Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प्रसार, नोकरी किंवा व्यवसाय करणार्‍या साधकांनो, गोमूत्र, अत्तर आणि कापूर यांच्या मानस उपायांसाठी पुढील प्रयोग करा !

    प्रसार, नोकरी किंवा व्यवसाय करणारे साधक सतत रज-तम वातावरणात वावरत असतात. बाहेर असल्याने त्यांना कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे अनेक वेळा शक्य होत नाही. स्वयंसूचनांची सत्रे आणि स्वभावदोषांचे लिखाण करतांना काही साधकांचे मन एकाग्र होत नाही. या अडचणींवर मात करण्यासाठी मुंबईला असतांना एका बैठकीत सौ. संगीता घोंगाणेकाकूंनी एक मानस प्रयोग करायला सांगितला होता. तो पुढे देत आहे.
प्रयोगाचे नाव : उपायांची नगरी
     आता मी उपायांच्या चैतन्यमय नगरीत प्रवेश केला आहे. प्रवेश करताच आरंभी मला गोअर्काची मोठी नदी वहातांना दिसली. या नदीत मी मनसोक्त स्नान करत आहे. नदीतील चैतन्यामुळे माझ्या शरिरातील सर्व थकवा, त्रास, दोष आणि अहं या नदीत विरघळून नष्ट होत आहेत अन् मी नदीतील चैतन्य ग्रहण करत आहे. नंतर मी पुढे जात असतांना थोड्याच अंतरावर मला अत्तराचा ओढा लागला आहे. मी या ओढ्यात डुबकी मारून पुढे मार्गक्रमण करत आहे. काही अंतर चालल्यावर समोर हिमालयासारखा पांढराशुभ्र कापराचा पर्वत दिसत आहे. या पर्वतावर चढतांना मी घसरगुंडी करत खेळत आहे. त्यामुळे पर्वताचा कापूर माझ्या सर्व शरिराला आणि तोंडवळ्याला लागला असून श्‍वासासमवेत त्याचा गंध माझ्या शरिरात जात आहे अन् त्यामुळे शरिरातील त्रासदायक शक्ती बाहेर पडून ती नष्ट होत आहे. आता मी या चैतन्यमय नगरीच्या बाहेर पडून प.पू. डॉक्टरांच्या चरणांजवळ आलो/आली आहे. येथे बसून मी एकाग्रतेने नामजप करत आहे. हे श्रीकृष्णा, या अमूल्य अन् चैतन्यमय नगरीचा प्रवास अनुभवायला दिल्याविषयी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.
    हाच प्रयोग साधक स्वयंसूचनांची अभ्याससत्रे करण्यापूर्वी, स्वभावदोषांच्या सारणीचे लिखाण करण्यापूर्वी किंवा भावजागृती यांसाठी करू शकतात.
 - कु. रेणुका वळंजू, सनातन आश्रम, गोवा. (१५.८.२०१५)

समीर गायकवाड यांना ३ दिवस पोलीस कोठडी !

कॉम्रेड पानसरे हत्येच्या प्रकरणात सनातनच्या साधकाला झालेली अटक 
     कोल्हापूर - सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या कथित कारणावरून संशयित म्हणून अटक करण्यात आली. त्यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने २३ सप्टेंबरला दुपारी त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. या वेळी दोन्ही बाजूंनी युक्तीवाद करण्यात आला. तेव्हा पोलिसांच्या वतीने ७ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी ५० मिनिटे श्री. गायकवाड यांची बाजू मांडली. त्या युक्तीवादामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी केवळ ३ दिवस म्हणजे २६ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

समीर गायकवाड यांची बाजू मांडण्यासाठी पुढे आले ३१ धर्माभिमानी अधिवक्ते !

      श्री. समीर गायकवाड यांचे वकीलपत्र घेण्यासाठी विविध जिल्ह्यांतून ३१ धर्माभिमानी अधिवक्ते या प्रसंगी उपस्थित होते. त्यामुळे न्यायालय या धर्माभिमानी अधिवक्त्यांनीच भरून गेले. या संदर्भात अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांनी न्यायालयात सांगितले की, श्री. गायकवाड यांना १६ सप्टेंबर या दिवशी अधिवक्ताही मिळू दिला नाही. आता मात्र एका निष्पाप व्यक्तीला अकारण शिक्षा होऊ नये, यासाठी ३१ अधिवक्ते सांगली, पुणे, सोलापूर, अकोला, संभाजीनगर आणि बेळगाव या ठिकाणांहून उत्स्फूर्तपणे येथे आले आहेत. 
     या वेळी अधिवक्ता सर्वश्री देवदास शिंदे, मकरंद कुलकर्णी, विनायक देशपांडे, अभय कुलकर्णी, उमेश भडगावकर, आेंकार कुलकर्णी, एस्.एस्. कुलकर्णी, मल्लिकार्जुन टाकणे, चंद्रशेखर पोरे, समीर पटवर्धन, एस्.एस्. धर्माधिकारी, सी.ए. करमरकर, एस्.डी. होमकर, प्रताप यादव, एस्.एस्. टेके, आर्.के. यमगर, एस्.एस्. सुहासे, राजा कुंभारे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर, हिंदु जनजागृती समितीचे सुरेश कुलकर्णी, नीलेश सांगोलकर, नागेश ताकभाते, संदीप अपसिंगेकर, चेतन मणेरीकर, अधिवक्त्या निता शिंदे, भारती कोळी, सौ. प्रीती पाटील, अधिवक्त्या सौ. श्रुती भट आदी उपस्थित होते.

सनातन संस्थेवर राजकीय दबावाखाली बंदी घालणार नाही ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    मुंबई - सनातन संस्थेवर बंदी घालायची अथवा नाही, याचा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. आजवर सनातन संस्थेच्या विरोधात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, हसन मुश्रीफ, रिपाइंचे खासदार रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदा घेऊन सनातनवर बंदी आणण्याची मागणी केली; मात्र या सर्वांना मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरामुळे तोंडघशी पडावे लागले आहे. आजवर महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे आणि भाजपच्या अनेक प्रवक्त्यांनीही कायद्यानुसार कारवाई करू, असे सांगितले होते; मात्र सनातनच्या विरोधकांकडून मुख्यमंत्री का बोलत नाहीत ?, असे विचारले जात होते. या वृत्तामुळे मात्र या सर्वांना आता शांतपणे काय होते, ते पहात बसावे लागणार आहे. 

गणेशोत्सव मंडपातील महाराष्ट्राचा देखावा उद्ध्वस्त

येळ्ळूर (कर्नाटक) येथे बेळगाव पोलिसांचा धुडगूस 
पोलिसांकडून ग्रामस्थांची अटक आणि सुटका
    बेळगाव - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात असणार्‍या मराठी भाषिक येळ्ळूर येथील गणेश मंडळाने उभारलेला महाराष्ट्र राज्याचा देखावा २२ सप्टेंबर या दिवशी पोलिसांनी उद्ध्वस्त करून धुडगूस घातला. एवढेच नव्हे, तर गणेशोत्सव बंद करा असे धमकावत ग्रामस्थांचीही धरपकड केली. पोलिसांच्या या दडपशाहीच्या विरोधात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असून बेळगावसह सर्व मराठी भाषिक गावांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

एका राज्यातील एका सेवाकेंद्रात सनातनच्या साधकांची पोलिसांकडून चौकशी

सनातनच्या साधकांच्या मागे पोलीस चौकशीचा वाढता ससेमिरा
     एका राज्यातील एका सेवाकेंद्रात नुकतीच ४ पोलिसांनी येऊन साधकांकडे चौकशी केली. या वेळी साधक आणि पोलीस यांच्यात झालेले संभाषण येथे देत आहोत.
पोलीस : आम्ही आता सध्याच्या विषयाच्या (कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी) संदर्भात चौकशी करण्यासाठी आलो आहोत. येथे किती जण राहतात ? या सेवाकेंद्राचे मालक कोण आहेत ? ते काय करतात ?
(साधकाने माहिती दिली.)

एक सहस्रहून अधिक पाक-प्रशिक्षित आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत ! - सैन्याधिकारी

आतंकवादी निर्माण करणार्‍या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा !
     श्रीनगर - पाकिस्तानातील १७ आतंकवादी प्रशिक्षण केंद्रांतील एक सहस्रहून अधिक आतंकवादी जम्मू-काश्मीर सीमेतून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत; मात्र भारतीय सैन्याच्या सतर्कतेने त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने ते आता आततायी बनले असून वाटेल त्या मार्गाने घुसखोरीच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणावर हानी सोसत आहेत, अशी माहिती सैन्याच्या १५व्या कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी एका संवादात दिली.

एखाद्या सदस्याच्या चुकीमुळे सनातन संस्थेवर बंदी घालणे अयोग्य ! - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर
     पणजी - संघटनेचा एक सदस्य चूक करू शकतो. एक सदस्य एका संघटनेशी किंवा अनेक संघटनांशी संबंधित असू शकतो. एका सदस्याच्या चुकीसाठी संपूर्ण संघटनेवर बंदी घालू शकत नाही, असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलतांना केले आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी शक्यता मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पूर्णपणे फेटाळली. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी, साम्यवादी, पुरोगामी, नास्तिकतावादी यांच्याकडून होत आहे.

पानसरे हत्या प्रकरणीचे सत्य तात्काळ बाहेर येण्याचा मार्ग लाय डिटेक्टर चाचणी ! - स्वामी विदितानंद

     सध्याच्या वैज्ञानिक युगात पोलीस खोटे बोलणार्‍या आरोपींची लाय डिटेक्टर चाचणी करतात आणि त्याद्वारे त्याच्या अंतर्मनातील सत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात. खरे तर पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड, त्याची चौकशी करणारे, तसेच या संदर्भात टीकाकार या सर्वांची लाय डिटेक्टर चाचणी करायला हवी. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. त्याचा अहवाल सर्व प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध करायला हवा.

गोव्याचे आमदार विष्णु वाघ यांची सनातन संस्थेवरील बंदीची मागणी पूर्वग्रहकलुषित !

     पणजी - सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयीची गोव्यातील भाजपचे आमदार विष्णु वाघ यांनी मागणी केली आहे. ही मागणी पूर्वग्रहकलुषित आहे. गोव्याचे मुख्यमंत्री श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हटले आहे की, एखाद्या सदस्याच्या चुकीमुळे सनातन संस्थेवर बंदी घालणे अनुचित आहे. अशा वेळी पक्षबदलू प्रतिमा असलेल्या वाघ यांच्या प्रतिक्रियेला महत्त्व द्यायचे कि मुख्यमंत्री पार्सेकरांच्या वक्तव्याला महत्त्व द्यायचे, हे ठरवले पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या साधिका सौ. शुभा सावंत यांनी केले. त्या एएन्आय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देतांना बोलत होत्या.

केवळ २९ टक्के मते मिळवून झाले २९ आमदार !

बिहारच्या मागील विधानसभा निवडणुकीतील मत विभागणीचा परिणाम 
ज्यांना ७० टक्क्यांहून अधिक मतदारांचा विरोध आहे, असे आमदार देणारी लोकशाही ! 
     पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारच्या मागील निवडणुकीत २४३ पैकी केवळ २३ आमदारांना ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. २९ जण तर केवळ २९ टक्क्यांच्या जवळपास मते मिळवून आमदार झाले होते. या वेळी ही परिस्थिती अधिकच बिकट होण्याची चिन्हे आहेत; कारण एकेका मतदारसंघात अनेक उमेदवार उभे आहेत. 
     झारखंड मुक्ती मोर्चाचे सुमीतकुमार चकाई हे त्यांच्या मतदारसंघात केवळ २०.१५ टक्के मते मिळवून आमदार झाले होते. त्याच वेळी त्यांच्याकडून पराजित होणार्‍या तीन प्रमुख उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज ५४ टक्के एवढी होती.

इमिशन टेस्टिंगमध्ये फेरफार करून प्रदूषणाची मात्रा दर्शवली अल्प !

चारचाकी वाहनांची निर्मिती करणार्‍या फॉक्सवॅगनची बनवाबनवी उघड
     नवी देहली - अमेरिकी पर्यावरण संरक्षण संस्थेने केलेल्या तपासणीत चारचाकी वाहन निर्माण करणार्‍या फॉक्सवॅगन या जर्मन आस्थापनेने दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. या आस्थापनेने एका संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर)च्या आधारे १ कोटी १० लाख डिझेल कारच्या इमिशन टेस्टिंगमध्ये फेरफार (प्रदूषणाची मात्रा) केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी या आस्थापनेला अब्जावधी डॉलर्सचा (१ सहस्र १५० अब्ज रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. 

२२ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर आणि १५ शिनूक हेलिकॉप्टर खरेदी करणार

भारताचा अमेरिकेशी संरक्षणविषयक करार
     नवी देहली - केंद्रशासनाच्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने २२ सप्टेंबर या दिवशी अमेरिकेशी अडीच अब्ज डॉलर्सच्या (१६ सहस्र ४७० कोटी रुपये) संरक्षणविषयक कराराला संमती दिली असून या करारानुसार बोईंग आस्थापनेकडून २२ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर आणि १५ शिनूक हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहे.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर हा करार करण्यात आला आहे. संरक्षणविषयक सूत्रांनुसार अपाचे हेलिकॉप्टर खरेदीसाठी बोईंगशी एका करारावर स्वाक्षर्‍या करण्यात येतील, तर या हेलिकॉप्टरसह असलेली शस्त्रे, रडार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी अमेरिकेच्या शासनाशी करार करून त्यावर स्वाक्षर्‍या केल्या जातील. 

सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये सद्गुरुपदी विराजमान !

पू. (कु.) स्वाती खाडये यांचा सत्कार
करतांना पू. नंदकुमार जाधव
    नाशिक, २३ सप्टेंबर (वार्ता.) - साधनेतील प्रगतीची आनंदवार्ता साधकांना अनपेक्षितपणे देऊन अचंबित करणार्‍या (सरप्राईज देणार्‍या) सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांना २३.९.२०१५ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अचंबित केले. निमित्त ठरले ते पू. स्वातीताईंनी सद्गुरुपदी विराजमान होण्याचे! येथील सिंहस्थपर्वात आज एक संत येणार म्हणून साधकांनी भावपूर्ण सिद्धता केली. संतांचे आगमन होण्यापूर्वी पू. (कु.) स्वातीताई यांनी गुरुमाऊलींची मानसपूजा करवून घेतली. या वेळी उपस्थित सर्वच साधकांनी गुरुमाऊलींचे अस्तित्व जाणवणे, भाव दाटून येणे, अशा प्रकारच्या अनुभूती आल्या. तेव्हा याचे गुपित पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उलगडले. सर्व साधकांमध्ये भाव निर्माण करून सिंहस्थपर्वाचे यशस्वी आयोजन करणार्‍या पू. (कु.) स्वातीताई या सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी घोषित केल्याचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगताच पू. ताईंसह सर्व साधक भावानंदाने न्हाऊन निघाले अन् थोड्याच वेळात वरुणराजानेही आशीर्वाद दिला.

पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी !

उजवीकडे तहसीलदार सौ. सरनोबत निवेदन स्वीकारतांना
गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
ईश्‍वरपूर येथे तहसीलदारांना हिंदुत्ववाद्यांकडून निवेदन
      ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), २३ सप्टेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी, असे निवेदन समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने ईश्‍वरपूर येथे तहसीलदार श्रीमती रूपाली सरनोबत यांना देण्यात आले. या वेळी राष्ट्रप्रेमी सौ. विमल थोरात, सौ. सुजाता शेवाळे, सौ. सारिता थोरात, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्ता भारती जैन, राजाराम मोरे, सनातन संस्थेच्या वतीने सौ. सुजाता शहा उपस्थित होते. या निवेदनावर श्रीशिवप्रतिष्ठान
श्री. गजानन पाटील, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अनिल वाळवेकर आणि भाजपचे श्री. अर्जुन बाबर यांनी स्वाक्षरी केली आहे.

४ सहस्र वर्षांपूर्वी संपूर्ण विश्‍वात केवळ हिंदूच होते ! - श्री. रमानंद गौडा, सनातन संस्था

      १२० वर्षांपूर्वी बहाई पंथाचा उदय झाला. १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी या भूमीवर एकही मुसलमान नव्हता. २ सहस्र १०० वर्षांपूर्वी एकही ख्रिश्‍चन नव्हता. ४ सहस्र वर्षांपूर्वी एकही ज्यू पंथीय नव्हता. ४ सहस्र वर्षांपूर्वी संपूर्ण विश्‍वात केवळ हिंदूच होते. हा इतिहास आम्हाला शिकवला जात नाही; परंतु भारतात आर्य म्हणजे हिंदू बाहेरून आले, असे शिकवले जाते. प्राचीन काळात संपूर्ण जगात वैदिक सनातन संस्कृती वैभवाने मिरवत होती आणि आज देशातही तिचे अधःपतन होत आहे. त्यामुळे विश्‍वात पुन्हा या संस्कृतीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.

असदुद्दीन ओवैसी एखाद्या वेश्येप्रमाणे बोलतात ! - योगी आदित्यनाथ

असे साहस केवळ योगी आदित्यनाथच करू शकतात !
योगी आदित्यनाथ
     गोरखपूर (उत्तरप्रदेश) - मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एम्आयएम्) पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दिन ओवैसी यांचे बोलणे एखाद्या वेश्येप्रमाणे असते, असे विधान भाजपचे नेते आणि खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले. दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे मुसलमान असूनही राष्ट्रभक्त होते, असे केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी म्हटले होते. त्याच्या या विधानावर ओवैसी यांनी टीका केली होती. त्या वेळी ओवैसी यांनी केलेली वक्तव्ये ही एखाद्या वेश्येने पतीव्रतेला उपदेश देण्याप्रमाणे होती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी ओवैसी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 
     योगी पुढे म्हणाले, शर्मा काहीही चुकीचे बोललेले नाहीत. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत निराळी असते. भारतीय संस्कृती आणि धर्म याविषयी ओवैसी यांनी बोलण्याची आवश्यकता नाही.

आप पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

सोमनाथ भारती गायब !
     नवी देहली, २३ सप्टेंबर - कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप असलेले आम आदमी पक्षाचे आमदार आणि देहलीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज देहली उच्च न्यायालयाने फेटाळला. तसेच त्यांच्याविरोधात अटक वॉरेंट बजावले. तेव्हापासून भारती गायब झाले आहेत.
      भारती यांच्या पत्नीने त्यांच्याविरूद्ध कोटुंबिक हिंसाचार केल्याचा आरोप केला आहे. याविरोधात भारती यांनी देहली उच्च न्यायालयात अटक टाळण्याच्या उद्देशाने अर्ज केला होता. या याचिकेवर सुनावणी करत असतांना न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. भारती यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. पत्नीच्या भोळेपणाचा अपलाभ घेत विरोधी पक्षांनी राजकारण केल्याचा आरोप भारती यांनी केला आहे.

अमेरिकेतील पाटीदार समाज नरेंद्र मोदी यांचे स्वागत करणार

     शार्लोट (अमेरिका) - गुजरातामधील पटेल समाजाने आरक्षण मिळण्यासाठी प्रारंभ केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ सप्टेंबर या दिवशी होणार्‍या प्रस्तावित अमेरिका दौर्‍यात मोदी यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकून त्यांच्याविरुद्ध निदर्शने करण्याचा मनोदय पटेल समाजाने व्यक्त केला असतांना पटेल समाजातीलच एक मोठा वर्ग असलेल्या पाटीदार समाजाने नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती अमेरिकेतील पाटीदार समाजाचे नेते बलदेव ठाकोर यांनी दिली.

ऑस्ट्रेलियाने केलेल्या पहिल्याच हवाई कारवाईत आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांची अनेक वाहने नष्ट

ऑस्ट्रेलिया परराष्ट्रातील आतंकवाद्यांच्या विरोधात मोहीम उघडते, 
आम्ही देशातीलच आतंकवाद्यांना धडा शिकवत नाही ! 
     मेलबर्न - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेविरुद्धच्या मोहिमेत आता ऑस्ट्रेलियानेही उडी घेतली असून त्यांनी केलेल्या पहिल्याच हवाई कारवाईत आतंकवाद्यांची अनेक वाहने नष्ट करण्यात आली. या कारवाईला आय.एस्.आय.एस्.कडूनही प्रतिकार करण्यात आला; मात्र यात त्यांना यश आले नाही, असे ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री केव्हिन ऍण्ड्र्यूज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.
  या हवाई आक्रमणांमध्ये आतंकवाद्यांना मुख्य लक्ष्य करण्यात आले आहे. या आक्रमणाच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेण्यात आली. यासाठी काही दिवस अगोदर योजना तयार करण्यात आली होती. तथापि या हवाई आक्रमणात किती आतंकवादी ठार झाले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले. येत्या काळात सिरिया आणि इराक या देशांमध्ये हवाई आक्रमणे तीव्र करण्याची मोहीम आखली जाणार आहे, असे या प्रवक्त्याने म्हटले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मुसलमान नागरिक लायक नाही !

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराचे मत 
     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी मुसलमान नागरिक उमेदवार म्हणून लायक नाहीत; कारण त्यांची ज्यावर श्रद्धा आहे तो इस्लाम धर्म हा अमेरिकेच्या मूलभूत मूल्यांशी सुसंगत नाही, असे मत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बेन कार्सन यांनी व्यक्त केले आहे. (मुसलमानांची निष्ठा प्रथम त्यांच्या धर्मावर असते आणि नंतर ते रहातात त्या भूमीवर असते, ही बाब जाणून त्याविषयी परखडपणे मत मांडणारे कार्सन !- संपादक)
     कार्सन म्हणाले, "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची श्रद्धा ही या देशाच्या राज्यघटनेच्या विरोधी असता कामा नये. त्यासाठी या देशाचे नेतृत्व एका मुसलमानाच्या हाती देण्यास माझा विरोध आहे." कार्सन यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरांतून टीका करण्यात येत आहे.

सनातन संस्थचे कार्य अतिशय चांगले ! - स्वामी अवधेशानंदगिरी महाराज

(उजवीकडून) स्वामी अवधेशानंदगिरी महाराज,
पू. डॉ. पिंगळे, पू. (कु.) स्वाती खाडये आणि अन्य
     नाशिक, २३ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे कार्य वर्ष २००३ पासून पहात असून संस्थेचे कार्य अतिशय चांगले आहे. मी आपले ग्रंथ पाहिलेले आहेत. ठिकठिकाणी होणार्‍या माझ्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हा, तुमचा विषय मांडा, असे मत जुना पिठाधीश्‍वर आचायर्र् महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले. त्यांनी लगेच त्यांच्या मुंबई आणि हरिद्वार येथील भक्तांना संपर्क करून त्यांच्या संपर्कात रहाण्यास सुचवले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्र्यंबकेश्‍वर येथे त्यांची सदिच्छा भेट घेतली असता स्वामी अवधेशानंदगिरी महाराज बोलत होते.

श्री. वीरेंद्र मराठे यांची मुलाखत प्रसिद्ध करतांना मुंबई मिरर या दैनिकाने केलेला विपर्यास आणि खुलासा

     मुंबई मिरर या इंग्रजी दैनिकाच्या पत्रकार अलका धुपकर यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला १९ सप्टेंबरला भेट देऊन श्री. वीरेंद्र मराठे यांच्याशी संस्थेचे कार्य आणि भूमिका यांविषयी मराठी भाषेत मुलाखत घेऊन माहिती घेतली होती. त्यानंतर २१ सप्टेंबरला मुंबई मिरर यामध्ये Politicians should start Sadhana (राजकारण्यांनी साधनेला प्रारंभ करावा !) या मथळ्याखाली इंग्रजीत लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात काही सूत्रांची मोडतोड करण्यात आली आहे. त्याचा खुलासा अलका धुपकर यांना पाठवूनही त्यांनी तो गेले दोन दिवस प्रसिद्ध केलेला नाही. तो येथे प्रसिद्ध करत आहोत.

धर्मशास्त्राचे अभ्यासक नसलेले अंनिसचे हमीद दाभोलकर देणार गणेशभक्तांना विसर्जनाच्या सूचना !

न्यायालयात गेल्यावर अधिवक्त्यांचेच ऐकावे लागते, रुग्णाईत असल्यास वैद्यांचाच सल्ला
घ्यावा लागतो, तसे धर्मशास्त्राच्या संदर्भात धर्मातील अधिकारी व्यक्तींचेच एकले, तर ते योग्य ठरते. गणेशमूर्ती विसर्जनाविषयी धर्मशास्त्राचा अभ्यास असणार्‍यांच्या सूचना घ्या ! - संपादक
     सातारा, २३ सप्टेंबर (वार्ता.) - सातारा जिल्ह्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर हे सदस्य असणार असून गणेशमूर्ती विसर्जनाविषयी सूचना करणार आहेत. (श्रद्धेच्या क्षेत्रात सूचना देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनवादी हमीद दाभोलकर यांना आमंत्रण देणे, हे हास्यास्पद आहे. धर्मशास्त्रानुसारच विसर्जन करून गणेशतत्त्वाचा लाभ घ्या ! - संपादक)

१२ पैकी ८ दोषींना फाशी देण्याची मागणी : ३० सप्टेंबरला निकाल

मुंबईतील ११ जुलै २००६ च्या बाँबस्फोट मालिकेचे प्रकरण 
     मुंबई - येथे ११ जुलै २००६ या दिवशी झालेल्या बाँबस्फोट मालिकेत १८८ जणांचा मृत्यू, तर ८२९ जण घायाळ झाले होते. या प्रकरणाची अंतीम सुनावणी न्यायालयात चालू आहे. 
     १२ धर्मांधांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी शासकीय अधिवक्त्यांनी २३ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत ८ जणांना फाशी आणि उरलेल्या ४ जणांना जन्मठेप देण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील निकाल ३० सप्टेंबर या दिवशी देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. 
     राज्याच्या एका महत्त्वाच्या बाँबस्फोट मालिकेविषयीचा खटला अंतिम टप्प्यात आल्यानंतर त्याविषयी काँग्रेसवाले ब्रही काढत नाही; मात्र सनातन संस्थेच्या साधकाला संशयित म्हणून अटक झाल्यानंतर ते सनातनवर बंदी घाला, अशी मागणी करत आहेत. यावरून काँग्रेसवाल्यांचे लांगूलचालनाचे धोरण स्पष्ट होते, अशी चर्चा राष्ट्रप्रेमी नागरिकांत चालू आहे.

नाशिक येथे तथाकथित पुरोगाम्यांनी सनातनच्या विरोधात केले धरणे आंदोलन : मोर्चा काढण्याचा निर्णय बारगळला !

       नाशिक, २३ सप्टेंबर (वार्ता.) - राज्यघटनाविरोधी कार्य करणारी सनातन संस्था आणि सिमी या संस्थांवर कठोर कारवाई करा, असे निवेदन लोकशाही हक्क संरक्षण समितीने जिल्हाधिकार्‍यांना दिले. त्यापूर्वी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या समितीच्या वतीने दुपारी १२ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सनातनच्या विरोधात भव्य मोर्चा काढणार असल्याचे वृत्त २० सप्टेंबरपासून येथील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत होते; मात्र मोर्चा काढण्याऐवजी त्यांना धरणे आंदोलन करावे लागले. सनातनला लोकशाहीविरोधी ठरवणार्‍या या समितीने मात्र या वेळी वाटलेल्या पत्रकावर मुद्रक आणि प्रकाशक यांचे नाव प्रसिद्ध केलेले नाही. लोकशाहीचा मक्ता घेतांना दिलेल्या घोषणांमधून साम्यवादांचा खरा हिंसक चेहरा पुन्हा उघड पडला.

काशी येथे गंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनाला प्रशासनाचा नकार

चैतन्यमय आणि उत्साहाच्या वातावरणात खर्‍या अर्थाने सण साजरे करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
पोलिसांच्या लाठीमारात स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद घायाळ
      काशी - गंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनाच्या मागणीसाठी येथील गोदौलिया चौकात धरणे आंदोलन करणार्‍या हिंदूंवर पोलिसांनी रात्री २ वाजता बेदम लाठीमार केला. या लाठीमारात शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद आणि सनातन धर्म इंटर महाविद्यालयाचे प्राचार्य हरेंद्र राय यांच्यासह अनेक हिंदू घायाळ झाले.
     काशी प्रशासनाने नदी प्रदूषणाचा उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगून हिंदूंना गंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनास बंधन घातले होते. या विरोधात हिंदुत्ववाद्यांकडून दोन दिवसांपासून येथील गोदौलिया चौकात धरणे आंदोलन चालू होते. हे आंदोलन बंद करण्याची चेतावणी प्रशासनाने दिली होती; मात्र आंदोलकांनी माघार न घेतल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

सध्या सनातनवर बंदीचा प्रस्ताव नाही ! - गृहराज्यमंत्री

      पुणे - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण सर्वांगीण बाजूने करण्यात येत आहे. त्यातून जे तथ्य समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल. सर्व लोकप्रतिनिधी, संघटना यांनी अन्वेषणासाठी सहकार्य करावे. त्यांनी आततायीपणाने अन्वेषणाला कोणतीही दिशा देण्याचा प्रयत्न करू नये. मिडिया ट्रायल घेऊन कोणतेही निष्कर्ष काढू नयेत. तसे झाले, तरच पोलीस यंत्रणा हे अन्वेषण निःपक्षपातीपणे करू शकेल. अन्वेषणातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल. सध्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विचार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

सनातन संस्था सत्य आणि धर्म यांच्या बाजूने असल्यानेच संत, हिंदुत्ववादी संघटना अन् धर्मप्रेमी यांचा पाठिंबा !

      मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एका निष्पाप साधकाला पकडून सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांचा आवाज वाढला असतांना, दुसरीकडे सनातन संस्था सत्य आणि धर्म यांच्या बाजूने असल्याने सत्यमेव जयते या वचनानुसार संत, हिंदुत्ववादी संघटना आणि धर्मप्रेमी यांनी सनातनला दिलेला पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच आहे, असे मत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी व्यक्त केले आहे.
      नाशिक येथील सिंहस्थपर्वात पश्‍चिमाम्नाय द्वारका शारदापीठ एवं उत्तराम्नाय ज्योतिषपीठ यांचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती यांच्यासह स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी साधू, संत, महंत, वारकरी, सत्पंथी संप्रदाय आदींनी सनातनला एकमुखी पाठिंबा दिला आहेे, असे यात पुढे म्हटले आहे.

या प्रकरणी व्यक्तीश: लक्ष घालू ! - भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ

राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदन !
      या प्रकरणी व्यक्तीश: लक्ष घालू, असे आश्‍वासन सांगली विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी दिले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. श्रीकृष्ण माळी, सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर उपस्थित होते.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी ! - जत येथे निवेदन

      जत (जिल्हा सांगली), २३ सप्टेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी, असे निवेदन समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने २३ सप्टेंबर जत येथे तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. संभाजीराव भोसले, सरदार यशवंतराव जाधव, सर्वश्री विजय शंकरराव चव्हाण, आेंकार सोनार, रणजित ओसवाल, सौ. मंदाकिनी जिगजेणी, सनातन संस्थेचे श्री. इरगोंडा पाटील, सौ. निला हत्ती, तसेच अन्य उपस्थित होते.

नाशिक येथे सनातनवरील बंंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

सनातनवरील बंदीची मागणी हा निवळ हिंदुद्वेष !
      नाशिक, २३ सप्टेंबर (वार्ता.) - कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना केवळ संशयित म्हणून अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी चालू असतांना सनातनवर बंदीची मागणी करणे हा केवळ हिंदुद्वेषच नसून न्यायप्रक्रियेचा आणि पर्यायाने घटनेचाही अवमान आहे. त्यामुळे शासनाने यास भीक घालू नये, अशी मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी येथे केली. सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात विविध हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आणि त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले.

राष्ट्रद्रोही हू किल्ड करकरे ? या पुस्तकावर बंदीच हवी !

सुनील घनवट यांची साम वाहिनीवर आग्रही मागणी
श्री. सुनील घनवट
    मुंबई - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आक्रमणाविषयी न्यायालयाने पाक आणि कसाब यांना दोषी घोषित केले. कसाबला फाशी दिली; मात्र तो निर्णय अमान्य करत माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ आणि माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी या प्रकरणी पुण्यातील ब्राह्मणांना दोषी ठरवले आहे. मुश्रीफ यांनी हू किल्ड करकरे ? या पुस्तकात तसे जातीयवादी लिखाण केले आहे; मात्र तत्कालीन शासनामध्ये मुश्रीफ यांचे भाऊ मंत्री असल्याने त्यावर बंदी आली नाही. त्यामुळे या देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेचा अवमान करणार्‍या जातीयवादी लिखाणावर भाजप शासनाने बंदी घातलीच पाहिजे, अशी खणखणीत मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. हिंदु जनजागृती समितीने कोल्हापुरात आंदोलनाद्वारे हू किल्ड करकरे ? या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केल्यानंतर साम वाहिनीवर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. २२ सप्टेंबराला रात्री ८ वाजता झालेल्या या चर्चासत्रात भाजपचे श्री. गणेश हाके, काँग्रेसचे राजू वाघमारे, बी.जी. कोळसे-पाटील, विलास रणसुबे सहभागी झाले होते. संजय आवटे यांनी सूत्रनिवेदन केले.

आतंकवादी निर्माण करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकवा !

फलक प्रसिद्धीकरता
      पाकिस्तानातील एक सहस्रहून अधिक आतंकवादी जम्मू-काश्मीर सीमेतून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत; मात्र भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे या आतंकवाद्यांचे मनसुबे अयशस्वी ठरत असून ते मोठ्या प्रमाणावर हानी सोसत आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
eka sahastrase jada Pakistani atankvadionka Bharatme ghuspeth karneka prayas.
Hum Pak ko kada sabak kab sikhayenge ?
जागो ! 
एक सहस्रसे जादा पाकिस्तानी आतंकवादीआेंका भारतमें घुसपेठ करनेका प्रयास.
हम पाक को कडा सबक कब सिखाएंगे ?

(म्हणे), राजाश्रयामुळे सनातन संस्थेकडून राजकीय आतंकवाद !

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बिनबुडाचे आरोप
सनातन संस्थेचे प्रमुख आणि सनातन प्रभातचे संपादक यांच्या अटकेची मागणी
      पुणे, २३ सप्टेंबर (वार्ता.) - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेच्या साधकाला अटक करण्यात आली. ज्या प्रकारे सनातन प्रभातमधून लिखाण करण्यात येते, पोलीस, पत्रकार यांना धमक्या देण्यात येतात, पत्रकार परिषदेत पुढे जाऊन छायाचित्रे काढली जातात, ते पहाता या संघटनेवर बंदीच घालायला हवी. ही एक प्रकारची आतंकवादी संघटना आहे. ही मंडळी उघडपणे धमक्या देऊनच बोलत असतात. राजाश्रय असल्यामुळेच त्यांच्याकडून असे उद्दाम लिखाण केले जाते.

तथाकथित पर्यावरणवादी आणि प्रशासन यांच्या आवाहनाला धुडकावून भाविकांनी निर्माल्याचे केले वहात्या पाण्यात विसर्जन !

चिपळूण येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या प्रबोधन मोहिमेला यश !
     चिपळूण, २३ सप्टेंबर - जिल्हा प्रशासन, चिपळूण नगर परिषद आणि हिंदूंच्या उत्सवप्रसंगी जागे होणारे तथाकथित पर्यावरणवादी यांनी निर्माल्यामुळे जलप्रदूषण होते, असा कांगावा करत श्री गणेशभक्तांना निर्माल्य वहात्या पाण्यात विर्सजित न करता विर्सजनस्थळी ठेवण्यात आलेल्या कुंडीत जमा करण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन धुडकावून भाविकांनी निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित केले. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने वाशिष्टी नदी अन् नाईक कंपनी या विसर्जनस्थळी निर्माल्य आणि गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित कराव्यात आणि पर्यावरणाला हानीकारक ठरणारे थर्माकोल, प्लास्टिक यांसारख्या वस्तू पाण्यात न टाकता कुंडीत जमा कराव्यात, असे आवाहन करत प्रबोधन मोहीम राबवली.

गणेशोत्सवातील धर्महानीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याने दिलेला लढा आणि ईश्‍वराच्या कृपेने त्यात मिळालेले यश !

    एका राज्यातील एका जिल्ह्यातील एका गावात श्री गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी गणपतीच्या समोरून येणार्‍या एका वाहनात युवक डी.जे. लावून एका अश्‍लील गाण्यावर नाचत होते. ही अनिष्ट प्रथा बंद व्हावी, यासाठी केलेले प्रयत्न आणि गुरुकृपेने त्यात आलेले यश यांविषयी पुढे देत आहे.
१. गणपतीच्या मिरवणुकीत अश्‍लील गाण्यांवर नाचणे योग्य नसल्याचे
गणेशोत्सवाच्या अध्यक्षांना सांगितल्यावर त्यांनी त्याविषयी कार्यवाही करण्यास असमर्थता दर्शवणे
मी गणेशोत्सवाच्या अध्यक्षांकडे गेलो होतो. त्या वेळी आमच्यात झालेले संभाषण पुढे देत आहे.
मी : हे गाणे लावून गणपतीच्या पुढे नाचणे चांगले वाटत नाही. त्यामुळे तुम्ही ते थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी सनातनविरोधकांच्या डोळ्यांत घातले झणझणीत अंजन

हिंदु धर्मियांचे खच्चीकरण करणारे या देशाचे शत्रूच !
झी २४ तास वृत्तवाहिनीवर पुरोगामी आतंकवादाचा फुगा फोडला 
चर्चासत्रात बोलतांना श्री. संजीव पुनाळेकर
     मुंबई - भारतात कुठल्याही प्रकारचा आध्यात्मिक आतंकवाद अस्तित्वात नाही. आध्यात्मिक आतंकवाद अस्तित्वाद असलाच, तर तो आखाती देश किंवा इस्लामी देशांत अस्तित्वात आहे. पुरोगामित्वाच्या नावाखाली येथील राष्ट्रवाद चिरडणारे, अंधश्रद्धेच्या नावाखाली येथील तरुणांचे खच्चीकरण करणारे, ऋषीतुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संदर्भात वाद निर्माण करणारे, सुधारणावादाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर आघात करणारे म्हणजेच धर्माचे खच्चीकरण करणारे लोक हे या देशाचे शत्रू आहेत, असे ठाम मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी सडेतोडपणे मांडले. यामुळे पुरोगामी आतंकवादाचा फुगा फुटला आणि सनातनविरोधकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले गेले.

सेल्फी, महामोदक आणि उंच मूर्ती : भक्ती कुठे ?

     गणेशोत्सव चालू असल्याने वातावरण श्री गणेशमय झाले आहे. भाविक मंडळी या पर्वणीचा लाभ करून घेण्यासाठी श्री गणेशाची या काळात अधिकाधिक आराधना करत असतात. केवळ प्रसिद्धीसाठी आता देवांनाही व्यावसायिक स्वरूप देणार्‍यांची आपल्याकडे काही न्यूनता नाही. काही वृत्त वाहिन्यांनी श्री गणेशमूर्तीसोबत छायाचित्र काढून त्यांना पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यांची ती गणेशमूर्तीसमवेत काढलेली सेल्फी (स्वतःने स्वतःचे काढलेले छायाचित्र) वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात येत आहेत.

झारखंड राज्यातील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसारकार्याचा ऑगस्ट २०१५ चा आढावा

१. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !
१ अ. निवेदने देणे
१. १५.८.२०१५ या दिवशी जमशेदपूर येथील २५ आणि धनबाद येथील ४ शाळांमध्ये समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली.
२. धनबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि जमशेदपूर येथील ४ पोलीस ठाणे यांना निवेदने देण्यात आली. समितीच्या कार्यकर्त्यांनी मागील २ - ३ वर्षांपासून प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या विक्रीवर बंदी घालण्याविषयी निवेदने दिली होती. याचा परिणाम म्हणून या वर्षी धनबाद, कतरास आणि जमशेदपूर येथे प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री झाली नाही.
२. शाळांमधून प्रबोधन
२ अ. श्री. प्रदीप खेमका यांनी राष्ट्राची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर २ सहस्र विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे : कतरासमधील श्यामडीह येथील सरस्वती शिशुमंदिर विद्यालयाच्या वतीने सनातनचे साधक श्री. प्रदीप खेमका यांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्राची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाययोजना, राष्ट्ररक्षण आणि राष्ट्राचे उत्थान यांचे महत्त्व, तसेच यासाठी आपण कोणते प्रयत्न केले पाहिजेत ? यांविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ २ सहस्र विद्यार्थी आणि १०० पालक यांनी घेतला. यानिमित्ताने समितीच्या वतीने विद्यालयात वंदे मातरम्चे फ्लेक्स फलक लावण्यात आले होते.
२ आ. जमशेदपूरमधील शाळेत विद्यार्थ्यांचे प्रबोधन ! : जमशेदपूरमधील आर.एम.एस्. माध्यमिक शाळा आणि डी.ए.व्ही. कन्या शाळा (सोनारी), येथे सनातनच्या साधिका सौ. माधुरी देवरस यांनी आपण राष्ट्रहितासाठी योगदान कसे देऊ शकतो ? आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा ठेवावा ?, यांविषयी प्रबोधन केले.

झारखंड राज्यातील सनातन संस्थेच्या प्रसारकार्याचा ऑगस्ट २०१५ चा आढावा

१. गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंदप्राप्तीसाठी साधना या विषयावर प्रवचन आयोजित : धनबाद येथील डी.ए.व्ही. विद्यालयाचेे प्राचार्य श्री. आशुतोष कुमार यांनी १७.८.२०१५ या दिवशी त्यांच्या घराच्या गृहप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने सनातनच्या साधकांना प्रवचन घेण्यासाठी आमंत्रित केले होते. याप्रसंगी धनबाद येथील साधिका सौ. नीलम सिन्हा यांनी आनंदप्राप्तीसाठी साधना या विषयावर प्रवचन घेतले.
२. कतरास येथील राणी सतीदीदी मंदिरात सावनमेळ्यात ग्रंथ आणि सात्त्विक वस्तू यांचे प्रदर्शन ! : १७.८.२०१५ या दिवशी कतरास येथील राणी सतीदीदी मंदिरात महिला सदस्यांकडून सावनमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सनातनच्या साधिकांकडून सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. या कक्षावरील साधिकांनी नामजप, सत्संग यांचे महत्त्व, तसेच सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची माहिती दिली.

विविध मार्गांनी भारतियांमध्ये निर्माण झालेली पराभूत मानसिकता

१. ब्रिटिशांची कुटीलता - आमचे सर्वच कसे श्रेष्ठ आणि
भारतीय सर्वच कसे सडके आहे, असे सतत भारतियांच्या गळी उतरवणे
     जुनी व्यवस्था, जुनी राजवट, जुने राजे, एवढेच नव्हे, तर जे जे भारतीय आहे, ते कसे कुजके, नासके आणि सडके आहे, हे जित समाजाला दाखवून देणे, ही ब्रिटिशांची राजकीय आवश्यकता होती. आम्ही कसे श्रेष्ठ आहोत, हे समाजाच्या मनावर ठसवणे आणि केवळ तुमच्या उद्धारासाठीच आम्ही तुमच्यावर राज्य करत आहोत, तुम्ही एकदा का शहाणे झालात की, आम्ही आपणहून भारत सोडून जाऊ, हे भारतियांच्या गळी उतरवणे, ही खास ब्रिटीश कुटीलता होती.

मुंबईतील धर्माभिमानी श्री. प्रशांत वैती यांनी समितीशी संपर्क झाल्यामुळे अनुभवलेले स्वतःतील आमूलाग्र पालट आणि राष्ट्रीय शिबिराच्या निमित्ताने अनुभवलेले आश्रमातील चैतन्यमय वातावरण

१. समितीच्या संपर्कात येण्यापूर्वी मनाची स्थिती
      पूर्वी मन अस्थिर होते, त्यामुळे लगेच तणावाखाली जायचे. घरच्या लोकांचा किंवा मित्रांचा लहानसहान गोष्टींवरून मला राग यायचा.
२. समितीच्या संपर्कात आल्यावर झालेले पालट
२ अ. नम्रता येऊन रागाचे प्रमाण न्यून होणे : साधकांची बोलण्याची पद्धत पाहून माझ्यात नम्रता आली आणि रागाचे प्रमाण न्यून झाले. बोलतांना कसे बोलले पाहिजे, परिस्थिती काय आहे आणि आपण कुणाशी बोलत आहोत, अशा प्रकारचे विचार येऊन आता प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोलण्याची सवय झाली आहे.

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तपत्रांची माहिती कळवा !

     कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तवाहिन्यांची माहिती कळवा !

     कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून सनातन संस्थेविषयी मानहानीकारक वृत्ते वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होत असल्यास त्याविषयी त्वरित दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात (०८३२) २३१२६६४ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे. ज्यांच्याकडे वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून ते vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावे आणि त्याविषयी अधिवक्ते नागेश ताकभाते (दू.क्र. ८४५१००६०५८) यांना कळवावे.

उत्सवकाळात शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह !

      श्री गणेशमूर्तींचे मंगलमूर्ती मोरया या गजरात विसर्जन करतांना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देश आर्थिक संकटात असतांना आणि आतंकवादाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा करण्याची लाजिरवाणी स्थिती आली असतांना शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह आहे !

महाराष्ट्रात मराठीला मानाचे स्थान देण्यासाठी कठोर धोरणे राबवण्याची आवश्यकता !

      परक्या (इंग्रजी) भाषेची उच्चता देशात राहू दिली, तर ती भाषा ज्यांची (इंग्रजांची) जन्मभाषा आहे, त्यांचे उच्चवर्गातील स्थान आपल्याला मान्य करावे लागेल. म्हणूनच -
अ. देशी भाषेत राज्य चालवणारे शासन लवकर स्थापित करावे.
आ. जो कायदा मराठीत नसेल, तो महाराष्ट्रास बंधनकारक नसावा.
इ. सर्व न्यायाधिशांच्या निवाड्याची भाषा मराठीच असावी.
ई. मराठी भाषेत महाराष्ट्राचा राज्यकारभार चालणे, म्हणजे देशी भाषांमध्ये राज्य चालवणे, याला मी स्वराज्य मानतो !
- ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर (१९२८)
(दैनिक लोकसत्ता, १५.७.२०१२)

प्रतिवर्षी अनुमाने १५० ते १७२ दिवस कर्मचार्‍यांना सुट्या देणारा जगातील एकमेव देश भारत !

अ. प्रतिवर्षी रविवार, दुसरा अन् चौथा शनिवार, सार्वजनिक दिवस (राष्ट्रीय दिन अन् सण) आदी मिळून अनुमाने ११५ दिवस शासकीय सुट्या असतात.
आ. सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी नैमित्तिक (प्रतिमास १ सुटी याप्रमाणे १२ दिवस) आणि आजार (१५ दिवस), तसेच अधिकाराची सुटी (प्रिव्हीलेज लीव्ह) (१ मास), अशा एकूण ५७ सुट्ट्या कर्मचार्‍याला घेता येतात.
एकूणच प्रतिवर्षी अनुमाने १५० ते १७२ दिवस शासन / आस्थापन यांच्याकडून सुट्टी दिली जाते. जगातील कोणत्याही देशात सुट्यांचे असे प्रमाण नसते.
सुट्ट्यांविषयी हिंदु राष्ट्रातील दृष्टीकोन !
      हिंदु राष्ट्रात कौटुंबिक कामे करण्यासाठी साप्ताहिक सुटी असेल. शासनाच्या कार्यालयांसह सर्व खाजगी आस्थापनांचे काम इतर सहा दिवस चालेल. काम / श्रम / सेवा, ही साधना आहे, हा दृष्टीकोन असल्याने अधिकारी अन् कर्मचारी केवळ आजार, मंगलकार्ये इत्यादी आवश्यक कारणांसाठी वैयक्तिक पातळीवर सुटी घेतील. तात्पर्य, सुटी हा अधिकार (हक्क) नसेल, तर सोय असेल.

साधकांनो, आतून होत असलेला नामजप बंद पडू नये, यासाठी त्या नामजपाच्या अनुसंधानात रहा !

    काही साधकांना अंतर्मुख झाल्यावर जाणवते की, त्यांचा आतून नामजप चालू आहे. देवाच्या कृपेने हे चांगले लक्षण आहे; पण ही जाणीव त्यांना सतत असत नाही. केवळ अंतर्मुख झाल्यावरच असते. त्यामुळे अशा साधकांनी आपला नामजप होत आहे, या भरवशावर राहू नये, तर आतून होत असलेल्या नामजपाकडे अधून मधून लक्ष ठेवावे, म्हणजेच नामजपाच्या अनुसंधानात रहावे. तसेच त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. यामुळे आतून होत असलेला नामजप बंद पडणार नाही. - (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०१५)      

चतुर्थ अखिल भारतीय हिंंदू अधिवेशनाच्या कालावधीत संतांसाठी भाकरी करण्याची सेवा करतांना साधिकेने अनुभवलेला कृष्णानंद !

कु. रुक्मिणी खंडागळे
     चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या कालावधीत (१० ते १७ जून २०१५) आश्रमात आलेल्या संतांसाठी भाकरी करण्याची सेवा करत असतांना मला आतून पुष्कळ आनंद व्हायचा. ही सेवा करायला विभागात येतांना संत हे कृष्णाचे समष्टी रूप असल्यामुळे प्रत्यक्ष कृष्णासाठीच भाकरी करायची आहे, या विचाराने मी कृष्णालाच म्हणायचे, आज ही सेवा कशी करू ? यामध्ये काय काय असायला हवे ?, हे तू मला शिकव. मी अज्ञानी आणि असमर्थ आहे. कसे शिकायचे ?, ते मला कळत नाही. तूच सेवा करवून घे. असे कृष्णाशी बोलत बोलत सेवेला येतांना माझ्यासह विशाल रूप असलेला कृष्ण सतत समवेत असलेला जाणवायचा.

सतत आनंदी, हसतमुख असलेल्या आणि सेवेची तीव्र तळमळ अन् व्यष्टी साधनेचे गांभीर्य यांमुळे ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी प्राप्त करणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील सौ. सुधा बिलावर !

सौ. सुधा बिलावर
     गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. सुधा बिलावर या कोल्हापूर आणि बेळगाव या शहरांच्या वितरक म्हणून सेवा करतात. ५.९.२०१५ या दिवशी, म्हणजे गोकुळाष्टमीला त्यांचा आध्यात्मिक स्तर ६१ प्रतिशत झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या नाशिक येथे कुंभमेळ्याच्या निमित्ताने सेवा करण्यासाठी आल्या आहेत. कुंभपर्वामध्ये त्यांच्याकडे मोठे दायित्व असतांना काकू स्थिर राहून सेवा करत असल्याचे लक्षात आले. कुंभपर्वाच्या सेवेसाठी त्यांनी ३ मास येण्याची सिद्धता दर्शवली. त्यांच्या तळमळीमुळेच त्यांचे संपूर्ण कुटुंब साधनेत आहे. साधकांना मिळालेली पूर्वसूचना आणि जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

ग्रंथात सांगितल्यानुसार प्रत्येक घास श्रीकृष्णालाच भरवत आहे, या भावाने प्रसाद ग्रहण केल्यानंतर भावजागृती होऊन नामजप एकाग्रतेने होऊ लागणे आणि सेवा करतांना ध्यान लागणे

    ३०.५.२०१५ या दिवशी भोजनाच्या आचारांचे शास्त्र भाग १ या ग्रंथाच्या पडताळणीची सेवा करत असतांना खालील ओळी माझ्या वाचनात आल्या.
१. अन्न ग्रहण करत असतांना देवालाच भरवत आहोत या भावाने स्वतःलाच भरवत असतांना केव्हा देव झालो, हे न कळणे, म्हणजेच भोजनातून अद्वैतात्मक सिद्धांत जगणे. या जगण्याला एकरूपतेने जगणे म्हणतात.

आनंदी, हसतमुख असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. ईश्‍वरी आेंकार बोडस (वय १ वर्ष) !

कु. ईश्‍वरी बोडस
     सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून सेवा करणार्‍या कु. शांभवी केळकर यांची बहीण सौ. मानसी आेंकार बोडस या सातारा येथील साधिका आहेत. सौ. मानसी यांची मुलगी चि. ईश्‍वरी हिचा पहिला वाढदिवस २४.९.२०१५ या दिवशी आहे. त्यानिमित्ताने तिच्या आईने तिच्याविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
 चि. ईश्‍वरी आेंकार बोडस हिला पहिल्या वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. देवीच्या दर्शनाला जातांना कोणताच त्रास न होणे : गर्भारपणात मला उलट्या आणि मळमळणे, असे त्रास होत होते. त्या वेळी आमचे कोल्हापूरला श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जायचे ठरले. प्रवासात कोणताच त्रास जाणवला नाही. दर्शनासाठी मोठी रांग होती. रांगेत उभे राहून आमचे दर्शन चांगले झाले.

प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे होण्यासाठी धडपडणार्‍या आणि आध्यात्मिक आई होऊन साधकांना घडवणार्‍या पू. (कु.) स्वाती खाडये !

      २१.७.२०१५ ते ११.८.२०१५ या कालावधीत मला नाशिक येथे कुंभमेळ्याची सेवा करण्याची संधी मिळाली. या कालावधीत मला पू. स्वातीताईंकडून जे शिकायला मिळाले, ते गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करत आहे.
१. गुरुमाऊलींना अपेक्षित असे होण्यासाठीची तळमळ !
      कोणतेही लहान-मोठे सूत्र असो, ते पूर्ण करतांना गुरुमाऊलींना अपेक्षित असे होण्यासाठीच त्यांची तळमळ असते. त्या तहान-भूक विसरून देहभान हरपून ते सूत्र पूर्ण करतात, उदा. साधकांसाठी कुंभमेळ्याच्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचे नियोजन करायचे होते.

आैंकारानंद महाराज (राजस्थान) यांचे मौलिक विचार !

प.पू. आैंकारानंद महाराज
१. संत आणि परिस
१ अ. संतांच्या सत्संगाने मानवाला ईश्‍वरप्राप्ती होऊ शकणे; पण परिस मात्र लोखंडाविना अन्य कोणत्याच धातूला स्पर्श करून सोने बनवू न शकणे : विश्‍वातील जीवनपद्धतीत प्रमुख दोन भाग आहेत. एक श्रेय मार्ग आणि दुसरा प्रेम मार्ग ! पहिला मार्ग कल्याण आणि भगवंतप्राप्ती करून देतो अन् दुसरा मार्ग संसारातील आसक्ती निर्माण करून पुनर्जन्माची सिद्धता करतो. लौकिक मार्गवादात वर्तमान दृष्टीकोनातून, तसेच अर्थवादामध्ये स्वधर्मसेवेला अधिक मूल्यवान समजले जाते. एका दगडाच्या प्रकाराला परिस (पारस) असे म्हटले जाते. त्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने बनते; परंतु परिस अन्य धातूंना स्पर्श करून सोने बनवू शकत नाही. संतांच्या सत्संगाने मानव ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो. त्यामध्ये भौतिक पदार्थाच्या वस्तूंविषयी गुणभेद नसतात आणि कोणत्याही देश, काल परिस्थितीमध्ये मानवाची प्रगतीच होते.

श्री. भरत आणि सौ. भवानी प्रभु (पूर्वाश्रमाची कु. प्रतीक्षा पडीयार) यांच्या विवाहात अनुभवलेला भावसोहळा !

    २२.१.२०१५ या दिवशी श्री. भरत प्रभु आणि चि. सौ. कां. प्रतीक्षा पडीयार यांचा विवाह सोहळा पार पडला. त्या वेळी मला सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. विवाह सोहळ्याच्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्ये
१. संतांच्या वंदनीय उपस्थितीमुळे सभागृहात सात्त्विकता जाणवणे
    आधुनिक विवाहात असात्त्विक वेशभूषा आणि चित्रपटांतील गाणी आदींमुळे विवाहाचे पावन पर्व रज-तमप्रधान होऊन जाते. त्यामुळे आध्यात्मिक लाभ तर दूरच रहातो; पण तेथील वातावरण रज-तमाने भरून जाते.

आश्रमाभोवती असलेल्या सूक्ष्मातील संरक्षक कवचामुळे आश्रमावर वीज न आदळण्याच्या संदर्भात आलेली अनुभूती

    पू. उलगनाथन्जी रामनाथी आश्रमात आले असतांना ११.५.२०१५ या दिवशी दिवसभरात ६ वेळा काही काळासाठी वीज गेली. एरव्हीही मधेमधे वीज जाते; पण विद्युत्जनित्र यंत्रावर (जनरेटरवर) लगेचच सर्व यंत्रणा चालू होते. आज मात्र वीज गेल्यावर काही काळ सर्व यंत्रणा थांबत होती आणि नंतर पुन्हा चालू होत होती.
    रात्री साधारण ८ वाजता आश्रमातील तिसर्‍या माळ्याच्या मोकळ्या जागेसमोरील कठड्याजवळ मी, कु. मयुरी डगवार आणि कु. कौमुदी जेवळीकर अशा तिघी जणी बोलत उभ्या होतो.

साधकांना सूचना

आपत्काळाची तीव्रता वाढली असल्यामुळे यापुढे ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा नामजप करा !
     सनातनचे साधक सध्या ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । हा नामजप करत आहेत; मात्र आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने सूक्ष्मातून होणारे त्रासही सर्वत्र वाढत आहेत. त्यासाठी यापुढे साधकांनी ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा जप न्यास न करता करावा. जप करतांना अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावण्याची मुद्रा करून हात मांडीवर किंवा खुर्चीच्या हातांवर ठेवावेत.
     जे साधक समष्टीसाठी श्रीकृष्णाचा नामजप करत आहेत, त्यांनी त्या नामजपाऐवजी आकाशदेवाचा वरील नामजप करावा. तसेच त्यांनी पुढील प्रार्थना कराव्यात.

नवरात्रोत्सव आणि दिवाळी यांच्या निमित्ताने प्रसारासाठी प्रबोधनपर भित्तीपत्रके उपलब्ध !

साधकांना सूचना !
                  


आपत्काळाची तीव्रता वाढली असल्यामुळे यापुढे ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा नामजप करा !

साधकांना सूचना !
      सनातनचे साधक सध्या ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । हा नामजप करत आहेत; मात्र आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने सूक्ष्मातून होणारे त्रासही सर्वत्र वाढत आहेत. त्यासाठी यापुढे साधकांनी ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा जप न्यास न करता करावा. जप करतांना अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावण्याची मुद्रा करून हात मांडीवर किंवा खुर्चीच्या हातांवर ठेवावेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.९.२०१५)

साधना

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बुद्धीवाद संपल्यावर ईश्‍वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होणे
      बुद्धीवादाच्या मर्यादा जेथे संपतात, तेथेच ईश्‍वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होतो. इथेच मनुष्य आध्यात्मिक विचार करू लागतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

गुरूंकडे काय मागावे ?

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
     भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

हिंदुहिताचा निश्‍चय !

    देवस्थानांचे अधिग्रहण होऊ देणार नाही, असा निश्‍चय योगऋषी रामदेवबाबा यांनी सिंहस्थपर्वाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक येथे आले असता पत्रकार परिषदेत व्यक्त केला. देवस्थानांचे अधिग्रहण, त्याचे लाभार्थी आणि हानी सोसणारे यांविषयी महाराष्ट्रातील जनता चांगलीच अवगत आहे. आता दक्षिण भारतातही देवस्थानांचे अधिग्रहण करण्याचे काम चालू झाले आहे. हिंदू भाविकांचा या देवस्थान अधिग्रहणाला नेहमीच विरोध असतो. त्यांचा हा विरोध केवळ विरोधासाठी विरोध नसून तत्त्वाला धरून आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn