Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अमीर खान यांनी केलेले विधान हे त्यांच्या पत्नीचे नसून त्यांचेच आहे ! - नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

साम वाहिनीवरील चर्चासत्र 
चर्चासत्रात बोलतांना श्री. नरेंद्र सुर्वे 
     मुंबई, २६ नोव्हेंबर (वार्ता.) - अमीर खान यांना देशातून जायचे असेल, तर त्यांनी खुशाल निघून जावे. या देशाने एक अमीर खान निर्माण केला; परंतु हाच देश असे अनेक अमीर निर्माण करू शकतो. अमीर खान यांनी व्यासपिठाचा चुकीचा वापर केला आहे. त्यांनी पत्नीच्या नावावर केलेले विधान हे तिचे नसून अमिर खान यांचे म्हणणे आहे, असे आम्ही मानतो. त्यांनी असे का केले ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काही सामाजिक संस्थांना निधी पुरवण्याचे बंद केले. त्यामुळे कदाचित् असे विधान केले असेल. अमीर खान यांचा दंगल हा आगामी चित्रपट येत आहे. कदाचित् त्याच्या प्रसिद्धीसाठीही अशा प्रकारे ते बोलले असावेत, हे नाकारता येत नाही. हिंदी चित्रपटसृष्टी आज कुठल्याही थराला जाऊ शकते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी साम या वाहिनीवरील चर्चासत्रात केले. या वाहिनीवरील आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात खोट कशात ? देशात ? अमीर खानमध्ये कि सत्ताधार्‍यांमध्ये ? या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अमीर यांचे हे विधान बालीश नाही. जेव्हा संगीतकार ए.आर्. रेहमान यांना विरोध झाला, तेव्हा अमीर यांना ती असहिष्णुता का वाटली नाही ?, असा प्रश्‍नही श्री. सुर्वे उपस्थित केला.
      या चर्चासत्रात राजकीय विश्‍लेषक हेमंत देसाई, अभिनेता मिलिंद गवळी, भाजपचे प्रवक्ते श्री. गिरीश व्यास, शिवसेनेच्य प्रवक्त्या मनीषा कायंदे, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारेही सहभागी झाले होते. 
विचारी नट असलेल्या अमीर खान यांना परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग का शोधता
आला नाही, याचे उत्तर हेमंत देसाई यांनी द्यावे ! 
(म्हणे) अमीर खान विचारी आणि सुसंस्कृत नट ! - हेमंत देसाई 
१. अमीर यांचे विधान नक्कीच आततायी नाही. अमीर एक विचारी आणि सुसंस्कृत नट आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करतांना टीकाकारांनी विवेक ठेवावा. (असहिष्णुतेच्या नावाखाली कांगावा करणे आणि देशातील वातावरण बिघडवणे, याला अमिर खान यांचा सुसंस्कृतपणा म्हणायचा का ? विवेकाचे भान कुणाला आहे आणि कुणाला नाही, हे कळण्यास जनता सूज्ञ आहे ! - संपादक) अमीर यांना असे का वाटते, याची आपण चिंता करायला हवी. 
२. हिंदी चित्रपटसृष्टीने आतापर्यंत निधर्मी भूमिका वठवली आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
३. शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी अमीर यांना देशद्रोही म्हटले. त्यावर देसाई म्हणाले की, अमीर यांना देशद्रोही म्हणणे हास्यास्पद आहे. त्यांना देशद्रोही म्हणणे म्हणजे आपण स्वतःला देशभक्त ठरवण्यासारखे आहे. (देशविरोधी वक्तव्ये करून देशात अशांती पसरवणे, हा देशद्रोह नव्हे का ? अशा देशविरोधी वक्तव्यांना विरोध करणे, हे देशभक्तीचेच लक्षण आहे, हेही राजकीय विश्‍लेषकांना न कळावे ! - संपादक) 
चर्चासत्रात निषेध करून राष्ट्ररक्षणाची भूमिका घेणारे श्री. गिरीश व्यास यांचे अभिनंदन ! 
अमीर खान यांच्या पत्नीच्या विधानाचा निषेधच ! - गिरीश व्यास 
१. अमीर यांच्या पत्नीने केलेले विधान बालीशपणाचे आहे. यासाठी त्यांचा निषेधच करायला हवा. अशा प्रकारे देशावर केली जाणारी टीका आम्ही कदापी सहन करणार नाही. 
२. समाज चुकीच्या मार्गाने जात असल्याने त्याला योग्य वळण देऊन कलाटणी देणे, हे कलाकाराचे दायित्व असते; मात्र सध्या तसे होतांना दिसत नाही. 
३. आज दादरी येथे घडलेल्या प्रकाराची चर्चा होते; मात्र नागपूर येथे गोहत्येला विरोध करणार्‍या आंदोलकाच्या हत्येची चर्चा होत नाही, हे देशाचे दुर्दैवच आहे. 
इतिहासाची स्वतःच मोडतोड केली असतांना इतिहास ठाऊक नसल्याचे 
खापर दुसर्‍यांवर फोडायचे, ही काँग्रेसची जुनी नीती ! 
(म्हणे) नरेंद्र सुर्वे यांना इतिहास ठाऊक नाही ! - राजू वाघमारे, काँग्रेस
१. नरेंद्र सुर्वे यांच्यासारख्या माणसांना उत्तरे देणे, हा आमच्या बुद्धीमत्तेचा प्रश्‍न आहे; कारण त्यांना इतिहासच ठाऊक नाही. ते बराच वेळ बडबडत होते. मी सहिष्णु आहे; म्हणून त्यांची बडबड ऐकून घेतली. 
२. मोदी शासन आल्यापासून वातावरणात पालट झाला आहे. असुरक्षित वातावरणामुळेच साहित्यिक पुरस्कार परत करत आहेत. 
मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाची झळ अमीर यांना कधी पोहोचली होती का ? 
- मनीषा कायंदे, शिवसेना
१. अमीर यांनी केलेल्या विधानासाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला जावा. 
२. मुंबईवर वर्ष २००८ मध्ये आतंकवादी आक्रमण झाले; मात्र त्याची झळ अमीर किंवा त्यांची पत्नी यांना कधीतरी पोहोचली होती का ? हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नीने असुरक्षिततेच्या संदर्भात विधान केले असते, तर ते काही अंशी सयुक्तिक ठरू शकले असते. त्यामुळे अमीर आणि त्यांची पत्नी यांच्या विधानाचा निषेधच करायला हवा. 
(म्हणे) नरेंद्र सुर्वे यांच्यासारखे दंगल करत होते ! - राजू वाघमारे यांचा आरोप
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर दंगल घडवण्याचा नाहक आरोप करणारे राजू वाघमारे यांच्या 
या विधानाविषयी हिंदु जनजागृती समिती अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !
      नरेंद्र सुर्वे म्हणाले, काँग्रेसच्या काळातच हिंदूंना भीतीचे वातावरण होते. त्या काळातच अधिक दंगली झाल्या. यावर काँग्रेसचे राजू वाघमारे चिडून म्हणाले, त्या काळात दंगल करणारे बाहेर होते; म्हणून अधिक दंगली झाल्या. आता दंगल करणार्‍यांच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे त्या बंद झाल्या आहेत. नरेंद्र सुर्वे यांच्यासारखे दंगल करणारे तेव्हा सत्तेबाहेर होते. दंगली घडवणार्‍यांंनीच पाकमध्ये जावे. तुम्ही केलेल्या आरोपांविषयी तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, असे सुर्वे यांनी वाघमारे यांना विचारले; मात्र काँग्रेसचे आजवरचे धोरणच पळपुटे असल्याने त्यांनी उत्तर देणे टाळले. (काँग्रेसच्या राज्यात दंगली कोणी घडवल्या आणि त्यांना प्रोत्साहन कोणाकडून मिळत होते, हे जनतेने ओळखले होते; म्हणूनच काँग्रेसच्या कारभाराला कंटाळूनच जनतेने निवडणुकीत तिला धडा शिकवला आहे, याचा वाघमारे यांना विसर पडला कि काय ? - संपादक) 
      दंगल घडवणार्‍यांच्या संदर्भात राजू वाघमारे यांनी केलेले विधान परत घ्यावे, अशी मागणी श्री. गिरीश व्यास यांनी केली; मात्र वाघमारे यांनी त्या मागणीलाही न जुमानता विषयांतरच केले. त्या वेळी श्री. व्यास म्हणाले, अशी विधाने करणार्‍यांकडून आम्हाला देशभक्तीची पावती मुळीच नको. 
वाचक प्रतिक्रिया 
अमीर खान याचे वक्तव्य म्हणजे कृतघ्नपणाचा उत्कृष्ट नमुनाच ! - मधुकर ताटके, गोरेगाव 
      आज आवडत्या (?) अभिनेत्याला अनेकांनी (भोळसटांनी) डोक्यावर चढवून ठेवले, भरभरून प्रेम दिले; मात्र त्याने जाहीररित्या केलेले वक्तव्य म्हणजे कृतघ्नपणाचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. पत्नीने लाखमोलाचा सल्ला दिल्यावर त्याची अंमलबाजवणी करण्याचे सोडून अमीर तूू अजूनही येथे कसा ? भारतियांनी त्याला काय दिले नाही ? अमीर खानचे हे विधान म्हणजे देशद्रोहच आहे. योग्य त्या कार्यवाहीसाठी त्याची गांभीर्याने नोंद घेणे इष्ट ठरेल. अमीर खान याने आपले खायचे दात दाखवलेच ! 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn