक्षण दिले पाहिजे. पूर्वी यासाठीच पुराणे आणि कीर्तने होती. शिक्षणक्रमात हे धर्मज्ञान यायला हवे. धर्मतत्त्वज्ञान हे धर्माचे विज्ञानच आहे. हे विज्ञान सोपे करून झोपड्यांपर्यंत न्यायला हवे. छत्रपती शिवरायांच्या तलवारीलाही अध्यात्माची मूठ होती. धर्माच्या प्रांतातील अंधश्रद्धा घालवण्यासाठी धर्म सोडून देण्याची आवश्यकता नाही; कारण धर्म जीवनाचा अर्थ सांगतो. जीवन यशस्वी करण्याचा आणि तेजस्वी करण्याचा महामंत्र देतो. म्हणून ज्यांना समाजसुधारणा करायची आहे, त्यांनी धर्म जाणून घ्यावा आणि आध्यात्मिक शक्तीची उपेक्षा वा अवहेलना न करता उपासनेद्वारे ती प्राप्त करून घ्यावी, हाच अंधश्रद्धा निर्मूलनाचा राजमार्ग आहे. (संदर्भ : अज्ञात)

चर्चमधील लैंगिक शोषण !

     चर्चमधील लैंगिक शोषणाच्या तक्रारींना पाठीशी न घालता त्यांची माहिती पोलिसांना द्यायला हवी, असे पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या अमेरिका दौर्‍यात बिशपना बजावले आहे, तसेच चर्चमधील लैंगिक शोषणास यापुढे गुप्त ठेवण्यात येणार नाही. युवकांचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच सज्ज राहीन, असे आश्‍वासन पोप यांनी दिले. जिथे धूर आहे, तिथे आग तर नक्कीच आहे. त्यामुळेच दस्तरखुद्द पोप यांनाच जाहीरपणे चर्चमधील मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी प्रतिपादन करावे लागले आहे. या कानपिचक्या त्यांनी अमेरिकेत दिलेल्या आहेत.

राज्यकर्त्यांनो, भारताला सर्व दृष्टींनी खिळखिळे करणार्‍या शत्रूराष्ट्रांच्या राष्ट्रद्रोही कारवायांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर जरब बसण्यासाठी आता कणखर पावले उचला !

१. पाक या शत्रूराष्ट्राने भारताविरुद्ध जोपासलेले शत्रुत्व !
पू. अशोक पात्रीकर
१ अ. पाकच्या निर्मितीपासून पाकने भारताशी शत्रूत्वाने वागणे : भारताने स्वतःच्या संरक्षणासाठीच्या रकमेची तरतूद वाढवली आहे, हे कारण पुढे करत भारत हा पाकिस्तानचा एकमेव शत्रू आहे, असे पाकने नुकतेच घोषित केले. प्रत्यक्षात हे शत्रूत्व पाकच्या निर्मितीपासूनच पाकिस्तान जोपासत आला आहे. भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणार्‍या पाकने अनेक प्रसंगांत हे दाखवले आहे. कारगिलची लढाई, भारताची सीमा राजरोसपणे ओलांडून भारतावर अप्रत्यक्षपणे आक्रमण करणे, भारतावर आक्रमण करण्यासाठी कसाब अन् याकूब यांसारखेे दहशतवादी पाठवणे, काश्मीरमध्ये सातत्याने तणाव राहील, असे वातावरण निर्माण करणे, चीनशी मैत्री करून भारतावर दहशत निर्माण करणे आदी अनेक उदाहरणे देता येतील.

व्हॉट अबाऊट सावरकर ?

      ५ एप्रिल या दिवशी दूरदर्शनवरील झी मराठी या वाहिनीवर २०१४ नाट्यगौरव हा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात नाटकाचा इतिहास आणि मराठीचा महिमा सांगितला जात होता; पण ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९२५ ते १९५१ अशी २५ वर्षे मराठीसाठी आपली लेखणी झिजवली, त्यांचा उल्लेखही कार्यक्रमात होऊ नये, याचे आश्‍चर्य वाटले. 
      नाशिकमध्ये असतांना सावरकर म्हणाले होते, जे काम सहस्र व्याख्यानांनी होत नाही, ते एका चांगल्या नाटकाने होते. त्यांनी वर्ष १९२७ मध्ये उःशाप हे पहिले नाटक लिहिले. ते नाटक नाट्यकला प्रसारक मंडळीने रंगभूमीवर आणले. ते नाटक सावरकरांनी स्वतः सूचना देऊन बसवले. नाटकाचा दिवस ठरला. दर्शिका (तिकिटे) विकल्या गेल्या. नाटकासाठी नाट्यगृह नव्हते. नारळाच्या झावळ्या आणि तरटाचे नाट्यगृह उभारले; पण ऐनवेळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍याने अनुमती नाकारली. रत्नागिरीच्या नागरिकांनी समजूतदारपणा दाखवून शासनाने अनुमती दिली, तर आम्ही नाटक पाहू; आपले श्रम पहाता आम्ही पैसे परत मागणार नाही, असे सांगितले. सावरकरांनी त्या वेळच्या मुंबई प्रांताधिकार्‍यास विद्युत संदेश (तार) पाठवून विचारले, माझ्या लेखनात असा कोणता आक्षेपार्ह भाग आहे, ते मला कळवावे. सुदैवाने नाटकास अनुज्ञा मिळाली.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या ऑगस्ट २०१५ मधील कार्याचा आढावा

१. हिंदु राष्ट्र्राची आवश्यकता या विषयावर धर्माभिमान्यांसाठी मार्गदर्शन
      श्री. विक्रम भावे यांनी सांगली शहर, तसेच सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, तासगाव तालुक्यातील सावळज, येळावी, डफळापूर, तासगाव, कडेगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील एकूण ५८५ तरुण हिंदु धर्माभिमान्यांना हिंदु राष्ट्र्राची आवश्यकता याविषयी संबोधित केले.
२. श्री. विक्रम भावे यांनी हिंदुत्ववादी अधिवक्ते आणि हिंदु धर्माभिमानी यांना हिंदुसंघटनाचे महत्त्व यासंदर्भात संपर्क केला. 

खोटे लिखाण प्रसिद्ध केल्याविषयी शिक्षा झालेले प्रा. श्याम मानव यांच्या कोणत्याही विधानावर विश्‍वास तरी कसा ठेवायचा ?

      पुणे येथील ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांच्याविषयी खोटे लिखाण प्रसिद्ध केल्यासंबंधी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पाध्ये यांच्या न्यायालयाने २.४.१९९१ मध्ये प्रा. श्याम मानव यांना एक दिवसाची कैद आणि १०० रुपये दंड ठोठावला. न्या. पाध्ये यांनी निकालात म्हटले होते, मानव यांचा गुन्हा गंभीर असून त्यांना कायद्यानुसार मोठी शिक्षा आणि दंड करायला हवा; मात्र त्यांचे सामाजिक (?) कार्य लक्षात घेऊन त्यांना सौम्य शिक्षा करण्यात येत आहे.
    या संदर्भातील स्पष्ट कबुली प्रा. मानव यांनी दूरचित्रवाणीवरील वाहिनीवर दिली होती. ते म्हणाले, मी दिवसभर न्यायाधिशांसमोर बसून होतो. त्यानंतर मला सोडण्यात आले.

कुठे भारतातील आंबेही येऊ न देणारा युरोपीयन संघ, तर कुठे कोट्यवधी बांगलादेशींना येऊ देणारा भारत !

     भारतातून निर्यात होणारा हापूस आंबा, कारले, दोडका, अळू आणि वांगी यांवर १.५.२०१४ पासून पुढील दीड वर्ष युरोपमध्ये प्रतिबंध घालण्यात आला आहे. काही आंबे आणि भाजी यांवर फळमाशी आढळल्याने युरोपीयन संघाने हा निर्णय घेतला आहे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिकेला पूर्वजांच्या त्रासाविषयी पडलेले स्वप्न आणि त्यासंदर्भात आलेल्या अनुभूती

१. स्वप्नात दिवंगत सासूबाई दिसणे, स्वतः एका खोलीत बंद असून तेथे पुष्कळ त्रास होणे, 
पुष्कळ अडचणींनंतर ॐ ॐ, असे म्हणता येेणे; मात्र मुद्रा करता न येणे
     ११.६.२०१४ या दिवशी पहाटे ५.३० वाजता मी गजर बंद करून केवळ डुलकी घेत असतांनाच मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला माझ्या दिवंगत सासूबाई दिसल्या. (त्यांचे डिसेंबर २०१३ मध्ये निधन झाले.) स्वप्नात मी एका खोलीत बंद असल्याचे दिसले. तेथे मला पुष्कळ त्रास होत होता आणि मी तो सहन करू शकत नव्हते. माझा नामजप आपोआप चालू झाला; मात्र पुष्कळ अडचणींनंतर मी ॐ ॐ, असे म्हणू शकले. मी हाताच्या बोटांनी मुद्रा करण्याचासुद्धा प्रयत्न करत होते; परंतु मुद्रा करण्यासाठी माझी बोटे एकत्र येत नव्हती.

आश्रमात आल्यानंतर सतत शिकण्याची वृत्ती ठेवून प्रयत्न करणारी कु. माधवी भोईटे (वय १३ वर्षे) !

कु. माधवी भोईटे
     पुणे येथील कु. माधवी भोईटे (वय १३ वषेर्र्) ही काही दिवसांसाठी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात सेवेसाठी आली होती. त्या वेळी तिला देवद आश्रमातील संत आणि पू. (कु.) अनुराधा वाडेकर, तसेच एक साधिका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
                                           १. देवद आश्रमातील संत
१ अ. सेवेची तळमळ : पू. भाऊकाका, पू. दाभोलकरकाका आणि पू. शेंडेआजोबा यांच्याकडून सेवेची तळमळ शिकायला मिळाली.
१ आ. तळमळ, सहजता आणि मनमोकळेपणा : पू. राजेंद्रदादा दिवसभर भ्रमणसंगणकावर (लॅपटॉपवर) सेवा करतात. त्यांच्याकडूनही सेवेची तळमळ शिकायला मिळाली. एवढी सगळी सेवा करूनही त्यांच्या तोंडवळ्यावर कधीच थकवा जाणवत नाही. उलट त्यांच्याकडे पाहून सर्व थकवा दूर होतो. पू. दादांकडून सहजता आणि मनमोकळेपणा हे गुण शिकायला मिळाले.

चतुर्थ 'अखिल भारतीय हिंदू अधिवेशना'च्या काळात भोजनकक्षात सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

१. देवाने सुचवल्याप्रमाणे भांड्यांची मांडणी केल्यामुळे नवीन सेवा करतांना ताण न येणे 
     चतुर्थ 'अखिल भारतीय हिंदू अधिवेशना'च्या काळात भोजनकक्षात सेवा करण्याची संधी मिळाली. सेवा मिळाल्यानंतर माझ्याकडून भगवान श्रीकृष्णाला सतत प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त होऊन माझी भावजागृती होत होती. 'माझे दोष आणि अहं नष्ट करण्यासाठी देवाने मला ही सेवा दिली आहे', असा माझ्या मनात विचार येत होता. सेवा आरंभ करण्यापूर्वी भोजनासाठी किती भांडी लागतात, हे देवाने सुचवले आणि तशी मी भांड्यांची मांडणी केली. त्यामुळे सेवा करतांना मला ताण आला नाही. 

श्रीकृष्णाने दुसर्‍या बसने जाण्याचे सुचवून प्रवासाचा वेळ वाचवणे

     '२७.५.२०१५ या दिवशी मला देवद आश्रमातून बेळगाव येथे जायचे होते. हे श्रीकृष्णा, 'हा प्रवास तुला अपेक्षित असा होऊ दे', अशी प्रार्थना करून मी रात्री १०.३० वाजता एका खाजगी आरामबसमध्ये बसलो. त्या प्रवासासाठी ३०० रुपये भाडे द्यायचे ठरले होते. 

शांत आणि सहनशील असणारी रामनाथी आश्रमात सेवा करणारी कु. मैथिली जोशी (वय २६ वर्षे) !

१. शांत आणि सहनशील
    मैथिली लहानपणापासून पुष्कळ शांत आणि सहनशील आहे. तिला लहानपणापासून दमा असल्याने सतत सर्दीचा त्रास व्हायचा. तसेच शाळेत खेळतांना आणि सायकल चालवतांना पडून पुष्कळ वेळा गुडघ्याच्या त्वचेवर जखमा व्हायच्या; पण तिने कधीही शाळेत जायचे टाळले नाही.
२. शाळेची आवड असणे
    ती २ वर्षांची असतांना कु. प्रियांका (मोठी मुलगी) शाळेत जायला निघाली की, तिलाही जावेसे वाटायचे आणि रडायची. तिला इयत्ता ५ वी ते ७ वी सलग तीन वर्षे शाळेत पूर्ण उपस्थितीचे शाळेने प्रमाणपत्रही दिले.

सेवेची आत्यंतिक तळमळ असलेली आणि कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून विविधांगी सेवा सहजतेने करणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के पातळीची कु. मैथिली अजय जोशी !

कु. मैथिली जोशी
    गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे ३१.७.२०१५ या दिवशी झालेल्या कार्यक्रमात रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणारी कु. मैथिली अजय जोशी ही उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर तिची आध्यात्मिक मैत्रीण कु. कविता निकम हिने सांगितलेली मैथिलीची गुणवैशिष्ट्ये आणि तिच्या सेवाभावी वृत्तीचे उलगडलेले विविध पैलू यांविषयी पुढे देत आहे.
१. प्रेमभावाने आपलेसे करणे
    मैथिलीने प्रेमभावाने मला आपलेसे करून घेतले. मला कधी काही अडचण आली, तर मी तिला निःसंकोचपणे सांगू शकते. मी रुग्णाईत असतांना ती मला जेवण आणून द्यायची. त्या वेळी मला ताप असल्यामुळे जेवावेसे वाटत नव्हते. त्या वेळी ती माझे जेवून होईपर्यंत माझ्यासमवेत बसायची आणि बोलायची. त्यामुळे तिच्याशी बोलता बोलता मी कधी जेवण संपवायचे, हे मलाच कळत नसे. मी वाढलेले सर्व जेवण संपवते, हे पाहून ती प्रतिदिन जेवणाचे प्रमाण थोडे थोडे वाढवायची. 

गुरुकृपेने प.पू. पांडे महाराज यांचा मिळालेला अनमोल सत्संग आणि त्यानंतर साधिकेला स्वतःमध्ये जाणवलेले पालट

प.पू. पांडे महाराज
१. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला शरणागत भाव निर्माण होण्यासाठी प्रार्थना होणे : हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळपासून देवाला प्रार्थना होत होती, देवा, माझ्यात सेवकभाव निर्माण होऊ दे. हनुमंताला सांगितले, तू जशी श्रीरामाची सेवा केलीस, तशीच माझ्याकडूनसुद्धा सेवा करवून घे. माझ्यात शरणागत भाव निर्माण होण्यासाठी तूच मला साहाय्य कर.
२. प.पू. पांडे महाराज फिरतांना धान्य विभागाजवळ आल्यानंतर त्यांनी काही वेळ साधनेविषयी मार्गदर्शन करणे आणि हनुमंत अन् प्रभु रामचंद्र आल्याचे जाणवून चैतन्य जाणवणे : ग्रहणकाळ असल्यामुळे आम्ही स्वयंपाक विभागातील सर्व साधक सायंकाळी धान्य विभागात सेवा करत होतो. प.पू. पांडे महाराज तेथून जात होते. आम्हा सर्वांना एकत्र पाहून ते आमच्याशी बोलण्यासाठी विभागात येऊन बसले आणि आमच्या आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने आम्हाला मार्गदर्शक सूत्रे सांगू लागले. त्या वेळी पू. बाबांच्या माध्यमातून हनुमंत आणि प्रभु रामचंद्र येथे आले आहेत, असे मला वाटले. माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसत नव्हता. त्या वेळी अनुभवलेले चैतन्य मी शब्दांत मांडूच शकत नाही.
    साधकांनी साधनेत प्रगती करावी, अशी प.पू. पांडे महाराज यांची पुष्कळ तळमळ आहे, असे मला त्यांच्या बोलण्यातून जाणवत हाते.

स्वतःतील दोष दूर करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या आणि सकारात्मक दृष्टीकोन असणार्‍या साधकांसाठी प्रगतीचे मूल्यमापन करणारा आराखडा !

श्री. घनश्याम गावडे
     'आपण सेवा करतो; पण साधनेत प्रगती झालेली दिसत नाही. त्याची अनेक कारणे असू शकतात. त्यासाठी चिंतन करून एक आराखडा बनवला आहे. त्यात स्वतःकडून घडणार्‍या चुका, प्रतिक्रिया, समष्टीला हानीकारक दोष, उदा. इतरांना दुखावणे यांवर भर देऊन प्रगतीकडे लक्ष देता यावे, यासाठी एक कोष्टक बनवले आहे. 

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी, तसेच चालक-साधकांची तातडीने आवश्यकता ! 
    सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यातील चैतन्य अन् सात्त्विकता यांचा लाभ व्हावा, यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. याचाच एक भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये धर्मरथाद्वारे उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात येते. यामध्ये ग्रंथ आणि उत्पादने यांची माहिती सांगणे, हिशोब ठेवणे, तसेच ग्रंथप्रदर्शनाचे नियोजन पहाणे आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे.

साधकांनो, 'इंटरनेट'चा अनावश्यक वापर करून गुरुसेवेतील अमूल्य वेळेचा अपव्यय टाळा !

     काही साधकांकडून इंटरनेट, 'फेसबूक', 'जीमेल' इत्यादींचा अनावश्यक वापर करण्यात साधनेतील अमूल्य वेळ वाया जात असल्याचे लक्षात आले. 
१. इंटरनेट वापरण्याच्या संदर्भात झालेल्या चुका 
१ अ. फेसबूक 
१. 'फेसबूक'वरील खाते (अकाऊंट) पहाणे, तसेच शाळा-महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणे (चॅटिंग करणे) 
२. एकमेकांचे 'फेसबूक प्रोफाईल' आणि 'ब्लॉग' उघडून पहाण्यात पुष्कळ वेळ वाया घालवणे 

भारतभरातील हितचिंतकांना सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने सुरक्षितरित्या पोहोचवणे, तसेच त्यांची वसुली सुरळीतपणे होणे, यांसाठी टपाल खात्याच्या 'व्ही.पी.पी.' या सुविधेचा वापर करा !

     'चैतन्याचे भांडार असणारे सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांना केवळ देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. सनातनची विविध विषयांवरील ग्रंथसंपदा पाहून अनेक वाचक आणि हितचिंतक प्रभावित होत आहेत. ग्रंथांना सर्व स्तरांवरून लाभणारा वाढता प्रतिसाद पहाता या ग्रंथांचे मागणीनुसार तत्परतेने वितरण करणे आणि त्याची वसुली सुरळीतपणे होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

साधकांना सूचना पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

१. सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत आहे. पितृपक्षात (या वर्षी २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत) हा त्रास वाढत असल्याने या कालावधीत प्रतिदिन 'ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।' हा नामजप किमान १ घंटा करावा. 

साधकांनो, विदेशातही साधनारत राहून स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

(पू.) सौ. बिंदा सिंगबाळ
१. एक साधक विदेशात गेल्यावर जिल्ह्यातून संबंधित उत्तरदायींना 
कल्पना दिली न गेल्याने तो साधक १० मास साधनेपासून वंचित रहाणे 
     'काही साधकांना स्वतःच्या, तसेच कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी विदेशात राहून नोकरी करावी लागते. भारतातील एका जिल्ह्यामधील एक क्रियाशील साधक नोकरीसाठी विदेशात गेल्यावर त्याच्या जाण्याविषयी त्या जिल्ह्यातून संबंधित उत्तरदायींना कळवले गेले नव्हते. परिणामी त्या साधकाला १० मास एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांच्या संपर्कात राहून साधनेची पुढील दिशा घेता आली नाही. अशीच चूक बर्‍याच साधकांच्या संदर्भातही होत असल्याचे लक्षात आले आहे. 

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तपत्रांची माहिती कळवा !

      कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत.
सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तवाहिन्यांची माहिती कळवा !
      कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून सनातन संस्थेविषयी मानहानीकारक वृत्ते वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होत असल्यास त्याविषयी त्वरित दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात (०८३२) २३१२६६४ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे. ज्यांच्याकडे वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून ते vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावे आणि त्याविषयी अधिवक्ते नागेश ताकभाते (दू.क्र. ८४५१००६०५८) यांना कळवावे.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

पोलिसांनी केलेल्या चौकशीची माहिती त्वरित दैनिक सनातन प्रभातला कळवा !
      कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकांची आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष बोलावून, घरी येऊन किंवा भ्रमणभाषवर संपर्क करून चौकशी केल्यास त्या चौकशीची माहिती (कोणत्या दिवशी चौकशी झाली, काय प्रश्‍न विचारले, पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली आदी सर्व तपशील) नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात त्वरित पाठवावा. आपल्या जिल्ह्यातील साधक किंवा कार्यकर्ते यांनी झालेल्या चौकशीचा तपशील पाठवला आहे कि नाही, याचा जिल्हा समन्वयकांनी आढावा घ्यावा.
इ-मेल : panveldainik@gmail.com
संपर्क : ९४०४९५६०८७

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
भांडे स्वच्छ हवे !
     तुम्हाला भिक्षा हवी आहे. तुम्ही म्हणता मी दाता आहे, तर तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा. भांड्यात आधीचे काही खरकटे रहाता कामा नये. नाहीतर तुम्हालाच भिक्षा न्यून (कमी) मिळेल. भिक्षापात्र रिकामे हवे.
भावार्थ : तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा, याचा अर्थ आपण शुद्ध, निर्मळ अंतःकरणाने बाबांकडे (गुरूंकडे) गेले पाहिजे. भांड्यात आधीचे काही खरकटे राहता कामा नये म्हणजे आपल्यात कुठलाही विषय, वासना किंवा कामना असता कामा नये.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचा शोध घेऊ नये ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      खराखुरा सद्गुरु लाभणे, ही सुकृतावर आधारित गोष्ट आहे. आपल्या संचितानुसार योग्य वेळी सद्गुरूंची भेट होते. वृथा शोध घेऊ नये. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

झुकेरबर्ग, मंदिरे आणि सनातन

    मंदिरांमध्ये गेल्यानंतर मला उभारी आणि प्रेरणा मिळाली आणि माझी परिस्थिती पालटली. त्यामुळे फेसबूकच्या इतिहासात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी केले आहे. फेसबूकवर घंटोन् घंटे (वाया) घालवणार्‍या भारतातील सजग पिढीपर्यंत हे विधान पोहोचणे आणि त्याचा मतितार्थ लक्षात येऊन त्यातून त्यांनी बोध घेणे, हे काहीसे अवघड आहे; तथापि मंदिरांचे महत्त्व अधोरेखित होणे आणि याच सनातन हिंदु धर्माचे महत्त्व सांगण्यासाठी सनातन संस्था धर्मप्रसार का करत आहे, हेही या निमित्ताने लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn