साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् हिंदु धर्माभिमानी यांना विनम्र आवाहन !
सद्यस्थितीत हिंदु धर्मावर सर्वच बाजूंनी आघात होत आहेत. या कठीण काळात हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरण करायला लावणारी आणि त्यांच्यावरील आघातांना वाचा फोडणारी छापील आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहेत. बहुतांश वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या साम्यवादी विचारांच्या प्रभावाखाली अथवा खिस्तीधार्जिण्या आहेत. त्यामुळे हिंदूंना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठच नाही. ‘धर्म वाहिनी’च्या माध्यमातून हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सनातन संस्थेचा प्रयत्न आहे.
समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत दैनिक प्रतिदिन पोहोचवणे अशक्य !
आज दैनिक ‘सनातन प्रभात’ हे आर्थिक हानी सोसून आणि हिंदुद्वेष्ट्या शासनाची दडपशाही झुगारून देऊन गेली १२ वर्षे हिंदूंना अविरत धर्मशिक्षण देणारे एकमेव दैनिक आहे. हे केवळ आपणा सर्वांचे प्रेम, या नियतकालिकाची सेवा करणार्या साधकांचा त्याग आणि प.पू. डॉक्टर आठवले यांच्यासारखे द्रष्टे संत अन् ईश्वर यांच्या आशीर्वादानेच शक्य झाले आहे.
असे असले, तरी समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीपर्यंत एक वृत्तपत्र पोहोचवण्यात अर्थिक पाठबळ, मनुष्यबळ आदी अनेक मर्यादा येतात. तसेच एखादे वृत्त तातडीने पाहोचवणेही कठीण जाते. वृत्त वाहिनीच्या माध्यमातून मात्र वृत्त तात्काळ समाजापर्यंत पोहोचवता येते. त्याचबरोबर दूरचित्रवाणी वाहिनी समाजात वृत्तपत्राच्या अनेक पटींनी धर्मप्रसारात साहाय्यक ठरू शकेल.
राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठीच ‘धर्म वाहिनी’ची निर्मिती !
हिंदु धर्मावर होणार्या आघातांना वाचा फोडणे, सनदशीर मार्गाने हिंदूंचे संघटन करून हिंदूंवरील आघात रोखणे आणि हिंदूंना धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी बनवणे, राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी त्यांना कृतीशील बनवणे, असे उच्चतम ध्येय बाळगलेल्या या वाहिनीवर करमणुकीच्या उथळ आणि समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या विरोधात असलेल्या कार्यक्रमांना अजिबात स्थान नसेल.
वाहिनीचे कार्यक्षेत्र आणि इतर माहिती !
१. या वाहिनीचे कार्यक्षेत्र प्रारंभी महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्ये असतील.
२. वाहिनी जितके तास चालवली जाईल त्यातील ५० प्रतिशत वेळ राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात अन् त्यावरील उपाय यांसाठी, तर उरलेला ५० प्रतिशत वेळ धर्मशिक्षण यांसाठी दिला जाईल.
३. या वाहिनीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचीही आवश्यकता भासणार आहे. (ध्वनीचित्रीकरण चित्रक (कॅमेरा) हाताळू शकणारे, पत्रकारितेचा अनुभव असणारे, निवेदक, संपादक अशा विविध कुशल साधकांची आवश्यकता भासणार आहे.)
४. वाहिनीसाठी आर्थिक पाठबळही मोठ्या प्रमाणावर लागणार आहे.
५. वाहिनी चालू करण्याच्या दृष्टीने कोणाकडे काही उपयुक्त माहिती असल्यास त्यांनी ती खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावी. (यामध्ये वाहिनीसाठी येणारा खर्च, त्यासाठी सिद्ध करावी लागणारी कागदपत्रे, वाहिनीचे कार्यक्षेत्र कसे असावे, वितरण व्यवस्था कशी असावी आदी माहितीचा समावेश असेल.)
एक वाहिनी चालू करणे म्हणजे शिवधुष्य उचलण्यासारखे आहे; मात्र आपण सर्व जण मिळून संत आणि ईश्वर यांच्या आशीर्वादाने ते निश्चित पेलू, याची खात्री बाळगावी !
संपर्कासाठी पत्ता : dspgoa1@gmail.com
सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१