Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सर्जेपुरा (नगर) येथे श्री गणेशमूर्तीवर दगडफेक : अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद

अशा प्रकारची दगडफेक कोण करते, हे सूज्ञ हिंदूंना सांगणे न लगे !
नगर - २५ सप्टेंबर या दिवशी दुचाक्यांवरून आलेल्या ८ ते १० जणांनी सर्जेपुरा भागातील गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातील श्री गणेशमूर्तीवर दगडफेक केली. त्यामुळे तेथील हिंदूंचा संताप अनावर झाला; मात्र पोलिसांनी हिंदूंची समजूत घालून संबंधित अज्ञातांच्या विरोधात तक्रार नोंद करून घेतली.
१. येथील नीलकंठेश्‍वर मंडळाचे अध्यक्ष श्री. अमोल खोंड यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
२. त्या तक्रारीत म्हटले आहे की, मंडळाच्या मांडवावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी दगडफेक केली.
३. या दगडफेकीत छोटी गणेशमूर्ती दुखावली गेली.
४. त्याची माहिती मिळताच हिंदूंच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.
५. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे, पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी आणि अन्य अधिकारी घटनास्थळी आले.

सनातन संस्था ब्राह्मणवादी आणि मनुवादी आहे, या धर्मद्रोह्यांच्या आरोपांचे खंडण करा !

पू. संदीप आळशी
    कॉ. पानसरे हत्याप्रकरणी सनातन संस्थेच्या एका साधकाला संशयावरून अटक झाल्यानंतर सनातन संस्था आणि हिंदु धर्म यांच्या विरोधकांनी सनातनविषयी अपप्रचाराचे रान उठवले आहे. ते सनातनवर अनेक मिथ्या आरोप करत आहेत. यांपैकी एक आरोप म्हणजे सनातन संस्था ब्राह्मणवादी आणि मनुवादी संस्था आहे. असा आरोप करून ते सनातनला प्रतिगामी फॅसिस्ट भासवून सध्याच्या पुरोगामी हिंदूंच्या विरोधात सनातन असल्याचे चित्र निर्माण करतात. याद्वारे ते सनातनविषयीचे जनमत कलुषित करून मोठी धर्महानी करत आहेत. सनातनच्या साधकांनो आणि हितचिंतकांनो, असे मिथ्या आरोप करणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांच्या या आरोपांचे खंडण असे करा -
१. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातन संस्थेमध्ये सर्वच जाती-धर्माच्या लोकांना स्थान दिले आहे !
२. सनातनचे धर्मप्रसारक असणारे अनेक संत, उदा. पू. स्वातीताई खाडये, पू. नंदकुमार जाधवकाका हे ब्राह्मण नाहीत !

(म्हणे) सनातन संस्थेची विचारधारा धोकादायक !

पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा सनातनद्वेष !
संस्थेच्या पदाधिकार्‍यांना अटक करून संस्थेला दिलेला परवाना मागे घेणे आवश्यक
      पणजी - सनातन संस्थेची विचारधारा धोकादायक आहे. सनातन संस्थेच्या पदाधिकार्‍यांना अटक करून संस्थेला दिलेली अनुमती मागे घेणे आवश्यक आहे, अशी मागणी पणजी महानगरपालिकेचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी केली आहे. फुर्तादो यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही मागणी केली आहे. (फुर्तादो यांनी सनातनची विचारधारा कधी जाणून घेतली आहे का ? असा खोटा आणि मानहानीकारक आरोप केल्यावरून सुरेंद्र फुर्तादो यांच्यावरच कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा समुपदेश घेत आहे. - संपादक)

प्रार्थनेच्या बहाण्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांचा हिंदूंच्या घरात शिरकाव

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप !
मालमत्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न
     चेन्नई (तमिळनाडू) - चेन्नई शहरातील इंद्रनगर येथील एका वयस्कर हिंदु जोडप्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न मिशनर्‍यांनी चालवला होता. वयस्कर हिंदु जोडप्याला साहाय्याचे प्रलोभन दाखवून मिशनर्‍यांनी त्यांच्या घरात शिरकाव केला. येसू ख्रिस्त आपली सर्व दुःखे दूर करील, असे सांगून त्यांच्या घरात प्रार्थना चालू केली. त्या घराचे प्रार्थनास्थळामध्ये रूपांतर करण्यात आले. त्यानंतर त्यांची मालमत्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालू झाला. 
    अशा प्रकारच्या घटना चूलेमेडूसारख्या चेन्नईच्या इतर भागांतही घडल्या आहेत. याविषयीची माहिती मिळताच श्रीमती उमा आनंदन् यांच्यासह २२ धर्माभिमानी हे मिशनर्‍यांच्या कारवाया रोखण्यासाठी एकटवले. त्यांनी तातडीने एक बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. धर्मांतराच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी पत्रके छापून त्यांचे घरोघरी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सहभागी झालेले भाजपचे कार्यकर्ते श्री. गन्स यांनीही पत्रकांचे वाटप करण्याचे दायित्व स्वीकारले. अशाच प्रकारची दुसरी बैठक तीन आठवड्यांनी घेण्याचे ठरले. दोन ज्येष्ठ नागरिक श्री. अनंतनारायण आणि श्री. उदयकुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. श्रीमती पद्मिनी रविचंद्रन, श्री. श्रीधर, श्री. पृथ्वीराज, श्री. श्रीराम लुकतुके यांनी चर्चेत भाग घेतला.

सरकारपक्षाच्या युक्तीवादात काहीच नाविन्य नाही !

श्री. गायकवाड यांची बाजू मांडण्यासाठी उपस्थित धर्माभिमानी वकील
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून अटकेत असलेले सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना २६ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली पाटील यांनी २ दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली. त्यामुळे समीर यांना २८ सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. समीर यांच्या बाजूने अधिवक्ता समीर पटवर्धन आणि अधिवक्ता एम्.एम्. सुहासे यांनी युक्तीवाद केला.
    १६ सप्टेंबरला आणि २३ सप्टेंबरला सरकारपक्षाने जी सूत्रे न्यायालयासमोर मांडली होती, तिच सूत्रे पुन्हा सरकारपक्षाच्या बाजूने न्यायालयात मांडण्यात आली. मूळात त्यात नवीन असे काहीच नव्हते. समीर भ्रमणभाष (मोबाईल) दुरुस्तीचे काम करत असल्याने त्याच्याकडे पोलिसांना भ्रमणभाष आणि अन्य काही दुरुस्तीयोग्य साहित्य सापडले.

प्रवरा बँक आणि वीज संस्था यांतील घोटाळ्याच्या प्रकरणी काँग्रेसचे विखे-पाटील यांच्यावर कारवाई करा ! - हिंदु विधीज्ञ परिषदेची मागणी

   मुंबई - काँग्रेसचे आमदार आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अखत्यारितील प्रवरा सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी. तसेच विखे-पाटील कुटुंबियांकडे असलेल्या प्रवरा वीज संस्थेत सहस्रो कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करून त्याची रक्कम वसूल करावी. ती रक्कम शेतकर्‍यांना वाटावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने सहकारमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पत्रांद्वारे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, या बँकने विविध शैक्षणिक संस्थांना मर्यादांचे उल्लंघन करून प्रचंड कर्ज दिले.

ईदला बळी देणार्‍या प्राण्यांचे रक्त यमुना नदीत सोडू नये ! - राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

     नवी देहली - यमुना नदीचे पाणी दूषित होऊ नये, यासाठी ईदच्या दिवशी बळी दिल्या जाणार्‍या प्राण्यांचे रक्त नदीत सोडू नये, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला. ओजस्वी पार्टीकडून करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्या. युडी साल्वी यांनी हा आदेश दिला. यासह देहली शासन आणि देहली प्रदूषण नियंत्रण समितीला यासंबंधीची कागदपत्रे लवादासमोर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली. या याचिकेवरील पुढील सुनावणी ८ ऑक्टोबरला होणार आहे. ईदच्या एक दिवस आधीच ओजस्वी पार्टीचे ओमजी आणि मुकेश कुमार जैन यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका केली होती.
याचिकाकर्त्यांनी लवादासमोर परखडपणे मांडलेली सूत्रे !
     हिंदूंना निर्माल्यही फेकण्यास बंदी असणार्‍या यमुना नदीत ईदला बळी देणार्‍या प्राण्यांचे रक्त कसे सोडू देतात ? यमुना नदीचे पाणी दूषित होऊ नये, यासाठी हिंदूंवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. हिंदूंना त्यांच्या देवतांच्या मूर्तींचे विसर्जनही नदीत करण्यास बंदी आहे. तर मग हा नियम अन्य धर्मियांना का नाही ? ईदला बळी दिल्या जाणार्‍या प्राण्यांचे रक्त नाल्यांच्या माध्यमातून यमुना नदीला येऊन मिळते. त्यांनी प्रदूषण नाही का होत ?

उत्तरप्रदेशात मद्यपी धर्मांधाकडून गणेशमूर्तीचे भंजन

देशात गझनीच्या महंमदाचे वंशज अजूनही जिवंत असल्याचा पुरावा !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - एका मद्यपी धर्मांध युवकाने २३ सप्टेंबरच्या रात्री फिरोजाबाद येथे गणेशोत्सवाच्या मंडपात घुसून श्री गणेशची मूर्ती भूमीवर पाडून फोडली. याची माहिती मिळताच युवकांनी त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नवीन मूर्तीची स्थापना केली. (अशा धर्मांधांवर वचक नसल्यामुळे ते असे कृत्य करण्यास धजावतात ! - संपादक)
   फिरोजाबाद क्षेत्रातील श्यामनगरमध्ये गणेशोत्सवाच्या मंडपात रात्री आरती आणि भजन-कीर्तन आटोपल्यानंतर मध्यरात्री १२ वाजता सुनील राठोड आणि शमशाद यांच्यात मद्याच्या नशेत वाद झाला. त्यानंतर शमशादने गणेशोत्सवाच्या मंडपात येऊन श्री गणेशाची मूर्ती फोडली. या घटनेनंतर वातावरण संतप्त झाले. त्यानंतर पोलिसांनी राठोड आणि शमशादचे वडील यांना कह्यात घेतले. शमशादचा शोध घेतला जात आहे.

आतंकवादी हाफीज सईद जमवतोय ३ सहस्र ५०० कोटी रुपये

  • या निधीचा वापर भारताच्या विरोधात होण्याची शक्यता
  • भारतविरोधी कारवाया करणार्‍या अशा आतंकवाद्यावर भाजप शासनाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
      नवी देहली - पाकिस्तानी आतंकवादी आणि मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रदार हाफीज सईद आणि त्याची संघटना जमात-उद्-दावा देणग्या मिळवत असून ३ सहस्र ५०० कोटी रुपये गोळा करण्याची त्यांची योजना आहे. हा निधी भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी, तसेच आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठीही वापरला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांना शंका आहे. हाफीजच्या संघटनेसह जैश-ए-महंमद आणि अंसार-अल्-उम्माह या संघटनाही ईदच्या दिवशी पाकमध्ये निधी गोळा करत आहेत.

तमिळनाडूमध्ये शिवसेनेच्या वतीने मिरवणुकींद्वारे श्रीगणेश विसर्जन

      चेन्नई - तमिळनाडू राज्यातील चेन्नई, त्रिची, मदुराई, दिंडिगल, कन्याकुमारी, वेळ्ळुर, थेनी, थिरुप्पूर, कोवाई आदी ठिकाणी शिवसेनेच्या वतीने भव्य मिरवणुकींद्वारे श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने सुमारे २ सहस्र गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तमिळनाडू शिवसेना अध्यक्ष जी. राधाकृष्णन् यांच्या शुभहस्ते विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     या वर्षी तमिळनाडू पोलिसांनी शिवसेनेवर बरीच बंधने घातली होती. चेन्नई येथे श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी सुरक्षा पुरवली नव्हती. मदुराई येथे पोलिसांनी एका मंडपातून श्रीगणेशमूर्ती काढून टाकली. तंजावूर येथे अनेक नवीन गणेशमंडळांना पोलिसांनी अनुमती नाकारली. बर्‍याच ठिकाणी विसर्जन मिरवणूक काढण्यास पोलिसांनी अनुमती नाकारली. पारंपरिक पद्धतीनुसार यावर्षी मूर्ती विसर्जन २७ सप्टेंबरला करायचे होते; मात्र त्याच कालावधीत ईद असल्याने पोलिसांनी हिंदूंवर दबाव आणून हे विसर्जन त्यापूर्वीच करवून घेतले. (हिंदूंच्या धार्मिक परंपरेमध्ये हस्तक्षेप करून हिंदूंना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा देशाच्या राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकारही हिसकावून घेणारे प्रशासन ! - संपादक)

खर्‍या मुसलमानांनी दुर्गापूजा उत्सवाच्या मंडपांमध्ये जाऊ नये !

भाजपच्या आमदार उषा ठाकूर यांचे विधान
       धर्माप्रती जागरूक असणार्‍या आमदार ठाकूर यांचा आदर्श इतत्रच्याही लोकप्रतिनिधींनी घेऊन हिंदूंचे धार्मिक उत्सव अधिक सात्त्विक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत !
      इंदूर (मध्यप्रदेश) - खर्‍या मुसलमानांनी दुर्जापूजा उत्सवाच्या मंडपांमध्ये जाऊ नये; कारण इस्लाममध्ये मूर्तीपूजेचा निषेध करण्यात आला आहे, असे विधान येथील भाजपच्या आमदार उषा ठाकूर यांनी केले. मागील वर्षी त्यांनी गरब्यामध्ये मुसलमान युवकांना प्रवेश देऊ नये, असा आदेश नवरात्र मंडळांना दिला होता. मुसलमान युवकांना गरब्यात प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला पाहिजे, असेही आमदार ठाकूर त्या वेळी म्हणाल्या होत्या.

संयुक्त अरब अमिरात शासनाने मौलवीला फटकारले !

मंदिरासाठी भूमी देण्याच्या निर्णयावर टीका केल्याचे प्रकरण
     अबू धाबी - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातच्या दौर्‍यावर असतांना एका मंदिरासाठी संयुक्त अरब अमिरात शासनाने भूमी दिल्याच्या विरोधात टीका केल्याप्रकरणी येथील शेख जायेद मशिदीतील मौलवी शेख वसीम युसूफ यांना अमिरात शासनाने फटकारले, तसेच एका स्थानिक दूरचित्रवाहिनीवर चालू असलेला त्यांचा टॉक शोही बंद केला. 
    मौलवी युसूफ यांनी १८ ऑगस्ट या दिवशी ट्विटरवर काफिरांसाठी मंदिर बनवणे हराम (चूक) आहे, असे ट्वीट केले होते. त्यानंतर येथील वरिष्ठ अधिकारी आणि संयुक्त अरब अमिरातच्या बुद्धीजीवी वर्गाने वसिमच्या वक्तव्यावर टीका केली होेती.

सना (येमेन) येथे बकरी ईदच्या दिवशी शिया मशिदीत बॉम्बस्फोट !

२९ जण ठार, तर ५० घायाळ
     सना (येमेन) - २४ सप्टेंबरला म्हणजेच बकरी ईदच्या दिवशी येमन देशाची राजधानी सना येथे दोन बॉम्बस्फोट झाले. येथील पोलीस अकादमीजवळील बलीली या शिया मशिदीत सकाळी नमाजाच्या वेळी दोन आतंकवाद्यांनी स्वत:ला बॉम्बने उडवून दिले. या बॉम्बस्फोटामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला असून ५० जण घायाळ झाले आहेत. या भागात बंडखोरांची दहशत आहे. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही जिहादी आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही.

गणेशोत्सव मंडळांच्या पत्रकार परिषदेत दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधी कु. ऋतुजा शिंदे यांनी धर्मशास्त्र सांगून केले प्रबोधन !

पुण्याच्या मानाच्या गणेशमूर्तींचे हौदात विसर्जन करण्याच्या निर्णयाचे प्रकरण !
पुणे - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी महानगरपालिकेने बांधलेल्या कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधी कु. ऋतुजा शिंदे यांनी गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करण्याचे महत्त्व सांगून पदाधिकार्‍यांच्या अयोग्य भूमिकेविषयी प्रश्‍न विचारले; मात्र प्रत्येक वेळी दुष्काळाचे कारण पुढे करून मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. मानाच्या गणपतीच्या जोडीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणेशमूर्तीचेही हौदात विसर्जन होणार आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी हा स्मार्ट शहराचा स्मार्ट निर्णय आहे, असे सांगून त्याचे स्वागत केले. या प्रसंगी श्री कसबा गणपति मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्‍वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, तुळशीबाग मित्रमंडळाचे विवेक खटावकर, गुरुजी तालीम मित्रमंडळाचे प्रवीण परदेशी, केसरीवाडा मित्रमंडळाचे टिळक उपस्थित होते. (वास्तविक श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन झाल्याने त्याचा लाभ सर्वांना होतो. मानाच्या गणेशोत्सव मंडळांचे अनुकरण अन्य गणेशोत्सव मंडळे करतात. हौदात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींवर केली जाणारी पुढची प्रक्रियाही पारदर्शी नाही. त्यामुळे प्रमुख मंडळांनी त्यांच्या सर्वच कृती धर्मशास्त्रदृष्ट्या योग्य कशा होतील, ते पहायला हवे. केवळ दुष्काळाचे कारण सांगून धर्माचरणाला फाटा देणे अयोग्य आहे. - संपादक)

नदीत पाणी सोडल्याशिवाय विसर्जन करणार नाही !

संगमनेर (नगर) येथील १३५ गणेशोत्सव मंडळांचा निर्णय
अल्पसंख्यांकांच्या सण आणि उत्सवाच्या वेळी
जलसंपदा विभाग धर्मशास्त्राचे पालन करण्यास आडकाठी करते का ?
     संगमनेर - ज्या दिवशी प्रवरा नदीमध्ये धरणातून पाणी सोडण्यात येईल, त्या वेळी आम्ही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू, असा निर्णय येथील संगमनेर उत्सव समिती आणि संगमनेर सार्वजनिक गणेश मंडळे यांनी घेतलेल्या गाव बैठकीत घेण्यात आला. या वेळी शिवसेना संगमनेर शहरप्रमुख श्री. अमर कतारी यांनीही असे जाहीर केले आहे की, आम्ही सर्व भाविक घरातील श्री गणेशमूर्ती ज्या दिवशी पाणी सोडण्यात येईल, त्याच दिवशी विसर्जन करू.

बारामती येथे नीरा कालव्याला पाणी न सोडता कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन !

     बारामती (जिल्हा पुणे) - येथे गणेशोत्सवाच्या अगोदर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करू नये, या संदर्भातील निवेदन प्रशासनाला दिले होते; परंतु नेहमीप्रमाणे प्रशासनाने याला कचर्‍याची टोपली दाखवली. असंख्य हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवत कृत्रिम हौद वापरण्यासाठी नागरिकांना सक्तीचे केले आहे. पाणीटंचाईचे कारण देत गणेशमूर्ती विसर्जनासाठी नीरा डावा कालव्याला पाणी न सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

पंढरपूर येथे नदीमध्ये पाणी न सोडता गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन !

हिंदूंनो, खरे सण हे हिंदु राष्ट्रातच
साजरे करता येतील, असे आम्ही याचसाठी सांगतो !
     पंढरपूर - येथील नगरपरिषदेने गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आणि नदीमध्ये न करण्याचे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. या पत्रकात घरगुती आणि मंडळांच्या गणेशमूर्तींचे निर्माल्य नदीच्या पात्रात ठेवलेल्या निर्माल्य कलशात किंवा कंटेनरमध्ये टाकण्याचेही आवाहन करण्यात आलेे आहे. पंढरपूरमधील चंद्रभागा नदीत गणेशमूर्ती विसर्जन करण्यास पाणी उपलब्ध नाही. काही जण नदीतील मोठ्या पुलाजवळ विसर्जन करतात. त्या ठिकाणीही नगरपरिषदेने बांध घातला असल्यामुळे पाणी नाही.
     वरील सर्व गोष्टींमुळे यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन कोठे करावे, असा गहन प्रश्‍न पंढरपूरमधील नागरिकांसमोर आहे.

घोटाळ्यांच्या चौकशा थांबवण्यासाठी मोठ-मोठे नेते घरी येतात !

सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचा
राजकारण्यांचे खरे स्वरूप उघड करणारा गौप्यस्फोट
     नगर - घोटाळ्यांच्या चौकशा थांबवण्यासाठी अनेक मोठे नेते घरी येत आहेत. असे असले, तरी सर्वच चौकशा नि:पक्षपाती होतील. सहकारात स्वाहाकार होऊ देणार नाही, अशी चेतावणी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. नगरला ते दिनदयाळ उपाध्याय पतसंस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. (सहकारमंत्र्यांनी अशा घोटाळेबाज नेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !- संपादक) सहकार कारखाने, जिल्हा बँक आणि सूतगिरण्या यांमध्ये घोटाळे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांची चौकशी होणारच, असे त्यांनी सांगितलेे. दूध का दूध आणि पानी का पानी होऊ द्या, सहकार संपवणार्‍यांनी आम्हाला सांगू नये, असेही त्यांनी बजावले आहे.
     राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या अनेक प्रकरणांत चौकशा चालू आहेत. त्यामुळे चौकशी थांबवण्यासाठी कोणीकोणी चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या घरी भेट घेतली, याची चर्चा चालू झाली आहे.

म्हणे, गणेशमूर्तींचे विसर्जन तळ्यामध्ये झाल्यास त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जुन्या खाणींची पाहणी करा !

सातारा अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांचा धर्मविसंगत आदेश !
गणेमूर्तींसाठी विल्हेवाट हा शब्द वापरून हिंदूंच्या
भावना दुखावल्याविषयी जिल्हाधिकार्‍यांना विचारा !
     सातारा - यंदा गणेशमूर्ती तळ्यामध्ये विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तरीही गणेशमूर्तीचे विसर्जन तळ्यामध्ये झाल्यास त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जुन्या खाणींची पाहणी करावी, अशी सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी केली आहे. (गणेशमूर्तीचे विसर्जन तळ्यात केल्यावर परत ती बाहेर काढण्याची आवश्यकताच काय ? मूर्ती पाण्यात विरघळून जात नाही का ? परत ती पाण्याबाहेर काढणे; म्हणजे तिची विटंबना करणे होय ! हिंदु धर्माच्या विषयात प्रशासन ढवळाढवळ का करते ? मुसलमानांच्या संदर्भात अशा प्रकारे काही सूचना प्रशासन कधी देते का ? - संपादक)

प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार !

सनातनविरुद्ध नक्षलवाद्यांचा उपयोग करण्याची दिलेली धमकी !
     मुंबई - प्रकाश आंबेडकर यांनी कॉ. पानसरे हत्या प्रकरणी सनातनला दोषी ठरवतांना सनातनला उद्देशून वेळ पडल्यास डाव्या चळवळीकडे तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी अख्खा नक्षलवाद आहे, असे उघड हिंसाचाराचे समर्थन करणारे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे डाव्या चळवळीतील पक्षांचे खरे हिंसक स्वरूप उघड झाले आहे. नक्षलवाद हा देशाच्या घटनेला उघड आव्हान आहे. त्याचे समर्थन करणे, म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा अवमान करणे होय. या प्रकरणी सनातन संस्था प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार आहे. भाजप शासनाने या प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सनातनचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांचे हे विधान डाव्या चळवळीतील माकप आणि भाकप या पक्षांना तरी मान्य आहे का ? ते या विधानाचा जाहीर निषेध करत नाहीत. याचाच अर्थ त्यांचे या देशात नक्षलवाद्यांच्या हिंसक क्रांतीला समर्थन आहे. अशा राजकीय पक्षांकडून लोकशाहीची अपेक्षा करणे निरर्थक ठरणार आहे, असे श्री. वर्तक यांनी प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.
      मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मुंबईतील महापौर निवासस्थानी उभारण्याची शक्यता आहे. याविषयी हालचाली चालू झाल्या आहेत. स्मारकाच्या जागेचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने या जागेवर शिक्कामोर्तब केले असून महापौरांचे निवासस्थान अन्यत्र हालवण्यासाठी चाचपणी चालू आहे. भायखळ्यातील अतिरिक्त पालिका आयुक्तांचे निवासस्थान किंवा पालिका आयुक्तांचे निवासस्थान या २ जागांची महापौर निवासस्थानासाठी चाचपणी चालू आहे. महापौर निवासस्थान मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येत असल्याने या ठिकाणी स्मारक उभारण्यास राज्यशासनाच्या अनुमतीचीही आवश्यकता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बालसुधारगृहांमधील मुलांच्या दु:स्थितीविषयी न्यायालयाचे शासनावर ताशेरे

न्यायालयाला प्रत्येक गोष्टीत लक्ष घालावे लागू नये, अशी शासनाकडून अपेक्षा आहे !
     मुंबई - उमरखाडीतील बालसुधारगृहांमध्ये असलेल्या अडीचशे मुलांना जनावरांसारखे कोंडून ठेवण्यात येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने २५ सप्टेंबर या दिवशी राज्य शासनाला खडसावले.
१. राज्यातील बालसुधारगृहांतील अपुर्‍या सोयी-सुविधा आणि मुलांची ढासळती स्थिती याविषयी न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आहे.
२. याविषयी दंडाधिकारी न्यायालयाने दाखल केलेल्या उमरखाडीतील सुधारगृहाच्या परिस्थितीचा आढावा न्यायाधीश व्ही.एम्. कानडे आणि शालिनी फणसाळकर - जोशी यांच्या खंडपीठाने घेतला.

राज्य माहिती आयोगाच्या आदेशानुसार मंत्र्यांच्या कार्यालयांना पत्रव्यवहाराची माहिती देणे बंधनकारक !

     मुंबई - मंत्र्यांच्या कार्यालयातील पत्रव्यवहार हे माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाहीत, असे उत्तर मंत्र्यांकडून देण्यात आले होते; मात्र राज्य माहिती आयोगाने सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांना माहितीचा अधिकार लागू होऊन, सर्व पत्रव्यवहाराची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सकाळ इन्व्हेस्टीगेशन टीमचे वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे यांच्या तक्रारीनंतर राज्य माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी हा निर्णय नुकताच दिला.

आसाममध्ये एन्.डी.एफ्.बी.(एस्) या नक्षलवादी संघटनेच्या नेत्याला आणि ६ जिहादींना अटक

     गुवाहाटी - नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (संगोजित गट) (एन्डीएफ्बी) या संघटनेचा प्रमुख रबी बसुमतारी उपाख्य रोंग्जाबाजा आणि बांगलादेशस्थित आतंकवादी संघटना जमात्-उल्-मुजाहिदीन या संघटनेचे ६ जिहादी यांना सेना, सीमा सुरक्षा दल, आसाम पोलीस यांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत २५ सप्टेंबर या दिवशी पकडण्यात आले.
     आसाम राज्याच्या बक्श आणि चीरंग या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या बीटड भागातील मोराबारी या घनदाट जंगलातून बसुमतारी याला जॉगलाव नारझर या त्याच्या सुरक्षा रक्षकासह अटक करण्यात आली. त्याचबरोबर ६ जिहाद्यांना पकडण्यात आले. या कारवाईत ए.के. ५६ रायफल, शेकडो रायफलच्या गोळ्या आणि ४ बाँब जप्त करण्यात आले. नूर महंमद, मलेक शेख, मुस्तफा मंडल, हफीजूर अली, सुलेमान अली आणि मुफीझूल इस्लाम अशी अटक करण्यात आलेल्या जिहादींची नावे आहेत.

वसई (जिल्हा पालघर) येथे गणेशोत्सवात अश्‍लील नृत्य सादर

धर्मशिक्षणाच्या अभावी जन्महिंदूंकडूनच उत्सवांचे विकृतीकरण !
     वसई - वसई पश्‍चिमेकडील फेरीवाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्‍लील नृत्य करण्यात आले. या नृत्याच्या वेळी लोकांनी पैसेही उधळले. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर माणिकपूर पोलीस ठाणे असूनही रात्री उशिरापर्यंत हे अश्‍लील नृत्य चालू होते. या प्रकारामुळे खळबळ उडाल्यामुळे पोलिसांनी मंडळाचे पदाधिकारी, नाचणार्‍या महिला, नोटा उधळणारे इत्यादींवर गुन्हा नोंद केला आहे. (असा विकृत गणेशोत्सव साजरा करणार्‍यांवर श्री गणेशाची कृपा कधीतरी होईल का ? - संपादक)

शासनाने कोणाकडे लक्ष न देता योग्य तो निर्णय घ्यावा ! - ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, सचिव, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

     ज्या व्यक्तीने गुन्हा केला, तो सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा व्हावी, पण त्यासाठी त्याचे कुटुंब किंवा संस्था यांच्यावर बंदी घालणे, हे उचित नाही. असे जर असेल, तर शासन स्वतःवर आणि पक्षांवर ही घालेल का ? तसे झाल्यास कुटुंब, संस्था, पक्ष आणि संघटना कोणीच निर्माण करणार नाहीत. त्यामुळे हा देश चालवणे कदापि शक्य होणार नाही. सनातन संस्थेच्या माध्यमातून असे शिक्षण देण्याचे आणि कार्यकर्ते सिद्ध करण्याचे धोरण नाही. उलट संस्थेतर्फे समाजात सामाजिक आणि आध्यात्मिक स्थिरता आणण्याचे कार्य केले जाते. तेव्हा शासनाने कोण काय म्हणत आहे, याकडे लक्ष न देता योग्य तो निर्णय घ्यावा. त्यासाठी महाराष्ट्र आणि सनातन संस्था आपल्या पाठीशी आहे.
सनातन संस्थेवर बंदी घालणे घटनाबाह्य !
- भाजप आमदार श्री. लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवड
     कॉम्रेड पानसरे यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली असून जो कोणी अपराधी असेल, त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला योग्य ते शासन केले जाईल. व्यक्ती म्हणजे संस्था नाही. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी मागणी सातत्याने करणे, हे घटनाबाह्य आहे.

शिवसेनेचे गजानन मोरे यांनी विसर्जन कुंडाद्वारे होणारी श्री गणेशमूर्तीची विटंबना रोखली !

     मिरज - सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ब्राह्मणपुरीत काशीविश्‍वेश्‍वर देवालयाशेजारी विसर्जनासाठी ठेवलेल्या कुंडातील फोलपणा आणि होत असलेली मूर्तींची विटंबना उघड होऊनही २४ सप्टेंबर या दिवशी मिरज शहरात गणेश तलावाजवळ महापालिकेने ठेवलेल्या कुंडात श्री गणेशमूर्ती विसर्जन चालूच होते. ही गोष्ट शिवसेनेचे श्री. गजानन मोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी कार्यकर्त्यांसह तात्काळ तेथे धाव घेऊन हा प्रकार बंद करण्याच भाग पाडले. (श्रीगणेशमूर्तीची कुंडाद्वारे होणारी विटंबना रोखणारे श्री. गजानन मोरे यांचे अभिनंदन ! शिवसैनिकांमध्ये धर्मप्रेम असल्याने ते हिंदु धर्मासाठी अशा धडक कृती करू शकतात ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

भारतातील आतंकवाद संपल्याशिवाय देशाचा विकास होईल का ?
      नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (संगोजित गट) या संघटनेचा प्रमुख रबी बसुमतारी उपाख्य रोंग्जाबाजा आणि बांगलादेश स्थित आतंकवादी संघटना जमात्-उल्-मुजाहिदीन या संघटनेचे ६ जिहादी यांना भारताचे सुरक्षा दल आणि पोलीस यांनी पकडले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Asamke Chirag Jileme Jamte-Ul-Mujahidinke 6 atankvadionko banaya gaya bandi.
Deshka yaha atankvad samapt hoga ya nahi ?
जागो !
असम के चिरांग जिले में जमाते-उल-मुजाहिदीन के ६ आतंकवादियों को बनाया गया बंदी.
देशका यह आतंकवाद समाप्त होगा या नही ?

सनातन संस्थेवर बंदीची अभ्यासहीन मागणी करणे, हा एक फतवाच ! - डॉ. मनोज सोलंकी, गोवा राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

चर्चासत्रात बोलतांना डॉ. मनोज सोलंकी
      पणजी (गोवा) - सनातन संस्थेच्या राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठीच्या कार्याचा अभ्यास न करता, सनातनचा आश्रम प्रत्यक्ष न पहाता आश्रमांना आतंकवादी अड्डे म्हणणे आणि सनातन संस्थेला आतंकवादी म्हणून हिणवणे, हा वैचारिक आतंकवाद आहे. आरोप सिद्ध झाले नसतांना संस्थेवर बंदीची अभ्यासहीन मागणी करणे, हा एक फतवाच आहे. या लोकांनी सनातनच्या आश्रमात येऊन सनातनचे कार्य पहावे आणि मगच सनातनच्या विरोधात बोलावे, असे रोखठोक प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी केले. सनातन संस्था आतंकवादी असल्याचे खोटे आरोप उघडपणे करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही डॉ. सोलंकी यांनी दिली. एच्सीएन् या गोव्यातील स्थानिक वृत्तवाहिनीवर २४ सप्टेंबरला झालेल्या चर्चेत डॉ. सोलंकी यांनी काँग्रेसचे प्रवक्ता सुनील कवठणकर आणि साम्यवादी पक्षाचे अधिवक्ता सुहास नाईक यांच्या सनातन संस्थेवरील बिनबुडाच्या उथळ आरोपांना चोख उत्तर देऊन त्यांना सनातनची अपकीर्ती करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.

नेपाळ ही देवभूमी आहे, याचाच विसर पडल्याने नेपाळी जनतेला भूकंपांना तोंड द्यावे लागणे आणि भूकंपग्रस्तांना साहाय्य करतांना धर्माचरण अन् साधना करण्याची अनिवार्यता ध्यानी येणे

श्री. निरंजन चोडणकर
     २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये मोठा प्रलय झाला होता. तेव्हा काही अनुभव नसतांना मी तेथे साहाय्य करण्यासाठी गेलो होतो. तेथे एक मास राहून साहाय्यता कार्य केले आणि प.पू. गुरुदेवांच्या कृपेने वेगवेगळे अनुभव घेता आले. दोन वर्षांनी पुन्हा नेपाळमध्ये साहाय्य करण्यासाठी जाण्याची मला संधी मिळाली. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने शिकायला मिळालेली सूत्रे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
१. अभियानाच्या पूर्वसिद्धतेची बैठक !
     २९.४.२०१५ च्या रात्री मला पू. पिंगळेकाकांचा निरोप मिळाला, नेपाळला जायचे आहे. आम्ही ३ वाजता वाराणसी आश्रमात पोेचलो. नंतर पू. पिंगळेकाकांसमवेत नेपाळ अभियानाच्या पूर्वसिद्धतेच्या नियोजनाची बैठक होती. पू. काका एकेक सूत्राचा आढावा घेऊन आमचे चिंतन होण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यांच्या माध्यमातून श्रीकृष्णच मला घडवत आहे, असे वाटत होते.

हिंदूंच्या धार्मिक संस्कारांचे महत्त्व !

१. कोणतेही धार्मिक बंधन नसूनही दृढ आचार-संस्कारांनी बांधलेला हिंदू समाज ! : आमच्या हिंदु धर्मात कसलीच सक्ती नाही, अत्याचार नाही, देवळात गेलेच पाहिजे, असे नाही, सामुदायिक उपासना नाही, धार्मिक अत्याचार आणि सक्ती नाही, तरी प्रत्येक हिंदू विविध आचार-संस्कारांनी बांधलेला आहे. 
     जनावर जाते तिथे चरते. दिसेल ते खाते. तसे हिंदूंना हवे ते, हवे तिथे खाता येत नाही. हिंदूंचे जेवण, (अन्न खाणे) याला संस्कार आहे. काही संस्कारांविना तो अन्न ग्रहण करू शकत नाही. स्नानाला संस्कार, जेवणात संस्कार, पाणी पिण्याला संस्कार ! 
२. हिंदूंवर शासनाच्या कायद्यापेक्षा धार्मिक संस्कारांचा अंमल अधिक ! : हे संस्कारच हिंदूंना सुदृढ आणि सुस्थिर ठेवतात. शासनाचा, गोर्‍या साहेबाचा वा ब्राऊन साहेबांचा कायदा त्याच्या अंतःकरणावर जितका अधिकार गाजवू शकतो, त्यापेक्षा सहस्रपट अधिक धार्मिक विधी-निषेधांचा अंमल त्याच्यावर असलेला दिसून येतो. आमचा इतिहास पाहिला, तर पाच-दहा वेळा परचक्रे आली, परकीय सत्ताही नांदल्या; पण ते परकीय शासन आमचा धर्म कधीच रतिमात्रही चाळवू शकले नाहीत. आमचा हिंदु समाज आमच्या या अव्यक्त सम्राटाची (धर्माची) प्र्रजा राहिलेला आहे आणि राहील. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, नोव्हेंबर २०१४) 

वाचाळवीर माजी न्यायमूर्ती काटजू !

     अभिनेता (?) आणि शासनाचा जावई असल्याप्रमाणे वागणूक घेणार्‍या संजय दत्तला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा झाली आहे. शिक्षा सुनावण्यापूर्वी तो १ वर्ष ६ मास तुरुंगात होता. आता तो उर्वरित ३ वर्ष ६ मासाची शिक्षा येरवडा कारागृहात भोगत आहे. तो येरवडा कारागृहात गेल्या अडीच वर्षांपासून आहे. सध्या तो एक मासाच्या संजित रजेवर (पॅरोल) असून त्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे. त्याच्या सुटकेसाठी अवघे काही महिने राहिले असतांना त्याने केलेल्या चांगल्या वर्तणुकीवरून दिलेल्या शिक्षेपासून सुटका होण्यासाठी माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी दया याचिका केली होती. मात्र २४ सप्टेंबर या दिवशी राज्यपाल विद्यासागर राव यांनी ती याचिका फेटाळल्याने त्याला पूर्ण शिक्षा भोगावी लागणार आहे.

प्रसारमाध्यमांनो, निरपेक्षपणे अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर अकारण टीका करून तुम्ही केवळ पाप ओढवून घेत आहात, हे लक्षात घ्या !

श्री. प्रशांत हरिहर
     सनातनचे साधक दिवस-रात्र एक करून अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहेत. हे सर्व कार्य साधक त्यांच्या लाभासाठी नाही, तर समाजसेवा आणि समष्टी साधना म्हणून करत आहेत. साधक प्रथमोपचाराच्या उपयुक्ततेपासून नरजन्माचे सार्थक करणारी साधना कशी करावी ? यांविषयी सातत्याने आणि तळमळीने समाजाला सांगत आहेत. या गोष्टींकडे प्रसारमाध्यमांनी कधी ढुंकूनही पाहिले नाही. सनातनची तशी अपेक्षाही नाही म्हणा ! कारण एक म्हण आहे ना, गाढवाला गुळाची चव काय ? 
     सध्याच्या पानसरे प्रकरणात सनातन संस्थेचा कोणताही हात नसतांना आणि पोलिसांनीही तसे म्हटलेले नसतांना पोलिसांनी केवळ सनातन हे नाव उच्चारल्यावर खडबडून जागी झालेली (अप)प्रसारमाध्यमे सनातन, सनातन म्हणत सुटली आहेत. सनातनचे साधक कष्ट सोसून जे कार्य करत आहेत, ते न दाखवणारी ही माध्यमे हे वृत्त मात्र मीठ-मसाला लावून सांगत आहेत. सनातनचे साधनेचे आणि अध्यात्माचे कार्य ही प्रसारमाध्यमे समजूही शकत नाहीत. देवाचे कार्य करणार्‍या सनातनवर टीका करून ही माध्यमे पाप मात्र ओढवून घेत आहेत. देवाने आतातरी त्यांना थोडी बुद्धी द्यावी, अशी प्रभुचरणी प्रार्थना ! 
- श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरु (१९.९.२०१५)

खरे समाजसुधारक कोण ?

श्री. संजय जोशी
     कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या साधकाला संशयित म्हणून अटक झाली आणि तथाकथित विचारवंतांनी सनातनबंदीची एकच कोल्हेकुई चालू केली. दूरदर्शनवर चर्चासत्रे झडू लागली. अशा वेळी नेहमी समाजसुधारणा, जातीयवाद यांसारखी सूत्रे पुढे येऊ लागतात. समाजसुधारकांच्या कार्याचे पुढे काय, अशा विवंचनेतून दूरदर्शनवरील चर्चासत्रांतून सनातनसारख्या आध्यात्मिक संस्थांना रुढतावादी ठरवून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जातो.
     खरेतर समाजसुधारक कोणाला म्हणायचे, हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होईल आणि याविषयीही दूरदर्शनवर चर्चासत्रेही घेता येतील. सनातन हिंदु संस्कृती आणि विशेषत्वाने त्यातील धर्म अन् अध्यात्म ही काळाच्या कसोटीला उतरलेली चिरंतन सत्ये अथवा मूल्ये आहेत. या चिरंतन मूल्यांची कास न सोडता काळानुरूप समाजप्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न करणारे थोर ऋषिमुनी, संत यांनाच खरे समाजसुधारक म्हणता येईल.

सनातन संस्था आतंकवादी नव्हे, तर हिंसेचा विरोध करणारी आध्यात्मिक संस्था ! - अभय वर्तक

एन्डीटीव्ही इंडिया या वाहिनीवर निखिल वागळे यांना सनातनने 
कथित धमकी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर
श्री. अभय वर्तक 
       २२ सप्टेंबर २०१५ या दिवशी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एन्डीटीव्हीचे कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे आणि चर्चेचा गोशवारा येथे प्रसिद्ध करत आहोत.
संपादक रवीश कुमार यांनी अभय वर्तक यांना विचारलेले 
प्रश्‍न आणि त्यांनी दिलेली उत्तरे 
प्रश्‍न : काँग्रेस आणि भाजप सनातनवर बंदी का आणू शकले नाहीत ? तुम्ही पत्रकारांना धर्मद्रोही घोषित करता का ? त्यांना तुम्ही शिक्षा देणार का ?
उत्तर : काँग्रेस आणि भाजप सनातनवर बंदी का आणू शकले नाहीत, याचा विचार केला पाहिजे. सनातन संस्थेत कुटुंबे, वयस्कर लोक, सुशिक्षित आणि चांगल्या घरातील लोक सहभागी आहेत. ही काही राष्ट्रद्रोही संघटना नाही. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप सनातनवर बंदी आणू शकले नाहीत. जे धर्माचा अपमान करतात, जे धर्माच्या विरुद्ध लिहितात, त्यांच्याविषयी आम्ही धर्मद्रोही असा शब्द लिहितो. त्यांचे खरे कार्य लोकांसमोर आणणे हे आमचे कर्तव्य आहे. शिक्षा त्यांना देव देईल. जो देवता आणि धर्म यांचा अपमान करतो, त्यांना शिक्षा देणारे आम्ही कोण ? देवच त्यांना शिक्षा देईल.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 
पू. सुनीलजी चिंचोलकर
    आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रात प्रसारमाध्यमांना कुठलेही बंधन नाही. विचारस्वातंत्र्य आणि लेखनस्वातंत्र्य यांच्या नावाखाली प्रसारमाध्यमे जरा अतीच स्वातंत्र्य घेत आहेत. अलीकडे ४ - ५ वर्षांत प्रसारमाध्यमांनी न्यायाधिशांचीच भूमिका स्वीकारलेली आहे. एखादे प्रकरण जेव्हा न्यायप्रविष्ट असते आणि शासकीय पोलीस यंत्रणा त्याचे अन्वेषण करत असते, तेव्हा प्रसारमाध्यमांनी केवळ त्याची बातमी देणे अपेक्षित असते. प्रसारमाध्यमे मात्र तो गुन्हा कोणी केला, याविषय केवळ तर्कच नव्हे, तर निर्णायक भूमिका घेतात. यासंबंधी कायदा होण्याची आवश्यकता आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आत्मप्रौढी नको ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा; पण अहंकाराची जोपासना करू नये. आत्मप्रौढीपेक्षा अधिक कोणता वेडेपणा नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पुत्राचे कर्तव्य आणि हल्लीचे पुत्र

१. पुत्राचे कर्तव्य 
     जीवतो वाक्यकरणात् क्षयाहे भूरिभोजनात् ।
     गयायां पिण्डदानेन त्रिभिः पुत्रस्य पुत्रता ॥ - देवीभागवत, स्कन्ध ६, अध्याय ४, श्‍लोक १५
अर्थ : वडील जिवंत असतांना त्यांची आज्ञा पाळणे, ते वारल्यावर त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी श्राद्ध करणे, तसेच गयातीर्थावर पिंडदान करणे या ३ कृती पुत्राचे पुत्रत्व सिद्ध करतात.
२. हल्लीचे पुत्र 
    आज वडिलोपार्जित संपत्तीच्या उत्तराधिकार्‍यांना हक्काची गोष्ट तर लक्षात आहे; परंतु ते आपल्या कर्तव्याला विसरून जातात. आजोबांचे श्राद्ध आहे, हे त्यांच्या लक्षात रहात नाही; मात्र वाटणीसाठी न्यायालयाचा दिवस असेल, तर तो अवश्य लक्षात रहातो. अश्रद्धा आणि उच्छृंखलता हे याचे कारण आहे. (संदर्भ : मासिक कल्याण, ऑक्टोबर २०१०)

संपर्क असावा, संसर्ग नको !

     स्वच्छतेच्या विकासाचा एक परिणाम सांगितला आहे की, दुसर्‍याशी संपर्क कायम रहावा; परंतु संसर्ग असू नये. संस्कृत शब्दांचा सूक्ष्म अर्थ लक्षात आला नाही, तर ते शब्द तुमच्याशी बोलत नाहीत. दुसर्‍यांशी संपर्क असावा, संसर्ग नसावा म्हणजेच संपर्क आक्रमक शारीरिक पीडा देणारा नसावा. 
   आपल्याकडे एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करण्याची प्रथा आहे. पश्‍चिमेकडे हस्तांदोलन करतात. आपल्या योजनेत संसर्ग नाही, तर संपर्क आहे. ते लोक फुलांचा गुच्छ बनवून हातात देतात. गुच्छात फुलांना स्वातंत्र्य नसते. सगळी फुले एकत्र बांधलेली असतात. आपल्याकडे हार घालण्याची प्रथा आहे. त्यात प्रत्येक फूल वेगवेगळे असते. प्रत्येक फूल स्वतंत्र असते. गुच्छात संसर्ग आहे; मात्र संपर्क नाही आणि हारात संपर्क आहे; मात्र संसर्ग नाही. हाराचा दोरा फुलांना जोडतो; म्हणून संपर्क असतो. हार आपल्या सभ्यतेचे प्रतीक आहे. 
   कर्माच्या दुधाने, भक्तीच्या साखरेने आणि ज्ञानाच्या केशराने बनवलेले श्रीखंड म्हणजे गीताखंड ! त्याचप्रमाणे राष्ट्राच्या प्रेरणेने, दुर्दम्य आशावादाच्या साखरेने, इतिहासाच्या भगव्या केशराने राष्ट्रवादी व्यक्तीच्या अंतःकरणात स्थिर झालेले सत्त्व म्हणजे हिंदुत्व ! एकवेळ मी हळूहळू चालेन; पण एकदाही माघारी फिरणार नाही. सरस्वतीच्या साधकाने कधीही आपला आचार सोडू नये आणि लाचार होऊ नये. 
आपला बंधूवत, विद्याधरपंत नारगोलकर, पुणे.

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

विविध सेवांसाठी वाराणसी आणि देहली सेवाकेंद्रांत साधकांची तातडीने आवश्यकता !
'वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, लेखा, प्रसार आदी सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. यासमवेतच विद्युत्-जोडणी, सुतारकाम, रंगकाम आदी बांधकामाच्या संदर्भातील कौशल्य असलेल्या सेवा, तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण (सुपरविझन) करू शकणारे साधकही हवे आहेत.
देहली सेवाकेंद्रात वाहन, स्वयंपाक, लेखा आदी विभागांमध्ये, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. 
जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी वाराणसी अथवा देहली सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा vishwadeep2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.'
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ.(४.५.२०१५)                   

तिथीनुसार असलेल्या वाढदिवसाच्या दिवशी आलेली अनुभूती

'२५.३.२०१५ या दिवशी माझा तिथीनुसार वाढदिवस होता. त्या दिवशी सहसाधक श्री. गौतम गडेकर मला म्हणाले, "तिथीप्रमाणे वाढदिवस असतो, त्या दिवशी विशेष अनुभूती येतात. म्हणून मी काय अनुभूती येते, ते पहाण्याचे ठरवले. 
  देवद आश्रमात डासांचे प्रमाण अधिक आहे. प्रतिदिन औषधाची फवारणी करूनही काही लाभ होत नाही. 'ओडोमॉस' लावले, तरी तेवढ्या पुरताच लाभ होतो आणि पुन्हा डासांचा उपद्रव होतो. 
२५.३.२०१५ या दिवशी मी 'ओडोमॉस' लावण्याचा कंटाळा केला आणि भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराजांची भजने लावून झोपलो. त्या वेळी खोलीतील इतर साधकांना डास चावत होते. त्यांची झोपमोडही होत होती; परंतु मला रात्रभर एकही डास चावला नाही आणि झोपही शांत लागली. 
भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांनीच जन्मतिथीच्या दिवशी ही अनुभूती दिली, यासाठी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! 
- श्री. संजय पडेलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. 
(२६.३.२०१५)

काही ज्ञानी व्यक्तींचे अज्ञान !

'व्यक्तीला एका विषयाचे ज्ञान मिळाले की, त्यानंतर त्याला अनेक विषयांच्या संदर्भात ज्ञान मिळू लागते. हे करतांना त्याच्या मनात कधीतरी विकल्प येतो की, एक दिवस आपल्याला मिळत असलेले ज्ञान संपणार तर नाही ना ? असे वाटण्याचे कारण असे की, त्याला नळातून येणार्या  पाण्याविषयी ज्ञान असते; परंतु 'या पाण्याचा मूळ स्रोत नदी किंवा एखादे धरण आहे', हे लक्षात न आल्याने त्याला पाणी संपण्याची भीती वाटते. याउलट सर्वज्ञतेची अनुभूती घेणार्यो जिवाला परमेश्वराकडे अथांग समुद्राप्रमाणे असलेल्या ज्ञानाची कल्पना असल्याने त्याला असा विकल्प येत नाही.' 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०१५)

साधकांशी बोलतांना राधा आणि मीरा यांची आठवण येऊन त्यांच्या कृष्णप्रेमाविषयी शब्दबद्ध झालेली कविता !

     साधकांशी बोलतांना त्यांच्या बोलण्यातून येणार्‍या काही शंका, त्यांचे काही प्रश्‍न ऐकल्यावर नेहमीप्रमाणे मीरेची आठवण आली. वेळी मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढीलप्रमाणे शब्दबद्ध झाली. ती ज्यांच्या कृपेमुळे झाली, त्यांच्या चरणी अर्पण

सांगशील का देवा तू याचे उत्तर  ?
एक असे राधा अन् एक मीरा असे ।
दोघींचेही प्रेम देवा तुझ्यावरी असे ॥ १ ॥
 
एकीस म्हणती राधाराणी दूजी असे ती मीरादासी ।
राणी आणि दासी दोघींच्याही अंतरी वससी तू कृष्णमुरारी ॥ २ ॥

शांत, समाधानी वृत्ती असलेल्या आणि प्रत्येकच कृती सर्वार्थाने आदर्शपणे करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेली सखी सिद्धी क्षत्रिय हिची अक्षताने टिपलेली गुणवैशिष्ट्ये !

कु. सिद्धी क्षत्रीय
      गुरुपौर्णिमा २०१५ चे शुभ औचित्य साधून रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणारी पू. महेंद्र क्षत्रीय यांची कन्या कु. सिद्धी क्षत्रीय हिचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. तिची मैत्रीण कु. अक्षता रेणके हिने टिपलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
     वर्ष २०११ मध्ये रामनाथी आश्रमात माझी आणि कु. सिद्धी क्षत्रीय हिची भेट झाली. कला विभागात आम्ही दोघीही एकाच वेळी आलो. त्यानंतर काही दिवसांनी आम्हा दोघींना मेंदी या ग्रंथातील चित्रांची सेवा मिळाली. आम्ही एक ते दीड वर्ष एकत्र सेवा केली. मला तिची मैत्रीण होणे आवडले. आम्हा दोघींनाही सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळायचा. सर्व साधकही आम्हाला एकत्र पाहिल्यावर रिद्धी-सिद्धी म्हणायचे. प.पू. डॉक्टरही आम्हा दोघींना एकमेकींविषयी विचारतांना मैत्रीण या संबोधनानेच विचारायचे. काही दिवसांनंतर आमच्या भिन्न प्रकृतीमुळे, तसेच दोषांमुळे आम्हाला काही दिवस एकमेकींशी जुळवून घेता आले नाही; पण यातून पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि यातूनच संघर्ष करत साधनाही झाली, असे वाटते.

८४ लक्ष योनींतून सुटका करणार्‍या चौर्‍यांशी कोसांच्या वृंदावनातील ब्रज परिक्रमेचा अनुभव घेणार्‍या देवद आश्रमातील सौ. सुलोचना जाधव (वय ६९ वर्षे) !

     सनातनच्या देवद आश्रमात राहून सेवा करणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. सुलोचना जाधव (वय ६८ वर्षे) गत वर्षी १ मासासाठी वृंदावन येथे यात्रेला गेल्या होत्या. त्याविषयीची माहिती आणि त्यांना आलेली अनुभूती त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहे.
१. परिक्रमा करतांना असलेली दिनचर्या !
     या परिक्रमेत संपूर्ण कार्तिकी मासात अखंड नाम घेत पायात वहाणा न घालता प्रतिदिन १५ ते १८ कि.मी. चालायचे असते. प्रतिदिन पहाटे ३ वाजता उठायचे. सकाळी प्रातर्विधी उरकून मंगल आरतीला जायचे. तुळशीची आरती, नरसिंहाची आरती, गुरूंची आरती करून नंतर जप करत परिक्रमा करायची असते. चैतन्य महाप्रभु यांनी भागवतातून शोधून काढलेला हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥ हा मंत्र परिक्रमा करतांना सगळ्यांनी म्हणायचा असतो.

कु. वैदेही पिंगळे हिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

कु. वैदेही पिंगळे
१. उत्तम निरीक्षणक्षमता
     रामनाथी आश्रमात जून मासात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्यात आली होती. कार्यशाळेच्या एका सत्रात धर्मशिक्षणवर्ग कसा घ्यायचा ?, याचा प्रायोगिक भाग घेण्यात आला होता. प्रत्येक साधकाला विषय नेमून दिले होते. दोन साधिकांनी त्यांना सांगितलेले विषय मांडले. त्यावर कार्यशाळेत सहभागी झालेला प्रत्येक साधक त्या साधिकांचे विषय मांडतांना काय चुकले, अजून कसे असायला हवे होते ?, याचे निरीक्षण सांगत होते. तेव्हा कु. वैदेहीने पुष्कळ चांगले निरीक्षण सांगितले. तिचे निरीक्षण ऐकून पुष्कळ वर्षे प्रसारसेवा आणि सत्संग यांचा अनुभव असलेला साधक निरीक्षण सांगत आहे, असे वाटले.

श्राद्धाचे विधी चालू असतांना सूक्ष्मातून घरात पुष्कळ दाटी झाल्याचे जाणवणे आणि विधी संपल्यावर घरातील दाटी विरळ झाल्यासारखी वाटून पुष्कळ शांत वाटू लागणे

१. वडिलांचा श्राद्धविधींवर विश्‍वास नसल्याने आजोबांचे श्राद्ध करण्याची त्यांची सिद्धता नसणे आणि नंतर श्राद्ध करायला ते सिद्ध होणे
     माझे वडील हयात असतांना त्यांचा श्राद्धविधींवर विश्‍वास नव्हता. वर्ष १९८५ मध्ये मी सुटीत घरी गेलो असतांना त्यांना आजोबांचे श्राद्ध करण्याविषयी बोललो. तेव्हा त्यांनी मला तुला करायचे असेल, तर कर; परंतु मला याविषयी काही सांगू नकोस, असे सांगितले. तसा तर माझाही या गोष्टींवर फारसा विश्‍वास नव्हता; पण असे विधी करायला हवेत, असे मला वाटत होते. त्या वेळी मी त्यांना म्हणालो, तुम्ही जिवंत असतांना मला श्राद्ध करण्याचा अधिकार नाही. नंतर ते श्राद्ध करायला सिद्ध झाले.

महाप्रसाद ग्रहण करतांना झालेली प्रार्थना !

श्री. राकेश पाध्ये
या देहामुळेच आध्यात्मिक उन्नती करता येत असल्यामुळे देहाला शक्ती मिळण्यासाठी त्याला अन्न भरवणे, ही साधकाची सेवाच असणे : '४.७.२०१५ या दिवशी दुपारी महाप्रसाद ग्रहण करतांना एक क्षण देह आणि जीव वेगळा होऊन जिवाकडून प्रार्थना झाली. 'हे श्रीकृष्णा, तू हे अन्न ग्रहण करण्याची सेवा दिली आहेस, त्याविषयी कृतज्ञता. ही सेवा तुला अपेक्षित अशी होऊ दे.' मला क्षणभर काही कळले नाही की, अशी प्रार्थना का झाली ? मी कोणतीही सेवा करत नसून जेवत आहे. त्या क्षणी जिवाने उत्तर दिले, 'माझी आध्यात्मिक उन्नती या देहामुळे करता येत आहे. हा देह आहे; म्हणून मला सेवा करता येतात. त्यामुळे देहाला शक्ती मिळण्यासाठी 'त्याला अन्न भरवणे', ही माझी सेवाच आहे. ती भावपूर्ण होऊ दे.'
'गुरुदेव, या अनुभूती घेण्याची पात्रता नसतांनाही अशा अनुभूती मला देत आहात आणि त्या लिहून घेत आहात त्याविषयी कृतज्ञ !'
- श्री. राकेश पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (४.७.२०१५) 

सप्तर्षींनी साष्टांग नमस्कार करण्याचे सांगितलेले महत्त्व !

पू. सौ. अंजली गाडगीळ 
२३.८.२०१५ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी देहली येथील साधक श्री. संजीव कुमार यांच्या निवासस्थानी नाडीवाचन केले. तेव्हा सप्तर्षींनी साष्टांग नमस्कार करण्याचे महत्त्व सांगितले.
१. साष्टांग नमस्कार : साष्टांग नमस्कार करणे, म्हणजे षड्रिपू, मन आणि बुद्धी या आठ अंगांसह ईश्वराला शरण जाणे होय.
२. लाभ : या भूमीवर अनेक पुण्यात्मे चालले आहेत. श्रीराम, श्रीकृष्ण, अनेक संत आणि ऋषी यांनी या भूमीवर तपस्या केली आहे. साष्टांग नमस्कार करतांना या पवित्र भूमीला आपल्या पूर्ण शरिराचा स्पर्श होतो. त्या स्पर्शातून आपल्याला पुण्यात्म्यांचे चैतन्य मिळते. 
३. साष्टांग नमस्कार करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना ! : पुढील प्रार्थना करावी, 'हे भूमीदेवते, या भूमीवरून अनेक अवतार, पुण्यात्मे आदी चालले आहेत. त्यामुळे ही भूमी पवित्र झाली आहे. या नमस्कारातून आम्हाला भूमीतील चैतन्य मिळू दे.'
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ 
नाडीपट्टीची भाषा
१. नाडी : नाडी म्हणजे देवलोकातील देवकथा !
२. विमान : गरुडपंख असलेले आकाशात उडणारे वैज्ञानिक यंत्र !
३. हेलिकॉप्टर : म्हणजे चक्रधारी यंत्र !
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ               

श्राद्धकर्माचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व सांगणारे सनातनचे ग्रंथ !

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण करण्याचा उपाय !
श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन
१. श्राद्धामुळे पूर्वजांना गती कशी मिळते ?
२. श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
३.श्राद्ध कोणी, कधी आणि कोठे करावे ?
४.पितृपक्षात श्राद्ध केल्याने काय लाभ होतो ?
५. श्राद्धात दर्भ आणि काळे तीळ का वापरावेत ?
६. कावळा पिंडाला शिवणे, यामागील शास्त्र काय ?

प्रेमळ, जन्माने जुळ्या, साधनेला एकमेकींना पूरक असलेल्या आणि ५५ प्रतिशत आध्यात्मिक स्तर प्राप्त करून प्रगतीची वाटचालही जोडीने करणार्यां गुजरात येथील बालसाधिका कु. चिन्मयी आणि कु. देवश्री मनोज ओंकार (वय ११ वर्षे) !

कु. चिन्मयी ओंकार
 कु. देवश्री ओंकार
  कर्णावती, गुजरात येथील बालसाधिका कु. चिन्मयी मनोज ओंकार आणि कु. देवश्री मनोज ओंकार (वय ११ वर्षे) या दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्या उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या असून २०११ मध्ये दोघींचा स्तर ५१ प्रतिशत होता. आता तो ५५ प्रतिशत आहे. त्या दोघीही प्रत्येक कृती एकमेकींना पूरक अशीच करतात. त्यांचा भाद्रपद पौर्णिमेला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची आई सौ. दीपाली मनोज ओंकार यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
कु. चिन्मयी आणि कु. देवश्री यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

नवरात्रोत्सवानिमित्त प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

      नवरात्रोत्सवानिमित्त प्रबोधन करणारे ८ फूट X ७ फूट या आकारातील ५ होर्डींग तसेच नवरात्रोत्सवातील गैरप्रकारांविरुद्ध प्रबोधनपर हस्तपत्रक नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे. हे पत्रक ए५ आकारात पाठपोट आहे.
होर्डींगचे विषय खालीलप्रमाणे आहेत.
१. नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावट करा !
२. राष्ट्रावर कर्ज असतांना खर्चिक आरास अन् फटाके वाजवणे, ही राष्ट्रहानीच !

संतसेवेची सुवर्णसंधी !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक दाम्पत्याची आवश्यकता !
      पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक दाम्पत्याची आवश्यकता आहे. जे सेवक दाम्पत्य या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
भ्रमणभाष : ८४५१००६०७०
इ-मेल : hinducoordination@gmail.com

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशी (२७.९.२०१५) दुपारी १२.०७ वाजता
समाप्ती - भाद्रपद पौर्णिमा/कृष्ण पक्ष प्रतिपदा (२८.९.२०१५) सकाळी ८.२१ वाजता
आज पौर्णिमा आहे.

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तपत्रांची माहिती कळवा !

    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम
     कोणतीही गोष्ट जगात दिसली पाहिजे, उदा. प्रेम हे जगात दिसले पाहिजे, दाखविले पाहिजे, मग त्यात वास्तविकता असो वा नसो.
भावार्थ : जग आणि प्रेम हे प्रकृतीतील आहे. प्रेम कृतीतून दाखविता आले पाहिजे, नाहीतर दुसर्‍याला ते कळणार नाही. एकदा एका शिष्याकडे गेले असता, बाबांनी तेथे हातात माळ घेऊन जप केला. मग त्याच्या घरातील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली. वास्तविक बाबांच्या केवळ अस्तित्वानेच तसे झाले असते; पण अस्तित्वाचा परिणाम लोकांना दिसत नाही, तर हातात माळ धरून केलेला जप दिसतो, म्हणून बाबांनी तसे केले. या प्रसंगाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे बाबांनी हातात माळ घेऊन जप केल्याचे कुणी पाहिले नव्हते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
संतांनीही धर्मशास्त्राप्रमाणे कृती करणे आवश्यक !
    संत कर्मकांडाच्या पलीकडे गेलेले असल्याने त्यांनी धार्मिक कृती कशीही केली, तरी तिच्या फलनिष्पत्तीत फरक पडत नाही; कारण फलनिष्पत्ती त्यांच्या कृतीमुळे नाही, तर संकल्पामुळे होते. असे असले, तरी त्यांनी इतरांसमोर धर्मशास्त्राप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे, नाहीतर त्यांची अयोग्य कृती पाहून इतरही तशीच अयोग्य कृती करतील आणि तसे करणे योग्य असल्याचे इतरांना सांगतील. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.८.२०१५)

देवासंदर्भात व्यक्तीगत विचार करतांना आणि लिहितांना किंवा इतरांशी बोलतांना भाषेत भेद हवा !

१. व्यक्तीगत विचार करतांना : आपण ज्या वेळी देवाशी अरे, तुरे अशा प्रकारे एकेरी बोलतो, तेव्हा त्यात प्रेमाचा भाग असतो. ते वैयक्तिक असल्यामुळे ठीक आहे. 
२. लिहितांना किंवा इतरांसमोर बोलतांना : आपण ज्या वेळी देवाविषयी लिहितो किंवा इतरांसमोर बोलतो, त्या वेळी देवाबद्दल आदर ठेवून विचार व्यक्त करणे उचित ठरते. अशा वेळी प्रेमापेक्षा आदराला प्राधान्य द्यावयाचे, असे मला तरी वाटते. शुभम् । 
- योगतज्ञ दादाजी वैशंपायन (२.९.२०१५) 
(प.पू. दादाजींनी आज दूरभाषवर वरील विचार सांगितले. त्या आधी २ दिवस माझ्या मनात विचार येत होता, देवाला आपण अरे, तुरे च्या भाषेत संबोधतो. हे योग्य नाही. आज प.पू. दादाजींनी विषय स्पष्ट केला. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.९.२०१५))

खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असलेला आप !

संपादकीय
     तिकता आणि भ्रष्टाचारमुक्ततेच्या मोठ्या गप्पा मारणार्‍या आप या राजकीय पक्षाची सत्यता विविध प्रकरणांमुळे समोर यायला लागली आहे. हत्येचा प्रयत्न, हुंड्यासाठी पत्नीला त्रास देणे आणि घरगुती हिंसाचार असे विविध गुन्हे दाखल असलेले आपचे सध्याचे आमदार आणि माजी कायदेमंत्री सोमनाथ भारती सध्या पसार आहेत. भारती यांच्या विरोधात अन्य कोणी नाही, तर त्यांची पत्नी लिपिका यांनीच महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. सोमनाथ भारती यांच्यावर यापूर्वीही विदेशी महिलांसमवेत वाईट कृत्य केल्याचा आरोप झालेले आहेत. १० सप्टेंबरला तक्रार दाखल झाल्यापासून भारती अटक होण्यापासूच वाचण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यामुळे ते पसार झाले आहेत. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आवाहन करूनही भारती पोलिसांसमोर उपस्थित झालेले नाहीत. भारती यांचे हे केवळ एक प्रातिनिधीक उदाहरण असून सत्तेत आल्यापासून आपचे कारनामे पाहिल्यास आता खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असलेला आप आता जनतेसमोर येत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn