Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

श्रीपाद श्रीवल्लभ जयंती

सांगली येथील सनातनचा साधक समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक !

 • कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
 • सनातनद्वेष्ट्यांच्या दबावामुळे सनातनच्या निष्पाप कार्यकर्त्यांवर कारवाई करणारे पोलीस खर्‍या मारेकर्‍यांपर्यंत कधीतरी पोहोचू शकतील का ?
 • ६ महिने पाळत ठेवून तांत्रिक माहितीवरून अटक गायकवाड यांच्या सांगलीतील घरावर धाड ७ दिवसांची पोलीस कोठडी 
       कोल्हापूर, १६ सप्टेंबर - सांगली येथील १०० फुटी रस्त्यावर रहाणारे सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून कोल्हापूर येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पहाटे ४.३० वाजता अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती; मात्र न्यायालयाने त्यांना ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

निष्पाप समीर गायकवाड यांना गोवण्यासाठी पोलिसांनी रचलेला हा बनाव ! - सनातन संस्था

         कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला समीर गायकवाड हा सनातनचा पूर्णवेळ साधक असून तो निष्पाप अन् निर्दोष आहे, याची आम्हाला खात्री आहे. सनातनद्वेष्ट्यांच्या दबावाखाली पोलिसांनी लाखो कॉल रेकॉर्ड्सवरून सनातनच्या साधकाचाच क्रमांक शोधून त्याला हेतूपूर्वक अटक केली आहे. यापूर्वीही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या अनेक साधकांची चौकशी झाली होती. सनातनला यापूर्वीही अनेक वेळा झोडपण्यात आले आहे; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. समीर गायकवाड यांना संशयावरून अटक करण्यात आली आहे. पोलीसही त्यांना संशयित असल्याचे म्हणत आहेत. लवकरच यामागील सत्य उघडकीस येईल. सनातन ही आध्यात्मिक संस्था असल्याने ती प्रत्यक्ष कायदेशीर साहाय्य करू शकत नाही. समीर गायकवाड हे निष्पाप असल्याने त्यांना हिंदु विधीज्ञ परिषद किंवा अन्य हितचिंतक अधिवक्ता यांच्यामार्फत कायदेशीर साहाय्य पुरवण्यात येईल.

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राजभवनाचा केला सात्त्विक कायापालट !

 • राजभवनात सकाळ-संध्याकाळ होते होम-हवन !
 • सर्वपक्षीय भारतीय राज्यकर्ते यातून बोध घेऊन संसद, विधानसभा यांचा असा कायापालट करतील का ?
आचार्य देवव्रत
      शिमला - कधीकाळी विजेच्या रोषणाईने सतत उजळणार्‍या हिमाचल प्रदेशच्या राजभवनाने त्याचे पूर्वीचे रूप पालटून नवीन रूप धारण केले आहे. शंखनाद, घंटेचा मधुर ध्वनी, संस्कृत श्‍लोकांचे उच्चारण आणि प्रतिदिन होणारे होमहवन यांमुळे राजभवनाचे वातावण सात्त्विक आणि चैतन्यमय बनले आहे. केवळ एका मासाच्या काळात हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राजभवनाचा हा सात्त्विक कायापालट करून संपूर्ण राज्यात एक चांगला संदेश पोहोचवला आहे. राजभवनाच्या अंगणात आता दोन गायींची जोडी विचरण करते आणि आचार्यांचा प्रथम गोेग्रास त्यांना मिळतो. आजच्या काळात राजभवनातील असे वातावरण आश्‍चर्यकारक वाटत असले, तरी ते सत्य आहे. राज्यपाल देवव्रत म्हणतात, संस्कृतमध्येच संस्कृती लपलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील ब्रिटिशांच्या खाणाखुणा हटवा ! - कायदेेतज्ञांची मागणी

देशातून इंग्रजांची सत्ता जाऊन ६८ वर्षे होेऊन गेली असतांना त्यांच्या खाणाखुणा जपणारी 
न्यायव्यवस्था ! गुलामगिरीच्या वातावरणात राष्ट्राविषयी स्वाभिमान जागृत राहील का ?
      मुंबई - ज्या ब्रिटीश न्यायाधिशांनी लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक देशभक्तांवर अन्याय केला, त्यांच्या प्रतिमा आणि पुतळे आजही मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात दिमाखात उभे दिसतात. अन्यायाच्या या खाणाखुणा इथून हटवण्यात याव्यात, अशी मागणी काही कायदेतज्ञांकडून करण्यात येत आहे. (अशी मागणी का करावी लागते. न्यायव्यवस्थेच्या हे लक्षात येणे अपेक्षित आहे ! - संपादक)

माझ्या रक्ताचा एक थेंब जरी पडला, तरी हिंदु क्रांती होईल ! - महंत नरसिंहानंद

महंत नरसिंहानंद यांना सौदी अरबमधून चेतावणी आल्याचे प्रकरण एखाद्या मौलवीला 
ठार मारण्याची चेतावणी मिळाल्याचे कधी ऐकले आहे का ?
      गाझियाबाद - आय.एस्.आय.एस्.ने भारतात पाय ठेवला आहे. आता तरी जागे व्हा, अन्यथा सिरियासारखी परिस्थिती येथेही होण्यास वेळ लागणार नाही. दूर देशात बसून मला दूरभाषवर चेतावणी देणार्‍याने लक्षात ठेवावे की, माझ्या रक्ताचा एक थेंब जरी पडला, तरी तो हिंदु क्रांतीला प्रारंभ होण्याचा पहिला थेंब असेल, असे विधान डासना देवी मंदिराचे महंत यती बाबा नरसिंहानंद सरस्वती महाराज यांनी त्यांच्या समर्थकांना संबोधित करतांना केले. महंत नरसिंहानंद यांना सौदी अरबमधून ठार करण्याची चेतावणी मिळाल्याची बातमी मिळताच ११ सप्टेंबर या दिवशी मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थकांनी मंदिरात गर्दी केली होती. त्यांच्या समर्थकांनी परवाना शस्त्रांच्या साहाय्याने २४ घंटे महाराजांना संरक्षण देण्याची सिद्धता दर्शवली. महाराजांना चेतावणी आल्याप्रसंगी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून तपास करण्यात येत आहे.

विद्यापिठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या दोनशेत दोन भारतीय संस्था

      नवी देहली - विद्यापिठांची जागतिक सूची घोषित झाली असून त्यात पहिल्या दोनशे विद्यापिठांत दोन भारतीय विद्यापिठांचा समावेश आहे. बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था आणि देहली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था या दोन संस्थांचा या सूचीत समावेश झाला आहे. त्या अनुक्रमे १४७ आणि १७९ या स्थानावर आहेत. या सूचीत अमेरिकेतील एम्आयटी आणि हार्वर्ड विद्यापिठांनी अनुक्रमे पहिला आणि द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

कॉन्व्हेंट शाळेतील प्राचार्याचा चौथीच्या वर्गातील मुलीवर बलात्कार : प्राचार्यासह दोन महिलांना अटक

 • असे वासनांध प्राचार्य विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
 • अशा बलात्कार्‍यांना त्वरित फासावर लटकवा !
      रायपूर - छत्तीसगड राज्यातील कोरिया जिल्ह्यातील पोडी भागातील एका कॉन्व्हेंट शाळेतील प्राचार्याने वसतीगृहातील व्यवस्थापक आणि सुरक्षा पहारेकरी यांच्या साहाय्याने वसतीगृहात रहाणार्‍या इयत्ता चौथीच्या वर्गातील ९ वर्षीय मुलीवर ५ सप्टेंबर या दिवशी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी प्राचार्यासह त्याच्या दोन महिला सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ येथील आमदार, महापौर आणि आयुक्त यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव मोहीम 
     ठाणे, १६ सप्टेंबर (वार्ता.) प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र वर्षातून एकदाच येणार्‍या गणेशोत्सवाला प्रदूषणास उत्तरदायी ठरवले जाते. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे मूर्तीदान आणि कृत्रिम तलावात विसर्जन या कृती बंद कराव्यात. धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे समुद्र, नदी किंवा वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी करणारे निवेदन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ येथील आमदार, महापौर, नगरसेवक आयुक्त यांना देण्यात आले. 

गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आम्ही बनवणार नाही ! - श्री. अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी, धुळे

धुळे येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक 
समितीचे कार्य चांगले आहे !  - श्री. मिसाळ, जिल्हाधिकारी, धुळे 

     धुळे -
गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आम्ही बनवणार नाही, असे आश्‍वासन धुळे जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने येथील शांतता समितीची बैठक धुळे येथील जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीत धुळे महानगरपालिका आयुक्त नामदेवराव भोसले, धुळे येथील महापौर सौ. जयश्रीताई अहिरराव, धुळे पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, धुळे येथील सर्व पक्षांचे नगरसेवक, माजी आमदार, तसेच धुळे जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करा ! - अधिवक्ता नीलेश सांगोलकर

पत्रकार परिषदेत बोलतांना डावीकडून अधिवक्ता संदीप अपशिंगेकर,
अधिवक्ता नीलेश सांगोलकर, सौ. राजश्री तिवारी आणि श्री. वीरेंद्र उत्पात
    पंढरपूर, १६ सप्टेंबर (वार्ता.) - सध्या पंढरपूर येथील नदीचे प्रदूषण होत असल्याचा मोठा बागुलबुवा उभा केला जात आहे. गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तसेच कृत्रिम हौदात गणेशमूर्ती विसर्जन न केल्यास कारवाई करण्याची भीतीही दाखवली जात आहे. प्रत्यक्षात न्यायालयाने नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात हौदात विसर्जन करण्याविषयी प्रबोधन करा, असे सांगितले आहे. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जन वहात्या पाण्यातच करा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. ते स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्वामी स्वामी श्री चिन्मयानंद सरस्वती यांची प्रदर्शनास वंदनीय भेट

डावीकडून अनंत श्री विभूषित महामंडलेश्‍वर श्री श्री १००८
स्वामी श्री चिन्मयानंद सरस्वतीजी महाराज, त्यानंतर
श्री. सुरेश सहारा आणि त्यांना ध्वनीचित्र-चकत्यांविषयी
माहिती सांगतांना श्री. विनय पानवळकर
      नाशिक, १६ सप्टेंबर (वार्ता.) - इंदूर (मध्यप्रदेश) येथील तपोनिधी पंचायती आखाडा श्री निरंजनी श्री श्री विद्याधाम पीठाधीश्‍वर अनंत श्री विभूषित महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्वामी श्री चिन्मयानंद सरस्वतीजी महाराज यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सिंहस्थपर्व, नाशिक येथे लावण्यात आलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या प्रदर्शनास भेट देऊन शुभाशीर्वाद दिले. या वेळी त्यांच्यासमवेत विद्याधामचे विश्‍वस्त श्री. सुरेश सहारा आणि विद्यार्थी उपस्थित होते. सनातन संस्थेचे श्री. विनय पानवळकर यांनी प्रदर्शनाविषयी सर्वांना अवगत केले. 
     महामंडलेश्‍वर स्वामी श्री चिन्मयानंद सरस्वती यांच्या वेदपाठशाळेत २०० विद्यार्थी शिकत आहेत, तसेच गोशाळेत ४५० हून अधिक गायी आहेत. त्यांचे वय २८ वर्षेे असून ते सर्वांत अल्प वयाचे महामंडलेश्‍वर आहेत.

हिंदुत्वाच्या कार्याला साधनेचे पाठबळ देणारे सनातनचे महान कार्य ! - अनंत श्रीविभूषित जगद्गुरु षष्ठपीठाधीश्‍वर सोमयाजी गोस्वामी श्री वल्लभरायजी महाराजश्री, सुरत

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सिंहस्थपर्व, 
नाशिक येथे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या विषयावर भव्य प्रदर्शन
श्री वल्लभरायजी महाराजश्री (डावीकडे) यांना 
प्रदर्शनाविषयी माहिती देताना श्री. विनय 
पानवळकर (उजवीकडे)
     नाशिक, १६ सप्टेंबर (वार्ता.) सध्या चहूबाजूंनी निराशेचे वातावरण आहे. राष्ट्र आणि धर्म हा चिंतेचा विषय झाला आहे. नेपाळ हे जगातील एकमेव हिंदु राष्ट्र भारताने मध्यस्थी करून निधर्मी केल्याने ते नष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी साधनेची जोड देऊन चालू केलेले हिंदुत्वाचे कार्य महान आहे. आपण योग्य दिशेने कार्य करत असून साधकांमध्ये समर्पणभाव आहे. आपण हाती घेतलेल्या या ईश्‍वरी कार्यास नक्कीच यश लाभेल ! हे ईश्‍वरी कार्य असल्याने साक्षात् भगवंत तुमच्यासोबत आहे. तुम्ही कौतुकास पात्र आहात, असे आशीर्वचन सुरत येथील अनंत श्रीविभूषित जगद्गुरु षष्ठपीठाधीश्‍वर सोमयाजी गोस्वामी श्री वल्लभरायजी महाराजश्री यांनी दिले. 

हिंदूंनो, सावर्र्जनिक गणेशोत्सवात शिरलेल्या विकृती दूर करण्यासाठी शर्थीचे यत्न करा आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करून श्रीगणेशाची कृपा संपादन करा ! - पू. अशोक पात्रीकर

     
 पू. अशोक पात्रीकर
     भारत पारतंत्र्यात असतांना लोकमान्य टिळकांनी तत्कालीन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रीपतिबुवा भिंगारकर यांना विचारले, "स्वराज्याच्या कार्याचा राष्ट्र्र्रभर प्रसार होण्यासाठी कोणाची आराधना करावी ? " यावर बुवांनी त्यांना सांगितले, "श्री गणपतीची पार्थिव पूजा चालू करा !" त्यानुसार लोकमान्य टिळकांनी सावर्र्जनिक गणेशोत्सव चालू केले आणि देशवासियांचे संघटन केले. आपण आजही सावर्र्जनिक गणेशोत्सव साजरे करत आहोत; पण या उत्सवाला आलेले आजचे हे बीभत्स रूप पहाता 'आपण उत्सव साजरे न करता श्री गणेशाची अवकृपा ओढवून घेत आहोत', असे म्हणावे लागेल. आज देश-धर्माची एकूण स्थिती पहाता हिंदु राष्ट्राच्या निर्मितीला पर्यायच नाही. हे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीचे कार्य स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षाही अवघड आहे. कालमहात्म्यानुसार या कार्यासाठी हिंदूंनी श्रीकृष्णाची आराधना करायची आहेच. त्याचबरोबर सावर्र्जनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून हिंदूंच्या संघटनाची जी अपूर्व संधी प्रतिवर्षी उपलब्ध होत असते, त्या संधीचा लाभ करून घ्यायला हवा. धर्मशिक्षणाचा अधिकाधिक प्रसार करून गणेशोत्सवात शिरलेल्या विकृती दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायला हवेत. श्री गणेशाची होत असलेली विटंबना थांबवल्यास आणि आदर्श गणेशोत्सव साजरा केल्यास श्री गणेशाचीही कृपा संपादन करता येणार आहे.

श्री गणेशाचे विडंबन थांबवण्यासाठी प्रयत्न करा !

धर्माभिमानी हिंदूंना आवाहन
     श्री गणेशचतुर्थीच्या काळात वेगवेगळ्या आस्थापनांकडून श्री गणेशाचे विज्ञापनफलक लावण्यात येतात. यांतील बहुतांश विज्ञापन फलकांवरील श्री गणेशाचे चित्र विडंबनात्मकरित्या काढलेले असते, तसेच दूरचित्रवाहिन्या आणि संकेतस्थळे यांवरील विज्ञापनांमधूनही श्री गणेशाचे विडंबन केले जाते. असे विडंबन निदर्शनास आल्यास त्याविषयी संंबंधित आस्थापनांच्या प्रमुखांना संपर्क करून त्यांचे प्रबोधन करावे आणि श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र पालटण्यास उद्युक्त करावे. याविषयाची माहिती नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयातही कळवावी. 
संपर्क : (०८३२) २३१२६६४ 
ई-मेल पत्ता : dspgoa1@gmail.com

सिंहस्थपर्वातील सनातनच्या राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या प्रदर्शनाला गणेश चतुर्थीच्या दिवशी ३ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंची भेट !

सनातनच्या उत्तुंग कार्यापुढे सनातनद्वेष्ट्यांचे आरोप पडले फिके !
प्रदर्शन पहाण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले जिज्ञासू
   नाशिक, १७ सप्टेंबर (वार्ता) - येथील सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 
     श्री. समीर गायकवाड यांना कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक झाल्यावर सनातनद्वेष्ट्यांनी सनातनच्या विरोधात विखारी प्रचार करण्यास प्रारंभ केला; मात्र या प्रसाराला भीक न घालता आज गणेशचतुर्थीच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४ सहस्राहून अधिक धर्मप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली. सनातन काळानुसार सांगत असलेली गुरुकृपायोग साधनापद्धत आणि समितीची धर्मरक्षणाची भूमिका यांविषयी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिक्रिया या जिज्ञासूंकडून मिळत आहेत. या प्रदर्शनस्थळी सनातनच्या सात्त्विक गणेशमूर्तीविषयीची ध्वनिचित्र तबकडी पाहून भाविकांनी या मूर्तींची मागणी केली.

गणेशभक्तांनो, गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा !

फलक प्रसिद्धीकरता
१. हिडीस नाच आणि महिलांची छेडछाड रोखा !
२. जुगार आणि मद्यपान यांना स्थान देऊ नका !
३. चित्रपटगीतांपेक्षा संतांची भजने किंवा प्रवचने लावा !
४. दर्शनाच्या रांगेत न बोलता नामजप करा !
५. फटाके, वाद्यवृंद आणि चित्रपटगीत यांमुळे होणारे ध्वनी अन् वायू प्रदूषण टाळा !

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Hinduo, Ganeshjiki shobhayatrame honewale anacharko rok kar 
Ganeshjiki krupa sampadan kijiye !
जागो ! : 
हिंदूओ, गणेशजीकी शोभायात्रामे होनेवाले अनाचार रोककर गणेशजीकी कृपा संपादन किजीये !

नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी साहाय्य करणे भारताचे कर्तव्य ! - सिंहस्थ पर्वानिमित्त धर्मजागृती सभेत संत-महंतांचे प्रतिपादन

डावीकडून पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, महामंडलेश्‍वर
श्री ईश्‍वरदासजी महाराज महात्यागी, पू. बालयोगेश्‍वर
श्री राम बालकदासजी महाराज आणि दीपप्रज्वलन
करतांना श्री बनवारी देवाचार्यजी महाराज महात्यागी
     नाशिक, १६ सप्टेंबर (वार्ता.) - भारत आणि नेपाळ या राष्ट्रांची संस्कृती समान असून दोघांमधील नाते जिव्हाळ्याचे आहे. तेथे जवळपास ९० टक्के लोकसंख्या हिंदू असून त्यांनी नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे; मात्र मूठभर राज्यकर्त्यांनी घटना समितीमध्ये हिंदु राष्ट्राला विरोध केला आहे. यातून लोकराज्याची मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. अशा वेळी जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र आणि नेपाळचा मोठा भाऊ समजल्या जाणार्‍या भारताने नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी साहाय्य करणे, हे भारताचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सिंहस्थ पर्वात आयोजित धर्मजागृती सभेतील संत-महंतांनी केले. 

दुसर्‍या राजयोगी स्नानाच्या दिवशी रामकुंड परिसरात १० चोरीच्या घटना

कडक पोलीस बंदोबस्त असतांनाही एवढ्या प्रमाणात 
चोरीच्या घटना घडणे, हे पोलीस प्रशासनाचे अपयशच ! अशा घटना 
पुन्हा घडणार नाहीत, यासाठी पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार आहेत ? 
     नाशिक, १६ सप्टेंबर - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसर्‍या राजयोगी स्नानाच्या गर्दीचा अपलाभ घेऊन रामकुंड, घाटाचा परिसर आणि शहरातील अन्य भागांत १३ सप्टेंबर या एकाच दिवशी चोरीच्या १४ घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी सोन्याचे अलंकार, भ्रमणध्वनी संच आणि रोख रक्कम असा विविध प्रकारचा ७ लक्षहून अधिक रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. या व्यतिरिक्त पोलिसांनी १६ चोरांना अटक केली आहे. विशेष म्हणजे पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (रामकुंड परिसर) चोरीच्या संबंधाने १० गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.

राजस्थानमधील उदयपूर येथील तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध !

भाजपची सत्ता असलेल्या राज्यात असे फतवे निघतात, हे लज्जास्पद ! 
     उदयपूर (राजस्थान) - तलाव स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांच्या काळात तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यावर प्रतिबंध घातला आहे. (हिंदूंना धर्मशास्त्रानुसार कृती करण्यास प्रतिबंध घालणार्‍या प्रशासनाची मोगलाई ! - संपादक) या संदर्भात जिल्हाधिकारी रोहित गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (हिंदूंना त्यांच्या धार्मिक कृती करण्यापासून वंचित ठेवणारे धर्मद्रोही जिल्हाधिकारी ! हिंदूंनो, प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात वैध मार्गाने लढा द्या ! - संपादक) 'विसर्जनाच्या दिवशी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर पाणी शिंपडून त्या मूर्तींना नगरपालिकांकडे सोपवण्यात येणार आहे', असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. (हिंदूंनो, अशी धर्मद्रोही कृती कदापी करू नका ! धर्मशास्त्राचे कठोरतेने पालन केले, तर त्याचे फळ मिळते. या दृष्टीने त्या शहरात प्रतिबंध असेल, तर दुसर्‍या शहरात जाऊन मूर्तींचे विसर्जन करा ! - संपादक) 

जर्मनीतील श्री पीठ नीलय आश्रमाचे संस्थापक श्री स्वामी विश्‍वानंद यांच्यासह त्यांच्या १५० हून अधिक भक्तांची सनातनच्या प्रदर्शनास भेट

प्रदर्शन पहातांना श्री स्वामी विश्‍वानंद
यांच्यासह त्यांचे भक्त
      नाशिक, १६ सप्टेंबर (वार्ता.) - जर्मनी या देशातील श्री पीठ नीलय आश्रमाचे संस्थापक श्री स्वामी विश्‍वानंद यांच्यासह त्यांच्या १५० हून अधिक भक्तांनी सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या प्रदर्शनास सदिच्छा भेट दिली. विदेशी नागरिकांनी संपूर्ण प्रदर्शन जिज्ञासेने समजून घेतले, तसेच त्यातील बारकावेही जाणून घेतले. सनातनच्या साधकांनी त्यांना प्रदर्शनाविषयी अवगत केले. हे प्रदर्शन पाहून प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री स्वामी विश्‍वानंद म्हणाले, दैनंदिन आचार, तसेच वैभवशाली भारतीय संस्कृती यांविषयीची माहिती पोहोचवण्याचे फार चांगले कार्य तुम्ही करत आहात. प्रदर्शन फार चांगले आहे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.

उत्सवकाळात शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह !

श्री गणेशमूर्तींचे मंगलमूर्ती मोरया या गजरात विसर्जन करतांना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देश आर्थिक संकटात असतांना आणि आतंकवादाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा करण्याची लाजिरवाणी स्थिती आली असतांना शास्त्रविसंगत फटाक्यांची आतषबाजी करणे, हा राष्ट्र आणि धर्म द्रोह आहे !

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

कानाचे पडदे फाडणारे, निरोग्यांचे मरण जवळ आणणारे, बालकांचा थरकाप उडवणारे आणि आवाजाबरोबर प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा श्री गणेश चतुर्थी,  दिवाळी, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे. फटाक्यांमुळे होणारा विनाश स्वतःहून ओढवून घेण्याचा अट्टाहास आपण कशासाठी करतो ?

दुष्काळ : धर्माचरणाचा !

महाराष्ट्रात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्यांसह राज्यकर्त्यांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात आली असून राज्यकर्त्यांमध्येही दुष्काळाच्या सूत्रावरून राजकारण रंगले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरात कारागृह भरा असे आंदोलन करण्यास प्रारंभ केला आहे, तर शासनाने शेतकर्यांच्या साहाय्यासाठी अर्थसाहाय्य घोषित केले असल्याचे सांगण्यात सत्ताधारी भाजप व्यस्त आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनीही दुष्काळाचे संकट अस्मानी असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. थोडक्यात राज्यातील जनता दुष्काळाच्या खाईत लोटली असतांना लोकप्रतिनिधी मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भोंदू साधू आणि बाबा यांना रोखण्यासाठी सिंहस्थ पर्वापासून हिंदु संघटनांचे आंदोलन !

सनातन-निर्मित भोंदू बाबांपासून सावधान या ग्रंथाचे प्रकाशन 
डावीकडून श्री. सुनील घनवट, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
आणि पू. नंदकुमार जाधव
    नाशिक - हिंदु धर्माला कलंकित करणारे भोंदू साधू आणि बाबा यांना रोखण्यासाठी सिंहस्थपर्वात हिंदु संघटनांचे आंदोलन चालू करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी दिली. नाशिक येथील निर्माण हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे प्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव आणि समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, प्राचीन काळापासून साधू-संतांना हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे वाहक म्हणून समाजात आदराचे स्थान आहे.

मिरवणुकीत देवतेची मूर्ती असतांना भक्तीरस निर्माण होणारी कृती करा !

      गणेशोत्सवात श्री गणेशाची मूर्ती आणतांना आणि मूर्ती विसर्जनासाठी नेतांना मिरवणुकीत बँड वाजवणे, हिडिस प्रकारचे नृत्य करणे, फटाके फोडणे, असे प्रकार सर्रास होतांना दिसतात. हे उत्सवांमध्ये शिरलेले अपप्रकार असून यामुळे धर्महानी होते. हाच प्रकार नवरात्रोत्सव आणि अन्य धार्मिक मिरवणुकांच्या वेळीही होतो. यामुळे वातावरण रज-तमप्रधान होऊन देवतेच्या उत्सवाचा चैतन्याच्या स्तरावर लाभ मिळणे दुरापास्त होते. त्याऐवजी मिरवणुकीत भजन आणि भक्तीगीते म्हटल्यास वातावरण सात्त्विक बनते. वारकरी जसे टाळ-मृदंग वाजवत तालबद्ध नाचत वारी पुढे पुढे नेतात, तसेच देवतांच्या मिरवणुकीच्या वेळी केल्यास उत्सवांचा आध्यात्मिक लाभ होईल.

उत्सवांच्या वेळी किंवा त्यांच्या मिरवणुकांमध्ये दारू पिऊन आलेल्या लोकांना उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी धर्माभिमान राखून आधीच घालवा !

      सध्या सार्वजनिक उत्सवांच्या वेळी किंवा त्यांच्या मिरवणुकांमध्ये काही लोक मौजमजा आणि दंगामस्ती करण्यासाठी दारू पिऊन सहभागी होतात. त्यामुळे अंगविक्षेप करत नाचणे, लोकांची टिंगलटवाळी करणे, महिलांची छेडछाड करणे, असे प्रकार घडतात. असे होत असूनही सहभागी झालेली इतर चांगली माणसे त्या दारू पिऊन आलेल्या लोकांना काही बोलत नाहीत किंवा आपल्याबरोबरची माणसे दारू पिऊन आलेली आहेत, हे माहीत असूनही त्यांना आधीच तेथून बाहेर काढत नाहीत. एरव्ही प्रवास करतांना इत्यादी प्रसंगी आपल्या बाजूला कोणी दारू प्यायलेला माणूस असेल, तर आपण त्याला लगेच दूर जायला सांगतोच ना ? दारू प्यायलेल्या लोकांमुळे अनर्थ ओढवेल, तसेच उत्सवाचे पावित्र्य निघून जाईल, हे लोकांच्या लक्षात येत नाही किंबहुना त्यांच्यामध्ये धर्माभिमान नसल्यानेच ते घाबरून काही कृती करायला धजत नाहीत. हिंदूंनो, साधना करून देवतांची कृपा संपादन करून आपत्काळाला सामोरे जा !

      हिंदूंनो, कल्पकल्पांतापासून ऋषीमुनींनी विविध प्रकारे केलेले देवतांचे गुणगौरव, स्तवन, त्यांच्या आशीर्वादासाठी सांगितलेले जप-तप-व्रते, तसेच परंपरागत सण-उत्सव यांचे महत्त्व जाणून घ्या. ऋषीमुनींनी देवतांचे ध्यान आणि उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि जगत्कल्याणासाठी त्यांच्याकडून वर मागून घेतले. वर्षानुवर्षे साधना करून अनेक विषयांवर ज्ञान मिळवून मानवजातीसाठी ते ज्ञानभांडार खुले केले. हे त्यांचे उपकार विसरू नका. आपणही उपासना करून, भक्त बनून देवतांची कृपा संपादन करूया. सारी मानवजात आज संस्कृतीहीन होऊन स्वार्थासाठी सृष्टी नष्ट करण्याला उद्युक्त झाली आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्याला आज विज्ञान नव्हे, तर अध्यात्म, धर्म आणि देवताच वाचवणार आहेत. हिंदूंनो, यासाठी धर्मशिक्षण घ्या. स्वतः धर्माचरण करून इतरांना प्रेरित करा. धर्म आणि संस्कृती वाचवा ! राष्ट्र वाचवा ! श्रीगणेशाची कृपा संपादन करून आणि साधनेने बळ वाढवून हिंदु राष्ट्र आणूया ! हिंदूंनो, श्रीगणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत मद्य पिऊन आणि रज-तमात्मक चित्रपटगीतांच्या तालावर नाचून धर्महानी करू नका !

 'श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत बहुसंख्य तरुण मुले रज-तमात्मक चित्रपटगीतांच्या तालावर नाचत असतात. ही चित्रपटगीते बहुधा अश्लीकल असतात आणि मुले  विचित्र अंगविक्षेप करत नाचत असतात. यातील बरेच जण मद्य प्यायलेले असतात. त्यामुळे धर्महानी होते आणि पाप लागते. खरेतर या चित्रपटगीतांचा आणि गणेशोत्सवाचा काहीतरी संबंध आहे  का ? गणेशाच्या सात्त्विक मूर्तीसमोर अशी हिडीस नृत्ये करून काय साध्य होते ? अशाने श्रीगणेश प्रसन्न होईल का ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच असे घडत आहे. काही गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत मात्र शाळकरी मुला-मुलींचे लेझिम पथक असते. ही मुले लयबद्धरित्या आपली कला सादर करतात. हे बघायलाही फार छान वाटते. ते करतांना मुला-मुलींनी गणेशाचा नामजप केल्यास त्यांना अधिक लाभ होईल. इतर गणेशोत्सव मंडळांनीही हा आदर्श घ्यायला हवा.'

श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व मूर्तीकार आणि गणेशभक्त यांना सनातनची अनमोल भेट !

श्री गणेशाच्या उपासनेमागील शास्त्र समजून घेण्यासाठी वाचा सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ !
 श्री गणपति - भाग १
 • शुभकार्यात प्रथम श्री गणेशपूजन का करतात ?
 • श्री गणपतीला लाल फुले अन् दूर्वा का वाहतात ?
 • गणेश चतुर्थीला नवीन मूर्तीची पूजा का करतात ?

श्री गणेश पूजाविधी 
(काही मंत्रांच्या अर्थासह)
 • पूजेची सिद्धता करतांना स्तोत्रपठण कसे करावे ? 
 •  गणेशपूजेसाठी कोणते साहित्य किती प्रमाणात असावे ?
 • पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची शुद्धी कशी करावी ?

श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी !
श्री गणेशमूर्ती मातीची शास्त्रानुसार असेल, तर भाविकांना गणेशतत्त्वाचा खरा लाभ होतो. सनातन-निर्मित मूर्ती ही या दृष्टीने आदर्श कशी, याविषयी मार्गदर्शक लघुग्रंथ !
श्री गणपति अथर्वशीर्ष अन् संकष्टनाशनस्तोत्र
गणेशस्तोत्राचे पठण केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि शरिराभोवती सूक्ष्म संरक्षक-कवच निर्माण होते. स्तोत्रातील संस्कृत भाषेमुळे उच्चारही सुधारतात. यासाठी नित्य गणेशस्तोत्राचे पठण करा आणि मुलांकडून करवून घ्या ! 
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !
संपर्क : ९३२२३१५३१७

विविध सेवांसाठी वाराणसी आणि देहली सेवाकेंद्रांत साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !
      वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, लेखा, प्रसार आदी सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. यासमवेतच विद्युत्-जोडणी, सुतारकाम, रंगकाम आदी बांधकामाच्या संदर्भातील कौशल्य असलेल्या सेवा, तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण (सुपरविझन) करू शकणारे साधकही हवे आहेत.
   देहली सेवाकेंद्रात वाहन, स्वयंपाक, लेखा आदी विभागांमध्ये, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. 
    जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी वाराणसी अथवा देहली सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा vishwadeep2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ.(४.५.२०१५)

गणेशभक्तांनो, गणेशोत्सवाचे निमित्त करून अधिकाधिक रज-तम पसरवून श्री गणेशाची अवकृपा ओढवून घेऊ नका !


 'गणेशोत्सवाच्या कालावधीत चित्रविचित्र आकारांतील गणेशमूर्ती, अनावश्यक दिव्यांची आरास, कर्णकर्कश्श 'डॉल्बी'वरील संगीतावर नाचणार्यांची विसर्जन मिरवणूक इत्यादी अयोग्य प्रकार आपल्याला प्रतिवर्षी पहायला मिळतात. पूर्वी मोठ्या मंडळांत असलेले हे लोण आता लहान गृहनिर्माण वसाहतींतील गणेशोत्सवापर्यंतच नाही, तर घराघरांपर्यंत पोचले आहे. विशेषतः गणपतीच्या मूर्तीवर चिनी बनावटीच्या दिव्यांची जी प्रकाशयोजना केली जाते, त्यातून रज-तमात्मक वातावरण कसे निर्माण होते, हे पुढील काही प्रसंगांवरून लक्षात येईल. 

गणेशोत्सवाच्या काळात जनतेचे नैतिक अधःपतन करू पहाणारी नीतीहीन गणेशोत्सव मंडळे !

'वर्ष २०११ मध्ये गोव्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी मंडळाच्या सोडतींवर मोठमोठ्या रकमेची बक्षिसे ठेवली होती. अनेक मंडळांचा केवळ बक्षिसांवरील खर्च ४० लक्षांहून अधिक होता. ट्रक, विविध प्रकारच्या चारचाकी गाड्या, दुचाकी वाहने, सोने, रोख रक्कम, अशी बक्षिसांची खैरात करण्यात आली होती.'

गणपतीने साधिकेला स्वप्नात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व सांगून त्यांची सूची लिहिलेली पाटी गळ्यात घालणे, याला अलंकार असे संबोधणे

कु. नीलिमा कुलकर्णी
     मी १०.८.२०१५ या दिवशी माझ्यातील स्वभावदोष आणि अहंची लक्षणे असलेली सूत्रे टंकलिखित करून त्याची प्रत (प्रिंट) काढण्यासाठी दैनिक कार्यालयात दिली. मी २ दिवस ती प्रत दैनिक कार्यालयातून घेतली नाही. त्यानंतर १८.८.२०१५ या दिवशी सकाळी मला स्वप्न पडले.
१. स्वप्नात प.पू. डॉक्टरांनी श्री गणेशाला 
सगळ्यांवर लक्ष ठेवण्याचे दायित्व सोपवल्याचे दिसणे
    स्वप्नात प.पू. डॉक्टरांनी प्रसारसेवक, आश्रमसेवक, तसेच सर्व साधक अशा सगळ्यांवर लक्ष ठेवण्याचे दायित्व श्री गणेशावर सोपवले आहे, असे दिसले. जिल्ह्यांत आणि आश्रमांत काही चुका होत असतील, तसेच त्यांना काही अडचणी येत असतील, तर त्याही सोडवायच्या, असेही दायित्व होते.

६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांची सुवचने

१. देव दार उघडून आपली वाट बघत बसलेलाच आहे. त्यामुळे आपणच त्याच्याकडे जाण्याची आपली तळमळ वाढवूया.
२. समष्टीसमोर चूक सांगितल्याने पापक्षालन होणार आहे. संतांचा सत्संग मिळणार आहे आणि आपल्याकडून देवाला अपेक्षित असे घडणार आहे.
३. सेवा म्हणजे भगवंताने दिलेला प्रसाद
४. आपल्याला मिळालेली सेवा ही भगवंताच्या चरणांजवळ जायची संधी आहे, या भावाने केली पाहिजे. (२०.८.२०१५

आपले जीवन संतचरणी समर्पित व्हावे, अशी इच्छा असलेले आणि दिसेल ते कर्तव्य या उक्तीनुसार कृती करणारे घाटकोपर, मुंबई येथील श्री. विष्णु शुक्ला !

    श्री. विष्णु शुक्ला हे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून श्री. दीपक महाराणा यांच्यासमवेत कार्य करतात. त्यांना बालपणापासून अध्यात्मात रस असून आपले जीवन संतांच्या चरणी समर्पित व्हावे, असे त्यांना वाटते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यावर त्यांची श्रद्धा असून समितीच्या कार्यामध्ये असलेली योग्य दिशा आणि परिणामकता अन्य संघटनांमध्ये कार्य करतांना अनुभवास मिळत नाही, असे त्यांना जाणवते.
१. तळमळ
    राष्ट्रीय हिंदु आंदोलन अधिकाधिक चांगले व्हावे, तसेच अनेक धर्माभिमानी संघटित व्हावेत, अशी तळमळ त्यांच्यात आहे. 

क्षात्रवृत्ती असलेले आणि धर्मकार्याला नामजपादी साधनेची जोड देणारे श्री. दीपक महाराणा अन् श्री. विष्णु शुक्ला !

    श्री. दीपक महाराणा आणि श्री. विष्णु शुक्ला यांनी साधनेला लगेचच आरंभ केला असून ते अधिकाधिक प्रार्थना अन् नामजप करतात. आध्यात्मिक त्रास जाणवल्यास त्यावर मात करण्याचा ते प्रयत्न करतात. एकदा श्री. विष्णु यांना राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या संदर्भात नकारात्मक विचार येऊन त्यात सहभागी होऊ नये, असे वाटत होते; परंतु त्यावर मात करून ते आंदोलनाच्या सेवेमध्ये तळमळीने सहभागी झाले.
- श्री. बळवंत पाठक, ठाणे (५.७.२०१५)

गणेशभक्तांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधकांनी काढलेल्या श्री गणपतीच्या चित्रांचे वैज्ञानिक उपकरणाद्वारे सिद्ध झालेले महत्त्व जाणून त्यांचा उपासनेत अधिकाधिक वापर करा !

श्री गणपतितत्त्व वेगवेगळ्या प्रमाणात असणार्‍या सनातन-निर्मित
श्री गणपतीच्या चित्रांचा वायूमंडलावर होणारा परिणाम दर्शवणारी पिप तंत्रज्ञानाच्या
साहाय्याने अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !
     उपासना करतांना उपासकाला आनंद, शांती यांची अनुभूती येण्यासाठी त्याचा उपास्य देवतेप्रती भाव जागृत होणे महत्त्वाचे असते. उपासनेतील उपास्य देवतेच्या चित्रात देवतेचे तत्त्व (तारक रूप असल्यास सात्त्विकता) जेवढे अधिक प्रमाणात असते, तेवढे ते चित्र उपासकाला त्या देवतेचे तत्त्व ग्रहण करण्यास अधिक उपयुक्त ठरते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-कलाकारांनी काढलेली श्री गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, श्री दत्त, शिव, श्री लक्ष्मी आणि श्री दुर्गा या देवतांची चित्रे सनातन संस्थेने प्रकाशित केली आहेत. या चित्रांमध्ये त्या त्या देवतेच्या तत्त्वाचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे.

नाशिक येथे चालू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी साधकांना आलेल्या अनुभूती

    सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त नाशिक येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शन स्थळी ५.९.२०१५ या दिवशी श्रीकृष्णजन्माष्टमी सोहळा पार पडला. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा होत असतांना श्रीकृष्णाचा पाळणा लावला होता. तेव्हा साधकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. श्रीकृष्णाचे चित्र जिवंत झाल्याचे जाणवणे
अ. श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघून नामजप करतांना श्रीकृष्णाचे नेत्र जिवंत असल्याचे भासले आणि माझा देह श्रीकृष्णाप्रमाणेच निळा होत असल्याचे जाणवले. - श्री. निषाद देशमुख, भोपाळ

समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ या उक्तीची क्षणोक्षणी प्रचीती देणारे श्रीराम मंदिराचे बांधकाम आणि गुरुदेवांप्रती असलेला उत्कट भाव शब्दाशब्दांतून व्यक्त करणारे प.पू. दास महाराज !

प.पू. दास महाराज
    घर पहावे बांधून आणि लग्न बघावे करून, अशी म्हण प्रचलीत आहे. या दोन्ही शुभकार्यांना हात घातल्यावर धन आणि वेळ यांचा व्यय किती अन् कसा होईल, याचा तर्क करता येत नाही. पावला पावलाला नवीन आव्हाने समोर उभी रहातात. अशा कार्याला संतांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले, तर कार्य सहज अन् सुरळीतपणे पार पडते.
    पानवळ, बांदा येथील श्रीराम मंदिराचे बांधकाम करतांना साधकांनी हे सर्व अनुभवले. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करतांना आलेल्या अडथळ्यांवर श्री गुरुकृपेमुळेच मात करता आली. हे सर्व प्रेरणादायी अनुभव वाचून साधकांची
प.पू. गुरुदेवांच्या प्रती श्रद्धा दृढ होवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !

जिज्ञासू वृत्तीचे आणि धर्मकार्यात सक्रिय सहभाग घेणारे कल्याण येथील धर्माभिमानी श्री. दीपक महाराणा !

श्री. दीपक महाराणा
    श्री. दीपक महाराणा हे संगणकीय अभियंता असून संकेतस्थळ निर्मितीचा व्यवसाय करतात. समितीच्या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांनी कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यामध्ये पुष्कळ जिज्ञासा असून विविध संकेतस्थळांद्वारे ते अध्यात्माविषयी माहिती मिळवत असतात.
१. धर्मकार्यास साहाय्य करणे
    कल्याण येथील आंदोलनात ते आपल्या सहकार्‍यांसमवेत सहभागी झाले आणि नंतर धर्मकार्यात सक्रिय सहभाग घेऊ लागले. त्यांनी आपले कार्यालय धर्मशिक्षण वर्गासाठी उपलब्ध करून दिले आहे.

हिंदु जनजागृती समितीशी संपर्क झाल्यानंतर स्वतःत परिवर्तन अनुभवणारे आणि प.पू. गुरुदेवांशी झालेल्या भेटीचे वर्णन शब्दांत करणे अशक्य असल्याचे सांगणारे घाटकोपर, मुंबई येथील श्री. विष्णु शुक्ला !

श्री. विष्णु शुक्ला
    घाटकोपर, मुंबई येथील हिंदुत्ववादी श्री. विष्णु शुक्ला हे हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आहेत. त्यांच्यात झालेले पालट, त्यांना आलेल्या अनुभूती आणि रामनाथी आश्रमात शिबिरासाठी गेल्यावर प.पू. गुरुदेवांशी झालेली अविस्मरणीय भेट आणि शिबिरात शिकायला मिळालेली सूत्रे यांविषयीची माहिती पुढे देत आहोत.   
१. हिंदु जनजागृती समितीशी संपर्क
१ अ. समितीच्या संपर्कात आल्यानंतर स्वतःत झालेले परिवर्तन : आपल्या सनातन धर्माला अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा वाढली. लोकांशी संवाद साधण्यात सुलभता आली. स्वभावात पालट होऊ लागला. खाण्यापिण्यातही पालट झाले. विचारांमध्ये सात्त्विकता वाढली. कार्यभार सांभाळण्याचे दायित्व घेण्याची क्षमता वाढली, तसेच भावनांवर नियंत्रण येऊ लागले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधकांनी काढलेली चित्रे श्री गणपतीच्या मूळ रूपाशी अधिक एकरूपता साधणारी असल्याने ती आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहेत, हे दर्शवणारी पिप छायाचित्रे !

सूचना : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) छायाचित्र क्र. २ ते ७ यांची तुलना मूलभूत प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १) करतांना छायाचित्रातील पटल, तसेच चित्र यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

अमेरिकेतील सौ. मृणाल नानीवडेकर यांच्या घरी सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीचे मंगलमय आगमन

सौ. मृणाल नानीवडेकर
झाल्यानंतर त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण
अनुभूती आणि मूर्तीत झालेले चैतन्यमय पालट !
    श्री गणेशाच्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती मी यापूर्वी लिहून दिल्या नाहीत, यासाठी सर्वप्रथम प.पू. गुरुदेव आणि श्री गणपति यांच्या चरणी क्षमा मागते. माझ्या जीवनातील श्री गणपतीचे अस्तित्व आणि त्याने माझ्यावर केलेली कृपा यांविषयी मी किती कृतघ्न आहे, हेच यातून दिसून येते. हे श्री गणेशा, यासाठी तू मला क्षमा कर आणि तूच तुझ्या अपेक्षेनुसार या अनुभूती माझ्याकडून लिहून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !

प.पू. गुरुदेवांनी दोन संतांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम मंदिराच्या निर्मितीत खारीचा वाटा उचलण्याची संधी देऊन बुद्धीने नव्हे, तर शरणागत भाव ठेवून सेवा कशी करावी, याविषयी प्रसंगांद्वारे दिलेली शिकवण !

१. मंदिर बांधकामाची सेवा करतांना  बुद्धीच्या मर्यादेची जाणीव 
होऊन प्रत्येक कृती भावाच्या स्तरावर करण्याचे महत्त्व लक्षात येणेे
    एखादी सेवा मी करणार, असा माझा पूर्वी भाग असायचा. त्यासाठी बुद्धीचा अधिकाधिक वापर करून सेवा अचूक करण्यावर भर असायचा. बुद्धीला मर्यादा असतात, त्याने सेवेत अडथळे उत्पन्न होतात. भावाच्या स्तरावर कृती झाल्यावर अडथळे आपोआप दूर होतात. अडचणी सुटत जातात आणि सेवाही जलद गतीने, तसेच अचूकपणे होते. श्रीराम मंदिराच्या सेवेत असतांना हा भाग आयुष्यात प्रथम अनुभवला. ही सेवा करतांना ही प.पू. गुरुदेवांनी दिलेली सेवा आहे, असे वाटून कृतज्ञता वाटली. हाच विचार प.पू. गुरुदेवांनी साधकांच्या माध्यमातून आणखी दृढ केला.

शिर्डीचे साईमंदिर बांधणार्‍या नागपूर येथील बुटी कुटुंबाशी अकल्पित परिचय होऊन श्रीकृष्णाचीच भक्ती करा !, असा संदेश देणार्‍या कृष्णभक्त साईबाबांचा अनुभवलेला श्रेष्ठ सत्संग !

      १०.६.२०१४ या दिवशी सायंकाळी ६ वाजता आम्ही नागपूर येथील पांडे लेआऊटमध्ये रहाणार्‍या बुटी यांच्या घरी पोहोचलो. घरात प्रवेश करतांनाच मला वेगळेपण जाणवत होते. साईबाबा देहधारी असतांनाच नागपूर येथील श्रीमंत गोपाळ बुटी यांनी स्वखर्चाने शिर्डीचे साईबाबांचे मंदिर बांधून दिले. त्यांच्या सुनेच्या घरी, श्रीमती माधुरी बुटी (वय ६५ वर्षे) यांच्या घरी आम्ही गेलो असता साईबाबांचा विषय निघाला. तेव्हा त्यांनी साईबाबांच्या काही गोष्टी, आठवणी आणि प्रत्यक्षात श्री. गोपाळ बुटींशी साईबाबांचे झालेले बोलणे यांविषयी सांगितले. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. मंदिराच्या निर्मितीपूर्वी श्री. गोपाळ बुटी यांना साईबाबांनी दिलेला दृष्टांत !
    साईमंदिर बांधण्यापूर्वी श्री. गोपाळ बुटी मंदिरात मूर्तीच्या ठिकाणी कृष्णाची मूर्ती बसवणार होते, येथपर्यंतचा भाग श्रीमती माधुरी बुटी यांना आठवत होता; मात्र पुढचा भाग आठवत नव्हता.

अध्यात्माचा आधार घेऊन धर्मप्रसार आणि धर्मकार्य करणारे कल्याण येथील डॉ. उपेंद्र डहाके !

डॉ. उपेंद्र डहाकेे
    डॉ. उपेंद्र डहाकेे हे कल्याण येथील प्रतिष्ठित डॉक्टर असून भाजपचे तेथील उपाध्यक्ष आहेत. त्यांनी गोवंश रक्षण, मशिदीवरील भोंगे उतरवणे, हिंदूंना संघटीत करणे, या विषयांत उल्लेखनीय कार्य केले आहे. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्याविषयी त्यांच्या मनात पुष्कळ श्रद्धा आहे. नुकत्याच झालेल्या चतुर्थ हिंदू अधिवेशनाच्या स्थानिक पत्रकार परिषदेत त्यांनी अधिवेशनाचा उद्देश अतिशय तळमळीने मांडला.
१. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी पुढाकार घेणे
     मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी शहरातील विविध संघटनांचे चांगले संघटन केले आणि कल्याण शहर पोलीस उपायुक्तांना निवेदन देऊन त्यांचा नेटाने पाठपुरावा केला. परिणामी शहरात पहाटे होणारा भोंग्यांचा आवाज बंद झाला आणि इतर वेळेला दिल्या जाणार्‍या बांगेचा आवाजही न्यून झाला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यानंतर श्री. देवेंद्र परब यांच्यात झालेले पालट !

श्री. देवेंद्र परब
१. हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यानंतर सर्व ईश्‍वर सांभाळणार आहे, असे वाटून आणि मन शांत अन् स्थिर होणे : हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आलो आणि साधना म्हणजे काय ?, हे समजले. युद्ध म्हणजे केवळ मारामारी नाही, तर सूक्ष्मातून युद्ध कसे असते ?, हे लक्षात आले. मी धर्मावरील आघातांचे गार्‍हाणे देण्यासाठी प्रथमच पोलीस ठाण्यात गेलो आणि माझे पोलिसांविषयी वाटणारे भय नाहीसे झाले. पूर्वी मला धर्मकार्य करतांना पोलिसांनी पकडले आणि मेलो, तर माझ्या कुटुंबाचे, देशाचे आणि धर्माचे काय होईल ? अशी चिंता वाटायची; पण आता मला या गोष्टींशी माझे काहीही देणे-घेणे नाही, तर हे सर्व ईश्‍वर सांभाळणार आहे, असे वाटते आणि मन शांत आणि स्थिर होते.

साधकांनो, २५.९.२०१५ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !

प्रसारसेवक, जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
     संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून २५.९.२०१५ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी. 
      १५.९.२०१५ या दिवसापर्यंतचा प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सत्याची कास कधीही सोडू नये ! 
परमेश्वराची साथ नित्य रहावी, ही इच्छा असेल, तर कधीही सत्याची कास सोडू नये. 
सतत सत्याचे अधिष्ठान ठेवावे !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


वेळ न मिळणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
     जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका.
भावार्थ : जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता म्हणजे पैसा गोळा करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. याउलट कसे करायचे ते शिका म्हणजे वेळेचा जास्तीतजास्त वापर साधना करण्यासाठी करा. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का, असा प्रश्‍न पडतो. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले, २४.५.२००९ 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

विघ्नसंतोषींचे पारिपत्य !

आज विघ्नहर्त्या श्री गणेशाचे आगमन होत आहे. सारी सृष्टी गणरायांच्या येण्याने प्रफुल्लित झाली आहे. न्यायालयाने कितीही निर्बंध लादले, पोलिसांनी नोटिसा पाठवल्या, तरीही अवघा हिंदु समाज सारी सुख-दुःखे बाजूला सारून गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. हा सारा आनंदी-आनंद सहन होत नाही; म्हणून कि काय संभाजीनगर येथील 'मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन'चे (एम्.आय.एम्.चे) जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांनी गोवंशहत्या बंदीच्या विरोधात १८ सप्टेंबर या दिवशी संभाजीनगर बंद करण्याची चेतावणी दिली आहे. चिथावणीखोर विधाने करतांना कुरैशी म्हणाले, "गोवंशहत्या बंदी हे आमच्या धार्मिक प्रथांवर आक्रमण आहे. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी मीच बैलाची कत्तल करतो. पोलिसांनी मला अटक करावी. त्या दिवशी माझ्यासमवेत शेकडो लोक असतील. तेही स्वतःला अटक करून घेतील." 'जाणीवपूर्वक हिंदूंच्या सणांच्या वेळी कुरापती काढून धार्मिक अशांतता पसरवल्यास आपल्याला जन्नत मिळेल', असे कदाचित कुरैशी यांना वाटत असावे. ते काही असले, तरी असल्या प्रवृत्तींना आपल्याकडे विघ्नसंतोषी म्हणतात. बाकी सर्व चांगले चालले असतांना यांना पोटशूळ उठतो आणि रंगाचा बेरंग होतो. संभाजीनगर येथील घटना समोर आली आहे; मात्र भारतात अनेक ठिकाणी छुपे संघर्ष चालू झालेच असतील. आरतीचा आवाज किती ठेवावा, मंडप कुठे उभारावा, मिरवणुकीचा मार्ग कोणता असावा, यासाठी अनेक ठिकाणी धर्मांध अरेरावी करतात, हिंदूंचे दमन करतात, असा आजवरचा इतिहास आहे. 

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn