Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन सत्यकथन विशेषांक


आज अनंतचतुर्दशी

सनातन संस्थेवर बंदी घालणे अयोग्य !

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती यांचा पुनरुच्चार
साधू-संतांचे कृपाशीर्वाद हीच सनातनची शक्ती ! 
नाशिक - अंधश्रद्धा दूर करून लोकांना श्रद्धेच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करणार्या सनातन संस्थेवर बंदी घालणे योग्य नाही. जोपर्यंत सनातन संस्थेच्या विरोधात ठोस पुरावा मिळत नाही, तोपर्यंत केवळ 'सनातनने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांना विरोध केला', या आधारावर बंदी घालता कामा नये, असे ठाम धर्ममत पश्चिमाम्नाय द्वारका शारदापीठ एवं उत्तराम्नाय ज्योतिष्पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती यांनी 'एबीपी माझा' या मराठी वृत्तवाहिनीशी बोेलतांना केला. सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. (माध्यमांसमोर सनातन संस्थेला आशीर्वादात्मक पाठबळ दिल्याविषयी सनातन संस्था जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे, असे सनातनच्या विश्वंस्तांनी कळवले आहे ! - संपादक) 

सनातन संस्थेला इंटरनेटवर वाढता प्रतिसाद !

संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या संख्येत वाढ
मराठी संकेतस्थळ प्रतिदिन ९०० वरून १८००
इंग्रजी संकेतस्थळ प्रतिदिन ९०० वरून १५००
मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेला एका बाजूला वाढत्या विरोधाला सामोरे जावे लागत असतांनाच सनातनला पाठिंबा दर्शवणार्यांची संख्या देखील वाढत आहे. १६ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०१५ या काळात सनातन संस्थेचे संकेतस्थळ, फेसबूक आणि ट्विटर खात्याला भेट देणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. (एकीकडे तथाकथित पुरोगाम्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत असतांना संस्थेच्या संकेतस्थळाला मिळणारा वाढता प्रतिसाद ही तथाकथित पुरोगामी आणि हिंदुद्वेष्ट्या प्रसारमाध्यमांना सणसणीत चपराक ! )

समीर गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ

कोल्हापूर २६ सप्टेंबर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी अटकेत असलेले सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी २६ सप्टेंबरला संपला. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता, पोलिसांनी न्यायालयाकडे ४ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली; मात्र न्यायालयाने २ दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली.

(म्हणे) 'डाव्यांच्या हातात नक्षलवाद आहे, हे सनातनने विसरू नये !'

प्रकाश आंबेडकर यांची सनातनला उघड धमकी !
या धमकीवरून खरे आतंकवादी आणि नक्षलवादी कोण आहेत, ते समाजाने जाणावे !
  सांगली - सनातनच्या मासिकातून जे आदेश साधकांना दिले गेले, त्यातूनच कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. मारामारीची भाषा करणार्या सनातनने डाव्यांच्या हातात नक्षलवाद आहे हे लक्षात ठेवावे, अशी उघड धमकी रिपब्लिकन (आंबेडकर गट) नेते, तसेच भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे दिली. या विषयीचे वृत्त 'इनाडू इंडिया डॉट कॉम' या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. (डाव्यांच्या हातात नक्षलवाद आहे, हे जगजाहीर आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ते मान्य करून ते नक्षलवाद्यांचे समर्थक आहेत, हे सिद्ध केले. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. आपल्या पूर्वजांनी देशाची घटना बनवली; म्हणून ती आपल्याला लागू नाही, असे प्रकाश आंबेडकर यांना वाटते कि काय ? सनातनची नियतकालिके आंबेडकर यांनी कधीतरी वाचली आहेत का ? सनातनच्या कोणत्या मासिकातून साधकांना आदेश दिले गेले ज्यामुळे कॉ. पानसरे यांची हत्या झाली, ते आंबेडकर यांनी स्पष्ट करावे. सनातन या प्रकरणी कारवाईसाठी अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे. - संपादक)

(म्हणे) 'खुनी लोकांना मदत करू नका...!'

महाराष्ट्र टाइम्सचे सनातनद्वेषी वृत्त !
सनातनला मिळत असलेला पाठिंबा पाहून पायाखालची वाळू 
सरकल्याने छोट्याशा सनातनविरुद्ध सनातनद्वेष्ट्यांचे आणखी एक नवे षड्यंत्र !
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक केली आहे. पोलिसांनी अद्याप त्याचा हत्येच्या प्रकरणात सहभाग काय ? हे स्पष्ट केलेले नाही, तसेच त्याची केवळ संशयावरून चौकशी चालू आहे. असे असतांना सनातनद्वेषाचा कंड शमवून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सनातन संस्थेच्या विरोधात मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र टाइम्सच्या संकेतस्थळावरून 'खुनी लोकांना मदत करू नका...', या मथळ्याखाली सनातन प्रभातच्या २७ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार्या सनातन सत्यकथन विशेषांकाला साहाय्य न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे वृत्त देतांना महाराष्ट्र टाइम्सचा कोल्हापूर प्रतिनिधी सोशल मिडियावर असे आवाहन करण्यात येत असल्याचा कांगावा करायलाही विसरलेला नाही. 

'सनातन चुकीचे आणि विखारी विचार पसरवून हिंसेला प्रोत्साहन देते', असा कांगावा करणार्यांना सनातनच्या ग्रंथांना समाजातून मिळणार्यां प्रतिसादाविषयी काय म्हणायचे आहे ?

ऑगस्ट २०१५ पर्यंत सनातनच्या २७३ ग्रंथांच्या १४ भाषांमध्ये ६१ लाख प्रती प्रकाशित !
सनातनने चुकीचे विचार पसरवले असते, तर समाजातून सनातनच्या ग्रंथांना इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असता का ? टीका करणार्यांगनी सनातनच्या ग्रंथांचा नीट अभ्यास केला, तर त्यांनाही सनातन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी नि:स्वार्थी वृत्तीने करत असलेल्या व्यापक कार्याची प्रचीती येईल !

पानसरे हत्या प्रकरणीचे सत्य तात्काळ बाहेर येण्याचा मार्ग 'लाय डिटेक्टर' चाचणी ! - स्वामी विदितानंद

सध्याच्या वैज्ञानिक युगात पोलीस खोटे बोलणार्या  आरोपींची 'लाय डिटेक्टर' चाचणी करतात आणि त्याद्वारे त्याच्या अंतर्मनातील सत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात. खरे तर पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड, त्याची चौकशी करणारे पोलीस, तसेच या संदर्भातील टीकाकार या सर्वांची 'लाय डिटेक्टर' चाचणी करायला हवी. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. त्याचा अहवाल सर्व प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध करायला हवा.

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्या वृत्तपत्रांची माहिती कळवा !

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्यो वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत.
सनातन संस्थेची मानहानी 
करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्या वृत्तवाहिन्यांची माहिती कळवा !
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून सनातन संस्थेविषयी मानहानीकारक वृत्ते वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होत असल्यास त्याविषयी त्वरित दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात (०८३२) २३१२६६४ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे. ज्यांच्याकडे वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून ते vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावे आणि त्याविषयी अधिवक्ते नागेश ताकभाते 
(दू.क्र. ८४५१००६०५८) यांना कळवावे.

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून पाठिंबा !

सनातन संस्थेवरील बंदीची मागणी निषेधार्ह ! 
- श्रीरंग बारणे, खासदार, शिवसेना, पुणे 
      गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी सापडत नाही, म्हणून सनातन संस्थेवरील बंदीची मागणी चुकीची आहे. कायद्यानुसार खर्‍या गुन्हेगाराला शिक्षा होणे क्रमप्राप्त असून चुकीच्या पद्धतीने कोणावरही अन्याय होता कामा नये. तुम्हाला अडचणीमध्ये काही साहाय्य लागल्यास सांगा, मी येईन. सनातन संस्थेवरील बंदीची मागणी निषेधार्ह आहे.
       श्री. समीर यांना केवळ संशयित म्हणून अटक केलेली आहे. अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे बंदीच्या मागणीचा प्रश्‍न येत नाही. - उल्हासराव पाटील, आमदार, शिवसेना, शिरोळ, कोल्हापूर

संभाव्य बंदीच्या विरोधात श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे हिंदु रक्षा कृती समितीच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीचे प्रकरण 
      श्रीरामपूर, २६ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्था ही राष्ट्रभक्ती निर्माण करणारी संस्था असून तिच्यामुळे अनेकांमध्ये राष्ट्र्रप्रेम निर्माण झाले आहे. व्यक्ती दोषी ठरली, तर संबंधित संघटना किंवा पक्षच शिल्लक रहाणार नाहीत. त्यामुळे उगाचच खोटी आवई उठवून समाजात सनातन संस्थेविषयी अपप्रचार करण्याचे षड्यंत्र चालू आहे. काही नेते हिंदुद्वेषातून संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. हिंदु रक्षा कृती समिती या सर्वांचा विरोध करत असून आमचा सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीला विरोध आहे, अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी प्रकाश थविल यांना येथील हिंदु रक्षा कृती समितीच्या वतीने २४ सप्टेंबर या दिवशी देण्यात आले. 
      या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री श्री. विजय जैस्वाल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री प्रवीण पैठणकर, दीपक डावखर, शिवम पगारे, प्रशांत मोढे, राहुल पवार, बजरंग दलाचे श्री. सोमनाथ पतंगे, भाजपचे श्री. शेखर आहेर, श्रीराम युवा संघाचे श्री. कुणाल करंडे, प.पू. आसारामजी बापू साधक परिवारचे श्री. गौरव कांबळे आदी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते. 

सनातन संस्थेवर बंदी आणू नये यासाठी कराड येथील हिंदुत्ववाद्यांचे तहसीलदारांंना निवेदन

तहसीलदार सौ. भोसले (मध्यभागी) यांना निवेदन
देतांना कराड येथील धर्माभिमानी हिंदू
       सातारा, २६ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्था ही वैचारिक आणि सनदशीर मार्गाने मार्गक्रमण करणारी संस्था आहे. सनातन संस्थेवर बंदी आणण्यात येऊ नये, अशी मागणी कराड येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी तहसीलदार सौ. भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
     या वेळी भाजपचे गणेश कापसे, शिवसेनेचे प्रतिक घोडके, सागर मिसाळ, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्रीकृष्ण पाटील, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रतिष्ठान, कराडचे प्रशांत नांगरे, प्रशांत नलावडे आदी अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रुग्णांच्या नातेवाईकांची केईएममधील आधुनिक वैद्यांना स्टूल, सळईने मारहाण

      मुंबई - केईएम रुग्णालयात डेंग्यू झालेल्या एका मुलीची अवस्था फारच नाजूक होती. त्यामुळे ती मुलगी त्याच वेळी कोमामध्ये गेली होती; मात्र संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट आधुनिक वैद्यांनाच मारहाण केली. या मारहाणीचा निषेधार्थ केईएममधील निवासी डॉक्टरांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे.
     आधुनिक वैद्यांच्या निष्काळजीपणामुळे मुलगी कोमात गेल्याचा समज मुलीच्या नातेवाईकांनी करून घेत थेट आधुनिक वैद्यांनाच मारहाण केली. मारहाण करण्यात आलेल्या आधुनिक वैद्याचे नाव सुहास चौधरी आहे. त्यांची पाठ आणि हात यांवर लोखंडी स्टूल आणि सळीने मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्यांना सोडवण्यासाठी गेलेले आधुनिक वैद्य कुशल आणि पुनील यांनाही रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली.

दुप्पट वीजदेयकांमुळे बेस्टचे अडीच लक्ष ग्राहक संतप्त

जनतेला मनस्ताप देणारी आस्थापने !
      मुंबई - तांत्रिक बिघाडामुळे बेस्टच्या अडीच लक्ष वीजग्राहकांना दुप्पट देयके येत असल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बेस्टने विजेची देयके पाठवण्याच्या यंत्रणेचे खासगीकरण केले; परंतु त्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने बेस्टचा कारभार गोंधळाचा झाला आहे. 
     बेस्टची ईडीपी (इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट ऑफ प्रोसेस) विभागाच्या वतीने ग्राहकांची विजेची देयके काढली जात होती; परंतु २००८-०९ पासून विजेच्या देयकाचे खासगीकरण करण्यात आल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना विजेची देयके दुप्पट येत आहेत. केएल्जी या खासगी आस्थापनाला हे काम देण्यात आले; परंतु या कंपनीच्या वीजदेयक काढण्याच्या यंत्रणेत बिघाड येऊ लागला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे. एका वर्षात तीन वेळा ग्राहकांना भुर्दंड भरावा लागत आहे.

यवतमाळमध्ये पोलिसांवर धर्मांधांचा धारदार शस्त्रांनी हल्ला, तीन पोलीस गंभीर जखमी

पोलीसच सुरक्षित नाही, तिथे सामान्यांची काय कथा !
      यवतमाळ - बकरी ईदच्या दिवशी यवतमाळमधील पुसदमध्ये सकाळी नमाज झाल्यावर काही तरुणांनी पोलिसांवर धारदार शस्त्रांंनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पुसदमधील शिवाजी चौकात ही घटना घडली. हल्लेखोर तरुणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे ४० ते ५० पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते; मात्र हल्लेखोरांनी कसलीही पर्वा न बाळगता चाकूने हल्ला केला. अमरावती विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी पाहणीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत, तर जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

पानसरे खून प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांच्या बाजूने सांगलीतून ७० वकिलांनी सरकारपक्षाच्या बाजूने साहाय्य करण्यासाठी केली स्वाक्षरी !

     सांगली, २६ सप्टेंबर (वार्ता.) - कॉ. पानसरे खून खटल्याच्या प्रकरणी सरकारी पक्षाला साहाय्य करण्यासाठी वकिलांनी पुढे यावे, असे आवाहन पानसरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले होते. त्याला सांगलीतून ७० वकिलांनी पाठिंबा दिला आहे. यात काही माजी जिल्हा सरकारी वकिलांचाही समावेश आहे. ही वकीलपत्रे कोल्हापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
Punake Mukhya 5 Ganesh Mandalonka krutrim kundame Ganeshmurtionka visarjan karneka nirnay ! - Ganeshmurtionka bahete panime visarjan kar Dharmashastraka palan kare !
जागो ! :
पुना के मुख्य ५ गणेश मंडलों का कृत्रिम कुंड मे गणेशमूर्तीआेंका विसर्जन करने का निर्णय ! - गणेशमूर्तींआेंका बहेते पानी में विसर्जन कर धर्मशास्त्र का पालन करें ।

गणेशभक्तांनो, श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करा !

फलक प्रसिद्धीकरता
       धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने गणेशतत्त्वाचा लाभ सर्वांना मिळतो, असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करून श्री गणेशाची कृपा संपादन करा !

श्यामसुंदर सोन्नार आणि निखिल वागळे यांना सनातनने धमकी दिल्याचा आरोप ही 'स्टंटबाजी' !

सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांचे मुंबई प्रेस क्लबला पत्र
    मुंबई - श्यामसुंदर सोन्नार आणि निखिल वागळे यांना सनातन संस्थेने धमकी दिल्याविषयी मुंबई प्रेस क्लबकडे तक्रार करण्यात आल्याचे वृत्त २२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झाले आहे. त्याविषयी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी एक पत्र प्रेस क्लबच्या अध्यक्षांना पाठवले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, सनातनने ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नार किंवा निखिल वागळे यांना धमकी दिलेली नाही. तशा प्रकारचा आरोप करणेे, हा पब्लिसिटी स्टंट आहे.
या पत्रात म्हटले आहे की,
१. सनातन संस्था गेली २५ वर्षे हिंदु धर्मशास्त्राचा प्रसार करत आहे. वर्ष १९९८ पासून सनातन संस्था ही दैनिक सनातन प्रभात या वृत्तपत्राद्वारे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीचे कार्य करत आहे. 
२. पत्रकार श्यामसुंदर सोन्नार यांनी स्वतःला 'सनातन प्रभातमधून धमकी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध केले', असे म्हटले आहे.

शासनाला अपकीर्त करण्यासाठी सनातन संस्थेवर बंदीची मागणी ! - दिलीप अलोणी, अध्यक्ष, ब्राह्मण स्वाभिमान मंच, तसेच ठाणे अध्यक्ष राष्ट्रीय एकात्मता रक्षा अभियान

श्री दिलीप अलोणी
    डॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी समीर गायकवाड याला केवळ संशयित म्हणून तांत्रिक सर्वेक्षणाच्या आधारे अटक केली आहे. या प्रकरणात गायकवाड आणि त्याचे कुटुंबीय हिंसा करतील, असे वाटत नाही. सनातन संस्थेचे कार्य सनदशीर मार्गाने चालते आणि विचारांची लढाई विचाराने लढण्याची त्यांची कार्यपद्धत आहे. असे असूनही तथाकथित पुरोगाम्यांकडून हल्लाबोल करत सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. 
     सनातन संस्था ही हिंदुत्वासाठी लढणारी एक संघटना आहे. शासनाला अपकीर्त करण्यासाठी कथित पुरोगाम्यांकडून खटाटोप केला जात आहे. सत्ताधारी भाजप शासन मात्र या प्रकरणी बोटचेेपे धोरण स्वीकारत आहे. या प्रकरणी दोषीला शिक्षा होईलच; पण या हत्येमध्ये सनातन संस्थेने मारेकर्‍यांना प्रशिक्षण दिले असेल अथवा हत्येसाठी त्यांना उद्युक्त केले असेल, तरच संस्थेवर बंदीवर घालण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका शासनाने घ्यायला हवी. एखाद्या संघटनेमधील एखाद्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला, तर संपूर्ण संघटनेवरच बंदी घालण्याचा नियम लावला, तर सर्व राजकीय पक्षांवरही बंदी येईल.

राजकारणी आणि प्रसारमाध्यमे सनातन संस्थेवर करत असलेले आरोप वस्तूस्थितीवर नव्हे, तर हिंदु धर्मावरील द्वेषावर आधारित असणे !

'एखाद्याने गुन्हा केला, तर त्याच्या आई-वडिलांना अटक करत नाहीत. एखाद्याने भ्रष्टाचार केला, तर त्याच्या कार्यालयातील सर्वांवर गुन्हा दाखल करत नाहीत. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने गुन्हा केला, तर पक्षावर बंदी घालत नाहीत. असे असतांना सनातनच्या एका साधकावर गुन्हा केल्याचा नुसता संशय असला, तरी सर्व सनातनद्वेष्टे एकसुरात 'सनातनवर बंदी घाला', अशी मागणी करतात !'
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.९.२०१५)

सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या करणार्‍या वृत्तांचा श्री. उन्मेष गुजराथी यांनी त्यांच्या ब्लॉगमधून घेतलेला समाचार !

सनातन संस्थेची न्याय्य बाजू सडेतोडपणे मांडणारे प्रातिनिधिक वृत्त !
   जो तो उठतो आणि...
    दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी...! एका पाठोपाठ एक अशा तीन विचारवंतांच्या हत्या झाल्या आणि प्रत्येक वेळा संशयाची सुरी सनातनकडे वळली. अर्थात् या प्रकरणांतील खरे आरोपी कोण ? याची अजून शहानिशा व्हायची आहे; पण त्याआधीच अनेकांनी सनातनवर बंदी घालायची मागणी लावून धरली आहे. कित्येकांना सनातनपासून त्यांच्या जिवाला धोका असल्याचा साक्षात्कार होत आहे.
     सनातन म्हणजे इसिसच्या धर्तीवरील एखादी संस्था असावी, असेच एकंदर चित्र उभे करण्यात आले आहे. इसिसमध्ये भरती होण्यासाठी जाणार्‍या तरुणांपेक्षा सनातनचा साधक समीर गायकवाड माध्यमांत अधिक गाजतो आहे. खरंच इतकी खतरनाक असेल सनातन संस्था, तर मग आज बंदीची मागणी करणारे स्वत: सत्तेत असताना गप्प का बसले होते ? देशहिताच्या एवढ्या महत्त्वाच्या बाबीसाठी एवढा विलंब कशासाठी ?

हिंदुत्वाला अपकीर्त करण्यासाठीच सनातनवर कारवाई ! - दैनिक सामना

        दैनिक सामनाने २१ सप्टेंबर या दिवशी तथाकथित पुरोगाम्यांच्या सनातनद्वेषाचे पितळ उघडे पाडणारे कुत्रा, माकड व बोकड आणि सनातनची सुपारी ! हे संपादकीय लिहिले ! त्याद्वारे जनतेसमोर पुरोगाम्यांचा बुरखा फाडून राष्ट्र आणि धर्म निष्ठ सनातन संस्थेला खंबीर पाठिंबा देणारे दैनिक सामनाचे संपादक अन् शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे आणि कार्यकारी संपादक खासदार श्री. संजय राऊत यांचे सनातन संस्थेच्या वतीने जाहीर आभार ! 
सनातनवर बंदीची मागणी करण्याचा 
प्रकार हास्यास्पद !
      सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे आणि अशी मागणी करणारी थोबाडे तीच, तीच आणि तीच आहेत. कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगलीतून समीर गायकवाड या तरुणास अटक झाली. गायकवाड हा सनातनचा साधक आहे. सनातनच्या अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात त्याचा सहभाग आहे, या कारणास्तव गायकवाडला विनाचौकशी फासावर लटकवा आणि सनातनवर लगेच बंदी घाला, अशा मागणीची डबडी वाजू लागली आहेत. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे आणि स्वत:स पुरोगामी वगैरे म्हणवून घेणार्‍यांचे ढोंग उघडे पाडणारा आहे. 

गोव्यातील मडगाव स्फोट प्रकरणाच्या अग्नीदिव्यातील सनातनचे निर्दोषत्व !

      १६ ऑक्टोबर २००९ दिवशी मडगाव येथे स्फोट झाला आणि त्यात सनातन संस्थेचे दोन साधक ठार झाले. या स्फोटाला सनातनच्या काही साधकांना अपकीर्ती ठरवून गेली अनेक वर्षे माध्यमांमध्ये सनातनची बदनामी केली जात आहे. अनेकांना हे माहीतच नाही की, या प्रकरणातील सनातनचे सर्व साधक निर्दोेष सुटले आहेत. म्हणूनच या संदर्भात खुलासा करणारा २५ सप्टेंबर २०१५ ला दैनिक आपला वार्ताहरने प्रसिद्ध केलेला हा लेख....

सनातन संस्थेला अखिल मानवजातीचे हित साधायचे आहे !

सनातनविरोधी रान उठवणार्‍यांना चोख प्रत्युतर : सनातन संस्थेचे प्रवक्ता 
श्री. अभय वर्तक यांच्याशी झालेला संवाद
श्री. अभय वर्तक
      हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या अग्रणी संस्थांपैकी एक असलेल्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी चालू आहे. गेल्या २५ वर्षांत सनातन संस्थेने केलेले उत्तुंग धर्मकार्य थांबावे, यासाठी प्रसारमाध्यमांतील कथित बुद्धीवंत लेखणी आणि काही मिनिटांचे वृत्तसादरीकरण यांद्वारे आकाश-पाताळ एक करत आहेत. सनातनरूपी सूर्यावर मळभ आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या या धर्मद्वेषी वृत्तीला चोख उत्तर देणे आणि सामान्य हिंदूंच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करणे यांसाठी सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. सागर निंबाळकर यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांच्याशी साधलेला हा संवाद...

एक जागरूक राष्ट्रप्रेमी या नात्याने देहलीतील एक शाम पाकिस्तान के नाम हा कार्यक्रम आणि शान-ए-पाकिस्तान हे प्रदर्शन यांना विरोध करतांना श्री. शिवाजी वटकर यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे दिलेली शर्थीची झुंज !

श्री. शिवाजी वटकर
    नवी देहली येथे एक शाम पाकिस्तान के नाम हा करमणुकीचा कार्यक्रम आणि शान-ए-पाकिस्तान प्रदर्शन रहित व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आज येथे आपण पहाणार आहोत.   
१. निषेधपत्रात सर्व माहिती न लिहिल्यामुळे झालेला गोंधळ
    नवी देहली येथे एक शाम पाकिस्तान के नाम हा करमणुकीचा कार्यक्रम आणि शान-ए-पाकिस्तान प्रदर्शन आहे, असे वृत्त जुलै २०१५ च्या शेवटी मला समजले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय निर्यात महासंघ (फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन), गृहमंत्री, व्यापार मंत्री, विदेश मंत्री आणि देहली पोलीस आयुक्त यांना संगणकीय पत्र पाठवले, तसेच या कार्यक्रमांच्या विरोधात संकेतस्थळावर मोहीमही चालू केली. नंतर मला समजले की, संगणकीय पत्रावर पत्र पाठवणार्‍याचे नाव आणि संपर्क क्रमांक दिला नव्हता. त्यामुळे देहलीतील विशेष शाखा पोलिसांचा भ्रमणभाष समितीच्या लेटरहेडवर असलेल्या कार्यकर्त्याच्या भ्रमणभाष क्रमांकावर आला. एखाद्याला निषेधपत्र पाठवण्यात चूक झाली, तर कसा गोंधळ होतो आणि मोहिमेचा आरंभ कसा चुकीचा होतो, हे या उदाहरणातून शिकायला मिळाले. 

सनातन संस्थेवर बंदी घातल्यास राज्यभर आंदोलन करू ! - सुदर्शन अण्णा शितोळे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन पक्ष, पुणे

श्री सुदर्शन अण्णा शितोळे
      कॉम्रेड पानसरे यांच्या प्रकरणात सनातन संस्थेचा साधक श्री. समीर गायकवाड दोषी असेल, तर त्याला जरूर शिक्षा करा; पण शासन सनातन संस्थेला हिंदुत्ववादी म्हणून लक्ष्य करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे जर सनातन संस्थेवर बंदी घातली, तर राज्यभर आंदोलन केले जाईल.

आम्ही सनातनच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत ! - अनिल शिरोळे, खासदार, भाजप, पुणे

     सनातन संस्था ही अध्यात्मशास्त्राचा प्रसार करणारी संस्था आहे. या संस्थेतील साधक साधना आणि राष्ट्रभक्ती करणारे आहेत. कॉम्रेड पानसरे यांच्या प्रकरणात सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड दोषी असेल, तर त्याला जरूर शिक्षा करा; म्हणून संस्था दोषी असेलच असे म्हणता येत नाही. त्यामुळे शासन सनातन संस्थेवर बंदी आणू शकत नाही. आम्ही सनातनच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत.

सनातनच्या ईश्‍वरी कार्यात आम्ही खंबीरपणे त्यांच्यासोबत असून संस्थेला आमचा पाठिंबा ! - पेशवा युवा मंच, पंढरपूर, सोलापूर

      सनातन संस्थेसारख्या राष्ट्र-धर्मकार्याकरिता कार्यरत असणार्‍या संस्थेवर बंदी आणण्याची मागणी काही तथाकथित पुरोगामी संघटना करू लागल्या आहेत. राष्ट ्र- धर्म कार्यात विघ्न आणण्याचा हा प्रयत्न चुकीचा आणि निषेधार्ह आहे. सनातनवर बंदीच्या मागणीचा आम्ही निषेध करतो. सनातनच्या ईश्‍वरी कार्यात आम्ही खंबीरपणे सोबत असून संस्थेला आमचा पाठिंबा या पत्रकाद्वारे जाहीर करतो.

सनातन संस्था कोणतेही देशविघातक कार्य करणार नाही ! - नगरसेवक अनंत कोर्‍हाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

      सनातन संस्था ही हिंदु धर्मप्रसार आणि समाजप्रबोधान याचे कार्य करते. त्याचबरोबर नवीन युवकांना मार्गदर्शन करून सामाजिक बांधिलकी जपणे आणि देशसेवेद्वारे देशाचे हित राखणे यासाठी संस्था कार्य करते. आम्ही नेहमी सनातनच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतो. सनातन संस्था कोणतेही देशविघातक कार्य करणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. आमचा सनातन संस्थेला सदैव पाठिंबा आहे.

सनातनच्या साधकाला खोट्या आरोपाखाली अटक केल्याविषयी सर्व हिंदूंनी रस्त्यावर उतरून विरोध करावा ! - पू. आचार्य आर्य जीतेंद्रजी महाराज, मध्यप्रदेश

     आम्ही गुरुदेवांशी (परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले) जोडले गेलेलो आहोत. सनातनच्या साधकाला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या विरोधात सर्व हिंदूंनी रस्त्यावर उतरून विरोध करायला हवा. आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीशी आहोत.

राष्ट्र उभारणीसाठी सनातन संस्था टिकावी ! - महामंडलेश्‍वर श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज

      सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र अन् संस्कृती यांविषयीचे कार्य सकारात्मक आहे. सनातनकडून धार्मिक कृती, उत्सव यांविषयीचे धर्मज्ञान समाजास दिले जातेे. सनातन संस्था आणि तिचे हे कार्य राष्ट्र उभारणीसाठी टिकूून राहिले पाहिजे. समीर गायकवाडवर न्यायालयात आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यास अपराधी म्हणणे, हा तो आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर अन्याय आहे. तसे केल्याने त्याच्या आयुष्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.
     भाजपचे प्रसिद्धीप्रमुख श्री. केदार खाडिलकर यांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये १८ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेले संपादकीय त्यांच्या फेसबूक अकाऊंट, तसेच व्हॉट्स अ‍ॅपवर टाकले होते. त्यामुळे ७०० हून अधिक लोकांपर्यंत विषय पोहोचवण्यास साहाय्य झाले.

साप्ताहिक सनातन प्रभातच्या पृष्ठसंख्येत वाढ !

दीपावलीच्या शुभ मुहुर्तावर... वाचक आणि विज्ञापनदाते यांना आनंदवार्ता !
      राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची संख्या वाढत असल्याने सध्या या आघातांची वृत्ते येण्याचा ओघ प्रचंड आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्र आणि धर्म यासंदर्भात स्फूर्तीदायक प्रसंग घडतांना दिसत आहेत. या सर्व गोष्टींविषयी हिंदूंना अवगत करणे आवश्यक आहे. यासाठीच साप्ताहिक सनातन प्रभातची पृष्ठसंख्या वाढवत आहोत.
वर्ष १७ अंक क्र. ५० (२९ ऑक्टोबर २०१५ ते ४ नोव्हेंबर २०१५) पासून प्रत्येक अंक १६ पानी ! 
मूल्य ८ रुपये (वार्षिक वर्गणी : ४०० रुपये)

श्री. वीरेंद्र मराठे यांची मुलाखत प्रसिद्ध करतांना मुंबई मिरर या दैनिकाने केलेला विपर्यास आणि खुलासा

    
मुंबई मिरर या इंग्रजी दैनिकाच्या पत्रकार अलका धुपकर यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला १९ सप्टेंबरला भेट देऊन सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांच्याशी संस्थेचे कार्य आणि भूमिका यांविषयी मराठी भाषेत मुलाखत घेऊन माहिती घेतली होती. त्यानंतर २१ सप्टेंबरला मुंबई मिरर यामध्ये 'Politicians should start Sadhana' (राजकारण्यांनी साधनेला प्रारंभ करावा !) या मथळ्याखाली इंग्रजीत लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात काही सूत्रांची मोडतोड करण्यात आली आहे. त्याचा खुलासा अलका धुपकर यांना पाठवूनही त्यांनी तो गेले दोन दिवस प्रसिद्ध केलेला नाही.
तो येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. मुंबई मिररमधील चुकीची माहिती : सनातन संस्था साधकांसाठी वाळपईच्या जंगलात सैनिकी प्रशिक्षण देते. १५ साधकांना बंदूक चालवण्याचे आणि जंगलात लपण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी स्थानिकांच्या बंदुका वापरण्यात आल्या.
योग्य माहिती : हे वाक्य 'वाळपई' या गावाच्या जवळ २००१-२००२ या कालावधीत केवळ २ वर्षांसाठी समाजातील लोकांसाठी निःशुल्क स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले होते. यात दोरीवर चढणे, उंचावरून तोल सांभाळत चालणे, उपलब्ध असलेल्या एअर रायफलच्या आधारे ती कशी पकडायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या वर्गांना प्रतिसाद न मिळाल्याने ते बंद करण्यात आले.

आमचा सनातनला भक्कम पाठिंबा ! - हिंदुत्ववादी अन् विचारवंत

    अनेक हिंदुत्ववादी, हिंदु संघटनांचे नेते, प्रवचनकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, संपादक इत्यादींनी सनातनच्या कार्यावर विश्‍वास व्यक्त करत सनातन संस्थेला पाठिंबा दिला तसेच संस्थेचे कार्य अधिक प्रमाणात वाढण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीराम सेना आणि अन्य संघटना सनातनच्या पाठीशी !
- प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक
    सनातनवर चुकीचे आरोप केले जात असून त्यात कोणतेही तथ्य नाही. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती चांगले कार्य करत आहे. आपण सत्याच्या बाजूने आहोत. त्यामुळे साधकांनी घाबरून न जाता धीर धरावा आणि त्यांची साधना चांगल्या प्रकारे चालू ठेवावी. श्रीराम सेना आणि हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेच्या पाठीशी आहेत.

सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करणारे महामूर्ख !
- ठाकूर अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन, पनवेल
    सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी पुरोगामी आणि काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. त्या विषयी स्वतःची प्रतिक्रिया वृत्तवाहिन्यांसमोर मांडतांना महाराणा प्रताप बटालियनचे ठाकूर श्री. अजयसिंह सेंगर म्हणाले, सनातन ही एक धर्मनिष्ठ संघटना आहे. हिंदूंसाठी प्रामाणिकपणे कार्य करणारी संघटना आहे. सनातन संस्था हिंदु धर्म वाचवण्याचे कार्य करत आहे. सनातन संस्थेसारखी महान संघटना देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात मी पाहिलेली नाही. धर्मरक्षक तयार करणार्‍या संघटनेवर तुम्ही बंदी आणण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. जे सनातनवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत, ते महामूर्ख आहेत.

वैचारिक पराभवामुळे रचलेले पुरोगाम्यांचे सनातनबंदीचे कुभांड निषेधार्हच ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना कोणताही सबळ पुरावा नसतांना अटक करण्यात आली. ही अटक म्हणजे सनातन संस्थेला लक्ष्य करण्यासाठी झालेली अन्याय्य कारवाई आहे. या हत्या प्रकरणात सनातनला अकारण गोवून हिंदुत्ववादी संघटनांची मानहानी करण्याचे हे पुरोगाम्यांचे षड्यंत्र आहे. सनातनचे हिंदुत्वाचे कार्य जोमाने वाढत असल्याने पुरोगामी आणि निधर्मी यांचा वैचारिक पराभव झाला आहे. तो पचनी न पडल्याने मीडिया ट्रायल करणारे, पुरोगामी, साम्यवादी, काँग्रेस आदी पक्ष यांनी पोलिसांची चौकशी आणि न्याययंत्रणेचे न्यायदान होण्यापूर्वीच सनातनविरोधी कुभांड रचून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी चालवली आहे. सनातनवरील बंदीच्या षड्यंत्राचा आणि सनातनचे निष्पाप साधक श्री. समीर गायकवाड यांच्या अटकेचा हिंदु जनजागृती समिती जाहीर निषेध करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि दैवी कण यांच्याविषयी अभ्यासहीन वृत्तीतून वृत्तवाहिन्यांकडून अपप्रचार !

एम्.आय.टी येथे दैवी कणांविषयी प्रबंध सादर करतांना
डॉ. दुर्गेश सामंत आणि शेजारी बसलेल्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ
    सनातन संस्थेद्वारे चालू असणार्‍या आध्यात्मिक संशोधनाच्या कार्याविषयी अनेक प्रसारमाध्यमांनी विपर्यस्त वृत्ते प्रसिद्ध केली आहेत. स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च डॉट ऑर्ग या संकेतस्थळावरील चित्रणाचा वापर करून काही वृत्तवाहिन्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शरिरातून दैवी कण प्रक्षेपित होतात, यांसह अन्य माहिती प्रसिद्ध केली. ती करतांना लोकांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल, असेच चित्रण करण्यात आले. सनातनविषयी अधिकाधिक अपसमज पसरवण्यात आले. दैवी कणांच्या संदर्भातील सनातनने संशोधक वृत्तीने केलेल्या प्रयत्नांची माहिती येथे प्रातिनिधीक स्वरूपात देत आहोत. यावरून सनातनचे संशोधन कशा प्रकारे चालू आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल.

राष्ट्ररक्षण, धर्मजागृती यांचा वसा घेतलेल्या दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचक व्हा !

केवळ रविवारच्या दैनिक सनातन प्रभातचे वाचन करणार्‍या राष्ट्र-धर्म प्रेमी 
आणि जिज्ञासू वाचकांना नम्र विनंती !
१. राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असल्याने वाचकांना चौकस ज्ञानसंपदा उपलब्ध करून देणारे अनोखे दैनिक सनातन प्रभात ! : दैनिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक ! अध्यात्म, राष्ट्र, धर्म, आचारधर्म, कायदा, आर्थिक उलाढाल, राजकारण आदी विषयांवरील लेख योग्य संपादकीय दृष्टीकोनासह या नियतकालिकातून प्रसिद्ध केले जातात. वाचकांच्या मनातील देशप्रेम वृद्धींगत करण्यासाठी, तसेच हिंदु धर्मावर होणार्‍या आघांताविषयी त्यांना अवगत करण्यासाठी हे नियतकालिक सदैव कटीबद्ध आहे. 
      देवतांविषयी भावभक्ती वाढवणारी, साधनेची अपरिहार्यता सांगणारी नानाविध सदरेही यामध्ये प्रसिद्ध केली जातात.

इन्क्विझिशन(धर्मच्छळ)चा क्रूर इतिहास चित्रबद्ध करण्यासाठी चित्रकार हवेत !

      प्रसिद्ध हिंदुत्ववादी आणि फ्रेंच पत्रकार श्री. फ्रान्सुआ गोतिए हे गोवा दौर्‍यावर आले होते. गोव्यात धर्मांतराला ज्या हिंदूंनी विरोध केला, त्यांना पोर्तुगिजांनी इन्क्विझिशन (पोर्तुगिजांनी गोव्यातील हिंदूंचे ख्रिस्ती पंथात धर्मांतर करण्यासाठी केलेले अनन्वित अत्याचार) अर्थात् धर्मच्छळ करून ज्या ठिकाणी अनन्वित अत्याचार केले, त्या ठिकाणांना श्री. गोतिए यांनी भेट दिली. त्या वेळी गोव्यात इन्क्विझिशनच्या फार अल्प खुणा अस्तित्वात असून हा इतिहास लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढे समाजही इन्क्विझिशनसारखे काही अस्तित्वात होते, यावर विश्‍वास ठेवणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. येणार्‍या हिंदु पिढ्यांना हा इतिहास ज्ञात व्हावा, यासाठी श्री. गोतिए यांनी इन्क्विझिशनचा इतिहास चित्रबद्ध करण्याचे ठरवले आहे. अशा इन्क्विझिशनवर आधारित ५० चित्रांचे प्रदर्शन भरवून हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा श्री. गोतिए यांचा मानस आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे सनातनच्या साधकाच्या नेत्ररुग्णालयासाठी (पुरूष) नेत्रतज्ञाची आवश्यकता

      सनातनच्या साधकास प्राधान्य. पात्रता, अनुभव आणि अपेक्षित पगार तसेच भ्रमणध्वनी क्रमांकासह या संगणकीय पत्त्यावर त्वरित संपर्क करा siddhiey@gmail.com

(म्हणे) 'सनातनला हिदु दहशतवाद मान्य !'

दैनिक प्रहारमध्ये सनातनच्या पत्रकार परिषदेतील विधानाचा विपर्यास
    मुंबई - दैनिक प्रहारच्या १९ सप्टेंबरच्या पृष्ठ १ वर 'देशात हिंदू दहशतवाद असल्याचे सनातनला मान्य' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले आहे. हा सनातनच्या पत्रकार परिषदेतील विधानांचा विपर्यास आहे. 'अशा आशयाचे वृत्त एकाही वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेले नसतांना दैनिक प्रहारने असे प्रसिद्ध करणे, हा खोडसाळपणा आहे, असे सनातन संस्थेने म्हटले आहे.'
दैनिक प्रहारने काय प्रसिद्ध केले ?
     दैनिक प्रहारच्या वृत्तात म्हटले आहे, देशात हिंदु दहशतवाद असून हिंदु धर्माच्या विरोधात बोलल्याने कॉ. गोविंद पानसरे आणि कर्नाटकातील साहित्यिक कलबुर्गी यांची हत्या हिंदूंनी केली असावी, असा गौप्यस्फोट हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी शुक्रवारी 'सनातन' संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. देशात हिंदु दहशतवाद असल्याचे आम्ही मान्य केले आहे. यासाठी काही संघटना सहभागी असल्या, तरी आम्ही त्यात सहभागी नाही, असा खुलासा त्यांनी केला; मात्र या भरकटत चाललेल्या  हिंदुत्ववादी संघटनांसोबत कुठे तरी चर्चा व्हावी, असा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

सनातनवर बंदी नाही ! - मुख्यमंत्री अन् लोकप्रतिनिधी

सनातन संस्थेवर राजकीय दबावाखाली बंदी
घालणार नाही ! -
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
    कॉ. पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण कायद्याच्या चौकटीत राहून केले जाईल. कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल; मात्र सनातन संस्थेवर बंदी घालायची अथवा नाही, याचा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

एखाद्या सदस्याच्या चुकीमुळे सनातन संस्थेवर
बंदी घालणे अयोग्य ! -
लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा
     संघटनेचा एक सदस्य चूक करू शकतो. एक सदस्य एका संघटनेशी किंवा अनेक संघटनांशी संबंधित असू शकतो. एका सदस्याच्या चुकीसाठी संपूर्ण संघटनेवर बंदी घालू शकत नाही.

आम्ही सनातनच्या पाठीशी ! - संत-महंत अन् संप्रदाय

साधू, संत, महंत, वारकरी, सत्पंथी संप्रदाय आदी
सनातनच्या पाठीशी आहोत ! - स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज
     धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी आपण त्यांच्या पाठीशी संघटितपणे अन् खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आम्ही सर्वजण सनातनच्या पाठीशी आहोत.

सनातनची जी अपकीर्ती चालू आहे, ती अत्यंत
चुकीची आहे ! -
पू. डॉ. रघुनाथ शुक्ल, शास्त्रज्ञ, पुणे
    सनातन संस्था अध्यात्मप्रसार करणारी संस्था आहे. संस्थेचे कार्य मी जवळून पाहिले आहे. या संस्थेतील साधक सेवाभावी वृत्तीने अध्यात्मप्रसार आणि राष्ट्ररक्षण हे कार्य तळमळीने करतात. प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रे यामधून सनातन संस्थेची जी अपकीर्ती चालू आहे, ती अत्यंत चुकीची आहे. संस्थेच्या कार्यामुळे समस्त हिंदू सनातनच्या पाठीशी आहेत.

नाशिक येथील वारकरी संत संमेलनात सनातनला एकमुखी पाठिंबा !

सनातनला पाठिंबा देणारे साधू, संत, महंत !

     डावीकडून अनुक्रमे १. श्री महंत स्वामी नारायणगिरी महाराज २. श्री गुरुमालसिंह महाराज ३. श्री त्रिकालदर्शी महाराज ४. जय भगवानबाबा ५. महाराष्ट्र वारकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री, ६. महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज ७. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज ८. श्रीमद् जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्यजी महाराज ९. महामंडळेश्‍वर डॉ. अमृतदासजी जोशी महाराज १०. महामंडलेश्‍वर ईश्‍वरदास महाराज ११. ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, १२. महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ १३. ह.भ.प. रामचंद्र महाराज बळी १४. ह.भ.प. रामचंद्र पेनोरे महाराज १५. श्री महंत चैतन्यदास महाराज निंबोळे १६. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे 
    जगद्गुरु सत्पंथाचार्य श्री नानकदासजी महाराज, अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याचे अध्यक्ष श्री महंत धरमदासजी महाराज, महामंडलेश्‍वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, ह.भ.प. तुरियानंद महाराज, ह.भ.प. संतोषानंद शास्त्री महाराज

आम्ही सनातनच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत ! - खासदार श्री. अनिल शिरोळे, भाजप

    सनातन संस्था ही अध्यात्मशास्त्राचा प्रसार करणारी संस्था आहे. या संस्थेतील साधक साधना आणि राष्ट्रभक्ती करणारे आहेत. कॉम्रेड पानसरे यांच्या प्रकरणात सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड दोषी असेल, तर त्याला जरूर शिक्षा करा; म्हणून संस्था दोषी असेलच असे म्हणता येत नाही. त्यामुळे शासन सनातन संस्थेवर बंदी आणू शकत नाही. आम्ही सनातनच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत.

सनातनवरील बंदीविषयी तुळजापुरातील मान्यवरांचे अभिप्राय

    आरोप सिद्ध झाले नसतांनाही प्रसारमाध्यमे ज्या पद्धतीने सनातनवरती बंदीची मागणी करीत आहेत, ती सर्व प्रसारमाध्यमे आणि पुरोगामी म्हणजे देशद्रोहीच ! - श्री. अर्जुन साळुंके, शिवबाराजे प्रतिष्ठान

    सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून ती अशी दुष्कृत्ये करूच शकत नाही. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे हिंदु धर्माची अपकीर्ती कशी होईल ते बघत आहेत आणि पुरोगामी विचारांचे लोक बंदीची मागणी करीत आहेत, ते चुकीचे आहे. सनातन संस्थेला आमचा पाठिंबा आहे. - श्री. विजय सुरेश पाठक, परशुराम प्रतिष्ठान

सनातनला संतांचे आशीर्वाद

सनातन संस्था हिंदूंच्या रक्षणासाठी
 उत्तम प्रकारे कार्य करत आहे !
मी सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांविषयी बोलत आहे. सनातन संस्था ही हिंदूंच्या रक्षणासाठी समाजात उत्तम पद्धतीने अध्यामप्रसाराचे कार्य करत आहे. सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांचा काडीमात्र अभ्यास न करता त्यांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करून संस्थेची अपकीर्ती केली जात आहे.- सद्गुरु खडेश्वर महाराज, दत्तवाडी, येवला, जिल्हा नाशिक.  
चांगले कार्य करणार्या संस्थांना वृत्तवाहिन्या झोडपून काढतात !
समाजात अध्यात्म आणि धर्म यांच्या प्रसाराचे चांगले कार्य करणार्या  संस्था आहेत. याविषयी प्रसिद्धीमाध्यमे चांगली वृत्ते प्रसारित करत नाहीत. याउलट त्या संस्थांना वृत्तवाहिन्या झोडपून काढतात. - सद्गुरु खडेश्वर महाराज, दत्तवाडी, येवला, जिल्हा नाशिक.


सनातनवरील बंदी आणि बंदीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी कारवाई न करणे

वर्ष २०१३ मध्ये मी केंद्रीय गृहमंत्री झालो. त्यानंतर माझ्याकडे सनातनवरील बंदीचा कोणताही प्रस्ताव आला नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी तो पाठवला, त्याविषयी त्यांनी गांभीर्याने पाठपुरावा करायला हवा होता. आम्ही काहीतरी कारवाई केली असती. ज्यांनी हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली, त्यांचे अज्ञान असावे. - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे


सनातन संस्था हिंदु धर्माचे काम करत असल्याने आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी ! - आनंद रजपूत, उत्सव समिती प्रमुख, शिवसेना, मिरज

    सनातन संस्था हिंदु धर्माचे काम करते. त्यामुळे ते जे काही करतील ते योग्यच असेल. सनातनवर आमचा पूर्णपणे विश्वाआस आहे. आतापर्यंत सनातनवर अनेक वेळा आरोप झाले, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आम्ही सनातन संस्थेच्या पूर्णपणे पाठीशी आहोत. येणार्या् काळात हिंदुद्वेष्ट्यांच्या दबावाला बळी पडून जर सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, तर मिरज शिवसेना वेळप्रसंगी सनातनच्या बाजूने रस्त्यावर उतरेल.    सनातनविरोधी माध्यमांनी रान उठवलेले असतांना सनातनचे धर्मजागृतीपर प्रदर्शन पाहून कार्याला साधूसंत आणि जिज्ञासू यांचा उदंड प्रतिसाद !

      


प्रदर्शन पहाण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी
म्हणजे सनातनला अकारण विरोध करणार्यांना चोख उत्तर
जुलै २०१५ पासून नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ अन् सात्त्विक वस्तू यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा प्रसार अधिक प्रमाणात करू शकलो नाही. त्याच कालावधीत श्री. समीर गायकवाड यांना अटक केल्यामुळे प्रसारमाध्यमांनी सनातनच्या विरोधात रान उठवले; मात्र सनातनच्या प्रदर्शनाला प्रतिसाद वाढत गेला. साधकांनादेवाचे कार्य देवच करतो, याची प्रचीती आली. जे साधूसंत, राजकीय व्यक्ती, जिज्ञासू आदी प्रदर्शन पाहून गेले, तेच सर्वजण बाहेर जाऊन प्रसार करत होते. प्रदर्शन पाहून झाल्यानंतर अनेकांनी अतिशय चांगले अभिप्राय दिले. हे अभिप्राय आणि साधूसंतांचे आशीर्वाद म्हणजे सनातनच्या धर्मकार्याला मिळालेली पोचपावतीच होय !

सनातनचे साधक राष्ट्र आणि धर्म कार्य इतक्या अल्प वयात करतात, हे कौतुकास्पद ! - ह.भ.प. मारुति कोकाटे


कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी सनातनच्या पाठीशी उभे रहावे ! - सौ. कमल माळी

    सनातन संस्था धर्मप्रसाराचे कार्य करत असल्याने कीर्तनकार-प्रवचनकार यांनी सनातनच्या पाठीशी उभे रहावे ! सनातनचे कार्य हे हिंदु धर्माचे कार्य असल्याने सर्व वारकरी, कीर्तनकार-प्रवचनकार यांनी या प्रसंगी सनातनच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहिले पाहिजे. सनातन संस्थेचे कार्य आम्ही जवळून पाहिले आहे.

प्रसारमाध्यमांनी न्यायालयाची भूमिका घेऊ नये ! - महंत मावजीनाथ महाराज, सिद्ध गरीबनाथ मठ, तुळजापूर.

   प्रसारमाध्यमे न्यायालयाच्या भूमिकेत जात आहेत. यामागे राजकीय षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसारमाध्यमे एका बाजूचे मत मांडत आहेत, तर दुसरी बाजू ऐकून घेण्यास तयार नाहीत. सनातन संस्था हिंदु धर्माचे कार्य करणारी संस्था आहे. असे करण्याचा संस्थेचा अजेंडा नाही. अनेक संस्थेत आणि राजकीय पक्षात गुन्हेगार लोक आहेत म्हणून त्यांच्यावर बंदी आणली का ? बंदी घातली, तर धर्माचे काम थांबेल असे होत नाही. सनातन संस्थेमुळे हिंदु धर्म काय आहे, हे लोकांना कळायला लागले आहे. आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी आहोत.

प्रसारमाध्यमांनी न्यायालयाची भूमिका घेऊ नये ! - महंत मावजीनाथ महाराज, सिद्ध गरीबनाथ मठ, तुळजापूर.

   प्रसारमाध्यमे न्यायालयाच्या भूमिकेत जात आहेत. यामागे राजकीय षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसारमाध्यमे एका बाजूचे मत मांडत आहेत, तर दुसरी बाजू ऐकून घेण्यास तयार नाहीत. सनातन संस्था हिंदु धर्माचे कार्य करणारी संस्था आहे. असे करण्याचा संस्थेचा अजेंडा नाही. अनेक संस्थेत आणि राजकीय पक्षात गुन्हेगार लोक आहेत म्हणून त्यांच्यावर बंदी आणली का ? बंदी घातली, तर धर्माचे काम थांबेल असे होत नाही. सनातन संस्थेमुळे हिंदु धर्म काय आहे, हे लोकांना कळायला लागले आहे. आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी आहोत.

सनातनच्या साधकाला खोट्या आरोपाखाली अटक केल्याविषयी सर्व हिंदूंनी रस्त्यावर उतरून विरोध करावा ! - पू. आचार्य आर्य जीतेंद्रजी महाराज, मध्यप्रदेश

    आम्ही गुरुदेवांशी (परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले) जोडले गेलेलो आहोत. सनातनच्या साधकाला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या विरोधात सर्व हिंदूंनी रस्त्यावर उतरून विरोध करायला हवा. आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीशी आहोत.

हिंदूंंनो, पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र जाणून घेऊन तशी कृती करा !

एस्.एस्.आर्.एफ्.चे श्री. शॉन क्लार्क यांनी केलेल्या श्राद्धामध्ये भोजन
वाढण्यापूर्वी काढलेल्या छायाचित्रात दिसणारे एक-दोन लिंगदेह (ऑर्ब्ज)
१. पितरांना नैवेद्य दाखवतांना काढलेल्या छायाचित्रात
वातावरणात अकस्मात् असंख्य लिंगदेह दिसू लागणे
    २३.९.२०१४ ला एस्.एस्.आर.एफ्. चे ऑस्ट्रेलिया येथील साधक श्री. शॉन क्लार्क यांनी त्यांच्या पितरांना गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी केला होता. श्री. शॉन यांनी केलेल्या या श्राद्धामध्ये भोजन वाढण्यापूर्वी काढलेल्या छायाचित्रात वातावरणात अत्यंत अल्प प्रमाणात, म्हणजे अगदी एक-दोन लिंगदेह (ऑर्ब्ज) दिसले; मात्र पितरांना नैवेद्य दाखवतांना काढलेल्या छायाचित्रात वातावरणात अकस्मात् अनेक लिंगदेह दिसू लागले. श्राद्धविधीत पितरांना नैवेद्य दाखवण्याचा विधी संपल्यावर वातावरणात लिंगदेह दिसले नाहीत.

कुठे पितरांना गती मिळावी, यासाठी श्राद्ध करण्यास सांगणारी उदात्त आणि आध्यात्मिक स्तरावरील हिंदु संस्कृती आणि कुठे पितरांना ओळखू येऊ नये, यासाठी भयानक वेशभूषा करण्यास सांगणारी मानसिक स्तरावरील पाश्‍चात्त्य संस्कृती !

पितर पृथ्वीवर आकृष्ट झाल्यानंतर स्वत:ला ओळखू
नये, यासाठी भयानक वेशभूषा धारण करणारे पाश्‍चात्त्य
    पितृपक्षामध्ये पितरांना आवाहन केले जाते. त्यांचे पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. या कालावधीमध्ये पितरांना भूतलावर येण्यासाठी योग्य अशी स्पंदने निर्माण झाल्यामुळे ते सहजच भूतलाकडे आकृष्ट होतात. आपल्या पितरांना गती मिळावी, यासाठी हिंदु धर्मातील आध्यात्मिक स्तरावर उदात्त विचार असतो. पाश्‍चात्त्य संस्कृतीमध्ये ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन हा सण साजरा करतात. त्यांचे असे मानणे आहे की, या कालावधीमध्ये पृथ्वी आणि भुव लोक यांतील अंतर न्यून होत असल्यामुळे पितर पृथ्वीवर आकृष्ट होतात. ते पृथ्वीवर आकृष्ट झाल्यानंतर त्यांनी आपल्याला ओळखू नये, यासाठी ते भयानक वेशभूषा धारण करून स्वतःला लपवतात. त्यांची वेशभूषा इतकी भयानक असते की पितरच काय; परंतु त्रासदायक शक्तीही त्यांच्याकडे सहज आकृष्ट होऊ शकतील.

अध्यात्मप्रसार करणारी सनातन संस्था !

पू. नंदकुमार जाधव
१. सनातन संस्थेचे संस्थापक
 परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
    आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २४ मार्च १९९९ या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली. त्यांनी शीघ्र ईश्वररप्राप्तीसाठी गुरुकृपायोग सांगितला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि प्रमुख साधनेसाठी संघटित आणि सक्रीय होत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिचय

१. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ
    'प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी वैद्यकीय शिक्षणानंतर १९७१ ते १९७८ या काळात ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेऊन संमोहन-उपचारपद्धतीवर संशोधन केले. १९७८ मध्ये त्यांनी मुंबई येथे संमोहन-उपचारतज्ञ म्हणून व्यवसाय चालू केला. १९८२ मध्ये त्यांनी 'भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था' स्थापली. १९६७ ते १९८२ अशी १५ वर्षे त्यांनी ५०० हून अधिक डॉक्टरांना संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांचे सिद्धान्त आणि प्रात्यक्षिके यांविषयी अमूल्य मार्गदर्शन केलेे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशी (२७.९.२०१५) दुपारी १२.०७ वाजता
समाप्ती - भाद्रपद पौर्णिमा/कृष्ण पक्ष प्रतिपदा (२८.९.२०१५) सकाळी ८.२१ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

पितृपक्षात नेहमीपेक्षा १ घंटा अधिक साधना करा !

साधकांना सूचना 
      सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत आहे. पितृपक्षात (२८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत) हा त्रास वाढत असल्याने या काळात नियमित साधनेबरोबरच १ घंटा अधिक साधना करावी. या कालावधीत नामजप, प्रार्थना आणि आध्यात्मिक उपाय यांचे प्रमाण वाढवावे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
अध्यात्मात धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा पठण ही साधना नसून ग्रंथांत सांगितलेले कृतीत आणणे, ही साधना आहे !
'काही शाळांत गीतेचा एखादा अध्याय पाठ करण्याच्या स्पर्धा असतात. गीतेसारखा ग्रंथ पदव्युत्तर शिक्षणातील पाठ्यपुस्तकाप्रमाणे आहे. गीता समजायला आयुष्यातील अनेक वर्षे साधना करावी लागते. असे असतांना मुलांसाठी अशी स्पर्धा ठेवण्यात काय अर्थ आहे ?, तसेच बरेच जण गुरुचरित्र, दासबोध इत्यादींचे व्यक्तीगत किंवा सामूहिक वाचन करतात.
येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, अध्यात्मात धार्मिक ग्रंथांचे केवळ वाचन किंवा पठण ही साधना नसून ग्रंथांत सांगितलेले कृतीत आणणे, ही साधना आहे. शिकवण कृतीत न आणल्याने बहुतेकांची साधनेत प्रगती होत नाही, उलट ते भ्रमात असतात की, आपली साधना चालू आहे.'  
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.९.२०१५)

संतांचे विश्‍लेषण करू नये

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज महाराज
                         संतांचा शोध घेऊन काही सापडत नाही; कारण तेथे केवळ शून्य असते.
भावार्थ : प्रकृतीतील गोष्टी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे शोध घेऊन सापडणे शक्य आहे; पण पुरुष, शिव किंवा ब्रह्मतत्त्व यांचा शोध घेता येत नाही; कारण ते पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. संत ब्रह्माशी एकरूप झालेले असल्याने त्यांचा शोध घेऊन काही सापडत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

विचारपूर्वक कृती करणे आवश्यक !
    कोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून 'ती खरोखरंच हितावह आहे का ?' याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

ध्येयनिष्ठ सनातन प्रभात !

     सनातनचा साधक समीर गायकवाड याला कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात संशयित म्हणून अटक झाली. त्याची चौकशी पूर्ण झाली नाही म्हणून सात दिवसांची पोलीस कोठडी तीन दिवसांनी वाढवली. या कालावधीत सनातनचे विरोधक आणि जवळपास सर्वच दूरचित्रवाहिन्यांनी कहर केला आणि सनातनवर बंदी घालण्याची एकमुखी मागणी लावून धरली. सनातन संस्थेसह सनातन प्रभात या दैनिकावरही बंदी घालण्याची मागणी पुढे आली. असे केल्याने विरोधक आणि प्रसिद्धीमाध्यमे यांचे अज्ञानच उघड झाले.  सनातन प्रभात किंवा अन्य कोणत्याही नियतकालिकावर बंदी घालतांना 'प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया' या संस्थेची भूमिका महत्त्वाची असते. दूरचित्रवाहिन्यांसमोर येऊन कलकलाट केला म्हणजे नियतकालिके बंद पडत नाहीत. सनातन प्रभातला घटनेने मतस्वातंत्र्य दिले आहे. त्याची पायमल्ली करण्याची मागणी म्हणजे घटनाद्रोह होय. त्यामुळे 'सनातन प्रभात' सारख्या देश आणि धर्म कार्याला वाहून घेतलेल्या दैनिकाविषयी बोलतांना आवश्यक तो सुसंस्कृतपणा दाखवणे महत्त्वाचे आहे. चर्चासत्रांमध्ये एकतर्फी चर्चा घडवून आणण्याचे आणि सनातनच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्याचे दूरचित्रवाहिन्यांचे धोरण लपू शकले नाही.

शरण तुला गणराया !

आज अनंतचतुर्दशी ! हिंदूंचा गणेशोत्सव समाप्त होईल. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणरायाचे घरात आगमन झाल्यापासून हिंदूंनी त्याची मनोभावे उपासना केली. हिंदु भाविकांना लागलेला त्याच्या भक्तीचा लळा त्यांचे त्याच्याबरोबरचे नाते अधिक दृढ करतो. गणराय माघारी जायला निघाले की हिंदु भाविक अस्वस्थ होतात, त्यामागचे कारण हेच असते. गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व आहे. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. तो देशाचा गुलामगिरीचा काळ होता. देशात हिंदु-मुसलमान दंगेधोपे वारंवार उद्भवत होते. लोकमान्य टिळकांना तेव्हा हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता भासली. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव उपयुक्त ठरेल, अशी त्यांची कल्पना होती. या उत्सवाच्या निमित्ताने हिंदू एकत्र येतील आणि त्यांचे भव्य संघटन होईल, असे त्यांना वाटले होते. दुर्दैवाने हिंदूंच्या संघटनाची प्रचीती आली नाही. आज तर या संघटनाच्या अभावामुळे हिंदू संकटात आहेत. 'हिंदूंच्या संघटनाचा अभाव', हे हिंदूंवरील संकटच आहे. ते दूर करण्यासाठी विघ्नहर्त्या गणेशाला शरण जाणे अपरिहार्य आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn