Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

सरदार वल्लभभाई पटेल 
यांची आज जयंती

कोटी कोटी प्रणाम !


सनातनचे पू. विनायक कर्वे 
यांचा आज वाढदिवस

काश्मीरमध्ये ठार झालेला आतंकवादी अबू कासिमच्या अंत्यसंस्कारास सहस्रावधी देशद्रोह्यांची गर्दी

देशाच्या मुळावर उठलेल्या एका आतंकवाद्याच्या अंत्यसंस्कारास एवढा जनसागर उसळतो, हे लक्षात घ्या ! आज काश्मीरमध्ये असणारी ही विदारक स्थिती भारतात इतरत्र येऊ नये, यासाठी शासनाने या धर्मांध देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
  • भारतविरोधी घोषणा   
  • सुरक्षा सैनिकांवर दगडफेक   
  • पाकचे झेंडे फडकवले; 
  • २ जिल्ह्यांत बंद 

श्रीनगर - उधमपूर येथे भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत ठार झालेला लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या अबू कासिम याच्या ३० ऑक्टोबरला पार पडलेल्या अंत्यसंस्कारास सहस्रावधी देशद्रोही उपस्थित होते. या वेळी देशद्रोह्यांनी हिंसक निदर्शने केली, तसेच सुरक्षा सैनिकांवर दगडफेकही केली. याप्रकरणी पोलिसांनी ६७ जणांना अटक केली आहे. 

गडचिरोलीत दोन युवकांची गळा चिरून हत्या !

नक्षलवादाची वाढती समस्या लक्षात घेता, शासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्न पडतो !
महाराष्ट्र - छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात नक्षलवादाच्या थैमानामुळे अतिदक्षतेची चेतावणी !
  • ३७ वाहने जाळली !    
  • रस्त्याचे काम करणार्याना १०० नक्षलवाद्यांकडून मारहाण !

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याच्या भागाला लागून असलेल्या महाराष्ट्र - छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात अतिदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. येथे प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. नक्षलवाद्यांनी दोन युवकांची गळा चिरून हत्या केल्याची घटना ३० ऑक्टोबर या दिवशी येथे उघडकीस आली आहे. पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून हत्या घडल्याचे सांगितले जात आहे. गडचिरोली राजनांदगाव महामार्गावरील सावरगाव जवळ ही घटना घडली आहे. 

मतांच्या राजकारणासाठी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्याकडून आतंकवाद्यांना आश्रय ! - भाजपचा गंभीर आरोप

पाटलीपुत्र (बिहार) - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्र्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे मतांच्या राजकारणासाठी आतंकवाद्यांना आश्रय देत आहेत, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते सुशील मोदी यांनी केला आहे. सुशील मोदी पुढे म्हणाले, "नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे दोघेही आतंकवाद्यांना आश्रय देत आहेत. मतांच्या राजकारणासाठी दहशतवाद्यांना आश्रय देणारे हे अकार्यक्षम शासन आहे. तसेच लष्कर-ए-तोयबा आणि इंडियन मुजाहिदीनसारख्या आतंकवादी संघटनांना बिहार हे राज्य सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वर्ग वाटते. या दोघांमुळेच नेपाळमध्ये सापडलेल्या यासीन भटकळला कह्यात घेण्यास बिहार पोलिसांनी नकार दिला होता."

(म्हणे) मला गोमांस खाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही !

बहुसंख्य हिंदू असलेल्या देशातील एका राज्याला असे मुख्यमंत्री मिळणे, हे दुर्दैव ! 
अशा राज्यकर्त्यांकडून हिंदु धर्माचे रक्षण काय होणार ?
काँग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे धर्मद्रोही विधान
     बेंगळुुरू (कर्नाटक) - स्वतःच्या इच्छेने गोमांस खाणार्‍या व्यक्तीवर बंदी घातली जाऊ शकत नाही. देशात अशा प्रकारे घालण्यात आलेली बंदी अयोग्य आहे. आजपर्यंत मी कधी गोमांस भक्षण केले नाही; पण जर मला त्याची चव आवडली, तर मी ते नक्की खाईन. त्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही, असे धर्मद्रोही विधान कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक युवक काँग्रेसच्या सर्वसाधारण सभेत बोलतांना केले. या वेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी केरळ हाऊसवर पोलिसांनी छापा टाकल्याच्या कृतीचा निषेध व्यक्त केला.

भारतीय नागरिकत्वाच्या अर्जात पाकचे गायक अदनान सामी यांनी भरली असत्य माहिती !

भारतियांनो, पाक नागरिकांची मानसिकता जाणा !
शत्रूराष्ट्राच्या गायकांना पायघड्या घालण्याचा घातकी खेळ कधीपर्यंत चालणार ?
मुंबई - पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना भारत शासन नागरिकत्व देण्याच्या सिद्धतेत आहे; मात्र सामी यांनी नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती दिल्याचे समोर येत आहे. सामी यांनी १६ जानेवारी २०१३ मध्ये हा अर्ज केला होता. त्या वेळी त्यांचा भारतीय व्हिसा संपल्याचे वृत्त समोर येत होते. अर्जातील १७ क्रमांकावर त्यांच्यावर केवळ एकच गुन्हा नोंद असल्याची माहिती देण्यात आली आहे; मात्र यात तथ्य नसल्याचे समजते. या संदर्भात वाहिन्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सामी त्यांना टाळत आहेत. विशेष म्हणजे याविषयी कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही आणि त्यांच्या अर्जातील माहिती खरी असल्याचे भारत शासनाने मानले आहे. 

पाकप्रेमी सुधींद्र कुलकर्णी पुस्तक प्रकाशनासाठी पाक दौर्‍यावर !

सातत्याने भारतातील राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावून पाकला 
चुचकारणार्‍या अशा पाकनिष्ठांना पाकमध्येच हाकला !
    मुंबई - ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी हे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र्र मंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी पुढील आठवड्यात पाकिस्तान दौर्‍यावर जाणार आहेत. (कसुरी यांनी भारताच्या विरोधात गरळ ओकणारी विधाने केली होती. भारतातील अनेक वृत्तवाहिन्यांनी ती प्रसारित केली आहेत. एवढे सगळ धडधडीत समोर आले असतांना पाकला जाणारे सुधींद्र कुलकर्णी देशद्रोहीच ! - संपादक) पाकमध्येही या पुस्तकाचे पुन्हा प्रकाशन होणार आहे.

सामीला भारताचे नागरिकत्व देऊ नये ! - अ.भा. हिंदु महासभा

अशी मागणी का करावी लागते ?
नवी देहली - पाकिस्तानी गायक अदनान सामी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आयकर चोरी, 'फेमा' (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट) च्या नियमांचे उल्लंघन, घरघुती हिंसाचार, फसवणूक आदी अनेक गुन्हे त्यांच्या नावावर आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार शर्मा यांनी केली आहे. भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अदनान यांनी नुकतेच भारत शासनाकडे आवेदन दिले आहे. अदनान यांच्यावरील गुन्ह्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर चीनने ज्याप्रमाणे एक पत्नी दोन मुले हा कायदा लागू केला, त्याप्रमाणे भारतात समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणीही शर्मा यांनी शासनाकडे केली आहे. 

दाऊद टोळीपासून जिवाला धोका ! - छोटा राजन

राजन लवकरच भारतात - इंडोनेशियातील भारतीय राजदूत
    बाली (इंडोनेशिया) - कुख्यात गुंड छोटा राजनने भारताचा इंडोनेशियातील दूतावास आणि इंडोनेशिया पोलीस यांना एक चिठ्ठी लिहिली असून त्यात कुख्यात गुंड दाऊद टोळीपासून स्वतःच्या जिवाला धोका असल्याचे नमूद केले आहे; तसेच आपल्याला योग्य वैद्यकीय उपचार मिळत नाहीत, अशीही तक्रार केली आहे. इंडोनेशिया पोलिसांच्या डेनपसार कोठडीत असलेल्या छोटा राजनने कोठडीतील अन्य कैद्याला त्रास दिल्यावरून त्याला दुसर्‍या कारागृहात हलवण्यात आले आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात गुन्हेगार प्रत्यार्पण करार यापूर्वीच झालेला आहे. त्यामुळे या करारानुसार पुढची प्रक्रिया त्वरित पूर्ण करून राजनला भारतात नेण्यात येईल, असे भारताचे इंडोनेशियातील राजदूत गुरजीत सिंह यांनी सांगितले.

केरळच्या भ्रष्ट मंत्र्यांना दोषमुक्त ठरवणारा अन्वेषण यंत्रणेचा अहवाल न्यायालयाने फेटाळला !

भ्रष्टाचार्‍यांना न्यायालयच शासन करेल, अशी जनतेला आशा आहे !
नव्याने अन्वेषण करण्याचा आदेश
     थिरुवनंतपुरम् - विशेष दक्षता न्यायालयाने राज्याचे अर्थमंत्री के.एम्. मणी यांच्याविरुद्ध लाचखोरीचे प्रकरण बंद करण्याच्या संदर्भात अन्वेषण यंत्रणेचा अंतिम अहवाल फेटाळून लावत या प्रकरणाचे आणखी अन्वेषण करण्याचा आदेश दिला. या प्रकरणाचे अन्वेषण करणारे विशेष न्यायधीश जॉन. के. इतेकदन यांनी दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी समितीचा अंतिम अहवाल मान्य करण्यास नकार दिला.

पर्यावरणाची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी आणा ! - धर्माभिमानी हिंदू

बडोदा (गुजरात) येथे हिंदु जनजागृती समितीकडून शासनाला निवेदन सादर
जिल्हाधिकारी श्रीमती अवंतिका सिंह यांना
निवेदन देतांना धर्माभिमानी हिंदू
     बडोदा (गुजरात) - दिवाळीसह अन्य सणांच्या वेळी फोडण्यात येणार्‍या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते, तसेच देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेली फटाके फोडल्यानंतर त्यांची विटंबनाही होते. त्यामुळे अशा फटाक्यांवर त्वरित बंदी घालावी, या मागणीसाठी हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ ऑक्टोबर २०१५ या दिवशी येथील जिल्हाधिकारी श्रीमती अवंतिका सिंह यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री ओम साई मित्र मंडळाचे प्रमुख श्री. राकेश भारद्वाज, बजरंग दलाचे श्री. जितेंद्र परमार, श्री. रवी पटेल, श्री. नरेश मकवाना, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रेखा बर्वे, सनातन संस्थेच्या सौ. मनीषा गोडबोले, सौ. सिन्नरकर आदी उपस्थित होत्या.

हरियाणा शिक्षण विभागाच्या शिक्षा भारती मासिकात गोमांसाच्या समर्थनार्थ लेख प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी मासिकाच्या संपादकांची पदावरून हकालपट्टी !

     गोमांस भक्षणाचे समर्थन करणार्‍या गोद्रोह्यांच्या विरोधात कठोर पावले उचलणार्‍या भाजप शासनाच्या शिक्षण विभागाचे अभिनंदन ! अशांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली, तरच अशी कृती करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही !
     चंदिगड (हरियाणा) - गोमांस भक्षण केल्यामुळे ऊर्जा मिळते, असा लेख प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी हरियाणा शिक्षण विभागाच्या शिक्षा भारती मासिकाच्या संपादकांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री रामविलास शर्मा यांनी दिली. याबरोबरच अशा प्रकारचा लेख हरियाणातील मासिकामध्ये प्रसिद्ध होणे चुकीचे असून या संपादकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

बिहारमध्ये भाजप पराभूत झाल्यास पाकमध्ये फटाके फुटतील ! - अमित शहा

     मोतीहारी - बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास पाकमध्ये फटाके फुटतील, असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार निवडणुकीतील तीन टप्पे पार पडले आहेत. येत्या आठवड्यात उर्वरित दोन टप्प्यांतील मतदान होऊन ८ नोव्हेंबर या दिवशी निकाल लागणार आहे. निवडणुकीतील विजयासाठी महाआघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून भाजपनेही ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली आहे. निवडणुकीच्या पुढील दोन टप्प्यांत ज्या ५७ मतदारसंघांत मतदान होणार आहे, तेथे मुसलमान नागरिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर बेतिया येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

पाकने आम्हाला अणूतंत्रज्ञान विकले होते ! - इराणच्या माजी अध्यक्षांची स्वीकृती

अशा धूर्त पाकशी स्वप्नातही मैत्री करणे घातकच ठरेल !
     तेहरान - आम्हाला पाककडून सुमारे ३ दशकांपूर्वी अणूतंत्रज्ञान मिळाल्याची स्पष्ट स्वीकृती इराणचे माजी अध्यक्ष अकबर हशेमी रफसंजानी यांनी दिली. इराणमधील एका अणूविषयक मासिकाच्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. 
यात रफसंजानी पुढे म्हणतात,
१. इस्लामी राष्ट्रांकडे अणूबॉम्ब असावेत, असे पाकचे माजी अणूशास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांना वाटत होते. त्यामुळे पाकिस्तानने आम्हाला साहाय्य करण्याची सिद्धता दर्शविली.
२. त्या वेळी युद्धजन्य परिस्थिती असल्याने शत्रूपक्षाने अणूशस्त्राचा वापर केल्यास आपल्याकडे पर्याय उपलब्ध हवा, अशी आमची मानसिकता होती.

बस्तवाड हलगा (बेळगाव) येथे धर्मांध गुंडाचे ग्रामपंचायत सदस्यावर तलवारीने आक्रमण !

जैन धर्मियांना अपशब्द वापरणार्या धर्मांधांना हिंदूंचे प्रत्युत्तर ! 
बस्तवाड हलगा (बेळगाव) - येथील ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि सदस्य राजेंद्र बडवण्णवर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हसनसाब मुल्ला या धर्मांधाने आणि त्याच्या कुटुंबियांनी तलवार अन् विळा यांनी प्राणघातक आक्रमण केले. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. या धर्मांधाच्या मुलाने जैन धर्मियांच्या संदर्भात अपशब्द वापरले. त्यामुळे संतप्त हिंदूंनी त्यांच्या घरावर आक्रमण केले. या प्रकरणी हसनसाब यासह मलिकजान मुल्ला, नूरअहमद ही दोन मुले आणि त्यांची आई आएशाबी यांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

लोकगायक शिवदास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद

एका गीताद्वारे जयललितांवर टीका केल्याचे प्रकरण
तमिळनाडूतील अण्णाद्रमुक शासनाची हुकूमशाही ! दादरी प्रकरणावरून पुरस्कार परत करणारे याविषयी काही बोलतील का ?
चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर टीका करणे, एका लोकगायकाला महागात पडले आहे. यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. एस्. शिवदास असे या लोकगायकाचे नाव असून काव्य, संगीत आणि कला या क्षेत्रांमध्ये ज्यांना दूर ढकलले गेले आहे, अशांना साहाय्य करण्यासाठी झटणार्या चळवळींशी ते निगडित आहेत. शिवदास यांनी राज्य शासनाच्या मद्यप्राशनाच्या संदर्भातील धोरणावर टीका करणारी २ गाणी गायली. यात मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर टीका करण्यात आली होती. ही गाणी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ऐकली गेली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

पुणे महानगरपालिका हद्दीजवळच्या गावांमध्ये अवैध बांधकामे चालूच !

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन हे होत
असलेली अवैध बांधकामे रोखणे आणि त्याची निर्मिती न होणे, यासाठी काय प्रयत्न करणार आहेत ?
अवैध बांधकामांच्या सर्वेक्षणाची मोहीम थंडावली
      पुणे, ३० ऑक्टोबर - महानगरपालिका हद्दीजवळच्या गावांमध्ये चालू असलेल्या अवैध बांधकामांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने ती बांधकामे जोमाने चालू आहेत. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएम्आर्डीए) स्थापना झाल्याने जिल्हा प्रशासनासह हवेली तालुका प्रशासनाचे या बांधकामांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाने चालू केलेली अवैध बांधकामाच्या सर्वेक्षणाची मोहीम पूर्णत: थंडावली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना पुन्हा गती आली आहे.

प्रदूषण करणार्‍या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री रोखा ! - ईश्‍वरपूर येथे तहसीलदारांना निवेदन

तहसीलदार श्रीमती रूपाली सरनोबत (डावीकडे)
यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
     ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), ३० ऑक्टोबर (वार्ता.) - प्रदूषण करणार्‍या, तसेच हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी २९ ऑक्टोबर या दिवशी ईश्‍वरपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार श्रीमती रूपाली सरनोबत यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर तहसीलदार सरनोबत यांनी या संदर्भात पोलीस ठाणे, तसेच अन्य ठिकाणी पत्र पाठवण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजाराम मोरे, संतोष कुंभार, सनातन संस्थेचे सर्वश्री सुरेश जाधव, उत्तम मोरे, श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. मंदार चव्हाण उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेकडे सरोगसीचा हिशेब नाही

महानगरपालिका, केंद्र आणि राज्यशासन ही समस्या
रोखण्यासाठी कठोर पावले तत्परतेने उचलेल, ही अपेक्षा !
      पुणे, ३० ऑक्टोबर - केंद्र शासनाने विदेशी नागरिकांना सरोगसी करण्यावर बंदी घातली आहे. असे असले, तरी येथील मोठ्या रुग्णालयांमध्ये सरोगसी तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. पुणे शहरात अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) केंद्रे आहेत. त्या माध्यमातून दरवर्षी ६० हून अधिक अपत्ये जन्माला येतात. कोणत्या रुग्णालयातून किती सरोगसी झाली ? त्यात विदेशातील अपत्ये किती आहेत ? किती सरोगेट आईद्वारे अपत्यप्राप्ती होते, याची नोंद पुणे महानगरपालिकेकडे नसल्याचे समोर आले आहे.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे आजपासून तीन दिवसीय श्री नामदेव महाराज साहित्य संमेलन

    पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ३० ऑक्टोबर (वार्ता.) - श्री संत नामदेव महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन ३१ ऑक्टोबर या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे माजी अध्यक्ष डॉ. यू. म. पठाण यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत यांच्या अध्यक्षतेखाली येथे ३१ ते २ ऑक्टोबर असे ३ दिवस संमेलन होणार आहे, अशी माहिती संयोजक समितीचे कार्याध्यक्ष भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी दिली.
ते पुढे म्हणाले...
१. स्वातंत्रवीर सावरकर वाचनालय, श्री संत नामदेव शिंपी समाज, श्री संत नामदेव सेवा मंडळ, श्री संत नामदेव युवक संघटना यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय साहित्य संमेलनात आम्हाला भावलेले संत नामदेव महाराज, संत मांदियाळीतील नामदेव महाराजांचे वेगळेपण, संत साहित्य आणि आपले अभ्यासक्रम, आतंकवादावर मात करण्यासाठी संत साहित्य, संतवाणीची हस्तलिखिते आणि संत साहित्य प्रकाशकांची सद्यस्थिती, संत साहित्य आणि ललित साहित्य, संत नामदेव महाराज, भारतीयतेसाठी संत साहित्य आदि विषयांवर ज्ञानसत्रांचे आयोजन केले आहे.

मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगणारा दूरभाष खोटा असल्याचे उघड

खोटे संपर्क करून पोलिसांना फसवणार्‍या
अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईच अपेक्षित आहे !
     मुंबई - शहरात बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्यात येणार आहे, असे सांगणारा दूरभाष मुंबई पोलिसांना आला होता; मात्र चौकशीअंती तो खोटा असल्याचे उघड झाले. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
     २८ ऑक्टोबरला रात्री अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिषेक सिंग नावाच्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून संपर्क करून सांगितले, मी कॅनडाच्या सैन्यात असून सध्या भारत दौर्‍यावर आहे. रात्री जुहू चौपाटीवर पाच अनोळखी व्यक्तींचे संभाषण ऐकले. काही मॉल, रेल्वे आणि बसस्थानके, तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवले असून १२ घंट्यांत त्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो, असे ते बोलत होते. ते दाऊद आणि कसाब यांची नावे घेत होते. संभाषणानंतर ते पाच जण अंधेरीच्या दिशेने निघून गेले

मी आता सनातनचाच झालो आहे ! - वेदमूर्ती श्री. नंदकुमार रहाणे

वेदमूर्ती श्री. नंदकुमार रहाणे (डावीकडून दुसरे)
यांना सनातन प्रभातची माहिती सांगतांना श्री. आगवेकर
वेदमूर्ती, ग्रामोपाध्याय श्री. नंदकुमार रहाणे यांची देवद आश्रमाला भेट 
      पनवेल - मी आता सनातनचाच झालो आहे. प्रती २ मासांनी मी आश्रमात येईन. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. अनेक दिवसांपासून आश्रमात यायची इच्छा पूर्ण झाली, असे भावपूर्ण उद्गार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुरसुंगी येथील वेदमूर्ती, ग्रामोपाध्याय श्री. नंदकुमार रहाणे यांनी काढले. त्यांनी सनातन संस्थेच्या देवद, पनवेल येथील आश्रमाला २९ ऑक्टोबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
     ते पुढे म्हणाले, भारताची रास धनु आहे. जानेवारी २०१७ मध्ये शनि धनुराशीत प्रवेश करत असल्याने त्यानंतरची अडीच वर्षे हिंदु जनजागृती समितीकडे अनेक लोक आकर्षित होतील आणि कार्यभाग पूर्णत्वास जाईल.

काँग्रसचे नेते दिगंबर जाधव यांनी भूमीच्या वादातून केला गोळीबार !

काँग्रेसची गुंडगिरी !
     सांगली, ३० ऑक्टोबर (वार्ता.) - संजयनगर परिसरात ३० ऑक्टोबर या दिवशी दुपारी १.३० वाजता भूमीच्या वादातून काँग्रेसचे नेते आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी हवेत गोळीबार केला. महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्याशी जाधव याचा वाद झाल्याने त्यांना हा गोळीबार केला. जाधव यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना संजयनगर पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

पुणे येथे देण्यात येणार्‍या पाण्यापैकी २० प्रतिशत पाणी वाया ! - महानगरपालिका

राज्यात पाणीटंचाई अभावी शेतकरी आत्महत्या करत असतांना असे पाणी वाया घालवणे, हे योग्य आहे का ?
      पुणे, ३० ऑक्टोबर - पुण्यात देण्यात येणार्‍या पाण्यापैकी २० प्रतिशत पाणी वाया जाते. पालिकेची सदोष यंत्रणा आणि जलसंपदा विभागाचा कालवा यांमुळे पाणी वाया जात असल्याचे महानगरपालिकेने मान्य केले आहे. येथील धरणातून उजनी धरणामध्ये पाणी सोडण्याच्या संदर्भात जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे प्रविष्ट केलेल्या याचिकेमध्ये पालिकेने पाणी वापराची आकडेवारी दिली आहे.

भ्रष्टाचाराच्या माध्यमातून विकास केलेल्या अजित पवार यांच्या निमंत्रणास शिवसेनेचा नकार ! - नीलमताई गोर्‍हे

     कोल्हापूर, ३० ऑक्टोबर (वार्ता.) - बारामतीचा केलेला विकास पहायला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निमंत्रणास सध्या शिवसेनेने नकार दिला आहे. अजित पवार यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून ते निर्दोष सिद्ध झाल्यानंतरच त्याचा विचार करण्यात येईल, असे आज शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या आमदार डॉ. नीलमताई गोर्‍हे यांनी येथे जाहीर केले.

नगर येथे निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
फटाक्यांच्या माध्यमातून देवता आणि राष्ट्र्रपुरुष यांची होणारी
विटंबना रोखण्याची हिंदु जनजागृती समितीची मोहीम
     नगर, ३० ऑक्टोबर (वार्ता) - फटाक्यांच्या वेष्टनांवर असणार्‍या देवता आणि राष्ट्रपुुरुष यांच्या चित्रांमुळे होणारी विटंबना लक्षात घेऊन अशा फटाक्यांची निर्मिती आणि विक्री थांबवण्यात यावी. तसेच अशा फटाक्यांचे विक्रेते आणि निर्मिती करणारे यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी येथील निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना २९ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. परमेश्‍वर गायकवाड, हिंदुत्ववादी सर्वश्री तेजस भाले, विनायक बत्तीन, मारुती खडके आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष गवळी आदी उपस्थित होते.

विचारवंतांच्या हत्येला मोदी उत्तरदायी कसे ? - कन्नड साहित्यिक डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांचा प्रश्‍न

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते, असे म्हणणारे आणि पुरस्कार
परत करणारे साहित्यिक अन् कलाकार यांच्याकडे याविषयी उत्तर आहे का ?
     पुणे, ३० ऑक्टोबर - कलबुर्गींची हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे; पण कर्नाटकातील मुख्यमंत्री पक्के डाव्या विचारांचे आहेत. उत्तर प्रदेशमध्येही समाजवादी पक्षाचे शासन आहे, तरीही मोदी यांनाच नावे ठेवली जातात. ते काही बोलले, तर राज्याच्या स्वातंत्र्यावर गदा आली, असे म्हटले जाते. पुरस्कार परत करणारे हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी हे तर काँग्रेसचे नेते अर्जुनसिंग यांचा उजवा हातच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असे म्हणत आहेत, त्यांचे एकूण योगदान काय, हेही पहायला हवे. लेखक आणि विचारवंत यांच्या हत्या, दादरी प्रकरण हे त्या राज्यांचे विषय आहेत. या प्रकरणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उत्तरदायी कसे, असा प्रश्‍न कन्नड साहित्यिक डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांनी केला.

नगरमध्ये महाविद्यालयातच गळफास घेऊन बारावीच्या मुलीची आत्महत्या

    नगर - येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने वर्गातच गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली. तेजस्विनी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव असून ती मूळची संभाजीनगर येथील आहे. तेजस्विनी ही नेवासा फाटाजवळच्या त्रिमूर्ती महाविद्यालयामध्ये शिकत होती. या महाविद्यालयाच्या वर्गातच तेजस्विनीने गळफास घेऊन आयुष्य संपवले. तेजस्विनीच्या आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. (शेतकरी, पोलीस यांच्या पाठोपाठ आता महाविद्यालयीन विद्यार्थीही आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आहेत. ही स्थिती भयावह आहे. जीवनातील ताण-तणाव यांना सामोरे जाण्याची शक्ती देणारे धर्मशिक्षण घेणे, साधना करणे अनिवार्य असल्याचे यातून स्पष्ट होते. - संपादक)

भुजबळ कुटुंबियांच्या आस्थापनांची माहिती मागवली !

     मुंबई - समीर भुजबळ विविध आस्थापनांच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक उलाढालप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर यांच्याशी संबंधित असलेल्या विविध आस्थापनांची माहिती मागवली आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून चालू असलेल्या चौकशीसाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करत आहोत, असे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.
     राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र सदन आणि इतर प्रकरणांत छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज आणि समीर यांच्यासह कंत्राटदारावर गुन्हा प्रविष्ट केला. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने त्या दोघांना समन्स पाठवले. त्यानंतर प्रश्‍नावलीही पाठवण्यात आली.

आज १३ कोटी ६५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन ! - आमदार सुधीर गाडगीळ

     सांगली, ३० ऑक्टोबर (वार्ता.) - शासनाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने संमत झालेल्या नाबार्ड, अर्थसंकल्प आणि रस्तेदुरुस्ती या कार्यक्रमांतून १३ कोटी ६५ लक्ष रुपयांच्या खर्चाच्या कामाचा शुभारंभ शनिवार, ३१ ऑक्टोबर या विश्रामबाग येथे दुपारी १२ वाजता होत आहे. यात सांगली विधानसभा मतदारसंघाला जोडणार्‍या पाचही रस्त्यांचे डांबरीकरण, रुंदीकरण, तसेच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. याचप्रकारे राज्यात १ लक्षहून अधिक कामांचे उद्घाटन होत आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक निधी आणण्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, तसेच बांधकाममंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे यश आले आहे. या कामांच्या पारदर्शकतेसाठी त्या त्या कामांची माहिती संबंधित ठिकाणी फलकावर लावण्यात आली आहे, अशी माहिती सांगली लोकसभा मतदार संघातील भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

मल्लिका शेरावत यांच्या विरोधात चालू करण्यात आलेली फौजदारी प्रक्रिया उच्च न्यायालयाकडून रहित !

न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार आता समाजप्रेमींनी चित्रपटांद्वारे अश्‍लीलता पसरवणार्‍या 
अभिनेत्रींच्या विरोधात चित्रपट परीनिरीक्षण मंडळाकडे दाद मागावी !
चित्रपटात तोकड्या कपड्यांत वावरण्याचे प्रकरण
     नागपूर - चित्रपटात तोकड्या कपड्यांत काम करत असल्याच्या कारणावरून येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने पांढरकवडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांच्या कार्यालयात अभिनेत्री मल्लिका शेरावत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शेरावत यांच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया चालू करण्याचा आदेश न्यायदंडाधिकार्‍यांनी दिला होता. या आदेशाला शेरावत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया रहित करण्याचा आदेश दिला.

येत्या २४ घंट्यांत चक्रीवादळाची शक्यता

     पुणे - दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मध्य अरबी समुद्र यांवर निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या २४ घंट्यांत चक्रीवादळात रूपांतर होणार असून ते पश्‍चिमेकडे सरकत ओमान किनारपट्टीकडे धडकणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असल्याने पश्‍चिम किनारपट्टीवर कोणताही परिणाम होणार नाही, तर लक्षद्वीप येथील मच्छीमारांना पुढील २४ घंटे समुद्रात जातांना सतर्कतेच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

संतप्त ६० पालकांकडून शाळेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन !

सेंट फ्रान्सिस शाळेचे शुल्कवाढ प्रकरण
पालकांनो, पैसे लुबाडणार्‍या इंग्रजी माध्यमांच्या
शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश द्यायचा कि नाही, हे ठरवा !
     नाशिक - येथील सेंट फ्रान्सिस शाळेत शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका न देता फळ्यावर प्रश्‍न लिहून दिले. तसेच विद्यार्थ्यांचे ओळखपत्रही जमा केल्याने संतप्त ६० पालकांनी शाळेच्या प्रांगणातच संस्थेच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. (हिंदूंनो, ख्रिस्त्यांच्या शाळांची विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क उकळण्याची मानसिकता जाणा ! - संपादक) अशा प्रकारे शुल्कवाढीवरून पालकांनी अनेकदा आंदोलन केले आहे. या शाळेत साधारणतः ३ सहस्र विद्यार्थी शिकत आहेत. त्यांची ओळखपत्रे शाळेने जमा केली; मात्र विद्यार्थी हरवले किंवा त्यांचे अपहरण झाल्यास उत्तरदायी कोण, असा प्रश्‍न पालकांकडून विचारण्यात आला.

ऑनलाईन औषध विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

     मुंबई - देशात बेकायदेशीररीत्या ऑनलाइन औषधविक्री करणार्‍या संकेतस्थळांवर तत्काळ कारवाई करा, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्यशासनाला दिला. त्या विषयीच्या कार्यवाहीचा अहवाल २८ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
१. ऑनलाईन औषधविक्री करणार्‍या संकेतस्थळांवर कारवाई करण्याचा आदेश राज्य शासनाला द्यावा, अशी मागणी सोमय्या महाविद्यालयाच्या प्रा. मयुरी पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली होती.
२. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एस्.बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी उपरोक्त आदेश दिले.

उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन दिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन !

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील ४५ हून अधिक हिंदू संघटनांचा सहभाग !
      उल्हासनगर (वार्ता.) - हिंदु धर्मविरोधी षड्यंत्रे, हिंदु धर्मियांवरील अन्याय अन् अत्याचार यांविषयी जागृती करण्यासह हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उल्हासनगर येथे प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यघटनेद्वारे भारत हे हिंदु राष्ट्र उद्घोषित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय आणि धर्माभिमानी हिंदू यांना एका व्यासपिठावर आणणे, हा अधिवेशनाचा प्रमुख उद्देश आहे. या अधिवेशनात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ४५ हून अधिक हिंदु संघटनांचे १४० प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. यांत अधिवक्ते, संपादक आणि विचारवंत यांचाही समावेश आहे.

रामनाथ (अलिबाग) येथील पोलीस मुख्यालयात पोलिसाकडूनच दुचाकीचा स्फोट

कायद्याच्या रक्षकांकडून हे अपेक्षित नाही !
      रामनाथ (अलिबाग) - येथील पोलीस मुख्यालयात २८ ऑक्टोबरच्या दिवशी दुपारी झालेला दुचाकीचा स्फोट हत्या करण्याच्या उद्देशाने पोलिसानेच घडवून आणल्याचे तपासातून उघड झाले आहे. या स्फोटात दोन पोलीस घायाळ झाले होते. यात पोलीस हवालदार नितेश पाटील यांचा मृत्यू झाला. आरोपी हवालदार प्रल्हाद पाटील आणि नितेश पाटील यांचे एकाच महिला पोलीस कर्मचारीशी संबंध होते. सूड उगवण्यासाठीच दुचाकी स्फोट घडवण्यात आला. अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून आरोपी पोलीस कर्मचार्‍याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांचेही प्रेमसंबध असणार्‍या महिलेचा सहभाग आहे का, याची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी हवालदार प्रल्हाद पाटील यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

जिहादी आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेला सहस्रोंची गर्दी होणारा देश सुरक्षित आहे का ?
     उधमपूर येथे भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत ठार झालेला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अबू कासिम याच्या अंत्यसंस्कारास सहस्रावधी धर्मांध उपस्थित होते. या वेळी धर्मांधांनी भारतविरोधी घोषणा दिल्या, तसेच सुरक्षा सैनिकांवर दगडफेकही केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Bhartiya senake hatho mare gaye jihadi atankvadi Abu Kasim ke
antim sanskarke liye sahastro deshdrohiyonki bhid.
    kya hamara desh surakshit hai ?
जागो !
    भारतीय सेना के हाथो मारे गए जिहादी आतंकवादी अबू कासीम के
अंतिम संस्कार के लिए सहस्रो देशद्रोहियों की भीड.
    क्या हमारा देश सुरक्षित है ?

वातावरण सात्त्विक बनवणारी भारतीय संस्कृती कुठे, तर हॅलोवीन साजरा करून वातावरणील नकारात्मक शक्ती वाढवणारी पाश्‍चात्त्य विकृत कुप्रथा कुठे !

३१ ऑक्टोबर या जागतिक हॅलोवीन दिनाच्या निमित्ताने...
     ईश्‍वराकडे वाटचाल करण्याची शिकवण देऊन जीवन उन्नत करण्याची शिकवण देणार्‍या देवभूमी भारतात अशा कुप्रथांचा शिरकाव होऊ देऊ नका !
हॅलोवीनसाठी घातलेला
पोशाख
१. हॅलोवीन या कुप्रथेची माहिती !
     हॅलोवीन ही प्रथा अनेक देशांत, विशेषकरून अमेरिका आणि युनायटेड किंगडम यांसारख्या देशांत ३१ ऑक्टोबर या दिवशी साजरी केली जाते. यामध्ये केलेली सर्व सजावट आसुरी शक्तींच्या संदर्भातील असते. या वार्षिक प्रथेच्या वेळी अकस्मात् उफाळून येणार्‍या समाजविघातक प्रवृत्तीचा सामना करण्यासाठी पोलीस आणि अग्नीशमन दल हे आधीपासूनच सतर्क अन् सज्ज रहायला शिकले आहेत. या दिवशी पालक आपल्या मुलांना आसुरी आणि अनोळखी लोकांविषयी सतर्क रहाण्यास सांगतात. हॅलोवीन बाह्यतः मनोरंजन अन् मौज यांसाठी साजरा होत असला, तरी त्यामागे अधिक घातक अदृश्य शक्ती कार्यरत असते. याविषयी ते अनभिज्ञ असतात.

भ्रमणभाष आणि फेसबूक म्हणजे जगभर संपर्क करण्याचे उत्कृष्ट माध्यम कि महिलांच्या शोषणास साहाय्य करणारे राक्षस ?

श्री. अरुण रामतीर्थकर
१. फेसबूक हे संपर्काचे उत्कृष्ट माध्यम असूनही सध्या त्यातून 
सुविधेपेक्षा समस्याच निर्माण होतांना दिसणे 
     फेसबूक हे संपर्काचे उत्कृष्ट माध्यम असल्याने जगभर त्याचा वापर होत आहे. प्रश्‍न असा आहे की, त्याचा वापर करतो कोण ? आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात ? फेसबूकवरून अनेक मित्र-मैत्रिणी मिळवता येतात. एकमेकांच्या अनुभवांचे आदान-प्रदान करता येते. त्याद्वारे पुरुषांनी नवे मित्र मिळवावेत आणि महिलांनी मैत्रिणी मिळवाव्यात; पण सध्या त्यातून सुविधेपेक्षा समस्याच निर्माण होतांना दिसत आहेत. भ्रमणभाषनंतर (मोबाईलनंतर) आता फेसबूक तरुणांत लोकप्रिय झालेले दिसून येते.

पाश्‍चात्त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण

      आज पाश्‍चात्त्य लढाई न करता, आपल्या विचारांचा पगडा दुसर्‍या देशांवर लादत आहेत. दूरदर्शनच्या माध्यमाद्वारे विकारी आणि विलासी, क्रूरता वाढविणारे, हिंसक अन् अराजकता माजवणारे विचार पसरवत आहेत. दैवी विचारांचा लोप होत आहे. ते दुष्ट लोक स्वतः समृद्ध होण्यासाठी अणूबाँब वगैरे प्रलयकारी शस्त्रे बाळगून, दुसर्‍यांना शांतीच्या नावावर शस्त्रे बाळगण्यापासून परावृत्त करत आहेत. हिडिस नृत्य, बेसूर आणि कामुक गाण्यांचा प्रसार करत आहेत. भौतिक सुखातच रहाण्यात जीवनाला आनंद आहे, याच्या जाहिराती देत आहेत. दारू, मादक पदार्थांचा सर्रास प्रसार करीत आहेत. पक्षांत भांडणे लावण्यासाठी पैशांचे साहाय्य घेत आहेत. - प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ७४)

केरळ भवनातील संतापजनक प्रकार !

राजधानी नवी देहली येथे आपल्या देशाच्या विविध राज्यांची भवन, सदन आहेत. जसे या ठिकाणी त्या राज्याचे लोकप्रतिनिधी, अधिकारी आदी मंडळीची सतत ये-जा चालू असते. जंतरमंतर पटांगणाच्या नजिक दक्षिणेकडील केरळ राज्याचे केरळ भवन चर्चेत आले, ते तेथील पदार्थ सूची अर्थात मेन्यू कार्डमध्ये बीफ फ्राय नावाचा पदार्थ मिळत असल्याचे उघड झाल्यामुळे हिंदु सेनेने पोलीस नियंत्रणकक्षात दूरध्वनी करून या प्रकरणी माहिती दिल्यावर पोलीस लगेचच त्या ठिकाणी गेल्याने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. देहलीचे मुख्यमंत्री केंद्र शासनाच्या कोणत्याही कृतीला विरोध करायचा, याच भूमिकेत नेहमी दिसत असतात. योग्य-अयोग्य यांच्याशी त्यांचा सुतराम संबंध नसल्याचे त्यांच्या उतावळ्या प्रतिक्रियांवरून लक्षात येत असते.

भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील अग्रेसर नेते सरदार वल्लभभाई पटेल !

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त... 
     भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील अग्रेसर नेते सरदार वल्लभभाई पटेल यांची आज ३१.१०.२०१५ या दिवशी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवन-चरित्रातील काही प्रसंग पुढे देत आहोत. 
१. वाटसरूंना ठेच लागू नये; म्हणून पायवाटेवरील दगड 
उखडून काढणारा शालेय विद्यार्थी वल्लभ ! 
     काही विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या गावाहून दुसर्‍या गावी पायी पायी जात होते. थोडे दूर गेल्यानंतर मित्रांनी पाहिले की, एक विद्यार्थी कमी आहे. मागे वळून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, तो विद्यार्थी शेताच्या पाळीवर (बांधावर) बसलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना वाटले की, तो काहीतरी करत आहे. त्यांनी त्या मुलाला हाक मारली, तू काय करत आहेस ? तो मुलगा म्हणाला, थांबा ! मी लगेच येतो. थोड्या वेळाने तो त्यांना येऊन भेटला आणि सहजतेने म्हणाला, वाटेत एक दगड वर आला होता. त्यामुळे अंधारात न जाणे कित्येकांना ठेच लागली असेल ! येता-जाता ठेच लागेल, अडथळा येईल, अशी वस्तू दूर करणेच योग्य असते; म्हणून मी तो दगड बाहेर काढून दूर फेकला. मानवीय संवेदनांनी युक्त हृदयाचा हाच विद्यार्थी पुढे देश आणि संस्कृती यांचा एक महान सेवक बनला !

देशासमोर आदर्श कोण आहे ?

     भारतात हिंदूंचा आदर्श श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत; पण मुसलमानांचा आदर्श बाबर आहे; कारण भारतावर आक्रमण करून त्याने अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर पाडून बाबरी मशिदीचा ढाचा बांधला. मुसलमानांची निष्ठा रामावर नाही, तर बाबरवर आहे; म्हणूनच अयोध्येत अनेक शतके आजपर्यंत लाखो लोक संघर्षात आहेत. आदर्श एक नाही, त्या देशाचे एैक्य कसे रहाणार ? देशात प्रिय व्यक्ती कोण ?
      छत्रपती शिवाजी महाराज देशाचेच नव्हे, तर जगातील आदर्श राजे होऊन गेले. त्यांनी दहशतवाद त्या वेळी संपविला; पण तो मुसलमानांना मान्य नाही; कारण त्यांना अफझलखान कबर प्रिय आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज प्रिय कि अफझलखान प्रिय हे देश ठरवत नाही, तोपर्यंत तो एक कसा रहाणार ? 
- एक स्वातंत्र्यसैनिक (लोकजागर, संपादक व प्रकाशक : प्रवीण कवठेकर, सांगली, पृष्ठ २१-२२)

जिहादी मुसलमानांचे लांगूलचालन करणारे तथाकथित सुधारक आणि पुरोगामी !

     आतंकवादाचे मूळ जागतिकीकरण, सामाजिक विषमता, गरिबी, आर्थिक विषमता, यांमध्ये निश्‍चितच नसून इस्लामची शिकवणच त्याला कारणीभूत आहे. बॉँबस्फोट, अन्य धर्मियांच्या हत्या आणि मानवी हल्ले, या सर्व गोष्टी या मुसलमानांच्या नसानसांमध्ये भिनलेल्या जिहाद या इस्लामच्या धार्मिक शिकवणीचा परिपाक आहेत. संपूर्ण जग इस्लाममय करण्यासाठी सर्व गोष्टींचा अतिरेक करणे, हे जिहादींना अभिमानस्पद वाटते. जिहादींची वैचारिक बैठक आणि त्यांचे वागणे हे सर्व इस्लामी धर्मतत्त्वांनुसार असते. ही वस्तूस्थिती भारतातील डोके नसलेले तथाकथित सुधारक आणि पुरोगामी लोक या सर्व अयोग्य अन् विकृत विचारांपुढे सपशेल शरणागती का पत्कारतात, हेच कळत नाही. 
- विचारवंत डॉ. बाबू सुशीलन (संदर्भ : हिंदु व्हॉईस)

सरदार पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांची चेतावणी गंभीरपणे न घेतल्याचे परिणाम राष्ट्राला भोगावे लागत आहेत, हे लक्षात घ्या !

     स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६५ वर्षे झाली, तरी ते प्रश्‍न अजून कायम आहेत. ५२ वर्षांपूर्वी सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली चेतावणी आम्ही गंभीरपणे घेतली नाही. त्याचे परिणाम राष्ट्राला भोगावे लागत आहेत.
१. देशद्रोही याकूबला फाशी न देण्याविषयीच्या पत्रकावर बहुसंख्य हिंदु लोकांनी सह्या करणे, ही शरमेची आणि दुःखाची गोष्ट ! : याकूबला फाशी देऊ नका; म्हणून पत्रकावर सह्या करणारे बहुसंख्य लोक हिंदू आहेत, ही शरमेची आणि दुःखाची गोष्ट आहे. याकूबऐवजी एखादा हिंदु फाशी गेला असता, तर या तथाकथित विचारवंतांनी (?) आपल्या सह्यांचे पत्रक काढले असते का ? प्रसारमाध्यमांनी एवढा गदारोळ केला असता का ? 

अशांना काँग्रेस आमदारपद देते ! ही आहे काँग्रेसची संस्कृती आणि नीतीमत्ता !

     आसाम राज्यातील काँग्रेसच्या ३६ वर्षीय आमदार श्रीमती रुमी नाथ यांचा जीवनपट अत्यंत वादग्रस्त आहे. वाहनचोर्‍या प्रकरणी प्रमुख सूत्रधार म्हणून गाजलेले अनिल चौहान यांच्याशी त्यांचा संबंध असल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्याआधी त्यांनी त्यांच्या प्रथम पतीला घटस्फोट न देता फेसबूक वरील मित्र जॅकी जाकीर या धर्मांधाशी विवाह केला. तत्पूर्वी मुस्लीम धर्मही स्वीकारला होता.

जे अमेरिकेला कळते, ते भारतीय शासनाला का कळत नाही ?

    अमेरिकेच्या संसदेने आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य (आय.आर्.एफ्.) आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाने पाकिस्तानात होत असलेल्या हिंदु आणि ख्रिस्ती धर्मियांच्या संदर्भातील धार्मिक स्वातंत्र्य उल्लंघनाच्या गंभीर घटना लक्षात घेता पाकिस्तानला काळजी करण्यासारखे देश या सूचीत टाकण्याची शिफारस केली आहे. या आयोगाचे अध्यक्ष रॉबर्ट जॉर्ज यांनी ही माहिती दिली.

भीषण आपत्काळाचे वर्णन करणारी आणि त्यातून तरून जाण्यासाठी भक्ती करायला सांगणारी श्री हालसिद्धनाथांची भाकणूक !

श्री भगवान महाराज डोणे (वाघापुरे) भाकणूक सांगतांना (उजवीकडे)
    कोल्हापूरपासून जवळच बेळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला लागून श्री हालसिद्धनाथांचे एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र आप्पाची वाडी आणि कुर्ली. दिसायला ही गावे दोन असली, तरी त्या दोन्ही गावांना श्री हालसिद्धनाथावरील श्रद्धेने आणि प्रेमाने घट्ट बांधले आहे. श्री क्षेत्र आप्पाची वाडी आणि कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक ! भाकणूक म्हणजे आगामी घडणार्‍या गोष्टी किंवा घटना गेय स्वरूपात श्री भगवान डोणे (वाघापुरे) यांच्या माध्यमातून श्री हालसिद्धनाथ देव सांगतात. आप्पाची वाडी येथील श्री हालसिद्धनाथ मंदिरात ३० ऑक्टोबर या दिवशी पहाटे ४.१५ वाजता श्री भगवान महाराज डोणे (वाघापुरे) यांच्या माध्यमातून भाकणूक सांगण्यात आली. या वेळी आप्पाची वाडी, कुर्ली, रायबाग, चिक्कोडी, निपाणी, संकेश्‍वर, कोल्हापूर यांसह अन्य गावांतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही भाकणूक कशा स्वरूपाची असते, हे सर्वांना कळावे, यासाठी ती येथे प्रसिद्ध करत आहोत.
संकलक : श्री. वीरभद्र विभूते (कुर्ली, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव)
छायाचित्रकार : श्री. सचिन कौलकर, कोल्हापूर.
    काढावं काढावं पोथी पुराण काढावं, वाचून दावावं, सभेत बोलावं. खोटं तू बोलशील सिद्धा खरं मी करीन, सभेला सादर राहीन. पेरलं ते उगवलं शेवटाला लावीन. चालवीन चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन, वंश गा वाढवीन, अगा ये गा बाबा, धरतो हालसिद्धाआप्पा मेघ यान फळा माझ्या आकाशाच्या फळा, अमृताच्या धारा हाय कि गा मेघ उदंड हाय. बांधा आड बांध, शिवा आड शिव.

सनातन संस्थेच्या संदर्भातील अपसमज दूर करण्यासाठी पुणे येथे जाहीर जनसंवाद सभा !

     कॉ. पानसरे हत्या प्रकरणी सनातन संस्थेच्या साधकाला संशयित म्हणून अटक केल्यावर सनातनवर इतके खोटे आरोप होऊनही हिंदुत्ववादी संघटना, संत, विविध संप्रदाय सनातन संस्थेच्या पाठीशी ठाम उभे राहिले; परंतु तरीही या सर्व घटनाक्रमामुळे सनातन संस्थेविषयी समाजमन काही प्रमाणात कलुषित झाले आहे. कथित पुरोगाम्यांकडून सनातनविषयी बेछूट आणि विद्वेषी आरोप करून संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. या खोट्या आरोपांमागील वस्तुस्थिती लोकांना कळावी, त्यांच्या मनातील शंका आणि अपसमज दूर व्हावेत, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने पिंपरी (पुणे) येथे जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे.

साधकांसमोर आज्ञापालनाचा आदर्श निर्माण करणारे आणि सतत भावावस्थेत असलेले पू. कर्वेमामा (वय ७५ वर्षे) !

१. सातत्य पू. कर्वेमामांच्या दिनचर्येला उत्तररात्री ३ वाजल्यापासून आरंभ होतो. ते योगासने करून दैनिक सनातन प्रभात वाचतात. यात एक दिवसही काही पालट झाल्याचे मी पाहिले नाही.
२. कार्यपद्धतीचे पालन करणे आश्रमातील कार्यपद्धतींचे पालन, म्हणजे गुरुदेवांचे आज्ञापालन करणे आहे, या भावाने ते स्वतः त्यांचे पालन करून इतरांना करायला शिकवतात.
३. कोणतीही सेवा असली, तरी ते तल्लीन होऊन उत्साहाने करतात.
४. प्रेमभाव
पू. मामा बाहेरून येणार्‍या व्यक्तींशी अत्यंत प्रेमाने बोलतात. ते साधकांकडून सेवेत झालेल्या चुका प्रेमाने दाखवतात आणि साधकांकडून योग्य कृती होईपर्यंत पाठपुरावा करतात. इतरांकडून सेवा करवून घेतांना परिपूर्ण सेवा व्हावी, असा त्यांचा भाव असतो.
५. साधकांचा विचार करणे
साधकांना स्थानकावर यायला लांब पडते, तसेच त्यांचा वेळ वाचावा आणि गुरुधनाचा अपव्यय होऊ नये; म्हणून घरून येतांना पू. मामा आधीच्या स्थानकावर उतरून बसने आश्रमात येतात.

साधकांनो, दुःखाच्या खाईत नेणार्‍या अहंकाराचा त्याग करून मानवाला देवत्वाकडे घेऊन जाणार्‍या श्रद्धेच्या बळावर प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय पूर्ण करा ! - पू. विनायक कर्वेमामा

पू. विनायक कर्वे
      मंगळुरू येथील गुरुपौर्णिमेच्या कार्यशाळेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा यांनी साधकांना अमूल्य मार्गदर्शन केले. आपल्या साध्या, सोप्या रसाळ वाणीने साधकांवर साधनेचे आणि श्रद्धेचे महत्त्व बिंबवून प.पू. गुरुदेवांची महानताही त्यांनी वर्णन केली. आज आश्‍विन कृष्ण पक्ष पंचमी (३१.१०.२०१५) या दिवशी सनातनचे पू. विनायक कर्वेमामा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी केलेले मार्गदर्शन त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहोत.
पू. विनायक कर्वेमामा यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पूजेसाठी फुले आणि तुळशी काढण्याची, तसेच संगणक दुरुस्तीची सेवा करतांना कु. अजिंक्य वांडरे (वय १६ वर्षे) याला आलेल्या अनुभूती

कु. अजिंक्य वांडरे
रामनाथी आश्रमातील कु. अजिंक्य वांडरे सकाळी लागवड विभागातून पूजेसाठी फुले आणि तुळशी आणण्याची सेवा करतो, तसेच तो संगणक दुरुस्ती विभागातही सेवा करतो. ही सेवा करतांना तो फुले आणि संगणक यांच्याशी बोलतो. त्यामुळे त्याला सेवा करतांना आनंद मिळतो आणि देवाचे साहाय्यही मिळते. याविषयी त्याला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. पूजेसाठी फुले आणि तुळशी काढण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. देवाला विचारून फुले आणि तुळशी तोडल्याने पायांवर गुडघ्यापर्यंत मुंग्या चढलेल्या असूनही एकही मुंगी न चावणे : मी प्रतिदिन पुजेसाठी फुले आणि तुळशी काढून आणण्याची सेवा करतो. आदल्या दिवशी मोठा पाऊस पडला असल्याने लागवड विभाग पूर्ण ओला झाला होता. भूमी पाण्याने भिजल्यामुळे किडे, अळ्या, मुंग्या, साप आणि सरडे यांचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे मी कृष्णाला विचारायचो, फुले काढायला कुठे जाऊ ? दुर्वा आणि तुळशी कुठून काढू ? तेव्हा कृष्ण मला कुठे
जायचे ?, ते सांगत असे. असेच एकदा तुळस तोडतांना माझ्या पायांवर गुडघ्यापर्यंत लाल मुंग्या चढल्या. ते पाहिल्यावर मी शांतपणे बाजूला येऊन चप्पल काढली आणि मुंग्या झटकल्या. तेव्हा देवाच्या कृपेने मला त्यातील एकही मुंगी चावली नाही. खरेतर त्या चावणे साहजिक होते.

श्रीकृष्णाने साधिकेला समृद्ध असलेली स्वर्गभूमी दाखवून भोगभूमी आणि योगभूमी यांतील भेद लक्षात आणून देणे

सौ. उमा रविचंद्रन्
१. आवरणामुळे एकही बालकभावाचे चित्र काढू न शकणे, नवीन 
ठिकाणी एकटेपणा वाटल्याने श्रीकृष्णाला काकुळतीने विनवणे आणि तो 
प्रत्येक क्षणी समवेत असूनही त्याच्या अस्तित्वाची जाणीव 
होत नसल्याचे त्याने लक्षात आणून देणे
     अमेरिकेत आल्यापासून जवळजवळ एक आठवडा मी सर्वांसाठी सांगितलेले उपाय न केल्यामुळे माझ्यावर काळ्या शक्तीचे आवरण आले होते. त्यामुळे मी बालकभावाचे एकही चित्र काढू शकले नाही. मला नवीन ठिकाणी आणून एकटे सोडून दिल्यामुळे मी श्रीकृष्णाला काकुळतीने विनवत होते. त्या वेळी श्रीकृष्ण प्रत्येक क्षणी माझ्यासमवेत असून मलाच त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नसल्याचे त्याने लक्षात आणून दिले.

आयुर्वेदाचे शिक्षण घेत असतांना मोठा आयुर्वेदाचार्य बनण्याचे पाहिलेले स्वप्न साधना करतांनाच पूर्ण करून सनातनमधील एक मोठे आयुर्वेदाचार्य बनलेले वैद्य मेघराज पराडकर !

वैद्य मेघराज पराडकर
वर्ष २००७ - २००८ मध्ये श्री. मेघराज पराडकर आयुर्वेदाचे शिक्षण घेत असतांना अभ्यासासाठी आश्रमात येत असत. आमची ओळख झाल्यावर मी त्यांच्या अभ्यासाविषयी विचारपूस करून मधेमधे त्यांना साधनेतील काही गोष्टी सांगत असे. त्यांच्या मनात येणारे विचार ते मला सांगत असत. काही वेळा शिक्षण आणि साधना या विषयांवर त्यांचा संघर्ष होई. तेव्हा मी त्यांना डॉ. दुर्गेश सामंत यांच्याशी बोलण्यास सांगत असे. एक दिवस ते म्हणाले, मी कर्ज (लोन) काढून शिक्षण घेत असल्याने शिक्षण सोडून साधनाही करू शकत नाही. मला जगातील सर्वांत मोठा आयुर्वेदाचार्य व्हायचे आहे ! सध्या ते आयुर्वेदाचा अभ्यास करण्यासाठी बाहेरील आश्रमांत, चिकित्सालयात जाणे, आयुर्वेदातील तज्ञांना भेटणे, ग्रंथ विभागातील आयुर्वेदीय ग्रंथांचे लिखाण करणे, पडताळणे, लागवड विभागात औषधी वनस्पती लावणे, साधकांना औषधांचा सल्ला देणे आदी सेवा करतात.

निवृत्ती वेतनधारकांनी नोव्हेंबर मासात अधिकोषाला लाईफ सर्टिफिकेट द्यावे !

    ज्या शासकीय अथवा अन्य कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला निवृत्ती वेतन (पेन्शन) देण्यात येते, त्यांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात लाईफ सर्टिफिकेट द्यावे. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन चालू राहू शकते. हे सर्टिफिकेट देण्यासाठी अधिकोषाच्या ज्या शाखेतून खाते उघडले आहे, तेथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या अधिकोषाची शाखा असल्यास तेथे आपल्या आधारकार्डाची मूळ आणि झेरॉक्स प्रत, तसेच पासबूक दाखवून लाईफ सर्टिफिकेट देता येते. (उदा. एखाद्याने निवृत्त वेतनासाठी ठाणे येथील अधिकोषातून खाते उघडले असेल आणि सध्या तो देहलीला वास्तव्याला असेल, तर देहली येथील त्या अधिकोषाच्या शाखेतूनही तो सर्टिफिकेट देऊ शकतो.)
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०१५) 

साधकांना सूचना

निर्गुणाचे जप करतांना करावयाची मुद्रा आणि न्यास
१. २८.१०.२०१५ या दिवशीच्या सनातन प्रभातमध्ये ॐचा नामजप करण्याची सूचना दिली होती. शून्य, महाशून्य, ॐ किंवा निर्गुण हे निर्गुणाचे जप करतांना हाताच्या तळव्याने न्यास करावा किंवा न्यास न करता ध्यान लावतांना करतात त्याप्रमाणे त्या त्या पंजाचा केवळ अंगठा आणि तर्जनी यांची टोके एकमेकांना चिकटवावीत.
२. कुंडलिनीचक्र वा विकारग्रस्त अवयव यांच्या ठिकाणी न्यास करतांना तो शरिरापासून १ - २ सें.मी. अंतरावरून करावा. वयोवृद्ध वा आजारी व्यक्ती यांना न्यास करतांना आधाराची आवश्यकता वाटल्यास त्यांनी शरिराला स्पर्श करून न्यास करावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
अर्जुनाप्रमाणे स्थिती झालेले बहुसंख्य हिंदू
'भगवान श्रीकृष्णाने गीतेत (अध्याय २, श्लोक ११) अर्जुनाला सांगितले, 'अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च  भाषसे ।', म्हणजे 'हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस'. अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तीवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात.' 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.६.२०१४) 

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी रस्त्यावर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम
करीत नाही; कारण आमची माघार नाही; म्हणून मी हरलो.
भावार्थ : मी रस्त्यावर प्रेम करतो म्हणजे साधनेवर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही म्हणजे साधनेत येणार्‍या अडचणी, सिद्धी आदींकडेे दुर्लक्ष करतो. कारण आमची माघार नाही म्हणजे मोक्षाला जाऊन, नामाशी एकरूप झाल्यावर आम्हाला तेथून परत यावयाचे नाही. म्हणून मी हरलो यातील मी म्हणजे मीपणा, अहंभाव हरलो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आधाराची अपेक्षा नको 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना, धारिष्ट्य करून स्वतःच्या पायांवर उभे रहाणे इष्ट ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शासनाचे दायित्व वाढले !

संपादकीय
     गणेशोत्सव झाला. आता येणार दिवाळीचा उत्सव ! गणेशोत्सवाचे दहा दिवस फटाक्यांचा धूमधडाका असतो; दिवाळीचे चार ते पाच दिवस तो असतो. यासंदर्भातील मुख्य सूत्र म्हणजे ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण. फटाके फोडल्यामुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि त्यापासूनचे अपाय, यांविषयी कित्येक वर्षांपासून जनजागृती करण्याचे काम अनेक सेवाभावी संस्था करत आहेत. परिणामस्वरूप फटाके वाजवण्याच्या प्रमाणात घट दिसत असली, तरी ध्वनीप्रदूषणाची भयावहकता दृष्टीआड करून चालणारी नाही. फटाके वाजवण्यात होणारी करमणूक फटाके फोडल्याने होणार्‍या दुष्परिणामांवर मात करते.

कोटी कोटी प्रणाम !

पंत बाळेकुंद्री महाराज यांची 
आज पुण्यतिथी (बेळगाव)

लष्कर-ए-तोयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबू कासिम चकमकीत ठार

आतंकवाद्यांचे उगमस्थान असलेल्या पाकवरच आता थेट आक्रमण 
करून आतंकवादाचे एकदाच समूळ उच्चाटन करण्याला पर्याय नाही !
श्रीनगर - लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या काश्मीर  खोर्यातील कारवायांचा प्रमुख अबू कासिम हा काश्मीरमध्ये भारतीय सैन्यामवेत झालेल्या चकमकीत ठार झाला. २८ ऑक्टोबर या दिवशी काश्मीरमधील खुडपोरा या गावात सुरक्षादलाच्या सैनिकांकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. त्या वेळी झालेल्या चकमकीत रात्री २ वाजता भारतीय सैनिकांच्या गोळीबारात कासिम ठार झाल्याची माहिती सैन्यदलाच्या प्रवक्त्यांनी दिली. या ठिकाणी अजूनही शोधमोहीम चालू असून अबू कासिमचा मृत्यू सैन्यदलाच्या दृष्टीने मोठे यश मानले जात आहे. अबू कासिम हा पाकिस्तानी नागरिक असून तो गेली ६ वर्षे काश्मीर खोर्यातील आतंकवादी कारवायांची सूत्रे हाताळत होता. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार अबू कासिमनेच सप्टेंबर मासात उधमपूर येथे लष्करी बसवर झालेल्या आक्रमणाचा कट आखला होता. या आक्रमणात २ भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता, तर १६ सैनिक घायाळ झाले होते. याशिवाय वर्ष २०१३ मध्ये हैदरपोरा येथे सैनिकांवर करण्यात आलेल्या आक्रमणातही त्याचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वीच कासिमच्या मागावर असतांना आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीर पोलीसदलातील उपनिरीक्षक अल्ताफ अहमद यांचा मृत्यू झाला होता.

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंदिर पाडण्यापासून तहसीलदारांना थांबवले !

 हिंदूंवरील आघातांच्या विरोधात शिवसेनाच सातत्याने आवाज उठवते; 
म्हणून हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो !
संभाजीनगर - वळुंज येथे अतिक्रमण मोहिमेच्या अंतर्गत एक मंदिर पाडण्यासाठी आलेले तहसीलदार रमेश मनुलोड यांना शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी दरडावून थांबवले. याविषयी श्री. खैरे म्हणाले, "येथील महिलांनी प्रत्येकी १०० रुपये जमवून हे मंदिर उभारले आहे. देहलीत एक मशीद १५ वर्षे रस्त्याच्या मध्यभागी आहे. ती पाडायचे धैर्य  पोलिसांमध्ये नाही. हे भ्रष्ट अधिकारी अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी वर्षानुवर्षे जात नाहीत. हे मोदींचे राज्य आहे, मोगलांचे नव्हे. एम्आयडीसी आणि मंदिराचे प्रशासन यांची या संदर्भात चर्चा चालू आहे. ही चर्चा चालू असतांनाच जिल्हाधिकार्यांनी मंदिर पाडण्याचे आदेश कसे काय दिले ? या कारवाईसाठी जिल्हाधिकारी स्वतः न येता त्यांनी तहसीलदारांना का पाठवले ?"

धर्मांधांच्या विरोधामुळे बंगालमधील नलहाटी या गावात ४ वर्षांपासून नवरात्रोत्सव बंद !

कोलकाता - येथील वीरभूमी जिल्ह्यातील नलहाटी गावात वर्ष २०१२ पासून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा करण्यास अनुमती दिली जात नाही. (हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावरील या आघातावर प्रसारमाध्यमे गप्प का ? - संपादक) एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या गावातील धर्मांधांंनी प्रशासनाकडे मागितलेली गोहत्येची अनुमती त्यांना नाकारण्यात आली होती. तेव्हा त्यांनी प्रशासनाकडे हिंदूंनाही नवरात्रोत्सव साजरा करण्याची अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. त्यामुळे गावात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनानेही नवरात्रोत्सवाला अनुमती नाकारली. परिणामी आजपर्यंत तेथे या उत्सवापासून हिंदूंना वंचित ठेवण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक लोकांकडून 'दादरी हत्या आणि गोमांस बंदीवर उघडपणे बोलणार्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता गप्प का ?' असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीजिंग - चीनने प्रत्येक जोडप्याला १ मूल होऊ देण्याच्या धोरणात पालट करत त्यांना आता २ मुले होऊ देण्यास अनुमती दिली आहे. लोकसंख्येचा भस्मासूर रोखण्यासाठी चीनने काही वर्षांपूर्वी एका मुलाचे धोरण अवलंबले होते. 

शास्त्रज्ञ पी.एम्. भार्गव यांच्याकडून पद्मभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा

लेखकांपाठोपाठ आता वैज्ञानिकांनाही जडला पुरस्कार वापसीचा आजार !
     चेन्नई - गेल्या काही दिवसांपासून देशातील असहिष्णू वातावारणाचा निषेध म्हणून लेखक आणि कलाकार यांच्याकडून चालू असणार्‍या पुरस्कार वापसी आंदोलनात आता शास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत. देशातील बुद्धीप्रामाण्यावाद, तर्क आणि विज्ञानाच्या गळचेपीचा निषेध म्हणून शास्त्रज्ञ तथा पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे (सीसीएम्बी) संस्थापक-संचालक पी.एम्. भार्गव यांनी त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार शासनाला परत करण्याची घोषणा केली. (दादरी प्रकरण होऊन आता बराच कालावधी लोटला. आताच्या घडीला देशातील धार्मिक वातावरण कलुषित झाले आहे, असे नाही. असे असतांना भार्गव यांनी दिलेली कारणे तकलादू वाटतात. त्यांच्या या कृतीवरूनच त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे, हे दिसून येते ! - संपादक)

भारतीय उच्चायुक्तांना पाकच्या क्लबमध्ये प्रवेश नाकारला !

  • पाकच्या कलाकारांना भारतात पायघड्या घालणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी याविषयी काही बोलतील का ?
  • पाकचे शेपूट वाकडे ते वाकडेच !
     नवी देहली - पाकमधील एका क्लबने भारताचे उच्चायुक्त टी.सी.ए. राघवन् यांना प्रवेश देण्यास नकार दिला. या क्लबमध्ये होणार्‍या एका कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण मिळालेले असतांनाही राघवन् आणि त्यांच्या कुटुंबाला या क्लबच्या प्रवेशास अधिकार्‍यांनी ऐनवेळेस नकार दर्शवला. या घटनेला देहली आणि कराची येथील सूत्रांनीही दुजोरा दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. महंमद अली जीना यांचा नातू लिकायत मर्चंट सहअध्यक्ष असलेल्या पाकिस्तान-इंडिया सिटिझन्स फ्रेंडशिप फोरमच्या वतीने २६ ऑक्टोबर या दिवशी कराची येथील सिंध क्लबमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी राघवन् यांनाही निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी ते कुटुंबियांसह कराचीतील एका हॉटेलमध्ये उतरले होते. तेव्हा त्यांना या क्लबकडून प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्याचा अधिकृत संदेश प्राप्त झाला; मात्र त्यामागील नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नाही. या प्रकरणाची परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.

खानापूर येथे सापडलेल्या मृतदेहाविषयी गुन्हे अन्वेषण विभाग चौकशी करणार !

मृतदेह रुद्रगौडा पाटील यांचा नसल्याचे नातेवाइकांकडून स्पष्ट
बेळगाव (कर्नाटक) - येथील खानापूरजवळील जंगलात आढळलेल्या मृतदेहाचा तोंडवळा कर्नाटकातील धर्मद्रोही पुरोगामी साहित्यिक डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपीच्या तोंडवळ्याशी मिळताजुळता असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाले. धारवाड पोलिसांनी या मृतदेहाला २६ ऑक्टोबरला दफन केल्याचे पुढे आले आहे. तत्पूर्वी ९ दिवस हा मृतदेह तेथील शवागरात होता. तो कह्यात घेण्यासाठी कोणी पुढे आले नव्हते. हा मृतदेह रुद्र पाटील यांचा असल्याचा संशय असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाले होते; मात्र हा मृतदेह रुद्र पाटील यांचा नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी स्पष्ट केले आहे. दफन केलेला हा मृतदेह पोलिसांनी उकरून काढला असून या मृतदेहाविषयी अधिक चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक येथे दाखल झाले आहे, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाले आहे. 

पोलिसांच्या मारहाणीविरुद्ध रवि कामलिंग यांची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार !

खानापूर येथील हिंसाचाराचे प्रकरण
बेळगाव - खानापूर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या कालावधीत पोलीस उपनिरीक्षक उस्मानगणी अवटी यांनी श्री. रवि सोमेश्वर कामलिंग यांना बेदम मारहाण केली. यात श्री. रवि कामलिंग गंभीररित्या घायाळ झाले. याविरोधात श्री. कामलिंग यांनी देहली येथील राष्ट्र्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून 'पोलीस उपनिरीक्षक उस्मानगणी अवटी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्यांच्याकडून २ लाख ५० सहस्र रुपयांची हानी भरपाई मिळावी', अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानी लेखिकेला भारताने व्हिसा नाकारला; मात्र पाकप्रेमींकडून त्यांच्या पुस्तकाचे स्काईपवरून अनावरण !

     शत्रूराष्ट्र पाककडून प्रतिदिन सीमेवर गोळीबार करून भारतीय सैनिक आणि जनता यांचे बळी घेतले जात आहेत, तसेच भारतीय कलाकारांच्या कार्यक्रमांना पाकमध्ये अनुमती नाकारली जाते; मात्र भारतातील राष्ट्राभिमानशून्य पाकप्रेमींकडून पाकिस्तान्यांचे तुष्टीकरण केले जाते !
    धानाचुली (उत्तराखंड) - पाकिस्तानी लेखिका कान्झा जावेद यांना कुमांव साहित्य महोत्सवात भाग घेण्यासाठी भारताकडून व्हिसा नाकारण्यात आला; मात्र त्यांच्या पुस्तकाचे अनावरण येथून स्काईप या संगणकीय प्रणालीवरून करण्यात आले. साहित्य महोत्सवाचे संचालक सुमंत बत्रा यांनी जावेद यांच्या अ‍ॅशिस, व्हाइन अ‍ॅण्ड डस्ट या पुस्तकाचे अनावरण केले. कान्झा जावेद यांनी स्काईपवरून या सोहळ्यात भाग घेतला. कान्झा जावेद भारतात येऊ न शकल्याने वाईट वाटते; मात्र आम्ही त्यांच्या पुस्तकाचे अनावरण केले, असे बत्रा यांनी सांगितले. (शत्रूराष्ट्र पाकच्या कलाकारांचा पुळका येणार्‍यांनी पाकमध्ये चालते व्हावे, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे ! - संपादक) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तारा प्रकाशच्या आंचल मल्होत्रा यांनी केले.

कर्नाटक शासनाने २५ लक्ष रुपये हानीभरपाई द्यावी ! - बजरंग दल

प्रशांत पुजारी हत्या प्रकरण
     मंगळुरू (कर्नाटक) - येथील अवैध पशूवधगृहे बंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले प्रशांत पुजारी यांची ९ ऑक्टोबर या दिवशी धर्मांधांनी निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पुजारी यांच्या कुटुंबियांना कर्नाटक शासनाने २५ लक्ष रुपये हानीभरपाई द्यावी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या आतंकवादी संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी बजरंग दलाचे विभागीय संयोजक श्री. सूर्यनारायण यांनी एका पत्रकार परिषदेत केली. राज्यशासन हिंदूंना संरक्षण नाकारून दंगली आणि अन्य गुन्ह्यांच्या प्रकरणात धर्मांधांना संरक्षण देत आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

मठाधिपतींच्या विरोधात साक्षीदारांची दबावापोटी खोटी साक्ष ! - रामचंद्रपूर मठाचे पदाधिकारी

श्री राघवेश्‍वर भारती स्वामी यांच्यावरील कथित बलात्काराच्या आरोपाचे प्रकरण
     बेंगळुरू (कर्नाटक) - एका गायिकेवर बलात्कार केल्याच्या कथित आरोपांच्या प्रकरणी रामचंद्रपूर मठाचे मठाधिपती श्री राघवेश्‍वर भारती स्वामी यांच्या विरोधातील साक्षीदारांनी दबावापोटी खोटी साक्ष दिल्याचा दावा मठाच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अनेकांची साक्ष नोंद करून घेतली होती. साक्षीदारांनी त्यांच्या पूर्वीच्या आणि आताच्या साक्षीमध्ये केलेल्या विधानांमध्ये विरोधाभास आहे. यावरून साक्षीदार दबावाखाली साक्ष देत असल्याचे सिद्ध होते, असे रामचंद्रपूर मठाचे समन्वयक श्री. गजानन शर्मा यांनी सांगितले. आमच्या गुरूंच्या विरोधातील आरोप खोटे आहेत. ते एक मोठे षड्यंत्र आहे, असेही श्री. शर्मा यांनी सांगितले.

तेलंगणची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ

उत्तरदायी अधिकार्‍यांना कायमचे निलंबित करा !
     भाग्यनगर (हैद्राबाद) - तेलंगण राज्याच्या महसूल खात्याने तपासणी केली असता शासनाची काही महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे लक्षात आले आहे. तेलंगण राज्याच्या १० जिल्ह्यांतील सुमारे ११ सहस्र ९९० कागदपत्रे गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील सर्वांधिक ३ सहस्र ९९५ कागदपत्रे गहाळ झाली आहेत. करीमनगर २ सहस्र ४५०, निझामाबाद २ सहस्र ३६०, नालगोंडा ९९०, वारंगल ६५०, खम्माम ४००, मेडक ३००, महबूबनगर २५०, भाग्यनगर ११० आणि आदिलाबाद १५ अशी कागदपत्रे गहाळ झाली आहेत. राज्यात मालमत्ता नोंदणी चालू असल्याने गहाळ झालेली सर्व कागदपत्रे सापडणे आवश्यक आहे. कागदपत्रांविना नोंदणी प्रक्रिया पुढे नेणे कठीण होणार आहे, असे महसूल खात्याच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

डॉ. कलाम यांचे निवासस्थान केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना देण्यावरून आपची टीका

     नवी देहली - माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे निवासस्थान पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांना दिल्याने आम आदमी पक्षाने टीका केली आहे.
    डॉ. कलाम यांनी वास्तव्य केलेला राजाजी मार्गावरील बंगला महेश शर्मा यांना रहाण्यासाठी देण्यात आला आहे. राजधानीच्या ल्युटन्स भागातील बंगल्याचे स्मृतीस्थळात रुपांतर न करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. यावर टीका करतांना आपचे मंत्री कपिल मिश्रा म्हणाले, डॉ. कलाम यांचे कार्य केवळ रामेश्‍वरम्पुरतेच मर्यादित ठेवणे, तसेच त्यांचे सर्व साहित्य, पुस्तके आणि अगदी त्यांची वीणाही रामेश्‍वरम्ला पाठवणे हा त्यांचा अवमान आहे. या महान व्यक्तीच्या स्मृती जपण्यासाठी हे निवास्थान ज्ञान केंद्र करायला हवे होते.

हिंदु जनजागृती समितीला पू. पंडित जगदीश जोशी यांचे आशीर्वाद

हिंदु जनजागृती समितीकडून उज्जैन येथील संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची भेट 
     उज्जैन - हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील संत पू. पंडित जगदीश जोशी यांचे त्यांच्या द्वारिका आश्रमात दर्शन घेऊन धर्मकार्यासाठी आशीर्वाद घेतले. या आश्रमाच्या वतीने जिज्ञासूला साधनेचे महत्त्व सांगून त्याच्याकडून साधना करवून घेतली जाते. 
प्रसिद्ध सनदी लेखापाल श्री. नितीन गरूड यांची भेट 
     हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उज्जैन येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल श्री. नितीन गरूड यांची भेट घेतली. या भेटीत श्री. गरूड यांनी पू. डॉ. पिंगळे यांच्याशी साधनेविषयी चर्चा केली. या वेळी त्यांनी कुंभपर्वाच्या वेळी आवश्यक सहकार्य करण्याचे समितीला आश्‍वासन दिले.

हिंदु सेनेचे प्रमुख विष्णु गुप्ता यांना अटक

केरळ भवनमध्ये गोमांस मिळत असल्याच्या तक्रारीचे प्रकरण
     नवी देहली - देहलीतील केरळ हाऊसमध्ये गोमांस मिळत असल्याविषयी दिलेली तक्रार खोटी असल्याचे सांगत हिंदु सेनेेचे प्रमुख श्री. विष्णु गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली. श्री. गुप्ता यांना काल पोलिसांनी कह्यात घेतले होते.
      देहलीचे पोलीस आयुक्त बी.एस्. बस्सी म्हणाले, पोलिसांना दूरध्वनीवर खोटी माहिती देणार्‍या विष्णु गुप्ता यांच्यावर भादंविच्या कलम १८२ (खोटी माहिती देणे) अन्वये कारवाई करण्याचा विचार आहे. शासकीय कर्मचार्‍यांना त्यांचे अधिकार निरपराध व्यक्तींच्या विरोधात वापरण्यास भाग पाडण्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. गुप्ता यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून केरळ अतिथिगृहात गाईचे मांस दिले जात असल्याची माहिती दिली होती; परंतु गुप्ता यांनी दिलेली माहिती खोटी होती.

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणी असदुद्दिन ओवैसी यांना अटक आणि सुटका

स्वत:च कायदा न पाळणारे असे लोकप्रतिनिधी जनतेला कायद्याचे राज्य कधी देतील का ?
पूर्णिया (बिहार) - बिहार राज्यात सध्या चालू असलेल्या निवडणुकांच्या वेळी एम्.आय.एम्. पक्षाचे प्रमुख तथा खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी कुठलीही पूर्वानुमती न घेता, तसेच ध्वनिक्षेपकाचा वापर करून धार्मिकस्थळी सभा घेतली. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याने बैसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. ओवैसी यांनी 'मी धार्मिकस्थळी प्रार्थना करण्यास गेलो होतो', असे कारण पुढे करत सर्व आरोप फेटाळले. ओवैसी यांना पोलीस ठाण्यात १ घंटा बसवून १० सहस्र रुपयांच्या वैयक्तिक 'बॉण्ड'वर सोडून देण्यात आले.

दादर, मुंबई येथील वेदमूर्ती पंकज रामचंद्र जोशी यांचे आकस्मिक निधन !

वेदमूर्ती पंकज जोशी
दादर, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन प्रभातचे वाचक आणि सनातन संस्थेचे हितचिंतक, हिंदु धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक वेदमूर्ती पंकज रामचंद्र जोशी (वय ३८ वर्षे) यांचे २८ ऑक्टोबरच्या रात्री ८.३० वाजता हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर २९ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि काकू आहेत. सनातन परिवार जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

भारत आणि आफ्रिका येथील युवक उद्याचे भविष्य ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत-आफ्रिका परिषद
     नवी देहली - भारत आणि आफ्रिका येथील दोन तृतीयांश जनता ३५ वर्षांहून अल्प वयाची आहे. हेच लोक येणार्‍या काळात देशाला नवी दिशा देणार आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांत तेथील युवक हेच उद्याचे भविष्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे चालू असलेल्या आफ्रिकी देशांच्या परिषदेच्या शेवटच्या दिवशी केले. या संमेलनात आफ्रिकेच्या ५४ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या सर्वाधिक हत्या महाराष्ट्रात !

या हत्या थांबवण्यासाठी आतापर्यंत काय उपाययोजना केल्या गेल्या, हे जनतेला कळले पाहिजे !
माहिती अधिकार खात्याच्या कार्यालयांमध्ये २ लाखांवर माहिती अर्ज प्रलंबित
    नवी देहली - देशातील २३ माहिती अधिकार खात्याची कार्यालये आहेत. त्यांत ख्रिस्ताब्द २०१३ अखेर २ लाखाहून अधिक माहिती मागवलेले अर्ज प्रलंबित आहेत. ही माहिती राग आणि साम्य केंद्र या सेवाभावी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे. वरील परिस्थिती अशीच राहिली, तर मध्यप्रदेश राज्य माहिती आयोगाकडे दाखल केलेले अपील ६० वर्षांनंतर सुनावणीस येईल, तर बंगालमध्ये त्यालाच १७ वर्षे लागतील.

फटाक्यांवरील प्रतिबंध काळात वाढ नाही ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजवण्याचा रात्रीचा प्रतिबंधित काळ वाढवण्यास सर्वोच्च न्यायालायाने नकार दिला. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके वाजवण्यास २००१च्या आदेशानुसार बंदी आहे; मात्र त्यात वाढ करण्यासाठी आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना २८ ऑक्टोबर या दिवशी न्यायालयाने शासनावर ताशेरे ओढले. फटाके घातक असून त्याचे दुष्परिणामही आहेत; मात्र फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यात शासन अपयशी ठरल्याचे सरन्यायाधीश एच. एल्. दत्तू आणि न्या. अरुण मिश्रा म्हणाले.

जागतिक क्रमवारीत भारताच्या मानांकनात सुधारणा

जागतिक बँकेकडून डूईंग बिझनेस २०१६ हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध
     वॉशिंग्टन - भारतात उद्योग चालू करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. ईझ ऑफ डुईंग बिझनेसच्या जागतिक क्रमावारीत भारताच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. तो १२ स्थानांनी वर गेला असून आता १८९ देशांच्या सूचीत भारत १३० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताच्या मानांकनात इतक्या अल्पावधीत झालेली सुधारणा ही अत्यंत कौतुकास्पद कामगिरी आहे, असे मत जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू यांनी व्यक्त केले.

विमानातून २ टन अमली पदार्थ नेल्याच्या प्रकरणी सौदीच्या युवराजाला अटक

     बैरूत - लेबनॉनची राजधानी बैरूतमधील विमानतळावर २ टन अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या तस्करीच्या प्रकरणी सौदीचा युवराज आणि इतर ४ जणांना अटक करण्यात आली आहे. 
    अमली पदार्थांचा एवढा प्रचंड साठा उजेडात येण्याची बैरूतच्या रफिक हरीरी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सौदीचे युवराज अब्देल मोहसेन बिन वालिद बिन अब्दुल अझीज यांच्या खाजगी विमानात हा साठा आढळून आला. युवराज अब्देल मोहसेन याच विमानाने सौदी अरेबियाला जाणार होते. पश्‍चिम आशियातील लढवय्ये नशेसाठी या गोळ्यांचे सेवन करतात. यापूर्वी सौदी राजघराण्याच्या सदस्यांच्या कुकृत्यांमुळे सौदीच्या राजघराण्याचे विविध देशांतील प्रशासनाशी तंटे झाले आहेत.

अंतराळातील एक मोठा तुकडा पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता ! - शास्त्रज्ञांची चेतावणी

     वॉशिंग्टन - अंतराळातील एक मोठा तुकडा १३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी पृथ्वीवर कोसळेल, अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. या मानवनिर्मित तुकड्याचे डब्ल्यूटी ११९० एफ् असे नामकरण करण्यात आले आहे. हा तुकडा पोकळ असून तो रॉकेटचा वापरलेला अवशेष किंवा अलीकडील चांद्र मोहिमेचे पॅनेलिंग शेड असू शकतो. भविष्यात अवकाशातून एखादी विध्वंसक वस्तू पृथ्वीवर आदळणार असेल, तर काय करता येईल ?, याचीही चाचणी म्हणून या घटनेचा शास्त्रज्ञांकडून अभ्यास करण्यात येत आहे. हा तुकडा हिंद महासागरात कोसळण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर हा तुकडा जळणे अपेक्षित आहे; मात्र तसे न झाल्यास त्याचे उर्वरित अवशेष बॉम्बसारखे आदळू शकतात, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

हिंदूंच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! - रमाकांत कोंडुस्कर, जिल्हाध्यक्ष, श्रीराम सेना

सभेत मार्गदर्शन करतांना श्री. रमाकांत कोंडुस्कर
गायकवाडी (निपाणी) येथे हिंदु धर्मजागृती सभा आणि श्रीराम सेना शाखेचा उद्घाटन सोहळा सभारंभ
      निपाणी (जिल्हा बेळगाव), २९ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण होण्यासाठी, हिंदु समाज सुशिक्षित आणि आनंदित रहाण्यासाठी आज हिंदु धर्मजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने प्रत्येक गावागावात धर्मजागृती सभा घेत आहोत. हिंदूंच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही, असे परखड मत श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री. रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केले. गायकवाडी येथे २६ ऑक्टोबर या दिवशी श्रीराम सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम सेनेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आणि हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमास १ सहस्र ५०० जिज्ञासूंची उपस्थिती होती.

साहित्यिकांनी एकच पक्ष किंवा विचारसरणीला 'टार्गेट' करू नये !

भाजपचे गोवा येथील आमदार कवी विष्णु सूर्या वाघ यांचा साहित्यिकांना सल्ला 
     कुडाळ - देशातील असहिष्णूतेचे वातावरण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याच्या भावनेतून महाराष्ट्रासह देशभरातील साहित्यिक आपले पुरस्कार परत करत आहेत; परंतु समाजात ज्या अप्रिय घटना घडतात, त्यावर हे साहित्यिक आवाज का उठवत नाहीत ? कोणाला कोणतीही विचारसरणी प्रिय असू शकते. एकच विचार सगळ्यांना मान्य असेल, असे नाही. साहित्यिकांनी प्रत्येक अन्यायाविरोधात आवाज उठवायलाच हवा; पण त्यांनी एकाच पक्षाला आणि एकाच विचाराला 'टार्गेट' करू नये; मात्र देशहितासाठी प्रत्येकाचे मतस्वातंत्र्य जपलेच पाहिजे, असे मत भाजपचे गोवा येथील आमदार कवी विष्णु सूर्या वाघ यांनी येथे आयोजित कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनात व्यक्त केले. 

सांगली-मिरजेत गॅस दाहिनी उभारणार - स्थायी समिती सभापती

सांगली महापालिकेचा हिंदु धर्मशास्त्रविरोधी निर्णय !
     सांगली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - अंत्यसंस्कारासाठी सांगली-मिरज शहरात गॅस दाहिनी उभारण्यात येणार आहे. शहरात मध्यभागी असणार्‍या स्मशानभूमीत प्रदूषण टाळण्यासाठी, तसेच वनसंपदा वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी पत्रकारांना दिली. (हिंदु धर्मशास्त्रानुसार मृतदेहाचे दहन हे पारंपरिक पद्धतीने मृतदेहाला अग्नी देऊनच होणे अपेक्षित आहे ! महापालिकेला प्रदूषणाची एवढीच काळजी आहे, तर कृष्णा नदीत मिसळणारा शेरीनाला, साखर कारखान्यांचे सांडपाणी, शहरात होणारी वृक्षतोड यांवर महापालिकेने काय केले, ते अगोदर स्पष्ट करावे ! - संपादक)

फेसबूकवरील अपकीर्तीमुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या

या घटनेवरुन स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते !
      मुंबई - फेसबूकवरील खोट्या खात्यावर अपकीर्ती झाल्याने १४ वर्षांच्या एका मुलीने मीरा रोड येथे आत्महत्या केली आहे. तिच्या वर्गात शिकणार्‍या एका मुलाने फेसबूकवर तिची अपकीर्ती करणारा संदेश पाहून ती निराश झाली आणि तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली असून त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.
हा मुलगा अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करायचा. मुलीच्या पालकांनी याची तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी मुलाला समज देऊन सोडले होते; मात्र पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून त्याने तिच्या नावाचे खोटे फेसबूक खाते उघडून त्यावर संदेश टाकले.

राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून उच्च शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण रहित होणे आवश्यक ! - सर्वोच्च न्यायालय

सर्वच गोष्टी जर न्यायालयाला सांगाव्या लागत असतील, तर शासन स्वतः करते काय ?
नवी देहली - राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून उच्च शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण रहित होणे आवश्यक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. या संदर्भात परिणामकारक पावले उचलण्याचे आवाहन केंद्रशासनाला केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे होऊनही अद्याप काही अधिकारांमध्ये पालट करण्यात आलेले नाहीत, अशी खंतही न्यायालयाने व्यक्त केली.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये !

पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्यावरून सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर दोषारोप होत आहेत. याविषयी कोणताही पुरावा नाही, तरीही 'धर्मभावना दुखावल्यावरून चिडून हिंदुत्ववाद्यांनी या विचारवंतांच्या हत्या केल्या आहेत', असे काही पुरोगाम्यांना अजूनही वाटते. 'त्यात तथ्य आहे', असे क्षणभर गृहीत धरले, तरी त्यामागील मूळ कारणेही शोधणे आवश्यक आहे. 'कट्टर हिंदूंना विचारस्वातंत्र्य मान्य नाही, ते धर्मांध आहेत', असे एकतर्फी आरोप करणारे या घटनांचा सर्वांगांनी विचार करत नाहीत. प्रसारमाध्यमेही विचारवंतांच्या कोणत्या विचारांवरून हिंदू भडकले असतील, ते समोर आणत नाहीत. त्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये धर्मश्रद्ध हिंदूंसाठी किती दुखरी असतात, याची उदाहरणे खाली दिली आहेत. या वक्तव्यांचे समर्थन विचारस्वातंत्र्य म्हणून करता येईल का, हे हिंदूंनी ठरवावे.
ज्ञानेश्वरांनी कधी भिंत चालवली नाही, तुकारामाची गाथा आपोआप पाण्यातून वर आली नाही अथवा ते सदेह वैकुंठाला गेले नाहीत. ज्ञानेश्वरांनी खरोखरच भिंत चालविली असती अथवा रेड्याच्या तोंडून वेद म्हणून घेतले असते, तर ज्ञानेश्वंरीमध्ये तसा उल्लेख झाला असता, निदान चमत्कार करण्याचे सामर्थ्य सिद्धपुरुषांच्या अंगी असते, असे म्हटले असते ! - शाम मानव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती  (गोमन्तक, ३०.५. १९९०)                   (क्रमश:)

भारताशी जोडले गेल्याविना जगाशी जोडले जाणे अशक्य ! - मार्क झुकेरबर्ग

     नवी देहली - जगातील प्रत्येक व्यक्तीशी जोडले जाणे, हे आमचे उद्दिष्ट आहे; मात्र भारताशी जोडले गेल्याविना जगाशी जोडले जाणे अशक्य आहे. भारत ही अतिशय मोठी आणि महत्त्वपूर्ण बाजारपेठ असून जगात वेगाने विस्तार करायचा असेल, तर भारतात जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचणेही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी केले. येथील आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी ते बोलत होते. 
     ते पुढे म्हणाले, "भारतात कोट्यवधी लोक इंटरनेट आणि फेसबूक वापरतात; मात्र अनेक लोक अजूनही नेटवर्क, किंमत आणि जागरूकता या तीन गोष्टींमुळे इंटरनेट सुविधेपासून वंचित आहेत. हे तीन अडथळे मोडून काढण्यासाठी आम्ही काम करत आहोत. इंटरनेटप्रती लोकांची जाणीव वाढवण्यासाठी न्यूनतम डेटा वापरणारी 'अ‍ॅप्लिकेशन्स' आणण्यावर आम्ही भर देत आहोत."

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे 'श्री समर्थ मल्ल सम्राट कुस्ती मैदान २०१५' चे आयोजन

     सातारा, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - सातारा तालीम संघ, सातारा यांच्या मान्यतेने, श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड आणि श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र सज्जनगड येथे 'श्री समर्थ मल्ल सम्राट कुस्ती मैदान २०१५' चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समर्थभक्त शहाजीबुवा रामदासी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राजवाडा येथील पत्रकार भवन येथे ही पत्रकार परिषद पार पडली. या वेळी सातारा तालीस संघाचे आणि कार्यक्रमाचे संकल्पक आणि संयोजक पैलवान सुधीर पुंडेकर, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख श्री. सतीशबापू ओतारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कोल्हापुरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील ५० ठिकाणे महिलांसाठी संवेदनशील !

रामराज्यात कोणत्याही वेळी निर्जनस्थळी महिला
एकटी फिरू शकत असे. आताचे राज्यकर्ते हे लक्षात घेतील का ?
      पुणे, २९ ऑक्टोबर - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात महिला आणि मुली यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ५० ठिकाणांची सूची सिद्ध करण्यात आली आहे. त्या ठिकाणी उपाययोजना चालू केली असल्याची माहिती महिला साहाय्य कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली. (विद्या आणि संस्कृती यांचे माहेरघर म्हणवणार्‍या पुण्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी हे करावे लागणे, लज्जास्पद नव्हे का ? - संपादक)
     पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षा समितीने सारसबाग, लक्ष्मी रस्ता, कर्वे रस्ता, आपटे रस्ता अशा विविध ५० ठिकाणांची सूची केली आहे.

नागपूर येथे गुंडांकडून दुकानदारावर तलवारीने आक्रमण

      नागपूर - येथील तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक्स बाजारात पेन ड्राइव्ह नादुरुस्त निघाल्याने ६ जणांनी थेट दुकानदारावर तलवारीने आक्रमण केले. ही संपूर्ण घटना क्लोज्ड सर्किट कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आहे. या वेळी गुंडांनी दुकानातील अन्य वस्तूंचीही तोडफोड केली. या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (राज्यातील वाढते अराजक रोखण्यासाठी शासन कोणते प्रयत्न करणार आहे ? - संपादक)

कसुरींना दिलेली सुरक्षा म्हणजे त्यांची मते मान्य असणे नव्हे ! - मुख्यमंत्री

     मुंबई - कसुरींना दिलेली सुरक्षा म्हणजे त्यांची मते मान्य असणे नव्हे. राजधर्माचे पालन करण्यासाठी आम्ही सुरक्षा दिली. अजूनही गझलसम्राट गुलाम अली यांनी मुंबईत कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात येईल, याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पोलिसांनी सुरळीत पार पाडून दाखवला, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

निर्धारणा आदेश पारित केल्याशिवाय स्थानिक संस्था कराची वसुली करता येणार नाही ! - उच्च न्यायालय

      सांगली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील नियम ३३ नुसार निर्धारणा आदेश पारित केल्याशिवाय व्यापार्‍यांकडून स्थानिक संस्था कर वसूल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने मे. हरिओम डेपो या खटल्यात दिला आहे. हा निकाल उल्हासनगर महापालिकेच्या विरोधात दिला आहे. संबंधित व्यापार्‍याने विवरणपत्रे दाखल केल्यानंतर परताव्याकरिता आवेदन सादर केल्यावर आयुक्तांनी परतावा न देता व्यापार्‍याकडेच वसुलीची नोटीस काढली. यावर उच्च न्यायालयाने व्यापार्‍यांच्या बाजूने निकाल देत राज्यातील व्यापार्‍यांना दिलासा दिला आहे, अशी माहिती सांगली येथील कर सल्लागार श्री. किशोर लुल्ला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.

नागपूर आतंकवादविरोधी पथकाकडून आयएस्आयएस्शी संबंधित तरुणाची चौकशी

भारताभोवतीचा आयएस्आयएस्चा वाढता विळखा वेळीच
दूर करण्यासाठी शासन तत्परतेने कठोर पावले उचलेल, ही अपेक्षा !
      नागपूर - आयएस्आयएस् या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून येथील आतंकवादविरोधी पथक मध्यप्रदेशात रायपूर येथील तरुणाची कसून चौकशी करत असल्याचे कळते. नागपुरातील काही युवकही त्या संघटनेच्या संपर्कात होते. त्यामुळे पोलीस अन्वेषण करत आहेत.
       सप्टेंबर २०१५ मध्ये यवतमाळमधील पुसद येथे काही तरुणांनी तीन पोलिसांवर चाकूने आक्रमण केले होते. अन्वेषण करतांना रायपूर येथील एका तरुणाने सामाजिक संकेतस्थळावर चिथावणीखोर पोस्ट टाकल्याचे आतंकवादविरोधी पथकाला आढळले. त्याला कह्यात घेतल्यावर त्याचे आयएस्आयएस्शी संबंध असल्याचे समजले.

नागपुरात प्लास्टीक थाळ्या, ग्लास आणि पिशव्या यांवर बंदी

       नागपूर - येथे प्लास्टीक पिशव्या, थाळ्या, ग्लास आणि कप यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून, ५० मायक्रॉन अथवा त्याहून अधिक जाडीच्या प्लास्टीक पिशवीसाठी ग्राहकांना १० रुपये मोजावे लागतील. याविषयीची अधिसूचना महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केली आहे. महिनाभरानंतर या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. (अन्य महापालिका नागपूर महापालिकेप्रमाणे असा निर्णय घेणार का ? - संपादक)
     या अधिसूचनेनुसार प्रत्येक व्यावसायिक आणि विक्रेते यांना कोणतेही साहित्य, वस्तू भाजीपाला, अन्नधान्य आदी ग्राहकांना प्लास्टीकच्या पिशवीतून देता येणार नाही. ग्राहकाला ५० मायक्रॉन अथवा त्याहून अधिक जाडीच्या पिशवीचे देयक आणि पावती देणे बंधनकारक आहे.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn