Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

स्वामी स्वरूपानंद सरस्वती (पावस,
जिल्हा  रत्नागिरी) यांची आज पुण्यतिथी
-------
संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी

कुराणानुसार गोमांस खाणे निषिद्ध आणि आरोग्यास हानीकारक !

गुजरातच्या भाजप शासनाकडून राज्यात फलकप्रसिद्धीद्वारे गोहत्याबंदीचा प्रसार
केवळ फलकप्रसिद्धी नको, तर गोहत्याबंदीसाठी ठोस कार्यवाही हवी !
    कर्णावती (अहमदाबाद) - मुसलमान धर्मग्रंथ मानत असलेल्या कुराणनुसार गोमांस (बीफ) खाणे, हे आरोग्यास हानीकारक आहे, असा दावा गुजरात शासनाच्या एका मंडळाने केला असून तसा प्रचार करणारे अनेक फलक राज्यात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. गोसेवा आणि गौचर विकास मंडळाने या फलकांची निर्मिती केली असून  त्यावर गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचेही छायाचित्र छापण्यात आले आहे. या फलकांना मुसलमान समाजाने विरोध दर्शवला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे जनतेला कॅसिनोत जुगार खेळायला देणारे सर्वपक्षीय आसुरी वृत्तीचे राज्यकर्ते, तर कुठे जनतेला सात्त्विक बनवून तिच्या मनात जुगाराचा विचारही येऊ न देणारा राम राजा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.९.२०१५)

म्यानमारमध्ये घुसून भारतीय सैन्याकडून ३ आतंकवादी ठार

अशीच कारवाई करून पाकच्या सीमेतील आतंकवादी अड्डेही उद्ध्वस्त करावे !
    नवी देहली - भारतीय सैन्याने पुन्हा एकदा म्यानमारमध्ये घुसून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले. आसाम रायफलची ११ वी बटालियन आणि ६ डोगरा रेजिमेंट यांच्या सैनिकांनी ५ सप्टेंबर या दिवशी म्यानमार सीमेच्या जवळपास ३ किलोमीटर आत घुसून ही कारवाई केली. ४ जून या दिवशी आतंकवाद्यांनी भारतीय सैन्याच्या ताफ्यावर आक्रमण केले होते. या आक्रमणात १८ सैनिक ठार झाले होते. त्याचा सूड म्हणून भारतीय सैन्याने ८ जूनमध्ये अशाच प्रकारे म्यानमारमध्ये घुसून अनेक आतंकवाद्यांना ठार केले होते.

आश्‍वासने न पाळण्यात जागतिक विक्रम केलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणतात, मोदींनी त्यांची आश्‍वासने पाळली नाहीत !

    नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेली बहुतांश आश्‍वासने म्हणजे तोंडाची वाफ होती, अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

गांधी हत्येची धारिका पुन्हा उघडावी !

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी
    नवी देहली - गांधीजींच्या हत्येनंतर त्यांच्या शरीरावर ४ गोळ्या झाडल्याच्या खुणा होत्या, असे रॉयटर आणि न्यू यॉर्क टाईम्स या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये दिसत असतांना त्यांच्या खटल्यात केवळ ३ गोळ्यांचाच उल्लेख का ? असा प्रश्‍न डॉ. स्वामी यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून उपस्थित केला, तसेच त्याकाळी केवळ इंग्रजांकडेच इटालियन बनावटीच्या बंदुका असतांना पं. नथुराम गोडसे यांच्याकडे ती बंदुक कशी आली ? याचा शोध का घेतला गेला नाही ? असाही प्रश्‍न भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी विचारला असून गांधी यांच्या हत्येच्या खटल्याची धारिका पुन्हा उघडण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कामाशिवाय परदेशात थांबणार्‍या अधिकार्‍यांना गमवावी लागेल नोकरी !

केंद्रशासनाकडून सनदी अधिकार्‍यांच्या संदर्भात नवीन नियमावली
     केवळ अधिकार्‍यांसाठीच नाही, तर मंत्र्यांच्याही परदेश दौर्‍यांसाठी नियमावली आणि कठोर शिक्षापद्धत हवी. अशा दौर्‍यांची फलनिष्पत्ती काय, हेही जनतेला समजले पाहीजे !
    नवी देहली - पूर्वपरवानगीशिवाय सुटी लांबवणार्‍या किंवा कामानंतर एक मासापेक्षा अधिक काळ परदेशांत थांबणार्‍या आयएएस् किंवा आयपीएस् दर्जाच्या सनदी अधिकार्‍यांच्या संदर्भात केंद्रशासनाने नवी नियमावली सिद्ध केली आहे. त्यानुसार नियमभंग केल्यावरून या अधिकार्‍यांना नोकरी गमावण्याचीही पाळी येऊ शकते. (देश संकटात असतांना अशा प्रकारे शासकीय नियमांना धाब्यावर बसवून मनमानी वागणार्‍या अधिकार्‍यांबरोबरच मंत्र्यांच्याही विरोधात कडक धोरण अवलंबल्याशिवाय देशाच्या विकासाचा विचार करणे, म्हणजे शुद्ध फसवणूक आहे ! - संपादक)

भारतात मंदिरांना लक्ष्य करण्याचे आतंकवाद्यांचे षड्यंत्र

     यातून जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो,  हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतंकवादाला धर्म नसतो, अशी ओरड करणार्‍या तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
    नवी देहली - लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी भारतातील प्रमुख मंदिरांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र रचत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थांना आतंकवाद्यांच्या  दूरध्वनी मुद्रणातून मिळाली आहे. यात विशेषत: उत्तर भारतातील मंदिरांना लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचा डाव आहे. त्यामुळे सर्व सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे.
    सूत्रांनुसार आतंकवादी हाफीज सईद याने नुकताच वाघा सीमेनजिक दौरा केल्याचे आढळून आले आहे. सईद मागील काही दिवसांपासून पाकच्या पंजाब प्रांतात फिरून जमात उद दावा आणि लष्कर-ए-तोयबा यांसाठी पैसा गोळा करत आहे.

देहली येथे होणारा शान-ए-पाकिस्तान हा कार्यक्रम रहित करा ! - नाशिक येथील हिंदुत्ववाद्यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नाशिक जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी काकूस्ते यांना
निवेदन देतांना श्री. प्रशांत वलझाडे, श्री. शिवाजी उगले,
श्री. मनोहर जाधव, श्री. शशीधर जोशी आणि श्री. गणेश चौधरी
    नाशिक, ८ सप्टेंबर (वार्ता.) - भारतात सतत अशांतता पसरवून निरपराध नागरिकांचे बळी घेणार्‍या पाकचा शान-ए-पाकिस्तान हा कार्यक्रम रहित करावा, अशी मागणी नाशिक येथील हिंदुत्ववाद्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. भारत निर्यात महासंघ  आणि बराती पाकिस्तान (कराची वाणिज्य महासंघाचे सदस्य) यांच्या संयुक्त विद्यमाने  तीन दिवसांचा देहलीतील द ग्रँड हॉटेल, वसंत कुंज येथे १० ते १२ सप्टेंबर या काळात शान-ए-पाकिस्तान आणि एक शाम पाकिस्तान के नाम हे कार्यक्रम होणार आहेत. या विरोधात देशभरातील राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
    हिंदुत्ववाद्यांच्या एका शिष्टमंडळाने याविषयीचे एक निवेदन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना सादर केले.

सिरियाचा अखेरचा तेलप्रकल्प आय.एस्.आय.एस्.च्या कह्यात

    लंडन - सिरिया शासनाच्या नियंत्रणात असलेला जझल हा अखेरचा तेलप्रकल्पही आय.एस्.आय.एस्.च्या जिहादी आतंकवाद्यांनी कह्यात घेतला, अशी माहिती ब्रिटनमधील एका मानवाधिकार संघटनेने दिली आहे. सिरियाच्या सैन्याचा पाडाव करून या तेल प्रकल्पावर आय.एस्.आय.एस्.ने नियंत्रण मिळविले आहे.

ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ आणि ह.भ.प. रामेश्‍वरशास्त्री महाराज यांची प्रदर्शनास भेट

डावीकडून श्री. सुनील घनवट, ह.भ.प. प्रकाश महाराजजवंजाळ आणि
ह.भ.प. रामेश्‍वरशास्त्री महाराजमहाराज यांना सनातनच्या ग्रंथांविषयी माहिती देतांना
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावतीने
सिंहस्थपर्व, नाशिक येथे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी प्रदर्शन

    नाशिक, ८ सप्टेंबर (वार्ता.)  ७ सप्टेंबर या दिवशी येथील काळाराम मंदिराजवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनास महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ आणि वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वरशास्त्री महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी मोठ्या उत्साहाने प्रदर्शनाची माहिती जाणून घेतली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ आणि ह.भ.प. रामेश्‍वरशास्त्री महाराज यांचा सन्मान केला. या वेळी झालेल्या चर्चेच्या वेळी ह.भ.प. रामेश्‍वरशास्त्री महाराज म्हणाले, धर्माशिवाय जगात कोणतीच गोष्ट चालू शकत नाही; मात्र राजकीय लोकांना वाटते की, आमच्यामुळे सर्व समाजाचे कार्य चालते. हा त्यांचा भ्रम आहे.

फेसबूकने बंद केलेले हिंदु जनजागृती समितीचे फेसबूक पान (हिंदी) पूर्ववत चालू

   मुंबई, ८ सप्टेंबर (वार्ता.) - दिनांक ४ सप्टेंबर २०१५ रोजी फेसबूकने अचानक बंद केलेले हिंदु जनजागृती समितीचे फेसबूक पान (facebook.com/hjshindi) दिनांक ८ सप्टेंबर २०१५ या दिवशी पूर्ववत कार्यरत झाले. समितीच्या फेसबूक पानावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा कांगावा करत फेसबूकने हे पान बंद केले होते. त्यानंतर समितीने यासंदर्भात आवश्यक ती प्रक्रिया करून फेसबूकला त्यांच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. त्यानुसार फेसूबकने समितीला पान पूर्ववत चालू केल्याचे संपत्र पाठवले.

प्रदर्शनाचे आयोजक नसल्याचे सांगून हिंदुत्ववाद्यांचे निवेदन घेण्यास टाळाटाळ

भारत निर्यात महासंघाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा खोटारडेपणा
    नवी देहली - ११ आणि १२ सप्टेंबर या कालावधीत देहलीतील द ग्रँड हॉटेल येथे शान-ए-पाकिस्तान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. भारत निर्यात महासंघ आणि बराती पाकिस्तान (कराची चेम्बर्स ऑफ कॉमर्स) हे या प्रदर्शनाचे आयोजक आहेत. शत्रूराष्ट्र पाकसमवेतचे हे प्रदर्शन रहित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भारत निर्यात महासंघाच्या वरिष्ठ अधिकार्‍याशी भेट घेतली असता आपण कार्यक्रमाचे आयोजकच नसल्याचे खोटे सांगत त्यांनी निवेदन घेण्यासच टाळाटाळ केली. (प्रसारमाध्यमांतून या प्रदर्शनासंबंधातील विज्ञापन प्रसिद्ध झाले आहे. त्यात भारत निर्यात महासंघ आणि बराती पाकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित होत असल्याचे स्पष्ट झाले असतांना भारत निर्यात महासंघाच्या अधिकार्‍याने दिलेले खोटारडेपणाचे उत्तर त्यांच्यातील दायित्वशून्यताच दर्शवते. अशा अधिकार्‍यांवर शासनाने कठोर कारवाई करायला हवी ! - संपादक)

पीडीपी-भाजप शासनाने श्री वैष्णोदेवी यात्रेसाठीच्या हेलिकॉप्टर प्रवासावर कर लादला !

हिंदूंनो, जम्मू-काश्मीर शासनाचा हा हिंदुद्रोह लक्षात ठेवा ! 
यास पीडीपीशी संधान साधणारा भाजप अधिक प्रमाणात उत्तरदायी 
आहे. हिंदूंचा विश्‍वासघात करणारा भाजप कधीतरी हिंदुहित साधेल का ? 
     
श्री वैष्णोदेवी मंदिर 
     श्रीनगर -
जम्मू-काश्मीरमधील पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि भाजप यांच्या युती शासनाने श्री वैष्णोदेवीच्या यात्रेसाठीच्या हेलिकॉप्टरच्या प्रवासावर १२.५ टक्के सेवा कर लादला आहे. यामुळे प्रवासभाड्यात वाढ झाल्याने भाविकांना फटका बसला आहे. काँग्रेसने जिझिया कर ठरवत याला विरोध केला आहे. राज्यातील शासनामध्ये सहभागी असलेल्या भाजपनेही याला विरोध करत कर मागे घेण्याची मागणी केली आहे. (हा निर्णय भाजपला ज्ञात नव्हता का ? युती असूनही पीडीपीची एकाधिकारशाही चालत असेल, तर त्यच्याशी युती करून भाजपने काय साध्य केले ? - संपादक)

काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून देहलीतील पुष्टा मार्गाचे हेतूपुरस्सर 'औरंगजेब मार्ग' असे नामकरण !

धर्मांधांचा भरणा असलेली काँग्रेस राष्ट्रहित काय साधणार ? 
असिफ खान यांनी उभारलेला फलक
औरंगजेब मार्गाचे नामकरण केल्याचा सूड उगवण्यासाठी केलेले कुकृत्य ! 
     नवी देहली - येथील 'औरंगजेब मार्गा'ला माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे पोटशूळ उठल्याने काँग्रेसचे माजी आमदार असिफ महंमद खान यांनी कालिंदी कुंज ते जामियानगरला जोडणार्‍या राजधानीतील ओखला येथील मार्गाला 'औरंगजेब मार्ग' असे नाव दिले. या रस्त्याला 'पुष्टा मार्ग' म्हणून ओळखले जाते. या रस्त्यावर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील 'औरंगजेब मार्ग'  हे नाव दर्शवणारा फलक लावण्यात आला आहे. "औरंगजेब हा कोणी महान व्यक्ती होता किंवा डॉ. कलाम हे महान व्यक्ती नव्हते असे माझे म्हणणे नाही; परंतु औरंगजेब हा आपल्या इतिहासाचा एक भाग आहे आणि आपण हे सत्य पालटू शकत नाही. (इतिहासाचा भाग आहे; म्हणून क्रूर मुसलमान आक्रमणकर्त्याचे नाव मार्गांना ठेवायचे का ? स्वतःची धर्मांधता लपवण्यासाठी काँग्रेसच्या मुसलमान नेत्याचा हा अश्‍लाघ्य प्रयत्न आहे ! - संपादक) भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा मार्गांची नावे पालटून हिंदुत्ववादी विचारसरणी पसरवण्याचा हा प्रयत्न आहे" , असे असिफ खान यांनी म्हटले आहे. 

चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांच्या मातोश्री श्रीमती जानकी राधाकृष्णन् आजी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

श्रीमती जानकी राधाकृष्णन् आजी यांचा भगवान श्रीकृष्णाची
प्रतिमा देऊन सत्कार करतांना सनातन संस्थेच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन्
     चेन्नई - सनातन संस्थेच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांच्या मातोश्री श्रीमती जानकी राधाकृष्णन् आजी (वय ७४ वर्षे) यांनी भाव आणि तळमळ या गुणांच्या आधारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे जन्माष्टमीच्या सत्संगात घोषित करण्यात आले. श्रीकृष्ण जन्माष्टमीला मिळालेल्या ह्या आनंदमय वार्तेने आजींच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे भावाश्रू वाहू लागले आणि त्यांच्यासह सर्व उपस्थिताचीही भावजागृती झाली. त्यानंतर श्रीमती राधाकृष्णन् आजी यांचा ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन् यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सनातनच्या साधकांसह आजींचे पुत्र, स्नुषा, जावई, नात उपस्थित होते.

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांचे संतापजनक विधान (म्हणे) श्री एकवीरादेवीचे मी सर्व काही बिघडवू शकतो !

हिंदूंनो, तुमच्या देवतांच्या संदर्भात अशी हीन विधाने करणार्‍यांना आयुक्त पदावरून हटवा !
      अमरावती - येथील आराध्यदैवत श्री अंबादेव आणि श्री एकवीरादेवी यांच्या जागेचे मी मोजमाप केले. त्यांनी माझे काय बिघडवले ? परंतु मी देवीचे सर्व काही बिघडवू शकतो, असे वादग्रस्त विधान येथील महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एका बैठकीत केले. (अशी विधाने करून आयुक्त देवतांची अवकृपाच ओढवून घेत आहेत ! - संपादक) यामुळे उपस्थित भाविक आणि कर्मचारी संतप्त झाले. स्वच्छ भारत अभियान या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय देण्याच्या अनुषंगाने आयुक्त गुडेवार यांनी बैठक आयोजित केली होती.
     ते अनेकदा हिंदु देवी-देवतांविषयी अयोग्य वक्तव्ये करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर योग्य कायदेशीर कार्यवाही करावी, अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. काही हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार आहेत. (हिंदूंनो, केवळ निवेदन देऊन थांबू नका, तर अशांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी पोलिसांचा पाठपुरावा घ्या ! - संपादक)

धर्मनिरपेक्ष शब्दावर विश्‍वास नाही ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी ७ सप्टेंबर २०१५ या दिवशी नाशिक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि नेपाळमध्ये हिंदूसंघटनाचे कार्य करणारे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नाला दिलेली उत्तरे देत आहोत.
प्रश्‍न : तुम्ही नेपाळला हिंदु राष्ट्र होण्यासाठी मागणी करत आहात. तुमचा राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष या तत्त्वप्रणालीवर विश्‍वास नाही का ?
उत्तर : ज्या वेळी राज्यघटना सिद्ध झाली, त्या वेळी धर्मनिरपेक्ष शब्द कुठेही नव्हता. वर्ष १९७५ मध्ये देशात लोकशाहीची हत्या करून जनतेवर आणीबाणी लादल्यावर हा शब्द राज्यघटनेत घुसडण्यात आला आहे. धर्मनिरपेक्ष शब्दाला अर्थ नाही. मुळात या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झालेली आहे. मुसलमानांना पाकिस्तान आणि हिंदूंना हिंदुस्थान मिळालेला आहे. त्या वेळी हिंदुस्थानची राज्यघटना सिद्ध करतांना त्यात धर्मनिरपेक्ष शब्द नव्हता.

आसाममध्ये अतीवृष्टीचा २१ जिल्ह्यांतील १८ लाखांहून अधिक लोकांना फटका

३० शेतकर्‍यांच्या आत्महत्या 
 शेतकर्‍यांच्या आत्महत्या संपणार कधी ? 
     गौहत्ती (आसाम) - आसाममध्ये २२ ऑगस्टपासून चालू असलेल्या अतीवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून या पुरामुळे राज्याच्या २१ जिल्ह्यांतील १८ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे, तर ६१ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या पुरामुळे येथील १ लक्ष ४५ सहस्र हेक्टर भूमी पाण्याखाली गेली असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरीही आत्महत्या करत आहेत. आतापर्यंत आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या ३० झाली आहे. 

(म्हणे) 'भगतसिंह हे आतंकवादी !'

अकाली दलाचे नेते सिमरनजीतसिंह मान यांचा क्रांतीकारकांविषयी द्वेष ! 
     चंदीगड - चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला हुतात्मा क्रांतीकारक भगतसिंह यांचे नावे देण्याच्या संदर्भात हरियाणा आणि पंजाब शासनामध्ये वाद निर्माण झाला आहे. अकाली दलाचे अमृतसर विभागाचे अध्यक्ष सिमरनजीतसिंह मान यांनी या विमानतळाला भगतसिंह यांचे नाव देण्यास विरोध करतांना 'भगतसिंह हे हुतात्मा किंवा राष्ट्रीय हिरो नाहीत. ते एक आतंकवादी आहेत. यासाठी आमचा चंदीगड विमानातळाचे नाव शहीद-ए-आजम सरदार भगतसिंह विमानतळ असे ठेवण्यास विरोध आहे', असे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. (हिंदूंनो, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलीदान देणारे क्रांतीकारक भगतसिंह यांना आतंकवादी म्हणून संबोधणे, हा केवळ क्रांतीकारकांचाच नव्हे, तर देशाचाही अवमान आहे. अशांना ते भेटतील तेथे खडसवा ! - संपादक) त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा विवाद निर्माण झाला आहे. 

हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे लेखन थांबवले !

स्तंभलेखनातून श्रीरामावर धर्मद्रोही टीका केल्याचे
 प्रकरण आज धर्माभिमान्यांनी केवळ दूरध्वनी करून तीव्र प्रतिक्रिया 
व्यक्त केल्या, उद्या याचा उद्रेक झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ? 
     कोची (केरळ) - मल्याळम् दैनिक 'मातृभूमी' या वृत्तपत्रात एम्. एम्. बशीर नावाच्या एका टीकात्मक लेख लिहणार्‍या लेखकाने ऑगस्ट मासात रामायणावर स्तंभलेखन केले होते. या लेखाद्वारे श्रीरामाचे मानवीकरण करून त्याच्या कृती कशा अयोग्य होत्या, हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. या विरोेधात अनेक धर्माभिमान्यांनी या लेखाच्या विरुद्ध दूरध्वनीवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे बशी याला हे स्तंभलेखन बंद करणे भाग पडले. 

छत्तीसगड मंडपाच्या वतीने उत्साहात गंगापूजन आणि गोरक्षा यात्रा; सनातन संस्थेचाही सहभाग

     
गोरक्षा यात्रेत सहभागी संत आणि अन्य
     नाशिक, ८ सप्टेंबर (वार्ता.) - छत्तीसगड मंडपाच्या वतीने सुरभी महायज्ञानिमित्त ८ सप्टेंबरला सकाळी १० वाजता गंगापूजन आणि गोरक्षा यात्रा काढण्यात आली. यामध्ये पारंपरिक वेश परिधान केलेल्या स्त्रियांनी डोक्यावर कलश घेतले होते. या निमित्ताने भक्तांनी भगवा ध्वज फेरीही काढली. या फेरीत गोहत्या बंदी झालीच पाहिजे, वन्दे मातरम् अशा घोषणांनी नाशिकचा परिसर दणाणून सोडला. या यात्रेत सनातन संस्थेच्या साधिका डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सनातन संस्था पुणे न्यासाच्या वतीने दंतचिकित्सा शिबीर

साधकांची दंतचिकित्सा करतांना दंतवैद्यांचे पथक
       देवद (पनवेल), ८ सप्टेंबर - येथील सनातनच्या आश्रमात ५ आणि ६ सप्टेंबर या दिवशी सनातन संस्था पुणे न्यासाच्या वतीने दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, कोल्हापूर (वारणानगर) येथील मुख्याध्यापक दंतवैद्य हरीश कुलकर्णी आणि अन्य दंतवैद्य रजनी कुलकर्णी, सूर्यकांत मेटकरी, किशोर चौगुले, राघवेंद्र, प्रशांत जाधव, ज्योती बिरादर, चेतन सुगंधी या दंतवैद्यांच्या पथकाने आश्रमातील साधकांच्या दातांची तपासणी केली. आश्रमातील १५० साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या कालावधीत आश्रमातील साधिका सौ. कोमल जोशी यांनी दंतवैद्यांच्या पथकाला आश्रमातील सेवांविषयीही अवगत केले.

पुणे येथे शिक्षणसंस्थांमध्ये दहीहंडीनिमित्त चित्रपटातील गाण्यांवर थिरकण्याचे प्रकार

हिंदूंच्या सण-उत्सवांना आलेले आेंगळवाणे स्वरूप पालटण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !
      पुणे - येथील एका नावाजलेल्या शिक्षणसंस्थेत दहीहंडी उत्सवाच्या वेळीही ध्वनीक्षेपकांच्या भिंती उभ्या करून त्यावर चित्रपटातील गाणी लावण्यात आल्याचे आढळून आले होते. अनेक युवकही गाण्यांवर अक्षरशः बेभान होऊन थिरकत होते. बांधण्यात आलेल्या दहीहंडीच्या खालीच महाविद्यालयातील विद्यार्थिनी चित्रपटातील गाण्यांवर नाचत होत्या. त्यातच एकमेकांवर पाण्याच्या बाटल्यांमधील पाणी उडवण्याचे प्रकारही चालू होेते. ज्या शिक्षणसंस्थांमधून खरेतर सुजाण, सुसंस्कृत विद्यार्थी बाहेर पडायला हवेत, त्याच शिक्षणसंस्थांमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली हिंदूंच्या उत्सवांना बाजारी स्वरूप आणले जात आहे. धर्मशिक्षणाची अपरिहार्यता स्पष्ट करायला अजून कोणता पुरावा हवा ? आतातरी हिंदूंनी जागृत होऊन सण-उत्सव यांचे पावित्र्य भंग होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

नेपाळ येथे हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी चालू असलेल्या उपोषणाला आठ दिवस पूर्ण

आंदोलनकर्त्यांची स्थिती नाजूक 
     काठमांडू - नेपाळला हिंदु राष्ट्र म्हणून पुन्हा घोषित करावे, या मागणीसाठी ३१ ऑगस्टपासून येथे राष्ट्रीय हिंदु युवा मंचच्या ४ प्रखर हिंदुत्ववादी युवकांनी आमरण उपोषण आरंभले. या उपोषणाला ८ दिवस पूर्ण झाले. हिंदु राष्ट्राच्या मागणीसोबतच धर्मांतर आणि गोहत्या यांवर बंदी घालण्यात यावी, हीसुद्धा मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलकांपैकी वयाने सर्वांत लहान असणारे श्री. कमलप्रसाद जोशी (वय २० वर्षे) यांची प्रकृती दिवसेंदिवस नाजूक होत आहे. अन्य तिघांची प्रकतीही खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीची प्रतिदिन तपासणी करण्यात येत आहे. नेपाळ शासन या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. काही अनुचित घटना घडल्यास त्याला सर्वस्वी पंतप्रधान सुशील कोयराला हे उत्तरदायी असतील, असे येथील हिंदूंचे म्हणणे आहे. 

जर्मनीत सहस्रो विस्थापित मुसलमानांचा ख्रिस्ती धर्मात प्रवेश !

परराष्ट्रातील मुसलमानांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, 
तर चालतो; मात्र भारतातील मुसलमानांनी हिंदु धर्मात प्रवेश
केल्यास इस्लाम धर्म संकटात असल्याचा कांगावा केला जातो ! 
     बर्लिन (जर्मनी) - सिरिया, इराक, अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान या अशांत देशांतील युद्धजन्य परिस्थितीला कंटाळून आणि विस्थापित होऊन लक्षावधी मुसलमान युरोपच्या दिशेने येत असून यांतील बहुतेक जण रोजगार आणि सुरक्षितता शोधण्यासाठी जर्मनीच्या आश्रयाला जात आहेत. यांतील बहुतेक जर्मनीत कायमचा आश्रय मिळेल, या अपेक्षेने ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित होत आहेत. 

आतंकवाद्यांचे आर्थिक साहाय्य रोखण्याच्या उद्देशाने पाकने गोठवली २०० हून अधिक मदरशांची बँक खाती

भारतात मदरशांना विविध सुविधा 
पुरवणार्‍या भाजप शासनाला याविषयी काय म्हणायचे आहे ? 
     इस्लामाबाद - पाकिस्तानने २०० पेक्षा अधिक मदरशांची बँक खाती गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने आतंकवाद्यांचे आर्थिक साहाय्य रोखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. हा निर्णय राष्ट्रीय कृती योजनेचा एक भाग आहे. पेशावरमधील शाळेवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर त्यांचे निधी व्यवस्थापक आणि साहाय्य करणारे यांच्या विरोधात कारवाईसाठी या वर्षाच्या प्रारंभी ही योजना आखण्यात आली होती. शाळेवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात १५० पेक्षा अधिक जण मारले गेले होते. मरणार्‍यांमध्ये बहुतेक शालेय मुले होती. बँक ऑफ पाकिस्तानच्या निर्देशावर बँकांनी मागील आठवड्यात नोंदणीकृत नसलेल्या मदरशांच्या २०० पेक्षा अधिक खात्यांतील देवाणघेवाणीवर बंदी घातली आहे. धार्मिक विषयक मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या नव्या व्यवस्थेच्या अंतर्गत जोपर्यंत मदरसे आपली नोंदणी करत नाहीत, तोपर्यंत सर्व बँकांनी त्यांची नवी खाती उघडणे बंद केले आहे.

कृत्रिम तलाव वा गणेशमूर्तीदान नको; गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलात विसर्जन व्हावे ! - मुख्याधिकार्‍यांना निवेदन

मुख्याधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते
    गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), ८ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सव कालावधीत कृत्रिम तलाव वा गणेशमूर्तीदान नको; गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलात विसर्जन व्हावे, या मागणीसाठी २ सप्टेंबर या दिवशी गडहिंग्लज येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. तानाजी नरळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. सागर कुराडे, श्रीशिवप्रतिष्ठानचे मनोज पोवार, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद धनवडे, किरण आजगेकर, अरुणा पेडणेकर उपस्थित होते. याच मागणीसाठी पलूस (जिल्हा सांगली) येथे तहसीलदार श्री. मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री रवींद्र यादव, गणेश मानुगडे, आेंकार पाटील, रोहित माने, आनंदराव साळुंखे, चेतन गायकवाड, संतोष पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शशिकांत जोशी, गणेश बुचडे, रवी कुंभार यांसह अन्य उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात वीज खंडित होणे थांबवावे !

ऊर्जामंत्री बावनकुळे (मध्यभागी) यांच्याशी बोलतांना डॉ. पाटील (पाठमोरे)
हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थापन
झालेल्या गणेशोत्सव महामंडळाचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन
    नंदुरबार - कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणारे छेडछाडीचे प्रकार घडू नयेत म्हणून गणेशोत्सव काळातील भारनियमन थांबवावे, तसेच वीज खंडित होण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने ४ सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.

तथाकथित आध्यात्मिक गुरु राधे मां सेक्स रॅकेट चालवत असल्याची तक्रार

      मुंबई - मॉडेल आणि अभिनेत्री आर्शी खान यांनी राधे मां यांनी मला वाईट धंद्यात ओढण्यासाठी प्रयत्न केला, अशी तक्रार केली आहे. राधे मां सेक्स रॅकेट चालवत असून तिने मला त्यात ढकलण्याचा प्रयत्न केला होता, असा आर्शी खान यांचा आरोप आहे. यापूर्वी डॉली बिंद्रा यांनी अशा प्रकारचे आरोप राधे मां यांच्यावर केले होते. आर्शी खान यांनी तिला अनेकदा दूरभाषवरून धमकी दिली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारीया यांची अचानक बदली !

जावेद अहमद नवे पोलीस आयुक्त !
      मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांची अचानक बदली करण्यात येऊन जावेद अहमद यांना मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. राकेश मारीया यांना बढती मिळाली असून ते होमगार्डचे पोलीस महासंचालक झाले आहेत.
      शीना बोरा हत्या प्रकरणी राकेश मारीया जातीने रात्रंदिवस स्वतःत कसून चौकशी करत होते. यापुढेही तेच या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

जम्मू-काश्मीर शासनाचा हिंदुद्रोह लक्षात घ्या !
    जम्मू-काश्मीर शासनाने श्री वैष्णोदेवीच्या यात्रेसाठीच्या हेलिकॉप्टरच्या प्रवासावर १२.५ टक्के सेवा कर लादला आहे. यामुळे प्रवासभाड्यात वाढ झाल्याने भाविकांना फटका सहन करावा लागत आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Helicoptarse ki Janewali Shri Vaishnodevi yatrapar Jammu-Kashmir Shasan ka kar.
- Bahusankhya Hinduoke deshme Hinduoparhi anyay kyo ?
जागो ! 
    हेलिकॉप्टरसे की जानेवाली श्री वैष्णोदेवी यात्रापर जम्मू-कश्मीर शासनका कर.
- बहुसंख्य हिंदुआेंके देशमे हिंदूआेंपरही अन्याय क्यो ?

चाकण- तळेगाव (पुणे) रस्त्यावर अपघातग्रस्त वाहनातून ६०० किलोहून अधिक गोमांस शासनाधीन

अपघातानंतर झुडपामध्ये पडलेले गायीचे शीर   
(हे चित्र प्रसिद्ध करण्यामागे कोणाच्याही धार्मिक भावना
दुखवण्याचा हेतू नाही. केवळ वाचकांच्या माहितीसाठी ते देत आहोत. - संपादक) 
 आणखी किती घटना उघडकीला आल्यावर भाजप शासन गोवंशहत्या
बंदी कायद्याची अंमलबजावणी करणार आहे ? गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
      पुणे, ८ सप्टेंबर - चाकण-तळेगाव रस्त्यावर खेडमधील खालुंब्रे येथे ६ सप्टेंबर या दिवशी एका वाहनाचा अपघात झाला असून त्यामध्ये ६२० किलो गोमांस आढळले आहे. या वाहनातील धर्मांध वसीम शेख आणि झाकीर पठाण (रा. मुंबई) हे दोघे घायाळ झाले आहेत. (अल्पसंख्यांक धर्मांध गोवंश हत्येच्या गुन्हेगारीत मात्र पुढे ! - संपादक) पोलिसांनी त्या दोघांची रुग्णालयात चौकशी चालू केली असून सर्व गोमांस शासनाधीन केल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत गणेशोत्सव-पितृपक्ष विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १३ सप्टेंबर
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ सप्टेंबरच्या
दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

एवढ्या मोठ्या फलकावर लहान अक्षरे कशाला ? अक्षरे लहान चालत असतील, तर फलक मोठा कशाला ? शासन मोठ्या फलकावर पैसेे का उधळते ?

    नवी देहली येथील औरंगजेब मार्गाचे नामांतर होऊन अखेर या मार्गाला दिवंगत माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले.

अशी नाटिका पोलीस स्वत:हून बंद का पाडत नाहीत ? उघड होणारे गुन्हे पोलिसांच्या लक्षात कसे येत नाहीत ? अशा पोलिसांना निलंबित करा !

     रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची अनुमती नसणे, संत तुकाराम महाराज यांचा खून झाला आहे, यांसह अनेक गोष्टींचे खोटे चित्र उभे करणे, कार्यक्रमास अनुमती नसणे, अशा अनेक नियमबाह्य गोष्टी असल्याने इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात होणार्‍या सॉक्रेटिस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम या नाटिकेस हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी यांनी संघटितपणे विरोध केला. या विरोधामुळे पोलीस प्रशासनास ही नाटिका रहित करणे भाग पाडले.

संतांवर टीका करणारे बुद्धीप्रामाण्यवादी अन् अंनिसवाले आणि संतांवर अत्याचार करणारे पोलीस !

आजच्या हिंदु समाजाला धर्मशिक्षणच नसल्यामुळे साधू-संतांचे 
महत्त्वही कळत नाही. त्यांच्यासाठी हे विशेष सदर !
शिष्याला साधनेविषयी मार्गदर्शन
१ आ. अध्यात्माचा अभ्यास आणि साधना नसतांना अध्यात्म विषयावर पंडित असल्याचा आव आणून बोलणारे आणि साधू-संतांबद्दल टीका करणारे बुद्धीप्रामाण्यवादी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले हास्यास्पद ठरतात ! : एखाद्या आधुनिक वैद्याने दुसरा आधुनिक वैद्य चांगला नाही, असे सांगितले, तर त्याला काहीतरी महत्त्व असते. तसेच अभियंता, अधिवक्ता, लेखा परिक्षक इत्यादींनी त्यांच्या क्षेत्रांतील व्यक्तींबद्दल मत व्यक्त केले, तर त्याला काहीतरी अर्थ असतो. असे असतांना साधना करून आध्यात्मिक स्तरावर न पोहोचलेले बुद्धीप्रामाण्यवादी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले धर्माबद्दल आणि साधू-संतांबद्दल द्वेष पसरवतात आणि हिंदू ते ऐकतात ! यापेक्षा अधिक मूर्खपणाची गोष्ट असेल का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.७.२०१५)
१ इ. भोंदूगिरीला आळा घालण्यास अस्तित्वात असलेले कायदे सक्षम असून महाराष्ट्रात वेगळा अंधश्रद्धा निर्मूलन करणारा अंनिसचा कायदा आवश्यक नाही, हे अधोरेखित करणारी घटना ! : उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथे आशीर्वाद देण्याच्या नावाखाली विद्यार्थिनींशी अश्‍लील कृत्य करणार्‍या फारुखी नावाच्या एका तांत्रिकाला पोलिसांनी अटक केली. फारुखी तांत्रिक कृतीच्या नावावर जनतेची फसवणूकही करत होता.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या कार्याच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

१. लॉग-इन सुविधा 
१ अ. एस्.एस्.आर्.एफ्. अब्रॉड लॉग-इन सुविधा 
१. या सुविधेच्या अंतर्गत इंग्रजी, जर्मन, सर्बियन, स्पॅनिश आदी ९ भाषांतील वाचकांच्या ४४८ प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली.
२. लॉग-इन सुविधेद्वारे संपर्कात आलेल्या १४ जिज्ञासूंनी नामजपाच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला.
१ आ. एस्.एस्.आर्.एफ्. भारत लॉग-इन सुविधा 
१. या अंतर्गत एकूण ५४४ प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली.
२. १९ नवीन जिज्ञासूंनी नियमितपणे नामजप करायला आरंभ केला असून ते सत्संगालाही नियमितपणे उपस्थित रहातात.
१ इ. इंग्रजीसह अन्य भाषांतील वाचकांना दिलेल्या उत्तरांचा आढावा : एस्.एस्.आर्.एफ्. भारत लॉग-इन सुविधेअंतर्गत एकूण ५४४ प्रश्‍नांना, तर एस्.एस्.आर्.एफ्. अब्रॉड लॉग-इन सुविधेअंर्तगत इंग्रजी आणि अन्य भाषांतील वाचकांच्या ४४८ प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली. ही संख्या एकूण ९९२ इतकी झाली आहे.

भारतीय ऋषींना सहस्रो वर्षांपूर्वी समजलेले पाण्याचे महत्त्व जपानी शास्त्रज्ञांना आता उकलणे, हा विज्ञानाचा थिटेपणा !

   सहस्रो वर्षांपूर्वी हिंदूंच्या धर्मग्रंथांत सांगितलेल्या जलविषयक सूत्राला पूरक असे संशोधन जपानच्या शास्त्रज्ञांनी आता केले आहे. त्यानुसार समाजाच्या एखाद्या क्रियेला जल प्रतिसाद देऊ शकते आणि स्वतःची पसंती दर्शवू शकते, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. या संशोधनामुळे, जल हे सजिवांची निर्मिती करणारे मूळ रसायन आहे, हा भारतीय ऋषींनी अनंत कालापूर्वी मांडलेला सिद्धांत आणि जल अशुद्ध अथवा अपवित्र करू नये, असे सांगून वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे आदी ग्रंथांतून झालेले प्रबोधन, यांना आता वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाण मिळाले आहे.
- डॉ. रा.श्री. मोरवंचीकर, निवृत्त प्राध्यापक (इतिहास), आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर (औरंगाबाद).
(मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २००७)

महिलांना कामात व्यत्यय आणला; म्हणून कारागृहात का टाकले नाही ? एवढेही न कळणार्‍या पोलिसांना निलंबित करा !

    मुंब्रा येथील नूरजहाँ ही सहा मजल्याची अनधिकृत इमारत तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले. इमारतीवर कारवाई करू नये; म्हणून तेथे रहाणार्‍या चाळीस मुसलमान महिलांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे येथे काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर रहिवाशांचा आक्रमक पवित्रा बघून कर्मचार्‍यांना कारवाई न करताच माघारी परतावे लागले.

गायींची पशूवधगृहे चालू ठेवू देणार्‍या राज्यकर्त्यांकडून केवळ देखावा करण्यासाठी आदेश !

    राज्यातील मुलांमध्ये पशूंप्रती दयाभाव निर्माण व्हावा, त्यांच्यात संवेदनशीलता निर्माण व्हावी, यासाठी दयाळू नागरिक कसे बनावे, याविषयीचे शिक्षण देण्याचा आदेश गोवा राज्य शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदेने राज्यातील शिक्षणसंस्थांना परिपत्रकाद्वारे दिला आहे. 

हे करायला भाजपला १ वर्ष का लागले ?

    देशातील अनेक माजी मंत्र्यांसह ३० अतीमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कुटुंबातील ८ सदस्यांचा, तसेच माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचा समावेश आहे.

'फोटो काढणे' या शब्दांमुळे साधक आणि फोटो काढणारा या दोघांमध्ये झालेला गमतीशीर संवाद !

     काही साधक निवेदन देण्यासाठी जातात. तेव्हा निवेदन देतांना छायाचित्र काढले जाते. एकदा फोटो काढणार्‍याने (कॅमेरामनने) एका साधकाला सांगितले, फोटो काढा ! तो साधक म्हणाला, छायाचित्रक (कॅमेरा) तुमच्याकडे आहे, तर तुम्ही फोटो काढा ! त्या वेळी फोटो काढणार्‍याने साधकाला सांगितले, "तुम्ही फोटो काढला, तरच मला फोटो काढता येर्ईल !" त्या साधकाने पुन्हा सांगितले, "अहो, कॅमेरा तुमच्याकडे आहे, तर तुम्हीच फोटो काढा ना !" 
प्रश्‍न : फोटो काढणारा स्वतः फोटो न काढता फोटो काढण्यासाठी आलेल्या साधकालाच फोटो काढा, असे वारंवार का सांगत होता ? 
फोटो काढणारा स्वतः फोटो न काढता फोटो काढण्यासाठी आलेल्या साधकालाच फोटो काढा, असे वारंवार का सांगत होता ? या प्रश्‍नाचे उत्तर
उत्तर : फोटो काढणारा साधकाच्या कपाळावर त्याने लावलेलेे देवतेचे छोटे चित्र काढण्यास सांगत होता, तर साधक निवेदन देतांनाचा फोटो काढा, असे सांगत होता. शेवटी फोटो काढणार्‍याने साधकाजवळ जाऊन त्याच्या कपाळावर असलेले देवतेचे चित्र काढून त्याला दाखवले. तेव्हा फोटो काढा, याचा अर्थ कळला.
- कु. शांता जंगम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०१५)

सत्त्व हरवलेले यांत्रिक उत्सव

    मधुर पाणी असलेला नारळ, ही ईश्‍वराची खरोखरच अप्रतिम निर्मिती ! पण नारळामधील मधुर पाणी आणि ओला नारळ यांकडे दुर्लक्ष होऊन कोणाला करवंटीच महत्त्वाची वाटावी आणि नारळ म्हणजे करवंटीच अशी समजूत होऊन बसावी, तशी स्थिती आज हिंदु समाजाची झाली आहे. ज्या उद्देशाने आणि पद्धतीने सण साजरा केला जावा, त्यातून जो आनंद, चैतन्य अनुभवावे त्याकडे दुर्लक्ष होऊन आज केवळ बाह्य देखावा आणि कर्मकांड यांनाच महत्त्व प्राप्त झाले आहे. खरेतर हिंदूंच्या सर्वच सणांना वरील सूत्र लागू पडतेेे; पण त्यातही अधिक लागू पडते, ते दहीहंडी उत्सवाला !
    नुकताच थरावर थर लावून दहीहंडी उत्सव साजरा झाला; पण त्यात नेहमीप्रमाणे भावभक्तीच्या ओलाव्याचा अभावच दिसला. सर्व ठिकाणी गोविंदाच्या गाण्यांवर नाचत थरावर थर रचण्यात आले. काही ठिकाणी कथित समानतेचा नारा देत महिला गोविंदांनीही दहीहंडी फोडली; पण या सगळ्या धामधुमीत भगवान श्रीकृष्णाचे स्मरण, अनुसंधान याचा लवलेशही अनुभवायला मिळाला नाही.

हिंदु महिलांनो, विदेशी महिलांकडून शिका !

     नाशिक येथे सिंहस्थपर्वानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी काही विदेशी महिला आल्या होत्या. एखाद्या कृतीची शास्त्रीय माहिती सांगितल्यावर त्या लगेच ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करत होत्या. 
१. पुरुष जसा टिळा लावतात, त्याप्रमाणे विदेशी महिला उभे कुंकू लावून आल्या होत्या. त्यांना कुंकू लावण्याचे महत्त्व आणि ते लावण्याची योग्य पद्धत यांची माहिती सांगितल्यावर ती त्यांना पटली आणि त्यांनी लगेच उभे कुंकू पुसून गोल कुंकू लावले. 
२. भारतीय संस्कृतीनुसार वाढदिवस साजरा करण्याचे महत्त्व सांगितल्यावर हे शास्त्र आम्हाला ठाऊक नव्हते, यापुढे आम्ही वाढदिवस भारतीय संस्कृतीनुसार साजरा करणार, असे त्यांनी सांगितले. 
३. त्यांच्याकडे फक्त १०० रुपये होते (नंतर त्यांना अधिकोषातून पैसे काढायचे होते), तरीसुद्धा त्यांनी सनातनचे प्रकाशन सिंहस्थपर्वाचे महत्त्व हा ग्रंथ विकत घेतला. त्यांनी सांगितले की, आम्ही उद्या परत जाणार आहोत. आम्हाला सिंहस्थपर्वाचे महत्त्व ठाऊक नाही. किमान जातांना हा ग्रंथ वाचून तरी सिंहस्थपर्वाचे महत्त्व आम्हाला कळेल.
- (पू.) कु. स्वाती खाडये, प्रसारसेविका, सनातन संस्था 
      हिंदुत्वाला पालवी फुटण्यापेक्षा फाटे फोडण्यात येत आहेत; कारण तथाकथित हिंदुत्ववादी बुद्धीभ्रम निर्माण करत आहेत. - प्रा. सुधाकर देशपांडे (संदर्भ : प्रज्वलंत, हुतात्मा भगतसिंग पुण्यतिथी विशेषांक, मार्च २००२)

काँग्रेस आणि भाजप शासनामध्ये भेद नाही. अल्पसंख्यांकांना दिलेल्या पैशातून जिहादी पोसले जाणार नाहीत, तर देशभक्त पोसले जातील, याची खात्री भाजप शासन देणार का ?

     अल्पसंख्यांकांसाठी असलेली आर्थिक तरतूद दुप्पट करण्याचा निर्णय १०.२.२०१५ या दिवशी केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला. राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास आणि वित्त महामंडळासाठी पूर्वी १ सहस्र ५०० कोटी रुपयांची तरतूद होती. ही तरतूद वाढवून ती ३ सहस्र कोटी रुपये करण्यात आली आहे.

हिंदूंनी स्वत:चे रक्षण स्वत:च करायला शिकले पाहिजे !

      अकबरुद्दीन ओवैसी यांच्यासारखे १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना संपवण्याची भाषा करतात; मात्र याविरोधात कुणीही ब्र काढत नाही. हिंदूंनी आक्रमणाचा प्रतिकार केला, तर त्याला जातीय तेढ म्हणतात आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी कोणतेही राजकारणी किंवा पोलीस धावून येत नाहीत. त्यामुळे आपले रक्षण आपणच करायला शिकले पाहिजे.- श्री. प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

कांद्याची दरवाढ आणि शासनाचे हितसंबंध

कांदा खरा कुणाचा ? नाही तो शेतकर्‍यांचा ! आहे तो व्यापार्‍यांचा ! कांदा व्यापार्‍यांचा आहे, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे; पण सगळेजण डोळे मिटून बसले आहेत. महाराष्ट्रात पाऊस कमी झाला असला, तरी कांद्याच्या दरवाढीमुळे अश्रूंचा महापूर मात्र सर्वत्र आला आहे. शासन मात्र या प्रकारावर डोळे मिटून बसले आहे, हे अर्धसत्य आहे. शासन उघड्या डोळ्यांनी व्यापार्‍यांची साठेबाजी आणि नफेखोरी पहात आहे; पण त्याविरुद्ध ते काही करू शकत नाही; कारण जिसकी लाठी उसकी भैंस हे शासनालाही माहीत आहे. शासनसुद्धा याच न्यायाने स्थापन झालेले असते. त्यामुळे जिसका गोडाऊन उसका कांदा हे शासनाच्या दृष्टीनेही क्रमप्राप्तच आहे. तळे राखी तो पाणी चाखी, हे जसे बरोबर आहे, तसे कांदा साठवी, तो लाभ उठवी, हे आलेच. जसे झोपडपट्ट्या आपोआप उगवतात. मग शासन त्याकडे काही वर्षे दुर्लक्ष करते. त्यानंतर बिल्डरलॉबी जेव्हा तिकडे दृष्टी वळवते, तेव्हा शासन आपोआप ती झोपडपट्टी दुसरीकडे स्थलांतर करते; म्हणजे शासन एखाद्याच्या फायद्याच्या आड कधी येत नसते. आधी आपोआप गोष्टी घडू द्यायच्या आणि वेळप्रसंग आले की, त्यांच्याकडे लक्षही आपोआप द्यायचे, ही शासनाची नीती आहे.

सखी तृप्तीसम होता यावे, ही इच्छा आहे स्नेहसखीची ।

कु. स्नेहा झरकर
     हे केशवा, तुझ्या मधुर मधुर अन् सुंदर गोपीविषयी तुझ्या चरणी ही शब्दसुमने अर्पण करत आहे...
जिच्या सहवासाने अंतरात कृतज्ञता जागृत होते ।
तिच्या आगमनाने सर्वकाही आनंदी होऊन जाते ॥ १ ॥ 

जिच्या दृष्टीकोनांनी मनाला अन् प्रयत्नांना उभारी येते ।
तिच्या निखळ आणि निरागस हास्याने मन प्रसन्न होते ॥ २ ॥

जिच्या प.पू. डॉक्टर अन् श्रीकृष्ण यांच्याप्रती असलेल्या भावाने, 
आपल्यातही भावभक्तीचे बीज रोवले जाते ॥ ३ ॥

जिला चुकांची अंतरातून तीव्र जाणीव आणि खंत वाटून,
देवा मला क्षमा कर, असे म्हणून कंठ दाटून रडू येते ॥ ४ ॥

सिंहस्थपर्वस्थळी भावभक्तीच्या हिंदोळ्यावर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा !

६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. तृप्ती गावडे यांचा वाढदिवस साजरा
कु. तृप्ती गावडे हिचे औक्षण करतांना
पू. (कु.) स्वाती खाडये
    नाशिक, ८ सप्टेंबर (वार्ता.) - सिंहस्थपर्वानिमित्त येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या विषयावर भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाच्या कालावधीत अमृतकुंभातून एक थेंब या ठिकाणी पडावा, असा मंगलक्षण ५ सप्टेंबरला रात्री कृष्णजन्माष्टमीस २०० साधकांनी अनुभवला. प्रदर्शनस्थळी श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीनिमित्त भावभक्ती, चैतन्य आणि बासुरीचा सुमधुर निनाद या वातावरणात मंगल सोहळा पार पडला. धर्माचे रक्षण करणार्‍या श्रीकृष्णाचा जन्मसोहळा धर्मजागृती करणार्‍या ठिकाणी होणे, हा भगवंताने एकप्रकारे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीला दिलेला आशीर्वादच होय. 

मेरा भोला-भाला सबसे निराला कृष्णकन्हैया ।

सीधा-साधा, भोला-भाला ।
जगसे निराला है वो ।
मेरा कान्हा है वो ॥ १ ॥

कभी रुलाता है । कभी हंसाता है । 
कभी कुछ सिखाता है । कभी कुछ बताता है ।
मेरा कान्हा है वो, जग से निराला है वो ॥ २ ॥

कु. शांता जंगम यांचा श्री गणपतीशी झालेला संवाद आणि आपत्काळात प.पू. डॉक्टर सतत कसे रक्षण करत आहेत, याच्या संदर्भात आलेल्या भावपूर्ण अनुभूती !

उपायांच्या वेळी श्री गणपतीशी झालेले संभाषण आलेल्या अनुभूती 
कु. शांता जंगम
१. नामजप करतांना श्री गणेशाच्या चरणांना स्पर्श केल्यावर बोटे सजीव आणि मऊ लागणे : १०.११.२०१३ या दिवशी मी ११.३० ते १२.३० या वेळेत ध्यानमंदिरात उपायांना बसले होते. जप करत गणपतीच्या डोळ्यांकडे पहात असतांना माझे हात श्री गणेशाच्या चरणांना स्पर्श करू लागले. तेव्हा गणपतीचे चरण आणि पायांची बोटे हाताला कापसासारखी मऊ लागत होती अन् ती सजीव असल्यासारखी वाटत होती. जवळ जवळ १ - २ वर्षांपासून गणपतीला प्रार्थना केली नव्हती, तसेच त्याच्याशी बोलणेही झाले नव्हते; पण आज नामजप करता करता श्री गणेशाशी पुढील संभाषण झाले. 
२. गणपतीला साबण लावून स्नान घातल्यावर त्याने दोन्ही खांदे हलवत छान छान, असे म्हणणे : मी श्री गणपतीला म्हणाले, मी तुला मनाने स्नान घालणार आहे. चालेल का ? तेव्हा त्याने सांगितले, ठीक आहे. चालेल. मग मी सनातनच्या चंदनाच्या साबणाने त्याला स्नान घालू लागले. गणपति त्याच्या सोंडेने माझ्या अंगावर पाणी उडवत होता. त्या वेळी (आश्रमातील कु. भक्ती मेहता (वय ३ वर्षे) तिला एखादी गोष्ट आवडली, तर दोन्ही खांदे हलवत छान छान, असे म्हणते तसे) तो दोन्ही खांदे हलवत छान छान, असे म्हणत होता.

गुरुधनाचा स्वखर्चासाठी वापर करणारे विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते !

     अर्पणदात्यांनी अर्पण स्वरूपात दिलेले धन स्वखर्चासाठी वापरण्याच्या संदर्भात संस्था स्तरावरील कार्यकर्त्यांकडून झालेल्या अक्षम्य चुका पुढे देत आहे.
साधकांच्या चुका सनातन प्रभातमध्ये छापण्याचा उद्देश 
     मनाच्या नाही, तर निदान जनाच्या लाजेने तरी त्यांनी पुढे चुका टाळाव्यात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.७.२०१५) 
     साधकांना आर्थिक अडचण असल्यास त्यांनी संस्थेचे पैसे न वापरता सहसाधकांकडून घ्यावेत. त्यामुळे संस्थेचे अहवाल योग्य वेळी पूर्ण होतील आणि साधकांची आपसात जवळीकही होईल.

रामनाथी आश्रमात महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी प्रार्थना करतांना श्रीकृष्ण प्रत्यक्ष समोर दिसणे

      चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या कालावधीत मी रामनाथी आश्रमातील भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करत असे. महाप्रसाद घेण्यापूर्वी श्रीकृष्णाला प्रार्थना करतांना मला श्रीकृष्ण प्रत्यक्ष समोर दिसत असे. श्रीकृष्णा, तुझ्या चरणी अनंत कोटी कोटी वेळा कृतज्ञ आहे. - सौ. लीला कदम, वास्को, गोवा. (१७.६.२०१५)

श्रीकृष्णाने दिलेलेच उत्तर प.पू. डॉक्टरांनी दिल्यावर सगुण-निर्गुण एकच आहे, हे लक्षात येणे

      एकदा मी प.पू. डॉक्टरांच्या कक्षात सेवा करत होते. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही श्रीकृष्णाशी बोला ! त्याप्रमाणे मी श्रीकृष्णाशी बोलू लागले. मी सर्वकाही श्रीकृष्णाला विचारत असे. मी एकदा प्रयोग केला. एक गोष्ट आधी श्रीकृष्णाला विचारली आणि नंतर तीच गोष्ट स्थुलातून प.पू. डॉक्टरांना विचारली. तेव्हा एकच उत्तर मिळाले. यातून लक्षात आले की, सगुण-निर्गुण एकच आहे. 
- कु. तृप्ती गावडे, रामनाथी आश्रम, गोवा. (वर्ष २०१२)

सांग ना गं कृष्णाई, कशी झिजू तुझ्यासाठी ?

कु. आरती सुतार
कृष्णाई, कशी गाऊ तुझी अंगाई । 
सांग ना, तुझ्यासाठी झिजू 
कशी ॥ १ ॥

आहेस तू कृष्णाई, सर्वांना सांभाळतेस । 
लेकराच्या एका हाकेला धावूनी तू येतेस ॥ २ ॥ 

आईविना जगणे अती कठीण 
असते । 
कारण तिच्याच आधारे लेकरू पुढे जाते ॥ ३ ॥ 

कृष्णाई तुझा विरह सहन होईना ।
पण या विरहातच आहे खरी परीक्षा ।
हा विरह घडवतो साधकरत्ना ॥ ४ ॥

कु. शांता जंगम यांचा प.पू. डॉक्टरांप्रती असलेला भाव आणि त्यासंदर्भातील प्रसंग !

प.पू. डॉक्टरांना न्याहारीसाठी गोड आणि तिखट असे दोन पदार्थ देणे, त्यांनी आधी गोड खाऊ कि 
तिखट ? असा प्रश्‍न विचारल्यावर उत्तर शोधतांना साधिकेचे झालेले चिंतन !
      ३.२.२०१५ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या सकाळच्या न्याहारीसाठी गोड आणि तिखट असे दोन पदार्थ बनवले होते. ते खातांना त्यांनी कु. माधुरी दुसेला सांगितले, दोन्ही पदार्थ छान झाले आहेत. तेव्हा माधुरी म्हणाली, शांताताईने बनवले आहेत. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, शांताला विचार की, दोन्ही पदार्थ पुष्कळ छान झाले आहेत. आधी गोड खाऊ कि तिखट खाऊ ? नंतर माधुरीने याविषयी मला विचारले. तेव्हा मला काहीच कळेना ! प.पू. डॉक्टरांनी कोडेच घातले आहे, असे मला वाटले; म्हणून मी कृष्णाला विचारले, कृष्णा, याचे उत्तर काय असणार ? तेव्हा कृष्णाने सांगितले, गोड म्हणजे कृष्ण आणि तिखट म्हणजे राधा ! कृष्णाकडे जाण्यासाठी राधा आसुसलेली असते. ती कृष्णाशी एकरूप झालेली असते. तसाच कृष्णही राधेच्या भक्तीमुळे तिच्याशी एकरूप झालेला असतो. तसेच हे गोड आणि तिखट खाणे कृष्ण अन् राधा यांच्यासारखे आहे. तिखट खाल्ले की, गोड खावेसे वाटते आणि गोड खाल्ले की, तिखट खावेसे वाटतेे. त्यामुळे दोन्ही एकाच वेळी खाणे योग्य आहे, असे कृष्णाने सांगितले. 
      हे कृष्णा, हे प.पू. डॉक्टर, आपणच हे उत्तर दिलेत. ते आपल्या चरणी अर्पण करते.

साधकांनो, आध्यात्मिक त्रासाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने आवश्यक आध्यात्मिक उपाय मनापासून करा !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
       सध्या बहुतांश साधकांच्या आध्यात्मिक कारणांमुळे होणार्‍या त्रासात वाढ झाली आहे. थकवा येणे, काही न सुचणे, साधनेविषयी, तसेच इतर साधकांच्या संदर्भात नकारात्मकता निर्माण होणे आदींमुळे त्यांची सेवा आणि साधना यांमध्ये व्यत्यय येत आहे. साधकांना होणार्‍या त्रासाचे वाढते प्रमाण दर्शवणारे दोन लघुसंदेश पुढे देत आहे.
१. साधिकेविषयी नकारात्मकता पसरवण्यासाठी तिला त्रास 
देणार्‍या मांत्रिकाने इतरांना पाठवलेले लघुसंदेश ! 
     एका जिल्ह्यातील एका साधिकेला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. या साधिकेला त्रास देणार्‍या वाईट शक्तीने काही साधकांना पुढील लघुसंदेश पाठवला, तुम्हा लोकांना मी किती वेळा सांगितले आहे की, एक साधिका ही चारित्र्यहीन स्त्री आहे. असे असतांनाही ती तुमच्या गुरूंना आवडते. तुम्ही त्यांना हे सत्य सांगा.

जून २०१५ मध्ये चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि राष्ट्रीय शिबीर यांसाठी कर्नाटक राज्यातून आलेल्या धर्माभिमान्यांमध्ये झालेले पालट आणि त्यांना आलेल्या अनुभूती

१. प.पू. गुरुदेवांच्या भेटीनंतर अधिकाधिक व्यष्टी आणि समष्टी 
साधना करण्याचा निश्‍चय करणारे श्री. कृष्णाजी जाधव, विजयपूर !
गेल्या दीड वर्षापासून समितीच्या संपर्कात आल्यानंतर श्री. कृष्णाजी जाधव नामजपादी व्यष्टी साधना, तसेच समष्टी साधनेअंतर्गत जागो लघुसंदेश पाठवणे, इ-मेलवरून धर्मशिक्षणाविषयी जाणूून स्वतः आचरणात आणणे, तसेच इतरांना सांगणे, प्रशिक्षणवर्ग घेणे, तसेच आंदोलनांत सहभागी होणे आदी सेवा करतात. त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि अनुभूती पुढे देत आहोत.
१ अ. समितीच्या मार्गदर्शनामुळे वाईट सवयी नष्ट होणे : समितीच्या संपर्कात येण्यापूर्वी मी सतत मित्रांच्या सहवासात आणि घोळक्यात असायचो. त्यामुळे मला अनेक वाईट सवयी लागल्या होत्या. मी वाईट बोलत असे, शिव्या देत असे; पण समितीचे मार्गदर्शन मिळाले आणि मी आता चांगल्या प्रकारे सभ्य भाषेत बोलू लागलो. समितीचे मार्गदर्शन आणि गुरुदेवांनी निर्माण केलेली तळमळ यांमुळे माझ्यात पालट झाले. माझ्यात सुधारणा झाल्याचे पाहून घरच्यांना पुष्कळ आनंद झाला आहे.

संतसेवेची सुवर्णसंधी !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक दाम्पत्याची आवश्यकता !
    पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक दांम्पत्याची आवश्यकता आहे. जे सेवक दांपत्य या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी
श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
भ्रमणभाष : ८४५१००६०७०
इ-मेल : hinducoordination@gmail.com
     प.पू. दास महाराजांच्या आश्रमात दिवसभरात करावयाच्या सेवांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
१. आश्रम आणि मंदिर यांची, तसेच परिसराची स्वच्छता
२. स्वयंपाक आणि स्वयंपाकघराशी संबंधित सेवा करणे

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

मूर्तीविसर्जनामुळे प्रदूषण होते, हा अपप्रचार ! हा फ्लेक्स फलक उपलब्ध !
     विनाप्रक्रिया सांडपाणी सोडल्यामुळे होणार्‍या भयावह जलप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते, असा कांगावा करून धर्मद्रोही मूर्तीदान आणि कृत्रिम हौदात विसर्जन अशा धर्मशास्त्रविरोधी चळवळी राबवतात. या संदर्भात प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवविषयक फलकांच्या मालिकेत मूर्तीविसर्जनामुळे प्रदूषण होते, हा अपप्रचार ! हा नवा फ्लेक्स फलक ६ फूट  ४ फूट आणि ८ फूट  ६ फूट आकारांत उपलब्ध करण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, विसर्जनस्थळे, मिरवणुकीचे मार्ग आदी ठिकाणी हा फलक लावून प्रबोधन करता येईल. नेहमीच्या ठिकाणी हा फलक उपलब्ध आहे. प्रायोजक मिळवून या फलकाचा वापर प्रसारासाठी करू शकतो, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन
कुणाचेही वाईट चिंतू नये !
वाईट बोलणे हे केव्हाही अयोग्यच; पण कुणाचेही वाईट चिंतणे आणि त्याच्या र्‍हासाची इच्छा करणे, हे अधिक अयोग्य !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

प्रकृती आणि पुरुष
१. प्रकृतीचे भय गेले म्हणजे तो पुरुष झाला. मी कर्ता आहे, याचे ज्ञान पाहिजे. मी म्हणजे अहंकार धरला, तर ती प्रकृती.
भावार्थ : मी कर्ता आहे यातील मी हा पुरुषतत्त्वासंबंधी आहे. 
२. प्रकृतीधर्माप्रमाणे वृत्ती, याला प्रवृत्ती म्हणतात. निवृत्तीची प्रतिक्रिया प्रवृत्ती. निवृत्ती ही स्वयंसिद्ध आहे.
३. पुरुषाचे लक्ष आणि स्त्रीची दृष्टी : पुरुषाचे लक्ष हे त्याचे ध्येय असते, तर स्त्रीची दृष्टी परपुरुषाचे लक्ष आकृष्ट करते, म्हणजे प्रकृतीमुळे विकार येतात. लक्ष, रस इत्यादी म्हणजे विकार.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या स्वार्थीपणाच्या कक्षा

१. सर्वसाधारण व्यक्तीच्या विस्तारत जाणार्‍या स्वार्थीपणाच्या कक्षा 
     स्वतः, स्वतःचे कुटुंब, नातेवाईक, शेजारी, गाववाले, जातवाले, संबंध असलेल्या संस्थेचे सदस्य, राजकीय पक्षाशी जोडलेले असल्यास तो पक्ष.
२. साधकांच्या स्वार्थत्यागाच्या, म्हणजेच आध्यात्मिक स्तराच्या कक्षा 
२ अ. व्यष्टी साधकांच्या संकुचित होत जाणार्‍या कक्षा : टप्प्याटप्प्याने फक्त स्वतःचे मन, बुद्धी, चित्त आणि अहं अल्प करण्याचा विचार, म्हणजे इतर कोणताही विचार न होता फक्त ईश्‍वरप्राप्तीचा विचार होणे.
२ आ. समष्टी साधकांच्या विस्तारत जाणार्‍या स्वार्थीपणाच्या कक्षा : टप्प्याटप्प्याने इतर साधक, राष्ट्र, सर्व मानव आणि विश्‍व यांचा आध्यात्मिक स्तरावर विचार होणे. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.८.२०१५)

वाढता उन्माद !

नरेंद्र मोदी यांचे शासन सत्तेवर आल्यापासून म्हणजे गेल्या दीड वर्षात देशातील सामाजिक वातावरण गढूळ झाल्याचे बोलले जात आहे. हे काही प्रमाणात खरे असले, तरी हे वातावरण गढूळ होण्यामागील कारणांचा अभ्यास केल्यास याला मोदी शासन नाही, तर या शासनाचे विरोधकच अधिक उत्तरदायी असल्याचे लक्षात येते. सत्ता हातातून गेल्यामुळे बिथरलेले काही राजकारणी, भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यामुळे संघद्वेष्ट्यांचा उठलेला पोटशूळ, गोवंश हत्या बंदी यांसारख्या शासनाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे भयभीत झालेले काही तथाकथित धर्मनिरपेक्षवादी आणि अर्थातच आपली छुपी कारस्थाने उघड होण्याची भीती असलेले अल्पसंख्य यांनी मोदी शासनाच्या विरोधात हे शासन कसे चुकत आहे, हे दाखवण्याचा चंग बांधला आहे. यासाठी खोटे आरोप करणे, घडणार्‍या प्रत्येक सामाजिक गोष्टीचा संदर्भ शासनाशी जोडणे, शासन अल्पसंख्यविरोधी असल्याचे चित्र निर्माण करणे, हिंसक आंदोलने करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणे, असे प्रकार वाढीस लागले आहेत.

शेषरावांसारखे हवेत !

पोथीनिष्ठ मार्क्सवाद्यांना फटकारण्याबरोबरच सर्व पुरोगाम्यांच्या वैचारिक आतंकवादाचा समाचार चौथ्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी घेतला. आतापर्यंत पुरोगाम्यांच्या अभ्यासहीन आणि अतिरेकी विचारांना केवळ कर्महिंदूच विरोध करत होते. प्रा. शेषराव मोरे हे कर्महिंदूंमध्ये मोडत नसले, तरीही त्यांनी हिंदुत्ववादी एवढे दिवस जे सांगत होते, ते सत्य अंदमानमध्ये का असेना सांगितले आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येचे खापर हिंदुत्ववाद्यांवर फोडले जात आहे. त्याचाही प्रा. मोरे यांनी समाचार घेतला. प्रा. मोरे यांचा त्यामागील हेतू काहीही असो; पण सर्वसाधारण हिंदूंमध्ये त्यामुळे सकारात्मक संदेश जाईल, हे महत्त्वाचे !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn