‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धीविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागले. बरेच जण (ज्येष्ठा) गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन करतात. एखाद्याच्या कुलाचारात गणपति पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला, तर तो तसे करू शकतो. यासाठी अधिकारी व्यक्तीस विचारण्याची जरूरी नाही. रूढीप्रमाणे पहिल्या, दुसर्या, तिसर्या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेशविसर्जन करावे.’
श्री गणेशचतुर्थी : शास्त्रोक्त विधी आणि रूढी यांचा अवधी

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गणपति’)
अण्णा हजारे यांच्या जिवाला धोका
सुरक्षा वाढवण्याची अण्णांच्या अधिवक्त्यांची मागणी
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट - भ्रष्टाचाराच्या सूत्रावर सार्या देशात रान उठवणारे आणि सामान्य जनतेला त्या विरोधात संघटित करणारे ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांच्या जिवाला धोका असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी अण्णांचे अधिवक्ता मिलिंद पवार यांनी शासनाकडे केली आहे.
अण्णांसारख्या आंदोलनांचा पुन्हा सामना करावा लागेल !
सर्वोच्च न्यायालयाची केंद्र शासनाला चपराक !
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट - सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाचे न्यायमूर्ती जी.एस्. सिंघवी आणि न्यायमूर्ती एच्.एल्. दत्तू यांनी केंद्र शासनाला चेतावणी दिली आहे की, अलीकडेच रामलीला मैदानात झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाप्रमाणे आंदोलनांचा सामना शासनाला करावा लागेल.
जुझे फिलिप यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! - राजेंद्र आर्लेकर
गोव्याचे महसूलमंत्री जुझे फिलिप यांच्याकडून
कडधान्याच्या पिशवीवर श्री गणेशाबरोबर स्वतःचेही चित्र छापून श्री गणेशाचे विडंबन
वास्को, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - गणेश चतुर्थीनिमित्त राज्याचे महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा हे नागरिकांना कडधान्यांचे मोफत वितरण करत आहेत; मात्र या वेळी वाटण्यात आलेल्या पिशव्यांवर श्री गणेशाच्या प्रतिमेसोबत स्वतःचे छायाचित्र छापून महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
१ सहस्त्र २०० दंगेखोर मुसलमानांवरील दगडफेकीचे फौजदारी खटले मागे
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची ईदची राष्ट्रद्रोही भेट !
श्रीनगर, ३१ ऑगस्ट - जम्मू-कश्मीरचे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या शासनाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रमजान ईदनिमित्ताने मागच्या वर्षी जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ या घटनांच्या प्रकरणी फौजदारी खटले दाखल करण्यात आलेल्या १ सहस्त्र २०० तरुणांवरील सर्व गुन्हेगारी स्वरूपाचे खटले मागे घेण्याची घोषणा केली आहे.
म्हणे, महापालिकेत गणेशोत्सवासह धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा करू नका !
काही तथाकथित पुरोगामी संघटनांनी
गेल्या वर्षी दिलेल्या निवेदनाच्या आधारे सांगली महापालिकेचा ‘फतवा’ !
सांगली, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - गेल्या वर्षी काही विघ्नसंतोषी तथाकथित पुरोगामी संघटनांच्या वतीने शासकीय कार्यालयांमध्ये गणेशोत्सव किंवा अन्य कोणताही उत्सव, धार्मिक कार्यक्रम किंवा सत्यनारायणाच्या पूजेसारख्या पूजाअर्चा करू नयेत, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले होते.
चोपडा (जिल्हा जळगाव) येथे श्री गणेशमूर्ती आणणार्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना मुसलमानांकडून मारहाण !
गणेशोत्सव मंडळांनो,
श्री गणेशमूर्तीची मिरवणूक काढतांना आक्रमण करणार्या
मुसलमानांकडून मूर्तीचे आणि स्वतःचे रक्षण करण्याची सिद्धता ठेवा !
चोपडा (जिल्हा जळगाव), ३१ ऑगस्ट (वार्ता.) - येथील शेतपुरा भागातील शेतपुरा गणेश मित्र मंडळाची श्री गणेशमूर्ती घोषणा देत ट्रॅक्टरवरून आणली जात होती. या मंडळाची मिरवणूक या भागातील मशिदीजवळ आल्यावर मशिदीतून काही मुसलमानांनी ट्रॅक्टर थांबवून ‘‘आमचा नमाज चालू आहे’’, असे म्हणत घोषणा थांबवायला सांगितल्या.
गृहमंत्री पी. चिदंबरम कारागृहात जाणार ! - डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी
मुंबई - ‘टू जी स्पेक्ट्रम’मध्ये जो १ लक्ष ७६ सहस्त्र कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला, त्या संदर्भात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर दूरसंचारमंत्री ए. राजा कारागृहात गेले.
‘वीर शिवाजी’ मालिकेचे नाव ‘छत्रपती शिवाजी’ करण्याची हिंदु जनजागृती समितीची ‘कलर्स’ वाहिनीला विनंती !
मुंबई, ३१ ऑगस्ट - ‘कलर्स’ या वाहिनीवर मंगळवारपासून चालू होणार्या ‘वीर शिवाजी’ या मालिकेचे नाव पालटून ‘छत्रपती शिवाजी’ असे करावे, अशी विनंती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कलर्स’ या वाहिनीच्या व्यवस्थापकांना करण्यात आली आहे.
श्री गणेश हाच जनलोकपाल आहे !
आजपासून प्रारंभ होणार्या श्री गणेशोत्सवाला मा. श्री. अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. श्री गणेश हाच जनलोकपाल आहे. त्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी आंदोलन झाले. म्हणून ते यशस्वी होणारच होते. लोकमान्य टिळक एकदा आपल्या दोन निकटवर्तींपाशी म्हणाले की, त्यांना इंग्रजांना घालवून स्वराज्याची स्थापना करायची आहे; परंतु त्यांची मनातली ही इच्छा सार्वत्रिक करण्यासाठी लोकांना भक्तीमार्गाकडे वळवावे लागेल आणि कर्मयोगी बनवावे लागेल.
मुंबईत मोठी विमान दुर्घटना टळली !
मुंबई, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक मोठी विमान दुर्घटना टळली. ‘एअर इंडिया’चे २६० प्रवासी घेऊन जाणारे जेद्दाहमुंबई विमान तांत्रिक बिघाडामुळे तातडीने उतरवण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
पोलीसच त्यांचे लागे-बांधे असलेल्या चोरांना बंद घरांची माहिती देणार नाहीत, याची जनतेला खात्री वाटत नाही; म्हणून ते त्यांना सहकार्य करत नाहीत !
गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात होणार्या चोर्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन गोवा पोलीस खात्याने केले आहे. पोलीस खात्याच्या वतीने काढलेल्या आवाहन पत्रात म्हटले आहे की, आपले दरवाजे व्यवस्थित बंद करा, घरामागील आणि समोरील दिवे रात्रीही चालू ठेवा, मौल्यवान वस्तू अधिकोषात ठेवा, बाहेरगावी खूप दिवसांसाठी जाण्यापूर्वी पोलिसांना तथा शेजार्यांना कल्पना द्या तसेच संशयास्पद गतीविधीची माहिती त्वरित पोलिसांना कळवा.
ज्या पोलिसांना बंद मंदिरांतील चोर्या थांबवता येत नाहीत, ते जनतेच्या बंद घरांवर लक्ष ठेवतील का ?
ग्रामीण भागांतील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा द्या ! - सुनील तटकरे
मुंबई, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - ग्रामीण भागांतील नागरिकांना उत्तम आणि नियमित आरोग्यसेवा देणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, अशा सूचना जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी आज केल्या. (रुग्णालयांना न्यूनतम अत्यावश्यक गोष्टींच्या सिद्धतेविषयी सूचना द्याव्या लागणे, हेच लज्जास्पद आहे. त्यामुळे असा सूचना द्याव्या लागणार्या प्रशासनावर पालकमंत्री कठोर कारवाई करतील का ? - संपादक) रोह तालुका ग्रामीण रुग्णालयाच्या अडचणींविषयी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
श्री गणेशाच्या स्वागतासाठी महापालिका यंत्रणा सज्ज - आयुक्त
मुंबई, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - श्री गणेशाचे आगमन आणि विसर्जन यांसाठी पालिकेने संपूर्ण यंत्रणा तैनात केली आहे. या उत्सवासाठी पालिकेकडून १ सहस्त्र ५५४ कर्मचारी आणि २५८ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटी यांसारख्या विसर्जनस्थळी मोठी यंत्रणा सिद्ध ठेवण्यात आली आहे. चौपाटीच्या वाळूतून श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेणे सुलभ व्हावे, यासाठी २३१ ‘स्टील प्लेट’ लावण्यात येत आहेत. तसेच यंदा विभागीय स्तरावर २२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
शिवसेना ठाणे जिल्हा शाखेची ‘गणेश दर्शन स्पर्धा २०११’
ठाणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने घेण्यात येणारी ‘गणेश दर्शन स्पर्धा’ यंदा २१ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. यंदा ही स्पर्धा ३ आणि ४ सप्टेंबर या दिवशी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आमदार श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. प्रथम मंडळास २५ सहस्त्र आणि विशेष गुणवत्तापूर्ण आकर्षक श्री गणेशमूर्तीसाठी २ लक्ष रुपयांपर्यंत पारितोषिके देण्यात येणार आहेत. कल्याण शहरातील मेळ्याच्या गणपतीसाठी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
मुंबई महापालिकेची ३६१ अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई
मुंबई , ३ १ ऑगस्ट (वार्ता.) - महापालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त यांच्या आदेशानुसार वरळी, वाळकेश्वर, नळ बाजार, दादर, वांद्रे, अंधेरी, मालाड, गोरेगाव, सांताक्रूझ, तसेच घाटकोपर, मुलुंड आदी ठिकाणच्या ३६१ अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामध्ये ४ लक्ष ६८ सहस्त्र ५९० रुपयांचा माल राजहृत (जप्त) करण्यात आला.
‘सनातन संस्थेच्या’च्या ‘गणेशोत्सव प्रश्नमंजुषे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद : ८३८ विद्यार्थ्यांचा सहभाग
मुंबई, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - विद्यार्थ्यांना सण-उत्सव, त्यामागील अध्यात्मशास्त्र, तसेच संस्कृती यांची शास्त्रीय माहिती मिळावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात येते.
वसई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन
वसई (जिल्हा ठाणे), ३१ ऑगस्ट (वार्ता.) - सार्वजनिक गणेशोत्सवातील अपप्रकार दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यासह हा उत्सव अध्यात्मशास्त्रानुसार आणि आदर्शरित्या साजरा करावा,
अण्णांच्या विरोधात गरळओक करणार्या मनीष तिवारी यांची स्थायी समितीतून माघार
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट - अण्णा हजारे यांच्यावर चिखलफेक करणारे काँग्रेसचे वादग्रस्त नेते मनीष तिवारी यांनी संसदेच्या स्थायी समितीतून माघार घेतली आहे. नव्या समितीमध्ये आपल्या नावाचा विचार करून नये, असे त्यांनी पक्षाला कळवले आहे.
वाढीव पाणीपुरवठ्यासाठी तानसा तलावाची उंची १ फुटाने वाढवण्याची मागणी
मुंबई, ३१ ऑगस्ट (वार्ता.) - मुंबईला १ महिन्याचा वाढीव पाणीपुरवठा मिळण्यासाठी तानसा तलावाची उंची १ फुटाने वाढवण्याची मागणी महापालिका आयुक्तांना करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. हुल शेवाळे यांनी नुकतीच दिली.
फलक प्रसिद्धीकरता
खालील मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
हिंदूंनो, मुसलमानांचा हिंदुद्वेष जाणा !
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे मशिदीजवळून जात असलेली श्री गणेशाची मिरवणूक थांबवत मुसलमानांनी श्री गणेश मंडळाच्या दहा-बारा कार्यकर्त्यांना मारहाण केली. पोलिसांनी मात्र मुसलमानांवर कारवाई न करता हिंदूंनाच दमदाटी करून मिरवणुकीचा मार्ग पालटायला लावला.
बसपच्या आमदाराने शेतकर्याचा भूखंड लाटला
लखनौ - उत्तरप्रदेशातील मायावती यांच्या बसपचे आमदार कैलाश राजपूत यांनी त्यांच्या पित्याच्या माध्यमातून एका शेतकर्याचा भूखंड बळकावला आहे. या प्रकरणी छिब्बरामऊ ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी केलेल्या चौकशीत शेतकर्याच्या म्हणण्यामध्ये तथ्य आढळले आहे. (असे गुन्हेगारांचा भरणा असलेले राजकीय पक्ष देणारे निरर्थक लोकराज्य आता नको ! - संपादक)
अण्णांची प्रकृती स्थिर
गुडगाव, ३१ ऑगस्ट - गुडगावच्या मेदांता रुग्णालयात चार दिवस उपचार घेतल्यानंतर श्री. अण्णा हजारे यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले. अण्णांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉ. नरेश त्रेहान यांनी सांगितले. अण्णा रुग्णालयातून थेट राळेगणसिद्धीकडे रवाना झाले.
गडकरी रंगायतन स्फोट प्रकरणातील दोषींना १० वर्षांची शिक्षा
मुंबई, ३० ऑगस्ट (वार्ता.) - हिंदूंच्या देवता आणि ‘महाभारत’ हा धर्मग्रंथ यांची विटंबना करणार्या ‘आम्ही पाचपुते’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी ठाणे येथील गडकरी रंगायतन या नाट्यगृहात झालेल्या स्फोटात श्री. रमेश गडकरी आणि श्री. विक्रम भावे यांना दोषी ठरवण्यात आले. आज सत्र न्यायालयाने या दोघांना १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी न्यायालयात या दोघांवर एकूण ६ गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यांतील स्फोटक कायदा कलम ३ आणि ४ नुसार सर्वाधिक १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तसेच प्रत्येकी ११ सहस्र रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
साधकांना सूचना
‘ओणम्’चे औचित्य साधून अध्यात्मप्रसार करा, तसेच मल्याळम् भाषेतील २०१२ च्या ‘सनातन पंचाग’साठी मागणी नोंदवा आणि प्रायोजकही मिळवा !
भाद्रपद शु. द्वादशी, कलियुग वर्ष ५११३ (९.९.२०११) या दिवशी केरळमधील लोकांचा ‘ओणम्’ हा सण आहे. केरळ व्यतिरिक्त अन्य राज्यांतही मल्याळी लोकांच्या उपास्यदेवतांच्या मंदिरांत तो साजरा केला जातो, उदा. निगडी (पुणे) येथील गुरुवायूरप्पन (श्रीकृष्ण) मंदिर, देहूरोड आणि पनवेल येथील अय्यप्पन मंदिर इत्यादी. साधकांनी आपल्या जिल्ह्यातील अशा मंदिरांची, तसेच ‘ओणम्’च्या काळात (७ ते १० सप्टेंबर या दिवसांत) लोकांची गर्दी कधी अधिक असते, याची माहिती काढून सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावायची अनुमती त्या मंदिराकडून घ्यावी.

सर्वांसाठीचा उपाय : १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०११
* ‘पुढे’ म्हणजे शरिराच्या पुढच्या, म्हणजे मुखाकडच्या भागाकडील चक्राशी संबंधित भाग
** ‘पाठी’ म्हणजे शरिराच्या पाठच्या, म्हणजे डोक्याच्या भागाकडील चक्राशी संबंधित भाग
२. जप (जाता-येतांना किंवा उपाय करण्याची आवश्यकता भासल्यास प्रतिदिन २ घंटे करावयाचा जप) : ‘ॐ ॐ श्री अग्निदेवाय नमः ॐ ।’
३. मुद्रा (जाता-येतांना किंवा उपाय करण्याची आवश्यकता भासल्यास उपायांच्या वेळी करावयाची मुद्रा) : अंगठ्याचे टोक मधल्या बोटाच्या मुळाला लावणे
४. न्यास : छातीचे मधले हाड जेथे संपते, तेथे अंगठा, तर्जनी आणि मधले बोट यांची टोके ठेवावीत. तेव्हा अंगठ्याचे टोक हाडाच्या खालच्या टोकावर ठेवावे आणि तर्जनी अन् मधले बोट यांची टोके हाडाच्या टोकाच्या खालील पोटावर ठेवावीत.
५. ८ व्या आणि ९ व्या द्वारांचे उपाय चालू ठेवावेत.

- डॉ. आठवले (आषाढ कृ. ५, कलियुग वर्ष ५११३ (२०.७.२०११))
कार्यकर्त्यांना सूचना
पूर्वी कार्य चालू असलेल्या गावांशी पुन्हा संपर्क करा !
एका जिल्ह्यातील एका गावात हिंदु जनजागृती समितीचे कार्य ३ वर्षांपूर्वी चालू केले होते. कार्याला चांगला प्रतिसादही होता; परंतु गावातील स्थानिक राजकारणामुळे कार्र्य उणावले आणि नंतर त्या भागातील उत्तरदायी कार्यकर्तेही इतरत्र प्रसारासाठी गेल्यामुळे त्या गावाशी संपर्क तुटला. श्री. रमेश शिंदे या भागात दौर्यावर आले असतांना त्यांनी या गावाची चौकशी केली. तेव्हा लक्षात आले की, आजही या गावातील काही महिला सामूहिक नामजप करतात आणि युवकही प्रत्येक शनिवारी आरतीसाठी एकत्र येतात.

धर्मशिक्षण : श्री गणेश विशेष
कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करण्याचे महत्त्व
इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय पूजास्थानी कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करतात. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती देवता तेथे येऊ शकते. यालाच महाद्वारपूजन किंवा महागणपतिपूजन असे म्हणतात.

खिस्ती पंथासाठी अविरत प्रयत्नरत असलेल्या हिंदुद्रोही सोनिया गांधी !
काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचा पॅलेस्टाईनमधील खिस्ती आतंकवादी संघटनेचा नेता जॉर्ज वॉशशी चांगला परिचय होता. त्या त्याला अर्थसाहाय्य करत असल्याचा गंभीर आरोप जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मुंबईत केला आहे.
प.पू. पांडे महाराजांनी संकेतस्थळ सेवा करणार्या साधकांना सांगितलेली सूत्रे
![]() |
| प.पू. पांडे महाराज |
अल्प प्रमाणात साधना करत असूनही ‘सात्त्विक कपडे बनवण्याचा प्रकल्प (प्रोजेक्ट) सिद्ध करतांना स्वतःतील चैतन्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूतीमुळे प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
| सौ. गायत्री इंद्रजीत जामसांडेकर |
मी ‘फॅशन डिझाईनिंग’चा(Fashion designing) अभ्यास करते. या अभ्यासक्रमातील माझे शेवटचे वर्ष संपत आले होते. या पाठ्यक्रमाच्या शेवटच्या सत्राच्या वेळी प्राचार्यांनी मला बोलवून ‘ऑरा-स्कॅन’ हा विषय दिला. मला एकटीलाच हा विषय मिळाला होता.
याच कालावधीत एके दिवशी सौ. अंजली कणंगलेकर आमच्याकडे आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी मला सुचवले, ‘आपले कपडे सात्त्विक कसे असावेत’ यासंदर्भात नवीन काही करता आले, तर बघ.’ त्या दृष्टीने मी विचार करत होते. याच कालावधीत प्राचार्यांनी मला अचानक बोलवून सांगितले, ‘सात्त्विक कपडे बनवण्याचा प्रकल्प (प्रोजेक्ट) सिद्ध कर.’ त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला अन् मी त्याच क्षणी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. कृष्णजन्माष्टमीच्या वेळी साधिका पाळण्याला झोके देत असतांना साधकांच्या साधनेसाठी कृष्णाने अवतार घेतल्याचे वाटून कधीही न अनुभवलेला आनंद मिळणे आणि कार्यक्रमानंतर पृथ्वी अन् आप या तत्त्वांची अनुभूती आल्याने देवाविषयी कृतज्ञता वाटणे
श्रावण कृष्ण सप्तमी, कलियुग वर्ष ५११३ (२१.८.२०११) या रात्री कृष्णजन्माष्टमीनिमित्तच्या भावसोहळ्याला कु. सायली गाडगीळ कृष्णाचे गाणे म्हणत असतांना भावजागृती होऊन आनंद मिळत होता. त्या पाळणा म्हणत असतांना दोन साधिका प्रत्यक्ष पाळण्याला झोके देत होत्या.
निजलेल्या तान्ह्यावर जशी आई लक्ष ठेवून असते ।
प.पू. डॉक्टरांचे मनही सदा साधकांभोवती असते ।।
प.पू. डॉक्टरांच्या चरणी
- आधुनिक वैद्या सौ. मंगला वेरेकर
प.पू. डॉक्टरांच्या चरणी
- आधुनिक वैद्या सौ. मंगला वेरेकर
‘झी २४ तास’चा अतिरेक !
* सनातन संस्थेवर कोणत्याही अतिरेकी कारवाईचे आरोप झालेले नसतांना या चर्चेचे नाव ‘सनातनी अतिरेकी’ असे ठेवण्यात आले होते. त्याचवेळी सूत्रधार मंदार परब यांनी या चर्चेचा उल्लेख ‘सनातनी अतिरेकी का ?’ असा केला.
भावे-गडकरी अतिरेकी नव्हेत ! - मधू चव्हाण
‘झी २४ तास’वरील कार्यक्रम
`झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवरील `सनातनी अतिरेकी’ या चर्चासत्रात जितेंद्र आव्हाड यांच्या विधानांवर आमदार मधू चव्हाण यांनी केलेला प्रतिवाद येथे देत आहोत.
* जितेंद्र आव्हाड यांनी भावे आणि गडकरी यांना ‘अतिरेकी’ म्हणणे हे त्यांच्या मतदारसंघाची स्थिती पहाता, त्यांना तसे बोलावे लागते, हे समजू शकतो
* हिंसक कृत्य करून कोणतेही ईप्सित साध्य करता येत नाही; परंतु हे एका नैराश्यातून केलेले कृत्य आहे. त्यामुळे मी त्यांना अतिरेकी म्हणू इच्छित नाही.

जितेंद्र आव्हाड यांची विद्वेषी वक्तव्ये आणि त्यांचा प्रतिवाद
* आज न्यायालयाने जरी भावे आणि गडकरी यांना अतिरेकी ठरवले नसले, तरी ते अतिरेक्यांच्या भूमिकेपासून लांब नाहीत. गडकरी रंगायतनमध्ये केलेला बाँबस्फोट हा धर्मद्वेषातून केलेला अतिरेक आहे. (याचा अर्थ ‘न्यायालयापेक्षा जितेंद्र आव्हाड यांनाच अधिक कळते’, असे त्यांना म्हणायचे का ? असे वक्तव्य करून आव्हाड यांनी न्यायालयाचा अवमान करण्याचाच अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. काँग्रेसवाल्यांना लोकशाही नव्हे, तर त्यांची ठोकशाहीच हवी आहे, हेही त्यांचे हे वक्तव्य सांगत आहे ! - संकलक)
सनातनकडून आतंकवादाला प्रोत्साहन नाही ! - अभय वर्तक
‘झी २४ तास’वरील कार्यक्रमातून सनातनची भूमिका स्पष्ट देवतांच्या विडंबनाच्या विरोधात सक्षम कायदा हवा ! - सनातन संस्था
श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘प्रत्येक दिवशी कोठे-ना-कोठे हिंदु संत किंवा देवता यांचे विडंबन होत असते. त्यामुळे हिंदू दुखावले जातात. काही दिवसांपूर्वी शेखर सुमन यांनी मुसलमानांच्या भावना दुखावणारे विधान केले. त्याबद्दल ५-६ मुसलमान गृहमंत्री रा.रा. पाटील यांना भेटले. त्यांनी ताबडतोब दूरभाष करून शेखर सुमन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला; मात्र आम्ही देवतांच्या विडंबनाच्या विरोधात शेकडो वेळा निवेदने दिली, निदर्शने केली; पण संबंधित व्यक्तींवर कारवाई होत नाही. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या लिखाणाविषयी ‘झी २४ तास’ने अभिनंदनीय कार्यक्रम घेतला; मात्र त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले ? कायदा सुव्यवस्था कुठे आहे ? ‘एम्व्हीएल’ या भ्रमणध्वनीच्या आस्थापनाच्या विज्ञापनात पहाताही येणार नाही, इतके अश्लाघ्य विडंबन चालू आहे. आम्हाला एक हिंदु म्हणून अक्षरशः कळवळायला होते. त्यामुळे देवतांच्या विडंबनाच्या विरोधात एक सक्षम कायदा होणे अत्यावश्यक आहे.’’

चीनची मोर्चेबांधणी !
भारताच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चीनचे एक टेहळणी जहाज अंदमान-निकोबार बेटांजवळ वावरत असल्याचे दिसून आले आहे. हिंदी महासागरात आणि बंगालच्या उपसागरात चीनच्या जहाजांची ये-जा वाढू लागल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. नौदलाच्या माहितीनुसार, चीनचे एक मोठे जहाज चार महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय समुद्रात घिरट्या घालत असल्याचे आढळले होते.
लोकायुक्त नव्हे, काँग्रेसायुक्त !
अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी उपोषण आरंभले होते, त्याला भाजपने पाठिंबा देत काँग्रेसवर हल्ला चढवला होता. याच वेळी भ्रष्ट काँग्रेसने भाजपवर सूड उगवण्याच्या उद्देशानेच गुजरात राज्यात लोकयुक्ताची नेमणूक केली. या नियुक्तीला नरेंद्र मोदी यांनी तेव्हाच विरोध केला आणि आता भाजप पक्ष याला संसदेत आणि संसदेबाहेर विरोध करत आहे. उद्या भाजप या विषयावर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेणार आहे. अण्णा हजारे यांनी त्यांच्या उपोषणातून संसदेकडे तीन मागण्या केल्या होत्या आणि त्या संसदेने मान्य करून स्थायी समितीकडे पाठवल्या आहेत. यात सर्व राज्यांत लोकायुक्त स्थापन करणे, ही एक मागणी होती. त्यामुळे जनतेला वाटत असेल की, काँग्रेसने गुजरात राज्यात लोकायुक्त नेमून अण्णांचीच मागणी प्रत्यक्षात कृतीत आणली आहे; मात्र प्रत्यक्षात तसे नाही. या नियुक्तीमागे काँग्रेसला भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याप्रती द्वेष आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
Subscribe to:
Posts (Atom)