Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील हिंदूंना येत आहे मिनी पाकिस्तानचा अनुभव !

हिंदुत्ववादी नेत्यांवर प्राणघातक आक्रमणांची मालिका !
आता ही आक्रमणे धर्मांधांनी केली असल्याने त्यांच्या संघटनांवर बंदी घाला, 
अशी मागणी हिंदुत्ववाद्यांनी करावी का ?
      ठाणे, २० सप्टेंबर (वार्ता.) - येथील वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी या मुसलमानबहुल परिसरातील धर्मांधांकडून हिंदूंवर विविध बंधने लादली जात आहेत. धार्मिक उत्सव साजरे करण्याविषयी धर्मांधांची अरेरावी हिंदूंना सहन करावी लागत आहे. येथील हिंदु महिलांनाही धर्मांधांकडून त्रास दिला जात आहे. आतापर्यंत धर्मांधांच्या विरोधात कृती करणार्‍या ३ हिंदु नेत्यांवर प्राणघातक आक्रमण करण्यात आले आहे. १० सप्टेंबरला शिवसेनेचे उपशाखाप्रमुख श्री. धर्मेंद्र चौबे यांच्यावरही असेच प्राणघातक आक्रमण झाले असून गेले १० दिवस ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. या परिसरातील हिंदूंना हा भारत नसून एक छोटा पाकिस्तान (मिनी पाकिस्तान) असल्याचाच अनुभव येत असल्याची माहिती पीडित हिंदूने दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराशी बोलतांना दिली. (कुठल्याही पुरोगामी नेत्याला एखादे धमकीचे पत्र आले, तरी लगेचच त्याविषयी पत्रकार परिषद घेऊन हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात कांगावा केला जातो. संबंधितांना शासनाकडून संरक्षण देण्याची मागणी केली जाते. आजवर ठाण्यातील या एकाच परिसरातील हिंदूंच्या ३ नेत्यांवर झालेल्या प्राणघातक आक्रमणाविषयी मात्र ब्रही काढला जात नाही. पिडीत हिंदूंना रक्षण मिळावे, असे कुणाला का वाटत नाही? - संपादक)

गोमांस निर्यातीवरील अनुदान बंद करावे !

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी
      नवी देहली - भारतात गोहत्या बंदी लागू करण्यासाठी आवश्यक असलेले एक पाऊल, म्हणजे गोमांस निर्यातीवरील अनुदान बंद करणे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र देऊन केली आहे. या पत्रात डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे की, गोमांस निर्यातीला देण्यात येणारे अनुदान करदात्यांच्या पैशातून दिले जाते आणि बहुसंख्य करदाते हिंदु असल्याने आपल्या कराचा असा विनियोग झाल्याने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. काही राज्यांनी गोहत्याबंदी केली आहे, मात्र अनेक राज्यांत आजही गोहत्या चालूच आहे. गोमांस निर्यातीसाठी केंद्रशासनाकडून १३ प्रकारची अनुदाने दिली जातात. ती सर्व बंद झाली पाहिजेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक भाषणात काँग्रेसने जी गुलाबी क्रांती (गोमांसाचा रंग) केली आहे, ती बंद करण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आता पंतप्रधानांनी पाळले पाहिजे. (सिंहस्थपर्वासाठी शासनाने केलेल्या खर्चावर आक्षेप घेणारे हिंदुद्वेष्टे आता डॉ. स्वामींच्या या मागणीला समर्थन देणार का ? - संपादक)

मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांची माहिती

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांची भेट घेणार !
  • नेताजींचे दस्तावेज उघड करण्याविषयी मोदी यांचे मौन 
      नवी देहली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पन्नासहून अधिक नातेवाईक ऑक्टोबर मासात पंतप्रधान यांच्या निवासस्थानी येणार असून त्यांच्या स्वागतासाठी मी अतिशय उत्सुक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी २० सप्टेंबर या दिवशी झालेल्या मन की बात या कार्यक्रमात सांगितले. याचवेळी नेताजी बोस यांच्याशी संबंधित दस्तावेज उघड करण्याच्या संदर्भात मात्र मोदी यांनी वक्तव्य करण्यास टाळले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांनी मन की बात कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. ही मागणी आयोगाने फेटाळून लावल्याविषयी त्यांनी आयोगाच्या अधिकार्‍यांचे कौतुक केले. मन की बातच्या वर्षपूर्तीनिमित्त बोलतांना मोदी म्हणाले, सर्वसामान्यांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. या विषयी मला आतापर्यंत एकूण ५५ सहस्र दूरध्वनी आले. लोकशाही राज्यात मन की बात सारख्या कार्यक्रमावर टीका होण्याऐवजी उलट कौतुक व्हायला हवे.

ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांना राष्ट्रीय कीर्तनसम्राट उपाधी प्रदान !

ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा (सर्वांत उजवीकडे)
यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरव करतांना
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज
    नाशिक - जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांना राष्ट्रीय कीर्तनसम्राट अशी उपाधी प्रदान करून त्यांचा गौरव केला. या वेळी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह प्रदान केले. येथील साधूग्राममधील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज नगरात हा सोहळा झाला. ह.भ.प. आफळेबुवा यांच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राष्ट्रपुरुषांच्या चरित्राचा दांडगा व्यासंग, तसेच रसाळ वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे कौशल्य या सर्व गुणांची दखल घेऊन जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी त्यांचा हा गौरव केला. यावेळी ह.भ.प. आफळेबुवा म्हणाले, माझ्या कार्याची दखल जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी घेतली. मी खर्‍या अर्थाने भाग्यवान आहे. महाराजांचे हिंदुत्वाचे कार्य सर्वोच्च आहे. हिंदु धर्म खतरेमें है, असे ते नेहमी सांगत असतात. त्यांचे घरवापसीचे काम फार मोठे आहे. स्पष्ट बोलण्याचे धारिष्ट्य त्यांच्याकडे आहे.त्याद्वारे राष्ट्रप्रेम जागवण्याचे काम मी आजपर्यंत केले आहे. मी कीर्तनाच्या माध्यमातून क्रांतीकारक, संत, देशभक्त यांची चरित्रे सांगतो. त्यामुळेच स्वामीजींनी केलेल्या या गौरवाने मी कृतकृत्य झालो आहे. या पुरस्काराने माझे दायित्व वाढले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता वैद्य उदय धुरी यांनी फोडले काँग्रेसी आतंकवादाचे बिंग !

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांचे शिरकाण करणार्‍या काँग्रेसवर बंदी का नको ? 
वैद्य उदय धुरी
      मुंबई - आज सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करत आहेत; मात्र गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणतात, माझ्याकडे प्रस्ताव आलाच नाही. काँग्रेसवाल्यांतच मेळ नसतांना काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. सनातन संस्थेवर अद्याप कुणाच्याही हत्येचा आरोपही झालेला नाही, तो सिद्ध होणे दूरच राहिले. जर हाच नियम लावायचा झाला, तर केरळमध्ये २५० स्वयंसेवकांच्या हत्या करणार्‍या साम्यवाद्यांवर बंदी का नको ? इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या नंतर शिखांचे शिरकाण करणार्‍या काँग्रेसवाल्यांचे काय करायचे ? आजच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील ६४ गोपनीय धारिका बंगाल शासनाने उघड केल्या आहेत. त्यातून सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसनेच केल्याचे सिद्ध होऊ शकते, मग काँग्रेसवर बंदी का नका ? असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक वैद्य श्री. उदय धुरी यांनी केला. ते टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीवरील खास बात कार्यक्रमातील सनातनवरील बंदीची मागणी योग्य आहे का ? या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात भाजपच्या प्रवक्त्या सौ. कांता नलावडे, काँग्रेसचे राजू वाघमारे, भाकपचे प्रकाश रेड्डी उपस्थित होते. सूत्रनिवेदन प्रज्ञा कुलकर्णी यांनी केले.

समीर गायकवाडला अटक हा सनातन संस्थेवर झालेला अन्याय ! - श्रीराम सेना

गदग (कर्नाटक) येथे सनातनच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद
डावीकडून श्री. मुतालिक, पू. श्री. सिद्धलिंग स्वामी,
श्री. कुळकर्णी आणि श्री. के.एस्. कल्लनगौडर
     गदग (कर्नाटक) - कोल्हापूर येथील कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना कोणताही सबळ पुरावा नसतांना अटक करण्यात आली. ही अटक म्हणजे सनातन संस्थेला लक्ष्य करून केलेली अन्याय्य कारवाई आहे. या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेला नाहक गोवून हिंदुत्ववादी संघटनांची मानहानी करण्याचे पुरोगाम्यांचे षड्यंत्र आहे. या षड्यंत्राचा आम्ही स्पष्टपणे निषेध करतो, असे उद्गार श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी गदग येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काढले. या पत्रकार परिषदेला श्रीराम सेनेचे (गौरव) अध्यक्ष पू. श्री. सिद्धलिंग स्वामी , कर्नाटक राज्य संघटना कार्यदर्शी श्री. गंगाधर कुळकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. के.एस्. कल्लनगौडर उपस्थित होते.

ओडिशातील ७२ शहरांपैकी ५४ शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य ! - श्री. अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

डावीकडून श्री. मुरली मनोहर शर्मा, श्री. अनिल धीर,
 डॉ. बिमलेंदू मोहंती आणि श्री. सूर्यकांत केळकर
    भुवनेश्‍वर (ओडिशा) - राज्यातील ७२ शहरांपैकी ५४ शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य असल्याचे एका प्राथमिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. बनावट नोटा छापणे, पशूंची तस्करी करणे, मंदिरांमध्ये चोर्‍या करणे आदी अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये या घुसखोरांचा सहभाग आहे, तसेच अवैधपणे चालणारा शरीरविक्रीचा व्यवसायसुद्धा पूर्णपणे या घुसखोरांच्या कह्यात आहे, अशी माहिती भारत रक्षा मंचच्या वतीने आयाोजित करण्यात आलेल्या परिषदेत या मंचाचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांनी दिली. मंचाच्या वतीने १३ सप्टेंबर या दिवशी भारतातील बांगलादेशी घुसखोर आणि ओडिशावर त्याचा होणारा परिणाम या विषयावर महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या सभागृहात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

गणेशोत्सवानिमित्त तुमकूर(कर्नाटक) येथे सनातनला एफ्.एम्. रेडिओवर निमंंत्रण !

      तुमकूर (कर्नाटक) - येथील सिद्धार्थ एफ्.एम्. रेडिओच्या वतीने कुणिगल येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. सुमा मंजेश यांना श्री गणेशाच्या होणारे विडंबनाविषयी माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सौ. मंजेश यानी गणेश चतुर्थी, तसेच श्री गणेशाचे होणारे विडंबन यांविषयी माहिती दिली.

ईदच्या पार्श्‍वभूमीवर चेन्नई पोलिसांकडून गणेशोत्सवावर निर्बंध

  • गणपति १० दिवस ठेवण्यावर आक्षेप
  • नवीन गणेश मंडळांना अनुमती देण्यासही नकार
      चेन्नई (तमिळनाडू) - चेन्नई येथे गणेशोत्सव साजरा होऊन उत्साहात १० व्या दिवशी मिरवणुकीने विसर्जन केेले जाते; मात्र २४ सप्टेंबर या दिवशी बकरी-ईद असल्याने चेन्नई पोलिसांनी विविध गणेश मंडळे आणि हिंदु संघटना यांच्या बैठका घेऊन तिसर्‍या, पाचव्या आणि सातव्या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा आदेश दिला. त्याचसमवेत या वर्षी नवीन गणेश मंडळांना अनुमती देण्यासही पोलिसांनी नकार दिला. नवीन गणेश मंडळांना अनुमती न देणे, विसर्जनाच्या मार्गात पालट करणे, यांसाठी पोलिसांनी कोणतेही अधिकृत पत्रक न काढता तोंडी आदेश दिले. पोलिसांच्या या हिंदूविरोधी आदेशाला न जुमानता मदुराईतील जयहिंद पुरमच्या शिवसैनिकांनी गणेशमूर्तीची स्थापना केली असता पोलिसांनी ही मूर्ती उचलून भूमीवर ठेवली. याविरोधात शिवसैनिकांनी आत्मदहन करण्याची चेतावणी दिल्यानंतर पोलिसांनी गणेशमूर्ती स्थापन करून पूजा करण्याची अनुमती दिली. पोलिसांच्या या भूमिकेचा सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि धर्माभिमानी हिंदूंनी निषेध केला आहे.

टीपू सुलतान देशद्रोही असल्यामुळे त्याचे स्मारक बांधू नये ! - भाजपचे राष्ट्रीय सचिव एच्. राजा

      चेन्नई - टीपू सुलतान देशद्रोही असल्यामुळे डिंडीगल येथे त्याचे स्मारक करू नये, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सचिव एच्. राजा यांनी केली आहे. तमिळनाडू शासनाने हे स्मारक बांधल्यास सहस्रो लोकांकडून डिंडीगल-मदुराई हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येईल, अशी चेतावणीही राजा यांनी दिली आहे. याबरोबरच या चित्रपटात रजनीकांत यांनी टीपू सुलतानची भूमिका करू नये; त्यांनी ती केल्यास तो हिंदूंचा विश्‍वासघात ठरेल, असे राजा म्हणाले.

काश्मीरमधील बंद अवस्थेतील १ सहस्र मंदिरांच्या देखभालीसाठी नॅशनल कॉन्फरन्सचा प्रस्ताव

      हिंदूंनो, वर्ष १९९० च्या दशकापासून अनेक वर्षांपर्यंत नॅशनल कॉन्फरन्सची काश्मीरमध्ये सत्ता होती; परंतु एवढ्या वर्षांत तिने मंदिरांच्या देखभालीसाठी काहीही प्रयत्न केले नाही. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न म्हणजे एक देखावा आहे, हे लक्षात घ्या !
      श्रीनगर - काश्मीर खोर्‍यातून वर्ष १९९० च्या दशकात जिहादी आतंकवादामुळे साडे चार लाख काश्मिरी हिंदूंना विस्थापित व्हावे लागले. त्यामुळे काश्मीरमध्ये १ सहस्रांहून अधिक लहान-मोठी मंदिरे बंद पडली आहेत. शेकडो मंदिरे देखभालीच्या अभावी अत्यंत दयनीय स्थितीत पोहचली आहेत. काश्मिरी हिंदूंची घरवापसी आता होऊ शकत नाही, किमान या मंदिरांच्या देखभालीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असा विचार समोर येत आहे. त्या दृष्टीकोनातून नॅशनल कॉन्फरन्स येथील मंदिरांच्या देखभालीसाठी एक विधेयक आणत आहे. 
     काही दिवसांपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला यांनीही काश्मिरी हिंदूंना आश्‍वस्त करतांना त्यांचा पक्ष विधानसभेत हे विधेयक पारित होण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावेल, असे सांगितले होते. आमचा पक्ष येथील मंदिरांच्या देखभालीसाठी गंभीर असून या देखभालीचे दायित्व हिंदूंना मिळण्यासाठी हे विधेयक लागू व्हावे, असे भाजपने म्हटले आहे.

धुबरी (आसाम) येथे श्री कालिमातेची मूर्ती तोडल्यामुळे तणाव

हिंदूंच्या मंदिरांकडे शासनाच्या होणार्‍या अक्षम्य दुर्लक्षाचा परिणाम ! 
     धुबरी - आसाम राज्यातील धुबरी जिल्ह्यातील धुबरीनगर येथे श्री कालिमातेच्या मूर्तीचे भंजन केल्यामुळे तणाव निर्माण झाला. संतप्त हिंदूंनी नगरबंद आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कोणीतरी दारू पिऊन नशेमध्ये हे कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. (जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन करतांना पोलिसांनी अशा प्रसंगी जनता अस्वस्थ का होते, याचा विचार करायला हवा. दारू प्यायलेल्या व्यक्तीला मूर्तीच फोडण्याचे का आणि कसे सुचले ? हिंदूंच्या धार्मिक भावनांचा हा प्रश्‍न असल्यामुळे पोलिसांनी याचे सखोल अन्वेषण केले पाहिजे - संपादक)

बिलिव्हर्स पंथियांकडून श्री गणेशचतुर्थीच्या काळात अवैधपणे मेगाफोनद्वारे ख्रिस्ती धर्माचा प्रसार

अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी हिंदु धर्माचा प्रसार केलेला त्यांनी कधी खपवून घेतला असता का ?
      मडगाव (गोवा) - बिलिव्हर्स पंथियांकडून मडगाव (गोवा) भागात ऐनश्री गणेशचतुर्थीच्या काळात कोणतीही पूर्वानुमती न घेता अवैधपणे वाहनाद्वारे मेगाफोन वापरून ख्रिस्ती पंथाचा प्रसार केला जात आहे. या बिलिव्हर्सवाल्यांकडून पत्रकेही वाटली जात आहेत. मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच पोलीस ठाणे यांच्यासमोर असा अवैध प्रकार चालू होता; मात्र प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. यापूर्वी एका हिंदु संघटनेला मात्र प्रशासनाने एका कार्यक्रमाची उद्घोषणा करण्यास कायद्याचे कारण पुढे करून आडकाठी आणली होती.

बिहार निवडणुकीत शिवसेना १५० जागा लढवणार !

      पाटलीपुत्र (पाटणा) - आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर १५० जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली. उमेदवारांची सूची सिद्ध असून ती सोमवारी घोषित करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

सनातनच्या साधकाला खोट्या आरोपाखाली अटक केल्याविषयी सर्व हिंदूंनी रस्त्यावर उतरून विरोध करावा ! - प.पू. आचार्य आर्य जीतेंद्रजी महाराज

      पुणे, २० सप्टेंबर - आम्ही गुरुदेवांशी (परात्पर गुरु प.पू. डॉ. आठवले) जोडले गेलेलो आहोत. सध्या सनातन धर्म हा समुद्राच्या तळाशी गेला आहे. त्याला वर आणण्याचे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना प्रामाणिकपणे करत आहेत. हे कार्य आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे. सनातनच्या साधकाला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या विरोधात आपण सर्व हिंदूंनी रस्त्यावर उतरून विरोध करायला हवा. आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन प.पू. आचार्य आर्य जीतेंद्रजी महाराज (मध्यप्रदेश) यांनी केले. पाषाण येथील कोकाटे तालीम मंडळ (ट्रस्ट) यांचे अध्यक्ष आणि हिंदुत्ववादी श्री. राहुल कोकाटे यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. 
      'गोमाता (गाय) - एक शाश्‍वत वरदान' या विषयावर ते बोलत होते.

सनातनच्या कार्यातून ब्रह्मानुभूती येईल ! - श्री त्रिदण्डी स्वामीजी महाराज यांचे शिष्य श्री जीयर स्वामीजी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सिंहस्थपर्व, 
नाशिक येथे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी प्रदर्शन
डावीकडून श्री विष्णुचित्त स्वामीजी महाराज, 
श्री जीयर स्वामीजी महाराज, श्री. सुनील घनवट
आणि प्रदर्शनाची माहिती सांगतांना 
श्री. विनय पानवळकर
      नाशिक, २० सप्टेंबर, (वार्ता.) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण हे प्रदर्शन आमच्या राष्ट्राचे संस्कार करणारे आहे. या संस्कारातून संस्कृती, संस्कृतीमधून सभ्यता, सभ्यतेमधून मर्यादा, मर्यादेतून मानवता, मानवतेमधून शांती, शांतीमधून आनंद, आनंदातून परमानंद आणि या परमानंदातून ब्रह्मानुभूती येईल. आपले हे कार्य वेगाने वाढून ते सर्वांचे मंगलकारक होवो, असे शुभाशीष भारतातील थोर संत श्री त्रिदण्डी स्वामीजी महाराज यांचे शिष्य श्री जीयर स्वामीजी महाराज यांनी दिले. ते सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त विद्यमाने भरवलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या प्रदर्शनास १९ सप्टेंबर या दिवशी भेट दिल्यानंतर बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत श्री विष्णुचित्त स्वामीजी महाराज यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. श्री जीयर स्वामीजी महाराज यांचा सत्कार सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
      या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटकश्री. सुनील घनवट हे उपस्थित होते. समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी प्रदर्शनाविषयी माहिती दिली.

संपूर्ण वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी ! - ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

सनातनला सर्व साधूसंतांचा एकमुखी पाठिंबा
ह.भ.प. प्रकाश महाराज
जवंजाळ
      नाशिक - कॉ. पानसरे प्रकरणात केवळ संशयित म्हणून सनातन संस्थेच्या एका साधकाला कह्यात घेण्यात आले; म्हणून संपूर्ण सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे चुकीचे आहे. एखाद्या पक्षात किंवा संस्थेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी चुकीची कृती केल्यास त्या पक्षावर किंवा संस्थेवर बंदी घातली जात नाही. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना हिंदुत्वाचे आणि हिंदुत्व रक्षणाचे कार्य करत आहेत. संपूर्ण वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी आहे. तपास यंत्रणांना त्यांचा तपास करू द्यावा, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले. येथील जगद्गुरु स्वामी हंसदेवाचार्यजी महाराज यांच्या मंडपात २० सप्टेंबर या दिवशी संत गुलाबराव महाराज समाधी शताब्दी महोत्सव पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सर्व साधूसंत उपस्थित होते.

सनातन प्रभातमधील लिखाणाचा विपर्यास करत आयबीएन् लोकमतकडून सनातनची अपकीर्ती !

      मुंबई - दैनिक सनातन प्रभातमधील एका वृत्ताच्या अंतर्गत दिलेल्या संपादकीय दृष्टकोनाचा विपर्यास करून आयबीएन् लोकमत या वृत्तवाहिनीने दिवसभर सनातनवर टीका करण्याची संधी साधली. १८ सप्टेबरच्या अंकातील पृष्ठ १ वरील वृत्तात एक संपादकीय टीप दिली आहे. दैनिक लोकमतच्या १९ सप्टेंबरच्या अंकात सदर दृष्टकोनाचा विपर्यास करून वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे दैनिक सनातन प्रभातच्या २० सप्टेंबरच्या अंकात त्या टीपेचे नेमकेपणाने स्पष्टीकरण दिले होते; मात्र त्याविषयीही आक्षेप घेत आयबीएन् लोकमत या वृत्तवाहिनीने २० सप्टेंबरला प्रत्येक तासाला सनातन प्रभातच्या विरोधात वृत्त प्रकाशित केले. सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. संदीप शिंदे यांना बोलू न देता केवळ प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यानंतर प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांची प्रतिक्रिया घेतांनाही त्यांचे ऐकून घेण्यापेक्षा स्वतःला अपेक्षित उत्तरे मिळवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र श्री. वर्तक यांनी सुस्पष्ट केले की, सनातन प्रभातमध्ये मतस्वातंत्र्याच्या आधारे एक मत व्यक्त केले आहे. याचा अर्थ कृती केली, असा होत नाही. हिंदु राष्ट्र येणार असून तेव्हा कशी स्थिती असेल, ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

(म्हणे), सनातनवर बंदी घाला !

पुरोगाम्यांसह मुसलमानांचाही एकच टाहो
सनातन संस्थेवरील कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसतांना अशा प्रकारची मागणी 
करणारे कोणत्या विवेकवादाची भाषा करत आहेत ?
      कोल्हापूर/पुणे - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या कथित आरोपाखाली संशयित म्हणून सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक झाली. त्याच वेळी २० सप्टेंबर या दिवशी पानसरे यांच्या हत्येला ७ महिने आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २५ महिने पूर्ण झाल्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घाला, असा टाहोच एक प्रकारे तथाकथित पुरोगाम्यांनी फोडला. सनातनला विरोध करण्यासाठी आता मुसलमानांच्या संघटनाही पुढे आल्या आहेत.

नाशिकच्या त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील दर्शनाच्या वेळेविषयी धर्मादाय आयुक्तांकडून देवस्थानाकडे विचारणा

ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर भाविकांनी देवस्थानच्या तक्रारींचा पाढा वाचला !
     त्र्यंबेकश्‍वर (जिल्हा नाशिक), २० सप्टेंबर (वार्ता.) - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत १५ सप्टेंबरला ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन घेतले. या वेळी देवस्थान विश्‍वस्त मंडळातील विश्‍वस्त ललिता शिंदेे यांनी भाविकांच्या आग्रहावरून वेळ वाढवून देण्याचा विषय केसरकर यांच्याकडे मांडला. स्थानिक लोकांनीही मंदिर व्यवस्थापनाच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर त्र्यंबकेश्‍वर मंदिरात भाविकांना ज्योर्तिलिंग दर्शनाची वेळ काय आहे, अशी विचारणा मुख्य धर्मादाय आयुक्तांनी नाशिकच्या धर्मादाय कार्यालयाकडे तातडीने केली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वर मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना मिळणार्‍या वागणुकीकडे शासनाचे लक्ष वेधल्याचे अधोरेखित झाले आहे. 

नगर येथे गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने व्यापार्‍याला मारहाण

      नगर, २० सप्टेंबर - गणेशोत्सवासाठी वर्गणी देण्यास नकार दिल्यामुळे सुशीलकुमार भळगट या व्यापार्‍याला गंभीर मारहाण करण्याची घटना झाली आहे. (मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या अशा अपप्रवृत्तीमुळेच उत्सवाची अपकीर्ती होते. - संपादक) भळगट यांच्या दुकानात १४ सप्टेंबर या दिवशी एका गणेश मंडळाचे ३ कार्यकर्ते २ सहस्र ५०० रुपयांची वर्गणी मागण्यासाठी आले होते. त्या वेळी सुशीलकुमार यांनी तेवढी वर्गणी देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भळगट यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी त्या ३ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हाही प्रविष्ट केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नसल्याची माहिती सुशीलकुमार यांनी दिली आहे. (जन्महिंदूंना धर्मशिक्षण देण्याची अपरिहार्यता दर्शवणारी घटना ! - संपादक)

सनातनच्या धर्मकार्यात सहकार्य करणार ! - श्री महंत हंसजी गांगेय

प्रदर्शन पहातांना महंत श्री हंसजी गांगेय, त्यांचे 
सहकारी, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि माहिती 
सांगतांना श्री. विनय पानवळकर

     नाशिक, २० सप्टेंबर (वार्ता.) - सिंहस्थपर्व हे केवळ गायन-भजन यांकरिता नाही. ही पवित्रभूमी असून येथे हिंदु राष्ट्राचा संकल्प झाल्यास तो पूर्ण होईल. यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले धर्मजागृतीचे कार्य गौरवास्पद आहे. या कार्यासाठी दोन्ही संघटनांचे अभिनंदन करतो. हे कार्य करण्यासाठी केव्हाही मला अधिकाराने सांगा. या धर्मकार्यात मी अवश्य सहकार्य करीन, असे प्रतिपादन वृंदावन येथील श्री महंत हंसाजी गांगेेय यांनी केले. या प्रदर्शनास नुकतीच भेट दिली असता ते बोलत होते. समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती दिली.

थकीत वेतन मिळाल्याशिवाय श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणार नाही !

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या कामगारांचा निर्णय
      पिंपरी (पुणे), २० सप्टेंबर - येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स हे केंद्र शासनाच्या मालकीचे आस्थापन आर्थिक संकटात सापडले आहे. या आस्थापनाचे उत्पादन काही मास बंद आहे. त्यामुळे सुमारे १ सहस्र कामगारांचे १२ मासांचे वेतन थकले आहे. हे वेतन मिळेपर्यंत प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. (अशा गोष्टींसाठी देवाला वेठीस धरण्यापेक्षा अन्य सनदशीर मार्गांचा अवलंब करावा आणि श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वेळेवर करून श्री गणेशाची कृपा संपादावी. - संपादक) कामगारांनी यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना त्या संदर्भातील निवेदन दिले.
      हिंदुस्थान अँटिबायोटिक्स मजदूर संघाचे सरचिटणीस सुनील पाटसकर यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्र्यांनी आस्थापन पुनरुज्जीवन करण्याचे आश्‍वासन दिले; परंतु काहीच झाले नाही. केंद्र शासनाने गणेशोत्सवापूर्वी कामगारांना वेतन द्यावे, अन्यथा कामगार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणार नाहीत. त्यामुळे निर्माण होणार्‍या असंतोषाचे दायित्व शासनाचे राहील.

सनातनच्या बंगाल येथील पू. दासआजी यांची सनातन अन् हिंदु जनजागृती समिती आयोजित नाशिक येथील प्रदर्शनास भेट !

पू. दासआजींचा सन्मान करतांना पू. (कु.) स्वाती खाडये
आणि त्यांच्या मागे उभे असलेले पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
   नाशिक, २० सप्टेंबर (वार्ता.) - सनातनच्या बंगाल येथील संत पू. दासआजींनी नाशिक येथील प्रदर्शनास भेट दिली. सिंहस्थपर्वानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लावलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण हे भव्य प्रदर्शन पाहण्यासाठी त्या त्यांच्या कुटुंबियांसह आल्या होत्या.
     पू. दासआजी यांनी संपूर्ण प्रदर्शन वयस्कर असूनही पाहिले. सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांनी त्यांना प्रदर्शनाविषयी अवगत केले. त्यानंतर त्यांची ओळख सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांच्याशी करून देण्यात आली. या वेळी पू. दासआजींना अतिशय आनंद होऊन त्यांनी पू. स्वाती खाडये यांना आईच्या मायेने जवळ केले. त्यानंतर पू. स्वाती खाडये यांनी पू. दास आजींचा सन्मान केला. पू. दासआजींनी सर्वांना स्वत:च्या हाताने प्रसाद दिला. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव, स्नुषा आणि पुतणी उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

देवगिरी किल्ल्यातील ३ गणेशमूर्ती, १२ व्या शतकातील २ शिवलिंग यांची चोरी

दुर्गांवरील असुरक्षित संग्रहालयांकडे लक्ष देण्यासाठी भाजप शासनाने पुढाकार घ्यावा ! 
      संभाजीनगर, २० सप्टेंबर - दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यातून आठ प्राचीन मूर्ती चोरीस गेल्याची घटना १६ सप्टेंबर या दिवशी दुपारी घडली. त्यात ३ गणेशमूर्ती, १२ व्या शतकातील यादवकालीन २ शिवलिंग, निझाम काळातील २ बिल्लेे आणि अमूल्य दगडी माळ यांचा समावेश आहे. या प्रकरणी दुर्ग कर्मचारी संजय रोहनकर यांच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. किल्ल्याच्या मनोर्‍याच्या पश्‍चिमेला आमखास इमारतीत पुराणवस्तू संग्रहालय असून तेथे ५० विविध मूर्ती ठेवलेल्या होत्या. इमारतीचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटाची काच फोडून मूर्ती चोरल्या. चोरी झालेल्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला प्रवेश नाही. इमारतीभोवती सुरक्षारक्षकांचा पहारा असतो. असे असतांनाही चोरी झाल्याने किल्ल्यातील काही कर्मचार्‍यांवर संशय व्यक्त केला जात आहे.

सनातनवरील बंदीची मागणी हास्यास्पद ! - अरविंद पानसरे, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून बोलतांना श्री. अरविंद पानसरे
आणि शेजारी श्री. गणेश हाके
     मुंबई - एखाद्या संघटनेवर बंदी आणण्यासाठी त्या संघटनेने देशाविरुद्ध युद्ध पुकारले आहे, हे सिद्ध करावे लागते. आज अनेकांना बंदीचे निकष ठाऊक नसतांना ते सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, हे हास्यास्पद आहे, असे ठाम मत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी मांडले. ते १८ सप्टेंबर या दिवशी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर लक्ष्यवेधी कार्यक्रमातील सनातनवर बंदी घालावी का ? या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते.

पुणे येथे सनातननिर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांविषयीच्या प्रबोधन कक्षाचे उद्घाटन

(उजवीकडून दुसरे) श्री. धनंजय जाधव यांना
सात्त्विक वस्तूंची माहिती सांगतांना श्री. निरंजन दाते
     पुणे, २० सप्टेंबर (वार्ता.) - येथील महाराणा प्रताप उद्यानासमोर, बाजीराव रस्ता येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणपतिविषयक शास्त्रीय माहिती आणि सात्त्विक उत्पादने समाजापर्यंत पोहोचावी, यासाठी प्रबोधन कक्ष लावण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करुन आणि नारळ वाढवून भाजपचे नगरसेवक श्री. धनंजय जाधव यांनी केले. या वेळी पतित पावन संघटनेचे शहर संघटक श्री. दिनेश भिलारे, सनातन संस्थेचे सर्वश्री नारायण पाटील, निरंजन दाते आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विवेक गुप्ता हे उपस्थित होते. 

कर्वेनगर (पुणे) येथील प्रगती विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांची आदर्श गणेशोत्सवाविषयी प्रबोधनफेरी

प्रबोधन फेरीत सहभागी झालेले
विद्यार्थी आणि विद्यार्थिनी
     पुणे, २० सप्टेंबर - येथील कर्वेनगर भागातील प्रगती विद्या मंदिर या शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वीमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याविषयी प्रबोधन फेरी काढली. ही फेरी हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली १२ सप्टेंबर या दिवशी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत विद्या मंदिर आणि कर्वेनगर परिसरात काढण्यात आली. या फेरीमध्ये ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी गणेशोत्सवात राष्ट्रभक्ती वाढवणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करूया !, आरती नामजप करत वातावरणातील सात्त्विकता वाढवा ! आणि देशभक्तीपर गीते, समरगीते, तसेच पोवाडे ऐका ! आदी प्रबोधनपार फलक काही विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. फेरीच्या सुरुवातीला आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, या विषयावर सौ. मानसी वीरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या संपूर्ण उपक्रमामध्ये प्रगती विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री. निकुडे यांचे सहकार्य लाभले.

क्रांतीकारकांच्या क्रांतीगाथेने विद्यार्थ्यांमध्ये चेतवली राष्ट्रभावना

क्रांतीकारकांचे प्रदर्शन पहातांना विद्यार्थी
     हडपसर (जिल्हा पुणे), २० सप्टेंबर (वार्ता.) - ज्या क्रांतीकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांचेही बलिदान दिले, अशा क्रांतीकारकांच्या योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, यासाठी येथील साधना विद्यालयात क्रांतीकारकांची क्रांतीगाथा या फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ८ सप्टेंबर या दिवशी लावलेल्या या प्रदर्शनाचा इयत्ती ५ वी ते इयत्ता ८ वी च्या अडीच सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या प्रदर्शनामुळे क्रांतीकारकांविषयीची माहिती कळली, प्रदर्शन आवडले, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. प्रदर्शन लावण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचे सहकार्य लाभले.

श्री. देवेंद्रनाथ पंड्या संकलित आपले नाशिक या पुस्तकाचे प्रकाशन

      नाशिक, २० सप्टेंबर (वार्ता.) - भारतामध्ये एकूण ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो. सध्या नाशिकला कुंभमेळा चालू आहे. देशभरातून कोट्यवधी भाविक येथे येतात; मात्र या पुराणकालीन शहराची फारशी माहिती कुणालाही नाही. हे लक्षात घेऊन श्री. देवेंद्रनाथ पंड्या यांनी नाशिक नगरीच्या पौराणिक काळापासूनच्या इतिहासावर आपले नाशिक हे पुस्तक लिहिले. नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन श्री काळाराम मंदिर येथील नाथपंथीय संमेलनात करण्यात आले.
      या नगराला सहस्रोे वर्षांचा इतिहास असतांनाही यावरील एकही विस्तृत आणि अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन श्री. देवेंद्रनाथ पंड्या यांनी याविषयीचा ग्रंथ संकलित केला. यासाठी त्यांनी जवळपास ८ वर्षे नाशिकची पुरातन माहिती शोधून काढली आणि ७ ते ८ सहस्र पुस्तकांचे वाचन केले.
     श्री काळाराम मंदिर येथे महंत सूरजनाथ यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलेल्या एका नाथपंथीय संमेलनात नुकतेच या ग्रंथाचे प्रकाशन झाले. नाशिकचा पुरातन काळापासूनचा समग्र इतिहास समजून घेण्यासाठी या पुस्तकाचे अवश्य वाचन करावे, असे प्रकाशनच्या वेळी वक्त्यांनी सांगितले.स्वाईन फ्ल्यूपासून रक्षण होण्यासाठी जनजागृती आणि औषध वाटप

सिंहस्थ पर्वानिमित्त नाशिक येथील संत श्री आसारामजी बापू, युवा सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम !
डावीकडून संत श्री आसारामजी बापू, युवा संघाचे
श्री. भुपेंद्र भाई औषध स्वीकारतांना सनातन संस्थेच्या
साधिका सौ. शिल्पा कोठावळे
     नाशिक, २० सप्टेंबर (वार्ता.) सिंहस्थ पर्वानिमित्त राजयोगी स्नानासाठी जगभरातून भाविक मोठ्या प्रमाणात नाशिक येथे येत आहेत. या शहरात स्वाईन फ्ल्यूचे काही रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या परिस्थितीत आपल्या सामाजिक उपक्रमाचे भान ठेवत संत श्री आसारामजी बापू, युवा सेवा संघ नाशिकच्या वतीने याविषयी जनजागृती करत स्वाईन फ्ल्यूपासून संरक्षण होण्यासाठी जनजागृती आणि औषधाचे वाटप करण्यात येत आहे. युवा संघाचे श्री. भुपेंद्र भाई यांसह विजय गोमासे, आशीष सिंह, निरज तिवारी, गणेश उदावंत, किर्ती भाऊ, अनंता रनमाळे यांनी आज सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेल्या प्रदर्शनास भेट देऊन सर्व साधक आणि कार्यकर्ते यांना पुरेल एवढे औषध दिले. या वेळी श्री. भुपेंद्र भाई म्हणाले, आम्ही आतापर्यंत पोलीस, प्रशासन, अग्नीशामक दल, साधूग्राम यांसह ९ सहस्र भाविकांना औषध दिले आहे. आमचे एकूण ४ गट असून ६० साधक यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत.

प्रा. वामन जोशी यांच्यासारखे सनातन प्रभातचे वाचक हीच सनातनची खरी शक्ती !

सनातन प्रभातला आतंकवादी ठरवून त्यातील लिखाणावर 
सातत्याने झोड उठवणार्‍या पुरोगाम्यांना चपराक ! 
प्रा. वामन जोशी
     नाशिक - रत्नागिरी जिल्ह्यातील प्रा. वामन जोशी हे गेल्या ७ वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातचे वाचक आहेत. वाचन झालेले अंक ते आगगाडीतून प्रवास करतांना इतर प्रवाशांना विनामूल्य वाचनास देतात. या वेळी ते प्रवाशांना अंकाचे महत्त्व विशद करून हा अंक राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे ते सांगतात.
     सिंहस्थ पर्वानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे लावलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या भव्य प्रदर्शनास त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी सर्व साधकांच्या त्यागाचे, सेवांचे मन भरून कौतुक केले. ते म्हणाले, तुम्ही सर्व साधक या जन्मी पुष्कळ सेवा करत आहात, पुष्कळ त्याग करत आहात. तुमचा पुढचा जन्म हा राजघराण्यातच होईल.
- श्री. मिलींद पोशे, देवद, पनवेल.

प्राणीप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाची गोवा शासनाला नोटीस

काले येथील शासकीय फार्ममध्ये १ सहस्र गोवंशांच्या मृत्यूचे प्रकरण 
शेकडो गोवंश नैसर्गिकरित्या कसा मृत्यूमुखी पडतो ? नक्की कुठे पाणी मुरते, याचा शासनाने शोध घ्यावा !
     पणजी (गोवा) - वर्ष २०१३ पासून काले येथील शासकीय फार्ममध्ये शासनाने पकडून आणून ठेवलेल्या १ सहस्र १४१ भटक्या गोवंशापैकी १ सहस्रहून अधिक गोवंश मृत्यूमुखी पडला आहे. अपुरा चारा आणि पाणी यांच्या अभावी हा गोवंश मृत्यूमुखी पडला आहे, असा दाट संशय आहे. याविषयी चौकशी समिती नेमून चौकशी करावी, तसेच गोवंशाचा मृत्यू होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्या, या मागणीसाठी अ‍ॅनिमल रेस्क्यू स्क्वॉड या प्राणीपे्रमी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने पशूसंवर्धन खात्याच्या अधिकार्‍यांना नोटीस पाठवली आहे. (मद्य महोत्सव, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आदींवर कोट्यवधी रुपये उधळणार्‍या शासनाला गोवंशाला चारा-पाणी करण्याची इच्छा होत नाही का ? - संपादक)

हिंदूंनो, स्वरक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

फलक प्रसिद्धीकरता
     ठाणे शहराच्या वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी या मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना धर्मांधांची अरेरावी सहन करावी लागत आहे. त्यांना खडसवण्यास गेलेल्या हिंदूंच्या नेत्यांवरही आक्रमण करण्यात आल्याने हिंदूंना छोटा पाकिस्तानचा अनुभव येत आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Maharashtrake Thane jileme Wagle Estateme dharmandhone Hiduonke dharmacharnapar pratibandh lagaye ! - Hindubahul deshme Hinduonpar pratibandh kyon ?
जागो ! 
: महाराष्ट्र के ठाणे जिले मे वागले इस्टेटमें धर्मांधो ने हिंदूआें के धर्माचरण पर प्रतिबंध लगाए ! - हिंदुबहुल देश में हिंदुआेंपर प्रतिबंध क्यों ?

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात का करू नये ?

      प्रदूषणमुक्त विसर्जनाच्या नावाखाली महापालिकेकडून ठिकठिकाणी पाण्याचे हौद बांधले जातात. हौदांत श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणे अयोग्य आहे; कारण कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पालिकेचे कर्मचारी गणेशमूर्ती पाण्यात विरघळण्यापूर्वीच ती हौदातून काढून बाहेर ठेवतात. असे करणे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती पालिकेच्या कचर्‍याच्या गाडीतून नेल्या जातात. तसेच गणेशमूर्ती काढून घेतल्यानंतर पालिका हौद बुजवण्यापूर्वी त्यातील पाणी गटारात सोडून देते. हीसुद्धा एकप्रकारे श्री गणेशाची विटंबनाच आहे. 

भारतात विद्यार्थ्यांसाठी अशी मागणी करावी लागते, हे लज्जास्पद !

      सावंतवाडीमध्ये श्री गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी, तसेच चतुर्थीच्या तिसर्‍या दिवशी अनेक शिक्षणसंस्थांमध्ये पाचवी ते आठवी, अकरावी ते बारावी, तसेच महाविद्यालयांच्या परीक्षाही ठेवल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना श्री गणेशचतुर्थी सणाचा आनंद लुटता आला नाही. चतुर्थीच्या दिवसांत असणार्‍या या परीक्षा रहित करून शिक्षणसंस्थेने आठ दिवस सुटी घोषित करावी अन्यथा हिंदु धर्मियांच्या विविध संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी जीवनरक्षा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी दिली आहे

रामायण, महाभारत आणि गीता शिकवाच !

    केंद्रातील भाजप शासनाचे सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी अलीकडेच महाविद्यालयांत रामायण, महाभारत आणि गीता शिकवणार !, असे घोषित केले. सदर संकल्पना नक्कीच स्तुत्य आहे. फक्त ही केवळ एक घोषणा न ठरता ती संकल्पना प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर उत्तम प्रकारे राबवणे अपेक्षित आहे.
   महाविद्यालयांत या गोष्टी शिकवल्या जाणार, तर निधर्मीपणाचा टेंभा मिरवणार्‍यांना, तसेच अन्य पंथियांना ही गोष्ट आवडणार नाही, हे ओघाने आलेच. केंद्रशासनाने आयोजित केलेल्या जागतिक योग दिनाच्या वेळी सूर्यनमस्कार आणि ॐच्या उच्चार यांवरून मुसलमान, ख्रिस्ती यांनी विरोध केला होता. तेव्हा केंद्रशासनाने योगसाधनेचे प्रमुख अंग असलेल्या ॐला बगल देत योग करण्याची मान्यता दिली होती. शिवाय मुसलमानांना सूर्याला नमस्कार करण्यास वावडे वाटत असल्याने सूर्यनमस्कारही वगळले होते. रामायण, महाभारत, गीता शिकवण्यावरून धार्मिक वाद उकरून काढून या संकल्पनेत खो घालण्यासाठी पुरोगामी आता त्यांच्या बाह्या सरसावतील. त्यांची बाजू घेऊन प्रसारमाध्यमेही निधर्मीपणाचा आव आणत हे ग्रंथ शिकण्यासाठी शासन विद्यार्थ्यांवर का बळजबरी करत आहे, असा गळा काढून दाखवत त्यांचेे पुढारलेपण टिकवून ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील. हिंदु धर्माविषयी आस्था ठेवणारे त्यांना प्रतिगामी वाटतात; कारण ते स्वतःला आधुनिक विज्ञानवादी समजतात. असे असतांना धर्मप्रेमी आणि भाजप शासनाने हिंदु धर्मातील सर्वोच्च ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आडकाठी निर्माण करणार्‍यांना कसे थोपवायचे, याचा आधी विचार करणेही आवश्यक आहे.

जनहो, गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही !

      माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार गणेशमूर्ती विसर्जनानंतर तेथील पाण्यातील प्रदूषणाचा स्तर न्यून झाला असल्याची माहिती उपलब्ध आहे ! गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे ! पर्यावरणतज्ञांनी मूर्तीविसर्जनामुळे प्रदूषण होत नसल्याचे निष्कर्ष अभ्यासाद्वारे मांडलेले आहेत. कागदाच्या लगद्याची गणपतीमूर्ती धर्मविरोधी असून लगदा विसर्जित झाल्यावर जलचरप्रकरणी आणि मासे मरतात तसेच प्रदूषण वाढते !

हिंदु धर्म आणि धर्माचरण ज्ञात नसलेली अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंदु धर्मियांची अंधश्रद्धा काय दूर करणार !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
हिंदु धर्म आणि धर्माचरण ज्ञात नसलेली अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंदु धर्मियांची अंधश्रद्धा काय दूर करणार !
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०१५)
ज्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कोणावर श्रद्धा नाही आणि श्रद्धा म्हणजे काय हे जिला ज्ञात नाही, ती अंधश्रद्धा काय दूर करणार ! - (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०१५)
सनातनचे कार्य माणसांचे मुडदे पाडणे नव्हे, तर माणसांना ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवणे, हे आहे !
      भारतभरातील सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे सनातनचे कार्य जाणून घेण्यासाठी कोणासही खुली आहेत. तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठीचे अन् साधनामार्ग दाखवण्याचे सनातनचे कार्य जाहीरपणे होत आहे आणि या कार्याचा गौरवही होत आहे. असे असतांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव म्हणतात, सनातनने ब्रेन वॉशिंगचे कारखाने चालू केले आहेत आणि ते माणसांचे मुडदे पाडू शकतील ! यावरून खरे अंधश्रद्ध कोण, हे सिद्ध होते. - (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०१५)

प.पू. गुरुदेवांच्या सत्संगात त्यांचे रूप विराट झाल्याचे जाणवणे

     जेव्हा प.पू. गुरुदेव खोलीमध्ये आले, तेव्हा वातावरणात चैतन्य आल्यासारखे वाटले. जसजसे त्यांच्याशी बोलण्यात वेळ जात होता, तसतसे आम्ही सर्व साधक लहान लहान होत आहोत आणिप.पू. गुरुदेवांचा आकार वाढतच जाऊन त्यांचे रूप विराट होत गेले, असे जाणवले. माझे मन हळूहळू शांत झाले. प.पू. डॉक्टरांच्या देहाभोवती तेजाचे वलय दिसत होते. शेवटी शेवटी माझे डोके जड झाले. अगदी शेवटी जाण्याच्या वेळेस पुन्हा शांत आणि प्रसन्न वाटू लागले. गुरुदेवांच्या शब्दांत वर्णन करता येणार नाही, अशी अनुभूती आली. - श्री. अमित जोशी, योग वेदांत सेवा समिती आणि शिववंदना संघ, पुणे. (१६.६.२०१५)


हे तपासाला सहेतुक दिशा देण्याचे पाप !

      कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात संशयित म्हणून सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. लगेच समीर गायकवाड याला पानसरे यांचा खुनी म्हणून काही मंडळी किंचाळू लागली आहेत. एखाद्या संवेदनशील घटनेबाबत काहीही विचार न करता उथळपणे विधाने करणे हे निदान जबाबदार लोकांनी टाळले पाहिजे. अयोध्येतील बाबराने बांधलेली ती वादग्रस्त वास्तू संतप्त लोकांनी पाडल्यानंतर तत्कालीन पंतप्रधानांनी टीव्हीवर रडवेल्या आवाजात या इमारतीला बाबरी मशीद असे संबोधल्याने या देशातील दंगेखोरांना चिथावणी मिळाली आणि तेथून दुसर्‍या दिवशी देशभर रस्त्यावर उतरून गोंधळ घालायला प्रारंभ झाला.

उत्सवकाळात शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह !

     श्री गणेशमूर्तींचे मंगलमूर्ती मोरया या गजरात विसर्जन करतांना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देश आर्थिक संकटात असतांना आणि आतंकवादाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा करण्याची लाजिरवाणी स्थिती आली असतांना शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह आहे !

विविध सेवांसाठी वाराणसी आणि देहली सेवाकेंद्रांत साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !
     वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, लेखा, प्रसार आदी सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. यासमवेतच विद्युत्-जोडणी, सुतारकाम, रंगकाम आदी बांधकामाच्या संदर्भातील कौशल्य असलेल्या सेवा, तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण (सुपरविझन) करू शकणारे साधकही हवे आहेत.
     देहली सेवाकेंद्रात वाहन, स्वयंपाक, लेखा आदी विभागांमध्ये, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. 
      जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी वाराणसी अथवा देहली सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा vishwadeep2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ.(४.५.२०१५)

हिंदूंनो, श्रीगणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत मद्य पिऊन आणि रज-तमात्मक चित्रपटगीतांच्या तालावर नाचून धर्महानी करू नका !

      श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत बहुसंख्य तरुण मुले रज-तमात्मक चित्रपटगीतांच्या तालावर नाचत असतात. ही चित्रपटगीते बहुधा अश्‍लील असतात आणि मुले विचित्र अंगविक्षेप करत नाचत असतात. यातील बरेच जण मद्य प्यायलेले असतात. त्यामुळे धर्महानी होते आणि पाप लागते. खरेतर या चित्रपटगीतांचा आणि गणेशोत्सवाचा काहीतरी संबंध आहे का ? गणेशाच्या सात्त्विक मूर्तीसमोर अशी हिडीस नृत्ये करून काय साध्य होते ? अशाने श्रीगणेश प्रसन्न होईल का ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच असे घडत आहे. काही गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत मात्र शाळकरी मुला-मुलींचे लेझिम पथक असते. ही मुले लयबद्धरित्या आपली कला सादर करतात. हे बघायलाही फार छान वाटते. ते करतांना मुला-मुलींनी गणेशाचा नामजप केल्यास त्यांना अधिक लाभ होईल. इतर गणेशोत्सव मंडळांनीही हा आदर्श घ्यायला हवा.

इस्लामेतर युवतींवरील बलात्काराचे इस्लामी विद्वानांनीही खंडण न करणे

      आय.एस्.आय.एस्.च्या जिहादींना इस्लामेतर युवतींवर बलात्कार करण्याचा पवित्र कुराणमध्ये अधिकार दिला आहे आणि ते जिहादी कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. त्याचे कुणीही अगदी सौदी अरेबियाच्या इस्लामी विद्वानांनीही खंडण केलेले नाही. - श्री. सूर्यकांत शानबाग, बेळगाव (१८.९.२०१५)
श्री. अभय वर्तक
     दैनिक पुण्यनगरीमध्ये १९ सप्टेंबर २०१५ या दिवशी पृष्ठ ६ वर सनातन मोक्ष साधना या नावाने डॉ. कुमार सप्तर्षी यांचा सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांच्यावर पुराव्याअभावी बेछूट आरोप करणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचे उत्तर देणारा सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा हा लेख, दैनिक पुण्यनगरीमध्ये २० सप्टेंबरला प्रसिद्ध झाला. सनातनच्या पत्राची तत्परतेने नोंद घेतल्याविषयी दैनिक पुण्यनगरीचे सनातन संस्थेने आभार मानले आहेत. त्यांच्या सौजन्यानेच हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
संकलक : श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

हिंदूंनो, श्री गणेशचतुर्थी हे व्रत धर्मशास्त्रानुसार करून श्री गणेशाची कृपा संपादन करा !

वेदमूर्ती पंकज जोशी
श्री गणेशचतुर्थी या पार्थिव गणेश व्रतात नदीकाठची माती आणण्यापासून ते त्या नदीत ती पूजलेली मूर्ती विसर्जन करीपर्यंत विधी सांगितले आहेत. माती आणतांना कोणता नाममंत्र म्हणावा ?, हेसुद्धा सांगितले आहे. मग धातूच्या मूर्तीच्या संदर्भात हे कसे शक्य होईल ? मंत्र म्हणून आवाहन केले, म्हणजे मूर्तीत देवत्व आले आणि मंत्र म्हणत विसर्जन झाले, म्हणजे देवत्व गेले, हे जरी खरे असले, तरी देवत्व येण्याआधीपासूनच आपली त्या मूर्तीवर जी श्रद्धा असते, ती देवत्व गेले (विसर्जित झाले), तरी रहातेच ! (माणसातले चैतन्य निघून गेले, म्हणजे आपण त्याला वाटेल तेथे टाकून देतो का ? प्राण गेले, म्हणजे खरेतर विसर्जन झालेच; पण जेव्हा पंचतत्त्वात विलीन केले जाते, तेव्हा विसर्जन प्रक्रिया खरी पूर्ण होते.) म्हणूनच तर वाटेेल तेथे मूर्ती विसर्जित करत नाही आणि वाटेल त्या घटकांचीही मूर्ती बनवत नाहीत. मंत्र हेच एकमेव साधन असते, तर मूर्ती मातीची असो, धातूची, कागदाची अथवा अन्य कशाची, हा प्रश्‍नच उद्भवला नसता; पण तसे नसून पार्थिव व्रताचे तेही एक वैशिष्ट्य आहे, हे दर्शवले आहे.

पू. गुरुनाथ दाभोलकर यांनी प्रांजळ मनाने विचारलेले प्रश्‍न आणि त्यांची प.पू. डॉक्टरांनी दिलेली उत्तरे पू. गुरुनाथ दाभोळकर

पू. गुरुनाथ दाभोळकर
परम प्रिय गुुरुदेव,
शिरसाष्टांग नमस्कार.

    प.पू. डॉक्टर, मला सध्या होणारे मानसिक त्रास आणि साधनेची स्थिती सांगतो. संतपद प्राप्त करूनही मनातील काही विकार अजूनही त्रास देत आहेत. त्यासंदर्भात मला मार्गदर्शन करून माझ्या स्थितीत सुधारणा करावी, अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो.
१. दिवसाचा दिनक्रम
    मी प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठतो. नंतर सकाळी ६.४५ वाजेपर्यंत पाऊण घंटा आश्रम परिसरात फिरणे, अर्धा घंटा जप करणे, ३५ मिनिटे योगासने करणे इत्यादी करतो. प्रकृती स्वास्थ्याप्रमाणे आणि सेवेच्या उपलब्धतेनुसार दिवसातून ५ ते ९ घंटे सेवा होते. दुपारी एक घंटा विश्रांती घेतो आणि रात्री झोपण्यापूर्वी अर्धा घंटा जप करून ११.३० च्या दरम्यान झोपतो.

साधकांच्या प्रगतीची तळमळ असलेल्या, सतत आनंदी राहून सर्वांवर आईप्रमाणे प्रेम करत असल्याने सार्‍यांच्या गुणवंतीआई बनलेल्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती गुणवंती नाईक (वय ७१ वर्षे) !

श्रीमती गुणवंती नाईक
    ३१.१२.२०१४ या दिवशी एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगात सावईवेरे, फोंडा येथील साधिका श्रीमती गुणवंती नाईक यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व साधकांची भावजागृती होऊन सर्वांनी गुरुकृपा आणि गुरुप्रेम अनुभवले. या संदर्भात साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना, जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि सत्काराच्या निमित्ताने श्रीमती गुणवंती नाईक यांनी व्यक्त केलेले मनोगत पुढे देत आहोत.
१. साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना 
अ. पातळी घोषित करण्याआधी १५ दिवसांपासून श्रीमती गुणवंती नाईक यांच्याकडे पहात रहावे, असे अनेक साधकांना वाटत होते.

आंध्रप्रदेशमधील तिरुमला येथील तिरुपती बालाजीला घातलेल्या अभिषेकाच्या वेळी उपस्थित रहाण्याची मिळालेली संधी आणि त्या पूजेमध्ये मिळालेल्या प्रसादरूपी वस्तू

१. महर्षींच्या कृपेने आधी नावनोंदणी न करताही श्री तिरुपती बालाजीच्या अभिषेकाच्या
वेळी उपस्थित रहाण्याचे भाग्य लाभणे आणि पूजेतील प्रसादरूपी वस्तूही मिळणे 
   सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये महर्षींच्या झालेल्या आज्ञेप्रमाणे आम्ही साधक श्री तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी आंध्रप्रदेशमधील तिरुमला येथे गेलो. ४.९.२०१५ या दिवशी आम्हाला तिरुपती बालाजीच्या अभिषेकाच्या वेळी उपस्थित रहाण्याचे भाग्य लाभले.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी पाठवलेल्या नागदेवतेच्या तांब्याच्या जागृत मूर्तीविषयी आलेल्या अनुभूती

१४.८.२०१५ या दिवशी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमामध्ये नागदेवतेची तांब्याची जागृत मूर्ती पाठवली. तिच्याकडे पाहून प्रयोग केल्यावर आणि तिचे पूजन करतांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. १५.८.२०१५ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी मला विचारले, नागदेेवतेकडे पाहून काय जाणवते ? त्या वेळी मला नागदेवतेकडे बघतच रहावेसे वाटत होते आणि माझी भावजागृती होत होती, तसेच मला पुष्कळ आनंदही जाणवत होता.
२. पूजा करतांना मला नागदेवतेच्या मूर्तीमध्ये जिवंतपणा जाणवला. त्या वेळी नागदेवतेला पाहून मी घाबरले नाही; कारण नागदेवतेविषयी मला पुष्कळ जवळीक वाटली.
३. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्याप्रती माझ्या मनात कृतज्ञताभाव जागृत झाला.
- कु. दीपाली माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या निवासस्थानी झालेल्या अभिषेकाच्या वेळी अचानक आलेल्या एका साधूने वेदमंत्रपठण करणे, त्यांना सन्मानार्थ दिलेली दक्षिणा त्यांनी पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना सनातनचे कार्य विश्‍वभर होवो, असा आशीर्वाद देऊन परत देणे आणि हे पैसे जपून ठेवा, असे सांगणे

      २९.८.२०१५ या पौर्णिमेच्या दिवशी तिरुवण्णमलई, तमिळनाडू येथील अरुणाचलम् पर्वत येथे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या निवासस्थानाबाहेर असलेल्या श्रीविष्णु आणि श्री मुकाम्बिकादेवी यांच्या मूर्तींवर अभिषेक करण्यात आला. हा अभिषेक सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे झाला. त्या वेळी पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि आम्ही साधक तेथे उपस्थित होतो. या अभिषेकाच्या वेळी आंध्रप्रदेशमधील आेंगेल येथील कृष्णस्वामी गुरुजी हे साधू अचानक येऊन वेदमंत्रपठण करू लागले. त्याआधी काही क्षणांपूर्वी पू. (सौ.) काकूंच्या मनात विचार आला होता, अभिषेकाच्या वेळी मंत्रपठण झाले असते, तर चांगले झाले असते.
     त्या साधूंचा पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी पू. (सौ.) काकूंच्या हस्ते दक्षिणा देऊन सन्मान केला. तेव्हा त्या साधूंनी सनातनचे कार्य विश्‍वभर होवो, असा पू. (सौ.) काकूंना आशीर्वाद दिला आणि त्यांना दिलेली दक्षिणा आशीर्वाद म्हणून परत दिली. त्या वेळी त्यांनी सांगितले, हे पैसे कुठे व्यय (खर्च) करू नका. जपून ठेवा.
     - श्री. दिवाकर आगावणे, तिरुवण्णमलई, तमिळनाडू. (२९.८.२०१५)   

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेले सूत्र

१. आलेल्या अनुभूती 
अ. रामनाथी, गोवा येथे झालेल्या चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या विराट रूपाचे दर्शन होऊन कृतज्ञता वाटली.
आ. येथे आलेले धर्माभिमानी आणि हिंदुत्ववादी विषयाचा आरंभ करतांना भगवान श्रीकृष्ण अन् प.पू. गुरुदेव यांच्या चरणी वंदन करत होते. ते पाहून भावजागृती झाली आणि कृतज्ञता वाटली.
२. शिकायला मिळालेले सूत्र
२ अ. धर्माभिमान्यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग केलेला असल्याने ते अध्यात्मातही प्रगती करत असल्याचे लक्षात येणे : येथे अनेक धर्माभिमानी आणि हिंदुत्ववादी आले होते. त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग केला असून ते आपले प्राण संकटात घालून हे कार्य करत आहेत. त्यामुळेच ते अध्यात्मातही प्रगती करत आहेत, हे लक्षात आले.
- श्री. राजन जोशी, वाराणसी

सातत्याने इतरांचा विचार करणारे आणि प.पू. डॉक्टरांवरील अपार श्रद्धेमुळे कठीण प्रसंगांनाही आनंदाने तोंड देणारे सनातनचे ५१ वे संतरत्न पू. जयराम जोशीआबा (वय ७७ वर्षे) यांची त्यांच्या कन्येने सांगितलेली वैशिष्ट्ये !

पू. जयराम जोशीआजोबा
    ईश्‍वराने मला संतांच्या घरात जन्म देऊन माझ्यावर कृपा केली. त्यामुळे मी ईश्‍वरचरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे. प.पू. डॉक्टर, बाबांविषयी लिहिण्याची माझ्यात क्षमता नाही; पण या अज्ञानी बालकाकडून आपणच लिखाण करून घ्यावे, ही प्रार्थना करते.
१. प्रेमभाव आणि इतरांचा विचार
    पू. बाबा घरी आलेल्या सर्वांचे प्रेमाने आदरातिथ्य करत. आमची घरगुती खानावळ होती. ते खानावळीत जेवायला येणार्‍या मुलांना पालकांप्रमाणे आधार देत. ही मुले त्यांच्या आई-वडिलांपासून दूरच्या शहरात शिक्षणासाठी येतात. त्यांचा शिक्षणावर अधिक व्यय होतो, हे पाहून त्यांच्याकडून ते अल्प पैसे घेत असत. असे असूनही गुरुमाऊलींनी त्यांना कधीही न्यून पडू दिले नाही. हे मी स्वतः त्यांच्या संदर्भात अनुभवले आहे.

सतत इतरांचा विचार करणारे आणि कसलीही अपेक्षा न ठेवता दिसेल ते कर्तव्य या भावाने सेवा करणारे पू. जयराम जोशीआजोबा !

    प्रकृती ठीक नसल्यामुळे मी काही दिवस मिरज आश्रमात होतो. तेव्हा मला पू. जयराम जोशीआजोबांचा सहवास लाभला. त्या वेळी त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
१. पू. जोशीआजोबा मनमिळाऊ, शांत आणि संयमी आहेत.
२. सर्वांशी लवकर जवळीक साधणे : पू. आजोबा आश्रमात नवीन आलेल्या साधकाची आवर्जून विचारपूस करतात. ते मुळातच प्रेमळ असल्याने प्रथम भेटीतच त्यांच्याशी जवळीक होते. ज्या साधकांचा आजोबांशी संपर्क आला आहे, ते साधक सेवेनिमित्त इतर आश्रमात गेले, तरी त्यांना आजोबांची आठवण येते. आजोबा गुरुपौर्णिमेच्या दिवशी संतपदावर आरूढ झाल्यापासून आजोबांच्या संपर्कातील साधकांचे त्यांना भ्रमणभाष यायला लागले.

साधकांनो, व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी अन्य मार्गांचा अवलंब करण्यापेक्षा श्रीगुरु आवश्यक ते देण्यास समर्थ आहेत, यावर श्रद्धा ठेवा !

कु. सायली डिंगरे
    २२.८.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेला प.पू. दास महाराज यांचा अन्य संतांकडे जाऊन व्यावहारिक इच्छापूर्ती करून घेणार्‍या साधकांनो, हे लक्षात घ्या ! हा लेख वाचून कृतज्ञता वाटली. काही दिवसांपूर्वी माझ्याही मनात असेच विचार येत होते; मात्र माझे साधनेचे प्रयत्न तितके चांगले नाहीत. त्यामुळे तसे लिखाण करण्याचा माझा अधिकार नाही, असे वाटून मी ते लिखाण केले नाही.
    प.पू. दास महाराजांनी इतर संतांना व्यावहारिक प्रश्‍न विचारण्याच्या संदर्भात सांगितले आहे. त्याचप्रमाणे एका राज्यात भाविक त्यांच्या अडचणींसाठी देवतेला कौल लावून उपाय विचारतात. त्यावर देवतेने सांगितलेले उपाय केले की, अडचणींचे निराकरण झाल्याच्या अनुभूतीही अनेकांना येतात. काही साधक त्यांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी त्या देवतेला कौल लावतात, असे कळल्यावर मनात अनेक विचार आले. ते विचार योग्य आहेत कि अयोग्य, ते कळत नव्हते; मात्र प.पू. दास महाराज यांच्या लेखाद्वारे शंकानिरसन झाले; म्हणून येथे चार शब्द लिहीत आहे.

भ्रमणभाषवर अधिकोष खाते अथवा एटीएम् खाते यांविषयीची माहिती देऊ नये !

साधकांना सूचना 
      सध्या अनेक साधकांना अज्ञात व्यक्तींचे भ्रमणभाष येत आहेत. यामध्ये तुमच्या एटीएम्च्या खात्याविषयीची माहिती सांगा; तसेच तुमचे कोणत्या अधिकोषात खाते आहे ? अशा प्रकारचे प्रश्‍न विचारले जात आहेत. या संभाषणाच्या वेळी वैयक्तिक अनावश्यक प्रश्‍नही विचारले जातात. तरी साधकांनी अशा प्रश्‍नांची उत्तरे देऊ नयेत. अधिकोषाच्या नियमाप्रमाणे अशी माहिती भ्रमणभाषवर देणे मला बंधनकारक नाही, असे उत्तर देऊन ती गोष्ट अधिकोषात जाऊन कळवावी. तसेच इतर कोणत्याही साधकाचा किंवा व्यक्तीचा भ्रमणभाष क्रमांकही देऊ नये.

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन
श्रद्धेचे महत्त्व 
 आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत ॥

॥ हरि ॐ तत्सत ॥
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
 ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशातनाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी न घालणारी सर्वपक्षीय सरकारे जनहिताच्या संदर्भात किती उत्तरदायीशून्य आहेत, हे लक्षात घ्या !

      स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कोणत्याच पक्षाचे सरकार जनहितकारी नसल्याने फटाके वाजवू नका, यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीला अनेक वर्षे मोहिम राबवावी लागत आहे. एखादे सुबुद्ध सरकार असते, तर त्याने मुळाशी जाऊन फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी घातली असती. आता हिंदु राष्ट्रातच हे साध्य होईल. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.१०.२०१४) 

फटाक्यांना अनुमती देणारी सर्वपक्षीय सरकारे समाजद्रोही, राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही आहेत !

     फटाक्यांमुळे अब्जावधी रूपये अक्षरशः जाळले जात असतांना आणि त्यांच्यामुळे पर्यावरण आणि आरोग्य यांची अपरिमित हानी होत असतांना, तसेच जनता आत्यंतिक दारिद्य्रात दिवस ढकलत असतांना फटाक्यांना स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी अनुमती कशी दिली ? हा समाजद्रोह, राष्ट्रद्रोह आणि धर्मद्रोह आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.८.२०१४)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      कुठे थोड्याशा भौतिक सुखासाठी ख्रिस्ती होणारे हिंदू, तर कुठे धर्मासाठी प्राण अर्पण करून इतिहासात अजरामर झालेले छत्रपती संभाजी महाराज ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.७.२०१५)

धार्मिक स्वातंत्र्य

चित्रपटसृष्टीत आतापर्यंत हिंदूंचे संत, देवता आणि सण-समारंभ यांविषयी अनेक चित्रपट आले आहेत. सश्रद्ध हिंदूंनी भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे त्यातील बहुतांश चित्रपट पुष्कळच लोकप्रिय झाले. रामायण, महाभारत यांसारख्या मालिका अद्यापही हिंदूंच्या मनात घर करून राहिल्या आहेत. हिंदूंचा धर्मच विश्‍वव्यापी आणि अत्यंत पारदर्शक असल्यामुळे तो अशा प्रकारे चित्रपट, नाटक, कथा-कादंबर्‍या यांतून शब्दबद्ध केला जातो. देवतांची चित्रे अत्यंत श्रद्धेने पुजिली जातात. याउलट स्थिती मुहंमद : अ मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. मुसलमानांच्या धार्मिक नियमावलीनुसार तो प्रदर्शित होऊ नये, यासाठी मुसलमानांचा दबाव वाढत आहे. त्याला संगीतही ए.आर्. रेहमान या मुसलमान संगीतकाराने दिलेले असल्यामुळे एक निराळा वाद निर्माण झाला आहे; कारण मुसलमानांत संगीत आणि नृत्य प्रतिबंधित आहे. प्रत्यक्षात आपल्या श्रद्धास्थानाविषयी कोणी अत्यंत श्रद्धेने माहिती मांडत असल्यास अन्य धर्मबांधवांमध्ये धार्मिक जागृती होईल, हे लक्षात घेऊन त्या चित्रपटाला प्रोत्साहन देण्यास काहीच हरकत नव्हती.

प्रार्थनेची प्रचीती !

आज गणेशोत्सवाचा पाचवा दिवस ! ठिकठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाचा कार्यक्रम असेल. हिंदूंच्या धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन केले गेले पाहिजे. अनादि काळापासून चालत आलेली ही प्रथा केवळ प्रथा नाही, तिला शास्त्राचा आधार आहे. हिंदु धर्म सर्वांचे हित पहातो. सणासुदींचा लाभ समाजाला व्हायला पाहिजे, असा दृष्टीकोन राखला गेला आहे. 
    श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात केल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर गणेशाची पवित्रके वहात जातात आणि सर्वदूर वातावरणात पसरतात. त्यामुळे वातावरणशुद्धी होऊन समाजस्वास्थ्य उत्तम रहाण्यास साहाय्य होते. हिंदूंच्या सणांची आखणी समष्टीच्या कल्याणासाठी करण्यात आलेली आहे. केवळ श्रद्धा आणि भाव या स्तरांवर ते साजरे झाले म्हणजे धर्माचरण झाले, असे होते. धर्मो रक्षति रक्षितः । या वचनाप्रमाणे धर्माचरण करणार्‍या भाविकाला त्याचा लाभ होतो. आपल्या ऋषिमुनींनी सांगितलेल्या आनंददायी मार्गाने जाण्यास काही धर्मद्रोही राजी नसतात. ते हिंदु धर्मात जन्माला येऊन जीवनाचे सार्थक करून घेत नसल्यामुळे धर्माचरणी लोकांना दुःख वाटते. वहात्या पाण्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करून पर्यावरण बिघडवू नका.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn