Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा !

    सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे पूजकाचा भक्तीभाव वाढवण्यासाठी उपयुक्त असा अमूल्य ठेवा आहे, याची प्रचीती अनेकांनी घेतली आहे. या चित्रांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सनातन संस्थेने या चित्रांचे मालकी अधिकार (कॉपीराईट) घेतले आहेत.
१. साधकांना या चित्रांचा वापर फेसबुक, संकेतस्थळ वा अन्य कलाकृती अशा ठिकाणी करायचा असल्यास त्या चित्राच्या खाली ‘कॉपीराईट’च्या चिन्हासह ‘सनातन-निर्मित चित्र’ असे छापावे.
२. समाजात अनेक ठिकाणी सनातन-निर्मित देवतांची चित्रे सनातन संस्थेच्या पूर्व अनुमतीशिवाय वापरली जातात. यात व्यावसायिक, नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळ, फेसबुक आदींचा समावेश आहे. असे कोणी करत असल्याचे आढळल्यास त्यांना ‘सूत्र १’ विषयी सांगावे.
३. प्रबोधन केल्यानंतरही फेसबुक, संकेतस्थळ वा अन्य कलाकृती अशा ठिकाणी घेतलेल्या सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांखाली ‘कॉपीराईट’च्या चिन्हासह ‘सनातन-निर्मित चित्र’ असे छापलेले नसल्यास मात्र सनातन संस्थेला अशा संबंधित व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यास भाग पडेल. अशी कायदेशीर कारवाई करता येण्यासाठी पुढील गोष्टी करा  -
अ. आस्थापनेचे नाव, पत्ता आदी माहिती पुढील पत्त्यावर कळवावी.
आ. सनातन-निर्मित देवतांची चित्रे कोठे विनाअनुमती छापलेली आढळल्यास त्याच्या ४-५ प्रती पाठवाव्यात.
इ. ही चित्रे एखादे संकेतस्थळ किंवा फेसबुक यांवर ठेवलेली असल्यास ते पान स्वतःजवळ संरक्षित करून ठेवावे, तसेच त्याची दिनांक अंतर्भूत असलेली प्रतही कोर्‍या कागदावर काढून ठेवावी. ही मार्गिकाही (लिंकही) पुढे दिलेल्या इ-मेल पत्त्यावर पाठवून द्यावी.
ई. एखाद्या दूरचित्रवाहिनीवर ही चित्रे दाखवली जात असल्यास त्याविषयी त्वरित कळवावे, जेणेकरून तो कार्यक्रम ध्वनीचित्र-मुद्रित करून घेणे शक्य होईल.
    अशा प्रकारे माहिती पाठवल्यास सनातन-निर्मित देवतांचा चित्रांचा कायदाबाह्य वापर करणार्‍या घटकांवर कायदेशीर कारवाई करणे सोपे होईल.
नाव : श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर
पत्ता : सनातन आश्रम, सनातन संकुल, पोस्ट- ‘ओएन्जीसी’, देवद, तालुका पनवेल, रायगड - ४१० २२१
भ्रमणभाष क्रमांक : ९३२४३५१५८०
इ-मेल : ssvirendra@gmail.com
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn