Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

समीर गायकवाड यांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली !

९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
    कोल्हापूर, २८ सप्टेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात अन्वेषण करण्यासाठी श्री. समीर गायकवाड यांची पोलीस कोठडी आणखी २ दिवसांनी वाढवावी, अशी मागणी विशेष शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी केली. त्याविरोधात युक्तीवाद करतांना अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी सांगितले की, गेले १२ दिवस पोलिसांनी अन्वेषण करूनही भ्रमणभाषवरील संभाषणाव्यतिरिक्त त्यांना काहीही मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्यात येऊ नये. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर्.डी. डांगे यांनी शासकीय वकिलांची मागणी फेटाळून लावले. तेव्हा न्यायदंडाधिकार्‍यांनी सांगितले की, अन्वेषणासाठी १२ दिवसांचा पुरेसा वेळ देऊनही पोलिसांनी या प्रकरणाचे पूर्ण अन्वेषण केले नाही. अन्वेषणात प्रगतीही झालेली नाही. त्यामुळे श्री. गायकवाड यांना ९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येते. शासकीय अधिवक्ता बुधले यांनी श्री. गायकवाड यांची ब्रेन मॅपिंग करण्याची अनुमती मिळण्यासाठी अर्ज केला आहे; मात्र त्याविषयी २९ सप्टेंबरला निर्णय होणार आहे. विशेष म्हणजे श्री. गायकवाड याच्या बाजूने सांगलीचे अधिवक्ता श्री. एम्.एम्. सुहासे यांनीही युक्तीवाद केला. न्यायदंडाधिकारी श्री. डांगे यांनी श्री. गायकवाड यांना कळंबा कारागृहात नव्हे, तर बिंदु चौकातील कारागृहात ठेवा, असे आदेश दिले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण इत्यादींसंदर्भात नेहमी बातम्या येतात; पण त्यांचे मूळ असलेल्या रज-तमाच्या प्रदूषणाकडे मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी कोणाचेच लक्ष जात नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.९.२०१५)

सनातनचे जयंत आठवले यांना देशद्रोही ठरवा, अशी मागणी करणार्‍यांवर ते देशद्रोही असल्याचे सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व येते !

    पुरोगामी विचारांनी कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम्.एम्. कलबुर्गी यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी निंदनीय आहे. या घटनांचे समर्थन आणि पोलिसांनी संशयित म्हणून कह्यात घेतलेल्यांना पाठीशी घालणार्‍या आणि माहिती प्रसारित करणार्‍या सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करावेत, असा ठराव कोल्हापूर येथे २५.९.२०१५ या दिवशी झालेल्या जाहीर प्रतिरोध परिषदेत करण्यात आला.        
    कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य श्री स्वामी जयेंद्र सरस्वती, योगऋषी रामदेवबाबा, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यासारख्या थोर धर्माधिकार्‍यांवर अत्याचार करणार्‍या धर्मद्रोह्यांप्रमाणे विद्रोहींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देशद्रोही म्हटले, यात आश्‍चर्य ते काय ? विद्रोहींनो, समाज सत्त्वगुणी बनवण्यासाठी अहोरात्र झटणार्‍या संतांना देशद्रोही ठरवण्याचे पाप करू नका !

सनातन संस्थेवर बंदी घालणे अशक्य ! - एकनाथ खडसे

पोलीस महासंचालकांचीही स्पष्टोक्ती
सनातनवर बंदी घालण्यासाठी उतावीळ झालेल्यांना सणसणीत उत्तर !
    मुंबई / गोवा - सनातन संस्थेवर बंदी घालणे अशक्य आहे. एका कार्यकर्त्याला संशयित म्हणून अटक केल्यानंतर संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न करणे व्यवहार्य नाही. हाच नियम लावायचा झाला, तर ओवैसी बंधू आणि मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एम्आयएम्) यांच्यावरही बंदी घालावी लागेल, असे मत राज्याचे कृषीमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही तशीच स्पष्टोक्ती केली आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍यांना शासनानेच प्रत्युत्तर दिल्याने गप्प बसावे लागणार आहे.
    राज्याच्या पोलीस महासंचालकांनी एचसीएन् या गोव्यातील वृत्तवाहिनीला सांगितले की, सनातन संस्थेच्या विरोधात बंदी घालण्याइतपत पुरावे आता आमच्याकडे नाहीत. त्यामुळे सनातनच्या बंदीची मागणी शासन करू शकत नाही. तशी मागणी करणे चुकीचे ठरेल आणि त्यात राज्याच्या गृहविभागाची नाचक्की होऊ शकते.

मंदिरांंमध्ये गेल्यानंतर मला उभारी आणि प्रेरणा मिळाली !

फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचे विधान
हिंदूंनो, कोट्यवधी रूपये देऊनही मिळू शकणार नाही अशी
सात्त्विकता मंदिरांतून प्रक्षेपित होत असते, हे जाणून त्यांचे रक्षण करा !
    सॅन होजे (अमेरिका) - दहा वर्षांपूर्वी फेसबूक आर्थिक संकटात असल्याने विकण्याचा विचार चालू होता. या कठीण परिस्थितीतून जात असतांना मी भारताचा दौरा केला. या दौर्‍याच्या वेळी मंदिरांंमध्ये गेल्यानंतर मला उभारी आणि प्रेरणा मिळाली अन्  त्यानंतर माझी परिस्थिती पालटली. त्यामुळे फेसबुकच्या इतिहासात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे, असे विधान सामाजिक संकेतस्थळांमध्ये अग्रणी असलेल्या फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी केले आहे.

शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालू नये ! - समाजातील अनेक धर्माभिमान्यांची मागणी

समाजातील धर्माभिमानी आणि जिज्ञासू यांच्याकडून
दैनिक सनातन प्रभातच्या सत्यकथन विशेषांकाला उदंड प्रतिसाद !
पुरोगामीवाल्यांनी १ लक्ष लोकांच्या स्वाक्षरी घेतल्या,
तर आम्ही सनातनच्या बाजूने १० लक्ष हिंदूंच्या स्वाक्षरी
घेऊ !
- धर्माभिमानी अनिल खोत यांची विद्रोहींना चेतावणी
    कोल्हापूर, २८ सप्टेंबर (विशेष प्रतिनिधी) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला पोलिसांनी संशयित म्हणून अटक केल्यानंतर पुरोगामीवाल्यांकडून सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. असे असले, तरी ईश्‍वरनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ असलेल्या सनातन संस्थेवरील समाजाचा विश्‍वास तसूभरही अल्प झालेला नाही, उलट सनातन संस्थेच्या आम्ही पाठीशी असून कोणत्याही परिस्थितीत सनातन संस्थेवर बंदी येता कामा नये, अशा प्रतिक्रिया अनेक सनातनप्रेमी नागरिकांनी सनातनच्या साधकांशी बोलतांना व्यक्त केल्या आहेत. रणदेवीवाडी (तालुका कागल) येथील धर्माभिमानी श्री. अनिल खोत म्हणाले, सनातनच्या विरोधात पुरोगामीवाल्यांनी १ लक्ष लोकांच्या स्वाक्षरी घेतल्या, तरी आम्ही सनातनच्या बाजूनी १० लक्ष हिंदूंची स्वाक्षरी घेऊ. आम्ही संस्थेच्या पाठीशी आहोत, हे मुख्यमंत्र्यांना कळवू. सनातनला पाठिंबा देणार्‍या धर्माभिमान्यांमध्ये सनातनचे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी यांचा समावेश आहे. सनातनवरील समाजाचा विश्‍वास आणि प्रेम पहाता सनातनद्वेष्टे पुरोगामीवाल्यांचे सनातनवर बंदी घालण्याचे स्वप्न आता भंग पावले आहे, हे विशेष.  

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची आवश्यकता नाही ! विनय तेंडुलकर, अध्यक्ष, गोवा राज्य, भाजप

श्री. विनय तेंडुलकर
      पणजी - गोव्यातील भाजप सनातन संस्थेवर बंदी घालण्यास उत्सुक नसल्याची, तसेच सनातनच्या कार्याची चौकशीही करण्याची मागणी करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती गोव्यातील भाजपचे अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलतांना दिली आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या एका साधकाला चौकशीसाठी कह्यात घेतल्याच्या कारणास्तव सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस पक्ष, माकप, तसेच भाजपचे आमदार विष्णु वाघ यांनी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर विनय तेंडुलकर यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी गोव्याचे भाजप शासनाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी एका सदस्याच्या चुकीमुळे संपूर्ण संस्थेला दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे सांगून सनातन संस्थेवर बंदी घालण्यास शासन इच्छुक नसल्याचे म्हटले होते.

सनातनच्या विरोधकांना चोेख उत्तर !

सनातन सत्यकथन विशेषांकाविषयी अपप्रचार होऊनही त्याचेे वितरण वाढले !
     दैनिक सनातन प्रभातने सनातन सत्यकथन विशेषांक प्रसिद्ध करण्याचे नियोजन केल्यानंतर काही विरोधकांनी सामाजिक संकेतस्थळावरून या विशेषांकाच्या विरोधात मोहीम उघडली. हा अंक घेऊ नका. या अंकाच्या वितरणासाठी वितरणकक्ष लावू देऊ नका. त्यांना विज्ञापने देऊ नका. आपले पैसे खुन्यांना देऊ नका, असा टाहो फोडण्यात आला. महाराष्ट्र टाइम्ससारख्या प्रथितयश वृत्तपत्रानेही त्यांच्या संकेतस्थळावर विरोधकांच्या या वृत्ताला प्रसिद्धी देऊन सनातनचे विचार समाजात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र समाजातूनच आलेल्या उत्स्फूर्त मागणीवरून सनातन सत्यकथन विशेषांकाचे आवृत्तीनिहाय वितरण पुढीलप्रमाणे करण्यात आले. 
     सनातन प्रभातच्या या विशेषांकाच्या वितरणाची ही प्रचंड मोठी संख्या हेच सनातनच्या विरोधकांना चोख प्रत्युत्तर होय ! यावरून सनातनच्या कार्याला असणारे ईश्‍वरी अधिष्ठान स्पष्ट होते. - संपादक

या छायाचित्रातील साधकाकडे पाहून ते गुन्हेगार असतील, असे तुम्हाला वाटते वाटते का ?

श्री. विनायक पाटील
    मडगाव, गोवा येथील २००९ च्या स्फोट प्रकरणात ६ साधकांना पोलिसांनी अटक करून खटले भरले होत; मात्र त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांची ३१ डिसेंबर २०१३ या दिवशी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या ६ निर्दोष साधकांपैकी एका साधकाचे छायाचित्र येथे दिले आहे.
पोलिसांनो, खरे गुन्हेगार ओळखण्यासाठी साधना करण्याशिवाय पर्याय नाही !
    या छायाचित्राकडे पाहून सर्वसामान्य व्यक्तीही सांगू शकेल की, ते गुन्हेगार नाहीत; मात्र पोलीस ते ओळखू शकले नाहीत. त्यामुळे या साधकाला ४ वर्षे अकारण कारागृहात खितपत पडावे लागले. एखाद्याच्या मनात चिंता असेल, तर ती चिंता त्याच्या चेहर्‍यावर दिसते. इंग्रजीत चेहरा हा मनाचा आरसा आहे. (Face is mirror of mind.) त्यानुसार एखाद्याने गुन्हा केला असेल, तर त्याच्या चेहर्‍यावर तसे जाणवते; मात्र पोलीस निरपराध साधकांना नाहक अटक करून त्यांचा छळ करतात, म्हणजेच पोलिसांना गुन्हेगार ओळखता येत नाहीत. खरे गुन्हेगार ओळखण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही, हेच यातून सिद्ध होते; कारण साधनेमुळे सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता व्यक्तीत निर्माण होते आणि अशी सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेली व्यक्तीच एखादी व्यक्ती कशी आहे, हे लगेच ओळखू शकते. यावरून साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते.

तमिळनाडूत तिरुपती कोडाई या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

      चेन्नई (तमिळनाडू) - कोलाथूर येथे १२ सप्टेंबर या दिवशी तिरुपती कोडाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पूजा अर्चा आणि कैलास आश्रम येथील माताजी यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कुंकू लावणे, सात्त्विक वस्त्रे परिधान करणे, रांगोळी काढणे आणि नामजप करणे आदींमागील शास्त्र आणि महत्त्व सौ. जयकुमार यांनी सांगितले, तसेच गणेशोत्सव योग्य पद्धतीने कसा साजरा करावा ?, याविषयीही माहिती दिली. 
क्षणचित्रे
१. हिंदु जनजागृती समितीच्या आध्यात्मिक कार्यक्रमांना मला आमंत्रित करावे, असे माताजींनी सांगितले.
२. या वेळी अन्य दोन मंदिर व्यवस्थापनांनी हिंदु जनजागृती समितीला गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले.

जीवनात यशस्वी होण्यासाठी अध्यात्म आवश्यक ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती
समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे
(उजवीकडे बोलतांना)
     बिकानेर (राजस्थान) - चांगले शिक्षण, नोकरी, व्यवसाय, बंगला, गाडी आणि विदेशात जाणे, ही आज यशस्वी जीवनाची व्याख्या झाली आहे; मात्र असे सर्व असतांनाही आम्ही आज दु:खी आणि आत्महत्या करणारे लोक पहात आहोत. सुख मिळवून देणार्‍या भौतिक वस्तू नाही, तर सदैव आनंद कसा मिळवायचा, हे शिकवणारे अध्यात्मच जीवनात यशस्वी कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शन करू शकते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. 

धर्मनिरपेक्ष ब्लॉगर्सना शोधून ठार मारा !

बांगलादेशी धर्मांध संघटनेकडून तिच्या कार्यकर्त्यांना आवाहन
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बढाया मारणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     ढाका - बांगलादेशच्या अंसारुल्लाह बांगला या धर्मांध संघटनेने प्रसिद्ध धर्मनिरपेक्ष ब्लॉगर्सची (स्तंभलेखकांची) आंतरराष्ट्रीय सूची सिद्ध केली आहे. या सूचीत अमेरिका, ब्रिटन आणि युरोप येथील ब्लॉगर्सची नावे असून त्यांना शोधून ठार मारण्याचे आवाहन या संघटनेने केले आहे, असे वृत्त ब्रिटनच्या डेली मेल या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. 
       डेली मेलनुसार या सूचीत जगातील किमान २० लोकांची नावे आहेत. ही यादी या आतंकवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. याविषयी ब्लॉगर्स समुदायाच्या अधिकारांसाठी काम करणारे वाले थॉमस ह्यूग्स म्हणाले, लेखक आणि ब्लॉगर्स समुदाय यांना दिलेली चेतावणी म्हणजे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केलेले आक्रमण आहे. या वर्षात बांगलादेशात ४ धर्मनिरपेक्ष ब्लॉगर्सना ठार करण्यात आले आहे.

लक्षावधी मुसलमानांच्या युरोपीय देशात पळून जाण्याने आय.एस्.आय.एस्.च्या पायाखालची माती सरकली !

      बगदाद (इराक) - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेने सिरिया आणि इराक या देशांतील मोठा भाग जिंकून तेथे खिलाफत (इस्लामच्या नियमांनुसार चालणारी राजवट) निर्माण केले आहे. ही खिलाफत स्थापन करून तेथे पृथ्वीवरील स्वर्ग निर्माण केल्याचा दावा आय.एस्.आय.एस्. करत आहे; मात्र या भागातील लक्षावधी मुसलमान जीव धोक्यात घालून युरोपीय देशांकडे आश्रय घेण्यासाठी जात आहेत. त्यामुळे आय.एस्.आय.एस्.चा पृथ्वीवरील स्वर्ग निर्माण केल्याचा दावा पोकळ ठरत आहे. विस्थापितांच्या लोंढ्याला रोखण्यासाठी आय.एस्.आय.एस्.ने अनेक चलचित्रफिती (व्हिडिओ) निर्माण करून त्याद्वारे युरोपच्या दिशेने पळून जाणार्‍या मुसलमानांना खिलाफातमध्ये परत येण्याचे आवाहन केले आहे.

पुणे येथे घाटांवर प्रबोधन करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी !

ओंकारेश्‍वर घाटावर पोलिसांनी प्रबोधन चळवळ बंद पाडली
हिंदुत्ववाद्यांना दमदाटी करणार्‍या पोलिसांनी दुसर्‍या
संघटनेला थांबवण्याविषयी स्वतःहून पुढाकार का घेतला नाही ?
      पुणे, २८ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या आदर्श गणेशोत्सव प्रबोधन चळवळीच्या अंतर्गत भिडे पूल, ओंकारेश्‍वर पूल, एस्.एम्. जोशी पूल येथील घाटांवर भाविकांना धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते हातात प्रबोधनात्मक फलक घेऊन उभे असतांना ओंकारेश्‍वर पुलाजवळील वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर घाटावरील चळवळ पोलिसांनी दमदाटी करून बंद पाडली.

चिंचवडमध्ये घाटावर, तसेच हौदात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती खाणीत टाकल्या !

सनातन श्रीगणेशमूर्तींविषयी जे सांगत होते तेच घडले !
आतातरी श्री गणेशभक्त वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जन करणार का ?
      चिंचवड, २८ सप्टेंबर (वार्ता.) - चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयाच्या समोरील घाटावरील कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या, तसेच दान घेतलेल्या मूर्ती २८ सप्टेंबर या दिवशी ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयासमोरील खाणीत टाकण्यात आल्या. केवळ कृत्रिम हौदातीलच नाही, तर नदीमध्ये पाणी कमी असल्याने ज्या गणेशमूर्ती पाण्यावर तरंगत होत्या, त्याही उचलून सकाळी काठावर ठेवण्यात आल्या होत्या, त्या गणेशमूर्तीही पुन्हा खाणीत टाकण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवड येथे श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन, मूर्तीदानास अल्प प्रतिसाद

     पिंपरी-चिंचवड, २८ सप्टेंबर (वार्ता) - शहरातील बिर्ला रुग्णालयाच्या जवळील घाट, काकडे पार्क, वाकड गावठाण, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपरीगाव, मासुळकर वसाहत येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासंबंधी सिद्धता करण्यात आली होती. अनेक भाविकांचा कल नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे होता आणि मूर्तीदान करण्याला अल्प प्रतिसाद मिळाला.
१. चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयाच्या जवळील घाट आणि काकडे पार्क येथील घाट या ठिकाणी नागरिकांनी नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन केले; परंतु या ठिकाणी ध्वनीक्षेपकावरून भाविकांना आवाहन केले जात असल्यामुळे मूर्तीदान केले जात होते.

धुळे येथे वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या मोहिमेला १०० टक्के यश

हिंदूंनो, या यशासाठी श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !
हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनाचा परिणाम
      धुळे - येथे हिंदु जनजागृती समितीने गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याच्या संदर्भात राबवलेल्या मोहिमेला १०० टक्के यश मिळाले. येथील खासदार डॉ. सुभाष भामरे यांना हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनानंतर त्यांनी महानगरपालिकेला कृत्रिम तलाव बांधू नयेत, अशा सूचना देणार असल्याचे सांगितले. समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त श्री. नामदेवराव भोसले आणि महापौर सौ. जयश्रीताई अहिरराव, धुळे जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ आणि उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवले यांनीही कृत्रिम तलाव बनवणार नसल्याचे सांगितले.

धुळे येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

तथाकथित पुरोगामी प्रवृत्तीच्या संघटनांवर कायदेशीर कारवाईची मागणी
     धुळे - सनातन संस्थेच्या विरोधात अपप्रचार करत संस्थेवर कारवाई करण्याविषयी बंदी आणण्यासाठी शासनावर दबाव आणणार्‍या तथाकथित पुरोगामी प्रवृत्तीच्या संघटनांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्ववादी संघटनांनी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुळवले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सदर निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांकडून सुपुर्द करण्यात आले. कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तथाकथित पुरोगामी संघटना सनातन संस्थेच्या विरोधात अपप्रचार करत आहेत. शासनाने त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या बंदीच्या दबावाला बळी न पडता हत्या प्रकरणाचे निःपक्ष अन्वेषण करावे, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.
    या वेळी योग वेदांत सेवा समितीचे डॉ. योगेशभाई, श्री. कमलेशभाई, स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास रजपूत, शिवसेनेचे श्री. कपिल शर्मा आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


पुणे येथे मानाच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन !

श्री तांबडी जोगेश्‍वरी मित्रमंडळाच्या गणपतीची पालखी
कथित पर्यावरणवाद्यांकडून पुण्यातील घाटांवर
भाविकांना कृत्रिम हौदात विसर्जन करण्याची सक्ती
    पुणे, २८ सप्टेंबर (वार्ता.) - १० दिवस मोठ्या उत्साहात साजर्‍या करण्यात आलेल्या गणेशोत्सवाची अनंत चतुर्दशीच्या दिवशी सांगता झाली. ४३७२ सार्वजनिक आणि ४ लाख ७९ सहस्र ९२२ घरगुती गणेशमूर्तींचे या वेळी विसर्जन करण्यात आले. गणेशभक्तांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करून गणरायाला निरोप दिला. पुण्यनगरीचे वैशिष्ट्य असलेल्या मानाच्या ५ गणपतींची विसर्जन मिरवणूकही नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडली. ढोल-ताशांचा दणदणाट, नाचवले जाणारे भगवे झेंडे, गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा यांमुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण होते. केवळ मानाच्या गणेशमंडळाच्या पदाधिकार्‍यांनी घोषित केलेल्या निर्णयाप्रमाणे पाचही गणपतींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. मानाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी दोन ठिकाणी कृत्रिम टाक्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. कथित पर्यावरणवाद्यांनी भाविकांच्या केलेल्या बुद्धीभेदामुळे कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन होत असले, तरी अनेक जणांनी धर्मशास्त्राप्रमाणे नदीच्या वहात्या पाण्यात पारंपारिक पद्धतीने विसर्जन केले.

मिरज शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उभारल्या वैशिष्ट्यपूर्ण कमानी

मिरज शहरातील शिवसेनेची ५० वर्षेपूर्तीची वैशिष्ट्यपूर्ण कमान
मिरज येथील छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळाची शिवाजी चौक येथील कमान
     मिरज, २८ सप्टेंबर (वार्ता.) - मिरज शहराला कमानींचा इतिहास आहे. विविध गणेशोत्सव मंडळांनी उभारलेल्या कमानी पहाण्यासाठी भाविक लांबून येतात. यंदा श्री. सुधीर अवसरे यांच्या छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळाने दैत्यांना ठार मारणार्‍या शंकराचे चित्र असणारी कमान उभी केली आहे. शिवसेनेने ५० वर्षे पूर्ण झाल्याविषयी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्राची भव्य कमान उभी केली आहे. या कमानीवर शिवसेनेेने केलेली विविध कामे चित्रीत करण्यात आली आहेत.

(म्हणे) सनातनचे जयंत आठवले यांना देशद्रोही ठरवा !

कोल्हापूर येथील जाहीर प्रतिरोध परिषदेत विद्रोहींचा ठराव
अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले 
यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करणे हास्यास्पद !
      कोल्हापूर, २८ सप्टेंबर (वार्ता.) - पुरोगामी विचारांनी कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम्.एम्. कलबुर्गी यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी निंदनीय आहे. या घटनांचे समर्थन आणि पोलिसांनी संशयित म्हणून कह्यात घेतलेल्यांना पाठीशी घालणार्‍या आणि माहिती प्रसारित करणार्‍या सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करावेत, असा ठराव येथे झालेल्या जाहीर प्रतिरोध परिषदेत करण्यात आला. (अजमल कसाबचे वकीलपत्र घेणारे, याकूबच्या फाशीला विरोध करणारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कधी विद्रोही म्हणवणार्‍यांनी केली आहे का ? डाव्यांच्या हातातील नक्षलवाद्यांची सनातनला भीती दाखवणारे प्रकाश आंबेडकर यांचा विद्रोहींनी एका शब्दाने तरी निषेध केला का ? कि त्यांना हा नक्षलवाद मान्य आहे ? - संपादक) डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ येथील शाहू स्मारक भवन येथे २६ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नंदकुमार गोंधळी, दलित ऐक्य चळवळीचे मच्छिंद्र कांबळे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके, अधिवक्ता पंडित सडोलीकर, डॉ. ज.रा. दाभोळे, बाळासाहेब भोसले, लालासाहेब नाईक, सखाराम कामत, अनंत मांडुकलीकर, अस्मिता दिघे यांनी या परिषदेत विचार मांडले. 

सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात एकवटले सातारा येथील संत आणि धर्माभिमानी हिंदू

निवेदन देतांना संत, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी
    सातारा, २८ सप्टेंबर (वार्ता.) - नुकतेच सातारा येथील काही धर्मद्रोही संघटनांनी सनातन संस्थेवर बंदी आणावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. धर्मद्रोह्यांच्या या मागणीला विरोध दर्शवत आज सातारा येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवत मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांना जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने निषेध निवेदन दिले.

३०० भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय !

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यावरील पोलीस लाठीमार प्रकरण
    काशी (वाराणसी) - नदी प्रदूषणाविषयी उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगून काशी प्रशासनाने हिंदूंना गंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला होता. शासनाच्या या कारवाईच्या विरोधात आंदोलन करणार्‍या स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यासह अनेक हिंदुत्ववाद्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. या लाठीमाराच्या संदर्भात भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप करून भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तथापि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी हे पक्षांतर्गत प्रकरण असल्यामुळे सोडवण्यात येईल, असे म्हटले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, मंदिरांचे महत्त्व जाणा !
    फेसबूक आर्थिक संकटात असतांना मी भारतातील मंदिरांंमध्ये गेलो. त्यानंतर मला नवीन उभारी आणि प्रेरणा मिळून माझ्यात फेसबूकला अब्जावधी रुपयांच्या कंपनीत परावर्तीत करण्याचा आत्मविश्‍वास निर्माण झाला, असे विधान फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Facebook ke Mark Zuckerberg ne kaha,
Bharatke mandirme janese bacha dubta huva Facebook.
- kya ab nidharmi Zuckerberg ko bhi andhavishvasi kahenge ?
जागो !
    फेसबुक के संस्थापक मार्क झुकेरबर्ग ने कहा, भारत के मंदिर में जाने से
बचा था डुबता हुआ फेसबुक ! - क्या अब निधर्मी झुकेरबर्ग को भी अंधविश्‍वासी कहेंगे ?

खर्‍या आतंकवादाकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणारे (अ)विवेकी पुरोगामी !

डॉ. सच्चिदानंद शेवडे
     कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर तथाकथित विचारवंत, पुरोगामी, तसेच प्रसिद्धीमाध्यमे यांनी पक्षपातीपणे एकांगी बाजू मांडत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सनातन संस्थेवर खोटे आरोप करून संस्थेवर बंदी आणण्याचा कांगावा केला. या लेखात राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी पुरोगाम्यांच्या पक्षपातीपणा उघड करून सनातनची सत्य बाजू मांडली आहे.
     आम्ही सनातन संस्थेचे साधक नाही, हे आरंभीच सांगून टाकतो. त्याप्रमाणे दाभोलकर, पानसरे आणि कलबूर्गी यांचे हत्यारे सापडून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, या मताचे आहोत; पण म्हणून आम्ही आमची सद्सद्विवेकबुद्धी कोणाच्या दावणीला बांधलेली नाही अथवा गहाणही टाकलेली नाही. त्यामुळे सनातन संस्थेचा एक साधक संशयित म्हणून पकडला जाताच, आम्ही संपूर्ण संस्थेवर दोषारोप करू इच्छित नाही.

सनातन धर्म बुडवणे कोणाच्या हातचे नाही ! - स्वातंत्र्यवीर सावरकर

      सनातन धर्माविषयी वर्ष १९३० मधील एका लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही. सनातन धर्म बुडवणे मूठभर सुधारकांच्याच नव्हे, तर मनुष्यजातीच्याही हातचे नाही. जेव्हा आपण धर्म शब्दास सनातन हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्‍वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान असा असतो. आदिशक्तीचे स्वरूप, जगताचे आदिकारण आणि आदिनियम हे सनातन, शाश्‍वत आणि त्रिकालाबाधित आहेत. भगवद्गीतेत किंवा उपनिषदांत याविषयीचे जे सिद्धांत प्रकट केले आहेत, ते सनातन आहेत. ते पालटणे ही मनुष्यशक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. ते सिद्धांत आहेत ते आहेत आणि तसेच कायम रहाणार.

रेल्वेअपघात टाळण्यासाठी आवश्यकता प्रबळ इच्छाशक्तीची !

      लोकलट्रेन ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. कितीतरी लोक याचा वापर वर्षानुवर्षे करत आहेत. लोकसंख्या वाढली, रेल्वेचा विस्तार वाढला आणि त्याचसमवेत विविध अडचणी डोके वर काढून प्रवाशांना त्रास देऊ लागल्या. त्यावर तात्पुरते उपाय रेल्वेकडून झालेही; पण या सेवेवरील भार पहाता तेही तोकडेच पडत आहेत. अशा स्थितीत आवश्यकता आहे, ती रेल्वेने आपल्या चुकांची उजळणी करून प्रवाशांना विनाकटकट सुविधा पुरवण्यासाठी विचारपूर्वक पावले टाकण्याची !

सनातन मूल्यांची उपेक्षा आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आचरण यांमुळे राष्ट्राने सर्वच गोष्टींत गाठलेली अधोगतीची परिसीमा

     स्त्रीने स्त्रीत्व गमावले. पुरुष वीर्यहीन झाला. समाजाने धर्मतेज गमावले. राष्ट्राने अस्मिता गमावली. आधुनिकता बोकाळली. माणूस श्रद्धाहीन आणि स्वैर बनला. समाज अधःपतनाच्या गर्तेत पडला. राष्ट्र लयाला जात आहे. पाश्‍चात्त्यांच्या या क्षुद्र नव्या बाजारूपणापुढे पुराणांनी जोपासलेला संवर्धिलेला आत्मा कोलमडून पडत आहे; कारण आम्ही आमच्या सनातन मूल्यांची उपेक्षा केली. लक्षावधी वर्षांच्या परंपरा आणि संस्कृती मोडित काढल्या. पुराणांना भाकडकथा ठरवल्या. जर आम्ही पुराणे खरोखर जाणली असती, त्यांची परम महनीयता ओळखली असती, तर वेगळेच घडले असते. आम्ही विलक्षण धीट झालो असतो. अधिक स्वतंत्र बुद्धीचे झालो असतो. आपल्या पायावर उभे रहातांना कचरलो नसतो. आमच्या परंपरांना आम्हीच नाक मुरडले नसते. आपल्या राष्ट्रीयतेची आम्हाला लाज वाटली नसती. पुराणांचा निधी आमच्याजवळ असतांना आम्ही पाश्‍चात्त्य संस्कृतीला सामोरे जातांना आमची भूमिका त्यांच्यापेक्षा वरची ठेवली असती.
      देवा, तू आमचा पाठीराखा आणि रक्षणकर्ता आहेस; म्हणूनच आम्ही निर्भय आहोत. पुराण संस्कृतीचे हरपलेले वैभव तुझ्या कृपेने आम्ही पुन्हा आत्मसात करू. तुझा जयजयकार असो !
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, नोव्हेंबर २०१४)

हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे आणि तो येऊ नये; म्हणून कोणती काळजी घ्यावी ?

जागतिक हृदयरोगदिनाच्या निमित्ताने...
      आपला श्‍वास जन्मानंतर चालू होतो; परंतु हृदयाचे आकुंचन-प्रसरण गर्भावस्थेत पहिल्या तीन मासांतच (महिन्यांतच) चालू होते आणि मृत्यूपर्यंत चालू रहाते. जन्मानंतर पहिल्या मासात प्रत्येक मिनिटाला हृदयाचे १४० ठोके पडतात. तरुण माणसांत प्रत्येक मिनिटाला ७२ ठोके पडतात आणि प्रत्येक मिनिटाला ५ लिटर रक्त पंप केले जाते. हृदय हा सर्व शरिराला रक्त पुरवणारा आणि परत सर्व शरिरातून रक्त खेचणारा, तसेच कधीही विश्रांती न घेता सतत चालणारा जिवंत पंप आहे. रक्ताद्वारे तो सर्व पेशी आणि अवयव यांना अन्न, पाणी अन् प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवतो, तसेच सर्व पेशींतील मळ मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि त्वचा यांच्याकडे पोहोचवतो. काम करतांना किंवा धावतांना स्नायूंना अन्न, पाणी आणि प्राणवायू यांची अधिक आवश्यकता असते, तेव्हा हृदयाची गती वाढते आणि झोपेत हृदयाची गती घटते. हृदयाचे आकुंचन-प्रसरण एक मिनिट बंद पडले, तरी आपण जिवंत राहू शकत नाही. योगशास्त्राप्रमाणे हृदय हे अनाहतचक्राचे स्थान आहे. प्राचीन काळापासून कवींनी हृदयाला मनाचे स्थान मानले आहे. एखादा प्रसंग किंवा एखादी व्यक्ती हृदयाला स्पर्श करून किंवा हृदयात घर करून गेली, असे आपण व्यवहारात म्हणतो; कारण मनोभावनांचा हृदय आणि नाडी यांच्या गतीवर सतत परिणाम होत असतो. कॉरोनरी आर्टरीद्वारे हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवले जाते. या कॉरोनरी आर्टरीत रक्ताची गुठळी झाल्यास हृदयविकाराचा झटका (हार्ट अ‍ॅटॅक) येतो.

हिंदु जनजागृती समितीचे आदर्श गणेशोत्सव जनजागृती अभियान

कर्नाटकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद !
गणेशोत्सव जनजागृती अभियान
     शिवमोग्गा (कर्नाटक) - गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकमध्ये आदर्श गणेशोत्सव जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत राज्यातील १५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये ४८९ गणेशोत्सव मंडळांना संपर्क करण्यात आला. 
१. या मंडळांना धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्ती कशी असावी, गणेशोत्सवाचा उद्देश, मूर्ती विसर्जनाची योग्य पद्धत, या उत्सवात कोणते धार्मिक कार्यक्रम असावेत इत्यादींविषयी ध्वनीचित्र-चकती दाखवून प्रबोधन करण्यात आले. परिणामस्वरूप हुब्बळ्ळी नगरातील ११ गणेशोत्सव मंडळांनी या वर्षी गणेशोत्सव मिरवणुकीत डीजे न लावता शक्य होईल तेवढे धार्मिक कार्यक्रम करण्याचे आश्‍वासन दिले. 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       परमेश्‍वराप्रमाणेच सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असेल, तर सद्गुरूंच्या रूपात परमेश्‍वर दिसतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हृदयरोगांविषयी अनमोल मार्गदर्शन करणारे सनातनचे ग्रंथ !

हृदयाच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार (भाग १)
दोषज हृद्रोग, अ‍ॅन्जायना, हार्ट अ‍ॅटॅक आदींवरील उपचार
१. अ‍ॅन्जायना (हत्शुल) म्हणजे काय ?
२.  हृदयविकाराचा झटका म्हणजे काय ?
३. हृदयविकाराचा झटका येऊ नये ; म्हणून कोणती काळजी घ्यावी. 
४. हृदयविकाराचा झटका आलेला माणूस बरा कसा होतो. 
५. जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांना कसे हाताळावे.
     संस्कृतीद्वेष्टे अंधश्रद्धा अशी शिवी हासडून स्वतःला कृतार्थ मानतात. अंधश्रद्ध अशी श्रद्धावानाची हेटाळणी करणारे हे कॉन्व्हेंट, पॉप संस्कृतीचे पोषक नि संवर्धक स्वतः मात्र अंधश्रद्धेने पछाडलेले असतात ! - प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी

नामजपासंबंधी काही आवश्यक गोष्टी

१. 'जननाशौच (संतती जन्माच्या वेळी लागणारे अशौच) असतांना मातेने (प्रसूत स्त्रीने) ४० दिवस आणि पित्याने १० दिवस माळ घेऊन नामजप करू नये.    
२. मरणाशौच (मृत्यूच्या वेळी लागणारे सूतक) असतांना १३ दिवस माळ घेऊन नामजप करू नये.
३. जन्म-मृत्यू दोन्ही अशौचात शुद्धी झाल्यानंतरच माळेने नामजप करू शकतो; परंतु मानसिक जप तर प्रत्येक अवस्थेत केला जाऊ शकतो आणि केलाच पाहिजे.
४. रजस्वला स्त्रीला जोपर्यंत मासिक धर्म असतो, तोपर्यंत तिने माळेने नामजप करू नये आणि मानसिक जपसुद्धा प्रणव (ॐ) रहित करावा.
५. जोपर्यंत मासिक धर्म असेल, तोपर्यंत दीक्षासुद्धा घेता येत नाही. पाचव्या-सहाव्या दिवशीसुद्धा मासिक धर्म चालू असल्यास अज्ञानवश दीक्षा घेतली किंवा अशा प्रकारे दुसरी एखादी चूक झाली, तर तिच्या प्रायश्चित्तासाठी 'ऋषिपंचमी' (गुरुपंचमी) हे व्रत केले पाहिजे.'   
(संदर्भ : मासिक 'ऋषी प्रसाद', ऑगस्ट २००४)

संतांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या ध्वनीचकत्या ऐकून लिखाणाच्या टंकलेखनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

कु. नंदा नाईक
१. संतांच्या मार्गदर्शनाच्या ध्वनीचकत्या ऐकून टंकलेखन करण्याची सेवा चालू केल्यापासून कानात यंत्र न घालता व्यवस्थित ऐकू येणे : 'मला लहानपणापासून अल्प (कमी) ऐकू येते. त्यामुळे मला कानात यंत्र घालावे लागते. गेले ९ मास (महिने) मी संतांचे मार्गदर्शनांच्या ध्वनीचकत्या ऐकून त्यातील लिखाणाचे टंकलेखन करत आहे. ही सेवा चालू केल्यापासून मला कानात यंत्र न घालताही व्यवस्थित ऐकू येते. 
२. एकाग्रता साधता येऊन आकडी येण्याचा त्रास उणावणे : ही सेवा चालू केल्यापासून मला एकाग्रता साधता येते. यापूर्वी मला जराही एकाग्रता साधता येत नव्हती. कोणत्याही विषयात एकाग्रता साधण्याचा प्रयत्न केल्यावर मला तीव्र डोकदुखी चालू होऊन आकडी येत असे; परंतु हा त्रास आता अल्प झाला आहे. 
३. इतरांनी बोललेले पटकन लक्षात येणे : गेल्या २५ वर्षांपासून मला इतरांनी सावकाश बोलले, तरच 'ते काय बोलत आहेत', हे लक्षात यायचे; परंतु टंकलेखनाची सेवा चालू केल्यापासून इतरांचे बोलणे मला पटकन समजायला लागले आहे. 
वरील अनुभूतींसाठी मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.' 
- कु. नंदा नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०१५) 

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी, तसेच चालक-साधकांची तातडीने आवश्यकता ! 
    सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यातील चैतन्य अन् सात्त्विकता यांचा लाभ व्हावा, यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. याचाच एक भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये धर्मरथाद्वारे उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात येते. यामध्ये ग्रंथ आणि उत्पादने यांची माहिती सांगणे, हिशोब ठेवणे, तसेच ग्रंथप्रदर्शनाचे नियोजन पहाणे आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे.

अनेक प्रयत्न करूनही २० वर्षांपासून असलेले यजमानांचे दारूचे व्यसन न सुटणे आणि श्री गुरुदेव दत्त हा नामजप, श्राद्धविधी, तसेच आध्यात्मिक उपाय यांमुळेे दारूचे व्यसन सुटणे

पितृपक्षातील श्राद्ध !
      हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.

मंगळुरू येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्री. प्रशांत हरिहर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. प्रशांत हरिहर
१. नम्रता : 'प्रशांत गुरुजनांसमोर सदैव नम्र रहातो. कुणी काही सांगितले, तरी ते तत्परतेने ऐकतो. 
२. समाधानी : जीवनात जे मिळेल, त्यात तो समाधानी असतो. 
३. सकारात्मकता : लहानपणापासून तो सकारात्मक होता. साधनेत आल्यानंतर त्यात वृद्धी झाली आहे. वर्ष २००९ मध्ये माझ्या मनात नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढल्याने माझे मन चिंताग्रस्त असायचे. त्या वेळी प्रशांतने मला सकारात्मक विचार करण्यास शिकवून त्या स्थितीतून मला बाहेर काढले.
४. इतरांना साहाय्य करणे : लहानपणापासून तो इतरांना कामात साहाय्य करत असे. आमच्या घरी सासरे करत असलेल्या कामात मी न सांगता स्वतः पुढाकार घेऊन साहाय्य करत असे. कोणतेही काम अर्धवट न सोडता तो ते पूर्ण करत असे. 

प्रत्येक कृती नामासहित अन् भावपूर्ण करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या संभाजीनगर येथील श्रीमती छाया बन्सी काकडे !

'लहानपणापासूनच देवाने माझ्यात साधनेची आवड निर्माण केली. लहानपणापासून व्रतवैकल्ये, देवळात जाणे, प्रतिदिन हरिपाठ म्हणणे, रात्री आजीसमवेत गावात पोथी ऐकायला जाणे इत्यादी सर्व साधना देवानेच माझ्याकडून करवून घेतल्या. विवाहानंतरही नियमित कुलधर्म-कुलाचारांचे पालन करणे, भगवद्गीता वाचणे, पोथी वाचणे, अशा माध्यमातून देवानेच माझ्याकडून प्राथमिक टप्प्याची साधना करवून घेतली.
त्यानंतर गेल्या १२ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत असतांना आणि माझी काही पात्रता नसतांना श्रीकृष्णानेच आयुष्यातील अनेक प्रसंगांत साधनेत टिकवून ठेवले. यासाठी त्याच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! जीवनाच्या या प्रवासात श्रीकृष्णाच्या कृपेने साधनेसाठी केलेले प्रयत्न आणि आलेल्या काही अनुभूती येथे देत आहे.

कर्तेपणा श्रीकृष्णाला अर्पण करणारा डोंबिवली येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. हृषिकेश प्रसाद लेले (वय १ वर्ष) !

१. जन्मापूर्वी 
१ अ. चांगले संस्कारक्षम मूल जन्माला यावे, अशी इच्छा असणे : 'आम्ही दोघांनी मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या मनात असा विचार होता की, एक चांगले संस्कारक्षम आणि चांगले कार्य करणारे मूल आपल्या पोटी जन्माला यावे. आम्ही इतर कोणत्याही अपेक्षा त्याच्याकडून ठेवल्या नव्हत्या.
१ आ. प्रतिदिन रेकी घेऊन शरिराची शुद्धी करणे : माझे लग्न होऊन २ वर्षे झाल्यानंतर मी रेकीचा पहिल्या डिग्रीचा आणि दुसर्‍या डिग्रीचा वर्ग केला. मूल चांगले निपजण्यासाठी आणि बीज शुद्ध असायला हवे, यासाठी मी नियमितपणे प्रतिदिन १ घंटा २० मिनिटे रेकी उपचार घेऊ लागले.
१ इ. रात्री झोपण्यापूर्वी खोलीची शुद्धी करणे : रात्री झोपण्यापूर्वी उदबत्ती खोलीत लावून शुद्धी करत होतो. दोघांच्या मनात सतत चांगले विचार असायचे. संपूर्ण खोलीत रेकीत शिकवलेली सेकंड डिग्रीची चिन्हे काढत होतो. १५ मिनिटे ध्यान लावून शांत बसण्याचा प्रयत्न करत होतो.
१ ई. बाळ पोटात असतांनाच त्याला रेकीचा दुसरा वर्ग ऐकायला मिळणे : मला ज्या मासात 'दिवस राहिले आहेत', असे समजले, त्याच मासात म्हणजे मार्च २०१३ मध्ये माटुंगा येथे श्री. अजित तेलंगगुरुजी आणि कल्पिताताई कीर या सेकंड डिग्री रेकीचा वर्ग घेणार होत्या. त्या वर्गाला मला जायला मिळाले आणि त्यालाही सेकंड डिग्री रेकीचा वर्ग ऐकायला मिळाले. हा एक चांगला योगायोगच होता.
१ उ. आध्यात्मिक उपाय आणि आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन चालू करणे : ९ मास पूर्ण होईपर्यंत मी रेकी घेणे, अत्तर आणि कापराचे उपाय नियमित करत होते. बालाजी तांबे यांची गर्भसंस्कार सीडी प्रतिदिन ऐकत होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांची पोथी प्रतिदिन वाचत होते. 'साद देती हिमशिखरे', 'साधनामस्त', 'भागवत' अशी आध्यात्मिक पुस्तके वाचण्याची मला आतून तीव्र इच्छा होत होती; म्हणून ती सर्व पुस्तके वाचली.
ऊ. नियमितपणे रेकी घेतल्यामुळे आपल्याला काहीच होणार नाही, या विश्‍वासाने घरातील कामे करणे : पहिले ३ मास आधुनिक वैद्यांनी मला संपूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले होते; परंतु 'मी नियमितपणे रेकी घेत आहे. त्यामुळे मला कोणताही त्रास होणार नाही', असा दृढ विश्‍वास निर्माण झाला आणि मी घरातील दैनंदिन कामे सहजतेने करत होते.
१ ए. कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याची तीव्र इच्छा होऊन दर्शनाला जातांना कोणताही त्रास न होणे, तसेच सोमनाथची नियोजित यात्राही सुखरूप होणे : त्याच कालावधीत मला कुलदेवी श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला जावेसे वाटत होते. मी रेकीच्या उपायांवर संपूर्ण भार टाकून आमची कुलदेवता कोल्हापूरची श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनाला गेले. मला प्रवासाचा कोणताही त्रास झाला नाही. मला ३ मास पूर्ण झाल्यानंतर आम्ही सोमनाथ येथेही गेलो होतो. सोमनाथ यात्रेचे नियोजन ४ मास अगोदरच केलेले होते. माझ्यासाठी ते रहित करणे मला योग्य वाटले नाही; म्हणून मी रेकीवरच पूर्ण विश्‍वास ठेवून निर्धास्तपणे प्रवास केला. प्रवासातही मी रेकी घेत होते. माझ्या सासूबाईंना माझी काळजी वाटत होती; म्हणून त्यांनी मला आल्यानंतर लगेच डॉक्टरांकडे नेले आणि त्यांनी माझी प्रकृती पुष्कळ चांगली असल्याचे सांगितले.
१ ऐ. बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या चांगल्या पायगुणाची जाणीव होणे : मला चौथा महिना लागला आणि बाळाची पणजी सौ. सुमित्रा वसंत खरे (माझ्या सासूबाईंची आई) अन् माझे आजी-आजोबा सौ. शैलजा परांजपे आणि श्री सदाशिव परांजपे यांची आध्यात्मिक पातळी ६१ प्रतिशत झाल्याचे घोषित करण्यात आले.
१ ओ. बाळाला गुंडाळण्यासाठी प.पू. राघवेंद्रस्वामी (मंत्रालय) यांच्या वृंदावनावर घातलेले भगवे उपरणे मिळणे : आठव्या महिन्यात प.पू. राघवेंद्रस्वामी (मंत्रालय) यांचे अंतरंग शिष्य पू. अण्णा (भालचंद्र) लिमये यांनी त्यांना भेट म्हणून मिळालेले प.पू. राघवेंद्रस्वामींच्या वृंदावनावर घालण्यात आलेले भगवे उपरणे बाळ जन्माला आल्यानंतर त्याला गुंडाळण्यासाठी दिले.
१ औ. गरोदरपणात निसर्गाशी जवळीक साधण्याची इच्छा होणे : गरोदरपणाच्या कालावधीत मला निसर्गाशी जवळीक साधण्याची तीव्र इच्छा होत होती. मी रेकी घेत असतांना बाळही माझ्या स्पर्शाला प्रतिसाद देत असे. या कालावधीत मला केवळ फळेच पचत होती. बाळ जन्माला येण्यापूर्वी मला सर्व उत्तमोत्तम पदार्थ आणि अत्यंत पौष्टिक पदार्थ खायला मिळाले.
२. जन्माच्या वेळी 
२ अ. बाळाच्या श्‍वसनाचा आलेख असमाधानकारक येणे : नवव्या मासातील 'सोनोग्राफी'त बाळाच्या गळ्याभोवती नाळेचे वेढे असल्याचे दिसून आले. बाळाची 'टीसीजी' (बाळाचा कार्डिओग्राम) केली, तर बाळाच्या हालचालीच्या वेळा न्यून होत आहेत, तसेच 'बाळाच्या श्‍वसनाचा आलेखही असमाधानकारक आहे', असे निदान झाले आणि डॉक्टरांनी त्याच दिवशी 'सिझर' करण्याचा निर्णय घेतला.
२ आ. रेकी मिळाल्यानंतर श्‍वसनाचा आलेख सुधारणे : २ घंट्यांनी 'परत एकदा चाचणी करूया', असे डॉक्टर म्हणाले; म्हणून आम्ही रेकी मास्टर कु. कल्पिताताई कीर यांना बाळाला रेकी पाठवण्यास सांगितली. पहिली चाचणी झाल्यानंतर सुमारे २ घंट्यांनी बाळाची परत 'टीसीजी टेस्ट' करण्यात आली. रेकी मिळाल्यामुळे ही चाचणी समाधानकारक आली आणि लगेच 'सिझर' केले. बाळ अगदी सुखरूपपणे जन्माला आले.
३. १ ते ३ महिने 
३ अ. जन्माला आल्यानंतर सात्त्विक कपडेच परिधान करणे : बाळ जन्माला आल्यानंतर त्याला लगेच मंत्रालय येथील वृंदावनावर घातलेल्या वस्त्रात गुंडाळले. बाळाच्या पणजीच्या साडीच्या शिवलेल्या चौघड्या, लंगोट आणि पनवेल येथील ६१ प्रतिशत पातळीची चि. शुभ्रा गोगटे हिचे कपडे असे सर्व सात्त्विक कपडेच त्याने जन्माला आल्यापासून परिधान केले.
३ आ. बाळ जन्माला आल्यापासून कोणत्याही गोष्टीची उणीव न भासणे : बाळाचा जन्म झाल्यापासून त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव भासली नाही. 'बाळासाठी काही हवे आहे', असा केवळ मनात विचार आला, तरी कोणाच्या तरी माध्यमातून ती वस्तू बाळाला भेट म्हणून मिळत असे. बाजारात जाऊन वस्तू विकत घेण्याचा प्रसंग कधीच आला नाही. जन्माला आल्यापासून बाळ चांदीच्या चमचा-वाटीने दूध पित आहे.
 ४. ४ ते ६ महिने 
४ अ. वयाच्या मानाने बाळ अधिक चपळ असणे : त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत बाळ चपळ आहे. तो साडेतीन मासांतच पालथे पडायला लागला आणि चौथा मास पूर्ण होण्याच्या सुमारासच पुढे सरकण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची प्रतिसाद देण्याची क्षमताही चांगली होती. पाचव्या मासात बाळ पुढे सरकू लागले आणि ६ मास पूर्ण झाल्यानंतर तो बसायला लागला.
५. ७ ते ९ महिने 
५ अ. या काळात हृषिकेश व्यवस्थित बसू लागला आणि उभे राहून धरून-धरून चालू लागला. 
५ आ. सनातन पंचांग आणि श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून शांत होणे : लहानपणी हृषिकेश कितीही रडत असला आणि त्याला सनातन पंचांगासमोर नेले की, तो एकदम शांत होत असे. कृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यानंतर त्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात. कृष्णाचे चित्र पाहून तो आनंदाने टाळ्या वाजवायला लागतो.
६. १० ते १२ महिने 
६ अ. श्रीकृष्णाचे चित्र पटलावर ठेवण्यासाठी रडणे : आम्ही घरात सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्राची फ्रेम करून आणली होती. ती आम्हाला भिंतीवर लावायची होती. आजी ते चित्र भिंतीवर लावायला लागल्यानंतर चि. हृषिकेश जोरजोरात रडू लागला. तो ते चित्र भिंतीवर लावू देईना; म्हणून त्यांनी ते चित्र पटलावर आसन घालून त्यावर ठेवले. त्यांनी तसे करताच तो टाळ्या वाजवून मोठ्याने हसू लागला.
६ आ. श्रीकृष्णाच्या कृपेने गाडी घेतली, असे वडिलांना सुचवणे : हृषिकेश ११ मासांचा असतांना आम्ही चारचाकी गाडी घेतली. तेव्हा त्याचे बाबा त्याला म्हणाले, "हृषिकेश, तुझ्यामुळे गाडी आली बरे का !" बाबांचे बोलणे ऐकून त्याने मान खाली घातली आणि श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून टाळ्या वाजवायला प्रारंभ केला. आम्हा सर्वांना काहीच कळेना; म्हणून त्याचे बाबा त्याला परत म्हणाले, "अरे, तुझ्या पायगुणाने गाडी आली. " तेव्हा त्याने पुन्हा श्रीकृष्णार्जुनाच्या रथाच्या चित्राकडे पाहून टाळ्या वाजवायला प्रारंभ केला. तेव्हा त्याला असे सांगायचे होते, 'हे माझ्यामुळे झाले नाही, तर श्रीकृष्णाच्या कृपेने झाले.' तसे त्याच्या वडिलांनी त्याला बोलून दाखवताच तो परत आनंदाने टाळ्या वाजवू लागला.
     'हे श्रीकृष्णा, या बाळावर कशा पद्धतीने संस्कार करायचे ? ते तूच आम्हाला शिकव', हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.'
- सौ. सायली प्रसाद लेले, डोंबिवली, जि. ठाणे.

पू. सुदामराव शेंडेआजोबांचा उत्कट कृतज्ञताभाव !

पू. सुदामराव शेंडे
'सनातनचे संत पू. सुदामराव शेंडेआजोबांना पाठदुखीचा पुष्कळ त्रास असून वैद्यांनी त्यांना नियमितपणे मर्दन करण्यास सांगितले आहे. ही सेवा मला गुरुकृपेने मिळालेली आहे. हे माझे भाग्यच होय.
तीन महिन्यांपूर्वी मर्दन करत असतांना काही वेळाने पू. शेंडेआजोबा यांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. तेव्हा मला 'मी करत असलेल्या सेवेत काही उणीव भासली का ?', असा विचार येऊन दुःख झाले. थोड्या वेळाने पू. आजोबा देवाजवळ हात जोडून सद्गदित होऊन प्रार्थना करत म्हणाले, "बाहेर रुग्णालयात गेल्यास हेच मर्दन करण्यास न्यूनतम ५ सहस्र रुपये घेतात. येथे मला देवाच्या कृपेने विनामूल्य मिळत आहे. याचे ऋण मी कसे फेडू ?" तेव्हा मला पू. आजोबांकडून शिकायला मिळाले की, जर ते केवळ मर्दनाविषयी एवढा कृतज्ञताभाव ठेवत असतील, तर ईश्वराने आश्रमात उपलब्ध करून दिलेल्या अन्य सुखसोयींविषयी त्यांचा किती उत्कट कृतज्ञताभाव असेल !' - श्री. उमेश नाईक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.१.२०१५)                        

साधिकेच्या छायाचित्राचा प्रयोग !

प्रयोग : या छायाचित्राकडे २ मिनिटे पाहून
काय वाटते ? ते अनुभवा अन् नंतर पुढील भाग वाचा.

प्रसंगांकडे नकारात्मक दृष्टीने पहातांना श्री. गणेश तांबे यांनी अनुभवलेली अस्वस्थता आणि प्रसंगांकडे सकारात्मकतेने पाहू लागल्यावर त्यांना वाटू लागलेली श्रीकृष्णाप्रती कृतज्ञता !

श्री. गणेश तांबे
'मला कार्यालयीन कामानिमित्त प्रत्येक मासात २० ते २२ दिवस घराबाहेर रहावे लागते. प्रत्यक्ष काम २ ते ३ घंट्यांचेच असते; पण प्रवासात ३० - ४० घंटे जातात. अशा वेळी परिस्थिती स्वीकारली न जाऊन मनात पुष्कळ नकारात्मक विचार यायचे. काही काळापासून या विचारांत पालट झाल्याचे जाणवत आहे. नकारात्मक विचार आणि नंतर झालेले सकारात्मक पालट पुढे दिले आहेत. 
१. परिस्थिती न स्वीकारता आल्याने मनात वाढलेले नकारात्मक विचार आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता !
१ अ. कुटुंबियांचा विचार भावनिक स्तरावर होणे : पूर्वी घरातून नोकरीनिमित्त बाहेरगावी जातांना 'आपण पुष्कळ वेळ बाहेर असतो. घरच्यांना वेळ देता येत नाही. त्यांना कसे वाटत असेल ? मुलगी मोठी झाल्यावर आपल्याला काय म्हणेल ?', असे विचार यायचे. त्यामुळे दिवसभरात ६ - ७ वेळा घरी संपर्क केला जायचा. 

चित्तशुद्धी झालेल्या जिवाला ईश्‍वरी चैतन्याचा प्रवाह सहजतेने प्राप्त होणे

श्री. राम होनप
     
     'पाण्याच्या नळात काही अडथळा नसल्यास पाणी आपोआप प्रवाही रहाते. ते प्रवाही रहाण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाही, त्याचप्रमाणे चित्तशुद्धी झालेल्या जिवास ईश्‍वरी चैतन्याचा प्रवाह सहजतेने प्राप्त होतो.'
  - श्री. राम होनप (२५.५.२०१५) 

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तवाहिन्यांची माहिती कळवा !

     कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून सनातन संस्थेविषयी मानहानीकारक वृत्ते वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होत असल्यास त्याविषयी त्वरित दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात (०८३२) २३१२६६४ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे. ज्यांच्याकडे वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून ते vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावे आणि त्याविषयी अधिवक्ते नागेश ताकभाते (दू.क्र. ८४५१००६०५८) यांना कळवावे.

साधकांनो, वर्ष २०१६ च्या 'सनातन पंचांगां'चे वितरण १५.११.२०१५ या दिवसापर्यंत पूर्ण करून त्याची येणे बाकी ३०.११.२०१५ या दिवसापर्यंत मुख्य कार्यालयात पाठवा !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

     'सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. धर्मप्रसाराचे प्रभावी माध्यम असणारे पंचांग लवकरात लवकर सर्व जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सेवा श्रीगुरूंनी साधकांना उपलब्ध करून दिली आहे. 
     महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तसेच दक्षिण आणि उत्तर भारतातील काही राज्ये यांना वर्ष २०१६ च्या सनातन पंचांगांचा पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी लवकरच त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पंचांग वितरण आणि येणे बाकी (वसुली) यांच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे. 

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तपत्रांची माहिती कळवा !

      कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत.

साधकांनो, हितचिंतकांकडून अर्पण आलेल्या वस्तूंची परस्पर विक्री न करता त्या रामनाथी आश्रमात पाठवा !

     हिंदु धर्मजागृती सभा, अधिवेशने आणि अन्य कार्यक्रम या वेळी काही वेळा हितचिंतक सोने किंवा चांदी यांच्या वस्तू अर्पण देत असल्याचे लक्षात आले आहे. आंध्रप्रदेशमध्ये एका हितचिंतकाने चांदीची वस्तू आणि सोलापूर येथील एका हितचिंतकाने सोन्याची वस्तू दिली होती. तेथील संबंधित साधकांनी त्या वस्तूंविषयी उत्तरदायी साधकांना न विचारता त्यांची परस्पर विक्री केली आणि ते पैसे अर्पणात घातले. साधकांनी हितचिंतकांकडून आलेल्या वस्तूंची परस्पर विक्री करू नये. त्याऐवजी त्या वस्तू रामनाथी आश्रमात येत असलेल्या साधकासमवेत (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ यांच्या नावे पाठवाव्यात.

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित
धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे !
     २८.९.२०१५ या दिवसापासून पितृपक्षाला प्रारंभ झाला आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहे. त्या अंतर्गत धार्मिक कृतियोंका शास्त्र या विषयाचे १०, तर अध्यात्मशास्त्र या विषयाचे ८ धर्मसत्संग आहेत. प्रत्येक सत्संगाचा कालावधी २८ मिनिटे आहे.
     या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे.
२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत.

पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

साधकांना सूचना 
१. सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत आहे. पितृपक्षात (या वर्षी २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत) हा त्रास वाढत असल्याने या कालावधीत प्रतिदिन 'ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।' हा नामजप किमान १ घंटा करावा.

दीपावली आणि कार्तिकी एकादशी यांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच ध्वनीचित्र-चकत्या यांचे अधिकाधिक वितरण करा !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना
     'नोव्हेंबर २०१५ मध्ये दीपावली आणि कार्तिकी एकादशी असणार आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच ध्वनीचित्र-चकत्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोेचवण्याची सुवर्णसंधी गुरुकृपेमुळे लाभत आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेल्या प्रसारसाहित्याचे अधिकाधिक वितरण करावे. 

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

पंतप्रधानांचा यशस्वी अमेरिका दौरा !

संपादकीय
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा संपण्याआधीच त्याच्या फलनिष्पत्तीविषयी चर्चा रंगली आहे. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदी यांचे विदेशात फिरणे रूचलेले नाही. लालूप्रसाद यादव यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनिवासी भारतीय उमेदवार मिळावा; म्हणून नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आहेत, अशी अविवेकी टीका केली आहे. भारताच्या कुठल्याही मंत्र्याने विदेश दौरा केल्यावर त्याच्या फलनिष्पत्तीविषयी चर्चा होते. मोदी यांच्या विदेश दौर्‍यांच्या बाबतीतही ती व्हायला हवी; मात्र टीकेसाठी टीका करणे योग्य नव्हे. मोदी यांचा अमेरिका दौरा तीन अंगांनी पहायला हवा. प्रथम अमेरिकेशी आपले संबंध दृढ करणे, दुसरे संयुक्त राष्ट्रांत स्वतःचे वजन वाढवणे आणि तिसरे म्हणजे भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी तेथील संधी शोधणे होय. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून मोदी यांनी मांडलेला विषय आणि विविध आस्थापनांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या घेतलेल्या आत्मविश्‍वासपूर्ण भेटी यांवरून त्यांचा हा दौरा लक्षणीय होता, असेच म्हणायला हवे. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn