Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

श्रीमत् महासाधु मोरया गोसावी यांची पुण्यतिथि

कोटी कोटी प्रणाम !

श्री अनंतानंद साईश यांचा आज महानिर्वाणोत्सव

पाकला गोपनीय माहिती पुरवणार्‍या भारतीय हवाई दलाच्या बडतर्फ अधिकार्‍यास अटक !

सुरक्षादलांच्या बडतर्फीसारखी शिक्षा झालेल्या अधिकार्‍यांना 
मोकळे सोडू नका. त्यांना आजन्म कारागृहातच ठेवा !
आय.एस्.आय.च्या महिला हेराच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून दिली माहिती !
     नवी देहली - आय.एस्.आय.ला गोपनीय माहिती पुरवणार्‍या भारतीय हवाई दलाच्या बडतर्फ अधिकार्‍यास देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेने केरळ येथे अटक केली. रंजित के.के. असे या अधिकार्‍याचे नाव आहे. पोलिसांनी २८ डिसेंबरला ही कारवाई केली. रंजित यास देहलीला नेण्यात आले असून त्याची कसून चौकशी चालू आहे. आय.एस्.आय.च्या एका महिला हेराने रंजितला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून ही सर्व गुपिते मिळवली.

वर्ष २०१६ च्या आरंभी भारतात आक्रमण करण्याचा लष्कर-ए-तोयबाचा डाव !

देशाने आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली असती, तर त्यांचे 
भारतात वारंवार आतंकवादी आक्रमणे करण्याचे धाडस झाले नसते !
     नवी देहली - वर्ष २०१६ च्या काळात देशात अनेक ठिकाणी लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेकडून आक्रमण होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसद भवन, भारतीय सैन्याचे मुख्यालय आणि देशातील आण्विक केंद्र यांना आतंकवादी लक्ष्य करण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील सर्व राज्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.

(म्हणे) पतंजलीची उत्पादने गोमूत्रमिश्रित असल्याने खरेदी करू नका !

गोमूत्र न चालणार्‍यांना गोमांस कसे चालते ?
गोमूत्र हे इस्लाममध्ये निषिद्ध असल्याचा कांगावा !
पतंजलीच्या विरोधात मुसलमान संघटनेचा फतवा
     चेन्नई - योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांच्या विरोधात तमिळनाडू तौहीद जमात या मुसलमान संघटनेने फतवा काढला आहे. पतंजलीच्या बहुतांश उत्पादनांमध्ये गोमूत्राचा वापर करण्यात येतो. गोमूत्र हे इस्लाममध्ये हराम (निषिद्ध) मानले गेले आहे.

पैशांचे प्रलोभन दाखवून पाकच्या आय.एस्.आय.कडून भारतात हेरगिरी !

गोवर्धन सिंहसारखे सूर्याजी पिसाळ भारतात असल्यामुळेच पाकचे फावते ! 
अशा फितुरांना तात्काळ फाशी द्या !
पोखरण हेरगिरी प्रकरण
     नवी देहली - पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. पैशांचे प्रलोभन दाखवून कशाप्रकारे भारतात हेरगिरी करत आहे, हे नुकतेच राजस्थानच्या पोखरणमध्ये अटक करण्यात आलेल्या विश्‍वासघातकी गोवर्धन सिंह याच्या चौकशीतून उघड झाले आहे. मागील एका वर्षात सीमावर्ती भागातील २० हून अधिक पाकसाठी काम करणशर्‍या हेरांना अटक करण्यात आली आहे. (हेरगिरीने पोखरलेला भारत शत्रूराष्ट्राशी दोन हात कसे करणार ? अशा हेरांना खड्यासारखे वेचून कठोर शिक्षा करणे आवश्यक ! - संपादक)

बंगालमध्ये मंदिराजवळ गोमांस शिजवण्यास विरोध केल्यावरून धर्मांधांकडून हिंदूची हत्या

दादरीवरून जगभर रान पेटवणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, 
प्रसारमाध्यमे आणि पुरोगामी आता कुठे लपून बसले आहेत ?
ममता बॅनर्जी यांच्या बंगालमध्ये हिंदू असुरक्षित !
     कोलकाता - शांतीपूर येथे वैष्णव मंदिराजवळ मद्यपान करणार्‍या आणि गोमांस शिजवणार्‍या धर्मांध युवकांना एका हिंदु व्यापार्‍याने विरोध केल्याने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हे मंदिर भक्ती मार्गातील श्री चैतन्य देव यांचे शिष्य अद्येता यांचे समाधीस्थळ आहे. 
     या मंदिराजवळ २५ डिसेंबर या दिवशी १५ जणांच्या धर्मांध युवकांनी मद्यपान करून गोमांस शिजवण्यास प्रारंभ केला, तसेच कर्णकर्कश संगीत लावून आणि आपापसात शिवीगाळ करून तेथील शांती आणि पवित्रता भंग करण्याचा प्रयत्न केला. हे बघून शांतीपूर येथील सुकांतापल्ली भागात रहाणार्‍या हिंदु तरुणांच्या एका गटाने या धर्मांधांना विरोध केला. त्याच वेळी गुरुपद विश्‍वास नावाचा एक व्यापारी तेथून जात होते.

भारतीय नौदलाकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

     कोलकाता - भारतीय नौदलाकडून भूमीवरून हवेत मारा करणार्‍या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. आयएन्एस् कोलकाता या लढाऊ जहाजावरून ही चाचणी घेण्यात आली असून हवाई आक्रमणांना प्रत्युत्तर देण्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने ही मोठी कामगिरी समजण्यात येत आहेे. भारतीय नौदलाने हवाई संरक्षणामध्ये घेतलेल्या या मोठ्या झेपेविषयी संरक्षण मंत्रालयाने आनंद व्यक्त केला आहे. भारतीय नौदल, संरक्षण संशोधन अन् विकास संस्था, तसेच इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज् यांनी संयुक्तपणे ही चाचणी घेतली.

दुबईत धर्मांतरित हिंदु पत्नीची हत्या करणार्‍या धर्मांध पतीला मृत्यूदंडाची शिक्षा

असे किती लव्ह जिहादचे बळी गेल्यानंतर हिंदु तरुणींना शहाणपण येणार आहे ?
     दुबई - रायगड येथील अतिफ पोपेरे याला २४ वर्षीय पत्नी बुशराच्या हत्येप्रकरणी दुबईत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातच्या कायद्यानुसार त्याला गोळीबार पथकाकडून गोळ्या झाडून मृत्यूदंड देण्यात येणार आहे. त्याच्या पत्नीच्या कुटुंबियांनी क्षमा केल्यास त्याला या शिक्षेत सूट मिळू शकते; परंतु ही शक्यता बुशराच्या आईकडून नाकारण्यात आली आहे. अतिफने बुशरा (पूर्वाश्रमीची मिनी धनंजयन)ला प्रेमाच्या जाळ्यात फसवून विवाह केला होता.

विवाहोत्तर धर्मांतरावर बंदी घालण्याची बजरंग दलाची मागणी !

धर्माविषयी अभिमान नसणे, हीच हिंदूंची मूळ समस्या आहे. त्यामुळे 
हिंदूंना धर्मशिक्षण देणे हाच लव्ह जिहादवर खरा उपाय आहे !
     मीरत (उत्तरप्रदेश) - बजरंग दलाचे उत्तरप्रदेश राज्य संयोजक श्री. बलराज दुगर यांनी लव्ह जिहादची प्रकरणे थांबवण्यासाठी विवाहोत्तर धर्मांतरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्रेम खरे असेल, तर मुसलमानाने हिंदु मुलीशी विवाह केल्यावर त्या मुलीचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याची काय आवश्यकता ?, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे. या संदर्भात आम्ही राष्ट्र्रपतींकडे मागणी करणार असून विवाहोत्तर धर्मांतरावर बंदी घातल्यामुळे कुणालाही कुणाशीही विवाह करण्याची मुभा मिळेल आणि बहुसंख्य हिंदूंची लव्ह जिहाद प्रकरणांपासून मुक्तता होईल, असेही श्री. दुगर म्हणाले. (वरवरचे उपाय काढणारे हिंदू ! - संपादक) भाजप आणि विश्‍व हिंदु परिषद यांच्या नेत्यांनी शामली जिल्ह्यातील कान्धला गावात आयोजित महापंचायतीमध्ये भाषणे करतांना या मागणीला पाठिंबा दिला. कान्धला येथील २२ वर्षीय हिंदु तरुणी ४० वर्षीय मुसलमान भाडेकरू मोहंमद असिफ याचेसोबत देहली येथे पळून गेल्याचे आढळले. हे निश्‍चितच लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे श्री. दुगर म्हणाले. आसिफ हा विवाहित असून त्याला ३ मुले आहेत. त्याला एका हिंदु तरुणीला फसवून पळवून नेण्याची काय आवश्यकता होती ? असाही प्रश्‍नही श्री. दुगर यांनी उपस्थित केला.

(म्हणे) राम मंदिराविषयी बोलणारे आतंकवादीच !

राममंदिरासाठी शिळा आणल्या म्हणून हिंदूंना आतंकवादी ठरवणारे मौर्य 
बाबरीची प्रतिकृती सिद्ध करणार्‍यांविषयी एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
बसपचे सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांची गरळओक
     लखनौ - अयोध्येतील राममंदिर उभारण्याच्या संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. अशा वेळी घटनेच्या विरोधात जाऊन राममंदिर उभारण्याविषयी बोलणारे देशातील आतंकवादीच आहेत, अशी गरळओक बहुजन समाज पक्षाचे सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांनी येथे केली.

केवळ निवडणूक लढवण्यास पात्र न ठरल्याने धर्मांध सरपंचाने केला दुसरा विवाह !

भारतातील कायदे केवळ हिंदूंसाठीच आहेत, हे सिद्ध करणारे अजून एक उदाहरण !
     मेवात (हरियाणा) - मेवात जिल्ह्यातील अकलीम्पूर या गावाचा सरपंच दीन मोहंमद हा ८ मुलांचा पिता आहे. येत्या पंचायत निवडणुकीत त्याची जागा महिलांसाठी राखीव झाल्याने त्याला निवडणूक लढता येत नाही. पहिली पत्नी अशिक्षित आहे. नव्या नियमाप्रमाणे पंचायत निवडणूक लढवण्यासाठी किमान पात्रता ८वी उत्तीर्ण हवी. पंचायतवर सत्ता कायम राहावी म्हणून दीन मोहंमद याने निवडणूक लढवण्यास सर्वदृष्टीने पात्र असलेल्या २३ वर्षीय मुलीशी दुसरा विवाह केला आहे. आता येत्या पंचायत निवडणुकीत त्याची दुसरी बेगम निवडणूक लढवेल. (मुसलमानांना शरीया कायदे लागू होतात. त्यामुळे ज्या कायद्यात कठोर शिक्षा होऊ शकते, त्यातून मुसलमान शरीया कायद्याचा गैरवापर करून सहज निसटू शकतात. केवळ व्यक्तीगत बाबीसाठी असणारे शरीया कायदे आता निवडणुकीसारख्या सार्वजनिक क्षेत्रातही हस्तक्षेप करू लागले आहेत. आता तरी शासन जागे होऊन समान नागरी कायदा अमलात आणणार का ? - संपादक)

हासन (कर्नाटक) येथे प्रशासनाकडून हनुमान जयंती उत्सवावर बंदी

मंदिर सरकारीकरणाचा परिणाम
     हासन (कर्नाटक) - हासन शहरातील नीरुबागीलु श्री अंजनेय देवळाच्या वतीने प्रतिवर्षी हनुमान जयंतीला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो; परंतु यावर्षी जिल्हाधिकार्‍यांकडून या मंदिरात हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठीच शासनाने हा निर्णय घेतल्याचे स्थनिकांचे म्हणणे आहे. उत्सव थांबवणारे शासन उद्या देवळाचे सर्व धार्मिक आचरण एकेक करून बंद करणार का ? अशी शंका स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 
     २-३ वर्षांपूर्वी या देवळाचे सरकारीकरण झाले आहे. यावर्षी मुसलमानांची मोहरम मिरवणूक रहित करण्यात आली होती. त्यामुळे हिंदूंचा उत्सवही रहित करायला पाहिजे, असा मुसलमानांनी प्रशासनावर दबाव निर्माण केला. त्यामुळेच हनुमान जयंतीची मिरवणूक जिल्हाधिकार्‍यांनी रहित केल्याचे बोलले जात आहे.

आय.एस्.आय.एस्.चे आतंकवादी कुर्दीश महिला सैनिकांशी लढण्यास घाबरतात !

महिलांच्या हातून ठार झालो, तर स्वर्ग मिळणार नाही, या इस्लामच्या शिकवणीचा परिणाम !
     अंकारा (तुर्कस्थान) - तुर्कस्थानमधील कुर्द जमातीतील १० सहस्र महिलांची सैन्य तुकडी आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांशी लढा देत आहे. त्यांनी आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांना कोबानी या मोठ्या शहरातून हाकलून लावत जगाचे लक्ष वेधून घेतले. या सैन्याच्या एक महिला सैन्याधिकार्‍याने एक नवीनच माहिती देतांना सांगितले, आय.एस्.आय.एस्.चे आतंकवादी महिलांशी लढाई करण्यास घाबरतात; कारण त्यांना वाटते की, ते इस्लामसाठी लढतांना जर एखाद्या महिलेच्या हातून मारले गेले, तर त्यांना स्वर्ग मिळणार नाही. त्यामुळे ते महिलांशी लढायला घाबरतात. या सैन्याधिकार्‍याच्या तुकडीने आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांना अल्-होऊल या ठिकाणावरून माघार घेण्यास बाध्य केले. एका २० वर्षीय महिला सैनिकाने म्हटले की, जर आय.एस्.आय.एस्.चे सैन्य परत आले, तर त्यांच्यातील एकही सैनिक जिवंत परत जाणार नाही.

आय.एस्.आय.एस्.कडून मुसलमानेतरांचे अवयव काढण्याचा फतवा

आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांचे क्रौर्य !
     दुबई - क्रूरतेसाठी कुविख्यात असलेल्या आय.एस्.आय.एस्.या आतंकवादी संघटनेने मुसलमानेतरांना त्यांच्या शरिराचे अवयव बलपूर्वक काढून त्याचे गरजवंत मुसलमानांना प्रत्यारोपण करण्यासाठी वाटप करण्याचा फतवा काढला आहे. रशियाच्या संवाद समितीने म्हटल्यानुसार फतव्याचे कागदपत्र एका संवाद समितीकडे आहेत. या फतव्यात लिहिले आहे की, आय.एस्.आय.एस्. मुसलमानेतरांचे अवयव काढून ते गरजवंत मुसलमानांना देत आहेत. यात अवयव देणार्‍याचा मृत्यू झाला, तरी चालेल. मुसलमानेतरांचे जीवन आणि त्यांचे अवयव सन्मान करण्यायोग्य नाही.

बुरखा प्रथेला विरोध केला म्हणून धर्मांधांनी एका छायाचित्रकाराचा स्टुडिओ जाळला !

या विरोधात प्रसारमाध्यमे चर्चासत्रे का आयोजित करत नाहीत ?
     कन्नूर (केरळ) - येथील एक छायाचित्रकार रफिक तालीपराम्बाया याने व्हाट्स-अ‍ॅपवरून इस्लाम धर्मातील बुरखा प्रथेला विरोध केला. त्याच्या मते या बुरख्याआड अनेक लोक अनैतिक कृत्ये करतात; म्हणून त्याचा या प्रथेला विरोध आहे. या प्रतिक्रियेला रफिकला अनेकांनी समर्थन दिले, तर अनेकांनी चेतावण्याही दिल्या. त्याची परिणीती काही अज्ञात धर्मांधांनी रफिकचा स्टुडिओ लुटून तो जाळण्यात झाली. या घटनेत रफिकची १० लाख रुपयांची हानी झाली आहे. या घटनेची तक्रार पोलिसांत केली असता पोलिसांनी रफिकच्या व्हाट्स-अ‍ॅप गटात असणार्‍या सदस्यांची चौकशी चालू केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (पुरोगाम्यांना ही अहिष्णुता दिसत नाही का ? यावर ते आता चर्चासत्र घेतील का ? - संपादक)

धूम्रपान करणार्‍या भारतीय महिलांच्या संख्येत वाढ

भारतीय समाजाचे झपाट्याचे अधःपतन होत असल्याचा परिणाम !
भारतात सिगारेटच्या विक्रीत मात्र १० टक्क्यांनी घट
     नवी देहली - भारतात गेल्या २ वर्षांमध्ये सिगारेटची विक्री जलदगतीने म्हणजे १० टक्क्यांनी अल्प झाली आहे; मात्र याच वेळी सिगारेट ओढणार्‍या माहिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्वाधिक धूम्रपान करणार्‍या महिलांमध्ये अमेरिकेनंतर दुसर्‍या स्थानावर भारत पोहोचला आहे. (पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून धूम्रपान करण्यात अग्रेसर असणार्‍या भारतीय महिला ! स्त्रीमुक्तीवाल्यांना हीच समानाता अपेक्षित आहे का ? - संपादक) एका जागतिक तंबाखू अभ्यासानुसार भारतात वर्ष १९८० मध्ये धूम्रपान करणार्‍या महिलांची असलेली संख्या ५३ लाखांवरून वर्ष २०१२ पर्यंत १कोटी २७ लाखापर्यंत पोहोचली. जगभरात पुरुषांच्या तुलनेत धूम्रपान करणार्‍या महिलांची संख्या घटली आहे. हा अभ्यास १८७ देशांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ मिट्रिक्स अ‍ॅण्ड इव्होल्यूशन या संस्थेने केला आहे.

फुटीरतावादी नेत्या असिया अंद्राबीचा आय.एस्.आय.एस्.शी असलेला संबंध उघड

फुटीरतावादी नेते देशात उघडपणे राष्ट्रविरोधी कारवाय करतात ! हे केवळ भारतातच घडू शकते 
     नवी देहली - नागपूर विमानतळावर अटक करण्यात आलेल्या तीन धर्मांध तरुणांचा संबंध काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्या असिया अंद्राबी हिच्याशी असल्याचे चौकशीत समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याच्या संशयावरून मोहंमद अब्दुल्ला, सैयद उमर फारुख आणि माज हसन फारुख या तिघांना नागपूर विमानतळावरून कह्यात घेतले होते.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

भिवंडी येथे प.पू. स्वामी श्री गंभीरानंद आश्रमाच्या वतीने चतुर्दिवसीय श्री गीताज्ञान संतसंमेलनाचे आयोजन !

     भिवंडी - येथील कामतघर भागातील प.पू. स्वामी श्री गंभीरानंद आश्रमाच्या वतीने एकादश वार्षिक उत्सव आणि श्रीमद्भगवद्गीता जयंती महोत्सवाच्या निमित्ताने २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत चतुर्दिवसीय श्री गीताज्ञान संतसमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला भारतातील हरिद्वार, काशी, राजस्थान, वृंदावन आदि ठिकाणांहून ७० हून अधिक संत-महात्मे आले होते. याचा लाभ सहस्रो भाविकांनी घेतला.

अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी शासन कटिबद्ध ! - केंद्रीयमंत्री महेश शर्मा

     बुलंदशहर (उत्तरप्रदेश) - अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री महेश शर्मा यांनी येथे केले. ते एका कार्यक्रमात बोलात होते. ते पुढे म्हणाले, अयोध्येत लवकरात लवकर राममंदिर बांधणे हे देशातील जनतेचे स्वप्न आहे. आमच्या पक्षाने आणि शासनाने यापूर्वीच राममंदिराच्या उभारणीचा निर्णय घेतला आहे.

हिंदु संस्कृतीनुसार नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करावे ! - आधुनिक वैद्य उदय धुरी

टी.व्ही. ९ मराठी 
वृत्तवाहिनीवरील चर्चासत्र
     हिंदु धर्मानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच नवीन वर्ष साजरे करण्यामागे शास्त्रीय आधार आहे, तसेच नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पार्श्‍वभूमी आहे. नैसर्गिक कारण म्हणजे या वेळी वसंतऋतू असल्यामुळे वृक्षांना नवीन पालवी फुटलेली असते. सर्वत्र आनंददायी आणि उत्साही वातावरण असते.

मडगाव स्फोट प्रकरणात सनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तता होण्याला २ वर्षे पूर्ण !

  • चार वर्षे नाहक दोषारोप करून सनातन संस्थेची अपकीर्ती करणारे सनातनद्वेष्टे, प्रसारमाध्यमे आणि तथाकथित पुरोगामी यांनी कितीही हानीभरपाई दिली, तरी ती अपुरीच ठरेल !
  • निरपराध असतांनाही सतत ४ वर्षे कारागृहात असह्य यातना साधनेच्या बळावर आनंदाने सोसणार्‍या साधकांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरच्या अविस्मरणीय घडामोडींचे चित्रमय स्मरण
डावीकडून (उभे असलेले) श्री. दिलीप माणगावकर, श्री. प्रशांत अष्टेकर,
श्री. धनंजय अष्टेकर, श्री. प्रशांत जुवेकर,डावीकडून (बसलेले) श्री. विनायक
पाटील, (मध्यभागी) परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री. विनय तळेकर.
रामनाथी आश्रमात आगमन झालेली साधकांची मिरवणूक, बाजूला घोषणा देतांना साधक
निर्दोष सुटलेल्या साधकांचे रामनाथी आश्रमात आगमन झाल्यानंतर 
सर्व साधकांच्या वतीने त्यांचे तोंड गोड करतांना सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ
     रामनाथी (गोवा) - १६ ऑक्टोबर २००९ या दिवशी दिवाळीच्या पूर्वसंध्येला रात्री ९.३० वाजता मडगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या स्फोटाच्या प्रकरणी आरोप असलेले सनातनचे साधक श्री. विनय तळेकर, श्री. विनायक पाटील, श्री. धनंजय अष्टेकर, श्री. प्रशांत अष्टेकर, श्री. दिलीप माणगावकर आणि श्री. प्रशांत जुवेकर यांची ३१ डिसेंबर २०१३ या दिवशी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सावईकर यांनी निर्दोष मुक्तता केली. अभियोग (सरकारी) पक्षाने सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे साधकांना दोषी ठरवत नसल्याने न्यायाधिशांनी हा निर्णय दिला. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर या साधकांची मिरवणूक काढण्यात आली आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भव्य स्वागत करण्यात आले. या साधकांची निर्दोष मुक्तता होऊन आज ३१ डिसेंबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. कारागृहात सतत ४ वर्षे असह्य यातना साधनेच्या बळावर आनंदाने सोसणार्‍या या साधकांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरच्या अविस्मरणीय घडामोडींचा चित्रमय वृत्तांत येथे देत आहोत.

नगरच्या पोलिसांकडे मद्यपी वाहनचालकांच्या पडताळणीसाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्रच उपलब्ध नाही !

पोलीस खात्याची ही दयनीय स्थिती ! असे पोलीस 
आतंकवाद्यांना कसे सामोरे जाणार, याचा विचारच न केलेला बरा !
     नगर - मद्यपान करून वाहन चालवणार्‍या चालकांची पडताळणी करण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्र वापरले जाते. असे एकही यंत्र येथील वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नसल्यामुळे त्या चालकांच्या विरोधात कारवाई करण्यास अडचणी येत आहेत. अशा मद्यपी चालकांची पडताळणी करण्यासाठी सिव्हील रुग्णालयात न्यावे लागते. (यामुळे व्यय होणारा वेळ आणि पैसा याला उत्तरदायी कोण ? - संपादक) त्यानंतर त्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करायची कशी, असा प्रश्‍न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.

खटला जिल्हा न्यायालयात वर्ग !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण 
पुढील सुनावणी १३ जानेवारीला होणार 
     कोल्हापूर, ३० डिसेंबर (वार्ता.) - येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. आर्.डी. डांगे यांच्यासमोर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांना 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे ३० डिसेंबरला उपस्थित करण्यात आले. या वेळी झालेल्या सुनावणीत श्री. डांगे यांनी 'हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला असून या खटल्याची पुढील सुनावणी १३ जानेवारी २०१६ या दिवशी होईल', असे सांगितले. या वेळी श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन आणि श्री. एम्.एम्. सुहासे उपस्थित होते. 

सनातन निर्दोष !

     ३१ डिसेंबर २०१३ ला सनातनच्या साधकांची मडगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. याविषयी दैनिक सामनाने प्रसिद्ध केलेल्या संपादकीयमधील निवडक भाग वाचकांसाठी येथे देत आहोत.
अग्नीदिव्य हिंदूंच्या पाचवीलाच पूजले आहे !
     आमच्याच हिंदुस्थानात हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर चालू आहे; पण या सर्व कटकारस्थानांना हिंदु संघटनांचे कार्यकर्ते पुरून उरतात. कुठे काहीही खट्ट झाले की, त्यामागे हिंदु संघटनांचाच हात असल्याची लोणकढी थाप आधी ठोकली जाते आणि नंतर ती थाप खरी ठरवण्यासाठी शासकीय यंत्रणा कामास लागते. मग तो मडगावचा स्फोट असेल, नाही तर मालेगाव स्फोटाचे प्रकरण. गोव्यातील मडगाव शहरात झालेल्या स्फोटातून सनातनच्या सहा कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाली. पणजी येथील विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तपास यंत्रणांवरच ताशेरे ओढले. सनातनच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना या सर्व प्रकरणात गोवण्यात आले. सनातनला अपकीर्त केले. ही अपकीर्ती इतकी पराकोटीची होती की, सनातनचे साधक हे जणू त्यांच्या आश्रमातून आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण देत आहेत, तेथे हिंदु माथेफिरू आणि आतंकवादी घडवण्याचा कारखानाच उघडला आहे, असा लोकांचा गैरसमज व्हावा. त्यामुळे सनातनवर बंदीच घालावी, अशी शिफारस महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने केंद्राकडे केली. हा सरळ सरळ अन्याय आहे आणि मुस्लिमांना बरे वाटावे अन् स्वत:ची बेगडी निधर्मी सुंता धर्मांध मुसलमानांच्या डोळ्यांत भरावी, यासाठीच केलेला बनाव आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात मुस्लिम निर्दोष तरुण अडकले म्हणून सरकारी पातळीवर जेवढे अश्रू ढाळले गेले आणि त्यांच्या सुटकेसाठी केंद्रशासनाने जे अथक परिश्रम घेतले त्याच्या गुंजभरही प्रयत्न निर्दोष हिंदु तरुणांच्या सुटकेबाबत झाले नाहीत.

पुणे विभागात लाचखोरीचे वर्षभरात २१४ गुन्हे प्रविष्ट

भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लाचखोरांना कठोरात कठोर शासन करणे आवश्यक !
     पुणे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या ५ जिल्ह्यांचा समावेश होतो. विभागाने वर्ष २०१५ मध्ये प्रविष्ट केलेल्या ४३ खटल्यांमध्ये ५७ जणांना शिक्षा झाली आहे. त्याचसमवेत ३० लाचखोरांना सेवेतून निलंबितही करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २०१४ मध्ये पुणे विभागात २१३ सापळे रचले, तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत २१४ सापळे रचून लाचखोरांना अटक करण्यात आली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितली.

नगर येथे चीनचा नॉयलॉन मांजा विक्री करणार्‍या ५ विक्रेत्यांना अटक

चिनी मांजावर भारतभर बंदी असतांना तो अवैधरित्या आयात आणि विक्री 
करणार्‍या व्यापार्‍यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !
      नगर - चिनी बनावटीचा नॉयलॉन मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी दिले आहेत. त्यानुसार येथील कोतवाली पोलिसांनी २८ डिसेंबर या दिवशी चिनी बनावटीचा नॉयलॉन मांजा विक्री करणार्‍या ५ व्यावसायिकांवर कारवाई केली. ही कारवाई बागडपट्टी, ख्रिस्तगल्ली, झेंडीगेट या भागांतील व्यावसायिकांवर करण्यात आली आहे. या कारवाईच्या वेळी २० सहस्र रुपये किमतीचा चिनी बनावटीचा नॉयलॉन मांजा शासनाधीन केला आहे.

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल घोषित !

शिवसेनेचे रामदास कदम, बाजोरीया, भाजपचे गिरीश व्यास  
यांच्यासह काँग्रेसचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ उमेदवार विजयी 
     मुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक मतदारसंघातील आठ जागांसाठीचे निकाल ३० डिसेंबरला घोषित झाले. सातपैकी तीन जागी काँग्रेस, प्रत्येकी दोन जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी अन् भाजपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. 

ख्रिस्ती नववर्ष स्वागतासाठी पुण्याच्या शहरी भागातील मद्यालयांना पहाटे ५ वाजेपर्यंत अनुमती

     ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने वाढणारी गुन्हेगारी आणि अपप्रकार पहाता १ जानेवारीला पहाटेपर्यंत मद्यालयांना (बिअर बार) चालू ठेवण्याची शासनाने दिलेली अनुमती रहित करून जनतेला 'चांगले दिवस' दाखवावेत, ही अपेक्षा ! 
     पुणे, ३० डिसेंबर - ख्रिस्ती नववर्ष स्वागतासाठी पुण्याच्या शहरी भागातील मद्यालये (बिअर बार) आणि उपहारगृह पहाटे ५ वाजेपर्यंत, तर ग्रामीण भागात पहाटे ३ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास अनुमती देण्याचा निर्णय जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने घेतला आहे. तसेच या काळात नियमभंग अथवा कोणताही गोंधळ झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही देण्यात आली आहे. एकूणच या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाने सर्व पोलिसांच्या वर्षाअखेरच्या सुट्ट्या रहित करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने मेजवान्या आणि 'पब' यांवर लक्ष ठेवण्यासाठी ३० भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. 

धुळे येथे पत्रकार परिषदेद्वारे '३१ डिसेंबर'ला होणारे अपप्रकार थांबवण्याचे आवाहन

प्रसिद्धि माध्यमांचा वाढता प्रतिसाद 
मराठी पत्रकार संघाचे श्री. सुनील पाटील, मनमाड जिन मित्र मंडळाचे श्री. विनोद लहामगे,
हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल आणि शिवसेनेचे श्री. कपिल शर्मा

१. जीन्यूजचे मालक श्री. सुनील चौधरी ही बातमी २ दिवस दाखवणार आहेत.
२. आई एकविरा विजनचे श्री. गौरव शर्मा हिंदु जनजागृती समितीचा विषय ८ दिवसांपासून दाखवत आहेत. 
३. एम्.एच्. टीव्हीचे श्री. राजू भावसार हे समितीचा विषय दाखवत आहेत. 

नववर्ष ३१ डिसेंबरला साजरे न करण्याचा निर्धार

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीत हिंदुत्ववादी कृतीशील 
     जळगाव - येथे २७ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरची आढावा बैठक येथील आचार्य कॉम्प्लेक्स येथे पार पडली. यामध्ये विविध भागांतील धर्माभिमानी सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये ३१ डिसेंबरच्या माध्यमातून तरुण पिढीचे जे नुकसान होत आहे, ते टाळण्यासाठी नववर्ष ३१ डिसेंबरला साजरे न करता ते गुढीपाडव्यालाच साजरे करण्याचा निर्धार हिंदुत्ववाद्यांनी केला. येथील टॉवर चौक या ठिकाणी सकाळी ११ वाजता हिंदूंच्या प्रबोधनासाठी एकत्र येण्याचे निश्‍चित करण्यात आले.

इंडस्इंड अधिकोषाला ३०४ कोटी रुपयांना फसवणार्‍या तिघा व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

      मुंबई - बनावट कागदपत्रांच्या आधारे इंडस्इंड अधिकोषाला ३०४ कोटी रुपयांना फसवणार्‍या तिघा व्यापार्‍यांविरुद्ध डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. व्याप्ती लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे निधन !

     मुंबई - सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी ३० डिसेंबरला दुपारी त्यांच्या घरी निधन झाले. त्यांनी मीराबाईच्या भजनांचा आणि कबिरांच्या दोह्यांचा, तसेच बायबलचा मराठी अनुवाद केला होता. 'बोरकरांची कविता', 'विंदा करंदीकर यांची निवडक कविता' हे ग्रंथ त्यांनी संपादित केले होते. 'या जन्मावर या जगण्यावर...,' 'अशी पाखरे येती', 'श्रावणात घननिळा बरसला', 'सांग सांग भोलनाथ', 'भातुकलीच्या खेळामधली...', 'शुक्रतारा मंदवारा' यांसारखी त्यांनी लिहिलेली भावगीते आजही मराठीजनांच्या ओठावर आहेत. चिरतरुण कवि म्हणून संबोधले जाणार्‍या पाडगावकरांची 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ' ही कविता आजच्या तरुणाईच्याही तोंडी आहे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील सादरीकरणाच्या कवितांच्या कार्यक्रमांना अमाप प्रसिद्धी मिळाली. जिप्सी, सलाम, गझल, वात्रटिका, विदुषक, धारानृत्य, निंबोणीच्या झाडामागे आदी कवितासंग्रह, तसेच 'ज्युलिअस सिझर', 'वादळ' ही नाटके त्यांनी लिहिली. त्यांना 'महाराष्ट्र भूषण', पद्म पुरस्कार, साहित्य अकादमीचा पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांचे ते मानकरी होते. २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 'युनाटेड स्टेट्स इन्फर्मेन सर्व्हिस' येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले.

आय.आर्.बी. आस्थापन १ जानेवारीपासून पथकर बंद करणार ! - पालकमंत्री

     कोल्हापूर, ३० डिसेंबर (वार्ता.) - येत्या १ जानेवारीपासून कोल्हापूरचा पथकर बंद करा, असे पत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम्.एस्.आर्.डी.सी.) ने आय.आर्.बी. आस्थापनाला २९ डिसेंबर या दिवशी दिले. त्यामुळे शुक्रवारी, १ जानेवारीपासून आय.आर्.बी. आस्थापन येथील गाशा गुंडाळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

आय.एस्.आय.एस्.मध्ये जाणार्‍या मुसलमान तरुणांचे मन वळवण्यासाठी मुसलमान संघटनेची बैठक

     मुंबई - मुसलमान तरुणांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून आतंकवादी कारवायांमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला जाण्याची भीती मुसलमानांना वाटू लागल्याचे कारण पुढे करून या समस्येवर चर्चा करण्यासाठी इस्लामी अभ्यासक प्रा. रफिक युसुफ, प्रा. महम्मंद खान यांच्या 'मुस्लिम सुधारक प्रेरणा विचार मंडळा'ने एका बैठकीचे मुंबईत आयोजन केले होते. त्याला काही मुसलमान उलेमा उपस्थित होते. या बैठकीत, "हा देश तुमचा आहे. इथे स्थैर्य, शांती, सुव्यवस्था ठेवणे ही तुमचे दायित्व आहे. कोणत्याही प्रलोभनांना भुलू नका, या मातीशी इमान राखा, परत फिरा", अशी साद मुसलमान उलेमांनी आय.एस्.आय.एस्.च्या वाटेवर असलेल्या तरुणांना घातली, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. (असे गोड बोलून कोणी आय.एस्.आय.एस्.मध्ये जाण्याचे थांबेल, असे म्हणणे हास्यास्पद आहे. - संपादक)

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबरविषयी वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांचे प्रबोधन

श्री. भर्दिके यांचा विषय ऐकतांना वेदपाठशाळेतील विद्यार्थी
     मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. चंद्रकांत भर्दिके यांनी मुरलीधर मंदिर न्यास, सायन येथील वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. 
     श्री. भर्दिके यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर साजरा करण्यासारख्या कुप्रथांमुळे आपण धर्मापासून दूर जात आहोत. त्यामुळे अशा हिंदूंना स्वधर्म, प्रथा यांविषयी जाणिव करून देणे, हे पुरोहितांचे तेवढेच दायित्व आहे. या मार्गदर्शनाचा लाभ १८ पुरोहित विद्यार्थ्यांनी घेतला. 

फलक प्रसिद्धीकरता

हिंंदूंनो, एक दिवसाचे धर्मांतर टाळा !
     एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केल्यानंतर ती व्यक्ती त्या धर्मातील प्रथा आणि उत्सव साजरे करून त्या धर्माचे आचरण करते. त्याचप्रमाणे हिंदूंनी जर ३१ डिसेंबर दिवस साजरा केला, तर एका दिवसापुरते का होईना, त्यांनी धर्मांतर केल्यासारखे होईल.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Hinduo, Christiyonka navvarsh 1 January manana, yani hamara 1 dinke liye dharmantarit hona jaise hai !
जागो !
     हिन्दूओ, ख्रिस्तीयों का नववर्ष १ जनवरी मनाना, यानी हमारा १ दिन के लिए धर्मांतरित होना जैसे है !

सातारा येथे जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर

महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतांना उजवीकडून
 हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम आणि श्री. हेमंत सोनवणे

     सातारा, ३० डिसेंबर (वार्ता.) - ३१ डिसेंबर विषयी निवेदन हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन जिल्हाधिकारी श्री. अश्‍विन मुद्गल आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. राकेश कलासागर यांना देण्यात आले.  
३१ डिसेंबरला नववर्ष साजरे न करण्याचे आवाहन करण्यासाठी बैठक 
     सातारावासियांनी पाश्‍चात्य संस्कृतीनुसार ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करू नये, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आले. येथील कासारदेवी मंदिरात पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. जितेंद्र वाडकर, योग वेदांत सेवा समितीचे श्री. सतीश केसकर, श्री. जितेंद्र रावत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ओंकार डोंगरे, श्री. सुधन्वा गोंधळेकर, अखिल भारतीय हिंदु महासभाचे अधिवक्ता श्री. गोविंद गांधी, श्री. उमेश गांधी, शिवसेनेचे श्री. नरेंद्र वाळंगे, श्री. शैलेंद्र सावंत, इस्कॉनचे श्री. सागर वंजारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम, श्री. हेमंत सोनवणे, बजरंग दल, सनातन संस्था यांसह गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकत्र या ! - संदेश कदम

भव्य वाहन फेरीने फलटणवासियांचे धर्माप्रति स्फुल्लिंग चेतवले 

धर्मध्वजाचे पूजन करतांना ह.भ.प. शिवाजी महाराज जाधव
फेरीत सहभागी हिंदु धर्माभिमानी

     फलटण (जिल्हा सातारा), ३० डिसेंबर (वार्ता.) - 'हिंदूंवरील आघात रोखून हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी माता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवले. छत्रपती शिवरायांनी दर्‍याखोर्‍यातील मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज छत्रपती शिवरायांचाच आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकत्र येऊया. याची पहिली पायरी म्हणून शनिवार, २ जानेवारी २०१६ या दिवशी मुधोजी क्लब मैदानावर होणार्‍या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेस आपण जात, पात, पक्ष, संप्रदाय बाजूला सारून एकत्र येऊया', असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. संदेश कदम यांनी केले. सभेच्या प्रचार-प्रसारनिमित्त समितीच्या वतीने आज शहरातून वाहन फेरीचे आयोजन केले होते. या फेरीची सांगता नगरपालिका चौकात कोपरा सभेत झाली. त्या वेळी श्री. कदम बोलत होते. 

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूच हिंदूंच्या देवतांचा अवमान करत आहेत !

     सध्या हिंदु देवतांचा अपमान करणारी कृत्ये आपल्याला नेहमी पहावयास मिळतात. अशा प्रकारच्या कृत्यांना विरोध करून देवतांचा होणारा अपमान थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती खंबीरपणे उभी आहे; पण वैयक्तिक स्तरावर होणारा देवतांचा अपमान थांबवणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. हा अपमान हिंदूंकडून केवळ अहंभाव आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळे होत आहे. 

पुणे येथील धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा धर्मप्रसाराच्या कार्यातील उत्स्फूर्त सहभाग

पू. (कु.) स्वाती खाडये
१. ग्रंथ विकत घेऊन ते ग्राहकांना देण्याची इच्छा असलेले 
बांधकाम व्यावसायिक श्री. अनिल बोराटे ! 
     पुणे येथील बांधकाम व्यावसायिक श्री. अनिल बोराटे यांना समितीचे श्री. मनोज महाजन यांनी संपर्क केला असता त्यांनी लव्ह जिहाद हे १०० आणि हिंदु राष्ट्र का हवे ? हे १०० ग्रंथ घेतले. ते हे ग्रंथ त्यांच्या ग्राहकांना देणार आहेत.
२. स्मशानभूमीत फलक लावण्याची कल्पना सुचवणारे 
वारजे येथील धर्माभिमानी श्री. जनार्दन पोटे !
     पुणे येथील कात्रज भागातील कार्यक्षम नगरसेवक श्री. वसंत मोरे यांच्या सौजन्याने व्यक्तीच्या मृत्यूनंतर करावयाच्या कृतींमागील शास्त्र या विषयावरील धर्मशिक्षण फलक कात्रज येथील स्मशानभूमीत लावण्यात आले आहेत. या नाविन्यपूर्ण कल्पनेच्या माध्यमातून स्मशानात येणार्‍या व्यक्तींना धर्मशिक्षण मिळणार आहे. स्मशानभूमीत फलक लावण्याची कल्पना सुचवणारे वारजे येथील धर्माभिमानी श्री. जनार्दन पोटे यांनी हे फलक लावण्यासाठी प्रयत्न केले. 
- (पू.) कु. स्वाती खाडये 

सुसंवादाची आत्यंतिक निकड !

     साधारण ३० ते ४० वर्षांपूर्वीपर्यंत अबाधित अशा आदर्श कुटुंबव्यवस्थेमुळे भारतियांना घटस्फोट हा शब्द उच्चारतांना खटकत असे. घटस्फोट हा आयुष्यातील मोठा अपघात मानला जायचा. पती-पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय अगदी शेवटपर्यंत तडजोडीच्या प्रयत्नात असायचे; कारण कौटुंबिक व्यवस्थेचे लाभ आणि त्याचे दूरगामी परिणाम याविषयी अगदी सर्वच जण सजग होते. सरत्या काळानुसार लग्नसंस्थेविषयीच्या आस्था अल्प झाल्या. काळानुसार लग्नव्यवस्थेची परिभाषा पालटून तडजोडीची शक्यता मावळत गेली आहे. आज वैवाहिक बंधन हे पैशाच्या जोरावर उभे केले जाते किंवा मोडले जाते, अशी स्थिती आहे.

धर्मकार्य करणार्‍या सनातनवर बंदी आणू इच्छिणार्‍यांनो, श्रीकृष्णाला वेगळ्या माध्यमातून विश्‍वरूप दाखवण्यास भाग पाडू नका !

श्री. कीर्तन भट
१. सनातन संस्थेवरील सर्व आरोप खोटे असल्याचे संस्थेच्या 
प्रवक्त्याने पुराव्यांसहित सिद्ध करूनही तथाकथित 
बुद्धीवाद्यांनी सनातनवर बंदी घाला ! असा डंका पिटणे 
     सनातन संस्थेच्या प्रवक्त्याने कित्येक वेळा पत्रकार परिषदा, दूरचित्रवाहिन्या आणि वर्तमानपत्रे यांद्वारे सनातन संस्थेवर केले गेलेले सर्व आरोप कसे खोटे आहेत, हे पुराव्यांसहित सिद्ध केले आहे; परंतु तथाकथित बुद्धीवादी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सनातनवर बंदी घाला ! असा डंका पिटत आहेत. 
२. सर्वसामान्यांनाही मान्य असणारी गोष्ट तथाकथित बुद्धीवाद्यांनी मान्य 
न करणे आणि यावरून महाभारतातील असाच एक प्रसंग आठवणे 
     सनातन संस्था नेहमीच कोणत्याही अन्यायाविरुद्ध न्यायालयीन कायद्यानुसार लढत आहे. सनातन संस्थेचे साधक अन्यायकारक घटनेच्या विरुद्ध आंदोलने करणे, निवेदने देणे, न्यायालयात खटले दाखल करणे, अशा प्रकारे विचारांच्या स्तरावर लढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनाही सनातन संस्था कुणाची हत्या मुळीच करणार नाही, हे कळते. तरीही ही गोष्ट तथाकथित बुद्धीवादी मान्यच करत नाहीत. उलट ते सनातनवर बंदी आणा असा डंका पिटत आहेत. जो आपलाच डंका पिटत असेल, तो दुसर्‍याचे म्हणणे काय ऐकणार ? तथाकथित बुद्धीवाद्यांच्या या स्थितीवरून महाभारतातील एक प्रसंग आठवला.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

आयुर्वेदाला जे सहस्रो वर्षांपासून ज्ञात आहे, ते आता कळणारे पाश्‍चात्य संशोधक !

     तूप आणि लोणी यांमुळे हृदयविकार बळावतो, हा आतापर्यंत असलेला समज खोटा ठरवणारे संशोधन केंब्रिज विद्यापीठ आणि ब्रिटीश हार्ट फाउंडेशन यांच्या वैज्ञानिकांनी केले आहे. वैज्ञानिकांनी १८ देशांतील सहा लाख लोकांच्या एकूण संपृक्त मेदाम्लांच्या सेवनाचे प्रमाण पाहिले आणि जैवनिदर्शकाच्या साहाय्याने त्याचे रक्तातील स्थान आणि इतर बाबी तपासल्या असता त्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवत असल्याची बाब खरी नसल्याचे त्यांना दिसून आले. (२४.३.२०१४)

साधक जोडपे घरी रहायला आल्यानंतर सततच्या सत्संगामुळे निर्माण झालेली कुटुंबभावना आणि अंतर्मुखता वाढून साधनेसाठी योग्य दिशेने झालेले प्रयत्न

२९ डिसेबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या 
आश्रमात होत असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
श्री. वाम्सीकृष्णा
गोल्लामुडी
     २०१२ या वर्षी श्री. शॉन आणि सौ. श्‍वेता क्लार्क मेलबर्न येथील आमच्या घरी काही कालावधीसाठी वास्तव्यास येणार होते. श्री. शॉन आणि आमची मैत्री गेल्या अनेक वर्षांपासून आहे; परंतु एक जीवलग मित्र म्हणून नव्हे, तर रामनाथी आश्रमातून दोन साधक (श्री. शॉन आणि सौ. श्‍वेता) आमच्यासमवेत रहाण्यासाठी येणार असल्याविषयी आम्हा पती-पत्नीला आनंद झाला होता. या कालावधीत सौ. श्‍वेता क्लार्क यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि सत्संगामुळे झालेला लाभ पुढे देत आहे. 
१. प्रेमभावामुळे लवकर जवळीक साधणार्‍या आणि स्वतःत पालट 
घडवून आणण्याची तळमळ असणार्‍या सौ. श्‍वेता क्लार्क ! 
१ अ. प.पू. गुरुदेवांच्याच एका साधकाच्या वास्तूत रहायला मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटणे : रामनाथी आश्रमापासून दूरवरच्या मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे रहावे लागत असल्याचे आरंभीचा काळ सौ. श्‍वेताताई ते स्वीकारू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या मनाचा संघर्ष होत असे, तरीही रामनाथी आश्रमापासून जरी मला दूर रहावे लागले, तरी प.पू. गुरुदेवांच्याच एका साधकाच्या वास्तूत रहायला मिळत आहे, असे त्या सकारात्मकतेने सांगत असत, तसेच त्यासाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी त्या कृतज्ञ असत. प.पू. गुरुदेव त्यांना साहाय्य करत असलेल्या माध्यमाविषयी, म्हणजे साधकांविषयी त्यांना कृतज्ञता वाटत असे.

हिंदूंनो, ३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे एका दिवसापुरते धर्मांतरच !

     खरे तर ३१ डिसेंबर हा दिवस साजरा करणे, ही पाश्‍चात्त्य संस्कृतीचा एक भाग आहे; मात्र आता हिंदूंनाही हा दिवस म्हणजे भारतीय उत्सवांपैकी एक आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे ते हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करू लागले आहेत.

आश्रमातील भिंती श्री विश्‍वदर्शन देवतायै नमः । हा नामजप करत असल्याचे जाणवणे आणि माझ्या गुरुदेवांच्या आश्रमातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू वैशिष्ट्यपूर्ण असून जगातील आश्‍चर्यांपैकी एक आहेत, याची जाणीव होणे

      ११.८.२०१५ या दिवशी सकाळी ६ वाजता मी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाच्या तिसर्‍या माळ्यावरील बाहेरच्या जागेत बसून दैनिक सनातन प्रभात वाचत होतो. त्या वेळी श्री विश्‍वदर्शन देवतायै नमः । हा नामजप माझ्या कानावर पडत होता. त्यामुळे आपोआप माझाही तोच नामजप होऊ लागला. आश्रमातील ध्वनीक्षेपकावर मधेमधे हा मंत्रजप लावला जातो, आता तो लावला असेल, असे मला वाटले; परंतु त्या वेळी तो नामजप ध्वनीक्षेपकावर लावला नव्हता. त्या क्षणी माझे लक्ष जवळच्याच भिंतीकडे गेले. त्या भिंतीमधून नामजप ऐकू येत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी या भिंतीच हा नामजप करत असून आश्रमातील भिंती श्‍वासोच्छ्वासाबरोबर नामजपही करत आहेत, असे मला जाणवले. माझ्या गुरुदेवांच्या आश्रमातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू वैशिष्ट्यपूर्ण असून जगातील आश्‍चर्यांपैकी एक आहेत, याची मला जाणीव झाली. श्री. वाम्सीकृष्णा गोलामुडी, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया. (११.८.२०१५) 

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका आधुनिक वैद्या विशाखा नार्वेकर यांना वडील रुग्णाईत असतांना आलेल्या अनुभूती आणि स्वतःत जाणवलेले पालट

     आशिया पॅसिफिक येथे रहाणार्‍या आधुनिक वैद्या विशाखा नार्वेकर या साधिकेने काही मासांपूर्वीच (महिन्यांपूर्वीच) एस्.एस्.आर्.एफ्.ंच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला आहे. वडील रुग्णाईत असतांना अल्प कालावधीतही साधनेत त्यांना आलेली अनुभूती आणि स्वतःत जाणवलेले पालट पुढे देत आहोत.
१. वडील रुग्णाईत असतांना आलेल्या अनुभूती
१ अ. वडिलांना ताप आणि अतिसार झाल्यामुळे रुग्णालयात भरती करावे लागणे अन् त्यांना 
कर्करोगाची गाठ झाली असून तात्काळ शल्यकर्म करावे लागणार असल्याचे कळणे 
     जुलै २०१४ च्या दुसर्‍या आठवड्यात माझे वडील रुग्णाईत असतांना आलेली अनुभूती या ठिकाणी देत आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांना अकस्मात् एका घटनेला सामोरे जावे लागले. माझ्या वडिलांना ताप आणि अतिसार झाल्यामुळे रुग्णालयात भरती करावे लागले. त्या ठिकाणी त्यांच्या चाचण्या झाल्यावर त्यांच्या मोठ्या आतड्याच्या खालच्या भागात कर्करोग (निओप्लास्टिक ट्यूमर इन कोलोन) झाला असून त्याचे तात्काळ शल्यकर्म करावे लागेल, असे तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले. सदर कर्करोग विकसित झालेला असल्याने त्याचे तात्काळ शल्यकर्म करण्याचे आधुनिक वैद्यांनी ठरवले. शल्यकर्म न केल्यास वडिलांच्या जिवाला धोका संभवत होता.

प्रथमदर्शी अहवाल केवळ सनातनला गोवण्याच्या हेतूनेच ! - न्यायाधिशांची स्पष्टोक्ती

     आडात नाही ते पोहर्‍यात कुठून येणार ?, अशी म्हण आहे. त्याचप्रमाणे गुन्हाच केला नाही, तर पुरावे कसे असणार ? हे मडगाव प्रकरणात सिद्ध झाले आणि कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणातही सिद्ध होईल !
निकालपत्रात न्यायाधिशांनी नमूद केलेली ठळक सूत्रे
१. पोलिसांनी नोंद केलेला प्रथमदर्शी अहवाल हा केवळ सनातन संस्थेला गोवण्याच्या हेतूने बनवला होता, हे दिसून येते.
२. सरकार पक्षाकडून आरोपपत्रात सादर करण्यात आलेले एकूण १२ परिस्थितीजन्य पुरावे जुळत नाहीत. या पुराव्यांमधील सूत्रे जुळत नाहीत.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील १ मास (महिना) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

जीव म्हणाला.........!

देह म्हणाला जिवाला ।
तुझ्याविना माझे कसे चालायचे ॥
जीव म्हणाला देहाला ।
तू तर पंचमहाभूतात विलीन व्हायचे ॥ १ ॥
मन म्हणाले जिवाला ।
तुझ्याविना मी काय करायचे ॥
जीव म्हणाला मनाला ।
तू तर विश्‍वमनाशी एकरूप व्हायचे ॥ २ ॥ 

भवभूतीप्रमाणे सनातनचे विरोधकांना सांगणे

ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः ।
उत्पस्यते हि मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥ - भवभूती
अर्थ : या जगात जे कोणी आमची अवहेलना करत असतील, तर त्यांना जे काही समजायचे असेल ते समजू दे. आमची ही धडपड त्यांच्यासाठी नाही. केव्हातरी आणि कुठेतरी आमच्या कष्टांची जाण असलेला मनुष्य निश्‍चितच जन्मेल. ज्याला आमच्या या प्रयत्नांचा पुष्कळ उपयोग होईल; कारण काळ हा अनंत आहे आणि ही पृथ्वीही विशाल आहे.

दैनिक सनातन प्रभातमधील लेखमाला वाचून कारागृहातून निर्दोष सुटलेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे

१. देवाप्रती कृतज्ञता वाटणे
     लेखमाला वाचतांना कारावासातील दिवस आठवतात आणि त्या प्रतिकूल काळात देवाने कसे साहाय्य केले, याचे स्मरण होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटते. देवा, आम्ही सर्व जण तुझे ऋणी आहोत. अखंड कृतज्ञता व्यक्त करवून घे. 
- सर्वश्री विनायक पाटील, प्रशांत जुवेकर आणि दिलीप माणगांवकर
२. काही साधकांची लेखमाला वाचून भावजागृती 
होणे, तर काही जणांच्या मनात चीड निर्माण होणे
    साधकांशी संवाद साधतांना त्यांच्यात लेखमाला वाचून भावजागृती झाल्याचे जाणवले. माझ्याशी लेखमालेसंदर्भात बोलतांना काही साधकांना भावाश्रू आले. काही जणांच्या बोलण्यातून त्यांना येत असलेली चीड मला जाणवली. ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्या काळात त्रास दिला, ते पोलीस अधिकारी आणि आरक्षक यांच्याविषयी मनात प्रचंड चीड वाटते. या लेखमालेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची साधकांची सिद्धता देव करवून घेत आहे, याची प्रचीती आली. - श्री. विनायक पाटील

उज्जैन कुंभ महापर्वातील धर्मप्रसारांतर्गत विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, तसेच साधक यांना सेवेची अमूल्य संधी !
१. उज्जैन सिंहस्थ महापर्वाचे महत्त्व
     प्रयाग क्षेत्री माघ मासात, पुष्कर क्षेत्री कार्तिक मासात, तसेच उज्जयिनीत वैशाख मासात स्नान केल्याने युगानुयुगांची पापे दूर होतात. त्याचप्रमाणे प्रत्येक १२ वर्षांनी वैशाख मासात उज्जैन (मध्यप्रदेश) येथील कुंभ महापर्वाच्या वेळी क्षिप्रा नदीतील स्नान मोक्षदायी असते. त्यामुळे उज्जैन येथील कुंभपर्वाच्या वेळी कोट्यवधी भाविक यात्राविधी आणि क्षिप्रा नदीत स्नान करतात. या कुंभ महापर्वाचा कालावधी २२.४.२०१६ ते २१.५.२०१६ असा आहे.

साधकांना सूचना

     ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस ब्लॅकआऊट डे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या दिवशी भ्रमणभाषवरून लघुसंदेश पाठवणे, तसेच संपर्क करणे (कॉल करणे) यांसाठी विशिष्ट दरात पैसे आकारले जाणार आहेत. त्यामुळे साधकांनी या दिवशी लघुसंदेश पाठवू नयेत, तसेच आवश्यकतेप्रमाणे संपर्क (कॉल) करावा.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे,
 स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो
 जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे अपूर्ण विज्ञान, तर कुठे परिपूर्ण अध्यात्म !
     विज्ञान अपूर्ण आहे. त्यामुळे त्यात सतत संशोधन करावे लागते. ते संशोधनही मायेतील असल्यामुळे तात्कालिक सुख देणारे असते. याउलट अध्यात्मात संशोधन करावे लागत नाही; कारण ते चिरंतन आनंद देणारे परिपूर्ण शास्त्र आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.५.२०१५)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा ज्ञानी 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

कर्नाटक पोलिसांना दारुड्यांची चिंता !

संपादकीय 
     आपल्या देशात पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्याच्या रोगाची किती मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे, हे आता निराळे सांगायला नको; कारण ३१ डिसेंबर जवळ आला आहे. ख्रिस्त्यांच्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दारू ढोसून गटारांच्या शेजारी फूटपाथवर पडलेले युवक पाहिले की, हा देश नक्की कोणता, असा प्रश्‍न पडतो. ख्रिस्ती नववर्षामुळे होणारे हे गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न होत असले, तरी कर्नाटक पोलिसांनी दिलेला आदेश म्हणजे आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला, असेच म्हणावे लागेल. नववर्षानिमित्त अत्याधिक प्रमाणात मद्यपान करणार्‍यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचे दायित्व मद्यालय चालकांचे आहे. त्यांनी त्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी, असा आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त एम्.ए. सलील यांनी काढला आहे. हा आदेश वाचल्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री मद्य ढोसणे म्हणजे एखादी जीवनावश्यक गोष्ट आहे आणि मद्यपान करणे अपरिहार्य आहे, असे एखाद्याला वाटल्यास आश्‍चर्य नाही. आश्‍चर्य या गोष्टीचे आहे की, एका पोलीस पदाधिकार्‍यांने हा आदेश दिलाच कसा ?

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या गोदामात बॉम्ब बनवतांना स्फोट !

लोकहो, देशद्रोह्यांचा भरणा असलेल्या तृणमूल काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी करा !
  • दोन ठार
  • कार्यकर्ता फरार
     मालडा (बंगाल) - तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या गोदामात बॉम्ब बनवतांना स्फोट झाल्याने हन्ना शेख (वय ३० वर्षे) आणि फैजुल शेख (वय ३२ वर्षे) ठार झाले. या घटनेत नवीउल शेख (वय ४२ वर्षे) आणि नसीरूल इस्लाम (वय ४० वर्षे) हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत. घायाळांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही बर्धमान येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरात बॉम्ब बनवण्याचे काम चालू असतांना त्याचा स्फोट होऊन काही जण ठार झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते

धर्मशिक्षण देण्याची चळवळ हाती घेण्याची आवश्यकता ! - शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती

     नागपूर - शांतीसाठी धर्माची आवश्यकता असून धर्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर सर्व शिक्षा अभियानाच्या धर्तीवर धर्मशिक्षण देण्याची चळवळ हाती घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कांचीकामकोटी पिठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वतीजी महाराज यांनी येथे केले. श्री शिवशक्तीपीठ सेवा समितीच्या वतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विश्‍व स्वधर्म संमेलनात ते बोलत होते. शंकराचार्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संमेलनाचे उद्घाटन केले आणि त्याद्वारेच उपस्थितांना संबोधित केले.

(म्हणे) आय.एस्.आय.एस्.चा भारतीय मुसलमानांवर प्रभाव पडणार नाही !

आय.एस्.आय.एस्.चे आतंकवादी देशात प्रतिदिन कुठे ना कुठे सापडत असतांना गृहमंत्री कशाच्या आधारे 
हे वक्तव्य करत आहेत ? गृहमंत्री मनाच्या विरुद्ध जाऊन तर प्रतिक्रिया देत नाहीत ना ?
भारतियांना अचंबित करणारे केंद्रीय गृहमंत्र्यांचे विधान
     लखनौ - भारतीय मुसलमान वेगळे आहेत. भारतीय संस्कृतीच वेगळी आहे. येथील मुसलमान युवक माथेफिरू बनण्यास जात असेल, तर त्याचे नातेवाईक त्याला रोखतात. भारतात आय.एस्.आय.एस्.चा प्रभाव कधीच निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मौलाना आझाद विद्यापिठाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केले.

दक्षिण भारतातील युवकांवर आय.एस्.आय.एस्.चा प्रभाव वाढत आहे ! - शरद कुमार, प्रमुख, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

आतंकवादासारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सूत्राविषयी दोन महत्त्वाच्या व्यक्तींच्या विधानात 
कमालीची तफावत कशी काय ? गंभीर सूत्रांविषयी उच्चपदस्थ नेते आणि अधिकारी 
यांच्यात एकवाक्यता नसलेला जगातील एकमेव देश भारत !
     लखनौ - आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेला भारतात पाळेमुळे रुजवता आलेली नसली, तरी आय.एस्.आय.एस्.पासून असलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. युवकांना आय.एस्.आय.एस्.च्या प्रभावापासून दूर ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. विशेष करून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आय.एस्.आय.एस्.चा प्रभाव आहे. या राज्यांकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (एन्.आय.ए.) महासंचालक शरद कुमार यांनी येथील एका कार्यक्रमात केले.

कर्नाटक शासन अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारच ! - मुख्यमंत्री सिद्धरामय्या

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! टिपू सुलतानची जयंती साजरी करणार्‍या, तसेच गोमांस 
खाण्याचे समर्थन करणार्‍या मुख्यमंत्र्यांकडून अजून कसली अपेक्षा करणार ?
पुरो(अधो)गाम्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती
     बेंगळुरू - कितीही अडचणी आल्या, तरी राज्यातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी कर्नाटक शासन अंधश्रद्धा निमूर्र्लन कायदा करण्याच्या निर्णयावर ठाम आहे, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका संमेलनात केले. सिद्धरामय्या पुढे म्हणाले, लोकांच्या अंधश्रद्धेचा अपलाभ मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे. त्यांद्वारेच अंधश्रद्धेचा प्रसार होत आहे. डॉ. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर अनेक पुरोगामी मला भेटले.

धर्मांध तरुणाचा हिंदु तरुणीशी बलपूर्वक न्यायालयीन विवाह !

कोणीही उठतो आणि हिंदु तरुणीशी बलपूर्वक विवाह करतो ! उत्तरप्रदेश भारतात आहे कि पाकमध्ये ?
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहाद
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - फैजाबाद जिल्ह्यात इसरार या धर्मांध युवकाने एका हिंदु तरुणीच्या नातेवाइकांना जिवानिशी ठार मारण्याची चेतावणी देऊन तिच्याशी बलपूर्वक न्यायालयीन विवाह (कोर्ट मॅरेज) केला. त्यानंतर इसरार आणि त्याच्या नातेवाइकांनी बलपूर्वक तरुणीच्या घरात घुसून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु हिंदूंमुळे धर्मांधांचा हा डाव फसला. या प्रकरणी पोलिसांनी इसरारसह त्याच्या नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. (अनेक वर्षांची लव्ह जिहादची समस्या एकही राजकीय पक्ष सोडवू शकत नसेल, तर हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी का करू नये ? - संपादक)

नववर्षानिमित्त मद्यपान करणार्‍यांना घरी सुरक्षित पोहोचवा ! - पोलिसांचे मद्यालय चालकांना आदेश

३१ डिसेंबरच्या दिवशी मद्यपानाला विरोध न करता समर्थन करणारे कर्नाटक पोलीस !
काँग्रेसी राजवटीत जनतेला वार्‍यावर सोडण्याचा हा प्रकार नव्हे का ?
      बेंगळुरू (कर्नाटक) - नववर्षानिमित्त अत्याधिक प्रमाणात मद्यपान करणार्‍यांना घरी सुरक्षित पोहोचवण्याचे दायित्व मद्यालय चालकांचे असून त्यांनी अशा तळीरामांना वाहनाची व्यवस्था करून घरी पोहोचवावे, असे तोंडी आदेश कर्नाटक पोलिसांनी दिले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त एम्.ए. सलीम यांनी वरील आशयाचे आदेश काढले आहेत. नववर्षानिमित्त रात्री उशिरापर्यंत मद्यालये चालू रहाणार आहेत. मद्यपान करून वाहने चालवतांना तोल जाऊन अनेक अपघात होतात.

वर्ष २०१६ मध्ये पुन्हा एकदा घरवापसी मोहीम राबवणार !

धर्मजागरणचे ब्रज प्रांताचे संयोजक नंदकिशोर यांचा निर्धार
     आग्रा (उत्तरप्रदेश) - वर्ष २०१६ मध्ये पुन्हा एकदा घरवापसी मोहीम राबवणार असल्याची माहिती धर्मजागरण मंचाचे ब्रज प्रांताचे संयोजक श्री. नंदकिशोर यांनी दिली. ज्यांना पुन्हा हिंदु धर्मात येण्याची इच्छा आहे, अशा लोकांशी संपर्क साधण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केेले. धर्मांतरितांच्या शुद्धीकरणाचे महान कार्य करणार्‍या स्वामी श्रद्धानंद यांच्या बलीदान दिनानिमित्त राम वाटिका येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामी श्रद्धानंद यांच्यापासून प्रेरणा घेऊन हे अभियान राबवले जाणार असून त्या संदर्भातील रणनीती निश्‍चित करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

नेपाळकडून चिनी नागरिकांना फ्री व्हिसाची सोय

चीनशी जवळीक करून लहानसा नेपाळही भारताला वाकुल्या दाखवतो, हे चिंताजनक !
     काठमांडू - नेपाळ शासनाने चिनी नागरिकांना फ्री व्हिसा देण्याचा निर्णय घेऊन तो तात्काळ लागू करण्याचा आदेश दिला आहे. नेपाळचे विदेशमंत्री कमल थापा हे चीन दौर्‍यावर असतांना ही घोषणा करण्यात आली आहे. 
     नेपाळचे विदेशमंत्री कमल थापा चीनच्या दौर्‍यावर गेले असतांना तातडीने बोलवण्यात आलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याविषयी नेपाळ शासनाचे प्रवक्ता शेरधन राई यांनी माहिती दिली. नेपाळबरोबर भारताचे राजनितिक आणि कूटनितीक संबंध बिघडल्यामुळे नेपाळ चीनच्या जवळ जात आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे चीनला नेपाळचा चांगला मित्र मानत आहेत. नेपाळमध्ये गेले ४ महिने चालू असलेल्या मधेशीच्या आंदोलनाला भारताचे अप्रत्यक्ष समर्थन आहे, असा आरोप पंतप्रधान ओली यांनी केला आहे. यामुळे भारत-नेपाळ संबंधात कटुता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नेपाळची चीनशी वाढत जाणारी मैत्री भारताला चिंतेचा विषय बनू शकते.

मधेशींनी नेपाळ शासनाचा घटनादुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळला !

नेपाळ शासन आणि मधेशी नागरिक यांच्यातील वाद चिघळला
सीमेवर पुन्हा नाकाबंदी करणार
     मुजफ्फरपूर - मधेशी नागरिकांनी नेपाळ शासनाच्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळून लावला. हा प्रस्ताव जगाच्या डोळ्यांत धूळफेक करणारा आहे. त्यामुळेच विराटनगर सीमेवर पूर्ण नाकेबंदी करण्यात येणार आहे, अशी चेतावणी नेपाळच्या सद्भावना पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र महतो यांनी दिली आहे. त्यामुळे नेपाळ शासन आणि मधेशी यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

ख्रिस्ताब्द नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात विविध ठिकाणी निवेदन सादर

राऊरकेला (ओडिशा) येथील अपप्रकारांच्या विरोधात जागरूक 
राहून कृती करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन ! 
     राऊरकेला - ३१ डिसेंबरला नववर्षानिमित्त तीर्थस्थाने, पर्यटनस्थळे, सार्वजनिक स्थळे इत्यादि ठिकाणी होणारे अपप्रकार रोखणे, आवश्यक ती कार्यवाही करणे आणि समाजामध्ये या संदर्भात जागरूकता निर्माण करणे यांसाठी राऊरकेला येथील अतिरीक्त जिल्हाधिकारी के. सुदर्शन चक्रवर्ती यांना हिंदु जनजागृती समितीकडून एक निवेदन देण्यात आले. या वेळी चक्रवर्ती यांनी कायद्याचे उल्लंंघन होईल, अशा प्रकारचे कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन जागरूक राहून कृती करेल, असे आश्‍वासन दिले. या प्रसंगी सर्वश्री क्रियायोग मिशनचे अधिवक्ता विभूति भूषण पलेई, अधिवक्ता करमचंद जेना, भाजपचे राजीव बोस, सनातन संस्थेचे श्रीराम काणे आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रकाश मालोंडकर उपस्थित होते. 
क्षणचित्र : ३१ डिसेंबरच्या गैरप्रकारासंबंधी एक ध्वनीचित्रफीत अतिरीक्त जिल्हाधिकारी चक्रवर्ती यांना दाखवण्यात आली.

३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत बिअरबार चालू ठेवण्याची अनुमती रहित करावी ! - हिंदु जनजागृती समिती

शासनाकडे अशी मागणी का करावी लागते ?
     मुंबई - ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने वाढणारी गुन्हेगारी आणि अपप्रकार पहाता १ जानेवारीला पहाटेपर्यंत बिअरबार (मद्यालये) चालू ठेवण्याची शासनाने दिलेली अनुमती रहित करावी. एकीकडे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शासन नवनवीन प्रयत्न करत असतांना दुसरीकडे केवळ महसूलवाढीसाठी समाजाला अपप्रकार करण्यासाठी उद्युक्त करणे चुकीचे होईल. अशाने राज्याचा सर्वांगीण विकास आणि समाजहित कधी तरी साधले जाईल का ? जोडूनिया धन उत्तम व्यवहारे.... या संत तुकाराम महाराज यांच्या वचनानुसार महसूलवाढीचा निर्णय घेणे आवश्यक आहे.

देशभरातील शवागारांमध्ये ३५ सहस्रांहून अधिक मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून

 एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह अंत्यसंस्काराविना ठेवणार्‍यांवर शासन काय कार्यवाही करणार ?
     मुंबई - देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील शवागारांमध्ये ३५ सहस्रांहून अधिक मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बेवारस मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याविषयी धोरण बनवण्याचे आदेश केंद्रशासनाला देऊनही केंद्राने त्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीही नोंद न घेणारे शासन सामान्य जनतेला किती जुमानत असेल, हे यातून स्पष्ट होते. - संपादक) 

कडक नियमांमुळे पात्रता परीक्षेच्या (नेट) विद्यार्थ्यांना त्रास

केंद्रीय शिक्षण मंडळाचा अजब कारभार !
     पुणे - प्राध्यापकांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी पात्रता परीक्षा (नेट) २७ डिसेंबर या दिवशी झाली. कडक नियम आणि केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएस्ई) परीक्षेच्या वेळी दिलेली लेखणी (पेन्स) यांमुळे ही परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये चर्चेची ठरली. काही केंद्रांवर परीक्षा खोलीत विद्यार्थ्यांनी अंगावर थंडी वाजू नये, म्हणून घातलेली स्वेटर, जर्किन्सही नेण्यासही बंदी केली होती. त्यामुळे ऐन थंडीत सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांना वेगळ्याच परीक्षेला सामोरे जावे लागले.

महाराष्ट्रात ३ सहस्र कोटी, तर देशात १० सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा !

'समृद्ध जीवन'च्या ५८ कार्यालयांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या धाडी ! 
महेश मोतेवार यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी 
     पुणे - 'सेबी'ने बंदी करूनही गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारणारे महेश मोतेवार यांच्या 'समृद्ध जीवन फूड्स' या आस्थापनाशी संबंधित विविध आस्थापनांच्या ५८ कार्यालयांवर २९ डिसेंबर या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने धाडी टाकल्या. महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरात या राज्यांत या धाडी टाकून पोलीस अधिकारी विविध कागदपत्रांची छाननी करत आहेत. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, संभाजीनगर येथील कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पोलिसांनी महेश मोतेवार यांना पुण्यात २८ डिसेंबरला अटक केली होती आणि डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. उमरगावमधील न्यायालयाने मोतेवार यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. प्रत्यक्षात पोलिसांनी न्यायालयाकडे तपासकामासाठी सात दिवसांची कोठडी मागितली होती. 'सेबी'चे साहाय्यक महाव्यवस्थापक सचिन सोनावणे यांनी या संदर्भात गेल्या मासात तक्रार दिली होती. महाराष्ट्रात ३ सहस्र कोटी, तर देशात १० सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा मोतेवार यांनी केला आहे. 

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेचा प्रारंभ

दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करतांना पू. लोला वेझीलीच

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

आतंकवाद्यांच्या कुटुंबांना देतात, तसे संरक्षण कधी हिंदूंना देतात का ?

     ओडिशा राज्यातील कटकमध्ये एका मदरशात लहान मुलांना आतंकवादाचे शिक्षण दिल्याप्रकरणी डॉ. अब्दुर रहमान नावाच्या शिक्षकाला अटक करण्यात आली. त्यानंतर या आरोपीच्या घराजवळ सुरक्षा वाढवण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

आता या मुलालाही देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सहस्रो रुपये दिले, तर आश्‍चर्य वाटायला नको !

     १३ डिसेंबर २०१५ या दिवशी बिडकीन (जिल्हा संभाजीनगर) येथील एका १६ वर्षांच्या धर्मांध युवकाने जैन गल्लीत रहाणार्‍या पाच वर्षांच्या हिंदुु बालिकेवर बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर धर्मांधावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची गांधीगिरी !

     पुण्यातील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन धर्मांध युवतीला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (आय.एस्.आय.एस्.) या जिहादी आतंकवादी संघटनेने तिच्या जाळ्यात ओढल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर आतंकवादविरोधी पथकाकडून त्या मुलीला आतंकवादी कारवायांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न म्हणून इस्लाम, कुराण म्हणजे काय ? आणि त्यामध्ये देण्यात येणारी शिकवण, यांविषयी तिला समजावून सांगण्यात येत आहे.

आय.एस्.आय.एस्.ची संकेतस्थळे पहाण्यात मुंबई आणि पुणे येथील तरुणांची संख्या अधिक !

     हे युवक कोण आहेत, हे वेगळे सांगायला नको ? अशा युवकांना देशप्रेमी ठरवू पहाणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?शासनाने आतातरी या युवकांचे देशद्रोही रूप जाणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आतंकवादाची पाळेमुळे उखडून टाकावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे ! 
     नागपूर - मुंबई आणि पुणे येथील तरुण आय.एस्.आय.एस्.च्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक असल्याचे गुगल ट्रेण्ड्सच्या आकडेवारीवरून लक्षात आले आहे. आय.एस्.आय.एस्.ची माहिती घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करणार्‍यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. युवकांना जाळ्यात ओढण्यासाठी आय.एस्.आय.एस्.कडून इंटरनेट आणि सामाजिक संकेतस्थळे यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. गेल्या महिनाभरातील गुगल ट्रेंड्सच्या माहितीनंतर हे धक्कादायक वास्तव पुन्हा अधोरेखित झाले आहे.

अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांच्यावर तातडीने कारवाई करावी ! - हिंदुत्ववादी संघटनांची एकमुखी मागणी

सोळशी (जिल्हा सातारा) येथे शनीच्या 
चौथर्‍यावर अधिवक्त्या देशपांडे यांनी प्रवेश केल्याचे प्रकरण 
निवासी उपजिल्हाधिकारी (डावीकडे) श्री. संजीव देशमुख यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     सातारा - सोळशी (जिल्हा सातारा) येथे अधिवक्त्या देशपांडे यांनी २३ डिसेंबर रोजी शनीच्या चौथर्‍यावर प्रवेश केला. सवंग लोकप्रियतेसाठी अशी स्टंटबाजी करणार्‍यांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि इतर समविचारी हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजीव देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना देण्यात आले. 

धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने तणावमुक्तीविषयी प्रबोधन

     वर्धा - समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेल्या धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने वर्धा कन्या विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे ? याविषयी प्रबोधन करण्यात आले.

नंदुरबारच्या मतिमंद निवासी विद्यालयात सनातन संस्था ठाणेच्या वतीने अन्नदान

     नंदुरबार - सनातन संस्था ठाणेच्या वतीने १६ डिसेंबर रोजी नंदुरबार शहरातील कोकणी हील परिसरातील महात्मा फुले युवक मंडळ, धुळे संचलित मतिमंद विद्यार्थी निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. २० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करणार ! - महसूलमंत्री

     सोलापूर, २९ डिसेंबर - सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करणार असल्याचे आश्‍वासन महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री श्री. विजय देशमुख यांना दिले आहे. पालकमंत्री श्री. देशमुख यांनी २८ डिसेंबर या दिवशी महसूलमंत्री श्री. खडसे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते, तसेच जिल्ह्यातील पीक आणि पाण्याची परिस्थिती सांगितली. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याविषयी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले. आणेवारी अल्प दाखवण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्याला दुष्काळी सूचीतून वगळण्यात आले होते; परंतु पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील स्थिती वेळोवेळी सांगितली होती. त्यानुसार महसूलमंत्र्यांनी तातडीने पावले उचलत स्वत: जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करून येत्या दोन दिवसांत सोलापूर जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती आणि आणेवारीची माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी यांच्या पेरण्या पूर्णपणे वाया गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केल्याने शेतकर्‍यांना शासनाच्या साहाय्याचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. देशमुख यांनी व्यक्त केली.

ख्रिस्ती नववर्षारंभानिमित्ताने होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात प्रबोधन


हिंदु जनजागृती समितीची ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखा चळवळ
     पुणे - ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणार्‍या सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यापक प्रबोधन अभियान राबवण्यात येत आहे. या चळवळीच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत असूनही नागरिकांचाही या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

पिंपरी येथील दत्त मंदिराची समितीच्या धर्मशिक्षण वर्गातील युवकांकडून स्वच्छता

     पिंपरी - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील युवकांनी २१ डिसेंबर या दिवशी संत तुकाराम नगर येथील दत्त मंदिराची स्वच्छता केली. जसजसे मंदिर स्वच्छ होते, तसतसे मंदिरातील चैतन्य वाढत असल्याची अनुभूती धर्माभिमान्यांनी घेतली. सर्वश्री प्रतिक जाधव, अश्‍विन डहाके, धनाजी गळवे, प्रशांत बच्चे, संदीप चोपदार यांनी मंदिर स्वच्छतेची सेवा केली. मंदिर स्वच्छतेच्या सेवेमध्ये सर्वांचा सहभाग उत्साहवर्धक होता.

(म्हणे) 'रामायण आणि महाभारत ही मिथके !'

कुठे स्वत:च्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यावर रस्त्यावर उतरणारे मुसलमान, तर कुठे
 स्वत:च्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यावर त्याचा साधा निषेधही न करणारे धर्माभिमानशून्य हिंदू ! 
हिंदुद्वेष्टे इतिहासाचे अभ्यासक इरफान हबीब यांचे हिरवे फुत्कार 
     मालडा (बंगाल) - रामायण आणि महाभारत ज्यांनी लिहिले त्यांनी स्वत: इतिहास लिहिल्याचा दावा कधीही केला नाही. त्यामुळे रामायण आणि महाभारत ही मिथके आहेत, असे हिरवे फुत्कार इतिहासाचे अभ्यासक (?) इरफान हबीब यांनी येथे सोडले. अशा मिथकांना इतिहास मानणे धोक्याचे असून नेमके हेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे, अशीही गरळओक त्यांनी केली. ७६व्या 'इंडियन हिस्ट्री काँग्रेस'च्या पार्श्‍वभूमीवर 'टाईम्स ऑफ इंडिया'ने हबीब यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. 

मराठवाड्यात वर्षाअखेर १ सहस्र १०९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
     
     संभाजीनगर, २९ डिसेंबर - मराठवाड्यात असलेला दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांमुळे शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहेत. मराठवाड्याला सलग ४ थ्या वर्षी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या ३ वर्षांपेक्षा या वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्ष २०१५ च्या अखेरपर्यंत मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची संख्या १ सहस्र १०९ इतकी झाली आहे. डिसेंबर २०१५ या मासात ५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. मराठवाड्यात गेल्या ४ वर्षांतील शेतकरी आत्महत्यांचा हा आकडा सर्वाधिक आहे.
     आत्महत्या झालेल्या एकूण १ सहस्र १०९ शेतकर्‍यांपैकी ६९८ शेतकर्‍यांना साहाय्यता निधीचे वाटप करण्यात आले.

वाळूचोरांवर मोक्का आणि एम्पीडीए या कायद्यांनुसार गुन्हे प्रविष्ट करण्याचे आदेश

     पुणे - अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन हमीवर (बॉण्ड) न सोडता ते वाहन शासनाधीन (जप्त) करावे. त्याचसमवेत वाळूचोरांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायदा अथवा धोकादायक उपक्रम महाराष्ट्र प्रतिबंधक (एम्पीडीए) कायद्यानुसार गुन्हे प्रविष्ट करावेत, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक २८ डिसेंबर या दिवशी बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये गौण खनिज आणि वाळूचोरी यांचे सूत्र उपस्थित झाले, त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी सौरभ राव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

आता तृणमूल काँग्रेसवर बंदी आणण्याची मागणी करणार का ?
     मालडा (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या धर्मांध कार्यकर्त्याच्या गोदामात बॉम्ब बनवतांना स्फोट झाल्याने हन्ना शेख आणि फैजुल शेख हे दोघे जण ठार झाले, तर अन्य दोघे जण गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Trinmool congresske dhramandha karyakartake Godowm me bam banate samay huye visphotme 2 dharmandhonki mrutyu ! - es partypar bandi kyu na layi jaye ?
जागो !
     तृणमूल कांग्रेसके धर्मांध कार्यकर्ताके गोडाउन में बम बनाते समय हुए विस्फोट मे २ धर्मांधोंकी मृत्यु !
इस पार्टीपर बंदी क्यू ना लायी जाये ?

मदर तेरेसा यांच्या संतपदाविषयी अंनिसची भूमिका चमत्कारिक ! - हिंदु जनजागृती समिती

अंनिसकडून मदर तेरेसांच्या मानवतावादी 
कार्याला पोचपावती, तर सत्यसाईबाबांच्या मानवतावादी कार्याकडे दुर्लक्ष ! 
     मुंबई - एरव्ही चमत्कारांना कडाडून विरोध करणार्‍या आणि चमत्कार ही बाबच अस्तित्वात नाही, असे मानणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिसने) मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याविषयी मात्र चमत्कारिक आणि अंधश्रद्धाळू भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. याविषयी त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दिवशी सिंहगडावर सायंकाळी ७ नंतर थांबण्यास प्रतिबंध

ज्या गड-किल्ल्यांच्या साहाय्याने छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 
त्याचे पावित्र्य जपण्यासाठी महाराष्ट्रात मोहिमा राबवाव्या लागणे, हे लज्जास्पद ! 
     समस्त हिंदूंचे स्फूर्तीस्थान असलेल्या गडांचे पावित्र्य ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दिवशी केल्या जाणार्‍या अपप्रकारांमुळे नष्ट होत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदूंनी त्यांच्या भागातील गड-संरक्षण मोहिमेचे नियोजन करणे आवश्यक आहे ! 
     पुणे, २९ डिसेंबर - ३१ डिसेंबरच्या रात्री मौजमजा करण्यासाठी प्रतिवर्षी सिंहगडावर जवळपास १० सहस्र पर्यटक उपस्थित असतात. परिणामी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी वन अधिकार्‍यांना साहाय्य करत स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही महत्त्वाची भूमिका बजावतात. या वेळी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दिवशी पर्यटकांना सिंहगडावर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत थांबता येणार आहे. वन विभागाने दिलेल्या वेळेशिवाय इतर वेळी नागरिक गडावर आढळल्यास कारवाई केली जाईल, असे साहाय्यक वनसंरक्षक विजय माने यांनी सांगितले. 

हिंजवडी (पुणे) येथे 'इन्फोसिस' आस्थापनेत काम करणार्‍या महिलेवर बलात्कार

     महिलांसाठी असुरक्षित बनत चाललेले पुणे ! महिलांना स्वरक्षणाचे धडे आणि असे गुन्हे करणार्‍यांना फाशीसारखे कठोर शासन केल्यासच काही प्रमाणात आळा बसेल ! 
'इन्फोसिस'मधील २ कर्मचार्‍यांना अटक 
      पुणे, २९ डिसेंबर - येथील हिंजवडी आयटी पार्कमधील 'इन्फोसिस' या आस्थापनेत काम करणार्‍या एका महिलेवर त्याच आस्थापनातील एका कर्मचार्‍याने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. त्याच आस्थापनातील आणखी एका कर्मचार्‍याने त्या महिलेची छायाचित्रे काढून ती सामाजिक संकेतस्थळावर ठेवण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी त्या महिलेने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सुभाष बाग आणि प्रकाश किसन महाडीक या दोघांना अटक केली आहे.

आर्थिक आतंकवाद

१. आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या खळबळ कधीच माजत नाही; कारण मंत्र्यांपासून
आमआदमीपर्यंत कोणाला त्यातले काहीच कळत नसणे
     या निवडणुकीत १ सहस्त्र नोटांत एक नोट बनावट, म्हणजे पाकिस्तानी होती, असे डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स (DRI)चे म्हणणे आहे. या हंगामात (सीझनमध्ये) ३ सहस्त्र २०० कोटी रुपयांच्या नोटांच्या दुप्पट आकडा बनावट नोटांचा होता; कारण हा आकडा २०१२-१३ या वर्षाचा होता. एकंदर चलनाच्या ०.०००६७ टक्केच हा आकडा गेल्या वर्षी होता. आपल्या बँका सर्व आकडे उघड करीत नाहीत. कॅनडाच्या चलनात ०.४७ टक्के बनावट नोटा आल्यावर तेथे हल्लकल्लोळ माजला. २० महान (ग्रेट) राष्ट्रांनी मान्य केलेल्या आकड्याच्या तो दहापट होता. आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या खळबळ कधीच माजत नाही; कारण मंत्र्यांपासून आमआदमीपर्यंत कोणाला त्यातले काहीच कळत नाही.

पोलिसांना खरंच प्रतिमा सुधारायची आहे का ?

      संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या परिक्षेत्रातील पोलीस कर्मचार्‍यांना भ्रमणभाषमध्ये चित्रपटातील गाणी, पक्ष्यांचा आवाज किंवा कर्कश आवाज यांचे रिंगटोन ठेवण्यास बंदी केली आहे. त्यांनी पोलिसांना भ्रमणभाषवर सभ्य रिंगटोन ठेवण्याचा आदेश दिला आहे. चित्रपटातील गाणी किंवा कर्कश आवाजाच्या रिंगटोन ठेवल्याने पोलीसदलाची प्रतिमा मलीन होते. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी पोलीसदलाची प्रतिष्ठा जोपासली पाहिजे, असे सांगत त्या संबंधीचे एक पत्रकच नांगरे-पाटील यांनी काढले आहे. त्यांनी हे पत्रक संभाजीनगर ग्रामीण, बीड, जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली येथील पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn