Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

स्वामी वरदानंद भारती यांची आज पुण्यतिथी 

सर्व भारतियांना समानतेची वागणूक देण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा आणि गोहत्याबंदी कायदा त्वरित लागू करा ! - संत-महंतांची शासनाकडे मागणी

डावीकडून पू. बालयोगेश्वर श्री राम बालकदासजी महात्यागी महाराज, पू. मौनीबाबा, महामंडलेश्वर श्री महंत चंद्रदेवदासजी महाराज, महामंडलेश्वर लक्ष्मणदासजी महाराज, महामंडलेश्वर अमृतदासजी महाराज, महंत रामसेवकदासजी महात्यागी महाराज आणि पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
सिंहस्थपर्व, नाशिक येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने संत बैठक
नाशिक, ९ सप्टेंबर - देशात बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजाला देण्यात येणारी दुय्यम दर्जाची नागरिकत्वाची वागणूक बंद करून सर्व भारतियांना समानतेची वागणूक देण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, तसेच संपूर्ण देशात गोहत्याबंदी कायदा त्वरित लागू करावा, अशी एकमुखी मागणी साधू-महंतांनी सिंहस्थपर्वात आयोजित करण्यात आलेल्या संत बैठकीत केली. 

(म्हणे) 'शान-ए-पाकिस्तान'सारखे कार्यक्रम हा आमच्या पोटापाण्याचा प्रश्न !'

ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज यांना वाणिज्य विभागातील 
राष्ट्राभिमानशून्य कर्मचार्याचे संतापजनक उत्तर
सांगली, ९ सप्टेंबर (वार्ता.) - 'शान-ए-पाकिस्तान'सारखे कार्यक्रम हे आमच्या पोटापाण्याचे प्रश्न आहेत. पाकिस्तानसमवेत इतके सगळे चालू आहे. कशाला आमच्या पोटावर पाय आणता, असे संतापजनक उत्तर वाणिज्य विभागातील कर्मचार्याने सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय संघटनेचे संस्थापक ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज यांना दिले. शान-ए-पाकिस्तान कार्यक्रमाविषयी निषेध नोंदवण्यासाठी ह.भ.प. बोंगाळे महाराज यांनी वाणिज्य मंत्रालयात दूरभाष केला होता.  
वाणिज्य मंत्रालयात दूरभाष केल्यावर ह.भ.प. बोंगाळे महाराज म्हणाले, "सध्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान प्रतिदिन आगळीक करत आहे. त्यामुळे भारतियांच्या भावना तीव्र असल्याने असे कार्यक्रम होऊ नयेत, असे एक राष्ट्रभक्त या नात्याने मला वाटते." ह.भ.प. बोंगाळे महाराज यांचा अस्थिभंग झाल्याने महाराज सध्या घरीच आहेत. 

'शान-ए-पाकिस्तान' कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीच्या समवेत शिवसेनाही विरोध करणार ! - आमदार उदय सामंत, शिवसेना

आमदार उदय सामंत
राष्ट्रद्रोही कार्यक्रमाला विरोध करणार्या राष्ट्रप्रेमी शिवसेनेचे अभिनंदन ! अन्य राजकीय पक्ष आणि संघटना शिवसेनेकडून काही बोध घेतील का ?
रत्नागिरी, ९ सप्टेंबर (वार्ता.) - देहली येथे होणार्या 'शान-ए-पाकिस्तान' कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध आहे. ८ सप्टेंबर या दिवशी मुंबई येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या समवेत शिवसेना 'शान-ए-पाकिस्तान' या कार्यक्रमाला विरोध करील, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार श्री. उदय सामंत यांनी ९ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले. शहरातील रत्नागिरीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पर्युषणकाळात नवी मुंबईतही मांस विक्रीवर बंदी

नवी मुंबई - जैन धर्मियांच्या ९ ते १७ सप्टेंबर या पर्युषण पर्वाच्या काळात नवी मुंबईतही मांस विक्री बंद करण्याचा आदेश येथील महापालिकेने दिला आहे. मीरा-भाईंदर आणि मुंबई येथे याआधीच या काळात मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणजे कत्तलखाने ! - भालचंद्र नेमाडे

भुसावळ - इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शाळा नसून ते कत्तलखाने आहेत. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले, तर नोकरी मिळते ही अंधश्रद्धा आहे, असे विधान लेखक भालचंद्र नेमाडे यांनी येथील नाहटा महाविद्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केले.

केंद्रीय कर्मचार्यां च्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ

महागाई भत्त्यात वाढ करून शासकीय तिजोरीवरील बोजा वाढवण्यापेक्षा महागाई वाढणारच नाही, यासाठी शासन काही करील का ? 
नवी देहली - केंद्रीय कर्मचार्यां च्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रशासनाच्या अखत्यारित येणार्या सर्व कर्मचार्याांना याचा लाभ होईल.

भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह यांच्या विरुद्ध चिथावणीखोर भाषणे केल्याची तक्रार !

टी. राजासिंह
मजलिस बचाव तहेरिक या संघटनेच्या उलट्या बोंबा
अल्पसंख्यांक आयोगाकडे धाव
    भाग्यनगर -  येथील मजलिस बचाव तहेरिक या धर्मांध संघटनेचे अमजद उल्लाह खान यांनी, भाग्यनगरचे कट्टर हिंदुत्ववादी आमदार टी. राजासिंह यांनी चिथावणीखोर भाषणे करून हिंदु-मुस्लीम समाजामध्ये वितुष्ट पसरवण्याचे कार्य केले, अशी तक्रार तेलंगणच्या राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष अबीद रसूल खान यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. (हिंदूंंवर होणारे अत्याचार लक्षात घेऊन आमदार राजासिंह ठाकूर हिंदूंना संघटित करण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला हिंदू-मुसलमान समाजामध्ये वितुष्ट पसरवण्याचे काम म्हणणे, हा वस्तूस्थितीचा अतिरेक आहे. आमदार ठाकूर मात्र अशा तक्रारींना भीक न घालता त्यांचे कार्य अविरतपणे चालवत आहेत. - संपादक)

येत्या १५ दिवसांत दुष्काळ घोषित करू ! - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

कोल्हापूर - गेल्या २ दिवसांत झालेल्या पावसाने महाराष्ट्रातील दुष्काळाची दाहकता काही अल्प झालेली नाही. मराठवाडा आणि विदर्भ येथील परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे पिकांच्या प्राथमिक आणेवारीची माहिती घेऊन येत्या १५ दिवसांत दुष्काळ घोषित करू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

कोण म्हणतो मी धर्मनिरपेक्ष आहे ? मी हिंदु आहे !

त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांचे टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर !
स्वतःला निधर्मीवादी म्हणवून घेणारे हिंदु लोकप्रतिनिधी यातून बोध घेतील का ?
श्री. तथागत रॉय
    ऐझवाल (त्रिपुरा) - कोण म्हणतो मी धर्मनिरपेक्ष आहे ? मी हिंदु आहे; मात्र माझा देश वर्ष १९७६ पासून धर्मनिरपेक्ष आहे !, असे सडेतोड प्रत्युत्तर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल श्री. तथागत रॉय यांनी ट्विटरवरील एका प्रतिक्रियेला दिले आहे. (स्वतःला हिंदु म्हणवून घेण्यास लाज वाटणार्‍या हिंदूंनी श्री. रॉय यांच्याकडून बोध घ्यावा ! - संपादक)
मार्क्सवाद्याने डिवचल्यामुळे त्याला प्रत्युत्तर ! 
     काही दिवसांपूर्वी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले होते, बांगलादेशातील हिंदूंनी स्वतःला हीन लेखू नये. तुम्ही येथेच वास्तव्य करणार आहात; कारण ही (बांगलादेश) तुमची मातृभूमी आहे. त्यांचे हे वक्तव्य श्री. रॉय यांनी ट्विट केले होते.

शान-ए-पाकिस्तान आणि एक शाम पाकिस्तान के नाम कार्यक्रम रहित करण्याची हिंदु धर्माभिमान्यांची मागणी

फरिदाबाद (हरियाणा) येथे पत्रकार परिषद, तर बडोदा (गुजरात) येथे शासनास निवेदन 
आयुक्त अवंतिका सिंह यांना निवेदन देतांना
श्री. वैभव आफळे, श्री. मनोज पुजारा
आणि मागे श्री. विरल चौधरी
     फरिदाबाद - देहली येथे ११ आणि १२ सप्टेंबर या दिवशी भारत निर्यात महासंघ (एफ्.आय.इ.ओ.) आणि बराती पाकिस्तान (कराची वाणिज्य महासंघाचे सदस्य) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांचा आधुनिक वस्त्रप्रावरणांचे प्रदर्शन आणि विक्री असा शान-ए-पाकिस्तान नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी म्हणजे १० सप्टेंबर या दिवशी एक शाम पाकिस्तान के नाम या नावाचा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतात सतत अशांतता माजवून निरपराध नागरिकांचे बळी घेण्याचे काम करणार्‍या पाकसमवेतचे हे प्रदर्शन रहित करावे, यासाठी हिंदु धर्माभिमान्यांच्या वतीने फरिदाबाद येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, तर बडोदा (गुजरात) येथे आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. 

अमेरिकी नागरिकाकडून क्रॉसचे चित्र असणार्‍या रायफलची निर्मिती !

कुठे जिहादला क्रूसेडने उत्तर देण्यास सरसावणारे अमेरिकेतील ख्रिस्ती, तर कुठे आतंकवाद्यांच्या 
हातून हिंदू मरत असतांना काहीही न करणारे निद्रिस्त हिंदू !
      वॉशिंग्टन - अमेरिकेतील एका बंदूक निर्मात्याने आय.एस्.आय.एस्. प्रूफ रायफलची निर्मिती केली आहे. या बनावटीच्या रायफली आय.एस्.आय.एस्.चे आतंकवादी वापरणार नाहीत. एआर् १५ या रायफलचे नामकरण क्रुसेडर असे करण्यात आले असून तिच्या एका बाजूला लेसरने नाइट्स टेम्पलर क्रॉस हे ख्रिस्ती चिन्ह आणि दुसर्‍या बाजूला बायबलचा काही भाग कोरलेला आहे. (आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांच्या विरोधातील युद्ध हे धर्मयुद्ध आहे, असे अमेरिकी जनतेलाही वाटते. धर्मनिरपेक्षतेचा ढोल बडवून धर्मांधांच्या जिहादी वृत्तीकडे कानाडोळा करणार्‍या भारतातील निधर्मीवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक) अमेरिकी शस्त्रास्त्रे आतंकवाद्यांच्या हाती लागत आहेत, अशी भीती व्यक्त होत असल्याने धार्मिक चिन्हे असणारी रायफल बनवण्यात आली आहे.

देशद्रोहाच्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान !

    मुंबई, ९ सप्टेंबर - लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्या विरोधात बोलणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार, याविषयी भाजप शासनाने काढलेल्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने शासनाला त्याविषयीच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
    राज्यघटनेने नागरिकांना लेखन, भाषण, कला, चित्रकला या माध्यमांतून आविष्कारस्वातंत्र्य दिले असले, तरी केंद्र आणि राज्य शासन वा त्यांचे प्रतिनिधी असलेले राजकारणी वा लोकप्रतिनिधी यांविषयी द्वेष, तुच्छता, अप्रीती, शत्रुत्व आणि सामाजिक असंतोष निर्माण होत असेल, तर त्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल,  असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

पुणे महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद नाही

     पुणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) - राज्यातील दुष्काळाचा विचार करता पुणे महानगरपालिकेने प्रतिदिन होणारा पाणीपुरवठा बंद करून एक दिवसाआड पाणी देण्याचा म्हणजेच, ३० प्रतिशत पाणीकपात करण्याचा निर्णय ४ सप्टेंबर या दिवशी घेतला आहे. यांसह पाणी वाचवण्याच्या उद्देशाने काही दिवसांपूर्वी बांधकाम, वाहन धुलाई केंद्र, थंडपेय निर्मिती करणारे कारखाने अशा काही ठिकाणीही पाणीपुरवठा बंद केला आहे. महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गाड्या धुणे आदी प्रकार बंद करण्याचे आवाहन केले होते. महानगरपालिकेच्या हद्दीत पाण्याचा अपवापर झाल्यास संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट केले जातील, अशी चेतावणी पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली होती; मात्र शहरातील विविध भागांत प्रतिदिन चारचाकी आणि दुचाकी वाहन धुण्यासाठी पाणी वापरून त्याचा अपव्यय करण्यात येत आहे. (पाण्याची होणारी उधळपट्टी रोखण्यासाठी प्रशासनाने पथके सिद्ध करून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)

'(म्हणे) साहित्य संमेलनाला न बोलावल्यास ते उधळून लावू !'

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गुंडगिरीची भाषा 
वापरून धमकी देणारे खासदार रामदास आठवले यांचे वक्तव्य 
अहिंसेचे तत्त्व सांगितलेल्या बुद्धांच्या 
शिकवणुकीतून रामदास आठवले अशा धमक्या द्यायलाच शिकले का ? 
     पुणे, ९ सप्टेंबर - पिंपरी येथे होणारे आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आम्हाला बोलावले नाही, तर आम्ही ते उधळून लावू. आमच्यासारख्या कष्टकर्‍यांना तिथे बोलवले जात नाही. तर सेना-भाजपच्या नेत्यांना आवर्जून आमंत्रण दिले जाते, असे धमकीवजा प्रतिपादन 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. ते पुणे येथे ७ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (साहित्यिकांनी मान द्यावा, यासाठी मराठी भाषा आणि साहित्यनिर्मिती याविषयी आठवले यांनी कोणते कार्य केले आहे, म्हणून त्यांना निमंत्रण द्यायला हवे ? अशी धमकीवजा भाषा भारतरत्न डॉ. आंबेडकरांना तरी आवडेल का ? - संपादक) 

चित्रपटसृष्टीने शेतकर्यांना साहाय्य न केल्यास चित्रपटांवर बंदी घालण्याची मनसेची चेतावणी

मुंबई - मुंबई चित्रपटसृष्टीतील (बॉलीवूडमधील) कलाकारांनी शेतकर्यांना साहाय्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे. जर हे कलाकार शेतकर्यांना साहाय्य करण्यासाठी पुढे आले नाहीत, तर त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल, अशी धमकीही राज ठाकरे यांच्या मनसेने दिली आहे.
मनसेच्या चित्रपट सेनेने बॉलीवूडचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात शेतकर्यांना विशेषकरून मराठवाड्यातील शेतकर्यांंना साहाय्य करायला सांगितले आहे. शेतकर्यांची परिस्थिती पुष्कळ वाईट आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या कलाकारांप्रमाणे अन्य कलाकार शेतकर्यांना साहाय्य का करू शकत नाहीत ?, असा प्रश्नही या पत्रातून विचारण्यात आला आहे.

राजस्थानातील पाणीसाठ्यांमध्ये पाककडून विषप्रयोगाची शक्यता

भारताला नामोहरम करण्यासाठी एकही संधी न सोडणारा कुरापतखोर पाकिस्तान !
जैसलमेर (राजस्थान) - भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या राजस्थानातील जैसलमेर आणि बदमेर या जिल्ह्यांच्या पाणीसाठ्यांमध्ये पाककडून विषप्रयोग करण्यात येण्याची शक्यता आहे, अशी चेतावणी गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या जिल्ह्यांमधील पाण्याचा वापर स्थानिक नागरिकांसह भारतीय सैन्यासाठी केला जातो. पाकिस्तान या भागातील पाणीसाठ्यांमध्ये विषप्रयोग करण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षादलासह नागरिकांनी यासंदर्भात सतर्कता बाळगावी, असे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नेमाराम परिहार यांनी सांगितले आहे.

आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात भारतातील मौलवींचा फतवा

आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात फतवा काढणारे भारताच्या विरोधात जिहाद पुकारणार्या आतंकवादी संघटनांना विरोध का करत नाहीत ?
नवी देहली - आय.एस्.आय.एस्. या क्रूर जिहादी आतंकवादी संघटनेकडून केल्या जाणार्या अमानवी कृत्यांच्या विरोधात 'फतवा' काढण्यात आला आहे. 'इस्लामिक डिफेन्स सायबर सेल'चे अध्यक्ष डॉ.अब्दुल रहीन अंजारिया यांनी हा फतवा सिद्ध केला असून त्यास देशातील एक सहस्रांहून अधिक मुसलमान धर्मगुरु आणि संघटना यांनी पाठिंबा दर्शवला आहे, तसेच हा फतवा एका ठरावाच्या स्वरूपात संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनाही पाठवण्यात येणार आहे.
या फतव्यात इस्लामच्या नावाखाली इराक आणि सिरिया या देशांमध्ये धुमाकूळ घालून निरपराध्यांची हत्या करणे, जाळून मारणे, शीर छाटणे आणि या संहाराच्या ध्वनीचित्रफिती प्रसिद्ध करणे, या कृती इस्लामला मान्य नाहीत. त्यामुळे आय.एस्.आय.एस्. ही संघटना गैर-इस्लामी असल्याचे भारतातील मौलवी आणि मुसलमान संघटनांकडून घोषित करण्यात आले आहे. भारतातून इतक्या मोठ्या संख्येने इस्लाम धर्मगुरु आणि संघटनांनी एकत्र येऊन आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात फतवा काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुसलमानाकडून नाशिकच्या हिंदु तरुणाचे नोकरीचे प्रलोभन दाखवून धर्मांतर !

फसवून धर्मांतर करणारे मुसलमान ! हिंदूंनो, धर्मांतराचे
हे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
    नाशिक, ९ सप्टेंबर - कुवेतमध्ये नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून येथील कापड पेठ या भागातील गौरव संधानशिव (वय २८ वर्षे) या तरुणाचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्याला डांबून ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी गौरवच्या बहिणीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात सिराज शेख या संशयिताविरुद्ध अपहरणाची तक्रार नोंदवली आहे. हा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून संशयित सिराज शेख आणि तरुणाच्या शोधासाठी पथक मुंबईकडे गेले आहे.
१. गौरव याने एम्बीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी मुंबई गाठली होती. मुंबईत रिलायन्स आस्थापनात काम करत असतांना तो परदेशात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता.

१०० कोटी हिंदू हे शोभेच्या दारूचे काम नाही, हे दाखवून द्या ! - उद्धव ठाकरे

    मुंबई, ९ सप्टेंबर - हिंदूंची लोकसंख्या किंचित घटली असली, तरी १२५ कोटींच्या देशात हिंदू आजही १०० कोटींच्या घरात आहेत; मात्र मुसलमानांच्या १७ कोटींपुढे हे १०० कोटी हिंदू अनेकदा कच खातात, हीच खरी समस्या आहे. सुधारणावादी हिंदू म्हणून भूमिका मांडत असतांना आम्ही ज्ञान, विज्ञान आणि शस्त्रसज्ज हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्ते आहोत. हिंदूंनी मन, मनगट आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावे, तसेच धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणास पुरून उरावे, याच मताचे आहोत. केवळ लोकसंख्या वाढवूनच बलवान होता येईल, असे नव्हे. आज हिंदू शंभर कोटी आहेत, ते शोभेचे दारूकाम नाही हे केव्हातरी दिसू द्या, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी सामना या दैनिकाच्या अग्रलेखातून केले. विश्‍व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी हिंदूंची लोकसंख्या वाढवण्याविषयी अनेक विवाह आणि अपत्ये नसलेल्यांना उपाययोजना देण्याचा जो मार्ग सुचवला, त्यावर श्री. उद्धव ठाकरे यांनी हे भाष्य केले आहे.

त्यागपत्र देण्यास माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा नकार

     मुंबई - त्यागपत्र देण्याचा विचार नाही. माझ्या त्यागपत्राविषयीची वृत्त खरी नाहीत, असे स्वत: मारिया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

त्र्यंबकमध्ये आखाड्यांना स्नानासाठी वाढीव वेळ नाही !

मिरवणुकीत डीजे न वाजवण्याचा आखाड्यांचा निर्णय
    नाशिक, ९ सप्टेंबर (वार्ता.)  त्र्यंबकेश्‍वरमध्ये शाही स्नानासाठी कुंडाच्या रचनेनुसार तेथे फार थोडे भाविक स्नान करू शकतात. त्यामुळे भाविकांची संख्या विचारात घेता आखाड्यांना शाही स्नानासाठी वेळ वाढवून देणे शक्य नाही, असे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आखाडा प्रमुखांच्या बैठकीत स्पष्ट केले. पर्वणीच्या वेळी काढण्यात येणार्‍या मिरवणुकीत डॉल्बी ध्वनीक्षेपक यंत्रणा न लावण्याचा निर्णय आखाडा प्रमुखांनी घेतला आहे.

नगर येथील पावन गणपति मंदिरातील दानपेटीची चोरी

काँग्रेसप्रमाणे भाजप शासनाच्या काळातही मंदिरे असुरक्षित ! 
     अहमदनगर, ९ सप्टेंबर - येथील संभाजीनगर रस्त्यावरील पावन गणपति मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरली आहे. ही घटना ६ सप्टेंबर या मध्यरात्री घडली आहे. ही दानपेटी ७ सप्टेंबर या दिवशी सकाळी वडगाव गुप्ता परिसरात फोडलेल्या स्थितीत आढळून आली आहे. त्या पेटीतील रक्कम काढून चोरट्यांनी नंतर ती पेटी फेकून दिली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात ही चोरी झाल्याने नगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

उत्सवात अपप्रकार करणार्‍यांवर श्रीकृष्णाची कृपा कधीतरी होईल का ?

     पुणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) - येथील शहर आणि पिंपरी-चिंचवड भागात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. उत्सवामध्ये ध्वनीवर्धकाच्या मर्यादा ओलांडून 'डीजे' प्रणालीवर 'रिमिक्स ' गाणी लावण्यात आली होती. अनेक तरुण-तरुणी त्यावर नाचत होत्या; मात्र उपस्थित पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत होते. 

हिंदूंना गणेशोत्सव मोकळेपणाने साजरा करू द्यावा ! - दत्ता पोवार, शिवसेना शाहूवाडी तालुकाप्रमुख

आंदोलनात सहभागी धर्माभिमानी
     मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), ९ सप्टेंबर - हिंदूंच्या गणेशोत्सवाच्या काळात प्रशासनाद्वारे घातले जाणारे जाचक नियम अन् अटी दूर कराव्यात आणि हिंदूंना गणेशोत्सव मोकळेपणाने साजरा करू द्यावा. अन्यथा त्याविरुद्धच्या लढ्यात शिवसेना हिंदूंच्या पाठीशी राहील, असे प्रतिपादन शिवसेना शाहूवाडी तालुकाप्रमुख श्री. दत्ता पोवार यांनी केले. हिंदु धर्मावर होणारे आघात आणि आक्रमणे यांच्या विरोधात शासनाने कठोर कारवाई करावी, यासाठी मलकापूर येथील सुभाष चौकात करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. 

पुणे येथे एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा

जन्महिंदूंना धर्मशिक्षण देण्याची अपरिहार्यता
दर्शवणारी घटना ! त्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
    पुणे, ९ सप्टेंबर - येथील एरंडवणे भागातील पटवर्धन बाग बालमित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवासाठी मागितलेली १ सहस्र रुपये वर्गणी दिली नाही, म्हणून पटवर्धन बागमधील सूर्या उपाहारगृह चालकाला मारहाण करून तोडफोड केली. हा अपप्रकार ६ सप्टेंबर या दिवशी रात्री घडला आहे. त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर उपाहारगृह चालकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे. (मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या अशा अपप्रवृत्तीमुळेच हिंदूंच्या उत्सवाचे नाव अपकीर्त होत असते. म्हणून खरे उत्सव धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्रातच साजरे होतील ! - संपादक)
     मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपाहारगृहामध्ये असलेल्या ग्राहकांनाही शिवीगाळ करून हाकलून दिले, तसेच उपाहारगृहामधील खुर्च्या आणि कुंड्या यांची तोडफोड करून सुमारे ४० सहस्र रुपयांची हानी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उपाहारगृहाच्या बाहेर असलेल्या वाहनतळातील दुचाकी गाड्याही खाली पाडल्या.

हिंदु धर्मात सांगितलेल्या कृती योग्यच ! - अशोक हरणावळ, नगरसेवक, शिवसेना

नगरसेवक श्री. अशोक हरणावळ (उजवीकडे) यांना
निवेदन देतांना डावीकडून श्री. कृष्णाजी पाटील आणि श्री. दाते
     पुणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, तसेच धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यात व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने चळवळ आरंभली आहे. त्या अंतर्गत स्थानिक नगरसेवक, आमदार यांना निवेदने देऊन गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषण होते, हा प्रचार फसवा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सप्रमाण निदर्शनास आणून दिले जात आहे. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात शिवसेनेेचे गटनेते आणि नगरसेवक श्री. अशोक हरणावळ यांची भेट घेतली असता, त्यांनी हिंदु धर्मात सांगितलेल्या सर्व कृती योग्यच आहेत, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली. सनातनवर आमचा पूर्ण विश्‍वास आहे, असेही ते म्हणाले. श्री. हरणावळ हे प्रखर हिंदुत्ववादी असून सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना त्यांचा पाठिंबा असतो. या वेळी सनातन संस्थेचे श्री. निरंजन दाते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना निवेदन

समितीच्या कार्यकर्त्यांकडून निवेदनाविषयी समजून
घेतांना गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील (उजवीकडे)
     अकोला - गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात केले जाणारे विसर्जन किंवा मूर्तीदान मोहीम यांना विरोध करणे, तसेच गणेशाचे विडंबन रोखणे, देहली येथे होणार्‍या शान-ए-पाकिस्तान आणि एक शाम पाकिस्तान के नाम या कार्यक्रमांना अनुमती देऊ नये, या मागण्यांचे निवेदन येथील गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

तळोजा (रायगड) येथे जन्माष्ठमीच्या दिवशी २ गायींची हत्या; ५ जणांना अटक

फडणवीस शासन गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कधी करणार ?
हत्या केलेली गाय
    तळोजा - येथे गोरक्षक चेतन शर्मा यांनी पोलिसांच्या पथकासह तळोजा येथे गोवंशहत्या रोखण्यासाठी जन्माष्ठमीच्या दिवशी घातलेल्या धाडीत हत्या झालेल्या २ गायींची शरीरे सापडली. या प्रकरणी अद्यापपर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    तळोजा येथे गोवंशहत्येविषयी माहिती मिळायची. त्यानुसार पोलीस संबंधित ठिकाणी धाडीही घालायचे; मात्र कसायांमधील संपर्काच्या जाळ्यामुळे पोलीस तेथे पोहोचण्यापूर्वीच कसाई पळून जायचे. ६ सप्टेंबर या दिवशी पहाटे ३.३० ते ४.३० या वेळेत गोवंशहत्या होणार असल्याविषयी मिळालेल्या माहितीनुसार श्री. चेतन शर्मा यांनी स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने संबंधित ठिकाणी धाड घातली असता हत्या केलेल्या २ गायी आढळल्या. त्यांच्या मासाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
    (हे चित्र प्रसिद्ध करण्यामागे कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू नाही. केवळ वाचकांच्या माहितीसाठी ते देत आहोत. - संपादक)

पुणे येथे साहाय्यक शिक्षण उपनिरीक्षकांकडूनच बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने प्रवेश देण्याचा अपप्रकार

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! 
     पुणे, ९ सप्टेंबर - येथील उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आशा गुजर यांनी येथील दोन नामांकित महाविद्यालयांत दलालाद्वारे खोट्या कागदपत्रांच्या आधारे इयत्ता ११ वीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे गुजर यांच्याकडील सध्याचा पदभार काढून घेत बनावट प्रवेश रहित केले आहेत. 

गंभीर गुन्ह्यात सापडलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे नगरसेवक

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या पक्षांवर कारवाईची मागणी करा ! 

     पिंपरी, ९ सप्टेंबर - मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर एकूणच गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी चर्चा होत आहे. गेल्या काही निवडणुकांपासून गुन्हेगारीची ही कीड राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जपत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१२ मध्ये झाली. त्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक नगरसेवक निवडून आले. गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे काही नगरसेवक गंभीर गुन्ह्यात सापडले आहेत. (एका महानगरपालिकेमध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले नगरसेवक किंवा पदाधिकारी एवढ्या प्रमाणात असतील, तर देशामध्ये असलेल्या सर्व महानगरपालिका विधानसभा आणि संसद यांमध्ये दोन्ही काँग्रेस पक्षांमध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले किती राजकारणी असतील, याचा विचारच न केलेला बरा ! असे गुन्हेगार असलेली लोकशाही हटवून स्वच्छ चारित्र्याचे राज्यकर्ते मिळवण्यासाठी 'हिंदु राष्ट्र'च आवश्यक ! - संपादक)

गुन्हे अन्वेषण विभागाने अन्वेषण केलेल्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प

गृहविभाग याविषयी काय उपाययोजना करणार, ते त्यांनी स्पष्ट करावे ! 
     पुणे, ९ सप्टेंबर - राज्यातील महत्त्वाची तपास यंत्रणा म्हणजे गुन्हे अन्वेषण विभागाकडून गुन्हे उकलण्याचे प्रमाण अत्यल्प झाल्याची गोष्ट उघड झाली आहे. गेल्या ५ वर्षांत अन्वेषण विभागाने तपास केलेल्या ९४ गुन्ह्यांपैकी केवळ १८ गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा झाली असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. (यावरून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविषयी संशय आल्यास वावगे काय ? गुन्ह्यांची उकल होत नसल्याविषयी विभागातील कर्मचार्‍यांवर गृहविभागाने कोणती कारवाई केली, तेही गृहविभागाने स्पष्ट करावे. - संपादक) 

महाराष्ट्र प्राणीरक्षण (सुधारणा) कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करावी !

राज्य पशूसंवर्धन विभागाकडून 
जिल्हा उपआयुक्त पशूसंवर्धन आणि जिल्हा पशुसंवर्धन 
अधिकारी यांना आदेश  कायदा झाल्यावर तत्परतेने कठोर अंमलबजावणी का झाली नाही ? 
     मुंबई - ४ मार्च २०१५ पासून राज्यात महाराष्ट्र प्राणीरक्षण (सुधारणा) कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यातील तरतुदींप्रमाणे गायी, बैल आणि वळू यांची हत्या करण्यास अनुमती नाही. गोवंशीय प्राण्यांच्या हत्येसाठी वाहतूक, निर्यात, खरेदी, विक्री, तसेच गोवंशियांचे मांस कह्यात ठेवण्यास बंदी आहे. हा कायदा आणि त्यातील तरतुदींची माहिती जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये उपलब्ध करून द्यावी. यासाठी प्रसारमाध्यमांचा उपयोग करावा. बकरी ईदसाठी गोवंशियांची हत्या आणि वाहतूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार पातळीवर बैठका घ्याव्यात. बैठकीत बीट प्रमुखापासून तलाठी ग्रामसेवकापर्यंत कर्मचार्‍यांना बोलवावे. कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याची शासनाकडे निश्‍चिती करावी, असे आदेश पशूसंवर्धन विभागाचे आयुक्त श्री. विश्‍वास भोसले यांनी जिल्हा उपआयुक्त पशूसंवर्धन आणि जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी यांना दिल्या आहेत.

फेसबूकने बंद केलेले हिंदु जनजागृती समितीचे फेसबूक पान (हिंदी) पूर्ववत चालू

     मुंबई, ९ सप्टेंबर (वार्ता.) - दिनांक ४ सप्टेंबर २०१५ या दिवशी फेसबूकने अचानक बंद केलेले हिंदु जनजागृती समितीचे फेसबूक पान (facebook.com/hjshindi) दिनांक ८ सप्टेंबर २०१५ या दिवशी पूर्ववत कार्यरत झाले. समितीच्या फेसबूक पानावर आक्षेपार्ह 'पोस्ट' केल्याचा कांगावा करत फेसबूकने हे पान बंद केले होते. त्यानंतर समितीने यासंदर्भात आवश्यक ती प्रक्रिया करून फेसबूकला त्यांच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. त्यानुसार फेसूबकने समितीला पान पूर्ववत चालू केल्याचे संपत्र पाठवले.

उघड गुन्ह्याच्या वेळी पोलीस काय करत होते ? अशा पोलिसांना कर्तव्यच्युती म्हणून आजन्म कारागृहात टाका !

     'न्यायालयाच्या बंधनाच्या पार्श्‍वभूमीवर दहीहंडी उत्सवाच्या विकृतीला अंशत: आळा बसला, असे वरकरणी वाटले, तरी दादर येथे ८ थर आणि ठाणे येथे ७ थर लावले गेले आणि अनेक गोविंदा मंडळांनी न्यायालयाचा ४ थर लावण्याचा नियम पायदळी तुडवला.'

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत गणेशोत्सव-पितृपक्ष विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १३ सप्टेंबर 
 विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी
 १२ सप्टेंबरच्या दुपारी ३ पर्यंत 'ईआर् पी  प्रणाली'त भरावी !

फलक प्रसिद्धीकरता

भारतीय सैनिकांनो, तुमच्यावर विषप्रयोग करण्याचे
डाव रचणार्‍या पाकचे नाव जगाच्या नकाशावरून कायमचे पुसून टाका ! 
     भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमाभागातील पाणीसाठ्यांचा वापर स्थानिक नागरिकांसह भारतीय सैन्यासाठी केला जातो. या साठ्यांमध्ये पाककडून विषप्रयोग करण्यात येण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी नुकतीच वर्तवली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
 Pineke panime jahar dalkar Bhartiya sainikonko marneka Pak ka shadyantra. 
- Ham aise Pak ko akhari sabak kab sikhayenge ? 

जागो ! : 
पिनेके पानीमें जहर डालकर भारतीय सैनिकोंको मारनेका पाकका षड्यंत्र. 
- हम एैसे पाकको आखरी सबक कब सिखाऐंगे ?

रामराज्य येण्यासाठी संघर्षाची सिद्धता ठेवा ! - संभाजी साळुंखे

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
      कोल्हापूर, ९ सप्टेंबर (वार्ता.) - देशाचा लौकिक वाढावा, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. इतर पंथिरांना मात्र हा देश त्यांचा वाटत नाही. त्यांचे केवळ पाकिस्तानशीच पटते. याकूबच्या जनाजासाठी सहस्रो लोक जमले, याचा अर्थ त्यांची निष्ठा देशावर नाही, असेच म्हटले पाहिजे. रामराज्य येण्यासाठी संघर्षाची सिद्धता ठेवा, असे मत बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी साळुंखे यांनी व्यक्त केले. येथील छत्रपती शिवाजी पुतळा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करून अश्‍लील चित्रफीती बनवणार्‍या धर्मांधाला ७ वर्षांनंतर १३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

न्याय नव्हे अन्याय ! 
      इचलकरंजी, ९ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून त्याची चित्रफीत बनवून त्या प्रसारित करणारा धर्मांध इम्रान कलावंत या शिक्षकास ७ सप्टेंबर या दिवशी गुन्हा घडल्याच्या ७ वर्षांनंतर इचलकरंजीत अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत १३ वर्षे सक्तमजुरी आणि ५० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. (या उदाहरणावरून देशात अल्पसंख्य म्हणून आरडा-ओरडा करणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र सदैव आघाडीवर आहेत, हेच लक्षात येते ! - संपादक) 

नाशिक येथील धनलक्ष्मी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांची सनातनच्या प्रदर्शनास सदिच्छा भेट

ग्रंथप्रदर्शन पहातांना डावीकडून श्री. प्रकाश कोल्हे
आणि त्यांना माहिती सांगतांना सौ. अनुराधा निकम
     नाशिक, ९ सप्टेंबर (वार्ता) - सिंहस्थ पर्वानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथे राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण हे प्रदर्शन लावण्यात आलेले आहे. या प्रदर्शनास पाथर्डी फाटा, नाशिक येथील धनलक्ष्मी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रकाश सुखदेव कोल्हे आणि मुख्याधापिका सौ. ज्योती प्रकाश कोल्हे यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये उपस्थित होत्या.

थकबाकीसाठी पाणीपुरवठा बंद केल्यास शिवसेनेचे आंदोलन ! - शिवसेनेचे जीवन प्राधिकरणास निवेदन

जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना
निवेदन देतांना शिवसैनिक
   कोल्हापूर, ९ सप्टेंबर (वार्ता.) - गांधीनगर, उचगाव, गोकुळ शिरगांव यांसह ११ गावांना कागल दुधगंगा नदीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाण्याचा पुरवठा होतो. थकबाकीमुळे या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याची चेतावणी विभागाने दिली आहे. ही गावे ही केवळ याच पाण्यावर अवलंबून आहेत, तसेच हा पाणीपुरवठा बंद करणे म्हणजे नियमित देयके बंद करणार्‍यांवर अन्याय आहे. त्यामुळे थकबाकीसाठी पाणीपुरवठा बंद केल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेने दिली आहे. करवीरतालुका प्रमुख श्री. राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

शान-ए-पाकिस्तान हा कार्यक्रम रहित करा ! - ईश्‍वरपूर आणि मिरज येथे निवेदन

मिरज येथे प्रांत कार्यालयात शिरस्तेदारांना
निवेदन देतांना हिंदुत्ववादी
      सांगली, ९ सप्टेंबर (वार्ता.) - शान-ए-पाकिस्तान हा कार्यक्रम रहित करा, या मागणीसाठी ईश्‍वरपूर आणि मिरज येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. ईश्‍वरपूर येथे तहसीलदार रूपाली सरनोबत यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री गजानन पाटील, हिंदु जनजागृती समितीचे राजाराम मोरे, संतोष कुंभार, उत्तम मोरे आणि सनातन संस्थेचे सुरेश जाधव, राम आवटी, सौ. योजना पाटील उपस्थित होते. मिरज येथे प्रांत कार्यालयात निवेदन देतांना शिवसेनेचे व्यापारी सेनेचे श्री. तात्या कराडे, श्री. नितीन भोरावत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मनोज गवळी, गिरीश पुजारी उपस्थित होते.

हिंदु संतांवर कारवाई करणारे; पण भोंदू ख्रिस्ती धर्मप्रसारकांवर कारवाई न करणारे ख्रिस्तीधार्जिणे पोलीस !

हिंदु समाजाला साधू-संतांचे महत्त्व कळण्यासाठी हे विशेष सदर !
२ इ. योगऋषी रामदेवबाबा आणि त्यांच्या अनुयायांवर अत्याचार करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्याचा केवळ देखावा नको, तर प्रत्यक्ष कृती हवी ! : योगऋषी रामदेवबाबा यांच्या आंदोलनावर रात्री कारवाई का केली ?, असे विचारणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासन आणि देहली पोलीस यांना पाठवली आहे. महिला आयोगानेही महिलांवरील अत्याचारांविषयी शासन आणि पोलीस यांना खडसावले आहे. मानवाधिकार आयोगानेही दिल्ली पोलीस आणि केंद्रशासन यांना रामदेवबाबा यांच्यावरील कारवाईच्या संदर्भात नोटिसा पाठवल्या आहेत. बाबांना महाठग म्हणणारे काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांच्यावरही एका राष्ट्राभिमानी नागरिकाने खटला दाखल केला आहे. 
२ ई. हिंदु संतांवर कारवाईसाठी सदैव तत्पर असणारे; पण भोंदू ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यास टाळणारे ख्रिस्तीधार्जिणे पोलीस ! : दापोडी, पुणे येथील विनियार्ड चर्चचे पीटर सिल्व्हे, जयश्री सिल्व्हे आणि त्यांचे कार्यकर्ते गेली १५ वर्षे चमत्काराचे दावे करून सामान्य लोकांना फसवत आहेत. विनियार्ड चर्चमध्ये रोग बरे करण्यात येत असल्याचे सांगून तेल चोळायला दिले जाते.

भारताने नैतिक ओझ्यापोटी अण्वस्त्रे बाळगण्यात असलेला संकोच सोडून संरक्षणासाठी वास्तववादी भूमिका स्वीकारली पाहिजे !

      लेखिका रुणा दास यांनी रिव्हिजिटिंग न्यूक्लिअर इंडिया-स्ट्रॅटेजिक कल्चर अँड (इन)सिक्युरिटी इमॅजिनरी, हे पुस्तक लिहिले आहे. इंग्रजी भाषेत असलेल्या या पुस्तकाचे परीक्षण सचिन दिवाण यांनी दैनिक लोकसत्तात मांडले आहे. त्यातील संपादित भाग आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. यातून भारत पाकिस्तानच्या संदर्भात कचखाऊ भूमिका का अवलंबत आहे, याचेही उत्तर वाचकांना मिळू शकेल.
     एखाद्या देशाचे संरक्षणविषयक धोरण आकारास येतांना साधारणत: त्याला बाह्य शक्तींकडून असलेले धोके, त्यावर मात करण्याची व्यूहनीती, लष्करी क्षमता अशा ठराविक बाबींचा विचार केला जातो.

दुष्काळग्रस्तांची विटंबना !

      हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट संवादफेक करणारे, सडेतोड विचार मांडणारे; मात्र तितकेच समाजाप्रती संवेदनशील असणारे अभिनेते नाना पाटेकर आणि मराठी कलावंत मकरंद अनासपुरे या दोघांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जनतेला अर्थसाहाय्य केले. जीवनातील अडचणींमुळे खचून जाऊन आत्महत्या करून हे जीवन संपवू नका, अशी समजूतही ही कलाकार मंडळी घालत आहेत. शासनाने अमुक करावे, शासनाने तमुक करावे, असे म्हणणार्‍यांचा समाजात तोटा नाही; पण म्हणून स्वतः पुढाकार घेऊन पदरमोड करत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचे अश्रू पुसणारे अवघे दोनच त्यामधून समोर आले. इतका माणुसकीचा दुष्काळ राज्यात आणि पर्यायाने देशभरात पसरला आहे. या दोघांनी या कार्यात पुढाकार घेऊन समाजाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडलेे. एखादा विषय जेव्हा अधिकाधिक लोकप्रिय किंवा प्रसिद्ध होऊ लागतो, तेव्हा त्या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी राजकारणी हमखास पुढे येतात. नाना आणि मकरंद यांचा उपक्रम प्रसारमाध्यमांनी चांगलाच उचलून धरल्याचे लक्षात येताच दहीहंडी म्हणजेच धांगडधिंगा घालून उत्सवाचा बेरंग करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उच्च न्यायालय आणि राज्यशासन यांच्या नियमावलीमुळे त्यांची पाचपाखाडी येथील संघर्षची दहीहंडी आयोजित न करता तो पैसा दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना देण्याची घोषणा केली आणि माध्यमांकडून सवंग लोकप्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला.

सौरउर्जेच्या उपकरणांवरील अनुदानाविषयी अमेरिका आणि जागतिक व्यापार संघटना यांचे भारताविरुद्ध दुटप्पी धोरण !

      भारतातील ४० कोटी जनता अजूनही विजेचा वापर करण्याच्या पलीकडे आहे, याबद्दल जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यू.टी.ओ.) आणि अमेरिका मात्र अंधारातच आहे. भारत सौरऊर्जेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रशासनाने भारतात बनणार्‍या सौरऊर्जेच्या उपकरणांवर अनुदान घोषित केले आहे. याचा अमेरिका आणि युरोपमधून आयात होणार्‍या उपकरणांवर अनिष्ट परिणाम होईल; म्हणून भारताने हे अनुदान बंद करावे अथवा भारताविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्बंध घातले जातील, असा अजब निर्णय जागतिक व्यापार संघटनेने वर्ष २०१३मध्ये अमेरिकेने केलेल्या तक्रारीवर घेतला आहे. 
लेखक : चार्ल्स पिअरसन

शासनाने गोहत्यार्‍यांना मृत्यूदंड देण्याचा धडाकेबाज निर्णय घेऊन आपली मर्दुमकी दाखवावी !

      भाकड गायींना चारा पुरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेऊन गोसंवर्धनाच्या कायार्र्त महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन ! गोमातेनेच जावडेकर यांना सुबुद्धी देऊन हा निर्णय सुचवला.
      महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा केला. नुसता कायदा करून चालणार नाही, तर निर्भीडपणे त्याची कडक कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. गायीला पशू संबोधणे, हीच सर्वांत मोठी चूक आजचे राज्यकर्ते करत आहेत. गोमाताकी रक्षा, हिंदुस्थानकी सुरक्षा हाच मूलमंत्र समोर ठेवून राज्यकर्त्यांनी गोहत्याबंदीकडे पहावे आणि गोहत्याबंदी कायद्याद्वारे गोहत्यार्‍यांना मृत्यूदंड देण्याचा धडाकेबाज निर्णय घेऊन आपली मर्दुमकी दाखवावी.
     आजही गोमांस पकडण्यात पोलिसांचा वेळ वाया जात आहे. गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गोरक्षकांना सतर्क रहावे लागत आहे, ही महाराष्ट्राच्या शासनकर्त्यांसाठी शरमेची गोष्ट आहे. त्यामुळे शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कडक कार्यवाही करून गायींना मोकळ्या पटांगणात चरण्यासाठी हिरवे कुरण उपलब्ध करून द्यावे, अशी जनतेची मागणी आहे. गोमातेचा विजय असो !
- श्री. श्रीकांत भट, अकोला.

सामाजिक संकेतस्थळावर फिरत असलेला संदेश

मी नाही विसरलो...
अत्याचार जे मोगल, चंगेज आदींनी हिंदूंच्या पूर्वजांवर केले...
मी नाही विसरलो,
त्या कामांध अल्लाउद्दीन खिलजीला, ज्यापासून आपले शील वाचवण्यासाठी राणी पद्मिनीने १४ सहस्र स्त्रियांसह धगधगत्या अग्नीकुंडात स्वतःला लोटून दिले.
मी नाही विसरलो,
त्या जिहादी टीपू सुलतानला, ज्याने एकेका दिवशी माझ्या लाखो हिंदु बांधवांचा संहार केला !

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय !

    सनातनच्या रामनाथी आश्रमासमोरून जातांना गेली ८ वर्षे काही समाजद्रोही सनातन बॉम्ब, असे ओरडत जातात. काहीजण शिव्या देत जातात, काहीजण दगड फेकतात, तर काहीजण पेट्रोल बॉम्ब फेकतात. विविध संप्रदायांच्या भक्तांना, हिंदुत्ववाद्यांना आणि संतांना येणारे पुढील अनुभव वाचले की, लक्षात येईल की, सनातनविरोधी अशी कृत्ये करणारे असुरांच्या कह्यात आहेत. हिंदु राष्ट्रात त्यांचा नाश केला जाईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.६.२०१५)
उत्तम व्यवस्थापन असलेला उत्तम आश्रम !
     उत्तम व्यवस्थापन असलेला उत्तम आश्रम ! प्रत्येक साधकाच्या प्रत्येक टप्प्यातील आध्यात्मिक उन्नती होण्याच्या दृष्टीने पूर्ण नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे. आश्रमातील प्रत्येक क्षणाचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचा येथे विचार होतो आणि ते आनंदाने आचरणात आणणार्‍या साधकांना पाहून मला पुष्कळ समाधान वाटले. आश्रमात सर्व ठिकाणी चैतन्य पसरलेले आहे. मला येथे रहावे, असे वाटत आहे; परंतु मला परत जायला हवे. मला येथे येण्याची आणि आश्रम पहाण्याची संधी दिलीत; यासाठी मी आपला आभारी आहे. - श्री. आनंद कृष्ण दासा, बेंगळुरू, अध्यक्ष वॉट्स; अध्यक्ष, हरे कृष्ण मंदिर, बेंगळुरू. १७.६.२०१५
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

स्वातंत्र्यापूर्वी ३४ कोटी असलेले देशी गोधन आता ३.५ कोटींहून अल्प !

      वर्ष १९४८ मध्ये भारताची राज्यघटना अमलात आली. राज्यघटनेत संपूर्ण हिंदुस्थानात गोहत्या बंदी करावी, असे कलम आहेे. त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही. महाराष्ट्र विधीमंडळाने वर्ष १९९५ मध्ये गोवंश बंदीचा कायदा संमत केला आणि राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवला. आजपर्यंत तो तसाच धूळ खात पडून आहे. २० वर्षे उलटून गेल्यावरही या कायद्याला राष्ट्रपतींची संमती मिळाली नाही. देशात सुमारे ३३ सहस्र ६०० पशूवधगृहांतून प्रतिवर्षी सुमारे २ कोटी ४० लाख गोवंशियांची हत्या होते. वर्ष १९४७ मध्ये ३४ कोटी असलेले देशी गोधन आता ३.५ कोटींहून अल्प उरले आहे, तर १२८ गायींच्या देशी जातींपैकी केवळ १८ जाती शेष आहेत.
     हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत. - श्री श्री गुरुनागभूषण शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक

साधिकेने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकणारे, तिला साहाय्य करण्यास धडपडणारे आणि नामजप, दैनिक वाचनादी सर्व कृती करणारे शुकमुनी नामक पोपट !

दैनिक सनातन प्रभात वाचतांना शुकमुनी
१. घरी असतांना
१ अ. साधिकेच्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करणारे शुकमुनी !

    मी आणि शुकमुनी (पोपट) घरी असतांना मी सकाळ-संध्याकाळ तोंडाला पावडर-कुंकू लावतांना त्यांनाही लावायला हवे असायचे.
१ अ १. पावडर लावून घेणे : माझ्या हातात पावडरचा डबा पाहिला की, ते धावत येऊन पायाला चोच लावायचे. मग मी विचारायचे, तुम्हालाही पावडर हवी आहे का ?, तर ते हो म्हणायचे. मग मी त्यांच्या अंगावर पावडर टाकतांना ते त्यांचे पंख पसरायचे.
१ अ २. कुंकू लावण्यास सुचवणे : नंतर मी कुंकू लावायला आरशासमोर उभी राहिले की, तिकडेही धावत यायचे. मग मी त्यांना विचारायचे, तुम्हालाही कुंकू हवे का ? तेव्हाही ते हो म्हणायचे. मग मी कुंकवाच्या बाटलीतील काडी त्यांच्याजवळ नेऊन म्हणायची, लावलं.

जून २०१५ मध्ये चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि राष्ट्रीय शिबीर यांसाठी कर्नाटक राज्यातून आलेल्या धर्माभिमान्यांमध्ये झालेले पालट आणि त्यांना आलेल्या अनुभूती

१. साधना करून श्रीकृष्णरूपी प.पू. गुरुदेवांच्या कार्यात सहभागी 
होण्याची तळमळ लागलेले श्री. प्रथमेश पीरापुर !
१ अ. हिंदु जनजागृती समितीने धर्माचरण करण्यास शिकवणे : आमची एक संघटना आहे. आमच्या संघटनेला हिंदु जनजागृती समितीने धर्माचरण करायला शिकवले. राष्ट्र-धर्म यांच्या जागृतीसह स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून ईश्‍वरप्राप्ती कशी करावी ? हे आम्ही शिकत आहोत. आमच्या संघटनेला धर्माची जाणीव करून दिली; म्हणून आम्ही हिंदु जनजागृती समिती आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. समितीच्या संपर्कात आल्यानंतर मी हिंदुत्वाविषयी, धर्माचरणाविषयी जाणून घेतले. पूर्वी मी कुणीही भेटल्यास हस्तांदोलन करत होतो; पण आता नमस्कार करतो. भ्रमणभाषवर बोलतांना हॅलो म्हणत होतो; पण आता नमस्कार, असे म्हणू लागलो आहे.

प.पू. डॉक्टरांची छायाचित्रे पहातांना तेथे भगवान परशुरामाचे अस्तित्व जाणवणे

    काही दिवसांपूर्वी भोजनकक्षात प.पू. डॉक्टरांची प्रशिक्षण करत असतांना छायाचित्रे लावली होती. एक दिवस ती छायाचित्रे पहात असतांना मला भगवान श्री परशुरामाची आठवण झाली. त्या वेळी मला तेथे भगवान श्री परशुरामाचे अस्तित्व जाणवत होते.
- कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

भावपूर्ण सेवा केल्यास निर्जीव वस्तू आपल्याला त्यांच्यातील देवत्वाची अनुभूती देतात, याची पू. के. उमेश शेणै यांना आलेली प्रचीती !

पू. के. उमेश शेणै
१. स्नानगृहात पाय घसरल्याने खाली पडणे
अणि मागे असलेली बालदी तुटणे
    १७.३.२०१५ या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी स्नान करत असतांना लघुशंकेची भावना झाल्याने तेथेच असलेल्या शौचपात्राकडे जात असतांना अकस्मात् माझा पाय घसरून मी धपकन खाली पडलो. त्यामुळे माझ्या पाठीमागे असलेली बालदी तुटली. मी सतर्क नसल्याने ही घटना घडली. बालदी तुटली; म्हणून मी स्नानगृहातून बाहेर आलो. या घटनेनंतर मी इतक्या जोरात पडूनही मला किंचितही खरचटले नाही अथवा दुखलेही नाही, याचे कारण काय ?, असा विचार मी करू लागलो.

खेळण्या-बागडण्याच्या वयात तहानभूक विसरून तळमळीने सेवा करणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा पनवेल येथील कु. आर्य जोशी (वय ७ वर्षे) !

 कु. आर्य जोशी
    श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशी (१०.९.२०१५) या दिवशी देवद, पनवेल येथील बालसाधक कु. आर्य जोशी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि कु. आर्यला आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
कु. आर्य जोशी याला सनातन परिवाराच्या
वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. कु. आर्यची गुणवैशिष्ट्ये
१ अ. सेवाभाव

१ अ १. सेवेच्या तळमळीमुळे तहानभूक विसरणे : आर्यला संध्याकाळी ७ वाजता पाळणाघरातून घरी आणतांना तो म्हणतो, मला पुष्कळ भूक लागली आहे आणि घर जवळ आल्यावर मी आता आश्रमात सेवेला जातो, असे सांगून तो बाहेरच्या बाहेर सेवेला निघून जातो. (आमच्या घराजवळच सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची सेवा चालू असते.)

पैशाच्या लालसेपोटी सनातन संस्थेची आर्थिकदृष्ट्या फसवणूक करून स्वतःच्या पापात भर घालून घेणारी एक लोभी कार्यकर्ती !

साधकांच्या चुका सनातन प्रभातमध्ये छापण्याचा उद्देश
    मनाच्या नाही, तर निदान जनाच्या लाजेने तरी त्यांनी पुढे चुका टाळाव्यात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.७.२०१५)
    एका जिल्ह्यातील एका कार्यकर्तीकडून झालेल्या गंभीर चुका पुढे देत आहे.
१. अर्पण घेतांना
१ अ. अर्पणाच्या रकमेची काऊंटर फॉईलवर त्वरित नोंद न करणे : अर्पणदात्यांकडून अर्पण घेतल्यानंतर त्याच वेळी त्यांना पावती देणे आणि काऊंटर फॉईलवर (मुख्य कार्यालयात जमा करावयाच्या पावतीवर) त्याची नोंद करणे, ही कार्यपद्धत आहे. असे असतांनाही काही वेळा ही कार्यकर्ती अर्पणदात्यांकडून अर्पण घेतल्यानंतर काऊंटर फॉईलवर त्या रकमेची नोंद करत नसे. एका अर्पणदात्याच्या सतर्कतेमुळे ही अक्षम्य चूक लक्षात आली.

साधनेचे प्रयत्न करवून घेऊन स्वतःला लवकर घडवण्यासाठी कु. वैष्णवी माने (वय १२ वर्षे) हिने प.पू. डॉक्टरांना पत्रातून आर्ततेने आळवणे

कु. वैष्णवी माने
प्राणप्रिय, प.पू. डॉक्टर,
     मला पुष्कळ दिवसांपासून तुमची आठवण येत आहे. मला सतत, तुम्हाला पत्र लिहावे, असे वाटते; पण काय लिहावे ते कळत नव्हते. प.पू. डॉक्टर, माझ्यात काहीच तळमळ नाही. तुम्हाला पुष्कळ भेटावेसे वाटते; पण मी साधनेचे चांगले प्रयत्न केले, तर तुम्ही मला नक्की भेटाल, असे मला सतत वाटते. हे गुरुराया, तुम्ही आमच्यासाठी किती करता हो ! आमच्या मनात आलेली प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करता. हे देवा, तू इतके करतोस; पण आम्ही प्रयत्न करण्यास न्यून पडतो.
परम पूज्य, सांगा ना हो कृष्णाला ।
घडव तू लवकर या जिवाला ॥
परम पूज्य, सांगा ना हो कृष्णाला ।
प्रयत्न करवूनी गुरुचरणी घे या जिवाला ॥
    प.पू. डॉक्टरांना सर्व बालगोपींकडून साष्टांग नमस्कार !
- तुमच्या चरणांशी येण्यास आसुरलेली,
कु. वैष्णवी माने (वय १२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०१५)

परिपूर्ण सेवा करणारा आणि अनेक सेवा लीलया सांभाळणारा रामनाथी आश्रमातील श्री. कुशल उत्तम गुरव !

Add caption
    मूळचा नंदिहळ्ळी, बेळगाव येथील श्री. कुशल गुरव (वय २१ वर्षे) गेल्या ४ वर्षांपासून रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करतो. त्याचे पूर्ण कुटुंबीय साधनेत असून त्याची लहान बहीण कु. रोहिणी हीसुद्धा गेल्या ५ मासांपासून आश्रमात पूर्णवेळ सेवा करण्यासाठी आली आहे. लहान वयातच अनेक सेवा लीलया सांभाळणार्‍या कुशलविषयी रोहिणीने आणि एका साधिकेने दिलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
वाढदिवसानिमित्त श्री. कुशल गुरव
यांना सनातन परिवाराकडून अनेक शुभेच्छा !
१. नम्रतेने बोलणे
    तो सर्वांशी नम्रतेने आणि आदराने बोलतो. साधक भेटल्यावर त्यांची आणि घरच्यांची प्रेमाने विचारपूस करतो, तसेच घरच्यांना नमस्कार सांगा, असेही सांगतो.

काही हिंदुत्ववादी संघटनांप्रमाणे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांमध्ये दुसर्‍या संघटनांच्या कार्यकर्त्यांना पद देऊन आपल्या संघटनेत घेतले जात नाही !


पू. महादेव नकातेकाका यांच्याकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. महादेव नकाते
    सनातनचे पू. महादेव नकातेकाका यांच्या समवेत सेवेच्या निमित्ताने काही ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.
१. साधकांच्या कुटुंबियांनी साधना करावी, यासाठी
प्रयत्न करणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे
     पू. काकांचे निवासाचे नियोजन ज्या साधकाच्या घरी केले जाते, त्या साधकाच्या घरी गेल्यावर पू. काका त्याच्या घरातील कुटुंबियांना काही अडचणी आहेत का ?, हे समजून घेतात. तसेच घरातील सर्वांनी नामजप आणि साधना करावी, यासाठी ते प्रयत्नरत असतात.

साधकांना सूचना !

पितृपक्षाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध ! 
     पितृपक्षाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी पितृपक्षाचे धर्मशास्त्र सांगणारे 'ए ४' आकारातील पाठपोट हस्तपत्रक सिद्ध करण्यात आले आहे. या हस्तपत्रकांचे नियोजनपूर्वक सुयोग्य ठिकाणी वितरण करता येईल. तसेच मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र याविषयीचे २.२५ फूट ३.५ फूट आकारातील १६ धर्मशिक्षण फलक आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व या संदर्भातील १ फलक उपलब्ध करण्यात आला आहे. हे फलक सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करता येतील. हस्तपत्रक आणि वरील फलक यांसाठी प्रायोजक मिळवू शकतो. हे फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध आहेत.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'पंतप्रधान मोदी संपूर्ण चातुर्मासात प्रतिदिन एकदाच जेवतात' या बातमीऐवजी 'पंतप्रधान मोदी प्रतिदिन राजधर्माचे पालन करतात', ही बातमी जनतेच्या, राष्ट्राच्या आणि धर्माच्या दृष्टीने अधिक योग्य ठरली असती !' 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.९.२०१५)  

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम आणि प्रीती 
१. प्रेम असल्यावर सहवासाची ओढ लागते व मग प्रेम वृद्धींगत होते. ते केवळ प्रकृतीतीलच असते. 
२. आपण अशाश्‍वतावर प्रेम करतो आणि ते सुटून जाईल म्हणून भितो. जे शाश्‍वत आहे, त्यावर प्रेम करीत नाही. 
३. द्वैतात प्रेम असते; पण प्रेमात द्वैत नसते. प्रकृतीत प्रेम असते; पण ब्रह्मात द्वैत नसते. 
४. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल, तर मी प्रेमात आहे. 
 भावार्थ : येथे 'प्रेम' हा शब्द प्रीती, म्हणजे पारमार्थिक प्रेम, या अर्थाने वापरला आहे. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ईश्‍वर सर्वत्र आहे !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      जी गोष्ट उघडपणे करणे अयोग्य वाटते, ती लपून करण्याचा प्रयत्न करणेही अयोग्यच; कारण एखादी अहितकारक गोष्टच उघडपणे करायची टाळली जाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

देशद्रोही कोण ?

संपादकीय
      २७ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्राच्या गृह विभागाने केंद्र किंवा राज्य शासन वा त्याचे प्रतिनिधी असलेले राजकारणी वा लोकप्रतिनिधी यांच्याविषयी द्वेष, तुच्छता, अप्रीती, शत्रुत्व आणि सामाजिक असंतोष निर्माण करणार्‍या लिखाणाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील परिपत्रक काढले होते. या परिपत्रकाच्या विरोधात नरेंद्र शर्मा यांनी याचिका दाखल केल्यानंतर आता न्यायालयाने शासनाला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. शासन याविषयी काय उत्तर देईल, हा उत्सुकतेचा विषय असला, तरी ते परिपत्रक निश्‍चितच लोकशाहीतील मूलभूत तत्त्वांचे हनन करणारे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले श्री. देवेंद्र फडणवीस हे स्वतः अत्यंत स्वच्छ व्यक्तीमत्त्व असल्यामुळे हे परिपत्रक काढण्यामागे त्यांचा व्यक्तीगत स्वार्थ नक्कीच नाही; मात्र हे परिपत्रक काढण्याची ज्यांची कल्पना आहे, त्यांच्या बुद्धीची कीव केल्यावाचून रहावत नाही. आपल्या देशात देशद्रोही कृत्ये कोण करते आणि खरे देशप्रेमी कोण आहे, याचे वस्तूनिष्ठ अवलोकन केल्यास वरील परिपत्रक अगदीच विरोधाभास निर्माण करणारे आहे, यावर शिक्कामोर्तब होईल !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn