Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

७ नोव्हेंबर २०१६ ला एकतर मोदी शासन असेल किंवा संत समाज ! - सिंहस्थपर्वात संतांची सिंहगर्जना

 • गोरक्षणाच्या संदर्भात संतांनी मोदी शासनाच्या विरोधात रणशिंग फुंकले !
 • मोदी शासनाला दिली गोरक्षणाची अंतिम समयमर्यादा !
संत बालयोगेश्‍वर रामबालकदासजी
महात्यागी मार्गदर्शन करतांना
    नाशिक, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - ७ नोव्हेंबर १९६६ या दिवशी धर्मसम्राट स्वामी करपात्रीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली देहलीत गोरक्षणासाठी १६ लाख गोभक्त हिंदूंनी प्रचंड मोठे आंदोलन झाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे आंदोलन चिरडले होते आणि अनेक साधू संतांना गोळीबार करून ठार मारले होते. इतिहासाला कलंकित करणार्‍या या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. गोरक्षणाचा हा अपूर्ण राहिलेला प्रयत्न आम्ही संत समाज आणि गोभक्त यांच्या एकत्रिकरणातून पूर्ण करणार आहोत, अशी घोषणा मी आज करतो. यासाठीच्या रणनीतीची आखणी या कुंभमेळ्यातून केली जात आहे. जर देशात गोहत्याबंदी कायदा होऊन सर्व गोहत्या थांबल्या नाहीत, तर ७ नोव्हेंबर २०१६ ला एकतर मोदी शासन असेल, नाहीतर संत समाज असेल, अशी चेतावणी मी केंद्रातील स्वत:ला हिंदु म्हणवणार्‍या शासनाला देत आहे, अशी सिंहगर्जना छत्तीसगड मण्डपचे क्रांतीकारी गोभक्त संत बालयोगेश्‍वर रामबालकदासजी महात्यागी यांनी येथे केली. 
हिंदी सनातन पंचांगचे प्रकाशन करतांना डावीकडून संत बालयोगेश्‍वर
रामबालकदासजी महात्यागी, महामंडलेश्‍वर भैयादासजी महाराज,
प.पू. फरशीवाले बाबा, श्री. अभय वर्तक, एक संत आणि श्री. अजय पटेल

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कृतीशील हिंदूंनो, झोपलेल्या हिंदूंना जागृत करण्यात वेळ न घालवता आता जागृत हिंदूंना दिशा देण्याचे कार्य करा, तरच तुम्ही जवळ आलेल्या आपत्काळात वाचाल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकाल !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.८.२०१५)

(म्हणे) औरंगजेबाचा मोठा भाऊ दाराशुकोह धर्मनिरपेक्ष असल्याने औरंगाबादला त्याचे नाव द्या !

 • इतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे यांची बौद्धिक दिवाळखोरी !
 • छत्रपती संभाजी महाराज जातीयवादी होते, असे मोरे यांना म्हणायचे आहे काय ?
    मुंबई - औरंगजेबाचा मोठा भाऊ दाराशुकोह धर्मनिरपेक्ष होता. त्याचे नाव औरंगाबादला द्यायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि इतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे. सध्या औरंगाबादचे नामकरण करण्यावरून वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींकडून विधाने केली जात आहेत. नामकरणाविषयी मोरे पुढे म्हणाले, दारा शुकोहने उपनिषदांचे भाषांतर केले आहे. तो हिंदूंप्रमाणे बौद्ध, जैन आणि ख्रिस्ती पंडितांशी चर्चा करत असे.

संथारा व्रत अवैध असल्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती !

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
मिळते, म्हणजे उच्च न्यायालयाचा निर्णय संशयास्पद आहे, असा होतो !
    नवी देहली - जैन धर्मात सहस्रो वर्षांपासून चालत आलेली संथारा अथवा सल्लेखना ही परंपरा अवैध असल्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट या दिवशी स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एच्. एल्. दत्तू यांच्या नेतृत्वाखालील खंडपिठाने उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केलेली याचिका स्वीकारतांना वरील निर्णय दिला.
    सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्र आणि राजस्थान राज्य शासनांना नोटिसा पाठवल्या आहेत. १० ऑगस्ट या दिवशी राजस्थान उच्च न्यायालयाने संथारा हे व्रत भारतीय दंड विधान ३०९ प्रमाणे आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा ठरते, असे मत व्यक्त केले होते, तसेच या व्रताचे समर्थन करणारे कलम ३०६ नुसार आत्महत्येस उद्युक्त करणारे गुन्हेगार ठरतात, असेही निकालात म्हटले होते.

हिंदुत्वाला विरोध करणार्‍यास कुत्र्यासारखे मरण मिळेल !

 • कर्नाटकमधील बजरंग दल नेत्याचे ट्वीट
 • ट्वीट प्रकरणी बजरंगदलाच्या नेत्याला अटक
हिंदूंविषयी चिथावणीखोर आणि आक्रमक विधाने
करणार्‍या किती धर्मांधांना पोलीस अशी तात्काळ अटक करतात ?
    धारवाड (कर्नाटक) - आधी यु.आर्. अनंतमूर्ती आणि आता प्रा. कलबुर्गी ! हिंदुत्वाला विरोध करणार्‍यांना कुत्र्याचे मरण मिळेल. आता पुढे आदरणीय के.एस्. भगवान यांचा क्रमांक आहे, असे ट्विट बजरंग दलाचे येथील एक नेते भुवित शेट्टी यांनी  विचारवंत आणि कर्नाटक विद्यापिठाचे माजी कुलगुरु प्रा. (डॉ.) एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर केले. धारवाड येथे प्रा. कलबुर्गी यांची त्यांच्या रहात्या घरात आक्रमणकर्त्यांना गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर शेट्टी यांनी उपरोक्त ट्विट केले. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे आणि गुन्हेगारी कृत्ये करणे या कलमांखाली मंगळुरू पोलिसांनी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. यानंतर शेट्टी यांना पोलिसांनी अटक केली.

पुरोगाम्यांच्या हत्या होण्यामागे खरे गुन्हेगार असलेल्या शासनालाच फाशी द्या !

     कर्नाटकमधील हम्पी विद्यापिठाचे माजी कुलगुरु, ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, स्पष्टवक्ते आणि पुरोगामी विचारवंत डॉ. एम्.एम्. कलबुर्गी यांची हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केली असा, प्रचार सध्या प्रसारमाध्यमे करीत आहेत. या आरोपांना कोणताही पुरावा नाही, तरीही त्यात तथ्य आहे, असे क्षणभर गृहित धरले, तरी पुढील प्रश्‍न निर्माण होतात...
१. पुरोगाम्यांनी हिंदु धर्माची मानहानी केली
नसती, तर त्यांच्या हत्या झाल्या असत्या का ?
    सध्याच्या घटनेत डॉ. कलबुर्गी हे पुरोगामी विचारांचे आणि स्पष्टवक्ते होते. त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचा त्यांच्यावर राग होता, असे वार्तांकन प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे; पण मूर्तीपूजेचा निषेध करण्याचे त्यांचे शब्द काय होते, हे सांगण्याचे धारिष्ट्य प्रसारमाध्यमे करीत नाहीत. देवांच्या मूर्तीवर लघवी केली, तरी देव काही करणार नाहीत, असे अश्‍लाघ्य वक्तव्य डॉ. कलबुर्गी यांनी केले होते. बहुसंख्यांक मूर्तीपूजक असलेल्या भारतात एखाद्याने असे विधान केल्यामुळे कोट्यवधी सश्रद्ध नागरिकांच्या मनावर त्याची किती खोलवर आघात झाला असेल, याचा विचार पुरोगामी करतात का ? या पुरोगाम्यांनी अशी विधाने केली नसती, तर हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्या हत्या केल्या असत्या का ? डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या नसत्या, तर त्यांच्या हत्या झाल्या असत्या का ?

नेेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अपघाती निधन झालेच नाही ! अधेंदू बोस

      मुंबई - सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गुढ अजूनही आहे. या गुढाच्या संदर्भात माहिती असलेल्या धारिका जगासमोर यायलाच हव्यात. लालबहादूर शास्त्री यांच्या कुटुंबियांनी ही माहिती उघड करण्याची मागणी केली आहे. ती मागणी जनसामान्यांनीही केली पाहिजे, असे मत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे अधेंदू बोस यांनी मांडले. गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचे स्मरण करण्यासाठी नुकत्याच आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. 

बेळगावमध्ये महानगरपालिकेच्या भूमीवर धर्मांधांचा अवैध ताबा

गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील वातावरण दूषित करण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र असल्याचा हिंदूंचा आरोप
      बेळगाव, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - येथील खंजर गल्लीतील महापालिकेच्या जागेत असणारी बिल भरणा केंद्राची इमारत वाहनतळ उभा करण्याच्या उद्देशाने पालिकेने हटवली; पण ती हटवल्यानंतर तिच्या पायाशी एक काँक्रिटचा भाग (फाउण्डेशन) तसाच शिल्लक राहिला. हा भाग म्हणजे थडगे असल्याचा कांगावा करत स्थानिक धर्मांधांनी त्या बांधकामाला चुना फासून त्यावर हिरवी चादर टाकली आहे. ही भूमी महापालिकेची असून सध्या त्यावर धर्मांधांनी अवैध ताबा मिळवला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील वातावरण दूषित करण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र असल्याचा आरोप स्थानिक हिंदूंनी केला आहे. हिंदूंनी यासंदर्भात पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतली असता नीट चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. (थडग्याच्या जागी एखादे मंदिर असते, तर पोलिसांनी अशीच कचखाऊ भूमिका घेतली असती का ? काल-परवापर्यंत जेथे थडगे नव्हते, त्या महापालिकेच्या जागेवर थडगे असल्याचा कांगावा करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस केवळ वेळकाढूपणा करत आहेत, असे वाटून उद्या हिंदूंनी कायदा हातात घेतला, तर त्याला पोलीस प्रशासनच उत्तरदायी असेल ! - संपादक)

कर्मचार्‍यांच्या संपामुळे धार्मिक साहित्य प्रकाशित करणारी 'गीता प्रेस' अनिश्‍चित काळासाठी बंद

संपामुळे बंद पडलेल्या गीता प्रेसचे 
पुनरुज्जीवन  करण्यासाठी भाजप शासन काय प्रयत्न करणार ? 
     गोरखपूर (उत्तरप्रदेश) - ९० वर्षांहून अधिक काळापासून हिंदूंचे धार्मिक साहित्य प्रकाशित करणारी गीता प्रेस कर्मचार्‍यांच्या संपामुळे सध्या अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. 

     अगदी साध्या-सोप्या भाषेत आणि अत्यल्प दरात विविध भाषांतील हिंदु धार्मिक साहित्य प्रकाशित करणारे प्रकाशक म्हणून 'गीता प्रेस' लोकप्रिय आहे. गीता प्रेसने आतापर्यंत भगवद्गीतेच्या ७ कोटी २ लक्ष प्रती, तुलसीदासांच्या साहित्याच्या ७ कोटी प्रती, तर पुराण आणि उपनिषदे यांच्या तब्बल १ कोटी ९० लाख प्रती प्रकाशित केल्याची माहिती अक्षर मुकूललिखित गीता प्रेस आणि हिंदु भारताची निर्मिती या पुस्तकांत दिली आहे. अशी ऐतिहासिक गीताप्रेस बंद असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

शासनविरोधी वृत्तांचा प्रतिवाद करण्यासाठी तज्ञांची पथके स्थापन करण्यासाठी भाजप शासन विचाराधीन

भाजप शासनाने चांगले निर्णय घेतल्यास अशी पथके निर्माण 
 करावी लागणार नाहीत; कारण असे निर्णय लोकांमध्येच लोकप्रिय होतील ! 
     नवी देहली - प्रसारमाध्यमांमध्ये केंद्रशासनाच्या विरोधात नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्यास या वृत्तांचा प्रतिवाद करण्यात मोठा कालावधी जाऊ नये, यासाठी शासनाकडून विविध मंत्रालये आणि विभाग यांठिकाणी पथके स्थापन करण्यासाठी शासन विचार करीत आहे. 

सनसनाटी बातम्यांच्या मागे धावणारी प्रसिद्धीमाध्यमे १९६५ च्या युद्धातील भारताच्या विजयाच्या सुवर्णजयंतीला विसरली ! - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

    पणजी - सनसनाटी बातम्यांच्या मागे धावणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताला मिळालेल्या विजयाच्या सुवर्णजयंतीसारख्या मोठ्या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे, अशी खंत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने २९ ऑगस्ट या दिवशी पणजी येथे दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित केलेल्या एक राखी सैनिकासाठी या कार्यक्रमात संरक्षणमंत्री पर्रीकर बोलत होते. चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सीमांचे रक्षण करणार्‍या भारतीय सैनिकांना देण्यासाठी २६ सहस्र २८४ राख्या संरक्षणमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आल्या. या वेळी चैतन्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सभापती राजेंद्र आर्लेकर, रिअर अ‍ॅडमिरल रवनीत सिंह, ब्रिगेडियर सुमित कुमार अगरवाल, तटरक्षक दलाचे डीआयजी मनोज बाडकर, भाजपचे आमदार विष्णु वाघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर, चैतन्य प्रतिष्ठानच्या समन्वयक सौ. अनघा आर्लेकर आदी उपस्थित होते. 

केरळ राज्यात भाजप आणि मार्क्सवादी कार्यकर्ते यांची निर्घृण हत्या !

केरळमध्ये शासन अस्तित्वात आहे का ? असे लोकराज्य जनतेला चांगले शासन देईल का ? 
     थिरुवअनंतपुरम् - राज्यात लागोपाठ दोन राजकीय कार्यकर्त्यांची हत्या झाल्याने राजकीय हिंसाचारास प्रारंभ झाला असून भाजप आणि मार्क्सवादी पक्षांनी हिंसाचारास मुख्यमंत्री चंडी अन् गृहमंत्री चेन्निथाला यांना उत्तरदायी धरले आहे. 

काश्मीरमध्ये स्थानिक काश्मिरी हिंदूंचे विविध मागण्यांसाठी आंदोलन !

हिंदूंना प्रत्येक मागणीसाठी आंदोलन करावे लागते, तर मुसलमानांना काही न मागताच
 सर्व मिळते ! हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी संघटित होेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! 
     श्रीनगर - एकीकडे काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंंचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असतांनाच काश्मीरमधील स्थानिक काश्मिरी हिंदूंनी त्यांच्या मागण्यांसाठी काश्मीरमध्ये निषेध आंदोलन केले. या हिंदूंना शासनाने अल्पसंख्यांकांचा दर्जा देऊन अल्पसंख्यांकांना मिळणारे सर्व लाभ त्यांना मिळवून द्यावे, अशी मागणी केली आहे. 

चितवान दंगलीमध्ये पोलीस निरीक्षकासह ९ जण घायाळ

पोलिसांना दंगल नियंत्रणाचे प्रशिक्षण दिले जात नाही का ? 
     चितवान (मध्यप्रदेश) - चितवान जिल्ह्यातील नारायणगडमध्ये चितवानच्या थारू कल्याणकारी सभेने आयोजित केलेल्या बंदच्या पहिल्याच दिवशी पोलीस निरीक्षकासह ९ जण घायाळ झाले. बंदची हाक दिलेली असतांना नारायणगडमधील व्यापार्‍यांनी दुकाने उघडी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संघर्ष उडाला. 

खोट्या अधिवक्त्यांच्या शोधासाठी देशभर मोहीम !

संपूर्ण देशात कायद्याच्या लक्षावधी खोट्या पदव्यांचे 
वितरण होईपर्यंत बार कौन्सिल आणि कायदा विभाग झोपले होते का ? 
     नवी देहली - कायद्याच्या खोट्या पदव्या देणारी टोळी उत्तरप्रदेश, देहली आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये सक्रीय असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे देशभर बनावट अधिवक्त्यांचा शोध घेण्याची मोहीम चालू करण्यात आली आहे. या अंतर्गत महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील दीड लाख वकिलांच्या पदव्या, अनुभव आणि सनद तपासण्याचे कार्य चालू झाले आहे. 

भाविकांना श्रावणी सोमवारी श्री महादेवाच्या पिंडीवर दूध वाहू न देता ते गोळा करून वाटले !

'तनिष्का गटा'च्या महिलांचा धर्मद्रोही उपक्रम ! 
शस्त्रक्रियागृहात किंवा न्यायालयात स्वतःच्या मनाने कोणी 
काही कृती करतो का ? तिथे आधुनिक वैद्य किंवा अधिवक्ते यांनी 
सांगितल्याप्रमाणेच  वागावे लागते. साधे उपाहारगृहात गेलो, तरी सर्व जण तेथील 
शिष्टाचार  पाळतात. त्याचप्रमाणे मंदिरात आल्यावर धर्मातील नियम पाळणे योग्य ठरते ! 
     पुणे, ३१ ऑगस्ट - श्रावणी सोमवारनिमित्त येथील सांगवी भागातील श्री महादेव मंदिरातील श्री महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी भाविकांनी आणलेले दूध त्यांना पिंडीवर न वाहू देता तनिष्का गटाच्या महिलांनी स्वतःच्या मनाने ते भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्याचा धर्मद्रोह केला आहे. (मंगल कार्यालये, उपाहारगृहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न वाया जात असते, तेव्हा तनिष्का गट कोठे असतो ? अल्पसंख्यांकांकडून बकरी ईदच्या दिवशी अनेक बकर्‍यांची हत्या केली जात असतांना हा तथाकथित तनिष्का गट त्या ठिकाणी जाऊन त्या हत्या थांबवण्याचे कृत्य करू पाहतील का ? - संपादक) मागच्या सोमवारीही या गटाने हाच धर्मद्रोही उपक्रम राबवला. 

पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या दायित्वशून्यतेमुळे प्लास्टिकच्या पिशव्यांवरील बंदी कागदावरच

सातत्याने कठोर कारवाई केल्यासच बंदीची अंमलबजावणी शक्य !
    पुणे, ३१ ऑगस्ट - शहरात प्रतीदिवशी किमान १५०० टनहून अधिक कचरा जमा होतो. त्यात प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे कचर्‍यावर प्रक्रिया करतांना मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतात. यावर उपाय म्हणून पुणे महानगरपालिका प्रशासनाने जानेवारी २०१४ मध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घातली होती. ही बंदी असतांनाही महानगरपालिका प्रशासनाच्या दायित्वशून्यतेमुळे राजरोसपणे या पिशव्यांची खरेदी-विक्री होत आहे. त्यामुळे कचर्‍यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण वाढले असून ही बंदी केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. (याविषयी महानगरपालिका आयुक्त काय कारवाई करणार आहेत, ते स्पष्ट करतील का ? - संपादक)

जळगाव येथे धर्मांधांच्या जमावाकडून सुरा आणि लोखंडी रॉड यांनी हिंदूंना मारहाण

 • पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यांखाली हिंदूंनाच अटक
 • काँग्रेसप्रमाणे भाजपच्याही राज्यात धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे चालूच ! हेच का मोदी शासनाने हिंदूंना दाखवलेले चांगले दिवस ?
      पाळधी (जळगाव) - येथील माळीवाड्यातील दोन हिंदूंना वाटेतच थांबवत धर्मांध खाटिक दुकानदार आसिफ सलीम खाटिक याने ३ दिवसांपूर्वी यात्रेत झालेल्या धक्काबुक्कीविषयी खडसवून मारहाण केली. या वेळी तेथे अन्य धर्मांधही उपस्थित होते. माळीवाड्यातील अन्य हिंदू भांडण सोडवण्यास गेल्यावर धर्मांधांनी त्यांच्यावर मिरचीपूड फेकली, तसेच बोकड कापण्याचा सुरा आणि लोखंडी रॉड यांनी आक्रमण केले. (ही सिद्धता पहाता धर्मांधांचे आक्रमण पूर्वनियोजितच होते, हे सिद्ध होते. - संपादक) घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी मात्र धर्मांधांच्या ऐवजी हिंदूंवरच गंभीर गुन्हे प्रविष्ट करत त्यांना अटक केली आणि २ दिवसांची पोलीस कोठडी दिली. (अशा धर्मद्रोही पोलिसांची नावे सनातन प्रभातला कळवा ! हिंदु राष्ट्रात त्यांना आजन्म कठोर साधना करण्याची शिक्षा दिली जाईल ! - संपादक) 

श्रावणी सोमवारी भाविकांनी विनाअडथळा रामघाट आणि कुशावर्तकडे प्रवेश !

दुसर्‍या पर्वणीला चुकीची पुनरावृत्ती होणार नसल्याचे पोलीस प्रशासनाचे आश्‍वासन !
      त्र्यंबकेश्‍वर/नाशिक, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - श्रावणी सोमवारी म्हणजे ३१ ऑगस्टला सकाळपासून सहस्रावधी भक्तांचा जथ्या रामकुंड आणि कुशावर्त येथे येत होता. तेव्हा रामकुंडापर्यंत एकही बॅरेकेड न लावता भाविक थेट रस्त्याने रामकुंडापर्यंत पोहोचत होते, तसेच मनसोक्तपणे स्नान करत होते. अशा प्रकारे या श्रावणी सोमवारी रामघाट आणि कुशावर्त या दोन्ही ठिकाणी भाविकांची पोलिसांनी नाहक अडवणूक केली नाही, तसेच पुढील राजयोगी (शाही) स्नानाच्या वेळी पहिल्या राजयोगी स्नानाच्या दिवशी पोलिसांकडून झालेल्या अतीकडक बंदोबस्ताची पुनरावृत्ती केली जाणार नाही, असेही आश्‍वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.

बँकॉकमधील मंदिराबाहेरील बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक

     बँकॉक - थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये ब्रह्म मंदिराबाहेर १७ ऑगस्ट या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी नोंगचेक पोलिसांनी घरावर छापा टाकून एका तरुणाला अटक केली आहे. या घरातून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, तसेच अनेक देशांची पारपत्रे (पासपोर्ट) कह्यात घेण्यात आली आहेत, अशी माहिती थायलंडचे राष्ट्रीय पोलीस उपप्रमुख जनरल चेकटिप चैजिंडा यांनी दिली. 

काश्मीरप्रश्‍नी भारत आणि पाक यांना चर्चेस प्रोत्साहित करण्याचे अमेरिकेचे धोरण वर्ष १९५० मध्येच ठरले होते !

वर्ष १९५० च्या अमेरिकी गोपनीय दस्तावेजातून माहिती उघड 
     आतंकवादी पाकशी शांततेची चर्चा करून काहीही उपयोग नाही, हे आतापर्यंतच्या अनेक घटनांमधून उघड झाले आहे. त्यामुळे पाकबरोबर युद्ध करून त्याला कायमचा धडा शिकवणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे, हे भारतीय राज्यकर्ते अमेरिकेला ठणकावून सांगतील का ? 
     वॉशिंग्टन - केवळ भारत आणि पाकिस्तान हेच चर्चेच्या माध्यमातून काश्मीर वाद सोडवू शकतात अन् त्यासाठी अमेरिकेने या देशांनाच प्रोत्साहित करण्याचे धोरण वर्ष १९५० च्या दशकात ठरवले होते, अशी माहिती अमेरिकेची गुप्तचर संस्था 'सी.आय.ए'ने जुलैमध्ये उघड केलेल्या गोपनीय दस्तावेजातून उघड झाली आहे. 

वाढत्या तापमानामुळे समुद्राची पातळी पुढील २०० वर्षांत १ मीटरने वाढणार ! - नासा

     मियामी (अमेरिका) - पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरील बर्फाचे डोंगर मोठ्या प्रमाणात वितळत आहेत. त्याचा परिणाम येत्या १०० ते २०० वर्षांत समुद्राची पातळी १ मीटरने वाढेल, असा तर्क नासा या अमेरिकेतील वैज्ञानिक संस्थेच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे. 

आय.एस्.आय.एस्.कडून बालकांना खेळण्यातील बाहुल्यांचे मुंडके उडवण्याचे प्रशिक्षण !

जिहादी आतंकवादी संघटना लहान बालकांनाही आतंकवादी 
 प्रशिक्षण देऊन त्यांना जिहादी बनवत आहेत. या जिहाद्यांना 
सामोरे जाण्यासाठी भारतातील भाजपचे शासन आणि हिंदू सिद्ध आहेत का ? 
     दमास्कस - आय.एस्.आय.एस्.ने स्थापन केलेल्या खिलाफत या इस्लामी राज्याची वाटचाल पुढेही चालू रहावी आणि त्यांना भविष्यातही क्रूरकर्मे करण्यासाठी सैनिक मिळावेत, यासाठी आय.एस्.आय.एस्.ने ३-४ वर्षे वयाच्या बालकांना शिरच्छेद करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना खेळण्यातील बाहुल्यांचे मुंडके कापण्याचे (शिरच्छेद करण्याचे) प्राथमिक शिक्षण देणे चालू केले आहे. आय.एस्.आय.एस्.ने प्रसारित केलेल्या एका ध्वनीचित्रफितीत एक लहान बालक हातात सुरी घेऊन अस्वलाचे (टेडी बियरचे) मुंडके कापत असून त्याच्या मागे उभी असलेली एक व्यक्ती टाळ्या वाजवून त्या बालकाला प्रोत्साहन देतांना दिसत आहे. (आय.एस्.आय.एस्. किंवा कोणत्याही जिहादी आतंकवादी संघटनेचे भारत विशेषत: हिंदु धर्म संपवणे हे ध्येय आहे. त्या दृष्टीने त्यांची सिद्धता चालू आहे. अशा परिस्थितीत हिंदूंनी संघटित होऊन स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे ! - संपादक)

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये स्त्रियांच्या पोहण्याच्या कपड्यांवर श्री गणेशाचे चित्र छापल्याने हिंदू संतप्त

   
     नेवाडा - कॅलिफोर्नियामधील एका आस्थापनाने स्त्रियांच्या पोहण्याच्या कपड्यांवर श्री गणेशाचे चित्र छापल्याने हिंदू संतप्त झाले आहेत. हिंदु देवतांची अशा प्रकारे विटंबना करणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (हिंदूंनो, केवळ संताप व्यक्त करून शांत बसू नका, तर संघटित होऊन याविषयी आवाज उठवा ! बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना हिंदूंच्या देवतांच्या विटंबनेविषयी काही कृती करतील का ? - संपादक)

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश नाकारणार्‍या पुणे येथील ३ शाळांवर गुन्हे प्रविष्ट

अशा शाळांवर केवळ गुन्हे प्रविष्ट करून उपयोग नाही,
तर कारवाई पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा आवश्यक आहे !
    पुणे, ३१ ऑगस्ट - शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता १ लीच्या वर्गात २५ प्रतिशत आरक्षणांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणार्‍या शाळांच्या विरोधात शिक्षण विभागाने कारवाई करण्यास आरंभ केला आहे. येथील सदाशिव पेठेतील एस्.पी.एम्. इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, एस्.पी.एम्. पब्लिक स्कूल आणि लक्ष्मी रस्त्यावरील हुजूरपागा इंग्लिश मीडियम स्कूल या ३ शाळांच्या विरोधात २८ ऑगस्ट या दिवशी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या साहाय्यक प्रशासकीय अधिकारी शिल्पकला रंधवे यांनी ही तक्रार दिली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या श्री गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जन करा चळवळीस वासुंबे ग्रामपंचायतीचा पाठिंबा ! - ग्रामसभेत निर्णय

      वासुंबे (जिल्हा सांगली), ३१ ऑगस्ट (वार्ता.) - गणेशमूर्ती दान न देता ती वाहत्या पाण्यातच विसर्जन करावी, या हिंदु जनजागृतीच्या समितीच्या भूमिकेस तासगाव तालुक्यातील वासुंबे ग्रामपंचायतीने पाठिंबा दर्शवला आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या पत्राचे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत वाचन करून ते सभेतच सर्वांच्या निर्दशनास आणून दिले. तसे सरपंच सौ. शोभा प्रकाश कांबळे आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र समितीस देण्यात आले आहे. या संदर्भात वासुंबे येथील हिंदु धर्माभिमानी श्री. सचिन गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले. (हिंदु जनजागृती समितीच्या आवाहनास प्रतिसाद देणार्‍या वासुंबे ग्रामपंचायतीचे अभिनंदन ! हा आदर्श इतर ग्रामपंचायतींनीही घ्यावा ! - संपादक)

नालासोपारा येथे आदर्श दहीहंडी उत्सव मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद !

     नालासोपारा - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या आदर्श दहीहंडी उत्सव मोहिमेला येथील स्थानिक दहीहंडी मंडळानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या हिंदु गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे येथील दहीहंडी मंडळे जागृत झाली आहे. त्यांनी संकल्प केला की, या उत्सवात देवतांचे विडंबन होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. नामजप, तसेच राष्ट्र आणि धर्माभिमान जागृत करणार्‍या जयघोषासहित उत्सव साजरा करणार. उत्सवात कोणीही हुल्लडबाजी करणार नाही. अयोग्य कृती करणार्‍यांना रोखणार ! आतापर्यंत ८ मंडळांच्या ३०० हून अधिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून प्रबोधन करण्यात आले आहे.
      यामध्ये हिंदु गोवंश रक्षा समितीचे सर्वश्री धीरज पाटील, अमित केणी, सागर पाटील, जितेश राऊत, दिप्तेश पाटील, कुंदन राऊत, वैभव राऊत आणि परेश वैती यांनी सहभागी होऊन गोविंदा पथकांसमोर प्रभावीपणे विषय मांडला.

रस्ता विस्तारीकरणासाठी खंबाटकी घाटातील श्री खामजाईदेवी आणि श्री दत्त यांची मंदिरे पाडण्याची शक्यता

श्री खामजाई मंदिर (वर्तुळात)
     खंडाळा (सातारा), ३१ ऑगस्ट (वार्ता.) - पुणे-बेंगळुरू या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण चालू आहे. या महामार्गावर पारगाव-खंडाळा या भागातील खंबाटकी घाटामध्ये पुरातन काळापासून असलेले श्री खामजाईदेवी आणि श्री दत्त यांचे मंदिर रस्ता विस्तारीकरणासाठी पाडले जाण्याची दाट शक्यता आहे. मंदिर पाडण्याच्या या धर्मद्रोही कृतीला ग्रामपंचायत खंडाळा, सर्व ग्रामस्थ आणि शिवसेना यांनी कठोर विरोध दर्शवला आहे. (मंदिरे वाचवण्यासाठी संघटित झालेल्या सर्वांचेच अभिनंदन ! असाच संघटितपणे विरोध करून रस्ता विस्तारीकरण हे पर्यायी बाजूने होईपर्यंत असाच विरोध चालू ठेवणे अपेक्षित आहे. - संपादक)

संभाजीनगर येथे हिंदु युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन धर्मांध अटकेत, अन्य आरोपी पसार

अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे !
      संभाजीनगर, ३१ ऑगस्ट - येथील चिकलठाणा रस्त्यावरील एका शाळेच्या मागील रानामध्ये प्रियकरासमवेत २७ ऑगस्टच्या रात्री बोलत उभ्या असलेल्या एका हिंदु युवतीवर धर्मांधांनी बलात्कार केला आणि युवकाला गंभीर मारहाण केली. या प्रकरणी धर्मांध शेख तय्यब आणि शेख अश्फाक यांना अटक केली असून इतर धर्मांध आरोपी पसार झाले आहेत. (हिंदूंनो, या धर्मांधांना कठोर शासन होण्यासाठी संघटितपणे पोलिसांवर दबाव आणा ! - संपादक) शेख तय्यब याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून दुसर्‍या आरोपीला न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे. 
       पसार झालेल्या आरोपींना तत्काळ अटक करून हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी शिवसेना उपनेत्या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे. 

लोकमान्य आणि शिवसेनाप्रमुख यांचे कार्य पुढे नेण्यासाठी कायदेभंगाची वाट धरू !

शिवसेनाप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचा गणेशोत्सवात बाधा आणू पहाणार्‍यांच्या विरोधात घणाघात !
      मुंबई, ३१ ऑगस्ट - ब्रिटिशांविरुद्ध लोकांमध्ये जाग आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती मंडप आणि रस्ते यांवर आणला. त्यातून स्वातंत्र्यलढ्याचा वणवा पेटून देश स्वतंत्र झाला; पण स्वतंत्र हिंदुस्थानची न्यायालये त्याच ठिणगीवर फुंकर मारून गणपती उत्सवांना घरात कोंडायला निघाली आहेत. आज लोकमान्य टिळक हयात असते, तर न्यायालयाचे डोके ठिकाणावर आहे काय ?, असा प्रश्‍न विचारून गणपतीस मंडपात येण्यापासून कोण रोखतो, ते पाहतो असे आव्हान नक्कीच दिले असते. त्यांच्या या कायदेभंगाविषयी स्वतंत्र हिंदुस्थानच्या न्यायालयांनी लोकमान्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून कसाबच्या कोठडीत डांबले असते. आमच्या न्यायालयांनी पाकिस्तानच्या न्यायालयांसारखे वागू नये. नाहीतर लोकमान्य आणि शिवसेनाप्रमुख यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शिवसेनेला कायदेभंगाची वाट धरावीच लागेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून केले आहे. 

(म्हणे) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वांत मोठी आतंकवादी संघटना !

माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी द्वेषमूलक वक्तव्य
      पुणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - आज भारतात जी काही प्रसारमाध्यमे आहेत, ती सर्व ब्राह्मणांची आहेत. भारतात होणार्‍या प्रत्येक दंगलीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, तसेच केरळ, नांदेड आणि गुजरात येथे झालेल्या बॉम्बस्फोटांमध्येही संघाचा हात आहे. ठाणे येथील बॉम्बस्फोट प्रकरणात रमेश गडकरी याला शिक्षाही झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वांत मोठी आतंकवादी संघटना आहे. हेमंत करकरे यांची हत्या ब्राह्मण आणि संघ यांनी केली आहे. पुण्यातील आतंकवादविरोधी पथक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच शाखा आहे, असे द्वेषमूलक वक्तव्य माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केले. (हिंदुद्वेषाच्या काविळीमुळेच मुश्रीफ यांना सर्व ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना दोषी दिसतात; मात्र त्यांच्याकडे याविषयी कोणते पुरावे आहेत ? जर असतील, तर ते त्यांनी न्यायालयात सादर करावे ! पनवेल, ठाणे आणि मडगाव येथील बॉम्बस्फोट प्रकरणांत सनातनचा हात नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले असतांनाही केवळ ब्राह्मण आणि हिंदु यांच्या द्वेषापोटीच मुश्रीफ असे आरोप करत आहेत. सनातन प्रभात हे नियतकालिक आहे, हेही माहिती नसलेले अज्ञानी मुश्रीफ ! - संपादक)

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने...

साप्ताहिक सनातन प्रभातचा
अंक क्र. ४३ (१० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०१५)
गणेशचतुर्थी विशेषांक (रंगीत)
या अंकात वाचा...
 • श्री गणेशाच्या उपासनेमागील शास्त्र !
 • सनातनची सात्त्विक श्री गणेशमूर्ती, तिची वैशिष्ट्ये आणि उपयोग
 • यांसह अन्य वाचनीय लिखाण
   सर्व वितरकांनी अतिरिक्त अंकांची मागणी मंगळवार१ सप्टेंबर २०१५ या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी.
आपली मागणी आजच नोंदवा !

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अजित पवार अडकण्याची शक्यता

घोटाळेबाजांचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप शासन कारवाई करणार का ?
      अकलूज, ३१ ऑगस्ट - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचार हा आघाडी शासनाच्या काळात झाला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्राथमिक चौकशी अहवालात ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. अंतिम अहवालापर्यंत घोटाळ्याची व्याप्ती वाढून महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार रमेश कदम यांच्याबरोबरच आणखी नावे निष्पन्न होतील. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा असू शकतील, असे विधान समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. (या घोटाळ्यामध्ये कोणाचीही हयगय न करता भाजप शासनाने कारवाई करावी, हीच अपेक्षा ! - संपादक) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित महामेळाव्याच्या कार्यक्रमासाठी ते माळीनगर येथे ३० ऑगस्ट या दिवशी आले असता बोलत होते.

फलक प्रसिद्धीकरता

औरंगाबाद भारतात आहे कि पाकिस्तानात ?
    औरंगजेबाचा मोठा भाऊ दाराशुकोह धर्मनिरपेक्ष होता. त्याचे नाव औरंगाबादला द्यायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि इतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Aurangjebka bhai Dara Shukohaka nam Aurangabadko deneki mang itihaske
abhyasak Sadanad Morene ki. - Aurangabad Bharatme hai ya Pakme ?
जागो !
    औरंगजेबका भाई दारा शुकोहका नाम औरंगाबादको देनेकी मांग इतिहासके
अभ्यासक सदानंद मोरेने की. - औरंगाबाद भारतमें है या पाकिस्तानामें ?

सिंहस्थ पर्व २०१५ आणि गोदावरी पुष्करलू यासंबंधी माहिती देणार्‍या नव्या विभागांना आरंभ !

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदुजागृती डॉट ऑर्ग (Hindujagruti.org)
या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा जुलै २०१५ मधील आढावा
१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या
    ही वाचकसंख्या गूगल अ‍ॅनॅलिटिक्स या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून मिळते.

२. संकेतस्थळावरील राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीच्या मोहिमा
२ अ. हिंदु धर्म, देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या विडंबनाच्या विरोधात राबवण्यात आलेल्या जनजागृती मोहिमा
१. अमेरिका येथील बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या ॥ ॐ कुत्राय नमः ॥ या नाटकाद्वारे हिंदु मंत्र आणि भगवान दत्तात्रेय यांच्या होत असलेल्या विडंबनाच्या विरोधात जनजागृती समितीच्या संबंधातील FHA (फोरम फॉर हिंदु अवेकविंग)च्या साधकांनी निषेध मोहीम राबवली.

आखाड्यांनी केलेले धर्मरक्षणाचे कार्य

नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथे होत असलेल्या सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने...
    सध्याच्या काळात समाजापासून काहीसे दूर असलेल्या आखाड्यांना पूर्वी मोठे कार्य केले आहे. शास्त्र आणि शस्त्र नारंगत असल्यामुळे धर्मावर आलेल्या आक्रमणांचा आखाड्यांनी कशा प्रकारे प्रतिकार केला, हे या सदराच्या अंतिम भागात जाणून घेऊया.
    हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या इस्लामी आक्रमकांचा प्रतिकार करण्यास तत्कालीन हिंदू राजसत्ता काहीशी असमर्थ ठरल्याने साधूसंन्याशांनी धर्मसंरक्षणार्थ दंड थोपटले. नागा संप्रदाय आणि दशनामी संन्यासी एकत्र आले. शक्तीचे प्रतीक असलेला भाला त्यांनी शस्त्र म्हणून धारण केला. मल्लविद्या, तसेच तलवार आदी शस्त्रांचे प्रशिक्षण शास्त्रविद्येसह दिले जाऊ लागले. नागा-दशनामी संन्याशांमध्ये प्राचीन आध्यात्मिक परंपरेचे जतन करणारा शास्त्रधारी आणि धर्मरक्षणासाठी लढणारा शस्त्रधारी, असे दोन भाग करण्यात आले. या संन्याशांनी धर्मरक्षणाचे पुढील प्रकारे ऐतिहासिक कार्य केले.

मानवता आणि धर्महित यांच्या हिताच्या या लढाईत ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या बळावरच आम्हाला हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य होणार आहे. - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती


साहित्यक्षेत्रातील भोंदू !

     भालचंद्र नेमाडे ६० च्या दशकात कोसला आणि २० च्या दशकात हिंदु यांसारख्या प्रवाहाबाहेरच्या (सर्वसामान्यांना कळण्यास जड जाणार्‍या) कादंबर्‍या लिहून अधिक चर्चेत आले. भाषाशास्त्राचे प्राध्यापक असल्याने साहित्यक्षेत्रातील समीक्षक, विचारवंत अशी त्यांची प्रतिमा आहे आणि त्यातच ज्ञानपीठ देण्यार्‍यांच्या समितीत जैन अधिक असल्याने हिंदुविरोधी आणि जैन असलेल्या नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. दुतोंडी आणि स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी करणारी वक्तव्ये करण्यात नेमाडे पटाईत आहेत, उदा. अखिल भारतीय साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, जातीव्यवस्था हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, मराठी शुद्धलेखनातले र्‍हस्व-दीर्घ काढून टाका इ. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वादात उडी घेऊन स्वतःच्या दुतोंडीपणाचा कळस केला.

आसुरी इंग्रजी भाषा

गोवा राज्यात चालू असलेल्या भाषिक संघर्षासंदर्भात मार्गदर्शक सदर
     मराठी भाषेसाठी आंदोलन करणार्‍यांनो, सनातन संस्थेची मराठी भाषाविषयक ग्रंथमालिका अभ्यासा ! त्यामुळे मराठी भाषेचे आध्यात्मिक महत्त्व आणि तुलनेने इंग्रजी किती कनिष्ठ आहे, हे समाजाला सांगता येईल ! मराठी भाषेचे केवळ मातृभाषा म्हणून महत्त्व नाही, तर संस्कृत नंतर मराठीच सर्वांत सात्त्विक भाषा आहे !
१. इंग्रजी भाषा आसुरी संस्कृती जपणारी भाषा असल्याने जिवाला असुर बनवून देवबुद्धीच्या पलीकडे नेणारी ठरणे : इंग्रजी भाषेत सर्वच स्तरांवर पाताळातील नाद घनीभूत झालेले असल्याने ही आसुरी संस्कृती जपणारी भाषा जिवाला असुर बनवून देवबुद्धीच्या पलीकडे नेणारी ठरते.

देशात अशांती निर्माण करणार्‍या पाकिस्तानला ठेचून काढा आणि याकूब मेमनचे समर्थन करणार्‍यांनाही फाशी द्या !

फोंडा (गोवा) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाने प्रेरित होऊन
मंगेशी येथील श्री. शिवप्रणव आळवणी यांनी दिलेला अभिप्राय
    राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने रविवार, १६ ऑगस्ट २०१५ या दिवशी जुने बसस्थानक, फोंडा, गोवा येथे आंदोलन करण्यात आले. इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना देण्यात येणारे शासकीय अनुदान त्वरित रहित करावे, आतंकवादी याकूबचे समर्थन करणार्‍यांना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, तसेच कराची चेंबर ऑफ कॉमर्स, पाकिस्तान हाय कमिशन आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन यांनी संयुक्त विद्यमाने नवी देहली येथे ११ ते १३ सप्टेंबर २०१५ या काळात आयोजित केलेले प्रदर्शन आणि या काळात आयोजित करण्यात आलेला एक शाम पाकिस्तान के नाम ही कव्वाली आणि फॅशन शो हा कार्यक्रम यांना विरोध करणे, या मागण्यांना अनुसरून हे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनासंबंधी माहिती मिळाल्यानंतर मंगेशी (गोवा) येथील कु. शिवप्रणव आळवणी आंदोलनात सहभागी झाले. श्री. आळवणी यांनी यानंतर आंदोलनातील मागण्यांना अनुसरून त्यांचा अभिप्राय दैनिक सनातन प्रभातला पाठवला आहे. हा अभिप्राय जसा आहे, तसा पुढे देत आहे.

मुलतान (पाकिस्तान) येथील श्री नृसिंह मंदिराचा स्वप्नदृष्टांताप्रमाणे घेतलेला शोध !

    रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर जवळील गणेशभट्ट जोशी या परमसात्त्विक ब्राह्मणाने उपजिविकेचे साधन शोधत १८ व्या शतकात पुणे गाठले. येथे आल्यावर त्यांचे आराध्य कुलदैवत श्री लक्ष्मीनृसिंह यांची उपासना चालू ठेवली. पुणे येथील सदाशिव पेठ येथे एक मंदिरही बांधले. या घराण्याचे सध्याचे वंशज श्री. अनंत जगन्नाथ जोशी यांनी स्वप्नदृष्टांताप्रमाणे मूळ नृसिंह मंदिराचा शोध लावला. ते मंदिर पाकिस्तानच्या मुलतान शहरात असल्याचे समजले. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची संधी साधून त्यांनी मुलतान गाठले. प्राचीन नृसिंह मंदिर आणि त्यातील पुरातत्व मूर्तींचा शोध घेतला, तेव्हा त्या मूळ स्थानासहित फाळणीच्या वेळचा मूर्तीचा प्रवास सध्याच्या तेथील रहिवाशांकडून त्यांना सविस्तर समजला. तो इतिहास इतका रोमहर्षक आहे की, प्रत्येक भारतियाने वाचलाच पाहिजे.

कमालीचे दायित्वशून्य असणारे एका संघटनेचे कार्यकर्ते !

        एका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून विशेष उपक्रम राबवतांना झालेल्या गंभीर चुका पुढे देत आहे.
१. खाऊ वाटपाच्या उपक्रमापूर्वी लाडूची चव न पहाणे, परिणामी खराब झालेले 
लाडू खाल्ल्याने विद्यार्थ्यांना उलट्या होणे 
     एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका जिल्ह्यातील शाळेत बुंदीचे लाडू वाटण्याचा उपक्रम राबवण्याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना लाडू वाटण्यापूर्वी काही कार्यकर्त्यांनी त्यांची चव पाहिली नसल्याने त्याला बुरशी आल्याचे लक्षात आले नाही. विद्यार्थ्यांनी ते लाडू खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या झाल्या. शाळेतील शिक्षिकेने अतिशय नाराज होऊन वरील चूक लक्षात आणून दिली.

साधकांनो, हितचिंतकांकडून अर्पण आलेल्या वस्तूंची परस्पर विक्री न करता त्या रामनाथी आश्रमात पाठवा !

      हिंदु धर्मजागृती सभा, अधिवेशने आणि अन्य कार्यक्रम या वेळी काही वेळा हितचिंतक सोने किंवा चांदी यांच्या वस्तू अर्पण देत असल्याचे लक्षात आले आहे. आंध्रप्रदेशमध्ये एका हितचिंतकाने चांदीची वस्तू आणि सोलापूर येथील एका हितचिंतकाने सोन्याची वस्तू दिली होती. तेथील संबंधित साधकांनी त्या वस्तूंविषयी संबंधित उत्तरदायी साधकांना न विचारता त्यांची परस्पर विक्री केली आणि ते पैसे अर्पणात घातले. साधकांनी हितचिंतकांकडून आलेल्या वस्तूंची परस्पर विक्री न करता त्या वस्तू रामनाथी आश्रमात येत असलेल्या साधकासमवेत पाठवाव्यात. - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमातील सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून व्यक्त केलेले अभिप्राय !

      सनातनच्या रामनाथी आश्रमासमोरून जातांना गेली ८ वर्षे काही समाजद्रोही सनातन बॉम्ब, असे ओरडत जातात. काहीजण शिव्या देत जातात, काहीजण दगड फेकतात, तर काहीजण पेट्रोल बॉम्ब फेकतात. विविध संप्रदायांच्या भक्तांना, हिंदुत्ववाद्यांना आणि संतांना येणारे पुढील अनुभव वाचले की, लक्षात येईल की, सनातनविरोधी अशी कृत्ये करणारे असुरांच्या कह्यात आहेत. हिंदु राष्ट्रात त्यांचा नाश केला जाईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.६.२०१५) 
     सूक्ष्म-जगताचे प्रदर्शन पाहून चांगल्या कार्याला किती अडथळे येतात, याची जाणीव होऊन दुःख झाले. प्रत्येकाला साधनेची पुष्कळ आवश्यकता आहे, हे लक्षात आले. 
- श्री. विजय शामराव गावडे, पतित पावन संघटना, शहरप्रमुख, पुणे, महाराष्ट्र. (१३.६.२०१५)

मायेचा त्याग करून पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात येतांना प.पू. डॉक्टररूपी श्रीकृष्णाने केलेल्या साहाय्याविषयी सौ. पल्लवी हंबर्डे यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

१. संसार सोडून पूर्णवेळ साधनेसाठी आश्रमात जायचा मुलाचा आणि सुनेचा निर्णय ऐकल्यावर 
देवाने सासूसासर्‍यांच्या मनाची सिद्धता करून घेतल्यामुळे त्यांनी सहजपणे अनुमती देणे 
श्री. अमोल आणि सौ. पल्लवी हंबर्डे
     प.पू. डॉक्टरांनी आतापर्यंत माझ्यासाठी पुष्कळ काही केले; पण त्यांची परतफेड मी कधीच करू शकत नाही. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, असे वाटले.
     हे श्रीकृष्णा, घरी सासू-सासर्‍यांना (आई-बाबांना) आम्ही पूर्णवेळ साधक होणार, असे सांगितल्यावर ते पहिल्यांदा नाही म्हणाले. आम्हा दोघांनाही आपण आता पूर्णवेळ साधक होऊया, असे पुष्कळ तीव्रतेने वाटत होते; पण आई-बाबांना कसे समजावून सांगावे, ते कळत नव्हते. श्री. अमोल यांनी परत आई-बाबांना सांगितले, आम्ही २९ जूनला रामनाथीला जाण्याचे निश्‍चित केले आहे. आमचे येथे मन लागत नाही आणि आम्हाला पूर्णवेळ साधनाच करायची आहे. त्यावर आई-बाबा पुष्कळ रागावतील, असे वाटले; पण देवा, तूच त्यांची सिद्धता करून घेतलीस. बाबा म्हणाले, तुम्हाला जायचेच आहे, तर जाऊ शकता; पण दुकानाचा पूर्ण हिशोब करून जा. आई म्हणाल्या, तेथे जाऊन तुम्ही अंबिकाचे शिक्षण थांबवू नका. ती हुशार आहे. तिचे शिक्षण पूर्ण करा. आम्हाला आरंभी एकटे रहाण्याचा त्रास होईल; पण आता पर्याय नाही. या प्रसंगावरून मनात विचार आला, श्रीकृष्णा (प.पू. डॉक्टर), आपण किती हे सर्व सहजतेने केलेत. त्याविषयी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.

व्याकुळ अंतःकरणाने प.पू. गुरुमाऊलीच्या दर्शनाची प्रतीक्षा करणारे आंध्रप्रदेशातील श्री. प्रसन्ना वेंकटपूर !

     अखिल भारतीय हिंदू अधिवेशनानंतर रामनाथी येथील आश्रमात पार पडलेल्या समितीच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेला भारतभरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यासाठी आंध्रप्रदेश राज्यातील श्री. प्रसन्ना वेंकटपूर हेसुद्धा आले होते. आश्रमात येण्यापूर्वी प.पू. डॉक्टरांच्या दर्शनासाठी झालेली त्यांची व्याकुळता त्यांनी पाठवलेल्या लघुसंदेशातील पुढील काव्यातून लक्षात येते. - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.८.२०१५)
      अनुुदिन सोचता, पडेना चैन । 
      प्रभु, मन तरसे दिनभर नैन ॥ १ ॥
     अब समय दिया प्रभु ने तो मैं आ गया । 
     जागे मन के भाग्य, प्रभुराम से मिलन हो गया ॥ २ ॥
काव्याचा मराठीतील अर्थ : प्रतिदिन तुमची आठवण येते. तुमच्याविना चैन पडत नाही. देवा, तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ मनाने वाट पहात आहे. आता ईश्‍वराने संधी दिली; म्हणून आलो. प्रभुरामाशी मीलन झाले अन् माझे भाग्य उजळले !
- श्री. प्रसन्ना वेंकटपूर, भाग्यनगर, आंध्रप्रदेश (जून २०१५)

शरणागत भावाचे महत्त्व

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
       साधनेत शरणागत भाव महत्त्वाचा आहे. या भावामुळे कठीण गोष्टीही सहज साध्य होतात. जोपर्यंत आपल्यात मी आहे, तोपर्यंत आपल्याला काही साध्य होत नाही आणि आपली साधनाही होत नाही. त्यामुळे केवळ कठीण प्रसंगातच नव्हे, तर प्रत्येक प्रसंगात आपल्याला शरणागत भावात रहाता आले पाहिजे. कोणतीही कृती असो आणि ती कशी करायची, हे ठाऊक असो, आपण त्या कृतीच्या आरंभी शरणागत भावाने देवाला प्रार्थना करायला हवी. असे केल्याने देवाचे साहाय्य मिळून ती कृती जलद गतीने आणि सहज होते. नाहीतर देव म्हणतो, तुला हे येते, असे वाटते ना, तर ते तूच कर आणि तो साहाय्य करीत नाही. असे होऊ नये, असे आपल्याला वाटत असेल, तर आपण सातत्याने देवाला हाक मारायला हवी. यामुळे देवाचे साहाय्य तर मिळतेच आणि आपले त्याच्याशी अनुसंधानही टिकून रहाते. सत्मध्ये राहिल्याने मनोलय लवकर होतो.

पू. (सौ.) माई म्हणजे भक्ती, शक्ती आणि निरपेक्ष प्रेम !

पू. माई, तुम्ही आहात आमुच्या आई ।
प्रणाम, प्रणाम, प्रणाम तुमच्या चरणी ॥ धृ.॥

मायेची पाखर घातली आम्हावरी ।
सोडवल्या समस्या, हाक देवासी देऊनी ॥ १ ॥

संत झाल्यावर पू. (सौ.) माईंमध्ये जाणवलेले पालट

१. संत झाल्यानंतर पू. माईंचा तोंडवळा पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी आणि उजळ दिसतो. 
२. त्यांचे केस सोनेरी झाले आहेत. 
३. त्यांचे निखळ हास्य ऐकून आनंद जाणवतो. 
- श्री. विनोद टेमकर, पानवळ-बांदा, जि. सिंधुदुर्ग.

त्यागी आणि अनासक्त असलेल्या अन् साधकांवर प्रेमाचा वर्षाव करणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) (वय ६७ वर्षे) !

१. हसतमुख आणि आनंदी
      पू. माई नेहमी हसतमुख आणि आनंदी असतात. कठीण परिस्थितीतही त्या कधी दुःखी झाल्या नाहीत. परिस्थिती स्वीकारून पुढे जाणे, हे तत्त्व पू. (सौ.) माईंनी चांगल्या रितीने आचरणात आणले.
२. गृहकृत्यदक्ष
      एखादा पदार्थ बनवण्यासाठी काही साहित्य अल्प असले, तरी पू. माई उत्कृष्ट स्वयंपाक करतात. त्यांच्या हाताला चव आहे. पू. माई शिळे अन्न कधीही वाया घालवत नाहीत. 
- सौ. मीरा मदन सावंत, कराड, जि. सातारा आणि श्री. राजेंद्र परब, कुडाळ सेवाकेंद्र

सर्वांना साधनेची गोडी लावणार्‍या समष्टी आई पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक !

      १. पू. माईंनी बनवलेले अन्न ग्रहण करतांना उपाय होतात. 
- श्री. बाळकृष्ण राऊळ, श्री. विनोद टेमकर आणि सौ. समृद्धी गरुड
२. सहवासात आलेल्या प्रत्येकाला साधना सांगणे 
     सामान्यतः दोन वयस्कर व्यक्ती भेटल्या की, भूतकाळातील आणि व्यावहारिक विषयांत रमून जातात; पण माई सहवासात येणार्‍या वयस्कर व्यक्तींनाही साधनेविषयी सांगतात. मे २०१४ मध्ये आम्ही बांदा शहरात प्रथमच रहायला आलो. आम्ही ज्या खोलीत भाड्याने रहात होतो, तेथे शेजारी एक कुटुंब रहाते. त्या कुटुंबातील एका वयस्कर महिलेशी माझी ओळख झाली. त्यांच्याशी बोलतांना सहज कळले की, त्या माईंना ओळखतात. त्या म्हणाल्या, प.पू. बाबा आणि माई यांच्यासारखी माणसे शोधून सापडणार नाहीत. माईंच्या सासूबाई आणि माझ्या सासूबाई यांची जवळीक होती. पुढे आम्हा सुनांमधेही जवळीक झाली. दोन पिढ्यांमधील ही जवळीक केवळ भक्तीच्या जोरावर टिकून आहे. माईंमुळे आम्हाला उपासनेची सवय जडली आहे. - सौ. समृद्धी गरुड, पर्वरी, गोवा.

पू. सौरभदादांना जेवण भरवण्याची सेवा करतांना त्यांच्या माध्यमातून अनुभवला पू. (सौ.) माईंचा आनंददायी सत्कार सोहळा !

Add caption
१. पू. सौरभदादांना जेवण भरवतांना ते स्थुलातून साधिकेच्या जवळ 
असल्याचे; पण सूक्ष्मदेहाने दुसरीकडेच असल्याचे जाणवणे
      भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने २९.८.२०१५ या दिवशी पू. सौरभदादांना जेवण भरवण्याची सेवा मिळाली. याच दिवशी पू. माईंचा वाढदिवसही होता. प.पू. डॉक्टरांनी माईंना आश्रमात बोलावले होते. बैठक कक्षामध्ये त्यांचा सत्कार सोहळा चालू असावा, याची मला कल्पना होती. पू. दादांना जेवण वाढून नेतांना संत बैठक कक्षात जातांना मला दिसले. नंतर मी खोलीत जाऊन पू. सौरभदादांना जेवण भरवण्याची सेवा चालू केली. त्या वेळी ते स्थुलातून माझ्याजवळ आहेत; पण सूक्ष्मदेहाने दुसरीकडेच आहेत, हे लक्षात आले. त्यांचे चित्त दुसरीकडे असल्याचे पाहून माझ्या मनात विचार आला, हे आता कुठे असावेत ? तेव्हा आमचे पुढीलप्रमाणे संभाषण झाले.

आपल्या वाणीतून, नेत्रांतून आणि प्रेमळ हास्यातून सार्‍यांवर प्रेमाची पखरण करून त्यांना आपलेसे करणार्‍या अन् गुरूंवर अढळ निष्ठा असलेल्या सनातनच्या ५० व्या संतरत्न पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक !

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक
    मी मुंबईत सत्संगाच्या माध्यमातून सनातन संस्थेच्या संपर्कात आले. सत्संगामध्ये ईश्‍वराचे सगुण-निर्गुण गुरुतत्त्व कार्य कसे करते ? प्रारब्धावर साधनेने मात कशी करायची असते ? हे मी ऐकत होते. सर्व विषय मला नवीनच होता. हे विश्‍व वेगळे आहे, असे जाणवू लागले, तरीही मी कोणताही प्रयत्न न करता सहजतेने सत्संगात आणि नंतर सेवेमध्ये ओढले गेले, याचे मला आश्‍चर्य वाटायचे. प.पू. डॉक्टरांना पाहिले नव्हते; पण त्यांच्याप्रती मनात अत्यंत प्रेम निर्माण व्हायचे. त्यांच्याशी पूर्वीपासूनच जवळीक आहे, असे वाटायचे. मी त्यांच्याशी मनातून बोलायचे आणि मला पुष्कळ आनंद मिळायचा.
      लग्न झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. तेव्हा प.पू. डॉक्टरांना मनोमन विचारले होते की, मला इथे जवळचे असे कोणीच नाही. तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प.पू. परूळेकर महाराज, पू. गोगटे गुरुजी, प.पू. अण्णा राऊळ महाराज, प.पू. भाऊ मसुरकर, प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई हे सर्व संत तू माझी मुलगी आहेस, असे म्हणायचे. तेव्हा प.पू. डॉक्टरांची लीला अनुभवायला मिळत होती.

सात्त्विक गोष्टींची आवड असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज येथील चि. वरुण शेट्टी (वय १ वर्ष ७ मास) !

चि. वरुण शेट्टी
१. जन्मापूर्वी
अ. बाळाच्या जन्मापूर्वी गर्भारपणात मला कोणताही त्रास झाला नाही. 
आ. गर्भारपणात मला कोणतीही आवड-निवड नव्हती.
इ. मी केवळ सात्त्विक जेवण जेवू शकत होते. बाहेरचे मसाले घातलेले पदार्थ खाल्ले की, मला उलटी होत असे.
ई. मला नामजप करतांना चांगले वाटायचे.
उ. माझे शस्त्रकर्म होणार आहे, हे ठाऊक असतांनाही मला भीती वाटत नव्हती.
- सौ. राजलक्ष्मी शेट्टी (वरुणची आई), मिरज 

हिंदुत्वाच्या विचारधारेतूनच हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

    अन्य कोणत्याही मार्गाने नाही आणि अन्य कोणत्याही विचारधारेतून नाही, तर केवळ हिंदुत्वाच्या विचारधारेतूनच हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते. येणारे हिंदु राष्ट्र हे केवळ भगव्या ध्वजाखालीच स्थापन करावे लागेल. अखंड साधना हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा मूलमंत्र आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला अखंड साधना करायला हवी.

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे
केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे !
    ५.९.२०१५ या दिवशी कृष्णजन्माष्टमी आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विषद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहेत. या धर्मसत्संगांतर्गत धार्मिक कृतियोंका शास्त्र या विषयाचे दोन धर्मसत्संग आहेत आणि अध्यात्मशास्त्र या विषयाचे ४ धर्मसत्संग आहेत. या सत्संगांचा कालावधी २८ मिनिटे आहे.
    या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे.
२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत.

हिंदु जनजागृती समितीच्या केरळ येथील धर्मप्रसाराच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. अलुवा येथे पारितोषिक वितरण समारंभात
समितीच्या वतीने धर्माचरण या विषयावर प्रवचन
    जून मासात (महिन्यात) स्वामी विवेकानंद सेवा समिती, अलुवा यांच्या वतीने १० वी आणि १२ वीच्या वर्गात चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. त्या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांना धर्माचरण या विषयावर प्रवचन देण्यासाठी बोलावले होते. एकूण १५० जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. त्या ठिकाणी सनातन संस्थेचे धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ यांचे प्रदर्शनही लावले होते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

मी कोणावर प्रेम करीत नाही. प्रेम मला खेचते.
मी प्रेमात फसेन म्हणून मी प्रेमात अडकलो.
भावार्थ : मी प्रेम कोणावर करीत नाही, यातील प्रेम शब्द हा व्यावहारिक, मायेतील प्रेमासंबंधी आहे. प्रेम मला खेचते, यातील प्रेम म्हणजे प्रीती, पारमार्थिक प्रेम. नामधारकाचे प्रेम मला खेचते, म्हणजे मला त्याच्याविषयी ओढ वाटते.
    मी प्रेमात फसेन, यातील प्रेम हा शब्द व्यावहारिक प्रेमासंबंधी आहे. म्हणून मी प्रेमात अडकलो, यातील प्रेमात हा शब्द प्रीती म्हणजे पारमार्थिक प्रेम या अर्थाने वापरला आहे. थोडक्यात व्यावहारिक प्रेमात फसू नये, म्हणून मी पारमार्थिक प्रेमात अडकलो आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

साधना

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदाचाराचे महत्त्व ! 
    मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसते, तर व्यक्तीचे आचार-विचार आणि वर्तन यांनाच खरे महत्त्व असते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
      दुरून उपचार (Distant Healing) या पद्धतीत एका ठरलेल्या व्यक्तीवर दुरून उपाय करतात. याउलट संतांकडून एकाच वेळी शेकडो अनोळखी व्यक्तींवरही उपाय होतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.८.२०१५)

युद्धसज्ज शत्रूराष्ट्रे आणि झोपलेला भारत !

     सध्या जगाचे लक्ष चीनकडे लागले आहे. चीनमधील आर्थिक मंदीमुळे तो सध्या चर्चेत नाही, हे येथे नमूद करावे लागेल. ३ सप्टेंबर या दिवशी चीनमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचे एक भव्य संचलन होणार आहे. आतापासूनच चीनने या संचलनाला प्रसिद्धी देण्यास आरंभ केला आहे. लोकांनी कधीही न पाहिलेल्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन या दिवशी घडवले जाईल, असे चीन शासनाने म्हटले आहे. त्यामुळे चीन त्या दिवशी कोणत्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन घडवून आणणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी चीनचा पारंपरिक शत्रू जपानने शरणागती पत्करली तो दिवस म्हणजे ३ सप्टेंबर.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn