'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

सैन्याच्या जोरावर भारत काश्मीरला कह्यात ठेवू शकणार नाही ! - इम्रान खान

कुठे जगभर राज्य करणारे ब्रिटीश, 
तर कुठे भारताचा एक भाग असलेला 
काश्मीरही  कह्यात ठेवू न शकणारे
 काँग्रेसचे नेभळट राज्यकर्ते !

लाहोर, ३१ ऑक्टोबर - काश्मीरमधून भारताने त्याचे सैन्य मागे घ्यायला हवे. भारताचे सैन्य अमेरिकेच्या सैन्यापेक्षा शक्तीशाली निश्चितच नाही. जर अमेरिकेचे अफगाणिस्तानमध्ये काहीच चालले नाही, तर भारताचे सात लाख सैनिक काश्मीर कह्यात ठेवू शकतील का, अशी धमकी पाकमधील लाहोर शहरात झालेल्या एका सार्वजनिक सभेत इम्रान खानने भारतीय राज्यकर्त्यांना दिली आहे. 

(मुसलमानप्रेमाने अंध झालेल्या नेभळट  भारतीय राज्यकर्त्यांमुळे कोणीही उठतो आणि भारताला धमकी देतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दुसर्‍या आणीबाणीशी लढण्यास सिद्ध व्हा !

काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनतेने लढा दिला व इंदिरा गांधींना आणीबाणी रद्द करावी लागली. त्याप्रमाणे काँग्रेस सरकार सनातनवर बंदी घालणार आहे. तिच्याविरुद्ध ती रद्द होईपर्यंत सनदशीर मार्गाने लढण्यास सिद्ध व्हा !
‘श्रीराम, शालिवाहन, विक्रमादित्य, हरिहर आणि बुक्क, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांच्यासारखा एकतरी राज्यकर्ता लोकराज्याने (लोकशाहीने) दिला आहे का ?’ - प.पू. डॉ. आठवले (भाद्रपद कृ. ९, कलियुग वर्ष ५११० (२३.९.२००८))

प्रस्तावित धार्मिक दंगली प्रतिबंधक विधेयक हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी संमत करण्याचा शासनाचा कुटील डाव ! - अधिवक्ता धर्मेंद्र खांडरे

    सांगली, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - प्रस्ताविक धार्मिक दंगली प्रतिबंधक विधेयक संसदेत पहिल्याच दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबरला मांडून ते संमत करण्याचा केंद्रशासनाचा कुटील डाव आहे. त्यासाठी त्या दिवशी देशभर एकाच वेळी धरणे, निवेदन, तसेच अन्य पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिवक्ता परिषदेचे सरचिटणीस अधिवक्ता धर्मेंद्र खांडरे यांनी दिली. ते अधिवक्ता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे रविवारी सायंकाळी पार पडला.

अण्णा हजारे ४ दिवसांत मौनव्रत सोडणार !

राळेगणसिद्धी, ३१ ऑक्टोबर - ज्या अर्थी कोट्यवधी जनता वाचक झाली आहे, त्या अर्थी अधिक मौन न बाळगता त्यांच्याशी चर्चा करणे मला अधिक महत्त्वाचे वाटते.

भारतीय संस्कृतीच्या विरोधात असलेल्या उत्सवांचा विचार करणारे राष्ट्रद्रोही काँग्रेसच्या गोवा राज्यातील पर्यटन खाते !

‘स्पेनमध्ये टोमॅटो एकमेकांवर फेकून मारण्याचा ‘टोमॅटिनो फेस्टिव्हल’, हा आसुरी प्रकार पर्यटन वाढवण्याच्या नावाखाली गोव्यात आणण्याचा काँग्रेस शासनाचा प्रयत्न आहे. त्याला तीव्र विरोधही होत आहे. या कार्यक्रमाविषयी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे दीपक नार्वेकर यांनी सांगितले आहे की, सध्या हा कार्यक्रम करायचा कि नाही याविषयी चर्चा चालू आहे. गोवा पर्यटन खात्याने अद्याप निर्णय घेतलेला नाही.’
हिंदूंनो, एवढा छोटासा निर्णयही घेता न येणारे त्या पदावर काम करायला लायक आहेत का ?

जगाला भारताच्या आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर नव्हे, तर रम (दारू), रमा, रमी आणि टोमॅटो फेकून मारणे यांसारख्या आसुरी गोष्टींच्या माध्यमातून आकर्षित करू पहाणारे गोव्यातील काँग्रेसच्या राज्यातील पर्यटन खाते !

भारताची ‘जगाचा आध्यात्मिक गुरु’, ही प्रतिमा जगभर ठेवली असती, तर भारतात येणार्‍यांचा ओघ अनेकपटींनी वाढला असता. त्यासाठी जाहिराती, परिसंवाद इत्यादींचा वापर करावा लागला नसता. छोट्याशा सनातन संस्थेने केलेल्या अध्यात्मप्रसारामुळे विदेशातील अनेक नागरिक अध्यात्म शिकायला भारतात येतात. अध्यात्मप्रसार पद्धतशीरपणे केला, तर भारतात लाखो विदेशी नागरिक येतील.

श्री श्री रविशंकर भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन चालू करणार !

हिंदूंनो, काँग्रेससारखे भ्रष्ट आणि राष्ट्रद्रोही राज्यकर्ते 
लाभल्यामुळे संतांना भ्रष्टाचारासारख्या गोष्टींच्या 
विरोधात आंदोलन करावे लागते आहे, हे लक्षात घ्या !
    नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर - ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन चालू करण्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या उत्तरप्रदेश राज्यातून श्री श्री रविशंकर त्यांच्या आंदोलनाचा प्रारंभ करणार आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये मुसलमानांच्या धर्मांतराच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल

हिंदूंनो, मुसलमानांच्या धर्मांतराच्या विरोधात पोलीस स्वतःहून गुन्हा
दाखल करतात, तर तुम्ही
तक्रारी करूनही त्याची दखल घेत नाहीत, हे लक्षात घ्या !
    श्रीनगर, ३१ ऑक्टोबर - काही सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून मुसलमान युवकांना खिस्ती बनवण्याची ध्वनीचित्रफीत प्रसारित झाल्यावर जम्मू-काश्मीर पोसिलांनी त्याची स्वतःहून दखल घेत ‘अज्ञात’ व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

अलीगढ मुस्लीम विद्यापिठाच्या महाराष्ट्रातील शाखेला शिवसेनेचा विरोध

निधर्मी (अधर्मी) काँग्रेसच्या राज्यात जिहादी आतंकवादी निर्माण होण्याचा धोका !
काँग्रेस शासनातील मुसलमान मंत्री आणि विद्यापिठाचे मुसलमान कुलगुरु यांची औरंगजेबाच्या कबरीस भेट !
या पथकाने गावातील क्रुरकर्मा औरंगजेबाच्या कबरीला प्रथम भेट दिली. (क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीला भेट देणारे या क्रूरकम्र्याचेच वंशज आहेत, हेच सिद्ध होते ! अशांकडून उभारण्यात येणार्‍या विद्यापिठातून औरंगजेबच निर्माण होतील, हे लक्षात घेऊन हिंदूंनी या विद्यापिठास विरोध करणार्‍या शिवसेनेला पाठिंबा द्यावा ! - संपादक) 

नाशिक येथील साधक श्री. महेंद्र क्षत्रीय यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याबद्दल त्यांचा सत्कार !

डावीकडून श्री. महेंद्र क्षत्रीय यांचा सत्कार करतांना पू. सदानंद नाईकबाबा
    रामनाथी (गोवा) - नाशिक येथे १६ वर्षे अध्यात्मप्रसाराची सेवा करणारे आणि ६ महिन्यांपूर्वी पक्षाघाताचा झटका आल्यापासून घरी राहून साधना करणारे सनातनचे साधक श्री. महेंद्र क्षत्रीय यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याबद्दल त्यांचा पू. सदानंद नाईकबाबा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. क्षत्रीयकाका यापुढे नाशिक जिल्ह्यातील साधकांवर आध्यात्मिक उपाय करण्याची सेवा करणार आहेत.

हिंदुराष्ट्रातील आदर्श राज्यकर्ते असे असतील !

    दैनिक ‘सनातन प्रभात’मधून ‘हिंदुराष्ट्र’ हा शब्द प्रचलित झाल्यापासून ‘हिंदुराष्ट्र म्हणजे काय’, ‘ते कसे असेल ?’, ‘हिंदुराष्ट्रातील आदर्श राज्यकर्ते कसे असतील’, याविषयी अनेक वाचकांनी विचारणा केली होती. या दृष्टीने ‘हिंदुराष्ट्र’ ही संकल्पना वाचकांच्या लक्षात यावी, यासाठी हे सदर दीपावलीच्या निमित्ताने चालू करत आहोत. देशातील व्यापार वाढण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे राज्यकर्ते !

पाकमधील पेशावर येथील मंदिर हिंदु महिलेच्या न्यायालयीन लढ्यानंतर ६० वर्षांनी उघडले

मुंबई, ३१ ऑक्टोबर - पाकच्या पेशावर शहरातील गेली ६० वर्षांपासून बंद असलेले गोरखनाथ मंदिर उघडण्यासाठी फुलवती नामक हिंदु महिलेने दिलेल्या न्यायालयीन लढ्यानंतर उच्च न्यायालयाने हे मंदिर उघडण्याचा आदेश दिल्यानंतर नुकतेच हे मंदिर उघडण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयनंतरही काही काळ हे मंदिर पाक शासनाने न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवत मंदिर उघडण्यास नकार दिला होता.

भानामतीचा प्रयोग करण्यासाठी मारुतीच्या मूर्तीवरील शेंदूर काढणार्‍या मुसलमानाला अटक

बिलोली (जिल्हा नांदेड), ३१ ऑक्टोबर - बिलोली तालुक्यातील कार्ला (बु.) या गावात भानामतीच्या प्रयोगासाठी मारुतीच्या मंदिरातील मूर्तीवरील शेंदूर काढणार्‍या एका मुसलमानाला त्याच्या तीन साथीदारांसह पकडून हिंदूंनी चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.

फलक प्रसिद्धीकरता : हिंदूंनो, पुरोगामी महाराष्ट्रात नऊ टक्केच गुन्हेगारांना शिक्षा होते, हे सत्य जाणा !

टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
महाराष्ट्रात गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक कमी म्हणजे केवळ ९ टक्केच आहे. महाराष्ट्रापेक्षाही बिहार आणि ओरिसा ही राज्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्यात महाराष्ट्रापेक्षा खूपच पुढे आहेत.

संभाजीनगरमध्ये तरुणाच्या हत्येत काँग्रेसच्या नगरसेवकाचा सहभाग

हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असणारे लोकप्रतिनिधी असणार्‍या काँग्रेसवर बंदी का घालण्यात येऊ नये ?
    संभाजीनगर, ३१ ऑक्टोबर - संभाजीनगरमध्ये संपत्तीच्या वादातून कय्यूम खान याकुब खान या
३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तरुणाचा मृतदेह ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानाच्या झाडीत फेकला.

शासकीय नोकर्‍यांमध्ये मुसलमानांना आरक्षण हवे - राष्ट्रवादी काँग्रेस

    मुंबई, ३१ ऑक्टोबर - रंगनाथ मिश्रा आयोगाने केलेल्या मुसलमानांना शासकीय नोकर्‍यांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देण्याच्या शिफारशी केंद्रशासनाने तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी केली आहे. मिश्रा आयोगाने २००८ मध्ये अल्पसंख्यांकासाठी असलेल्या १५ टक्के आरक्षणात मुसलमानांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवाव्यात, अशी शिफारस केली होती.
    अन्वर पुढे म्हणाले की, मुसलमानांची आर्थिक स्थिती बेताची आहे.

पेण अर्बन बँक ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीद्वारे पेण ते ‘वर्षा’ संघर्ष यात्रा

हिंदु जनजागृती आणि सनातन संस्था यांचा पाठिंबा
    पनवेल, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - रायगड जिल्ह्यातील ‘दि पेण को.ऑ. अर्बन बँक लि. पेण’ ही ७५ वर्षे ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली अग्रणी बँक आहे. या अधिकोशावर (बँक) गेल्या वर्षी २३ सप्टेंबर २०१० या दिवशी रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्याची नोटीस दिली होती. त्यामुळे या अधिकोशाचे ठेवीदार-खातेदार यांच्यामध्ये भीती निर्माण झाली असून या अधिकोशात ठेवलेली आयुष्यभराची पुंजी धोक्यात आली आहे.

राष्ट्रीय अन्वेषण पथक पुरवणी आरोपपत्र दाखल करणार

खिस्ताब्द २००६मधील मालेगाव बाँबस्फोटाचे प्रकरण
    मुंबई - खिस्ताब्द २००६ मध्ये मालेगाव येथील मशिदीमध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणातील ९ आरोपींनी आज दुसर्‍यांदा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश वाय.डी. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी राष्ट्रीय अन्वेषण पथकाने या नऊ आरोपींच्या विरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करायचे असल्याने अवधी देण्याची मागणी केली. तेव्हा न्यायाधीश शिंदे यांनी
४ नोव्हेंबरपर्यंत पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचा आदेश दिला.

कापसाला ६ सहस्र रुपये भाव द्या - एकनाथ खडसे

जळगाव, ३१ ऑक्टोबर - कापसाचा हंगाम चालू होण्याची वेळ येऊनही राज्य आणि केंद्र शासन यांनी कापसाचा आधारभूत भाव घोषित केलेला नाही. शासनाने हा भाव त्वरित घोषित करावा आणि उत्पादन खर्च पहात कापसाला ६ सहस्र रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी काल येथे एका पत्रकार परिषदेत केली.

पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर दरोडेखोरांची तिघांना मारहाण आणि लूट

खालापूर, ३१ ऑक्टोबर - मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर काल दरोडेखोरांनी खालापूर गावाजवळ गाडीतून जाणार्‍या एका कुटुंबाला पावणेपाच लाख रुपयांना लुटले, तसेच गाडीतील तीन महिलांना बेदम मारहाण केली. पहाटेच्या वेळी अंधेरीहून पुण्याकडे स्कॉर्पिओ गाडीतून हे कुटुंब जात होते. रसायनी पोलिसांनी तीन दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दीडदमडीचा दिवटा दिग्विजय !

काँग्रेसचे सरचिटणीस महात्मा दिग्विजयसिंग यांनी हिंदूंचे पूजनीय धर्मगरु श्री श्री रविशंकर महाराज यांना उपदेश करण्याचे औद्धत्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करत असून त्यामुळे त्यांनी सावध राहावे, असा समुपदेश त्यांनी दिला आहे. दिग्विजयसिंग १० वर्षे मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तथापी थोडे कठोर बोलायचे तर त्यांनी एका संताला काही सांगायचे म्हणजे वेश्येने साध्वीला नीतीमत्ता सांगण्यासारखे आहे. कोण आहे हा दिग्विजयसिंग ? याचा जन्म फेब्रुवारी १९४७ मध्ये झाला.

साधकांना सूचना

जिल्ह्यातील साधकांना काही अडचणी असल्यास त्याविषयी पू. राजेंद्र शिंदे यांना कळवा !
     ‘जिल्ह्यातील साधकांना काही अडचणी असल्यास किंवा ज्या अडचणी जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांना सांगूनही सोडवल्या गेल्या नसतील, अशा समस्यांच्या धारिका पू. राजेंद्र शिंदे यांच्या नावे shrikrushnaupay@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवाव्यात. धारिका पाठवतांना पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

चूक आणि सुधारणा

    ३१ ऑक्टोबर २०११ या दैनिकात पृष्ठ ३ वर ‘साधनेने प्रगती झाल्यावर अनुभवता येणारा आनंद चेहर्‍यावरही दिसणे’ असा मथळा असलेल्या श्रीमती अश्विनी प्रभु यांच्या मजकुरात त्यांची छायाचित्रे छापली नाहीत. ही अक्षम्य चूक आहे. त्यामुळे तो मजकुर छायाचित्रासह आज पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. या चुकीला उत्तरदायी असलेले साधक प्रायश्चित्त घेत आहेत.

धर्मशिक्षण : दीप कोणत्या दिशेने ओवाळावा

दीप ओवाळतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच का ओवाळावा ? : ‘देवाला दीप ओवाळतांना देवाच्या उजव्या पावलापासून सुरुवात करून देवाच्या चेहर्‍यापर्यंत नेऊन तेथून डाव्या पावलापर्यंत, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने ओवाळावे. त्यामुळे दीप ओवाळणार्‍याची सूर्यनाडी जागृत होऊन त्याच्या सूक्ष्म-देहांची सत्त्वलहरी आणि देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या अतीसूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची क्षमता वाढते.’ - ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ३०.१.२००५)

सनातनच्या साधकांची जलद प्रगती होण्याची कारणमीमांसा

    सनातनच्या साधकांना आध्यात्मिक स्तराच्या अनुभूती येतात, त्यांची प्रगती जलद होऊन अनेक साधक ६० टक्के पातळी गाठतात आणि काहीजण संतही होतात. याचे काही जणांना आश्चर्य वाटते, तर अनेक जणांना ते अविश्वसनीय वाटते. ‘इतर संप्रदायांत असे आढळून येत नाही, तर फक्त सनातन मध्येच का ?’, असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण होतो. त्याचे उत्तर पुढील प्रमाणे आहे.

साधकांना सूचना : सनातन पंचांगाचा आढावा नियमित पाठवा !

     सध्या ‘सनातन पंचांग २०१२’चे वितरण होत आहे. त्या अनुषंगाने सध्या मिळालेल्या पंचांग संख्या, किती पंचांगांचे वितरण शिल्लक आहे, याचा आढावा कळावा यासाठी एक धारिका २७.१०.२०११ या दिवशी सर्व जिल्ह्यांना संगणकीय पत्राद्वारे पाठवली आहे. ज्या जिल्ह्यांना धारिका मिळाली नसेल, त्यांनी श्री. भूषण कुलकर्णी यांना भ्र.क्र. ९६८९४४९१०४ यावर संपर्क करावा.

६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठलेले नाशिक येथील श्री. महेंद्र क्षत्रिय यांच्या संदर्भात त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे

 उभे डावीकडून कु. वृषाली, कु. सिद्धी, कु. अमृता आणि कु. कौस्तुभ बसलेले डावीकडून श्री. महेंद्र क्षत्रिय आणि सौ. धनलक्ष्मी क्षत्रिय
कुटुंबीय
१. कु. वृषाली 
(श्री. क्षत्रिय यांची ज्येष्ठ कन्या, वय २४ वर्षे )
१ अ. बाबांना सत्चे विस्मरण न होणे : ‘बाबांना अर्धांगवायूचा झटका आल्यावर ते बाराखडी आणि आकडे यांची ओळख विसरले; पण नामजप, मुद्रा करणे इत्यादी गोष्टींची त्यांना आठवण करून द्यावी लागली नाही. या गोष्टी त्यांना बरोबर आठवतात.
१ आ. देवानेच सर्व व्यवहार सांभाळणे : बाबांच्या आजारपणानंतर त्यांचे व्यवहार बघतांना कित्येक वेळा ते सर्व व्यवहार आपोआप होत आहेत किंवा देवच नियोजन करून ते सर्व करत आहे, असे जाणवते.’

संत झालेले साधक आणि त्यांचा सन्मान सोहळा यांविषयी जाणवलेली सूत्रे

‘कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी सनातनचे पाच साधक संत झाले. याविषयी साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना, सन्मान आणि कृतज्ञता सोहळ्याविषयीची सूत्रे अन् अनुभूती आज येथे देत आहोत.

संस्कृतीचे हनन आणि विकृतीचे पूजन !

भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या फॉर्म्युला वन कार शर्यतीत जर्मनीच्या सॅबॅस्टियन व्हेटेल याला विजेतेपद मिळाले. या शर्यतीचा आणि सामान्य भारतियांचा तसा काडीचाही संबंध नाही. ही शर्यत म्हणजे उच्चभ्रू भारतियांच्या विरंगुळ्याचे साधन आहे. त्यामुळे त्याचे भारतात आयोजन करून लोकांचे काय भले झाले, हा एक वेगळा विषय असू शकतो; मात्र ही शर्यत जिंकल्यानंतर जगज्जेत्या व्हेटेल याने जे उद्गार काढले, ते प्रत्येक भारतियाला चिंतन करायला लावणारे आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi
 
Copyright © 2012 Dainik Sanatan Prabhat Contact Us : dainikonline@gmail.com