'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल


‘आदर्श' इमारतीचा घोटाळा
‘आदर्श’ इमारतीतील सदनिकेची माहिती लपवली !
    मुंबई/अमरावती - राज्यात २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रामध्ये कुलाबा येथील वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्थेत सदनिका असल्याची माहिती  लपवल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्या यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाईल, असे गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी आज म्हटले सांगितले.

पाकच्या बलुचिस्तानमधून हिंदूंना निर्वासित करण्याचे षड्यंत्र ! - पाकचे अल्पसंख्यांक मंत्री बसंतलाल गुलशन

अमेरिकेसह भारतातील निधर्मीवादी गुजरातमधील दंगलीचे वारंवार भांडवल करत आहेत; मात्र त्यांना पाकमध्ये सातत्याने मरणारे हिंदू दिसत नाहीत का ?
    इस्लामाबाद - पाकच्या बलुचिस्तान प्रांतातून गेल्या चार वर्षांमध्ये ५० पेक्षा अधिक हिंदूंचे अपहरण करण्यात आले आहे. हिंदूंनी या प्रांतातून स्थलांतर करावे, यासाठीच अपहरणांच्या मालिकेतून दबाव आणला जात आहे. त्याद्वारे येथील हिंदूंना निर्वासित करण्याचे षड्यंत्र आखण्यात आले आहे, असा आरोप पाकिस्तानचे मानवाधिकार आणि अल्पसंख्यांक मंत्री (बलुचिस्तान) बसंतलाल गुलशन यांनी केला आहे.

देवद येथील सनातन आश्रमावर धाड पडल्याची माहिती खोटी ! - सनातन संस्था

     नगर जिल्ह्यातील सनातनच्या एका हितचिंतकांना ‘देवद येथील सनातन आश्रमावर धाड पडली आहे’, अशी माहिती भ्रमणभाषवरून अन्य व्यक्तीकडून देण्यात आली. कदाचित ही पूर्वसूचनाही असू शकेल; मात्र देवद आश्रमावर कोणतीही धाड पडली नसून तशी कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही, असे सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी आधी अनुमती देऊन नंतर ग्रंथप्रदर्शन उद्दामपणाने काढण्यास भाग पाडले

कर्नाटकातील ‘हिंदु जागरण वेदिके’च्या अधिवक्त्यांसाठीच्या कर्नाटक राज्यस्तरीय संमेलनात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला विरोध
‘हिंदु जागरण वेदिके’च्या मृत्यूंजय यांनी हिंदु धर्म, देवता आणि राष्ट्र यांच्याशी संबंधित ग्रंथ फेकले
    दावणगेरे (कर्नाटक) - येथील शिवशंकरप्पा चौकात ‘हिंदु जागरण वेदिके’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून हिंदुत्ववादी अधिवक्त्यांसाठी राज्यस्तरीय संमेलन ४ मार्च या दिवशी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनास सरसंघचालक मोहन भागवत, संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेशकुमार, जनता पक्षाचे अध्यक्ष आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील एक प्रमुख नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी उपस्थित राहिले होते.

वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांना फसवून सनातनमध्ये आणल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयात खोटा ठरला ! - सनातन संस्था

डावीकडून अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. राजन बुणगे, 
वैद्या (कु.) अपर्णा महांगडे आणि श्री. अजित महांगडे सनातन संस्थेची पत्रकार परिषद
सनातनवर बिनबुडाचे आरोप करून नाहक अपकीर्ती करणार्‍या सनातनद्वेष्ट्यांना चपराक !
    मुंबई, ५ मार्च (वार्ता.) - सातारा येथील सनातन संस्थेच्या साधिका वैद्या (कु.) अपर्णा महांगडे (वय २३ वर्षे) या सज्ञान असल्याने त्या त्यांच्या इच्छेप्रमाणे सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करू शकतात आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे सनातनच्या कोणत्याही आश्रमात त्या राहू शकतात, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपिठाने नुकताच दिला आहे.

‘भारतात मृतवत् किंवा स्थितप्रज्ञ असावे लागते, नाहीतर सध्याच्या आणि येणार्‍या भीषण परिस्थितीत जगणे अशक्य होईल !’- डॉ. आठवले (१.९.२००७, रात्री ९.१५)


स्वधर्म व स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म व स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय पण भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे !

 

कर्नाटक विधानसभेत तीन नव्हे, १६ आमदार पहात होते अश्लील चित्रफीत !

लोकशाहीला निरर्थक ठरवणारे सर्वपक्षीय आमदार !
    बेंगळुरू - कर्नाटक विधानसभेत भ्रमणध्वनीवर अश्लील चित्रफीत तीन नव्हे, तर १६ आमदार पहात होते, असा दावा या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या समितीचे सदस्य नेहरू ओळेकर यांनी केला आहे. यात भाजप, काँग्रेस आणि जनता दल (स) यांचा समावेश आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ८ मार्चला आरोपी आमदार समितीसमोर चौकशीसाठी उपस्थित रहाणार आहेत. २० मार्चला समिती तिचा चौकशी अहवाल सादर करेल.

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रबोधन चळवळ आणि व्यापक प्रसार

     दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीचे व्रत शास्त्रानुसार करण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी, तसेच लहान मुलांवर धर्माचरणाचे संस्कार रुजावेत या उद्देशाने ही जनजागृती चळवळ राबवण्यात आली.

काँग्रेसने निवडणुकीत झालेला खर्च घोषित करावा - श्री. अण्णा हजारे

    इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली) - देशात झालेल्यार ५ राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या प्रचाराचा खर्च तिने तिच्या संकेतस्थळावर घोषित करावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी श्री. अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.  निवडणुकीसाठी वापरलेला पैसा हा सामान्य नागरिकांचा असून, त्याची माहिती नागरिकांना देणे आवश्यक आहे, असे अण्णा यांनी म्हटले आहे.

राजस्थानमध्ये वायूदलाचे ‘मिराज' विमान कोसळले

संपतकालात लढाऊ विमानांच्या अपघातात विक्रम करणारे भारतीय वायूदल !
    जयपूर - राजस्थानच्या सवाई माधोपूर भागात आज दुपारी वायूदलाचे मिराज-२००० हे लढाऊ विमान कोसळले. या विमानाचा वैमानिक मात्र सुरक्षितरित्या बचावला आहे. ग्वाल्हेर येथून उडालेले हे विमान बामनवास जवळील पर्वतांमध्ये कोसळले. गेल्या दहा दिवसांत मिराज-२००० विमानाला झालेली ही दुसरी दुर्घटना आहे. या अपघातातूनही दोन वैमानिकांना त्यांचा जीव वाचवण्यात यश आले होते.

तिरुपती देवस्थानच्या प्रसादात गुटख्याचे पाकीट !

काँग्रेस शासनाने केलेल्या मंदिर सरकारीकरणाचा परिणाम !
हिंदूंनो, असे वृत्त कधी चर्च अथवा मशिदी यांच्या संदर्भात येत नाही, हे लक्षात घ्या !
    तिरुमला - तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार्‍या लाडूमध्ये गुटख्याचे पाकीट सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या प्रसाद विक्री भांडारात ही घटना घडली. प्रसिद्धीमाध्यमांनी सदर घटना देवस्थानच्या नजरेस आणून दिली; परंतु देवस्थानच्या अधिकार्‍यांनी अशा प्रकाराची कोणतीही तक्रार त्यांच्याकडे आली नसल्याचे सांगत हात झटकले आहेत.

भारतीय शाळांमध्ये शिक्षकांकडून ८० टक्के विद्यार्थ्यांचा होतो अपमान ! - सर्वेक्षणाचा अहवाल

    इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली) - भारतात शाळेत शिकणार्‍या ८० टक्के विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक अपमानित करतात. असे ‘नॅशनल चाइल्ड राईट्स' या संस्थेने २००९-१० या शैक्षणिक वर्षात केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्याचबरोबर, ‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स’ या संस्थेकडून लवकरच एक सर्वेक्षण प्रकाशित केले जाणार आहे. त्यानुसार, काही ठिकाणी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून इलेक्ट्रीक शॉक्स देण्याचे प्रकारही घडत असल्याचे समोर आले आहे. हे सर्वेक्षण लवकरच प्रकाशित केले जाणार आहे.

झारखंडमध्ये पोलीस चकमकीत दोन माओवादी ठार

नक्षलग्रस्त भारत !
    चतरा (झारखंड) - आज पहाटे पोलिसांबराबेर झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले, तर एक पोलीस शिपाई घायाळ झाला. यानंतर पोलिसांनी येथे माओवाद्यांच्या विरोधात शोध मोहीच चालू केली आहे.

कापसाच्या निर्यातीवर बंदी

    इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली) - केंद्रशासनाने देशात अधिकाधिक कापसाचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने आज कापसाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पुढील आदेश मिळेपर्यंत ही बंदी चालू रहाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर भारताला भूकंपाचा धक्का

    इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली), ५ मार्च - उत्तर भारतातील इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली), पंजाब, हरियाणा इत्यादी भागात आज दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी १० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यात कोणतीही जीवित अथा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील बहादूरगढ येथे असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंद्रप्रस्थमध्ये १० ते १५ सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले होते.

विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास होणारा विरोध सनदशीर मार्गाने मोडला

हडपसर येथील नूतन विद्यालयातील धार्मिक गळचेपी हिंदु राष्ट्र सेनेने रोखली
पुणे, ५ मार्च - हडपसर येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना टिळा लावून शाळेत येण्यास होणारा विरोध हिंदु राष्ट्र सेनेने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची चेतावणी देऊन मोडून काढला.

(अंध)श्रद्धा निर्मूलन विधेयकातील धर्माला घातक असणार्‍या कलमांना नक्कीच विरोध करणार ! - काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे आश्वासन

आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
      पनवेल, ५ मार्च (वार्ता.) -  हिंदु धर्मावर आघात करणारे आणि घटनाविरोधी (अंध)श्रद्धा निर्मूलन विधेयक रहित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती, हिंदु संप्रदाय आणि संघटना यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

शासनाचा भूखंड लाटणार्‍या ‘आकृती’ बांधकाम व्यावसायिकाची महसूलमंत्र्यांकडून पाठराखण

फौजदारी कारवाई करण्याची मागणी
    मुंबई, ५ मार्च (वार्ता.) - माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना त्यांच्या विनंतीवरून वांद्रे येथे देण्यात आलेला २० सहस्र चौ.फू. भूखंड ‘आकृती’ या खाजगी बांधकाम व्यवसायिकाने ‘कल्चरल क्रिकेट अ‍ॅकेडमी’ या संस्थेच्या नावाने लाटला. तो भूखंड शासनाने परत कह्यात घ्यावा, असे जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांचा आदेश असूनही नऊ महिने ही धारिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पटलावर कारवाईविना पडून आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होळीतील अपप्रकारांवर बंदी आणून धर्मशास्त्रानुसार आदर्श होळी साजरी करण्याबाबत निवेदन


पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार गुप्ता यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
    अमरावती, ५ मार्च (वार्ता.) - होळी आणि धुलीवंदन हे सण शास्त्रानुसार साजरे करणे समाज विसरला आहे. या सणांच्या दिवशी होणार्‍या अपप्रकारांमध्ये दिवसेदिवस वाढ होत आहे. हे अपप्रकार धर्म, संस्कृती आणि समाज यांना हानिकारक आहेत. अशा अपप्रकारांवर बंदी घालून धर्मशास्त्रानुसार आदर्श होळी साजरी करण्यासाठी जनतेचे प्रबोधन करावे, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना नुकतेच देण्यात आले.

जगातील प्रमुख १०० विद्यापिठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही !

काँग्रेस राज्यकर्त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा परिणाम !
    कोझीकोड (केरळ) - जगातील पहिल्या १०० विद्यापिठांच्या सूचीमध्ये भारतातील एकाही विद्यापिठाचा समावेश नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी काल दिली.

भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावल्याच्या प्रकरणी माजी नगरसेवक अरविंद बने यांच्याविरोधात तक्रार !

    मुंबई, ४ मार्च (वार्ता.) - नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून ताडदेव येथील भाजपचे निलंबित माजी नगरसेवक अरविंद बने यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याची भाजपने तक्रार केली आहे. अरविंद बने हे ‘बघून घेतो’, असे बोलून कार्यकर्त्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफ.आय.आर्.) दाखल करण्यात आल्याची माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली आहे.

स्फूर्तीयात्रा धाकाची असू द्या !

  या वर्षी वर्षप्रतिपदा २३ मार्चला आहे आणि त्या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे पुण्यात, ठाण्यात, गिरगावात, डोंबिवली आणि कल्याणात, तसेच विले पार्ल्यात पहाटे स्फूर्तीयात्रा निघतील. दहा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा स्तुत्य उपक्रम हिंदू मानसिकता परिवर्तनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे. हिंदू म्हणून रस्त्यावर उतरण्यास सुशिक्षित तरुणास जी लाज वाटत होती, ती जवळजवळ नाहीशी झाली आहे.

‘हिंदु तेजा जाग रे’ !

आजचा हिंदुजागृती लघुसंदेश मूळ रोमन मराठी अन् मराठी अनुवादासह !

JAGO!
Spain madhe rahanarya Imran Firasat ya Pakistani
Muslimane Quran var bandichi magni keli.
Atankache te mool ahe ase tyane mhatle.
- Ata Secular jage hotil ?
जागो !
स्पेनमध्ये रहाणार्‍या इम्रान फिरासत या पाकिस्तानी मुसलमानाने कुराणवर बंदीची मागणी केली. आतंकाचे ते मूळ आहे असे त्याने म्हटले.
- आता सेक्युलर जागे होतील ?

समर्थ रामदासस्वामी आणि शिष्या वेणास्वामी यांच्या पादुका दर्शनासाठी ठाण्यात !

ठाणे - श्री वेणाबाई मठ, मीरज, मठाधिपती श्री कौस्तुभबुवा रामदासी हे समर्थ रामदासस्वामींच्या मूळ पादुका आणि समर्थांच्या शिष्या श्री वेणास्वामी यांच्या पादुका घेऊन ठाणे शहरात आले आहेत. मठाचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने निधी संकलनासाठी या पादुकांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. हा मठ मीरज येथे १६५५ मध्ये बांधलेला असून दैनंदिन पूजेसाठी समर्थ रामदासस्वामी यांनी तो श्री वेणास्वामी यांना दिला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
हिंदूंनो, होलिकोत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा करा !
    हिंदूंनो, काही धर्मद्रोही ‘कचर्‍याची आणि वाईट विचारांची होळी करा’, ‘होळीची पोळी दान करा’, असे आवाहन करतात. त्यांच्या या आवाहनाला बळी न पडता धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होळीचा सण साजरा करून आध्यात्मिक लाभ करून घ्या !

हिंदूंना फसवून त्यांचे धर्मांतर करणारे लबाड खिस्ती

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवण्याचे कुकृत्य खिस्ती नेहमीच करत असतात. बेंगळुरूमध्ये तर एका हिंदूंच्या दृष्टीदोषाचा गैरफायदा घेऊन त्याचे खिस्ती धर्मात धर्मांतर केले आणि त्याला पाद्री बनवून त्याच्याकडून ५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर केले; मात्र हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याने त्या धर्मांतरित हिंदूचे प्रबोधन केल्यानंतर त्याने पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. हिंदु धर्मावर भयंकर आघात करणार्‍या खिस्त्यांची आणखी काही कारस्थाने जाणून घेऊया.

प.पू. डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न दिल्याने कु. महानंदा यांना वाटलेली खंत आणि त्यांचे झालेले चिंतन

कु. महानंदा पाटील
१. शीव सेवाकेंद्रात ‘‘सपाता (स्लिपर्स) कशाने धुतल्यास’’, हे प.पू. डॉक्टरांनी विचारल्यावर ‘ते इतर साधकांना कळल्यास स्वतःला ही सेवा मिळणार नाही’, असे वाटून त्याचे उत्तर न देणे आणि नंतर त्याची खंत वाटणे
    ‘एक दिवस शीव सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टर शौचालयासाठी वापरत असलेल्या सपाता (स्लिपर्स) मी स्वच्छ धुतल्या. नंतर ‘त्या पुसून ठेवाव्यात’, असा माझ्या मनात विचार आल्याने मी बाजूच्या खोलीत गेले आणि माझ्या ओढणीने त्या पुसू लागले. तेव्हा मला त्या सपातांमध्ये पुष्कळ चैतन्य जाणवले.

मिरज आणि देवद आश्रमांतील चैतन्यामुळे ताप उणावणे

१. चाकरी करून आश्रमात सेवा करत असूनही कधी दुखणाईत नसणे आणि घरी गेल्यावर कसलीही धावपळ नसूनही चार दिवस तापाने दुखणाईत होऊन आधुनिक वैद्यांनी ‘रुग्णालयात प्रविष्ट करावे लागेल’, असे सांगणे : ‘मार्गशीर्ष शुद्ध दशमी, कलियुग वर्ष ५११३ (४.१२.२०११) या दिवशी मी कार्यालयातून चार दिवसांची सुटी घेऊन माझ्या घरी मिरजेला गेलो होतो. तेथे गेल्यावर मला सलग ३ - ४ दिवस ताप येत होता.

६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्रीमती कला प्रभुदेसाई यांना साधकांवर उपाय करतांना आलेल्या अनुभूती

श्रीमती कला प्रभुदेसाई
१. श्रीकृष्णाचे आज्ञाचक्र आणि चरण यांतून प्रकाश येतांना दिसणे : ‘माघ शुद्ध नवमी कलियुग वर्ष ५११३ (१.२.२०१२) या दिवशी सौ. उल्का प्रभुदेसाई यांच्याकडे उपायांना गेले असतांना मला त्यांच्या घरात भिंतीवर लावलेल्या श्रीकृष्णाच्या चित्रातील श्रीकृष्णाचे आज्ञाचक्र आणि चरण यांतून प्रकाश येतांना दिसला.

साधकांना सूचना : ‘सनातन पंचाग २०१२’ची सेवा करतांना आलेल्या अडचणी पाठवा !


सर्व जिल्ह्यांमध्ये पंचाग २०१२ ची सेवा पूर्ण झालेली आहे. ही सेवा करतांना जिल्हासेवक उत्तरदायी साधक यांना आलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाय आदी महिती slpanvel@gmail.comया  इ-मेल पत्यावर १० मार्चपर्यंत पाठवावी. ही माहिती ‘सनातन कार्यपद्धत ठरवण्यासाठी उपयोगी ठरेल.

देवतांना फुले वहाण्यामागील अध्यात्मशास्त्र

देवाला फुले वहातांना ती सुंदर पद्धतीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीने वाहिल्यास त्याचा लाभ होतो. या दृष्टीने अध्यात्मशास्त्रदृष्ट्या फुले कशी वहावीत याविषयी येथे समजून घेवूया.
१. देवाला योग्य ते फूल वहाणे, हे अध्यात्मशास्त्राला धरून असल्याने फुलांची अशी रचना ईश्वरेच्छेने स्पंदने प्रक्षेपित करणारी ठरणे आणि त्यामुळे तिचा कमाल स्तरावर चैतन्याच्या दृष्टीने समष्टीला लाभ होण्यास साहाय्य मिळणे अन् अशी फुले सुंदर पद्धतीने वाहिली, तर लाभाचे प्रमाण आणखी वाढणे.

‘जाणूनी श्रीगुरूंचे मन’, अशा भावाने ६८ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला कु. सौरभ जोशी याची सेवा करणारी त्याची आई सौ. प्राजक्ता जोशी !

     ‘फाल्गुन शु. अष्टमी, कलियुग वर्ष ५११३ (१.३.२०१२) या दिवशी मी ६८ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या
कु. सौरभला भेटण्यासाठी त्याच्या खोलीत गेले होते. (कु. सौरभ जोशी सध्या रामनाथी आश्रमात आहे. - संकलक) तेव्हा त्याची आई म्हणजेच सौ. प्राजक्ता जोशीकाकू यांच्याशी माझी भेट झाली. कु. सौरभच्या लेखांचे संकलन करण्याच्या निमित्तानेही माझे त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे होत होते. त्या कालावधीत सौ. प्राजक्ता जोशीकाकू यांच्या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर द्या !

       ‘गुजरात शासनाने जनतेला धार्मिक स्वातंत्र्य द्यावे’, असा प्रस्ताव भारतातील कुठल्या तरी विधानसभेत नव्हे, तर अमेरिकेच्या संसदेत मांडला गेला आहे. गुजरात आणि गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर कुठेही आरोप-प्रत्यारोप झाल्यावर काँग्रेस शासनाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. अमेरिकी संसदेत हा प्रस्ताव ठेवून भारताचे नव्हे, तर श्री. मोदी यांचे नाक कापले गेले, असे काँग्रेसला वाटत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi