Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गोवा राज्यातील हातकातरो खांबाकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

पोर्तुगिजांच्या गुलामगिरीचे स्मरण करून देणार्‍या चर्चच्या जतनासाठी शासन कोट्यवधी 
रुपये व्यय करते; मात्र त्यांनी हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांचे प्रतीक 
असलेल्या हातकातरो खांबाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असेच दिसते !
प्राचीन स्मारक म्हणून घोषित न झाल्याचा परिणाम
हातकातरो खांब
     पणजी - जुने गोवा येथील ऐतिहासिक हातकातरो खांब अजूनही प्राचीन स्मारक म्हणून घोषित न झाल्याने त्याकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केले आहे. हातकातरो खांबाची ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करण्यासाठी त्याला प्राचीन स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी शासनाकडे अनेक वेळी केली होती; मात्र शासनाने या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
      प्राप्त माहितीनुसार जुने गोवा येथील हातकातरो खांब प्राचीन स्मारक म्हणून घोषित न झाल्याने त्यावर भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण किंवा पुराभिलेख आणि पुरातन वास्तू संचालनालय किंवा गोवा शासन अधिकृत हक्क सांगू शकत नाही. गोवा राज्यात शेकडो ऐतिहासिक वास्तू असल्या तरी यामधील अत्यल्प वास्तूंचा भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण आणि पुराभिलेख आणि पुरातन वास्तू संचालनालय यांच्या प्राचीन स्मारकांच्या सूचीत समावेश झालेला आहे. गोवा जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा प्राचीन स्मारकांच्या दोन सूची बनवण्यात आल्या. यामधील पहिल्या सूचीत राष्ट्रीय स्तरावर महत्त्व असलेल्या २१ प्राचीन स्मारकांचा समावेश करण्यात आला आणि पुढे ही सूची भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण यांना वास्तूंच्या संवर्धनासाठी देण्यात आली. दुसर्‍या सूचीमध्ये राज्यस्तरावर महत्त्व असलेल्या ५१ प्राचीन स्मारकांचा समावेश करण्यात आला. ही सूची पुराभिलेख आणि पुरातन वास्तू संचालनालय या खात्याला देण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही सूचीमध्ये जुने गोवा येथील हातकातरो खांब याचा समावेश करण्यात आलेला नाही.हातकातरो खांब हा पोर्तुगीज काळात हिंदूंवर लादलेल्या इन्क्विझिशनचे एकमेव प्रतीक आहे; मात्र काही तज्ञांच्या मते राज्यात इन्क्विझिशनसंबंधी असलेल्या थोडीफार माहितीमध्ये या हातकातरो खांबाचा समावेश नाही. हा खांब पूर्वी जुने गोवा येथील गांधी सर्कलकडे होता आणि नंतर तो सध्या असलेल्या जुने गोवा बगलमार्गावर स्थलांतरित करण्यात आला. काहींच्या मते पूर्वी गुन्हा करणार्‍यांना शिक्षा म्हणून हातकातरो खांब कडे आणून त्यांचे हात कापले जात होते. जुने गोवा येथील लोकांच्या मते हातकातरो खांबा हा प्राचीन वारसा असून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. हा हातकातरो खांबा जुने गोवा बगलमार्गावर अन्यत्र हलवू नये, तसेच त्या ठिकाणी या वारशाचे संवर्धन करण्यासाठी वाहतूक बेट बांधावे, असे जुने गोवा येथील नागरिकांचे म्हणणे आहे. 
     इतिहासतज्ञ प्रजल साखरदांडे यांच्या मते हातकातरो खांबाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्याचे भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण किंवा पुराभिलेख आणि पुरातन वास्तू संचालनालय यांनी संवर्धन केले पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn