Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जम्मू-काश्मीरमध्ये गोमांस विक्रीवर बंदी !

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
गोमांस विक्रीवरील बंदीच्या निर्णयासमवेत त्याची कठोर कार्यवाही झाली, तरच खरी गोहत्या थांबू शकेल !
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये गोमांस खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.   गोमांस विक्रीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयाची कडक कार्यवाही झाली पाहिजे, असा आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. राज्यात कुठेही गोमांसाची विक्री होऊ नये, यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावरील पोलिसांनी गोमांसाची विक्री करण्यावर कठोर कारवाई करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ आता जम्मू-काश्मीरमध्येही गोमांस खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. 

मशिदींवरून ध्वनीक्षेपक काढा ! - केरळ सुन्नी महालू फेडरेशनचे आवाहन

कोची (केरळ) - केरळ सुन्नी महालू फेडरेशनकडून मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोझीकोड येथे फेडरेशनची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत आपल्याकडून इतरांना त्रास होऊ नये, यासाठी मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा मर्यादित स्वरूपात वापर करावा, तसेच ज्या गोष्टींमुळे धार्मिक सद्भावना धोक्यात येते, अशा गोष्टी टाळाव्या, असे फेडरेशनचे सहसचिव आणि मुस्लीम लीगचे नेते पनक्कड हैदर अली शिहाब थांगल यांनी सांगितले. फेडरेशनच्या या आवाहनाचे मुसलमान नेत्यांनी स्वागत केले आहे. ८ सहस्र मशीद समित्या या फेडरेशनशी जोडलेल्या आहेत.
जमात-ए-इस्लामीचे नेते महंमद कारक्कुन्नू म्हणाले, "एकाच भागातील विविध मशिदींमधून वेगवेगळ्या वेळेस नमाजपठण केल्यामुळे लोकांना त्रास होतो. अशा वेळी मुसलमानेतर लोक जेव्हा ही अजान ऐकतात, तेव्हा त्यांच्याकडून पैगंबरांच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येते." 'एका भागात एकाच मशिदीतून प्रार्थना झाली पाहिजे', असे ऑल इंडिया इसलाही मूव्हमेंटचे जनरल सेक्रेटरी हुसेन मदवूर यांनी सांगितले. 

भोंगे उतरवले; पण अनधिकृत मशिदींवर कारवाई कधी ? - जनतेचा प्रश्न

  • नवी मुंबई पोलिसांनी अनधिकृत मशिदींवरील भोंगे उतरवले   
  • पहाटे भोंगे न लावण्याचे मशिदींकडून आश्वांसन !

हिंदूंच्या मंदिरांवर त्वरित कारवाई करणारे प्रशासन अनधिकृत मशिदींविषयी गप्प का ? अवैध गोष्टींवर स्वतःहून कारवाई न करणारे प्रशासन हवेच कशाला ?
नवी मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी मुसलमान समाजाच्या प्रतिनिधींसह घेतलेल्या बैठकीत त्यांना न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत सकाळी ६ वाजण्यापूर्वीच्या अजानसाठी भोंगे न लावण्याच्या संदर्भात सूचवले. पोलिसांच्या या सूचनेमुळे मुसलमानांनी सकाळी ६ वाजण्यापूर्वीच्या अजानसाठी भोंगे न वापरण्याचा निर्णय घेतला, तसेच पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार येथील ५ अनधिकृत मशिदींवरील भोंगेही उतरवण्यात आले. भोंगे जरी उतरले असले, तरी या अनधिकृत मशिदींवर कारवाई कधी करण्यात येणार, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

लष्कर-ए-तोयबाचे लक्ष्य अयोध्या, मथुरा आणि काशी !

मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता !
अयोध्या - लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंवादी संघटनेचा अयोध्या, मथुरा आणि काशी या देशातील प्रमुख मंदिरांना लक्ष्य करण्याचा डाव असल्याची माहिती  गुप्तचर विभागाकडून मिळाल्यावर शासनाने राम जन्मभूमीसह इतर दोन्ही मंदिरांची सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी संशयितांची चौकशी करण्याची, तसेच वाहनांची तपासणी मोहीम चालू केली आहे.

विश्‍वभरातील जिज्ञासूंना ईश्‍वरप्राप्तीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना ! - पू. सिरियाक वाले

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आध्यात्मिक कार्यशाळेला प्रारंभ
      रामनाथी - ईश्‍वरप्राप्ती, म्हणजेच आनंदप्राप्तीसाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी (साधना) विश्‍वभरातील जिज्ञासूंना मार्गदर्शन करण्यासाठी अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेने झाली आहे, असे प्रतिपादन पू. सिरियाक वाले यांनी केले. अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ऐतिहासिक आध्यात्मिक कार्यशाळेला १० सप्टेंबर २०१५ पासून रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात प्रारंभ झाला. या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
     या वेळी राजस्थान येथील संत पू. आैंकारानंद महाराज, पू. भगवंतकुमार मेनराय, पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, पू. (सौ.) योया वाले या संतांची वंदनीय उपस्थिती होती. वैदिक पद्धतीने शंखनाद, श्री गणेशाचा श्‍लोक आणि वेदमंत्राच्या घोषात चैतन्यमय वातावरणात कार्यशाळेचे उद्घाटन संतांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

उज्जैन येथील कुंभपर्वात सनातनला पूर्ण सहकार्य करणार ! - श्री. दिवाकर नातू, मुख्य अधिकारी, उज्जैन कुंभपर्व

प्रदर्शनाची माहिती सांगतांना आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे (डावीकडे), 
सौ. श्रेया प्रभु (मागे), श्री. दिलीप भार्गव, श्री. एस्.के. दुबे आणि श्री. दिवाकर नातू
  नाशिक, १० सप्टेबंर (वार्ता) - सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नाशिक येथे 'राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण' हे प्रदर्शन लावले असल्याचे समजले. प्रदर्शन पहाण्याच्या उत्कंठेने मला रहावले गेले नाही आणि मी हे प्रदर्शन बघण्यास आलो. उज्जैन येथील कुंभपर्वात सनातनला पूर्ण सहकार्य करणार, असे उद्गार उज्जैन (मध्यप्रदेश) येथे वर्ष २०१६ मध्ये होणार्या कुंभपर्वाचे मुख्य अधिकारी श्री. दिवाकर नातू यांनी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर काढले. 

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात अध्यात्म विश्वूविद्यालयाच्या आध्यात्मिक कार्यशाळेला प्रारंभ

डावीकडून पू. भगवंतकुमार मेनराय, पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, पू. सिरियाक वाले,
दीपप्रज्वलन करतांना पू. औंकारानंद महाराज आणि पू. (सौ.) योया वाले

वडकी (पुणे) येथील युवा सेनेचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांची हत्या

दिवसाढवळ्या होणार्‍या हत्या हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे लक्षण असून जनतेला
सुरक्षित जीवन जगण्यासाठी भाजप शासनाने चांगले दिवस (अच्छे दिन) दाखवावेत, ही अपेक्षा !
     पुणे, १० सप्टेंबर - येथील वडकी भागातील युवा सेनेचे अध्यक्ष हेमंत प्रकाश गायकवाड (वय ३५ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना ९ सप्टेंबर या दिवशी घडली. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रकरणातील आक्रमणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पथके पाठवली आहेत.
१. हेमंत प्रकाश गायकवाड यांचे खाजगी सुरक्षारक्षक पुरवण्याचे आस्थापन आहे. ते ९ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३.१५ वाजता त्यांच्या चारचाकी वाहनामधून आस्थापनात प्रविष्ट झालेल्या एका कर्मचार्‍याला घेऊन छायाचित्र काढण्यासाठी घेऊन गेले होते.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाविषयी प्रसिद्ध केलेली आकडेवारी शंकास्पद !

     पुणे, १० सप्टेंबर - सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एम्एस्आर्डीसी) व्यवस्थापकीय संचालकांनी द्रुतगती महामार्गासह खाजगी सहभागातून उभारलेल्या सर्वच प्रकल्पांची माहिती आणि पथकर संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले होते. त्यानंतरही सदर माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही म्हणून राज्य माहिती आयोगाने कारवाई करण्याची चेतावणी दिली होती. अखेर १० सप्टेंबर या दिवशी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा करार आणि इतर तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार या महामार्गावर वर्षाला २० सहस्र वाहने ये-जा करतात, म्हणजेच दिवसभरात केवळ ५५ वाहनेच या महामार्गावरून जातात. (द्रुतगती महामार्गावरून दर दिवशी शेकडो वाहने ये-जा करत असतांना प्रसिद्ध केलेली माहिती ही हास्यास्पद आणि धूळफेक करणारीच आहे. - संपादक)

(म्हणे) हिंदूंचे काही असेल, तर माझ्याकडे येऊच नका ! - आदर्श गणेशोत्सव चळवळीच्या अंतर्गत निवेदन देण्यासाठी गेल्यावर हिंदुत्वनिष्ठांना दिलेले उर्मट उत्तर

     एका जन्महिंदु पदाधिकार्‍याचा अनुभवायला आलेला हिंदुद्वेष्टेपणा 
     एका जिल्ह्यात आदर्श गणेशोत्सव चळवळीच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्सव धर्मशास्त्रानुसार आदर्श पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात येत आहेत. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याला भेटायला गेले होते. त्या वेळी 'हिंदु' हा शब्द ऐकून चिडलेल्या त्या पदाधिकार्‍याने कार्यकर्त्यांना 'हिंदूंचे काही असेल, तर माझ्याकडे येऊच नका', असे सांगितले.

'शान-ए-पाकिस्तान'सारखे कार्यक्रम आमच्या पोटापाण्याचे प्रश्‍न ! - ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज यांच्या दूरभाषवर वाणिज्य विभागातील कर्मचार्‍याचे संतापजनक उत्तर

     सांगली, १० सप्टेंबर (वार्ता.) - 'शान-ए-पाकिस्तान'सारखे कार्यक्रम हे आमच्या पोटापाण्याचे प्रश्‍न आहेत. पाकिस्तानसमवेत इतके सगळे चालू आहे. कशाला आमच्या पोटावर पाय आणता, असे संतापजनक उत्तर वाणिज्य विभागातील कर्मचार्‍याने सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय संघटनेचे संस्थापक ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज यांना दिले. ह.भ.प. बोंगाळे महाराज यांनी निषेध नोंदवण्यासाठी वाणिज्य मंत्रालयात दूरभाष केला होता. त्या वेळी त्यांना हे उत्तर मिळाले. 

माओवाद्यांनी गडचिरोलीत वनविभागाचे कार्यालय जाळले; ग्रामपंचायत कार्यालयही पेटवले

माओवाद्यांचा आतंकवाद !
     गडचिरोली - आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या हत्येच्या घटनेनंतर ९ सप्टेंबर या दिवशी रात्री पेरमिली येथील वनपरिक्षेत्र कार्यालय, तसेच दुर्गापूर येथील ग्रामपंचायत जाळल्याची घटना घडली आहे.
     गेल्या काही दिवसांत नक्षलविरोधी अभियानामुळे माओवादी चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे संतप्त माओवाद्यांनी जिल्ह्यात हिंसक कारवाया चालू केल्या आहेत. अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे सशस्त्र माओवाद्यांनी हैदोस घालून वनविभागाची इमारत, तसेच महत्त्वाचे दस्तऐवज जाळून टाकले. तर धानोरा तालुक्यातील दुर्गापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला आग लावली. दोन्ही ठिकाणी महत्त्वाचे दस्तऐवज जळाले आहेत.

गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन होण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन

आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन देतांना
      पुणे, १० सप्टेंबर (वार्ता.) - धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतात अथवा नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जन केले जावे. महानगरपालिकेच्या वतीने मूर्तीदान, कृत्रिम हौद यांसारख्या अशास्त्रीय संकल्पना राबवल्या जाऊ नयेत, यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. निरंजन दाते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णा पाटील, कु. क्रांती पेटकर, श्री. दीपक आगवणे उपस्थित होते. या प्रसंगी कृत्रिम हौद संकल्पनेचा फोलपणा सिद्ध करणार्‍या माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीविषयी कुमार यांंना अवगत करण्यात आले. या वेळी कुमार यांनी या संदर्भात निश्‍चितपणे विचार करू, असे आश्‍वासन दिले.

(म्हणे) दुष्काळग्रस्तांच्या साहाय्यासाठी देवस्थानांनी पुढाकार घ्यावा !

आयबीएन् लोकमतचे आवाहन !
आयबीएन् लोकमत हे देवस्थानांना सांगण्यापेक्षा आयबीएन् लोकमत ग्रुपलाच का सांगत नाही ?
आयबीएन् लोकमतने असे आवाहन अल्पसंख्यांकांच्या मशिदी आणि चर्च यांना करावे !
दुष्काळग्रस्तांच्या साहाय्यासाठी देवस्थानांच्या पैशावर डोळा ठेवू नये ! दुष्काळग्रस्तांना साहाय्य
करणे, हे शासनाचे काम आहे. देवस्थानचा पैसा हा धर्मकार्यासाठी वापरला गेला पाहिजे.
      मुंबई, १० सप्टेंबर - महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तीर्थक्षेत्र भगवानगडाने ३ दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे राज्यातील इतरही देवस्थाने न्यास दुष्काळग्रस्तांच्या साहाय्यासाठी पुढाकार घेणार का, असे आवाहन आयबीएन लोकमत या दूरचित्रवाहिनीने केले आहे. त्यासाठी या दूरचित्रवाहिनीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती आणि पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधला आहे.

शिवसृष्टीचे प्राथमिक बांधकामाचे लोर्कापण !

     सांगली, १० सप्टेंबर (वार्ता.) - 'लोकजागर'चे संपादक श्री. प्रवीण कवठेकर यांच्या संकल्पनेतून मिरज तालुक्यात शिवसृष्टी उभी रहात आहे. याच्या प्राथमिक बांधमकाचे लोर्कापण नुकतेच करण्यात आला. या वेळी उद्योगपती श्री. राम वेलणकर, ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज, श्रीमती मालतीताई जोशी, सर्वश्री महेश ठाणेदार, हणमंत कुलकर्णी, एकनाथ खोत यांसह अन्य उपस्थित होते. या प्रकल्पाचा एकूण व्यय १० कोटी रुपये आहे. श्रीराम-श्रीकृष्ण यांच्यापासून क्रांतीकारक यांची माहिती, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य दाखवणारी हे शिवसृष्टी असणार आहे.

चेंबूर येथे दहीहंडीच्या दिवशी धर्मांधांकडून हिंदू आणि भगवान श्रीकृष्ण यांना शिवीगाळ

काँग्रेसप्रमाणे भाजपच्याही राज्यात धर्मांधांचा 
उद्दामपणा चालूच ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     चेंबूर - येथील वाशीनाका परिसरात दहीहंडीनिमित्त सराव करतांना येथील एका गोविंदा पथकातील जवळजवळ ८० ते १०० तरुणांना काही धर्मांधांनी शिवीगाळ केली. या वेळी त्यांनी श्रीकृष्णाला शिवीगाळ करत हिंदु सण-उत्सव यांच्याविषयीही अपशब्द उच्चारले. (हिंदूंनो, किती काळ आपल्या देवतांविषयी धर्मांधांकडून अपशब्द ऐकत बसणार ? आतातरी त्यांना खडसवण्यासाठी संघटित व्हा ! - संपादक) संतप्त हिंदू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाऊ लागताच धर्मांध पळून गेले. (कावेबाज धर्मांध ! - संपादक) 

सनातनचे साधक श्री. जगन्नाथ जांभळे यांना 'रायगड भूषण पुरस्कार' प्रदान !


श्री. जगन्नाथ जांभळे
     रायगड - पेण (रायगड) येथील सनातनचे साधक श्री. जगन्नाथ शिवराम जांभळे यांना वर्ष २०१५-१६ मध्ये रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रती वर्षी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या नामवंताचा सन्मान रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येतो. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते श्री. जांभळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या येळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. सुरेश टोकरे, आमदार श्री. जयंत पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य अन् पदाधिकारी उपस्थित होते. श्री. जांभळे यांनी यशाचे श्रेय सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिले आहे. तसेच 'या यशात पत्नी सौ. सुनीता आणि सहसाधक यांचा वाटा मोठा होता', असेही त्यांनी सांगितले. 

पुणे येथे एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा

जन्महिंदूंना धर्मशिक्षण देण्याची अपरिहार्यता दर्शवणारी घटना ! त्यासाठी 'हिंदु राष्ट्र'च हवे ! 
     पुणे, १० सप्टेंबर - येथील एरंडवणे भागातील पटवर्धन बाग बालमित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवासाठी मागितलेली १ सहस्र रुपये वर्गणी दिली नाही, म्हणून पटवर्धन बागमधील 'सूर्या' उपाहारगृह चालकाला मारहाण करून तोडफोड केली. हा अपप्रकार ६ सप्टेंबर या रात्री घडला आहे. त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर उपाहारगृह चालकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे.

(म्हणे) देशाला पुढे न्यायचे असेल, तर कर्मकांडांपासून मुक्त करावे लागेल !

अंनिसच्या कार्यक्रमात तथाकथित कीर्तनकार शामसुंदर सोन्नूर यांचे धर्मद्रोही विधान !
अशा तथाकथित कीर्तनकारांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !
      मुंबई - जोपर्यंत कर्मकांडांतून समाज बाहेर पडणार नाही, तोपर्यंत तो विवेकवादी होणार नाही. जो समाज वर्णव्यवस्था आणि कर्मकांड यांत गुंतलेला असतो, तो पुढे न जाता गुलाम बनतो. देश समृद्ध करायचा असेल, तर समाजातील कर्मकांड नाहीसे करावे लागेल. तोपर्यंत समाज विवेकवादी होणार नाही, असे धर्मद्रोही प्रतिपादन तथाकथित कीर्तनकार शामसुंदर सोन्नुर यांनी काढले. लातूर येथे अंनिसच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. (समाजात आज कर्मकांड करणारे आहेत तरी किती जण ? समाज कर्मकांडांमुळे नाही, तर सोन्नुर यांच्यासारख्या धर्मविरोधकांमुळे मागे आहे. - संपादक)

काश्मीर येथे आयएस्आयएस्चे झेंडे फडकवणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करावा !

हिंदुत्ववाद्यांची राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी
     नंदुरबार - समान नागरी कायदा लागू करावा, काश्मिरात आयएस्आयएस्चे झेंडे फडकवणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करावा, या मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदुत्ववाद्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नीलेश सागर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
     सनातन संस्थेच्या सौ. निवेदिता जोशी म्हणाल्या, नेपाळवर नुकतेच मोठे नैसर्गिक संकट येऊन गेले आणि मोठा प्रलय होऊन तेथील बहुतांश जनता उद्ध्वस्त झाली. तरीही केवळ साधनेच्या जोरावर ते स्थिर राहून आज हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी लढायला उभे राहू शकले आहेत.

काळेवाडी (पुणे) येथे सापडला जिवंत हातबॉम्ब !

असुरक्षित पुणे शहर !
     पिंपरी, १० सप्टेंबर - नदीत सापडलेला जिवंत हातबॉम्ब (हॅण्ड ग्रेनेड) विकण्याच्या प्रयत्नात असणार्‍या एका तरुणाला वाकड पोलिसांनी ९ सप्टेंबर या दिवशी सापळा रचून अटक केली आहे. (मागील आठवड्यात पुण्यातील कोंढवा येथील एका भंगाराच्या दुकानात अशाच तोफगोळ्यामुळे स्फोट झाला होता. असे मिळणारे जिवंत बॉम्ब हे कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे लक्षण आहे. - संपादक) त्या तरुणाचे नाव विकी अशोक सावंत (रा. काळेवाडी) असे आहे. हा हातबॉम्ब बॉम्बनाशक पथकाने ताब्यात घेतला आहे.

प्रा. के.एस्. भगवान यांना धमकी !

      म्हैसूर (कर्नाटक) - हिंदु धर्मीयांचा पवित्र ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेवर टीका करणारे प्रा. के.एस्. भगवान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. दिवस मोजण्यास प्रारंभ करा, पुढचा क्रमांक तुमचाच आहे, अशी धमकी देणारे पत्र भगवान् यांच्या घरी पोहोचल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
     नुकतीच कर्नाटकात प्रा. कलबुर्गी यांची हत्या झाली होती. या हत्येनंतर प्रा. भगवान् यांना बजरंग दलाच्या एका नेत्याने ट्वीटरवरून धमकी दिली होती. त्यानंतर ८ सप्टेंबरला दुपारच्या वेळी एका अज्ञात व्यक्तीने भगवान् यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला एक पत्र दिले. मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या त्या पत्रात लिहिले होते की, तुम्ही सुरक्षित आहात, या भ्रमात राहू नका. पुढील क्रमांक तुमचाच आहे. ३ प्रयत्नांत यश मिळाले आहे. आमचा नेम चुकत नाही. पोलीसही तुमचे रक्षण करू शकणार नाहीत. दिवस मोजण्यास प्रारंभ करा.

डुक्कर ज्वरावरील (स्वाइन फ्ल्यू) आयुर्वेदीय उपचार

१. लंघन (उपवास) : अंगात ताप असतांना पचनशक्ती मंद असते. या वेळी पचण्यास जड असे अन्नपदार्थ टाळावेत. या वेळी कडक उपवास केल्यास उत्तम; पण तो शक्य नसल्यास ताप उतरेपर्यंत भाजलेल्या लाह्या किंवा चुरमुरे यांचा चिवडा, राजगिर्‍याचे लाडू, मुगाचे कढण यांसारखा हलका आहार घ्यावा. भाताची गरम गरम पेजही खूपच लाभदायक ठरते. 

फलक प्रसिद्धीकरता

     भोंगे उतरले; पण अनधिकृत मशिदींवर कारवाई कधी होणार ? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस आणि मुसलमान समाजाचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत सकाळी ६ वाजण्यापूर्वीच्या अजानसाठी भोंगे न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार येथील ५ अनधिकृत मशिदींवरील भोंगेही उतरवण्यात आले.

खंडपिठाच्या मागणीसाठी कोल्हापूर बंद : सांगलीत अधिवक्त्यांचा कामकाजावर बहिष्कार !

     कोल्हापूर, १० सप्टेंबर (वार्ता.) - उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहित शहा सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरसाठी उच्च न्यायालयाचे खंडपीठ घोषित करतील, अशी अधिवक्त्यांची अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली. त्यामुळे अधिवक्त्यांनी १० सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. यामुळे आज बहुतांश बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. या बंदला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून सांगलीतही ९ सप्टेंबरपासून तीन दिवस कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला आहे. कोल्हापूरला खंडपीठ न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार अधिवक्त्यांनी केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
Navi Mumbai Police aur Musalmanoke baithak 
ke bad 5 avaidh masjidoparse laudspeaker utare gaye. 
- laudspeaker hataye, avaidh masjidopar karvai kab ? 

जागो ! :
नवी मुंबई में पुलीस और मुसलमानों के बैठक 
के बाद ५ अवैध मस्जीदपरसे लाऊडस्पीकर उतारे गये. 
- लाऊडस्पीकर हटाये, अवैध मस्जीदोंपर कारवाई कब ?

संतांचा अपप्रचार करणारी प्रसारमाध्यमे

हिंदु समाजाला साधू-संतांचे महत्त्व कळण्यासाठी हे विशेष सदर !
३ अ. एका वासनांध मुसलमान भोंदूबाबाने अभिनेत्रीवर बलात्कार 
केल्यानंतर ब्रही न काढणारी प्रसारमाध्यमे हिंदु संतांवर खोटे 
आरोप करून त्यांची अपकीर्ती करण्यात अग्रेसर असतात !
     बंगालीबाबा इस्माईल आझिम खान या भोंदूने मुंबईत एका दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमातील एका अभिनेत्रीचे २६ लक्ष रुपये लुबाडून तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. या अभिनेत्रीला तंत्रविद्येच्या साहाय्याने म्हाडाच्या इमारतीत सदनिका मिळवून देण्याचे आश्‍वासन इस्माईलने दिले होते. 
३ आ. संतांची अपकीर्ती करण्यात सदैव अग्रेसर असलेली; परंतु उघड 
आव्हान दिल्यावर मूग गिळून गप्प बसणारी धर्मद्रोही प्रसारमाध्यमे !
     मध्यप्रदेशातील दतिया येथील पंडोखर गावात असणार्‍या महाभारतकालीन मारुति मंदिराच्या (या मंदिराला पंडोखर सरकार म्हणतात) ठिकाणी रहाणारे संत पू. गुरुशरणजी महाराज हे पंडोखर सरकारच्या कृपेने समाजकल्याणासाठी लोकांच्या अडचणींवर उपाय सांगतात आणि त्यांच्या अडचणी केव्हा सुटणार ते सांगतात.

पश्‍चिम आशियातील निर्वासितांची नव्हे, मानवाधिकाराची समस्या !

१. सध्याच्या सिरिया, जॉर्डन, तुर्की या 
देशांच्या सीमेवरील परिस्थिती 
ही वर्ष १९७१ मधील भारताच्या 
बांगलादेश सीमेसारखीच !
      सध्या पश्‍चिम आशियामध्ये जी मोठी भयंकर मानवी समस्या उभी राहिली; म्हणून जगभर गवगवा चालला आहे, त्याच्या बातम्या बघून ४५ वर्षे मागे भारताच्या पूर्व सीमेवरील घटनांचे स्मरण झाले. १९७१ मध्ये पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. लष्करशहा जनरल याह्याखान यांनी त्या घेतल्या आणि तेव्हा आजचा बांगलादेश, पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता. तेथील लोकसंख्या पश्‍चिम पाकिस्तानपेक्षा अधिक होती आणि संसदेतही पूर्व पाकिस्तानच्या अवामी लीग पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते; पण पंजाबी वर्चस्वाखाली चाललेल्या पाकिस्तानी कारभाराला ते मान्य होणे शक्य नव्हते; म्हणूनच मग तडजोडीची बोलणी चालू झाली. अवामी लीगचे नेते शेख मुजीबूर रहमान यांनी उपपंतप्रधान व्हावे आणि त्यांच्या निम्म्यानेही जागा न जिंकलेल्या पिपल्स पार्टीचे नेते झुल्फीकार अली भुत्तो यांना पंतप्रधान म्हणून मान्य करावे; असा याह्यांचा आग्रह होता. तो मान्य झाला नाही आणि रातोरात गाफील मुजीबूरना उचलून थेट पश्‍चिम पाकिस्तानात आणले गेले. पूर्व पाकिस्तानात अवामी लीग नेत्यांची धरपकड चालू झाली. अनेक जण भूमीगत झाले, तर पूर्व पाकिस्तानी असलेल्या सैनिकांनी पाकविरोधात बंड पुकारले.

विकासनीती दुष्काळ दूर करेल का ?

       राज्यातील सुमारे ८ सहस्र गावांमध्ये भीषण दुष्काळ पडला असून येणार्‍या काळात ही संख्या दुप्पट होऊ शकते. गेल्या १० वर्षांची पावसाची आकडेवारी पाहिल्यास प्रतिवर्षी पाऊस गतवर्षीपेक्षा अल्पच होत आहे. आज केवळ महाराष्ट्र्रच नव्हे, तर पंजाब, हरियाणा यांसह निम्मा भारत दुष्काळाच्या छायेत आहे. दुष्काळाची परिस्थिती सप्टेंबरमध्येच निर्माण झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. धरणांमधील पाणीसाठा अल्प होत चालल्याने आतापासून अनेक जिल्ह्यांत पाणीकपात चालू झाली आहे. जालन्याला १० दिवसानंतर, नांदेड येथे २० दिवसानंतर, लातूर येथे मासातून एकदाच आणि पुणे येथे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

सुवर्णभूमी भारत !

१. भारताला सूर्यनारायण भरपूर ऊन (सोने) देत असल्याने भारत भूमीला सुवर्णभूमी म्हटले जाणे आणि पावसाळा ठराविक ऋतूत आल्यामुळे भारतात समृद्धीदायक चक्रे नियमित चालू असणे : आपला देश सुवर्णभूमी होण्याचे एक कारण म्हणजे आपल्याला मिळणारा सूर्यप्रकाश. पृथ्वीगोलाचा विचार करता हे लक्षात येईल की, उत्तर गोलार्धात भू-प्रदेश दक्षिणेपेक्षा अधिक आहे. त्यात भारताचे स्थान साधारण उत्तर अक्षांश ७ ते ३५ अंश याला आणि पूर्व रेखांश ७० ते १०० अंश या दरम्यान येते. त्यामुळे दिवस आणि रात्र यांत मोठा भेद (फरक) नसतो. आपल्याला सूर्यनारायण भरपूर ऊन, म्हणजेच सोने देतो, तसेच तीन बाजूंनी समुद्र आणि उत्तरेला हिमालय बर्फराजी असल्यामुळे देश खर्‍या अर्थाने सुफलाम् आहे. पावसाळा ठराविक ऋतूत आल्यामुळे आपल्या देशात वातचक्र, जलचक्र, भूचक्र आणि शेतीचक्र ही समृद्धीदायक चक्रे नियमितपणे चालू असतात. आपला देश आणि आपली जनता यांना एक प्रकारचे स्थैर्य, समृद्धी आणि निकोपबुद्धी प्राप्त झाली आहे. आपला इतिहास याचा साक्षी आहे.

मी म्हणजेच बीजेपी असे म्हणणार्‍या सत्तांध उमा भारती म्हणे संन्यासिनी !

१. देहलीत भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत उमा भारती यांनी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांना 
अद्वातद्वा बोलल्यामुळे भाजपने त्यांना पक्षातून काढून टाकणे अन् क्षमा मागितल्यावर 
त्यांना पुन्हा पक्षात घेणे
      उमा भारती यांच्या रूपाने भाजपमध्ये अनुशासनहीनतेचे आेंगळ प्रदर्शन मांडले गेले आहे. देहलीत भाजप पदाधिकार्‍यांची बैठक चालू असतांना त्या तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांना अद्वातद्वा बोलून बैठकीतून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्या या वर्तनाविषयी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. नंतर त्यांनी झाल्या प्रकारासंबंधी क्षमा मागितल्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. 

सिव्हिल सोसायटीचा दुटप्पी आणि अप्रामाणिकपणा !

      कर्नाटकातील विचारवंत एम्.एम्. कलबुर्गी यांच्या धारवाड येथे भरदिवसा गोळ्या घालून करण्यात आलेल्या हत्येचा सर्वच थरातून धिक्कार होणे आवश्यक आहे; पण या दुष्कृत्याविरुद्ध वक्तव्य करणारे लोक सामाजिक न्यायाच्या नावाखाली विध्वंसाचा पुरस्कार करणारेच आहेत.
१. स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येविरुद्ध कुणी आवाज उठवतांना दिसले नाही ?
      ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील जंगलात स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांचा देह बंदुकीच्या गोळ्या घालून विच्छिन्न करण्यात आला, तेव्हा मात्र त्या घटनेच्या विरुद्ध कुणी आवाज उठवतांना दिसले नाही. २३ ऑगस्ट २००८ या दिवशी स्वामीजी पहाटे स्नान करत असतांना मारेकर्‍यांनी त्यांच्या स्नानगृहाचा दरवाजा तोडून त्यांची हत्या केली. स्वामीजींचा गुन्हा कोणता होता ? मागासलेल्या भागातील गरीब आदिवासी लोकांसाठी त्यांनी आयुष्यभर समर्पित भावनेने कार्य केले. त्यांनी आपल्या पूर्वजांचा वारसा जपून ठेवण्याची आदिवासींना प्रेरणा दिली. विदेशी शक्तींनी भारताविरुद्धच्या युद्धात ज्यांचा इंधन म्हणून वापर केला किंवा भाकरीचा तुकडा देऊन ज्यांचा आत्मा विकत घेण्याचा प्रयत्न केला, त्याविरुद्ध त्यांनी लढा दिला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून सिंहस्थपर्वात संत बैठकीचे आयोजन

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासह देशभरात गोहत्याबंदीसाठी संतरूपी धर्मसत्ता एकवटली !
संत बैठकीला उपस्थित असलेले साधू, संत, महंत आणि अन्य

सत्ताप्राप्तीसाठी स्वतःला अल्पसंख्य म्हणवून घेणारे मुसलमान !

      विख्यात पत्रकार श्री. एम्.जे. अकबर म्हणतात, आपण अल्पसंख्य आहोत, हे मुसलमानांना केव्हापासून भेडसावू लागले ? मुसलमान भारतात नेहमीच अल्पसंख्य होते; पण जेव्हा मुसलमान विद्वानांच्या हे ध्यानात आले की, यापुढे भारतात लोकशाही असेल आणि १५ प्रतिशत समाजाला सत्ताधीश होताच येणार नाही; तेव्हापासून आपण अल्पसंख्य आहोत, हे मुसलमानांना भेडसावू लागले. 
- श्री. गिरीश दाबके, मुंबई (स्वातंत्र्यवीर, दिवाळी विशेषांक २०१४)

अधिक वेळ दूरचित्रवाहिनी पहाणे आरोग्यास हानीकारक

      व्यायामाचा अभाव आणि बैठ्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचे आपल्याला माहीत होते; पण बराच काळ दूरचित्रवाहिनी पहात बसणे हेदेखील प्राणघातक ठरू शकते, असे एका अभ्यासाअंती लक्षात आले आहे. 
१. दिवसातून ५ घंट्यांपेक्षा अधिक वेळ दूरचित्रवाहिनी पाहिल्यास फुप्फुसांना रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी होऊन हृदयविकाराचा झटका येऊन (पल्मोनरी एम्बॉलिझम) मृत्यू ओढवू शकतो.
२. एका ठिकाणी फार वेळ बसल्याने अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो, हे प्रथम दुसर्‍या महायुद्धात हवाई आक्रमणांपासून संरक्षण मिळावे; म्हणून लंडनच्या भुयारी आश्रयस्थळांमध्ये लपणार्‍या नागरिकांच्या बाबतीत लक्षात आले.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

पू. ब्रह्मेंद्रस्वामी यांनी ४५० वर्षांपूर्वी कालज्ञान या ग्रंथात केलेले भाकीत !

      पू. ब्रह्मेंद्रस्वामी ४५० वर्षांपूर्वी होऊन गेले. कालज्ञान ग्रंथात (पान क्र. ११०) त्यांनी असे लिहून ठेवले आहे. वर्ष १९०० नंतर कुठल्याही तीर्थक्षेत्रात पवित्र दैवी शक्ती रहाणार नाही. नद्यांचे पावित्र्य नष्ट होईल. गंगा ऋषिकेशपर्यंतच पवित्र राहील. सैतानी शक्ती देवस्थानाचे पावित्र्य नष्ट करतील. खोट्या साधूंचे पीक येईल. देवस्थानात देवत्व रहाणार नाही. खोटे साधू भक्तातील देवत्व खेचून घेतील आणि ऐश्‍वर्य भोगतील. वर्ष २०५० पर्यंत हे चालेल. सत्पुरुषांनी लिहिलेले ग्रंथ मान्यता पावतील. धर्मा-धर्मातील भांडणे नष्ट होतील. लोक मानवतेने वागतील. 
(संदर्भ : पू. दत्तावधूत यांचे मानवी जीवनातील गूढ रहस्ये)

पहिल्या राजयोगी (शाही) स्नानाचे आध्यात्मिक महत्त्व !

      २९.८.२०१५ या दिवशी म्हणजे सिंहस्थपर्वाच्या पहिल्या पर्वणीचा मुहूर्त हा श्रवण नक्षत्र मकरेचा चंद्र सिंहचा गुरु आणि सिंहचा सूर्य असा हा पर्वणीकाळ आहे. सिंह राशीचा अधिपती सूर्य आहे. सूर्य हा सृष्टीचा आत्मा आहे. प्राणदान देणारा सूर्य आहे. श्रवण नक्षत्र शंकराचे आहे. म्हणून या मुहुर्ताला अधिक महत्त्व आहे. 
- श्री. जयंत शिखरे, त्र्यंबकेश्‍वर पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष आणि त्र्यंबकेश्‍वर मंदिर ट्रस्टचे विश्‍वस्त सिंहस्थपर्वात गोदावरी नदीत देवता, ऋषी आणि भाविक यांनी स्नान करण्याची कथा !

      गोदावरीने सांगितले की, सर्वांची पापे माझ्या तीर्थात स्नान केल्याने धुतली जातील. सर्वजण पापांच्या नाशासाठी गोदावरीत स्नान करतात. गोदावरीने सर्वांची पापे घेतली आहेत. तेव्हा देवाने गोदावरीला सांगितले की, सिंह राशीत गुरु येतो, त्या वेळी देवता आणि ऋषीमुनी तुझ्यात स्नान करतील आणि तुझी त्या पापांपासून शुद्धी होईल. कडक बंदोबस्ताच्या नावाखाली राजयोगी स्नान करणार्‍या साधूंना अवमानकारक वागणूक देणारे हिंदुद्रोही पोलीस !

     २९.८.२०१५ या दिवशी सिंहस्थपर्वाच्या वेळी नाशिक येथे रामकुंड आणि कुशावर्त कुंडाकडे १३ आखाड्यांतील साधूसंत, महंत आणि महामंडलेश्‍वर यांचे राजयोगी स्नान अतिशय अल्पावधीत आटोपले. या वेळी दोन्ही कुंडांना पोलिसांनी अक्षरशः गराडा घातला होता. अवघ्या काही सेकंदांतच साधूसंतांना राजयोगी स्नान आटोपण्याचे आदेश दिले जात होते. एखादा साधू अधिक काळ कुंडात असेल, तर पोलीस अक्षरशः त्यांना हाताला धरून बाहेर काढत असत.

जून २०१५ मध्ये चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि राष्ट्रीय शिबीर यांसाठी कर्नाटक राज्यातून आलेल्या धर्माभिमान्यांमध्ये झालेले पालट आणि त्यांना आलेल्या अनुभूती

१. श्री. योगीश, शिवमोग्गा
     हिंदु जनजागृती समितीमुळे पुष्कळ शिकायला मिळाले. शिबिरातही शिकायला मिळाले. नामजप, व्यष्टी-समष्टी साधना, तसेच हिंदु धर्मजागृती सभा आणि आंदोलने करतांना ती सेवा म्हणून कशी करायची ? हे समजले. जनजागृती करतांना, तसेच आपत्काळ आल्यावर साधना कशी करायची ? इत्यादी विषय शिकायला मिळाले.
२. साधकांच्या अंतरात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, यासाठी तळमळीने घडवणार्‍या 
संतांकडून कु. नागमणी आचार, बेंगळुरू यांना शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. शिबिरापूर्वीच्या बैठकीतून शिबीर परिपूर्ण होण्याची संतांची तळमळ दिसून येणे : २ दिवस आधी रात्री शिबिराच्या नियोजनाची बैठक झाली होती. बैठकीत शिबिरासाठी आलेले संतही उपस्थित होते. शिबिर चांगले होण्यासाठी काही पालट करायचे का ?, असे सर्व जण आम्हा शिबिरार्थीना विचारत होते. आम्ही कसे चिंतन करायला हवे ?, पुढच्या सत्रांत कोणते विषय घ्यायला हवेत ? यांविषयी चिंतन करायला सांगत होते. यातून त्यांची तळमळ दिसून येत होती. कोणतेही पालट केल्यावर त्यावर चर्चा आणि अभ्यास करणे या गोष्टी पहायला मिळाल्या. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने संत आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आदर्श कृती कशा शिकवत असतात, हे शिकायला मिळाले. 

एका प्रसंगाच्या निमित्ताने ६६ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले झारखंड येथील श्री. प्रदीप खेमका आणि सौ. सुनीता खेमका यांच्यातील गुरुसेवेची तळमळ अन् सेवेतील तत्परता या गुणांचे घडलेले दर्शन !

श्री. प्रदीप खेमका आणि सौ. सुनीता खेमका
    देहली सेवाकेंद्रातील चारचाकी वाहनाच्या बॅटरीची क्षमता अत्यल्प झाल्यामुळे हे वाहन गेल्या आठ दिवसांपासून चालू होत नव्हते. सेवाकेंद्रात कुणी साधक उपलब्ध नसल्याने वाहनाच्या दुरुस्तीसाठी त्वरित प्रयत्न झाले नाहीत. त्यासाठी श्री. प्रदीप खेमका यांच्या परिचयाचे वाहन दुरुस्ती करणारे श्री. गुलशन यांना संपर्क करूया, असे देवाने सुचवले; मात्र श्री. प्रदीपभैय्या यांचा भ्रमणभाष क्रमांक माझ्याकडे नव्हता. अन्य साधकांकडून तो मिळवण्याचा प्रयत्न करूनही तो मिळत नव्हता. शेवटी त्यांच्या पत्नी सौ. सुनीता खेमका यांचा संपर्क क्रमांक मिळाला.

उतारवयात साधनेला आरंभ करून झोकून देऊन साधना होण्यासाठी घरदाराचा त्याग करणारे आणि संत होण्याचा निश्‍चय करून तो पूर्णत्वाला नेणारे पू. राणेआजोबा !

१. साधनेत येण्यापूर्वी
    साधनेत येण्यापूर्वी पू. राणेआजोबांना देवपूजा, तसेच समाजसेवा करण्याची आवड होती. पहाटे ४ वाजता उठून ते प्रथम देवपूजा करत आणि ६ नंतर शेतीच्या कामाला आरंभ करत. सायंकाळी नामस्मरण आणि आरती न चुकता करायचे.
२. प्रसार करून सत्सेवेला आरंभ !
    कणकवली तालुक्यातील ओझरम गावी सनातनची एक सभा होती. त्या वेळी त्यांनी सगळ्या लोकांना सभेचा उद्देश समजावून सांगितला. त्यांना अजूनही पुष्कळ काही करायचे होते; म्हणून पुढे त्यांनी सनातनच्या माध्यमातून साधनेला आणि सेवेला आरंभ केला. ते दुपारी दैनिक सनातन प्रभातचे वितरण करत. शेतीची कामे करून ते सत्संगाला जात, तसेच सेवाही करत. ते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अर्पण गोळा करणे, तसेच प्रसार करणे आदी सेवा करत. ते संसारात राहून साधना करत होते.

दैनिक सनातन प्रभात वाचून साधना आत्मसात करणारे आणि प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असलेल्या हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी, अशी तळमळ लागलेले सनातनचे ४७ वे संतरत्न पू. रघुनाथ राणेआजोबा (वय ७६ वर्षे) !

पू. रघुनाथ राणेआजोबा
     पू. रघुनाथ वामन राणे (राणेआजोबा) (वय ७६ वर्षे) हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओझरम या गावचे असून वर्ष १९९९ मध्ये, म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. केवळ १६ वर्षांत तळमळीने साधना करून ते संतपदी विराजमान झाले. १५.३.२०१५ या दिवशी त्यांना सनातनचे ४७ वे संतरत्न म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर एप्रिल २०१५ मध्ये ते रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांची प.पू. डॉक्टरांशी झालेली भेट, त्यांचा साधनेचा प्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
१. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ !
१ अ. आरंभी सनातन म्हणजे अंधश्रद्धा वाटणे आणि
साधनेविषयीचे प्रवचन ऐकल्यावर स्वतः साधना करू लागणे
    एकदा माझा धाकटा मुलगा सूर्यकांत मला सांगत होता, मी सनातनच्या सत्संगाला जातो ! तेव्हा मी त्याला ही सगळी अंधश्रद्धा आहे, असे म्हणालो. नंतर काही दिवसांनी एक साधिका प्रसारासाठी दैनिक सनातन प्रभात घेऊन आली आणि म्हणाली, मंदिरात प्रवचन आहे, तुम्ही या. आमच्या येथे पहिले प्रवचन १६.१२.१९९९ या दिवशी झाले. प्रवचनात दत्त आणि कुलदेवता यांचा नामजप करायला सांगितला होता. मार्गदर्शन ऐकल्यावर मला ही अंधश्रद्धा नसल्याचेे पटले आणि मी संस्थेच्या संपर्कात आलोे.

संगणकीय सेवा करणार्‍या सर्व साधकांसाठी सूचना

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
साधकांनो, गुरुसेवेसाठी साहाय्य करणारे संगणक आणि
भ्रमणसंगणक यांचा वापर करतांना पुढील महत्त्वाची सूत्रे लक्षात घ्या !
१. सामायिक सूत्रे
१ अ. संगणकाची स्वच्छता : प्रतिदिन संगणक कापडाने पुसून स्वच्छ करावा. मॉनिटरच्या स्क्रीनसाठी बनियनच्या कापडाप्रमाणे मऊ कापड वापरावे. ते कापड इतरत्र कोठेही वापरू नये.
    प्रत्येक मासाला संगणकाच्या सी.पी.यू.चे बाजूचे पॅनल काढून तो ब्लोअरने स्वच्छ करावा. त्या वेळी हवेचा दाब (प्रेशर) जास्त प्रमाणात येणार नाही, अशा अंतरावर ब्लोअर असावा.
    भ्रमणसंगणक उघडून प्रतिवर्षी त्याची स्वच्छता करावी. स्वच्छता कशी करायची, त्या संदर्भात माहिती असणार्‍या व्यक्तीला अथवा रामनाथी किंवा देवद येथील संगणक दुरुस्ती विभागातील साधकांना विचारून घ्यावे.

किती आळवू तुज गुरुराया ?

    ३१.७.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभातचा गुरुपौर्णिमा विशेषांक वाचतांना मला पुढील  कविता सुचली.
दिनदयाळा कृपासागरा । किती आळवू तुज गुरुराया ? ।
किती करी कृपा तू आम्हावरी । दिनदयाळा कृपासागरा ॥ १ ॥
देशी स्थान आम्हा तुझ्या चरणांसी । धन्य होती संत अन् साधक ।
कृपादृष्टी करिसी तू आम्हावरी । दिनदयाळा कृपासागरा ॥ २ ॥
येण्या सत्वर तव चरणांशी । तरी तव चरणांचा लागो मज ध्यास ।
तरी कृपा करी तू आम्हावर । दिनदयाळा कृपासागरा ॥ ३ ॥
तुमच्या चरणी येण्यासाठी आसुसलेला जीव,
श्री. पवन पां. बर्वे, गोवा. (३१.७.२०१५)

प्रत्येक साधकामध्ये श्रीकृष्णाचे रूप पाहून सतत भावावस्थेत रहाणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. श्रावणी पेठकर (वय १३ वर्षे) !

कु. श्रावणी पेठकर
१. स्वप्नातले दृश्य खरे मानून सर्व साधकांमध्ये श्रीकृष्ण पहाणे
    श्रावणीला एकदा स्वप्न पडले, ती श्रीकृष्णाच्या समवेत त्याच्या रथात उभी आहे आणि श्रीकृष्ण तो रथ सनातनच्या रामनाथी आश्रमाकडे नेत आहे. आश्रमात पोचल्यावर तिला कुणीच दिसले नाही आणि मागे वळून पाहिल्यावर श्रीकृष्णही अदृश्य झाला होता. पुन्हा पुढे पाहिल्यावर काही साधक तिला इकडे-तिकडे वावरतांना दिसू लागले. त्यांच्याकडे पाहिल्यावर श्रावणीच्या लक्षात आले की, हे साधक नसून श्रीकृष्णच आहे आणि तो तिची परीक्षा पहात आहे. स्वप्नातील दृश्य खरे मानून श्रावणी सर्व साधकांमध्ये श्रीकृष्णाचे रूप बघते आणि त्या कृष्णाला नेहमी स्नेह देेते.

रामनाथी आश्रमात आकस्मिकपणे झालेले प.पू. गुरुदेवांचे दर्शन आणि काही दिवसांनी महाभक्तविजयम् ग्रंथाचे वाचन करतांना त्या दर्शनाचा उमगलेला भावार्थ !

प.पू. गुरुदेवांंच्या आकस्मिक दर्शनाने
स्तंभित झालेली साधिका (सौ. उमा रविचंद्रन)
    सप्टेंबर २०१३ च्या पहिल्या आठवड्यात मी तमिळ भाषेतील पंचांगाची सेवा करण्यासाठी रामनाथी आश्रमात गेले होते. त्या वेळी अकस्मात् प.पू. गुरुदेवांचे झालेले दर्शन माझ्या मनावर कायमचे कोरले गेले. इतक्या दिवसांनंतर आज मला यामागील कारण लक्षात आले.
१. महाभक्तविजयम् ग्रंथ वाचतांना भगवंताचे
प्रत्यक्ष दर्शन होऊ शकते का ? असा आलेला विचार आणि रामनाथी आश्रमात आकस्मिकपणे झालेल्या
प.पू. गुरुदेवांच्या दर्शनाची झालेली हृद्य आठवण
    मी महाभक्तविजयम्मधील ब्रह्मचारी यांचे चरित्र वाचत होते. त्यात एका प्रसंगात राजा म्हणतो की, कल्याण गोस्वामी यांनी त्यांच्या मुलीचा विवाह ब्रह्मचारी यांच्याशी करून देण्याचा दिलेला शब्द पाळतांना एका साक्षीदाराची आवश्यकता आहे. हे ऐकून ते ब्रह्मचारी साक्षात् भगवंतालाच साक्षीदार होेण्यासाठी विनवतात. करुणामूर्ती भगवंतही त्याच्या भक्तीकडे अपार वात्सल्याने अन् करुणेने पहात साक्षीदार म्हणून येण्याचे मान्य करतो. भक्ताला साहाय्य करण्यासाठी साक्षात् भगवंत आपणहून त्याच्याजवळ येतो, हे वाचल्यानंतर आजच्या कलियुगातही एखाद्याला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकते का ?, असा विचार माझ्या मनात आला.

प.पू. डॉक्टर गमतीतूनही धर्मग्रंथांतील शास्त्र समजावून सांगत असल्याचे आणि ती कृष्णाची लीला असल्याचे जाणणार्‍या सौ. उमा रविचंद्रन !

सौ. उमा रविचंद्रन
    रामनाथी आश्रमातील सौ. प्रार्थना देव सेवेनिमित्त प.पू. गुरुदेवांकडे २ - ३ वेळा गेल्या असतांना प.पू. गुरुदेवांनी त्यांना प्रत्येक वेळी वेगळ्या साधिकेच्या नावाने हाक मारली आणि ती साधिका समजून त्यांच्याशी बोलले. त्या प्रत्येक वेळी सौ. प्रार्थना देव यांना काय वाटले ? या संदर्भातील एक चौकट दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून आली होती. ती चौकट वाचल्यानंतर माझे गुरुदेवांशी सूक्ष्मातून पुढीलप्रमाणे बोलणे झाले.
१. कृष्णावतारात कृष्ण करत असलेल्या गमतींप्रमाणेे गुरुदेव
आताही मनमोहक गमती करून साधकांना आनंद देणे
    हे परमेश्‍वरा, हे प्रभो, तुझे देवत्व लपवण्याचा तू कितीही प्रयत्न केलास, तरी तुझ्या सुंदर लीलांच्या माध्यमातून ते दिसून येते. मागील कृष्णावतारात तू करत असलेल्या गमतींप्रमाणेे आताही तू मनमोहक गमती करून तुझ्या साधकांसमवेत लीला करत आहेस. एखाद्या साधकाला वेगळ्याच नावाने संबोधून, जणू काही त्या साधकाचे नाव तू विसरला आहेस, असे भासवून तो साधक अन्य साधक असल्याप्रमाणे त्याच्याशी बोलतोस. प्रभो, असे करतांना आमच्या तोंडवळ्यावरील हावभाव (प्रतिक्रिया) पाहून तुला आतल्या आत पुष्कळ हसू येत असते. आम्हा अज्ञानी लेकरांना त्या वेळी या मागचा खरा अर्थ न समजल्यामुळे आम्ही यातून काय शिकणे तुला अपेक्षित आहे, ते समजत नाही. त्यामुळे तुला आमच्या नावाचा विसर पडला आहे, तू आम्हाला ओळखत नाहीस, याचे आम्हाला वाईट वाटते. जगन्माता आणि जगत्पिता असलेला साक्षात् परमेश्‍वर आपल्या लेकरांना कधी विसरू शकतो का ?

समंजस, ऐकण्याची वृत्ती असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोलशेत, ठाणे येथील चि. ईशान अरविंद कौसडीकर (वय ३ वर्षे) !

     चि. ईशान अरविंद कौसडीकर (वय ३ वर्षे) याचा श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशी (११.९.२०१५) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
  चि. ईशान याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून आशीर्वाद ! 
१. सात्त्विक बाळ जन्माला येण्यासाठी केलेले प्रयत्न 
     'सात्त्विक बाळ जन्माला येण्यासाठी देवाला प्रार्थना करणे, गर्भारपणात नामजप करणे, रामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र म्हणणे, आध्यात्मिक उपाय करणे आदी प्रयत्न श्रीकृष्णानेच माझ्याकडून करून घेतले. 

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
प्रारंभ - श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी (१२.९.२०१५) सकाळी ९.४३ वाजता 
समाप्ती - श्रावण अमावास्या (१३.९.२०१५) दुपारी १२.११ वाजता 
दोन दिवसांनी अमावास्या आहे.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'हिंदु राष्ट्रात पोलीस आणि लष्कर यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना 'राष्ट्र आणि धर्म यांवरील प्रेम' हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.८.२०१५)        

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
योगी आणि भक्त 
अ.  मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते. 
आ. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी. 
भावार्थ : ध्यानयोग्याचे ध्यान संपले की, त्याचे अनुसंधान खंडित होते. ज्याचा नामजप श्‍वासोच्छ्वासावर होत असतो, म्हणजे नामाच्या ठिकाणी केवळ श्‍वासाची जाणीव असते, त्याचे श्‍वासाप्रमाणेच अखंड अनुसंधान असते. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्नेही निर्धन असला तरी चालेल; पण सदाचारी असावा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्‍वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हिंदूंनो, नेपाळी हिंदूंना लक्षवेधी पाठिंबा द्या !

संपादकीय
       विश्‍वातील एकमेव हिंदु राष्ट्र असलेले नेपाळ पुनःश्‍च हिंदु राष्ट्र घोषित व्हावे, यासाठी तेथील बहुसंख्य आणि भारतातील काही मोजक्या धर्मनिष्ठ हिंदूंचा जीव तळमळत आहे. गेल्या काही वर्षांपासून नेपाळमधील हिंदूंनी जोर धरलेले हिंदु राष्ट्रासाठीचे आंदोलन आता अधिक तीव्र होऊन एका विशिष्ट टप्प्यावर येऊन ठेपले आहे. ३१ ऑगस्टपासून चालू झालेल्या हिंदूंच्या आंदोलनात तेथील हिंदु युवा मंचचे ५ तरुण कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहेत आणि आता या उपोषणाला १० दिवस पूर्ण होत आले असतांना ४ तरुणांची प्रकृती ढासळली आहे. हिंदु तरुण जेव्हा राष्ट्रासाठी प्राणार्पण करायला सिद्ध होतात, तेव्हा त्यांची राष्ट्र आणि धर्म यांविषयीची निष्ठा किती अत्युच्च असेल, हे लक्षात येते; परंतु तेथील निर्ढावलेले शासन या हिंदूंकडे ढुंकूनही पहात नाही, असे समोर येत आहे. त्यामुळे अशा कित्येक हिंदु तरुणांनी हिंदु राष्ट्रासाठी बलीदान दिले, तरी कोयराला शासनाला काही फरक पडेल, असे वाटत नाही. मग हिंदूंनी उपोषणाच्या मार्गाने जावे का ? एकेका धर्माभिमानी हिंदु तरुणाची नेपाळ हिंदु राष्ट्र होण्याच्या लढ्यात आवश्यकता आहे; असे असतांना त्यांनी अशा प्रकारे नाहक जीव का गमवावेत ? 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn