Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. परशराम पांडेमहाराज यांचा आज वाढदिवस

४ आतंकवादी ठार, तर १ मेजर आणि २ सैनिक हुतात्मा !

  • केवळ भाषणबाजी करण्याने पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट होत नाही, हे प्रतिदिन भारतीय सैनिकांच्या हुतात्मा होण्याच्या घटनेवरून तरी संरक्षणमंत्र्यांच्या लक्षात येणार आहे का ?
  • सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्यावरून स्वतःची पाठ थोपटून घेत बसण्यापेक्षा पाककडून होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील आक्रमणे ठोस पावले उचलून रोखावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे !
  • जम्मू येथील सैन्याच्या छावणीवर आतंकवादी आक्रमण
  • सांबा येथे २ आतंकवादी ठार ! 
        श्रीनगर - जम्मूतील नगरोटा येथे सैन्याच्या छावणीवर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १ मेजर आणि २ सैनिक हुतात्मा झाले, तर काही सैनिक घायाळ झाले आहेत. सैनिकांनी या वेळी ४ आतंकवाद्यांना ठार केले. २९ नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे आक्रमण करण्यात आले. आतंकवाद्यांनी आधी ग्रेनेड फेकले आणि नंतर गोळीबार केला. येथे छावणीच्या परिसरात हे आतंकवादी लपून बसले होते. जम्मूपासून २० किलोमीटर अंतरावर नगरोटा भाग आहे. सैन्याच्या १६ व्या कोअरचे मुख्यालय येथे आहे. 
हुतात्म्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघे ! 
        हुतात्मा झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील पंढरपूर येथील मेजर कुणाल मुन्ना गोसावी (वय २८ वर्ष) आणि नांदेड येथील सैनिक संभाजी यशवंत कदम (वय ३५ वर्षे) यांचा समावेश आहे. 

बांगलादेशात धर्मांधांनी २ मंदिरांना आग लावली !

भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना 
यांना लज्जास्पद ठरणार्‍या घटना ! बांगलादेशातून हिंदूंचा 
संपूर्ण वंशसंहार होण्याची तेथील धर्मांध जशी वाटत 
पहात आहेत, तशी भारत सरकार वाट पहात आहे का ?
        ढाका - बांगलादेशात होबिगांज जिल्ह्यातील बुल्ला या गावी असलेल्या बाराबराई मंदिराला २७ नोव्हेंबर या दिवशी रात्री धर्मांधांनी आग लावल्याने मंदिराची आणि मूर्तींची मोठी हानी झाली. त्याच रात्री श्री. अमरेंद्र रॉय यांच्या दुर्गा मंदिरालाही आग लावण्यात आली.
        बराबराई मंदिराला लागलेली आग अग्नीशमन दलाने विझवली. याआधी ३० ऑक्टोबर या दिवशी इस्कॉनच्या मंदिराला आग लावण्यात आली होती. त्याविषयी मंदिराच्या सेवकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या प्रकरणी २०-२५ धर्मांधांची नावे देण्यात आली होती. स्थानिक राजकीय नेत्यांनी मंदिर सेवकावर दबाव आणून ती तक्रार मागे घेण्यास सांगितले होते; मात्र सेवकाने तसे करण्यास नकार दिल्याने सूडापोटी बराबराई मंदिराला आग लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

२० वर्षांचा मुसलमान मुलगा आणि १९ वर्षांची हिंदु मुलगी यांना लिव्ह इन रिलेशनमध्ये रहाण्यास गुजरात उच्च न्यायालयाची अनुमती !

अशा अनुमतीमुळे आता प्रत्येक जण 
विवाहाचे वय पूर्ण होण्यापूर्वीच लिव्ह इन 
रिलेशनशीपमध्ये रहाण्याचा प्रयत्न करतील !
        कर्णावती - गुजरात उच्च न्यायालयाने २० वर्षांचा मुसलमान तरुण आणि १९ वर्षांची हिंदु तरुणी यांना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहाण्याची अनुमती दिली आहे. न्यायालयाने त्या मुलाला तो २१ वर्षांचा झाल्यावर तिच्याशी विवाह करील, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यास सांगितल्यानंतर हा निर्णय दिला आहे. 
१. शाळेत असतांना या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि त्यांनी धर्म न पालटताच विवाह करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र वय पूर्ण नसल्याने त्यांनी जुलै महिन्यात मैत्री करारासाठी अर्ज केला. गुजरातमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशीपला औपचारिक रूप देण्यासाठी हा करार केला जातो. 
२. जुलैमध्ये हा अर्ज करून ते एकत्र रहात होते. सप्टेंबर महिन्यात मुलीच्या आई-वडिलांनी तिला त्यांच्याबरोबर नेले. यानंतर मुलाने उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका (एखाद्याला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्याकरता केलेली याचिका) दाखल केली. तिला तिच्या पालकांनी तिच्या इच्छेविरुद्ध स्थानबद्ध केले आहे, असे सांगत तिला मुक्त करण्याची मागणी या याचिकेत त्याने केली. 

बुखारी ‘शाही इमाम’ असल्याचा लाभ उठवू शकत नाही ! - न्यायालय

      देहली - जामा मशिदचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांच्या विरोधातील गुन्हेगारी प्रकरण रद्दबातल करण्यास स्थानिक न्यायालयाने नकार दिला. ‘बुखारी एका मशिदीचे प्रमुख असल्याचा लाभ उठवू शकत नाहीत आणि धार्मिक तणावाच्या आडून न्यायालयाच्या सामर्थ्यापासून पलायनही करू शकत नाही’, असे स्थानिक न्यायालयाने सुनावले.
     ‘बुखारी यांना ‘झेड प्लस’ संरक्षण आहे, तसेच त्यांना सुनावणीला उपस्थित रहावे लागल्यास तणाव निर्माण होऊ शकतो’, असे कारण बुखारी यांच्या अधिवक्त्याने न्यायालयासमोर युक्तीवाद करतांना सांगितले. हा युक्तीवाद फेटाळतांना न्यायालयाने ‘नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हेही आरोपी म्हणून न्यायालयात उपस्थित राहिले’, असे लक्षात आणून दिले. वर्ष २००१मध्ये सरकारी अधिकार्‍यांशी कथित मारहाण करणे आणि सार्वजनिक संपत्तीची हानी पोचवल्या प्रकरणी शाही इमाम यांच्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश लोकेशकुमार शर्मा यांच्या न्यायालयात खटला चालू आहे.

निधर्मी शासनव्यवस्थेत चर्च, मशीद नव्हे; तर सरकार केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे ! - गोविंद चोडणकर

सावईवेरे (गोवा) येथे हिंदु धर्मजागृती सभेला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
 श्री गोविंद चोडणकर
     सावईवेरे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - एकही चर्च, मशीद सरकारच्या कह्यात नाही; मात्र हिंदूंची मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. आमच्या मंदिरातील पैसा सरकार अल्पसंख्यांकांवर उधळत आहे. या निधर्मी राज्यव्यवस्थेत अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जात आहे आणि हिंदूंचे शोषण होत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी श्री अनंत देवस्थान सभामंडप, सावईवेरे, फोंडा, गोवा येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलतांना केले.
     या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर, सनातन संस्थेच्या सौ. आनंदी वानखडे उपस्थित होत्या. शंखनाद आणि वक्त्यांच्या हस्ते झालेल्या दीपप्रज्वलनाने सभेला प्रारंभ झाला. श्री. पंकज बर्वे आणि श्री. पवन बर्वे यांनी वेदमंत्रपठण केले. श्री. श्रीकांत शेट वेरेकर आणि माजी शिक्षक, पत्रकार अन् जिल्हा पंचायत सदस्य श्री. मोहन वेरेकर या धर्माभिमान्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. राहुल वझे आणि कु. सुमेधा पाटील यांनी केले.

हिंदूंच्या पतनाकडे संत समाजाने लक्ष द्यावे ! - गिरीराज सिंह, नेते, भाजप

      वल्लभगड (हरियाणा) - आज संपूर्ण देश जातींमध्ये विभागला गेला आहे. आजही देशात काही समाजघटकांना मंदिरात जाण्यापासून थांबवण्यात येते, तसेच त्यांना सामूहिक अन्नदानापासून लांब ठेवण्यात येते. त्यामुळे धर्मांध लोक गरीब हिंदूंना प्रलोभन देऊन त्यांचे धर्मांतर करत आहेत. देशात ८ राज्यांतील हिंदूंची संख्या लागोपाठ घटत आहे. त्यामुळे हिंदूंच्या पतनाकडे संत समाजाने लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी येथील सेक्टर-२ येथे सनातन हिंदू वाहिनीच्या वतीने आयोजित हिंदु समरसता संमेलनात केले. या वेळी जग्दगुरु रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्य महाराज, जग्दगुरु शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद, महामंडलेश्‍वर यतीद्रानंद महाराज, स्वामी यति नरसिंहानंद सरस्वती आदी संतगण उपस्थित होते. ‘जनता राममंदिराची मागणी करत आहे; परंतु देशात रामभक्तच नसेल, तर राममंदिर कसे होईल ?, असा प्रश्‍नही सिंह यांनी या वेळी केला.

अमेरिकेतील वॉर्नर ब्रदर्स आणि सीबीसी कॉर्पोरेशनकडून सूर्यदेवाचे विडंबन

  • अमेरिकेतील हिंदूंप्रमाणे भारतातील किती हिंदू देवतांच्या विडंबनाला विरोध करतात ?
  • दूरदर्शन मालिकेत सूर्यदेवाला खलनायकाच्या रूपात दाखवले !
     नेवाडा (अमेरिका) - वॉर्नर ब्रदर्स आणि सीबीसी कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे चालू असलेल्या ‘दि फ्लॅश’ या दूरदर्शन मालिकेत हिंदूंची देवता सूर्यदेवाला खलनायकच्या भूमिकेत दाखवण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी ‘सीडब्लू नेटवर्क’कडे क्षमायाचनेची मागणी केली आहे.
     या विडंबनाविषयी अमेरिकेतील हिंदु नेते श्री. राजन झेद म्हणाले, ‘‘हिंदूंच्या देवता या दैवी आहेत. त्यांच्याशी संबंधित अशा कोणत्याही कलाकृतीचे शास्त्रांंमध्ये वर्णन केल्याप्रमाणे केलेले प्रदर्शन आम्हाला स्वीकार्य आहे; परंतु हिंदु देवता, त्यांच्या संकल्पना, शास्त्र यांच्याविषयी व्यावसायिक अथवा अन्य कोणतीही चर्चा होता कामा नये; कारण त्यांच्यामुळे हिंदूंची मने दुखावली जातात. हिंदूंच्या देवतांचे स्थान मंदिरात आणि घरातील देवघरात असते, जिथे त्यांची पूजा केली जाते. त्यांना अशा तर्‍हेने अकारण कोणत्याही विडंबनात्मक स्वरूपात दाखवण्याची मुभा कोणलाही घेता येऊ शकत नाही. हिंदु धर्म हा अतिप्राचीन आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मोठा धर्म आहे. सुमारे १ अब्ज लोक त्याचे अनुयायी आहेत. प्रगल्भ तत्त्वज्ञान असणार्‍या या धर्माला कोणीही क्षुल्लक मानू शकत नाही. कोणतीही श्रद्धा मग ती मोठी किंवा लहान असली, तरी तिचा अनादर होता कामा नये. सर्वांत प्राचीन अशा ॠग्वेदामध्ये, सूर्यदेवतेचा उल्लेख आहे. या सूर्यदेवतेला उद्देशून कितीतरी मंत्र, भजने, श्‍लोक आहेत.’’

महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या पुरुषांना नपुंसक करण्यात यावे ! - मीरा जॅसमिन, अभिनेत्री

बलात्कार्‍यांना केवळ नपुंसक केल्याने त्यांच्या मनातील तीव्र लैंगिक 
भावना नष्ट होणार नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण दिले 
पाहिजे. त्यामुळे समाज सद्वर्तनी बनेल आणि बलात्कारच नाही, तर इतरही गुन्हे घडणार नाहीत !
     कोच्चि (केरळ) - देशात महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या पुरुषांना शिक्षा करण्यासाठी एकमात्र कठोर मार्ग म्हणजे त्यांना नपुंसक करण्यात यावे, असे प्रतिपादन दक्षिणात्य अभिनेत्री मीरा जॅसमिन यांनी केले आहे. त्यांनी प्रसिद्ध अभिनेते अनुप मेनन आणि अलीकडेच पेरूमबावूर येथे कथितपणे बलात्कार केल्यानंतर हत्या करण्यात आलेल्या एका दलित मुलीच्या आईच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेला संबोधित केले.
     अभिनेत्री जॅसमिन म्हणाल्या, ‘‘सध्याचे कायदे अशा गुन्ह्यांशी दोन हात करण्यास पुरेसे नाहीत. जे महिलांवर लैंगिक अत्याचार करतात, त्यांनाही यातनामय शिक्षा मिळाली पाहिजे. जर अशा लोकांना यातनामय शिक्षा देण्यात आली, तर ते त्यांच्या जीवनात कोणत्याही महिलेला हात लावण्याचे पुन्हा धाडस करणार नाहीत.’’मृतदेह बर्फामध्ये जमा करण्याची न्यायालयीन लढाई १४ वर्षांच्या मुलीने जिंकली !

     लंडन - इंग्लंडमधल्या एका कर्करोगाने पीडित १४ वर्षांच्या मुलीने मृत्यूनंतर तिचा मृतदेह पुरण्याऐवजी ‘डीप फ्रिजर’मध्ये ठेवण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती. जेव्हा तिच्या आजाराचे औषध मिळेल त्या वेळी तिला पुन्हा जिवंत करता येईल, अशी त्यामागील तिची आशा होती. या प्रकरणात या मुलीच्या मृत्यूच्या ११ दिवस आधी न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल दिला. या मुलीचे नाव गुप्त राखण्यात आले आहे. ‘क्रायो प्रिझर्वेशन’मध्ये माणसाच्या मृत्यूनंतर २ ते १५ मिनिटांच्या आत ही प्रक्रिया चालू केली जाते. शरिरात रक्ताच्या गुठळ्या बनण्यापासून थांबवण्यासाठी विशेष प्रकारचे रसायन मृतदेहामध्ये भरले जाते. (मृत्यूनंतर मृतदेह टिकवून ठेवण्याची पाश्‍चात्यांची पद्धत अयोग्य आहे. त्यामुळे मृतात्म्याला पुढील गती मिळण्यात अडचण येते. - संपादक)

जगातील १० देशांमध्ये ‘कॅशलेस’ (रोकडरहित) व्यवहार मोठ्या प्रमाणात !

जगातील देशांचा व्यवहार ‘कॅशलेस’ (रोकडरहित) होत
असतांना रोख रकमेसाठी लढणारा भारत महासत्ता कसा होणार ?
     नवी देहली - केंद्र सरकारने १ सहस्र आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे जगात अनेक देश ‘कॅशलेस’ (रोकडरहित) व्यवहारांच्या दिशेने प्रगती करत आहेत, तर दुसरीकडे भारत रोख रकमेसाठी झगडत असल्याचे दृश्य दिसत आहे. अशाही स्थितीत भारतातच असे एक गाव आहे, जेथे नोटबंदीचा थोडाही प्रभाव पडलेला नाही. गुजरातमधील आकोदरा या गावात सर्व आर्थिक व्यवहारांसाठी भ्रमणभाष (मोबाईल), संगणक, ई-बँकिंग सेवांचा वापर करण्यात येत आहे. म्हणजे त्यांचे सर्व व्यवहार ‘कॅशलेस’ चालू आहेत. त्यामुळे भारतालाही त्याच दिशेने जाणे आवश्यक आहे. कॅनडामध्ये वर्ष २०१३ मध्ये नाण्याची निर्मिती बंद करण्यात आली असून त्याचे चलन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिवर्षी या देशाची अनुमाने ११ बिलियन डॉलर्सची (१ सहस्र १०० कोटी डॉलर्सची) बचत होत आहे. ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे स्वीडनमधील बँकांवरील दरोड्यांची प्रकरणे ३ वर्षांत ११० वरून १६ वर आली आहेत.
‘कॅशलेस’ व्यवहार करण्यात आघाडीवर असलेल्या 
देशांची सूची आणि कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण

अमेरिकेत मुसलमान समजून भारतियाला मारहाण !

भारतात एखाद्या अमेरिकन व्यक्तीला मारहाण केली असती, 
तर ती जागतिक घटना झाली असती !
     अमेरिका - रिपब्लिकन पक्षाचे डोनॉल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी स्थानापन्न झाल्यापासून अमेरिकेत अश्‍वेत आणि मुसलमान यांच्या विरोधात तिरस्काराची भावना वृद्धींगत झाल्याच्या विविध घटना घडत आहेत. पेनसिल्वेनिया राज्यात अशाच स्वरूपाची घटना नुकतीच घडली असून तेथे एका भारतियाला मुसलमान समजून मारहाण करण्यात आली.
      प्राप्त माहितीनुसार पेनसिल्वेनिया राज्यातील ‘रेड रॉबिन’ उपहारगृहात अंकुर मेहता त्यांच्या ‘टॅबलेट’वर काम करत असतांना त्यांच्यावर जेफ्री बुरगेस या व्यक्तीने आक्रमण केले, तसेच त्यांच्याविषयी अनुद्गारही काढले. या आक्रमणात मेहता गंभीर घायाळ झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

साक्षीदारांनी साक्ष फिरवणे भारतीय न्यायव्यवस्थेसाठी धोकादायक ! - सर्वोच्च न्यायालय

हिंदु राष्ट्रात साक्षीदार निर्भिडपणे साक्ष देऊ शकतील.
त्यामुळे खरा न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही !
     नवी देहली - साक्षीदारांनी साक्ष फिरवणे भारतीय न्यायव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. साक्षीदार साक्ष फिरवत असल्याने गुन्हेगारांना मिळणार्‍या शिक्षेचे प्रमाण अल्प झाले आहे. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांतील आरोपीही सुटतात. त्यासाठी साक्षीदारांना संरक्षण देण्यासाठी पुरेसे कायदे सिद्ध करणे आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 
      अलीकडच्या काळात काही उच्च वर्गियांच्या प्रकरणांमध्ये साक्षीदारांनी मोठ्या प्रमाणावर साक्ष फिरवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अनेक आरोपी सुटले आहेत. साक्षीदार न्यायव्यवस्थेचे डोळे आणि कान असतात. त्यांनी साक्ष पालटणे न्यायव्यवस्थेसाठी घातक आहे, असे मत एका हत्येच्या प्रकरणात सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए.के. सीकरी आणि अमिताभ रॉय यांच्या खंडपिठाने नोंदवले. साक्षीदारांना गुन्हेगारांकडून धमक्या दिल्या जात असल्याने ते साक्ष पालटतात; परंतु साक्षीदार पलटल्याने न्यायव्यवस्थेचे महत्त्व अल्प होते, असेही न्यायालय म्हणाले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्माभिमान्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात व्याख्यान

     चेन्नई - शहरातील तांबरम येथील सनातन संस्थेचे विज्ञापनदाते धर्माभिमानी श्री. श्रीधर राजमणीकम् यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आनंदप्राप्तीसाठी आध्यात्म’ या विषयावर व्याख्यान देण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी त्यांच्या व्याख्यानात नामजप आणि धर्माचरण यांविषयीचेही महत्त्व विशद केले. श्री. राजमणीकम् यांनी त्यांच्या वाढदिवसाला आलेल्या सर्व पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून ‘सनातन पंचांग’ दिले.

नलगोंडा (तेलंगण) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

बैठकीत मार्गदर्शन करतांना
श्री. चेतन जनार्दन आणि उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
     भाग्यनगर (हैद्राबाद) - तेलंगणच्या राजधानीचे शहर असलेल्या भाग्यनगरपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या नलगोंडा जिल्ह्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० नोव्हेंबरला क्रियाशील हिंदुत्वनिष्ठांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. स्थानिक स्तरावर राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित उपक्रम राबविण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समितीचे श्री. चेतन जनार्दन यांनी धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. 
क्षणचित्रे
१. स्थानिक धर्माभिमानी श्री. शिवा यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, तसेच त्यांना दोन धर्माभिमान्यांनी बैठकीच्या सिद्धतेसाठी साहाय्य केले.
२. ‘आयबीसी’ या स्थानिक दूरचित्रवाहिनीने या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली.

मुसलमानांच्या घुसखोरीमुळे जर्मन लोक ‘आपल्याच देशात परके’ !

     बर्लिन - मुसलमानांच्या घुसखोरीमुळे एक तृतियांश जर्मनांना त्यांच्याच देशात परके असल्यासारखे वाटत असल्याचे एका सर्वेक्षणाून समोर आले आहे. ‘फ्राइडरिच एलबट फाऊंडेशन’ या जहालमतवादी संघटनेचे अभ्यासक मिट्टे यांनी वाढता हिंसाचार, वेगवेगळ्या धार्मिक गटांमधील फूट, धर्माच्या नावाखाली चालू असलेले ध्रुवीकरण, लोकशाहीच्या संदर्भातील प्रचंड अविश्‍वास यांचा जर्मनीवर धोकादायक परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.

अलीबाबा’ आस्थापनाने हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेल्या ‘योग चटई’ संकेतस्थळावरून काढून टाकल्या !

हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाच्या विरोधातील आंदोलनाला यश !
     नेवाडा (अमेरिका) - संकेतस्थळावरून व्यापार करण्यास अग्रेसर असलेल्या चीनच्या ‘अलीबाबा’ आस्थापनाने हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेल्या ‘योग चटई’ची संकेतस्थळावरून विक्री चालवली होती. हिंदूंच्या देवतांच्या या विडंबनाच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी आंदोलन छेडताच सदर आस्थापनाने या योग चटया २४ घंट्याच्या आत संकेतस्थळावरून काढून टाकल्या. 
      ‘अलीबाबा’ आस्थापनाने या चटईंवर श्री गणेश, श्रीकृष्ण, शिव आणि विष्णु या देवतांची चित्रे रेखाटली होती. भूमीवर बसण्यासाठी वापरण्यात येणार्‍या या चटईर्ंवर देवतांची चित्रे रेखाटणे अयोग्य आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे हे विडंबन तातडीने रोखण्यात यावे, अशी मागणी हिंदूंनी केली होती. हिंदूंनी केलेल्या विरोधाला अनुसरून सदर आस्थापनाने संकेतस्थळावरील विक्री थांबवली आहे.

८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंतच्या बँक खात्यांचा तपशील सादर करा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 
भाजपचे आमदार-खासदार यांना आदेश !
         नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे आमदार आणि खासदार यांनी त्यांच्या ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीतील बँक खात्यांचा तपशील पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे १ जानेवारी २०१७ पर्यंत सादर करावा, असा आदेश दिला आहे. काळ्या पैशाच्या विरोधात लढा देण्यासाठी आणि आळा घालण्याच्या दृष्टीने शासन कटिबद्ध आहे. ८ नोव्हेंबरला ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याची घोषणा करण्यात आली होती. 
६ महिन्यांची माहिती 
मागा ! - केजरीवाल यांची मागणी 
         आता भाजपचे आमदार आणि खासदार यांनी ८ नोव्हेंबरपूर्वीच पैशांची विल्हेवाट लावली आहे. त्यांच्याकडे ८ नोव्हेंबरपूर्वीच्या ६ महिन्यांची माहिती मागितली पाहिजे. तसेच मोदी यांनी त्यांचे मित्र अंबानी, अदानी, पेटीएम्, बिगबाजार यांचीही खाती तपासावीत, अशी मागणी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. 

खलिस्तानी आतंकवादी हरमिंदरसिंह मिंटू कारागृहातून प्रतिदिन पाकमधील आयएस्आयच्या अधिकार्‍यांशी भ्रमणभाषद्वारे संपर्कात होता !

कारागृहाच्या व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराशिवाय 
कारागृहात अनागोंदी माजणे शक्य नाही. 
या व्यवस्थापनालाच कारागृहात पाठवा !
        नवी देहली - पंजाबच्या पतियाळा येथील नाभा कारागृहातून पळवून नेलेला आणि नंतर देहली येथे अटक करण्यात आलेला खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा (केएल्एफ्चा) खलिस्तानी आतंकवादी हरमिंदरसिंह मिंटू याच्या चौकशीतून काही माहिती समोर आली आहे. कारागृहात असतांना मिंटू प्रतिदिन भ्रमणभाषद्वारे पाकच्या आयएस्आय या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात होता. तो पुन्हा एकदा खलिस्तान लिबरेशन फ्रंट ही आतंकवादी संघटना उभारणार होता.
        यासाठी तो पाकमध्ये जाणार होता, असे त्याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे. 
        पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, हरमिंदर पाकच्या लाहोरमध्ये असलेला केएल्एफ्चा आतंकवादी हरमिंदर सिंह उपाख्य हैप्पी याच्या संपर्कात होता. कारागृहातून पळून गेल्यावर तो मुंबईमार्गे गोव्यात जाणार होता. तेथे त्याचा बांधकाम व्यावसायिक असलेला भाऊ रहातो. त्याच्याकडून पैसे घेऊन तो नेपाळला आणि तेथून मलेशियामार्गे जर्मनीत जाणार होता. जर्मनीतून तो त्याची संघटना उभी करणार होता. आयएस्आयच्या बांगलादेशी सदस्याने मिंटू याला थायलंडमध्ये ४ दिवस शस्त्रे चालवणे, बॉम्ब बनवणे आणि स्फोटके हाताळणे यांचे प्रशिक्षण दिले होते.

गेल्या २८ दिवसांत ५६४ नक्षलवाद्यांची शरणागती !

नोटाबंदीचा परिणाम !
       नवी देहली - गेल्या २८ दिवसांत ५६४ नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक यांनी शरणागती पत्करली आहे. यामागे सुरक्षादलांचा दबाव आणि नोटाबंदीचा निर्णय ही मुख्य कारणे असल्याचे म्हटले जात आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर यातील ४६९ नक्षलवादी शरण आले आहेत. आतापर्यंतच्या इतिसहासात एका महिन्यात इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवादी कधीही शरण आले नव्हते. नोटाबंदीमुळे नक्षलवादी शस्त्रे, स्फोटके, औषधे आणि अन्य जीवनावश्यक साहित्य खरेदी करू शकत नसल्याने त्यांना शरणागती पत्करावी लागली, असे म्हटले जात आहे. २०११ पासून १५ नोव्हेंबर २०१६ या ५ वर्षांत ३ सहस्र ७६६ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. यावर्षी १ सहस्र ३९९ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. ही गेल्या ६ वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे. 

मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी अल-कायदाशी संबंधित ४ आतंकवाद्यांना अटक !

       चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २२ अतीमहनीय व्यक्तींच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी अल कायदाशी संबंधित ४ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांना चेन्नई आणि मदुराई येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातील दाऊद सुलेमान (वय २३ वर्षे) हा टीसीएस् आस्थापनात सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. अब्बास अली (वय २७ वर्षे) हा मदुराईत रंगकाम करतो. सॅमसम करीम राजा हा वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. त्याचे मदुराईत मटणाचे दुकान आहे. एम्. अयुब अली (वय २५ वर्षे) हा कर्णबधीरांना साहाय्य करणार्‍या आस्थापनात कर्मचारी आहे. पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी घातलेल्या छाप्यातून दोघे पळून गेले आहेत. पळून गेलेले दोघे तमिळनाडूने १९९८ मध्ये बंदी घातलेल्या अलउमाह या संघटनेचे सदस्य होते. या चौघांच्या टोळीवर दक्षिण भारतातील न्यायालयांच्या परिसरात ५ स्फोट घडवल्याचा आरोप आहे.

नगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेले यश म्हणजे जनतेने पंतप्रधानांच्या निर्णयाला दिलेला कौल ! - मुख्यमंत्री

     मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - नवीन घर बांधायचे झाले, घराला रंग काढायचा झाला, तर थोडीतरी असुविधा होतेच. त्याप्रमाणे देशात परिवर्तन घडवायचे असेल, तर थोडा त्रास सहन करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात परिवर्तन घडवून आणतील, याचा विश्‍वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. नगरपालिका निवडणुकीत जनतेने भाजपला मत देऊन भाजपवर विश्‍वास दाखवला आहे. भाजपला मिळालेले यश म्हणजे जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला दिलेला कौल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. नगरपालिका निवडणुकीनंतर भाजपला मिळालेल्या विजयाविषयी माहिती देण्यासाठी २९ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

काळा पैसा पांढरा करून देणार्‍या दलालांच्या टोळ्या कार्यरत !

केवळ नोटाबंदीच्या निर्णयाने नव्हे; 
तर नैतिकतेचे शिक्षण दिल्यासच भ्रष्टाचार रोखता येईल ! 
     मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - नोटाबंदीच्या निर्णयानंतर शहरात ठिकठिकाणी काळा पैसा पांढरा करणार्‍या दलालांच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. हे दलाल ६०:४० प्रतिशत असा व्यवहार करतात. १ लक्ष रुपयांमागे ४० सहस्र रुपये दलालाला आणि ६० सहस्र रुपये पैसे देणार्‍याला असा व्यवहार होत आहे. दलालाला रक्कम दिल्यानंतर ५ घंट्यांपर्यंत पैसे देणार्‍याला व्यवहारानुसार रक्कम दिली जाते. रक्कम तातडीने हवी असल्यास दलाल रकमेतील ५० प्रतिशत इतका भाग घेतो.

बँकेतून आठवड्याला आता २८ सहस्र रुपये काढू शकता !

       मुंबई - सध्याच्या आठवड्यात बँकेच्या खात्यातून २४ सहस्र रुपये काढण्याच्या मर्यादेत वाढ करून ती आता २८ सहस्र रुपये करण्यात आली आहे. मात्र यासाठी बँकेत नव्या चलनातील नोटा जमा कराव्या लागतील. २९ नोव्हेंबरपासून नव्या नोटा जमा करणार्‍यांना हा लाभ मिळणार आहे. जुन्या नोटा भरणार्‍यांसाठी २४ सहस्र हिच मर्यादा रहाणार आहे. 
नोटाबंदीनंतर आतापर्यंत 
 ८ लाख ४५ सहस्र कोटी रुपये जमा !
       ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय लागू झाल्यापासून म्हणजेच १० नोव्हेंबरपासून २७ नोव्हेंबरपर्यंत बँकांमध्ये ८ लाख ४५ सहस्र कोटी रुपये जमा झाले आहेत. त्याच वेळी लोकांनी २ लाख १६ सहस्र कोटी रुपयांची रोकड बँक खात्यातून काढली आहे. रिझर्व्ह बँकेने ही आकडेवारी घोषित केली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पथकरवसुली पूर्ण झाल्याने ती तातडीने कायमची बंद करावी ! - विवेक वेलणकर

३१ ऑक्टोबरलाच अपेक्षित पथकर वसुली पूर्ण ! 
जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन लक्ष घालून पथकरवसुली बंद करेल का ? 
     पुणे, २९ नोव्हेंबर -पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या उभारणीसाठी केलेल्या व्ययापोटी कंत्राटदार आयडियल रोड बिल्डर्स (आयआर्बी) आस्थापनाला वर्ष २०१९ पर्यंत एकूण २ सहस्र ८६९ कोटी रुपये पथकरवसुली करण्याचे अधिकार राज्य शासनाने दिले होते. त्या रकमेची पूर्ण वसुली ३१ ऑक्टोबर या दिवशीच पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्या मार्गावरील पथकर वसुली तातडीने बंद करावी, अशी मागणी माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली. 

आमची पिढी हा संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात आणल्याविना स्वस्थ बसणार नाही !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमावासियांना घ्यायला लावली शपथ ! 
     मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - आता निर्णायक पद्धतीने पाऊल उचलले पाहिजे. अन्यथा अशा अनेक पिढ्यान्पिढ्या हा लढा चालूच राहील आणि आपण सीमाभागातील कुंदा खात बसू. पुढच्या वेळेस मला आपल्या महाराष्ट्रातील कुंदा खायचा आहे. यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यासाठी शिवसेना साहाय्य करेलच. आज शपथ घ्यावी की, आमची पिढी हा संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात आणल्याविना स्वस्थ बसणार नाही. हा केवळ सीमावासियांचा लढा नाही, तर माझ्या मातृभाषेचा, माझ्या आईचा लढा आहे. त्या भावनेतून महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस तुमच्यामागे उभा आहे आणि पुढे आणखी प्रभावीपणे मागे उभा राहील, असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रुमख श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

हाजी अली दर्ग्यातील मजारीपर्यंत महिलांना प्रवेश !

मुसलमानांच्या महिला संघटनांनी आता तलाकपद्धत, 
बुरखापद्धत आदी जाचक प्रथांपासून त्यांच्या धर्मभगिनींची सुटका करावी ! 
     मुंबई - देशभरातून आलेल्या ८० महिलांनी २९ नोव्हेंबरला हाजीअली दर्ग्यातील मजारीपर्यंत प्रवेश केला. दोन वर्षांपूर्वी दर्ग्यातील मुख्य भागातील महिलांच्या प्रवेश करण्यावर लावण्यात आलेल्या प्रतिबंधाला भारतीय मुस्लिम महिला आंदोलानाने (BMA) आव्हान दिले होते. या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रतिबंध हटवण्याचा आदेश दिला. त्यानंतर या निर्णयाला दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला होता.

ब्राझीलच्या फुटबॉलपटूंचे विमान कोसळले !

     कोलंबिया - ब्राझीलमधील फुटबॉलपटूंसह ७२ प्रवाशांना घेऊन अमेरिकेला निघालेले एक विमान कोलंबियामध्ये कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. यात ब्राझीलमधील चॅपेकोन्स क्लबच्या फुटबॉल संघाचे खेळाडू होते.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर ४३८ पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
     कोल्हापूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी विशेष पथकाचे (एस्आयटीचे) अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी जिल्हा न्यायालयात सनातनचे साधक आणि संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर ४३८ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र प्रविष्ट केले आहे. सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. या प्रकरणी यापूर्वी सनातनचे साधक आणि संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

कर्नाटकातील रा.स्व. संघाचे स्वयंसेवक रुद्रेश यांना ठार करण्याचा कट २-३ महिन्यांपूर्वीच शिजला होता !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या 
हत्या झाल्यावर पुरोगामी, बुद्धीवादी, निधर्मी, 
लेखक आदी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
       बेंगळुरू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रुद्रेश यांची हत्या केल्याच्या प्रकरणी आसिम शरैफ, महंमद सादिक, महंमद मुजिबुल्लाह, वासिम अहमद आणि इरफान पाशों या ५ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत त्यांनी रुद्रेश यांच्या हत्येचा कट २-३ महिन्यांपूर्वीच रचला होता, अशी माहिती दिली आहे. तसेच रुद्रेश यांच्या हत्येला मुर्गी कट असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले. जशी कोंबडीची हत्या एकाच वारात तिची मान कापून केली जाते, तशाच प्रकारे ही हत्या करण्यात आल्याने तिला मुर्गी कट हा सांकेतिक शब्दप्रयोग वापरण्यात आला. या सर्व धर्मांधांना एकाच वारामध्ये व्यक्तीला ठार मारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. 
       हे सर्व धर्मांध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्डीपीआय) यांच्याशी संबंधित आहेत. त्यांना केरळ येथे प्रशिक्षित केल्याचे उघडकीस आले आहे.

राज्यात स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ !

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा गुन्हेविषयक अहवाल २०१५ 
तथाकथित पुरोगामी आणि स्त्री समानतेसाठी 
झटणार्‍या तृप्ती देसाई यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? 
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे ! 
     पुणे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - राज्यात स्त्री अत्याचाराचे गुन्हे वाढले असून वर्ष २०१५ मध्ये ३१ सहस्र १२६ गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. त्याचसमवेत स्त्रियांवरील दखलपात्र गुन्ह्यांंच्या संख्येत वाढ झाली असली, तरी गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. ते प्रमाण १९ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आर्थिक आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. वर्ष २०१५ मध्ये राज्यात १३ सहस्र ७३३ आर्थिक गुन्हे, तर सायबरविषयीचे २ सहस्र १९५ सायबर गुन्हे प्रविष्ट झाले. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी कृत्यातील सहभागही चिंताजनक आहे, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा गुन्हेविषयक अहवाल २०१५ यामधून पुढे आली आहे. (कायदा-सुव्यवस्था रसातळाला जाणे हे राज्यासाठी चिंताजनक ! ही स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासन आणि पोलीस प्रशासन कोणते कठोर प्रयत्न करणार ? - संपादक

कोल्हापूर येथील शिवसेनेचे आमदार श्री. प्रकाश अबिटकर यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण !

श्री. प्रकाश अबिटकर (उजवीकडे) यांना निमंत्रण देतांना कार्यकर्ते

     कोल्हापूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - येथे ११ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण शिवसेनेचे राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) येथील आमदार श्री. प्रकाश अबिटकर यांना देण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी येथील सनातन सेवाकेंद्रास सदिच्छा भेट देऊन हे निमंत्रण स्वीकारले. या वेळी समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. सचिन कौलकर यांनी श्री. अबिटकर यांना समितीने राबवलेल्या मोहिमांची माहिती दिली. 
     या वेळी श्री. अबिटकर यांनी विधानसभा अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांवरील विषय मांडू आणि त्यांना पाठिंबा देऊन सहकार्य करू, असे आश्‍वासन दिले.  

शुक्रवारी मदरसे बंद ठेवणार्‍यांवर कारवाई करणार ! - हिमंत बिस्व सरमा, शिक्षणमंत्री, आसाम

        गुवाहाटी - आसाममध्ये शुक्रवारी मदरसे बंद ठेवण्यात आल्यास, ते बंद ठेवणार्‍यांवर कारवाई केली जाईल. मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात येईल. भारतात केवळ रविवारच्या दिवशी साप्ताहिक सुटी असते. शुक्रवारी मदरसे बंद ठेवणे, हे कायद्याच्या विरोधात आहे. शुक्रवारी बंद ठेवण्यासाठी हा पाकिस्तान किंवा बांगलादेश नाही, अशा शब्दांत आसामचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी चेतावणी दिली आहे. सरमा पुढे म्हणाले की, शुक्रवारी दुपारी विद्यार्थी नमाज पठणात सहभागी होऊ शकतात. त्याला सरकारचा आक्षेप नाही; मात्र मदरसे बंद ठेवू नयेत.

नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने मारली बाजी !

      कोल्हापूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - नगरपालिका निवडणुकीत येथे मुरगूडसह पन्हाळा, मलकापूर, पेठवडगाव आणि कुरुंदवाड नगरपालिकेत मतदारांनी सत्तांतर घडवत प्रस्थापितांना घरी बसवले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.

सोलापूर येथे प्रबोधन आणि हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार या उद्देशाने सादर केलेल्या पथनाट्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

पथनाट्य सादर करतांना कार्यकर्ते आणि ते पहातांना नागरिक
     सोलापूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी घेण्यात येणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी होण्यासाठी चौकाचौकात प्रबोधनात्मक पथनाट्ये कार्यकर्त्यांकडून सादर करण्यात येत आहेत. त्यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पथनाट्यांमध्ये हिंदु धर्मावर होणारे आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता, तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाची आवश्यकता यांविषयी प्रबोधन करून प्रशिक्षणाचे प्रकारही दाखवण्यात येत आहेत. या वेळी हिंदूंना जागृतीपर आवाहनात्मक गीतही सादर करण्यात येते. २८ ठिकाणी पथनाट्ये सादर करण्याचे नियोजन केले आहे. पथनाट्यानंतर कोपरा सभा घेऊन सभेची माहिती देऊन धर्मसभेला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण !

श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांना
सभेचे निमंत्रण देतांना कार्यकर्ते

     कोल्हापूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - येथे ११ डिसेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांना देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते. शिरोली (पु) येथे २८ नोव्हेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त त्या तेथे आल्या होत्या. 
     या वेळी शिरोली (पु) ग्रामपंचायत समितीच्या सदस्या सौ. रूपाली खवरे उपस्थित होत्या. रामतीर्थकर यांनी 'हिंदु धर्माची संस्कृती' या विषयावर व्याख्यान केले. या वेळी श्री. दुसे यांनी कोल्हापूर येथील सभेला उपस्थित रहाण्याचे सर्वांना आवाहन केले. 

मुंबई येथे माय होम इंडियाच्या वतीने यंदाचा ७ वा ओ.एन्.इ. इंडिया पुरस्कार वितरण सोहळा साजरा !

     मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - माय होम इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या ७ वर्षांपासून ओ.एन्.इ. इंडिया पुरस्काराचे वितरण करण्यात येते. हा पुरस्कार उत्तर पूर्व भागातील राष्ट्रीयत्व टिकवण्यासाठी जे लोक प्रामाणिकपणे स्वत:च्या क्षेत्रात कार्यरत असतात, त्यांना देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार आसाम येथील डॉ. बिरुबाला राभा यांना समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते देण्यात आला. २३ नोव्हेंबरला दादर येथील वीर सावरकर स्मारक सभागृहात हा सोहळा साजरा झाला. या वेळी माय होम इंडियाचे संस्थापक श्री. सुनील देवधर हे उपस्थित होते.
      आसाममध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर बहिष्कार घालण्यात येतो. डॉ. राभा यांनी या विरोधात २०११ मध्ये मिशन बिरुबाला ही चळवळ उभारली. विविध क्षेत्रांतील मुलांचे, सामाजिक संस्थांचे साहाय्य घेऊन महिलांवरील हे अत्याचार थांबवण्याचे कार्य त्यांनी अवलंबले आहे.
      या वेळी माय होम इंडियाचे संस्थापक श्री. सुनील देवधर यांना सनातनने प्रकाशित केलेला हिंदु राष्ट्र का हवे? हा इंग्रजी भाषेतील ग्रंथ हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनी भेट दिला.
माय होम इंडियाचे राष्ट्रीय कार्य
     १. देशाच्या उत्तर पूर्व भागात जे भारतीय आहेत त्यांच्याकडे देशातील अन्य भागातील लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन निराळा असतो. या लोकांमध्ये तेही भारतीयच असल्याची भावना निर्माण करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.
     २. गेल्या ३ वर्षांपासून घर सोडून पळून गेलेल्या, हरवलेल्या किंवा अपहरण करण्यात आलेल्या मुलांना त्यांच्या घरी सुखरूप पोचवण्याचे कार्य ही संस्था करते.


संविधान दिनाच्या निमित्ताने पुण्यात संविधान सन्मान मूकमोर्चा

      पुणे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - संविधान दिनाचे औचित्य साधून येथे २७ नोव्हेंबरला संविधान सन्मान मूकमोर्चा पार पडला. डेक्कन जिमखाना येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मूकमोर्चाला प्रारंभ होऊन त्याची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. या वेळी निळे फेटे घातलेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अ‍ॅट्रॉसिटी कायदा संरक्षण, ओबीसी, अल्पसंख्यांक, आदिवासी आणि भटक्या विमुक्त यांच्या समस्या आणि महिलांचे प्रश्‍न या विषयांवर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, उपमहापौर मुकारी अलगुडे, राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड, रिपाइं नेते परशुराम वाडेकर, रिपाइं नगरसेवक सिद्धार्थ धेंडे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी मूकमोर्चामध्ये सहभाग घेतला.

महिलांनी स्वतः सक्षम होऊन प्रत्येक क्षेत्रात सहभागी व्हायला हवे ! - गिरीश बापट, पालकमंत्री

       पुणे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - सध्या लिंगपदसमभाव अर्थसंकल्पावर चर्चा करण्याआधी अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचे प्रकार कोणते, त्यांचे उपयोग यांविषयी समजून घेतले पाहिजे. समाजात अजूनही काही ठिकाणी विषमता आहे. स्त्रियांना अजूनही कष्ट भोगावे लागत आहेत. ते न्यून करण्यासाठी महाराष्ट्र शासन, तसेच केंद्र शासन प्रयत्न करत आहे. प्रत्येक व्यवस्थेसाठी महिला हीच केंद्रबिंदू असली पाहिजे. महिलांसाठी आरक्षण असले, तरी महिलांनी स्वतः सक्षम होऊन प्रत्येक क्षेत्रात सहभागी व्हायला हवे, असे प्रतिपादन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्टच्या सभागृहात राज्याच्या महिलाकेंद्री अर्थसंकल्पाच्या दिशेने - स्थिती आणि उपाय या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन २५ नोव्हेंबर या दिवशी करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.


जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषांनी प्रविष्ट केलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

     मुंबई - चलनातून रहित केलेल्या नोटा स्वीकारण्यास आणि चलनात पालट करण्यास जिल्हा सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी केली आहे. त्या निर्णयाविरोधात जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषांनी प्रविष्ट केलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए.एम्. बदर यांच्या खंडपिठाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या मागणीला स्थगिती नाही, असे स्पष्ट केले, तर आम्ही या याचिकांवर सुनावणी घेऊ. तोपर्यंत आम्ही याचिकांवर सुनावणी घेणे अथवा कुठलाही दिलासा देणे योग्य होणार नाही, तसेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर म्हणजे ५ डिसेंबर या दिवशी पुढील सुनावणी ठेवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षक, पालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांचे वेतन रखडण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेकडून अद्ययावत आपत्कालीन विभागाचे लोकार्पण

मुंबई - आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जलद साहाय्य मिळावे यासाठी महापालिकेने आपत्कालीन विभाग अद्ययावत केला आहे. २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राज्यात नोटाबंदीनंतर करवसुलीत वाढ; एकूण १४०० कोटी ७७ लक्ष रुपये जमा

मुंबई - नोटाबंदीनंतर राज्यातील महानगरपालिकांमध्ये विविध कर आणि थकबाकी यांच्या रूपाने १४०० कोटी ७७ लक्ष रुपये जमा झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक करवसुली झाली असून पालिकेकडे ४८९ कोटी ६१ लक्ष रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर पुणे महानगरपालिकेत १४४ कोटी ५२ लक्ष रुपयांची वसुली झाली आहे. माहिती नगरविकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

सहा वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक अत्याचार!

महिलांसाठी असुरक्षित पुणे शहर !
     पिंपरी (जिल्हा-पुणे) - येथील एका झोपडपट्टीत राहणार्‍या बिगारी काम करणार्‍या एका स्त्रीच्या सहा वर्षांच्या मुलीला त्याच भागात रहाणार्‍या चार शालेय मुलांनी एकटीला गाठून तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलीची आई कामावर गेल्याचे पाहून त्यांनी हे घृणास्पद कृत्य केले. सायंकाळी घरी आल्यावर हा प्रकार समजल्याने तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. या चारही मुलांना बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

संभाजी ब्रिगेडचे मुसलमान प्रेम म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी प्रतारणा नव्हे का ? - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते

      श्रीक्षेत्र आळंदी (जिल्हा पुणे), २९ नोव्हेंबर (वार्ता.) - छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब या मुसलमानाने हालहाल करून मारले. त्याचेच वंशज असलेल्या मुसलमानांविषयी संभाजी ब्रिगेडला प्रेम का ? त्यांनी असे करणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी प्रतारणा नव्हे का, असे सडेतोड मार्गदर्शन राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष पू. ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांनी केले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचा सांगता समारोप २९ नोव्हेंबर या दिवशी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर पार पडला. त्या वेळी ते उपस्थित वारकर्‍यांना मार्गदर्शन करत होते. या समारोपाला राष्ट्र्रीय युवा कीर्तनकार हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोडही उपस्थित होते.

रायगडमधील २, तर रत्नागिरी येथील एका रेल्वेस्थानकाला क्रॉसिंग स्टेशनचा दर्जा देणार

      मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - कोकण रेल्वेमार्गातील प्रवास अधिक वेगवान आणि सुखद व्हावा, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभु यांनी रायगड जिल्ह्यातील इंदापूर आणि सापे वामने, तर रत्नागिरी जिल्ह्यातील वेरवली अशा तीन स्थानकांना क्रॉसिंग स्टेशन असा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही रेल्वेस्थानके हॉल्ट स्टेशन होती. क्रासिंग स्टेशन चा दर्जा दिल्यामुळे या स्थानकांवर आरक्षण, फलाट, निवारा शेड आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. इंदापूर रोड हे स्थानक कोलाड आणि माणगाव या स्थानकांच्या मध्ये, तर सापे वामने हे नवे स्थानक वीर आणि करंजाडी या रेल्वेस्थानकाच्या मध्ये उभारण्यात येत आहे. रत्नागिरीतील वेरवली हे नवे रेल्वेस्थानक आडवली आणि विलवडे या स्थानकांच्या मध्ये उभारण्यात येणार आहे.

नोटाबंदीमुळे भविष्यात आर्थिक विकासाच्या संधी ! - अर्थतज्ञांचे मत

     मुंबई - नोटाबंदीचा निर्णय हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. याद्वारे भविष्यात भारतीय अर्थकारणात सकारात्मक पालट झालेले पहायला मिळतील. व्याजदर न्यून होऊन घरांच्या किंमती उणावतील, विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेणे परवडेल, उद्योग जगतामध्ये आर्थिक गुंतवणूक वाढून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत देशातील प्रख्यात अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने मुंबईतील इंडियन मर्चंट चेंबर येथे आयोजित केलेल्या एका परिषदेमध्ये अर्थतज्ञांनी त्यांची मते मांडतांना नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येईल. आतंकवाद, नक्षलवाद आणि अतिरेक्यांच्या अर्थव्यवस्थेवर या निर्णयामुळे अंकुश लागेल. भविष्यात अधिकोषांमध्ये अधिकाधिक खाती उघडली जातील, गरिबांसाठी रुग्णालये उघडली जातील, रस्ते बनवले जातील यांसारख्या शक्यताही तज्ञांकडून वर्तवण्यात आल्या.


मडगाव (गोवा) येथे झालेल्या अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेत पुरो(अधो)गामी वक्त्यांनी व्यक्त केलेले हिंदुद्वेष्टे, तसेच राष्ट्रघातकी विचार

     मडगाव (गोवा) येथील रवींद्र भवन येथे पुरो(अधो)गाम्यांची अभिव्यक्ती दक्षिणायन परिषद १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या परिषदेत विविध वक्त्यांनी व्यक्त केलेले हिंदुद्वेष्टे, तसेच राष्ट्रघातकी विचार पुढे देत आहोत.
केवळ हिंदूविरोधासाठी स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेल्या आणि 
८० कोटी हिंदु लोकसंख्या असलेल्या या देशावर मूठभर पुरोगामीच 
स्वतःची तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी अन् राष्ट्रवादी विचारसरणी लादत आहेत !
(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र देशासाठी घातक !’ - स्वाती जोशी
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९२० वर्षापासून हिंदु राष्ट्राचा विचार मांडला आहे. हिंदु राष्ट्र देशासाठी घातक आहे आणि बुद्धीजिवींसाठी हे एक आव्हान आहे. वीर सावरकर यांनीही हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडतांना हिंदु राष्ट्रात इतर धर्मियांना रहाण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. गोळवलकर गुरुजी यांचीही विचारसरणी एकांगी आहे आणि या ठिकाणी दुसर्‍या विचारसरणीला स्थान नाही, असे हिंदुद्वेषी विचार पुरो(अधो)गामी स्वाती जोशी यांनी व्यक्त केले. परिषदेत १९ नोव्हेंबर या दिवशी ‘देशभक्ती, राष्ट्रवाद आणि मानवता’ या विषयावर स्वाती जोशी बोलत होत्या.

जगभरातील नोटाबंदी !

       ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता नोटाबंदी घोषित केल्यानंतर देशभरात एटीएम् आणि अधिकोष यांच्या बाहेर मोठमोठ्या रांगा दिसायला लागल्या. व्यवहारातील एकूण नोटांपैकी ८६ टक्के नोटा अचानक बंद केल्याने एकच हलकल्लोळ उडाला. मोदी यांचे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’ भारतीय जनतेसाठी नवे असले, तरी जगभरात असे प्रयोग अनेक वेळा झाले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रयोगांमुळे अनेक सत्ताधिशांना सत्ताही सोडावी लागली.
देश आणि नोटाबंदीचे वर्ष 
१. घाना : वर्ष १९८२ 
     जगाच्या आधुनिक इतिहासात नोटाबंदीचे पहिले पाऊल आफ्रिकन देश असणार्‍या घानाने टाकले. वर्ष १९८२ मध्ये करचोरी आणि भ्रष्टाचार रोखण्याच्या उद्देशाने ५० सेडीच्या (स्थानिक चलन) नोटा बंद करण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे घानाच्या जनतेचा आपल्याच चलनावरील विश्‍वास उडाला. त्यामुळे त्यांनी विदेशी चलनाकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे घानाच्या बँकिंग व्यवस्थाच नव्हे तर, अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला. ग्रामीण जनतेला कित्येक अंतर पार करून नोटा पालटण्याची वेळ आली. नोटा पालटण्याची कालमर्यादा संपल्यानंतर मोठ्या संख्येने नोटांचा ‘कचरा’ झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा ऑक्टोबर २०१६ या मासातील दुसर्‍या पंधरवड्याचा आढावा !

१. धर्माभिमान्यांचा धर्मकार्यातील सहभाग !
१ अ. आंदुर्ले आणि साळगाव येथे आदर्श श्रीकृष्ण प्रतिमा फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! : सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वर्षी नरकासुर प्रतिमांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसली. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले आणि साळगाव येथील धर्माभिमानी हिंदूंनी नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पराभूत नरकासुराचा उदोउदो करणार्‍यांसमोर विजयी श्रीकृष्णाच्या प्रतिमेची मिरवणूक काढून एक आदर्श निर्माण केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सलग दोन वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
     आंदुर्ले आणि साळगाव येथे श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून नंतर श्रीकृष्णाची प्रतिमा सजवलेल्या चारचाकी गाडीत ठेवून फेरी काढण्यात आली. आंदुर्ले येथील फेरीचा प्रारंभ कापडोसवाडी येथे श्री. सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी श्री. दत्तप्रसाद सामंत यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेच्या पूजनाने झाला. साळगाव येथे पू. (सौ.) माई नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पूजनानंतर दोन्ही ठिकाणी श्रीकृष्णाची प्रतिमा सजवलेल्या चारचाकी गाडीत ठेवून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ असा नामजप करत फेरी काढण्यात आली. या फेरीत अनेक ग्रामस्थ उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. फेरीच्या मार्गात ठिकठिकाणी थांबून फेरीचे प्रयोजन, तसेच नरकासुराच्या प्रतिमा बनवणे, त्यांची स्पर्धा घेणे यांचे दुष्परिणाम यांविषयी प्रबोधन करण्यात आले.

कारागृहांची सुरक्षा ‘चोख’च पाहिजे !

     पंजाबच्या पतियाळा येथील नाभा कारागृहावर शस्त्रधार्‍यांनी आक्रमण केले. चित्रपटातील कथानकास साजेशा अशा या आक्रमणाच्या नियोजनावरून हेच सिद्ध होते की ते कारागृह सर्वात असुरक्षित आहे. त्या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा या आक्रमणातून अधोरेखित झाला आहे. असे अत्यंत महत्त्वाचे कारागृहात केवळ नाममात्र सुरक्षित नको, तर खर्‍या अर्थाने सुरक्षित असायला हवे. जिथे कैदी आहेत, तिथे चोख सुरक्षा व्यवस्था ही असायलाच हावी. कैद्यांनी कारागृहातून पळ काढणे त्या व्यवस्थेस लांछनास्पद आहे. देशातील महत्त्वाच्या कारागृहाविषयी ज्या घटना घडत आहेत, त्या लक्षात घेता पळ काढण्याच्या डावपेचांत कैदी यशस्वी ठरत आहेत आणि त्यांना पुन्हा पकडण्यासाठी पोलिसांना डावपेच आखावे लागत आहेत. एकाच गुन्हेगारास पुन्हा पकडण्यासाठी मनुष्यबळ, वेळ यांचा व्यय करावा लागत आहे. या कारागृहावरील आक्रमणाच्या वेळी आक्रमणकर्ते पोलिसांच्या वेशात आले होते. आतंकवादीही पोलीस वा सैनिक यांच्या वेशात येतात. यामुळे आक्रमणकर्ते पुढ्यात येऊनही जोपर्यंत ते आपले खरे रूप प्रगट करत नाहीत, तोपर्यंत त्यांना ओळखताच येत नाही आणि नेमका याचाच लाभ आक्रमणकर्ते उचलतात. वेशभूषेची हल्लेखोरांची तशी ही जुनी पद्धत आहे तरीही ते याचाच पुनर्वापर करत आहेत. यावर ठोस उपाय शोधण्यात यश आले असे समाधानकारक चित्र नाही.

सनातनची अपकीर्ती करणार्‍या प्रसारमाध्यमांवर कारवाई करा !

       आता वृत्तवाहिन्यांवरून कोणताही पुरावा नसतांना एखाद्यावर आरोप केले जातात. असाच प्रकार सनातन संस्थेविषयीही झाला आहे. काही बुद्धीप्रामाण्यवादी पुरावा नसतांना सनातन संस्थेवर उगाचच आरोप करत आहेत. ते एखाद्या मेंढराप्रमाणे वक्तव्य करत आहेत, हे चुकीचे आहे. आधी पुरावे द्या, मग आरोप करा आणि नंतरच प्रसिद्धीमाध्यमांनी त्यास प्रसिद्धी द्या ! पुरावे येण्याआधीच आगडोंब करू नये. यामुळे समाजात चुकीचे संदेश जात आहेत. चार-दोन लोकांची मते म्हणजे खरे मत होऊ शकत नाही. सत्य काय आहे ? ते पुढे बाहेर येतेच; पण त्याआधी सनातनची अपकीर्ती करणार्‍या प्रसारमाध्यमांवर खरे तर कारवाई करायला हवी ! सरकार त्यांच्यावर कारवाई करेल का ? (सनातनवर होत असलेले सर्व आरोप निराधार असून भविष्यात सनातनचे निर्दोषत्व सिद्ध होईल, यात संदेह नाही ! - संपादक) - श्री. बाबासाहेब सुर्वे, कोकरे, चिपळूण.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Khalistani Atanki Harminder Singh Mintu Patiyala karagarse mobilese pratidin ISI ke samparkme rehta tha. - Karagar Adhikariyoki milibhagat ka yah parinam

जागो ! : खलिस्तानी आतंकी हरमिंदर सिंह मिंटू पटियाला कारागार से मोबाईल से प्रतिदिन आइएसआइ के संपर्क में रहता था । - कारागार अधिकारियों की मिलीभगत का यह परिणाम !
      ‘सर्व राजकीय व्यक्ती एकाच माळेचे मणी आहेत. ते जरी जन्माने हिंदु असले, तरी कर्माने हिंदुद्वेष्टे आहेत. असलीच माणसे अधिक धोकादायक असतात. हेच आज हिंदु समाजाच्या संस्कृतीची वाट लावण्यास कारणीभूत ठरत आहेत. ‘गोवा म्हणजे गोमंतक आणि गोमंतक भूमी ही पवित्र भूमी’, असे मानले जाते. ही भूमी क्रूरकर्मा राक्षस फ्रान्सिस झेवियरची नसून ती पवित्र भूमी परशुरामाने निर्माण केलेली आहे. मला गर्व वाटतो की, माझा जन्म या परशुरामाच्या पवित्र भूमीत झाला आहे. तेव्हा या माझ्या भूमीला अन्य कोणत्याही परकीय पाद्रीचे नाव दिले, तर मला ते सहन होत नाही आणि मी सहन करून घेणार नाही.’ - श्री. रामा उसपकर, वास्को, गोवा.

कारागृहातील भ्रष्टाचाराविना हे शक्य आहे का ?

      पंजाबच्या पतियाळा कारागृहातून पळवून नेलेला आणि नंतर देहली येथे अटक करण्यात आलेला खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा खलिस्तानी आतंकवादी हरमिंदरसिंह मिंटू कारागृहात असतांना प्रतिदिन भ्रमणभाषद्वारे पाकच्या आयएस्आयच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात होता.

सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज ! (वय ८९ वर्षे)

प.पू. परशराम पांडे महाराज
       ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या या साधनेच्या विश्‍वातील एक उच्च विभूती म्हणजे प.पू. परशराम माधव पांडे महाराज (प.पू. बाबा) ! ३० नोव्हेंबर २०१६, म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी ते ९० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे चरणी उतराई होण्यासाठी देवद आश्रमातील साधकांनी ही शब्द सुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिखाण म्हणजे देवद आश्रमातील सर्व साधकांचे मनोगत आहे. 
       प.पू. बाबांचे देवद आश्रमातील साधकांच्या हृदयातील असे अद्वितीय स्थान आहे. परात्पर गुरु डॉक्टरांची देवद आश्रमातील साधकांवर असलेली ही कृपाच आहे, यासाठी ही कृतज्ञतापुष्पांची आेंजळ त्यांच्या चरणी रीती करत आहोत.’
प.पू. परशराम पांडे महाराज 
यांना वाढदिवसानिमित्त सनातन 
परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

गंभीर आजारपणात अखंड अनुसंधानात आणि आनंदी राहून परिस्थितीवर मात करणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर !

कु. दीपाली मतकर
      ‘कु. दीपाली मतकर पुष्कळ आजारी असल्याचे कळल्यावर मला तिच्याजवळ रहाण्याची आणि तिला पहाण्याची तीव्र इच्छा झाली. नंतर मला सोलापूरला दीपालीच्या साहाय्यासाठी जाण्याची संधी मिळाली. ‘तिची भक्ती किती श्रेष्ठ आहे, पुष्कळ शारीरिक त्रास होत असतांनाही ती देवाशी कशी एकरूप होते’, हे शिकण्यासाठी देवाने मला तिथे पाठवल्याचे माझ्या लक्षात आले. रुग्णालयात गेल्यानंतर देवाने तिला केलेले साहाय्य, दीपालीसमवेत असतांना तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि प.पू. डॉक्टरांची अनुभवलेली प्रीती यांविषयी पुढे देत आहे. 
१. ‘दीपालीची सेवा करतांना ‘ती गुरुसेवा आहे’, या भावाने करून आनंद घ्यायचा आहे’, असे सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी सांगणे आणि त्यांनी सूक्ष्मातून दीपालीचे डोके अन् पाय चेपून देणे : कु. दीपालीकडे जातांना सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी मला सांगितले, ‘‘तुला दीपालीची सेवा ‘ती गुरुसेवा आहे’ या भावाने करून आनंद घ्यायचा आहे. त्या रुग्णालयात केवळ दोन गोपींचे अनुसंधान असणार आहे. त्यांचे विश्‍व असणार आहे आणि दीपाली बरी झाल्यावर तुम्ही दोघी लवकर रामनाथीला या. आम्ही वाट पहात आहोत.’’ सद्गुरु बिंदाताई रुग्णालयात सूक्ष्मातून जाऊन तिचे डोके आणि पाय दाबून द्यायच्या अन् तिच्या डोक्यावरून हात फिरवायच्या. त्या वेळी ‘तिला काय वेदना होत आहेत’, हे त्यांना कळायचे. 

आरती गुरुमाऊलीची ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
आरती गुरुमाऊलीची (टीप १) आरती माऊलीची ।
आरती गुरुमाऊलीची आरती माऊलीची ॥ धृ. ॥
दावियला ‘गुरुकृपायोग’ । 
अष्टांग साधना असे त्यात ॥
षड्रिपू निर्मूलन असे मुख्य ।
मन हो निर्मळ होई त्यात ॥ १ ॥
अनेक साधक झाले संत ।
स्थापण्या सर्वत्र हिंदु राष्ट्र ॥
केला अनिष्ट शक्तींचा निःपात ।
सर्व साधकांच्या रक्षणार्थ ॥ २ ॥

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली केरळ मधील कु. निकिता गांधी (वय १६ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. निकिता गांधी एक दैवी बालक आहे !
कु. निकिता गांधी
१. वय ९ मास
१ अ. मंदिरात लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनाकडे आजीला घेऊन जाण्यास खुणावणे : ‘कु. निकिता ९ मासांची असतांना तिची आजी श्रीमती सुचेता गांधी यांच्यासह एका मंदिरात गेली होती. त्या वेळी निकिताला बोलता येत नव्हते. त्या वेळी मंदिरात सनातनचे ग्रंथ प्रदर्शन लावले होते. त्या ग्रंथ प्रदर्शनाला आजीला घेऊन जाण्यासाठी ती खुणावू लागली. तिथे गेल्यावर साधक भेटले आणि त्यांनी सत्संगात येण्यास सांगितले. या प्रसंगानंतर तिची आजी सनातनच्या सत्संगाला येऊ लागली. आजीसमवेत निकिताही सत्संगाला आणि आश्रमात येऊ लागली. 
२. वय ७ वर्षे 
२ अ. दूरदर्शनवर दाखवण्यात येणार्‍या विज्ञापनात प्रमुख भूमिकेसाठी (‘मॉडेलिंग’साठी) निवडल्याचे कोणालाही न सांगणे : निकिता दिसायला सुंदर असल्यामुळे दूरदर्शनवर दाखवण्यात येणार्‍या विज्ञापनांमध्ये (‘अ‍ॅडव्हरटाईज’मध्ये) तिला प्रमुख भूमिकेसाठी (‘मॉडेलिंग’साठी) निवडले होते. तिने ही गोष्ट स्वतःहून कुणाला सांगितली नाही. कु. निकिताचे हावभाव अथवा बोलणे या कशातून कधी अहं जाणवायचा नाही.

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका ! 
        ‘सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
     सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्य या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल असे परवाने असणे आवश्यक आहे.
      जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
     ज्यांना धर्मरथ (ट्रक) चालवता येत नाही; मात्र शिकण्याची इच्छा आहे त्यांना धर्मरथ चालवण्यास शिकवण्यात येईल.


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
  • कुठे प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्तराचे ज्ञान देणारा हिंदु धर्म, तर कुठे बालवाडीप्रमाणे शिक्षण देणारे पाश्‍चात्त्य देश !
  • विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?
        सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. त्याचे एक उदाहरण येथे दिले आहे.
न्यायप्रणाली
        अध्यात्मात प्रगती केलेल्यांना व्यक्तीला केवळ पाहून तिने गुन्हा केला कि नाही, हे कळते. याउलट पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ते कळत नसल्यामुळे कोट्यवधी दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

खरा शिष्य
रंगाच्या जशा अनेक छटा असतात, तशाच शिष्यत्वाच्याही अनेक पायर्‍या असतात.
     १. मला कोणी शिव्या दिल्या, मारले, माझी कुणी हत्या (खून) केली, तरी त्याच्यावर तुम्ही दया केलीत, तर मी समजेन की, माझ्या गुरूने तुम्हाला सिद्ध (तयार) केले.
     भावार्थ : शिव्या देणे, मारणे, हत्या करणे इत्यादी सर्व प्रकृतीतील आहे. हे समजून ते करणार्‍याविषयी राग न येणे, एवढेच नव्हे, तर करुणाकर भगवंताप्रमाणे त्याच्यावर दया करणे, हे शिष्याच्या खर्‍या प्रगतीचे लक्षण होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संतांचा आदर करा !
सत्पुरुष आणि संत यांच्याविषयी आदर बाळगावा. 
ते परमेश्‍वराचे प्रेषित आणि प्रतिनिधी असतात. त्यांचा जन्म 
मानवी कल्याणासाठी आणि शोषितांच्या उद्धारासाठी असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्याविषयी संतांचे उद्गार !

१. आचार्य श्री शंकरानंदगिरी, स्वामी परमात्मानंद आश्रम, विजयवाडा
     संत आसारामजी बापू यांच्या सत्संगात लाखो लोक येतात. आध्यात्मिक शक्तीशिवाय एका व्यक्तीजवळ एवढ्या संख्येने लोक कसे जाऊ शकतात ? त्यांच्यावर खोटे आरोप लावून खटला दाखल करण्यात आला आहे. 
२. डॉ. के.बी. सुब्बरायुडू, प्राध्यापक (अद्वैत वेदांत), राष्ट्रीय संस्कृत संस्था विश्‍वविद्यालय, जम्मू
     कोणताही आरोप सिद्ध न होता ७९ वर्षांचे संत आसारामजी बापू यांना ३ वर्षांहून अधिक काळ कारागृहात ठेवणे त्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे. ते संतांसाठी मार्गदर्शक आहेत, सर्वकाही आहेत. किमान त्यांना जामीन मिळाला पाहिजे. यासाठी सर्व संतांनी सरकारला निवेदने पाठवली पाहिजे. 

सामान्यांना न्याय दुरापास्तच !

संपादकीय 
       सध्या न्यायालय आणि शासन यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू आहे. या दोघांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. हे खटके आता सार्वजनिकरित्या उडण्यासही प्रारंभ झाला आहे. देहली येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुख्य न्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांनी थेट शासनाला लक्ष्य करत ‘उच्च न्यायालयांमधील ५०० पेक्षा अधिक जागा रिकाम्या आहेत’, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, ज्यांनी आज काम करणे अपेक्षित आहे, ते काम करत नाहीत. न्यायाधीश नसल्याने खंडपिठांचे कामकाजही ठप्प आहे. त्याच प्रकारे न्यायालयांना ज्या सुविधा मिळायला हव्यात, त्या मिळत नसल्याने खटले ५ ते ७ वर्षे प्रलंबित रहात आहेत. यावर कायदामंत्री श्री. रविशंकर प्रसाद यांनीही प्रत्युत्तर देत निक्षून सांगितले की, मुख्य न्यायाधिशांनी सांगितलेली गोष्ट चुकीची आहे, यावर्षी शासनाने १२० न्यायाधिशांच्या नियुक्त्या केल्या आहेत आणि वर्ष १९९० नंतरची ही सर्वांत मोठी संख्या आहे. वर्ष २०१३ मध्ये १२१ न्यायाधिशांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या नियुक्त्या हे काम सर्वस्वी न्यायालयाच्याच अधीन असून त्यांनाच या नियुक्त्या करायच्या आहेत. त्यामुळे न्यायाधिशांच्या नियुक्त्यांच्या संदर्भात सध्यातरी सुस्पष्टता येत नसून प्रलंबित खटल्यांची संख्या मात्र वाढतच आहे !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn