Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


कोटी कोटी प्रणाम !

प.पू. भाऊ मसुरकर यांची 
आज पुण्यतिथी (सावंतवाडी)

सनातनचा बळी देण्यासाठी उठाठेव चालूच !

कॉ. पानसरे हत्या प्रकरण
(म्हणे) सनातन संस्थेवर तात्काळ बंदी घाला !
आदर्श घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्रीपदावरून हटवलेले 
अशोक चव्हाण यांची सनातनद्वेषी मागणी !
      पुणे - सनातन संस्थेची विचारसरणी विषारी आहे. त्यामुळे सनातन संस्था ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी संस्था आहे. त्यामुळे तिच्यावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. (अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याच्या प्रकरणी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची वेळ आली. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांसाठी निर्माण केलेल्या इमारतीतील सदनिका आप्तेष्टांना वाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पैसे देऊन स्वतःची वृत्ते प्रसिद्ध केल्याविषयी (पेड न्यूज) त्यांची खासदारकी जाण्याची वेळ आली होती. त्याविषयी त्यांनी वारंवार सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्पष्टीकरणे दिली आहेत. अशा नीतीहीन राज्यकर्त्यांना सनातनविषयी बोलण्याचा अधिकार आहे का ? छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू म्हणणार्‍या पंडित नेहरूंचे अनुयायी, भगतसिंग यांचा उल्लेख आतंकवादी म्हणून पुस्तकात करणार्‍या आणि हुतात्मा सैनिकांच्या प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या काँग्रेसला सनातनची राष्ट्र आणि धर्म निष्ठ विचारसरणी विषारी वाटली नाही, तरच नवल ! - संपादक)

सनातनवर आरोप होताच प्रसारमाध्यमांच्या सनातनद्वेषाला उधाण !

      कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात संशियत असल्याचे सांगत पोलिसांनी १६ सप्टेंबर या दिवशी सनातनचे सांगली येथील साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक केली. या अटकेचे वृत्त पोलिसांनीच प्रसारमाध्यमांना दिल्यानंतर लगेचच सर्व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी सनातनच्या विरोधात मोहीमच उघडली. या वेळी सनातनला झोडपण्याचा जो अश्‍लाघ्य प्रयत्न झाला, त्याविषयी काही उदाहरणे येथे देत आहोत. 
१ एबीपी माझा
१ अ. या वृत्तवाहिनीने १७ सप्टेंबर या दिवशी पानसरेंची हत्या धार्मिक कारणातून ! या मथळ्याच्या अंतर्गत कार्यक्रम घेऊन त्यामध्ये सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील माहिती दिली. (कसेही करून या प्रकरणात सनातनची अपकीर्ती करायची, हा वृत्तवाहिनीचा अंतस्थ हेतू यातून दिसून येतो ! - संपादक)
१ आ. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रही अकारण दाखवण्यात आले. त्यांची माहिती देतांना ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ होते आणि इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेऊन आले होते, हे कुत्सितपणे सांगितले जात होते. 

तीनही राजयोगी स्नानांसाठी अर्धा टीएमसीपेक्षा अल्प पाणी वापरले ! - पालकमंत्री गिरीश महाजन

      प्रा. एच.एम्. देसरडा यांचा खोटारडेपणा उघड ! याचा अर्थ देसरडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेली याचिका ही केवळ हिंदुद्वेषातून सादर केली, असा संशय आल्यास वावगे काय ? देसरडा यांच्या खोटारडेपणाविषयी उच्च न्यायालय त्यांना दंड ठोठावणार का ?
      नाशिक, १९ सप्टेंबर (वार्ता.) - सिंहस्थपर्वातील तीनही राजयोगी स्नानांसाठी गंगापूर धरणातून ३ टीएम्सी (२८३१ कोटी ६८ लाख ४६ सहस्र लीटर) पाणीसाठा वापरला जाईल. त्यास मनाई करावी, अशी मागणी प्रा. एच.एम्. देसरडा यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे जनहित याचिकेद्वारे केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या सुनावणीत राज्यशासनाला फटकारून फेरविचार करण्याचे आणि २१ सप्टेंबरपर्यंत या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश महाजन यांनी मात्र तीनही राजयोगी स्नानासाठी अर्धा टीएमसीपेक्षा अल्प पाणी वापरले असून प्रा. देसरडा यांनी अर्धवट माहितीच्या आधारे याचिका प्रविष्ट केल्याचे स्पष्ट केले. धरणातून सोडलेले हे पाणी पुढे मराठवाड्याला गेले असल्याचेही त्यांनी १८ सप्टेंबर या दिवशी सांगितले. 

सनातन संस्थेला हिंदुत्ववादी संघटना, पक्ष यांचा भक्कम पाठिंबा !

सनातन संस्थेला पाठिंबा देणार्‍या हिंदुत्ववादी संघटना आणि पक्ष यांचे आभार !
हिंदु महासभा, शिवसेना, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान, माळी समाज सनातनच्या पाठीशी !
      कोल्हापूर/सांगली, १९ सप्टेंबर (वार्ता.) - सांगली-कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतून सनातन संस्थेच्या पाठीशी उभे रहाणार्‍यांची संख्याही आता वाढत आहे. कोल्हापूर येथून हिंदु महासभा, तर सांगली येथे शिवसेना, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान, माळी समाज यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सनातनच्या कार्यावर पूर्णपणे विश्‍वास असल्याचे सांगितले. 
१. कोल्हापूर येथील हिंदु महासभेचे राज्य उपाध्यक्ष श्री. संजय कुलकर्णी म्हणाले सनातन संस्था ही केवळ हिंदु राष्ट्र व्हावे, या एकाच संकल्पनेने कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून कोणाची हत्या होणार नाही, याविषयी हिंदु महासभेला पूर्ण खात्री आहे. शासन मात्र लांगूलचालन करण्यासाठी सनातन संस्थेला बळीचा बकरा बनवण्याचा अनाठायी प्रयत्न करत आहे. सनातन संस्थेवर आळ घालण्याचे दुष्ट प्रकार बंद व्हावेत, अन्यथा हिंदु महासभा रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक आणि सत्याग्रहाचा मार्ग अवलंबेल.

नेहरू यांनी नेताजींच्या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केले !

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांचा आरोप 
     कोलकाता - तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी, तसेच बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. विधानचंद्र रॉय आणि सिद्धार्थ शंकर रे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केले आहेत. नष्ट करण्यात आलेल्या पुराव्यांतून आपल्याला वर्ष १९४५ साली झालेल्या नेताजींच्या विमान दुर्घटनेविषयी माहिती मिळण्याची शक्यता होती, असा आरोप नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी २० सप्टेंबर या दिवशी केला.

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

केरळमध्ये संघनेत्याच्या हत्येच्या प्रथम
स्मृतीदिनी समाजकंटकांनी कुत्र्यांना मारून विजेच्या खांबावर लटकवले !
साम्यवाद्यांचे कृत्य असल्याचा
भाजप आणि संघ नेत्यांचा आरोप
    कन्नूर (केरळ) जिल्ह्यातील पूर्व कथीरून भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते ई. मनोज यांच्यावर बॉम्बने आक्रमण करून त्यांना एक वर्षापूर्वी मारण्यात आले होते. या हत्येच्या पहिल्या स्मृतीदिनी म्हणजे १ सप्टेंबर २०१५ या दिवशी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे मृतदेह समाजकंटकांनी विजेच्या खांबावर लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. 
------------------------------------------------
देवस्थानचा निधी धर्मशिक्षणासाठी वापरावा, हेही ज्ञात नसलेले उद्योगमंत्री महादेव नाईक !
    'देवस्थान समितीने देवस्थानचा निधी समाजाच्या उद्धारासाठी आणि विकासासाठी वापरावा' - भाजपचे उद्योगमंत्री महादेव नाईक, गोवा
------------------------------------------------
गोव्यातील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत
कवळेकर यांच्या संपत्तीचे मूल्यांकन करणार !
    अवाजवी संपत्ती जमवल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यात येत असलेले गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष असलेले विद्यामान आमदार चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या संपत्तीचे मूल्यांकन सनदी लेखपालाकरवी (चार्टर्ड आकाउटंटकडून) करण्याचा निर्णय भ्रष्टाचारविरोधी पथकाने घेतला आहे. बाबू कवळेकर यांनी केरळमध्ये मोठी शेतभूमी विकत घेतल्याचे प्रसिद्धीमाध्यमांनी समोर आणल्यानंतर त्यांच्याविरुद्ध मे २०१३ मध्ये सुमारे ५ कोटी ५० लक्ष रुपयांची अवाजवी संपत्ती जमवल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने चालू आहे.
 ------------------------------------------------
सीबीआयच्या छाप्यात
पारपत्र अधिकारी फर्नांडिस यांनी
१८ गुन्हेगारांना पारपत्र दिल्याचे उघड
    केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकार्यांनी गोवा राज्यातील पारपत्र अधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांच्या किरभाट, नुवे येथील बंगल्यावर घातलेल्या छाप्यात अधिकारी फर्नांडिस यांनी १८ गुन्हेगारांना पारपत्र दिल्याची कागदपत्रे सापडली आहेत, तसेच छाप्याच्या वेळी ५ लक्ष रुपयांचे भारतीय आणि विदेशी चलन अन् ५ लक्ष रुपये किमतीचा विदेशी बनावटीचा मद्यसाठा सापडला. यातील एका मद्याच्या बाटलीची किंमत ३५ सहस्र रुपये आहे. पारपत्र अधिकारी फर्नांडिस यांच्या नुवे येथील बंगल्याची किंमत सव्वा कोटी रुपये आहे, तसेच त्यांची मोठी बेहिशेबी संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. गुन्हेगारी पार्श्वेभूमी असलेल्या काही व्यक्तींना पारपत्र दिल्याच्या प्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकार्यांपनी पाच ठिकाणी छापे घातले होते. या छाप्याच्या वेळी उपरोल्लेखित धक्कादायक माहिती उघड झाली पारपत्र अधिकारी फर्नांडिस यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
-------------------------------------------------
भाजपच्या मुसलमान नेत्याकडून गोमांस मेजवानी
    जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राज्यात गोमांस विक्रीवर बंदी घातल्यानंतर भाजप नेते खुर्शीद अहमद मलिक यांनी गोमांस मेजवानी देण्याची घोषणा केली होती. या मेजवानीला हिंदु आणि मुसलमान यांना आमंत्रित केले होते. या मेजवानीला मुसलमानांना गोमांस आणि हिंदूंना शाकाहारी भोजन देण्याचा त्यांनी बेत आखला होता. मी माझ्या धाार्मिक विश्वाभसाशी कोणतीही तडजोड करू शकत नाही, असेही मलिक म्हणाले होते.
-------------------------------------------------
बकरी ईदच्या कारणावरून नालासोपारा
(जिल्हा पालघर) येथील ७ हिंदुत्ववाद्यांच्या तडीपारीचा आदेश !
धर्मांध बकरी ईदला गोवंशियांची हत्या करत असल्याने जनजागृती
करणार्याब हिंदूंनाच तडीपार करणारे भाजपचे पोलीस भारताचे कि पाकचे ?
    नालासोपारा (जिल्हा ठाणे) - येथील गोरक्षा संघर्ष समितीच्या ७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी १० ते २६ सप्टेंबर २०१५ या कालावधीसाठी वसई तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे, तसेच ५ कार्यकर्त्यांना सोपारा गावात येण्यासही बंदी घातली आहे. तसा आदेश जिल्हादंडाधिकार्यांनी त्यांना पाठवला आहे. २४ सप्टेंबर या दिवशी बकरी ईद असल्याने या गोप्रेमींना ही नोटीस दिली आहे. गेली १० वर्षे या हिंदुत्ववाद्यांना अशा प्रकारे नोटीस बजावण्यात येत आहे. (गोहत्या बंदीचा कायदा असूनही धर्मांधांना डोक्यावर बसवून हिंदूंना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असेल, तर अशाने हिंदूंना कधीतरी चांगले दिवस (अच्छे दिन) येतील का ? ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करते ! काँग्रेसच्या राज्यात चालू असणारा हिंदुत्ववाद्यांचा छळ भाजपच्या राज्यातही चालूच रहाणे, याला काय म्हणायचे ? - संपादक)                               
------------------------------------------------ 

केरळमधील जन्माष्टमीच्या शोभायात्रेत मार्क्सवाद्यांनी साकारला हिंदु संतांना क्रॉसवर लटकवलेला देखावा !
डाव्यांमध्ये हिंदुद्वेष किती मुरला आहे, याचा पुरावा !
    कन्नूर (केरळ) येथे जन्माष्टमीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेतील देखाव्यात मार्क्सवाद्यांनी राज्यातील प्रसिद्ध संत श्री नारायण गुरु यांना येशू ख्रिस्ताप्रमाणे क्रॉसवर लटकवलेले दाखवल्याचे उघड झाले आहे. या घटनेविषयी हिंदूंनी निषेध व्यक्त केल्यावर मार्क्सवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चूक झाल्याचे मान्य करून क्षमायाचना केली आहे. (ही केवळ चूक नव्हे, तर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा आहे. याला केवळ क्षमायाचना पुरेशी नाही, तर उत्तरदायींवर गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात पाठवायला हवे ! - संपादक) मार्क्सवादी पक्ष नास्तिकतेचा पुरस्कार करणारा असला, तरी निवडणुकांमध्ये हिंदूंची मते मिळवण्यासाठी पक्षातील नेते आणि कार्यकर्ते हिंदूंच्या सणांत सहभागी होतात. त्याला अनुसरून पक्षाने जन्माष्टमीच्या शोभायात्रेत हा देखावा प्रायोजित केला होता, तसेच श्री नारायण गुरूंच्या 'एक जात, एक धर्म, एक ईश्वर' या शिकवणुकीला विकृत करून एक शब्द खोडून तेथे अनेक हा शब्द लिहिला होता. या प्रकाराचा श्री नारायण धर्म परिपालनचे सरचिटणीस वेलापल्ली नटेशन यांनी निषेध केला असून या गंभीर चुकीविषयी हिंदु जनता मार्क्सवादी पक्षाला निवडणुकीत धडा शिकवेल, असे सांगितले. मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस आणि माजी मुख्यमंत्री अच्युतानंद यांनी याविषयी दिलगिरी व्यक्त करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या संदर्भात क्षमा मागितली आहे.                                
-------------------------------------------------
मसुरे येथील पाच मंदिरांतील दानपेट्या फोडल्या !
मालवण तालुक्यात मंदिरांतील दानपेट्या फोडण्याच्या घटना 
चालूच काँग्रेसप्रमाणेच भाजपच्या राज्यातही हिंदूंची मंदिरे असुरक्षितच असल्यामुळे आता भाविकांनीच मंदिरांच्या रक्षणार्थ पुढाकार घ्यावा !
    मालवण तालुक्यात रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली मंदिरातील देवीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. आता मसुरे येथील पाच मंदिरांतील दानपेट्या फोडून चोरी झाल्याचे उघड झाले आहे. मंदिरांतील दानपेट्या फोडण्याच्या घटना चालू असून पोलिसांना चोरांना शोधण्यात मात्र अपयश आले आहे. मसुरे पोलीस ठाण्यानजीक असणारा श्री स्वामी समर्थ मठ; मसुरे येथील श्री समर्थ बागवे ट्रस्टचे श्री दत्त मंदिर; श्री समर्थ बागवे महाराज मठ; मार्गाची तड येथील श्री गणेश मंदिर; मसदे, वेरली चाळा हे धार्मिक ठिकाण येथील दानपेट्या चोरट्यांनी फोडून त्यातील रोख रक्कम चोरली. स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटीतील अर्पण रक्कम मंदिर व्यवस्थापनाने दोन दिवसांपूर्वी काढली होती, त्यामुळे चोरांच्या हाती काहीच लागले नाही, तसेच वेरली चाळा हे स्थान उघड्यावर असल्याने येथील दानपेटीत पावसाचे पाणी जाऊन आतील रोख रक्कम खराब झाल्याने चोरांनी ती तेथेच इतस्तत: टाकून दिली.

गायींची हत्या करणार्‍यास फाशीची शिक्षा द्या ! संत उमाकांतजी महाराज यांची मागणी

गोरक्षणासाठी अंगफलक घालून 
कार्यकर्ते धर्मप्रसार करत आहेत
     त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), १९ सप्टेंबर (वार्ता.) - 'गायींची हत्या करणार्‍यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन संत उमाकांतजी महाराज (उज्जैन, मध्यप्रदेश) यांनी पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे', अशी माहिती परमसंतबाबा जयगुरुदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मप्रसाराचे कार्य करणारे कार्यकर्ते श्री. गजानन अटनेरी (अमरावती) यांनी १८ सप्टेंबर या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली. सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ झाल्यापासून महाराजांचे शिष्य आणि कार्यकर्ते अंगात अंगफलक घालून नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे गोरक्षणाचा प्रसार करत आहेत. देशात गोहत्या बंदी होण्यासाठी सर्वत्र गोरक्षणाचा धर्मप्रसार चालू आहे, असेही त्यांनी सांगितले. 
     संत उमाकांतजी महाराज हे परमसंत बाबा जयगुरुदेव महाराज यांचे शिष्य आहेत. परमसंत बाबा जयगुरुदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मप्रसार करणारे २० ते २५ कार्यकर्ते अंगावर 'गो माता की जान बचाओ', 'बाबाजी का कहना, शाकाहारी बनना', असे लिहिलेले अंगफलक आणि टोपी घालून गोरक्षणाचा प्रसार करत आहेत. याचसमवेत 'सर्व प्रकारचा मांसाहार बंद करून दारू पिणे सोडून द्या', 'गायीला राष्ट्र्रीय प्राणी घोषित करा', अशा आशयाचे माहिती पत्रक ते भाविकांना वाटत आहेत. 

सिंहस्थ पर्वात काश्मिरी हिंदूंच्या बलिदानाचे स्मरण

जम्मू-कश्मीर खालसा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन 
     नाशिक, १९ सप्टेंबर (वार्ता) - १४ सप्टेंबर या दिवशी झालेल्या काश्मिरी हिंदु बलिदान दिनानिमित्त सिंंहस्थ पर्वात काश्मिरी हिंदूंच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. जम्मू-कश्मीर खालसा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू-कश्मीर खालशात काश्मिरी हिंदू बलिदान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपिठावर जम्मू-काश्मीर खालसाचे महामंडलेश्‍वर रामेश्‍वरदासजी महाराज, डॉ. सत्यनारायणदास शास्त्री, भागवताचार्य स्वामी फुलकृष्ण महाराज, जम्मू-काश्मीरमधील कामेश्‍वर मंदिरातील श्री. ब्रिजमोहनदास यांच्या समवेत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातनचे पू. नंदकूमार जाधव, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट, श्री. गजानन केसकर आदी मान्यवर उपस्थित होते. आज ही स्थिती जम्मू-काश्मीरमध्ये आहे. तथापि भविष्यात ती उर्वरित भारतामध्येही येऊ नये आणि काश्मीरमधील हिंदूंना आतातरी न्याय मिळावा, यासाठी विविध वक्त्यांनी त्यांच्या वक्तव्यांतून उपस्थितांमध्ये जागृती आणली. 

सनातनवरील खोटे आरोप होणे, हा सनातनच्या चांगल्या कार्याला आसुरी शक्तींमुळे होणार्‍या विरोधाचाच एक भाग ! - वीरेंद्र मराठे, विश्‍वस्त, सनातन संस्था.

     पणजी - सनातनचे कार्य दिवसेंदिवस कुठल्याही तडजोडीविना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे साहजिकच सनातनला होणारा विरोधही वाढत आहे. चांगल्या कार्याला सुक्ष्मातील आसुरी शक्तींचा विरोध हा होतच असतो. याच कारणासाठी सनातनवर गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे आरोप होत आहेत. यामुळे सनातनच्या कार्यावर काही काळ परिणाम होत असला, तरी यापूर्वी सनातन निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे आणि यापुढेही सनातनचे निर्दोेषत्व सिद्ध होईल, असा दृढविश्‍वास सनातन संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी व्यक्त केला. 
     गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनच्या साधकाला संशयित म्हणून अटक झाली. या पार्श्‍वभूमीवर १८ सप्टेंबर या दिवशी गोव्यातील स्थानिक एच्.सी.एन् या वृत्तवाहिनीवरील हॉट सीट या कार्यक्रमात पत्रकार रूपेश सामंत यांनी श्री. वीरेंद्र मराठे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत श्री. मराठे यांनी पुढील सूत्रे मांडली ...

एबीपी माझा आणि मंदार गोंजारी यांच्याकडून सनातनला २००९ च्या स्फोटप्रकरणी पुन्हा दोषी ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

     न्यायालयाने मडगाव स्फोट प्रकरणात सनातनच्या ६ साधकांची निर्दोष मुक्तता केलेली असतांना अशा प्रकारचा अपप्रचार करून एबीपी माझा काय साध्य करू पहात आहे ? एबीपी माझावाल्यांना न्यायालयापेक्षा अधिक कळते, असे वाटते का ?
    रामनाथी, गोवा - मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाचे वार्ताहर मंदार गोंजारी आणि त्यांचे सहकारी १८ सप्टेंबरला येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आले. त्यांनी काही माहिती घेतली. आश्रम बघितला; मात्र वृत्त प्रसारित करतांना त्यांनी खोटी माहिती दाखवली. वर्ष २००९ मध्ये मडगाव येथे सनातनच्या साधकांनीच स्फोट घडवल्याचे दाखवत त्यांनी अन्य स्फोटांसाठीही सनातनला दोषी ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रकार त्यांच्या वृत्ताद्वारे केला. (यावरून आजची प्रसारमाध्यमे ही हिंदुविरोधी कारस्थानाला कशी हातभार लावतात, ते सिद्ध होते. अशा प्रसारमाध्यमांवर सर्व हिंदूंनीच बहिष्कार टाकला पाहिजे ! - संपादक)

सनातन संस्थेवर आक्षेपार्ह आरोप करणार्‍या पुरोगामी प्रवृत्तीच्या संघटनांवर कायदेशीर कारवाई करा ! - समस्त हिंदुत्ववाद्यांचे कोल्हापूर येथे निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय पवार
(डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी 
     कोल्हापूर, १९ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेने आतापर्यंत सर्वशक्ती राष्ट्रभक्ती उत्पन्न करण्याकडेच लावली आहे आणि त्यामुळे कित्येकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण झाले आहे. व्यक्ती दोषी ठरली, तर संबंधित संघटना आणि पक्षही दोषी आहेत, असा निकष लावला, तर एकही पक्ष शिल्लक रहाणार नाही. उगाच खोटी आवई उठवून समाजात सनातन संस्थेविषयी अपप्रचार करण्याचे कुटील षड्यंत्र पुरोगाम्यांनी चालवले आहे. त्याला शासनाने बळी पडू नयेू. उलट देशप्रेम विसरलेल्या पुरोगाम्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय पवार यांना १९ सप्टेंबर या दिवशी देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे.

हिंदु म्हणून सनातनच्या पाठीशी उभे रहा ! - महाराणा प्रताप बटालियन

      पनवेल - 'कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे; मात्र आमची पोलिसांना विनंती आहे की, त्यांनी सनातनसारख्या धर्मनिष्ठ संघटनेला त्रास देऊ नये. यापूर्वी साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांना अटक केल्यानंतर त्यांना आजवर कारागृहात खितपत ठेवले आहे. आजचे शासन हिंदूंच्या मतांवर निवडून आले आहे. शासनाने कुणाच्याही दबावाखाली कार्यवाही करू नये. सनातन संस्था ही हिंदु धर्माला वाचवण्यासाठी कार्य करणारी एकमेव प्रामाणिक संघटना आहे. समस्त हिंदूंनी सनातन संस्थेच्या पाठीशी रहावे', असे आवाहन महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. अजयसिंग सेंगर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 
पत्रकात म्हटले आहे की, 
१. पोलीस असदुद्दीन ओवैसी आणि याकुब यांच्यासारख्या आतंकवाद्याच्या मागे उभे रहातात. विषारी भाषणे करणार्‍या ओवैसींना ते रोखू शकत नाहीत. 

(म्हणे), सनातनला हिंदु दहशतवाद मान्य ! दैनिक प्रहारमध्ये सनातनच्या पत्रकार परिषदेतील विधानाचा विपर्यास

     मुंबई - दैनिक प्रहारच्या १९ सप्टेंबरच्या पृष्ठ १ वर 'देशात हिंदू दहशतवाद असल्याचे सनातनला मान्य' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले आहे. हा सनातनच्या पत्रकार परिषदेतील विधानांचा विपर्यास आहे. 'अशा आशयाचे वृत्त एकाही वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेले नसतांना दैनिक प्रहारने असे प्रसिद्ध करणे, हा खोडसाळपणा आहे', असे सनातन संस्थेने म्हटले आहे.
 दैनिक प्रहारने काय प्रसिद्ध केले ?
     दैनिक प्रहारच्या वृत्तात म्हटले आहे, 'देशात हिंदु दहशतवाद असून हिंदु धर्माच्या विरोधात बोलल्याने कॉ. गोविंद पानसरे आणि कर्नाटकातील साहित्यिक कलबुर्गी यांची हत्या हिंदूंनी केली असावी, असा गौप्यस्फोट हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी शुक्रवारी सनातन संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. देशात हिंदु दहशतवाद असल्याचे आम्ही मान्य केले आहे. यासाठी काही संघटना सहभागी असल्या, तरी आम्ही त्यात सहभागी नाही, असा खुलासा त्यांनी केला; मात्र या भरकटत चाललेल्या हिंदुत्ववादी संघटनांसोबत कुठे तरी चर्चा व्हावी, असा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.' 

समीर गायकवाड यांनी गोळ्या झाडल्याचा कांगावा खोटा !

     कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांची चौकशी चालू आहे; मात्र दैनिक लोकमतने 'समीरनेच पानसरेंवर गोळ्या झाडल्या ?' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले; मात्र ते खोटे असल्याचे १९ सप्टेंबर या दिवशी दैनिक पुढारीने पोलीस महासंचालक संजयकुमार यांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे. (सनातनच्या विरोधात अपप्रचार करणार्‍यांना सणसणीत चपराक ! कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नसतांना जनतेची दिशाभूल करणारी वृत्तपत्रे काय साध्य करत आहेत ? - संपादक) 

विसर्जनासाठी अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी मागणी !

     पुणे, १९ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव चळवळ राबवली जात आहे. पुणे शहरामध्ये हा उत्सव व्यापक स्तरावर साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनाच्या म्हणजेच दुसर्‍या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी नदीमध्ये अतिरिक्त पाणी सोडावे, म्हणजे भाविकांना विसर्जन करणे सोयीचे जाईल, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तशा मागणीचे निवेदन पुणे पाटबंधारे विभाग मंडळाचे अधिक्षक अभियंता अतुल कपोले यांना देण्यात आले. 

समीर गायकवाड यांच्या अन्वेषणानंतर पुढील निर्णय ! - पालकमंत्री

     कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांची चौकशी चालू आहे. आम्ही कुणालाही क्लीन चीट दिलेली नाही. चौकशी निष्पक्षपणे होईल. त्यानंतर अन्वेषणातून जे समोर येईल, त्यानुसार कारवाई होईल, असे मत कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे सहकारमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे. श्री. पाटील यांच्या या उत्तरामुळे सनातनवर बंदी घालण्यासाठी आतुर झालेल्या पुरोगाम्यांना चपराक बसली आहे.

फलटणच्या मुख्याधिकार्‍यांचे निवेदनसह प्रबोधन !

हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव मोहीम 
     फलटण, १९ सप्टेंबर - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करण्याविषयीचे निवेदन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. डांगे यांना देण्यात आले. या वेळी श्री. डांगे म्हणाले, श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने पुष्कळ प्रदूषण होईल, तसेच शहरातून वहाणार्‍या कालव्यामध्ये पाणी असेल, तर वहात्या पाण्यात विसर्जन होईल; परंतु दुष्काळ आहे, धरणातच पाणी नसल्यामुळे कालव्यामध्ये नसेल, तर तुम्ही काय करायला सांगणार ? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर समितीचे श्री. आशिष कापसे यांनी म्हणाले, विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही, असे सिद्ध झाले आहे. गेल्या ४-५ दिवसांपासून श्रीगणेशाच्या कृपेने महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे आणि तुम्ही प्रयत्न केले, तर कालवाही चालू राहू शकतो. यानंतर श्री डांगे यांनी कालवा चालू राहिला, तर नागरिक वहात्या पाण्यात विसर्जन करतील, आम्हाला अडचण नाही असे सांगितले. (मुख्याधिकार्‍यांनी कालव्यात पाणी सोडण्यासाठी पुढाकार घेतला तर त्यांच्यावर श्री गणेशाची कृपा होईल. - संपादक)
     पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख श्रीमंत सुभद्राराजे ना. निंबाळकर यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी शिवप्रतिष्ठानचे श्री. माऊली कदम आणि श्री. मुळीक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री गणेशमूर्ती हाताळतांना चप्पल किंवा बूट घालणारे पुणे येथील मूर्तीवितरक !

धर्मशिक्षणाच्या अभावी जन्महिंदूकडून होणारी अयोग्य कृती !
      पुणे - येथे अनेक ठिकाणी हातगाडी, दुकाने, तात्पुरत्या स्वरूपाचा मांडव घालून श्री गणेशमूर्तींची विक्री करण्यात येत होती. या वेळी मूर्ती हाताळणार्‍या वितरकांनी चप्पल किंवा बूट घातलेले आढळायचे. वितरकाची ही अयोग्य कृती श्री गणेशाची मूर्ती खरेदी करणारे आणि अन्य पहाणारे यांच्या लक्षात आली नाही.

(म्हणे) 'शहरातील सनातनचे साहित्य विक्री केंद्र बंद करा !'

जातीयवादी, इतिहासद्रोही आणि हिंदुद्वेष्ट्या वाङ्मयाचा पुरस्कार करणार्‍या पुरोगामी आणि डाव्या आघाडीतील धर्मद्रोही लोकांना सनातनचा पोटशूळ
 निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन 
      सांगली, १९ सप्टेंबर (वार्ता.) - 'देशातील पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते आणि विचारवंत यांच्या खुनाचे सत्रच जातीयवादी शक्तींनी चालू केले आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी हा सनातन संस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात चालू करण्यात आलेली साहित्य विक्री केंद्रे बंद करावीत,' अशी मागणी पुरोगामी आणि डाव्या आघाडीतील संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी १८ सप्टेंबर या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. (सनातन संस्थेने प्रदर्शन लावतांना सर्व गोष्टींची रितसर पूर्तता केली आहे. सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनात धर्म, अध्यात्म, हिंदु धर्म यांची माहिती देणारे ग्रंथ, तसेच सात्त्विक साहित्य विक्रीसाठी ठेवले जाते. सनातनचे ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा अनमोल ठेवा आहे. यातून हिंदूंना धर्मशिक्षण मिळते. त्यामुळे अशी मागणी म्हणजे चोराच्या उलट्या.. असा प्रकार होय ! - संपादक) 

देशविरोधी घोषणाबाजी करणारे नागरिक भारताचे कि पाकचे ?

फलक प्रसिद्धीकरता
     उत्तर काश्मीरच्या तंगमार्गमध्ये १९ सप्टेंबर या दिवशी सकाळी हिजबुल मुजाहिदीनच्या एका आतंकवाद्याचा मृतदेह आढळून आला. त्यावरून नागरिकांनी भारताच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसेच पोलिसांवर दगडफेक केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
Kashmirme ek atankvadi mare janeke bad vahake logone deshvirodhi nare lagaye. 
Kya aise logoke virodhme hamari shasan karvai karegi ? 
जागो ! : 
कश्मीरमें एक आतंकवादी मारे जानेके बाद वहाके लोगोने देशविरोधी नारे लगाए ।
क्या ऐसे लोगोंके विरोधमें हमारी शासन कारवाई करेगी ?

कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकांच्या छळाचा घटनाक्रम !

१५ सप्टेंबर
रात्री ११ वाजता : श्री. समीर गायकवाड यांना सांगली येथील घरातून पोलिसांनी कह्यात घेतले.
१६ सप्टेंबर
पहाटे ४.३० वाजता : रात्रभर चौकशी करून श्री. गायकवाड यांना अटक दाखवण्यात आले.
सकाळी १०:३० वाजता : संकेश्वशर येथून श्री. गायकवाड यांचे चुुलत मेहुणे असलेले श्री. श्रीधर विजय जाधव आणि श्री. सुशील विजय जाधव यांना पोलिसांनी पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले. त्याविषयी त्यांच्या घरच्या लोकांना सांगितले पाहिजे, त्यांना हवे असल्यास अधिवक्त्यांना सोबत घेऊ दिले पाहिजे, असे कोणतेही नियम पोलिसांनी पाळले नाहीत, तसेच या दोघांचे भ्रमणभाषही काढून घेतले.
सकाळी ११ वाजता : श्री. गायकवाड यांना अधिवक्ताही मिळू न देता सरळ न्यायालयात उपस्थित केले. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, भ्रमणभाषवरील गंभीर संभाषणाचे ध्वनीमुद्रण आम्हाला मिळाले असल्याने १४ दिवस श्री. गायकवाड यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्याची मागणी केली. न्यायालयाने मात्र श्री. गायकवाड यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ज्यांचे विचार असत्य आहेत, त्यांनाच पोलिसांचे संरक्षण घेऊन फिरावे लागते !

सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांची पुरोगाम्यांना सणसणीत चपराक
   
श्री. अभय वर्तक
मुंबई - दैनिक सनातन प्रभातमधील लिखाणाचा विपर्यस्त अर्थ काढून सनातन संस्थेच्या राष्ट्र आणि धर्म प्रेमी विचारसरणीला घातक ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सनातन प्रभातमधील विचारांचा खरा अभ्यास करायचा असेल, तर समोर पुरोगामी म्हणवणार्यां चे साहित्यही ठेवून अभ्यास करा ! कुणाचे साहित्य प्रक्षोभक आणि नक्षलवाद पसरवणारे आहे, ते समजून घ्या ! सनातनचे विचार सत्य असल्याने आम्हाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळतो. अनेक जण सनातनच्या विचारांचा आधार घेऊन साधना करतात आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती होते. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रा. श्याम मानव यांच्यासारख्या लोकांचे विचार असत्य आहेत. त्यांचे विचार लोकमनात रूजत नाहीत, त्यामुळे त्यांना समाजाची भीती वाटते. त्यांना संरक्षण घेऊन का फिरावे लागते ? त्यांना कशाची भीती वाटते, हे ते सांगतील का ? धैर्य असेल, तर जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःचे संरक्षण नाकारून दाखवावे, असे आव्हान सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी दिले.

जितेंद्र आव्हाड यांची सनातनचे अभय वर्तक यांच्या विरोेधात तथ्यहीन तक्रार !

एबीपी माझावरील चर्चासत्रातील चर्चेचे निमित्त 
      मुंबई - एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर १८ सप्टेंबरला रात्री एबीपी माझा विशेषवर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात काही सूत्रांवरून सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला. या वादावरून आव्हाड यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात श्री. वर्तक यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, 'श्री. अभय वर्तक यांनी वरील चर्चासत्रात मला तीन मिनिटे निरनिराळ्या वाक्यांतून धमकी दिली. मला भीती दाखवण्याचे आणि माझ्या जिवाचे बरे-वाईट करण्याचे धमकीवजा इशारे श्री. वर्तक यांनी दिले. त्याविषयी आपण गांभीर्याने कारवाई करावी. माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व सनातन संस्थेवर राहील'. (आजवर सातत्याने सनातन संस्थेवर चिखलफेक करणारे जितेंद्र आव्हाड यांनी श्री. अभय वर्तक यांच्यासारख्या आध्यात्मिक संस्थेच्या प्रवक्त्याच्या विरोधात तक्रार करणे, याला घोर कलियुगच म्हणावे लागेल ! आजवर सनातच्या विरोधात झालेल्या अनेक चर्चासत्रांत जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. त्या प्रत्येक चर्चासत्रात आव्हाड यांनी सातत्याने सनातनच्या विरोधात नथुरामाची पिलावळ आणि गोडसेवादी अशी भाषा वापरली आहे. या भाषेवरून विखारी आणि विद्वेषी कोण बोलते, हे सूज्ञांस सांगणे न लगे ! - संपादक)

सनातन प्रभातमध्ये 'हिंदु राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा देण्यात येईल', असे लिहिण्यामागील दृष्टीकोन समजून घ्या !

      दैनिक सनातन प्रभातमध्ये काही वेळा हिंदु राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा देण्यात येईल, असा संपादकीय दृष्टीकोन देण्यात येतो. त्याचा अभ्यास करता त्याविषयी काही प्रसारमाध्यमे तर्कवितर्क काढत आहेत; म्हणून या संपादकीय दृष्टीकोनामागचा आध्यात्मिक दृष्टीकोन प्रसिद्ध करणे आवश्यक ठरते. 
      सनातनचे निष्पाप साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर त्यांच्या निष्पाप नातेवाइकांचा पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली छळ चालू केला आहे, हे अयोग्य आहे. आध्यात्मिक दृष्टीने सात्त्विक आणि सज्जन लोकांचा छळ करणे, हे तामसी प्रवृत्तीचे लक्षण आहे. तामसी प्रवृत्ती साधना करूनच नष्ट होऊन ती सात्त्विक बनू शकते. वाल्याचे वाल्मीकि ऋषि केवळ कठोर साधना करून झाले, या आध्यात्मिक सिद्धांतावर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. म्हणून सनातन अनेक वृत्तांमध्ये 'आगामी हिंदु राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा देण्यात येईल', असे म्हटले जाते. येथे शिक्षा हा शब्द प्रातिनिधीक असून साधनेद्वारे व्यक्तीचे ऐहिक आणि पारमार्थिक कल्याणच व्हावे, असा व्यापक आध्यात्मिक दृष्टीकोन आहे. 
- संपादक

शासकीय योजनांची देशाच्या तळागाळापर्यंत प्रत्यक्ष कार्यवाही झाली, तरच मोदींना अपेक्षित असे 'चांगले दिवस' (अच्छे दिन) येतील !

    १७ ऑगस्ट २०१५ या दिवशी मी फोंडा (गोवा) येथील एका दुकानात गेले होते. त्या दुकानासमोर मला कुजलेल्या भाज्या, प्लास्टिकच्या पिशव्या आदींचा ढीग दिसला. त्याविषयी मी त्या दुकानाच्या मालकीणबाईंना विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, "नगरपालिकेला दूरभाष करून सतत कळवावे लागते की, स्वच्छता कर्मचारी कचरा घेऊन जात नाहीत. तसे कळवूनही येथे असाच कचरा साठलेला असतो." आमचे संभाषण झाल्यावर थोड्याच वेळाने कचरा गोळा करणारी दोन ते तीन माणसे तेथे फिरतांना मला दिसली; पण त्यांपैकी कुणीही समोर दिसणाऱ्या कचर्याला हातही लावला नाही. अलिकडेच मोदी शासनाने स्वच्छ भारत अभियान घोषित करून त्यासाठी ४ सहस्र २६० कोटी रुपयांचा निधी दिला. या अभियानाचा प्रारंभ करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक आमदार, प्रतिष्ठित व्यक्ती आदींनी रस्त्यावरील कचरा उचलला. या वृत्तांना सर्व प्रसारमाध्यमांनी मोठ्या आकाराची छायाचित्रे आणि ठळक बातम्या यांद्वारे प्रसिद्धी दिली.

सनातनद्वेष्ट्यांकडून सनातनची अपकीर्ती होत असतांना सनातनच्या मागे खंबीरपणे उभे रहाणारे संत आणि भाविक !

१. प्रदर्शन पाहून गेलेल्या जिज्ञासूंनी सांगितले, तुम्ही अतिशय चांगले कार्य करत आहात. लोकांना धर्मशिक्षण देत आहात आणि प्रसारमाध्यमे मात्र तुमची नाहक अपकीर्ती करत आहेत. तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
२. अनेक साधू-संतांनी प्रत्यक्ष भेटून, तसेच भ्रमणभाष करून सांगितले की, तुमच्या एका साधकाला पकडले; म्हणून तुम्ही घाबरू नका. तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
३. एका विज्ञापनदात्याने स्वतःहून संपर्क करून सांगितले, मी वृत्तवाहिन्यांवरील वृत्ते पाहिली. हे सर्व खोटे आहे. तुमची मानहानी करण्यासाठीच हे सर्व चालले आहे.
४. एकजण म्हणाले, दोन दिवस दूरचित्रवाहिन्यांवर आम्ही बघत आहोत की, तुमच्या विरुद्ध कशा बातम्या दाखवत आहेत; म्हणून नेमके काय कार्य आहे, हे बघायला आलो. खरंच तुमचे कार्य किती अभिमानास्पद आहे. तुमचे कार्यकर्ते किती निस्वार्थीपणे कार्य करत आहेत. हे चॅनेलवाले मात्र तुमची अपकीर्ती करत आहेत.
- (पू.) कु. स्वाती खाडये, प्रसारसेविका, महाराष्ट्र राज्य

यापूर्वी सत्ता मिळण्यासाठी मातृभाषेसाठी केलेली आंदोलने मंत्री विसरले कि आता मिळालेली सत्ता टिकवण्यासाठी भाषाप्रश्नालची आवश्यकता नाही ?

    'केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या काणकोण (गोवा राज्य) भेटीच्या वेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांशी बोलण्यास प्रारंभी नकार दर्शवला.'

धर्मांध रझा अकादमीशी सनातन संस्थेची तुलना करण्याचा टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीचा डाव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हाणून पाडला !

     मुंबई - रझा अकादमी, तसेच अन्य देशद्रोही आणि धर्मांध संघटनांशी देशप्रेमी, धर्माभिमानी सनातन संस्थेची तुलनाच होऊ शकत नाही, असे ठामपणे मांडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या बाजूने चर्चा झुकवण्याचा टाइम्स नाऊचे संपादक अर्णव गोस्वामी यांचा कुटील डाव हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी १७ सप्टेंबर या दिवशी झालेल्या चर्चासत्राच्या वेळी हाणून पाडला. धर्मांध मुसलमान संघटना आणि सनातन संस्था या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे वक्तव्य गोस्वामी यांनी केले. त्या पार्श्‍वभूमीवर अधिवक्ता पुनाळेकर यांनी हे विधान केले. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात सनातनच्या साधकाला अटक झाल्याचे निमित्त साधून सनातन संस्था या कट्टरवादी छोट्या संघटनेवर बंदी घालणे या एकांगी विषयावर ही चर्चा घेण्यात आली होती.

श्री गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून आणि याकूब मेमनसारख्या देशद्रोह्याचे मढे (मृतदेह) विमानातून जाते, यालाच 'लोकराज्य' म्हणतात का ?

श्री. विक्रम भावे
     गणेशोत्सवात मूर्तीदान करणे, कृत्रिम तलावांत मूर्तीचे विसर्जन करणे, अशा गोष्टींमुळे होणार्‍या धर्महानीच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते गेली अनेक वर्षे वैध मार्गाने संघर्ष करत आहेत. त्या अनुषंगाने समितीच्या कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवली आहे. त्यात धक्कादायक माहिती अशी मिळाली की, कोल्हापूर, पुणे इत्यादी महापालिकांनी कृत्रिम तलावांत अर्धवट विरघळलेल्या मूर्ती किंवा विरघळलेल्या मूर्तींची माती हे सर्व कचर्‍याच्या गाडीतून नेऊन अन्य तलावांत किंवा नाल्यांत टाकले जाते; मात्र देशद्रोही इस्लामी आतंकवादी याकूब मेमनला फासावर लटकवल्यावर त्याचे मढे (मृतदेह) विमानाने नागपूरहून मुंबईला आणण्यात आले. 
     काय दैवदुर्विलास आहे पहा, हिंदूंच्या देशात हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेल्या जातात आणि एका देशद्रोह्याचे मढे विमानातून नेले जाते. यालाच लोकराज्य (लोकशाही) किंवा धर्मनिरपेक्षता म्हणायचे का ? 
- श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई

श्रीगुरूंचे सनातन संस्थारूपी नाव कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ लागलेल्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांसह राजयोगी स्नानाचे औचित्य साधून केलेला विहंगम प्रसार !

राजयोगी स्नानाच्या वेळी रामकुंडावर लावलेले फलक
    कुंभमेळ्यात राजयोगी (शाही) स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुंभमेळ्यातील एकूण प्रसाराच्या दृष्टीने या स्नानाच्या निमित्ताने होऊ शकणार्‍या प्रसाराला ८० टक्के, तर अन्य वेळी होणार्‍या प्रसाराला २० टक्के महत्त्व आहे, हे पू. स्वातीताईंनी जाणले आणि राजयोगी स्नानाच्या वेळी करावयाच्या प्रसाराचे काटेकोर अन् व्यापक नियोजन केले. कुंभमेळ्याच्या सेवेसाठी येऊ न शकलेल्या साधकांना या नियोजनाची व्याप्ती समजावी, यासाठी हा लेखनप्रपंच !
१. वर्ष २००३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातील
प्रसाराचा अभ्यास करून या वेळचे नियोजन करणे
    श्रीगुरूंचे सनातनरूपी नाव आणि हिंदु जनजागृती समितीचे नाव कुंभमेळ्याला उपस्थित असलेल्या अन् दूरचित्रवाणी वाहिनीवरून कुंभमेळा पहाणार्‍या प्रत्येक दर्शकाला ठाऊक व्हावे, अशी पू. स्वातीताईंची तळमळ होती. त्यांच्यासमवेत सेवा करणार्‍या प्रत्येक साधकाला ती तळमळ प्रकर्षानेे जाणवत असे. नाशिक शहरात सध्या रामकुंडाचे एक चित्र विक्रीसाठी उपलब्ध आहे. या चित्रात रामकुंडावर सर्वत्र सनातनचे फलक लागलेले दिसत आहेत. पू. ताईंनी ते चित्र घेऊन त्याचा अभ्यास केेला. कोणत्या ठिकाणी सनातनचे फलक लागले आहेत ?, हे पाहून त्यांनी या राजयोगी स्नानाच्या वेळच्या प्रसाराचे नियोजन केले. वर्ष २००३ मध्ये सनातनचे कार्य मर्यादित होते. आज संस्थेच्या प्रसाराची व्याप्ती पहाता त्या तुलनेत प्रसार झाला पाहिजे, ही पू. स्वातीताईंची धारणा होती !

एका कुंभमेळ्याचे आयोजन करता न येणारे शासन !

शासनाची कार्यक्षमता !
'नाशिक येथील सिंहस्थ कुंभपर्वात १३ सप्टेंबर २०१५ या दिवशी दुसर्या  राजयोगी स्नानाच्या वेळी आंबेडकर चौक येथे भाविकांसाठी स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली होती; मात्र पहाटे त्या ठिकाणी पाणीच उपलब्ध नसल्याची तक्रार भाविकांनी केली. शहरात गर्दी असल्याने पाण्याचे टँकर त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत, असे भाविकांना सांगण्यात येत होते.'

हिंदु विधीज्ञ परिषदेने दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र

अधिवक्ता
श्री. संजीव पुनाळेकर
हिंदु विधीज्ञ परिषद
दिनांक : १८.०९.२०१५
प्रती,
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस,
मंत्रालय, मादाम कामा रोड, मुंबई - ४०००३२
विषय : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात उच्च न्यायालयात झालेल्या याचिका आणि या तपासाविषयीचा पोलीस खात्याचा दृष्टीकोन...
महोदय,    नरेंद्र दाभोलकर यांचे कुटुंबीय आणि गोविंद पानसरे यांचे कुटुंबीय यांनी उच्च न्यायालयात केलेल्या स्वतंत्र याचिका वेगवेगळ्या दिवशी ऐकतांना मुंबई उच्च न्यायालयाने नापसंती व्यक्त केल्याच्या रंजक बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसृत झाल्या आणि त्यानंतर एखाद-दुसरा आठवडा होण्यापूर्वीच समीर विष्णु गायकवाड नावाच्या तरुणास अटक करण्यात आली. अधिकृतरित्या त्यांच्या अटकेची वेळ पहाटे ४.३० वाजताची दाखवण्यात आली, असे समजते. दुपारनंतर त्याच्या आईला या अटकेची माहिती दिली. त्या वेळेपर्यंत या तरुणास न्यायालयात उपस्थित करून ७ दिवसांचा ताबा पोलिसांनी मिळवला होता. या तरुणाला त्यामुळे कोणतेही कायदेशीर साहाय्य मिळाले नाही. मालेगाव २००८ प्रकरणात तत्कालीन काँग्रेस शासनाने हीच कार्यपद्धत अवलंबली होती. याची आठवण झाली. पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे आणि अकारण त्यात हस्तक्षेप करू नये, याच मताचे आम्ही आहोत. त्यातून विद्यमान शासन हे यापूर्वीच्या शासनापेक्षा पारदर्शक आणि स्वच्छ कारभार देणारे आहे, याविषयी आमच्या मनात शंका नसल्यामुळे कोल्हापूर येथील विशेष तपास पथक जो काही तपास करत आहे, त्याच्या कामात अडथळा येईल वा त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, असे कोणतेही कृत्य किंवा विधान आम्ही करणार नाही; मात्र याचा अर्थ संपूर्ण तपासयंत्रणेला मोकळे रान देण्यात येईल आणि त्यांची पापे त्यांच्या पदरात बांधण्याविषयी आम्हास भीड वाटेल, असा भ्रम पसरू नये आणि राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने या तपासयंत्रणेच्या अपयशाचे खापर आपल्यावर फुटू नये, या सद्हेतूने वस्तूस्थितीची जाणीव आपल्यास होण्यासाठी हे पत्र लिहीत आहोत.

आनंदाने अन् सलोख्याने नांदणे, हे हिंदूंना सांगायला नको. इतर धर्मियांना शिकवायला पाहिजे, हे भाजप शासनाला का कळत नाही !

   गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोव्याच्या भाजप शासनाने वृत्तपत्रांना दिलेल्या विज्ञापनात गोव्यातील संमिश्र संस्कृतीचा अभिमान बाळगून आणि जेथे सर्व आनंदाने अन् सलोख्याने नांदत आहेत, असे वाक्य नमूद करण्यात आले आहे.

हिंदूंनी धर्म सोडला; म्हणून ते रसातळाला गेले आहेत. असे असतांना गोव्यातील तथाकथित हिंदुत्ववादी भाजप शासन गोव्याला धर्मनिरपेक्ष बनवू इच्छिते. खरे वैभव म्हणजे भ्रष्टाचार, बलात्कार नसणारे राज्य, हेही भाजपला ज्ञात नाही का ?

   गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोव्याच्या भाजप शासनाने वृत्तपत्रांना दिलेल्या विज्ञापनाच्या शेवटी गोव्याला धर्मनिरपेक्ष आणि वैभवशाली करण्याच्या दिशेने वाटचाल, अशी ओळ लिहिली आहे.

कुंभमेळ्यातील सद्यस्थिती विशद करणारे सनातनचे ग्रंथ !

कुंभमेळ्यांतील काही साधूंची भोंदूगिरी
(संतांकडून अपेक्षित असलेले कार्यही अंतर्भूत)
      कुंभमेळा म्हणजे अखिल विश्‍वातील हिंदु साधू-संतांचे एक भव्य संमेलन ! साधू म्हणजे त्याग, अशी साधूंची समाजात परंपरागत ओळख असतांनाही कुंभक्षेत्रातील काही तथाकथित साधूंच्या वर्तनातून लोभ, आसक्ती, लोकेषणा, हेवेदावे आणि अडवणूक यांचे प्रदर्शन होते. प्रस्तुत ग्रंथात अशा तथाकथित साधूंच्या, तसेच संत या उपाधीचा अवमान करणार्‍या संतांच्या वर्तनांचे विवेचन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर खर्‍या साधू-संतांकडून कोणते कार्य अपेक्षित आहे, हे सांगून कुंभमेळ्यांत आदर्श कार्य करणार्‍या काही साधू-संतांची ओळखही या ग्रंथाद्वारे करून दिली आहे. 
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक दाम्पत्याची आवश्यकता !

संतसेवेची सुवर्णसंधी !
      पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक दाम्पत्याची आवश्यकता आहे. जे सेवक दाम्पत्य या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 
भ्रमणभाष : ८४५१००६०७० 
इ-मेल : hinducoordination@gmail.com 

डोळ्यांचे आरोग्य राखणे, तसेच तोंडावळ्यावरील मुरुम घालवणे यांसाठीचा सोपा उपाय !

वैद्य मेघराज पराडकर
      प्रतिदिन सकाळी उठल्यावर तोंड धुण्यापूर्वी स्वतःची लाळ काजळाप्रमाणे दोन्ही डोळ्यांत घालावी. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते. डोळे कोरडे होणे, डोळे येणे, डोळे तांबडे होणे, चष्म्याचा क्रमांक वाढणे आदी विकारांमध्ये हा उपाय अत्यंत लाभदायक आहे; मात्र हे करण्यापूर्वी प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी दात-तोंड स्वच्छ धुवावेत, नाहीतर सकाळची लाळ जंतूंमुळे दूषित होते. हीच लाळ तोंडवळ्यावर उठणार्‍या मुरुम-पुटकुळ्यांवर लावल्याने मुरुम-पुटकुळ्याही न्यून होतात. - वैद्य मेघराज माधव पराडकर, अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१३.९.२०१५)
'सार्वजनिक आणि सामान्य जीवनामध्ये अयोग्य मार्गाचा अवलंब करून कोट्यधीश होण्यासाठी आणि सत्ताप्राप्ती करण्यासाठी चढाओढ वाढली आहे' - धर्माचार्य स्वामी हरिनारायणानंद, संस्थापक महामंत्री, भारत साधू समाज 
'ज्यांनी स्वच्छ आणि दक्ष प्रशासन देण्याचे आवाहन केले होते; त्यांची मात्र अधोगती झाली आहे. अशा स्वार्थी राजकारण्यांना आणि विवेकशून्य प्रशासनाला रोखणे आवश्यक आहे.' - धर्माचार्य स्वामी हरिनारायणानंद, संस्थापक महामंत्री, भारत साधू समाज

'तुझे आहे तुजपाशी परी तू जागा विसरलासी ।', ही म्हण लागू पडणारे सरसंघचालक !

    हिंदूंच्या भारतीय संस्कृतीमध्ये कालबाह्य असे काही नाही. आहे ते सर्व नित्य नूतन, तरीही शाश्वत आणि चांगली मूल्ये जगभरात इतरत्र पसरली आहेत, या भ्रमात सरसंघचालक बोलतात, म्हणून कीव येते. 
    कालबाह्य ते फेकून देऊन जगभरातील शाश्वत आणि चांगली मूल्ये स्वीकारण्याची भारतीय समाजाची परंपरा राहिली आहे. - सरसंघचालक मोहन भागवत

अनेक गुणांची खाण असलेले आणि धर्मद्रोह्यांविरुद्ध क्षात्रवृत्तीने लढून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ बनलेले माननीय अधिवक्ता संजीव पुनाळेकर !

अधिवक्ता
श्री. संजीव पुनाळेकर
     आज भाद्रपद शुक्ल ७, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना हार्दीक शुभेच्छा ! या दिनानिमित्त अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. हिंदुत्ववाद्यांचा आधारस्तंभ !
     आज कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंद झाले किंवा पोलिसांकडून त्यांना नोटिसा देण्यात आल्या तर त्यांना सर्वप्रथम अधिवक्ता पुनाळेकरांची आठवण येते. त्यांंना आपली अडचण सांगितली की, ती सुटणारच, असा विश्‍वास त्या कार्यकर्त्यांना वाटतो.
      श्री गणेशमूर्तींचे मंगलमूर्ती मोरया या गजरात विसर्जन करतांना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देश आर्थिक संकटात असतांना आणि दहशतवादाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा करण्याची नामुष्की आली असतांना शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह आहे !

सनातन संस्था हिंदूंच्या रक्षणासाठी उत्तम प्रकारे कार्य करत आहे !

    मी सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांविषयी बोलत आहे. सनातन संस्था ही हिंदूंच्या रक्षणासाठी समाजात उत्तम पद्धतीने अध्यामप्रसाराचे कार्य करत आहे. सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांचा काडीमात्र अभ्यास न करता त्यांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करून संस्थेची अपकीर्ती केली जात आहे. - सद्गुरु खडेश्‍वर महाराज, दत्तवाडी, येवला, जिल्हा नाशिक

सनातनवरील बंदी आणि बंदीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी कारवाई न करणे

    वर्ष २०१३ मध्ये मी केंद्रीय गृहमंत्री झालो. त्यानंतर माझ्याकडे सनातनवरील बंदीचा कोणताही प्रस्ताव आला नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी तो पाठवला, त्याविषयी त्यांनी गांभीर्याने पाठपुरावा करायला हवा होता. आम्ही काहीतरी कारवाई केली असती. ज्यांनी हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली, त्यांचे अज्ञान असावे. - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

सनातन संस्थेला आतंकवादी म्हणणे पूर्णतः चुकीचे !

     सनातन संस्थेला आतंकवादी म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे. हिंदु धर्मरक्षणाचे आणि हिंदूंना संघटित करण्याचे कार्य सनातन संस्था खर्‍या अर्थाने करत आहे. या संस्थेची समाजात अपकीर्ती करू नका. - सद्गुरु खडेश्‍वर महाराज, दत्तवाडी, येवला, जिल्हा नाशिक

चांगले कार्य करणार्‍या संस्थांना वृत्तवाहिन्या झोडपून काढतात !

     समाजात अध्यात्म आणि धर्म यांच्या प्रसाराचे चांगले कार्य करणार्‍या संस्था आहेत. त्याविषयी मात्र प्रसिद्धीमाध्यमे चांगली वृत्ते प्रसारित करत नाहीत. याउलट त्या संस्थांना वृत्तवाहिन्या झोडपून काढतात. समाजात त्यांची अपकीर्ती करतात. धर्मप्रसाराचे कार्य न करणार्‍या संस्थांचा वृत्तवाहिन्यांवर उदोउदो केला जातो.
- सद्गुरु खडेश्‍वर महाराज, दत्तवाडी, येवला, जिल्हा नाशिक

सनातन संस्था हिंदु धर्माचे काम करत असल्याने आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी ! - आनंद रजपूत, उत्सव समिती प्रमुख, शिवसेना, मिरज

    सनातन संस्था हिंदु धर्माचे काम करते. त्यामुळे ते जे काही करतील ते योग्यच असेल. सनातनवर आमचा पूर्णपणे विश्‍वास आहे. आतापर्यंत सनातनवर अनेक वेळा आरोप झाले, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आम्ही सनातन संस्थेच्या पूर्णपणे पाठीशी आहोत. येणार्‍या काळात हिंदुद्वेष्ट्यांच्या दबावाला बळी पडून जर सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, तर मिरज शिवसेना वेळप्रसंगी सनातनच्या बाजूने रस्त्यावर उतरेल.           

धर्मद्रोह्यांनो, सनातन संस्थेला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी आमचे कार्य थांबणार नाही, हे लक्षात घ्या !

'सध्या सनातन संस्थेची नाहक अपकीर्ती करून या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी धर्मद्रोह्यांकडून करण्यात येत आहे. त्यांनी कितीही विरोध केला, तरी धर्माभिमानी हिंदूंचा सनातनवरील विश्वाहस तसूभरही न्यून झालेला नाही. नाशिक येथे सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त विद्यमाने राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी प्रदर्शन भरवले आहे. या अनुषंगाने आलेले काही अनुभव खाली देत आहे.
१. समाजाचा सनातनवरील विश्वास दर्शवणारी काही क्षणचित्रे 
अ. आतापर्यंत सुमारे १ लक्ष जिज्ञासूंनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. त्यातील अनेक जणांनी उत्स्फूर्तपणे अभिप्राय दिले, 'हे प्रदर्शन पाहून आम्ही कृतार्थ झालो. सिंहस्थाला आल्याचे सार्थक झाले.'
आ. रस्त्यावरून जाणार्या अनेक युवकांच्या आपापसातील चर्चेतून हेच कानावर पडत होते, 'आपण कुठेही गेलो नाही, तरी चालेल; पण सनातनच्या प्रदर्शनाला भेट देऊया. जीवनाचे सार्थक होईल.'

सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांच्या माध्यमातून जिज्ञासू संस्थेकडे कशा प्रकारे आकृष्ट होत आहेत, यांविषयी आलेले अनुभव आणि साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

       समाजातील काही व्यक्तींनी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ वाचल्यानंतर त्यांना काय जाणवले, यांविषयी संपर्क करून मला कळवले. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर झालेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे.
१. शिव ग्रंथ पहातांना प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पाहून शांत वाटल्याचे
सांगणार्‍या आणि त्यांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित करणार्‍या सौ. संगीता म्हात्रे !
      सौ. संगीता म्हात्रे (वय ४५ वर्षे), पालघर या लहानपणापासून शिवभक्त आहेत. त्यांनी ग्रंथ प्रदर्शनावरून शिव ग्रंथ विकत घेऊन त्यात सांगितल्याप्रमाणे कृती करण्यास आरंभ केला. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांचे ग्रंथातील छायाचित्र पाहिल्यावर त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात जागृत झाली. त्या म्हणाल्या, त्यांच्या छायाचित्राकडे पाहून शांत वाटते. ग्रंथातील अन्य साधकांच्या छायाचित्रांकडे पाहूनही प्रसन्नता जाणवते.
     एके दिवशी त्या शिवाचा जप करत झोपल्या असतांना झोपेत त्यांना सतत प.पू. डॉक्टरांचे मुख दिसत होते आणि झोपून उठल्यावरही पुष्कळ चांगले वाटत होते.

मुसलमानाने दुकानात येऊन पत्नीचे छायाचित्र काढल्यानंतर त्या प्रसंगाला क्षात्रवृत्तीने सामोरे जाता आल्याची एका धर्माभिमान्याला आलेली अनुभूती

१. एक मुसलमान भ्रमणभाषवर पत्नीचे छायाचित्र काढत असल्याचे पहाणे
आणि भ्रमणभाष तपासल्यावर त्यात इतर महिलांचीही छायाचित्रे असल्याचे लक्षात येणे
    १७.७.२०१५ या दिवशी सकाळी ११.३० वाजता माझी पत्नी आमच्या दुकानात काम करत होती. त्या वेळी एक मुसलमान युवक दुकानात येऊन भ्रमणभाषवर माझ्या पत्नीचे छायाचित्र काढत असल्याचे मी पाहिले. त्याला छायाचित्र काढलेस का ?, असे विचारल्यावर तो नाही म्हणाला. मी त्याचा भ्रमणभाष तपासल्यावर त्यात माझ्या पत्नीचे आणि इतर महिलांचीही छायाचित्रे दिसली.
२. पोलिसांना संपर्क केल्यानंतर त्यांनी
त्या मुसलमानाला पोलीस स्थानकात घेऊन जाणे
    मी त्याचा भ्रमणभाष माझ्याकडे घेतला आणि पोलिसांना संपर्क केला. तोपर्यंत एक धर्माभिमानी तेथे आले. त्याला त्यांनी आणि मी बेदम मारले. पोलीस आल्यावर त्यांनी त्या मुलाला पोलीस स्थानकात नेले. आम्हीही पोलीस स्थानकात गेलो. त्यापूर्वी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे श्रीकृष्णा, हा प्रसंग तूच घडवलास. या प्रसंगातून तुला जे काही शिकवायचे आहे, ते तूच आम्हाला शिकव. या प्रसंगात आमची साधना करवून घे. देवा. या धर्मलढ्यात आमच्यासमवेत राहून हे युद्ध कसे जिंकायचे ?, हे आम्हाला शिकव. या युद्धभूमीत प्रत्येक कृती साधना म्हणून होऊ दे. तुझ्या सुदर्शनचक्राचे संरक्षककवच आमच्याभोवती निर्माण करून आमचे रक्षण होऊ दे.

चैतन्यमय प्रदर्शन पाहून कार्याला साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवणारे साधूसंत आणि फलकांना नमस्कार करणारे जिज्ञासू !

प्रदर्शन पहाण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी
   'जुलै २०१५ पासून नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ अन् सात्त्विक वस्तू यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. काही कारणास्तव आम्ही उद्घोषणा, भित्तीपत्रके लावणे आदी माध्यमांतून प्रदर्शनाचा प्रसार अधिक प्रमाणात करू शकलो नाही. त्यामुळे पुष्कळ प्रसार झाला नाही; पण 'देवाचे कार्य देवच करतो', याची प्रचीती आली. जे साधूसंत, राजकीय व्यक्ती, जिज्ञासू आदी प्रदर्शन पाहून गेले, तेच सर्व जण बाहेर जाऊन प्रसार करत होते. ते ज्यांना ज्यांना सांगत होते, ते सारे जण प्रदर्शन पहायला यायचे. प्रदर्शन पाहून झाल्यानंतर अनेकांनी अतिशय चांगले अभिप्राय दिले. वाचकांसाठी काही अभिप्राय येथे देत आहोत. 

नाशिक येथील अभूतपूर्व धर्मप्रसार कार्य आणि साधू-संतांनी जाणलेले सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याचे महत्त्व !

पू. (कु.) स्वाती खाडये
नाशिकक्षेत्री चालू असलेल्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने धर्मजागृती होण्यासाठी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सनातनच्या संतांच्या मार्गदर्शनासाठी अहोरात्र प्रसारकार्य करण्यात मग्न आहेत. अधिकाधिक जणांपर्यंत धर्मशिक्षण पोचवण्यास कटीबद्ध असलेल्या या संघटना अनेक अडथळ्यांवर मात करून तळमळीने प्रसारकार्य करत आहेत. हिंदु धर्माला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी देहभान अर्पून सेवा करणारे साधक आणि प.पू. गुरुदेवांचा संकल्प यामुळे या कुंभमेळ्यात अभूतपूर्व प्रसार होत आहे. सनातनचे वेगळेपण आता सर्वांच्याच ध्यानी येत असून श्रीकृष्णकृपेने या वेळी आलेले काही अनुभव आणि सनातनच्या चैतन्याची लोकांना येणारी अनुभूती यांविषयी पुढे देत आहे. 

कॉ. पानसरे यांच्या हत्येला सनातनला नाहक उत्तरदायी ठरवून पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीर रहा !

साधकांना सूचना
     महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला आणि साधकांना नाहक गोवण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांकडून केला जात आहे. प्रसारमाध्यमांमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे पोलिसांकडून साधकांची चौकशी केली जाऊ शकते. पोलीस चौकशीला आल्यास साधकांनी घाबरून न जाता, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्यप्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. कारण सनातन संस्थेचे सर्व कार्य वैध मार्गाने चालते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये साधकांची चौकशी करण्यात आलेली आहे; मात्र अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. कर नाही, त्याला डर कशाला या उक्तीप्रमाणे आपण काहीही केलेले नसल्यामुळे साधकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. 
     भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगांत कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.

राजकारणी आणि प्रसारमाध्यमे सनातन संस्थेवर करत असलेले आरोप वस्तूस्थितीवर नव्हे, तर हिंदु धर्मावरील द्वेषावर आधारित असणे !

    एखाद्याने गुन्हा केला, तर त्याच्या आई-वडिलांना अटक करत नाहीत. एखाद्याने भ्रष्टाचार केला, तर त्याच्या कार्यालयातील सर्वांवर गुन्हा दाखल करत नाहीत. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने गुन्हा केला, तर पक्षावर बंदी घालत नाहीत. असे असतांना सनातनच्या एका साधकावर गुन्हा केल्याचा नुसता संशय असला, तरी सर्व सनातनद्वेष्टे एकसुरात सनातनवर बंदी घाला, अशी मागणी करतात !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.९.२०१५)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधना
    समुद्रातील वादळे अल्पकाळात नाहीशी होतात; पण मनातील वादळे एकदा निर्माण झाली की, ती आवरणे अतिशय कठीण; म्हणून ती निर्माण होऊ न देण्यासाठी साधना करणेच श्रेयस्कर !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी न घालणारी सर्वपक्षीय सरकारे जनहिताच्या संदर्भात किती उत्तरदायीशून्य आहेत, हे लक्षात घ्या !

      स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कोणत्याच पक्षाचे सरकार जनहितकारी नसल्याने 'फटाके वाजवू नका', यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीला अनेक वर्षे मोहिम राबवावी लागत आहे. एखादे सुबुद्ध सरकार असते, तर त्याने मुळाशी जाऊन फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी घातली असती. आता हिंदु राष्ट्रातच हे साध्य होईल. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.१०.२०१४)

फटाक्यांना अनुमती देणारी सर्वपक्षीय सरकारे समाजद्रोही, राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही आहेत !

     फटाक्यांमुळे अब्जावधी रुपये अक्षरशः जाळले जात असतांना आणि त्यांच्यामुळे पर्यावरण आणि आरोग्य यांची अपरिमित हानी होत असतांना, तसेच जनता आत्यंतिक दारिद्य्रात दिवस ढकलत असतांना फटाक्यांना स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी अनुमती कशी दिली ? हा समाजद्रोह, राष्ट्रद्रोह आणि धर्मद्रोह आहे. 
 - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.८.२०१४)

खरे समजून घेणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज महाराज
सुनो सोचो समझो । 
सुनो समझो सोचो ।
     भावार्थ : सुनो म्हणजे ऐका, सोचो म्हणजे विचार करा आणि समझो म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत सुनो सोचो समझो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारेे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसर्‍या ओळीत सुनो समझो सोचो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर जिवाने ती गोष्ट समजून जाणे, त्याची अनुभूती घेणे आणि नंतर त्याविषयी विचार करणे. हे ब्रह्माच्या संदर्भात आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      जे आंधळे, बहिरे कि भ्रष्ट पोलीस रात्री २ - ३ पर्यंत उघडपणे फोडल्या जाणार्‍या फटाक्यांना थांबवू शकत नाहीत, ते अतिरेकी लपून-छपून करत असलेले बाँबस्फोट कधी थांबवू शकतील का ? फटाक्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.९.२०१५)

सिंहस्थाची कृपा'वृष्टी' !

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. असे असले तरी 'पर्जन्यराजाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात वृष्टी करून शेतकरी आणि सामान्य जनता यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस शासन यांच्यावर कृपावृष्टीच केली आहे', असे म्हणावे लागेल. याचे कारण असे की, अतिवृष्टीमुळे तात्पुरती हानी आणि गैरसोय झाली, तरी पाण्यामुळे चांगले पीक येणे, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणे, असे लाभ होतात. याउलट 'दुष्काळामुळे वर्षभर जगायचे कसे ?', हा यक्ष प्रश्न  सर्वांसमोरच निर्माण होतो. एखाद्या भागात दुष्काळ आल्यावर केवळ त्या भागातील शेतकरी आणि इतर जनता यांच्यावरच आभाळ कोसळते असे नाही, तर त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण जनतेवरच थोड्याफार प्रमाणात होतो. उदाहरणार्थ शेतकर्यांना कर्जमाफी किंवा आर्थिक साहाय्य हे राज्याच्या तिजोरीतून दिले जाते. हा सर्वत्रच्या करदात्यांचा पैसा असतो, जो अन्य विकासकामांसाठी वापरता येऊ शकतो. त्यामुळे पर्जन्यराजाच्या कृपेमुळे फडणवीस शासन नक्कीच सुखावले असणार यात शंका नाही. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn