Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

आज पोळा

विनम्र अभिवादन !

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी

वर्ष २००६ च्या मुंबई लोकल गाड्यांमधील बॉम्बस्फोट मालिकेच्या प्रकरणी १२ धर्मांध दोषी !

१४ सप्टेंबरला सुनावली जाणार शिक्षा !
जनतेचा जीव घेणार्या घटनेचा निकाल लागण्यास ९ वर्षे लावणारी न्याययंत्रणा ! न्यायदानातील अशा विलंबामुळे जनतेचा न्याययंत्रणेवरील विश्वा्स उडत चालला आहे ! हिंदु राष्ट्रात गुन्हेगारांना त्वरित कठोर शिक्षा करणारी न्याययंत्रणा असेल !
मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकलगाड्यांमध्ये ११ जुलै २००६ या दिवशी झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट मालिकेच्या प्रकरणाचा निकाल अखेर ९ वर्षांनंतर ११ सप्टेंबर या दिवशी लागला. विशेष मोक्का न्यायालयाने १३ आरोपींपैकी १२ जणांना दोषी ठरवले. १४ सप्टेंबर या दिवशी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालय दोषींना शिक्षा सुनावणार आहे. अब्दुल वाहिद शेख या एका आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. 

महाविद्यालयांमध्ये रामायण, महाभारत आणि भगवद्गीता शिकवणार

सांस्कृतिक प्रदूषण दूर करण्यासाठी केंद्रशासनाचा कार्यक्रम
नवी देहली - केंद्रातील भाजप शासन आता देशातील 'सांस्कृतिक प्रदूषण' दूर करण्यासाठी सरसावले असून थेट महाविद्यालयांमध्ये रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचे धडे दिले जाणार आहेत. विरोधकांच्या भगवेकरणाच्या टीकेला न जुमानता हा पालट घडवून आणणार असल्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी स्पष्ट केले.

'सॉक्रेटीस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम' या नाटकाला प्रमाणपत्र देऊ नये !

मुंबई, ११ सप्टेंबर (वार्ता.) - प्रमाणपत्र न घेताच १०० हून अधिक ठिकाणी प्रयोग करणार्या, 'सॉक्रेटीस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम' या नाटकाला रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळाने प्रमाणपत्र देऊ नये, तसेच हा अवैध प्रयोग केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भातील शिफारस पोलिसांना करावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केली आहे. त्यांनी तशा आशयाचे पत्रच परीक्षण मंडळाकडे पाठवले आहे. 
या पत्रात त्यांनी म्हटले आहे,
ज्याप्रमाणे चित्रपटांसाठी 'केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्डा'ची अनुमती लागते, त्याचप्रमाणे नाटकाच्या प्रदर्शनासाठी 'रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळा'ची अनुमती लागते. अलीकडचा इतिहास पाहिला तरी 'पुरुष, गिधाडे, मी नथुराम गोडसे बोलतोय, गोलपीठा, योनीच्या मनीची गोष्ट, एक चावट संध्याकाळ, अशा अनेक नाटकांवरून गदारोळ उठला; परंतु आपल्या अनुमतीशिवाय कोणी प्रयोग केले नाहीत. आपली अनुमती मिळणे न मिळणे, यांवरून प्रकरणे न्यायालयातही गेली आहेत; परंतु 'सॉक्रेटीस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम' या नाटकाला रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळाची अनुमती नसतांनाही त्याचे १०० प्रयोग करून त्या नाटकाचा निर्माता, दिग्दर्शक आणि अन्य संबंधीत यांनी रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळाची अवहेलना केली आहे. अशा पद्धतीने विनाअनुमती आणि नाटकांचे शेकड्यांनी प्रयोग होऊ लागले, तर भविष्यात त्याचा दुसरा अर्थ असा लावला जाईल की, 'रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळ' हे केवळ एक निर्जीव बुजगावणे आहे.

आज स्वातंत्र्यदिन (तिथीनुसार)

भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !
देश स्वतंत्र झाला तो दिवस होता 'श्रावण कृष्ण चतुर्दशी' या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार '१५ ऑगस्ट' असल्याचे म्हटले जाते. 
भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन '१५ ऑगस्ट' या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे 'श्रावण कृष्ण चतुर्दशीला' साजरा करा !

गंगा शुद्धीकरणासाठी माता अमृतानंदमयी यांनी दिला १०० कोटी रुपयांचा निधी

राष्ट्रकार्यासाठी अन्य धर्मीय धर्मगुरूंनी असे दान केल्याचे कधी ऐकले आहे का ?
नवी देहली - हिंदु संत माता अमृतानंदमयी यांनी गंगा शुद्धीकरणाच्या कार्यात पुढाकार घेतला आहे. त्यांनी केंद्रशासनाच्या 'नमामी गंगे' या गंगा शुद्धीकरणाच्या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांचा धनादेश वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सुपुर्द केला.

पाकिस्तान आणि बांगलादेश येथून आलेल्या हिंदु विस्थापितांना भारतात कायमच्या वास्तव्याचे आदेश निर्गमित !

सुमारे १ कोटीहून अधिक हिंदू, शीख, बौद्ध आणि इतर यांना भारताचे नागरिकत्व मिळणार !
      नवी देहली - भाजप शासनाने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून धार्मिक अत्याचाराला कंटाळून भारतात आश्रयासाठी आलेले हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिस्ती, जैन, पारसी या अल्पसंख्यांकांना त्यांचे प्रवासी परवाने (व्हिसा) संपल्यावर अथवा त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नसतांनाही भारतात कायम निवास करण्याची अनुमती दिल्याचे परिपत्रक ७ सप्टेंबर २०१५ या दिवशी निर्गमित केले आहे. (ख्रिस्त्यांना त्यांचे देश असतांना भारतावर त्यांचा बोजा कशासाठी ? - संपादक) त्यासाठी पारपत्र (भारतात प्रवेश) कायदा १९२० आणि विदेशी नागरिक कायदा १९४६ मध्ये आवश्यक पालट करण्याचे अधिकृत राजपत्र (गॅझेट) जारी केले आहे. याचा लाभ पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून धार्मिक अत्याचाराला कंटाळून भारतात आलेल्या १ कोटीच्या वर हिंदूंना मिळेल, अशी आशा आहे.

केरळमधील जन्माष्टमीच्या शोभायात्रेत मार्क्सवाद्यांनी साकारला हिंदु संतांना क्रॉसवर लटकवलेला देखावा !

डाव्यांमध्ये हिंदुद्वेष किती मुरला आहे, याचा पुरावा !
शोभायात्रेत मार्क्सवाद्यांनी
साकारलेला हिंदुद्रोही देखावा
     कन्नूर (केरळ) - जन्माष्टमीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेतील देखाव्यात मार्क्सवाद्यांनी राज्यातील प्रसिद्ध संत श्री नारायण गुरु यांना येशू ख्रिस्ताप्रमाणे क्रॉसवर लटकवलेले दाखवल्याचे उघड झाले आहे. या घटनेविषयी हिंदूंनी निषेध व्यक्त केल्यावर मार्क्सवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चूक झाल्याचे मान्य करून क्षमायाचना केली आहे. (ही केवळ चूक नव्हे, तर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा आहे. याला केवळ क्षमायाचना पुरेशी नाही, तर उत्तरदायिंवर गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात पाठवायला हवे ! - संपादक)
मार्क्सवादी पक्ष नास्तिकतेचा पुरस्कार करणारा असला, तरी निवडणुकांमध्ये हिंदूंची मते मिळवण्यासाठी पक्षातील नेते आणि कार्यकर्ते हिंदूंच्या सणात सहभागी होतात.

पाकने भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांचे घरगुती साहित्य धरले रोखून !

      स्वाभिमानशून्य भारत शासन ! एकीकडे कुरापतखोर पाककडून राजनैतिक अधिकार्‍यांचे घरगुती साहित्य अडवून ठेवले जाते, तर दुसरीकडे भारतात शान-ए-पाकिस्तान नावाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तान्यांसमोर पायघड्या अंथरल्या जातात ! 
     नवी देहली - पाकिस्तानने वाघा येथे ४ भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांचे साहित्य एक मासापासून अडवून ठेवले आहे. भारतीय अधिकार्‍यांच्या या घरगुती वापराच्या वस्तू आहेत. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार भारतीय अधिकार्‍यांचे साहित्य अडवून ठेवल्याच्या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला अनेक स्मरणपत्रे लिहिली आहेत; मात्र पाकिस्तानी सैन्याने या स्मरणपत्रांना केराची टोपली दाखवली आहे. (भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी पाक सोडत नाही. अशा पाकला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भाजप शासनाने पावले उचलावीत ! - संपादक)

देहलीमध्ये शान-ए-पाकिस्तान हे व्यापारी प्रदर्शन आणि एक शाम पाकिस्तान के नाम हा कव्वालीचा कार्यक्रम होणार !

  • प्रतिदिन सीमेवर आक्रमणे करून, तसेच आतंकवादी आक्रमणे करून भारतीय सैनिक आणि नागरिक यांचे नाहक बळी घेणार्‍या शत्रूराष्ट्र पाकचे कार्यक्रम भरवणारा जगातील एकमेव देश भारत ! हेच मोदी शासनाचे देशप्रेम का ?
  • काँग्रेसप्रमाणे भाजपच्या राज्यातही हिंदूंनी वैध मार्गाने केलेल्या मागण्याची दखल घेतली जात नाही. यासाठी आता धर्मक्रांतीला पर्याय नाही !
     मुंबई - देहलीमध्ये राष्ट्रप्रेमींच्या विरोधाला न जुमानता शासन नियोजनानुसार ११ आणि १२ सप्टेंबर या दिवशी शान-ए-पाकिस्तान हे व्यापारी प्रदर्शन आणि एक शाम पाकिस्तान के नाम हे दोन्ही कार्यक्रम होणार आहे. (आतापर्यंत पाककडून मारले गेलेले सहस्रो सैनिक आणि नागरिक यांचा हा घोर अवमानच आहे ! - संपादक) भारतीय निर्यात महासंघाचे (फेडरेशन ऑफ इंडियन एस्क्पोर्ट ऑर्गनायझेशनचे) सचिव आणि उपमहासंचालक विकास मित्तल यांनी ही माहिती दिली.

फरिदाबाद (हरियाणा) येथे हिंदुत्ववादी अधिवक्ता आणि धर्माभिमानी यांची बैठक

डावीकडून श्री. मुंजाल आणि अधिवक्ता केसरकर
सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांचे मार्गदर्शन
      फरीदाबाद (हरियाणा) - हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने फरिदाबाद येथील बंसल ब्रदर्स यांच्या कार्यालयात ३० ऑगस्टला हिंदुत्ववादी अधिवक्ता आणि धर्माभिमानी हिंदू यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांनी बैठकीत साधनेविषयी मार्गदर्शन केले. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे हरियाणा आणि पंजाब राज्यांचे समन्वयक श्री. सुरेश मुंजाल, तसेच समितीचे डॉ. भूपेश शर्मा आणि श्री. कार्तिक साळुंके उपस्थित होते. या बैठकीला ४ अधिवक्ता, २ अभियंते आणि १ डॉक्टर उपस्थित होते.

धर्मांध आणि फुटीरतावादी यांचा तीव्र विरोध

जम्मू-काश्मीरमधील गोमांसाच्या विक्रीवरील बंदीचे प्रकरण
ज्यांना हा देश आपला वाटत नाही, त्यांनी धर्मासाठी या देशाच्या न्यायव्यवस्थेच्या 
आदेशाला विरोध केल्यास नवल नाही !
श्रीनगर, ११ सप्टेंबर - जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाकडून गोमांस विक्रीवर लावण्यात आलेल्या बंदीला राज्यातील धर्मांध आणि फुटीरतावादी यांनी विरोध चालू केला असून गोमांसाच्या विक्रीवरील बंदीच्या विरोधात १२ सप्टेंबर या दिवशी राज्यात बंदचे आवाहन केले आहे. (आता ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी  हे न्यायालयाचा आदेश पाळण्यासाठी विरोधकांना सांगतील कि त्यांना पाठिंबा देतील ? - संपादक)

(म्हणे) शहरे आणि रस्ते यांचे पुनर्नामकरण करण्यावर बंदी घाला !

जमात-ए- इस्लामी हिंदला पोटशूळ ! 
      नवी देहली शहरे आणि रस्ते यांचे पुनर्नामकरण करण्यावर शासनाने बंदी घालावी, अशी मागणी जमात-ए-इस्लामी हिंद या धर्मांध संघटनेने केली आहे. शहरे आणि रस्ते यांची नावे पालटल्याने ऐतिहासिक व्यक्तीच्या संदर्भात जनतेत अनादर निर्माण होऊन इतिहासाचे पुनर्लेखन होते, असा दावा या संघटनेने केला आहे. 
     शहरे आणि रस्ते यांचे नाव पालटल्यानेे भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेला तडा जाईल, असेही या संघटनेने म्हटले आहे. (केवळ इस्लाम धर्मच सर्वश्रेष्ठ मानणार्‍यांनी धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणे, हे हास्यास्पद ! धर्मनिरपेक्षतेचा सोयीस्कर अर्थ लावून हिंदूंवर टीका करणार्‍या अशा धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक) डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येविषयी खेद व्यक्त करून त्यांची हत्या हिंदुत्ववादी संघटनांनी केली, असा आरोप जमात-ए-इस्लामी हिंदने केला आहे.

जपानमध्ये गेल्या ५० वर्षांतील सर्वांत मोठा प्रलय !

हॅलिकॉप्टरच्या साहाय्याने बचाव कार्य चालू !
     टोकियो - मध्य जपानमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे जपान शासनाने सुमारे १ लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांत येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथे महाप्रलयसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जपानमध्ये सध्या आलेला प्रलय हा गेल्या ५० वर्षांतील सर्वांत मोठा प्रलय असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या साहाय्यासाठी हॅलिकॉप्टरची सोय करण्यात आली असून आतापर्यंत सहस्रो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे. 

भरमसाठ कर भरा किंवा इस्लाम स्वीकारा अथवा चालते व्हा !

आय.एस्.आय.एस्.ने सिरियातील ख्रिस्त्यांसमोर ठेवले ३ पर्याय !
    दमास्कस (सिरिया) - जिहादी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.ने सिरियातील अल्-कर्‍यातेन या शहरात रहाणार्‍या ख्रिस्त्यांसमोर ३ पर्याय ठेवले आहेत. ख्रिस्त्यांनी एकतर मोठ्या रकमेचा कर भरावा किंवा इस्लाम स्वीकारावा अथवा हे शहर सोडून चालते व्हावे, असे ३ पर्याय आहेत. त्यांना यातील १ पर्याय निवडण्यासाठी केवळ ४८ घंट्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळे तेथील ख्रिस्ती लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती ब्रिटन येथील सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स या संघटनेने दिली. 
        संघटनेने दिलेल्या माहितीनुसार बहुतांश ख्रिस्ती नागरिक तिसरा पर्याय निवडत असून त्यांनी आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांकडे त्यांची ओळखपत्रे परत मागितली आहेत. ही ओळखपत्रे मिळाल्यावर ते हे शहर सोडून जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांनी येथील १ सहस्र ५०० वर्षे जुने मार एलियान हे कॅथलिक चर्च नष्ट करून त्याचे अवशेष फेकून दिले होते. (वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी पंडितांसमोर असेच ३ पर्याय ठेवून त्यांना काश्मीरमधून हाकलून लावले होते. इस्लामी राष्ट्राची स्थापना करणार्‍या आय.एस्.आय.एस्.नेही असेच ३ पर्याय सिरियातील ख्रिस्त्यांसमोर ठेवले आहेत. यातून सर्वत्रच्या धर्मांधांची मानसिकता एक आहे आणि त्यांना जगात सर्वत्र इस्लामचे राज्य आणायचे आहे, हे स्पष्ट होते. असे असतांनाही इस्लामला शांतीचा संदेश देणारा धर्म मानणार्‍यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ! - संपादक)

रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी गुजरातमध्ये हनुमानाला साकडे !

केवळ संकटात देवाकडे धाव घेणार्‍या जनतेने प्रतिदिन साधना करून धर्माचरण केल्यास 
त्यांना देवाचा आशीर्वाद लाभेल आणि निर्माण होणार्‍या समस्यांवरही मात करता येईल ! 
     बडोदा (गुजरात) - रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी येथील हिंदूंनी तरसली भागातील श्री काष्ठ भंजन हनुमान मंडळ मंदिरात श्रावण मासाच्या शेवटच्या शनिवारी ७ लक्ष रुपयांच्या नोटा (यात १ सहस्र आणि ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता.) मंदिराच्या भिंतींना लावून साकडे घातले. 
     या संदर्भात जयदीप पटेल यांनी सांगितले, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्याचे दिवसेंदिवस अवमूल्यन होत आहे. त्यामुळे विदेशात असलेल्या गुजराती समाजाच्या लोकांवर अनिष्ट परिणाम होत आहे. सर्व आर्थिक उपाय करूनही हा प्रश्‍न सुटत नाही, हे बघून आम्ही शेवटी भगवंताला शरण आलो आहोत.
      राकेश पटेल म्हणाले, आम्ही ही रूढी गेली ३ वर्षे पाळत आहोत; मात्र या वर्षापासून आम्ही नोटा भिंतींवर लावणे चालू केले आहे. मंदिरात सहस्रो भाविक येतात; मात्र यातील एकही नोट चोरली जात नाही. या नोटांचा हिशोब ठेवला जातो आणि श्रावण मास संपल्यावर अर्पणदात्यांना पैसे परत केले जातात.

ईदला बळी देणार्‍या पशूंची कातडी विकून मिळणारा निधी जिहादसाठी दान करा !

आतंकवादी संघटनांचे पाकिस्तानी जनतेला आवाहन
     नवी देहली - २५ सप्टेंबर या दिवशी होणार्‍या ईदच्या दिवशी बळी देण्यात येणार्‍या पशूंच्या कातडी विकून मिळणारी रक्कम जिहादसाठी दान देण्याचे आवाहन पाकिस्तानातील आतंकवादी संघटना जनतेला करत आहेत. यातून भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्यासाठी आवश्यक असा निधी गोळा करण्याची या संघटनांची योजना आहे, अशी माहिती भारतीय गुप्तहेर खात्याच्या अहवालात नमूद केली आहे. 
     वरील अहवालानुसार पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेल्या वर्षी ईदच्या दिवशी सुमारे १ कोटी जनावरांची कुर्बानी (बळी) देण्यात आली होती. या जनावरांची कातडी विकून मिळणारी रक्कम जैश-ए-महंमद, जमात-उद-दावा, हरकत-उल्-मुजाहिदीन इत्यादी आतंकवादी संघटनांना ईदनिमित्त दान करावी, यासाठी या आतंकवादी संघटनांनी मोहीम प्रारंभ केली आहे. प्रत्येक कातडीची बाजारातील किंमत ३५० रुपये धरल्यास या विक्रीतून सुमारे ३ सहस्र ५०० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे.

१५६ बॉम्बच्या मार्‍यांनतरही श्री द्वारकाधीश मंदिर दिमाखात उभे !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
      द्वारका (गुजरात) - वर्ष १९६५ च्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानी नौदलाने श्री द्वारकाधीश मंदिरावर आणि मंदिर परिसरात १५६ बॉम्ब डागले; परंतु त्या बॉम्बपैकी एकही बॉम्ब मंदिरापर्यंत पोहचू शकला नव्हता. पाणबुड्यांनी सोडलेले बॉम्ब समुद्रामध्येच निकामी झाले होते.
      गुजरातमधील काठेवाड प्रांतात समुद्रकिनारी असलेली द्वारका चार धाम मंदिरापैकी एक असून ते धार्मिक, पौराणिक, तसेच ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. खास विश्‍वकर्माने या नगरीची निर्मिती केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. यदु वंशाची समाप्ती आणि श्रीकृष्णाचे अवतार कार्य संपल्यावर द्वारकानगरी समुद्रात बुडाल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानने डागलेल्या बॉम्बपैकी एकही बॉम्ब या मंदिरापर्यंत पोहचू न शकण्यामागे या भागातील समुद्राच्या रचना कारणीभूत होती, असे बोलले जाते.

विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी जोडीदार मिळवून देणार्‍या संकेतस्थळावर ख्रिस्ती मिशनर्‍यांची रीघ नावे उघड झाल्याने ४०० ख्रिस्ती मिशनरी त्यागपत्र देणार !

कथित आरोपांवरून हिंदु संतांवर चिखलफेक करणारी प्रसारमाध्यमे 
ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या या कुकृत्यांविषयी गप्प का ? 
      न्यूयॉर्क - एशली मॅडीसन नावाची महिला अनेक वर्षांपासून चालवत असलेल्या एका संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेक पुरुष आणि महिला यांना विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी जोडीदार मिळवून देण्याच्या कामात प्रख्यात होती. तिच्या ग्राहकांमध्ये अनेक प्रथितयश स्त्री-पुरुषांचा समावेश होता. या सर्वांचा संगणकीय पत्त्यावरील पत्रव्यवहार अत्यंत गोपनीय ठेवण्यात एशली मॅडीसन हिचा हातखंडा होता. या माध्यमातून तिने कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. एका संगणक हॅकरने या संकेतस्थळाला हॅक करून धक्का दिला. त्यामुळे त्याला एशली मॅडीसन हिच्या सर्व ग्राहकांची सूची मिळाली आणि त्याने ती प्रसारमाध्यमांना देऊन प्रकाशित केली. या सूचीत सुमारे ४०० ख्रिस्ती मिशनर्‍यांचा समावेश आहे. हे सर्वजण लवकरच आपापल्या पदाचे त्यागपत्र देतील, अशी माहिती एड् स्टेत्झर यांनी दिली. एड् स्टेत्झर हे ख्रिस्ती धर्माशी संबंधित अनेक नियतकालिकांमध्ये लिखाण करतात आणि एका नियतकालिकाचे संपादनही करतात. त्यामुळे त्यांनी दिलेली माहिती विश्‍वसनीय मानली जाते. (आधीच अनेक ख्रिस्ती मिशनरी लैंगिक प्रकरणात गुंतले असल्याची स्वीकृती व्हॅटीकनने दिली आहे. या प्रकरणात अनेक नन आणि अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणांत तडजोड करण्यासाठी व्हॅटीकनने कोट्यवधी रुपये व्यय केले आहेत. आता या नवीन घोटाळ्यात अडकल्याने चर्चची अब्रू पार धुळीस मिळाली आहे. या प्रकरणांवरून धडा घेऊन धर्मांतरास उद्युक्त करणार्‍या मिशनर्‍यांना हिंदू खडसवणार का ? - संपादक)

ओवैसी मुसलमानांमध्ये फूट पाडत आहेत ! - जमाल सिद्दिकी, प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्यांक गट, भाजप

     ओवैसी केवळ मुसलमानांमध्येच फूट पाडत नाही, तर हिंदूंविषयीही विखारी विधाने करून देशातील एकसंधता बिघडवत आहेत. असे असतांना भाजपच्या मुसलमान नेत्यांना केवळ मुसलमानांचीच काळजी वाटते ! यावरून मुसलमान हा प्रथम मुसलमान असतो, नंतर तो देशाचा नागरिक असतो, हे भाजप जाणणार का ?
    सांगली - एम्आयएम् पक्षाचे प्रमुख अकबरुद्दीन ओवैसी मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचा उद्योग करत आहेत. देशाची फाळणी करणारे बॅ. जीना यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. ओवैसी मुसलमान समाजातील लोकांना भडकवत आहेत. त्यांच्या पक्षाची स्थिती पाण्यावरील बुडबुड्यासारखी आहे. ओवैसी काँग्रेससमवेत सत्तेत होते. काँग्रेसने मतांसाठी मुसलमानांचा उपयोग करून घेतला. आता सत्ता गेल्यावर भावनिक मुसलमान समाजाची ते दिशाभूल करत आहेत. भारतात राहिलेल्या मुसलमानांची प्रगती झाली आहे. पाकिस्तानात गेलेले मुसलमान आजही सुरक्षित नाहीत, असे प्रतिपादन भाजपच्या अल्पसंख्यांक गटाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित

१२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत ५ टप्प्यांत मतदान
     हिंदूंनो, हिंदुहिताचे धोरण राबवणार असाल, तरच मत देऊ, अन्यथा नकाराधिकाराचा वापर करू, असे मतांचा जोगवा मागण्यासाठी येणार्‍या राजकारण्यांना खडसावून सांगा !
     नवी देहली -  बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत ५ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण २४३ मतदारसंघातील ६ कोटी ६८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आगामी काळातील सण-उत्सव लक्षात घेऊन या निवडणुकीचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम अहमद जैदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन करावे ! श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, ह.भ.प. संपतदास महाराज,
पू. नंदकुमार जाधव आणि श्री. सुनील घनवट
नाशिक, ११ सप्टेंबर (वार्ता.) - प्रदूषणाच्या गोंडस नावाखाली गणेशोत्सवाच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील काही संघटना, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून 'गणेशमूर्तीदान' ही अशास्त्रीय मोहीम राबवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. 'गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण', असे समीकरण जुळवून गणेशमूर्तींच्या परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी गणेशमूर्तींचे बलपूर्वक दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. त्यामुळे त्यांच्या श्रद्धा, धार्मिक भावना पायदळी तुडवल्या जात आहेत. दान घेतलेल्या अथवा कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती कालांतराने दगडांच्या खाणीत वा इतरत्र टाकल्या जात असल्याचे वेळोवेळी उघडही झाले आहे. त्यामुळे श्री गणेशाची घोर विटंबना होते. याशिवाय तो फौजदारी गुन्हाही आहे. म्हणूनच गणेशभक्तांनी कुणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी न पडता गणेशमूर्तींचे दान न करता अथवा त्या कृत्रिम हौदांत विसर्जित न करता धर्मशास्त्रानुसार त्या वहात्या पाण्यातच विसर्जित कराव्यात, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी गणेशभक्तांना एका पत्रकार परिषदेद्वारे केले.

पर्वणीत मोकाट जनावरांचा सुळसुळाट; दुर्लक्ष ठरू शकते चेंगराचेंगरीचे कारण

    त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), ११ सप्टेंबर (वार्ता.) सिंहस्थ कुंभपर्वात पहिल्या पर्वणीत मोजकेच भाविक उपस्थित राहिले; मात्र दुसर्‍या पर्वणीला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. सध्या नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. या जनावरांचा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे बंदोबस्त केला जात नसल्याने दुसर्‍या पर्वणीवर मोकाट जनावरांची समस्या कायम रहाणार आहे. दुसर्‍या पर्वणीला देश-विदेशातून ७० ते ८० लक्ष भाविक उपस्थित रहातील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला आहे. (सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्रशासनाने २ सहस्र ३०० कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. पैशाची कोणतीही कमतरता नसतांना केवळ नियोजनाअभावी प्रशासनाकडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जात नाही. पर्वणीत समजा चेंगराचेंगरी झाल्यास त्याचे दायित्व प्रशासन घेणार आहे का ? असा नियोजनशून्य कारभार करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर प्रथम कारवाई करायला हवी. संपादक)

शोभायात्रेचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून उत्स्फूर्त स्वागत

शोभायात्रेच्या स्वागतासाठी समितीने लावलेला फलक
     नाशिक, ११ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु धर्म सोडून गेलेल्यांना परत हिंदु धर्मात आणण्याचे कार्य करणारे श्री संप्रदायाचे अनंत विभूषित रामानंदाचार्य प.पू. नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. फेरीच्या आरंभी एका मोठ्या श्रीफळाची सात्त्विक प्रतिकृती रथावर ठेवण्यात आली होती. त्याचे आणि शोभायात्रेतील मुख्य फलकाचे पूजन या वेळी करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांनी श्रीफळ पूजन करतांना, स्वामी नरेंद्राचार्य महाराज आणि विविध आखाड्यांचे प्रमुख संतसमुदायांचे रथ आल्यानंतर शंखनाद करून त्यांचे स्वागत केले.

नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी भाजप शासनाने ठोस भूमिका घ्यावी ! - श्री. अविनाश चव्हाण, हिंदुत्ववादी

आंदोलनात सहभागी हिंदु धर्माभिमानी
जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
     जळगाव, ११ सप्टेंबर - भारत आज धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून गणले जाते. यामुळे बहुसंख्य असूनही हिंदूंना त्यांचे अधिकार मिळत नाहीत, तर अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. हीच गोष्ट नेपाळविषयीही होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे नेपाळ या बहुसंख्य हिंदु असलेल्या देशाला हिंदु राष्ट्र घोषित होण्यासाठी भाजप शासनाने ठोस भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन हिंदुत्ववादी श्री. अविनाश चव्हाण यांनी केले. हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जळगाव येथे महापालिकेसमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी ३५ धर्माभिमानी उपस्थित होते.

नालासोपार्‍यात तरुणीवर सामूहिक बलात्कार

महिलांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित होत असलेला महाराष्ट्र !
      पालघर - ९ सप्टेंबर या दिवशी नालासोपार्‍यात एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित तरुणी ही मूळची घाटकोपरची आहे. पीडित तरुणीने या प्रकरणात निर्मलनगर पोलीस ठाण्यामध्ये आज गुन्हा नोंद केला आहे.
      तक्रारीनुसार पीडित मुलगी ९ सप्टेंबर या दिवशी सूरतहून येऊन वांद्रे टर्मिनसला उतरली. त्यानंतर तिने घाटकोपरला जाण्यासाठी रिक्षा पकडली. परंतु चालकाने रिक्षा घाटकोपरला न नेता नालासोपार्‍याच्या दिशेने वळवली. त्याच वेळी पाठलाग करणार्‍या नराधमांनी रिक्षाला गाठले आणि चालकाला हुसकावून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. सर्व आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन न करता हौदात अथवा घरात बालदीत करा ! - आदर्श शिक्षण मंडळाचे पालकांना हिंदु धर्मविरोधी आवाहन

आदर्श शिक्षण मंडळाने असे आवाहन कधी अन्य धर्मियांच्या सणांना केले आहे का ?
      मिरज, ११ सप्टेंबर (वार्ता.) - लवकरच गणेशोत्सव येत आहे. आपण सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. तरी गणेशमूर्ती शाडूची अथवी कागदाची करा, श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन न करता महापालिकेने केलेल्या हौदात, अथवा घरात बालदीत, अथवा पातेल्यात करा, निर्माल्य पाण्यात न सोडता ते निर्माल्य कुंडात सोडा, असे हिंदु धर्मशास्त्रविरोधी आवाहन आदर्श शिक्षण मंडळाने केले आहे. वरील गोष्टींविषयी पालकांनी त्यांचा अभिप्राय द्यावा, असे लेखी पत्र मंडळाची शाळा आदर्श शिक्षण मंदिर यांनी शेकडो विद्यार्थ्यांना दिले आहे.

शिवसेना दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलामुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार !

     संभाजीनगर - महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे; पण तरीही शेतकर्‍यांनी आत्महत्येचा पर्याय अवलंबू नये. शेतकर्‍यांच्या साहाय्यासाठी त्यांच्या मुलामुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ते येथे दुष्काळग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी आले होते.

मुंबई महापालिकेने केवळ २ दिवस मांसविक्री बंदीचा निर्णय घेतला !

आज १० सहस्र जैनांचे उपोषण !
      मुंबई - राज्य शासनाच्या निर्णयानुसार १० आणि १७ सप्टेंबर हे दोन दिवसच पर्युषणकाळात मांसविक्री करण्यात येईल, असा निर्णयात पालट केला आहे. पूर्वी मुंबई महापालिकेने ४ दिवस मांसविक्री बंद ठेवण्यात येईल, असे सांगितले होते. गेले काही दिवस शिवसेना आणि मनसे यांनी जैन धर्मियांच्या पर्युषण या धार्मिक सणाच्या काळात मांसविक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला आणि ठिकठिकाणी मांसविक्री चालू केली. राज्य शासनाचा वरील निर्णयही त्यांना मान्य नाही. या सर्व वादाच्या पार्श्‍वभूमीवर उद्या, १२ सप्टेंबर या दिवशी मुंबईत १० सहस्र जैनबांधव उपोषण करणार आहेत.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ७०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

      पुणे, ११ सप्टेंबर - येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ७०० विद्यार्थ्यांना १० सप्टेंबर या दिवशी अन्नातून विषबाधा झाली. त्यांना खडकवासला येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी प्रविष्ट करण्यात आले होते. त्यापैकी ३०० विद्यार्थ्यांना प्रकृती स्थिर असल्यामुळे सोडून देण्यात आले. १० सप्टेंबर या दिवशी विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणात अंड्याची रसभाजी देण्यात आली होती. त्यातून ही विषबाधा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असून त्यांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. उर्वरितांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असून इतरांवर उपचार अद्याप चालू आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

या देशातील न्यायव्यवस्थेला न जुमानणार्‍या फुटीरतावाद्यांना पाकमध्ये पाठवा !
    जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाकडून गोमांस विक्रीवर लावण्यात आलेल्या बंदीला तेथील धर्मांध आणि फुटीरतावादी यांनी विरोध चालू केला असून गोमांसाच्या विक्रीवरील बंदीच्या विरोधात १२ सप्टेंबर या दिवशी तेथे राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Jammu-Kashmir me gomanspar lage pratibandhako kattarpanthi aur algao
vadiyoka virodh. - Ab dhongi dharma nirpekshatavadi ispar kuch kahenge ?
जागो !
    जम्मू-कश्मीर में गोमांस पर लगे प्रतिबंध को कट्टरपंथी और अलगाववादियों का विरोध !
    अब ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी इसपर कुछ कहेंगे ?

संतांचा अपप्रचार करणारी प्रसारमाध्यमे

हिंदु समाजाला साधू-संतांचे महत्त्व कळण्यासाठी हे विशेष सदर !
१. प्रसारमाध्यमांनी दुर्लक्षिले म्हणून संत-महंतांचे समाजकार्य झाकले जाऊ शकत नाही !
      भारतातील प्रसारमाध्यमांकडून हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदु संत यांच्याविषयी समाजात द्वेष पसरवणारे, दंगली भडकवणारे आणि समाजात अशांती पसरवणारे, अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. वास्तविक पहाता हिंदु संत आणि हिंदुत्ववादी संघटना या समाजातील तळागाळातील घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी गेली अनेक वर्षे निःस्पृहपणे कार्य करत आहेत. असे असतांनाही त्यांच्या कार्याकडे हिंदुद्वेषाने पछाडलेली प्रसारमाध्यमे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. त्याही पुढे जाऊन त्यांची प्रतिमा डागाळण्याची एकही संधी ती सोडत नाहीत. याच पार्श्‍वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदु संत करत असलेल्या कार्याविषयी विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा ऑर्गनायझरमध्ये काही वर्षांपूर्वी लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचा काही भाग येथे देत आहोत. ख्रिस्ती मिशनर्‍यांचा उदोउदो करणार्‍या प्रसारमाध्यमांमुळे भारतात केवळ ख्रिस्ती मिशनरी समाजकार्य करतात, असा एक समज समाजामध्ये रूढ झाला आहे. हा लेख वाचून जनतेचा हिंदु संतांकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटेल, हे निश्‍चित !

शिना बोरा प्रकरणाच्या तपासातून काळ्या पैशाच्या बळावर भारताच्या राजकीय आणि आर्थिक धोरणांचा खेळ करणार्‍यांचा पर्दाफाश होईल ?

      सध्या बहुतांश सर्वच वृत्तवाहिन्यांवर गेले १०-१२ दिवस शिना बोरा हत्याकांड प्रकरण गाजत आहे. पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनाही मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यामागील कारण त्यांनी या प्रकरणात अधिक रस घेतल्यामुळेच असावे अशी चर्चा आहे. हे प्रकरण जरी एक सामान्य हत्या प्रकरण वाटत असले, तरी ते भारताच्या राजकीय आणि आर्थिक धोरणांचा खेळ करणार्‍यांशीही निगडीत असावे, असा अंदाज आहे. समाजात आणि वृत्तवाहिन्यांवर प्रतिष्ठित म्हणून मिरवणारेही या प्रकरणी गप्प आहेत. या प्रकरणाविषयी उहापोह करणारे मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉगवरील लिखाण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

जात्यंध राजकीय साहित्यिक !

      शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर ठाम असल्याचे आणि ते प्रत्यक्षात कृतीत आणण्याचे सुतोवाच ठाण्यात एका कार्यक्रमात केले. यानंतर संपूर्ण राज्यात औरंगाबादच्या नामांतरणावरून चर्चेला एकच उधाण आलेे. काँग्रेस, राष्ट्रवादी, एम्आयएम्सारख्या तथाकथित धर्मनिरपेक्षवादी आणि मुसलमानधार्जिण्या पक्षांनी आणि विचारवंतांनी (?) नामांतराला विरोध करायला आरंभ केला. दुसरीकडे महाराष्ट्रातील बहुसंख्य हिंदु आनंद व्यक्त करीत आहेत. यात साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनीदेखील स्वत:चे मते व्यक्त केली. त्यात इतिहासाचे अभ्यासक आणि मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी उडी घेतली. त्यांच्या मते औरंगाबादचे नामांतर करायचेच असेल, तर औरंगजेबाचा मोठा भाऊ दाराशुकोह याचे नाव द्यायला हवे. याचे कारणही त्यांनी असे सांगितले की, दाराशुकोह याने बावन्न उपनिषदांचे फारशी आणि अन्य भाषांमध्ये भाषांतर केले.

१८५७ चे स्वातंत्र्यसमर नियोजित वेळेपेक्षा आधी चालू होण्यामागील एक कारण !

१. १८५७ च्या उठावाचा आरंभदिन ३१ मे ऐवजी १० मे होण्याचे कारण मीज डॉली ! : पी.जे.ओ. टेलर नावाच्या एका इंग्रज इतिहासकाराने १९९२ ते १९९४ या दोन वर्षांत १८५७ वर चार पुस्तके लिहिली. त्यात ते लिहितात, सार्वत्रिक उठावाचा दिनांक ३१ मे होता. काही जणांच्या मते हा दिनांक २३ जून होता; कारण प्लासीच्या लढाईला त्या दिवशी शंभर वर्षे पुरी होणार होती किंवा ३१ मे ते २३ जून या तीन आठवड्यांत आपण सारे संपवू, असा उठावाच्या सूत्रधारांचा विश्‍वास असावा. १८५७ चा उठाव ही फार विलक्षण अभिनव रचना फसली, याचे एकमेव किंवा प्रमुख कारण असे सांगण्यात येते की, १० मे १८५७ या दिवशी अचानकपणे मेरठला पहिला स्फोट झाला आणि मेरठला हा अचानक अवेळी उठाव झाला, याचे कारण मीज डॉली (Mees Dolly) ! 

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यासंबंधी सत्य प्रसंग विकृत स्वरूपात दाखवणार्‍या चॅनेल्सविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार तक्रार प्रविष्ट; मात्र तपासाविषयी पोलीस निष्क्रीय !

हिंदूंनो, संतांची अपकीर्ती करणार्‍या अशा खोटारड्या वृत्तवाहिन्यांवर 
बहिष्कार टाका आणि त्यांना शक्य त्या मार्गाने खडसवा !
१. तक्रारदाराची अल्पवयीन पुतणी आणि पत्नी यांचा पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या 
समवेतच्या वास्तविक व्हिडिओत (ध्वनीचित्रफीतीत) चॅनल्सनी पालट करून तो 
अश्‍लीलरित्या दाखवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होणे
      न्यूझ २४, इंडिया न्यूझ आणि न्यूझ नेशन या वृत्तवाहिन्यांच्या (चॅनेल्सच्या) विरुद्ध बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (POCSO), भारतीय दंड विधान (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (ITACT) यांमधील विविध कलमांनुसार १६ डिसेंबर २०१३ या दिवशी गुडगाव (हरियाणा) येथे झिरो एफ्.आय.आर्. नोंदवण्यात आला. नंतर पोलिसांनी हे प्रकरण नोयडाच्या पोलीस ठाण्यात पाठवले आहे. तक्रारीनुसार चॅनल्सने १२ डिसेंबर २०१३ या दिवशी अल्पवयीन पुतणी आणि पत्नी यांचा पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या समवेत जो वास्तविक व्हिडिओ (ध्वनीचित्रफीत) होता, त्यात पालट करून तो अश्‍लीलरित्या दाखवला.

रोटरी क्लब ऑफ नवी मुंबईच्या वतीने विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर

नवी मुंबई महानगरपालिकेचा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
दिनांक - १३ सप्टेंबर २०१५  
वेळ - सकाळी ८ ते दुपारी २
स्थळ - गुरुद्वारा सिंग साहेब, सेक्टर ८, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.

मुंबई आणि ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

१. कृत्रिम तलाव, हौद यांमध्ये श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात यावी, तसेच मागील वर्षी दान केलेल्या मूर्तींची विटंबना करणार्‍यांवर कारवाई व्हावी
२. भारतात समान नागरिक कायदा लागू करण्यात यावा
३. भारतात पाकिस्तान आणि आय.एस्.आय.एस्. यांचे झेंडे फडकवणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी
४. नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात यावे
५. मुसलमानांचा अल्पसंख्यांक दर्जा कमी करावा.
या मागण्यांसाठी, दिनांक १३ सप्टेंबर २०१५ या दिवशी
१. मुंबई
स्थळ : सद्गुरु हॉटेलसमोर, रेल्वे स्थानकाच्या जवळ, चेंबूर (पूर्व)
वेळ : सायं. ५ ते ७ संपर्क : ९९२०२०८९५८
२. ठाणे
स्थळ : दीपक हॉटेलसमोर, रेल्वे स्थानकाच्या बाहेर, कल्याण (प.)
वेळ : सायं. ५ ते ७ संपर्क : ९८६७१९०५४३

चौकटी


खवळले हिंदु तर...!

आज तुम्ही जिवंत आहात ही कृपा समजा बाळासाहेबांची ।
मागून पाठीत खंजीर खुपसणे, ही रीतच आहे मुसलमानांची ॥
भारतात सर्वांत सुखी मुसलमान आहे जाण ठेवा याची ।
खवळले हिंदु तर वेळ येईल येथून नामशेष होण्याची ॥ 
- श्री. अनिल कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

श्रीरामस्पर्श झालेल्या धनुष्याचे मनोगत !

रामाने धनुष्य उचलले, रामस्पर्शाने धनुष्य सुखावले । 
धनुष्य मोडून पडले, रामाने विचारले, काय वाटले तुला ?
अहं मोडून पडला आणि श्रीरामा, तुझ्या चरणाशी स्थान मिळाले ॥ 
- पुष्पांजली (२९.७.२०१५)

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय !

    सनातनच्या रामनाथी आश्रमासमोरून जातांना गेली ८ वर्षे काही समाजद्रोही सनातन बॉम्ब, असे ओरडत जातात. काहीजण शिव्या देत जातात, काहीजण दगड फेकतात, तर काहीजण पेट्रोल बॉम्ब फेकतात. विविध संप्रदायांच्या भक्तांना, हिंदुत्ववाद्यांना आणि संतांना येणारे पुढील अनुभव वाचले की, लक्षात येईल की, सनातनविरोधी अशी कृत्ये करणारे असुरांच्या कह्यात आहेत. हिंदु राष्ट्रात त्यांचा नाश केला जाईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.६.२०१५)
आश्रमभेटीमुळे पावित्र्य आणि शुचिर्भूतता यांचा सुरेख संगम अनुभवला !
    सनातन संस्थेला भेट देण्यापूर्वी माझ्या मनात काही शंका होत्या. त्यांचे निराकरण करण्याचा हेतू मनात ठेवून आज मी आश्रमात आलो. आता मला प्रांजळपणे मान्य करावेसे वाटते की, ही संस्था हिंदु समाजामध्ये जनजागृती करणे, तसेच हिंदु धर्मातील चांगल्या आणि पवित्र गोष्टींची जाणीवपूर्वक जपणूक करतांना दिसते. पावित्र्य आणि शुचिर्भूतता यांचा सुरेख संगमच या भेटीत मला आढळून आला. संस्थेचे अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे स्वप्न मला प्रत्यक्षात केव्हा बघायला मिळेल, याची उत्सुकता आहे. त्या पवित्र कार्यासाठी मी शुभेच्छा चिंततो !
- श्री. दीपक नरसिंह गोठे, पणजी, गोवा. (३१.७.२०१५)

विसर्जन कि विल्हेवाट ?

     गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला असतांना गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याचा नेहमीचा कांगावा करत कथित बुद्धीवाद्यांकडून गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार नदीमध्ये विसर्जन करण्यास विरोध केला जात आहे. त्यातच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एन्.सी.एल्.) शास्त्रज्ञांनी सोडामिश्रित रसायनाचा शोध लावून त्याचा गणेशमूर्तींवर प्रयोग केला. त्या रसायनामुळे गणेशमूर्ती पूर्णपणे विरघळून जात असल्याचे आढळून आले. कृत्रिम तलाव, रसायनमिश्रित पाणी गणेशमूर्तीवर सोडण्याचा पर्याय पाहून आपल्याला गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे आहे कि विल्हेवाट लावायची आहे, असा प्रश्‍न पडतो. विसर्जनाची पवित्र भावना अशास्त्रीय पद्धतीने गणेशमूर्तींची विल्हेवाट लावतांना कशी मिळणार ?

स्वप्नात एक वास्तू पेटली असूनही तिची धग साधकांना पोहोचत नसल्याचे जाणवणे आणि दुसर्‍या दिवशी दोन साधकांची आध्यात्मिक प्रगती झाल्याचे कळल्यावर स्वप्नाचा उलगडा होणे

    २०.११.२०१४ च्या रात्री आम्ही ज्या ठिकाणी झोपतो, ती वास्तू पेटली आहे, असे मला स्वप्न पडले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात होत्या; परंतु त्याची धग आम्हा साधकांना पोहोचत नव्हती, असे मला जाणवत होते. स्वप्नावस्था साधारण ५ मिनिटे होती. त्यानंतर मला जाग आली. तेव्हा कुठेतरी काहीतरी नक्की झाले असावे, असे मला वाटले.
    दुसर्‍या दिवशी श्री. हेमंत आणि सौ. सुमन सोनवणे यांचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के झाला असल्याचे समजले. तेव्हा असे वाटले की, सौ. सुमनच्या हाताला अपघात झाला; परंतु प.पू. डॉक्टरांनी त्याची मानसिक झळ उभयतांना जाणवू दिली नाही. तेव्हा रात्रीच्या स्वप्नाच्या अर्थाचा मला उलगडा झाला.
- श्रीमती सत्यवती दळवी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.११.२०१४)

रात्रंदिन लागलेला सेवेचा ध्यास, प.पू. गुरुदेवांप्रती अतूट भाव आणि उत्साह अन् सकारात्मकता यांचा खळाळता झरा म्हणजे चेन्नईतील ६७ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. उमा रविचंद्रन !

१. सेवेची तीव्र तळमळ
अपघात झाल्यामुळे तीव्र वेदना होत असूनही सेवारत रहाणे : २४ डिसेंबरच्या रात्री साधारण ८.१५ वाजता सौ. उमाक्कांच्या वाहनाला अपघात झाला. दुचाकीवरून खाली पडून त्यांच्या डोक्याला छोटी दुखापत झाली आणि खांद्याला पुष्कळ मार लागला. त्यामुळे चालतांनाही त्यांना वेदना होत होत्या. एवढे असूनही त्या रात्री पू. बिंदाताईंच्या स्काईप सत्संगासाठी (राष्ट्रीय स्तरावरील सत्संगात) उपस्थित राहिल्या.
१ अ. बसणे अवघड असतांनाही भाषांतर सेवा करणे : तमिळ भाषेत लवकरच प्रकाशित करायच्या ग्रंथांचे भाषांतर आणि पडताळणी सेवा त्यांनी त्या रात्री अन् दुसर्‍या दिवशी दिवसभर बसून पूर्ण केली. वास्तविक त्यांना बसणे अतिशय अवघड होत होते.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अविस्मरणीय सत्संगात सौ. उमा रविचन्द्रन् यांनी अनुभवलेले सुवर्ण क्षण आणि त्यांना लाभलेले अनमोल ज्ञानामृत !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
सौ. उमा रविचंद्रन
१. पू. (सौ.) अंजली गाडगीळ म्हणजे संतरूपी चालते-बोलते अध्यात्म विश्‍वविद्यालयच !
    २९.१.२०१५ या दिवशी पू. (सौ.) अंजलीताई (पू. (सौ.) अंजली गाडगीळ) चेन्नई ते पॉन्डिचेरी हा प्रवास करत असतांना मला त्यांच्या आणि त्यांच्या समवेत असणार्‍या साधकांच्या सत्संगात रहाण्याची सुवर्ण संधी लाभली. मला त्यांच्याकडून एका दिवसात इतके शिकायला मिळाले की, ते सर्व समजून घेणे, आत्मसात करणे आणि आचरणात आणणे यांसाठी काही मासांचा (महिन्यांचा) कालावधी लागेल, असे मला वाटते. शिकण्यात किती मजा आणि आनंद आहे, हे मला आतापर्यंत ठाऊकच नव्हते. प.पू. डॉक्टरांनी पू. ताईंच्या माध्यमातून संतरूपी चालते-फिरते आध्यात्मिक विश्‍वविद्यालयच आम्हाला बहाल केले आहे आणि ईश्‍वराच्या कृपेने अशा आध्यात्मिक विश्‍वविद्यालयात मला शिक्षण घेण्याचा प्रत्यक्ष अनुभव प्राप्त झाला.

श्रीकृष्णाला तळमळीने आळवणारी, ६१ टक्के पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील चि. संस्कृती गजानन बावणे (वय ४ वर्षे) !

चि. संस्कृती बावणे
१. सौ. रूपाली गजानन बावणे (चि. संस्कृतीची आई), अमरावती
१ अ. जन्मापूर्वी
१. गर्भारपणात मी गणपति अथर्वशीर्ष वाचत असे, तसेच देवळातही जात असे.
२. चि. संस्कृतीचे बाबा पोलीस खात्यात नोकरी करत असल्यामुळे त्या वेळी आम्ही धुळे येथे शासकीय क्वार्टरमध्ये रहात होतो. क्वार्टरच्या बाहेेर इच्छापूर्ती गणपतीचे एक देऊळ होते. काही वेळा आणि चतुर्थीच्या दिवशी मी त्या देवळात दर्शनाला जात असे. नामजप आणि आध्यात्मिक उपाय प्रार्थना करत असे.
३. सातव्या मासापासून आईकडे अमरावतीत आल्यानंतर नियमित नामजप करत असे, तसेच उपायांची चित्रे लावणे इत्यादी आध्यात्मिक उपाय करत असे.
४. मी पोटावर हात ठेवून नामजप आणि प्रार्थना केला की, बाळ आतून प्रतिसाद द्यायचे.

गुरुमाऊलीप्रती अनन्य भाव असल्याने अखंड भावावस्थेत राहून दुसर्‍यांमधील भावही जागृत करणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. स्नेहा झरकर !

कु. स्नेहा झरकर
सौ. आरती पुराणिक
१. छपाईच्या दृष्टीने पालट केल्यानंतर कु. स्नेहा झरकरचे छायाचित्र जिवंत वाटू लागणे
    कला विभागाच्या सेवेअंतर्गत कु. स्नेहा झरकर हिच्या छायाचित्रावर छपाईच्या दृष्टीने काही पालट केले होते. चित्र पूर्ण झाल्यावर ते जिवंत वाटत आहे, असे लक्षात आले. कु. स्नेहा झरकर हिच्यातील भावामुळे ती प्रत्यक्ष आमच्याशी बोलत आहे, अशा हालचाली तिच्या छायाचित्रात जाणवल्या. प.पू. डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांना ते पुष्कळ आवडले आणि त्यांनी ते वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र संगणकीय पत्राद्वारे (ई-मेलद्वारे) स्नेहाला पाठवून देण्यास सांगितले.

गुर्वाज्ञापालनाच्या तळमळीमुळे प्रकृती अस्वास्थ्य असतांनाही मी माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत समष्टीसाठी नामजप करत राहीन, असा प.पू. डॉक्टरांना निरोप पाठवणारे सनातनचे ४७ वे संत पू. राणेआजोबा !

पू. रघुनाथ राणे
    पू. रघुनाथ राणेआजोबा (वय ७८ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
    सर्वस्वाचा त्याग, अखंड सेवा, सर्वांप्रती प्रेम, कशाबद्दलही कधीच तक्रार नसणे इत्यादी अनेक गुणवैशिष्ट्ये असलेल्या पू. राणेआजोबांनी साधकांसमोरच नाही, तर अनेक संतांपुढेही आदर्श संतांचे उदाहरण ठेवले आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.९.२०१५)

१. सेवा हाच श्‍वास आणि सेवेचाच ध्यास !
    राणेआजोबा तपोधाम (रत्नागिरी) येथे वास्तव्याला असायचे. त्यांच्यात सेवेची तीव्र तळमळ असल्याने ते उतारवयातही तेथील शक्य त्या सर्व सेवा करायचे. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी ते रामनाथी आश्रमात आले होते. तपासणी झाल्यावर विश्रांतीसाठी काही दिवस आश्रमात थांबण्याऐवजी ते म्हणाले, मला बरे वाटत आहे. आता मी तपोधामला जाऊ शकतो.

प.पू. पांडे महाराजांच्या ठिकाणी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे दर्शन होणे

    २९.५.२०१५ या दिवशी रात्री मी प.पू. पांडे महाराजांच्या खोलीत सेवेसाठी गेलो होतो. त्या वेळी ते पलंगावर बसले होते. तेव्हा मला त्यांच्या ठिकाणी योगतज्ञ दादाजी वैशंपायन दिसले. यापूर्वीही मला प.पू. पांडे महाराजांच्या ठिकाणी श्री साईबाबा, श्री दत्तगुरु आणि शेषशायी श्रीविष्णु यांचे दर्शन झाले होते.
- श्री. गोपाळ जोरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

डुक्करज्वर (स्वाइन फ्लू) आणि आयुर्वेदीय उपचार

     सध्या सर्वत्र डुक्करज्वराची अनेकांना लागण होत आहे. त्या अनुषंगाने सर्वांनाच काळजी घेता यावी, यासाठी हा लेख पुनर्प्रसिद्ध करत आहोत.
१. डुक्करज्वर म्हणजे काय ?
    जुलै २००९ पासून डुक्करज्वर हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या मासापासून महाराष्ट्रात या रोगाने पुन्हा डोके वर काढले आहे. हा विकार स्वाईन A (H1N1) या विषाणूमुळे (व्हायरसमुळे) होतोे. हे विषाणू डुकरांमध्ये सहज आढळतात; म्हणून या रोगाला डुक्करज्वर म्हणतात. डुकराचे मांस खाणे आणि डुक्करज्वर यांचा मात्र काहीच संबंध नाही. हा विषाणू हवेत ८ घंटे जिवंत राहू शकतो. या रोगाने बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणार्‍या तुषारांमध्ये हे विषाणू असतात. यांचा रोगप्रतिकारक शक्ती अल्प असलेल्या व्यक्तीचे नाक, डोळे, तोंड इत्यादी भागांशी संपर्क आल्यास विषाणूंचे संक्रमण होते, असे आधुनिक वैद्यकशास्त्र सांगते.

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी (१२.९.२०१५) सकाळी ९.४३ वाजता
समाप्ती - श्रावण अमावास्या (१३.९.२०१५) दुपारी १२.११ वाजता
उद्या अमावास्या आहे.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् राष्ट्रप्रेमी हिंदु यांना नम्र विनंती !

भ्रमणभाष चोरणार्‍यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तो सतर्कतेने स्वतःजवळ बाळगा !
    गेल्या काही दिवसांमध्ये भ्रमणभाष चोरीला जाण्याच्या अथवा गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याचे लक्षात आलेे. एका साधकाच्या भ्रमणभाषची चोरी होण्याच्या संदर्भातील प्रसंग पुढे देत आहे.
१. पेट्रोलपंपाजवळ भ्रमणभाषवर बोलत उभ्या असलेल्या साधकाची एका
अज्ञात दुचाकीस्वाराने चौकशी करणे आणि नंतर त्याच्याशी अरेरावीने बोलणे
    काही दिवसांपूर्वी रात्री १० वाजताच्या सुमारास एका शहरातील पेट्रोलपंपाच्या बाजूला दुचाकी वाहन बंद करून एक साधक भ्रमणभाषवर बोलत होता. त्याच वेळी एक अज्ञात दुचाकीस्वार त्या साधकाच्या बाजूला येऊन थांबला आणि त्याने तू कुठे रहातोस, अशी चौकशी केली. नंतर तो दुचाकीस्वार तुझे वाहन माझ्या वाहनाला घासून गेले, असे अरेरावीने बोलू लागला.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् राष्ट्रप्रेमी हिंदु यांना नम्र विनंती !

भ्रमणभाष चोरणार्‍यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तो सतर्कतेने स्वतःजवळ बाळगा !
    गेल्या काही दिवसांमध्ये भ्रमणभाष चोरीला जाण्याच्या अथवा गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याचे लक्षात आलेे. एका साधकाच्या भ्रमणभाषची चोरी होण्याच्या संदर्भातील प्रसंग पुढे देत आहे.
१. पेट्रोलपंपाजवळ भ्रमणभाषवर बोलत उभ्या असलेल्या साधकाची एका
अज्ञात दुचाकीस्वाराने चौकशी करणे आणि नंतर त्याच्याशी अरेरावीने बोलणे
    काही दिवसांपूर्वी रात्री १० वाजताच्या सुमारास एका शहरातील पेट्रोलपंपाच्या बाजूला दुचाकी वाहन बंद करून एक साधक भ्रमणभाषवर बोलत होता. त्याच वेळी एक अज्ञात दुचाकीस्वार त्या साधकाच्या बाजूला येऊन थांबला आणि त्याने तू कुठे रहातोस, अशी चौकशी केली. नंतर तो दुचाकीस्वार तुझे वाहन माझ्या वाहनाला घासून गेले, असे अरेरावीने बोलू लागला.

धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र

सनातनच्या या ग्रंथात वाचा...
  • उत्सव आणि व्रते यांचे महत्त्व
  • उत्सव आणि व्रते शास्त्रानुसार का साजरे करावेत ?
  • उत्सव आणि व्रते साजरा करण्याचे फायदे अन् काही प्रमुख व्रते
  • याशिवाय विविध उत्सव आणि व्रते यांविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत गणेशोत्सव-पितृपक्ष विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १३ सप्टेंबर
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ सप्टेंबरच्या
दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी (१२.९.२०१५) सकाळी ९.४३ वाजता
समाप्ती - श्रावण अमावास्या (१३.९.२०१५) दुपारी १२.११ वाजता
आज अमावास्या आहे.

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या पुढे आहे. माझ्या मागे जो
आनंद आहे, तो तुमच्या मागे येईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे.
भावार्थ : आनंद माझ्या मागे आहे, याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरीराच्या मागच्या भागातून जात असल्याने आनंद माझ्या मागे आहे, असे म्हटले आहे. दुःख माझ्या पुढे आहे म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते. मी दुःखी आहे म्हणजे तुम्ही नामजप करून आनंदी होत नाही, याचे मला दुःख आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
शिक्षेने नाही, तर साधनेनेच दुर्गुण जातात 
'शिक्षेने दुर्गुण जात नाहीत, तर साधनेनेच जातात, हे न कळणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते राज्य करण्याच्या क्षमतेचे आहेत का ? यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा. त्यात सर्वांकडून साधना करवून घेतली जाईल. '
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.७.२०१५)          

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ? 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

जम्मू-काश्मीरच्या पोलिसांचे दायित्व वाढले !

संपादकीय
      जम्मू-काश्मीर राज्यात गोमांस विक्रीवर बंदी, असे वृत्त वर्तमानपत्रात नुकतेच झळकले. ज्या राज्यात धर्मांधांच्या भारतविरोधी कृत्यांना उधाण आलेले असते, त्या राज्यात न्यायालयाकडून गोमांस विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचे वृत्त वाचून कुणाही भारतियाला त्याविषयी अप्रूप वाटेल. मुसलमान समाजाचे वर्चस्व असलेले हे राज्य, त्यातच पाकधार्जिण्या फुटीरतावाद्यांचा दबाव. केंद्रशासनाने आखलेल्या प्रत्येक योजनेला विरोध आणि देशविरोधी तसेच हिंदुविरोधी हेच जणू ध्येय असलेले हे राज्य आहे, ही सर्वसामान्यांची झालेली धारणा ! राज्यशासनाचे या फुटीरतावाद्यांवर नियंत्रण नाही. सर्व सुविधा हाताशी असतांना राज्यशासन या फुटीरतावाद्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलत नाही, त्यामुळे फुटीरतावादी मनाला येईल त्याप्रमाणे कारवाया करत सुटतात. देशभर गोहत्याबंदीचे वारे वहात असतांना या फुटीरतावाद्यांच्या एका गटाने गोमातेची हत्या केली आणि दूरचित्रवाहिनीवरून तो गोहत्येचा देखावा प्रसारित केला. अशा या राज्यात न्यायालयाने गोमांसविक्रीवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn