Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साधू, संत, महंत, वारकरी, सत्पंथी संप्रदाय आदी सनातनच्या पाठीशी आहोत ! - स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज

संमेलनाला उपस्थित संत-महंत
      नाशिक, २१ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना हिंदुत्वासाठी गौरवशाली काम करत आहेत. त्यांच्या या हिंदुत्वाच्या कार्यात आपण सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी आपण त्यांच्या पाठीशी संघटितपणे अन् खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आम्ही सर्व जण सनातनच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी येथे काढले. श्रीसंत गुलाबराव महाराज यांच्या समाधी शतक महोत्सवानिमित्त आयोजित वारकरी संत संमेलनात ते बोलत होते.

सनातन संस्थेचे मुख्य केंद्र हे नामांकित संमोहन-उपचारतज्ञाने उभारलेले आध्यात्मिक विश्‍वविद्यालय !

इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रात सनातनच्या अद्वितीय कार्याची माहिती ! 
     पणजी - सनातन संस्थेवर तथ्यहीन आरोप होत आहेत. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीची टूम उठली आहे. या पार्श्‍वभूमीवर इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकाचे गोव्यातील प्रतिनिधी हर्षा राजगुट्टी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन आश्रमात चालणारे अद्वितीय कार्य पाहिले. सनातन संस्थेचे विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे, आश्रमातील कार्य, आश्रमातील साधक यांच्याशी बोलल्यानंतर आणि संपूर्ण आश्रम पाहिल्यानंतर त्यांनी सनातनच्या या आश्रमात चालणार्‍या कार्याविषयी माहिती २० सप्टेंबरच्या दैनिकातील वृत्तात मांडली आहे. सनातन संस्थेचे मुख्य केंद्र हे नामांकित संमोहन-उपचारतज्ञाने उभारलेले आध्यात्मिक विश्‍वविद्यालय आहे, या मथळ्याखाली त्यांनी सनातनच्या कार्याविषयी माहिती दिली आहे.

कठीण काळात शिवसेनेचे सनातनला पुन्हा भक्कम पाठबळ !

सनातनला भक्कम पाठिंबा देणार्‍या शिवसेनेचे मनःपूर्वक आभार ! 
खासदार संजय राऊत
सनातनवर बंदी घालण्याची मागणी हा मूर्खपणा ! - खासदार संजय राऊत 
     सनातन संस्था ही अध्यात्माचा प्रसार करणारी हिंदुत्ववादी संघटना आहे. त्यांचे कार्य आम्ही जवळून जाणून घेतले आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण झाले पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे; मात्र केवळ हिंदु असल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे मूर्खपणाचे आहे. सनातन संस्था ही काही राष्ट्रविरोधी, अल्-कैदा किंवा लादेन नाही. सनातन संस्थेची यापूर्वीच्या प्रकरणांत अनेकदा चौकशी करून झाली आहे. एखाद्या संघटनेची विचारसरणी आक्रमक असली; म्हणून त्यांच्यावर बंदीची कुर्‍हाड चालवणे किंवा त्या संघटनेला फासावर देणे चुकीचे आहे.

फुटीरतावादी नेता यासिन मलिकला अटक

     श्रीनगर - जेकेएल्एफ् या फुटीरतावादी संघटनेचा प्रमुख यासिन मलिक याला पोलिसांनी अटक केली. जेकेएल्एफ्च्या कार्यकर्त्यांनी येथे काढलेल्या मोर्च्याचे नेतृत्व मलिक करत होता. हा मोर्चा लाल चौकात आल्यावर मोर्च्याचे सभेत रूपांतर होण्यापूर्वीच पोलिसांनी मलिकसह २४ हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली. अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात तीन वर्षांचा बुऱहान बशीर आणि पूर्वी आतंकवादी असलेल्या त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी जेकेएल्एफ्ने रॅली काढली होती.

हिंदूंना वंदनीय अशा गायीची कत्तल मुसलमानांनी टाळावी ! - इस्लामिक विचारवंत सईद हुसेन मदानी

      मुसलमानांनी कायदा हातात घेऊ नये आणि गोहत्येपासून स्वत:ला दूर ठेवावे. यामुळे इस्लामची खरी शिकवण इतरांनाही मिळेल. गाय हिंदु धर्मासाठी वंदनीय आहे. आपण जेव्हा तिची कत्तल करतो, तेव्हा हिंदूंच्या भावना दुखावतात. यातून होणार्‍या उद्रेकात हिंसाचार घडून येतो. प्राणहानीसोबतच संपत्तीची हानीही होते. देशात अस्थिरता निर्माण होते. ही स्थिती टाळण्यासाठी मुसलमानांनीही गायींची कत्तल करण्याची प्रथा बंद करायला हवी. 

श्रीराम सेना आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना सनातनच्या पाठीशी आहेत ! - श्री. मुतालिक

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांची 
सनातनच्या हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील सेवाकेंद्राला भेट
      हुब्बळ्ळी (कर्नाटक) - सध्या सनातनवर चुकीचे आरोप केले जात असून त्यात कोणतेही तथ्य नाही. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समीती चांगले कार्य करत आहे. आपण सत्याच्या बाजूने आहोत. त्यामुळे साधकांनी घाबरून न जाता धीर धरावा आणि त्यांची साधना चांगल्या प्रकारे चालू ठेवावी. श्रीराम सेना आणि हिंदुत्ववादी संघटना सनातनच्या पाठीशी आहेत, या शब्दांत श्रीराम सेनेेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी साधकांना आश्‍वस्त केले. पानसरे हत्या प्रकरणी प्रसारमाध्यमांकडून सनातन संस्थेवर आरोप करण्यात येत आहेत. या पाश्‍वभूमीवर श्री. मुतालिक यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह नुकतीच हुब्बळी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात येऊन साधकांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

(म्हणे) मुख्यमंत्री फडणवीस हेच कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार !

मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणाला रा.स्व. संघाला उत्तरदायी ठरवणारे 
शमशुद्दीन मुश्रीफ यांचा आणखी एक कांगावा !
      पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्ष मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विश्‍वास व्यक्त करत असतांना या प्रकरणाला जातीय रंग देणे योग्य आहे का ?
     कोल्हापूर - कॉ. पानसरे यांची प्रकृती सुधारत असतांना त्यांना मुंबईत नेण्याची आवश्यकता नव्हती. ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्यावरून हा कटाचाच एक भाग होता, हे स्पष्ट होते. त्यानंतर दी वीकमध्ये आलेल्या या लेखावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या कटाचे मुख्य सूत्रधार आहेत, हे स्पष्ट होते. हे आरोप हू कील्ड करकरे या पुस्तकाचे लेखक आणि माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
     शहीद गोविंद पानसरे विचारमंचच्या वतीने घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील आणि अन्य उपस्थित होते. या वेळी त्यांनी शासनातील भाजपच्या नेत्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य केले.

समाजहितासाठी गोहत्या टाळा !

दक्षिण भारतातील मौलवींचे मुसलमानांना आवाहन 
     भाग्यनगर (हैद्राबाद) - समाजाच्या व्यापक हितासाठी मुसलमानांनी गाय आणि बैल यांचा बळी देण्याची प्रथा थांबवावी, असे आवाहन दक्षिण भारतातील काही मौलवींनी केले आहे. नुकतेच केरळमधील ८ सहस्र मशिदी सदस्य असलेल्या केरळ सुन्नी महालू फेडरेशनने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे आवाहन मुसलमानांना केले होते. 
     मौलवींनी मुसलमानांना सांगितले, सद्यस्थितीत मुसलमान समाजाने मोठेपणा दाखवायला हवा. गायींची हत्या करण्याची जुनाट परंपरा बंद करून इस्लामने अनुमती दिलेल्या प्राण्यांचीच कत्तल करावी. यामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत आणि देशातही शांतता टिकून रहाण्यास साहाय्य होईल.(इस्लामने गाय आणि बैल यांच्या हत्येस अनुमती दिली नसतांना भारतातील बहुतांश मुसलमान मात्र इस्लामच्या नावावर गाय आणि बैल यांची कत्तल करतात. ते नेमके कुठल्या इस्लामचे आचरण करतात, असा संशय कुणाला आल्यास त्यात नवल काय ? - संपादक) मौलवींच्या या विचारांना बहुतांश मुसलमान शाळांनीही पाठिंबा दिला आहे. गोहत्या थांबवण्यात यावी, यासाठी सामाजिक संकेतस्थळे, बैठका आणि शुक्रवारचे एकत्रित नमाजपठण यांच्या माध्यमातून या विचारांचा प्रचार करण्यात यावा, असेही या मौलवींनी म्हटले आहे.

बकरी ईदच्या काळातही गोमांस बंदी हटवणार नाही !

मुंबई उच्च न्यायालयाचा स्तुत्य निर्णय !
      मुंबई - महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू केलेली गोमांस बंदी बकरी ईदच्या काळात तात्पुरती हटवावी, यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. शासनाने राज्यात गोवंशहत्या बंदीसह गोमांसावर बंदी घातली आहे. त्यामुळे जर बंदीत शिथिलता आणायची असेल, तर ते राज्यशासनाचे काम आहे, असे सांगून न्यायालयाने हात झटकले. २५ ते २८ सप्टेंबर या बकरी ईदच्या काळात गोमांस बंदी हटवावी, अशी मागणी करणारी याचिका अस्लम आलमीर मल्कानी आणि इशाक अब्दुल अझीझ शेख यांनी दाखल केली होती. गोमांस बंदीमुळे धार्मिक अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांच्या अधिकारांचे हनन होत असल्याचा दावा याचिकादारांनी केला होता.

सनातन संस्थेला वारकरी आणि हिंदुत्ववादी पक्ष यांचा भक्कम पाठिंबा !

धर्माचे काम करणार्‍यांना त्रास देऊ नका अन्यथा त्यांच्या मागे सबंध देश उभा राहील ! 
- ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री, अध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी प्रबोधिनी
      महाराष्ट्रात आणि सबंध देशात धर्माचे काम करणारे लोक, धर्माचार्य आणि साधक यांना त्रास देण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली काही मंडळी हिंदु धर्म अन् हिंदु धर्माचे काम करणार्‍या संघटना यांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. साधकांना कुठल्यातरी प्रकणात गोवण्याचा प्रयत्न करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करू पहात आहेत. याद्वारे धर्माला अपकीर्त करून लोकांना धर्मापासून दूर नेण्याचा काही विघ्नसंतोषी लोकांचा डाव आहे. सनातन संस्थेला अनेकदा अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. आताही एका युवकाला पकडले आहे. त्याआडून या संघटनेवर बंदी आणण्याची मागणी समाजकंटकांकडून केली जात आहे. अद्याप तो केवळ संशयित असतांना थेट संस्थेवरच बंदीची मागणी करणे, हे देश आणि धर्म यांसाठी घातक आहे. धर्माचे काम करणार्‍यांना त्रास देऊ नका, अन्यथा धर्माचे काम करणार्‍यांच्या मागे सबंध देश उभा राहील. 

वैचारिक पराभवामुळे रचलेले पुरोगाम्यांचे सनातनबंदीचे कुभांड निषेधार्हच ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून श्री. मारुति सुतार, पू. नंदकुमार जाधव,
पू. चारुदत्त पिंगळे, श्री. सुनील घनवट
    नाशिक - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना कोणताही सबळ पुरावा नसतांना अटक करण्यात आली. ही अटक म्हणजे सनातन संस्थेला लक्ष्य करण्यासाठी झालेली अन्याय्य कारवाई आहे. या हत्या प्रकरणात सनातनला अकारण गोवून हिंदुत्ववादी संघटनांची मानहानी करण्याचे हे पुरोगाम्यांचे षड्यंत्र आहे. सनातनचे हिंदुत्वाचे कार्य जोमाने वाढत असल्याने पुरोगामी आणि निधर्मी यांचा वैचारिक पराभव झाला आहे. तो पचनी न पडल्याने मीडिया ट्रायल करणारे, पुरोगामी, साम्यवादी, काँग्रेस आदी पक्ष यांनी पोलिसांची चौकशी आणि न्याययंत्रणेचे न्यायदान होण्यापूर्वीच सनातनविरोधी कुभांड रचून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी चालवली आहे.

नव्या राज्यघटनेनुसार गाय नेपाळचा राष्ट्रीय पशू

धर्मांतराला घटनेची मान्यता नाही !
      काठमांडू (नेपाळ) - नेपाळमध्ये अखेर बहुप्रतिक्षित नवी राज्यघटना लागू झाली. या राज्यघटनेनुसार नेपाळ हे आता धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य झाले. सनातन हिंदु धर्माच्या सर्व परंपरांच्या रक्षणाचे दायित्व शासनाने स्वतःकडे घेतले असून हिंदूंना पवित्र असणार्‍या गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्यात आला आहे, तसेच या घटनेने देशात धर्मांतराला अवैध घोषित केले आहे. राष्ट्रपती रामबन यादव यांनी संसदेत नवीन राज्यघटना लागू झाल्याची घोषणा केली. नवीन राज्यघटनेत नेपाळला धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घोषित केल्याने तेथील बहुसंख्य हिंदूंनी तीव्र निषेध व्यक्त केला असून या निर्णयाविरोधात आंदोलनाला आरंभ केला आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी !

राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या मागणीचा जाहीर निषेध... 
समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने 
सांगली, तासगाव, कवठेमहांकाळ आणि शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे निवेदन 
     
सांगली येथे जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड
(उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी 
     सांगली,
२१ सप्टेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना केवळ संशयित म्हणून अटक केली. या प्रकरणी पोलिसांकडून अजून चौकशी चालू आहे; मात्र 'मीडिया ट्रायल' करणारे, पुरोगामी मंडळी आणि राजकीय पक्ष यांनी पोलिसांची चौकशी आणि न्याययंत्रणेचे न्यायदान होण्याआधी सनातनवर बंदी घालण्याची मागणी करण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी, असे निवेदन समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने सांगली, तासगाव, कवठेमहांकाळ आणि शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या मागणीचा सर्वांनी एकमताने निषेध असून "आम्ही सर्व सनातन संस्थेच्या पाठीशी आहोत", असे सांगितले. (सनातनच्या पाठीशी उभे रहणार्‍या सर्वच राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे सनातन संस्थेने आभार कळवले आहेत ! - संपादक) 

शिर्डी येथील श्री साई संस्थानने पोलीस यंत्रणेला दिले १ कोटी ७५ लक्ष रुपयांचे विविध साहित्य

हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा आणि
 मंदिरे पुन्हा भक्तांच्या स्वाधीन होण्यासाठी प्रयत्न करा ! 
     शिर्डी, २१ सप्टेंबर - श्री साईबाबांच्या अर्पणपेटीत भाविकांनी अर्पण केलेल्या पैशांतून श्री साई संस्थानाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस यंत्रणेला १ कोटी ७५ लक्ष रुपयांचे संरक्षणाचे विविध साहित्य देणगी स्वरूपात दिले. (देवधनाचा वापर हा धर्मकार्यासाठी व्हायला हवा. पोलिसांना संरक्षणाचे साहित्य पुरवणे हे शासनाने कर्तव्य आहे. - संपादक) 

त्र्यंबकेश्‍वर येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास साधू-महंतांचा उदंड प्रतिसाद !

अनेक महंतांकडून सनातनच्या कार्याचा गौरव; महंतांचे त्यांच्या 
आश्रमात प्रदर्शन लावण्याची मागणी !
       त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), २१ सप्टेंबर (वार्ता.) एकीकडे कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणा आणि प्रसिद्धीमाध्यमे सनातनवर खोटे आरोप करून समाजात सनातनची अपकीर्ती करत असतांना दुसरीकडे नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे सिंहस्थपर्वानिमित्त विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनांना साधू, महंत, संत आणि समाजातील जिज्ञासू यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सनातनचे राष्ट्र आणि धर्म या विषयावरील ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने पाहून भारावून गेलेले साधू, महंत आणि जिज्ञासू यांनी सनातनच्या कार्याचा गौरव केला आहे. याचसमवेत सप्ताह आणि कार्यक्रमाच्या वेळी साधू-महंतांच्या आश्रमात सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्याची त्यांनी आर्वजून मागणी केली आहे. याशिवाय उज्जैन येथे एप्रिल २०१६ मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यात सनातनला संपूर्ण साहाय्य केले जाईल, असेही साधू-महंत यांनी सनातनच्या साधकांना सांगितले आहे. 

जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी वासुदेवाचार्यजी महाराज (विद्याभास्कर) यांची सनातनच्या प्रदर्शनास भेट

प्रदर्शन पहातांना डावीकडून श्री. सुनील घनवट, जगद्गुरु
रामानुजाचार्य स्वामी वासुदेवाचार्यजी महाराज
(विद्याभास्कर), श्री. विनय पानवळकर
आणि पू. नंदकुमार जाधव
    नाशिक, २१ सप्टेंबर (वार्ता.) - सिंहस्थपर्वासाठी येथे आलेले जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी वासुदेवाचार्यजी महाराज (विद्याभास्कर) यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेल्या प्रदर्शनास भेट दिली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी त्यांना प्रदर्शनाविषयी अवगत केले. 
     प्रदर्शनाविषयी बोलतांना ते म्हणाले, हे प्रदर्शन फार चांगले अन् लोकांवर संस्कार करणारे आहे. प्रत्येक हिंदूने स्वत:ची हिंदु ही ओळख जपली पाहिजे. आपली वेशभूषा, आचरण आदी त्यानुसारच असायला हवे आणि याचा आरंभ स्वत:पासूनच केला पाहिजे. आपल्यात ब्राह्मतेज असणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राविषयी बोलतांना ते म्हणाले, कुणी काहीही म्हणू दे; मात्र भारत प्राचीन काळापासून हिंदु राष्ट्र होते, आहे आणि सदैव राहील. भारतीय संविधानाच्या प्रथम आवृत्तीच्या मुखपृष्ठावर भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचे चित्र होते. ही गोष्ट आपण सर्वांपर्यंत पोहचवली पाहिजे. लोकांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्यात जागृती केली पाहिजे. सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी वासुदेवाचार्यजी महाराज (विद्याभास्कर) यांचा सन्मान केला.

सनातनच्या साधकांना भेटल्यानंतर मनाला शांती मिळते ! महंत श्री राजराजेश्‍वरानंद महाराज

महंत राजराजेश्‍वरानंद महाराज यांना सनातनच्या 
ग्रंथ प्रदर्शनाची माहिती देतांना श्री. विलास गरूड
    त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), २१ सप्टेंबर (वार्ता.) सनातनच्या साधकांना भेटल्यानंतर मनाला शांती मिळते. सनातनचे धर्मप्रसाराचे कार्य योग्य दिशेने चालू असून अशा धर्मप्रसाराची समाजाला आवश्यकता आहे. आपले कार्य सत्याच्या मार्गाने चालू आहे. मला आपल्या आश्रमास भेट द्यायची आहे. मला इतर संघटनांच्या कार्याच्या तुलनेत १ सहस्र पटीने आपले कार्य महत्त्वाचे वाटते, असे उद्गार नर्मदा येथील महंत श्री राजराजेश्‍वरानंद महाराज यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना काढले. 
     येथील प.पू. गगनगिरी मठाजवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन धर्मरथावर लावले आहे. त्याला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी सनातनचे साधक श्री. विलास गरूड यांनी महाराजांना ग्रंथ प्रदर्शनाची माहिती दिली. प्रदर्शन पहातांना महाराजांनी पुष्कळ ग्रंथ आणि देवतांचे ताईत (लॉकेट) खरेदी केले. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाचा गैरवापर करत सार्वजनिक तलावांत गणेशमूर्ती विसर्जनास बंदी !

उच्च न्यायालयाच्या नावाचा वापर करून खोटे फलक 
लावण्याचा अधिकार नगरपालिका मुख्याधिकार्‍यांना कोणी दिला ?
सातारा नगरपालिका मुख्याधिकार्‍यांकडून गणेशभक्तांची फसवणूक 
     सातारा, २१ सप्टेंबर (वार्ता.) - शहरातील मोती तळे आणि फुटका तलाव येथे सातारा नगरपालिकेच्या वतीने फलक लावण्यात आलेले आहेत. या फलकावर 'मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तळ्यात निर्माल्य आणि मूर्ती विसर्जनासाठी मनाई केली आहे', असे लिहिण्यात आलेले आहे; मात्र मुंबई उच्च न्यायालयाने असे कोणतेही निर्देश अथवा आदेश दिलेले नाहीत. तरीही मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाचा गैरवापर करत सातारा नगरपालिका मुख्याधिकारी यांनी शाहूनगरवासीय गणेशभक्तांची घोर फसवणूक केली आहे. 

अपघातानंतर २ मास (महिने) ईश्‍वरी ज्ञानाचे टंकलेखन करतांना स्वेच्छेपेक्षा परेच्छेने किंवा ईश्‍वरेच्छेने वागण्याचे महत्त्व लक्षात येणे

श्री. राम होनप
१. अपघातात डावा हात दुखावणे आणि १५ दिवस ईश्‍वरी ज्ञान मिळायचे बंद होणे : मार्च २०१५ मध्ये एका अपघातात माझा डावा हात दुखावला. अपघातापूर्वी मला ईश्‍वरी ज्ञान मिळत होते; पण अपघातानंतर १५ दिवस मला ईश्‍वरी ज्ञान मिळायचे बंद झाले.
२. उजवा हात आणि दोन पाय यांवर जखमा झाल्याने देवाने मला हात बरा होईपर्यंत ज्ञानप्राप्तीच्या सेवेतून सुटी द्यावी, असा विचार मनात येणे : अपघाताच्या १५ दिवसांनंतर मला परत ज्ञान मिळू लागले. तेव्हा मला एका हाताने टंकलेखन करण्यास बराच वेळ लागत होता, तसेच उजवा हात आणि दोन पाय यांवर जखमा झाल्याने ज्ञान घेण्याची माझी स्थिती नव्हती. त्यामुळे देवाने मला हात बरा होईपर्यंत ज्ञानप्राप्तीच्या सेवेतून सुटी द्यावी, असा विचार माझ्या मनात येत होता.

बकरी ईदच्या काळात गोवा मांस प्रकल्पात गोवंशहत्या करण्यास अनुमती

गणेशोत्सवातच पर्यावरण आठवणारे सर्व पर्यावरणवादी कुठे गेले ? 
'बकरी ईद' असतांना हिंदूंना पूज्य असणार्यो गोवंशाची हत्या कशासाठी ?
पणजी (गोवा) - येत्या बकरी ईदच्या काळात (२३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत) गोवा मांस प्रकल्पात गोवंशहत्या करण्यास गोवा शासनाने सशर्त मान्यता दिली आहे. गोवंशहत्येच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट आहे. याविषयी सुनावणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे बकरी ईदच्या काळात तात्पुरती गोवंशहत्येस मान्यता देत असल्याचे शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला कळवले आणि न्यायालयानेही यास कोणतीही हरकत घेतली नाही.

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, धनंजय देसाई आणि समीर गायकवाड यांच्या सुटकेसाठी २० नोव्हेंबरला मुंबईत भव्य निषेध मोर्चा !

पनवेल येथे महाराणा प्रताप बटालियाच्या नेतृत्वाखाली 
पृथ्वी हॉलमध्ये हिंदुत्वनिष्ठांची बैठक संपन्न !
      पनवेल, २१ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुनिष्ठ संघटना यांना संपवण्यासाठी जाणीवपूर्वक साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई आणि सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड तुरूंगात टाकले जात आहे. त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. सर्वच्या सर्वजण निर्दोष आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी त्यांना सोडून द्यावे, या मागणीसाठी २० नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा निर्धार समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी व्यक्त केला. या विषयीची माहिती हरिद्वार येथील १००८ श्री श्री विवेकानंद ब्रह्मचारी महाराज, आझादी बचाओ आंदोलनाचे श्री. जितेंद्र आर्य, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. धनंजय देसाई यांच्या भगिनी सौ. रूपाली मराठे, महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंग सेंगर आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटन यांनी बैकठीनंतर पत्रकारांना दिली.

अभिनव भारत मंचचा गणेशमूर्ती विसर्जनाचा स्तुत्य उपक्रम !

      श्रीवर्धन - येथील अभिनव भारत मंच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक श्री गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन करण्याचा अभिनव उपक्रम राबवला. गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी समुद्रावर अनेक गणेशमूर्तीर्ंचे अवशेष आणि अर्धवट विसर्जित झालेल्या मूर्ती समुद्र किनार्‍यावर येतात आणि श्री गणेशाची विटंबना होते. म्हणून अभिनव भारत मंच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या वर्षी अशा मूर्ती पुन्हा विधीपूर्वक समुद्रात खोल पाण्यात जाऊन विसर्जित केल्या. (श्री गणेशमूर्तींची विटंबना रोखण्यासाठी उपक्रम राबवणार्‍या अभिनव भारत मंचच्या कार्यकर्त्यांवर श्री गणेशाची कृपा होईल ! - संपादक) सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही चळवळ राबवली. शैलेश ठाकूर, संतोष सापते, अर्जुन राठोड, गणेश पालेकर, अमित सारोळा, श्रेयस चित्ते, कमलेश रहाटे, अनिकेत किल्लेदार, संदीप आव्हाड या सभासदांनी या चळवळीत भाग घेतला.

सनातन संस्थेवर आरोप करणे पूर्णत: चुकीचे ! - पृथ्वीराज पवार, युवा नेते, शिवसेना

     सांगली, २१ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे कार्य पूर्णत: उघडपणे चालते. संस्थेचे साधक काय करतात, हे संपूर्ण समाजाला माहिती आहे. संस्थेची विचारधाराही लोकांना माहिती आहे. त्याचबरोबर कॉ. पानसरे प्रकरणातील तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे या प्रकरणी सनातन संस्थेवर आरोप करणे, तसेच संस्थेवर बंदीची मागणी करणे तर पूर्णत: चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे युवा नेते श्री. पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केली आहे.

(म्हणे) हा देश काय तुमच्या बापाचा आहे ?

भारतमाता न मानणारे, राष्ट्रध्वजाला वंदन न करणारे आणि 
वन्दे मातरम् न म्हणणारे हा देश त्यांचा आहे, असे कोणत्या आधारावर समजतात ? 
एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची दर्पोक्ती 
     भाग्यनगर (हैद्राबाद) - 'गीता आणि रामायण हिंदुस्थानचा आत्मा आहे, न कि कुराण आणि बायबल', या केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्या वक्तव्यानंतर एम्.आय.एम्.चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शर्मा यांना असांस्कृतिक मंत्री संबोधले असून 'हा देश काय तुमच्या बापाचा आहे ?', असा प्रश्‍न केला.  (स्वत : असांस्कृतिक भाषा वापरणारे ओवैसी दुसर्‍यांना काय संस्कृती शिकवतात ? - संपादक) 

आंबेशी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात चोरी !

हिंदूंनो, मंदिरांवर सातत्याने होणारे आघात रोखण्यासाठी संघटित व्हा !
वाळपई - आंबेशी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात १९ सप्टेंबरच्या रात्री चोरी झाली. हिंदूंच्या घरांच्या मध्यभागी असलेल्या या मंदिरात घुसून चोरांनी सुमारे ४० सहस्र रुपये किमतीची चांदीची प्रभावळ आणि अन्य दागिने चोरून नेले. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

हा देश स्वत:चा समजणारे वन्दे मातरम् म्हणणार का ?

फलक प्रसिद्धीकरता
     कुराण आणि बायबल नाही, तर गीता आणि रामायण हिंदुस्थानचा आत्मा आहे, या केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्या वक्तव्यानंतर एम्.आय.एम्.चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हा देश काय तुमच्या बापाचा आहे ?, असा प्रश्‍न केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
yaha desh kya tumhare bap ka hai ? aisa MIMke neta Asaduddin Ovaisine kendriya mantri Sharmase kaha.
To kya yaha desh Vandemataramko na mannevalonka hai ?
जागो ! : 
यह देश क्या तुम्हारे बाप का है ? ऐसा एम्.आय.एम्.के नेता असदुद्दीन ओवैसीने केंद्रीय मंत्री शर्मासे कहा.
तो क्या यह देश वन्देमातरम्को ना माननेवालोंका है ?

विसर्जनासाठी नदीला पाणी नाही !

पालिका प्रशासनाची गणेशोत्सवाप्रती उदासीनता ! 
     पुणे, २१ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा उत्सव ! जवळपास प्रत्येक हिंदु कुटुंबात तो साजरा होतोच; पण महानगरपालिका प्रशासनाने मात्र हा उत्सव धर्मशास्त्रानुसार हिंदूंना साजराच करता येऊ नये, असा चंग बांधला आहे कि काय, अशी परिस्थिती गौरी आणि ५ व्या दिवसाच्या गणेशविसर्जनाच्या दिवशी पहायला मिळाली. मुठा नदीला पाणी सोडण्यात आले नव्हते. नदीमधील गाळ काढण्यात आला नव्हता. तसेच नदीकाठी जाण्यासाठी रस्ताही व्यवस्थित बांधण्यात आला नव्हता. नदीला पाणी नसल्याने अनेक गणेशमूर्ती पाण्यात पूर्णपणे बुडल्या जात नव्हत्या, तसेच काही मूर्ती पाण्यावर तरंगत होत्या. धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे आणि गौरींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे अनेक भाविकांनी अप्रसन्नता व्यक्त केली. (खरे तर पालिका प्रशासनाने ठरवले, तर गणेशोत्सव भाविकांना चांगल्या प्रकारे साजरा करता यावा, यासाठी पुष्कळ चांगल्या सोयी-सुविधा पुरवता आल्या असत्या; पण हिंदूंच्या धार्मिक उत्सवाप्रती असणार्‍या अक्षम्य उदासीनतेमुळे भाविकांच्या पदरी निराशाच पडल्याचे चित्र दिसते. ही स्थिती पालटण्यासाठी धर्मशिक्षित झालेल्या हिंदूंच्या प्रभावी संघटनाला पर्याय नाही. - संपादक)

सनातनवर बंदी टिकणार नाही ! - एकनाथ खडसे

     मुंबई - भाजप शासन कॉम्रेड पानसरे यांच्या मारेकर्‍यांचा पूर्ण छडा लावल्याविना गप्प बसणार नाही. शिवसेनेेने काय भूमिका घ्यावी, याविषयी आम्ही त्यांना सांगू शकत नाही; मात्र एकूण शासन म्हणून जे गुन्हेगार असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले जातील. बाकी सनातन संस्थेविषयी जी बंदीची मागणी केली जात आहे, तिच्याविषयी अभ्यास झाला पाहिजे. सदर बंदी न्यायालयात टिकू शकणार नाही. त्यामुळे ती लगेच घाला, असे म्हणणे अव्यवहार्य आहे, असे मत राज्याचे महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

काही वृत्तपत्रे....

काही वृत्तपत्रे खप होण्यासाठी बातम्या भडक करून छापतात ।
एका नाण्याला दोन बाजू असतात, हे जाणूनबुजून विसरतात ।
दुसरी बाजू कीतीही खरी असली, तरी ती देण्याचे टाळतात ।
हिंदूंनो, अशी वृत्तपत्रेच समाजात द्वेषभावना पसरवतात ॥               
- श्री. अनिल कुलकर्णी, देवद, पनवेल.

...यांनी मुंबईला अस्वच्छ ठेवले !

मुंबई महानगरपालिका ही देशातील प्रथम क्रमांकाची मोठे अर्थकारण असणारी महापालिका आहे. शहराच्या व्याप्तीनुसार तिचा विस्तारही व्यापक असल्याने याचा लाभ आपले खिसे भरण्यासाठी भ्रष्टाचारी घेणार नाहीत, तर नवलच होय. नालेसफाई प्रकरण चांगलेच अंगाशी आल्याने प्रमुख अभियंत्यासह आयुक्तांनी १४ अधिकर्याांना निलंबित केले आहे. कंत्राटदार, वजनकाटा ठेकेदार यांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

प्रत्येक वेळी धर्मांधच पकडले जातात, हे लक्षात घ्या !

     दाबोळी (गोवा) विमानतळावर १८ सप्टेंबर २०१५ या दिवशी जकात अधिकार्‍यांनी २५ लक्ष २० सहस्र रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी करणार्‍या एम्. इनायतुल्ला आणि शाहीद अहमद यांना अटक केली. (२०.९.२०१५)

बुडाला औरंग्या पापी; आता इतर...!

श्री. अरुण रामतीर्थकर
  माझ्या देहलीच्या वास्तव्यात फिरतांना खटकलेली एक गोष्ट म्हणजे नवी देहलीच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील रस्त्यांना आक्रमक, विध्वंसक मोगल राज्यकर्त्यांची नावे. त्यातही औरंगजेब आणि काँग्रेस कार्यालय असलेला अकबर रोड ही नावे डोळ्यांना खुपत होती. औरंगजेब रस्त्यावर विदर्भातील एक नेते एन्.के.पी. साळवे यांचे निवासस्थान होते. या मराठी माणसाला आपला पत्ता सांगतांना किंवा लिहितांना वैषम्य वाटत असेल, अशी माझी समजूत ! तसे असेल, तर ती एक बातमी होईल; म्हणून मी संसद आवारात त्यांना भेटलो. माझी शंका बोलून दाखवली. त्यावर साळवे म्हणाले, "तुम्हाला असे वाटावे, हेच आश्चर्य आहे. औरंगजेब भारताचा सम्राट होता. उपभोगशून्य स्वामी म्हणावे, तर औरंगजेबला ! त्याची कबर किती साधी आहे, ते औरंगाबादला जाऊन पहा." थोडक्यात साळवेंना एका मराठी अर्थात काँग्रेसवाल्या खासदाराला आपल्या पत्त्याची खंत वाटत नव्हती. उलट गर्व होता. मी निराश झालोे; मात्र परवा अचानक देहली महानगरपालिकेने 'औरंगजेब रोड' हे नाव पालटून 'डॉ. अब्दुल कलाम रोड' असे नामांतर केल्याची अतिशय सुखद बातमी वाचली. एका चांगल्या प्रक्रियेचा हा शुभारंभ ठरावा, अशी माझी इच्छा आहे; कारण देहलीत पालटण्यासारखे असे आणखी पुष्कळ काही आहे. काँग्रेस कार्यालय असलेला अकबर रोड. हा अकबर म्हणे सेक्युलर होता ! सेक्युलर म्हणजे रजपुतांच्या बायका मुसलमान केल्या; मात्र राजघराण्यातील एकही मुसलमान स्त्री रजपुतांना दिली नाही. असा 'वन वे ट्रॅफिक' म्हणजे सेक्युलॅरिझम आणि घरवापसी म्हणजे जातीयवाद. असा सेक्युलर अकबर आतापर्यंत चालला. इथून पुढे नको.

ट्रकमालक आणि अन्य खाणींवर अवलंबून असणार्‍यांसाठी जनतेचे पैसे का वापरले ? इतकी वर्षे पैसे कमावलेल्या खाण उत्पादकांकडून ते पैसे का दिले नाहीत ?

      राज्यातील ट्रकमालक आणि अन्य खाण अवलंबितांसाठी गोवा शासनाने एकूण २० कोटी रुपये संमत केले. खनिज खाणी बंद पडल्याने जे युवक बेरोजगार बनले होते, त्यांनाही शासकीय योजनेंतर्गत ४ कोटी ४८ लक्ष रुपये संमत करण्यात आले आहेत. (१९.९.२०१५)

आजपासून मी सनातनचा झालो, असे सांगणारे अयोध्येतील श्री महंत १०८ देवरामदासजी वेदांती महाराज !

      हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी उभारलेल्या प्रदर्शनात हिंदु धर्मात सांगितलेल्या कृतींचे तात्त्विक आणि आध्यात्मिक महत्त्च सांगण्यात आले आहे. हे चांगले प्रयत्न असून त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. आजपासून मी सनातनचा झालो आहे. यापुढे सनातनचे आणि माझे कार्य वेगळे नसून एकच आहे.
- श्री महंत १०८ देवरामदासजी वेदांती महाराज, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय देवस्थल आणि अयोध्या नवनिर्माण ट्रस्ट, श्रीरामवल्लभाकुंज, अयोध्या, उत्तरप्रदेश.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी उभारलेल्या प्रदर्शनाला ईश्‍वरी अधिष्ठान आहे !

      हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी उभारलेल्या प्रदर्शनाच्या मागे मानवी प्रयत्न नाहीत, तर यामागे ईश्‍वरी प्रयत्न आहेत. या प्रयत्नांचा झेंडा संपूर्ण विश्‍वाच्या कानाकोपर्‍यात फडकेल. जनमानसात जागृती होईल. या प्रदर्शनाच्या दर्शनाने परम सुखाची आणि परम शांतीची प्राप्ती होईल. अशा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपले प्रयत्न यशस्वी होवोत. - महामंडलेश्‍वर प.पू. जन्मोजय शरणजी महाराज, रसिक पिठाधीश्‍वर, अयोध्या, उत्तरप्रदेश.

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक दाम्पत्याची आवश्यकता !

संतसेवेची सुवर्णसंधी !
      पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक दाम्पत्याची आवश्यकता आहे. जे सेवक दाम्पत्य या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 
भ्रमणभाष : ८४५१००६०७० 
इ-मेल : hinducoordination@gmail.com 

हिंदुत्वाला अपकीर्त करण्यासाठीच सनातनवर कारवाई ! - दैनिक सामना

  
दैनिक सामनाने २१ सप्टेंबर या दिवशी तथाकथित पुरोगाम्यांच्या सनातनद्वेषाचे पितळ उघडे पाडणारे कुत्रा, माकड व बोकड आणि सनातनची सुपारी ! हे संपादकीय ! जनतेसमोर पुरोगाम्यांचा बुरखा फाडून राष्ट्र आणि धर्म निष्ठ सनातन संस्थेला खंबीर पाठिंबा देणारे दैनिक सामनाचे संपादक अन् शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे आणि कार्यकारी संपादक खासदार श्री. संजय राऊत यांचे सनातन संस्थेच्या वतीने जाहीर आभार !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सिंहस्थपर्व, नाशिक येथे आयोजित केलेल्या 'राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती' प्रदर्शनात येत असलेला जिज्ञासूंचा ओघ ही सनातनविरोधकांना चपराकच !


आश्रमात येण्यापूर्वी सनातन संस्थेविषयी मनात विकल्प असणे आणि नातीने साधनेचा दृष्टीकोन देऊन साधनेचे महत्त्व पटवून देणे

कु. चैताली पोटे
१. सनातनविषयी पुष्कळसे तर्क-वितर्क मनात असणे
    मी रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी माझ्या मनात सनातनविषयी पुष्कळसे तर्क-वितर्क (विकल्प) असायचे. मला कधी कधी वाटायचे की, लोक सनातनविषयी एवढा आदर का बाळगतात ? गळ्यात नामपट्टी कशासाठी बांधतात ? घरात देवतांच्या नामपट्ट्या कशासाठी लावतात ? धर्मजागृती सभा घेतात. अशा सभा घेऊन यांना साधक मिळतील का ? त्याऐवजी नामजप करा. नामजप केल्याने देव साहाय्य करतो ना ! सनातनवाले सकाळ-संध्याकाळ २ - ३ घंटे नामजप करतात. एवढ्याने काय साध्य होणार ? यापूर्वी कुणी एवढा नामजप करा आणि या नामपट्ट्या घ्या, असे सांगत नव्हते.

रामनाथी आश्रमात आल्यानंतर प.पू. डॉक्टरांच्या दर्शनाची लागलेली ओढ आणि गुरुकृपेेने त्यांच्या दर्शनाचा अनुभवलेला आनंद !

    १७.२.२०१५ या महाशिवरात्रीच्या दिवशी प.पू. डॉक्टरांचे दर्शन घेण्यासाठी आणि आमची नात कु. चैताली हिला (कु. चैताली पोटे हिला) रामनाथी आश्रमात पोहोचवण्यासाठी मी अन् माझी पत्नी सौ. आशाबाई सुपेकर रामनाथी आश्रमात आलो. 
१. प.पू. डॉक्टरांचे दर्शन झाले नसल्याची रुखरुख मनाला लागून
रहाणे आणि दर्शन होणार असेल, तर आपोआप होईल, असे नातीने सांगणे
    गोवा आणि आश्रम दर्शन झाल्यावर प.पू. डॉक्टरांचे दर्शन कधी होईल ?, असे आम्हाला वाटत होते. मनाची ही रुखरुख मी चैतालीला बोलून दाखवली, आम्हाला प.पू. डॉक्टरांचे दर्शन झाले नाही, ते मनाला लागून राहिले आहे, तरी तू आम्हाला दूरून का होईना, प.पू. डॉक्टरांचे दर्शन घडवून आण. त्यावर ती म्हणाली, दर्शन होणार असेल, तर आपोआप होईल. आम्हाला वाटायचे, आपण प्रयत्न केले नाही, तर दर्शन कसे होईल ? ही रुखरुख आमच्या मनात सारखी असायची.

समजूतदार आणि बालपणीच संतसहवासाची ओढ असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बडोदा येथील चि. सोहम् पोत्रेकर (वय ४ वर्षे) !

    बडोदा येथील बालसाधक चि. सोहम् पोत्रेकर याचा २२.९.२०१५ या दिवशी चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्याच्या संदर्भात आलेली अनुभूती पुढे देत आहोत.
चि. सोहम पोत्रेकर याला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. दीड ते ३ वर्षे
१ अ. समजूतदारपणा
१. सोहम पावणेदोन वर्षांचा असतांना मी गर्भवती होते. त्या वेळी मी त्याला उचलून घेऊ शकत नव्हते. इतर मुलांच्या आईप्रमाणे मीही त्याला उचलून घ्यावे, असे त्याला पुष्कळ वाटायचे; पण समजावून सांगितल्यावर तो पुष्कळ वेळा शांत रहायचा. तो सव्वा दोन वर्षांचा असतांना मी बाळंतीण होते. प्रसूती शस्त्रकर्म करून झालेली असल्याने जवळपास दीड मास सोहमला माझ्यापासून दूर दुसर्‍या खोलीत झोपावे लागले. तेही त्याने सहन केले.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 
१ आ. संकेतस्थळाला मिळालेले मानांकन
१. गूगलने दिलेले मानांकन (जून २०१५ नुसार) :

पू. (सौ.) सखदेवआजींच्या खोलीत रहायला गेल्यानंतरत्यांच्यातील चैतन्यामुळे साधिकेला आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) अशालता सखदेव
१. नामजप होण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करणे
    पू. सखदेवआजींच्या खोलीत रहायला जाण्यापूर्वी प.पू. डॉक्टरांनी सांगितलेला नामजप सतत करण्यासाठी मला पुष्कळ प्रयत्न करावे लागायचे. तो नामजप व्हावा, यासाठी मी दिवस-रात्र प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्याजवळ रडायचे आणि त्यांना सांगायचे, प.पू. बाबा, मला तुम्ही अखंड नामभक्तीत दंग करा. हे केवळ तुमच्या कृपेनेच साध्य होणार आहे. त्यानंतर मी नामजप होण्यासाठी सतत विविध प्रकारे प्रयत्न करायचे. दैनंदिन कृती करत असतांना मी कधी भ्रमणभाषमधील नामजप लावून ठेवायचे, तर कधी नामजप लिहून काढायचे. उपायांच्या वेळी प्रत्येक ५ ते ७ मिनिटांनी पू. बाबांना प्रार्थना करून नामजप भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करायचे, तर कधी मनातल्या मनात केवळ प.पू. बाबा, प.पू. बाबा असे गुणगुणत रहायचे. त्यातच कधी नामजप व्हायचा.

भाव तेथे देव ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या आणि प.पू. डॉक्टरांप्रतीच्या अत्युच्च भावाचे ठायी ठायी दर्शन घडवणार्‍या श्री. प्रदीप हसबनीस यांच्या सत्काराच्या वेळी साधिकांनी अनुभवलेले भावक्षण !

श्री. प्रदीप हसबनीस
    ढवळी, फोंडा येथील श्री. प्रदीप हसबनीस यांना अपस्माराचे तीव्र झटके (फिट्स) येतात. झटके आल्यानंतर काही घंटे तरी त्यांना कोणत्याच हालचाली करता येत नाहीत आणि सर्वच गोष्टींचे पूर्णपणे विस्मरण होते. अशा वेळी ते काहीच बोलू शकत नाहीत. श्री. हसबनीस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यासाठी गुरुपौर्णिमेला, म्हणजे ३१.७.२०१५ या दिवशी पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या; परंतु कार्यक्रमाच्या अगोदर काही वेळ श्री. हसबनीस यांना अपस्माराचा झटका येऊन गेल्याने त्या दिवशीचा कार्यक्रम रहीत करावा लागला. त्यानंतर १४.९.२०१५ या दिवशी श्री. हसबनीस यांच्या निवासस्थानी त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी त्यांचा सत्कार करण्यात आला. या दोन्ही दिवशी उपस्थित असलेल्या रामनाथी आश्रमातील साधिकांना जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री. हसबनीसकाकांंच्या
निवासस्थानी गेल्यावर साधिकांनी टिपलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. शारीरिक त्रासांतही आनंदी रहाणे : त्या दिवशी काकांची प्रकृती ठीक नव्हती, तरीही ते सर्वांच्या बोलण्याला आनंदाने प्रतिसाद देत होते. स्वतःला शारीरिक त्रास होत असल्याचे त्यांनी तोंडवळ्यावरून कुठेच जाणवू दिले नाही. - कु. अमृता मुद्गल, कु. कौमुदी जेवळीकर आणि कु. माधुरी दुसे

हिंदु जनजागृती समितीच्या चेन्नई (तमिळनाडू) येथील धर्मप्रसार कार्याच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

सौ. उमा रविचंद्रन्
१. शिवसेनेने आयोजित केलेल्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !
     ५.७.२०१५ या दिवशी शिवसेनेचे दिवंगत नेते श्री. नारायणजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवसेनेने चेन्नर्ई येथे एक बैठक आयोजित केली होती. या वेळी डिएम्के या डाव्या विचारसरणीच्या पक्षाचा धैर्याने केलेला निषेध आणि निःस्वार्थपणे केलेली जनसेवा यांसाठी श्री. जयम् पांडियन् अन् इतर अनेक शिवसैनिक यांचे त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी अभिनंदन करून त्यांना पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी श्री. जयम् पांडियन् यांनी स्थापन केलेली हिंदु यूथ सेना ही संघटना शिवसेनेमधे विलीन झाली.
    या कार्यक्रमात भारत हिंदु मुन्नानी, श्रीराम सेना, साथिया सेना, अखिल भारतीय हिंदु महासभा या हिंदू संघटनांचे नेते सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. उमा रविचंद्रन् आणि सौ. सुगंधी जयकुमार सहभागी झाल्या होत्या.

पितृपक्षात नेहमीपेक्षा १ घंटा अधिक साधना करा !

साधकांना सूचना
     सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत आहे. पितृपक्षात (२८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत) हा त्रास वाढत असल्याने या काळात नियमित साधनेबरोबरच १ घंटा अधिक साधना करावी. या कालावधीत नामजप, प्रार्थना आणि आध्यात्मिक उपाय यांचे प्रमाण वाढवावे. तसेच साधकांनी पितृपक्षात श्राद्धविधीही करावा.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा आनंद 
'आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडित नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. 'आपला आनंद आपल्यात मिळावा', हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. 'तुझे आहे तुजपाशी' या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडित असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. हे प्रगत होऊ पहाणार्याच साधकांना परत परत सांगू इच्छितो. '
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

गोरक्षकांनो, हे लक्षात घ्या !

      आमच्या गोशाळेत ३०० गायी आहेत, असे समाधानी न रहाता मी ३०० गोरक्षकांना तयार करणार आहे, असा विचार आणि तशी कृती केल्यास सहस्रो गायींचे प्राण वाचतील. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.६.२०१५)

ब्रह्म आणि माया म्हणजे काय ?

हरि ॐ तत्सत
संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
      एखादा कुत्रा दोरीला बांधलेला असतो. ती दोरी खुंट्याला बांधलेली असते. खुंटा स्थिर असतो, तसे ब्रह्म स्थिर आहे. दोरी म्हणजे मायेचे बंधन. तिच्या बंधनात असलेला कुत्रा उड्या मारतो, धावतो, भुंकतोे; पण कितीही प्रयत्न केले, तरी तो खुंट्यापासून सदाचा दूर जाऊ शकत नाही. तशी मायेत कितीही धडपड केली, तरी ब्रह्मापासून फार दूर कोणी जाऊ शकत नाही. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

वाया गेलेली 'नेपाळी' संधी !

नेपाळने नव्या राज्यघटनेचा स्वीकार केला. जनतेने या राज्यघटनेचे स्वागत मात्र थंडपणे केले आहे. या नवीन घटनेतील काही तरतुदींमुळे तेथील विविध जनजातींनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. मधेसी आणि इतर जनजाती यांचे ६० सदस्य संसदेत आहेत. त्यांपैकी एकानेही या घटनेला पाठिंबा दिलेला नाही. यावरून त्यांच्या विरोधाची तीव्रता लक्षात येते. 'नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करावे', अशी तेथील बहुतांश हिंदूंची मागणी आजही आहे. ती डावलल्यामुळे तेथील हिंदूंनाही या नवीन घटनेचे स्वागत करावेसे वाटले नाही. नेपाळमध्ये नवीन राज्यघटनेच्या निर्मितीच्या पार्श्वसभूमीवर झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ४० जण ठार झाले आहेत. नेपाळमध्ये राज्यघटनेच्या विरोधात लोकांचा वाढता असंतोष पाहून भारत शासनानेही त्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव एस्. जयशंकर यांनी नेपाळचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि इतर राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. 'नेपाळची घटना अधिक व्यापक हवी', असे त्यांनी म्हटले; मात्र त्यांच्या या सूचनेकडे कानाडोळा करण्यात येत आहे. धक्कादायक बाब अशी की, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांच्या पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धी अधिकार्यााने  एका स्थानिक वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये नेपाळमधील वाढत्या असंतोषाला भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तरदायी धरण्यात आले आहे. नेपाळ शासनाची ही सरळसरळ भारतविरोधी भूमिका आहे. भारतासाठी हे घातक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn