Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नेपाळला 'हिंदु राष्ट्र' करण्यासाठी मोदी शासनाने पुढाकार घ्यावा ! - सिंहस्थपर्वातील साधू-महंतांची मागणी

डावीकडून पू. (कु.) स्वाती खाडये, बालयोगेश्व र श्री रामबालकदासजी महाराज, 
पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, महंत १०८ श्री देवरामदास वेदांतजी महाराज, श्री. गुरुराज प्रभु
  •  नेपाळला हिंदु राष्ट्र करण्यासाठी सिंहस्थपर्वातील साधू-महंत पंतप्रधानांना पत्रे लिहिणार !
  •  नेपाळचे ख्रिस्तीकरण करण्यासाठी युरोपीय युनियनकडून कोट्यवधी रुपयांच्या निधीचा व्यय

  नाशिक, ७ सप्टेंबर (वार्ता.) - नेपाळची ९५ टक्के अर्थव्यवस्था ही भारतावर अवलंबून असून भारत अन् नेपाळ यांची संस्कृती समान आहे. अशा वेळी नेपाळमध्ये युरोपीय युनियन कोट्यवधी रुपये पैसे व्यय करून तेथील राज्यघटना हिंदु राष्ट्राऐवजी ती धर्मनिरपेक्ष करण्यासाठी षड्यंत्र रचत आहे. हे षड्यंत्र भारतातील मोदी शासनाने लक्षात घेऊन नेपाळ आणि भारत यांचे चांगले संबंध टिकवून ठेण्यासाठी, तसेच नेपाळमधील बहुसंख्य हिंदु जनतेची 'हिंदु राष्ट्रा'ची मागणी मान्य करण्यासाठी तेथील शासनावर दबाव आणावा, असे आवाहन सिंहस्थपर्वातील साधू-महंतांनी ७ सप्टेंबरला जाहीर पत्रकार परिषदेत केले.

हिंदूंनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटित झाले पाहिजे ! - सुमेरुपीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद महाराज

प्रदर्शनस्थळी चर्चा करतांना डावीकडून पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, 
सुमेरुपीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद महाराज 
आणि धर्माचार्य महंत श्री सोमेश्वररानंद सरस्वती महाराज
सिंहस्थपर्व, नाशिक येथे सनातन संस्था आणि 
हिंदु जनजागृती समिती आयोजित भव्य 'राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती' प्रदर्शन
नाशिक, ७ सप्टेंबर (वार्ता.) - देशाच्या घटनात्मक रचनेत जोवर पालट होत नाहीत, तोवर हिंदूंपुढील समस्यांचे निराकरण कठीण आहे. जेव्हा हिंदूंचे दमन करण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा हिंदू अधिक सशक्त, बलवान झाले. २१ वे शतक हे हिंदूंचे असून त्यासाठी सर्वांनी आपापसांतील भेद विसरून एकत्र यायला हवे. साधू, १३ आखाडे, हिंदुत्ववादी संघटना यांच्यात समन्वय होऊन त्यांनी संघटित व्हायला हवे, असे उद्गार सुमेरुपीठाधीश्वर (काशी) जगदगुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद महाराज यांनी काढले. त्यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित 'राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती' या प्रदर्शनास ६ सप्टेंबर या दिवशी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्वामी नरेंद्रानंद महाराज यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केला. या वेळी सनातनच्या प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाडये या उपस्थित होत्या.

गांधी हत्येत सहभाग असल्याचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कलंक दूर करा !

चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोेरे यांची मागणी
गांधी हत्येत स्वातंत्र्यवीर यांचा हात होता, असे कुणी म्हणत असेल, 
तर त्याविषयी पोलिसांत तक्रार केली पाहिजे ! - प्रा. मोरे
पोर्ट ब्लेअर (अंदमान) - कपूर समितीने दिलेल्या अहवालातील केवळ एकाच परिच्छेदाचा वारंवार दाखला देत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गांधींच्या हत्येच्या प्रकरणात हात होता, असा प्रचार हेतूपुरस्सर करण्यात येत आहे. खरे तर गांधींच्या हत्येच्या प्रकरणातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली होती. सध्या केंद्रात आणि राज्यात सावरकरद्वेषी शासन नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा परिच्छेद रहित करावा, अशी मागणी प्रा. शेषराव मोरे यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील हा कलंक दूर करण्यासाठी सावरकरवाद्यांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ऑफबीट डेस्टिनेशन आणि महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचा ६ सप्टेंबरला समारोप झाला. त्या वेळी प्रा. शेषराव मोरे बोलत होते. 

दाऊदला आणण्यासाठी शासन साम, दाम, दंड आणि भेद अवलंबील ! - राज्यवर्धन राठोड, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री

अमेरिकेने पाकमध्ये घुसून ओसामा बिन लादेन याचा  काटा काढला. भारताकडे अमेरिकी सैनिकांप्रमाणे 
कौशल्य असलेले सैनिक नाहीत, असे म्हणता येत नाही !
नवी देहली - मुंबई येथील वर्ष १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला पकडून भारतात आणण्यासाठी शासन साम, दाम, दंड आणि भेद यांचा अवलंब करील, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना सांगितले. भारताचे शत्रू कुठेही असले, तरी आमचे त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे. आम्ही शत्रूवर काय कारवाई करणार, याविषयी येथे सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कारवाई पूर्ण झाल्यानंतरच कळेल, असेही राठोड म्हणाले.
संयुक्त अरब अमिरातकडून दाऊदच्या संपत्तीवर टाच
दाऊद इब्राहिमची संपत्ती कह्यात घेण्यास संयुक्त अरब अमिरातने आरंभ केला आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रशासनातील अधिकार्यांनी दिली असल्याचे वृत्त आहे. गत मासात पंतप्रधान मोदी यांच्या संयुक्त अरब अमिरातच्या दौर्या‍च्या वेळी दाऊदवर कारवाई करण्यासंदर्भातील करार उभय देशांत झाला होता.

प्रमोद मुतालिकांवरील प्रवेशबंदी पटली नाही ! - प्रभाकर तिंबले, गोव्याचे माजी निवडणूक आयुक्त

       सलोखा, समन्वय आणि बहुविधतेला मानणार्‍या गोव्याच्या भूमीत श्रीराम सेनेचे सर्वेसर्वा प्रमोद मुतालिक, तसेच त्यांच्या सहकार्‍यांना येण्यास बंदी घालणारा राज्यशासनाचा निर्णय उचलून धरणारा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा राज्याचा विजय मानला जात असला, तरी तो कायद्याचा आणि न्यायनिष्ठेचा पराभव आहे, हेदेखील आपण लक्षात घेतले पाहिजे. व्यक्तीस्वातंत्र्य आणि वैयक्तिक अधिकारांच्या बाबतीत ज्याचा शब्द अंतिम असतो, अशा सर्वोच्च न्यायालयाने गेले वर्षभर एका व्यक्तीवर लादलेली बंदी न उठवणे निराशाजनक आहे. कायद्याच्या प्रत्येक उल्लंघनासाठी मुतालिक आणि त्यांच्या गणगांना कायद्यात सांगितलेली कठोर शिक्षा व्हायलाच हवी; मात्र इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या बंदीमुळे संविधानिक अधिकार आणि स्वातंत्र्यासंदर्भात एक चुकीचा पायंडा पाडला जात आहे. प्रत्येक भारतियाला घटनेच्या १९ व्या कलमाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा या कृतीने उपमर्द होतो आहे. नागरी हक्कांचा सर्वोच्च रक्षणकर्ता असलेल्या वरिष्ठ न्यायालयाने यासंदर्भात आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

(म्हणे) अफझल, याकूब मेमन यांना तडकाफडकी फाशी देणे, ही शासनाची चूक

माजी न्यायाधीश अजित शाह यांचे आतंकवाद्यांचा उमाळा
     नवी देहली - संसदेवर आतंकवादी आक्रमण करणारा अफझल याला ज्या पद्धतीने अचानक आणि गुप्तरित्या फाशी देण्यात आली, ते अनाकलनीय आहे. याकूब मेमनच्या बाबतीतही कार्यपालिका आणि न्यायपालिका या दोघांनीही त्यांचे कर्तव्य पूर्णपणे तसेच पारदर्शकतेने बजावले नाही, अशी टीका विधी आयोगाचे निवृत्त अध्यक्ष आणि देहली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अजित शाह यांनी केली. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसशी साधलेल्या संवादात त्यांनी ही टीका केली.
      आतंकवादी कृत्ये आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आदी गुन्हे वगळता इतर गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ नये, असा अहवाल शाह यांनी नुकताच सादर केला होता. तसेच आठवडाभरापूर्वीच ते विधी आयोगाच्या दायित्वातून मुक्त झाले.

काळा पैसा जमवणार्‍यांची माहिती द्या आणि १५ लाख रुपये मिळवा !

सर्व यंत्रणा हाताशी असतांना अवैध संपत्ती जमा करणार्‍यांना शोधू न शकणारे भाजप शासन काय कामाचे ? असे पुरस्कार घोषित करणे, ही शासनावर ओढवलेली नामुष्की !
आयकर खात्याची नवी योजना
      नवी देहली, ७ सप्टेंबर - कर बुडवून अमाप संपत्ती जमा करणार्‍या लोकांची किंवा त्यांच्या संपत्तीची माहिती देणार्‍या देशातील कोणत्याही नागरिकाला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची नवी योजना आयकर खात्याने जाहीर केली आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेेवण्यात येणार आहे. या संदर्भातील नवीन नियमावली आणि दिशानिर्देश केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने गेल्या आठवड्यात देशभरातील आपल्या सर्व अधिकार्‍यांना जारी केले आहेत. 
     आयकर खात्याने करबुडव्यांच्या काळ्या यादीत ज्याचे नाव टाकले आहे, त्याच्याविषयीची खात्रीलायक माहिती देणार्‍या किंवा काळा पैसा जमवणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे शक्य होईल, अशी माहिती देणार्‍या कोणत्याही नागरिकाला १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, असे या नियमावलीत नमूद आहे. शासनाचा महसूल वाढवण्यासोबतच काळ्या पैशाची किचकट होत चाललेली समस्या हाताळून देशातच लपवण्यात आलेला अमाप काळा पैसा बाहेर काढण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले असल्याची माहिती आयकर खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. कायद्याच्या दृष्टीने जिथे आवश्यक आहे, तिथेच त्याच्या ओळखीबाबतचे दस्तावेज सीलबंद लिफाप्यातून सादर केले जातील, असेही यात स्पष्ट करण्यात आले.

देहलीतील शान-ए-पाकिस्तान प्रदर्शन

प्रदर्शनाच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीचे 
निवेदन स्वीकारण्यास भारत निर्यात महासंघाचा नकार
नवी देहली, ७ सप्टेंबर (वार्ता.) - देहलीत १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत शान-ए-पाकिस्तान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देहलीतील द ग्रँड हॉटेल येथे हे प्रदर्शन भारत निर्यात महासंघ आणि बराती पाकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात येत आहे. हे प्रदर्शन रहित करावे, या मागणीचे निवेदन घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भारत निर्यात महासंघ आणि द ग्रँड हॉटेल यांच्या अधिकार्यांतची ७ सप्टेंबरला भेट घेतली असता त्यांनी हे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला.
(याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा उद्याच्या अंकात)

मणीपूरमध्ये इंधन संकट, प्रतीलिटर पेट्रोलचा दर १८० रुपये !

पूर आणि भूस्खलन यांमुळे महामार्ग ठप्प
इंफाळ (मणीपूर) - मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यांमुळे मणीपूरमधील विविध भागांमध्ये अनेक पूल तुटले आहेत. तेथे इंधनाचे टँकर पोहोचण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन पेट्रोलचे दर प्रतिलिटर ५७ रुपये असतांना काळ्या बाजारात एक लिटर पेट्रोलसाठी १६० ते १८० रुपये मोजावे लागत आहेत. परिस्थितीत लवकर कोणताही पालट होणार नसल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.

केरळमधील मुसलमानांची आय.एस्.आय.एस्. आणि अल् कायदा यांच्या विरोधात मोहीम

आतंकवादी संघटनांच्या विरोधात मोहीम उघडणार्‍या मुसलमानांना भारतभरात हिंदूंवर 
अत्याचार करणार्‍या धर्मांधांविषयी काय म्हणायचे आहे ? 
     थिरुवनंतपूरम - मुसलमान मुलांनी आय.एस्.आय.एस्. आणि अल् कायदा या आतंकवादी संघटनांच्या प्रभावाखाली येऊ नये, यासाठी केरळमधील मुसलमानांनी या संघटनांविरुद्ध मोहीम चालू केली आहे. केरळमधील दोन युवक सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून संयुक्त अरब अमिरातीमधील आय.एस्.आय.एस्.च्या विचारांचा प्रसार करत असल्याचे उघड झाले होते. यानंतर ही मोहीम राबवण्यात आली. केरळ नादव्हाथुल मुजाहिद्दीन या संस्थेने आतंकवादविरोधी मोहीम चालू केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष अब्दुल माजिद स्वालाही म्हणाले, आमचा लढा मूलतत्त्ववादी आणि आतंकवादी विचारसरणीला विरोध करण्यासाठी आहे. आतंकवादी विचारसरणीपासून तरुणांना परावृत्त करण्याचाही आमचा प्रयत्न आहे. महंमद पैगंबर आणि इस्लाम यांच्या इतिहासाला विकृत करण्याचा आतंकवादी संघटनांचा प्रयत्न आहे. तरुणांना आतंकवादापासून परावृत्त करण्याचाच आम्ही प्रयत्न करत आहोत.

धर्मादाय आयुक्तांच्या अहवालानुसार राज्यशासनाने निर्णय घ्यावा ! - सर्वोच्च न्यायालय

कर्नाटकमधील चिक्कमंगळुरू येथील दत्तात्रय पिठाचे प्रकरण
     नवी देहली - काही दशकांपासून हिंदु आणि मुसलमान यांच्यातील वादाला कारणीभूत ठरलेल्या चिक्कमंगळुरू येथील वादग्रस्त गुरु इनाम दत्तात्रेय पिठाच्या प्रकरणी वर्ष २०१० मध्ये धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या समग्र अहवालाचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक शासनाला दिला आहे. या आदेशामुळे धार्मिक दृष्टीने अतीसंवेदनशील असलेले प्रकरण सोडवण्याचे दायित्व काँग्रेसच्या सिद्धारामय्या शासनावर आले आहे.
१. धर्मादाय आयुक्तांनी या धार्मिक स्थळाविषयी दोन्ही धर्मांच्या प्रमुखांकडून, तसेच संबंधित व्यक्तींकडून माहिती संग्रहित करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वर्ष २०१० ला एक अहवाल सादर केला. 
२. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०१५ ला या अहवालाच्या प्रती वादी-प्रतिवादींना देऊन आक्षेप नोंदवण्यास सांगितले. 
३. या अहवालाविरुद्ध अर्जदार सय्यद गौस मोइद्दीन यांनी आयुक्तांनी गुरु दत्तात्रेय संवर्धन समितीच्या आक्षेपांना अधिक प्राधान्य दिले, अशी तक्रार न्यायालयाकडे केली.

गुजरातमधील नानोद येथे शाळेत शिकवायला जाण्यासाठी शिक्षकांना करावी लागते ७ किलोमीटर पायपीट !

पंतप्रधानांच्या विकसित गुजरातमधील शिक्षकांची ही स्थिती असेल, 
तर इतर ठिकाणचा विचारही न केलेला बरा ! 
     नांदोद (जिल्हा नर्मदा) - येथील सातपुडा डोंगररांगेत वसलेल्या छीन कुवा गावातील प्राथमिक विद्यालयात दिलीप चौधरी (वय ३३ वर्षे) आणि रमीला वसावा (वय ३९ वर्षे) हे दोन शिक्षक प्रतिदिन ७ किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन मुलांना शिकवतात. (स्वतंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही शिक्षकांवर अशी वेळ येते, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद ! - संपादक) या विद्यालयात ५२ विद्यार्थी शिक्षण घेतात.

शेतकर्‍यांच्या समस्यांच्या निवारणाच्या बैठकीत महिला अधिकारी भ्रमणभाषवर खेळ खेळण्यात रममाण !

भारतीय प्रशासन जनतेप्रती संवेदनशून्य असल्याचे अनेक उदाहरणे आहेत; मात्र आता उच्च शिक्षण 
घेऊन खाजगी आस्थापनांमध्ये नोकरी करणारे अधिकारीही असे संवेदनशून्यअसणे, हे दुर्दैवी आहे ! 
      चेन्नई - शेतकर्‍यांची समस्या सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत एका साखर कारखान्यात कार्यरत असलेली उच्चपदस्थ महिला अधिकारी कँडी क्रश हा भ्रमणभाषवरील खेळ खेळत असल्याची एक ध्वनीचित्रफीत सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित झाली आहे. (खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी हे केवळ पैसा आणि स्वतःचे हित पहातात. त्यांना समाजाशी काही देणेघेणे नसते. असे अधिकारी निपजणे हे भारतीय शिक्षणपद्धतीचे अपयश आहे ! - संपादक)

सिरियावर हवाई आक्रमण करण्याचे वृत्त फ्रान्सने फेटाळले

      पॅरिस - सिरियातील निर्वासितांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत सिरियाच्या विरोधात सैन्य कारवाई करण्याचा विचार अनेक युरोपीय देश करीत आहेत. या आघाडीत सहभागी होत सीरियावर हवाई आक्रमणे करण्याचा विचार फ्रान्स करीत असल्याचे वृत्त फ्रान्समधील प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले आहे. फ्रान्स शासनाच्या अधिकार्‍यांनी मात्र हवाई आक्रमणाची शक्यता फेटाळून लावली. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत इराकवर आक्रमण करण्यात फ्रान्स आघाडीवर होते; मात्र सिरियावर सैन्य कारवाई केल्यास त्याचा लाभ सिरियाचे अध्यक्ष बशर-अल्-असद यांना होऊ शकतो, अशी भीती फ्रान्सला आहे. असद यांच्या विरोधात लढणार्‍या बंडखोरांना फ्रान्स शस्त्रपुरवठा करतो. सिरियातील अंतर्गत यादवीच्या पार्श्‍वभूमीवर निर्वासितांचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. अंतर्गत यादवीला कंटाळलेले सहस्रो नागरिक युरोपात आश्रय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून देहलीतील पुष्टा मार्गाचे हेतूपुरस्सर 'औरंगजेब मार्ग' असे नामकरण !

धर्मांधांचा भरणा असलेली काँग्रेस राष्ट्रहित काय साधणार ? 
असिफ खान यांनी उभारलेला फलक
औरंगजेब मार्गाचे नामकरण केल्याचा सूड उगवण्यासाठी केलेले कुकृत्य ! 
     नवी देहली - येथील 'औरंगजेब मार्गा'ला माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे पोटशूळ उठल्याने काँग्रेसचे माजी आमदार असिफ महंमद खान यांनी कालिंदी कुंज ते जामियानगरला जोडणार्‍या राजधानीतील ओखला येथील मार्गाला 'औरंगजेब मार्ग' असे नाव दिले. या रस्त्याला 'पुष्टा मार्ग' म्हणून ओळखले जाते. या रस्त्यावर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील 'औरंगजेब मार्ग'  हे नाव दर्शवणारा फलक लावण्यात आला आहे. "औरंगजेब हा कोणी महान व्यक्ती होता किंवा डॉ. कलाम हे महान व्यक्ती नव्हते असे माझे म्हणणे नाही; परंतु औरंगजेब हा आपल्या इतिहासाचा एक भाग आहे आणि आपण हे सत्य पालटू शकत नाही. (इतिहासाचा भाग आहे; म्हणून क्रूर मुसलमान आक्रमणकर्त्याचे नाव मार्गांना ठेवायचे का ? स्वतःची धर्मांधता लपवण्यासाठी काँग्रेसच्या मुसलमान नेत्याचा हा अश्‍लाघ्य प्रयत्न आहे ! - संपादक) भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा मार्गांची नावे पालटून हिंदुत्ववादी विचारसरणी पसरवण्याचा हा प्रयत्न आहे" , असे असिफ खान यांनी म्हटले आहे. 

धर्मद्रोह्यांचे आघात वारंवार होत असून अशा प्रसंगात आम्हाला पुनःपुन्हा लढा द्यावा लागेल ! - ह.भ.प. बाळासाहेब माने

पुरोगामी मंडळींकडून संतांच्या नावांचा वापर करून त्यांची अवहेलना केली जात असल्याचे प्रकरण !
इचलकरंजीत वारकर्यांच्या पुढाकाराने भव्य निषेध दिंडी
४०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी सहभागी
निषेध दिंडीत सहभागी वारकरी आणि हिंदू
इचलकरंजी, ७ सप्टेंबर (वार्ता.) - संत तुकाराम महाराज यांचा घोर अपमान पुरोगाम्यांनी केला आहे. सदेह वैकुंठाला कसे जायचे, ते संत तुकाराम महाराज यांनी साध्य केले होते. श्री. चतुर्वेदी यांच्या ग्रंथांत त्याचा उल्लेख आहे. ज्यांची साधना नव्हती, तसेच जे धर्मद्रोही आहेत, त्यांना संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठात जातांना विमान का दिसले नाही, याचा अभ्यास त्यांनी करावा. धर्मद्रोह्यांचे आघात वारंवार होत असून अशा प्रसंगात आम्हाला पुनःपुन्हा लढा द्यावा लागेल, असे मत ह.भ.प. बाळासाहेब माने यांनी व्यक्त केले. 
पुरोगामी मंडळींकडून संतांच्या नावांचा वापर करून त्यांची अवहेलना केली जाते. याचा निषेध करण्यासाठी वारकर्याांच्या पुढाकाराने येथील प्रांत कार्यालयावर भव्य निषेध दिंडी काढण्यात आली. त्या वेळी ह.भ.प. माने बोलत होते. 

हिंदूंनी रामकुंडात केवळ स्नान करण्यापेक्षा श्रीरामाचा नामगजर करणे महत्त्वाचे ! - योगी सम्राट श्री श्री १००८ श्री ओमदासजी महाराज

     नाशिक, ७ सप्टेंबर (वार्ता.) - येथील कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सनातन धर्मावर नुसते प्रवचन करून अर्थकारण करणे व्यर्थ आहे. रामकुंडात नुसते राजयोगी स्नान करण्यापेक्षा हिंदूंनी तेथे श्रीरामाचा नामगजर करणे आवश्यक आहे. असे केल्याने कुंभमेळ्याचा खर्‍या अर्थाने लाभ होईल, तसेच युगप्रवर्तनही होईल; मात्र दुर्दैवाने याचा कुणी विचारच करत नाही. रामकुंडात नुसते स्नान केले जाते, अशी खंत योगी सम्राट श्री श्री १००८ श्री ओमदासजी महाराज यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. 

सनातनच्या सेवाभावी साधकांना भेटणे म्हणजे कुंभनिमित्त अवतरलेल्या देवतांना भेटल्याप्रमाणेच आहे ! - धर्माचार्य महंत श्री सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज

श्रीराम शक्तीपीठ, ब्रह्मचारी आश्रमाचे संस्थापक धर्माचार्य 
 महंत श्री सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांची प्रदर्शनस्थळी भेट
     नाशिक, ७ सप्टेंबर (वार्ता.) - सिंहस्थपर्वाच्या प्रदर्शनस्थळी सनातनच्या सेवाभावी साधकांना भेटणे म्हणजे कुंभच्या निमित्ताने अवतरलेल्या देवतांना भेटल्याप्रमाणेच आहे. सर्व साधकांना भेटून मला आनंद झाला. संस्कृती जपणार्‍या साधकांमध्ये साधूंचा भाव आहे. त्यामुळे नाशिकचे कुंभ पहाण्यात, साधूंचे दर्शन घेण्यात जसा आनंद आहे, तसा आनंद साधकांना भेटून मला झाला. गोदावरी तिरी प्रदूषणामुळे देवतांचे दर्शन होत नाही; मात्र सनातनच्या प्रदर्शनस्थळी भेट दिल्याने देवतांचे दर्शन झाले, असे प्रतिपादन श्रीराम शक्तीपीठ, ब्रह्मचारी आश्रमाचे संस्थापक धर्माचार्य महंत श्री सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण' या प्रदर्शनास भेट दिल्यानंतर ते बोलत होते. 

गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार ! - नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची ठाणे येथे पत्रकार परिषद 
     ठाणे, ७ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण, असे समीकरण जुळवून गणेशमूर्तींच्या परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. या दान केलेल्या मूर्ती पुन:विसर्जन करतांना मूर्तींची विटंबना झाल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे गणेशमूर्तींची विटंबना होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. अशा प्रकारे मूर्तीची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि कृत्रिम तलावात विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात यावी, यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी ठाणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु महासभेचे अधिवक्ता जयेश तिखे यांनी उपस्थित पत्रकारांसमोर विषय मांडला. 

विशाखापट्टनम् येथील सनातनच्या साधिका सौ. हंसाबेन पटेल यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

     
शेजारील छायाचित्रात डावीकडून सौ. हंसाबेन पटेल यांना
श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करतांना सौ. मीना कदम
विशाखापट्टनम् (आंध्रप्रदेश),
७ सप्टेंबर (वार्ता.) - येथील सनातनच्या साधिका सौ. हंसाबेन पटेल (वय ३५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ५ सप्टेंबर या दिवशी घोषित करण्यात आले. गोकुळाष्टमीच्या दिनी येथील साधकांना भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने एक अनमोल भेट मिळाल्याविषयी उपस्थित साधकांनी कृतज्ञता व्यक्त केली. सौ. पटेल यांचा सत्कार येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मीना कदम यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन करण्यात आला. या प्रसंगी सौ. पटेल यांचे पती रवी पटेल, मुलगा जुगल पटेल, मुलगी रोशनी पटेल यांची उपस्थिती होते. 

८६३ गणेशोत्सव मंडळे अजूनही अनुमतीविना

      मुंबई - गणेशोत्सव जवळ आला असतांनाही पोलिसांनी केवळ १८४ गणेशोत्सव मंडळांना अनुमती दिलेली आहे; मात्र ८६३ मंडळांना अनुमती मिळालेली नाही, तर २०९ मंडळांचे अर्ज बाद केले आहेत. सध्या मुंबईत ११ सहस्र ५५६ गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांपैकी पोलिसांकडे १ सहस्र ४११ मंडळांचे मंडपांसाठी अर्ज आले होते. (अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांना अनुमती देण्यात इतका विलंब करण्याचे पोलिसांचे धाडस झाले असते का ? - संपादक)

गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतातच विसर्जन व्हावे ! - पंकज बागुल, हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथे पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेत विषय मांडतांना (डावीकडे) श्री. पंकज बागुल आणि श्री. दत्तात्रय वाघुळदे
      जळगाव - धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यातच विसर्जन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल यांनी केले. ४ सप्टेंबर या दिवशी आचार्य कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
      या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. दत्तात्रय वाघुळदे यांनी गणेशोत्सव आदर्श कसा साजरा करावा आणि १० दिवस श्री गणेशाची कृपा कशी संपादन करावी, याविषयाचे विश्‍लेषण केले, तसेच श्री गणेश मूर्तीदान का करू नये, याविषयी माहिती सांगितली.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे 'आदर्श गणेशोत्सव जनजागृती मोहिमे'च्या अंतर्गत लोकप्रतिनिधींच्या भेटी

गणेशोत्सवातील अशास्त्रीय प्रकार थांबवणे आणि
 देहली येथे होणारा 'शाम-ए-पाकिस्तान' कार्यक्रम रहित करण्याविषयी निवेदन 
     पिंपरी, ७ सप्टेंबर (वार्ता.) - कथित पर्यावरणवाद्यांकडून नदी प्रदूषणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. गणेशोत्सवातील मूर्तीदान, कृत्रिम तलाव अशा पद्धतीचे सर्व अशास्त्रीय प्रकार थांबवावेत, तसेच देहली येथे १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणारा 'शाम-ए-पाकिस्तान' हा भारत शासनाने आयोजित केलेला कव्वालीचा कार्यक्रम रहित करावा, या मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड येथे शिवसेना खासदार, आमदार, नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांच्या भेटी घेऊन निवेदन देण्यात आले. 

प्रत्येक हिंदूने गो-व्रती व्हावे ! - स्वामी राजेंद्रदेवाचार्य महाराज

विहिंपकडून नाशिक येथे संत-संमेलनाचे आयोजन 
     नाशिक, ७ सप्टेंबर (वार्ता.) - भारतात आज गोमातेची स्थिती दयनीय आहे. गायींची मोठ्या प्रमाणात हत्या केली जात आहे; म्हणून गोमातेच्या संरक्षणासह तिचे संवर्धन करणेही आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूने स्वत: गो-व्रती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पथमेडा येथील स्वामी राजेंद्रदेवाचार्य महाराज यांनी केले. 

फलक प्रसिद्धीकरता

अशांची पाकिस्तानात हकालपट्टी करा !
      संसदेवर आतंकवादी आक्रमण करणार्‍या अफझलला ज्या पद्धतीने फाशी देण्यात आली, ती अनाकलनीय आहे. याकूब मेमनच्या बाबतीतही कार्यपालिका आणि न्यायपालिका या दोघांनीही त्यांचे कर्तव्य पूर्णपणे अन् पारदर्शकतेने बजावले नाही, अशी टीका उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अजित शाह यांनी केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Afzal aur Yakubke bareme nyayapalikane sahi kartavya nahi nibhaya ! - Bhutpurva nyayadhish Ajit Shah
Aise logonko pak me kyo na bheja jaye ?
जागो !
अफझल और याकूबके बारेमें न्यायपालिकाने सही कर्तव्य नही निभाया ! - भूतपूर्व न्यायाधीश अजित शाह
ऐसे लोगों को पाक में क्यो न भेजा जाए ?

जागेवर नियंत्रण मिळवण्यासाठी हिंदूंचा छळ करून धर्मांधांनी हुसकावले !

भूमी जिहादसाठी सोकावलेल्या धर्मांधांचा हा उद्दामपणा कायमचा संपवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
कपाडियानगर, कुर्ला येथे धर्मांधांचा भूमी जिहाद !
      मुंबई - कुर्ला पश्‍चिमेकडील कपाडियानगरात काही धर्मांधांनी तेथील हिंदूंना हुसकावून जागेवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांचा पुष्कळ छळ करण्यास प्रारंभ केला आहे. तेथे अवैध बांधलेली मशीद, मदरसा आणि मुसाफिरखाना (मुसलमानांची धर्मशाळा) सध्या महानगरपालिकेकडे गहाण आहे. या इमारतींमध्येही धर्मांधांनी अवैधरित्या घुसखोरी केली आहे. (आजवरच्या राज्यकर्त्यांनी धर्मांधांच्या केलेल्या अतीलांगूलचालनामुळेच हे घडते ! हिंदूंनो, धर्मांधांचा हा लँड जिहाद जाणा आणि त्याला संघटितपणे विरोध करा ! - संपादक) धर्मांधांच्या या जाचाला कंटाळून कुर्ला कपाडियानगरात आम्ही अल्पसंख्य झालो आहोत. त्यामुळेच महानगरपालिकेचे अधिकारी आमच्या तक्रारींची नोंद घेत नाहीत. निबंधक कार्यालयातील अधिकारी आम्हाला बाहेरची वाट दाखवतात आणि पोलीसही आम्हाला सहकार्य करत नाहीत. मग आम्हाला वाली कोण ? आम्ही असेच मरायचे का ?, असा प्रश्‍न हिंदूंनी केला आहे. (हीच स्थिती आज सर्वत्रच्या हिंदूंची झाली आहे. हिंदूंनो, धर्मद्रोही राज्यकर्ते तुमच्यासाठी काहीही करणार नाहीत. भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आतातरी धर्माचरण करा ! - संपादक)

महाराष्ट्रात माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर देशात सर्वाधिक आक्रमणे आणि हत्या !

ही आक्रमणे पहाता देशात शासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो !
      मुंबई - महाराष्ट्रात माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर देशात सर्वाधिक ६० आक्रमणे झाली असून त्यांपैकी १० जणांची हत्या झाली आहे, अशी आकडेवारी कॉमनवेल्थ मानवाधिकार संस्थेने सिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. हत्येच्या बाबतीत महाराष्ट्रानंतर गुजरात आणि उत्तरप्रदेश (प्रत्येकी ६ जणांच्या हत्या), कर्नाटक आणि बिहार (प्रत्येकी ४) यांचा क्रमांक लागतो. 
     माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर झालेल्या आक्रमणाच्या, त्यांना छळण्याच्या आणि हत्येच्या घटनांत महाराष्ट्रानंतर गुजरात (३६), उत्तरप्रदेश (२५) आणि देहली (२३) यांचा क्रमांक लागतो. माहिती अधिकार कायद्यांतर्गत देशात सर्वांत अधिक अर्ज महाराष्ट्रातून दाखल होतात. या अर्जांतील बहुतेक प्रकरणे जमिनीची मालकी, हस्तांतर आणि वापर यांच्याशी संबंधातील आहेत. यात गुंतलेले लोक राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या सबळ असल्याने त्यांच्या हितसंबंधांना बाधा पोहोचवणारे माहिती अधिकार कार्यकर्ते रोषास सहज बळी पडतात.

भारतीय संस्कृतीला वेढून कुटुंबसंस्था उद्ध्वस्त करणारी पाश्‍चात्त्य संस्कृतीची विषवल्ली !

      पैसा, प्रसिद्धी, सुखलोलुपता, प्रतिष्ठा यांच्या जंजाळात नातेसंबंध, माणुसकी, भावना यांना लाथाडून आसुरी सुख मिळवणार्‍या इंद्राणी मुखर्जी हिचे प्रकरण म्हणजेच शीना बोरा हत्याकांड प्रसिद्धीमाध्यमांनी पुष्कळ चर्चेत आणले. काम आणि अर्थ या पुरुषार्थांचा अतिरेक झाल्यावर कसे अधःपतन होते, याचे ठळक उदाहरण या निमित्ताने समोर आले आहे.
     हे प्रकरण थोडक्यात असे आहे - एका मुलाशी असलेल्या लिव्ह इन संबंधांतूनच इंद्राणी मुखर्जी हिला दोन अपत्ये झाली, एक शीना आणि दुसरा मिखाईल. ३ वर्षांनंतर एक धनवान (उद्योजक) भेटल्यावर आधीच्या मुलाशी असलेले लिव्ह इन संबंध तोडून इंद्राणीने त्याच्याशी लग्न केले. त्या वेळी तिने स्वतःच्या दोन्ही मुलांना आईकडे सोडून दिले. दुसर्‍या नवर्‍यापासून तिला एक मुलगी झाली. कालांतराने त्याच्याशीही तिने फारकत घेतली; कारण त्याच्यापेक्षा स्टार इंडियाचे तत्कालीन सीईओ पीटर मुखर्जी यांच्यासारखा गर्भश्रीमंत पुरुष भेटल्याने इंद्राणीने त्यांच्याशी विवाह केला. इंद्राणीची मुलगी शीना आणि पीटर यांच्या आधीच्या पत्नीपासून झालेला मुलगा यांच्यातील प्रेमसंबंध इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांना रुचत नव्हते. इंद्राणीने आयएन्एक्स मिडिया हे आस्थापन काढले होते. ते विकल्यावर त्याचा पैसा तिने शीनाच्या नावावर गुंतवला होता; मात्र त्यावर शीना हक्क सांगू लागली, हे न पटल्याने तिने तिचा खून केला. दुसर्‍या नवर्‍यापासून झालेल्या मुलीला संपत्ती मिळावी, असेे आमिष दाखवून तिने दुसर्‍या नवर्‍याला समवेत घेऊन शीनाची गाडीतच हत्या करून तिचा मृतदेह पेणजवळील जंगलात जाळण्याचे दुष्कर्म केले.

समाजवादाचे भूत मानगुटीवर बसलेले पं. नेहरू आणि समाजवादी विचारसरणीचा परिणाम !

१. सनातन धर्म-संस्कृतीपेक्षा चीन भारतात आल्यास देशाची हानी 
होणार नाही, अशी श्रद्धा असणारे नेहरू ! 
      भारताची राज्यघटना आणि शासन समाजवादी, लोकशाही स्वरूपाचे आहे. लोकशाही आणि समाजवाद (socialism) हे दोघे एकत्र कसे असू शकतील ? पंडित नेहरूंना भारताला समाजवादी वळण द्यायचे आहे. समाजवाद, साम्यवाद यांकडे त्यांचा कल आहे. सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे नाव काढले की, ते आणि त्यांच्या गुंडांच्या डोळ्यांतून आग बाहेर पडते व कानशिले थाडथाड उडतात.
      चीन तिबेट घेतांना आमच्या तिन्ही दलांचे सरसेनापती (बहुधा ते जनरल थिमय्या असावे) नेहरूंना म्हणाले, पहाता पहाता आम्ही चीनची नाकेबंदी करतो. तिबेट जर चीनने घेतला, तर भारताला चीनपासून मोठा धोका आहे. नेहरू नकार देत उदगारले, भारतात सनातन धर्म संस्कृती येण्यापेक्षा चीन आला, तर भारताची काही हानी होणार नाही. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)

पदोपदी फसवणार्‍या राजकीय पुढार्‍यांचे बुरखे फाडण्याचे धाडस नसणारे अंनिसवाले !

आजच्या हिंदु समाजाला धर्मशिक्षणच नसल्यामुळे साधू-संतांचे 
महत्त्वही कळत नाही. त्यांच्यासाठी हे विशेष सदर !
शिष्याला साधनेविषयी मार्गदर्शन
१ अ ४. अंनिसवाल्यांनी साधू-संतांऐवजी लोककल्याणाची माळ जपून सर्वांनाच पदोपदी फसवणार्‍या राजकीय पुढार्‍यांचे बुरखे फाडून दाखवावेत !
कार्यकर्ता : स्वामी, पण डोळ्यांसमोर लोक फसत आहेत, हे दिसते. मग स्वस्थ कसे बसायचे ?
स्वामी : केवळ फसवणुकीचा विचार अस्वस्थ करत असेल, तर मी दुसरे काही सुचवल्यास आवडेल का ? येथेही बुरखा फाडण्याचेच काम करायचे आहे.
कार्यकर्ता : निश्‍चित आवडेल.
स्वामी : मग साधू-संतांचा विचार तूर्त बाजूला ठेवा. त्यांच्या नादी लागून काही थोडे मूर्ख लोक फसतील; पण असेही एक क्षेत्र आहे की, जिथे सर्वच लोक पदोपदी फसत आहेत.

...म्हणे, विवेकवाद !

      ६ सप्टेंबर २०१५ ला एका प्रतिथयश दैनिकाच्या मुखपृष्ठावर विवेकवादाचे बळी अशा मथळ्याखाली डॉ. दाभोलकर, पानसरे आणि कुलबर्गी यांच्या हत्येविषयी उहापोह करणारे वृत्त वाचनात आले. समाजवाद, साम्यवाद असे वादाचे विषय माहिती होते; परंतु विवेकवाद हा नवीन विषय समजला आणि त्याचे हसूही आले. मुळातच ज्यांना विवेक आहे, त्यांची बुद्धी ही समाजाचा सर्वांगीण विचार करण्यासाठी खर्च व्हायला हवी; मात्र तीच बुद्धी विवेकाच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता यांच्या विरोधात आणि त्यांची चेष्टा, विटंबना करण्यासाठी वापरली जात असेल, तर त्यांचा विवेक खरोखरच किती जागृत आहे, हे सर्वसामान्य लोकांना सहजपणे समजते.

ढोंगी धर्मनिरपेक्षता : राष्ट्रासाठी अभिशाप !

१. कुठे मरणानंतर वैर संपते, अशी शिकवण स्वतःच्या कृतीद्वारे समाजमनावर बिंबवणारे प्रभु श्रीराम, 
तर कुठे विज्ञानाद्वारे बायबलमधील असत्य दाखवून जगापुढे सत्य उलगडणारे गॅलेलियो यांच्या 
मृतात्म्याशी शत्रूत्व जपणारे विद्यमान पोप ! 
     संपूर्ण जगाला ठाऊक आहे की, पूर्वीचे नावाजलेले वैज्ञानिक गॅलेलियो यांनी बायबलमधील संभावित असत्याला विज्ञानाच्या कसोटीवर उतरवून जगासमोर सत्य आणले. त्यामुळे त्यांना दंड म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. जगातील ३२४ वैज्ञानिकांनी पूर्वीचे पोप जॉन पॉल द्वितीय यांच्या जवळ मागणी केली होती की, महान वैज्ञानिक गॅलेलियो यांचा आत्मा आजपण कैद आहे. कृपा करून तुम्ही त्याला आतातरी मुक्त करा; पण ही गोष्ट सांगितल्यावर सध्याच्या पोपनी सांगून टाकले, बायबलच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे मी गॅलेलियोच्या आत्म्याला क्षमादान देऊ शकत नाही.

माणुसकीविषयी वायफळ बडबड करणार्‍या ख्रिस्तींची भयानक प्रतिज्ञा !

ख्रिस्ती धर्माचे विषारी शिक्षण !
      माणुसकीविषयी वायफळ बडबड करणारे ख्रिस्ती प्रतिज्ञा करतात, सर्व धर्म ईश्‍वराकडे पोहोचण्याचे मार्ग आहेत. हे सर्व खोटे आहे. तुम्हाला प्रमाण हवे, तर कुराण आणि बायबल वाचा अन् स्वतः पारखून बघा. मी प्रतिज्ञा करतो आणि घोषणा करतो की, मला संधी मिळाल्यास जसा आदेश मिळेल, तसे मी सर्व अन्य धर्मीय, प्रोेटेस्टंट आणि उदारवादी यांच्या विरुद्ध गुप्त किंवा उघडपणे सदैव युद्ध करीन. मी त्यांची धूळधाण करीन, त्यांना या जगातून समूळ नष्ट करीन. त्या वेळी मी वय, लिंग आणि परिस्थितीचा थोडाही विचार करणार नाही. मी या कलंकित विधर्मींना फाशी, कमरेपर्यंत उकळत्या पाण्यात उभे करणे, चामडी सोलणे, गळा दाबणे, जिवंत गाडणे, अशा शिक्षा करीन. तसेच त्यांच्या स्त्रियांच्या पोटातील गर्भ चिरून टाकीन. त्यांच्या बालकांचे शिर भिंतींमध्ये चेचून टाकण्यात कसर ठेवणार नाही, म्हणजे त्या घृणीत जातीचा समूळ नाश होईल.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमातील सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून व्यक्त केलेले अभिप्राय !

    सनातनच्या रामनाथी आश्रमासमोरून जातांना गेली ८ वर्षे काही समाजद्रोही सनातन बॉम्ब, असे ओरडत जातात. काहीजण शिव्या देत जातात, काहीजण दगड फेकतात, तर काहीजण पेट्रोल बॉम्ब फेकतात. विविध संप्रदायांच्या भक्तांना, हिंदुत्ववाद्यांना आणि संतांना येणारे पुढील अनुभव वाचले की, लक्षात येईल की, सनातनविरोधी अशी कृत्ये करणारे असुरांच्या कह्यात आहेत. हिंदु राष्ट्रात त्यांचा नाश केला जाईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.६.२०१५)                                     
  • सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पहातांना आपल्याकडे साधनेचे बळ असेल, तर अनिष्ट शक्ती आपल्यावर फारसा प्रभाव पाडू शकत नाहीत, हे लक्षात आले. सतत साधनेत रहाणे हेच ध्येय असायला हवे. - श्री. शशिकांत सहदेव बागुल, सचिव (कोकण विभाग), श्री योग वेदांत सेवा समिति, रत्नागिरी, महाराष्ट्र. (११.६.२०१५)
  • सूक्ष्म जगताचे प्रदर्शन चांगले आहे. वाईट शक्तींच्या त्रासावर येथे उपाय मिळू शकतो, असे  वाटले. - श्री. चंद्रकिशोर राय, केंद्रीय खजिनदार, हिंदु युवा मंच, बोंगइगांव, आसाम.
  • प्रदर्शनात सजीवता असल्याचे जाणवते. - श्री. शिव शंकर कुंडू, केंद्रीय संगठन सचिव, हिंदू युवा मंच, ढुबरी, आसाम. (१२.६.२०१५)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

अज्ञातवासात शापच ठरला अर्जुनाला वरदान, तर शापांमुळे अधर्मी कर्णाचा झाला विनाश !

      अर्जुनाला नपुसंक बनण्याचा शाप होता. त्याचा उपयोग त्याने अज्ञातवासात नृत्यशिक्षक म्हणून केला. कर्णाला शाप होता, त्याचे रथाचे चाक भूमीत रुतेल ! (त्याने दुसरा रथ सिद्ध ठेवला नाही.) कर्णाला मंत्र विसरण्याचाही शाप होता. (त्याने दुसरा मंत्र सिद्ध केला नाही.) शेवटी धर्माचाच जय होतो, हे यावरून सिद्ध होते. - पुष्पांजली, बेळगाव (१०.११.२०१४)    देवाला देशभक्तापेक्षा देवभक्त प्रिय आहेत. देवभक्तांना तो पृथ्वीचेच काय ? संपूर्ण विश्‍वाचे राज्य देतो. - पुष्पांजली, बेळगाव (१०.११.२०१४) बसमध्ये हिंदु तरुणीची छेड काढणार्‍या मुसलमानाला रोखण्याचे सामर्थ्य एकाही हिंदूमध्ये नाही, हे लक्षात घ्या !

      १९.२.२०१४ या दिवशी सकाळी ८.३० वाजता गोव्यात भुईपाल येथून साखळी येथे बसगाडीमधून जाणार्‍या एक १९ वर्षीय हिंदु युवतीची हमीद शेख या मुसलमान युवकाने छेड काढली आणि तिचा विनयभंग केला.

क्षात्रवीर साधकांना रामनाथी आश्रम माहेर असल्याचे सांगून त्यांची नाळ आश्रमाशी जोडणारे आणि त्यांच्यातील क्षात्रवृत्ती जागृत ठेवण्यासाठी वज्रमूठ करून स्फूर्ती देणारे प.पू. डॉक्टर !

      सनातनच्या रामनाथी आश्रमात घेण्यात आलेले क्षात्रवीर साधकांसाठीचे प्रशिक्षण शिबिर पूर्ण करून काही साधक २५.१०.२०१३ या दिवशी सकाळी ७ वाजता आपापल्या जिल्ह्यांत जाण्यासाठी निघणार, एवढ्यात प.पू. डॉक्टर त्यांच्या खोलीच्या आगाशीमध्ये आले आणि म्हणाले, जायला निघालात का ? मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते, तेव्हा तिला तिच्या माहेरचीही ओढ असते. तुम्हीही हे तुमचे माहेरच समजा आणि तुम्हाला जेव्हा इकडे यावेसे वाटेल, तेव्हा या हं ! त्यानंतर प्रवासासाठी निघणारे क्षात्रवीर साधक वाहनात बसले आणि त्यांनी हर हर महादेव, असा जयघोष केला. त्या वेळी प.पू. डॉक्टर पुन्हा खोलीतून बाहेर आले आणि दोन्ही हातांची वज्रमूठ करत म्हणाले, हे माझ्यासाठी टॉनिक आहे. त्यानंतर त्यांनी सर्वांना निरोप दिला.
- श्री. विनोद पालन, ठाणे (१४.११.२०१३)

प्रसारसेवक, जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

साधकांनो, २०.९.२०१५ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !
     संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून २०.९.२०१५ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी.
३१.८.२०१५ या दिवसापर्यंतचा प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे.
     घर, संस्कृती आणि देवालय हे हिंदु समाजाचे केंद्रबिंदू आहेत. सद्यस्थितीत ही जीवनव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे अराष्ट्रीयतेचे संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. ते दूर करण्यासाठी धार्मिकता आणि राष्ट्रीयता यांची सांगड घालावी लागेल. तरच आपण हिंदु म्हणून जगू शकू !
- प्राचार्य सुभाष वेलींगकर, गोवा

श्री (म्हणजे प.पू. डॉक्टर) हेच स्वतःकडील धन असल्याचे सांगणारी कु. धनश्री जाधव !

कु. हर्षदा जाधव
    एकदा प.पू. डॉक्टरांनी माझी बहीण कु. धनश्री हिला विचारले, तुझ्याकडे कोणते धन आहे, भाव कि भक्ती ? त्यावर तिने उत्तर दिले, माझ्याकडे श्री (म्हणजे प.पू. डॉक्टर) हेच धन आहे आणि जेथे श्री (म्हणजे प.पू. डॉक्टर) आहेत, तेथे भाव, भक्ती, आनंद आणि प्रीती असे सर्वकाही आहे. - कु. हर्षदा जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०१५)

रात्री अकस्मात् स्नानगृहात जावेसे वाटणे, तेथील सोलरच्या नळातून पाणी येत नसल्याचे लक्षात येणे आणि तत्परतेने पाण्याची तजवीज केल्याने आश्रमात आलेल्या अतिथींच्या दुसर्‍या दिवशीच्या स्नानाची काळजी घेतली जाणे

    सनातनच्या मिरज आश्रमात १.६.२०१५ या दिवशी पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर निवासासाठी आले होते. त्यांची भेट झाल्यावर ते मला म्हणाले, आम्ही उद्या सकाळी ७ वाजता स्नान उरकून पुण्याला जायला निघू. त्याच रात्री १०.४५ वाजता मी झोपण्याच्या सिद्धतेत असतांना मला अकस्मात् सामूहिक स्नानगृहाकडे जावेसे वाटले. स्नानगृहात गेल्यावर सोलरच्या नळाला एक थेंबही पाणी येत नसल्याचे लक्षात आले. मी त्वरित स्वागत कक्षात दूरभाष करून पाण्याचा पंप चालू करण्यास सांगितले आणि नळातून पाणी येत असल्याची निश्‍चिती करून झोपण्यास गेलो.
    रात्री देवाने जर मला नळ चालू करून बघण्याची बुद्धी दिली नसती, तर सकाळी पू. सुनील चिंचोलकर यांना ऊन पाणी मिळाले नसते. माझ्या माध्यमातून प.पू. डॉक्टरांनीच ती काळजी घेतली. ही अनुभूती दिल्यामुळे मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे !- (पू.) श्री. जयराम जोशी, सनातन आश्रम, मिरज. (४.६.२०१५)

महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या कु. ऐश्‍वर्या जोशी (वय ११ वर्षे) हिने तिच्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त बनवलेले वैशिष्ट्यपूर्ण शुभेच्छापत्र !

कु. ऐश्‍वर्या जोशी
    होळी पौर्णिमेला कु. ऐश्‍वर्याचे आजोबा, म्हणजे मिरज आश्रमातील साधक श्री. जयराम जोशीआजोबा (आताचे पू. जोशीआजोबा) यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त कु. ऐश्‍वर्याने १६.३.२०१४ ला रात्री त्यांच्यासाठी शुभेच्छापत्र बनवले. शुभेच्छापत्र पाहिल्यावर तिच्या सर्व संकल्पना आध्यात्मिक स्तरावरच्या आहेत आणि तिने आजोबांचे किती नेमकेपणाने वर्णन केले आहे, ते लक्षात येते.
(शुभेच्छापत्राची चित्रे शेजारी दिली आहेत.) निर्मळ मनाचे आणि प्रीतीचे मूर्तीमंत रूप असल्याने आपल्या डोळ्यांतून, बोलण्यातून साधकांवर प्रेमाचा वर्षाव करणारे अन् सतत देवाच्या अनुसंधानात असणारे सनातनचे ५१ वे संतरत्न पू. जयराम जोशी !

पू. जयराम जोशी
कु. स्नेहा झरकर
    गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी मूळचे पुण्याचे आणि सध्या मिरज आश्रमात वास्तव्य असणारे पू. जयराम जोशीआजोबा (आबा) यांना संतपद प्राप्त झाले. एक वर्षाच्या कालावधीत ६ टक्के आध्यात्मिक प्रगती साध्य करून ते आता संतपदी विराजमान झाले आहेत. उतारवयातही सेवेची तळमळ असणारे आणि सर्व साधकांशी आपुलकीचे नाते निर्माण करणारे पू. जोशीआबा आपल्या विविध गुणांमुळे साधकांसाठी आधारस्तंभ बनले आहेत. साधकांना भावलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. सर्वांना हवेहवेसे वाटणारे आणि सतत भावावस्थेत असणारे पू. जोशीआबा !
    हे श्रीकृष्णा, तूच माझ्याकडून हे लिखाण करून घे. भगवंता, आज तू मला इतका आनंद दिला आहेस की, मला तो शब्दांत मांडणे कठीण होत आहे. देवा, या जिवाकडून तूच काय ते करून घे, हीच आर्त प्रार्थना !

कार्यपद्धतीचे पालन न करणे, गांभीर्याचा अभाव आदींमुळे पाट्याटाकूपणे लेखाची (अकाऊंटची) सेवा करून त्यातील चुका सुधारण्यासाठी संतांना वेळ द्यायला लावणारे दायित्वशून्य साधक !

साधकांच्या चुका सनातन प्रभातमध्ये छापण्याचा उद्देश
    मनाच्या नाही, तर निदान जनाच्या लाजेने तरी त्यांनी पुढे चुका टाळाव्यात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.७.२०१५) 
    मागील काही मासांंपासून सनातनचे पू. महादेव नकाते आणि पू. पद्माकर होनप हे लेखा, तसेच अन्य तपासणी करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. त्या वेळी जिल्हास्तरावरील साधक किती पाट्याटाकूपणे लेखासेवा सेवा करतात, ते लक्षात आले. या संदर्भातील चुका पुढे देत आहे.
१. लेखा तपासणी
१ अ. तपासणीच्या सेवेला येण्यात उदासीनता असणे : अनेक जिल्ह्यामध्ये तपासणीची सेवा करण्यासाठी येण्याची साधकांची सिद्धता नव्हती. नियतकालिकांचे वितरण करणारे बरेच साधक तपासणीसाठी स्वतः न येता सेवेच्या नोंदवह्या अन्य साधकांसमवेत पाठवून देत होते. त्यामुळे त्यांच्या वह्यांमधील नोंदींची तपासणी अन्य साधकांना करावी लागत होती.

साधकांनो, सर्व शासकीय नियमांचे पालन करून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

    सध्या एका संस्थेच्या एका आश्रमात बांधकामाच्या अंतर्गत विविध सेवा चालू आहेत. या सेवेसाठी लोखंडी सळ्या, तसेच अन्य काही साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांचे भक्त बाजारात गेले होते. लोखंडी सळ्यांची खरेदी करून भाड्याने ठरवलेल्या रिक्शातून त्या आश्रमात पाठवतांना त्यांच्याकडून झालेल्या अक्षम्य चुका पुढे देत आहे.
१. शासकीय नियम ठाऊक असतांनाही
रिक्शाबाहेर आलेल्या सळ्यांना लाल कापड न बांधणे
    खरेदी केलेल्या सळ्या रिक्शात भरल्यानंतर त्यांंचा काही भाग रिक्शाबाहेर येत होता. अशा वेळी सळ्यांच्या बाहेर आलेल्या टोकांना लाल कापड बांधण्याचा नियम असल्याचे ठाऊक असूनही भक्तांनी ते बांधले नाही.    
    कापड न बांधताही वाहन चालवू शकतो, असे रिक्शाचालकाने अती आत्मविश्‍वासाने सांगितले असता त्यांनी अन्य पर्यायांचा विचार करणे अपेक्षित होते.

प.पू. डॉक्टरांच्या सर्वज्ञतेची प्रचीती देणारे प्रसंग !

१. प.पू. डॉक्टरांनी प्रवासासाठी लिमलेटच्या गोळ्यांचे मोठे पाकिट देणे, काही वेळाने ते परत घेऊन त्याची चार पाकिटे करून देणे अन् पुढे तुम्ही २ वेगवेगळ्या वाहनांनी जाणार, असे म्हणणे आणि प्रत्यक्षातही तसेच घडणे
    ७.६.२०१५ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमातून दिल्लीला जाण्यासाठी निघणार होतो. प.पू. डॉक्टरांनी प्रवासात खाण्यासाठी लिमलेटच्या गोळ्यांचे १ मोठे पाकिट दिले होते. एक घंट्याने त्यांनी ते पाकिट परत मागून त्याची ४ लहान पाकिटे करून दिली आणि म्हणाले, पुढे तुम्ही २ वेगवेगळ्या वाहनांनी जाणार. उन्हाळाही आहे; म्हणून ही वेगळी पाकिटे दिली.
    पुढे प.पू. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच झाले. आम्ही नैमिषारण्यात जातांना २ वेगळ्या वाहनांनी गेलो. पू. गाडगीळकाकू आणि काही साधक पुढच्या वाहनात, तर पू. उलगनाथन्जी आणि इतर साधक मागच्या वाहनात होते. त्या दिवशी पुष्कळ ऊन होते. त्यामुळे सर्वांनी प.पू. डॉक्टरांनी दिलेल्या लिमलेटच्या गोळ्या खाल्या. पू. उलगनाथन्जींना याविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, प.पू. डॉक्टर सर्वज्ञ आहेत आणि आताही ते आमच्याकडे पहात आहेत.

स्वावलंबी, लाघवी स्वभावामुळे सर्वांशी आपुलकीने वागणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला शिरढोण, पनवेल येथील चि. हर्ष विनायक वाकडीकर (वय ५ वर्षे) !

चि. हर्ष वाकडीकर
    चि. हर्ष विनायक वाकडीकर याचा ७.९.२०१५ या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. भजन आवडणे
    लहानपणी हर्ष रात्री रडू लागल्यावर अच्युतम् केशवम् राम नारायणम् हे भजन लावले की, ते शांतपणे ऐकत झोपी जायचा. त्या वेळी आम्ही सनातनच्या सत्संगाला जात नव्हतो.
२. नामजप ऐकत शांतपणे खेळणे
    हर्ष दीड वर्षांचा असतांना सनातनचे साधक घरी येऊन काही उपाय सांगायचे. हळूहळू मी ते करू लागले. जून २०१३ पासून मी सत्संगाला जाऊ लागले. त्या वेळी हर्षही माझ्यासमवेत यायचा. मी घरी नामजप करत असतांना तो खेळत असल्यास मला सांगायचा, आई, मोठ्याने नामजप कर ना ! मी मध्येच मनातल्या मनात नामजप करू लागल्यास आई, मोठ्याने जप कर, असे म्हणायचा आणि नामजप ऐकत ऐकत तो खेळायचा. मी नामजप करत असतांना तो मला त्रास न देता शांतपणे खेळत रहायचा.

संतसेवेची सुवर्णसंधी !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक जोडप्याची आवश्यकता !
      पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक जोडप्याची आवश्यकता आहे. जे सेवक जोडपे या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
भ्रमणभाष : ८४५१००६०७०
इ-मेल : hinducoordination@gmail.com

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत गणेशोत्सव-पितृपक्ष विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १३ सप्टेंबर
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ सप्टेंबरच्या
दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ज्ञानाचा वापर सुयोग्य करायला हवा 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      नुसते ज्ञान संपादन केले, तर त्याचा उपयोग होईलच, असे नाही. त्याचा सुयोग्य वापर करण्याचा चाणाक्षपणा आणि हुशारी नसेल, तर ते ज्ञान म्हणजे इंजिनविना असलेली गाडी ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'धर्मक्रांतीशिवाय हिंदु राष्ट्राची स्थापना कधीही होऊ शकणार नाही', हे हिंदूंना कधी कळणार ?
'नेपाळमध्ये साम्यवाद्यांनी क्रांती करून हिंदु राष्ट्र संपवले. नेपाळ आणि भारत या दोन्ही राष्ट्रांत हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे; म्हणून शांततापूर्वक चळवळी चालू आहेत. त्यांचा काही परिणाम आतापर्यंत झालेला नाही आणि पुढेही होणार नाही. एवढेच नव्हे, तर नेपाळमधील हिंदु राष्ट्रासाठी उपोषण करणारे मेले, तरी तेथील शासनावर काही परिणाम होणार नाही. अशी स्थिती असतांना 'धर्मक्रांतीशिवाय हिंदु राष्ट्राची स्थापना कधीही होऊ शकणार नाही', हे हिंदूंना कधी कळणार ? '
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.९.२०१५) 

॥ हरि ॐ तत्सत ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
     भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)


मानवतेमागील खरा धर्म !

       सध्या सिरिया, अफगाणिस्तान, इरिट्रिया, तसेच इतर इस्लामी राष्ट्रांतून लोंढेच्या लोंढे युरोपच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या निर्वासितांमध्ये सिरियातील लोकांची संख्या अधिक आहे. अंतर्गत गृहयुद्ध, आय.एस्.आय.एस्.चे आतंकवादी घडवून आणत असलेला रक्तपात यांमुळे तेथील लोक जीव मुठीत धरून ग्रीस, जर्मनी, इटली आदी देशांत आश्रयासाठी जात आहेत. हे लोंढे युरोपसाठी डोकेदुखी बनले आहेत. युरोपमधील काही देशांमध्ये निर्वासितांना रोखण्यासाठी कठोर नियम आहेत. त्यामुळे या निर्वासितांना हुसकावण्याचे प्रकारही झाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn