Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गौरीआवाहन
बलराम जयंती

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे पू. राजेंद्र शिंदे 
यांचा आज वाढदिवस

दांभिक पुरोगाम्यांच्या दबावामुळेच सनातन संस्था लक्ष्य !


डावीकडून अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, 
बोलतांना श्री. अभय वर्तक आणि वैद्य उदय धुरी
हिंदुत्ववादी संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद 
कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकांचा छळ !
  • दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे तपास करण्याची मागणी ! 
  • संघटना निरपराध समीर गायकवाड यांच्या पाठीशी ! 
  • दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात माहिती देण्यासाठी शासनाशी केलेला पत्रव्यवहार पत्रकारांसमोर उघड !

मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी १६ सप्टेंबर या दिवशी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली. त्याला अधिवक्ताही मिळू दिला नाही. त्याच वेळी 'जितं मया'च्या आवेशात डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांचे कुटुंबीय, अखिल भारतीय अंनिसचे प्रा. श्याम मानव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, काँग्रेसचे सचिन सावंत इत्यादी दांभिक पुरोगाम्यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. अजून श्री. गायकवाड यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही आणि न्यायालयाने कुणालाही दोषी ठरवलेले नाही, असे असतांनाही सनातनवर बंदी घालण्याच्या अवकाळी मागण्या चालू झाल्या आहेत. सतत सनातन संस्था आणि संस्थेशी संबंधित व्यक्तींकडे संशयाचे बोट दाखवून विवेकी गोंगाट निर्माण करायचा आणि खर्यास गुन्हेगारांना पकडण्यापासून पोलिसांना परावृत्त करायचे, असे हे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक यांनी १८ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केले. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव आणि सनातन संस्थेचे कायदेविषयक समादेशक (सल्लागार) अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी उपस्थित होते.

पाकचा ध्वज फडकवणार्या असिया अंद्राबी यांना अटक

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये पाकचा ध्वज फडकवल्याप्रकरणी १८ सप्टेंबर या दिवशी 'दुखतरण-इ-मिल्लत' या संघटनेची प्रमुख असिया अंद्राबी या महिलेला अटक करण्यात आली आहे. अंद्राबी यांनी पाकच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित येथील एका कार्यक्रमात पाकिस्तानचे राष्ट्रगीत म्हटले होते, तसेच पाकचा ध्वजही फडकवला होता.

सनातनच्या बाजूने खटला लढवण्यास आम्ही सिद्ध ! - अधिवक्ता सुजित लाळे

पुरोगामी आणि हिंदुद्वेष्टे यांना हिंदु 
धर्मप्रेमी अधिवक्त्यांची सणसणीत चपराक !
सनातनच्या साधकाची बाजू मांडण्यासाठी आटपाडी (जिल्हा सांगली) येथील सहा अधिवक्त्यांचा पाठिंबा
आटपाडी (जिल्हा सांगली), १८ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्था ही अध्यात्मप्रसार करणारी संस्था आहे. त्या संस्थेचे साधक अशा प्रकारचे कृत्य करणे शक्य नाही. हिंदूंची बाजू प्रभावीपणे मांडण्याचे काम सनातन संस्था करत आहे. यामुळेच सनातन संस्थेच्या साधकाला षड्यंत्र करून गोवण्यात आले आहे. आम्ही तुमची वाट पहात होतो. तुम्ही संपर्क केला नसता, तर आज आम्ही तुम्हाला संपर्क करणार होतो. अटक केलेल्या सनातनच्या साधकाचे केवळ  वकीलपत्र घेत नसून त्याचा संपूर्ण खटला लढवण्यास आम्ही सिद्ध आहोत. हे सर्व सिंचन घोटाळ्यातील बाबी, तसेच जुनी प्रकरणे दडपण्यासाठी नवीन प्रकरण काढण्यात आलेले आहे, अशी प्रतिक्रिया आटपाडी येथील अधिवक्ता सुजित लाळे यांनी सनातनच्या साधकांकडे व्यक्त केली. (सनातनची न्याय्य बाजू लक्षात घेऊन सनातनच्या साधकाचे वकीलपत्र घेण्याची सिद्धता दर्शवून प्रत्यक्ष खटला लढवण्याची सिद्धता दर्शवणार्या  सर्व अधिवक्त्यांचे सनातन संस्थेने आभार व्यक्त केले आहेत ! असे हिंदु धर्माभिमानी अधिवक्ते सर्वत्र हवेत ! - संपादक)

सांगली जिल्ह्यात अनेक हिंदु धर्माभिमानी, हिंदुत्ववादी, वाचक यांचा सनातनला पाठिंबा !

भाजप उपाध्यक्ष अभिजित शिंदे सनातनच्या पाठीशी !
मिरज, १८ सप्टेंबर (वार्ता.) - गेल्या दोन दिवसांत सांगली जिल्ह्यातून विविध हिंदु धर्माभिमानी, हिंदुत्ववादी, 'दैनिक सनातन प्रभात'चे वाचक, हितचिंतक यांनी सनातनच्या साधकांना प्रत्यक्ष भेटून, दूरभाषद्वारे सनातनच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत 'आम्ही पूर्णत: सनातनच्या पाठीशी आहोत', असे सांगितले. भाजपचे सांगलीचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. अभिजित शिंदे यांनी सनातन संस्थेच्या ब्राह्मणपुरी येथील आश्रमात येऊन साधकांची भेट घेतली. 'सनातनची बाजू सत्याची बाजू आहे. माझे साहाय्य लागेल, तेव्हा मला हाक मारा. मी तत्परतेने तुमच्या साहाय्यास येईन', असे सांगून त्यांनी स्वतःचा भ्रमणभाष क्रमांक दिला. (सनातनवर होणार्याा वृथा आरोपांच्या विरोधात सनातनच्या बाजूने उभे रहाणारे श्री. अभिजित शिंदे यांच्यासह सर्व हिंदुत्ववादी आणि हिंदु धर्माभिमानी यांचे आभार ! - संपादक)
एका अधिवक्त्यांचे आश्रमात येऊन साहाय्याचे आश्वासन ! 
१७ सप्टेंबर या दिवशी सनातनच्या एका हितचिंतक अधिवक्त्यांनी सनातन संस्थेच्या मिरज येथील आश्रमात येऊन साधकांनी भेट घेतली. साधकांची आस्थेने चौकशी करून तुम्हाला काही त्रास नाही ना ?, अशी विचारणा केली. कोणतेही साहाय्य लागल्यास मला हाक मारा, असे त्यांनी सांगितले.

बंगाल शासनाकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील ६४ धारिका उघड !

कोलकाता, १८ सप्टेंबर - ममता बॅनर्जी शासनाकडून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ धारिका १८ सप्टेंबर या दिवशी सार्वजनिक करण्यात आल्या. या सर्व धारिका वर्ष १९३७ ते १९४७ या काळातील असून सध्या त्या पोलीस संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या धारिकांमधील सर्व १२ सहस्र ७४४ पानांची 'सीडी' सिद्ध करण्यात येऊन ती नेताजी बोस यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आली आहे. आजवर करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार नेताजी यांचा वर्ष १९४५ च्या एका विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले; मात्र आता वर्ष १९४७ पर्यंतच्या धारिका पुढे येत असल्यामुळे नेताजींच्या गूढ मृत्यूचे सत्य उकल होण्याची शक्यता आहे. 
नेताजींचे पणतू चंद्र बोस म्हणाले, "भारतीय स्वातंत्र्याचे खरे खलनायक कोण ? हे या ६४ धारिकांवरून स्पष्ट होणार आहे. नेहरूंच्या आदेशावरून काँग्रेसचे तत्कालीन शासन बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांची हेरगिरी का करत होते ?, याची मोदी शासनाने  चौकशी करावी. "

दक्षिण गोव्यात गेल्या ८ महिन्यांत ११ अल्पवयीन शाळकरी मुलींचे अपहरण !

      जानेवारी ते ऑगस्ट २०१५ या ८ महिन्यांत दक्षिण गोव्यात अपहरणाच्या २९ घटना घडल्या आहेत. त्यापैकी २५ घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अपहरण करण्यात आलेल्या २९ घटनांपैकी ११ घटनांत अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींचा समावेश आहे. वास्को पोलीस स्थानकात सर्वांत अधिक म्हणजे ७ अपहरणाचे गुन्हे नोंद आहेत.
        मडगाव पोलीस ठाण्यात ५, वेर्णा पोलीस ठाण्यात ४, मायणा-कुडतरी, कोलवा आणि फोंडा येथे प्रत्येकी ३, केपे पोलीस स्थानकात २, तर कुडचडे पोलीस स्थानकात एका घटनेची नोंद झालेली आहे.

गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला नाहक गोवले जात आहे ! - श्री. वीरेंद्र मराठे, विश्‍वस्त, सनातन संस्था

      पणजी - सनातन संस्थेला कुठलेही राजकीय पाठबळ नसल्याने सनातन संस्थेला लक्ष्य केले जात आहे. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला नाहक गोवले जात आहे, असे सनातन संस्थेचे विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी म्हटले आहे. श्री. मराठे म्हणाले, सनातन संस्था ही सॉफ्ट टार्गेट असल्यानेच पुन्हा पुन्हा सनातन संस्थेला लक्ष केले जात आहे. आम्हाला काँग्रेस किंवा भाजप या राजकीय पक्षांकडून पाठिंबा नाही. आम्ही सत्ताधार्‍यांविरुद्ध सतत आवाज उठवत असतो म्हणून सनातन संस्थेविरुद्ध कारवाई केली जात आहे. अन्य हिंदुत्ववादी संघटनांना राजकीय पाठबळ असते. त्या कुठल्याही विषयावर कठोर भूमिका घेत नाहीत. त्यामुळे राजकीय पक्ष त्यांना लक्ष करत नाहीत.

गुगलकडून हिंदुद्वेष्ट्या म.फि. हुसेन यांचे उदात्तीकरण

हिंदूंनो, या हिंदुद्वेष्टेपणाच्या विरोधात गुगलला जाब विचारा !
     मुंबई - हिंदु देवतांचे नग्न चित्र रेखाटणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फी. हुसेन यांच्या १०० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने गुगलने त्यांना डुडल (गुगल या सर्च इंजिनचे होमपेज)द्वारे विशेष मानवंदना दिली. हिंदूंचा गणेशचतुर्थी हा सण असणार्‍या दिवशीच गुगलने त्याच्या होमपेजवर अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रकारातील एक चित्राकृती ठेवली. ही चित्राकृती हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढणार्‍या हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फी. हुसेन यांची असल्याने हिंदूंनी त्याचा तीव्र निषेध केला.

पानसरे हत्याप्रकरणी सनातनला नाहक गोवण्याचा प्रयत्न निषेधार्ह ! - श्रीराम सेना

शिरसी कर्नाटक येथे सनातनच्या समर्थनार्थ हिंदुत्ववाद्यांची पत्रकार परिषद
डावीकडून श्री. सतीश कुमटाकर, श्री. बसवराज बुधिहाळ, 
श्री. प्रमोद मुतालिक, श्री. शिवानंद दीक्षित, 
श्री. रमेश नायक, श्री. राघवेंद्र कांबळे
     शिरसी (कर्नाटक) - कोल्हापूर येथील कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नसतांना अटक करण्यात आली. ही अटक म्हणजे सनातन संस्थेला लक्ष्य करून केलेली अन्याय्य कारवाई आहे. या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेला नाहक गोवून हिंदुत्ववादी संघटनांची मानहानी करण्याचा हे पुरोगाम्यांचे षड्यंत्र आहे. कर्नाटकमधील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आम्ही या षड्यंत्राचा आणि सनातनचे निष्पाप साधक श्री. समीर गायकवाड यांच्या अटकेचा जाहीर निषेध करतो. आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेच्या मागे भक्कमपणे उभे आहोत, याची या पत्रकार परिषदेद्वारे आम्ही ग्वाही देतो, असे उद्गार श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे काढले. या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश नायक आणि निवृत्त अधिकारी, तसेच हिंदुत्ववादी श्री. शिवानंद दीक्षित उपस्थित होते. 

साधू-महंतांच्या राजयोगी स्नानाला, साक्षात् वरुणराजाही धावला साक्षीला !

रामकुंडावरील राजयोगी स्नानाला उपस्थित भाविक
अमृतरूपी जलवर्षावामुळे तिसर्या  राजयोगी स्नानाचा उत्साह द्विगुणित !
नाशिक, १८ सप्टेंबर (वार्ता.) - ऋषीपंचमीदिनी गोदातिरी झालेल्या साधू-महंतांच्या तिसर्या  राजयोगी स्नानाचा साक्षीदार होण्यासाठी साक्षात् वरुणराजाही धावून आला. राजयोगी स्नानाच्या पूर्वसंध्येपासूनच कुंभनगरीत चालू झालेला संततधार पाऊस राजयोगी स्नानाच्या दिवशीही कायम होता. या अमृतरूपी जलवर्षावामुळे साधू-महंतांसह लाखो भाविकांचा तिसर्या राजयोगी स्नानाचा उत्साह द्विगुणित झाला. 
मुसळधार पावसातही आजच्या राजयोगी मिरवणुकीस वेळेतच आरंभ झाला. आजच्या राजयोगी स्नानाचा पहिला मान अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याला मिळाला. निर्मोही अनी आखाड्याचे राजयोगी मिरवणुकीसह सकाळी ६.३५ वाजताच रामकुंडावर आगमन झाले. आजवरचे दोन्ही राजयोगी स्नान अनुमाने ७.१५ वाजण्याच्या सुमारास पार पडले आहे; मात्र आजच्या पावसामुळे मिरवणूकही जलदगतीने पुढे नेण्यात आल्याने पहिला आखाडा सकाळी ६.३५ वाजताच रामकुंडावर पोहोचला. त्यापाठोपाठ अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा, तसेच अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाडा या आखाड्यांतील साधू-महंतांनी गोदावरी नदीत पवित्र स्नान केले. त्यापाठोपाठ संबंधित आखाड्यांच्या खालशांतील साधू-महंतांनीही स्नान केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून राजयोगी स्नानाच्या मिरवणुकीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत !

औक्षण, शंखध्वनी आणि घोषणा यांनी मिरवणुकीचे स्वागत करतांना सनातनचे साधक
      नाशिक, १८ सप्टेंबर (वार्ता.) - सिंहस्थ कुंभपर्वात ऋषीपंचमीच्या दिवशी तिसर्‍या राजयोगी (शाही) स्नानानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक भरपावसातही उत्साहात पार पडली. मिरवणुकीस सकाळी ६ वाजता साधूग्राम येथून आरंभ झाला. त्यानंतर ती गणेशवाडी येथून जाऊन राजयोगी मार्गाने रामकुंडावर आली. मिरवणुकीत अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा, त्यापाठोपाठ अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा आणि शेवटी अखिल भारतीय श्री पंच निर्वाण अनी आखाडा या तिन्ही अनी आखाड्यांचे साधू, संत आणि महंत यांनी स्नान केले. त्यानंतर या आखाड्यांतर्गत असलेल्या खालशांमधील साधू, संत, महंत यांनीही स्नान केले. राजयोगी स्नानाच्या मिरवणुकीत साधूंकडून शंखनाद केला जात होता.

त्र्यंबकेश्‍वर येथे आजपासून प.पू. रामदेवबाबा यांच्या योग शिबिराचे आयोजन

      त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), १८ सप्टेंबर (वार्ता.) पंतजली योग समितीच्या वतीने १९ सप्टेंबर या दिवशी येथील श्री गुरु कार्ष्णि कुंभमेळा, बडा उदासीन आखाडा येथे पहाटे ५ ते सकाळी ७.३० पर्यंत योगऋषी प.पू. स्वामी रामदेवबाबा यांच्या निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नियमितपणे योग प्राणायम केल्याने शारीरिक आणि मानसिक आजार दूर होतात. या शिबिरात योगासह भारतीय आयुर्वेदिक चिकित्सापद्धती, तसेच प्राकृतिक चिकित्सेसह घरामध्ये करण्यात येणार्‍या उपायांची माहिती देण्यात येणार आहे. या शिबिराचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंतजली योग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांच्याकडून हिंदुद्वेष्ट्यांच्या काळ्या कृत्यांवर प्रकाश !

पानसरे हत्याप्रकरणी सनातनला दोषी ठरवण्यासाठी आयोजित केलेले 
आयबीएन् लोकमत वाहिनीवरील चर्चासत्र !
डावीकडून सूत्रसंचालक श्री राजेंद्र हुंजे, श्याम मानव,
अधिवक्ता श्री संजीव पुनाळेकर, आणि नवाब मलिक 
       सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या अटकेच्या प्रकरणी आयबीएन् लोकमत वाहिनीने १६ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या चर्चासत्रात अंनिसचे प्रा. श्याम मानव, अंनिसचे हमीद दाभोलकर (दूरभाषवरून), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक या सर्व राष्ट्र आणि धर्म द्रोह्यांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी वेगवेगळ्या प्रसंगांतील उदाहरणे देत निरुत्तर केले आणि सडेतोड उत्तरे देत त्यांचे बिंग फोडले ! श्याम मानव आणि हमीद दाभोलकर हे सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी पोलीस आणि शासन यांच्यावर प्रचंड प्रमाणात दबाव आणत आहेत, हे या चर्चेतून पुढे आले. या चर्चासत्रातील सूत्रे आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

सनातनचे ७ कापडी फलक हिंदुद्वेष्टे पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन यांनी कचराकुंडीत टाकले !

सनातनचे ७ कापडी फलक हिंदुद्वेष्टे पोलीस आणि
महानगरपालिका प्रशासन यांनी कचराकुंडीत टाकले !
      नाशिक, १८ सप्टेंबर (वार्ता.) - साधू-महंतांच्या स्वागतासाठी रामकुंडावर लावलेले सनातनचे ७ कापडी फलक हिंदुद्वेष्टे पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन यांनी काढून कचराकुंडीत टाकल्याचे निदर्शनास आणले. याविषयी पोलीस वा प्रशासन यांनी सनातनला कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही.
      १८ सप्टेंबर २०१५ या दिवशी तिसर्‍या राजयोगी स्नान पार पडले. या स्नानासाठी रामकुंडावर अनेक साधू-महंत यांच्या स्वागतासाठी सनातनने कापडी फलक लावले होते. यापूर्वी पार पडलेल्या दोन्ही राजयोगी स्नानाच्या वेळीही असेच फलक लावण्यात आले होते. तथापि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना पोलिसांनी नुकत्याच केलेल्या अन्याय्य अटकेच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन यांनी निवळ हिंदुद्वेषापोटी हे फलक काढून ते कचराकुंडीत टाकल्याचे निदर्शनास आले.

मुंबई-पुणे नवीन एक्स्प्रेस वे आणि जुना हायवे यांवर पूरस्थिती

      मुंबई - १७ सप्टेंबर या दिवशी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे जुन्या आणि नव्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस रस्त्यावर डोंगरदर्‍यांतून प्रंचड प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने अचानक पूरजन्य स्थिती निर्माण झाली. डोंगरदर्‍यातून विविध ठिकाणी साचलेल्या पाण्याचे ओघ रस्त्यावर येत होते.

फलक प्रसिद्धीकरता

अशा देशद्रोह्यांची पाकिस्तानात हकालपट्टी करा !
     जम्मू-काश्मीरमध्ये १४ ऑगस्टला पाकच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाकचा ध्वज फडकवणे आणि पाकचे राष्ट्रगीत म्हणणे या प्रकरणी दुखतरण-इ-मिल्लत या संघटनेची प्रमुख देशद्रोही असिया अंद्रबी या महिलेला अटक करण्यात आली.

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार

     ढाका (बांगलादेश) - ढाका जिल्ह्यातील सावर येथे मंदिराच्या मालकीची भूमी बळकावण्यासाठी सुमारे ४० सशस्र धर्मांधांच्या जमावाने मध्यरात्री मंदिरावर आक्रमण केले. या आक्रमणात त्यांनी मंदिर आणि मूर्ती यांची तोडफोड केली. या प्रकरणी सावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष श्री. रविंद्र घोष यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. 
बागेर्‍हाट जिल्ह्यात हिंदु मुली आणि महिला 
यांच्यावर लैंगिक अत्याचार
     बागेर्‍हाट जिल्ह्यातील सावरनखोला येथे हिंदु मुली आणि महिला यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत, तसेच हिंदूंच्या भूमी बळकावणे, हिंदूंच्या मंदिरांची मोडतोड करणे, मूर्तींची तोडफोड करणे हे प्रकार घडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या कार्यकर्त्यांनी या जिल्ह्याला भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली आहे.

सनातनचे राष्ट्र-धर्माचे कार्य पुष्कळ तेजस्वी असून ते सफल होणार ! - महंत गुरुमुखदासजी उदासी महाराज, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा

सुवर्ण-चांदी भक्षण करणारे जगातील एकमेव दक्षिणमुखी 
पारदशिवलिंग मंदिराचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात साजरा !
  • मंदिराचे पिठाधीश्‍वर श्री महेशदासजी उदासी यांच्याकडून सनातन संस्थेचे धर्मशिक्षणविषयक लिखाण लावण्यासाठी मोठी भिंत उपलब्ध !
  • दिनी पिठीधिश्‍वर श्री महेशदासजी उदासी यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांकडून रुद्राभिषेक करवून घेतला !
      श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) - सनातन संस्था जे राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांचे कार्य करत आहे, ते कार्य पुष्कळ तेजस्वी असून ते निश्‍चित सफल होणारच आहे. या कार्यासाठी काही साहाय्य लागले, तर मी तुमच्यासह असेन, असे प्रतिपादन श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याचे महंत स्वामी गुरुमुखदासजी उदासी महाराज यांनी काढले. ते खंबाळे गाव, त्र्यंबकेश्‍वर येथील सुवर्ण-चांदी भक्षण करणारे जगातील एकमेव दक्षिणमुखी पारदशिवलिंग मंदिराच्या तृतीय वर्धापनदिनाच्या प्रसंगी बोलत होते. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना त्यांनी संस्थांच्या कार्यासाठी आशीर्वाद दिलेे. या वेळी पारदेश्‍वर मंदिराचे पिठाधिश्‍वर श्री महेशदासजी उदासी आणि त्याचे पुत्र श्री आकाश उदासी हे उपस्थित होते.

सनातनच्या साधकाला अटक होताच प्रसारमाध्यमांच्या सनातनद्वेषाला उधाण !

       कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात संशियत असल्याचे सांगत पोलिसांनी १६ सप्टेंबर या दिवशी सनातनचे सांगली येथील साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक केली. या अटकेचे वृत्त पोलिसांनीच प्रसारमाध्यमांना दिल्यानंतर लगेचच सर्व प्रसारमाध्यमांनी सनातनच्या विरोधात मोहीम उघडली. प्रसारमाध्यमांकडून सनातनला झोडपण्याचा जो अश्‍लाघ्य प्रयत्न झाला, त्याविषयी काही उदाहरणे येथे देत आहोत. 
१. वृत्तपत्रे 
१ अ. दैनिक लोकमत
१. १८ सप्टेंबरच्या कोल्हापूर आवृत्तीत पृष्ठ १ वर समीरनेच गोळ्या झाडल्याचा संशय अशा मथळ्याखाली वृत्त दिले आहे, तर संकेतस्थळावर समीरनेच गोळ्या झाडल्या, असे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. (याला म्हणतात पीतपत्रकारिता! पोलिसांच्या अन्वेषणात काय स्पष्ट झाले, ते पोलिसांनी अधिकृतरित्या सांगण्यापूर्वीच जनतेला खोटी माहिती देणारे लोकमत ! - संपादक)

सनातन संस्थेच्या राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण प्रदर्शनास १० सहस्रांहून अधिक जिज्ञासूंची भेट !

प्रदर्शनाविषयीची माहिती समजून घेतांना जिज्ञासू
सनातनवर एकांगी आरोप करून बंदीची मागणी करणार्‍यांना सणसणीत चपराक !
      नाशिक, १८ सप्टेंबर (वार्ता.) - सनातनद्वेष्ट्यांच्या सनातनविरोधी एकांगी अपप्रचारास सामान्य नागरिक बळी पडत नाहीत, तसेच ईश्‍वरी कृपेने सनातनचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे, अशी अनुभूती नाशिक कुंभमेळ्यात धर्मसेवेत सहभागी असलेल्या साधकांनी घेतली. सिंहस्थ पर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या प्रदर्शनास धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा प्रतिसाद वाढत आहे. १८ सप्टेंबर या दिवशी भरपावसातही प्रदर्शनास भेट देणार्‍यांची संख्या १० सहस्रांहून अधिक होती. जिज्ञासू भिजलेले असतांनाही शांतपणे प्रदर्शन पहात होते. सभागृहाबाहेर उभे राहून प्रदर्शन पहाण्याचे आमंत्रण देणार्‍या साधकांचे अनेकांनी कौतुक केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Jammu-kashmirme Pak ka rashtradhwaj faharaneke aropme Asiya Andrabi ko 1 mahke pashchat giraftar kiya. Kya aise deshdrohioko shasan fasipar latkayegi ?
 जागो !
 जम्मू-कश्मीरमें पाक का राष्ट्रध्वज फहराने के आरोप में असिया अंद्रबी को एक माह के पश्‍चात गिरफ्तार किया. क्या ऐेसे देशद्रोहीआें को शासन फासीपर लटकाएगी ?

वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास भाविकांचा सकारात्मक प्रतिसाद !

वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास भाविकांचा सकारात्मक प्रतिसाद !
हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव चळवळ
महापालिकेने पाणी न सोडूनही श्री गणेशाच्या कृपेने पाऊस पडल्याने नदीला पाणी !
      पुणे, १८ सप्टेंबर (वार्ता.) - धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्याच्या हिंदु जनजागृती समितीच्या आवाहनाला भाविकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. १८ सप्टेंबर या दिवशी दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. येथील एस्.एम्. जोशी पूल, भिडे पूल, ओंकारेश्‍वर पूल येथील घाटांवर, तर पिंपरी-चिंचवड परिसरात थेरगाव घाट, मोरया घाट, रावेत घाट, औंध घाट, काकडे पार्वैमधी, घाट आदी ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रबोधन चळवळ राबवण्यात आली.

सनातनने केलेल्या हिंदूसंघटनामुळे हिंदुविरोधी शक्तींचे षड्यंत्र ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

'टीव्ही ९' च्या चर्चासत्रात अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर 
यांनी सनातनद्वेष्ट्यांचा घेतला समाचार !
अधिवक्ता
श्री. संजीव पुनाळेकर
      मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर २ घंट्यांतच त्या हत्येमागे गोडेसेवादी प्रवृत्ती आहे, असे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोडसे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे होते. असे असूनही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे संघपरिवाराची संघटना असल्याचे सांगितले गेले. हा बादरायण संबंध कसा जोडला जातो ? डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी सनातनच्या आश्रमांत चौकशी करण्यात आली. त्यातून आजवर काहीही निष्पन्न झाले नाही. डॉ. दाभोलकर किंवा कॉम्रेड पानसरे असे कोणते मौलिक विचार मांडत होते ? सनातन संस्थेने अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांच्या माध्यमातून भारतभरातील हिंदुत्ववादी संघटनांचे संघटन केले. कोल्हापूरलाही नुकतीच अधिवक्त्यांची बैठक झाली. या सगळ्यामुळे हिंदुविरोधी शक्ती घाबरल्या आणि त्यांनीच सनातनच्या विरोधात षड्यंत्र रचले असून त्यामुळे सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली. त्यातून पुढे दिवसभर सनातनच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे, असे सुस्पष्ट मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी व्यक्त केले.

आनंदाने अन् सलोख्याने नांदणे, हे हिंदूंना सांगायला नको. इतर धर्मियांना शिकवायला पाहिजे, हे भाजप शासनाला का कळत नाही !

     गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोव्याच्या भाजप शासनाने वृत्तपत्रांना दिलेल्या विज्ञापनात गोव्यातील संमिश्र संस्कृतीचा अभिमान बाळगून आणि जेथे सर्व आनंदाने अन् सलोख्याने नांदत आहेत, असे वाक्य नमूद करण्यात आले आहे.

हिंदूंनो, स्वतःची कूपमंडूक मानसिकता त्यागा आणि साधना करून धर्मरक्षण करण्यास सज्ज व्हा !

श्री. प्रशांत हरिहर
     महाराष्ट्र्र्र्र्रात गोवंशहत्या बंदी कायदा लागू झाल्यावर देशभरात मुसलमानांनी विरोध दर्शवला. हे वृत्त समजल्यावर सुचलेले विचार पुढे मांडत आहे. 
१. सध्याची हिंदुस्थानची स्थिती - मोकळे रान मिळाल्याने देशभर 
हैदोस घालणारे धर्मांध आणि बिळात लपून बसणारे हिंदू बांधव !
आज जगभरात धर्मांधांचे कट्टरता राज चालू आहे. ते आपले काम करण्यात मग्न असून त्यांना हवे ते प्राप्त करतांनाही दिसत आहेत. आज ते आय.एस्.आय.एस्.च्या रूपात विदेशांत आहेत, तर पाकच्या घोषणा देणार्‍यांच्या रूपात भारतातही जागृत आहेत. जगात कुठेही त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यास ते एकटवतात आणि रहातात त्या देशात हैदोस घालतात. असाही एक काळ होता, जेव्हा अखिल विश्‍वात हिंदु राजेच राज्य करत होते. त्या काळी कुठलाही धर्मांधच काय; पण सप्त पाताळांतीलही कुणी वक्र दृष्टीने पाहू शकत नव्हते. आजची स्थिती पूर्णतः त्याविरुद्ध आहे. आज हिंदू बिळात लपून बसले आहेत, तर धर्मांध दुष्टांना मोकळे रान मिळाले आहे.

पारदेश्‍वर धामाचे माहात्म्य !

पारदेश्‍वर मंदिरातील
पारदशिवलिंग
      पारदेश्‍वर मंदिराचे माहात्म्य सांगतांना पिठाधिश्‍वर श्री महेशदासजी उदासी आणि त्यांचे पुत्र श्री. आकाश उदासी म्हणाले की, 
१. पारदशिवलिंग लोहापेक्षा १६ पटीने अधिक भारमान असलेला १२५ किलो पारा वापरून सिद्ध करण्यात आले आहे. पारा हा स्थिर रहात नाही; मात्र हे पार्‍याचे शिवलिंग मंत्रशक्तीद्वारे बेलाच्या झाडाच्या खोडावर स्थिर करण्यात आले आहे. 
२. या शिवपिंडीचे वैशिष्ट्य असे की, ही शिवपिंड उत्तरमुखी बसवण्यासाठी उज्जैन येथून पंडित आले होते; मात्र स्थापनेच्या वेळी ती स्वत:हून दक्षिण दिशेला फिरली. त्यामुळे स्वयंभू दक्षिणमुखी झाली. ज्या ठिकाणी दक्षिणमुखी पारदशिवलिंग स्थापन होते, तेथे स्मशानभूमी निर्माण होते; मात्र येथे असे झालेले नाही. 

सनातन संस्थेची न्याय्य बाजू मांडल्याची काही प्रातिनिधिक वृत्ते !

सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या करणार्‍या वृत्तांचा उन्मेष गुजराथी 
यांनी त्यांच्या ब्लॉगमधून घेतलेला समाचार !
समीर गायकवाड : आरोप आणि उठाठेव
      समीर गायकवाडला अटक झाल्याची बातमी सगळ्यांनी रंगवून दिली; पण सनातनची बाजू कोण मांडणार? मी तसे करून पाहिले. आणि आज दिवसभर माझा फोन वाजत राहिला. मी सनातनचा साधक झालोय कि काय, अशी शंकाही कित्येकांना आली. पण असे काहीही झालेले नाही आणि यापुढेही होणार नाही याची खात्री असू द्या.
     पण तरीही पत्रकार म्हणून दोन्ही बाजू मांडणे मी माझे कर्तव्यच समजतो. त्यातली एक बाजू सगळ्यांनीच इतकी उचलून धरलीय, की त्यात आता नवीन सांगण्यासारखे काहीच नाही. म्हणूनच मी दुसर्‍या अ(ल्प)प्रकाशित बातमीला पुढे आणायचे ठरवले.

क्रांतीकारक भगतसिंह यांच्या नावालाही उर्दू शब्द वापरणारे पंजाब शासन !

     चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहीद-ए-आजम सरदार भगतसिंह विमानतळ, असे नाव ठेवण्यावरून हरियाणा आणि पंजाब शासनांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

धर्मशास्त्राचा अभ्यास नसणारे धर्मद्रोही सोन्नूर !

      जोपर्यंत कर्मकांडांतून समाज बाहेर पडणार नाही, तोपर्यंत तो विवेकवादी होणार नाही. जो समाज वर्णव्यवस्था आणि कर्मकांड यांत गुंतलेला असतो, तो पुढे न जाता गुलाम बनतो. देश समृद्ध करायचा असेल, तर समाजातील कर्मकांड नाहीसे करावे लागेल. तोपर्यंत समाज विवेकवादी होणार नाही. - धर्मद्रोही तथाकथित कीर्तनकार शामसुंदर सोन्नूर (प्राचीन काळापासून संपूर्ण जगात सनातन हिंदु संस्कृती ही सर्वांत प्रगत संस्कृती होती. या संस्कृतीतील ऋषी-मुनी यज्ञयागादी कर्मकांडाचे विधी करत होते. या ऋषि-मुनींनीच आज ज्ञात असलेले बहुतांश सर्व वैज्ञानिक शोध लावले आहेत. आजही नासातील शास्त्रज्ञ वेद आणि जुन्या संस्कृत ग्रंथांतील श्‍लोकांचा आधार घेऊन सर्व स्तरांतील संशोधन करत आहेत. सोन्नूर यांनी या धर्मशास्त्राचा अभ्यास करावा !

हिंदु राष्ट्रात काळा पैसा जमवणारे कुणी नसतील; असलेच, तर त्यांची माहिती देणार्‍या व्यक्तीला १५ लाख द्यावे लागणार नाही; कारण ती व्यक्ती राष्ट्रकर्तव्य म्हणून हे करील !

      कर बुडवून अमाप संपत्ती जमा करणार्‍या लोकांची किंवा त्यांच्या संपत्तीची माहिती देणार्‍या देशातील कोणत्याही नागरिकाला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची नवी योजना आयकर खात्याने घोषित केली आहे. 
 प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

एका कुंभमेळ्याचे आयोजन करता न येणारे शासन !

शासनाची कार्यक्षमता !
      नाशिक येथील सिंहस्थ कुंभपर्वात १३ सप्टेंबर २०१५ या दिवशी दुसर्‍या राजयोगी स्नानाच्या वेळी आंबेडकर चौक येथे भाविकांसाठी स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली होती; मात्र पहाटे त्या ठिकाणी पाणीच उपलब्ध नसल्याची तक्रार भाविकांनी केली. शहरात गर्दी असल्याने पाण्याचे टँकर त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत, असे भाविकांना सांगण्यात येत होते.

फटाक्यांना अनुमती देणारी सर्वपक्षीय सरकारे समाजद्रोही, राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही आहेत !

     फटाक्यांमुळे अब्जावधी रूपये अक्षरशः जाळले जात असतांना आणि त्यांच्यामुळे पर्यावरण आणि आरोग्य यांची अपरिमित हानी होत असतांना, तसेच जनता आत्यंतिक दारिद्य्रात दिवस ढकलत असतांना फटाक्यांना स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी अनुमती कशी दिली ? हा समाजद्रोह, राष्ट्रद्रोह आणि धर्मद्रोह आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.८.२०१४)

फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी न घालणारी सर्वपक्षीय सरकारे जनहिताच्या संदर्भात किती उत्तरदायीशून्य आहेत, हे लक्षात घ्या !

      स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कोणत्याच पक्षाचे सरकार जनहितकारी नसल्याने फटाके वाजवू नका, यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीला अनेक वर्षे मोहिम राबवावी लागत आहे. एखादे सुबुद्ध सरकार असते, तर त्याने मुळाशी जाऊन फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी घातली असती. आता हिंदु राष्ट्रातच हे साध्य होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.१०.२०१४)

साधनेच्या मार्गावर आधार देणारे पू. राजेंद्र शिंदे यांचा तोंडवळा आनंदी आणि प्रेमळ फुलासारखा आहे, असे सांगून त्यांंना शुभेच्छापत्र पाठवणारी कु. साक्षी रुद्रकंठवार (वय १४ वर्षे) !

कु. साक्षी हिने शुभेच्छापत्रावर
काढलेले फुलाचे चित्र
१. पू. दादा, तुमचे बोलणे अन् हसणे अती छान ।
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जमले सारे जण ।
गुरूंचे आशीर्वाद लाभले आनंदलेे सर्व जण ॥ १ ॥
गुरूंनी दिलेले ज्ञान शिष्याने घेतले जाणून ।
मिळाले आम्हाला पू. दादांचे मार्गदर्शन ॥ २ ॥
पू. दादा, तुमचे बोलणे अन् हसणे अती छान ।
श्रीकृष्णाजवळ पोचण्याचा प्रयत्न करू छान ॥ ३ ॥
२. श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्याजवळ नेणारे पू. दादा !
    झाडाला मुळांची आवश्यकता असतेे, तसेच शिष्याला भरारी घेण्यासाठी गुरूंचीच आवश्यकता असते. शिष्यासाठी गुरु हेच सर्वस्व असतात. गुरूंच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द शिष्यासाठी अमृतासमान असतो. शिष्याला ज्ञान आणि मोक्ष मिळवण्यासाठी गुरूंचीच आवश्यकता असते. मी पुष्कळ भाग्यवान आहे की, मला माझ्या गुरूंकडे जाण्याचा मार्ग मिळाला आहे. पू. दादा मला साधनेच्या मार्गावर श्रीकृष्णाप्रमाणेे आधार देत आहेत. ते मला श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्याजवळ नेणार आहेत.

कार्यालयात काम करतांना उत्साह जाणवत नसतांना हिंदु जनजागृती समितीचे एक कार्यकर्ते आल्यावर वातावरणात चैतन्य जाणवणे आणि हा सनातनच्या भीमसेनी कापराचा परिणाम असल्याचे लक्षात येणे

    आज सकाळपासून बाहेरचे वातावरण गढूळ होते. त्यामुळे मला मरगळ आली होती. मला कार्यालयात काम करतांना उत्साह जाणवत नव्हता. त्याच वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शैलेश पोटे हे आमच्या कार्यालयात बातमीसाठी आले. त्यांची भेट झाल्यावर अकस्मात् मला वातावरणात चैतन्य जाणवले. एकाएकी असा पालट कसा झाला ?, हा विचार करत असतांनाच मला त्यांच्याकडून वेगळा सुगंध येऊन चैतन्याची स्पंदने जाणवली. श्री. शैलेश पोटे यांना विचारले असता ते म्हणाले, माझ्याजवळ भीमसेनी कापूर आहे. आमच्या गुरुदेवांनी नियमितपणे याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. कापराच्या चैतन्यमय सुगंधामुळे वातावरणाची आणि व्यक्तीची शुद्धी होत असते.
    हे ऐकून मला कौतुक वाटले आणि मीही कापराचा उपाय केला. त्या वेळी मला या कापराचे महत्त्व लक्षात आले.
- श्री. फनेंद्र मंडलीक (वार्ताहर, महाराष्ट्र टाइम्स)

साधिकेने सांगितलेली स्वतःच्या साधनेची आरंभीची स्थिती आणि गुरु अन् आश्रम यांचे महत्त्व

१. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर
साधिकेला स्वतःची आणि घराची जाणीव न रहाणे
    मी सनातन संस्था या नावाच्या आध्यात्मिक संस्थेत बुडून गेले होते. मला घराची आणि मुलांची जाणीवही नव्हती. कोणत्यातरी वेगळ्याच लोकात बुडून गेले होते. माझ्या मनात मी, माझे, असे विचार येत आहेत कि नाहीत, घरातील कामे केली कि नाही केली, तेही मला ठाऊक नव्हते.
२. सत्संगात सांगितल्याप्रमाणे आज्ञापालन न झाल्यास काय
होईल, याचा ताण येणे आणि स्वतःविषयी अहंयुक्त विचार येणे
    सत्संगात सांगितलेले बिनचूक लिहून त्याप्रमाणे आचरण करण्यास सत्संगसेवकांनी सांगितले होते. आज्ञापालन केले नाही, तर काय होईल ?, असा माझ्या मनावर ताण येत होता. माझ्याकडून नीट आज्ञापालन का होत नाही ?, याचे मला कारण कळत नव्हते. मी साधिका असून साधना करत आहे, मी इतरांपेक्षा वेगळी आहे, मीच योग्य आहे, अशी माझी अहंयुक्त समजूत होती.

सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधात असणार्‍या आणि प्रेमभावाचे प्रतीक असणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक स्तर असणार्‍या सौ. सुलोचना जाधवआजी ! (वय ६८ वर्षे)

सौ. सुलोचना जाधवआजी
    देवद आश्रमात बांधणी विभागात सेवा करणार्‍या ६२ टक्के पातळीच्या सौ. सुलोचना जाधवआजी (वय ६८ वर्षे) या मागील काही दिवस रुग्णाईत होत्या. शल्यकर्मासाठी रुग्णालयात असतांना त्यांची सुश्रषा करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. व्याधी प्रारब्धाचा भाग म्हणून आनंदाने स्वीकारणे
    सौ. जाधवआजी हार्निया या व्याधीने ग्रस्त असल्याने त्यांच्यावर शल्यकर्म करण्यासाठी पनवेल येथील एम्जीएम् रुग्णालयात भरती होत्या. त्यांच्या सेवेसाठी माझे नियोजन झाले. त्यांचे शल्यकर्म ३०.५.२०१५ या दिवशी ठरले. तेव्हा त्यांनी त्यांची व्याधी प्रारब्धाचा भाग म्हणून आनंदाने स्वीकारल्याचे मला जाणवले. सकाळी उठून नेमाचा १६ माळा जप त्यांनी पूर्ण केला आणि शल्यकर्मासाठी जाण्यास सिद्ध झाल्या. जणू एखादा शिपाई युद्धभूमीवर जाण्यासाठी सिद्ध व्हावा, त्याप्रमाणे त्यांची सिद्धता पाहून मला त्यांच्याविषयी पुष्कळ आदर वाटला.

कृष्णमय दीपाली मतकर समष्टीमय कृष्णाला क्षणोक्षणी अनुभवत असल्याविषयी कु. स्वाती गायकवाड यांनी अनुभवलेला एक प्रसंग !

कु. दीपाली मतकर
    एकदा मी दीपालीताईला गूळ वाढ, असे म्हटले. तेव्हा ती मला गूळ वाढतांना आमचे पुढील संभाषण झाले.
मी : मधुर मधुर दीपालीने दिलेल्या गुळाला आता आणखी गोडवा आला असेल !
दीपाली (घट्ट झालेला गूळ पाहून) : गुळाकडून शिकायला मिळाले की, संघटितपणा कसा असायला हवा आणि संघटितपणामुळेच त्याच्यात गोडवा टिकून रहातो.
    तिचे बोलणे ऐकून मला वाटले, दीपाली आता समष्टीत गेल्याने तिच्यामध्ये व्यष्टी भावापेक्षा समष्टी भाव अधिक प्रमाणात निर्माण झाला आहे. तसेच कृष्णमय दीपाली समष्टीमय कृष्णाला क्षणोक्षणी अनुभवत आहे. - कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.६.२०१५)

पू. राजेंद्रदादांमध्ये काहीतरी वेगळेपण आहे, असे वाटण्यामागील अर्थ ध्यानात आल्यावर प.पू. डॉक्टरांना भेटल्याचा आनंद होऊन पू. राजेंद्रदादा यांना पाठवलेले पत्र !

कु. सुवर्णा कुंभार
आदरणीय पू. राजेंद्रदादा,
साष्टांग नमस्कार.
    १३.७.२०१५ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये कु. मनीषा शिंदे यांनी तुमच्याविषयी लिहिलेले लिखाण आणि कविता वाचली अन् मनाला पुष्कळ आनंद झाला. मन हलके झाले. हा लेख वाचल्यानंतर मी उरलेले पूर्ण दैनिक वाचले. त्यामुळे मन विविध विषयांतून गेले. संपूर्ण दैनिक वाचून झाल्यावर डोळे बंद केले, तर पुन्हा आपल्याविषयीचा लेख डोळ्यांसमोर आला आणि मनात पुढील
विचार आले.
१. पू. राजेंद्रदादा निराळे आहेत, असे मनात
येऊन विचार करतांना डोळ्यांसमोर आलेल्या ओळी !
१ अ. पू. बिंदाताई : प.पू. डॉक्टरांच्या समष्टी कार्याशी एकरूप आहेत !
१ आ. पू. अनुताई : प.पू. डॉक्टरांच्या समष्टी प्रीतीशी एकरूप आहेत !

नकारात्मक विचार नष्ट करून साधनेसाठी प्रोत्साहन देणारा पू. राजेंद्र शिंदे यांचा आनंददायी सत्संग !

१. आध्यात्मिक त्रासावर मात करून साधना वाढवण्यास प्रोत्साहन देणारे पू. दादा !
    एकदा मी जेवत असतांना पू. राजेंद्रदादा माझ्या शेजारी येऊन बसले. आध्यात्मिक त्रासामुळे मला त्यांच्याशी बोलता यायचे नाही; पण ते स्वतःहून बोलल्यावर त्यांच्याविषयी जवळीक वाटून साधना वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. मी त्यांना म्हणाले, पू. दादा, तुम्ही विभागात आल्यावर आपण इथे थांबू नये, असे वाटते. जिवाची तडफड चालू होते. पू. दादा म्हणाले, ताई, तुम्ही एवढी साधना वाढवा की, मांत्रिक घाबरून पळूनच गेला पाहिजे ! त्यांचे हे वाक्य मनावर कोरले गेले. देवच आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढत आहे, या विचाराने मन कृतज्ञतेने भरून गेले.

नामजप नीट होत नसल्याची खंत वाटत असलेल्या साधिकेने देवाने पू. राजेंद्रदादांच्या रूपात येऊन साहाय्य केल्याची घेतलेली अनुभूती

१. गुरुपौर्णिमा जवळ आली असतांना नामजप न होणे आणि पू. राजेंद्र शिंदे यांंनी नामजपाची विचारणा करून नाम घेत भाकरी केली, तरच भाकरी खाणार, असेे सांगणे : वर्ष २०१५ च्या जुलै मासातील १५ दिवस उलटले, तरी माझा नामजप नीट होत नव्हता. मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाणही उणावत नव्हते. गुरुपौर्णिमा काही दिवसांवरच आली होती आणि काय करावे, ते कळत नव्हते. एकदा पू. राजेंद्र शिंदे स्वयंपाकघरात आले आणि त्यांनी मला विचारले, ताई, जप होतो का ? तेव्हा मी त्यांना नाही, असे उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही जप करत भाकरी केली नाही, तर मी भाकरी खाणार नाही. माझ्या मनात माझ्यामुळे पू. दादांना केवळ भातच खावा लागणार नाही ना ! असा विचार आला आणि जपच झाला नाही तर ? अशी भीतीही वाटली. पू. दादा म्हणाले, मी बाहेर जाऊन थांबतो. तुम्ही जप करा.

कु. वैदेही शिंदे हिला उच्च लोकातील जीव असल्याचे घोषित केल्यावर मिळालेला प्रसाद तिने जन्म देणार्‍या आई-वडिलांना पाठवणे आणि तिच्या वडिलांनी आम्ही केवळ तुझे जन्मदाते असून तुझे जन्मोजन्मीचे नाते प.पू. डॉक्टरांशीच असल्याचे सांगणे

कु. वैदेही शिंदे
    रामनाथी आश्रमात सेवारत असलेली कु. वैदेही शिंदे यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी उच्च लोकातील जीव असल्याचे घोषित केले आणि प.पू. डॉक्टरांनी प्रसाद दिला. तो प्रसाद आपली आई आणि संत असलेले वडील (पू. राजेंद्र शिंदे) यांना पाठवतांना तिने लिहिलेले भावपूर्ण कृतज्ञता पत्र आणि संत वडिलांनी आपल्या उच्च लोकातील कन्येसाठी उत्तर म्हणून पाठवलेला तितकाच भावपूर्ण लघुसंदेश येथे देत आहोत.
    आई-बाबा, हा प्रसाद तुम्हाला पाठवत आहे. या प्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे या गुरुपौर्णिमेला प्रत्यक्ष गुरुमाऊलीने आनंद आणि कृपेचा वर्षाव केला अन् प्रसाद दिला, तोच हा प्रसाद ! देवाने मला तू उच्च लोकातील आहेस, हे सांगून सिद्ध केले की, ज्यांनी मला जन्म दिला, ते माझे (सगुण) आई-बाबासुद्धा उच्च स्तराचे आहेत. आई-बाबा हा प्रसाद माझ्यासाठी नसून तुमच्यासाठीच आहे. तुमच्यामुळेच मी साधनेत इथपर्यंत येऊ शकले. देवाने तुमच्या माध्यमातून लहानपणापासून जे संस्कार केले, त्यासाठी मी अनंत कोटी कृतज्ञ आहे.

निरुत्साही स्थितीत पू. राजेंद्र शिंदे यांंच्या खोलीची स्वच्छता करतांना त्यांच्याकडून साधनेविषयी मिळालेले मार्गदर्शन !

    २४.८.२०१५ या दिवशी सकाळपासून पुष्कळ निरुत्साह जाणवत होता. मनाची स्थितीही चांगली नव्हती. अशा स्थितीतच पू. दादांच्या खोली स्वच्छतेची सेवा करत होतो. त्या वेळी सेवा करतांना मिळणार्‍या आनंदापासून आपण वंचित रहात आहोत, असे लक्षात आल्यावर देवाने पू. दादांचे मार्गदर्शन घेण्याचा विचार दिला. तेव्हा त्यांनी मला व्यष्टी साधनेविषयी सारणीलिखाण, सत्र इत्यादींविषयी विचारले आणि पुढील सूत्रे सांगितली.
१. स्वयंसूचना सत्रांमुळे मनाला दोष आणि अहं यांची जाणीव होणे
    अष्टांग साधनेनुसार सर्वच महत्त्वाचे आहे; परंतु काळानुसार साधना करतांना सध्याच्या स्थितीला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, तसेच भावजागृतीचे प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे. हे प.पू. डॉक्टरांनीही सांगितले आहे. स्वयंसूचना सत्रांमुळे मनाला दोष आणि अहं यांची जाणीव होते; पण त्यावर मात करण्यासाठी प्रयत्नच करायला हवेत.

आपल्या निर्मळ हास्यातून साधकांना आनंद आणि प्रेरणा देणारे अन् समष्टीची तीव्र तळमळ असल्याने छोट्या छोट्या कृती स्वतः करून साधकांना शिकवणारे पू. राजेंद्र शिंदे !

पू. राजेंद्र शिंदे
    भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे मला पू. राजेंद्रदादांच्या खोलीच्या स्वच्छतेची आणि अन्य सेवा करण्याची संधी मिळाली. या कालावधीत लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
सनातनचे ६ वे संतरत्न पू. राजेंद्र शिंदे यांना
सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. इतरांचा विचार करणे 
१ अ १. कपडे वाळत घालण्यास स्वतः शिकवणे : पू. दादांच्या खोलीतील सेवा करण्यास आधी मला पुष्कळ वेळ लागायचा. तेव्हा ते मला कपडे वाळत घालणे इत्यादी सेवा करण्यासाठी साहाय्य करायचे. एकदा मी वाळत घातलेल्या सदर्‍यावर पुष्कळ चुण्या राहिल्या होत्या. पू. दादांनी ते पाहिले आणि म्हणाले, कपडे वाळत घालतांना ते अशा पद्धतीने घालावेत की, कपडे इस्त्री करणार्‍या साधकाला अधिक वेळ लागणार नाही. त्यांनी स्वतः कपडे कसे वाळत घालायचे ते शिकवले.

संतसेवेची सुवर्णसंधी !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक दाम्पत्याची आवश्यकता ! 
     पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक दाम्पत्याची आवश्यकता आहे. जे सेवक दाम्पत्य या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 
भ्रमणभाष : ८४५१००६०७० 
इ-मेल : hinducoordination@gmail.com 
प.पू. दास महाराजांच्या आश्रमात दिवसभरात करावयाच्या सेवांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. 
१. आश्रम आणि मंदिर यांची, तसेच परिसराची स्वच्छता 
२. स्वयंपाक आणि स्वयंपाकघराशी संबंधित सेवा करणे 

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

विविध सेवांसाठी वाराणसी आणि देहली सेवाकेंद्रांत साधकांची तातडीने आवश्यकता !
     वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, लेखा, प्रसार आदी सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. यासमवेतच विद्युत्-जोडणी, सुतारकाम, रंगकाम आदी बांधकामाच्या संदर्भातील कौशल्य असलेल्या सेवा, तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण (सुपरविझन) करू शकणारे साधकही हवे आहेत.
      देहली सेवाकेंद्रात वाहन, स्वयंपाक, लेखा आदी विभागांमध्ये, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे.
     जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी वाराणसी अथवा देहली सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा vishwadeep2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा. 
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ.(४.५.२०१५)

वाचक, हितचिंतक, तसेच राष्ट्रप्रेमी हिंदु यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !

गणेशोत्सव मोहिमेत अधिकाधिक संख्येत सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !
     सध्या गणेशोत्सव चालू आहे. गणेशोत्सवातील अपप्रकार दूर करून आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आदर्श मिरवणूक कशी काढावी ? मूर्तीदान अथवा कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन न करता वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याच्या संदर्भात प्रबोधनात्मक मोहीम चालू आहे. या अंतर्गत विविध गणेशोत्सव मंडळांना संपर्क करणे, राष्ट्र-धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील प्रवचनाचे नियोजन करणे, गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श ही ध्वनीचित्र-चकती दाखवणे, प्रसिद्धीसाठी अन्य वृत्तपत्रांत गणपतिविषयक लेखमाला देणे, क्रांतीकारकांचे, तसेच धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शन आयोजित करणे असे धर्मरक्षणाचे प्रयत्न केले जात आहेत. 

प्रसारसेवक, जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

साधकांनो, २५.९.२०१५ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !
(पू.) सौ. बिंदा सिंगबाळ
      संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून २५.९.२०१५ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी. 
      १५.९.२०१५ या दिवसापर्यंतचा प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे. 
१. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी 
५. गुरुपौर्णिमा २०१५ च्या स्मरणिका आणि विशेष स्मरणिका यांच्या विज्ञापनांची येणे बाकी 
       ठाणे, नाशिक, जळगाव, वर्धा, यवतमाळ, अकोला, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, गोवा, सिंधुदुर्ग 

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'क्वचित एखादाच सात्त्विक, पापभिरू हल्लीच्या राजकारणात राहू शकतो. बाकीचे सर्व राजकारणापासून चार हात दूर रहातात. इतके हल्लीचे राजकारण गलिच्छ झाले आहे !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
(३.९.२०१५) 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे. 
भावार्थ : 'दुसर्‍याला उमजू न देणे' म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. 'स्वतःचे स्वतःला न उमजणे' म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. 'स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे' म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.) 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संतांचा आदर करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      सत्पुरुष आणि संत यांच्याविषयी आदर बाळगावा. ते परमेश्‍वराचे प्रेषित आणि प्रतिनिधी असतात. त्यांचा जन्म मानवी कल्याणासाठी आणि शोषितांच्या उद्वारासाठी असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राजकारणी आणि प्रसारमाध्यमे सनातन संस्थेवर करत असलेले आरोप वस्तूस्थितीवर नव्हे, तर हिंदु धर्मावरील द्वेषावर आधारित असणे !

      एखाद्याने गुन्हा केला, तर त्याच्या आई-वडिलांना अटक करत नाहीत. एखाद्याने भ्रष्टाचार केला, तर त्याच्या कार्यालयातील सर्वांवर गुन्हा दाखल करत नाहीत. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने गुन्हा केला, तर पक्षावर बंदी घालत नाहीत. असे असतांना सनातनच्या एका साधकावर गुन्हा केल्याचा नुसता संशय असला, तरी सर्व सनातनद्वेष्टे एकसुरात सनातनवर बंदी घाला, अशी मागणी करतात ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.९.२०१५)

भारतात न्याय नव्हे, तर केवळ अन्याय आहे !

९१ टक्के गुन्ह्यांतील आरोपी निर्दोष सुटण्याच्या संदर्भात समाज अन् प्रसिद्धीमाध्यमे यांनी आवाज 
उठवणे आणि पोलिस अन् न्याययंत्रणेतील उत्तरदायी यांनी निर्दोष व्यक्तींवर केलेल्या 
अत्याचारासंदर्भात क्षमा मागणे आवश्यक ! 
     महाराष्ट्र राज्यात ९१ टक्के गुन्ह्यांतील आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे न्यायालयात अनेक वर्षांनी निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत तब्बल ९१ टक्के निर्दोष लोकांना पोलिसांच्या अत्याचारांना आणि समाज अन् प्रसिद्धीमाध्यमे यांनी तुच्छ लेखण्याला सामोरे जावे लागते अन् मनस्ताप भोगावा लागतो. वाईट या गोष्टीचे वाटते की, त्यासंदर्भात कोणालाही लाज काय; पण वाईटही वाटत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आरोपी निर्दोष सुटण्याला पोलिसांकडे आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसणे, पोलिसांनी चुकीच्या व्यक्तींना आरोपी करणे न्याययंत्रणा कार्यक्षम नसणे आदी गोष्टी कारणीभूत आहेत. खरेतर यासंदर्भात समाज अन् प्रसिद्धीमाध्यमे यांनी या उत्तरदायींविरूद्ध आवाज उठवला पाहिजे.
      हिंदु राष्ट्रात अन्याय करणारे पोलीस, न्यायाधीश इत्यादी सर्वांना आयुष्यभर खडतर साधना करण्याची शिक्षा करण्यात येईल. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.९.२०१५)

विवेकाची विटंबना !

       गेले तीन दिवस तथाकथित पुरोगामी विवेकाच्या नावाने ठणाणा करत आहेत. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनच्या एका साधकाला चौकशीसाठी पोलिसांनी कह्यात घेतल्याचे निमित्त झाले आणि या पुरोगामी म्हणवणार्‍या कंपूच्या हाती आयतेच कोलीत सापडले. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी स्थिती पुरोगाम्यांची झाली आहे. दाभोलकर-पानसरे यांनी त्यांच्या हयातीत कसे महान कार्य केले आणि हिंदुत्ववादी संघटना कशा वाईटच आहेत, याच्याविषयी भरभरून चर्चा झडू लागल्या. वर्तमानपत्रांतील पान-पान भरून लिखाण प्रसिद्ध होऊ लागले. या तथाकथित विवेकवाद्यांचा विवेक किती बेगडी आहे, याविषयी आम्ही वेळोवेळी पुष्कळ लिखाण केलेलेच आहे; मात्र आता बाहेर विवेकाच्या नावाने या अविवेकींचा अक्षरशः तमाशा चालू असतांना शांत राहिलो, तर त्याला मूकसंमती दिल्यासारखे होईल. तसे होऊ नये आणि हा आेंगळवाणा प्रकार म्हणजेच विवेकवाद, असा समाजाचा अपसमज होऊ नये, यासाठी येथे त्याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn