Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आध्यात्मिक उपाय

     महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितलेल्या उपायांच्या जोडीला पुढील उपायही करावेत. उपायांच्या एकूण कालावधीतील ३० टक्के वेळ पुढे दिलेल्या उपायांना द्यावा आणि ७० टक्के वेळ महर्षींनी सांगितलेला ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जप करण्यासाठी द्यावा.

१. सर्वांनी करावयाचे उपाय 

१ अ. विविध चक्रांवर लावावयाची देवतांची चित्रे : देवतेचे चित्र शरिराला स्पर्श करून बाहेरच्या दिशेने मुख करून (निर्गुण) ठेवायचे कि आतल्या दिशेने मुख करून (सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी नामपट्टीचा उपयोग करावा. 

टीप १ - पुढे म्हणजे शरिराचा पुढचा भाग (चक्राशी संबंधित भाग)

टीप २ - पाठी म्हणजे शरिराचा पाठचा भाग (चक्राशी संबंधित भाग)

१ आ. जप (जाता-येतांना किंवा उपाय करण्याची आवश्यकता नसल्यास करावयाचा जप) : ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ॥

१ इ. मुद्रा (जाता-येतांना किंवा उपाय करण्याची आवश्यकता असल्यास करावयाची मुद्रा) : तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे

१ ई. न्यास : मुद्रा केलेल्या एका हाताने विशुद्धचक्रावर आणि दुसर्‍या हाताने मणिपूरचक्रावर

२. व्यक्तीगत व्यष्टी साधना

      त्रास असणार्‍या साधकांनी व्यष्टी साधनेसाठी आवश्यक तो नामजप करावा.

- परात्पर गुरु डॉ. आठवले
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn