Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शनिमंदिरात स्त्रीने जावे कि नाही, या विषयाकडे आध्यात्मिक दृष्टीनेच पाहिले पाहिजे ! - वैद्य उदय धुरी

मी मराठी वृत्तवाहिनीवर देवस्थानांमध्ये 
महिलांना प्रवेश देणे योग्य आहे का ? या विषयावरील चर्चासत्र
       मुंबई - शनिमंदिरात स्त्रीने जावे कि नाही, या प्रश्‍नाकडे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनातूनच पहायला हवे. याविषयी कोणावर बळजोरी मात्र नाही. शरिरातील हिमोग्लोबीन पडताळायचे असेल, तर मला काहीही खाल्ले, तरी चालते; मात्र रक्तातील इएस्आर् पडताळायचा असेल, तर उपाशी रहावे लागते. रक्त एकच आहे; मात्र त्यातील घटक पडताळतांना वेगवेगळ्या पद्धतीने करावे लागते, तसेच प्रत्येक ठिकाणी तेथील नियमाप्रमाणे वागावे लागते, असे हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी सांगितले. मी मराठी वृत्तवाहिनीवर पॉईंट ब्लँक कार्यक्रमात देवस्थानांमध्ये महिलांना प्रवेश देणे योग्य आहे का ? या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात वैद्य उदय धुरी यांच्यासह राजकीय विश्‍लेषक प्रा. अरुणा पेंडसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सौ. विद्या चव्हाण, श्री शनिशिंगणापूर देवस्थान न्यासाचे विश्‍वस्त श्री. सयाराम बानकर आणि मी मराठीचे संपादक रवींद्र आंबेकर सहभागी होते.
वैद्य धुरी पुढे म्हणाले की,
१. प्रत्येक देवतेचे सृष्टीतील कार्य वेगवेगळे आहे. तसेच आपल्या शरिराचेही आहे. डोळ्याचे कार्य डोळा करणार, कानाचे कार्य कान करणार. मी मनाने कार्यक्रम पहायचा नाही, असे कितीही ठरवले, तरी डोळे ते पहाणार. अवयवांप्रमाणेच सृष्टीतील घटक ज्याचे त्याचे कार्य करतात.
२. तुमच्या मनाप्रमाणे हे धर्मशास्त्र काम करत नाही, हे समजून घेतले पाहिजे. तुम्ही कितीही सामाजिक अंगाने, पुरोगामीपणाने चिडून सांगितले, तरी हे शास्त्र आणि नियम पालटणार नाहीत.
३. शनिशिंगणापूर हे दैवत आहे; मात्र कोणी येतो आणि म्हणतो, हे थोतांड आहे. काहीही वाटेल, ती टीका करत आहेत. त्यांना सांगावेसे वाटते की, तुम्ही म्हणता, ते मन, बुद्धी, अहंकार कुठे असतो, हे कुठे शोधून काढले आहे ? केवळ पंचज्ञानेंद्रियांनी दिसत नाही; म्हणून वाटेल ती टीका का करता ?
४. शनि देवता ग्रहपीडा, साडेसाती दूर करणे, आपल्या पूर्वकर्मांमुळे काही समस्या शक्तीशी संबंधित असतात, त्यांचे निवारण करण्याचे कार्य शक्ती करते, तसेच भावाप्रमाणे फलश्रुती वेगळ्या असतात.
५. शनि, अय्यप्पा या देवता ब्रह्मचारी देवता आहेत. तुमच्या घरात कुणी ब्रह्मचारी भिक्षा मागण्यासाठी आला आणि म्हणाला की, मला स्पर्श होणार नाही, अशा प्रकारे भिक्षा द्या. तेव्हा घरातील स्त्रियांविषयी कुणी पुरुष भिक्षा देऊ शकतो. तिथे मी माझ्या घरात मी संविधानाप्रमाणेच वागणार. माझ्या पत्नीनेच भिक्षा दिली पाहिजे, असे म्हणणार नाही.
६. शनिदेवतेच्या ठिकाणी कुठल्याही जाती-धर्माचे लोक जाऊन दर्शन घेऊ शकतात. तिथे जाऊन तुम्ही स्वत:ही निश्‍चिती करू शकता.
७. साधनेचा विचार करतो, तेव्हा उपासनाकांड, कर्मकांड, ज्ञानकांड यांनुसार एकेक भाग असतो. कर्मकांडानुसार जिथे स्पर्शाने एखादी कृती करायची असेल, तिथे नियम पाळावेच लागतात.
८. हिंदु धर्माने जेवढा स्त्रीचा विचार केला आहे, तेवढा जगाच्या पाठीवर कोणीच केलेला नाही. मैत्रैयी, गार्गी अशा स्त्रियांनाही वेदपठणाचा अधिकार हिंदु धर्माने दिला आहे.
९. विश्‍वाचे कार्य सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांद्वारे चालू असते. हे गुण दिसत नाहीत. शरिरात अन्न ग्रहण करतो, तेव्हा पेशींमध्ये ते पचवण्याची प्रक्रिया चालू होते. ते दिसत नाही; मात्र कार्य चालू असते. तसेच या त्रिगुणांचे आहे.
१०. भक्तच मंदिरे शुद्ध आणि पवित्र ठेवतील; म्हणून सर्व मंदिरे शासनाकडून काढून भक्तांच्या कह्यात द्या.
(म्हणे) महिलांनी शनिदेवाला स्पर्श करू नये, असे 
कोणत्याही कथेत दिलेले नाही ! - प्रा. अरुणा पेंडेसे, राजकीय विश्‍लेषक
      शनिदेवाच्या सर्व कथा मी वाचून आले आहे. त्यात कुठेही महिलांनी शनिदेवाला स्पर्श करू नये, असे दिलेले नाही. (शनिदेवाविषयी अपूर्ण माहितीच्या आधारे शनिदेवांविषयी स्वत:चे मत ठरवणार्‍या प्रा. पेंडसे यांच्या बुद्धीची कीव करावी, तेवढी अल्पच आहे. त्यांनी शास्त्र जाणून घ्यावे, साधना करावी, धर्माधिकार्‍यांकडून याविषयी जाणून घ्यावे. - संपादक) कार्तिक स्वामींविषयी अशा कथा आहेत. समतेचा हक्क सर्वांत पहिला आहे. (समतेचा उद्घोष करणार्‍यांनीच आज कोट्यवधींची माया जमवली आहे, तर गरीब अजूनच गरीब होत आहेत. ही समता आहे कि विषमता ? - संपादक ) स्त्रियांविषयी अस्पृश्यता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पुरुषांनी धर्माचा ठेका घेतला आहे. पुरुष देवतांच्या ठिकाणी पुरुष पुजारी आणि स्त्री देवता, उदा. महालक्ष्मी येथेही पुरुष पुजारी असतात आणि तिथेही गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेश मिळत नाही ? त्यांनी देवीला आई म्हटले, तरी तिची वस्त्रे पुरुष कशी पालटतात ? घरात आपण असे करतो का ? (वड्याचे तेल वांग्याला लावून स्वत:चे हसे करून घेणार्‍या प्रा. पेंडसे ! देवता या तत्त्वरूपाने आणि वायुरूप असतात. त्यांच्यामध्ये स्त्री-पुरुष हा भेदभाव नसतो. असे असतांना मनुष्याचे नियम त्यांना कसे लावता येतील ? - संपादक)
राज्यघटनेनुसार प्रत्येकाच्या धर्मानुसार चालीरिती पाळण्याचा 
अधिकार ! - सयाराम बानकर, विश्‍वस्त, श्री शनिशिंगणापूर देवस्थान न्यास
      ९ मार्च २०११ या दिवशी देवस्थान न्यासाने स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाही चौथर्‍यावर दर्शनासाठी न सोडण्याचा निर्णय घेतला होता. चौथर्‍याखालूनच दर्शन घेण्यास सांगितले होते. त्या वेळी तेथे भेट दिलेल्या १० ते १२ सहस्र लोकांनी नोंदवहीत लिहिले होते की, ही दर्शन पद्धत चांगली आहे. श्री शनिशिंगणापूर देवस्थान सार्वजनिक न्यासाच्या अंतर्गत आहे. ही खाजगी मालमत्ता नाही. प्रत्येक देवस्थानात काम कसे करावे, विश्‍वस्तांची नेमणूक कशी करावी, याची घटना आहे. साहाय्यक धर्मादाय आयुक्त मुलाखती घेऊन ते ठरवतात, अशी याची पद्धत आहे. त्यामुळे न्यासात महिला का नाही, अन्य गोष्टी का नाहीत, असे आम्ही ठरवत नाही.
वारंवार धर्मशास्त्रावर टीका करणार्‍या राष्ट्रवादी 
काँग्रेसच्या प्रवक्त्या सौ. विद्या चव्हाण यांचा कांगावा !
(म्हणे) गाभार्‍यातही महिलांनी जायचे नाही, हे महिलांवर अन्याय करणारे !
     गाभार्‍यातही महिलांनी जायचे नाही, हे महिलांवर अन्याय करणारे आहे. संभाजीनगर येथे एका महिलेने शनिदेवावर पीएच्डी केली आहे. तिने शनिदेवाचे मंदिर बांधले आहे. ती कधीही असे म्हणत नाही की, माझ्या मंदिरामध्ये केवळ पुरुषांनाच प्रवेश आहे. स्त्रियांना नाही. (याविषयी धर्माधिकार्‍यांचे मत जाणून न घेता कोणत्याही उदाहरणावरून सल्ले देणार्‍या सौ. विद्या चव्हाण ! उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसे वागायचे, याचे नियम जनतेने ठरवल्यास ते सौ. विद्या चव्हाण यांना चालेल का ? - संपादक) महिलांच्या पोटातूनच सर्व जन्म घेतात, त्याच महिलांच्या हातचे अन्न खातात आणि त्यांनाच अशुद्ध कसे ठरवतात ? (धार्मिक विषयाला भावनिक आणि सामाजिक स्तरावर नेण्यामुळे लोक धर्मापासून दूर जातात, हे सौ. चव्हाण समजून घेतील का ? - संपादक)
     संपादक श्री. आंबेकर यांनी अनेक वेगवेगळ्या प्रवृत्तीचे गुन्हेगार शनिशिंगणापूरला येतात. तिथे अभिषेक करतात, त्यांच्या पीडा सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे देव कधी अशुद्ध होत नाही. महिलेमुळे कसा अशुद्ध होतो, असे अज्ञानमूलक प्रश्‍न विचारले.
क्षणचित्र
      कार्यक्रमात वारंवार धर्माच्या ठेकेदारांकडून महिलांना प्रवेश नाकारण्यात आला, असे सांगण्यात येत होते. (स्वत: धर्म जाणून घ्यायचा नाही, साधना समजून घ्यायची नाही आणि धर्मपालनाचा आग्रह धरणार्‍यांना धर्माचे ठेकेदार म्हणून हिणवायचे, हा पुरोगामीपणा कि अधोगामीपणा ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn