Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

डॉ. टी.बी. कुन्हा यांचा स्मृतीदिन

तिसर्‍या पर्वणीसह सिंहस्थपर्वातील राजयोगी (शाही) स्नानांची सांगता

  • शेवटच्या राजयोगी स्नानासाठी त्र्यंबकेश्‍वरमध्ये २० लाख भाविकांची विक्रमी गर्दी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून साधूंचे पारंपरिक पद्धतीने स्वागत
  • पोलीस आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक
पहाटेच्या वेळी पवित्र कुशावर्त कुंडात राजयोगी स्नान करतांना साधूसंत

राजयोगी स्नानासाठी कुशावर्त कुंडाकडे निघालेली मिरवणूक
   त्र्यंबकेश्‍वर, २५ सप्टेंबर (वार्ता.) - श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वरमधील पवित्र कुशावर्त तीर्थावर लाखो साधूंनी आज तिसरे राजयोगी (शाही) स्नान केले. या पर्वणीसह सिंहस्थपर्वातील सर्व राजयोगी स्नानांची सांगता झाली. या शेवटच्या राजयोगी स्नानाची पर्वणी साधण्यासाठी त्र्यंबकेश्‍वरमध्ये सुमारे २० लाख भाविकांनी विक्रमी गर्दी केली. या पर्वणी सोहळ्यात महाराष्ट्रातील भाविक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

(म्हणे) सनातनवर बंदी घालण्याची प्रक्रिया पुन्हा चालू करावी !

आम आदमी पक्षाचा सनातनद्वेष !
      पणजी (गोवा) - दैनिक सनातन प्रभातला देण्यात येणारी विज्ञापने त्वरित बंद करून दैनिक सनातन प्रभातवर बंदी घालावी. सनातन संस्थेच्या सर्व कारवायांवर करडी नजर ठेवावी. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने वर्ष २०११मध्ये सनातन संस्थेच्या विरोधात पाठवलेला अहवाल केंद्रीय गृह खात्याने परत मागवून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या माध्यमातून पुन्हा चौकशी करावी आणि सनातन संस्थेवर अवैध कारवाई प्रतिबंध कायद्याखाली (युएपीए) बंदी घालण्यासाठी नव्याने प्रस्ताव बनवावा, अशी मागणी गोव्यातील आम आदमी पक्षाने केली आहे. (असे करायला भारतात लोकशाही आहे कि मोगलाई ? कोणतेही कारण नसतांना अवैध कारवाई प्रतिबंध कायद्याखाली बंदी कशी घालता येईल ? भारतभरात सनातनवर एकतरी गुन्हा एकातरी पोलीस ठाण्यात नोंद आहे का ? उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीप्रमाणे मागणी करणार्‍या आपने पोलीस पकडतील म्हणून त्यांचे नेते कुठे फरारी झाले आहेत, ते शोधावेत. - संपादक) आम आदमी पक्षाचे गोवा निमंत्रक वाल्मीकि नायक यांनी २४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

असे झाले राजयोगी (शाही) स्नान !

   शाहीस्नानाचा पहिला मान मिळालेल्या शंभु पंचदशनाम जुना आखाड्याची मिरवणूक निघाली. महंत प्रेमगिरीजी महाराजांनी स्नान करून शाहीस्नान पर्वणीचा प्रारंभ केला. त्यानंतर पंचायती दशनाम आवाहन आखाडा, श्री पंच अग्नी आखाडा, तपोनिधी पंचायती निरंजनी आखाडा, तपोनिधी पंचायती आनंद आखाडा, पंचायती महानिर्वाणि आखाडा, पंचायती अटल आखाडा, पंचायती बडा उदासीन आखाडा, पंचायती नवा उदासीन आखाडा आणि पंचायती निर्मल आखाडा या आखाड्यांचे महंत व भाविकांनी शाहीस्नानाची पर्वणी साधली.
     आजच्या राजयोगी (शाही) स्नानास ब्राह्ममुहुर्तावर आरंभ झाला. पहाटे पावणेतीनच्या सुमारास साधूग्राम येथून आखाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी प्रशासनाने मध्यरात्रीच राजयोगी मार्ग स्वच्छ धुवून काढला. आजची शेवटची पर्वणी असल्याने सर्वांमध्येच विशेषत: त्र्यंबकेश्‍वरवासियांमध्ये त्याविषयी विशेष उत्सुकता होती. त्यामुळे या मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी साधूंसाठी भव्य रांगोळ्या काढल्या होत्या, तर अनेक ठिकाणी साधूंवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

विस्थापित मुसलमानांनी युरोपियन नागरिकांशी शारीरिक संबंध ठेवून अनेक मुलांना जन्म द्यावा ! - इमाम

     जेरुसलेम - युरोपियन देशांमध्ये लक्षावधीच्या संख्येने गेलेल्या विस्थापित मुसलमानांनी युरोपियन नागरिकांशी शारीरिक संबंध ठेवून मोठ्या प्रमाणात मुलांना जन्म द्यावा. अशाने त्यांचे देश आपल्या कह्यात घेऊन त्या युरोपियन नागरिकांना आपण पायाखाली चिरडून टाकू, असा सल्ला येथील प्रख्यात अल-अक्सा मशिदीचे इमाम शेख महंमद आयेद यांनी दिला आहे. 
     इमाम शेख महंमद आयेद पुढे म्हणाले, युरोपियन देशात सध्या मजूर-कामगारांची वानवा भासत आहे; म्हणूनच ते विस्थापितांना आश्रय देत आहेत. ही अल्लाने आपल्याला मोठी संधी दिली आहे. युरोपचे लोक इस्लामचा तिरस्कार करतात. जगातून मुसलमान नष्ट व्हावेत, असे त्यांना वाटते; मात्र एकदा मुसलमानांची संख्या वाढली की, आपण त्यांना धडा शिकवू. लोकसंख्या वाढवण्याची त्यांच्यात क्षमता नाही, ती मुसलमानांत आहे; म्हणून आपण त्यांच्याकडून अपत्ये जन्माला घालू. विस्थापित म्हणून नव्या देशात जाणे, हा जिहादचा एक भागच आहे, असे कुराणमध्ये सांगितले आहे.

बिहारमध्ये खुनाचा आरोप असलेल्या ४६ जणांना पक्षांकडून उमेदवारी

खुनाचा आरोप असणार्‍यांना उमेदवारी देणार्‍या पक्षांना सनातनवर बंदी घाला ही मागणी करण्याचा 
नैतिक अधिकार तरी आहे का ? गुन्हेगारी वृत्तीचे उमेदवार असणारे राजकीय पक्ष जनतेला 
कायद्याचे राज्य काय देणार ?
     पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने आता उमेदवारांची नावे घोषित करण्यास सर्वच पक्षांनी आरंभ केला आहे. प्रमुख पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची सूची घोषित केली असून बहुतांश उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड झाले आहे. त्यांतील ४६ जणांवर तर खुनाचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना निवडून देणारी लोकशाही काय कामाची ? या प्रश्‍नावर जोरदार चर्चा चालू आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर्च्या) अहवालानुसार गंभीर गुन्हे नोंद असणार्‍या १४१ आमदारांवर यंदाही सर्वच राजकीय पक्षांनी विश्‍वास दाखवला आहे. यांमधील ४६ आमदार असे आहेत की, ज्यांच्यावर खून आणि अपहरण असे गंभीर आरोप आहेत. त्यांपैकी काही जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे, तर काही जण जामीनावर मुक्त आहेत. 
      बिहारमध्ये गेल्या १० वर्षांत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या ५ सहस्र ३१४ उमेदवारांनी लोकसभा आणि २० जणांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली.

त्र्यंबकेश्‍वर येथील तिसर्‍या राजयोगी स्नानाचा छायाचित्रात्मक वृत्तांत !

नागा साधू आणि अन्य साधू
नागा साधूंच्या गळ्यातील रूद्राक्षमाळा (रूद्राक्ष माळण्यावरून साधनेतील अधिकार ठरतो असे सांगितले जाते

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून साधूंचे पारंपरिक पद्धतीने स्वागत

श्री महंत नरेंद्रगिरि महाराज यांचे औक्षण करतांना सनातनची साधिका
     २५ सप्टेंबरला शेवटच्या राजयोगी स्नानासाठी आलेले साधू, संत आणि महंत यांचे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. साधूंच्या स्वागतासाठी सबंध त्र्यंबकेश्‍वरमध्ये ठिकठिकाणी स्वागत फलक हाती धरण्यात आले होते. हे फलक साधूंचे लक्ष वेधून घेत होते. याशिवाय सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुशावर्त तीर्थ चौकात साधूंच्या आगमनाच्या वेळी शंखनाद करण्यात येत होता, तसेच विधिवत् औक्षण करण्यात येत होते.

हार्दिक पटेल यांच्या अपहरणाच्या दाव्याविषयी न्यायालय साशंक

धर्मावर चोहोबाजूने आघात होत असतांना आज हिंदूंचे संघटन आवश्यक आहे. अशा वेळी त्यांना 
आरक्षणाचे प्रलोभन देऊन त्यांच्यात फूट पाडणारे राष्ट्र आणि धर्म द्रोही नाही का ?
      कर्णावती (गुजरात) - पटेल जातीच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे हार्दिक पटेल यांनी केलेल्या अपहरणाच्या दाव्याविषयी गुजरात उच्च न्यायालयाने सांशकता व्यक्त केली आहे. न्यायालयाला गृहित धरू नका, अशा शब्दांत हार्दिक पटेल आणि त्यांच्या अधिवक्त्यांना न्यायालयाने फटकारले असून न्यायालयाचा अवमान केल्यावरून कारवाई करू, अशी चेतावणी दिली आहे. (आरक्षणाच्या सूत्रावरून आंदोलन पेटते ठेवण्यासाठीच हार्दिक पटेल शासनाने माझे अपहरण केले, असे सांगत स्टंटबाजी करत आहेत, असे जनतेला वाटल्यास नवल ते का ? अशा प्रसिद्धीलोलूप नेत्यांपासून लोकांनी सावध रहावे ! - संपादक)
     हार्दिक पटेल यांचे सहकारी दिनेश पटेल आणि केतन पटेल यांनी बी.एम्. मंगुकीया यांच्यावतीने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या अपहरणाच्या आरोपाविषयी सकृतदर्शनी न्यायालय समाधानी नसल्याचे या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एम्. आर्. शहा आणि के.जे. ठाकर यांच्या खंडपिठाने सांगितले. या प्रकरणाची सुनावणी २९ सप्टेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

अमेरिकेत मोदी यांची जागतिक आस्थापनांच्या प्रमुखांशी भेट

मोदी यांचे मेक इन इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल !
      न्यूयॉर्क - सुप्रसिद्ध फॉर्च्युन ५०० आस्थापनांपैकी ४७ आस्थापनांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि अध्यक्ष यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबर या दिवशी न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. हा कार्यक्रम फॉर्च्युन मासिकाने आयोजित केला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या सादरीकरणामुळे अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभावित झाले. मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडियाच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल; म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. 
      या बैठकीत गेल्या वर्षभरात शासनाने कोणकोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, याची माहिती मोदी यांनी दिली. या वेळी मोदी म्हणाले, आम्ही विविध प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सुटसुटीत केली आहे, तसेच शासनाकडून वेगाने आणि पारदर्शकपणे निर्णय घेतले जात आहेत. या कार्यक्रमाला पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नुयी, डाऊ केमिकल्सचे अध्यक्ष अँड्र्यू लिव्हेरिस, लॉकहिड मार्टिनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्लिन हेवसन्, फोर्डचे अध्यक्ष मार्क फिल्ड इत्यादींचा समावेश होता.

कैलास मानसरोवरातील पवित्र तीर्थ कुशावर्ताच्या तीर्थात विधिवत् अर्पण

कैलास मानसरोवरातील पवित्र तीर्थ त्र्यंबकेश्‍वर येथील तीर्थामध्ये अर्पण करतांना मुख्यमंत्री फडणवीस आणि बाजूला शिष्टमंडळ
त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) - चीनमधील कैलास मानसरोवरातून आणलेले पवित्र तीर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ सप्टेंबरला पर्वणीच्या निमित्ताने येथील कुशावर्ताच्या तीर्थात विधिवत् अपर्र्ण करण्यात आले. हा उपक्रम चीन आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे केला. याप्रसंगी चीनचे वाईस कॉन्सुलेट जनरल चॉन्ग ली आणि कुंभमंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील १२ जणांचे एक शिष्टमंडळ या सद्भावना उपक्रमांतर्गत मानसरोवर येथे गेले होते. या उपक्रमामुळे चीन आणि भारत या दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलतांना व्यक्त केला.

पाकिस्तान आणि आय.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवले

  • जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा धर्मांधांचा उन्माद
  • शत्रू राष्ट्र आणि आय.एस्.आय.एस्.चे झेंडे देशात फडकू देणारा जगातील एकमेव देश भारत !
  • असे अमेरिका किंवा युरोपमध्ये घडले असते, तर त्यांना तेथे देशद्रोही ठरवण्यात आले असते !
श्रीनगर (जम्मू काश्मीर) - येथील ईदगाह परिसरात बकरी ईदच्या नमाजानंतर पुन्हा एकदा धर्मांधांकडून पाकिस्तान आणि आय.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवण्यात आले, तसेच भारताच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. एवढेच नव्हे, तर नमाज पठणानंतर एकत्र आलेल्या धर्माधांच्या जमावाने पोलीस आणि सुरक्षा रक्षक यांच्यावरही दगडफेक केली. या हिंसक आदोलनात अनेक जण घायाळ झाले. या घटनेची शक्यता लक्षात घेऊन शासनाने यापूर्वीच फुटीरतावादी नेत्यांना स्थानबद्ध केले होते.

पुण्यातील मानाच्या पाचही गणेशोत्सव मंडळांचा श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा निर्णय

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अयोग्य निर्णय घेणारी गणेशोत्सव मंडळे !
    पुणे, २५ सप्टेंबर (वार्ता.) - अपुरा पाऊस आणि पाणीटंचाई यांची दखल घेत येथील पाचही मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. श्री कसबा गणपति, गुरुजी तालीम गणपती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पाठोपाठ अन्य तीन मंडळांनीही हा निर्णय घेतल्याचे २५ सप्टेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
    पुणे येथील महापौर दत्तात्रय धनकवडे आणि महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गणेशोत्सव मंडळांना गणेशमूर्तींचे हौदात विसर्जन करण्याचे आवाहन एका निवेदनाद्वारे केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून येथील पाचही गणेश मंडळांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. या आवाहनामध्ये म्हटले आहे की, पुणे शहरातून वहाणार्‍या मुळा-मुठा नदीचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी पुणे महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या हौदामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. (हौदात विसर्जन केल्यानंतर श्री गणेशमूर्ती पुन्हा कचर्‍याच्या गाडीतून खाणीमध्ये टाकल्या जातात आणि त्या मूर्तींचे विडंबन होते. यामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात, त्याविषयी आयुक्त काही उपाययोजना करणार का ? - संपादक)

सांगली येथे विसर्जनाच्या वेळी होणारी श्री गणेशमूर्तींची विटंबना शिवसैनिकांनी रोखली !

शिवसेनेचे आनंद रजपूत यांनी उघड केला महापालिकेच्या विसर्जन कुंडातील फोलपणा !
हिंदूंचे आराध्य दैवत असणार्‍या श्री गणेशाच्या मूर्तींची विटंबना करणार्‍यांवर शासनाने कारवाई करावी !
    मिरज, २५ सप्टेंबर (वार्ता.) - सांगली महापालिकेने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ब्राह्मणपुरीत काशीविश्‍वेश्‍वर देवालयाशेजारी विसर्जन कुंड ठेवले आहे. या कुंडात विसर्जन होणार्‍या श्रीगणेशमूर्ती महापालिका एकत्र करून परत नदीत विसर्जन करते. २३ सप्टेंबरला रात्री १२ वाजता महापालिकेचे कर्मचारी या कुंडातील श्रीगणेशमूर्ती काढण्यासाठी विसर्जन कुंडात उतरले होते. हे कर्मचारी कुंडातून मूर्ती बाहेर काढतांना अन्य मूर्तींवर पाय ठेवत होते. हा प्रकार शिवसेनेचे उत्सव समितीप्रमुख श्री. आनंद रजपूत यांनी पाहिला. त्यांनी तात्काळ प्रखर विरोध दर्शवून हा सर्व प्रकार थांबवला. श्री. रजपूत यांनी पोलिसांना बोलावून हा सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. नंतर पहाटे ४ वाजेपर्यंत सर्व मूर्ती योग्यप्रकारे काढून त्या विसर्जन होईपर्यंत ते थांबले होते. या वेळी श्री. गजानन मोरे यांसह अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना रोखणार्‍या शिवसेनेचे श्री. आनंद रजपूत, श्री. गजानन मोरे आणि अन्य शिवसैनिक यांचे अभिनंदन ! - संपादक)

व्यापम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या ४० ठिकाणी धाडी

केंद्रात आणि मध्यप्रदेशात भाजप सत्तेवर असल्याने त्याने या घोटाळ्याच्या 
मुळापर्यंत जाऊन सत्य समोर आणणे अपेक्षित आहे !
      नवी देहली - देशभरात गाजलेल्या मध्यप्रदेशमधील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापम) घोटाळा प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यांत ४० ठिकाणी धाडी घातल्या. या वेळी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार जगदीश सागर आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांचे विशेष अधिकारी धनराज यादव यांचे वास्तव्य असणार्‍या परिसराचीही शोध घेण्यात आला. 

हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ७१७ जण ठार, ८०० हून अधिक घायाळ

     मीना - मक्का शहराबाहेर असलेल्या मीना येथे हज यात्रेच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ४५३ मुसलमान मरण पावले असून सुमारे ७०० हून अधिक घायाळ झाले आहेत. २४ सप्टेंबर या दिवशी हज यात्रेचा शेवटचा दिवस होता. या दिवशी सैतानाला दगड मारतांना ही चेंगराचेंगरी झाली. काही दिवसांपूर्वीच मक्का येथील मशिदीमध्ये क्रेन कोसळून सुमारे १०९ जण ठार झाले होते, तर ४०० हून अधिक जण घायाळ झाले होते.

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे रामकुंड येथे स्नान

    नाशिक, २५ सप्टेंबर (वार्ता.) - गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आज सकाळी सव्वादहा वाजता येथील रामकुंड येथे स्नान केले. तसेच गंगा-गोदावरी मंदीरात पूजा करून दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या समवेत गुजरातच्या उच्च शिक्षण राज्यमंत्री श्रीमती वसु त्रिवेदी आणि नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे होत्या.
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे रामकुंड येथे स्नान
    नाशिक, २५ सप्टेंबर (वार्ता.) - केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री हंसराज गंगाराम अहीर यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सकाळी नऊ वाजता रामकुंड येथे स्नान केले. तसेच गंगा-गोदावरी मंदिरात पूजा करून दर्शन घेतले.

जातीय तेढ निर्माण करणारा जाहीर प्रतिरोध परिषदेचा कार्यक्रम पोलीस प्रशासनाने रहित करावा !

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार बोडसे यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
    कोल्हापूर, २५ सप्टेंबर (वार्ता.) - २६ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे दहशतवादी कारवाया...डोकी सनातनी...पोर-पोरी बहुजनाची...आम्ही आता हे चालू देणार नाही, असे घोषवाक्य असणारी जाहीर प्रतिरोध परिषद आयोजित करण्यात आली आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण पोलीस यंत्रणा करत आहे. संशयित म्हणून सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड यांचे अन्वेषण चालू आहे. त्याचे भांडवल करून तथाकथित पुरोगामी संघटना समाजात तेढ पसरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने हा विद्वेष पसरवणारा कार्यक्रम त्वरित रहित करावा,
अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली.

नशिराबाद (जिल्हा जळगाव) येथे बकरी ईदनिमित्त धर्मांधांकडून दंगल !

  • पोलीस उपनिरीक्षकांचे तडकाफडकी निलंबन
  • दंगल घडवून सर्वत्र दहशत माजवणार्‍या धर्मांधांवर भाजप शासनाने कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
जळगाव - नशिराबाद येथे बकरी ईदनिमित्त आयोजित नमाजपठणाच्या वेळी एका हिंदु पोलिसाच्या सूचनेचा राग मनात धरून धर्मांधांनी दंगल घडवली. या वेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड करून ३० मिनिटे रस्ता बंद आंदोलनही केले. ( धर्मांधांचा हा उद्दामपणा थांबवण्यासाठी पोलीस कोणती उपाययोजना करणार आहेत ? - संपादक)
१. नशिराबाद येथील पोलीस ठाण्याच्या शेजारीच एक मशीद आहे. या मशिदीत २५ सप्टेंबरला धर्मांधांनी नमाजपठण आयोजित केले होते.
२. या वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. नगराळे यांना आमंत्रित केले होते.
३. श्री. नगराळे बोलत असतांना त्यांच्या भाषणावर काही धर्मांधांनी आक्षेप घेतला.
४. संतप्त धर्मांधांनी त्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत काही धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. (ही आहे धर्मांधांच्या निषेधाची पद्धत ! - संपादक)

(म्हणे) प्रदूषणाचे नियम डावलणार्‍या सनातनवर कारवाई करा ! - पुरोगामी संघटनांचे निवेदन

तासगाव (जिल्हा सांगली), २५ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेकडून उच्च न्यायालयाकडून दिलेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या निर्देशांच्या विरोधात प्रचार चालू आहे. त्यांच्याकडून उच्च न्यायालयाचा अवमान चालू आहे. त्यांच्याकडून प्रदुषणाचे कायदे न पाळण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पुरोगामी संघटनांच्या वतीने तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली. (सनातन संस्थेने श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या विषयी काढलेले प्रसिद्धीपत्रक हे न्यायालयाचे नियम पाळून, तसेच धर्मशास्त्राचा आधार घेऊनच काढण्यात आलेले आहे ! याउलट प्रशासनाची दिशाभूल करणार्‍या पुरोगामी संघटनांवरच प्रशासनाने कारवाई करायला हवी ! - संपादक) असे वृत्त दैनिक सकाळच्या २३ सप्टेंबरच्या सांगली आवृत्तीत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

एका शहरातील साधकाची गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी

तीच तीच माहिती घेण्यासाठी साधकांची वारंवार चौकशी करून त्यांना नाहक त्रास देणारे पोलीस !
      नुकतीच एका शहरातील गुप्तचर यंत्रणेच्या एका पोलीस अधिकार्‍याने एका साधकाला दूरभाषवर संपर्क करून सनातनच्या कार्याविषयी, तसेच साधकांविषयी चौकशी केली. त्यानंतर पुन्हा दुसर्‍या दिवशीही दूरभाष करून दैनिक सनातन प्रभातविषयी विचारणा केली. या वेळी साधक आणि पोलीस यांच्यामध्ये पुढीलप्रमाणे संभाषण झाले.
पोलीस : मला दैनिक सनातन प्रभातविषयी थोडी माहिती हवी आहे. तुमचे सध्याचे वितरण किती आहे हे तुम्ही मला सांगू शकता का ? 
साधक : माझ्याकडे याविषयी काही माहिती नाही. माहिती काढून सांगू शकतो.
पोलीस : ठीक आहे. नंतर संपर्क करून मला माहिती सांगा. एक साधक आता तुमच्या कार्यामध्ये नसतात का ?
साधक : नसतात.
पोलीस : तुम्हाला पुन्हा दूरभाष केल्याविषयी क्षमा करा. मला केवळ आधीची माहिती अद्ययावत करायची होती.

मुंबई महापालिकेच्या शाळेत लैंगिक शिक्षणास प्रारंभ होणार !

   मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. तूर्तास नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्यात येणार आहे. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिक्षण समितीत या संदर्भात ठरावाची सूचना मांडली होती. त्या सूचनेला प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
सुरुवातीला नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण दिले जाणार असून त्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. किशोरवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण कसे होऊ शकते आणि ते कशाप्रकारे टाळता येईल, याचे धडेही दिले जातील. जर असा प्रकार घडलाच, तर साहाय्यासाठी कुठे संपर्क करायचा, हेही सांगितले जाईल.

४ आठवड्यांच्या आत सर्व विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे अल्प करा !

महाराष्ट्र शासनाला न्यायालयाचे आदेश
      मुंबई - ४ आठवड्यांच्या आत राज्यातील सर्व शाळांमध्ये दप्तरांचे ओझे अल्प करण्याचे स्पष्ट निर्देश शाळांना पत्रकाद्वारे कळवा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन किमान अर्ध्याने अल्प करण्याची आवश्यकता आहे, असेे मतही न्यायालयाने व्यक्त केले. 
      चेंबूर येथील पालक स्वाती पाटील यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी विद्यार्थ्यांचे ओझे अल्प करण्यासाठी शाळा कोणत्या उपाययोजना करत आहेत, याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक शाळेत एका अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला. सद्यस्थितीत शाळेतील विद्यार्थी त्याच्या वयापेक्षा तब्बल २० ते ३० टक्के अधिक वजनदार दप्तर पाठीवर घेत असतात. त्यामुळे ६० टक्क्यांहून अधिक मुलांना पाठीचे आजार होत आहेत, असे याचिकाकर्त्या पाटील यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वाढलेले वजन अल्प करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता; परंतु या निर्णयाची कार्यवाही कधीपासून करणार, याविषयी शासन न्यायालयात निश्‍चितपणे सांगू शकले नाही. शासनाच्या वतीने शासकीय अधिवक्ता अंजली हेर्लेकर यांनी, तर याचिकाकर्त्यांकडून अधिवक्ता दत्ता माने यांनी बाजू मांडली.

संजय दत्तची शिक्षेतून सुटका नाहीच राज्यपालांनी दया याचिका फेटाळली

      मुंबई - मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्यामुळे कारागृहात असलेला अभिनेता संजय दत्त याने उर्वरित शिक्षेतून सुटका मिळावी, यासाठी दाखल केलेली दया याचिका महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी २४ सप्टेंबर या दिवशी फेटाळली. ही याचिका मार्कंडेय काटजू यांनी दाखल केली होती.
      संजय दत्त याला अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा झाली असून गेल्या अडीच वर्षांपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. सध्या तो एक मासाच्या संचित रजेवर (पॅरोल) असून त्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे.

श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करणे योग्य - नायब तहसीलदार प्रकाश कांबळे

   फलटण (जिल्हा सातारा), २५ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी, फलटण (प्रांत) श्री. विजय देशमुख यांना श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यात करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन श्री. विजय देशमुख यांच्या ऐवजी नायब तहसिलदार श्री. प्रकाश कांबळे यांनी स्वीकारले. या वेळी श्रीगणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे आध्यात्मिक महत्त्व हिंदु जनजागृती समितीचे श्री. आशिष कापसे यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनीही श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करणे योग्य असल्याचे मान्य केले. नीरा उजवा कालव्यामध्ये पाणी सोडण्याबाबत कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांना पत्राने तातडीने कळवितो, असे आश्‍वासन त्यांनी दिले. लगेचच त्यांनी लिपीकास बोलावून, तसे पत्र लिहण्यास सांगितले.

संस्कार प्रतिष्ठान आणि टाटा मोटर्स यांच्याकडून धर्मद्रोही श्री गणेशमूर्तीदान आणि निर्माल्य दान उपक्रम !

श्री गणेशमूर्तीवरील निर्माल्य काढून घेण्याचा
धर्मद्रोही उपक्रम राबवतांना कार्यकर्ते
     संस्कार प्रतिष्ठान आणि टाटा मोटर्सच्या टाटा व्हॉलेंटिअरिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशमूर्तीदान आणि निर्माल्य गोळा करण्याचा धर्मद्रोही उपक्रम गेल्या आठवडाभरापासून पिंपरी-चिंचवडमध्ये राबवला जात आहे. यामध्ये पाचव्या विसर्जनादिवशी सुमारे ४ सहस्र २७० मूर्ती आणि ६ टन एवढे निर्माल्य गोळा करण्यात आले.

नांदेड येथे १ सहस्र ३२० क्विंटल गोमांस शासनाधीन

     नांदेड, २५ सप्टेंबर - नांदेड शहर आणि जिल्ह्यात बकरी ईदच्या निमित्ताने गोवंशाची हत्या होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन काळजी घेत असले, तरीही गोवंशाच्या हत्या चालू आहेत. २२ सप्टेंबर या दिवशी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देगलूर नाका परिसरातील इक्बालनगर भागात पाण्याच्या टाकीजवळ बोलेरो मालवाहू जीप वाहनातून गोवंशाचे मांस नेण्यात येणार असल्याची वार्ता मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका बोलेरो मालवाहू जीपमधून नेण्यात येणारे १ सहस्र ३२० क्विंटल गोवंशाचे मांस शासनाधीन (जप्त) केले. या वेळी ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्या गोमांसाची किंमत १ लक्ष ९८ सहस्र रुपये आहे. (आणखी किती घटना उघडकीस आल्यावर शासन गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करणार ? - संपादक)
     या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सदानंद वाघमारे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

शीव (मुंबई) येथे गणेशोत्सवाच्या मंडपात जुगार खेळणार्‍यांना अटक !

धार्मिक उत्सवात जुगारांसारखे गैरप्रकार करणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी !
     मुंबई - शीव येथील एका गणेशोत्सव मंडपाच्या आवारात जुगार खेळणार्‍यांवर छापा टाकून पोलिसांनी २० जुगार्‍यांना अटक केली. त्यांच्याकडून ४३ सहस्र रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
     शीवच्या प्रतीक्षानगर येथील विश्‍वनाथ मित्रमंडळाच्या गणेशोत्सव मंडपात जुगार चालू असल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना मिळाली होती. त्यांनी त्यांच्या पथकाला पाठवून जुगार खेळणार्‍या २० जणांना अटक केली. त्यांच्यावर कलम ४(अ) आणि ५ अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारी ४३ सहस्र रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील हा उन्माद शासन थांबवणार का ?

फलक प्रसिद्धीकरता
     जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथे बकरी ईदच्या नमाज पठणानंतर पुन्हा एकदा धर्मांधांकडून पाकिस्तान आणि आय.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवण्यात आले, तसेच भारताच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच पोलीस आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
 Jammu-Kashmirme fir faharaye gaye Pak aur ISISke zande 
kya es deshme pak ke zande faharana rashtradroha nahi ? 
जागो ! :
 जम्मू-कश्मीर में फिर फहराये गये पाक और आय.एस्.आय.एस्. के झेंडे. 
क्या इस देश में पाक के झेंडे फहराना राष्ट्रद्रोह नही ?

नेपाळ : व्याख्येने सेक्युलर आणि व्यवहाराने हिंदु राष्ट्र !

भाऊ तोरसेकर
       शहाण्या वा बुद्धीजिवी लोकांची एक मोठी समस्या अशी असते की, त्यांना प्रत्येक गोष्टीची व्याख्या आवश्यक असते. जी बाब कानाने ऐकता येते, नाकाला येणार्‍या वासाने ओळखता येते किंवा डोळ्यांनीही बघता येते, तिची ओळख व्याख्येत नसली की मग विचारवंतांचे हाल चालू होतात. त्यांना प्रत्येक बाबतीत डॉक्युमेन्ट (पुरावे) हवे असते. ज्याचे डॉक्युमेन्ट वा शब्दांत केलेले वर्णन वा व्याख्या नाही, ती अस्तित्वातच नाही; अशी ज्यांची ठाम समजूत असते, त्यांना बुद्धीमान म्हणून ओळखले जात असावे. मग अशा शहाण्यांना कोणीही अडाणी कागद आणि शब्दांतली व्याख्या दाखवून हत्तीला मुंगीही ठरवू शकत असतो. नेपाळमध्ये काहीसे तसेच झाले आहे. तिथे माओवाद्यांनी उच्छाद मांडला होता, त्यातून क्रांती झाली आणि राजेशाही व्यवस्था संपुष्टात आली.

भयावह नशेच्या विळख्यात गोवा राज्य !

     १९८० च्या दशकात आलेला, गोव्याचा विख्यात पॉप गायक-संगीतकार रेमो फर्नांडिसचा राष्ट्रीय स्तरावर पहिला अल्बम प्रसिद्ध झाला. त्यातील डाऊन विथ ब्राऊन, जस्ट अ हिप्पी या गाण्यांचा रोख होता तो सिगरेटच्या धुराकडे नव्हे, तर मानवी शरिराला झपाट्याने लाचार बनवून पोखरण्याची ताकद बाळगून असलेल्या अमली पदार्थाकडे, त्या कालावधीत प्रस्थ वाढण्यास प्रारंभ झालेल्या हेरॉईनकडे ! या अमली पदार्थांच्या विळख्यात गोवा राज्य आणि तेथील युवक कसा सापडला आहे, याविषयीचे हे भयावह वास्तव !

सामाजिकतेच्या आड लपलेला हिंदुविरोधी चेहरा !

     प्रा. एच्.एम्. देसरडा नामक कथित पर्यावरणवाद्यांनी सिंहस्थपर्वासाठी गंगापूर धरणातील पाणी सोडण्याच्या संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने तिसर्‍या राजयोगी (शाही) स्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी न सोडण्याचा आदेश दिला. पाणी धोरण आणि वेगवेगळ्या कायद्यांनुसार सर्वाधिक प्राधान्य पिण्याच्या पाण्याला आहे. 

राजस्थान राज्याचा हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसार कायार्र्चा ऑगस्ट २०१५ मधील आढावा

१. बैठकांचे आयोजन
अ. हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जोधपूर येथील वाचकांची बैठक घेण्यात आली. त्या वेळी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येक १५ दिवसांनी अशी बैठक घेण्याचे या बैठकीत निश्‍चित करण्यात आले.
आ. बिकानेर येथे झालेल्या एका बैठकीत काही धर्माभिमान्यांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार १५ ऑगस्ट या दिवशी त्यांची एक बैठक घेण्यात आली. 
२. प्रदर्शन
     जोधपूर येथील श्री. विवेक मित्तल यांनी १५ ऑगस्टच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी क्रांतीकारकांची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले.

राजस्थान राज्याचा सनातन संस्थेच्या धर्मप्रसार कायार्र्चा ऑगस्ट २०१५ मधील आढावा

१. सत्संगाला आरंभ : जोधपूर येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी काही धर्माभिमान्यांनी सत्संग चालू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार १७ ऑगस्टला सत्संग चालू करण्यात आला. 
२. श्रावणी सोमवारचे औचित्य साधून केलेला प्रसार : जोधपूर येथे रातानाडा गणेश मंदिर, श्रावणी सोमवारच्या निमित्ताने श्री अचलनाथ मंदिर आणि पब्लिक पार्क येथील शिवमंदिर, तसेच बिकानेर येथील श्री लालेश्‍वर महादेव मंदिर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या वेळी धर्माचरणाचे महत्त्व सांगणारे फ्लेक्स आणि शिवाची अध्यात्मशास्त्रीय माहिती देणारे पत्रक यांद्वारे जागृती करण्यात आली.
- श्री. गजानन केसकर आणि श्री. आनंद जाखोटिया, राजस्थान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खरा धोका श्याम मानव यांच्यासारख्या संधीसाधूंकडून ?

सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍या दिव्य मराठीला पाठवलेला प्रतिवाद !
श्री. अभय वर्तक
प्रती, 
     मा. संपादक 
     दिव्य मराठी वृत्तपत्र समूह.
मा. महोदय,
      आपल्या लोकप्रिय आणि नव्या धाटणीच्या वर्तमानपत्राशी सनातन संस्थेची जवळीक आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बातम्यांत सनातन संस्थेच्या उपक्रमांच्या बातम्या अनेकदा प्रसिद्ध झाल्या आहेत. आज आपल्या वर्तमानपत्रात सनातन संस्थेला लक्ष्य करून खोटे आरोप करणारा श्री. श्याम मानव यांचा बदनामीकारक लेख प्रसिद्ध झाला आहे. आमच्या अनेक साधकांना सदर एकांगी लेख वाचून धक्का बसला. श्री. श्याम मानव हे ना अधिकृत संमोहनतज्ञ आहेत, ना अभ्यासक ! त्यांच्या अर्धवट माहितीतून दिलेल्या या लेखामुळे संमोहनक्षेत्राचीही अपकीर्ती होऊन समाजात आणि वैद्यकीय क्षेत्राविषयी अपप्रचार पसरू शकतात. तसेच अशा लेखांमुळे सामाजिक संघटनांना मोठी हानी पोहोचते. तरी या दृष्टीने आम्ही सदर लेखाचा प्रतिवाद करणारा लेख पाठवत आहोत. कृपया त्याला प्रसिद्धी देऊन सदर अपप्रचार रोखण्यास साहाय्य करावे, ही विनंती.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

शक्तीपेक्षाही स्वाभिमान महत्त्वाचा ! - लोकमान्य टिळक

      १९०८ मध्ये लो. टिळक नाशिक येथे गेले होते. तेव्हा तेथे राममूर्ती सर्कस खेळ करीत होती. एका खेळाला लो. टिळक निमंत्रणावरून गेले. प्रा. राममूर्तींनी लोकमान्यांचा सत्कार केला. आभार मानतांना टिळक म्हणाले, आताच प्रा. राममूर्तींचा उल्लेख इंडियन सँडो असा केलेला तुम्ही ऐकलात. (सँडो नावाचा युरोपातील एक मल्ल त्या काळी प्रसिद्ध होता. - संकलक) हिंदभूमीत भीम, भीष्म आदी शक्तीपुरुष बरेच झाले असूनही आपल्या आजच्या शक्तीसंपन्न पुरुषाला शक्तीदर्शक परकीय नाव आम्ही उगीच का द्यावं ? आपण राममूर्तींना आधुनिक भीम असे म्हणूया. पाहिजे तर सँडोला युरोपीय भीम म्हणा; पण राममूर्तींना इंडियन सँडो म्हणू नका. शक्तीपेक्षाही स्वाभिमान महत्त्वाचा आहे ! - ह.त्र्यं. देसाई (गुणसागर टिळक) 
       स्वाभिमान वाढवण्यासाठी स्वभाषाभिमान आणि स्वदेशी वस्तूंचा अभिमान वाढवा !
      द्वेष पसरवणारी भाषा बोलतात; म्हणून जर सनातनवर बंदी घालायची असेल, तर सगळ्यात आधी जितेंद्र आव्हाड यांच्यावरच बंदी घालायला हवी ! - श्री. अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी तथा राजकीय-सामाजिक विश्‍लेषक
      भारताच्या घटनेमध्ये पक्ष आणि लोकांच्या समुहाने निवडणूक लढवावी, असे कुठेही म्हटलेले नाही. वर्ष १९४७ मध्ये इंग्रज गेले; मात्र लोकशाही आली नाही, कारण पक्षशाही आणि पार्टीशाही यांनी लोकशाहीला या देशात येऊच दिले नाही. - श्री. अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

अशा विचारसरणीचे पोलीस अधिकारी त्यांच्या कार्यकाळात कसे वागत असतील ? हे शासनाला कळले कसे नाही ?

     दी वीकमध्ये आलेल्या एका लेखावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या कटाचे मुख्य सूत्रधार आहेत, हे स्पष्ट होते, असा आरोप हू कील्ड करकरे या पुस्तकाचे लेखक, माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी २१ सप्टेंबर २०१५ या दिवशी एका पत्रकार परिषदेत केला. 
      भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल ! 
- श्री. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तवाहिन्यांची माहिती कळवा !

   कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून सनातन संस्थेविषयी मानहानीकारक वृत्ते वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होत असल्यास त्याविषयी त्वरित दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात (०८३२) २३१२६६४ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे. ज्यांच्याकडे वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून ते vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावे आणि त्याविषयी अधिवक्ते नागेश ताकभाते (दू.क्र. ८४५१००६०५८) यांना कळवावे.

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तपत्रांची माहिती कळवा !

    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत.

ज्ञानगंगा

श्री. राम होनप
ज्ञानाला गंगेची उपमा दिली जाते. गंगेचे पाणी प्रवाही असते. प्रवाहाचे कार्य वाहून नेणे असते. त्यामुळे नदीतील पाणी शुद्ध रहाते. ज्ञानात चैतन्याचा प्रवाह आहे. ज्ञानामुळे मनुष्यातील अंतर्घाणीचा नाश होतो आणि चित्त गंगेप्रमाणे शुद्ध अन् पवित्र बनते. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०१५)

टप्प्याटप्प्याने दिशा मिळाल्यामुळे पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्धाराप्रत जाणारे एक प्रखर हिंदु धर्माभिमानी

श्री. अमित जोशी
     प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे मी २०१३ च्या रामनवमीला हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आलो. नंतर दैनिक सनातन प्रभात वृत्तपत्र चालू केले. त्यानंतर कार्य करण्यास आरंभ झाला. तसे घर आधीच सोडलेले होते. आता मनापासून सुटू लागले. नंतर धर्मशिक्षण वर्गात गेल्यानंतर धर्मावरील सर्व आघांतासाठी कोणते कार्य करावे, हे कळले. कृती करण्याची इच्छा होती; पण योग्य संघटना सापडत नव्हती. आता संघटना मिळाली आणि कार्याला आरंभ केला. राष्ट्रीय आंदोलने, शिबीर, धर्मशिक्षण वर्ग, तसेच अधिवेशन असे करत पुष्कळ मोठ्या प्रमाणात स्वतःमध्ये पालट घडला. 
      हिंदु राष्ट्रासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत ? हिंदु राष्ट्राची परिभाषा काय आहे ? आणि त्यासाठी किती अवधी शेष आहे ? हे सर्व समजून घेतले. नंतर ते इतरांनाही समजावण्यास चालू केले. ईश्‍वराच्या कृपेने मला पुष्कळ चांगल्या व्यक्तींची साथ मिळाली. अगोदरपासून राष्ट्राभिमान, देशाभिमान आणि धर्माभिमान होता; पण तो व्यक्त करण्यासाठी युवक अन् धर्माभिमानी यांचा जमाव मिळत नव्हता. तो मिळाला आणि मी स्वतःमध्ये पालट घडवला.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवून आनंद अनुभवणारे श्री. अशोक रेणके !

   वर्षानुवर्षे स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी स्वयंसूचना देऊनही स्वतःत विशेष पालट न घडवणार्‍या साधकांसमोर श्री. अशोक रेणके यांनी केवळ २ महिन्यांत स्वभावदोष आणि अहं यांत बराच पालट घडवून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.  - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. डॉक्टर,
श्री. अशोक रेणके

कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार 
     प.पू. डॉक्टर, आपल्या चरणी कृतज्ञता कशी व्यक्त करावी, हे मला समजत नाही. मी काहीच प्रयत्न करत नाही. तुमच्या कृपेनेच सर्व चालू आहे. रामनाथी आश्रमात येण्याची माझी पात्रताही नव्हती. माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित असे काहीच होत नाही. मी केवळ कार्य करत होतो. माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी काहीच प्रयत्न होत नव्हते, तरी आपणच मला आश्रमात येण्याची संधी दिलीत. येथे आल्यानंतर मला ताण येत होता. आपल्याला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया का जमत नाही ? त्यासाठी प्रयत्न कसे करायचे ?, असे मला वाटत होते.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सेवेसाठी रामनाथी आश्रमात आल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सौ. रोहिणी कोरगांवकर
१. रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी आलेल्या अनुभूती
१ अ. रामनाथी आश्रमात सेवेला जाण्याची ओढ लागल्यावर प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ आत्मनिवेदन करणे आणि हिंदू अधिवेशनाच्या सेवेनिमित्त रामनाथी आश्रमात जायची संधी मिळणे : दोन ते तीन मासांपासून मला रामनाथी आश्रमात सेवेला येण्याची ओढ लागली होती; परंतु माझ्याकडे काहीच कौशल्य नसल्यामुळे नेमके कुठल्या सेवेला जायचे, हे मला कळत नव्हते. तेव्हा मी श्रीकृष्णाच्या चित्राजवळ बसून त्याला सांगत असे, मला रामनाथी आश्रमात यायचे आहे आणि मला जायची संधी मिळणार, असे आतून वाटायचे.
     जून २०१५ मध्ये पू. (सौ.) बिंदाताईंची चतुर्थ हिंदू अधिवेशनाच्या सेवेसाठी धान्य विभागात आणि स्वयंपाकघरात साधक हवे, अशी चौकट आली. ती वाचून माझ्यासाठीच ही चौकट दिली आहे, असे वाटले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.

विदेशातील साधकांकडून श्री. अशोक रेणके यांना शिकायला मिळालेली सूत्रे

. तत्त्वनिष्ठता आणि वक्तशीरपणा : विदेश विभागातील सर्व साधक तत्त्वनिष्ठ असून त्यांची प.पू. गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा आहे. ते सर्वजण आश्रमातील सूचनांचे काटेकोर पालन करतात. भोजन आणि न्याहरी यांच्या वेळा काटेकोरपणे पाळतात.
. धर्मशास्त्र समजून घेऊन ते कृतीत आणणे : सर्व साधक नियमितपणे भारतीय आहार घेतात आणि भारतीय पोषाख परिधान करतात. विशेष कार्यक्रमाच्या वेळी सात्त्विक पोषाख परिधान करतात. स्त्री-साधिका सर्व अलंकार, कुंकू आणि बांगड्या घालतात. पुरुषही तिलक लावतात.

जन्मतःच क्षात्रवृत्ती आणि सात्त्विकतेची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील चि. कृष्ण तांबट (वय ४ वर्षे) !

चि. कृष्ण तांबट
१. जन्मापूर्वी
१ अ. प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ऐकत असतांना बाळाने हालचाल करून प्रतिसाद देणे
बाळ पोटात असतांना पुष्कळ हालचाल करत असे. ते पुष्कळ जोरात लाथ मारायचे; पण सकाळी आरतीच्या वेळी मात्र एकदम शांत रहात असे. मी प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ऐकत असतांना ते आतून पुष्कळ प्रतिसाद द्यायचे.
१ आ. विविध आध्यात्मिक उपाय केल्यामुळे नैसर्गिक प्रसूती होणे
माझ्या मोठ्या मुलाच्या जन्माच्या वेळी काही शारीरिक अडचणींमुळे मला दुर्बिणीने शस्त्रकर्म करून बाळ झाले. (सिझरपेक्षा मोठी शस्त्रक्रीया) त्यामुळे मला ५० टाके पडले होते. त्या वेळी आम्ही साधनेत नव्हतो. दुसर्‍या बाळाच्या जन्माच्या वेळी मी पोटावर भगवद्गीता आणि दैनिक सनातन प्रभात ठेवणे, भजने ऐकणे, उदबत्तीचे उपाय करणे इत्यादी आध्यात्मिक उपाय करत असे. त्यामुळे पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी
परिस्थिती गंभीर असतांना आणि दुसर्‍यांदा शस्त्रकर्म करायचे निश्‍चित असतांनाही केवळ देवाच्या कृपेने माझी प्रसूती नैसर्गिक (नॉर्मल) झाली.
- सौ. स्वाती तांबट (चि. कृष्णची आई), जळगाव

रामनाथी आश्रमातील साधक श्री. अशोक रेणके यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

. कु. सुप्रिया जठार
१ अ. नम्रता : काकांमध्ये पुष्कळ नम्रता आहे. त्यांच्यातील नम्रता केवळ वयाने मोठ्या असणार्‍यांप्रती नाही, तर लहान-मोठ्या अशा सर्वांप्रतीच आहे.
१ आ. सातत्य आणि चिकाटी : आश्रमात आल्यापासून व्यष्टी लिखाण करणे, सूचना सत्र करणे यांमध्ये कधीच खंड पडला नाही.

प.पू. पांडे महाराजांनी सांगितलेला हरवलेली वस्तू मिळण्याचा जप कोणाला विचारायचा ? या विचारांत असतांना केवळ १० मिनिटे प.पू. पांडे महाराज असे सतत म्हटल्यामुळे गाडीचे महत्त्वाचे मूळ कागद पत्र सापडणे

  २१..२०१५ या दिवशी घराच्या मांडणीत ठेवलेले गाडीचे महत्त्वाचे मूळ कागदपत्र त्याच मांडणीत ४ - ५ वेळा शोधूनही सापडत नव्हते. .पू. पांडे महाराजांनी सांगितलेल्या एका मंत्राने हरवलेली वस्तू सापडते, हे मला ज्ञात होते; परंतु तो मंत्रजप कोणाला विचारायचा ? या विचारात असतांनाच माझ्याकडून अंदाजे १० मिनिटे प.पू. पांडे महाराज, .पू. पांडे महाराज, असे सतत म्हटले गेले.

पू. (कु.) स्वाती खाडये यांना सद्गुरुपद मिळण्याच्या संदर्भात साधिकेला मिळालेली पूर्वसूचना

१. स्वप्नात पूर आलेल्या नदीच्या दुसर्‍या काठावर जाण्यासाठी पोहत असल्याचे दिसणे : १२.९.२०१५ या दिवशी पहाटे मला पुढील स्वप्न पडले, मी एका मोठे पात्र असलेल्या नदीच्या काठावर उभी होते. नदीचे पाणी दुथडी भरून वहात होते. मला पलीकडचा काठही दिसत नव्हता. मला त्या काठावर जायचेच होते; म्हणून मी नदीत पोहत जाऊ लागले. नदीत अनेक माणसे पोहत पलीकडच्या काठावर जाण्यासाठी धडपडत होती. त्यांपैकी काही जण पाण्यात गटांगळ्या खात होते आणि काही जण बुडत होते.
२. पोहतांना पू. स्वातीताई हवेत उडत दिशा देत असल्याने मगरींची भीती न वाटणे आणि त्यामुळे दुसर्‍या काठावर सुखरूप पोचता येणे : माझ्या अंगावर पाण्यातील मगरी आणि सुसरी धावून येत होत्या. त्या वेळी मला किंचितही भीती वाटत नव्हती; कारण पू. स्वातीताई (पू. (कु.) स्वाती खाडये) माझ्या डोक्यावर हवेत उडत होत्या. सुसर किंवा मगर माझ्याजवळ आली की, पू. ताई मला दुसरीकडून जायला सांगायच्या. त्यामुळे मी सहजपणे दुसर्‍या काठावर पोचले.

सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी सद्गुरुपद गाठल्याविषयी संतांनी व्यक्त केलेले मनोगत आणि साधकांना सुचलेली काव्यसुमने

    नाशिक येथील सिंहस्थपर्वातील प्रसाराचे नियोजन करून ते प्रत्यक्षात आणणार्‍या सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांची गुरुपौर्णिमेला असलेली ७७ टक्के पातळी केवळ ३ महिन्यांत वाढून ८० टक्के झाली आहे, म्हणजेच त्या आता सद्गुरुपदावर आरुढ झाल्या. सद्गुरुपद गाठल्याविषयी त्यांचा नाशिक येथे २३.९.२०१५ या दिवशी सन्मान सोहळा पार पडला.
पू. (कु.) स्वातीताई यांनी सद्गुरुपद गाठल्याविषयी सनातनच्या संतांनी व्यक्त केलेले मनोगत आणि साधकांना सुचलेली काव्ये येथे देत आहोत.
तळमळीने गुरुकार्य कसे करायचे, हे पू. (कु.) स्वातीताईंकडून शिकायला मिळाले ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
सद्गुरुपद गाठल्याविषयी पू. (कु.) स्वातीताई यांचा सन्मानसोहळा म्हणजे साधकांसाठी सिंहस्थपर्वाची खरी पर्वणी आहे. हा सोहळा मनात, हृदयात साठवून त्यातून साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करूया. या सिंहस्थपर्वात साधनेला जी दिशा मिळाली, कृपा मिळाली त्याप्रती कृतज्ञ राहूया. साधक परिवार एक होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे, प्रत्येक साधकाशी जवळीक साधून त्याला आपलेसे कसे करायचे, तळमळीने गुरुकार्य कसे करायचे, हे पू. (कु.) स्वातीताईंकडून शिकायला मिळाले.
गुरूंना अपेक्षित असे कार्य करतांना प्रगती साधण्याचे
पू. (कु.) स्वातीताई या आदर्श उदाहरण ! - पू. नंदकुमार जाधव
सिंहस्थपर्वात पू. स्वातीताईंसमवेत सेवेची संधी मिळाली. त्या प्रत्येक गोष्ट पुढाकार घेऊन करतात. प्रत्येक व्यवस्था तळमळीने आणि बारकाईने पहातात. साधक दिवसभर सेवा करतात, त्यांना कोणताही त्रास होता कामा नये, यासाठी त्यांची धडपड असते. एकवेळ स्वत:ला उपाशी रहावे लागले, तरी चालेल; मात्र साधकांना व्यवस्थित भोजन मिळायला हवे, अशी त्यांची तळमळ असते. पू. स्वातीताईंमध्ये साधकांप्रती प्रेमभाव असून तो त्यांच्या उद्गारांमधूनही जाणवतो. पू. ताईंमध्ये मनाची निर्मळता, मनमोकळेपणा आणि गुरुकार्याची तळमळ पुष्कळ आहे. गुरूंना अपेक्षित कार्य करतांना प्रगती कशी करू शकतो, याचे पू. स्वातीताई संस्थास्तरावरील आदर्श उदाहरण आहेत.

२७ सप्टेंबरला दैनिक सनातन प्रभातचा सनातन सत्यकथन विशेषांक !

वाचक, हितचिंतक आणि साधक यांना सूचना 
      सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून सनातन संस्थेवर बंदी आणावी, अशी आवई उठवण्यात आली आहे. या प्रकरणातील वस्तूस्थिती लोकांपर्यंत जाण्यासाठी २७ सप्टेंबरला दैनिक सनातन प्रभातचा सनातन सत्यकथन विशेषांक काढण्यात येणार आहे. हा अंक दहापानी असून याचे मूल्य ५ रुपये प्रति अंक असणार आहे. साधकांनी प्रायोजक घेतांना या रकमेप्रमाणे घ्यावे. 

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्माभिमानी यांना नम्र विनंती !

भारतीय रिझर्व्ह बँकेने क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे !
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनात वापरत असलेल्या नोटांवर पेनने लिहिलेले असल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत, असे क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत सूचित केले होते. अशा नोटा बँकेच्या दृष्टीने कागदासमान असल्याने बाजारात त्या कोणी स्वीकारणार नाही, अशी सूचनाही बँकेने २ वर्षांपूर्वी काढली होती.
आतापर्यंत लोकांकडून या सूचनेचे पालन झालेले नसल्याने या संदर्भात कडक धोरण अवलंबण्याचे बँकेने ठरवले आहे. अशा नोटा चलनात चालणार नाहीत, यासाठी दक्षता घेण्यास बँकेने आरंभ केला आहे. या संदर्भात सर्वांनी पुढीलप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
१. यापुढे नोटांवर पेन किंवा पेन्सिलने काहीही लिहू नये. नोटांवर संख्या लिहायची असल्यास वेगळ्या कागदाचा वापर करून तो रबरबँडने नोटांना गुंडाळावा. कागद लावण्यासाठी स्टेपलर किंवा टाचणी यांचा वापर करू नये.

साधकांना सूचना

              पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशी (२७.९.२०१५) दुपारी १२.०७ वाजता
समाप्ती - भाद्रपद पौर्णिमा/कृष्ण पक्ष प्रतिपदा (२८.९.२०१५) सकाळी ८.२१ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

अहंभाव-निर्मूलनाचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     अहंभाव, म्हणजे मीपणा. हा अहंभाव सोडला, तर माणसांच्या समूहात तुम्ही आश्‍चर्यकारक एकांताचा अनुभव मिळवाल.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
पांडित्य दाखवणारे केवळ पुस्तकाप्रमाणे असणे !
पुस्तकात शाब्दिक ज्ञान असते. ते पुस्तकाला स्वतःला समजत नाही, तसेच पांडित्य दाखवण्यापुरते ज्यांना शाब्दिक ज्ञान असते, त्यांना त्या ज्ञानाची अनुभूती आलेली नसते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.९.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज महाराज 
तीर्थयात्रा
 पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।
भावार्थ : इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं । म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्‍वराच्या भेटीपेक्षा भेट होणार यात जास्त आनंद आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

हिंदूंचा दुस्वास !

संपादकीय
     गंगा नदीच्या स्वच्छतेकडे भारत शासनाने विशेष लक्ष दिले आहे. विद्यमान केंद्रीय मंत्रीमंडळात या कामासाठी वेगळा मंत्री असून उमा भारती यांच्याकडे ते खाते आहे. हिंदूंसाठी पवित्र असलेली गंगामाता मलीन होऊन कित्येक वर्षे वहात आहे. तिचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाने वेळीच पाऊल उचलले असते, तर आजची तिची दुर्दशा पहाण्याची वेळ आली नसती. गंगामातेला हिंदूंच्या दृष्टीने असलेले धार्मिक महत्त्व काँग्रेसी राजवटीत दुर्लक्षित राहिल्यामुळे गंगामातेचे मालिन्य वाढले. मोदी शासनाने काँग्रेसींच्या त्रुटीवर योग्य प्रकारे बोट ठेवले आणि गंगा स्वच्छता चळवळ राष्ट्रीय सूत्र झाले. केंद्रशासनाचा स्तुत्य कार्यक्रम, असे म्हणत हिंदूंनी शासनाच्या कार्यक्रमाला दाद दिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn