Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवस्थानांचे अधिग्रहण होऊ देणार नाही ! - योगऋषी रामदेवबाबा

धार्मिकतेमध्ये शासकीय हस्तक्षेप चुकीचा
योगऋषी रामदेवबाबा
     नाशिक, २२ सप्टेंबर - देवस्थानाचा मूळ उद्देश आर्थिक नफा कमवणे, हा नसून समाजाला दिशा देण्याचा आहे. साधूसंतांच्या तपस्येतून देवस्थानाची निर्मिती झालेली आहे. असे असतांना त्यांचे अधिग्रहण करून त्यांच्या मूळ उद्देशावरच शासन घाला घालत आहे. 
    सध्या दक्षिण भारतामध्ये देवस्थानांचे अधिग्रहण केले जात आहे. देवस्थाने शासनाच्या हातात गेल्यास तेथे धार्मिकता अल्प आणि राजकारणच अधिक होऊ शकते. राजकारण्यांचे आचरण हे कितपत शद्ध असते, याविषयीही संशय असल्याने अशा राजकारण्यांपासून देवस्थानांना दूर ठेवणे अधिक चांगले आहे. धार्मिकतेमध्ये शासकीय हस्तक्षेप चुकीचा असल्यामुळे देवस्थानांचे अधिग्रहण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले.

केवळ सनातनद्वेषातून खोटे वृत्त प्रसिद्ध करणारे करावळी कर्नाटक वार्ता!

     कर्नाटकातील करावळी कर्नाटक वार्ता या वृत्तसंकेतस्थळाने त्याच्या संकेतस्थळावर कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी चालू असणार्‍या अन्वेषणाविषयी अत्यंत खोटे आणि सनातनद्वेष्टे वृत्त प्रसिद्ध केले आहे. पानसरेंच्या मारेकर्‍याला पोलिसांनी कसे शोधले ? या मथळ्याखाली १७ सप्टेंबरला दिलेल्या वृत्तातील आक्षेपार्ह भाग आणि वस्तूस्थिती येथे देत आहोत.
धादांत खोटी माहिती देऊन सनातनच्या विरोधात गरळओक करणारे करावळी कर्नाटक वार्ता !
१. वृत्त : गोविंद पानसरे यांचा मारेकरी (हत्येचा सूत्रधार) विशेष शोध पथकातील पोलिसांनी त्याच्यासाठी लावलेल्या जाळ्यात पुराव्यासह सापडला आहे. 
वस्तूस्थिती : अ. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी अटकेत असणारे सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड यांना पानसरे यांचा मारेकरी, किंवा हत्येचा सूत्रधार म्हटलेले नाही.
आ. पोलिसांनी स्वतः श्री. गायकवाड हे संशयित असून केवळ तांत्रिक सर्वेक्षणातील माहितीच्या आधारे त्यांना पकडले, असे सांगितले आहे. त्यांनी कुठेही पुराव्यासह पकडले, असे म्हटलेले नाही.

इटलीच्या नागरिकांची राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती प्रदर्शनास भेट !

डावीकडून लुका, पॉलो आणि त्यांना प्रदर्शनाची 
माहिती सांगतांना श्री. आशिष सावंत
   नाशिक, २२ सप्टेंबर (वार्ता.) - सिंहस्थपर्वानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे लावण्यात आलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या प्रदर्शनास इटली या देशातील लुका आणि पॉलो या दोन नागरिकांनी भेेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे श्री. आशिष सावंत यांनी प्रदर्शन समजावून सांगितले. पॉलो यांना हिंदु धर्माचे महत्त्व पटल्याने त्यांनी गेल्या ३ वर्षांपासून कांदा, लसूण, मद्य, सिगारेट, मांसाहार आदी सेवन करणे बंद केले आहे. हिंदु धर्म श्रेष्ठतम असल्याचे पटल्यावर पॉलो यांनी स्वत: एका हिंदु मुलीसमवेत विवाह केला आहे. पॉलो हे महाकालीची उपासना करतात. ते सर्व माहिती लक्षपूर्वक ऐकत होते. प्रदर्शन पाहून प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी केलेली २२३ कोटी रुपयांच्या काळ्या धनाची कमाई उघड !

कोट्यवधीच्या काळ्या धनाचा व्यवहार करणे म्हणजे देशद्रोहच आहे. याची कसून 
चौकशी करून शासनाने उत्तरदायींना कारागृहात पाठवावे !
     नवी देहली - केंद्रात काँग्रेसचे शासन असतांना कार्यरत असणारे अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी केवळ एका प्रकरणात २२३ कोटी रुपयांच्या काळ्या पैशांची कमाई केली आहे. अर्थतज्ञ एस्. गुरुमूर्ती यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून १७ सप्टेंबर २०१५च्या इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात हा घोटाळा उघडकीस आणला. 
या लेखात म्हटले आहे,
१. चेेन्नई येथील जे.डी. ग्रुप या आस्थापनाने वासन आय केअर या आस्थापनास प्रथम ४० कोटी रुपये रोख दिले. नंतर थोडे थोडे करून एकूण २२३ कोटी रुपये रोखीने (काळ्या पैशांच्या स्वरूपात) दिले. 
२. जे.डी. ग्रुप या आस्थापनाचे चीट फंड आणि इतर अनेक अवैध धंदे होते. त्याला आयकर विभागाचे संरक्षण मिळवून देण्यासाठी उपरोक्त रक्कम देण्यात आली. 

केंद्रात काँग्रेस शासन असतांना विना-निविदा १३ सहस्र कोटी रुपयांचे आधार संबंधित आदेश दिले !

या घोटाळ्याची त्वरित चौकशी करून उत्तरदायींना आजन्म कारागृहात टाका ! 
     मुंबई - काँग्रेसच्या मनमोहन सिंह शासनाने नंदन निलकेणी यांच्या नेतृत्वाखाली महत्वाकांक्षी आधार कार्ड योजना प्रारंभ केली. या योजनेशी संबधित कामे करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस शासनाने निविदा न मागवता १३ सहस्र कोटी रुपयांच्या कामासाठी आदेश निर्गमित केल्याचे एका माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मागवलेल्या माहितीद्वारे उघड झाले आहे.
    मुंबई येथील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. अनिल गलगली यांनी या संदर्भात माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती मागितली होती. आधार योजनेच्या संदर्भातील कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी एस्.एस्. बिश्त आणि उपसंचालक आर्. हरीश यांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन शासनाने १३ सहस्र ६६३.२२ कोटी रुपयांची कामे निविदा न करता दिली. त्यातील ६ सहस्र ५३६ कोटी रुपये सुमारे ९० कोटी ३० लक्ष आधार कार्ड वाटपासाठी मे २०१५ पर्यंत व्यय झाले. ही कामे एकूण २५ आस्थापनांना १९ मे २०१४ या दिवशी वाटण्यात आली. श्री. नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, म्हणजे उपरोक्त सर्व कामे ही काँग्रेसच्या कार्यकालात करण्यात आली, हे स्पष्ट होते.

आय.एस्.आय.एस्. आणि पाकचे ध्वज फडकवणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
शिवमोग्गा येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन
करतांना हिंदु धर्माभिमानी
   शिवमोग्गा - भारतात पाक आणि आय.एस्.आय.एस्.चे ध्वज फडकवणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. या आंदोेलनात मोठ्या प्रमाणात धर्माभिमानी उपस्थित होते. 
क्षणचित्रे
१. २० महाविद्यालयीन युवक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी झाले.
२. गेल्या आठवड्यात सहभागी झालेल्या धर्माभिमान्यांचा यावेळी सक्रीय सहभाग होता. 
३. कार्यक्रमाला प्रारंभ होण्याआधी पाऊस येऊ लागला; मात्र प्रार्थना केल्यानंतर पाऊस थांबला.

अलिगड मुस्लिम आणि जमिया मिलीया इस्लामिया विश्‍वविद्यालयावर तत्कालीन काँग्रेस शासनाची ५ सहस्र कोटींची खैरात

      नवी देहली - गेल्या ५ वर्षांत अलिगड मुस्लिम विश्‍वविद्यालय आणि देहली येथील जमिया मिलीया इस्लामिया विश्‍वविद्यालय यांना काँग्रेस शासनाने ५ सहस्र कोटी रुपयांचे अनुदान दिल्याचे एका माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मागवलेल्या माहितीतून उघड झाले आहे. या दोन्ही विश्‍वविद्यालयांत विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मुसलमान आहेत. देहलीतील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. प्रफुल्ल गोरडिया यांनी विश्‍वविद्यालय अनुदान आयोग (यु.जी.सी.) यांच्या कार्यालयात केलेल्या आवेदन पत्रावर (अर्जावर) जनसंपर्क अधिकारी श्रीमती सुषमा राठोर यांनी जुलै २०१५ मध्ये पाठवलेल्या पत्रात वरील माहिती दिली आहे. 

विवाहितांना हृदयरोगाचा धोका अल्प !

     विवाहित लोकांना हृदयरोगाचा धोका तुलनेने अल्प असतो; परंतु घटस्फोटित, विधवा, विधुर लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण लक्षणीय असते, असा निष्कर्ष न्यूयॉर्कमधील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लॅनगोग मेडिकल सेंटरमध्ये तज्ञांच्या एका गटाने काढला आहे. त्यांनी या संशोधनासाठी अमेरिकेतील सर्व राज्यांमधून आलेल्या ३५ लाख लोकांची आरोग्यतपासणी केली.

दुर्ग (छत्तीसगढ) येथील शाळेत हिंदु जनजागृती समितीच्या क्रांतिकारकांच्या प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

क्रांतिकारकांचे प्रदर्शन पहातांना विद्यार्थी
      छत्तीसगढ - भिलाईनगर येथील आमदीनगर विद्यानिकेतन उच्चतर माध्यमिक शाळेत १४ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या क्रांतिकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २७५ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी सांगितले, हे प्रदर्शन पुष्कळ ज्ञानवर्धक आहे आणि आपण परत असेच प्रदर्शन लावायला अवश्य या. शाळेत गेल्यावर तेथील शिक्षिकांनी प्रदर्शन लावण्याकरिता तत्परतेने दोन सहाय्यक उपलब्ध करून दिले.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा अधिकार कुणालाही नाही ! - जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती

सनातन संस्थेवरील बंदीसाठी टाहो फोडणार्‍यांना सणसणीत चपराक !
जगद्गुरु शंकराचार्य
स्वामी स्वरूपानन्द सरस्वती
      नाशिक - सनातन संस्था ही सनातन हिंदु धर्माचा प्रसार करणारी संस्था आहे. अशा संस्थेवर बंदी घालण्याचा किंवा तिचे कार्य रोखण्याचा कुणालाही अधिकार नाही. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी चुकीची आहे, असे मत पश्‍चिमाम्नाय द्वारका शारदापीठ एवं उत्तराम्नाय ज्योतिष्पीठाचे पूज्य स्वामी श्री स्वरूपानन्द सरस्वती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.
जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती म्हणाले,
१. सनातन धर्माचा हिंसेवर विश्‍वास नाही.
२. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना पकडा. त्यांना कायद्यानुसार फाशी द्या; मात्र सनातनवर बंदी घालणे अयोग्य आहे.
३. देहली विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्मदिनांक शोधून काढला, ही आनंदवार्ता आहे.
४. यावरून प्रभु श्रीरामचंद्र हे अस्तित्वात होते, हे सिद्ध झाले आहे. त्याविषयी विद्यापिठाचे अभिनंदन !
५. प्रभु श्रीरामचंद्र किंवा श्रीकृष्ण यांना कल्पनापुरुष मानणार्‍यांना चपराक बसली आहे. हिंदूंचा इतिहास प्राचीन असल्याचेही यातून सिद्ध झाले आहे. जेथून लिखाण चालू झाले, तेवढाच इतिहास नसून हिंदु धर्माला त्याहूनही प्राचीन परंपरा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

बंगालमध्ये गोमांस बंदी नाही ! - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

हिंदुबहुल देशात गोमांसावर बंदी घालण्याची मागणी करावी लागते, हेच हिंदूंचे दुर्दैव !
बंगालमध्ये दुर्गोत्सवाच्या काळात गोेमांसावर बंदी घाला ! - हिंदू संहती
      कोलकाता - बंगाल ही धार्मिक सलोखा आणि धर्मनिरपेक्षता यांची भूमी आहे. धार्मिक सलोखा असलेल्या या भूमीत कोणी काय खावे आणि काय खाऊ नये, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे शासन राज्यात गोमांस बंदी होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य अल्पसंख्यांक विकास विभागाच्या एका कार्यक्रमात अल्पसंख्यांकांना दिली. या पार्श्‍वभूमीवर १९ ऑक्टोबरपासून बंगालमध्ये साजरा करण्यात येणार्‍या दुर्गापूजा उत्सवाच्या काळात गोमांसावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदू संहती या हिंदुत्ववादी संघटनेने मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

सनातन संस्थेच्या बंदीविषयी पुरेसे पुरावे नव्हते ! - आर्.के. सिंह, माजी गृहसचिव

      मुंबई - देशाच्या गृह विभागाचे माजी गृहसचिव आणि सध्याचे भाजपचे खासदार श्री. आर्.के. सिंह यांनी सनातन संस्थेच्या बंदीविषयी तत्कालिन महाराष्ट्र शासनाने पुरेसे पुरावे सादर केले नव्हते, असे सांगितले. श्री. सिंह यांनीच सदर प्रस्ताव नाकारल्याचे राज्यशासनाच्या वतीने सांगण्यात येत होते; मात्र ते आता खोटे ठरले आहे. यावरून तत्कालीन काँग्रेसचे राज्य आणि केंद्र शासन यांच्यात बेबनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
     श्री. सिंह म्हणाले की, काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् हे केंद्रीय गृहमंत्री असतांना सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने पाठवला होता. त्या प्रस्तावात सनातन संस्थेच्या विरोधात पुरेसे पुरावे नव्हते. चिदंबरम् यांनी त्याविषयी राज्यशासनाला कळवले की, पुरेशा पुराव्यांअभावी बंदी टिकणार नाही. त्यामुळे सुधारित प्रस्ताव पाठवा. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सदर प्रस्ताव पाठवलाच नाही. त्यामुळे गृहविभागाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव स्वीकारणे वा फेटाळणे याचा प्रश्‍न येत नाही.

श्रीलंकेकडून १५ भारतीय मच्छिमार कह्यात

      कोलंबो (श्रीलंका) - श्रीलंकेच्या हद्दीत घुसखोरी करून मासेमारी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेने २२ सप्टेंबर या दिवशी १५ भारतीय मच्छिमारांना कह्यात घेतले. हे मच्छिमार २ बोटींमधून मासेमारी करत होते. त्यांना कांगेसंथुराई येथील कारागृहात ठेवण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरील प्रस्तावित निर्बंध मागे

      मुंबई - केंद्रशासनाने व्हॉट्सअ‍ॅपवर घालण्यात येणारे प्रस्तावित निर्बंध मागे घेतले आहेत. शासनाने निर्धारित केलेल्या नव्या मसुद्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेश ९० दिवसांपर्यंत जपून ठेवणे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक करण्यात आले होते; पण सर्वच नागरिकांनी या निर्णयावर अप्रसन्नता दर्शवल्यावर हा निर्बंध मागे घेण्यात आला.

खासदार श्री. हरिश्‍चंद्र चव्हाण आणि आमदार श्री. बाळासाहेब सानप यांची सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या नाशिक येथील राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण या प्रदर्शनाला भेट !

भाजपचे नाशिक येथील आमदार श्री. बाळासाहेब सानप 
यांच्याशी चर्चा करतांना सनातनचे पू. नंदकुमार जाधव 

न्यायसंस्थेचा अवमान करणार्‍या हू किल्ड करकरे ? पुस्तकावर बंदी घाला !

कोल्हापूर येथील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी 
आंदोलनात सहभागी झालेले धर्माभिमानी हिंदू
    कोल्हापूर - मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी भारतातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेने पाक आणि आतंकवादी हाफीज सईद यांना दोषी ठरवले आहे. आतंकवादी अजमल कसाब याला फाशीही देण्यात आली; मात्र माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ त्या संदर्भात अपप्रचार करत आहेत. त्यांनी लिहिलेल्या हू किल्ड करकरे ? या पुस्तकात देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेचा निर्णय अमान्य करून या आक्रमणात हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे शत्रूराष्ट्राचे उदात्तीकरण आणि देशाच्या न्यायव्यवस्थेचा अवमान आहे. 

श्री तुळजाभवानी मंदिरातील शिवकालीन भांड्यांची चोरी

हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा 
आणि 'आंधळ दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय' अशा पद्धतीचा 
असलेला मंदिरांचा कारभार भक्तांच्या स्वाधीन करण्यासाठी शासनाकडे मागणी करा ! 
     धाराशिव, २२ सप्टेंबर (वार्ता) - येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडील पुरातन शिवकालीन अशी मौल्यवान भांडी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना उघडकीला येऊन एक सप्ताह उलटून गेला, तरी याविषयी अद्याप पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार मंदिर संस्थानने नोंदवलेली नाही. (संस्थान समितीच्या अशा गलथान कारभारामुळे समितीतील सदस्यांविषयी संशय आल्यास वावगे ते काय ? - संपादक) या प्रकरणी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी लातूरचे सहधर्मादाय आयुक्त श्री. हेर्लेकर यांच्याकडे चौकशी करण्याविषयीचे निवेदन २२ सप्टेंबर या दिवशी दिले आहे. त्यामध्ये त्यांनी मंदिर व्यवस्थापक आणि तहसीलदार सुदीप नरहरे, सहव्यवस्थापक दिलीप नायकवडे आणि इतर संबंधित कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्याची मागणी केली आहे. लातूर सहधर्मदाय आयुक्त यांनीही धाराशिवच्या सहधर्मादाय आयुक्तांना चौकशी करण्याची विनंती केली आहे. 

म्हणे, 'तीनही हत्यांमागे सनातनचा हात !'

पुरोगाम्यांचे नगर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 
     नगर, २२ सप्टेंबर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला ७ मासांनंतर अटक करण्यात आली आहे. पोलिसांवर दबाव येत असल्याने या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, डॉ. कलबुर्गी या तीनही धर्मनिरपेक्ष व्यक्तींच्या हत्येची कार्यपद्धती समान असून त्यामागे सनातन संस्था आणि संबंधित संघटनांचा हात आहे. सनातन संस्थेचा आतंकवादी इतिहास पहाता तिच्यावर बंदी घालावी आणि या हत्येचा सखोल तपास करून त्यामागील सूत्रधारांना कठोर शिक्षा करावी, तसेच महाराष्ट्र पोलिसांना आध्यात्मिक शिक्षेच्या नावाखाली धमकी देणार्‍यांवर जादूटोणा कायद्यान्वये कारवाई करावी, अशा मागण्या पुरोगामी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या. 
     हे निवेदन देण्यापूर्वी पुरोगामी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव सुभाष लांडे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

काशी येथे गंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनास प्रतिबंध

उत्तरप्रदेश समाजवादी शासनाचा हिंदुद्वेष 
हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन गणपती विसर्जनाने नदीचे प्रदूषण होते, 
असे सांगणारे उत्तरप्रदेश शासन कारखान्यांमुळे होणार्‍या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करते, हे लक्षात घ्या ! 

     काशी - नदी प्रदूषणाच्या संदर्भातील वर्ष २००६चा सर्वोच्च न्यायालयाचा कथित आदेश असल्याचे सांगून उत्तरप्रदेश प्रशासनाने येथील गंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी घातली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात हिंदु युवा वाहिनीच्या नेतृत्वाखाली भाजप, शिवसेना, बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद आदी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास प्रारंभ केला आहे. या हिंदुत्ववाद्यांना स्थानिक हिंदूंनीही समर्थन दिले असून बाजार आणि इतर आस्थापने बंद ठेवल्या आहेत. जोपर्यंत गणेशमूर्तींचे गंगा नदीत विसर्जन करण्यास परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील, अशी चेतावणी हिंदु युवा वाहिनीचे काशी शहर महामंत्री श्री. सतिश वर्मा यांनी येथील प्रशासनाला दिली आहे.

हिंदु धर्माला बळकटी देण्यासाठी 'घरवापसी' आवश्यक ! - प.पू. स्वामी गोविंददेवगिरी

     नाशिक, २२ सप्टेंबर - आजवर अनेकदा बाहेरच्या प्रवृत्तींकडून हिंदु धर्मावर आघात झाले; पण त्याला तोंड देऊन हिंदु धर्म नुसता टिकलाच नाही, तर आणखी तेजस्वी झाला. हिंदु धर्मात अनेक जाती-पाती, पंथ असले, तरी धर्म एकच आहे. आता 'सर्व धर्म सारखेच' असे सांगितले जाते; परंतु त्यात तथ्य नाही. सनातन वैदिक धर्म हा जगात एकमेव असून, त्याला मोठे महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की, 'धर्मासाठी प्राण द्यावे लागले, तरी हरकत नाही.' हिंदु धर्मामुळेच जगात शांतता नांदत असून ती कायम ठेवण्यासाठी धर्माला बळकटी देणे आवश्यक आहे. त्यासाठी 'धर्मांतरितांची घरवापसी' आवश्यक आहे, असे मार्गदर्शन प.पू. स्वामी गोविंददेवगिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले. 

पुणे येथील बाजारात वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसुली

असे जन्महिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! 
     पुणे - गेले वर्षभर दुष्काळाने पिचलेल्या आणि गेल्या आठवडाभरातील पावसामुळे बेजार केलेल्या शेतकर्‍यांच्या शेतमालाच्या गाड्या सक्तीने अडवून दम देत वर्गणी वसूल करण्यात आली. गुलटेकडी मार्केट यार्डच्या दारात पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हा प्रकार झाला, असे वृत्त दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झाले आहे. (बलपूर्वक वर्गणी वसूल केली जात असतांना पोलीस बघ्याची भूमिका का घेत होते ? - संपादक) अनेक आडत्यांनीही याचा निषेधही केला. 

भुसावळ येथे हिंदुत्ववाद्यांकडून उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन !

  • सनातनवर बंदी आणू नये ! 
  • गणेशमूर्तीदान आणि कृत्रिम हौद नकोत ! 

  भुसावळ - येथे उपविभागीय अधिकार्‍यांना सनातन संस्थेवर बंदी आणू नये, तसेच गणेशमूर्तीदान होऊ नये आणि कृत्रिम हौद बांधू नयेत यासाठी हिंदुत्ववाद्यांनी निवेदने दिली. 
 

निखिल वागळे यांची तळी उचलून सनातनला दोषी ठरवू पहाणार्‍या न्यूज एक्स वृत्तवाहिनीच्या संपादकांची पीत पत्रकारिता उघड !

    मुंबई - हिंदुद्रोही पत्रकार निखिल वागळे यांनी सनातन संस्था मला वर्ष २०११ पासून धमक्या देत होती, असा कांगावा करण्यास आरंभ केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर न्यूज एक्स या इंग्रजी वृत्तवाहिनीने रात्री ९ वाजता चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक हेही सहभागी झाले होते. वागळे यांना धमक्या देण्याच्या संदर्भात वृत्तवाहिनीचे संपादक तथा सूत्रसंचालक राहुल शिवशंकर यांनी श्री. वर्तक यांना तुम्हाला धमक्या देण्याचा काय अधिकार ?, असा प्रश्‍न विचारला. त्या वेळी श्री. वर्तक यांनी आम्ही वागळे यांना काय धमक्या दिल्या, ते सांगा ?, असा प्रश्‍न विचारला. त्या वेळी शिवशंकर वारंवार धमक्या का दिल्या, असे विचारत होते आणि पुनःपुन्हा श्री. वर्तक आम्ही काय धमक्या दिल्या, ते सांगा, अशी विनंती करत होते; मात्र शेवटपर्यंत शिवशंकर यांना सनातनने वागळे यांना काय धमक्या दिल्या, हे सांगता आले नाही.

राष्ट्र उभारणीसाठी सनातन संस्था टिकावी - महामंडलेश्‍वर श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज

     
नाशिक, २२ सप्टेंबर (वार्ता) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र अन् संस्कृतीविषयीचे कार्य सकारात्मक आहे. सनातनकडून धार्मिक कृती, उत्सव याविषयीचे धर्मज्ञान समाजास दिले जातेे. त्याविषयी चिंतन करून ते योग्यप्रकारे समाजात पोहोचवले जातेे. सनातन संस्था आणि तिचे हे कार्य राष्ट्र उभारणीसाठी टिकूून राहिले पाहिजे. समीर गायकवाडवर न्यायालयात आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यास अपराधी म्हणणे, हा तो आणि त्याचे कुटुंबिय यांच्यावर अन्याय आहे. तसे केल्याने त्याच्या आयुष्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांनी केले. सनातनवरील कथित बंदीच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते.

सावरकरांना भारतरत्न देण्याच्या सूत्रास उदंड प्रतिसाद !

      डोंबिवली - भारतातील क्रांतिकारकांचे क्रांतिकारक अशी ख्याती असलेले प्रखर राष्ट्रभक्त आणि थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चालू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चळवळीच्या अंतर्गत देण्यात आलेल्या दूरभाष क्रमांकावर अवघ्या १० घंट्यात ३५ सहस्रांहून अधिक मिस कॉल आले आहेत.
       स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे, यासाठी १० लाख स्वाक्षर्‍या गोळा करण्याचा संकल्प खासदार डॉ. शिंदे यांनी सोडला असून याचाच एक भाग म्हणून +९१९२२२००९१९१ या क्रमांकावर मिस कॉल करण्याचे आवाहन खा. डॉ. शिंदे यांनी केले आहे. या क्रमांकावर केलेला मिस कॉल स्वाक्षरी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आदी ठिकाणी स्वाक्षरी घेण्यासाठी केंद्रेही उभारण्यात आली आहेत.

शिरगाव (चिपळूण) येथे विसर्जित गणेशमूर्ती पाण्याबाहेर काढून धर्मांधांनी फोडल्या !

          * संतप्त हिंदूंनी केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांकडून धर्मांधांना अटक 
          * आंदोलनकर्त्या हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार 
          * १४ हिदूंना अटक आणि जामिनावर मुक्तता
यातून धर्मांधांची मूर्तीभंजक प्रवृत्ती स्पष्ट होते ! 
      चिपळूण, २२ सप्टेंबर (वार्ता.) - तालुक्यातील शिरगांव-कुंभार्ली हनुमानवाडी येथे मूर्तीविसर्जनाच्या दिवशी नदीमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तींपैकी ३ मूर्ती र्ा काही धर्मांध युवकांनी पाण्यातून काढून फोडण्याचे अश्‍लाघ्य कृत्य केले. इतके होऊनही पोलिसांनी धर्मांधांवर तत्परतेने कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त जमावाचा उद्रेक झाला. सहस्रावधी हिंदूंनी रस्ता बंद आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी लाठीने आक्रमण केले. धर्मांधांना अटक होईपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री १.३० वाजता सय्यदवाडी येथील सुहेल शेख, फैजान खान आणि २ धर्मांधांना अटक करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या धर्मांधांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम २९५, ३४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले धर्मांध अल्पवयीन असल्याने त्यांना रत्नागिरी येथे बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. यांसह सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी १४ हिंदूंना अटक केली. त्यांना २२ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या हिंदूंमधील २ अल्पवयीन असल्याने त्यांना रत्नागिरी येथे बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून साधूंच्या जीवनशैलीचा अभ्यास !

      नाशिक - देशाच्या निरनिराळ्या भागांतील साधू-महंतांच्या जीवनशैलीविषयी सर्वांच्याच मनात कुतूहल असते; मात्र त्यांच्या जीवनशैलीविषयी सखोल अभ्यास कोणी करत नाही. येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मात्र कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे दाखल झालेल्या साधूंची दिनचर्या, जीवनशैली याविषयी शास्त्रशुद्ध अभ्यास चालू केला आहे. या अभ्यासातून काही निष्कर्षही काढले जाणार आहेत. त्यांतून मानवी आरोग्याविषयीचे काही नवे पैलू समोर येण्याची शक्यता आहे.

शाळांमधून धर्मशिक्षणाचे धडे द्यायला हवेत ! - अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज

      नाशिक, २२ सप्टेंबर - आजच्या पिढीला वैज्ञानिकतेसमवेत अध्यात्माचे शिक्षण मिळणेही आवश्यक आहे. केवळ हिंदु धर्मियांनाच नव्हे, तर अन्य धर्मियांनाही त्यांच्या धर्माचे शिक्षण दिले गेलेच पाहिजे. आजच्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोन असावा; परंतु अध्यात्म सोडता कामा नये. मानवता टिकली, तरच शांती टिकेल. आपला धर्म मानवता शिकवतो. त्यामुळे धर्मशिक्षणातून मानवतेचे अध्ययन होणार आहे. मुलांवर लहानपणापासूनच संस्कार करायला हवेत. ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाचे पाठशाळांमधून देऊन धर्मशिक्षणाचे धडे द्यायला हवेत, असे प्रतिपादन अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केले. 

गोवा शासनाने श्रीराम सेनेवरील बंदी चार मासांनी वाढवली !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मुस्काटदाबी का केली जात आहे ?
    पणजी - श्रीराम सेना आणि श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्यावरील बंदी गोवा शासनाने ४ मासांसाठी वाढवली असून आता जानेवारी २०१६पर्यंत ही बंदी असणार आहे. श्रीराम सेना आणि प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशावर गोवा शासनाने १९ ऑगस्ट २०१४ या दिवशी प्रथम बंदी घातली. तेव्हापासून आतापर्यंत विविध कालावधीसाठी ही बंदी कायम ठेवण्यात आली होती. आता ही बंदी जानेवारी २०१६पर्यंत असणार आहे.

पुरोगाम्यांच्या पत्रावर साहाय्यक आयुक्तांची सनातनच्या प्रदर्शनास नोटीस !

     सांगली, २२ सप्टेंबर (वार्ता.) - १८ सप्टेंबर या दिवशी पुरोगामी संघटनांनी सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन रहित करण्याच्या संदर्भात सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले. या निवेदनावर प्रभाग क्रमांक १/२ च्या साहाय्यक आयुक्तांनी, "तुम्हाला दिलेली अनुमती ग्रंथ विक्रीसाठी आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवणार्‍या अथवा अन्य कारणांसाठी या प्रदर्शनाचा वापर केल्यास आपल्याला दिलेली अनुमती तात्काळ रहित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याचे दायित्व तुमच्यावर असेल", अशी नोटीस सनातन संस्थेच्या साधकांना दिली. ही नोटीस घेऊन महापालिकेचे कर्मचारी प्रदर्शनाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी या नोटीशीवर साधकांची पोच घेतली. (सनातनच्या साधकांवर अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसतांना केवळ काही पुरोगाम्यांनी कांगावा केला म्हणून अध्यात्मप्रसाराचे ग्रंथ वितरण करण्यासाठी सनातनला नोटीस देणे सर्वस्वी अयोग्य आहे ! - संपादक)

राजकीय नेत्यांवरील टीकेला देशद्रोह ठरवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती !

राजकीय नेत्यांवरील टीकेविषयी कायदा करणार्‍या 
राज्यकर्त्यांनी देवतांच्या अवमानाच्या विरोधातही कायदा करावा ! 
     मुंबई - राजकीय नेत्यांवरील टीका, हा देशद्रोह ठरवणार्‍या राज्यशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थागिती दिली आहे. 

वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सर्वाधिक बेहिशेबी मालमत्ता !

महाराष्ट्रात लाचलुचपत विभागाच्या ९०२ धाडी 
     पुणे - लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सापळा रचून ९०२ धाडी टाकल्या आणि लाच घेणार्‍यांना अधिकार्‍यांना पकडले. पुणे, नागपूर, ठाणे, अमरावती, नांदेड, मुंबई, संभाजीनगर येथे या धाडी टाकण्यात आल्या. यात विविध खात्यांतील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. अ दर्जाच्या अधिकार्‍यांकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा ८ कोटी रुपयांची अधिक मालमत्ता आढळली आहे. 

राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाचे श्री. सिद्धेश पाटील यांचा वैयक्तिक स्तरावर सनातनला पाठिंबा !

     सनातन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात 'सनातन संस्थेवर बंदी आणू नये' या विषयाच्या संदर्भात राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाचा सनातन संस्थेला पाठिंबा आहे, असे कळवले होते. तरी या संदर्भात राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाचे कार्यकर्ता अधिवक्ता सिद्धेश पाटील यांनी दिलेला पाठिंबा संघटनात्मक स्तरावर नसून, वैयक्तिक स्तरावर त्यांनी सनातन संस्थेला पाठिंबा दिला आहे, असे त्यांनी कळवले आहे.

हिंदूंनो, पवित्र वातावरणात धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

फलक प्रसिद्धीकरता
      बंगालमध्ये होणार्‍या आगामी दुर्गापूजा उत्सवाच्या काळात गोमांसावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदूंकडून करण्यात आल्यावर शासन राज्यात गोमांस बंदी होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Bangalme durga pujake dinome gomanske pratibandh par CM Mamata Banarjika Inkar. - es deshme Hindu achhe vatavaran dharmik utsav kab manayenge ? 
जागो !
बंगालमें दुर्गापूजाके दिनोमें गोमांस पर प्रतिबंधके लिए मुख्यमंत्री ममता बैनर्जीका इन्कार. 
- इस देशमें हिंदू अच्छे वातावरणमें धार्मिक उत्सव कब मनायेंगे ?

राष्ट्र आणि विश्व यांच्या उत्कर्षाकरिता समर्पित व्हा

'साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य अन् ऋण आहे. प्रत्येकानेच ते बजावले पाहिजे. उपेक्षिले तर सर्वनाश अटळ आहे. धर्माकरिता समर्पित झाले पाहिजे. सर्वस्व वाहिले पाहिजे. त्यातच त्याचा, राष्ट्र आणि विश्वा यांचाही उत्कर्ष आहे. कल्याण आहे आणि मुक्तीही ! धर्माकरिता बाजी लावण्याचा आजचा प्रसंग आहे. धर्माकरिता जीवन वेचण्याचा हा काळ आहे.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

साधनेमुळे जीवनात अनेक पालट अनुभवून हिंदु धर्माच्या महानतेची प्रचीती घेणारे फरिदाबाद येथील श्री. भूपेश शर्मा !

वैद्य भूपेश शर्मा
    सर्वप्रथम मी हिंदु जागृती समितीच्या Hindujagruti.org संकेतस्थळाच्या माध्यमातून श्री. दैवेश रेडकर आणि श्री. सुरेश मुंजाल यांच्या संपर्कात आलो. जुलै २०१३ पासून मी नियमितपणे संस्थेचे विचार वाचतो.
१. धर्मशिक्षणाचा अभाव हे हिंदूंच्या अधःपतनाचे सर्वांत 
मोठे कारण असून देश आणि धर्म यांची स्थिती सुधारायची 
असेल, तर हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक !
    नियमित वाचनामुळे मला हे कळले की, धर्मशिक्षणाचा अभाव हे हिंदूंच्या अधःपतनाचे सर्वांत मोठे कारण आहे आणि हेच भारत देशाच्या अधःपतनाचेही कारण आहे. ईश्‍वरच सर्वकाही करतो आणि आपण केवळ निमित्तमात्र आहोत, हेही मला समजले.

एक राष्ट्र चांगले असणे...

'एक राष्ट्र चांगले असणे, म्हणजे तेथील प्रजा त्याग आणि सेवा करणारी असणे, तसेच तेथील नागरिक ज्ञानी आणि देशभक्ती करणारे असणे महत्त्वाचे आहे. अशी स्थिती येण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे महत्त्वाचे आहे !'
- पू. श्री श्री श्री विजयानंद सरस्वती स्वामीजी, धारवाड, कर्नाटक. (१०.१२.२००८)

आत्यंतिक तळमळ असलेले आणि प्रत्येक कृती तत्परतेने आचरणात आणणारे धर्माभिमानी श्री. भूपेश शर्मा !

    श्री. भूपेश शर्मा हे वर्ष २०१२ पासून संकेतस्थळाद्वारे संपर्कात आलेले धर्माभिमानी (प्रोफाईल मेंबर) आहेत. व्यवसायाने ते आयुर्वेदिय वैद्य आहेत. १ वर्षापासून ते समितीच्या संपर्कात आले असून ९ मासांपासून त्यांनी साधनेलाही आरंभ केला आहे. त्यांच्यात साधनेची पुष्कळ तळमळ असून शिकण्याची इच्छा आणि जिज्ञासू वृत्तीही आहे. त्यांना साधनेचे महत्त्व पटले असून त्यांनी त्यांच्या पत्नीलाही साधना शिकवा, असे सांगितले. त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. जिज्ञासू वृत्ती : राष्ट्रीय शिबिरात गटचर्चा चालू असतांना त्यांनी सगळी सूत्रे पूर्णपणे ऐकून घेतली आणि जी सूत्रे समजली नाहीत, ती जिज्ञासेने विचारून घेतली.

'स्मार्ट सिटी'साठी 'स्मार्ट' अधिकारी नेमा !

केंद्रशासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ९८ शहरांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये पुणे शहराचेही नाव आहे. आता दुसर्याल टप्प्यात 'स्मार्ट सिटी करण्यासाठी सविस्तर आराखडा सिद्ध करण्यात येत आहे. 'स्मार्ट सिटी'च्या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेने 'मॅकेन्झी' या खाजगी आस्थापनाची नियुक्ती केली आहे; परंतु 'इतर आस्थापनांच्या तुलनेत 'मॅकेन्झी' या आस्थापनाने जादा शुल्क मागितले आहे', असा आरोप करत त्या विरोधात पुणे जनहित आघाडीचे उज्ज्वल केसकर आणि नगरसेवक प्रशांत बधे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि अचलिया यांच्या खंडपिठापुढे त्याविषयी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने 'पुढील आदेशापर्यंत 'मॅकेन्झी' आस्थापनाला कार्यादेश देऊ नये', असे महानगरपालिकेला सांगितले आहे.

धर्माप्रती प्रेम असल्याने धर्मजागृती मोहिमांत सहभागी होणारे आणि रामनाथी आश्रमातच रहावे, अशी इच्छा व्यक्त करणारेे पुणे येथील श्री. मिलिंद देशपांडे !

श्री. मिलिंद देशपांडे
    एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेला मी फलक वाचून उपस्थित राहिलो. तेथे पुष्कळ चैतन्यमय आणि आनंदी वातावरण होते. नंतर २२.१.२०१५ पासून मी खर्‍या अर्थाने समितीच्या संपर्कात आलो.
१. समितीच्या संपर्कामुळे झालेले पालट
१ अ. धर्माचरण करू लागणे : समितीतील साधकांच्या सहवासामुळे बोलण्यात नम्रता येऊ लागली. मी प्रतिदिन टिळा लावू लागलो. साधनेमुळे धर्माविषयी माहिती आणि शास्त्र कळायला लागले.
१ आ. धर्मशिक्षण वर्गात जाऊ लागल्यानंतर आलेली अनुभूती : मी धर्मशिक्षण वर्गात नियमित जायचो. एका सोमवारी मला स्वप्न पडले. स्वप्नात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो आहे.

महाविद्यालयीन मुलांकडून त्यांच्या आनंदाच्या क्षणी केल्या जाणार्‍या काही विशिष्ट मुद्रांतून होणारे त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण !

मुद्रा क्र. १
      महाविद्यालयीन मुले आनंदाच्या क्षणी काही वेळा हाताने विशिष्ट मुद्रा करतात आणि आपला आनंद व्यक्त करतात. त्या मुद्रा पहातांना आणि करतांना त्या अत्यंत रज-तमात्मक असाव्यात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रज-तम कणांचे ग्रहण किंवा उत्सर्जन होत असावे, असे वाटले. मला सूक्ष्मातील भाग कळत नाही; परंतु देवाने लक्षात आणून दिले. त्यामुळे त्या दोन त्रासदायक मुद्रा कशा आहेत, हे येथे स्पष्ट करत आहेे.

व्यवसाय आणि अध्यात्म यांचा सुरेख मेळ घालून 'सत्य-तुका हॉस्पिटल'च्या माध्यमातून रुग्णसेवेसह धर्मप्रसारही करणारे लांजा, रत्नागिरी येथील डॉ. समीर घोरपडे !

डॉ. समीर घोरपडे
आम्ही काही कामानिमित्त लांजा येथे गेलो होतो. तेव्हा तेथील 'सत्य-तुका हॉस्पिटल'मध्ये आमचे जाणे झाले. तेथे गेल्यावर स्वहित साधून परमार्थ कसा करतात, ते मला समजले. व्यवसाय आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असलेले उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. समीर घोरपडे यांचे लांजा बाजारपेठेतील 'सत्य-तुका हॉस्पिटल' ! त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे शिक्षण सनातनचे संत कै. पू. डॉ. वसंत आठवले (प.पू. डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. त्यामुळे रुग्णाशी बोलतांना ते वैद्यकीय समादेशासह आध्यात्मिक दृष्टीकोनही देतात. 

जळगाव येथे रिक्शावरील हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधनात्मक पत्रक न्याहाळतांना नागरिक !

     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या आदर्श गणेशोत्सव चळवळीच्या अंतर्गत भित्तीपत्रकांच्या माध्यमांतूनही प्रबोधन करण्यात येते. मूर्तीदान देऊ नका या विषयावरील भित्तीपत्रकाद्वारे अशा प्रकारे जनजागृती होत आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असणारे सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये संगणक अन् भ्रमणसंगणक यांची आवश्यकता !

वाचक, हितचिंंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात यथाशक्ती हातभार लावण्याची अमूल्य संधी !
      हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे ध्येय शीघ्रतेने साकार होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, तसेच उत्पादने आणि सनातन प्रभात नियतकालिके या माध्यमांतून जनसामान्यांमध्ये राष्ट्र अन् धर्म यांच्या संदर्भात जागृती केली जाते. राष्ट्र-धर्म कार्याच्या अंतर्गत विविध सेवांसाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले संगणक आणि भ्रमणसंगणक यांचा वापर केला जातो.

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसार कार्याचा केरळ राज्याचा ऑगस्ट २०१५ मधील आढावा

१. 'राष्ट्रध्वजाचा मान राखा' ही मोहीम राबवणे
१ अ. 'फेसबूक' आणि 'व्हॉट्सअ‍ॅप' वरून प्रसार ! : या मोहिमेच्या अंतर्गत इंग्रजी आणि मल्ल्याळम् भाषांतील भित्तीपत्रकांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. राष्ट्र्रध्वजाच्या विडंबनाच्या संदर्भात प्रबोधन करणारा मल्ल्याळम् भाषेत २ मिनिटांचा एक माहितीपट (व्हिडिओ) बनवून त्याचा प्रसार 'फेसबूक' आणि 'व्हॉट्सअ‍ॅप' यांवरून केला. या मोहिमेला अनेकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
१ आ. शाळांमध्ये जाऊन भित्तीपत्रके लावणारे श्री. स्वराज ! : 'राष्ट्र्रध्वजाचा मान राखा' या मोहिमेत अनेक धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला. श्री. स्वराज नावाच्या एका धर्माभिमान्याने स्वतः ४ - ५ शाळांमध्ये जाऊन राष्ट्र्रध्वजाचा मान राखण्यासंदर्भातील भित्तीपत्रके लावली. ज्या शाळेत श्री. स्वराज शिकले, त्या शाळेत त्यांनी भित्तीपत्रक लावल्यावर त्या शाळेतील मुख्याध्यापिकांना आनंद झाला आणि त्या म्हणाल्या, "तू चांगले काम करत आहेस. तुझ्यातील पालट पाहून मला पुष्कळ आनंद झाला." तेव्हा मुख्याध्यापिकांनी त्यांना आशीर्वाद दिला. अनेक शाळांमधील शिक्षकांनी या मोहिमेविषयी चांगले मत दर्शवले.

पाहूनी सप्तर्षिकाकांना प्रेरणा मिळे सार्‍यांना ।

श्री. राजाभाऊ सप्तर्षि
    ६१ टक्के अध्यात्मिक पातळी असलेले श्री. राजाभाऊ सप्तर्षी यांच्या विषयी काव्ये देत आहोत.
येता सप्तर्षिकाका विभागात ।
आनंद मावेना गगनात ॥ १ ॥
पाहूनी त्यांच्याकडे वाटे ।
जणू चैतन्यस्रोत येई विभागात ॥ २ ॥
पहाता त्यांना मिळते प्रेरणा ।
परिपूर्ण अशी सेवा करण्या ॥ ३ ॥

सौ. अश्‍विनी पवार हिच्या संदर्भातील लेख प्रसिद्ध झाल्यावर लिखाणाचे आणि साधिकेचे कौतुक करणारी अश्‍विनीताई अन् अश्‍विनीताईच्या संभाषणातून कर्तेपणा कसा त्यागायचा, याचा अभ्यास करणारी साधिका !

    मागील मासात सौ. अश्‍विनी पवार हिच्या संदर्भात मी केलेले लिखाण दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाले होते. ते लिखाण वाचल्यावर सौ. अश्‍विनीताईने मला संपर्क करून लिखाणाविषयी माझे कौतुक केले. तेव्हा माझ्या आध्यात्मिक आईने माझे ज्या शब्दांत कौतुक केले, ते पुढे देत आहे.
सौ. अश्‍विनी : लेख आवडला. शब्दरचना आणि वाक्यरचना किती सुंदर केलीस ! तुझे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे.
मी : आई, तूच शिकवलेस ना !
सौ. अश्‍विनी : देवाने शिकवले आणि देवच घडवतो.

वृद्धापकाळातील अवयवांच्या कुरकुरण्याकडे साक्षीभावाने कसे पहायचे, याचे उत्तम उदाहरण घालून देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केलेल्या सौ. नीलिमा सप्तर्षि (वय ७८ वर्षे) !

सौ. निलिमा सप्तर्षि
१. साधिकेच्या इंद्रियांनी केले बैठकीचे आयोजन आणि प्रत्येकाला झाली स्वतः बोेलण्याची घाई ! : एक दिवस माझ्या इंद्रियांनी बैठकीचे आयोजन केले होते. माझी इच्छा नसतांनाही त्यांनी मला न्यायाधीश नेमले आणि प्रत्येक इंद्रिय बोलू लागले. पाय म्हणाले, माझे ऐक, डोळे म्हणाले, माझे प्रथम ऐक, कंबर आणि पाठही गयावया करू लागले. सर्वच इंद्रियांना काहीतरी सांगायचे होते. मला काय करावे, ते कळत नव्हते. मी त्यांना म्हणाले, तुम्ही सर्व जण एकानंतर एक सांगा. मी सर्वांचे ऐकणार आहे. माझ्या बोलण्याने पाय फुगून बसले, डोळे रडू लागले, पाठ आणि कंबर वाकून शरण आले.
२. साधिकेने इंद्रियांना बक्षिसे देऊन समाधानी करणे : मग मी कंबरेला कंबरपट्टा बक्षीस दिला आणि गप्प केले. सूजलेल्या पायांना उच्चासन (दोन उशा) देऊन हसवले. डोळ्यांना औषध घालून समाधान दिले. पाठीला गोंजारून सांगितले, तू स्वतःच प्रयत्न करून सर्वांना सांभाळून घे; कारण तूच सर्वांचा आधार आहेस !

पू. मेनरायकाका यांच्या उपायांच्यावेळी विविध प्रकारचे सुगंध येणे

१. बासुंदीचा सुगंध : १६.८.२०१५ या दिवशी उपायांच्या वेळी श्रीकृष्णाचा नामजप करत असतांना मला बासुंदीचा सुगंध आला आणि मुखातही बासुंदीची गोड चव लागली. त्या वेळी श्रीकृष्णाची आठवण येऊन भावजागृती होत होती.
२. लवंगांचा सुगंध : एक दिवस मला लवंगांचा सुगंध आला. त्या वेळी तो मारक गंध असल्याचे जाणवले.
३. तुपाची आहुती दिल्याचा सुगंध : १८.८.२०१५ या दिवशी यज्ञात तुपाची आहुती दिल्यावर येतो, तसा सुगंध येत असल्याचे पू. काकांनी सांगितले. त्या वेळी उपायांना बसलेल्या साधकांना त्या सुगंधाची अनुभूती आली.
 - कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०१५)

पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी केलेल्या भरतकामांची वैशिष्ट्ये !

पू. मेनरायकाकू यांनी भरतकाम केलेल्या काही कलाकृती
पू. मेनरायकाकू यांनी भरतकाम केलेल्या काही कलाकृती
     काही दिवसांपूर्वी पू. मेनरायकाकूंनी केलेल्या भरतकामाचे काही नमुने साधकांना पहाण्यासाठी पटलावर ठेवण्यात आले होते. त्यांतील काही भरतकाम हाताने केलेले होते, तर काही शिलाई यंत्रावर केलेले होते. त्यांची मला जाणवलेली वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१. दोन्ही भरतकामांमधील रंगसंगती उत्कृष्ट आहे.
२. भरतकाम केलेल्या प्रत्येक कपड्याच्या कडेला सुबक आणि वेगवेगळी कलाकुसर केलेली आहे.
३. भरतकामात सुटसुटीतपणा आहे.

पू. मेनरायकाका आणि पू. (सौ.) काकू यांच्या उपायांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

पहिल्यांदाच उपायांसाठी बसल्यावर हलकेपणा जाणवणे आणि सभागृहात
पू. (सौ.) मेनरायकाकू येण्यापूर्वीही तसाच हलकेपणा जाणवून भाव जागृत होणे
    पू. (सौ.) मेनरायकाकू उपायांसाठी खोलीत आल्यावर त्यांच्यातील प्रीती आणि भाव यांमुळे वातावरणातील काळी शक्ती नष्ट होते, असे लक्षात आले. मी पहिल्यांदा पू. काकूंच्या उपायांना बसले. त्या वेळी मला पुष्कळ हलके वाटले. नंतर संध्याकाळी एक ध्वनीचित्र-चकती (सी.डी.) पहाण्यासाठी सभागृहात गेले असतांना काही वेळाने मला त्यांच्या उपायांच्या वेळी येणारा हलकेपणा जाणवला आणि त्यांचे अस्तित्व जाणवू लागले. त्याच वेळी सभागृहाचे दार उघडले आणि पू. (सौ.) मेनरायकाकू सभागृहात येतांना दिसल्या. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला आणि भावही जागृत झाला.
    पू. मेनरायकाका आणि पू. (सौ.) मेनरायकाकू या वयातही दिवसभर अखंड बसून आम्हा सर्व साधकांवर उपाय करत आहेत, यासाठी त्यांच्या चरणी आम्ही सर्व साधक कृतज्ञ आहोत. त्यांच्या उपायांचा आम्हाला लाभ करून घेता येऊ दे, ही प्रार्थना !

सौ. विमल माळी, चाळीसगाव यांना पू. भगवंतकुमार मेनरायकाका यांच्या वाढदिवसानिमित्त सुचलेले काव्यपुष्प !

पू. मेनरायकाकांच्या रूपे देव आलासे भूवरी ।
पू. मेनरायकाकांच्या रूपे देव आलासे भूवर ।
कष्ट हरण्या साधकांचे स्वकष्टतो अपार ॥ १ ॥
चैतन्य देण्या साधकांना (टीप), सदैव असे तत्पर (टीप १) ।
नानाविध सुगंध येती, तारक-मारक असे प्रकार ॥ २ ॥

पू. मेनरायकाका आणि पू. (सौ.) काकू यांचे आध्यात्मिक उपाय म्हणजे सर्व साधकांना होणारे त्रास दूर करण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी साधकांवर केलेली अपार कृपा !

पू. भगवंतकुमार मेनरायकाका आणि पू. (सौ.) सुरजकांता मेनराय
    पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू आणि पू. काका त्रास असणार्‍या साधकांवर ५ आठवड्यांपासून उपाय करत आहेत.
१. पू. (सौ.) मेनरायकाकू
१ अ. उपायांची पद्धत : त्या अखंड भावावस्थेत असून आम्हालाही त्या प्रतिदिन त्या अवस्थेत नेण्याचा प्रयत्न सतत करत असतात. त्या कधी प.पू. डॉक्टरांचे चरण पकडून नामजप करा, असे म्हणतात, तर कधी मध्येच गुरुदेव तुमच्या सोबत आहेत ना, हे पडताळा आणि तळमळीने नामजप करा, अशी आठवण करून देतात अन् सर्व साधकांकडून भावपूर्ण उपाय करवून घेतात.
१ आ. लाभ : त्यामुळे साधकांना त्रास होत असला, तरी ते भावावस्थेत जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मांत्रिकाची शक्ती न्यून होते.

अखंड श्रीकृष्णाच्या स्मरणात असणारा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. श्रीरंग दळवी (वय ४ वर्षे) याची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि. श्रीरंग दळवी
    १३.६.२०१५ या दिवशी चि. श्रीरंग दळवी याचा ४ था वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. चि. श्रीरंगच्या आवाजात क्षात्रवृत्ती जाणवणे
    एके दिवशी चि. श्रीरंगची बहीण आमच्या सदनिकेच्या आवारात देवपूजेसाठी फुले आणण्यासाठी गेली होती. परत आल्यावर तिने मला सांगितले, आई, खाली एक माणूस होता आणि तो विचित्र नजरेने माझ्याकडे पहात होता. मला भीती वाटली. हे ऐकून चि. श्रीरंग तिला म्हणाला, ताई, तू घाबरू नकोस. मी तुझ्यासमवेत येतो आणि बघतो त्या माणसाला ! तेव्हा चि. श्रीरंगच्या आवाजात क्षात्रवृत्ती जाणवत होती.
२. आई-वडिलांना ते वाद घालत असतांना नामजपाची
आठवण करून देणे किंवा एकमेकांची क्षमा मागण्यास सांगणे
    चि. श्रीरंगला मी अन् यजमान यांनी एकमेकांशी वाद घातलेला, एकमेकांवर रागावून बोललेले आवडत नाही. तसे झाले, तर तो लगेच आम्हाला नामजपाची आठवण करून देतो किंवा एकमेकांना चुकले, असे म्हणायला लावतो.

आश्रमातील बांधकाम सेवा करणार्‍या कामगारातही पालट घडवून त्याला सेवेतील आनंद अनुभवायला देणारे महान प.पू. गुरुदेव !

    आश्रमात कामासाठी बाहेरून येणार्‍या कामगारामध्येही पालट होतात, तर आपण आश्रमात राहूनही आपल्यात फरक का होत नाही ?, याचा प्रगती न होणार्‍या साधकांनी गांभीर्याने विचार करावा.
    रामनाथी आश्रमातील बांधकाम सेवा करण्यासाठी काही कामगार बाहेरून येतात. एकदा मी एका कामगाराशी (सोनालाल) बोलत होतो. मी त्यांना विचारले, तुम्हाला बाहेर आणि आश्रमात काम करतांना काय भेद जाणवतो ? तो म्हणाला, येथे सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळतो. येथे पुष्कळ साधक असूनही शांत वाटते. पूर्वी बांधकामाच्या कामांत अनेक वेळा पालट होत असतांना माझी पुष्कळ चिडचिड होत असे. आता तसे होत नाही. जे पालट होतात, ते माझ्याकडून आनंदाने स्वीकारले जातात. नंतर त्याने गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आश्रमात सेवा करायला मिळते, याविषयी त्या कामगारामध्ये पुष्कळ कृतज्ञता असल्याचे जाणवले. - श्री. संजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.९.२०१५)

योग्य आचार-विचार

    दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करीत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना; पण स्वत:च्या हिमतीवर उभे राहून स्वावलंबी होणे इष्ट !
- योगतज्ञ दादाजी वैशंपायन

पू. स्वातीताई यांना जवळून अनुभवल्यावर देवाने सुचवलेल्या कृतज्ञता पंक्ती !

पू. स्वाती खाडये
    नाशिक कुंभमेळ्यात प्रथमच पू. स्वातीताई (सनातनच्या ३४ व्या संतरत्न पू. (कु.) स्वाती खाडये) यांना जवळून अनुभवायला मिळाले. सेवा संपवून घरी परत येतांना पू. ताईंविषयी खालील पंक्ती देवाने सुचवल्या. तेव्हा कृतज्ञतेने डोळे भरून आले.
पू. स्वाती - जी स्व अती
अर्पूनी बैसली गुरुदेवांच्या हृदयी ।
पू. ताई म्हणजे जणू प्रीतीचा सागरच अथांग ।
हास्याचा खळखळणारा झरा अन् आनंदीआनंद ॥ १ ॥
पू. ताई म्हणजे सगुणरूपी संत, जणू शस्त्रधारी दुर्गादेवी ।
शुद्धीसत्संगातून क्षात्रवृत्तीने साधकां तारी मोहमायेतूनी ॥ २ ॥

प.पू. पांडे महाराजांनी भावपूर्णरित्या दगडांमध्ये साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन पाहून निर्जीव वस्तूंमध्ये भगवंत पहाण्याची दृष्टी दिल्याविषयी कृतज्ञता वाटणे

    देवद आश्रमात प.पू. पांडे महाराजांनी दगडांमध्ये साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
१. दगडांवरील, तसेच पत्र्यांवरील देवता, प्राणी, मनुष्य इत्यादींचे आकार अतिशय स्पष्टपणे लक्षात येत होते.
२. कलाकृती असलेल्या दगडांवर कलाकृतीचा आकार लक्षात येण्यासाठी तो रंगीत करून स्पष्ट करणे, एका दगडावर अनेक आकार असल्याने ते स्पष्ट होण्यासाठी त्यावर छोट्या आकाराच्या कागदांवर क्रमांक घालून ते त्यावर चिकटवणे, तसेच कोणत्या क्रमांकावर कोणता आकार आहे, याची सूची लावणे, ते पारदर्शक पिशवीत घालणे, इत्यादी अनेक बारकाव्यांनी युक्त अशी ही परिपूर्ण सेवा होती. त्यामुळे ते पहातांनाही प्रसन्नता जाणवत होती. ईश्‍वराचे सगुण रूप असलेल्या संतांची सेवा कशी असते, हेसुद्धा लक्षात आले. 

प.पू. पांडे महाराजांनी जतन केलेल्या दगडांतील कलाकृती पाहिल्यावर दिलेला अभिप्राय !

प.पू. पांडे महाराज
प्रदर्शन पाहिल्यावर साधना करणार्‍या जिवांत संशोधक वृत्ती
आणि शक्ती कशी असायला हवी, याची जाणीव होणे
    मार्गावर पडलेले दगड पाहिल्यावर ते उचलून घ्यावेत, असे आम्हाला वाटत नाही. आम्ही पायाने त्यांना ढकलून देतो; परंतु प.पू. पांडे महाराज यांनी याच दगडांवर संशोधन करून त्यांना कोणते आकार प्राप्त झाले आहेत, हे शोधून काढले. एकेका दगडातील मत्स्य, प्राणी, मनुष्य, देवता इत्यादी आकार पाहिल्यावर आम्हा जिवांमध्ये साधना करतांना किती संशोधक वृत्ती आणि शक्ती असायला पाहिजे, हे माझ्या लक्षात आले.
    प्रदर्शन पहातांना माझ्यावर आध्यात्मिक उपाय होऊ लागले आणि त्यामुळे ढेकरा आल्या. संपूर्ण शरीर उष्ण होऊन त्यातून वाफा निघत होत्या. आश्रमात येऊन मी पुष्कळ काही मिळवले आहे. त्यासाठी कृतज्ञता ! - श्रीमती दीपा नागपाल, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.८.२०१५)

सर्व साधक, वाचक आणि हितचिंतक यांना सूचना

     सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून 'सनातन संस्थेवर बंदी आणावी', अशी आवई उठवण्यात आली आहे. या प्रकरणातील वस्तूस्थिती लोकांपर्यंत जाण्यासाठी २८ सप्टेंबरला 'कृष्णधवल विशेषांक' काढणार आहोत.

आपत्काळाची तीव्रता वाढली असल्यामुळे यापुढे ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ हा नामजप करा !

साधकांना सूचना
     सनातनचे साधक सध्या ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ हा नामजप करत आहेत; मात्र आता आपत्काळाची तीव्रता वाढलेली असल्यामुळे साधकांनी यापुढे ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ हा नामजप बसून, तसेच सतत येता-जाता करावा.

साधकांना सूचना

अ. सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या वृत्तपत्रांची माहिती कळवा ! : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत.

बोधचित्र


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा एकांत 
माणूस कुठेही गेला, तरी त्याला इतर कुठलेही नसेल; पण स्वतःच्या शरिराचे बंधन राहीलच; म्हणून शारीरिक आणि सांसारिक विचारांपासून मुक्त होणे, हाच खरा एकांत.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


मी कोणावर प्रेम करीत नाही. प्रेम मला खेचते. मी प्रेमात फसेन म्हणून मी प्रेमात अडकलो.

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
     भावार्थ : मी प्रेम कोणावर करीत नाही, यातील प्रेम शब्द हा व्यावहारिक, मायेतील प्रेमासंबंधी आहे. प्रेम मला खेचते, यातील प्रेम म्हणजे प्रीती, पारमार्थिक प्रेम. नामधारकाचे प्रेम मला खेचते, म्हणजे मला त्याच्याविषयी ओढ वाटते. 
    मी प्रेमात फसेन, यातील प्रेम हा शब्द व्यावहारिक प्रेमासंबंधी आहे. म्हणून मी प्रेमात अडकलो, यातील प्रेमात हा शब्द प्रीती म्हणजे पारमार्थिक प्रेम या अर्थाने वापरला आहे. थोडक्यात व्यावहारिक प्रेमात फसू नये, म्हणून मी पारमार्थिक प्रेमात अडकलो आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

नेताजींचा सन्मान केव्हा ?

भारतीय समाजाच्या मनावर जाणीवपूर्वक बिंबवण्यात आलेल्या 'अहिंसेच्या मार्गानेच भारताला स्वातंत्र्य मिळेल', अशा भ्रामक संकल्पांमधून बाहेर पडून भारताला इंग्रजांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी थेट लष्करी सामर्थ्य निर्माण करणारे प्रखर राष्ट्रभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दुर्दैवाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत यथायोग्य सन्मान मिळाला नाही. नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला, अशी शक्यता नेहमीच व्यक्त केली गेली. स्वातंत्र्यानंतर नेताजींचे काय झाले ? ते कुठे होते ? या प्रश्नांची उत्तरे नेहमीच भारतीय जनतेला हवी होती; मात्र स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ देशावर सत्तास्थानी असलेल्या काँग्रेसने ती 'गोपनीयते'च्या नावाखाली कधीच उघड होऊ दिली नाहीत. नुकतेच पश्चिम बंगाल शासनाने नेताजींच्या संदर्भातील वर्ष १९३७ ते १९४७ या कालावधीतील ६४ धारिका सार्वजनिक केल्या आहेत. यातील उर्वरित धारिका ओडिशा आणि केंद्रशासन यांच्याकडे आहेत. केंद्रशासनाकडे, तर १०० हून अधिक धारिका आहेत. नेताजींचे वंशज बर्यापच कालावधीपासून या धारिका उघड करण्याची मागणी करत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn