'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

‘फेसबुक’वर अनावश्यक वेळ वाया घालवण्यापेक्षा त्या माध्यमाद्वारे परिणामकारक धर्मप्रसार करण्याला प्राधान्य द्या !

 सध्या संस्थेच्या बर्‍याच साधकांचे ‘फेसबुक’ आणि अन्य सोशल नेटवर्विंâग संकेतस्थळांवर खाते आहे. ते यांवर प्रतिदिन अथवा आठवड्यातून काही वेळा विविध विषयांवरील माहिती प्रसारित करतात. तरी साधकांनी या संकेतस्थळांवरून अनावश्यक माहिती प्रसारित करण्यात, तसेच ते एकमेकांना संगणकीय पत्त्याद्वारे पाठवण्यात आणि त्याविषयी संगणकावर संभाषण (चॅटिंग) करण्यात आपला अमूल्य वेळ दवडू नये. आपल्याकडे बरेच अध्यात्मशास्त्रीय लिखाण प्रसारासाठी उपलब्ध आहे, त्याचा संगणकाद्वारे परिणामकारक प्रसार करण्याला प्राधान्य द्यावे.


‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’ यांसारख्या विविध सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर सेवा करू इच्छिणार्‍यांना अध्यात्मप्रसाराची सुवर्णसंधी !
    सध्या संकेतस्थळांमाध्यमातून अध्यात्मप्रसाराचे कार्य मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपण संकेतस्थळांवरून सनातन-निर्मित ग्रंथांतील लिखाणाचा व्यापक स्तरावर प्रसार करत आहोत. यासाठी ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ आणि अन्य विविध सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे यांची माहिती असणार्‍या अन् प्रसार करू शकणार्‍या साधकांची आवश्यकता आहे. जे यात सहभागी होऊ इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांद्वारे पुढील संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा. येणार्‍या आपत्काळात शीघ्र गतीने अध्यात्मप्रसार करण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घेऊया !
संपर्क करतांना आपली माहिती पुढीलप्रमाणे द्यावी.
१. नाव, दूरभाष क्रमांक, संगणकीय पत्ता, घरी माहितीजाल (इंटरनेट) जोडणी आहे का ?
२. आपण (प्रतिदिन / आठवड्यातून) किती वेळ देऊ शकतो ?
संगणकीय पत्ता : websiteseva@gmail.com


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi