Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

आज वामन जयंती

शासनाला माझी हत्या घडवून आणायची होती !

द्वारकापिठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद
सरस्वतीजी यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा आरोप
उत्तरप्रदेशच्या समाजवादी शासनाचा हिंदुद्वेष्टेपणा !
      काशी (उत्तरप्रदेश) - येथे गंगा नदीत प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनाला प्रतिबंध करण्यात आल्याच्या विरोेधात आंदोलन करणार्‍या हिंदूंवर पोलिसांकडून २२ सप्टेंबर या दिवशी लाठीमार करण्यात आला. या लाठीमारात शासनाला माझी हत्या घडवून आणायची होती, असा आरोप द्वारकापिठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांनी केला आहे. पोलिसांच्या मारहाणीतून मी वाचलोे, मी क्षमाशील आहे; मात्र लहान बटुकांवर करण्यात आलेला लाठीमार अनुचित आहे, असेही स्वामी म्हणाले.

हिंदु जनजागृती समितीला शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांचे आशीर्वाद !

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज
(उजवीकडे) यांना माहिती सांगतांना श्री. सुनील घनवट
      नाशिक, २४ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पश्‍चिमाम्नाय द्वारका शारदापीठ एवं उत्तराम्नाय ज्योतिष्पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचे नाशिक येथे मंगल दर्शन घेऊन त्यांचे धर्मकार्यासाठी आशीर्वाद घेतले. या वेळी श्री. घनवट यांनी पूज्य स्वामीजींचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यावर उत्तरप्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या लाठीमाराच्या विरोधात समितीने केलेल्या निषेधाविषयी माहिती दिली. तसेच हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षण आणि धर्मजागृती या कार्यांविषयी महाराजांना अवगत केले.


सनातन संस्था ही अध्यात्म आणि हिंदु धर्म यांचा प्रचार करणारी एक संस्था ! - दीपक ढवळीकर, मंत्री, गोवा राज्य

     पणजी - सनातन संस्थेच्या एका सदस्याला खूनाच्या प्रकरणावरून संशयीत म्हणून अटक केली, तर संपूर्ण सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी का केली जात आहे ? सनातन संस्था ही अध्यात्म आणि हिंदु धर्म यांचा प्रचार करणारी एक संस्था आहे, असे मत मगो पक्षाचे अध्यक्ष आणि गोव्याचे विद्यमान मंत्री श्री. दीपक ढवळीकर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेकडे बोलतांना मांडले. काँग्रेस, तसेच अन्य काही संघटनांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केल्याच्या पाश्‍वभूमीवर मंत्री श्री. दीपक ढवळीकर यांनी हे विधान केले आहे.
     सनातन संस्थेचे कार्य आपण जवळून पाहिले आहे. ही संस्था कधीही हिंसा शिकवत नाही. मडगाव येथील बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री रवि नाईक यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते; मात्र केंद्रशासनाने ही मागणी धुडकावून लावली होती.

पंतप्रधान मोदी यांचे गुरु स्वामी दयानंद सरस्वती यांचा देहत्याग

      डेहराडून - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद सरस्वती यांनी २३ सप्टेंबरच्या रात्री ऋषीकेश येथे देहत्याग केला. ते ८५ वर्षांचे होते. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निधनामुळे माझी वैयक्तिक हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना मोदी यांनी त्यांच्या ट्विटवरून व्यक्त केली आहे. स्वामी सरस्वती यांचा जन्म वर्ष १९३० मध्ये मंजाकुडी येथे झाला होता. स्वामी दयानंद सरस्वती गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. मोदी यांनी त्यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. 

सनातन संस्थेवर बंदी घातल्यास राज्यभर आंदोलनाची हिंदु एकता आंदोलन पक्षाची चेतावणी

सनातन संस्थेच्या पाठीमागे ठामपणे उभे
रहाणार्‍या हिंदु एकता आंदोलन पक्षाचे आभार !
    नगर, २४ सप्टेंबर (वार्ता) - कॉम्रेड पानसरे यांच्या प्रकरणात सनातन संस्थेचा साधक श्री. समीर गायकवाड दोषी असेल, तर त्याला जरूर शिक्षा करा; पण शासन सनातन संस्थेला हिंदुत्ववादी म्हणून लक्ष्य करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे जर सनातन संस्थेवर बंदी घातली, तर राज्यभर आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुदर्शन अण्णा शितोळे यांनी श्रीरामपूर येथे सनातन संस्थेच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सनातनच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत ! - अधिवक्ता
राजीव देशपांडे, पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन पक्ष
    पुणे - सनातन संस्था ही अतिरेकी नसून साधकांचा समूह आहे. आज शासन जसे सनातनच्या मागे लागत आहे, तसे त्यांनी धर्मांध आणि नक्षली यांच्या मागे लागावे. आम्ही सनातनच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, असे ठाम प्रतिपादन हिंदु एकता आंदोलन पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अधिवक्ता राजीव देशपांडे यांनी केले.

मुझफ्फरनगर दंगलीसाठी समाजवादी पक्ष आणि भाजप उत्तरदायी

न्या. विष्णू सहाय्य तपास आयोगाचा अहवाल राज्यपालांना सादर 
     लखनऊ (उत्तरप्रदेश) - वर्ष २०१३ मध्ये मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीसाठी समाजवादी पक्ष, भाजप यांच्यासह पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची दायित्वशून्यता कारणीभूत होती, असे या दंगलीसाठी नेमलेल्या न्या. विष्णू सहाय्य तपास आयोगाने म्हटले आहे. या दंगलीत ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर ५० सहस्रांहून अधिक नागरिक बेघर झाले होते. 
     न्या. विष्णू सहाय हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असून त्यांनी सिद्ध केलेल्या ७७५ पानांच्या अहवालात सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी आणि राजकीय पक्ष यांच्या एकूण ३७७ साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. हा अहवाल राज्यपाल राम नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून तो लवकरच मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे देण्यात येणार आहे.

शासनाने सर्वधर्मतीर्थ काळाराम मंदिर, रामकुंड आणि कुशावर्त येथे टाकले जाण्यापासून रोखावे ! - श्री महंत नरेंद्रगिरीजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

पुण्यातील एम्.आय.टी.च्या उपक्रमास साधु-संतांसह शंकराचार्यांचाही विरोध 
    त्र्यंबकेश्‍वर - सर्व ठिकाणचे तीर्थ विशेषरूपाने एकत्र करून ते मंदिरात टाकण्याची कोणतीही कृती हिंदु धर्मात सांगितलेली नाही. असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे शासनाने सर्वधर्मतीर्थ येथील सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिर, पवित्र रामकुंड आणि त्र्यंबकेश्‍वर येथील पवित्र कुशावर्त येथे टाकले जाण्यापासून रोखावे, अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्रगिरीजी महारजा यांनी केली.
    पुण्यातील एम्.आय.टी. या शिक्षण संस्थेकडून सर्वधर्मांतील तीर्थ एकत्र करून ते २५ सप्टेंबर २०१५ या दिवशी येथील सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिरा, तसेच कुशावर्त येथे टाकले जाणार आहे. याविषयी श्री महंत नरेंद्रगिरीजी महाराज यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

उत्तरप्रदेशमध्ये गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत धर्मांधांचा हैदोस

  • अनेक भाविक घायाळ
  • दुकाने आणि वाहने पेटवली
     गुजरात दंगलीसाठी मोदी शासनाला १० वर्षे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे निधर्मी प्रसारमाध्यमे आणि मानवाधिकारवाले उत्तरप्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या शासनाला त्यांच्या राज्यातील दंगलीविषयी प्रश्‍न का विचारत नाही ? कि राज्यात धर्मांध हिंदूंवर आक्रमण करतात; म्हणून ते चूप आहेत ?
    गौंडा (उत्तरप्रदेश) - येथील दयानंदनगर भागात २३ सप्टेंबर या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनाच्या शोभायात्रेवर धर्मांधांनी दगडफेक करून हैदोस घातला. त्यानंतर हिंसक जमावाने २४ दुकाने लूटली आणि ठिकठिकाणी असणारी दुकाने आणि ठेले यांना उलटवून त्यांना आगीच्या स्वाधीन केले. त्याचबरोबर काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांनाही पेटवून देण्यात आले. या दंगलीमुळे विसर्जनाला आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यात अनेक महिला घायाळ झाल्या. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला, अश्रूधुराचे गोळे सोडले आणि हिंसक जमावाला पांगवले. या दंगलीत अनेक जण घायाळ झाले आहेत. शहरात तणाव असून रात्री उशीरापर्यंत विविध भागांमध्ये दगडफेक आणि आग लावण्याच्या घटना चालू होत्या. प्रशासनाने शहरात कलम १४४ लागू केले आहे.

नगर येथे सामूहिक अथर्वशीर्ष पठण

समितीचे श्री. तेजस भाले भाविकांकडून अथर्वशीर्ष पठण करून घेतांना
     नगर, २४ सप्टेंबर - येथील लक्ष्मीबाई कारंजा भागातील गांधी मैदान येथे संकल्प युवक मंडळ ट्रस्ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. हा कार्यक्रम सलग ६ वर्षे होत असून २२ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत झाला. त्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी ७० जण उपस्थित होते. या वेळी समितीचे श्री. तेजस भाले यांनी भाविकांकडून अथर्वशीर्ष पठण करून घेतले. सदर कार्यक्रमास संकल्प युवक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नरेंद्र कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी सनातननिर्मित सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

नवी मुंबईत ९४ अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश - मुंबई उच्च न्यायालय

     नवी मुंबई - येथील दीघा गावातील ९४ अनधिकृत इमारतींवर तात्काळ हातोडा चालवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २४ सप्टेंबर या दिवशी दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे बेकायदा बांधकामे करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांसोबत घरे बेकायदा असल्याचे माहीत असूनही ती खरेदी करणार्‍यांना न्यायालयाने जोरदार तडाखा दिला आहे. एवढेच नव्हे, तर बेकायदा असल्याचे उघड झाल्यानंतरही कोर्ट रिसिव्हरच्या माध्यमातून याच गावातील दुर्गा माँ ाझा ही इमारत न्यायालयाने कह्यात घेतली होती; मात्र त्या वेळी अर्धवट बांधकाम अवस्थेत असलेली ही इमारत दीड महिन्यांत पूर्ण होऊन तेथे लोक वास्तव्याला आल्याचे उघड झाल्यावर न्यायालयाने या इमारतीतील ४१ कुटुंबांना सात दिवसांत नोटीस बजावून त्यानंतर दहा दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्याचेही स्पष्ट केले आहे.

पाणी सोडण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय घ्यावा - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण

पुरोगाम्यांना हिंदूंच्या सणाच्या वेळी उठणारा पोटशूळ !
  • पुणे येथे विसर्जनासाठी पाणी न सोडण्याविषयी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका !
  • विसर्जनासाठी पाणी न सोडण्याच्या याचिकेवर जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाला नोटीस !
    पुणे, २४ सप्टेंबर - खडकवासला धरणातून पाणी सोडायचे कि नाही, याचा निर्णय हा धोरणात्मक असून त्याविषयी जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय घ्यावा, असे न्या. विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी २४ सप्टेंबर या दिवशी सांगितले. दुष्काळग्रस्त परिस्थिती असतांना पिण्याचे दोन ते चार टीएम्सी पाणी खडकवासला धरणातून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नदीत सोडणे कितपत योग्य ठरेल, असा प्रश्‍न उपस्थित करणारी याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात प्रविष्ट करण्यात आली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. (मद्य बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पाण्याची बचत व्हावी, यासाठी मद्याचे कारखाने बंद करण्यासाठी कथित पर्यावरणवाद्यांनी आवाज उठवावा. - संपादक) या संदर्भात जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस आयुक्त यांना न्यायाधिकरणाचे न्या. विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या आदेशावरून नोटीस देण्यात आली होती. 

फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेशमधील धर्मांधांचा उद्दामपणा जाणा !
      उत्तरप्रदेशातील गौंडा जिल्ह्यातील दयानंदनगर भागात गणेशमूर्ती विसर्जनाच्या शोभायात्रेवर धर्मांधांनी दगडफेक केली, तसेच ठिकठिकाणी असणारी दुकाने, दुचाकी आणि चारचाकी यांना आगी लावल्या.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Uttarpradeshme Ganeshmurti visarjanki shobhayatrapar dharmandhoka pathrav aur danga !
Uttarpradesh Bharatme hai ya Pak me ?
जागो ! : उत्तरप्रदेश में गणेशमूर्ती विसर्जन की शोभायात्रा पर धर्मांधों का पथराव और दंगा !
उत्तरप्रदेश भारत में है या पाक में ?

नगरसेवक अनंत कोर्‍हाळे यांच्या पुढाकारामुळे पिंपरी-चिंचवड येथे वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

नागरिकांना धर्मपालन करता यावे, यासाठी पुढाकार घेणारे
श्री. अनंत कोर्‍हाळे यांसारखे नगरसेवक हीच हिंदु धर्माची खरी शक्ती !
    चिंचवड - येथील काकडे पार्कमधील विसर्जन घाटावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक श्री. अनंत कोर्‍हाळे यांनी भाविकांना श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे सोयीचे जावे, यासाठी उत्तम व्यवस्था केली होती. यामुळे सर्वच भाविकांनी नदीमध्ये विसर्जन केले. श्री. अनंत कोर्‍हाळे यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन श्री गणेशमूर्ती विसर्जन आणि अशास्त्रीय मूर्तीदान यांविषयी प्रबोधन केले होते. त्यानंतर श्री. कोर्‍हाळे १८, २१ आणि २३ सप्टेंबर या दिवशी संपूर्ण वेळ स्वतः विसर्जन घाटावर थांबून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीत करा, असे आवाहन भाविकांना करत होते. त्यांनी घाटाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागतकक्षही उभारला होता. त्याही ठिकाणाहून त्यांचे कार्यकर्ते भाविकाना विसर्जन करण्यासंबंधीचे आवाहन करत होते. श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी भाविकांना होड्या विनामूल्य उपलब्ध करून दिल्या होत्या, तसेच त्यांनी घाटावर १० X १० या आकाराचे श्री गणेशमूर्ती विसर्जन या विषयीचे २ मोठे फलेक्स फलकही लावले होते.

चिंचवड (पुणे) येथील मोरया गोसावी समाधी मंदिराजवळील घाटावर अनेकांचे वहात्या पाण्यात विसर्जन

    चिंचवडगाव - येथील मोरया गोसावी समाधी मंदिराजवळील घाटावर विधिवत पूजन करून भाविकांनी गणेश मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केले. या ठिकाणी मूर्तीदान घेणार्‍या संघटनेने भाविकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून मूर्तीदान करून घेतले. मूर्तीदान आणि निर्माल्य घेणारे कार्यकर्ते भाविकांना नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचा विषय सांगून ते मूर्ती घेण्याचा प्रयत्न करत होते. या दोन्हीमध्ये भाविकांची एक प्रकारे फसवणूक होत आहे, असे भाविकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याला भाविकांनी अल्प प्रमाणात प्रतिसाद दिला. या घाटावरही श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ५ होड्या ठेवल्या होत्या. त्यामुळे अल्प पैशांमध्ये भाविकांना होडीतून त्यांच्या हस्ते विसर्जन करता येत होते.

पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांची त्वरित सुटका करण्यात यावी या मागणीसाठी त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) येथे त्यांच्या भक्तांनी काढलेली फेरी

मंदिर संस्थानची पुजारी मंडळाचे किशोर गंगणे यांना नोटीस

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची दडपशाही
क्षमा न मागितल्यास १० कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट करण्याची चेतावणी !
हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! मंदिर प्रशासनाचा हा कारभार 
म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे. मंदिर सरकारीकरण झालेली मंदिरे 
भक्तांच्या कह्यात येण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करा !
     तुळजापूर, २४ सप्टेंबर (वार्ता.) - येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिलेल्या भेटवस्तूंवर विश्‍वस्तांनी केलेला व्यय हा अवाक करणारा असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी मिळवलेल्या माहितीतून उघड झाले होते. हा घोटाळा बाहेर काढल्यामुळे श्री. गंगणे यांना मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार सुदीप नरहरे यांनी अधिवक्ता विश्‍वास डोईफोडे यांच्या माध्यमातून नोटीस बजावली आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे, संस्थानच्या संबंधीची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखतीद्वारे का दिली ?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात भाविकांचा श्री गणेशमूर्ती नदीत विसर्जन करण्याकडे कल !

    नगडी प्राधिकरण - येथील गणेश तलावामध्ये २१ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे उत्तमरित्या होत होते. या ठिकाणी मूर्तीदान न होता सर्वच गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तर कृत्रिम हौदात विसर्जन होण्याचे प्रमाण हे नगण्य होते. भाविकांना मूर्ती विसर्जन सोयीचे व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्री. राजू मिसाळ यांनी आवश्यक त्या सुविधा पुरवल्या होत्या. (असा आदर्श इतरत्रच्या नगरसेवकांनी घ्यावा आणि श्री गणेशमूर्ती विसर्जनाची धार्मिक कृती चांगली होण्यासाठी प्रयत्न करावेत. - संपादक) तलावाच्या परिसरात होड्या ठेवल्या होत्या, त्यामुळे भाविकांना श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणे सोपे झाले. त्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, वाहन तळ आणि प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सर्व गणेशभक्तांचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारला होता.

सनातन संस्थेकडून पत्रकारांचे हितच; वागळेंचे आरोप केवळ प्रसिद्धीचा स्टंट !

     मुंबई - सनातन संस्थेला लक्ष्य करून विविध आरोप चालू असतांनाच काही जण यातूनही स्वप्रसिद्धीची कंड शमवून घेत आहेत. पोलिसांनी याविषयी कुठलाही खुलासा केला नसतांनाच, ते मी सनातनच्या टार्गेटवर आहे, मला धमक्या आल्या, अशी खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवून सनातन संस्थेविषयी पत्रकारांचे मत कलुषित करत आहेत. यात खर्‍या पत्रकारितेचा गंध नसलेले आणि प्रसिद्धीच्या झोतात राहू पहाणारे स्वयंघोषित पत्रकार आहेत. सनातन संस्थेला नेहमी पाण्यात पहाणारे आणि आरोप करण्यात पटाईत असणारे कोणतीही वृत्तवाहिनी हातात नसल्याने नाईलाजास्तव हात चोळत बसावे लागल्याने दु:खी झालेले श्री. निखिल वागळे यांचा हा पब्लिसिटी स्टंटच आहे. यातून स्वतःसह त्यांच्या येऊ घातलेल्या चॅनेलची प्रसिद्धी करण्याचा अंतःस्थ हेतू नाकारता येत नाही. वास्तविक सनातन संस्थेने आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार केला असून, याविषयी ग्रंथ प्रकाशित केला आहे. तसेच पत्रकारांवर होणार्‍या अन्यायाविषयी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यामुळे या खोट्या आरोपांचा फोलपणा सिद्ध करणार्‍या पुराव्यांसह सनातन संस्थेने प्रेस क्लबसह विधिमंडळ पत्रकार संघ, मा. गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर केले आहे. 

नदी सुधार प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव सादर करा - पर्यावरणमंत्र्याचे आदेश !

    पुणे - पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल २३ सप्टेंबर सायंकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महापालिकेला दिले होते. महापालिका प्रशासनाने पवना नदीविषयी आवश्यक धारिकाच सोबत न नेल्यामुळे हे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच शासनाच्या संबधित अधिकार्‍यांना महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करण्याचे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळांला कंपन्यांकडून होणारे नदी प्रदूषण रोखण्याचे आदेशही त्यांनी  बैठकीत दिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधारण्याचा अहवाल तयार केला आहे. त्याबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. बैठकीमध्ये पर्यावरण मंत्र्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र शासनाने दाखवलेल्या त्रुटींची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवला. महापालिका प्रशासनाने आवश्यक धारिका सोबत न नेल्यामुळे सुधारित प्रस्ताव गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (बैठकीला आवश्यक धारिका सोबत न नेणारे महापालिका अधिकारी कामे कशी करत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी ! - संपादक)

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही आणखी चार वर्षे टोल वसूल होणार !

    मुंबई - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाप्रमाणेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर २००६ पासून २०१९ पर्यंत आयआर्बीकडून १ सहस्र ४६१ कोटी वसूल केले जाणार आहेत. त्यांपैकी आतापर्यंत १ सहस्र ९३ कोटी वसूल झाले आहेत. पुढच्या चार वर्षार्ंत ३९७ कोटी वसूल करायचे असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एम्एस्आर्डीसी) जाहीर केले आहे. आयआर्बीकडून महामार्गावर होत असलेल्या या टोलधाडीला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

कॉ. पानसरे यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा व्हावी; मात्र त्यासाठी निर्दोष सनातनचा बळी नको ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

डावीकडून बोलतांना अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर,
आधुनिक वैद्य श्री. मानसिंग शिंदे, अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि श्री. राजन बुणगे
     कोल्हापूर, २४ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन ही आध्यात्मिक संस्था आहे. अशा संस्थेची तुलना काही राजकीय पक्षांनी सिमीसारख्या आतंकवादी संघटनेशी करणे चुकीचे आहे. सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. सनातन संस्था आतंकवादाचे कधीही समर्थन करणार नाही. सनातन संस्थेचा कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध नाही. कॉ. पानसरेंना धमक्या दिलेल्या नाहीत. तसे झाले असते, तर कॉ. पानसरे यांच्या भाषणांमध्ये तसा उल्लेख आला असता.

महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा सांगली जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार !

    सांगली, २४ सप्टेंबर (वार्ता.) - शिवचरित्रकार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवले. हा पुरस्कार मिळाल्याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीनराजे शिंदे यांनी श्री. बाबासाहेब पुरंदरे यांची पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी मनसे महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, सर्वश्री आदित्य पटवर्धन, चेतन भोसले, प्रियानंद कांबळे, गजानन मोरे, सुनीताताई इनामदार, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी येथील पशूवधगृहाला राष्ट्रवादीकडूनच विरोध !

    पिंपरी-चिंचवड - पिंपरी येथील डाल्को आस्थापनाच्या जागेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रस्तावित केलेल्या पशूवधगृहाला आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विरोध वाढू लागला आहे. हे पशूवधगृह होऊ नये यासाठी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांनाच साकडे घातले आहे. पिंपरी-चिंचवडच्या दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्र्यांना उपमहापौर वाघेरे यांनी निवेदन देऊन पिंपरीमध्ये पशूवधगृह चालू न करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांना द्याव्यात, अशी मागणी केली आहे. पिंपरीतील राजीव गांधी रेल्वे उड्डाण पुलाखाली कित्येक वर्षे चालू असणारे मोठ्या जनावरांचे पशूवधगृह अनेक संस्था, संघटना, विविध पक्ष यांच्या विरोधामुळे बंद करण्यात आले होते.

पाश्‍चात्य संस्कृतीचा पगडा हिंदु धर्मियांसाठी घातक ! - योगऋषी रामदेवबाबा

    त्र्यंबकेश्‍वर, २४ सप्टेंबर - सनातन वैदिक धर्मात संन्यास दीक्षा आहे. त्यानुरूप येथे संन्यस्त ब्रह्मचारी असतात. इतर धर्मात धर्मगुरु वेगवेगळ्या क्लृप्त्या करून फसवेगिरी करत आहेत. पाश्‍चात्य संस्कृतीचा पगडा हिंदु धर्मियांसाठी घातक आहे. त्यामुळे सनातन धर्म हा अनुकूल असून स्वदेशीचा अंगीकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले.

पुरोगामी लोकांचा वैचारिक आतंकवाद आणि दंडेलशाही खपवून घेणार नाही ! - हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर

कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरण 
दांभिक आणि पुरोगामी लोकांनी समीर गायकवाड यांना अडकवले !
अधिवक्ता
श्री. संजीव पुनाळेकर
       कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक झाली. हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव आणि उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी २३ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.के. जैनापुरे यांच्यासमोर समीर गायकवाड यांची बाजू मांडतांना युक्तीवाद केला. या युक्तीवादाविषयी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे ...
     कोल्हापूर, २४ सप्टेंबर (वार्ता.) - दांभिक आणि तथाकथित पुरोगामी म्हणणार्‍या खिसेभरू लोकांनी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणात जाणीवपूर्वक अडकावण्याचे काम आहे. अशा दांभिक लोकांचे काम उधळून लावण्यासाठी ३१ अधिवक्ते बाहेरून आले आहेत. पुरोगाम्यांकडून असे अत्याचार करणे आणि याप्रकरणी निष्पाप कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करणे, ही दंडेलशाही आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांसह धर्मद्रोही निखिल वागळे हे वैचारिक आतंकवाद मांडणारे आहेत. हा वैचारिक आतंकवाद आणि दंडेलशाही खपवून घेणार नाही,

हिंदु धर्माभिमान्यांना धर्मांध म्हणून हिणवणे हा निधर्मीवाद्यांचा ढोंगीपणा !

टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीवरील चर्चेत भाजपच्या नेत्या संजू वर्मा यांनी सनातनला 
विरोध करणार्‍या बेगडी निधर्मीवाद्यांचे पितळ उघडे पाडले ! 
     मुंबई - निरीश्‍वरवाद्यांना या देशात मत मांडण्याचा अधिकार आहे; मात्र हिंदु धर्म मानणार्‍यांनी मत मांडले, तर तो धर्मांधपणा होतो. हा स्वत:ला निधर्मी म्हणवणार्‍या निधर्मीवाद्यांचा ढोंगीपणा आहे, असे प्रतिपादन करून भाजपच्या नेत्या संजू वर्मा यांनी सनातनला आरोपी ठरवून झोडपणार्‍यांचे पितळ उघडे पाडले. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सनातनवरील बंदीच्या संदर्भात घेण्यात येत असलेली ही चर्चा एकांगी आहे. हा ढोंगी निधर्मीवाद आहे, असे स्पष्ट मत श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केले.

जन्महिंदू !

      नुकतीच कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक झाली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी माझ्या शाळेतील मित्र-मैत्रिणींनी मला त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपच्या गटातून कोणतीही पूर्वकल्पना न देता वगळले. का ? तर माझ्या असण्याने व्हॉट्स अ‍ॅप गटातील अन्य माझ्या शाळेतील तथाकथित मित्रमैत्रिणींना कदाचित् काही त्रास होईल.

सनातन संस्थेच्या निरपराध साधकांचा अकारण होणारा छळ आणि मोठमोठे अपराध करून मोकाट फिरणार्‍या गुन्हेगारांना मिळणारे अभय यांविषयी कु. नीलीमा कुलकर्णी हिच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया

कु. नीलीमा कुलकर्णी
१. साधकांचा अकारण होणारा छळ आणि गुन्हेगार मात्र मोकाट ! 
      कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना संशयित म्हणून नुकतीच अटक करण्यात आली आहे. कोणताही अपराध नसतांनाही सनातनच्या साधकांचा वारंवार छळ केला जातो. एकीकडे उघडपणे अपराध करणारा अभिनेता सलमान खान याने मद्यधुंद होऊन त्याच्या गाडीखाली ७ जणांना चिरडले. त्याला अनेक वर्षांनी शिक्षा झाली असली, तरी तो मात्र मोकाट फिरत आहे. अभिनेता संजय दत्त याचा अपराध सिद्ध होऊनही त्याला वारंवार कारागृहातून बाहेर येेण्याची सवलत दिली जाते. ही आहे सध्याची न्यायव्यवस्था ! 
       आमदार जितेंद्र आव्हाड आणि तथाकथित वृत्तवाहिन्या यांनी या गोष्टीचा कधीच कांगावा केल्याचे दिसले नाही; पण सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांनी कोणतेही अपराध न करताच त्यांना बळीचा बकरा केला जातो आणि सर्व जण गळा फाडून कांगावा करू लागतात.

भारतातील सर्वसाधारण नद्या, गंगा नदी आणि कुंभपर्वक्षेत्रीचे गंगादी जलस्रोत !

नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथील सिंहस्थपर्वातील आजच्या राजयोगी (शाही) स्नानाच्या निमित्ताने...
पू. (सौ.) योया वाले

कुंभमेळ्यांची सध्याची दु:स्थिती

कुंभमेळ्यातील सद्यस्थिती विशद करणारे सनातनचे ग्रंथ !
(राज्यकर्त्यांचा हिंदुद्वेष आणि हिंदुत्ववादी संघटना अन् हिंदू यांचे दुर्लक्ष)
     कुंभमेळा म्हणजे हिंदुस्थानच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महानतेचे दर्शन घडवणारे आध्यात्मिक संमेलन ! श्रद्धावानांच्या या संमेलनाची दु:स्थिती करणार्‍या विविध गोष्टींचा, उदा. कुंभमेळ्यासाठी आलेल्या वंदनीय साधू-संतांची प्रशासनाने दखलही न घेणे, पोलिसांनी अशोभनीय वर्तन करणे, कुंभमेळ्यातील राखीव भूभागावर अतिक्रमण होऊ देणे आणि राज्यकर्त्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथे होणार्‍या कुंभमेळ्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करणे आदींचा उहापोह या ग्रंथात करण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या या दुःस्थितीवरील उपायही प्रस्तुत ग्रंथात वाचा आणि कृतीशील व्हा !
संपर्क : ९३२२३१५३१७
     ज्याप्रमाणे चाणक्यांनी नंद राजाला धडा शिकवण्याची प्रतिज्ञा केली आणि ती पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसले नाहीत, त्याचप्रमाणे आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. - पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. 

विविध योगमार्गांतील साधूसंतांच्या दर्शनाचा अमोल लाभ म्हणजे कुंभमेळ्यातील एक महापर्वणी !

     कुंभमेळ्यात हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणा करणारे सिद्धपुरुष, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास करणारे परिव्राजक (संन्यासी) आणि शस्त्रधारी आखाड्यांतील संतमहंत यांचे दर्शन होते. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात येते की, ते ज्ञानाचा आणि अनुभवांचा साक्षात् हिमालय आहेत. असे असूनही त्यांची नम्रता आणि प्रेमळ दृष्टी सर्वांना सामावून घेणार्‍या सागरासारखी विशाल असते. 
(पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्र, महाकुंभ विशेषांक, १५.८.२००३)

भ्रष्टाचाराचा रोग नष्ट होण्यासाठी जनतेच्या निर्धाराची आवश्यकता !

     पदोपदी प्रत्येक कामासाठी लाच घेणारे शासकीय आणि अशासकीय कर्मचारी अन् अधिकारी या रोगाला जेवढे उत्तरदायी आहेत, तेवढीच लाच देऊन काम करून घेणारी जनताही याला उत्तरदायी आहे. काम झाले नाही तरी ठीक; पण मी लाच घेणार नाही, असा निर्धार जनतेने केल्यास हा रोग क्षणात नष्ट होईल. 
- पुं.बा. मोरजे (भ्रष्टाचार : स्वरूप, कार्यवाही आणि निर्मूलनाचे मार्गे)

पानसरे हत्या प्रकरणीचे सत्य तात्काळ बाहेर येण्याचा मार्ग लाय डिटेक्टर चाचणी ! - स्वामी विदितानंद

     सध्याच्या वैज्ञानिक युगात पोलीस खोटे बोलणार्‍या आरोपींची लाय डिटेक्टर चाचणी करतात आणि त्याद्वारे त्याच्या अंतर्मनातील सत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात. खरे तर पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड, त्याची चौकशी करणारे पोलीस, तसेच या संदर्भातील टीकाकार या सर्वांची लाय डिटेक्टर चाचणी करायला हवी. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. त्याचा अहवाल सर्व प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध करायला हवा.

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तपत्रांची माहिती कळवा !

     कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत.
सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तवाहिन्यांची माहिती कळवा !
     कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून सनातन संस्थेविषयी मानहानीकारक वृत्ते वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होत असल्यास त्याविषयी त्वरित दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात (०८३२) २३१२६६४ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे. ज्यांच्याकडे वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून ते vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावे आणि त्याविषयी अधिवक्ते नागेश ताकभाते (दू.क्र. ८४५१००६०५८) यांना कळवावे.

सिंहस्थपर्वात गोदावरीच्या रामकुंडातील जलात राजयोगी (शाही) स्नान करण्यापूर्वी आणि नंतर होणारा आध्यात्मिक स्तरावरील पालट अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथील सिंहस्थपर्वातील तिसर्‍या राजयोगी (शाही) स्नानाच्या निमित्ताने...
     १४ जुलै ते २५ सप्टेंबर २०१५ या कालावधीत त्र्यंबकेश्‍वर, नाशिक येथे सिंहस्थपर्व चालू आहे. सिंहस्थपर्वात २८.८.२०१५ या दिवशी गोदावरीतील रामकुंडातील जलाचा नमुना घेतला. त्यानंतर २९.८.२०१५ या दिवशी राजयोगी (शाही) स्नान झाल्यानंतरच्या जलाचा नमुना घेतला. या दोन्ही जलांचा सभोवतालच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्याच्या उद्देशाने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

बहीण आणि भाची यांच्या देवद आश्रमातील वास्तव्याविषयी आरंभी साशंक असणारे अन् नंतर 'आंतरिक साधनेसाठी केवळ ईश्‍वराप्रती उत्कट भाव पुरेसा आहे', ही जाणीव झाल्याने निःशंक झालेले श्री. शिवाजी वटकर !

     '२९.४.२०१५ या दिवशी कांदिवली, मुंबई येथील माझी मोठी बहीण श्रीमती जनाबाई नारायणकर (वय ८० वर्षे) आणि भाची श्रीमती मंगल शेरखाने या दोघी काही दिवसांसाठी देवद आश्रमात आल्या. आश्रमात येण्यास त्या आनंदाने सिद्ध झाल्या आणि तेथील वास्तव्याच्या थोड्याच कालावधीत त्यांनी सर्वांना आपलेसे करून घेतले. साधकांनी सांगितलेली कोणतीही सेवा करण्यास त्या नेहमीच सिद्ध असायच्या. त्या वेळी बहीण आणि भाची यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे. 

साधनेचे १,००० पट फळ देणारे सिंहस्थ पर्व !

      कुंभपर्वाच्या स्थळ आणि काळात केलेल्या दानादी सर्व धार्मिक कृतींचे आणि नामस्मरणादी साधनेचे फळ इतर स्थळ-काळाच्या तुलनेने १ सहस्र पट अधिक मिळते. कुंभ पर्वात अनेक देवता, ब्रह्मज्ञानी, तसेच विविध योगमार्गांतील साधूसंत एकत्र येत असल्याने त्यांचा सत्संग आणि मार्गदर्शन यांचा लाभ अल्पावधीत अन् एकाच ठिकाणी मिळतो; म्हणून कुंभपर्व म्हणजे भगवंताने आपली शीघ्र गतीने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी दिलेली सुवर्णसंधी होय.
     कुंभपर्वात जाऊन केवळ स्नान करून घेण्याने विशेष लाभ होणार नाही, तर आपले वासना, स्वभावदोष आणि अहंकार यांनी भरलेले मन, बुद्धी अन् अहं यांचे कुंभ तीर्थक्षेत्री कुंभमेळ्यात रिकामे केले, तरच आपल्याला देवता आणि साधूसंत यांचे आशीर्वाद मिळून आपल्या जीवनाचे सार्थक होईल ! 
- (जनलोकवासी) (पू.) डॉ. वसंत आठवले (प.पू. डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू), मुंबई.

प्रसार, नोकरी किंवा व्यवसाय करणार्‍या साधकांनो, गोमूत्र, अत्तर आणि कापूर यांच्या मानस उपायांसाठी पुढील प्रयोग करा !

     
 सौ. संगीता घोंगाणे
     प्रसार, नोकरी किंवा व्यवसाय करणारे साधक सतत रज-तम वातावरणात वावरत असतात. बाहेर असल्याने त्यांना कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे अनेक वेळा शक्य होत नाही. स्वयंसूचनांची सत्रे आणि स्वभावदोषांचे लिखाण करतांना काही साधकांचे मन एकाग्र होत नाही. या अडचणींवर मात करण्यासाठी मुंबईला असतांना एका बैठकीत सौ. संगीता घोंगाणेकाकूंनी एक मानस प्रयोग करायला सांगितला होता. तो पुढे देत आहे.

पू. स्वातीताईंचे आज्ञापालन करून वृद्ध सासू-सासर्‍यांची सेवा स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केलेल्या कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील सौ. अंजली मणेरीकर !

सौ. अंजली मणेरीकर
   सनातनच्या कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील साधिका सौ. अंजली हेमंत मणेरीकर यांनी ३.९.२०१५ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याची घोषणा सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी नाशिक येथे झालेल्या एका भावसोहळ्यात केली. त्यानिमित्त त्यांचे यजमान श्री. हेमंत मणेरीकर यांना पत्नीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
 १. सेवाभावी वृत्ती 
१ अ. वृद्ध सासू-सासर्‍यांचेे आणि घराचे पूर्ण दायित्व सांभाळून सेवा करणे : घरात माझे आई-वडील वृद्ध आणि रुग्णाईत होते. आईला अर्धांगवायू झाला होता. तेव्हा मी नोकरी करत होतो. वडील वयोमानापरत्वे २ मास पलंगावरच झोपून होते.

सनातन संस्थेच्या विरोधात अकारण गरळओक करणार्‍यांनो, सनातनप्रती विश्‍वास राखण्याचे कार्य देवच करत आहे, हे ध्यानात घेऊन संस्थेचे कार्य समजून घ्या !

१. बाहेरून आलेल्या अतिथींना आश्रम दाखवतांना ते सनातनविरुद्ध सध्या होत 
असलेल्या अपप्रचाराविषयी काही बोलतील, असे वाटणे; पण त्यांनी विषय न काढणे
    १९.९.२०१५ या दिवशी मला बाहेरून आलेल्या काही अतिथींना आश्रम दाखवण्याची सेवा होती. गोव्यातील एका साधकाचे मित्र आणि त्यांचा परिवार यांना आश्रम दाखवायचा होता. मी त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आले की, त्यांना साधना किंवा संस्था यांच्याविषयी विशेष काही ठाऊक नाही. त्यांनी दैनिक सनातन प्रभातचे अंक काही वेळा केवळ पाहिले आहेत.

देव संतांच्या माध्यमातून साहाय्य करत असल्याची साधकाला आलेली अनुभूती !

पू. नकातेकाका
१. चोर रोख रक्कम आणि दागिने घेऊन गेल्याचे दुपारी लक्षात येणे 
     '२५.६.२०१५ या दिवशी सकाळी ११ ते १ या वेळेत आमच्या घरी कुणीच नव्हते. सुमारे ११ - १२ च्या दरम्यान आमच्या घरात चोरी झाली. चोरांनी लोखंडी कपाटाची किल्ली शोधून काढून कपाटातील गुरुपौर्णिमेच्या अर्पणासाठी मिळालेले १ लक्ष रुपये आणि दागिने असे एकूण सव्वा लक्ष रूपयांची चोरी करून ते कपाटालाच किल्ली ठेवून पसार झाले होते. घरात चोरी झाल्याचे दुपारी १ - १.३० च्या दरम्यान सर्वांच्या लक्षात आले.
२. पू. नकातेकाकांनी घरी जाण्यास परवानगी देणे 
     मला मुलीने घरी चोरी झाल्याचे दुपारी १.३० वाजता कळवले. त्या वेळी मी गडहिंग्लज येथे पू. नकातेकाकांसमवेत कोल्हापूर जिल्ह्याच्या लेखा तपासणीच्या सेवेसाठी गेलो होतो. मी पू. काकांना घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्या वेळी पू. काकांनी 'तुम्ही घरी जाऊन येऊ शकता', असे सांगितले.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कल्याण येथील चि. श्रीराम उपेंद्र महाजन (वय साडेतीन मास) !

१. गर्भारपण
गरोदरपणातील प्रारंभीच्या २ - ३ मासांत उदरात निळा प्रकाश दिसणे : गरोदरपणात प्रारंभीचे दोन-तीन मास उदरात निळा प्रकाश जाणवायचा. यावरून हे बाळ उच्च लोकातील असेल. आपण त्याच्यावर काय संस्कार करणार ? तेच आपल्याला घडवेल, असे वाटायचे. मग उन्नत साधकांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, उच्च लोकांतील जिवांवरही संस्कार करावेच लागतात.
२. प्रसूती
प्रसववेदना सहन करणे अशक्य होणे; मात्र प.पू. डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण जवळ असल्याची जाणीव करून दिल्यावर त्यांच्या कृपेने प्रसववेदना सहन करता येणे आणि प्रसूती नैसर्गिकरित्या होणे : मला प्रसूतीच्या आधी पाच दिवस अल्प-अधिक वेदना चालू होत्या. पाचव्या दिवशी रात्री मोठ्या प्रसववेदना चालू झाल्यावर, सहाव्या दिवशी पहाटे ५.४५ वाजता आम्ही रुग्णालयात भरती झालो.

रामनाथी आश्रम !

रामनाथी, एक चैतन्याचा झरा । 
आश्रमातून वाहे चैतन्य खळखळा ॥ 
रामनाथ देवाच्या चरणी तो स्थिरावला । 
संत-साधकांच्या संगे श्रीहरीचा (प.पू. डॉक्टरांचा) वास लाभे आश्रमाला ॥ १ ॥ 

रामनाथी आश्रमाचा लौकीक असे जगभरात । 
आश्रम बोलतो, डोलतो, श्‍वास घेतो, सर्वकाही करतो ॥ 
येणार्‍या जाणार्‍यांना शांती आणि आनंद देतो । 
आश्रमात उमटतात 'ॐ' आणि होते यज्ञांतून हवन ॥ २ ॥ 

असंख्य दैवी कणांचे आणि नादांचे हे माहेरघर । 
जगभरातील हिंदु धर्माचे कार्य या आश्रमातून चाले ॥ 
आश्रमात येणार्‍यास जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून तो सोडवे । 
साधकांसाठी रामनाथी आश्रम एक मोक्षकेंद्र असे ॥ ३ ॥ 

जगभरातील जनांना तेथे येण्याची आस असे । 
सर्वांचे दोष आणि अहं पोटात घेत असे ॥ 
रामनाथी आश्रमाचा संग लाभावा साधकजना । 
आमच्यामध्ये रामनाथी आश्रमासारखा भाव दाटावा ॥ ४ ॥ 

     श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी रात्री १२ नंतर ही कविता देवानेच सुचवली आणि लिहूनही त्यानेच घेतली. श्रीकृष्णार्पणमस्तु । 
- श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, गोवा. (५.९.२०१५)

साधकांनो, साधनेत एखादे पाऊल मागे पडल्यावर काळजी करू नका !

     'साधनेचा प्रवास २ - ३ पावले पुढे आणि एखाद पाऊल मागे, असा असतो. एखाद पाऊल मागे पडल्यावर त्याची काळजी करू नये. बसने प्रवास करतांना ती मधे मधे थांब्यावर थांबते. तेव्हा आपण काळजी करत नाही. 'ती पुढे जाणार आहे', याची आपल्याला खात्री असते. त्याचप्रमाणे साधनेत एखादे पाऊल मागे पडल्यावर साधना करणार्‍याने त्याची काळजी करू नये. तो पुढे जाणारच असतो.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.७.२०१५)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी उपाय म्हणून लावायला सांगितलेल्या दिव्याच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

१. कोणतेही कारण नसतांना दिव्यातील (पणतीतील) वात नाहीशी होणे
     योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आश्रमाच्या रक्षणासाठी स्वागतकक्षाच्या बाहेर सायंकाळी दिवा लावण्यास सांगितले आहे. सनातन संस्थेवर खोटे आरोप होण्यापूर्वी २ दिवस, म्हणजे १५ आणि १६ सप्टेंबर २०१५ या दिवशी दिव्यातील वात नाहीशी होत होती. प्रतिदिन सायंकाळी नवीन वात लावावी लागत होती. वात नाहीशी होण्यामागचे कारण कळत नव्हते.

घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकल्यानंतर साधिकेला आलेल्या अनुभूती

१. घर स्वच्छ ठेवण्याविषयी शुद्धीकरण सत्संगात पू. बिंदाताईंनी सूत्र सांगितल्यानंतर स्वतःच्या घरी असलेल्या अनावश्यक वस्तूंची जाणीव होऊन त्याच रात्री घराची स्वच्छता करणे आणि त्यानंतर घरात पुष्कळ चांगले वाटणे : रामनाथी आश्रमातील शुद्धीकरण सत्संगात एका साधिकेने सांगितले की, तिला दुसर्‍या साधिकेच्या घरी गेल्यावर त्यांच्या घरातील अव्यवस्थितपणामुळे पुष्कळ त्रास झाला. तेव्हा घराच्या स्वच्छतेचे महत्त्व सत्संगात सांगण्यात आले. माझे यजमान त्या सत्संगाला उपस्थित होते. त्यांनी मला पू. बिंदाताईंनी सांगितलेली सूत्रे सांगितली.

'घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी', या उक्तीप्रमाणे साधकांची क्षणोक्षणी काळजी घेणारे आणि त्यांच्यावर संतांच्या माध्यमातून मायेची पाखर घालणारे प.पू. डॉक्टर !

 श्री. संजय जोशी
१. पू. देशपांडेकाका डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी कुडाळ येथे आले असता त्यांच्यासमवेत प.पू. राऊळ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास जाणे : पू. दत्तात्रय देशपांडेकाका डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी कुडाळ येथे आले होते. त्यांचे वास्तव्य पिंगुळी, कुडाळ येथील सेवाकेंद्रात होते. ५.५.२०१५ या दिवशी मी पू. देशपांडेकाकांना घेऊन पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज यांच्या समाधीमंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. आमच्यासमवेत साधक श्री. गोपाळ जोरी हेसुद्धा होते. आम्ही समाधीमंदिरात प्रवेश केला, त्या वेळी प.पू. राऊळ महाराज यांचे शिष्य तथा उत्तराधिकारी प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज तेथे भक्तांसमवेत बसले होते. आम्ही समाधीमंदिरात जाऊन प.पू. राऊळ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर तेथून बाहेर आलो. प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज भक्तांसह तेथे बसलेले असल्याने मी पू. देशपांडेकाकांना म्हटले, "आपण समाधीमंदिर परिसर आणि अन्य मंदिरे पाहून येऊ अन् नंतर प.पू. विनायक (अण्णा) राऊळमहाराज यांचे दर्शन घेऊ." 

वाचक, हितचिंतक आणि साधक यांना सूचना

२८ सप्टेंबरला प्रसिद्ध होणारा दैनिक सनातन प्रभातचा
सनातन सत्यकथन विशेषांक २७ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार !
      सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून सनातन संस्थेवर बंदी आणावी, अशी आवई उठवण्यात आली आहे. या प्रकरणातील वस्तूस्थिती लोकांपर्यंत जाण्यासाठी २८ सप्टेंबरला कृष्णधवल विशेषांक काढणार होतो. याऐवजी हा अंक रविवार, २७ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. हा अंक दहापानी असून याचे मूल्य ५ रुपये प्रति अंक असणार आहे. साधकांनी प्रायोजक घेतांना या रकमेप्रमाणे घ्यावे.

संतसेवेची सुवर्णसंधी !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक दाम्पत्याची आवश्यकता !
     पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक दाम्पत्याची आवश्यकता आहे. जे सेवक दाम्पत्य या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
भ्रमणभाष : ८४५१००६०७०
इ-मेल : hinducoordination@gmail.com

जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

साधकांनो, ३०.९.२०१५ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !
     संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून ३०.९.२०१५ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी.

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

विविध सेवांसाठी वाराणसी आणि देहली सेवाकेंद्रांत साधकांची तातडीने आवश्यकता !
      वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, लेखा, प्रसार आदी सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. यासमवेतच विद्युत्-जोडणी, सुतारकाम, रंगकाम आदी बांधकामाच्या संदर्भातील कौशल्य असलेल्या सेवा, तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण (सुपरविझन) करू शकणारे साधकही हवे आहेत.
      देहली सेवाकेंद्रात वाहन, स्वयंपाक, लेखा आदी विभागांमध्ये, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे.
      जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी वाराणसी अथवा देहली सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा vishwadeep2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ.(४.५.२०१५)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      कुठे आपल्या पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या आपल्या १ - २ मुलांवरही सुसंस्कार करता न येणारे हल्लीचे पालक, तर कुठे आपल्या हजारो भक्तांवर साधनेचे संस्कार करणारे संत आणि गुरु ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.९.२०१५)
॥ हरि ॐ तत्सत् ॥

गुरूंनी दिलेले नाव
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
     लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, तर बाकीची नावे सगुणातील असतात.
भावार्थ : लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात.
      गुरु मिळाले असे म्हणू नये. गुरु दिले गेले, असे म्हटले पाहिजे. ज्याचा जो गुरु (नाम), तो त्याला आम्ही दिला. तोच तारील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मंत्रजपाचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    समजा, मनाची एकाग्रता साधली नाही, तरी पावित्र्याने कर्तव्य म्हणून मंत्रजप केल्यावर मन आपोआप स्थिर होत जाईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

दौर्‍याचे ढोंग आणि घोटाळेबाजांचे पाप !

संपादकीय
       राज्यात या वर्षी दुष्काळाने परिसीमा गाठल्याने शेतकर्‍यांच्या दुःस्थितीला पारावार राहिला नाही. याचा राजकीय लाभ केवळ आणि केवळ सत्तांध अन् धूर्त नेते शरद पवार यांनी न उठवला तरच नवल होते; परंतु त्याचे पितळ आता उघडे पडण्याची वेळ त्यांच्या दुर्दैवाने लगेचच आली आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शरद पवार यांनी पावसाळी अधिवेशन चालू दिले नाही. जनहिताचे कित्येक निर्णय त्यामुळे प्रलंबित राहिले आणि शेतकर्‍यांचा प्रश्‍नही काही सुटला असे नाही. त्यामुळे झालेल्या राज्याच्या हानीचे पवार यांना काही सुवेरसुतक नाही. त्यानंतर त्यांनी दौर्‍यांचा फार्स केला. शरद पवार कृषीमंत्री होते. त्यांना शेतीतील चांगले कळते; पण म्हणून शेतकर्‍यांची दयनीय स्थिती आणि भंगलेली भूमी पाहून त्यांचे दगडाचे हृदय कळवळले, अशी संवेदनशीलता आणि माणुसकी त्यांच्यात येण्याची सुतराम शक्यता नव्हतीच आणि नाही. सत्ताकारण हाच त्यांचा (अ)धर्म आहे. आता त्यांना वाटते की, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना त्यांची कर्जमाफी अल्प, मानसिकता आणि व्यसनाधीनता अधिक कारणीभूत आहे. साहेबांची मुत्सद्देगिरी बहुतेकांच्या लक्षात येत असली, तरी सर्वसामान्य माणसाला ती पटकन कशी लक्षात येणार ? बीसीसीआयचे अध्यक्ष दालमिया यांचे निधन झाल्याने रिकाम्या झालेल्या खुर्चीकडे तर पवारांचे लक्ष्य नाही ना, असा वास येऊ लागला आहे. त्यासाठी शासनाचे साहाय्य महत्त्वाचे ठरणार असल्याने पवारांनी हे पाठमोरे वळण घेतले कि काय, अशी शंका कुणाला आल्यास ते अयोग्य नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn