Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज गोपाळकाला

प्रमाणपत्र न घेताच सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम या नाटकाचे राज्यात १०० हून अधिक प्रयोग ?

असे अवैध नाटक पोलीस स्वत:हून बंद का पाडत नाहीत ? उघड होणारे गुन्हे पोलीस आणि प्रशासन 
यांच्या कसे लक्षात येत नाहीत ? असे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निलंबित करा !
 • हिंदु जनजागृती समितीची कारवाईची मागणी 
 • कारवाई करण्याचे राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे आश्‍वासन
    मुंबई, ५ सप्टेंबर (वार्ता.) - राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र नसतांना सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग केल्याने या नाटकावर कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे पुराव्यानिशी निवेदन देऊन करण्यात आली. त्यानंतर परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी या विषयावर ५ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर येथे परीनिरीक्षण मंडळाच्या बैठकीत हा विषय घेतला. नाट्यपरिक्षणासाठी हे नाटक आल्यास मंडळ त्यावर कारवाई करेल, असा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी या बैठकीत निर्णय घेतला. कोल्हापूर येथे डॉ. मानसिंग शिंदे यांनी मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची भेट घेऊन या नाटकावर कारवाई करण्याची मागणी केली होती. (परिनिरीक्षण मंडळाची अनुमती न घेता एखादे नाटक सादर होत असतांना मंडळाने स्वतःहून त्यांच्यावर कारवाई का केली नाही ? - संपादक)

कन्नड वेदिकेच्या अध्यक्षासह वरिष्ठ महिला अधिकारी कह्यात अनैतिक संबंध उघड न करण्याविषयी दिली चेतावणी

कलबुर्गी हत्या प्रकरण
     बेळगाव - माजी कुलगुरु डॉ. एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी बेळगाव कन्नड आणि सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री यांच्यासह कन्नड युवा वेदिकेचे अध्यक्ष अनंत व्याकूड यांना या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ४ सप्टेंबर या दिवशी चौकशीसाठी कह्यात घेतले. बजंत्री आणि व्याकूड यांच्यातील अनैतिक संबंध उघड करू नयेत, यासाठी व्याकूडने डॉ. कलबुर्गी यांना चेतावणी दिली होती. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रशासनाकडून वन रँक वन पेंशन योजनेची घोषणा

२५ लाख सैनिक लाभार्थी !
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सैनिकांना योजना लागू नाही !
      नवी देहली - गेल्या ४२ वर्षांपासून ज्या योजनेची भारतीय सैनिक प्रतीक्षा करत होते, त्या वन रँक वन पेंशन योजनेची केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली. या योजनेचा लाभ देशातील सुमारे २५ लाख माजी सैनिकांना होणार आहे. १ जुलै २०१४ पासून या योजनेची कार्यवाही केली जाणार आहे. 
      केंद्रशासनाने तातडीने ही निवृत्तीवेतन योजना लागू करावी; म्हणून माजी सैनिकांनी देहलीतील जंतरमंतर येथे आंदोलन चालू केले होते. सलग ८३ दिवस त्यांचे हे साखळी उपोषण चालूच होते. ४ सप्टेंबरला माजी सैनिकांचे प्रवक्ता मेजर जनरल (निवृत्त) सतबीरसिंह यांनी पर्रीकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीच्या कुठल्याही शासनाने सैनिकांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते.

(म्हणे) बौद्ध धर्मातील अहिंसेच्या संदेशातून जगात शांतता नांदू शकेल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भ्रम ! 
      पाटलीपुत्र (पाटणा) - भगवान बुद्धांनी जगाला पुष्कळ काही दिले आहे. बौद्ध धर्माने सांगितलेला अहिंसेचा संदेश अनेकांनी स्वीकारला आहे. त्यातूनच जगात शांतता नांदू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोधगया येथे आयोजित तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट परिषदेत ५ सप्टेंबर या दिवशी केले. या कार्यक्रमाचे आयोजन विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन, इंटरनॅशनल बुद्धीस्ट फेडरेशन आणि टोकियो फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, हिंदु धर्मावर बुद्धांचा पगडा आहे. भारतात धर्मनिरपेक्षतेची भावना वाढीस लागण्यासाठी बुद्धांची महत्त्वाची भूमिका होती.

सनातनचे प्रदर्शन म्हणजे हिंदु संस्कृतीविषयी माहिती देणारी ज्ञानगंगा आहे ! - स्वामी अद्वैतानंद महाराज, आत्मा मालिक ध्यानपीठ

डावीकडून स्वामी अद्वैतानंद महाराज (डावीकडून दुसरे), 
महाराजांच्या मागे आणि शेजारी त्यांचे शिष्यगण, 
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि श्री. विनय पानवळकर
     नाशिक, ५ सप्टेंबर (वार्ता.) - सध्याच्या काळात हिंदु संस्कृतीतील ज्ञान जणू लुप्त होण्याच्या मार्गावर असतांना हे प्रदर्शन हिंदु धर्मियांना विशेषत: तरुणांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. हे प्रदर्शन म्हणजे हिंदु संस्कृतीविषयी माहिती देणारी ज्ञानगंगा आहे, असे गौरवोद्गार श्रीक्षेत्र आळंदी (जि. पुणे) येथील आत्मा मालिक ध्यानपीठाचे स्वामी अद्वैतानंद महाराज यांनी येथे काढले. 
     सिंहस्थ पर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लावण्यात आलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या प्रदर्शनाला स्वामी अद्वैतानंद महाराज यांनी ४ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. 
      स्वामी अद्वैतानंद महाराज पुढे म्हणाले, सर्व हिंदूंनी आपला धर्म आणि संस्कृती यांनुसार आचरण करावे, हाच संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला आहे. भारत विश्‍वगुरुपदी विराजमान करण्याचे काम सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत आहे. प्रत्येक हिंदूने या कार्यात सहभागी झाले पाहिजे. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी महाराजांना प्रदर्शनाविषयी अवगत केले. 

सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी उभारलेल्या भव्य प्रदर्शनाला १६ सहस्रांहून अधिक जणांची भेट !

 • भेट देणार्‍यांमध्ये देशभरातील संत आणि मान्यवर यांचा समावेश !  
 • ३० सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन चालूच रहाणार
प्रदर्शन कक्षात सनातनचे ग्रंथ दिसत आहेत
    नाशिक - सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी उभारलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या भव्य प्रदर्शनास १० ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१५ या कालावधीत १५ सहस्रांंहून अधिक नागरिकांनी भेट दिली. भेट देणार्‍यांमध्ये देशभरातील संत, तसेच राज्यातील मान्यवर, प्रतिष्ठित यांचा समावेश आहे. हे प्रदर्शन ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत चालू असणार आहे. या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन १० ऑगस्ट या दिवशी संत-महंतांच्या हस्ते झाले. सिंहस्थपर्वानिमित्त नाशिक येथे येणारे भाविक, तसेच स्थानिक नागरिक हे प्रदर्शन पहाण्यास गर्दी करीत आहेत, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

फारूख अब्दुल्ला यांच्या सीबीआय चौकशीचा उच्च न्यायालयाचा आदेश

भ्रष्टाचाराने पोखरलेला भारत !
जम्मू-काश्मीर क्रिकेट मंडळात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप
    श्रीनगर - जम्मू-काश्मीर क्रिकेट मंडळात (जेकेसीए) कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात यावी, असा आदेश जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. एन्.पॉल. वसंतकुमार आणि न्या. बी.एल्. भट्ट यांच्या खंडपिठाने दिला. या घोटाळा प्रकरणातील एक आरोपी असलेल्या अब्दुल्ला यांची चौकशी ६ मासांच्या आत पूर्ण करण्यात यावी, असेही न्यायालयाने हा आदेश देतांना म्हटले आहे.

वेतनवाढ द्या, अन्यथा इस्लाम धर्माचा स्वीकार करू

 • हिंदी आणि संस्कृत भाषेच्या शिक्षकांची शासनाला चेतावणी
 • उत्तरप्रदेश शासनाकडून हिंदी, संस्कृत आणि उर्दू शिक्षकांमध्ये भेदभाव
     हिंदूंमध्ये धर्माभिमानाचा अभाव ! मुसलमान शिक्षकांवर अन्याय झाला असता, तर त्यांनी मागणी पूर्ण ने केल्यास आम्ही हिंदु धर्म स्वीकारू, अशी चेतावणी दिली असती का ?
    गोरखपूर - वेतनवाढ द्या, अन्यथा इस्लाम धर्माचा स्वीकार करू, अशी चेतावणी उत्तरप्रदेशमधील हिंदी आणि संस्कृत भाषेच्या शिक्षकांनी राज्यशासनाला दिली आहे. शासन उर्दू भाषेच्या शिक्षकांनाच वेतनवाढ देत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे. (उत्तरप्रदेशमध्ये मुसलमानधार्जिन्या समाजवादी पक्षाला निवडून देण्याचा हा आहे परिणाम ! हिंदूंनो स्वाभिमानाने जगण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! - संपादक)

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभनगरी नाशिक येथे भव्य प्रदर्शन

अनेक साधू-महंतांना एकत्रित पहाण्याची पर्वणी !
प्रदर्शनस्थळी डावीकडून श्री. सुनील घनवट, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी
आखाड्याचे उप श्री महंत रामकिशोरशास्त्रीजी महाराज, चित्रकूट येथील श्री दिव्य
जीवनदासजी महाराज, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी
आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महंत कृष्णदासजी महाराज, आखाड्याचे महामंत्री
महंत वैष्णवदाजी महाराज, श्री रामस्वरूपदासजी महाराज (मागील बाजूस),
श्री जगदीशदासजी महाराज, श्री पवनदासजी महाराज, श्री रामदासजी
महाराज आणि नागा अमरदास

हिंदूंमध्ये धर्मजागृती करण्याची नितांत आवश्यकता ! - श्री सच्चिदानंददास बाबाजी महाराज, विश्‍वस्त, श्री जगन्नाथ मंदिर, पुरी.

प्रदर्शनस्थळी चर्चा करतांना डावीकडून पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, 
श्री सच्चिदानंददास बाबाजी महाराज आणि श्री श्री महामंडलेश्‍वर 
१००८ पूर्णानन्ददासजी महाराज
     नाशिक, ५ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन हिंदु धर्म हा देवाने निर्माण केलेला धर्म आहे. त्यामुळे धर्माचरणाद्वारेच आनंद आणि शांती मिळू शकते. दुर्दैवाने आज भारतीय नागरिकांत धर्माचरणाचा अभाव आहे. त्यामुळेच समाजात अशांती आणि उपद्रव पहावयास मिळत आहे. त्यासाठी हिंदु धर्माचा प्रसार अन् धर्माचरण यांद्वारे हिंदूंमध्ये धर्मजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पुरी येथील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराचे विश्‍वस्त श्री सच्चिदानंददास बाबाजी महाराज यांनी येथे केले.

श्री अनंत विभूषित श्री श्री १००८ श्री वासुदेवाचार्यजी महाराज यांची प्रदर्शनास भेट !

प्रदर्शन पहातांना (डावीकडून दुसरे) श्री अनंत विभूषित 
श्री श्री १००८ श्री वासुदेवाचार्यजी महाराज आणि प्रदर्शनाविषयी
 माहिती सांगतांना श्री. विनय पानवळकर (उजवीकडे)
     नाशिक, ५ सप्टेंबर (वार्ता.) - जटिंडा (जिल्हा पाली, राजस्थान) येथील श्री कुबाजी पिठाधीश्‍वर श्री अनंत विभूषित श्री श्री १००८ श्री वासुदेवाचार्यजी महाराज यांनी प्रदर्शनास भेट दिली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी त्यांना प्रदर्शनाविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी महाराजांनी फलक, तसेच सनातन-निर्मित ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आदींविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. त्यानंतर श्री. विनय पानवळकर यांनी महाराजांचा सन्मान केला.

साधु-संतांचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत आहे ! - महंत स्वामी रामप्रपन्नाचार्यजी महाराज

प्रदर्शन पहातांना डावीकडून महंत स्वामी रामप्रपन्नाचार्यजी
महाराज आणि त्यांना प्रदर्शन दाखवतांना श्री. विनय पानवळकर
   नाशिक, ५ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले संस्कृती उत्थानाचे कार्य हे ईश्‍वरी कार्य असून त्यास ईश्‍वराचे साहाय्य अवश्य मिळेल. या कार्यासाठी १ पाऊल टाकले, तर ईश्‍वर १० पावले तुमच्याकडे येऊन तुम्हाला आपलेसे करील. साधु-संतांचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असून त्यास माझ्या शुभेच्छा आहेत, असे उद्गार उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर येथील श्री राम जानकी शिव हनुमान ट्रस्टचे महंत स्वामी रामप्रपन्नाचार्यजी महाराज यांनी येथे काढले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लावण्यात आलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण या प्रदर्शनास भेट दिल्यानंतर ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी महाराजांना प्रदर्शनाविषयी अवगत केले आणि त्यानंतर त्यांचा सन्मान केला.
     महंत स्वामी रामप्रपन्नाचार्यजी महाराज पुढे म्हणाले, हे प्रदर्शन अधिकाधिक शाळा-महाविद्यालयांतील युवकांनी अन् घराघरांतील मातांनी पाहावे. हे आपल्या धर्म-संस्कृतीचे कार्य असून ते कौतुकास्पद आहे. या कार्यासाठी तुम्हाला कुठेही काही सहकार्य लागत असेल, तर तुमच्यासमवेत मी असेन.

विनापरवानगी नाटक करणारे प्रबोधन काय करणार ?

फलक प्रसिद्धीकरता
     राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र नसतांना सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम या नाटकाचे महाराष्ट्रात १०० हून अधिक प्रयोग करण्यात आले आहेत.हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : UP Shasanne Shrikrushna janmashtmike Bhandaropar lagaya 2100 rupyonka Jijiya kar. - Hindubahul deshme Hinduoparhi attachar kyo ? 
जागो ! : युपी शासनने श्रीकृष्ण जन्माष्टमी के भंडारोंपर लगाया 
२१०० रुपयोंका जिजिया कर. - हिंदुबहुल देशमें हिंदूआेंपरही अत्याचार क्यो ?

पाककडून होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि काश्मीरमधील आक्रमणे

(ऑगस्ट २०१५ चा अहवाल) 
जुलै २०१५ या मासात पाकने १९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले; तर ऑगस्ट मासात १५ तारखेपर्यंत ३२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
ऑगस्ट १७ : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील तुज्जर येथे एका सुफी दर्ग्याबाहेर सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस चौकीवर दुचाकीवरून आलेल्या २ आतंकवाद्यांनी एके-४७ बंदुकीतून गोळीबार केला. या आक्रमणात १ पोलीस शिपाई हुतात्मा झाला, तर १ पोलीस घायाळ झाला. या आक्रमणानंतर पोलिसांकडील रायफल घेऊन आतंकवादी फरार झाले.

८६३ गणेशोत्सव मंडळे अजूनही अनुमतीविना

हिंदूंच्या सणांच्या संदर्भातील निर्णयप्रक्रियेत दिरंगाई करणार्‍यांना खडसवण्यासाठी हिंदूसंघटनच हवे !
      मुंबई - गणेशोत्सव जवळ आला असतांनाही पोलिसांनी केवळ १८४ गणेशोत्सव मंडळांना अनुमती दिलेली आहे; मात्र ८६३ मंडळांना अनुमती मिळालेली नाही, तर २०९ मंडळांचे अर्ज बाद केले आहेत. सध्या मुंबईत ११ सहस्र ५५६ गणेशोत्सव मंडळे आहेत. (अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांना अनुमती देण्यात इतका विलंब करण्याचे पोलिसांचे धाडस झाले असते का ? - संपादक)

श्रीक्षेत्र कावनई येथे आज सर्व आखाड्यांचे राजयोगी स्नान

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने व्यापक अध्यात्मप्रसार !
       नाशिक, ५ सप्टेंबर (वार्ता.) - येथून ४७ कि.मी अंतरावर असलेले कावनाई हे तीर्थक्षेत्र सत्ययुगापासून १७७० पर्यंत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध होते. १७७० पर्यंत याच ठिकाणी कुंभमेळे भरत होते. या अनुषंगाने आध्यात्मिक लाभ घेण्यासाठी ६ सप्टेंबरला वैष्णव आणि शैव संप्रदायाचे सर्व आखाडे, तसेच खालसे या ठिकाणी पवित्र राजयोगी स्नान करण्यासाठी येणार आहेत. 
     ६ सप्टेंबर या दिवशी होणार्‍या राजयोगी स्नानाच्या निमित्ताने संध्याकाळपासून वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे आणि सकाळपासून सर्व आखाडे आणि खालसे यांच्या मिरवणुका निघतील. त्यानंतर राजयोगी स्नानाला प्रारंभ होणार आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कठोर अशा राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याचे सावट कायम !

      मुंबई - शासन, लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी यांच्याविरोधात कायदेशीर मार्गानेच नापसंतीचे स्वातंत्र्य रहाणार असून, इतर अपकीर्ती करणारी कोणतीही भूमिका राष्ट्रद्रोह ठरणार आहे, असा पुनरुच्चार गृह विभागाने केला आहे. यामुळे सार्वजनिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कठोर अशा राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याचे सावट कायम रहाणार आहे.
     कायदेशीर मार्गाने नापसंती व्यक्त करण्यासाठी केलेली टीका भारतीय दंडसंहितेच्या कलम १२४ (क) अंतर्गत राष्ट्रदोह म्हणून गणली जाऊ नये, असा स्पष्ट उल्लेख गृह विभागाच्या परिपत्रकात आहे. मात्र कायदेशीर मार्गाची सविस्तर व्याख्या आणि व्याप्ती शासनाने स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया समाजातील विविध स्तरांतून उमटत आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ (क) संदर्भात गृह विभागाने काढलेले परिपत्रक उच्च न्यायालयाच्या सूचनेस अनुसरून काढण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण गृह विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

स्वतःची दहीहंडी रहित करून अन्य कुणालाही खेळ खेळण्यास मैदानात मज्जाव

कधी नव्हे, एवढी राष्ट्र आणि धर्म रक्षणाची नितांत आवश्यकता असतांना दहीहंडीच्या खेळाविषयी 
अरेरावी करणार्‍यांना गोविंदाप्रेमींनी कृष्णनामाचा जयघोष करून खडसवायलाच हवे ! 
 • अनधिकृत व्यासपिठाची उभारणी 
 • शिवसेनेला मैदान मिळू नये, यासाठी काळी हंडी बांधण्याचा संकल्प 
संकल्प प्रतिष्ठानची मोगलाई ! 
      मुंबई - वरळीच्या जांबोरी मैदानात यंदा संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी नसली, तरी गोविंदा हा खेळ अन्य कुणीही आयोजित करू नये, अशी भूमिका घेत संकल्प प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मैदान अडवून ठेवले आहे. त्यामुळे सर्वच हिंदू संतप्त झाले आहेत. (हिंदूंनो, केवळ संतप्त होऊ नका, तर संस्कृतीचे जतन करण्यासाठी हिंदूसंघटनाचे सामर्थ्य दाखवत दहीहंडीचा खेळ साजरा करा ! - संपादक) शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मैदान भाड्याने घेऊन शुक्रवारपासूनच मैदानात अनधिकृत व्यासपीठ बांधणार्‍या संकल्प प्रतिष्ठानच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या वतीने तक्रार नोंदवण्यात आली आहे. गोविंदा हा खेळ असून तो मैदानातच करा, असे न्यायालयाचे आदेश असल्याने आणि ती कुणा एकाची मक्तेदारी नसल्याने याच मैदानात शिवसेनेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक गोपाळकाला होणारच, अशी चेतावणी शिवसेनेने दिली आहे. (धर्मरक्षणासाठी सदैव तत्पर असणार्‍या शिवसेनेचे अभिनंदन ! - संपादक)

परभणी येथे पावसाअभावी शेतकर्‍यांचा शेतभूमी विकण्याचा निर्णय

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति
     अर्थ : (राज्यकर्ता धर्मनिष्ठ नसला की, प्रजा धर्मपालन करत नाही. प्रजेने धर्माचे पालन न केल्यामुळे) अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा तो सुसह्य होईल.
      परभणी - येथे सतत ३ वर्षे पडणार्‍या दुष्काळामुळे शेतकर्‍यांनी आता शेतभूमी विकण्याचा निर्णय घेतला असून त्याविषयी फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. यंदाही येथे केवळ एकदाच पाऊस पडल्याने विहिरी आणि बोअरवेल पूर्णपणे आटल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग भूमी विकून आता पुण्याकडे नोकरीच्या शोधार्थ जात आहेत. शेतकर्‍यांनी सोयाबीनची पिके लावली आहेत; मात्र पावसाअभावी पिकांची पुष्कळ हानी होत आहे.
पुरोगाम्यांच्या हत्या होण्यामागे खरे गुन्हेगार असलेल्या शासनालाच फाशी द्या !

       कर्नाटकमधील हम्पी विद्यापिठाचे माजी कुलगुरु, ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, स्पष्टवक्ते आणि पुरोगामी विचारवंत डॉ. एम्.एम्. कलबुर्गी यांची हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केली असा, प्रचार सध्या प्रसारमाध्यमे करीत आहेत. या आरोपांना कोणताही पुरावा नाही, तरीही त्यात तथ्य आहे, असे क्षणभर गृहीत धरले, तरी पुढील प्रश्‍न निर्माण होतात... 
१. पुरोगाम्यांनी हिंदु धर्माची मानहानी केली नसती, तर त्यांच्या हत्या झाल्या असत्या का ? 
     सध्याच्या घटनेत डॉ. कलबुर्गी हे पुरोगामी विचारांचे आणि स्पष्टवक्ते होते. त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचा त्यांच्यावर राग होता, असे वार्तांकन प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे; पण मूर्तीपूजेचा निषेध करण्याचे त्यांचे शब्द काय होते, हे सांगण्याचे धारिष्ट्य प्रसारमाध्यमे करीत नाहीत. देवांच्या मूर्तीवर लघवी केली, तरी देव काही करणार नाहीत, असे अश्‍लाघ्य वक्तव्य डॉ. कलबुर्गी यांनी केले होते. बहुसंख्यांक मूर्तीपूजक असलेल्या भारतात एखाद्याने असे विधान केल्यामुळे कोट्यवधी सश्रद्ध नागरिकांच्या मनावर त्याची किती खोलवर आघात झाला असेल, याचा विचार पुरोगामी करतात का ?

सनातन संस्थेचे प्रवक्ता संदीप शिंदे यांच्या कुटुंबियांची विशेष शाखेकडून पुन:पुन्हा चौकशी !

 • सनातनच्या साधकांच्याच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांच्या मागेही पोलिसांकडून चौकशीचा ससेमिरा !
 • अशी चौकशी जिहादी आतंकवादी आणि त्यांचे पाठीराखे असणार्‍या धर्मांधांची केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !
 • काँग्रेसप्रमाणे भाजपच्या राज्यातही राष्ट्रप्रेमी संघटनांची चौकशी चालूच ! राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची चौकशी करून धर्मांधांना मोकाट सोडणार्‍या पोलिसांविषयी हिंदूंना सहानुभूती वाटेल का ? 
    पुणे - सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. संदीप शिंदे हे धर्मप्रसारानिमित्त मुंबई येथे असतात. त्यांचे पूर्ण कुटुंब पुणे येथे वास्तव्यास असते. २२ ऑगस्ट २०१५ यादिवशी सकाळी ११ च्या सुमारास श्री. संदीप शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू श्री. सागर शिंदे यांच्या पुणे येथील घरी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचे दोन पोलीस हवालदार साध्या वेशात चौकशीसाठी येऊन गेले. हवालदार श्री. धोत्रे आणि श्री. भोरे नामक पोलिसांनी श्री. सागर शिंदे घरी नसल्याने त्यांची आई सौ. सुनंदा शिंदे यांच्याकडे श्री. सागर यांच्याविषयी चौकशी केली. सागर शिंदे सध्या सनातनमध्ये कार्यरत आहेत का ?, अशी विचारणा केली. त्यावर सौ. शिंदे यांनी तुम्हाला अनेकदा याविषयी सांगूनही परत परत तुम्ही तेच प्रश्‍न विचारण्यासाठी का येता ?, असा प्रतिप्रश्‍न केला. त्यावर ते हवालदार गप्प बसले. नंतर आम्हाला आमच्या कार्यालयातून माहिती घेण्यास सांगतात, त्यासाठी आलो होतो, असे ते म्हणाले. त्यावर सौ. शिंदे यांनी अनेकदा तुम्हाला सर्व माहिती लिखित स्वरूपात तुमच्या कार्यालयातही दिली आहे, तरी परत परत का मागता ?, असे विचारल्यावर आम्ही आमच्या कार्यालयात याविषयी कळवतो, असे सांगून जातांना श्री. सागर शिंदे यांचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन ते निघून गेले. २० ऑगस्ट यादिवशी अंनिसचे माजी कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २ वर्षे झाली. याच प्रकरणी काहीही संबंध नसतांना अनेकदा पोलीस श्री. संदीप शिंदे आणि त्यांचे कुटंबीय यांची चौकशी करत आहेत. (खर्‍या अपराध्यांना पकडू न शकणारी कुचकामी पोलीस यंत्रणा सनातनच्या साधकांच्या कुटुंबियांकडे अकारण चौकशी करून स्वतःचा आणि साधकांचा अमूल्य वेळ वाया घालवत आहेत ! - संपादक)

देहलीतील शान-ए-पाकिस्तान प्रदर्शनाला विरोध होत असल्याच्या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे शिवाजी वटकर यांची पोलिसांकडून चौकशी

शत्रूराष्ट्राच्या कार्यक्रमांना विरोध करणार्‍या राष्ट्रप्रेमी
संघटनांचीच चौकशी होणारा जगातील एकमेव देश भारत !
    एक शाम पाकिस्तान के नाम आणि शान ए पाकिस्तान या कार्यक्रमांविषयी हिंदु जनजागृती समितीकडून भारतीय निर्यात महासंघाला प्राप्त झालेल्या निषेधपत्राच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी एका शहरातील गोपनीय शाखेचे एक पोलीस अधिकारी यांचा समितीचे मुंबई येथील समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांना नुकताच दूरभाष आला. त्या वेळी पोलीस अधिकारी आणि श्री. वटकर यांच्यात खालीलप्रमाणे संभाषण झाले.
पोलीस : भारतीय निर्यात महासंघाच्या (फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन) महासंचालकांना पत्र पाठवले आहे का ? त्याला विरोध का आहे ?

रक्षक नव्हे; भक्षक पोलीस !

      नियमबाह्य वर्तन, जनतेला सुरक्षेविषयी शाश्‍वती न वाटणे आणि भ्रष्टाचार या दोषांमुळे पोलिसांविषयी जनतेला आपुलकी किंवा जवळीक वाटत नाही. या संदर्भातील ऑगस्ट २०१५ मधील काही उदाहरणे येथे देत आहोत.
ऑगस्ट ३ : सात मासांत तीन गुन्हे केल्याने निलंबित होऊनही गोव्यातील पोलीस हवालदार अमझद कारोल यांच्या वृत्तीत पालट झालेला नाही. प्राप्त माहितीनुसार हवालदार कारोल याच्या विरोधात खात्याच्या अंतर्गत तपास चालू असून या तपासाच्या वेळीही तो मद्यपान करून येत असतो. हवालदार कारोल याच्या या असामाजिक वागण्यामुळे पोलीस दलातील महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

नाशिक येथे सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण भव्य प्रदर्शन !

 • कालावधी  : १० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०१५
 • वेळ : सकाळी १० ते रात्री ८

प.पू. डॉक्टरांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्यातील फुलांच्या पाकळ्या वर्षानुवर्षे चांगल्या स्थितीत रहाण्यासाठी पुढील काळजी घ्या !

    प.पू. डॉक्टरांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या अविस्मरणीय भावसोहळ्यातील अनमोल पुष्पे साधकांना देण्यात आली आहेत. या भावपुष्पांना बुरशी येऊन किंवा ती कुजून खराब होत असल्याचे आढळून आले आहे. वर्षानुवर्षे ही पुष्पे चांगल्या प्रकारे रहाण्यासाठी त्यांची पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. 
१. पाकळ्यांना बुरशी आली असल्यास ती हळूवारपणे मऊ कापडाने किंवा कागदावर रंगकाम करावयाच्या लहान कुंचल्याने (ब्रशने) काढावी.
२. बुरशी काढल्यानंतर पाकळ्या तीन दिवस अर्धा घंटा उन्हात ठेवाव्यात. 
३. पाकळ्या उन्हातून काढल्यानंतर त्या थंड होण्यासाठी थोडा वेळ पंख्याखाली वारा लागेल; पण त्या वार्‍यामुळे उडणार नाहीत, अशी काळजी घेऊन ठेवाव्यात. उन्हातून काढलेल्या पाकळ्या थंड न करताच थेट प्लास्टिक पिशवीत भरल्यास त्यांना वाफ धरून त्या कुजू शकतात. (सध्या पावसाळ्यामुळे ऊन पडत नसल्यास तोपर्यंत पुढचे टप्पे करू शकतो.)

गणेशमूर्ती दान करण्यास सांगणार्‍या तथाकथित सुधारकांना घनकचरा, सांडपाणी, उद्योग, ई-कचरा यांमुळे होणार्‍या प्रदूषणाविषयी खडसवा !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
      गणेशोत्सव जवळ आला आहे. आता नेहमीप्रमाणे स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते सक्रीय होतील. गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा अभाव आणि कथित पुढारलेपण यांमुळे अनेक जण त्यांच्या नादालाही लागले; पण आता हे स्वयंघोषित समाजसुधारक आणि समाजसेवक यांचे पितळ उघडे पडत आहे. गणपतीच्या मूर्तीला लावण्यात येणार्‍या रंगांमुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे अशा मूर्ती तलाव, नद्या, खाड्या, समुद्र यांत विसर्जित न करता, कृत्रिम तलावांत विसर्जित करण्याची किंवा त्या स्वयंघोषित संघटनांना दान देण्याची फॅशन चालू झाली.

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक जोडप्याची आवश्यकता !

संतसेवेची सुवर्णसंधी !
      पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक जोडप्याची आवश्यकता आहे. जे सेवक जोडपे या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 
भ्रमणभाष : ८४५१००६०७० 
इ-मेल : hinducoordination@gmail.com 
प.पू. दास महाराजांच्या आश्रमात दिवसभरात करावयाच्या सेवांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. 
१. आश्रम आणि मंदिर यांची, तसेच परिसराची स्वच्छता 
२. स्वयंपाक आणि स्वयंपाकघराशी संबंधित सेवा करणे 
३. मंदिरातील आणि परिसरातील देवतांची पूजा करणे
४. आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची देखभाल करणे
५. आश्रमात एक गाय पाळण्यात येणार आहे. तिची देखभाल करणे.
६. प.पू. दास महाराज यांची सेवा (औषधे देणे, कपडे धुणे, पायाचे मर्दन करणे आदी) 
७. आश्रमासाठी लागणार्‍या वस्तूंची बाजारपेठेतून खरेदी करणे 
८. आश्रमात आयोजित करण्यात येणार्‍या रामनवमी आणि हनुमान जयंती या धार्मिक उत्सवांमध्ये सेवा करणे
      महाराष्ट्रात जात (म्हणजे मराठा) वाद एवढा वाढला आहे की, महाराष्ट्रास दुसरे काही शुभ सुचूच शकत नाही. सारे संपादक समाजवादी. सारे टी.व्ही. अँकर्स हटकून डावे (म्हणजे विकले गेलेले.) - दादूमिया (धर्मभास्कर, जून २०१५)

मुंबईच्या छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनसमध्ये सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम हे धर्मद्रोही पथनाट्य सादर करून शेकडो प्रवाशांची दिशाभूल करण्याचे अंनिसचे कारस्थान !

छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनसमध्ये अनुमती
नसलेले पथनाट्य सादर करतांना अंनिसवाले
श्री. शिवाजी वटकर
१. मुंबई येथील रहदारीचे आणि संवेदनशील ठिकाण
असणार्‍या छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनसमध्ये स्टेशन मास्तरच्या कार्यालयासमोर गाणे बजावणे चालू असणे आणि त्या ठिकाणी
पुष्कळ गर्दी झाल्याने वाहतुकीला अडथळा येणे
      २०.७.२०१५ या दिवशी मुंबईच्या छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनसमध्ये आलो. तेथे गाण्याबजावण्याचा आवाज ऐकू येत होता. पुष्कळ गर्दी जमली होती. रहदारीला अडथळा येत होता. जिज्ञासा म्हणून पाहिले, तर तेथे लाल पोशाखातील पुरुष आणि महिला रिंगण घालून गाणे म्हणत नाचत होत्या.

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येचा थोडासा उलगडा !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर
स्थळ : दक्षिण मुंबईतील एशियाटीक वाचनालय (टाऊन हॉल असाही उल्लेख केला जातो.)
दिवस आणि वेळ : मंगळवार, १ सप्टेंबर २०१५, सायंकाळी ६ वाजता.
पार्श्‍वभूमी
      सोशल मिडीयामध्ये आजच्या दिवशी वरील स्थळी कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ जमायचे आहे, असे संदेश फिरू लागल्यानंतर पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, एशियाटीक वाचनालयाचे विश्‍वस्त, हा परिसर ज्यांच्या प्रभुत्वाखाली येतो ते मुंबईचे जिल्हाधिकारी या सर्वांकडे दुपारी ४ वाजेपर्यंत लेखी तक्रारी करण्यात आल्या. शेकडो जागरूक नागरिकांनी १०० या क्रमांकावर दूरभाष करून तक्रारी नोंदवल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार आझाद मैदानाच्या पलीकडे मोर्चे, निदर्शने, आंदोलने इत्यादींना बंदी आहे. आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठीही लेखी अनुमती आगाऊ घ्यावी लागते.

साहाय्य करणारा श्रीकृष्ण प्रत्येक क्षणी समवेत असतांना त्याच्याकडे साहाय्य न मागता इतरत्र धाव घेत असल्याची जाणीव एका कठीण प्रसंगाद्वारे होणे

प्रत्येक प्रसंगात केवळ श्रीकृष्णच साहाय्य करू शकतो, हे दर्शवणारे सौ. उमा रविचंद्रन् यांनी काढलेले चित्र
सौ. उमा रविचंद्रन्
१. चित्र रेखाटण्यासाठी कारणीभूत ठरलेला प्रसंग आणि चित्राचा भावार्थ !
१ अ. मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली असतांना तिने साधिकेवर अवलंबून न रहाता भगवान श्रीकृष्णावर रहायला हवे, याची जाणीव होणे : मध्यंतरी माझी दुसरी मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी ती पूर्णपणे माझ्यावर अवलंबून रहायची. तिला साहाय्य करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करायचे. या स्थितीतून तिला बाहेर काढण्याची क्षमता माझ्यात नसून संपूर्ण शरणागती पत्करल्यास केवळ भगवान श्रीकृष्णच तिला साहाय्य करू शकतो, याची जाणीव एका कठीण प्रसंगी आम्हा दोघींनाही झाली. त्या वेळी मी तिला साहाय्य करू शकते आणि ते माझ्या आवाक्यात आहे, हा माझा अहं असल्याची जाणीवही मला झाली.

सनातन हिंदु मोर्चाचे अध्यक्ष, नेपाळ येथील डॉ. माधव भटराई यांची बोलण्यातील हुशारी !

डॉ. माधव भटराई
प.पू. डॉक्टर : येथे लोक या पक्षात जातात, त्या पक्षात जातात. साधकांकडे असा पक्ष नसतो.
डॉ. माधव भटराई : नेपाळी लोक म्हणतात, आम्ही भगवंताच्या पक्षात राहू !
(१३.५.२०१५)
(चतुर्थ राष्ट्रीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी यांचा आध्यात्मिक स्तर ६१ झाल्याचे घोषित करण्यात आले.)

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

हिंदुत्ववादी संघटनांना आरोपी ठरवून
मिडिया ट्रायल नको !
- भाजपचे आमदार राम कदम
    डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणी अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. चौकशी पूर्ण होण्याआधीच एखाद्या संघटनेवर, समाजावर दोषारोप करून मिडिया ट्रायल करणे योग्य नव्हे. या खुनांच्या निमित्ताने घृणास्पद राजकारणाचा अतिशय दुर्दैवी पायंडा पडतो आहे.
------
देशातील सात राज्यांत हिंदु अल्पसंख्यांक 
आणखी काही वर्षांत हिंदुस्थानातच हिंदु अल्पसंख्यांक झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
    देशात आता ख्रिस्ती आणि मुसलमान हेच केवळ अल्पसंख्य राहिले नसून बहुसंख्य समजला जाणारा हिंदु समाजही देशातील ७ राज्यांमध्ये अल्पसंख्य झाला आहे. काही राज्यांत तर हिंदूंची लोकसंख्या १० टक्क्यांहून न्यून झाली आहे. शासनाने नुकत्याच घोषित केलेल्या धर्मनिहाय जनगणनेवरून हे वास्तव उघड झाले. हिंदूंच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.

चौकटी

     कलबुर्गी, पानसरे, दाभोलकर यांची हत्या कुणी केली ?, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे; मात्र त्यांची हत्या कदाचित् हिंदुत्ववाद्यांनी केली, असे गृहित धरले, तरी ती हत्या का झाली ? याचाही विचार व्हायला हवा. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी हे तिघेही सातत्याने हिंदु धर्मविरोधी प्रसार, तसेच विधाने करत होते. जेव्हा हिंदुविरोधी कृत्ये घडतात, तेव्हा त्यांचा प्रतिवाद करणे हे हिंदुत्ववाद्यांचे कर्तव्य आहे. डॉ. कलबुर्गीसारखे लोक देवतेच्या मूर्तीवर लघवी केली, तर देवता माझे काही बिघडवणार नाहीत, असे धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य वारंवार करत असतात. त्यामुळे कदाचित् ज्यांची धर्मभावना अतीशय तीव्र आहे, त्यांच्या सहिष्णुतेचा अशा विधानांमुळे अंत होऊ शकतो
- श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.
    (स्वतःला पुरोगामी म्हणवणारे ज्या अश्‍लील आणि असभ्य भाषेत देवतांविषयी बोलतात, तो त्यांचा विवेकवाद समजायचा का ? - संपादक)

उघड गुन्हे न दिसणारे भाजप शासन राज्य करण्याच्या क्षमतेेचे आहे का ?

    गोवा राज्यातील कळंगुट पंचायतीमध्ये अनेक अनधिकृत मद्यालये आणि डान्स बार कार्यरत आहेत; पण यावर शासन काहीच कारवाई करत नाही. याउलट शासन या अनधिकृत कामांना पाठिंबा देत आहे, असा आरोप कळंगुट पंचायतीचे प्रभारी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना केला.
    शासनाला मद्यालये आणि डान्स बार यांसंदर्भात कृती करण्याची इच्छाच नसल्यामुळे शासन त्याकडे दुर्लक्ष करते ! जनतेला वाममार्गाला लावणार्‍या अशा राज्यकर्त्यांना सत्ताच्युत करून नीतीमान शासनकर्ते सत्तास्थानी येण्यासाठी आता जनतेने एकजूट दाखवावी !

देशाच्या संपत्तीत न्याय्य वाटा, निर्णयप्रक्रियेत स्थान आणि मुसलमानांचे सक्षमीकरण हा या देशातील मुसलमानांचा अधिकार आहे. त्यामुळे केंद्रशासनाने मुसलमानांशी केल्या जात असलेल्या भेदभावाची चूक सुधारावी. - हमीद अन्सारी, उपराष्ट्रपती


काही झाले की, लगेच दंगली करणारे धर्मांध ! अशा धर्मांधांना रोखू न शकणार्‍या निष्क्रीय पोेलिसांना निलंबित करा !

    कोलवा (गोवा) येथील अकबार गाझी या रुग्णाचा हॉस्पिसियो रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करून मडगाव शहरात २६ ऑगस्ट २०१५ या दिवशी मृतकाच्या निकटवर्तियांनी शहरातील काही रस्ते अडवले आणि हॉस्पिसियो रुग्णालयाची मोडतोड केली. पोलिसांनी मात्र अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

हिंदूंना अशी मागणी करावी लागते, हे भाजप शासनाला लज्जास्पद ! हज यात्रेला सर्व सुविधा पुरवणारे गणेशोत्सवाकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !

    श्री गणेशचतुर्थीच्या काळात बस्तोडा, तार येथील नदीच्या पात्रात गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होते; या नदीच्या पात्रात गाळ साचल्यामुळे मूर्तीविसर्जनात अडचण येते. त्यामुळे श्री गणेशचतुर्थीच्या पूर्वी या ठिकाणचा गाळ काढून टाकावा, अशी मागणी करणारे निवेदन मयडे येथील धर्माभिमानी नागरिकांनी म्हापसाचे उपजिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर यांना दिले.

पुरुषांनी टिळा आणि स्त्रियांनी कुंकू लावण्याचे सप्तर्षींनी सांगितलेले महत्त्व !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
     हिंदु संस्कृतीनुसार पुरुषांनी कपाळावर टिळा लावणे आणि स्त्रियांनी कुंकू लावणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. टिळा किंवा कुंकू लावल्यामुळे आज्ञाचक्र जागृत रहाते आणि त्या माध्यमातून वातावरणातील ईश्‍वरी लहरी ग्रहण करणे सुलभ होते. या ईश्‍वरी लहरींमुळे अनुसंधान टिकून राहून जिवाभोवती संरक्षक कवच निर्माण होते; मात्र सध्या हिंदुमनावर पाश्‍चात्त्यांचा पगडा असल्यामुळे कुणीही धर्माचरण करत नाही.
२३.८.२०१५ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी देहली येथील साधक श्री. संजीव कुमार यांच्या निवासस्थानी नाडीवाचन केले. तेव्हा सप्तर्षींनी हिंदु स्त्रिया आणि पुरुष यांनी कपाळावर अनुक्रमे कुंकू अन् टिळा लावण्याचे महत्त्व सांगितले.

कितीही मोठे वैद्य झालो, तरी खर्‍या आनंदापासून आपण दूर असू, याची जाणीव होऊन पूर्णवेळ साधना करण्याचा दृढनिश्‍चय करणारी आणि कुटुंबियांनी केलेल्या तीव्र विरोधाला सामोरे जाऊन आश्रमजीवन अंगीकारणारी एक साधिका !

      ही लेखमाला वाचून साधनेसाठी घर सोडू इच्छिणार्‍यांना मनाची तयारी कशी करायची, हे शिकायला मिळेल. त्यांचा पूर्ण वेळ साधक होण्यासंदर्भातील विश्‍वास वाढेल. तीव्र तळमळ असलेल्यांना घरून विरोध असूनही साधना करण्यास धैर्य येईल आणि इतरांना दिशा मिळेल. -(परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१०.२०१४)
      साधकांना त्रास देणार्‍या आणि सनातनवर नाहक आरोप करणार्‍या अशा पोलिसांची आणि पोलीस अधिकार्‍यांची नावे सनातनने संग्रही ठेवली आहेत. हिंदु राष्ट्रात त्यांना आजन्म साधनेची शिक्षा करण्यात येईल ! - संपादक 
     वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर नोकरी वा व्यवसाय करून नाव मिळवण्यापेक्षा देश आणि धर्म यांची दुःस्थिती पाहून देशासाठी काहीतरी करायला हवे, असा विचार करणारी एक साधिका शिक्षण पूर्ण झाल्यावर सनातन संस्थेच्या संपर्कात आली. तेथे तिला सत्सेवेत आनंद मिळू लागला आणि आपण कितीही मोठे वैद्य झालो, तरी खरा आनंद या सत्सेवेपासून पुष्कळ दूर असल्याची जाणीव झाली.

गणेश चतुर्थी, पितृपक्ष, नवरात्र यांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, ध्वनीचित्र-चकत्या, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना
     सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ या कालावधीत गणेश चतुर्थी, पितृपक्ष, तसेच नवरात्र असणार आहे. त्या निमित्ताने ग्रंथ, ध्वनीचित्र-चकत्या, सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी गुरुकृपेमुळे लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेल्या प्रसारसाहित्याचे अधिकाधिक वितरण करावे. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या काळानुसार करावयाच्या नामजपाची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV) या उपकरणाच्या साहाय्याने अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

साधकांनो, वैज्ञानिक उपकरणाद्वारे सिद्ध झालेले
काळानुसार करावयाच्या नामजपाचे महत्त्व जाणून, तो भावपूर्ण करा !
    परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार करावयास सांगितलेला नामजप उच्च प्रतीची सकारात्मक स्पंदने असणार्‍या कक्षात बसून केल्यास तो किती परिणामकारक ठरतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी १७.१.२०१५ या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे बायो-वेल जी.डी.व्ही. उपकरणाच्या (Bio-well GDV Device च्या) द्वारे चाचणी घेण्यात आली. अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी ही चाचणी सिक्स सिग्मा अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स्ड कंट्रोल्स या अमेरिकेतील जगप्रसिद्ध आस्थापनाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रदीप देशपांडे यांनी घेतली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. यातून पुढील गोष्टी वाचकांच्या लक्षात येतील.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मक रहा !
    जगात यशाचीच पूजा केली जाते. मी यशस्वी होणारच, असे म्हणणारी आणि सकारात्मक वागणारी व्यक्तीच सर्वांना हवीहवीशी वाटते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

दुसरा आणि स्वतः

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
       दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


योग्य प्रकारे मंत्र म्हणण्यामागील शास्त्र आणि घाईघाईत मंत्र म्हणणार्‍या पुरोहितांमुळे त्यांच्यावर आणि यजमानांवर होणारा विपरीत परिणाम

१. योग्य प्रकारे मंत्र म्हणण्यामागील शास्त्र : मंत्र स्पंदनशास्त्राशी निगडित असल्याने मंत्र म्हटल्यावर मंत्रानुसार त्या त्या देवतेची शक्ती, म्हणजेच स्पंदने निर्माण होतात. योग्य लयीत आणि शुद्ध उच्चार न केल्यास त्यातून अयोग्य स्पंदने निर्माण होतात. परिणामी केलेल्या विधीच्या संकल्पपूर्तीसाठी ती शक्ती कार्य करू शकत नाही, उदा. धनुष्यातून बाण सोडल्यावर नियोजित कार्य केल्याविना त्याला थांबवता येत नाही आणि तो योग्य प्रकारे न सोडल्यास लक्ष्यभेद न करता बाण सोडणार्‍याचीच हानी करतो.
२. घाईघाईत मंत्र म्हणणार्‍या पुरोहितांमुळे त्यांच्यावर आणि यजमानांवर होणारा विपरीत परिणाम बहुतेक सर्वच पुरोहित ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । हे इतक्या जलद गतीने म्हणतात की, प्रत्येक नावाबरोबर यजमानाला एकदा जे आचमन करायचे असते, त्यासाठी वेळ मिळत नाही. तसे अतीजलद म्हटल्याने शब्द एकमेकांत मिसळतात. मंत्र योग्य प्रकारे न म्हटल्यास जी शक्ती निर्माण होते, त्या शक्तीचा यजमान आणि पुरोहित यांच्यावर विपरीत परिणाम होतो.
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती 
१. असे करणारे पुरोहित ज्ञात असल्यास त्यांच्याकडून धार्मिक विधी करून घेऊ नका.
२. चांगल्या आणि अयोग्य पुरोहितांची नावे सनातन प्रभातला कळवा. त्यामुळे वाचकांना कोणाला बोलवावे आणि कोणाला बोलावू नये, हे सांगता येईल. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.८.२०१५) 

हिंदु धर्मच खरा साम्यवाद शिकवतो !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
हिंदु धर्म सांगतो, 
सर्वं खल्विदं ब्रह्म । 
- छान्दोग्योपनिषद्, अध्याय ३, खण्ड १४, मंत्र १
अर्थ : (चराचर, परा-अपरा, जड-चेतन) हे सर्व खरोखर ब्रह्म(च) आहे.
हिंदु धर्म हे नुसते सांगत नाही, तर त्याची अनुभूती येण्यासाठी काय करायचे, हेही शिकवतो. साधनेने सर्वत्र ब्रह्मच आहे, याची अनुभूती आल्यावर व्यक्ती सर्वत्र समभावाने बघू लागते. साम्यवाद्यांच्या शिकवणीचा असा परिणाम आतापर्यंत एकावरही झालेला नाही. उलट साम्यवादाने भांडवलशाहीच्या विरोधात प्रचार करून प्रचंड हत्याकांडे केली आहेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.८.२०१५) 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

सहानुभूती कि कर्तव्य !

        ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हे मुसलमानबहुल असे एक शहर. या शहरात उभी राहिलेली नूरजहाँ ही सहा मजली इमारत अनधिकृत होती. ती तोडण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक गेले असता त्या पथकाला एका भयानक प्रसंगाला तोंड द्यावे लागले. संबंधित इमारतीवर कारवाई करू नये; म्हणून चक्क ४० महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. यापुढील त्यांच्या सिद्धतेविषयी सांगायची आवश्यकता नाही. अर्थात् तशी काही वेळ आली नाही; मात्र पथकाला त्यांचे काम अर्धवट सोडून माघारी यावे लागले. असेच जर होत असेल, तर मुंब्रा शहरातील अनधिकृत इमारती पाडायच्या कशा ? हा प्रश्‍न पालिका अधिकार्‍यांसमोर उभा आहे. येथे एक प्रश्‍न उपस्थित होतो तो म्हणजे सहा मजली इमारत उभी राहीपर्यंत नगरपालिकेचे अधिकारी होते कुठे ? हे अधिकारी आता स्वतः प्रश्‍न उपस्थित करत आहेत की, असाच विरोध पुढे होत राहिला, तर अनधिकृत इमारती पाडायच्या कशा ?

आत्मविश्‍वासाचा अतिरेक नको !

    आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.च्या कारवायांत सहभागी होण्याचा मनोदय असणे आणि त्याचबरोबर इतरांनाही त्यासाठी उद्युक्त करणे, अशा आरोपांखाली संयुक्त अरब अमिरात या देशाने ११ भारतियांना नुकतीच अटक केली. चार दिवसांपूर्वी याच देशातून अशाच कारणावरून दोन भारतीय नागरिकांना परत भारतात पाठवण्यात आले होते. ते दोघे केरळ राज्यातील रहिवाशी होते. आय.एस्.आय.एस्.ने जगभर पोहोचण्याचा निर्धार केला आहे आणि ही संघटना अफगाणिस्तानच्या दिशेने भारतीय सीमेजवळ येऊन पोहोचली आहे, असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn