Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

ऋषिपंचमी
-----
प.पू. कलावतीआई यांची आज जयंती
-----
श्री गजानन महाराज यांची आज पुण्यतिथी

समीर गायकवाड यांच्या दोन नातेवाइकांची चौकशी !

 • गायकवाड यांच्या घरात सापडलेल्या साहित्याचा माध्यमांकडून विपर्यास 
 • पोलिसांचा सनातनद्रोह चालूच !
 • कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या कथित आरोपातून सनातनच्या साधकांच्या छळाचे प्रकरण
      मुुंबई / संकेश्‍वर - सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना १६ सप्टेंबरला पोलिसांनी अटक केली. त्याच दिवशी सकाळी १०.३० वाजल्यापासून श्री. गायकवाड यांचे संकेश्‍वर (जिल्हा बेळगाव) येथील दोन मेहुणे बेपत्ता होते. त्याविषयी संकेश्‍वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेल्यानंतर ती नोंदवून घेतली नाही आणि त्या दोघांविषयी काही कल्पना नसल्याचे सांगत अन्य कुटुंबियांकडे चौकशी करण्यास सांगितले. सदर तक्रार पोलीस हेल्पलाईन क्रमांक १०० वरही नोंदवण्यात आली होती. आता मात्र या दोघांना पोलिसांनी कह्यात घेऊन चौकशीनंतर सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून पोलिसांची कायदाबाह्य कृती आणि सनातनद्रोह चालूच असल्याचे, तसेच सनातनने पोलिसांनी या अटकेचा बनाव रचल्याचे अधोरेखित झाले. (अशा पोलिसांची नावे सनातनने नोंद केली आहेत. साधकांचा छळ करणार्‍या पोलिसांना हिंदु राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा करण्यात येईल ! - संपादक)

सनातनवरील बंदीच्या प्रस्तावाच्या सूत्रावरून काँग्रेसमध्येच जुंपली !

 • सनातनवर बंदी आणण्याची हवा निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचे काँग्रेसचे कुकृत्य उघड !
 • सनातनवर बंदी घालण्याची पुन्हा एकदा टूम !
      मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड यांना १६ सप्टेंबरला पोलिसांनी कह्यात घेतले. त्यानंतर चौकशीतून अद्याप काहीही निष्पन्न झालेले नसतांना पुन्हा एकदा सनातनद्वेष्टे आणि काँग्रेसी विचारसरणीचे पक्ष यांनी सनातनवर बंदी घालण्याची टूम काढली आहे. (सनातनचे निर्दोषत्व वारंवार सिद्ध झाले आहे. याही प्रकरणात ते सिद्ध होईल. सनातनद्वेषामुळेच हे सर्व थयथयाट करत आहेत ! - संपादक) सनातनवरील मागील बंदीच्या प्रस्तावाविषयी काँग्रेसचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यामुळे या प्रस्तावावरून काँग्रेसवाल्यांमध्येच जुंपली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जम्मू आणि काश्मीर राज्याचे तीन भाग आणि काश्मीरचे दोन भाग करा ! - भाजप नेत्याची मागणी

रोगापेक्षा उपाय भयंकर ! धर्मांधांना भूमीचा एक तुकडा देऊन ते शांत बसणार का ? 
त्यांना जगावर खलिफाचे राज्य आणायचे आहे !
      जम्मू - जम्मू आणि काश्मीर राज्याचे जम्मू, काश्मीर आणि लडाख असे तीन भाग आणि काश्मीरचे राज्यातून विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंसाठी एक आणि उर्वरित एक असे दोन भाग करण्याची मागणी वरिष्ठ भाजप नेते प्राध्यापक हरि ओम यांनी केली आहे. या विभाजनामुळे काश्मीरमधील अशांत भाग नियंत्रित होईल, जम्मू, लद्दाख आणि काश्मिरी हिंदूंचे राजकीय आणि आर्थिक भविष्य उजळेल, तसेच त्यांच्यावर घटनेच्या कलम ३७० चा परिणाम होणार नाही, असे मत हरि ओम यांनी व्यक्त केले.

आग्रा येथे हिंदुत्ववाद्यांकडून हिंदु युवतीची लव्ह जिहादच्या विळख्यातून सुटका

हिंदूंनो, लव्ह जिहादपासून मुलींना वाचवण्यासाठी धर्मशिक्षण 
देऊन त्यांच्यात धर्माभिमान जागृत करा !
      आग्रा - येथील बी.टेक्.चे शिक्षण घेणार्‍या एका हिंदु युवतीला एका धर्मांध युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या युवकाने तिचे शील भ्रष्ट करण्यासाठी शहरातील एका हॉटेलवर तिला भेटण्यास बोलावले. धर्मांधाचा या षड्यंत्राची कुणकूण हिंदुत्ववाद्यांना लागली. त्यानंतर हिंदुत्ववादी आणि पोलीस यांनी या दोघांना कह्यात घेतले. (या धर्मांधाचा डाव हिंदु युवतीच्या लक्षात का नाही आला ? धर्मशिक्षण नसल्यामुळेच हिंदु युवतींची बुद्धी भ्रष्ट होते आणि त्या स्वैराचारी होतात ! - संपादक) युवतीच्या नातेवाइकांनी तक्रार न केल्यामुळे युवकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. 

शिक्षकांनी शिक्षणक्षेत्राकडे सेवेच्या दृष्टीकोनातून पहावे ! - संवित् श्री सोमगिरिजी महाराज

     झुंझुनू (राजस्थान) - शिक्षक आणि शिक्षणसंस्था यांनी शिक्षण क्षेत्राकडे नोकरी नाही, तर सेवेच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. या सेवावृत्तीमुळेच शिक्षकांची ज्ञानशक्ती आणि प्रतिष्ठा वाढेल, ज्याचा लाभ विद्यार्थ्यांनाही होईल, असे प्रतिपादन बिकानेर येथील संवित् श्री सोमगिरिजी महाराज यांनी येथील श्री चावो दादी विद्या कुंजच्या वतीने आयोजित गीता शिक्षणविषयक कार्यक्रमाला संबोधित करतांना केले. ते पुढे म्हणाले, प्राचीन काळी शिक्षण क्षेत्र कधीही राजसत्तेच्या नियंत्रणात नव्हते. मेकॉलेमुळे आमची गुरुकुल परंपरा बंद पडून शिक्षणक्षेत्र राजसत्तेच्या हातात गेले. या गुरुकुल परंपरेचे एवढे महत्त्व आहे की, भविष्यात परराष्ट्रातही याचा आरंभ झाल्यास आश्‍चर्य नाही. महाभारत हा धर्मग्रंथ घरात ठेवला, तर भांडणे होतात, असा अपप्रचार करून हिंदूंना त्यापासून लांब ठेवण्यात आले. त्यामुळे गीताही हिंदूंपासून लांब राहिली. गीता केवळ ग्रंथ नाही, तर माता आहे. त्यामुळे गीता समजून घ्या आणि कृतीत आणा, असेही महाराज म्हणाले.

साधू, संत आणि हिंदू यांनी धर्मयुद्धासाठी सज्ज रहावे !

आनंद आखाडा पंचायतीच्या वतीने संमेलनाचे आयोजन 
 धर्माचार्य शिवानी दुर्गा सिंह 
वाहिनी सरस्वती यांचे हिंदूंना आवाहन 
    त्र्यंबेकश्‍वर (जिल्हा नाशिक) - सद्य परिस्थितीत साधू, संत आणि भगवे वस्त्र धारण केलेल्या प्रत्येकाला धर्मासाठी लढण्याची वेळ आली आहे. श्‍लोक म्हणणार्‍यांचे कर्तव्य आहे की, त्याने धर्मयुद्धासाठी उभे राहिले पाहिजे. धर्माचे रक्षण करतांना आपण कुणाची हानी करणार नाही; मात्र जेथे शस्त्रांची आवश्यकता असेल, तेथे शस्त्र आणि जेथे शास्त्रांची आवश्यकता असेल, तेथे शास्त्रांचा वापर केला जाईल. जो हिंदु धर्माचे रक्षण करत नाही, त्याने एक तर स्वतःच्या शरीराचा त्याग करावा अथवा हिंदु धर्म रक्षणाकरिता स्वतःला झोकून घ्यावे. संत, समाज आणि गृहस्थ संघटित झाल्यानंतर ते धर्मयुद्ध करू शकतात. त्यानंतर विजय प्राप्त होऊन हिंदु धर्माची स्थापना होऊ शकते, असे सांगून साधू, संत आणि हिंदू यांनी धर्मयुद्धासाठी सज्ज रहावे, असे आवाहन येथील धर्माचार्य शिवानी दुर्गा सिंह वाहिनी सरस्वती यांनी काढले. 

मंगलमूर्तीचे आगमन

     
      पुणे, १७ सप्टेंबर (वार्ता.) - भक्तीभावाने भारलेल्या वातावरणात घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळांमध्येही आज श्री गणेशाचे आगमन झाले. मानाच्या ५ गणपतींचीही जल्लोषात निघालेल्या आगमन मिरवणुकीनंतर विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हिंदुत्ववाद्यांना आतंकवादी संबोधणे हा साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार !

साम वाहिनीवरील चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांचा घणाघात
डावीकडून संजय आवटे, कुमार सप्तर्षी, भाई जगताप,
श्री. सुनील घनवट, विलास रणसुबे, श्री. राम कदम
    मुंबई - साम वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे नाव हिंदुत्ववादी कि दहशतवादी ? असे आहे. त्यावर माझा तीव्र आक्षेप आहे. सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड यांना केवळ संशयित म्हणून पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांचा कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येमध्ये सहभाग आहे, असे म्हटलेले नाही. असे असतांनाही प्रसारमाध्यमांनी सनातनच्या विरोधात मोहीम उघडली आहे. एका संशयिताला अटक झाली; म्हणून सर्वच हिंदुत्ववादी संघटनांना आतंकवादी संबोधणे हा साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार आहे, अशी सणसणीत चपराक हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली. साम वाहिनीवर १६ सप्टेंबरला रात्री ८ वाजता आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात ते बोलत होते.

सनातन संस्थेला विरोध करणे अयोग्य ! - स्वामी विवेकानंद ब्रह्मचारी, हरिद्वार

     सनातन धर्म शाश्‍वत आणि चिरंतन आहे. त्या नावाने असणारी सनातन संस्था धर्मप्रसाराचे कार्य करत आहे. तिला चिरडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये; कारण तो निष्फळच ठरणार आहे. सनातन संस्थेला आमचे आशीर्वाद आहेत आणि सनातनवर कोणतेही अरिष्ट येऊ शकत नाही, अशी आमची धारणा आहे. त्यामुळे आम्ही सर्व हिंदुत्ववाद्यांना आवाहन करतो की, त्यांनी सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धर्मकर्तव्य बजावावे !

मी मराठी वृत्तवाहिनीवर वैद्य धुरी यांनी केली निधर्मीवादाची चिरफाड !

समीर गायकवाड यांच्या अटकेचे प्रकरण घृणास्पद ! - वैद्य उदय धुरी
डावीकडून प्रकाश रेड्डी, वैद्य उदय धुरी
आणि रवींद्र आंबेकर
    मुंबई - सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना पोलिसांनी आदल्या दिवशी रात्री अटक करून पहाटे ४.३० वाजता अटक दाखवले. त्यांना अधिवक्ता मिळू नये, यासाठी कुणाला भेटू न देताच न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांचे दोन मेहुणे बेपत्ता आहेत. त्याविषयी पोलीस साधी तक्रारही नोंदवून घेत नाहीत. हा सगळा घटनाक्रम घृणास्पद आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक वैद्य श्री. उदय धुरी यांनी ठामपणे मांडले. मी मराठी वृत्तवाहिनीवर १६ सप्टेंबरला रात्री ९ वाजता पॉईंट ब्लँक या कार्यक्रमातील आतातरी सनातनवर बंदी येईल का ? या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी अंनिसच्या कार्यकर्त्या वंदना शिंदे, भाकपचे प्रकाश रेड्डी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल लोंढे सहभागी झाले होते. सूत्रनिवेदन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांनी केले.

हिंदु म्हणून सनातनच्या पाठीशी उभे रहा ! - महाराणा प्रताप बटालियन

     पनवेल - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे; मात्र आमची पोलिसांना विनंती आहे की, त्यांनी सनातनसारख्या धर्मनिष्ठ संघटनेला त्रास देऊ नये. यापूर्वी साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांना अटक केल्यानंतर त्यांना आजवर कारागृहात खितपत ठेवले आहे. आजचे शासन हिंदूंच्या मतांवर निवडून आले आहे. शासनाने कुणाच्याही दबावाखाली कार्यवाही करू नये. सनातन संस्था ही हिंदु धर्माला वाचवण्यासाठी कार्य करणारी एकमेव प्रामाणिक संघटना आहे. समस्त हिंदूंनी सनातन संस्थेच्या पाठीशी रहावे, असे आवाहन 'महाराणा प्रताप बटालियन'चे अध्यक्ष श्री. अजयसिंग सेंगर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

नाशिक येथे सनातन संस्थेच्या प्रथमोपचार पथकाद्वारे भाविकांना साहाय्य !

 सिंहस्थपर्वात सनातनने उभारलेले प्रथमोपचार पथक 
    नाशिक, १७ सप्टेंबर (वार्ता.) - सिंहस्थपर्वानिमित्त येथे सनातन संस्थेच्या वतीने पंचवटीस्थित काळाराम मंदिराजवळ उपवन येथे भाविकांसाठी प्रथमोपचार पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. त्याचा अनेक भाविक लाभ घेत आहेत. देशभरातून लक्षावधी भाविक प्रतिदिन येथे येत आहेत. लांबच्या प्रवासामुळे त्यांच्यापैकी काहीजण आजारी पडत आहेत. अशांना प्राथमिक स्वरूपाचे साहाय्य या पथकाद्वारे करण्यात येत आहे. भाविकांवर विनामूल्य उपचार करण्यात येत असून अनेकांना औषधांची उपलब्धता करून दिली जात आहे. किरकोळरित्या घायाळ झालेल्या रुग्णांना मलमपट्टी करण्याची सेवाही येथे आनंदाने केली जात आहे. त्यामुळे भाविकांत सनातन संस्थेविषयी आपुलकी वाढत असून अनेकांनी सनातनच्या या उपक्रमाचे कौतुकही केले आहे. या पथकात संस्थेच्या आधुनिक वैद्या ज्योती दाभोळकर, नम्रता कुट्रे आणि रवींद्र धांडे आदींचा सहभाग आहे.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे बनावट रुद्राक्षांद्वारे भाविकांची घोर फसवणूक !

 • झाडाच्या सुकलेल्या फांदीला खोटे रुद्राक्ष चिकटवून चालू आहे विक्री !
 • प्लास्टिकच्या रुद्राक्षांवर नाग, शिवपिंड यांची चिन्हे मुद्रीत करून भाविकांची फसवणूक !
 • बनावट एकमुखी रुद्राक्ष विकला जात आहे ५०० रुपयांना !
 • १० रुपयांची वैजयंतीमाळ १०० रुपयांना !
-----------------------------------
खरा रुद्राक्ष माश्यासारखा चपट्या आकाराचा असतो. त्यावर नैसर्गिकरित्या ॐ आणि अन्य शुभचिन्हे असतात. त्याचे मूल्य ४ सहस्र रुपयांपासून ४० सहस्र रुपयांपर्यंत असते. खर्‍या रुद्राक्षांचे दर्शन दुर्लभ असते
-------------------------------
 
यंत्राद्वारे रुद्राक्षांवर शिवपिंड आणि नाग यांची चिन्हे कोरणे
 श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) - सिंहस्थपर्व आणि त्यात १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भगवान श्री त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविक त्र्यंबकेश्‍वर येथे गर्दी करत आहेत. भावपूर्ण दर्शन झाल्यावर भगवान श्री त्र्यंबकेश्‍वराचा प्रसाद म्हणून भाविक अत्यंत श्रद्धेने रुद्राक्ष खरेदी करत आहेत; मात्र भोळ्या भक्तांना फसवून त्यांना खोटे रुद्राक्ष विकण्याचा धक्कादायक प्रकार येथे चालू असल्याचे दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराच्या निदर्शनास आले आहे. 
१. रुद्राक्ष घेण्यासाठी दुकानांमध्ये गेल्यावर गळ्यात घालायची रुद्राक्षांची माळ १५० ते ३५० रुपयांपर्यंत विकली जात आहे. १५० रुपयांची माळ काही दुकानदार ३०० रुपयांना विकत आहेत. यातील बहुतांश रुद्राक्षांच्या माळा लाल आणि तपकिरी रंगाने रंगवलेल्या दिसत आहेत. काही रुद्राक्षांचा फिक्कट तपकीरी, तर काहींचा गडद लाल आणि गुलाबी लाल रंग दिसत आहे. त्यामुळे रुद्राक्षांच्या खरेपणाविषयी शंका येते.

(म्हणे) विषारी सनातन संस्थेने डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना संपवले !

निखिल वागळे यांचा ट्विटरवर सनातनद्वेषी जळफळाट ! 
     मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर हिंदुद्वेष्टे निखिल वागळे यांचा सनातद्वेष पुन्हा उफाळून आला. ते सध्या कोणत्याही प्रसारमाध्यमात कार्यरत नसल्याने त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देतांना सनातनद्वेषाचे टोक गाठले. अद्याप पोलिसांनीही सनातनवर आरोप केलेले नसतांना वागळे यांनी म्हटले आहे, "सनातन संस्था ही महाराष्ट्र आणि गोवा येथील सर्वांत विषारी हिंदुत्ववादी संघटना आहे. त्यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांना संपवले." (कुठल्या तरी प्रकरणात सनातन संस्थेला गोवण्यासाठी सनातनच्या साधकांना अटक झाली की, वागळे यांची ही प्रतिक्रिया ठरलेलीच असते; मात्र नंतर सदर चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही, हा आजवरचा इतिहास आहे. असे असूनही सनातनद्वेषाचा कंड शमवण्यासाठी अशा प्रकारची गरळओक करणार्‍यांच्या विरोधात सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! - संपादक) 

हिंदूंनो, काँग्रेसींचा सनातनद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता
      जिहादी संघटना सिमी आणि रझा अकादमी यांच्या बंदीची कधीही मागणी न करणारे काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेला आतंकवादी संबोधून तिच्यावर बंदी घालण्याची मागणी केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Congress ke neta Naseem Khan ne Sanatan Sanstha par pratibandh laganeki mang ki.
kya Naseem Khan SIMI ya Raza Akadami par pratibandh ki mang karenge ?
जागो ! 
काँग्रेस के नेता नसीम खान ने सनातन संस्था पर प्रतिबंध लगानेकी मांग की. 
क्या नसीम खान सिमी या रझा अकादमीपर प्रतिबंध की मांग करेंगे ?

...तर सनातनवर कठोर कारवाई ! - मुख्यमंत्री

      संभाजीनगर - सनातन संस्था दोषी आढळली, तर सनातन संस्थेवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे वृत्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे, तर अन्य काही वृत्तवाहिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे सांगितले.

हिंदु धर्म आणि हिंदू संघटित होण्यासाठी धर्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेची अपकिर्ती करू नका !

 • श्री सद्गुरु खडेश्‍वर महाराज यांचे मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला सडेतोड उत्तर
 • सनातनला संत आणि हिंदुत्ववादी यांचे भक्कम पाठबळ
      त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), १७ सप्टेंबर (वार्ता.) दोन दिवसांपूर्वी झी २४ तास या मराठी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराने श्री सद्गुरु खडेश्‍वर महाराज यांची मुलाखत घेतली. या वेळी त्या पत्रकाराने समाजात कोणत्या संस्था अध्यात्मप्रसाराचे चांगले कार्य करतात अथवा करत नाहीत ? असा प्रश्‍न विचारला. याला उत्तर देतांना श्री सद्गुरु खडेश्‍वर महाराज म्हणाले, समाजात अध्यात्म आणि धर्म यांच्या प्रसाराचे चांगले कार्य करणार्‍या संस्था आहेत. त्याविषयी मात्र प्रसिद्धीमाध्यमे चांगली वृत्ते प्रसारित करत नाहीत. याउलट त्या संस्थांना वृत्तवाहिन्या झोडपून काढतात. समाजात त्यांची अपकिर्ती करतात. धर्मप्रसाराचे कार्य न करणार्‍या संस्थांचा वृत्तवाहिन्यांवर उदोउदो केला जातो. असे म्हटल्यावर तो पत्रकार म्हणाला, महाराज असे का म्हणता, तुम्ही कोणत्या संस्थेविषयी असे बोलत आहात ? तेव्हा श्री सद्गुरु खडेश्‍वर महाराज म्हणाले, मी सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांविषयी बोलत आहे.

सनातन संस्था हिंदु धर्माचे काम करत असल्याने आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी ! - आनंद रजपूत, शिवसेना

      मिरज, १७ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्था हिंदु धर्माचे काम करते. त्यामुळे ते जे काही करतील ते योग्यच असेल. सनातनवर आमचा पूर्णपणे विश्‍वास आहे. आतापर्यंत सनातनवर अनेक वेळा आरोप झाले, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आम्ही सनातन संस्थेच्या पूर्णपणे पाठीशी आहोत. येणार्‍या काळात हिंदुद्वेष्ट्यांच्या दबावाला बळी पडून जर सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, तर मिरज शिवसेना वेळप्रसंगी सनातनच्या बाजूने रस्त्यावर उतरेल, असे मत शिवसेनेचे उत्सव समितीप्रमुख यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या समवेत सर्वश्री गजानन मोरे, प्रशांत मुत्तगडे, गिरीष जाधव आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

काँग्रेस आणि भाजप शासनामध्ये भेद नाही. अल्पसंख्यांकांना दिलेल्या पैशातून जिहादी पोसले जाणार नाहीत, तर देशभक्त पोसले जातील, याची खात्री भाजप शासन देणार का ?

'अल्पसंख्यांकांसाठी असलेली आर्थिक तरतूद दुप्पट करण्याचा निर्णय १०.२.२०१५ या दिवशी केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला. राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास आणि वित्त महामंडळासाठी पूर्वी १ सहस्र ५०० कोटी रुपयांची तरतूद होती. ही तरतूद वाढवून ती ३ सहस्र कोटी रुपये करण्यात आली आहे.'

'एक गाव एक गणपति' हवा !

     सध्या हिंदूंच्या उत्सवांमध्ये अनेक अपप्रकार वाढले आहेत. त्यामुळे हिंदूंच्या उत्सवांना नाहक टीकेला सामोरे जावे लागत आहे. हिंदूंचे सण नकोच, अशी टोकाची भूमिका समाजातून घेतली जाऊ लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवाच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या उत्सवातील अपप्रकारांमुळे उत्सव साजरे करण्यावर उच्च न्यायालयाने काही निर्बंध घातले. परिणामी समाजात बराच हलकल्लोळ माजला. आता गणेशोत्सवाच्या विषयीदेखील कुरबुरी चालू झाल्या आहेत; कारण गणेशोत्सवातही अनेक अपप्रकार होत असतात. त्यामुळे हा उत्सवही नकोसा वाटू लागला आहे. याही उत्सवाच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने गणेशोत्सव साजरा करण्यावरही काही निर्बंध लादले आहेत. त्याचे परिणाम म्हणून मुंबईतील 
१ सहस्र ९११ गणेशोत्सव मंडळांपैकी ४४८ मंडळांना मंडपासाठी अनुमती मिळाली असून ३७६ मंडळांना अनुमती नाकारण्यात आली आहे. या मंडळांनी उच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करत मंडपांची उभारणी केली असल्याने त्यांना अनुमती द्यावी, अशी विनंती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने राज्यशासनाला करण्यात आली आहे; मात्र या विनंतीवरून अनुमती न मिळाल्यास ही मंडळे गणेशोत्सव साजरा करणारच आहेत. या उत्सवानंतर पोलिसांकडून होणार्या् कारवाईविषयीही विचार केला जाईल, असा पवित्राही या समितीने घेतला आहे.

ऋषीपंचमी

१. ऋषी 
कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी.  
२. उद्देश 
अ. 'ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे, त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते.' - प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
आ. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने, तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो. (पुरुषांवर होणारा परिणाम क्षौरादी प्रायश्चित्त कर्माने आणि वास्तूवर होणारा परिणाम उदकशांतीने कमी होतो.)

वाराणसी जिल्ह्यातील धर्माभिमान्यांचा धर्मप्रसार कार्यातील अनुकरणीय सहभाग !

१. धर्मकार्यात पुढाकार घेऊन सेवा करणारे, तसेच अडचण येऊनही आंदोलनासाठी वेळ देणारे वाराणसी येथील श्री. महेश प्रसाद ! : 'नाटी इमली वाराणसी येथील श्री. महेश प्रसाद यांनी पुढाकार घेऊन आपल्या भागात एक पाक्षिक धर्मशिक्षणवर्ग चालू केला. या वर्गातील उपस्थितीत वाढ होत आहे. श्री. प्रसाद यांनी वाराणसी येथील गुुरुपौर्णिमा कार्यक्रमाचा प्रसारही केला. १४.७.२०१५ या दिवशी वाराणसी येथे आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या दिवशी त्यांच्या नातेवाइकांचे निधन झाल्याने त्यांना तेथे जायचे होते, तरीही त्यांनी वेळ काढून आंदोलनाचा प्रसार केला आणि आंदोलनात येऊन विषयही मांडला. 

भारतविरोधी आय.एस्.आय. !

१. आय.एस्.आय.चे भारतविरोधी कार्य वाढणे : बाहेरील गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी, तिचे विश्‍लेषण करण्यासाठी आणि तिचा वापर करण्यासाठी वर्ष १९४८ मध्ये इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सची (आय.एस्.आय.) स्थापना झाली. काळानुरूप ही संघटना फोफावत गेली. राजकारणात हस्तक्षेप करणे, पाकमधील लोकशाही शासन अस्थिर करण्याचा प्रयत्न करणे, शासनाच्या विरोधात मोर्चेबांधणी करणे, विरोधकांवर पाळत ठेवणे आणि त्यांना भ्रष्टाचाराच्या मोहात पाडणे, असे आरोप तिच्यावर होऊ लागले.
२. मुस्लिम अतिरेकी कारवाया चालू करणे : लष्करी हुकूमशहा जनरल झिया उल् हक (१९७७ ते १९८८) यांच्या काळात त्यांनी जेव्हा तथाकथित अफगाण जिहादमध्ये वर्ष १९८० च्या दशकात महत्त्वाची भूमिका निभावली, तेव्हा या संघटनेने तिचे रंग पालटले आणि अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेच्या (सी.आय.ए.च्या) साहाय्याने अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाच्या विरोधात मुस्लिम अतिरेकी कारवाया चालू केल्या.

भारतियांना आयुर्वेद शिकण्यासाठी चीनमध्ये जावे लागते, यापेक्षा लज्जास्पद काय असेल ? सर्वपक्षीय राज्यकर्त्यांमुळे भारताची अशी स्थिती झाली आहे. खरेतर विदेशातील व्यक्तींना आयुर्वेद शिकण्यासाठी भारतात यायला हवे !

       बेंगळुरू (कर्नाटक) येथील एक २२ वर्षीय विद्यार्थिनी चीनमध्ये राहून आयुर्वेदाचा अभ्यास करत आहेत.

शासनाची कार्यक्षमता ! एका कुंभमेळ्याचे आयोजन करता न येणारे शासन !

      नाशिक येथील सिंहस्थ कुंभपर्वात १३ सप्टेंबर २०१५ या दिवशी दुसर्‍या राजयोगी स्नानाच्या वेळी आंबेडकर चौक येथे भाविकांसाठी स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली होती; मात्र पहाटे त्या ठिकाणी पाणीच उपलब्ध नसल्याची तक्रार भाविकांनी केली. शहरात गर्दी असल्याने पाण्याचे टँकर त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत, असे भाविकांना सांगण्यात येत होते.

हिंदूंनी धर्म सोडला; म्हणून ते रसातळाला गेले आहेत. असे असतांना गोव्यातील तथाकथित हिंदुत्ववादी भाजप शासन गोव्याला धर्मनिरपेक्ष बनवू इच्छिते ! खरे वैभव म्हणजे भ्रष्टाचार, बलात्कार नसणारे राज्य, हेही भाजपला ज्ञात नाही का ?

      गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोव्याच्या भाजप शासनाने वृत्तपत्रांना दिलेल्या विज्ञापनाच्या शेवटी गोव्याला धर्मनिरपेक्ष आणि वैभवशाली करण्याच्या दिशेने वाटचाल, अशी ओळ लिहिली आहे.

गणेशोत्सव मोहिमेत अधिकाधिक संख्येत सहभागी होऊन श्रीगणेशाची कृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक, तसेच राष्ट्रप्रेमी हिंदु यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !
      सध्या गणेशोत्सव चालू आहे. गणेशोत्सवातील अपप्रकार दूर करून आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आदर्श मिरवणूक कशी काढावी ? मूर्तीदान अथवा कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन न करता वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याच्या संदर्भात प्रबोधनात्मक मोहीम चालू आहे. या अंतर्गत विविध गणेशोत्सव मंडळांना संपर्क करणे, राष्ट्र-धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील प्रवचनाचे नियोजन करणे, गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श ही ध्वनीचित्र-चकती दाखवणे, प्रसिद्धीसाठी अन्य वृत्तपत्रांत गणपतिविषयक लेखमाला देणे, क्रांतीकारकांचे, तसेच धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शन आयोजित करणे असे धर्मरक्षणाचे प्रयत्न केले जात आहेत.

भाविकांनो, गंगा-गोदावरीचे पावित्र्य जपून 'आपण लाखोंच्या समुदायातही आचारसंहिता पाळतो', हे जगाला दाखवा ! - योगतज्ञ दादाजी वैशंपायन

१. पर्वकाळाचा मुख्य उद्देश गंगा-गोदावरी स्नान करून 
'देवसमूहाने आपल्यावर केलेल्या उपकारांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे', हा असणे 
'पुरातन वैदिक संस्कृतीमध्ये महत्त्वाचे पर्वकाळ सांगितले आहेत. त्यातीलच एक म्हणजे जुलै २०१५ पासून पुढील १३ मासांसाठी (महिन्यासाठी) येणारा 'सिंहस्थ' हा पर्वकाळ ! या सर्व पर्वकाळाचा मुख्य उद्देश गंगा-गोदावरीत स्नान करून 'देवसमूहाने आपल्यावर केलेल्या उपकारांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे', हा आहे; पण हा हेतू साध्य होतो का ? 
२. कुंभकाळात लाखोंचा समुदाय नदीच्या काठी स्नानासाठी 
गेल्यावर स्वच्छता राखणे दुरापास्त होणे 
'ठराविक एकाच दिवशी लाखोंचा जनसमुदाय जेव्हा गंगा-गोदावरीच्या स्नानासाठी उतरतो, तेव्हा जल प्रदूषित होत नाही का ?', याचा विचार आपण केव्हा करणार ? या नद्यांच्या काठी जेव्हा लाखोंचा समुदाय जातो, तेव्हा स्वच्छता राखणे दुरापास्त होते. तेथे शासन यंत्रणा सज्ज असते. स्नानगृहे आणि शौचालये तात्पुरती बांधली जातात; पण स्वच्छता राखली जात नाही, मग हे दायित्व कोणाचे ? 

सनातनच्या साधकाला अटक होण्यापूर्वी ३-४ दिवस प.पू. डॉक्टरांची प्रकृती पुष्कळ खालावणे

१. प.पू. डॉक्टरांची प्रकृती खालावणे
     १३ आणि १४.९.२०१५ या दोन दिवशी प.पू. डॉक्टरांना त्यांच्या खोलीतून बाहेर अभ्यासिकेत धारिका वाचायला येतांना पुष्कळ त्रास होत होता. त्यांचा थकवा वाढला होता. आसंदीतून ऊठ-बस करायलाही त्यांना अवघड जात होते. चालतांना त्यांचा सारखा तोल जात होता. प.पू. डॉक्टर १५.९.२०१५ या दिवशी थकव्यामुळे सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत, म्हणजे २.३० घंटे झोपले.
२. सनातनच्या साधकाला पोलिसांनी अटक केल्यानंतर प.पू. डॉक्टरांची 
प्रकृती खालावण्याचा उलगडा होणे
      प.पू. डॉक्टरांची ही स्थिती पाहून काहीतरी संकट येईल, असे वाटत होते. १६.९.२०१५ या दिवशी दुपारी पोलिसांनी सनातनच्या एका साधकाला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक केली. प.पू. डॉक्टरांची प्रकृती बिघडणे, हे या घटनेची नांदी ठरली. 

बगदादीच्या आयएस्आयएस्चे मानवजातीने आभारच मानायला हवेत !

  आयएस्आयएस्च्या जिहादींना इस्लामेतर युवतींवर बलात्कार करण्याचा पवित्र कुराणमध्ये अधिकार दिला आहे आणि ते जिहादी कर्तव्य असल्याचे म्हटले आहे, त्याचे कुणीही अगदी सौदी अरेबियाच्या इस्लामी विद्वानांनीही खंडण केलेले नाही. आपल्या भारतातही काय झाले ? गेल्या १३ शतकांत ३ इस्लामी देश निर्माण झाले. हिंदु स्त्रिया-मुली यांना बलपूर्वक (सक्ती) 'निकाह' करण्यास भाग पाडल्यानेच या देशांची निर्मिती झाल्याचे इस्लामी इतिहासातच नोंदवलेले आहे. २० व्या शतकात वर्ष १९४७, १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानने आज आयएस्आयएस् जे करत आहे, तेच केले, नाही का ? आजही पाक-बांगलादेश (हिंदूंच्या जिवावर स्वतंत्र होऊन) हिंदु स्त्रिया-मुलींचा कसा छळ करत आहेत. काँग्रेस, साम्यवादी, समाजवादी, संघ-भाजप नेते यावर सत्ता मिळाल्यानंतरही ते थंड (गप्प) आहेत. 

भाजप आणि संत

हिंदु समाजाला साधू-संतांचे महत्त्व कळण्यासाठी हे विशेष सदर !
१. हिंदूंच्या धार्मिक हक्कांसाठी संतांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे मध्यप्रदेशातील हिंदुद्रोही भाजप शासन !
अ. वसंतपंचमी म्हणजे १५.२.२०१३ या दिवशी मध्यप्रदेशातील भोजशाळेत पूर्ण दिवस हिंदूंना श्री सरस्वतीदेवीचे पूजन करता यावे, याकरता श्रीकाशीसुमेरू पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी स्वतः मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मार्गस्थ होऊन तीव्र आंदोलन केले होते.
आ. आता भाजप शासनाने कारागृहात बंदिस्त ठेवलेल्या श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची मुक्तता करून तिची भोजशाळेत प्राणप्रतिष्ठापना करण्याकरता पुन्हा एकदा धार येथे जाऊन आरपारची लढाई करणार, अशी चेतावणी शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी दिली आहे.
इ. भोजशाळेतील श्री सरस्वती मंदिरात पूजा करण्यास जाणार्‍या हिंदूंवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, याचा जुना आखाड्याचे जगद्गुरु स्वामी पंचाननगिरी महाराज यांनी तीव्र निषेध केला असून या विरोधात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) च्या प्रसारकार्यातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. मासभरात संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 
२. संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारा ऑनलाईन प्रसार
२ अ. जुलै २०१५ मध्ये फेसबूकद्वारे झालेला प्रसार
२ अ १. जिज्ञासूंनी केला नामजपाला आरंभ ! : एस्.एस्.आर्.एफ्. फेसबूकच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या २३ जिज्ञासूंनी नामजपाला आरंभ केला आहे.
 
२ अ २. अनेकांना फेसबूक पान आवडले ! : एस्.एस्.आर्.एफ्. भारत फेसबूकवरील पोस्ट लोकांपर्यंत पोेचल्याची संख्या (पोस्ट रीच) १६ सहस्र ४९७ असून ३ सहस्र ८२७ जणांनी फेसबूक पान आवडल्याचा अभिप्राय (लाईक्स्) दिला आहे. ५ जिज्ञासूंनी नामजपाला आरंभ केला आहे.

दैनिक सनातन प्रभात मधील स्काईप सत्संगाविषयी प.पू. डॉक्टरांचे मार्गदर्शन वाचून डॉ. संजय प्रभाकर सामंत यांना सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्याने त्यांच्या मनातील विकल्प दूर होऊन स्काईप सत्संगाचा आनंद घेता येणे

डॉ. संजय सामंत
श्री. चित्तरंजन सुराल यांच्या मनात असलेल्या स्काईप सत्संगाविषयीच्या विकल्पांसंदर्भात प.पू. डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन २९.७.२०१५ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून आले होते. माझ्यासारख्या बुद्धीचे तीव्र अडथळे असणार्‍या जिवाला हे सर्व प्रश्‍न पुष्कळ प्रमाणात सतावत असल्यामुळे स्काईप सत्संगात बसण्यास निरूत्साह वाटत असे. जरी बसलो, तरी ते एक कर्मकांड म्हणूनच होत असे आणि कधी कधी तर झोपही येत असे. माझ्या मनात असलेले सर्व प्रश्‍न श्री. सुराल यांच्या मुखातून प.पू. डॉक्टरांनी वदवून घेऊन त्यांची उत्तरे दिली असल्याची मला अनुभूती आली. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचे मला समजलेले भावार्थ येथे देत आहे.
१. स्वतःतील साधकत्वाच्या गुणांची कसोटी लागणे
    स्काईप सत्संगात आपली चूक सांगून सहभागी झाल्याने आपल्यात साधकत्वाचे कोणते गुण वाढीस लागले किंवा कोणते गुण अल्प आहेत, याची कसोटी लागते.
२. आध्यात्मिक पातळीवर विचार केल्यास निरूत्साह वाटण्याऐवजी कृतज्ञताच वाटेल !
    सतत मानसिक स्तरापेक्षा आध्यात्मिक स्तरावर विचार करावा, म्हणजे ज्या वेळी चूक सांगण्यात येते, त्या वेळी केवळ माझीच चूक सांगितली किंवा ती चुकीच्या पद्धतीने सांगितली, असे विचार करून निरूत्साही होऊ नये. माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी मी प्रत्येक कृती आणि विचार यांकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून कसे पहायला हवे, हे सत्संगाला उपस्थित असलेल्या संतांच्या माध्यमातून शिकण्याची संधी परमदयाळू अशा प.पू. डॉक्टरांनी उपलब्ध करून दिली आहे, असा विचार केल्याने निरूत्साह वाटण्याऐवजी कृतज्ञताच वाटेल.

सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाणारी आणि आवडीने धर्माचरण करणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उडुपी, कर्नाटक येथील कु. नमना शशिधर पै (४ वर्षे ७ मास) !

कु. नमना शशिधर पै
२०१५ च्या गुरुपौणिमेला उडुपी, कर्नाटक येथील कु. नमना शशिधर पै (४ वर्षे ७ मास) हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के असल्याचे आणि ती उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आल्याचे घोषित करण्यात आले. तिच्या आजीला जाणवलेली नमनाची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. ४ मास ते १ वर्ष - श्रीकृष्णाची ओढ !
१ अ. कृष्णार्जुनाच्या चित्राच्या ओढीने रडे थांबून हसत हसत पुढे सरकू लागणे : कु. नमना पालथी पडणे, पुढे सरकणे, बसणे यांचा प्रयत्न करत असतांना मोठ्याने रडायची. एकदा तिच्या वडिलांनी कृष्णार्जुनाचे चित्र तिच्यापुढे थोडेसे दूर भिंतीला टेकवून ठेवले. ते पाहून ती हसली. ती वेगाने पुढे जाऊन कृष्णाच्या चित्राला हात लावू लागली. ॐ ॐ, असे म्हणत ती तेथून हललीच नाही आणि पुनःपुन्हा चित्राला हात लावून उभे रहाण्याचा प्रयत्न करू लागली.
ती एक वर्ष होण्यापूर्वीच उभी राहून पटल, आसंदी, टिपॉय इत्यादींना धरून चालायला शिकली. ती चालू लागल्यावर पुष्कळ नाचत असे.
१ आ. रामनाथी आश्रमात श्रीकृष्णाच्या चित्रापुढे उभी राहून बोलणे : एकदा रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. आश्रम पाहून झाल्यानंतर नमना तेथील श्रीकृष्णाच्या चित्रापुढे उभी राहून श्रीकृष्णाशी बोलू लागली. ते पाहून आम्ही सर्व जण आश्‍चर्यचकीत झालो. तिला कृष्णाशी बोलतांना इतका आनंद होत होता की, ती चित्र सोडून जाण्यास सिद्ध नव्हती. तिला तेथून घेऊन जाताच ती मोठ्याने रडू लागली.

शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ असलेले अन् स्वावलंबनाचा पुरस्कार करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेलेे श्री. राजाभाऊ सप्तर्षिकाका (वय ८१ वर्षे) !

श्री. राजाभाऊ सप्तर्षि
सप्तर्षिकाका आणि काकू दोघेही अत्यंत नम्र आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत. दोघांनीही ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठला असावा आणि गुरुपौर्णिमेला ते घोषित होईल, असे मला जाणवत होते. २१.८.२०१५ या दिवशी दोघांचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के झाल्याचे घोषित झाले.
श्री. सप्तर्षिकाका आश्रमात आल्यापासून प्रतिदिन माझी त्यांच्याशी भेट होते. अधूनमधून बोलणेही होत असते. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.
१. शासकीय नोकरीतील विषयांचे अचूक आणि योग्य मांडणीत टंकलेखन करत असल्याविषयी सप्तर्षिकाकांच्या वरिष्ठांनी गौरवोद्गार काढणे : सप्तर्षिकाका शासकीय नोकरी करत होते. तेव्हा त्यांच्या खात्याशी संबंधित विषयांचे टंकलेखन करून पाठवायचे. तेव्हा त्यांच्या वरिष्ठांनी काकांविषयी माझ्या नोकरीच्या संपूर्ण काळात पूर्ण खात्यामध्ये असे अचूक आणि योग्य मांडणीमध्ये टंकलेखन करणारे दुसरे कोणी मी आतापर्यंत बघितले नाही, असे गौरवोद्गार काढले होते. त्यांचा टंकलेखनाचा वेग ५० - ६० शब्द प्रति मिनीट असा असायचा आणि ते परिपूर्ण सेवा करायचे.
२. नियमितपणा : काका नियमितपणे सकाळ-सायंकाळ ध्यानमंदिरात होणार्‍या आरतीला उपस्थित असतात. आरतीनंतर गुडघे टेकून देवाला नमस्कार करतात.
३. स्वावलंबनाचे पुरस्कर्ते : त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहू नये, असे वाटते. भोजनानंतर साधक त्यांना म्हणतात, काका, तुमचे ताट द्या. धुवून ठेवतो. यावर ते म्हणतात, स्वतःची सर्व कामे स्वतःच करायला पाहिजेत. नाहीतर माणूस पांगळा होतो.
श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्‍वेता क्लार्क
पत्नीला साधनेत साहाय्य करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. शॉन क्लार्क यांनी वस्तूनिष्ठपणे वर्णिलेली ६१ टक्के पातळी गाठलेल्या सौ. श्‍वेता यांच्या आध्यात्मिक प्रवासाची वाटचाल !
वर्ष १९९८ मध्ये सौ. श्‍वेता शॉन क्लार्क (पूर्वाश्रमीच्या कु. श्‍वेता चौबे) यांनी साधनेला आरंभ केला. प्रथमपासूनच त्यांना पूर्णवेळ साधना करण्याचीच ओढ होती. साधनेतील पहिल्या काही वर्षांत साधनेची तत्त्वेे आणि विविध पैलू यांविषयी त्यांना पू. राजेंद्रदादा यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. (त्या वेळी पू. राजेंद्रदादा उत्तर भारतात प्रसारसेवा करत होते.)
साधनेची शिकवण आचरणात आणतांना त्यांचा झालेला संघर्ष, साधनेमुळे होत गेलेले सर्व स्तरांवरील पालट आणि सेवेच्या निमित्ताने प.पू. डॉक्टरांनी निर्माण केलेले व्यापकत्व आदींविषयी त्यांचे पती श्री. शॉन यांनी वस्तूनिष्ठपणे केलेले विवेचन पुढे देत आहोत. त्याद्वारे त्यांनी सौ. श्‍वेता यांच्या आध्यात्मिक प्रवासाची वाटचाल सुरेखपणे उलगडली आहे.
सौ. श्‍वेता यांच्यातील प.पू. डॉक्टरांप्रती असलेला अपार भाव, सेवेची आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ यांमुळे नुकताच त्यांनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी गाठण्याचा टप्पा पार केला आहे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात सौ. श्‍वेता क्लार्क यांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या संदर्भात साधिकांना मिळालेल्या पूर्वसूचना आणि सत्काराच्या प्रसंगी आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने देश-विदेशांतील साधकांसाठी कार्यशाळा झाली. कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. श्‍वेता क्लार्क यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांनी पातळी गाठण्याच्या संदर्भात एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिकांना मिळालेल्या पूर्वसूचना आणि सत्काराच्या प्रसंगी आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. पूर्वसूचना
अ. चित्रीकरण कक्षात प्रवेश करताक्षणीच सौ. श्‍वेता क्लार्क यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात येईल, असा विचार माझ्या मनात आला. - सौ. अनन्या सेठी, देहली, भारत
आ. काही मासांपूर्वी प.पू. डॉक्टर श्‍वेताला प्रसारासाठी बाहेर पाठवणार असल्याचे कळल्यावर आम्ही जेव्हा कार्यशाळेसाठी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात येऊ, तेव्हा तिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता ऐकायला मिळेल, असा विचार श्रीकृष्णाने दिला होता. कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असावी, असा विचार श्रीकृष्णाने दिला. - अनिंंदिता बासु, भारत

गुरुधन आणि पावतीपुस्तके यांच्या संदर्भात साधकांमधील अक्षम्य निष्काळजीपणा दर्शवणार्‍या चुका

१. अर्पणपेटी असणारी पिशवी अपरिचित ठिकाणी विसरणे, १ घंट्याने त्या चुकीची जाणीव होणे
जळगाव येथील सौ. निलीमा वाघुळदे अन्य साधकांसमवेत गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसाराला गेल्या होता. प्रसारादरम्यान स्वयंसूचना सत्र करण्यासाठी एका अपरिचित ठिकाणी थांबल्यावर सौ. वाघुळदे हितचिंतकांनी दिलेल्या अर्पणपेटीची पिशवी तेथेच विसरल्या. १ घंट्याने त्यांना स्वतःची चूक लक्षात आली असता त्यांनी पिशवीची शोधाशोध केली. तेव्हा सत्र करण्यासाठी थांबलेल्या ठिकाणी ती पिशवी सुस्थितीत मिळाली.
अशा चुकांमुळे गुरुधन कुणाच्या तरी हातात पडून त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
२. फळविक्रेत्याच्या गाडीवर हिंदु जनजागृती समितीचे पुस्तक विसरणे
जळगाव येथील सौ. सुगुणा पाटील धर्मप्रसाराच्या सेवेसाठी गेल्या असता हिंदु जनजागृती समितीचे कूपनपुस्तक (पावतीपुस्तक) फळ विक्रेत्याच्या गाडीवरच विसरल्या. साधारण २ घंटे ते कूपनपुस्तक तेथेच होते. त्यामुळे ते शोधण्यासाठी सौ. पाटील यांचा वेळ वाया गेला. नंतर काही वेळाने विक्रेत्याने सौ. पाटील यांना बोलवून ते घेऊन जाण्यास सांगितले. अशा प्रसंगात संबंधित व्यक्ती त्या कूपनपुस्तकाचा अयोग्य वापरही करू शकते, तसेच त्यामुळे पोलिसांकडे तक्रारअर्ज देण्यासाठी अनावश्यक वेळही द्यावा लागतो.

कोणत्याही जिज्ञासूने पूर्वी प्रकाशित केलेल्या सनातनच्या ग्रंथांची मागणी केल्यास त्या विषयाचे नव्याने विभाजित केलेले ग्रंथ त्यांना तत्परतेने उपलब्ध करून द्या !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना 
१. पृष्ठसंख्या अधिक असलेल्या ग्रंथांचे विभाजन करून त्यांच्या नावात पालट करण्यात येणे 
      वर्ष १९९५ पासून आतापर्यंत सनातन संस्थेने धर्म, साधना, राष्ट्ररक्षण, आयुर्वेद आदी विषयांवरील २६७ ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या १४ भाषांमध्ये एकूण ६० लाख ४३ सहस्र प्रती प्रकाशित केल्या आहेत. यांतील अनेक ग्रंथांत त्या विषयाशी संबंधित नवीन माहिती, अध्यात्मशास्त्रीय ज्ञान आदींची भर पडल्याने त्या ग्रंथांची पृष्ठसंख्या बरीच वाढली आहे. यामुळे अशा ग्रंथांचे विषयांनुसार विभाजन करून त्यांंच्या नावांत पालट करण्यात आला आहे. ग्रंथांचे विभाजन केल्यामुळे ग्रंथ सुटसुटीत होऊन सर्वसामान्य वाचकाला ते आर्थिकदृष्ट्याही परवडणार आहेत, तसेच असे ग्रंथ इतरांना भेट देणे किंवा त्यांचे प्रायोजक बनवणेही सोयीचे होणार आहे. 

बोधचित्र


अमृत आणि विष

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अमृतको जहरका डर होता है ।
भावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा जहर म्हणजे विष घेतले, तर आपण मरू कि काय, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाला साधना 
करण्याचे वळण लावा  
'ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।', म्हणजे 'मी यथोचित असेच सांगत आहे; सत्य तेच सांगत आहे.' 
स्पष्टीकरण : सत्य पालटू शकते, उदा. 'देवदत्त तरुण आहे', हे वाक्य आता सत्य असले, तरी देवदत्त वृद्ध झाल्यावर हे वाक्य असत्य ठरते; परंतु ऋत कधीही पालटत नाही,
उदा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. ऋत म्हणजे न पालटणारे नैसर्गिक सत्य. म्हणजे सत्य आणि नित्य जे असेल, त्याची उपासना करण्याचे वळण मनाला लावावे, म्हणजे साधकांची उन्नती वेगाने होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

भारतात न्याय नव्हे, तर केवळ अन्याय आहे !
परात्पर गुरु डॉ. आठवले
      ९१ टक्के गुन्ह्यांतील आरोपी निर्दोष सुटण्याच्या संदर्भात समाज अन् प्रसिद्धीमाध्यमे यांनी आवाज उठवणे आणि पोलिसांनी निर्दोष व्यक्तींवर केलेल्या अत्याचारासंदर्भात क्षमा मागणे आवश्यक ! : महाराष्ट्र राज्यात ९१ टक्के गुन्ह्यांतील आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे न्यायालयात निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत तब्बल ९१ टक्के निर्दोष लोकांना पोलिसांच्या अत्याचारांना आणि समाज अन् प्रसिद्धीमाध्यमे यांनी तुच्छ लेखण्याला सामोरे जावे लागते. इतक्या मोठ्या प्रमाणात आरोपी निर्दोष सुटण्याला पोलिसांकडे आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसणे, पोलिसांनी चुकीच्या व्यक्तींना आरोपी करणे आदी गोष्टी कारणीभूत आहेत. खरेतर यासंदर्भात समाज अन् प्रसिद्धीमाध्यमे यांनी उत्तरदायी पोलिसांविरूद्ध आवाज उठवला पाहिजे. हिंदु राष्ट्रात अन्याय करणारे पोलीस, न्यायाधीश इत्यादी सर्वांना आयुष्यभर खडतर साधना करण्याची शिक्षा करण्यात येईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.९.२०१५)

तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर !

तिसरे महायुद्ध अटळ आहे, असे संत-महंत सांगत आहेत. राजनीतीज्ञांचे विचार पाहिले, तर त्यांतूनही महायुद्धाची चाहूल लागते. या महायुद्धाची भयावहता वर्णन करतांना असे सांगितले जाते की, या युद्धाच्या तुलनेत पहिली दोन महायुद्धे खेळण्यातील युद्धाप्रमाणे भासतील ! भारत-चीन सीमेवर चीनच्या सैन्याने उभारलेला अवैध टेहळणी मनोरा नुकताच भारतीय सैनिकांनी उद्ध्वस्त केला. काही दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी आतंकवाद्यांची मोठी टोळी नष्ट केली होती. एकूणच भारतीय सैन्य आता त्यांच्या लौकिकाला शोभेल, असे कार्य निभावत आहे, असे भारतियांना वाटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या फाळणीपासूनच भारतीय सैन्याच्या कामगिरीवर दृष्टीक्षेप टाकणे सयुक्तिक ठरते.

सनातनबंदीचे कारस्थान !

विशेष संपादकीय
     कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेच्या एका साधकाला पोलिसांनी संशयित म्हणून अटक केल्यानंतर सनातनवर बंदी घाला !, सनातन संस्थेला आतंकवादी घोषित करा ! या मागण्यांची सरबत्ती चालू झाली आहे. अर्थात् हे निरर्थक आरोप वर्ष २००८ पासून होत आहेत. आम्ही केवळ भगवान श्रीकृष्णाची कृपा, संतांचे आशीर्वाद आणि हिंदुत्ववाद्यांचे पाठबळ यांमुळे या आरोपांचा खंबीरपणे सामना करू शकलो, याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत ! 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn