Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कराड येथे 'लव्ह जिहाद'च्या विरोधात जैन समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा

उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना निवेदन 
मोर्च्यात सहभागी जैन समाज
     कराड - येथे घडलेल्या 'लव्ह जिहाद'च्या एका घटनेच्या विरोधात जैन समाजाचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. 'लव्ह जिहाद'चा वाढता प्रसार थांबवण्यासाठी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवनकर यांना निवेदनही देण्यात आले. आतापर्यंत कराड येथे घडलेल्या 'लव्ह जिहाद'च्या प्रकरणांची चौकशी करून संबंधित धर्मांधांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

     या वेळी जैन समाज बहुसंख्येने उपस्थित होता, तसेच भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन कराड अध्यक्ष आणि कराड नगरसेवक श्री. विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. रूपेश मुळे, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. ओमकार माने, श्री. सागर आमले, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक, तसेच कराडमधील विविध धर्माभिमानी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
     येथील शिवाजी हौसिंग सोसायटी कराड मधील जैन समाजातील एका मुलीला धर्मांधाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर केले आणि तिच्यासमवेत निकाह केला. कुटुंबियांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला; पण ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. या घटनेच्या अनुषंगाने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. 
मान्यवरांची मते 
समाज म्हणून नव्हे, तर हिंदु म्हणून एकत्र या ! 
- श्री. विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप 
     लव्ह जिहाद हा हिंदु धर्मावरील मोठा आघात असून आता समाजासाठी एकत्र न येता हिंदु म्हणून एकत्र येण्याची आवश्यकता आहे. जैन समाजाने कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण हिंदु समाज त्यांच्या पाठीशी आहे. 
शासनाने लव्ह जिहादच्या विरोधात लवकरात लवकर कायदा करावा. लव्ह जिहादचा गुन्हा अजामीनपात्र करून संबंधितांना न्यूनतम १५ वर्षांची शिक्षा असावी. - श्री. विठ्ठल स्वामी महाराज, मठाधिपती, जयराम स्वामी मठ, वडगाव 
क्षणचित्र - या वेळी दैनिक सनातन प्रभातच्या 'लव्ह जिहाद'च्या विशेषांकाचे वितरण करण्यात आले. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn