Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आजचे दिनविशेष !साधू, संत, महंत यांच्या चरणस्पर्शाने गोदावरी कृतकृतार्थ !

 • कुंभनगरी, नाशिक येथे सिंहस्थ पर्वातील दुसरे राजयोगी (शाही) स्नान उत्साहात !
 • पोलीस बंदोबस्त शिथिल केल्याने लक्षावधी भाविकांनी घेतला स्नानाचा लाभ !
 • सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधू, संत, महंत यांचे स्वागत !
रामकुंडावर द्वितीय राजयोगी स्नानासाठी जमलेला विशाल जनसागर
श्री महंत ग्यानदास महाराज यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करतांना सनातनच्या
साधिका त्यांच्यामागे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
नाशिक, १३ सप्टेंबर (वार्ता.) - सिंहस्थपर्वात झालेल्या राजयोगी स्नानानिमित्त तपोनिधी साधू-महंतांचे चरणस्पर्श होताच गौतमी ऋषींची पवित्र गोदावरी नदी जणू कृतकृतार्थ झाली.
१३ सप्टेंबरला ब्राह्ममुहुर्तापासूनच खळखळणारा गोदावरीचा प्रवाह याची साक्ष देत होता. श्रावण अमावास्या म्हणजेच १३ सप्टेंबर २०१५ या दिवशी सिंहस्थ कुंभपर्वातील दुसरे राजयोगी (शाही) स्नान मोठ्या उत्साहात पार पडले. सिंहस्थनगरी, नाशिक येथे अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा आणि अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाडा या तिन्ही अनी आखाड्यांतील साधू-महंतांनी पवित्र रामकुंड येथे राजयोगी स्नान केले.
त्र्यंबकेश्‍वर भगवान श्री त्र्यंबकेश्‍वराच्या नगरीतील कुशावर्त या तीर्थराजमध्ये हर हर महादेव आणि वेदमंत्रांच्या उच्चारात शंकराचार्य, १० शैव आखाडे आणि साधूसंत यांनी आपल्या पारंपरिक शस्त्रास्त्रांसह अत्यंत उत्साहाने अन् आनंदाने दुसर्‍या पर्वणीतील प्रमुख राजयोगी स्नान केले. या वेळी देशातील भाविकांसह इंग्लंड, जपान, ऑस्ट्रिया, चीन आणि अन्य देशांतून आलेल्या विदेशी भक्तांनी स्नान केले. पहाटे २.३० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत अंदाजे दीड लाख भाविकांनी स्नान केल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले. पहिल्या पर्वणीला पोलिसांनी अतिकडक सुरक्षाव्यवस्था ठेवली होती; मात्र दुसर्‍या पर्वणीला पोलिसांनी भाविकांना पुष्कळ लांबपर्यंत न अडवल्यामुळे आणि बंदोबस्तात थोडी शिथिलता ठेवल्यामुळे भाविकांची गर्दी तुलनेने अधिक होती.

जपानमध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे संवर्धन

जपानमधील हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणांवरूनच
प्राचीन काळात हिंदु संस्कृती सर्वदूर पसरली होती, हे लक्षात येते !
    नवी देहली - जपानमध्ये प्राचीन हिंदु संस्कृतीतील किमान १२ देवतांचे नियमित पूजन होत आहे. भारतात लुप्त होत चाललेल्या वरुण आणि वायू देवतांच्या मंदिरांचे जपानमध्ये अस्तित्व आहे. या शिवाय श्री सरस्वतीदेवीचीच शेकडो मंदिरे आढळून येतात. शिवाय अनेक मंदिरांत श्री लक्ष्मी, इंद्र, ब्रह्मा, श्री गणेश, गरुड आणि इतर देवतांचे विविध रूपात पूजन केले जाते. तेथे श्री सरस्वतीदेवीची केवळ वीणा धारण केलेल्या मूर्तीचीच नव्हे, तर पाण्यात उभ्या असलेल्या रूपातही पूजा केली जाते. जपानच्या मंदिरांत बुद्ध, तसेच इतर हिंदु देवतांच्या मूर्तींचे चांगले संवर्धन केले जाते. जपानची राजधानी टोकियो येथे हिंदु देवतांशी संबंधित प्रसिद्ध जीओन हा सण साजरा केला जातो.

पाकची प्राध्यापिका ३ मासांसाठी निलंबित

पाकव्याप्त काश्मीर नकाशातून वगळल्याचे प्रकरण
    कुठे पाकने हडपलेला काश्मीरचा एक भाग नकाशातून वगळल्यामुळे प्राध्यापिकेवर कारवाई करणारा पाकिस्तान, तर कुठे भारताच्या नकाशाचे विविध माध्यमांतून विकृतीकरण करणार्‍यांवर कोणतीही कारवाई न करणारे भारतीय सर्वपक्षीय राज्यकर्ते !
    इस्लामाबाद - पाकव्याप्त काश्मीर नकाशातून वगळल्याने पाकमधील पंजाब विद्यापिठातील एक ज्येष्ठ प्राध्यापिका अबिदा नसरीन यांना ३ मासांसाठी निलंबित करण्यात आले आहे. अबिदा यांच्यावर पंजाब एम्प्लॉइज एफिशियन्सी डिसिप्लिन अ‍ॅण्ड अकाऊण्टेबिलिटी (पीडा) या कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रवाशांना मद्य न दिल्यामुळे मुसलमान हवाईसुंदरी निलंबित

कट्टरतेने धर्मपालन करणार्‍या मुसलमानांकडून हिंदूंनी शिकावे !
अमेरिकेच्या विमान आस्थापनाची कारवाई
    वॉशिंंग्टन - विमानप्रवासात प्रवाशाला मद्य न दिल्यामुळे अमेरिकेच्या विमान आस्थापनाने शारी स्टेनली या मुसलमान हवाई सुंदरीला सेवेतून निलंबित केले. या प्रकरणी शारी स्टेनली हिने समान रोजगार संधी आयोगासमोर तक्रार केली असून स्वत:ची नोकरी परत करण्याची मागणी केली आहे. एक्स्प्रेस जेट या विमान आस्थापनाच्या विरोधात केलेल्या तक्रारीत स्टेनली हिने इस्लामी निष्ठेमुळे विमानात प्रवाशांना मद्य न पुरवता नोकरी करायची असल्याचे म्हटले आहे. स्टेेनली हिने २ वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला आहे.

बांगलादेश मायनॉरिटी वॉचची मानवाधिकार पदाधिकार्‍यांशी चर्चा !

 • आतापर्यंत मानवाधिकार पदाधिकार्‍यांनी किती हिंदूंवरील
 • अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत ? 
 • सर्वत्रच्या हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी आता प्रभावी हिंदूसंघटनच हवे ! 
    ढाका (बांगलादेश) - बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची येथील राष्ट्र्रसंघाच्या निवासी समन्वयकांच्या कार्यालयातील मानवाधिकार पदाधिकारी हेनर बिलेफेड आणि सल्लागार मिका कानेवारी यांच्याशी बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांवर (हिंदूंवर) होणार्‍या अत्याचारांसंबंधी चर्चा झाली. ७ सप्टेंबर या दिवशी श्री ढाकेश्‍वरी मंदिरात झालेल्या या चर्चेत अल्पसंख्यांकांच्या धार्मिक आणि उपासनेच्या स्वातंत्र्याविषयी होणार्‍या गळचेपीवर विचार करण्यात आला. बांगलादेश मायनॉरिटी वॉचने मुसलमान आणि बांगलादेश शासन यांच्याकडून हिंदूंंवर होणार्‍या अत्याचारांविषयी राष्ट्रसंघाच्या पदाधिकार्‍यांना सत्यशोधन समितीचा अहवाल सादर केला. या वेळी मानवाधिकार पदाधिकार्‍यांनी सर्व माहिती जाणून घेतली आणि त्यावर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले.

सिंहस्थपर्वात साधू आणि भाविक यांनी उत्साहात केले दुसरे राजयोगी स्नान !

नाशिक येथे रामकुंडात स्नान करतांना भाविक
अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याला राजयोगी स्नानाचा पहिला मान !
      नाशिक - कुंभनगरी नाशिक येथे अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा आणि अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाडा या तिन्ही आखाड्यांच्या पारंपरिक मिरवणुकीस साधुग्राममधून सकाळी ६ वाजता आरंभ झाला. पारंपरिक वाद्ये, पारंपरिक शस्त्रे आदींचा समावेश असलेली मिरवणूक राजयोगी मार्गाने येऊन रामकुंडावर विसावली. यंदाच्या पर्वणीला अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याला राजयोगी स्नानाचा पहिला मान मिळाला.

रत्नागिरी येथील श्रीमती मंगला खेरआजी (वय ८३ वर्षे) संतपदी विराजमान !

पू. मंगला खेरआजी


अमेरिकेत भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीला ओसामा बिन लादेन संबोधून आक्रमण

मोदी शासन भारतीय वंशाच्या व्यक्तीवरील 
आक्रमणाविषयी अमेरिकेला खडसावेल का ?
    न्यूयॉर्क - अमेरिकेतील शिकागो येथे ओसामा बिन लादेन संबोधून भारतीय वंशाच्या इंदरजित सिंग मुक्कर या शीख व्यक्तीवर आक्रमण केल्याची घटना घडली. या प्रकरणी आक्रमणकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
    शिखांच्या एका संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत ९/११ आक्रमणाच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम चालू होता. त्या वेळी इंदरजित त्यांच्या घरातून दुकानाकडे जात होते.

निर्वासित मुसलमानांना सामावून घेण्यास काही युरोपियन देशांचा नकार

    स्ट्रॉसबर्ग (जर्मनी) - आय.एस्.आय.एस्. या जिहादी संघटनेच्या जाचाला कंटाळून इराक आणि सिरिया या देशातील लाखो लोकांनी युरोपच्या दिशेने कूच केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मानवतेच्या दृष्टीने या निर्वासित मुसलमानांना युरोपातील देशांनी आपापल्या क्षमतेने सामावून घ्यावे, असा प्रस्ताव युरोपियन युनियनने ठेवला आहे. त्या प्रस्तावावर १४ सप्टेंबर या दिवशी होणार्‍या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असला, तरी त्यापूर्वीच युरोपमधील अनेक देशांनी या निर्वासितांना सामावून घेण्यास नकार दिला.

बकरी ईदच्या कारणावरून नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील ७ हिंदुत्ववाद्यांना तडीपारीचा आदेश !

 • गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांच्या काळात धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचे धैर्य पोलिसांत आहे का ?
 • धर्मांध बकरी ईदला गोवंशाची हत्या करत असल्याने जनजागृती करणार्‍या हिंदूंनाच तडीपार करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?
ठाणे - नालासोपारा येथील गोरक्षा संघर्ष समितीच्या ७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी १० ते २६ सप्टेंबर या कालावधीसाठी वसई तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे. तसेच ५ कार्यकर्त्यांना सोपारा गावात येण्यासही बंदी घातली आहे. तसा आदेश जिल्हादंडाधिकार्‍यांनी त्यांना पाठवला आहे. २४ सप्टेंबर या दिवशी बकरी ईद असल्याने या गोप्रेमींना ही नोटीस दिली आहे. गेली १० वर्षे या हिंदुत्ववाद्यांना अशा प्रकारे नोटीस बजावण्यात येत आहे. यामध्ये सर्वश्री परेश बावेशी, हितेंद्र मेहता, रतनदास वैष्णव, मिलन बावेशी, उमेश पै, सुभाष राऊत, कुंदन राऊत यांचा समावेश आहे. (गोहत्या बंदीचा कायदा असूनही धर्मांधांना डोक्यावर बसवून हिंदूंना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असेल, तर अशाने हिंदूंना कधीतरी चांगले दिवस (अच्छे दिन) येतील का ? ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करते ! काँग्रेसच्या राज्यात चालू असणारा हिंदुत्ववाद्यांचा छळ भाजपच्या राज्यातही चालूच रहाणे, याला काय म्हणायचे ? - संपादक)

सलग २२ घंटे ऑनलाइन खेळ खेळल्यामुळे मुलाचा मृत्यू !

 • पालकांनो, पाल्याला मैदानी खेळ खेळण्याची आताच सवय लावा !
 • अन्यथा तंत्रज्ञानाचा हा अतिरेक गंभीर दुष्परिणाम भोगायला लावू शकतो !
 • आधुनिक विज्ञानाचे दुष्परिणाम !
    मॉस्को (रशिया) - सलग २२ घंटे ऑनलाईन खेळ खेळल्यामुळे दक्षिण रशियातील एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. बशकोरतोस्ताना प्रजासत्ताकमधील उचाली येथील रुस्तुम नावाच्या मुलाच्या पायाला ८ ऑगस्ट या दिवशी दुखापत झाली होती. त्याच्या पालकांनी सांगितले की, घरात बसून कंटाळा येत असल्यामुळे दिवसभर तो डिफेन्स ऑफ द अ‍ॅन्शंट्स हा खेळ खेळत असे आणि केवळ जेवणे अन् झोपणे यांसाठीच तो खेळणे थांबवत असे. रुस्तुम प्रतिदिन साडे सहा घंटे ऑनलाईन खेळ खेळत असे. एकदा तो त्याच्या खोलीत खेळत असतांना त्याची शुद्ध हरपली. त्यामुळे त्याला रुग्णालयात घेऊन जावे लागले; मात्र रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याने दीड वर्षांत दोन सहस्र घंटे ऑनलाईन खेळ खेळण्यात घालवले होते. न्यायालयाने त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी एक वैद्यकीय पथक नेमले आहे.

नाशिक येथील सिंहस्थपर्वातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. पुरोहित महासंघाच्या वतीने पहाटे ५.४५ वाजता मंत्रोच्चारात गोदावरी नदीची विधिवत् पूजा आणि आरती करण्यात आली.
२. रामकुंडातील पाण्यात यंदा पोलिसांनीच मानवी साखळी तयार केली. गत राजयोगी स्नानाला यासाठी स्वयंसेवी संस्थाचे साहाय्य घेण्यात आले होते.
३. पोलिसांकडून भाविकांना कपडे पालटण्यासाठी वस्त्रालयगृहाचाच वापर करण्याची सूचना करण्यात येत होती.
४. नवदुर्ग मित्र मंडळाचे श्री. अजय सोनावणे, त्यांचे काही कार्यकर्ते आणि स्वामी मित्र मंडळ यांचे कार्यकर्ते यांनी मिळून भाविकांना राजयोगी स्नान मार्ग दाखवण्यासाठी पोलिसांना साहाय्य केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून साधू, संत आणि महंत यांचे भावपूर्ण स्वागत !

मिरवणुकीच्या मार्गावर लावलेला फलक 

श्री गणेश मूर्तीविसर्जनाच्या बैठकीच्या वेळी हिंदु जनजागृती समितीस निमंत्रित करू ! - महापालिका आयुक्त

महापालिका आयुक्तांना (उजवीकडे) निवेदन देतांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते
      कोल्हापूर, १३ सप्टेंबर (वार्ता.) - श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी प्रदूषण मंडळ आणि शासन यांनी दिलेल्या सूचनांचे आम्ही पालन करत आहोत. तरीही श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या बैठकीच्या वेळी हिंदु जनजागृती समितीस निमंत्रित करू, असे आश्‍वासन कोल्हापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु एकताचे हिंदुराव शेळके, हिंदु महासभेचे संजय कुलकर्णी, राजेंद्र शिंदे, स्वाध्याय परिवाराचे पुरुषोत्तम पटेल, योग वेदांत सेवा समितीचे राजमोहन स्वामी, भारत स्वाभिमानचे संजय पाटील, इस्कॉनचे भाऊ पाडळकर, विद्यार्थी संघटनेचे नितीश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपूर येथे ऊर्जामंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधी यांना निवेदने

    नागपूर १३ सप्टेंबर - कथित पर्यावरणवाद्यांकडून नदीच्या प्रदूषणाच्या नावाखाली गणेशमूर्तीच्या वहात्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. गणेशोत्सवातील मूर्तीदान, कृत्रिम तलाव अशा पद्धतीचे सर्व अशास्त्रीय प्रकार थांबावेत, तसेच देहली येथे १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणारा शान-ए-पाकिस्तान हा भारत शासनाने आयोजित केलेला कव्वालीचा कार्यक्रम रहित करावा, या मागण्यांसाठी लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली.

त्र्यंबकेश्‍वर येथील सिंहस्थपर्वातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. २५ ते ३० विदेशी पत्रकारांनी कुशावर्ताच्या ठिकाणी येऊन वृत्तसंकलन केले.
२. वृत्तसंकलन करण्यासाठी आलेल्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने साधूंचे स्नान पूर्ण होण्याआधी स्नान केले.  (हिंदुद्रोही पत्रकार ! - संपादक)
३. विदेशातून आलेल्या इकाग्रा या महिलेने कुंभमेळ्यातील साधूंचे स्नान आवडल्याचे सांंगितले.
४. साधूसंत आणि भाविक स्नानासाठी आल्यावर कुशावर्त तीर्थात हार, फुले आणि अन्य साहित्य टाकत होते. परिसरही त्यामुळे अस्वच्छ होत होता; मात्र स्वच्छता कर्मचारी तत्परतेने ते स्वच्छ करत असल्यामुळे तेथे स्वच्छता होती.

राजयोगी स्नानाच्या मार्गावर स्थानिक महिलांनी स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे काढल्या रांगोळ्या !

भाविकांच्या भावाचा अवमान करणारे पोलीस !
       राजयोगी मार्गावर साधू-महंतांच्या स्वागतासाठी भाविकांनी रांगोळ्या काढल्या होत्या. असे असतांनाही पोलिसांनी त्यांची चारचाकी वाहने रस्त्याच्या बाजूने नेण्याऐवजी त्या रांगोळ्यांवरूनच नेत होते.

आजी अपंग असूनही रांगोळ्या फुलांनी सजवत होत्या.
त्यामुळे रांगोळ्या काढणार्‍या भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला.

महंत महामंडलेश्‍वर परमहंस नित्यानंद स्वामी यांचे राजयोगी स्नान बनले विशेष आकर्षण !

मिरवणुकीत सहभागी झालेले परमहंस नित्यानंद स्वामी
     महंत महामंडलेश्‍वर परमहंस नित्यानंद स्वामी यांनी त्यांच्या भारतीय आणि विदेशी भक्त परिवारासह राजयोगी स्नानाच्या आधी काढलेली मिरवणूक उठून दिसत होती. अन्यांच्या तुलनेत त्यांचे भक्त नामजप करत शिस्तबद्ध आणि इतरांचा त्रास होणार नाही, याची काळजी घेत मिरवणुकीत सहभागी झाले होते. (या भक्तांकडून इतरांनीही बोध घ्यावा ! - संपादक)

भोवळ आलेल्या भाविकाला सनातनच्या प्रथमोपचार पथकाकडून साहाय्य !

सनातनचे प्रथमोपचार पथक भाविकावर उपचार करतांना
     सिंहस्थ पर्वासाठी आलेले श्री. जनार्दन पांडे यांना भोवळ आली. तेव्हा सनातन संस्थेच्या प्रथमोपचार पथकातील आधुनिक वैद्य श्री. सुशील कुलकर्णी यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून श्री. पांडे यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. शिवाजी उगले उपस्थित होते.

साधू-महंतांचा जयजयकार करून भाविकांनी केले मिरवणुकांचे स्वागत !

सनातनचे संत आणि साधक मिरवणुकीचे स्वागत करतांना

श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन न करता हौदात अथवा घरात बालदीत करा ! - आदर्श शिक्षण मंडळाचे पालकांना हिंदु धर्मविरोधी आवाहन

आदर्श शिक्षण मंडळाने कधी अन्य धर्मियांच्या सणांना असे आवाहन केले आहे का ?
      मिरज, १३ सप्टेंबर (वार्ता.) - लवकरच गणेशोत्सव येत आहे. आपण सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. तरी गणेशमूर्ती शाडूची अथवी कागदाची करा, श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन न करता महापालिकेने केलेल्या हौदात, अथवा घरात बालदीत, अथवा पातेल्यात करा, निर्माल्य पाण्यात न सोडता ते निर्माल्य कुंडात सोडा, असे हिंदु धर्मशास्त्रविरोधी आवाहन आदर्श शिक्षण मंडळाने केले आहे. वरील गोष्टींविषयी पालकांनी त्यांचा अभिप्राय द्यावा, असे लेखी पत्र मंडळाची शाळा आदर्श शिक्षण मंदिर यांनी शेकडो विद्यार्थ्यांना दिले आहे.

आध्यामिक लाभ करून घेण्यापेक्षाही कुतूहलापोटी अनेक भाविकांची राजयोगी मार्गाच्या दुतर्फा गर्दी !

      राजयोगी स्नानानिमित्त आखाड्यांची निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी १३ सप्टेंबरला पहाटेपासूनच रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मिरवणुका चालू झाल्यानंतर महंतांना नमस्कार करण्याच्या जोडीला हर हर महादेव चा गजर करण्यात येत होता. काही ठिकाणी आखाड्यांमधील साधू - महंत यांच्यावर फुले उधळण्यात आली. लांबच लांब जाता असलेले, अंगाला भस्म लावलेले आणि धर्मरक्षणाचे प्रतिक म्हणून काठी किंवा तलवार मिरवणार्‍या नागा साधू भाविकांच्या कुतूहलाचा विषय बनले होते, या सगळ्या धामधुमीत या महापर्वणीचा आध्यात्मिक लाभ करून घेण्याच्याऐवजी भाविकांमध्ये केवळ उत्सुकतेतेच वातावरण दिसून आले. (हिंदूंनो, उत्सुकतेला जिज्ञासेची आणि कृतीची अर्थात धर्माचरणाची जोड दिली, तरच खर्‍या अर्थाने मनुष्य जन्माचे सार्थक होईल. - संपादक)

पोलिसांनी घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेमुळे भाविकांनी घेतला दुसर्‍या राजयोगी स्नानपर्वाचा आनंद !

      नाशिक, १३ सप्टेंबर (वार्ता) - नाशिक येथील दुसर्‍या राजयोगी स्नानाच्या वेळी पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे चित्र दिसत होते. (प्रत्येक वेळी हिंदूंना त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष का करावा लागतो ? दुसर्‍या पर्वस्नानाचा आनंद घेता आला; म्हणून भाविकांनी समाधान व्यक्त करून गप्प न बसता पहिल्या स्नानाच्या वेळी अडवणूक करणार्‍या पोलिसांवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा ! - संपादक) यामुळे भाविकांना दुसर्‍या राजयोगी स्नानपर्वाचा आनंद घेता आला. असे असले, तरी काही ठिकाणी पोलिसांच्या आडमुठेपणामुळे साधू-महंत आणि भाविक यांना त्रास झाला. तरीही मागच्या वेळेपेक्षा या वेळी तो अल्प होता, असे भाविकांचे म्हणणे आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
Bakri yidke karan Maharastrake Nalasoparame 7 gorakshakonko tadiparaki notice.
- kya Hindu tyoharoke dinome bhi police dharmandonko aisehi tadipar karenge ?
जागो !
बकरी ईदके कारण महाराष्ट्रके नालासोपारामें
७ गोरक्षकोंको तडीपारकी नोटीस. - क्या हिंदु त्योहारोंके दिनोमें पोेलीस धर्मांधोंको ऐसेही तडीपार करेंगे ?

हिंदुत्वाचे नाते

हिंदूंनो, जगी मी हिंदु म्हणून मिरवूया अभिमानाने ।
हिंदूंशी जवळीक वाढवूया हात जोडून नमस्काराने ॥
कठीण प्रसंगी एकमेका साहाय्य करूया बंधूभावाने ।
हिंदूंसाठी प्रत्येक गोष्ट पाहूया केवळ हिंदू या नात्याने ॥
- श्री. अनिल कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

द्रुतगती मार्गाची निर्मिती म्हणजे अशास्त्रीय बांधकामाचा नमुना !

      सध्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गात दरड न कोसळण्याविषयी दुरुस्ती आणि रॉक बोल्टिंग करून उच्च क्षमतेच्या जाळ्या बसवण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी या महामार्गावर आडोशी आणि खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळली आणि दोन जण मृत्यूमुखी पडले. अशा प्रकारच्या दरड कोसळण्यामागील कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
द्रुतगती महामार्गाची निर्मिती अशास्त्रीय पद्धतीने
     कोणतीही डोंगर खोदाई करतांना बहुतेक ती सर्व ठिकाणी ९० अंशामध्ये उभट खोदाई केलेली आढळते. हेच मुख्य कारण दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदुजागृती डॉट ऑर्ग (Hindujagruti.org) या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा ऑगस्ट २०१५ मधील आढावा

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या
    ही वाचकसंख्या गूगल अ‍ॅनॅलिटिक्स या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून मिळते.

२. संकेतस्थळावरील राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी स्वाक्षरी मोहिमा
    राष्ट्र आणि धर्म हितार्थ आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात हिंदुत्ववाद्यांनी शासनापुढे ठेवलेल्या मागण्यांच्या संदर्भात समितीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमा राबवण्यात आल्या.
अ. आतंकवादी याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला उपस्थित असणार्‍यांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा.
आ. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची कार्यवाही करून सामूहिक ठिकाणी नमाज पढण्यावर बंदी घालावी.

सिंहस्थातील स्नानासह तेथील ज्ञानतरंगांचा लाभ घेऊन पापक्षालन करावे ! - वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

वैद्य उदय धुरी
     मुंबई - आपले शरीर हे कुंभाप्रमाणे आहे. शरिरात असणारी सर्व तत्त्वे पंचमहाभूतांच्या रूपाने बाहेरही असतात. म्हणजे जे पिंडात आहे, तेच ब्रह्मांडातही असते; म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हटले जाते. पिंडाला ब्रह्मांडाकडे जाण्याची ओढ असते. सिंहस्थ पर्वाच्या कालावधीत देवता उपस्थित असतात. ऋषीमुनी राजयोगी (शाही) स्नानासाठी येतात. ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे भूगर्भातील आध्यात्मिक शक्तीही कार्यरत होते. जलप्रवाहत आलेली ही ईश्‍वरी ऊर्जा स्नान करणार्‍याच्या शरिरातून वाहू लागते. त्याचा आध्यात्मिक लाभ भाविकांना होतो. पहाटेच्या मंगलसमयी आणि या राजयोगी स्नानाच्या सुमुहुर्तावर वातावरणात विशिष्ट प्रकाशतरंग आणि ज्ञानतरंग पसरलेले असतात.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.

व्यक्तीगत आयुष्यामध्ये अपयशी ठरलेले लोकच पुढे जाऊन संन्यास घेतात, असे म्हणणार्‍या प्रसारमाध्यमांना चपराक !

हिंदु समाजाला साधू-संतांचे महत्त्व कळण्यासाठी हे विशेष सदर !
    हिंदु संतांवर सातत्याने टीका करणे, ही सध्या फॅशन झाली आहे. व्यक्तीगत आयुष्यामध्ये अपयशी ठरलेले लोकच पुढे जाऊन संन्यास घेतात, अशा आशयाची टीका प्रसारमाध्यमे सातत्याने करतांना दिसतात. या प्रसारमाध्यमांना आम्ही सांगू इच्छितो की, हिंदु संत बाह्यतः मोठे केस आणि दाढ्या राखतांना दिसत असले, तरी त्यांचा बुद्ध्यांक मात्र उच्च आहे. बरेच संत हे शल्यचिकित्सक, हृदयरोगतज्ञ, कर्करोगतज्ञ आहेत. श्री श्री रविशंकरजी, साध्वी ऋतंबरा हेही उच्च शिक्षित असून त्यांनी त्यांचे आयुष्य हिंदूंच्या विकासासाठी वेचले आहे.
काही हिंदु संतांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा : संत-महंत हे कोणत्याही शासकीय साहाय्यातेविना, तसेच राजकीय आणि शारीरिक स्तरांवर विरोध होत असतांना गेली कित्येक वर्षे समाजसेवा करत आहेत. विविध संत नेमके कोणते सामाजिक उपक्रम राबवत आहेत, हे जनतेला ज्ञात व्हावे, यासाठी काही जणांच्या कार्याचा आढावा येथेे देत आहोत.

हिंदूंचे धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची अपरिहार्यता स्पष्ट करणारे प्रसंग !

त्र्यंबकेश्‍वर येथे परंपरा मोडून साधूंच्या आधी स्वतः स्नान करणारे नतद्रष्ट !
      आखाडे आणि साधूसंत यांचे स्नान दुपारी १२.३० वाजेपर्यंत झाल्यानंतर सामान्य भाविकांच्या पर्वणी स्नानाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र निरंजनी आणि आनंद आखड्यांचे स्नान झाल्यावर भाविकांनी परंपरा मोडत अन्य साधूंच्या आखाड्यात मोठ्या प्रमाणावर शिरकाव करून मधेच स्नान उरकून घेतले. (साधू-संतांनी स्नान केल्यावर भाविकांनी केले, तर त्यांना चैतन्याचा अधिक लाभ होऊ शकतो, तसेच संत हे ईश्‍वराचे सगुण रूप असल्याने त्यांना स्नानाचा मान देणे आवश्यक आहे; मात्र धर्मशिक्षण नसल्यामुळे भाविकांकडून अशी हिंदुद्रोही कृती होते ! - संपादक)

सिंहस्थ पर्व, हे धर्मप्रसाराचे व्यासपीठ !

       ही हिंदूंचे सांघिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणारी यात्रा आहे. कुंभमेळ्यामध्ये सर्व पंथ आणि संप्रदाय यांतील साधूसंत, सत्पुरुष आणि सिद्धपुरुष सहस्रोंनी एकवटतात. कोट्यवधी भाविकही धार्मिक कृती करण्यासाठी जातात. कोट्यवधींच्या उपस्थितीत पार पडणारे कुंभक्षेत्रांवरील मेळे म्हणजे हिंदूंची विश्‍वातील सर्वांत मोठी धार्मिक यात्राच होय ! या यात्रेच्या वेळी जमलेल्या भाविकांना धर्मशास्त्र समजावून सांगणे, समर्पितभावाने साधू-संतांना साहाय्य करणे आणि हिंदु धर्माचा प्रसार करणे, ही सर्वश्रेष्ठ धर्मसेवा आहे !

क्रांतीकारक भगतसिंह यांच्या नावालाही उर्दू शब्द वापरणारे पंजाब शासन !

     चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहीद-ए-आजम सरदार भगतसिंह विमानतळ, असे नाव ठेवण्यावरून हरियाणा आणि पंजाब शासनांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
भारतातील ४० कोटी जनता अजूनही विजेचा वापर करू शकत नाही. ही आहे ६८ वर्षांच्या लोकशाहीची देणगी ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

साधूंच्या हातात शस्त्रे असण्याचे महत्त्व !

शस्त्र हाती घेतलेले साधू
      पृथ्वीराज चौहान याने देशाच्या रक्षणासाठी नागा साधूंचे साहाय्य घेतले आणि नागा साधूंनी त्याचे सैन्य होऊन त्या वेळी मुसलमान आक्रमकांपासून राज्याचे रक्षण केले. औरंगजेबाच्या सैन्यातील हिंदु सैनिक साधूंच्या बाजूने आले आणि हिंदु सैन्याचा विजय झाला. साधू जरी हिमालयात रहात असले, तरी राष्ट्राच्या रक्षणासाठी ते कार्यरत असतात आणि प्रत्यक्षात त्यांनी लढून राष्ट्राचे रक्षण केल्याचेही इतिहासात अनेक दाखले आहेत. क्षात्रधर्माचे प्रतीक म्हणून आजही नागा साधूंच्या हातात शस्त्रे असतात आणि त्याचे प्रदर्शन करत ते मिरवणुका काढतात. साधूंनी हिंदु राजांना साहाय्य केल्याने त्यांनी त्यांना छत्रचामरे दिली, त्यांच्या हत्ती, घोडे, उंट यांवरून वाजत-गाजत मिरवणुका काढल्या. आजही संन्यस्त असूनही साधू मिरवणुकांद्वारे स्नानाला येतात.

अनधिकृत मशिदींवर कारवाई न करता केवळ भोंगे उतरवणार्‍या पाट्याटाकू प्रशासकीय अधिकार्‍यांना फाशी द्या !

      सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी मुसलमान समाजाच्या प्रतिनिधींसह एक बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार येथील ५ अनधिकृत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले.

सिंहस्थपर्वात सनातन प्रभातच्या प्रतिनिधींची धर्मसेवा !

     महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सनातन प्रभातच्या वाचकांना सिंहस्थपर्वातील प्रमुख राजयोगीस्नानाचा सोहळा शब्दचित्रण आणि छायाचित्रण यांद्वारे अनुभवता येण्यासाठी सनातन प्रभातचे खालील विशेष प्रतिनिधी, वार्ताहर आणि छायाचित्रकार यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे सनातन प्रभात विशेष ३ पृष्ठे वाचकांपर्यंत पोहचवू शकला. - संपादक
१. विशेष प्रतिनिधी : श्री. नीलेश कुलकर्णी (गोवा) आणि श्री. अरविंद पानसरे (मुंबई)
२. वार्ताहर : कु. शलाका सहस्रबुद्धे, श्री. महावीर श्रीश्रीमाळ, श्री. भूषण कुलकर्णी (सर्व पुणे)
श्री. शैलेश पोटे (नाशिक) आणि श्री. नीलेश बोरा (नाशिक)
३. छायाचित्रकार : श्री. सचिन कौलकर (सांगली), श्री. संतोष पाटणे (सोलापूर), श्री. उमेश निकम आणि श्री. गणेश टेकवडे (सर्व पुणे)

जनहो, हिंदी भाषेवरील अन्याय वेळीच न रोखल्यास सामान्यजनांच्या मनातून देशभक्तांच्या स्मृतींचे अवशेष पूर्णतः नष्ट होतील !

हिंदी राजभाषा दिनाच्या निमित्ताने...
१. हिंदी भाषा सोपी होण्यासाठी एखाद्या शब्दाला पर्याय म्हणून 
विदेशी शब्द वापरण्याचा आदेश देणारे पंतप्रधान मनमोहन सिंह आणि
 ग्रामीण क्षेत्रांचे इंग्रजीकरण करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या ६ सहस्र 
शाळा चालू करण्याची घोषणा करणारे केंद्रीय मानव संशोधन विकास मंत्रालय !
    काही कालावधीपूर्वी केंद्रीय हिंदी परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतांना (तत्कालिन) पंतप्रधान श्री. मनमोहन सिंह यांनी हिंदी भाषा सोपी करण्याच्या नावावर भोजन (जेवण) या शब्दाला पर्याय म्हणून लंच, डिनर या शब्दांचा उपयोग करण्याचा आदेश दिला. मागील ६६ वर्षांत कार्यरत असलेल्या शासनाला अशा प्रकारच्या अनावश्यक विदेशी शब्दांचा उपयोग हिंदी भाषेत करण्याची आवश्यकता भासली नाही.

प्रशासनाकडून भाविकांची पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था नाही !

      लोकांनी कुंडाच्या बाहेर पादत्राणे काढल्यावर प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची पादत्राणे कचरा उचलण्याच्या गाडीत भरून दूर टाकून देण्यात येत होती. यात एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचा एक बुटही स्वच्छता कर्मचार्‍यांनी फेकून दिल्यामुळे अधिकार्‍यांची अडचण झाली. तो अधिकारी त्याला, बूट आणून दे, असे सांगत होता.
    आर्य चाणक्य यांनी नंदाचे कुशासन उध्वस्त करण्याची शपथ घेतली होती आणि साधनेच्या बळावर धर्माधिष्ठित राष्ट्राची स्थापना केली. राष्ट्र आणि धर्मासाठी कार्यरत प्रत्येक हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे.
- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

मुळाशी न जाता, म्हणजे देशद्रोह्यांना लगेच फाशी न देता केवळ वरवरचे उपाय करणारे भाजप शासन !

      लष्कर-ए-तोयबा, या जिहादी आतंकवादी संघटनेचा अयोध्या, मथुरा आणि काशी या देशातील प्रमुख मंदिरांना लक्ष्य करण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यावर शासनाने रामजन्मभूमीसह इतर दोन्ही मंदिरांची सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे निर्देश दिले.

अनेक गुन्हे उघड न झाल्यासंदर्भात पुरोगामी आरडाओरड का करत नाहीत ?

      पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे गेल्या ७ वर्षांत झालेल्या खुनांपैकी ७३ गुन्ह्यांचा तपास अजून उघडकीस आलेला नाही. त्यांपैकी ५६ गुन्ह्यांचा तपास करण्यात अपयश आल्याने त्याच्या धारिका बंद करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रभाषा हिंदी (दु:स्थिती आणि ती रोखण्यासाठीचे उपाय)

 राष्ट्राभिमान वाढवणार्‍या हिंदी भाषेच्या पुनरुत्थानासाठी बळ देणारा सनातनचा ग्रंथ !
 •  हिंदी भाषेच्या निर्मितीची प्रक्रिया
 •  हिंदी भाषेची वैशिष्ट्ये आणि तिची अपरिहार्यता
 •  राष्ट्रभाषेसाठी आग्रही भूमिका न घेणारे हिंदू
 •  हिंदी भाषेला दुय्यम स्थान देणारे नेते अन् शासन
 •  इंग्रजीसह परकीय भाषांचे हिंदीवरील आक्रमण
संपर्क : ९३२२३ १५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

हिंदी भाषेचा विश्‍वभरात होत असलेला प्रसार

    रशियातील मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे तेथील शासनाने एक हिंदी विश्‍वविद्यालय स्थापन केले आहे. संपूर्ण विश्‍वातील हिंदी शिकण्याच्या सर्वोत्तम सुविधा रशियामध्ये उपलब्ध आहेत. हिंदी संयुक्त राष्ट्रांच्या भाषांमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे. विश्‍वातील ३३ देशांतील १२७ विश्‍वविद्यालये आज स्वेच्छेने हिंदी भाषेला जवळ करत आहेत. हिंदी भाषेतील शब्दसंख्या ७ लक्ष आहे. इंग्रजी भाषेत मात्र केवळ अडीच लाख शब्द आहेत. (साप्ताहिक हिन्दू सभा वार्ता, २६ नोव्हेंबर से २ डिसेंबर २०१४ )प.पू. डॉक्टरांवर अपार श्रद्धा आणि प.पू. डॉक्टरांच्या सतत अनुसंधानात असल्याने गुरु हेच अवघे विश्‍व असलेल्या रत्नागिरी येथील श्रीमती मंगला खेरआजी (वय ८३ वर्षे) संतपदी विराजमान !

पू.(श्रीमती) खेरआजी यांचा भगवान श्रीकृष्णाची
प्रतिमा देऊन सन्मान करतांना सौ. मीनल खेर
      वर्ष १९९८ पासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणार्‍या श्रीमती मंगला खेर यांनी त्यांच्या मुलांवर केलेेल्या उत्तम संस्कारांमुळे त्यांच्या दोन्ही मुली, तसेच मुलगा आणि सून हे सर्व जण साधना करत आहेत. वर्ष २०११ मध्ये खेरआजींनी ६० प्रतिशत आध्यात्मिक स्तर प्राप्त केला आणि वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेला त्यांचा आध्यात्मिक स्तर ६८ प्रतिशत झाल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगितलेे होते. त्यांच्या दोन्ही मुलीही आईच्या पावलावर पाऊल ठेवून साधनेची वाटचाल करत असून सौ. माधुरी दीक्षित, सातारा यांचा आध्यात्मिक स्तर ६३ प्रतिशत आणि सौ. रोहिणी ताम्हनकर, देवगड यांनी ६१ प्रतिशत स्तर प्राप्त केला आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर गोरक्षकांना तडीपार करणारे प्रशासन भारताचे कि पाकचे ?
      २४ सप्टेंबर या दिवशी बकरी ईद असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी नालासोपारा (जि. पालघर) येथील गोरक्षा संघर्ष समितीच्या ७ कार्यकर्त्यांना १० ते २६ सप्टेंबर या कालावधीसाठी वसई तालुक्यातून तडीपारीची नोटीस बजावली आहे.

पू. दासआजी पू. सौरभ जोशी यांना भेटायला आल्यानंतर जाणवलेली सूत्रे

पू. सौरभ जोशी यांचे भावपूर्ण दर्शन घेतांना
पू. दासआजी. सोबत सनातनचे साधक श्री. रूपेश रेडकर
१. पू. दासआजी आणि पू. सौरभ यांना 
एकमेकांच्या भेटीची ओढ लागणे आणि भेटल्यानंतर पू. आजींची भावजागृती होणे 
     २.१.२०१४ या दिवशी सकाळी १० वाजता पू. दासआजीपू. सौरभ यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. येथे येण्यापूर्वी मला पू. सौरभ यांना भेटण्याची ओढ लागली होती, असे त्या म्हणाल्या. आजींना संत घोषित करण्यापूर्वीच त्यांना भेटण्यासाठी पू. सौरभदेखील आतुर झाल्याचे आजी ३८, या त्याच्या बोलण्यातून मला जाणवले. पू. सौरभना पहाताच पू. आजींची भावजागृती झाली. पू. आजींना खोलीत आल्यावर पुष्कळ छान वाटले. 

पू. श्रीमती हेमलता दासआजींची भेट म्हणजे देवाने दिलेला प्रसाद !

      सनातन संस्थेच्या ३८ व्या संत पू. दासआजी ३.१.२०१४ मध्ये दादर सेवाकेंद्रात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर मला आलेल्या अनुभूती, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे अन् त्यांनी सांगितलेली सुवचने येथे देत आहे.
१. पू. आजी येण्यापूर्वी आणि आल्यानंतर आलेल्या अनुभूती 
१ अ. पू. आजी येणार हे माहीत नसतांना निरुत्साह जाणवून मनात नकारात्मक विचार येणे आणि प्राणशक्ती न्यून होणे : पू. दासआजी येणार हे माहीत नसतांना मला त्रास होऊ लागला. मला आदल्या दिवसापासून थकवा आणि निरुत्साह जाणवत होता. माझ्या मनात अधूनमधून नकारात्मक विचार येत होते. माझी प्राणशक्ती न्यून झाली. त्यानंतर मला सायंकाळी पू. आजी दादर सेवाकेंद्रात येणार असल्याचे कळले. दुसर्‍या दिवशीही माझी प्राणशक्ती अल्पच होती. 
१ आ. भाषा कळत नसतांनाही भजन ऐकतांना साधिकेची भावजागृती होणे : पू. आजी बंगाली भाषेत भजन म्हणत असतांना ती भाषा मला कळत नव्हती; पण त्याचा भावार्थ प्रत्येक साधकामध्ये ईश्‍वराला पहाणे, असा असल्याचे मला जाणवले आणि माझी भावजागृती झाली.

संसारात राहूनही अलिप्त असलेल्या आणि सतत कृष्णाच्या अनुसंधानात रहाणार्‍या पू. श्रीमती हेमलता दासआजी (वय ७८ वर्षे) !

पू. श्रीमती हेमलता
दासआजी
       १.२.२०१५ या दिवशी आम्ही कोलकता येथे पू. दासआजींची भेट घेण्यास गेलो होतो. त्या त्यांचा मुलगा डॉ. दास यांच्यासमवेत मॉरीशस येथे रहातात. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. प्रत्येक कृती कृष्णासाठी करत आहे, असा भाव 
असल्याने कृष्णानंद अनुभवणे 
      आम्ही पू. दासआजींच्या निवासस्थानी पोहोचलो. तेव्हा त्या साध्या कपड्यांमध्ये स्वयंपाकघरात मुलासाठी स्वयंपाक करत होत्या. त्यांनी स्वतः आम्हाला चहा करून दिला आणि आमच्याशी पुष्कळ प्रेमाने बोलल्या. त्या म्हणाल्या, मी जे काही करते ते स्थुलातून माझ्या मुलासाठी करतांना दिसत असले, तरी मी प्रत्येक कृती माझ्या कृष्णासाठी करते. मला मनोमनी वाटते की, माझा कृष्ण गाय घेऊन वनात गेला आहे. तो मी बनवलेले अन्न ग्रहण करण्यासाठी येणार आहे. मी कृष्णाच्या आनंदात असते. संसारातील सर्व नात्यांना काहीही अर्थ नाही. मी माझ्या मुलासाठी जे काही करते, ते मात्र कर्तव्य म्हणून करते. हे सांगतांना त्या रडू लागल्या. 
       पू. दासआजी प्रत्येक कृती करतांना सतत कृष्णाच्या अनुसंधानात असतात. त्या संसारात राहूनही अलिप्त आहेत, असे जाणवले.

स्वतःतील दायित्वशून्यता आणि साधकत्वाचा अभाव यांमुळे हितचिंतकांच्या संदर्भात गंभीर चुका करून त्यांची नाराजी ओढवून घेणारे कार्यकर्ते !

      विविध राज्यातील कार्यकर्त्यांकडून वाचक, हितचिंतक, तसेच धर्माभिमानी यांच्या संदर्भात गंभीर चुका होत आहेत. कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुकांच्या संदर्भात काही हितचिंतकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया, तसेच अशा चुका टाळण्यासाठी लक्षात घ्यावयाचे दृष्टीकोन पुढे देत आहे.
१. सभेच्या सेवेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांसाठी बनवलेली भाजी मंदिरातून न आणल्याने ती वाया 
जाणे, परिणामी तेथील व्यक्तीने तुमच्यामध्ये समन्वय फारच अल्प आहे, 
अशी प्रतिक्रिया व्यक्त करणे 
     कर्नाटकातील बेंगळुरू येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या सेवेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांसाठी एका मंदिरातून जेवण घेऊन येण्याची सेवा सौ. पौर्णिमा प्रभु यांच्याकडे होती. सौ. प्रभु यांनी ती सेवा व्यवस्थित समजून घेतली नाही. त्यामुळे त्यांनी सेवेतील कार्यकर्त्यांसाठी मंदिरात बनवून ठेवलेली भाजी आणली नाही. या प्रसंगानंतर ८ दिवसांनी समितीचा एक कार्यकर्ता मंदिरात गेला असता मंदिरातील एक व्यक्ती त्यांना म्हणाली, तुमच्यामध्ये समन्वय फारच अल्प आहे. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही भाजी न नेल्यामुळे ३० जणांची भाजी वाया गेली.

प.पू. डॉक्टरांप्रती भाव असलेले आणि स्वतःचे शेवटचे दिवस गुरुदेवांच्या सुकोमल चरणी व्यतीत करण्याची इच्छा प्रदर्शित करणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. सतीश पंडित, हावेरी, कर्नाटक (वय ७३ वर्षे) यांचे प.पू. डॉक्टरांना पत्र

डॉ. सतीश पंडित
१. साधनेच्या प्रवासात प.पू. डॉक्टरांच्या कृपेचा 
वर्षाव अनुभवणारे प्रसंग !
१. प.पू. गुरुदेवांचे प्रथम दर्शन आणि भाव जागृत करणारी त्यांची प्रत्येक भेट ! : डिसेंबर १९९७ मध्ये कारवार येथे प्रथम तुम्हाला पाहिले. त्यानंतर प्रतिवर्षी गोवा येथील आश्रमात मी येत होतो. गेली १४ वर्षे प्रत्येक गोवा भेटीच्या वेळी आमची कुलदेवी श्री शर्वाणीदेवीला जात असे आणि नंतर तुम्हाला भेटायला येत असे. आपल्या भेटीच्या प्रत्येक वेळी माझी भावजागृती होऊन डोळ्यांतून अश्रू वहात असत. १९९८ मध्ये फोंडा येथे झालेल्या सर्वधर्मसभेच्या वेळी तुम्हाला दुरून पाहूनही माझी भावजागृती झाली होती. त्यानंतर आम्ही अमेरिकेला गेलो. 

प्रतिवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या काळात दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेला साधकांचा आत्मोन्नतीदर्शक आढावा वाचल्यावर मनात आलेले विचार !

१. पूर्णवेळ साधक होऊन १६ - १७ वर्षे झाली, तरी आध्यात्मिक प्रगती झाली नाही, असे वाटून व्यवहारात एखाद्याने ठरवले, तर तो पुष्कळ पैसे कमवू शकतो, असा विचार येणे : मी पूर्णवेळ साधना करायला लागून १६ - १७ वर्षे झाली. एवढा वेळ जर मी व्यवहाराला दिला असता, तर एव्हाना मी चांगली श्रीमंत झाले असते; पण आज माझी ६० टक्के आध्यात्मिक पातळीही झाली नाही. या अनुषंगाने पुढे विचार आला, एखाद्याने आज जरी ठरवले की, मला पैसे कमवायचे आहेत, तर थोडे प्रयत्न करून त्याला नोकरी लागेल. आणखी पैसे हवे असतील, तर तो एका वेळी दोन-तीन कामे करील. हे करत असतांना तो त्याला आवडेल, तसे जीवन जगू शकेल. कधीतरी कामे बाजूला ठेवून फिरायला जाऊ शकेल. फावल्या वेळात दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहू शकेल ! त्याला पुष्कळच पैसे कमवायचे असतील, तर तो वाममार्गाचाही वापर करू शकतो आणि पुष्कळ पैसा कमावू शकतो.

चीनमध्ये राहून आयुर्वेदाचा अभ्यास करणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बेंगळुरू (कर्नाटक) येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपूर्वा विजाशेखर (वय २२ वर्षे)

कु. अपूर्वा विजाशेखर
१. तत्परता 
      अपूर्वाला कोणताही संदेश दिला, तरी ती तत्परतेने उत्तर देते. काही माहिती हवी असल्यास लगेच ई-मेल द्वारा पाठवते आणि ई-मेल पाठवल्याचा लघुसंदेश पाठवते. 
२. प्रामाणिकपणा 
     ती सांगते, मी अधिक नामजप करत नाही. माझ्यात स्वभावदोषही पुष्कळ आहेत. मी सेवाही अधिक करत नाही, तरीही प.पू. गुरुदेव अनुभूती देतात आणि प्रत्येक वेळी सेवेची संधी देतात. गुरुपौर्णिमेच्या वेळी तिला आलेल्या अनुभूतीची आठवण होताच तिची भावजागृती होते आणि ती स्वतःहून विचारते, मी काय प्रयत्न करू ? तिच्या आईने तिला देवाशी अनुसंधान वाढवण्यास सांगितले आहे; परंतु तो प्रयत्नही अल्प पडतो, असे ती मोकळ्या मनाने सांगते.

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

विविध सेवांसाठी वाराणसी आणि देहली सेवाकेंद्रांत साधकांची तातडीने आवश्यकता !
      वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, लेखा, प्रसार आदी सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. यासमवेतच विद्युत्-जोडणी, सुतारकाम, रंगकाम आदी बांधकामाच्या संदर्भातील कौशल्य असलेल्या सेवा, तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण (सुपरविझन) करू शकणारे साधकही हवे आहेत.
      देहली सेवाकेंद्रात वाहन, स्वयंपाक, लेखा आदी विभागांमध्ये, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे.
      जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी वाराणसी अथवा देहली सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा vishwadeep2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०१५)

वाचक, हितचिंंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात यथाशक्ती हातभार लावण्याची अमूल्य संधी !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असणारे सनातनचे आश्रम
आणि सेवाकेंद्रे यांमध्ये संगणक अन् भ्रमणसंगणक यांची आवश्यकता !
     हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे ध्येय शीघ्रतेने साकार होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, तसेच उत्पादने आणि सनातन प्रभात नियतकालिके या माध्यमांतून जनसामान्यांमध्ये राष्ट्र अन् धर्म यांच्या संदर्भात जागृती केली जाते. राष्ट्र-धर्म कार्याच्या अंतर्गत विविध सेवांसाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले संगणक आणि भ्रमणसंगणक यांचा वापर केला जातो.
      विविध आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये पुढील क्षमतेचे संगणक अन् भ्रमणसंगणक यांची आवश्यकता आहे.जे वाचक, हितचिंंतक, धर्मप्रेमी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्यात यथाशक्ती आर्थिक साहाय्य करून खारीचा वाटा उचलू इच्छितात, त्यांनी रामनाथी आश्रमात श्री. अजय प्रजापती यांच्याशी ०८४५१००६०४२ अथवा ९४०४९५६०२३ या क्रमांकांवर अथवा hwpanvel@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क करावा.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०१५)

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे
केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे !
      १७.९.२०१५ या दिवशी श्री गणेशचतुर्थी आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला असून त्या अंतर्गत धार्मिक कृतियोंका शास्त्र या विषयाचे ७ धर्मसत्संग आहेत. हरितालिका, ऋषिपंचमी आणि अनंत चतुर्दशी या संदर्भातील धर्मशास्त्रीय माहिती सांगणारे धर्मसत्संगही बनवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे श्री गणेशाच्या संदर्भातील माहिती अंतर्भूत असणारे अध्यात्मशास्त्र या विषयाचे ८ धर्मसत्संगही उपलब्ध आहेत.
      हे सर्व सत्संग हिंदी भाषेत असून प्रत्येकाचा कालावधी २८ मिनिटे आहे. धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
अंनिसवाल्यांना चपराक देणारा श्रद्धेचा मेळा !
नाशिक येथील सिंहस्थपर्वाला कोणत्याही निमंत्रणाविना, तसेच प्रसारमाध्यमांतून विज्ञापन वा शासनाकडून व्यवसायात सूट, आर्थिक अनुदान आदी नसतांना लाखो भाविक येतात, याचे मुख्य कारण म्हणजे हिंदूंची धर्मश्रद्धा होय. गोदावरीमातेवरील श्रद्धेपोटी हिंदु समाज साधूसंतांसह एवढ्या मोठ्या संख्येने तेथे एकत्रित येतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या नास्तिकवादी संघटनाही श्रद्धाहीन नास्तिकांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण तर सोडाच; पण निमंत्रण देऊनही १०० लोकांचेही एकत्रीकरण करू शकत नाहीत. यावरून हिंदु धर्माचे अद्वितीयत्व लक्षात येते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले, (१३.९.२०१५)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरी संपत्ती !
    वेळ म्हणजे खरी संपत्ती ! ती एकदा गेली की,
 परत येत नाही;  म्हणूनच प्रत्येक क्षणाचा उपयोग करा. 
कधीही वेळ वाया घालवू नका !     
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

साधना

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान

व्यावहारिक प्रश्‍न आणि संत
     संत उत्स्फूर्तपणे बोलतात ते खरे. एखाद्याच्या प्रश्‍नाला लगेच उत्तर दिले तर ते खरे समजायचे, थोड्या वेळाने दिले तर ते खोटे असू शकते. एखाद्याने प्रश्‍न विचारल्यावर संत उत्तर देतात, ते बहुधा त्याला बरे वाटावे असे असते. (हे उत्तर बिंब- प्रतिबिंब या न्यायाने असते; म्हणजे त्याला जे उत्तर हवे असते (बिंब), त्याचे प्रतिबिंब संतांच्या मनात पडून ते त्याप्रमाणे सांगतात.) संतांना व्यवहारातील प्रश्‍नांविषयी, म्हणजे मायेविषयी, काहीही सांगायला आवडत नाही. संत अध्यात्मविषयक प्रश्‍नांची उत्तरे आवडीने सांगतात आणि ती कधीच चुकीची असत नाहीत.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

निरर्थक आक्षेप !

 
       राजधानी देहलीमधील औरंगजेब रस्त्याचे नाव पालटून मिसाईल मॅन म्हणून जगप्रसिद्ध झालेले भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले. क्रूरकर्मा औरंगजेब आणि भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांतील कोणते नाव निवडायचे ? असा प्रश्‍न शाळेतील विद्यार्थ्यांना विचारला, तर विद्यार्थी डॉ. कलाम यांचे नावच सांगतील. औरंगजेबचा इतिहास भारतियांना माहीत आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा धर्मांतरासाठी त्याने केलेला छळ आणि क्रूरपणे त्यांचा केलेला वध हिंदू विसरू शकत नाहीत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn