Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचारपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचारपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     जनतेवर सात्त्विकतेचे संस्कार न करता शिक्षेच्या भीतीने जनता गुन्हेगारी वृत्तीची होणार नाही, असे समजणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे सर्वपक्षीय राज्यकर्ते राज्य करण्याच्या लायकीचे आहेत का ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.९.२०१५)

कोटी कोटी प्रणाम !

प.प. टेंब्येस्वामी यांची आज जयंती

काश्मीरमध्ये चकमकीत एक सैनिक हुतात्मा, तर १ आतंकवादी ठार !

आतंकवाद्यांच्या आक्रमणात प्रतिदिन सैनिक मरू देणारा जगातील एकमेव देश भारत !
      श्रीनगर, २ सप्टेंबर - जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आतंकवाद्यांसह झालेल्या चकमकीत एक भारतीय सैनिक हुतात्मा झाला, तर १ आतंकवादीही ठार झाला. बारामुल्ला जिल्ह्यातील राफियाबाद ३ आंतकवादी लपले आहेत, अशी माहिती सैन्याला मिळाल्याने या भागात शोधमोहीम चालू करण्यात आली होती.

रा.स्व. संघ आणि भाजप यांच्यातील समन्वय बैठकीस आरंभ

राममंदिर उभारण्यात होणार्‍या दिरंगाईमुळे जनतेत चुकीचा संदेश ! - विहिंप
    नवी देहली - येथील मध्यांचल भवन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील तीन दिवसांच्या समन्वय बैठकीस २ सप्टेंबर या दिवशी आरंभ झाला. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे अनेक ज्येष्ठ नेते, संघाशी संबंधित १५ संघटनांचे नेते, तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप अध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आदी नेते सहभागी झाले. बैठकीच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ४ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी या बैठकीत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभनगरी नाशिक येथे भव्य प्रदर्शन सनातनला भगवंताचे अशीर्वाद मिळावेत ! - महामंडलेश्‍वर श्री बाबा बलरामदासजी

डावीकडून प्रदर्शन दाखवतांना श्री. विनय पानवळकर, सनातनचे
पू. नंदकुमार जाधव, श्री माधवदास महाराज, महामंडलेश्‍वर श्री बाबा
बलरामदासजी महाराज, तुकाराम महाराज पाटील
     नाशिक, २ सप्टेंबर (वार्ता.) - तुमचे हे कार्य पुष्कळ वाढो, केवळ व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण सनातन संस्थेलाच भगवंताचे शुभाशीर्वाद मिळावेत, अशी मी योगेश्‍वर कृष्णचरणी प्रार्थना करतो. ज्या संस्कृतीतून आपण आलो, वाढलो, त्या संस्कृतीचे आपण पूर्णत: आचरण करायला हवे. अशा महान संस्कृतीचा प्रचार करायलाच हवा. धर्म टिकवण्याकरिता हे प्रदर्शन अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वृंदावन क्षेत्रातील रमणरेती येथील महामंडलेश्‍वर श्री बाबा बलरामदासजी महाराज यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपराष्ट्र्रपतींना प्रश्‍न मुसलमानांना समान वागणूक पाहिजे, मग समान नागरी कायदा का नको ?

उपराष्ट्र्रपती अन्सारी यांनी  क्षमा मागावी ! - विश्‍व हिंदु परिषद
     उपराष्ट्र्रपती अन्सारी यांनी देहलीत एका कार्यक्रमात बोलतांना मुसलमानांच्या मागास स्थितीच्या संदर्भात केंद्रशासनाला उत्तरदायी धरून वक्तव्य केले. अन्सारी यांनी त्यांच्या या वक्तव्याविषयी जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेकडून करण्यात आली. असे वक्तव्य केल्याविषयी अन्सारी यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे सुरेंद्र जैन यांनी केली.
८०० वर्षे हिंदूंंवर अत्याचार झाले,त्याचे काय ? - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
     उपराष्ट्र्रपतींनी मुसलमानांना समान वागणूक मिळत नाही; म्हणून दु:ख व्यक्त केले आहे; मात्र मोगल आक्रमकांनी गेली ८०० वर्षे हिंदूंचा वंशसंहार, बलात्कार, बळजबरीने धर्मांतर केले, त्यावरही दु:ख व्यक्त करावयास हवे होते, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी त्यांच्या संकेतस्थळावर व्यक्त केले आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण स्वतंत्र भारताच्या अस्मितारक्षणासाठी आवश्यक ! - हिंदु जनजागृती समिती

औरंगजेबप्रेमी साहित्यिक सदानंद मोरे आणि नेमाडे यांचा महाराष्ट्राच्या भूमीशी द्रोह !
      मुंबई - इतिहासात क्रूरतेसाठी ओळखल्या जाणार्‍या औरंगजेबाचा महाराष्ट्रातील साहित्यिक सदानंद मोरे आणि भालचंद्र नेमाडे यांना मोठा पुळका आला असून राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे. मोरे यांनी औरंगजेबाचा भाऊ दाराशुकोह याला धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र बहाल करून त्याचे नाव औरंगाबादला देण्याची सूचना केली आहे, तर नेमाडे यांनी अगोदर तेथे पाणीपुरवठा करण्यास सांगितले आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्यासाठी बलीदान करणारे छत्रपती संभाजीराजे यांचे नाव जिल्ह्याला देणे हा एक सन्मानच आहे.

देशव्यापी संपात १५ कोटी कामगारांचा सहभाग

संप करून राष्ट्राची हानी करणे, हा राष्ट्रद्रोहच होय ! अशा संपाला सनातनचा नेहमीच विरोध राहील !
२५ सहस्र कोटी रुपयांच्या हानीची शक्यता
      नवी देहली - केंद्रशासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आणि त्यांच्या १२ सूत्री मागण्यांसाठी काँग्रेस आणि देशातील कम्युनिस्ट समर्थित १० कामगार संघटनांनी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला. त्यामुळे २ सप्टेंबर या दिवशी १५ कोटी कर्मचारी आणि कामगार संपावर होते. या संपामुळे देशभरातील अधिकोष (बॅँका), विमा, पोस्ट, वाहतूक, प्राप्तीकर यांसारख्या अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला, तसेच अनेक ठिकाणी हिंसक घटनांमुळे सामान्य जनतेला अडचणींना सामोरे जावे लागले.

मदरशांमध्येही झेंडावंदन झाले पाहिजे ! - उच्च न्यायालय

      मदरशांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी न्यायालयाला सांगावे लागते. हे शासनाला का
कळत नाही ? मदरशांना शासकीय अनुदान चालते, मग राष्ट्रध्वजाला वंदन का चालत नाही ?      
     प्रयाग (अलाहाबाद) - १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मदरशांमध्येही झेंडावंदन झाले पाहिजे, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे; तसेच यासंदर्भात उत्तरप्रदेश शासनाने पावले उचलावीत, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.
      यंदा उत्तरप्रदेशमधील अलिगड येथील एकाही मदरशावर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावण्यात आला नव्हता. त्यासंदर्भात श्री. अरुण गौड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी शासकीय कार्यालये आणि विद्यालये यांंप्रमाणेच मदरशांमध्येही झेंडावंदन करावे, अशी मागणी गौड यांनी केली होती. या याचिकेवर १ सप्टेंबर या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय्. चंद्रचूड आणि यशवंत वर्मा यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली.

संस्कृत भाषेतील व्याकरण आणि शुद्धतेचे महत्त्व यांची जाणीव तरी आहे का ?

संस्कृत भाषेच्या पाठ्यपुस्तकामधील चुकांचे प्रकरण 
विद्यार्थ्यांना व्याकरणदृष्ट्या चुकीचे
संस्कृत शिकवून देवभाषा संस्कृतचे अवमूल्यन 
करणार्‍या शिक्षण मंडळातील उत्तरदायींना आजन्म 
कारागृहात पाठवून संस्कृत भाषेची महती शिकवायला हवी ! 
संस्कृततज्ञांचा संपादन मंडळातील सदस्यांना प्रश्‍न 
 संस्कृत भाषेच्या पाठ्यपुस्तकांतील काही चुका आणि त्यांचे संस्कृततज्ञांनी सांगितलेले परिणाम 
१. या पुस्तकांतील संस्कृत मराठी वळणाचे आणि अशुद्ध असल्याने धडे अनाकर्षक झाले आहेत. अशा धड्यांमुळे विद्यार्थ्यांना संस्कृत विषयी गोडीच निर्माण होणार नाही. 
२. या पुस्तकांमध्ये मुद्रण आणि व्याकरणाच्या अनेक चुका आहेेत. 
३. संस्कृत भाषेचे मराठीकरण करण्यात आले आहे. 
४. दहावीच्या पुस्तकात 'विशेषप्रतिमा' हे मराठी विशेषण जसेच्या तसे वापरले आहे. संस्कृतमध्ये 'प्रतिमाविशेष:' असे हवे होते. 

निष्पाप बालकांच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍यांना फाशी द्या !

ओडिशामध्ये शिशू भवन रुग्णालयात 
गेल्या पाच वर्षांत ५ सहस्र ९०० बालकांचा मृत्यू 
     भुवनेश्‍वर - 'शिशू भवन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या रुग्णालयामध्ये गेल्या पाच वर्षांत ५ सहस्र ९०० बालके मृत्यूमुखी पडली आहेत. ओडिशा राज्यातील कटक येथील वल्लभभाई पटेल बाल आरोग्यकेंद्रातही गेल्या १० दिवसांत ४५ बालकांचा मृत्यू झाला आहे. याविषयी लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ओडिशा शासनाने हे मृत्यूसत्र थांबवण्यासाठी प्रयत्न चालवले असून अनुभवी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे. (इतक्या बालकांचा मृत्यू झाल्यावर जागे होणारे ओडिशा शासन जनताद्रोहीच ! पहिल्या बालकाच्या मृत्यूनंतर त्वरित प्रशासनाने याचा शोध घेऊन याला उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई केली असती, तर पुढील अनर्थ टळला असता ! - संपादक) 

विद्यार्थिनींच्या लैंगिक सतावणुकीची चौकशी करण्यास मडगावच्या रोझरी महाविद्यालयाकडून अक्षम्य हलगर्जीपणा !

नेमलेली चौकशी समिती नियमबाह्य असल्याने चौकशी
समिती पुन्हा स्थापन करण्याचा गोवा विद्यापिठाने दिला होता आदेश !
असभ्य वर्तन आणि लैंगिक सतावणूक केल्याविषयी विद्यार्थिनी आणि शिक्षक
यांनी गोवा विद्यापीठ, तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून एक वर्ष झाले, तरी काहीच
कारवाई का झाली नाही ? प्राचार्य ख्रिस्ती पाद्री आहेत; म्हणून शासन त्यांना पाठीशी घालत आहे,
असे समजायचे का ? शासन डायोसेसन शिक्षण संस्थेचे महाविद्यालय असल्याने कारवाई करत
नाही का ? अशी स्थिती असेल, तर कायदा आणि सुव्यवस्था शासन कशी राखणार ?
      पणजी - सासष्टी तालुक्यातील रोझरी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तेथील विद्यार्थिनींशी केलेले असभ्य वर्तन आणि लैंगिक सतावणूक यांविरुद्ध विद्यार्थिनी अन् काही शिक्षक यांनी केलेल्या तक्रारीची महाविद्यालय व्यवस्थापनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी गोवा विद्यापिठाकडे तक्रार केली होती. गोवा विद्यापिठाने तक्रारीला अनुसरून व्यवस्थापनाला चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले; मात्र गोवा विद्यापिठालाही यासंदर्भात या महाविद्यालयाने दाद दिलेली नाही.

देहलीतील मार्गांना देण्यात आलेली मुसलमान आक्रमकांची नावे पालटा !

हिंदु महासभेची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी 
छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, 
मदन मोहन मालवीय यांची नावे देण्याची मागणी 
     नवी देहली - देहलीत अनेक मार्गांना आजही मुसलमान आक्रमकांची नावे आहेत. या राजांनी भारतीय संस्कृती आणि हिंदूंच्या मंदिरांची अतोनात हानी केली आहे. हिंदूंचा अनन्वित छळ केला. अशा हिंदुद्वेष्ट्या मुसलमान राजांची नावे पालटून त्या मार्गांना छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदन मोहन मालवीय, नथुराम गोडसे यांची नावे देण्यात यावी, अशी मागणी हिंदु महासभेने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? शासन स्वत:हून हे का करीत नाही ? - संपादक) 

मणीपूर येथील हिंसाचारात ८ ठार, ३१ घायाळ

     इम्फाळ - मणीपूर विधानसभेत ३१ ऑगस्टला काही वादग्रस्त विधेयके मंजूर झाल्यानंतर चुडाचंदपूर जिल्ह्यात भडकलेल्या हिंसाचारात आणि पोलिसांच्या गोळीबारात ८ जण ठार, तर ३१ घायाळ झाले. या घटनेमुळे शहरात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

केरळमध्ये संघनेत्याच्या हत्येच्या प्रथम स्मृतीदिनी हत्येच्याच ठिकाणी समाजकंटकांनी वीज खांबावर कुत्र्यांना मारून लटकवले !

या घटनांविषयी प्रसिद्धीमाध्यमे गप्प का? भाजप 
आणि संघ यांनी केवळ आरोप करणे अपेक्षित नाही, तर 
धर्मद्रोह्यांना  आता शक्ती दाखवायला हवी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! 
 साम्यवाद्यांचे कृत्य असल्याचा भाजप आणि संघ नेत्यांचा आरोप 
     कन्नूर (केरळ) - जिल्ह्यातील पूर्व कथीरून भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते ई. मनोज यांच्यावर बॉम्बने आक्रमण करून त्यांना एक वर्षापूर्वी मारण्यात आले होते. या हत्येच्या पहिल्या स्मृतीदिनी म्हणजे १ सप्टेंबर या दिवशी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे शव समाजकंटकांना विजेच्या खांबाला लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. या कृत्यामागे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) असल्याचा आरोप भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्या नेत्यांनी केला आहे. 

हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे, हेच आमचे ध्येय ! - संभाजी साळुंखे

हिंदू संघटन मेळाव्यात मार्गदर्शन करतांना श्री. संभाजी साळुंखे,
शेजारी श्री. शिवानंद स्वामी आणि पू. प्राणलिंग स्वामिजी
      यरनाळ (ता. चिकोडी, कर्नाटक), २ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी, तसेच देशात हिंदु समाज एकत्रित रहाण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र निर्माण करणे, हेच आमचे ध्येय आहे. राजकीय नेत्यांनी निर्माण केलेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे हिंदु धर्मावर सातत्याने आघात होत आहेत. हिंदु धर्मावर मुसलमानांकडून होणारे अत्याचार आणि ख्रिस्त्यांचे लाड थोपवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, असे मार्गदर्शन बजरंग दलाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख श्री. संभाजी साळुंखे यांनी व्यक्त केले. या मेळाव्यात समाधी मठाचे पू. प्राणलिंग महास्वामीजी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, तसेच श्रीराम सेनेचे श्री. सागर श्रीखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यासाठी ४५० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

शान-ए-पाकिस्तान हा कार्यक्रम रहित करा ! - सांगली आणि कोल्हापूर येथे निवेदन

कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
    सांगली/कोल्हापूर, २ सप्टेंबर (वार्ता.) - जोपर्यंत पाकिस्तान आतंकवाद आणि काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना सहकार्य करणे बंद करत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडायला हवेत. या दृष्टीने भारत शासनाने वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत १० ते १२ सप्टेंबर या काळात देहली येथे आयोजित केलेला शान-ए-पाकिस्तान हे प्रदर्शन आणि एक शाम पाकिस्तान के नाम ही कव्वाली रहित करावी, या मागणीसाठी कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना, तर सांगली येथे जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांना हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदने देण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करणार - चंद्रकांत जाधव

शिवसेनाप्रमुख श्री. चंद्रकांत जाधव यांना निवेदन देतांना समितीच्या कार्यकर्त्या
     सातारा, २ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमांतून समिती करत असलेले धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांचे कार्य कौतुकास्पद आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवात राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांना शिवसेना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्‍वासन सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख श्री. चंद्रकांत जाधव यांनी दिले.
      शहरातील काही धर्मद्रोही संघटना आणि नगरपालिका यांच्या वतीने अनुक्रमे गणपतीदान आणि कृत्रिम तलाव या धर्मद्रोही मोहिमा राबवण्यात येणार आहेत. याला विरोध दर्शवण्यासाठी समितीच्या वतीने जनप्रबोधन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री. चंद्रकांत जाधव यांची समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन धर्मद्रोही मोहिमांविरोधात निवेदन दिले. तेव्हा त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना आश्‍वस्त केले.

आय.एस्.आय.एस्.ने ४ जणांना जिवंत जाळले

आय.एस्.आय.एस्.च्या क्रूर आतंकवाद्यांना 
सामोरे जाण्याची सिद्धता भारताने केली आहे का ?
     बगदाद (इराक) - क्रूर जिहादी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.ने इराकच्या अनबर प्रांतात ४ बंदीवानांना जिवंत जाळले. याविषयीची ध्वनीचित्रफित आतंकवाद्यांनी प्रसारित केली आहे. कोंबड्या किंवा मांस ज्या प्रकारे भाजले जाते, त्याप्रमाणे नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या या ४ बंदीवानांना साखळदंडाने आडवे बांधण्यात आले. त्यानंतर त्यांच्या खाली आग लावण्यात आली. त्यात त्यांचा भाजून मृत्यू झाला. जाळण्यात आलेले चारही बंदीवान हे इराक शासनाचे समर्थक असून पॉप्यूूलर शिया मिलिशिया ग्रुप या संघटनेचे सदस्य असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रसारकार्याला प्रसारमाध्यमांकडून भरघोस प्रसिद्धी !

     नाशिक, २ सप्टेंबर (वार्ता.) - नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे सिंहस्थपर्वात अधिकाधिक धर्मप्रसार करण्याची संधी असल्याने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून दोन्ही ठिकाणी व्यापक स्वरूपात धर्मप्रसाराचे कार्य चालू आहे. त्याकरता विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत असून त्यांना अन्य दैनिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. वृत्तपत्रांतील प्रसिद्धीमुळे प्रदर्शनाकडे भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी जमू लागली आहे. 

अकोला येथे विक्रीसाठी जात असलेले १५ क्विंटल गोवंशाचे मांस शासनाधीन

राज्यशासन गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कधी करणार ?
      अकोला, २ सप्टेंबर - राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतरही गोवंशाची मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात येत असल्याच्या घटना या दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना १ सप्टेंबर या दिवशी रात्री येथील आकोट फैलमध्ये पोलिसांनी उघडकीस आणून गोवंशाचे ३ लक्ष ५० सहस्र रुपये किमतीचे १५ क्विंटल मांस शासनाधीन केले आहे. एका बोलेरो वाहनामधून हे गोवंशाचे मांस विक्रीसाठी वाहतूक करत असतांनाच पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. या वेळी पोलिसांनी या वाहनाचा चालक आणि त्याचा साहाय्यक असे दोघांना कह्यात घेतले.

मुद्रितशोधनाच्या चुकीमुळे नागपूर विद्यापिठाने प्रदान केलेल्या ७३ सहस्रांहून अधिक पदव्या परत मागवणार

नागपूर विद्यापिठाचा भोंगळ आणि गलथान कारभार !
      नागपूर, २ सप्टेंबर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचा काही दिवसांपूर्वीच १०२ वा पदवीप्रदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आचार्य पदवीधारक, सुवर्णपदके, रौप्यपदके आणि पारितोषिके प्राप्त विद्यार्थ्यांना त्याच वेळी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. त्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्रे प्रदान करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. या वेळी वाटप करण्यात आलेल्या आणि वाटप न करण्यात आलेल्या एकूण ७३ सहस्र ८७२ पदव्या मुद्रितशोधनाच्या चुकीमुळे परत मागवणार आहेत.

कृत्रिम हौद आणि मूर्तीदान या धर्मशास्त्रविरोधी संकल्पना हद्दपार करा !

महापौर दत्तात्रय धनकवडे यांना निवेदन देतांना शिष्टमंडळ
पुणे येथे महापौर, आमदार यांसह नगरसेवक यांच्याकडे समितीची निवेदनाद्वारे मागणी !
     पुणे, २ सप्टेंबर (वार्ता.) - सांडपाणी आणि घनकचरा यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण आणि पर्यावरणाचा र्‍हास यांकडे दुर्लक्ष करून खोट्या प्रचाराद्वारे कथित पर्यावरणवादी हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करतात. या मंडळींचा अपप्रचार सामाजिक, तसेच प्रशासकीय पातळीवरही थांबवला जाणे आवश्यक आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर तथाकथित प्रदूषणाविषयी कृत्रिम तलाव अथवा गणेशमूर्तीदान या चुकीच्या संकल्पना राबवल्याने होत असलेली श्री गणेशमूर्तींची विटंबना थांबवण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराखाली आमदार, महापौर, नगरसेवक यांना निवेदने देण्यात आली.

हिंदु युवकांनी शक्तीला साधनेची जोड देऊन आत्मबळ जागवावे !

मेळाव्यास उपस्थित धर्माभिमानी युवक
नंदुरबार येथील हिंदूसंघटन मेळाव्यात आवाहन
      नंदुरबार - शक्तीला भक्तीची जोड देऊन आणि साधना करून आत्मबळ वाढवल्याशिवाय हिंदु धर्मावर आणि हिंदूंवर होणारे आघात थोपवता येणार नाहीत. म्हणून सर्व हिंदु युवकांनी शक्ती मिळवण्यासाठी साधनेकडे वळावे, असे आवाहन नंदुरबार येथील हिंदूसंघटन मेळाव्यात करण्यात आले.
      हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०१५ या दिवशी मंगल भुवन, नंदुरबार येथे सायंकाळी ५ वाजता घेण्यात आलेल्या हिंदूसंघटन मेळाव्याला विविध हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, सार्वजनिक मंडळे आणि धर्माभिमानी हिंदु बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पुणे येथे भाजयुमोच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम साजरा !

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सौ. अर्चना घनवट
सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सन्मान
      पुणे, २ सप्टेंबर - येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे चिटणीस श्री. सचिन डोंगरे यांनी आयोजित केलेला सन्मान स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम ३० ऑगस्ट या दिवशी महर्षीनगर येथील सौभाग्य मंगल कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमात येथील नामवंत सौ. श्रेया सिद्धार्थ शहा यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अर्चना घनवट आणि सनातन संस्थेच्या सौ. नेहा दाते यांना सन्मानचिन्ह आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि यश प्राप्त केलेल्या महिलांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

मदरशांनी झेंडावंदन करावे, असे न्यायालयाला का सांगावे लागते ?
      १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मदरशांमध्येही झेंडावंदन झाले पाहिजे, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे; तसेच यासंदर्भात उत्तरप्रदेश शासनाने पावले उचलावीत, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.

गोरीया मठातील अनुयायांसमवेत तेथील भक्तांनी प्रदर्शनाला दिली उत्साहाने भेट !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. आेंकार जरळी हे प्रदर्शनातील माहिती समजावून सांगतांना
     नाशिक, २ सप्टेंबर (वार्ता.) - श्री सारस्वत गौडीया आध्यात्मिक सेवा संघ यांच्या जलपायीगुरी (प. बंगाल) येथील गोरीया मठातील अनेक शिष्यांसह मठातील शेकडो भक्तांनी १ सप्टेंबर या दिवशी प्रदर्शनाला उत्साहाने भेट दिली.
      सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या विषयावरील सचित्र प्रदर्शन सर्वांनी बघितले. त्यानंतर त्यांना अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे महत्त्व ही ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष

२ युवक घायाळ
      श्रीनगर - काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागात दगडफेक करणारे आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष उडाला. यात आमीर अहमद बट आणि फिरदौस अहमद असे २ युवक घायाळ झाले आहेत. आमीरच्या पोटाला गोळी लागली असून फिरदौस हा अश्रुधुरामुळे घायाळ झाला. दोघांनाही श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली. पोलीस आणि अर्धसैनिक दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
UPke Aligadh jileme is varsh ekbhi madaraseme swatantrata din nahi manaya
gaya ! 
aise madarasoka shaskiya anudan kyo na band kiya jaye ?
जागो ! 
उत्तरप्रदेश के अलिगड जिले में इस वर्ष एक भी मदरसे में स्वतंत्रता दिन नही मनाया गया ।
एैसे मदरसों का शासकीय अनुदान क्यो न बंद किया जाए ?

६ सहस्र लोकसंख्येच्या गंगामसला (जिल्हा बीड) गावातील सर्व गावकर्‍यांचा सामूहिक आत्महत्येचा ठराव !

जय जय महाराष्ट्र माझा ! काँग्रेसप्रमाणे भाजपच्या राज्यातही जनतेची दुःस्थिती !
      मुंबई - ६ सहस्र लोकसंख्या असणार्‍या गंगामसला (बीड) गावातील सर्व गावकर्‍यांचा सामूहिक आत्महत्येचा ठराव ग्रामसभेत संमत केला आहे. गावकर्‍यांना नोकरी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, अशी स्थिती आहे. शेतकर्‍यांना पशूधन सांभाळणे अवघड झाले आहे. शासनाने आता साहाय्य न केल्यास गुरांना सोडून द्यावे लागणार आहे. तशातच जिल्हा अधिकोषाने कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठराव संमत केल्याचे गावकरी सांगत आहेत.
      नांदेड - नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि देगलूरचे तहसीलदार जिवराज डापकर या दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (धर्मशिक्षण, धर्माचरण यांच्याअभावी उच्चशिक्षित, उच्चपदस्थ व्यक्ती विनयभंगाचे गुन्हे करण्यास धजावत आहेत. ही दु:स्थिती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक) तहसील कार्यालयात शासकीय कर्मचारी असलेल्या महिलेच्या तक्रारीनंतर देगलूूर पोलिसांकडे या गुन्ह्याची नोंद झाली आहे. स्वामी आणि डापकर यांनी लज्जा वाटेल, असे वर्तन केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. तसेच विनयभंगाचे पुरावे असून, योग्य वेळी ते उघड करू, अशी चेतावणीही या महिलेने दिली आहे. या प्रकरणात अधिक तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांमधील तथाकथित कार्यकर्त्यांनो, सनातनला विरोध करण्यात स्वतःची शक्ती वाया दवडण्यापेक्षा हिंदू संघटनासाठी पुढाकार घ्या !

     अलीकडच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती लहान-मोठ्या हिंदुत्ववादी संघटनांना एकत्र करून हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत, ही सर्वत्रच्या हिंदूंसाठी गौरवास्पद गोष्ट आहे. संस्था आणि समिती भारतीयच नव्हे, तर विदेशातील हिंदूंनाही धर्माचरणाचे महत्त्व सांगत असल्याने आज लाखो हिंदू साधना करून देवतांच्या कृपेविषयी अनुभूती घेत आहेत, तरीही बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांमधील काही तथाकथित नेते आणि कार्यकर्ते सनातनच्या कार्याला उघड किंवा छुपा विरोध करत आहेत, पर्यायाने हिंदु धर्मियांचीच हानी करत आहेत; पण संकुचितपणा आणि हिंदु धर्मरक्षणाच्या मूळ ध्येयापासून दूर गेल्याने त्यांच्या ही चूक लक्षातही येत नाही.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

श्री. ज्ञानेश्‍वर गावडे
१. सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात गेल्यावर
प.पू. डॉक्टरांजवळ अधिवेशन बघण्याची इच्छा व्यक्त करणे आणि
प्रत्यक्षात १५ दिवसांनी अधिवेशनाच्या सेवेला जाण्याची संधी मिळणे
    १५.५.२०१५ या दिवशी सकाळी मानसपूजा करण्यासाठी सूक्ष्मातून रामनाथी आश्रमामध्ये गेलो. मानसपूजा केल्यावर मी प.पू. गुरुदेवांना म्हटले, आता पुढे अधिवेशन आहे आणि मलासुद्धा अधिवेशन बघायचे आहे. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सांगितले, अधिवेशनाला ये. मी तो क्षण लिहून ठेवला. प.पू. गुरुदेवांनी असे सांगितले, म्हणजे काहीतरी सत्य आहे, असा मी विचार केला. २.६.२०१५ या दिवशी दुपारी दायित्व असलेल्या साधकांनी विचारले, तू अधिवेशनाच्या सेवेला जाणार का ? तेव्हा मी लगेच होकार दिला.

न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय !

     ३१ ऑगस्ट या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने तीन महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. त्यातील एक म्हणजे मुंबईत वांद्रे येथे १३ वर्षांपूर्वी झालेल्या हिट ऍण्ड रन प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेला सलमान खान याला उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार रविंद्र पाटील यांच्या आईने सर्वोच्च न्यायालयात अभिनेता (?) सलमान खान याला देण्यात आलेला जामीन रहित करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका प्रविष्ट करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
हिंदुद्वेष्टा अकबरूद्दीन ओवैसीचा शिरकाव जेव्हा महाराष्ट्रात झाला, तेव्हा उपर छत्री, निचे छाया, भागो हिंदू, ओवैसी आया, अशा घोषणा दिल्या गेल्या. एका भाषणात, तर ओवैसीने प्रत्येक गावात एक बाबरी मशीद उभारू, अशी दर्पोक्ती केली.
- राष्ट्रीय कीर्तनकार समर्थभक्त यौगेश साळेगावकर, सेलू, जिल्हा परभणी.

१८ जून ते ३० जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. दीपक आगवणे
आपत्काळात साधनेच्या स्तरावर भावपूर्ण आणि परिपूर्ण कार्य करणे आवश्यक !
      हे भगवंता, श्रीकृष्णस्वरूप परात्पर गुरुमाऊली, आपल्या कोमल चरणांशी नतमस्तक होऊन समर्पण भावाने शरण येऊन या शिबिरात आपणच शिकवलेली अमूल्य सूत्रे आणि दिव्य ज्ञान शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.
प.पू. डॉक्टर, माझी पात्रता नसतांनाही माझ्यावरील निस्सीम प्रेमामुळे आपण मला शिबिरात येण्याची आणि धर्मकार्यासाठी कायर्र्सिद्ध होण्याची अमूल्य संधी दिलीत, यासाठी मी सदैव आपल्या चरणी कृतज्ञ आहे.

आजच्या हिंदु समाजाला धर्मशिक्षणच नसल्यामुळे साधू-संतांचे महत्त्वही कळत नाही. त्यांच्यासाठी हे विशेष सदर !

खरे साधू-संत आणि तीर्थक्षेत्र
खरे साधू-संत
१. व्याख्या
१ अ. साधू
१.    मूळ अर्थ : सात्त्विक वृत्तीचा, शमदमादी गुणांनी युक्त, ईश्‍वरभक्तीपरायण, पुण्यात्मा पुरुष, सज्जन
२. प्रचलित अर्थ : साधू हा शब्द संत या अर्थीही वापरात आहे.
१ आ. संत
१.    प्रपंचाविषयीची आसक्ती सोडून ईश्‍वरभजनी लागलेला पुरुष, न गडबडणारा, शांत
२. संत हे भगवंताचे सचेतन आणि सगुण रूप आहेत. मूर्ती भगवंताचे अचेतन, निर्जीव आणि सगुण रूप आहे. सत्ची साधना करून सद्रूप होणारे ते संत.
१ इ. स्वामी : संन्यासी, मालक किंवा धनी

स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांची पंतप्रधान मोदी यांना चेतावणी

      भारतात विनाविलंब कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा, तसेच लव्ह जिहादच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. या मागण्या त्वरित अमलात आणल्या गेल्या नाहीत, तर राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी होणारच आहे; पण धर्माच्या नावाला एक कलंक म्हणून पंतप्रधान मोदी यांची इतिहासात नोंद होईल.
- स्वामी ब्रह्मानंद सरस्वती, रामजन्मभूमी आंदोलनाचे जनक, हिंदू जागरण मंचाचे संस्थापक संघटनमंत्री

संस्कृती त्यागणारे पाकिस्तानसारखे आतंकवादग्रस्त देश आणि सांस्कृतिक राष्ट्रीयता जोपासून यशाकडे वाटचाल करणारे भारतासारखे सांस्कृतिक देश !

     पाकिस्तान त्यांच्या देशात स्वतःच्या इस्लामी धर्माची नवी ओळख स्थापन करू इच्छित आहे; पण हे कृत्रिम सांस्कृतिक आवरण ओढून घेतल्यामुळे त्याचा मूळ प्रकृतीशी मेळ बसेनासा झाला आहे. पाकिस्तान आज दुरवस्था आणि आयात केलेला आतंकवाद या समस्यांनी ग्रस्त आहे अन् त्यामुळेच तो आत्मघातकी अशा अस्थिरतेतून वाटचाल करत आहे. भूसांस्कृतिक राष्ट्रवाद सिद्ध करणारा आणि पाकिस्तानच्या नीतीवाद्यांसह भारतीय धर्मनिरपेक्षवाद्यांनाही विचार करायला लावणारा डॉ. गुलरेज शेख यांचा हा लेख पुढे देत आहोत.

प्रभु श्रीरामाचे स्मरण करून देणारी, प.पू. दास महाराजांच्या स्पर्शाने आणि रामनामाने पावन झाल्याने साधकांना चैतन्याच्या स्तरावर अनुभूती देणारी जपमाळ !

     मी माळेकडे पाहिले, तेव्हा भाव लगेच जागृत झाला आणि माळ हातात घेतल्यावर ३ - ४ सेकंदांत एवढा भाव जागृत झाला की, छाती भरून आल्यामुळे मला माळ खाली ठेवावी लागली. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.९.२०१५) 
     ३१.८.२०१५ आणि १.९.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमातील भोजनकक्षात साधकांकडून एक प्रयोग करून घेण्यात आला. एका पिशवीत एक जपमाळ ठेवली होती. आश्रमातील १८३ जणांंनी हा प्रयोग केला. प्रयोग करतांना साधकांना ही माळ प.पू. दास (रघुवीर) महाराज यांची आहे आणि तिच्या साहाय्याने श्रीरामाचा जप झाला आहे, हे ज्ञात नव्हते.
     ३१.८.२०१५ आणि १.९.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमातील भोजनकक्षात साधकांकडून एक प्रयोग करून घेण्यात आला. एका पिशवीत एक जपमाळ ठेवली होती. आश्रमातील १८३ जणांंनी हा प्रयोग केला. प्रयोग करतांना साधकांना ही माळ प.पू. दास (रघुवीर) महाराज यांची आहे आणि तिच्या साहाय्याने श्रीरामाचा जप झाला आहे, हे ज्ञात नव्हते.

राजस्थान येथील संत प.पू. श्रीराम महाराज यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी जप करण्यासाठी प.पू. दास महाराजांना पाठवलेली जपमाळ आणि या माळेला प.पू. डॉक्टरांचा हस्तस्पर्श व्हावा, अशी प.पू. दास महाराजांना लागलेली तळमळ !

प.पू. दास महाराज
     प.पू. जगद्गुरु, परात्पर गुरुचरणी दास महाराजांचा साष्टांग नमस्कार आणि आपल्या चरणी प्रार्थना करत आहे. 
१. प.पू. श्रीराम महाराज यांनी जपमाळ पाठवणे 
१ अ. राजस्थान येथील प.पू. श्रीराम महाराज यांनी प्रत्यक्ष परिचय 
नसतांना १०८० मण्यांची जपमाळ एका साधकाकडून पाठवून देणे 
    १२.१२.२०१४ या दिवशी नांदोडा, तालुका फोंडा, जिल्हा सिंधुदुर्ग येथील एक जुने साधक श्री. प्रकाश जोशी हे पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रमात आणि श्रीराम मंदिरात आले. ते प.पू. श्रीराम महाराज (राजस्थान) यांनी दिलेली नामजपाची १०८० मण्यांची माळ मला देण्यासाठी आले होते. प.पू. श्रीराम महाराज यांनी वर्ष २०१० मध्ये रामनाथी मंदिरात १३ कोटी सामूहिक नामजप केला आहे. प.पू. श्रीराम महाराजांनी ना कधी मला पाहिले आहे किंवा ना ते माझ्याशी कधीही बोलले किंवा मला भेटले आहेत. 

सौ. अंजली जोशी यांना एक वर्षाच्या अंतराने दोन वेळा रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाल्यावर रामनाथी आश्रमात आणि स्वतःमध्ये जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती

सौ. अंजली जोशी
१. रामनाथी आश्रम 
अ. पूर्वीच्या तुलनेत आश्रमातील चैतन्यात पुष्कळ वाढ झालेली जाणवली.
आ. संपूर्ण वास्तू हलकी होऊन तरंगत आहे, असे जाणवत होते. 
इ. प्रत्येक साधकातील प्रीतीतत्त्व आतून जागृत झाले आहे, असे जाणवत होते.
ई. बर्‍याच नवीन साधक-साधिकांना मी ओळखत नसूनही त्यांना पूर्वी कुठेतरी भेटल्याचे जाणवून जुनीच ओळख असल्याप्रमाणे वाटले. 
उ. प्रत्येक साधकात पुष्कळ सहजता आणि आंतरिक जवळीक जाणवत होती.
ऊ. सर्व साधक गंगेच्या प्रवाहासारखे ध्येयाच्या ओढीने पुढे पुढे जात आहेत, असे जाणवत होते.

पू. नकातेकाकांच्या सांगली जिल्ह्याच्या लेखाच्या (अकाऊंटच्या)तपासणीच्या वेळी जिल्ह्यातील साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र आणि आलेल्या अनुभूती

पू. महादेव नकाते
१. शिकायला मिळालेले सूत्र 
१ अ. अडचणींना धरून बसले, तर अनेक वर्षे वाया जाणार आणि आपला जन्म ज्यासाठी झाला ते ध्येय आपण गाठणार नाही, याची तीव्रतेने जाणीव झाली. - सौ. निर्मला ढवण, विटा केंद्र 
२. अनुभूती
२ अ. पू. नकातेकाकांशी पुष्कळ जवळचे नाते आहे, असे वाटल्याने मनातील सर्व बोलता येणे : पू. नकातेकाकांशी मनातील सर्व बोलूया, त्यांच्याशी पुष्कळ जवळचे नाते आहे, असे वाटले. प.पू. डॉक्टरांशी बोलतांना ताण जाणवत नाही, त्याचप्रमाणे पू. काकांविषयी वाटले. पू. काकांनी केंद्रातील चुका सांगितल्यावर निराशा आली नाही. चुका सुधारूया. माझी आणि साधकांची स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करूया, असे वाटत होते. त्यानंतर ही स्थिती टिकून आहे. - सौ. स्मिता माईणकर, सांगली 

रामनाथी आश्रमात पू. (सौ.) माई नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजर्‍या झालेल्या अवर्णनीय अशा भावसोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी लाभून प.पू. गुरुदेवांनी दिलेला अनमोल संत संग !

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक
      प.पू. दास महाराज यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक उपाख्य माई यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त २९.८.२०१५ (नारळीपौर्णिमा) या दिवशी रामनाथी आश्रमात भावपूर्ण वातावरणात सोहळा साजरा झाला. या सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह प.पू. दास महाराज, राजस्थान येथील संत पू. आैंकारानंद महाराज, पू. मेनरायकाका आणि पू. (सौ.) मेनरायकाकू याची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या वेळी संतांचा प.पू. गुरुदेवांप्रती क्षणोक्षणी व्यक्त होत असलेला कृतज्ञताभाव आणि शरणागत भाव यांमुळे हा सोहळा अवर्णनीय असा भावसोहळा झाला. 
१. संतांचा परस्पर परिचय
     ३१ जुलै २०१५ ला सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) माई यांना संतपदी विराजमान केले. त्यानंतर नारळीपौर्णिमेच्या दिवशी वाढदिवसानिमित्त गुरुदेवांचे आशीर्वाद घेण्यासाठी प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई रामनाथी आश्रमात आले होते. या वेळी कु. संगीता मेनराय यांनी प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांना राजस्थान येथील संत पू. आैंकारानंद महाराज, पू. मेनरायकाका, तसेच पू. (सौ.) मेनरायकाकू यांचा परिचय करून दिला. 

महाभारतातील सूर्यपुत्र कर्णाच्या पूर्वजन्माची कथा

१. पूर्वजन्मी तपश्‍चर्या करून १ सहस्र कवचे प्राप्त करून घेणारा दंभोद्भव नावाचा असुर, म्हणजे कर्ण !
      कर्ण पूर्वजन्मात दंभोद्भव नावाचा असुर होता. तेव्हा त्याने तपश्‍चर्या करून १ सहस्र कवचे प्राप्त करून घेतली. ज्याची १ सहस्र वर्षांची तपश्‍चर्या असेल, तोच कर्णाचे कवच तोडू शकणार होता; पण कवच तोडणार्‍याचा तात्काळ मृत्यू होणार होता. यावर तोडगा म्हणून नर-नारायण हे दोन ऋषि आळीपाळीने तपश्‍चर्या करून एकमेकांना जिवंत करत होते. अशा प्रकारे नर-नारायण १ सहस्र वर्षे तपश्‍चर्या करून युद्ध करत होते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
सतत वर्तमानकाळात रहाणे
आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे,
तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.
     भावार्थ : कर्म मागे म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. धर्म आमच्या पुढे असतो म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मकतेतील शक्ती !
     घडणार्‍या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

        देव भक्ताला तो मागेल ते देतो. गुरु शिष्याला आवश्यक ते देतात. - संत भक्तराज

विकास कि विघटन !

     देशाच्या संपत्तीत न्याय्य वाटा, निर्णयप्रक्रियेत स्थान आणि त्यांचे (मुसलमान समाजाचे) सक्षमीकरण हा या देशातील मुसलमानांचा अधिकार आहे. त्यामुळे केंद्रशासनाने मुसलमानांशी केल्या जात असलेल्या भेदभावाची चूक सुधारावी, अशी मागणी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केली आहे. मुसलमान समाजाची शिखर संस्था असलेल्या फोरम ऑल इंडिया मजलिस ए मुशावरात या संघटनेच्या सुवर्णजयंती कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या मागणीवर चारी बाजूंनी टीका झाली. मुख्य म्हणजे ते उपराष्ट्रपती असतांना त्यांनी राजकीय पक्षाच्या नेत्याने करावी, तशी मागणी केली, हे कुणाला पटणारे नव्हते आणि नाहीसुद्धा !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn