Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मध्यप्रदेशमध्ये चकमकीत ठार झालेल्या सिमीच्या ५ आतंकवाद्यांना धर्मांधांनी हुतात्मा ठरवले !

 • भाजपशासित प्रशासन आणि पोलीस निद्रिस्त ! खांडवा कारागृहातून आतंकवादी दोनदा पळून गेल्याची घटना झाल्यामुळे अपकीर्त झालेल्या मध्यप्रदेश पोलिसांची आता कोणती लाज शिल्लक राहिली आहे ?
 • कबरीजवळ लावण्यात आले हुतात्मा असल्याचे शिलालेख !
     भोपाळ - ३१ ऑक्टोबरला दिवाळीच्या रात्री मध्यप्रदेशातील खांडवा येथील मध्यवर्ती कारागृहातून एका पोलिसाची हत्या करून पळून गेलेल्या सिमीच्या ८ आतंकवाद्यांना अचारपुरा येथे चकमकीत ठार करण्यात आले होते. यातील ५ आतंकवादी खांडवा येथील, तर ३ अन्य ठिकाणचे होते. पोलिसांनी या आतंकवाद्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांना दिले होते. नातेवाइकांनी ते दफन केले. यातील खांडवामध्ये दफन केलेल्या ५ आतंकवाद्यांच्या मृतदेहाच्या जागेवर धर्मांधांनी कबर बांधून ग्रेनाईटवर शिलालेख लावला आहे. यात त्यांना शुहदा ए गज्वातुलहिंद (शहीद) म्हणजे हुतात्मा असल्याचे लिहिण्यात आले आहे. (या आतंकवाद्यांच्या अंत्यविधीला काही सहस्र धर्मांध सहभागी झाले होते. यावरून हे आतंकवादी एकटे नव्हते, तर त्यांना स्थानिक धर्मबंधूंचे समर्थन होते, हे लक्षात येते. यापैकीच काही जणांनी हे शिलालेख लावले असतील. या धर्मांधांवर अंत्यविधीच्या वेळी कारवाई केली असती, तर अशी कृती करण्याचे त्यांचे धाडस झाले नसते ! आता त्यांना पकडून कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे ! - संपादक)

संसदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

नोटाबंदीवरून संसदेत गोंधळ घालून देशाची कोट्यवधी
रुपयांची हानी करणार्‍यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !
        नवी देहली - नोटाबंदीच्या सूत्रावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने २४ नोव्हेंबरला लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. या वेळी समाजवादी पक्षाच्या अक्षय यादव यांनी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या समोर जाऊन कागदपत्रे फाडून त्यांच्या दिशेने फेकली. (अशा बेशिस्त खासदाराची खासदारकी रहित करून त्याला आजन्म निवडणूक न लढण्याचीच शिक्षा करायला हवी ! - संपादक) या गोंधळामुळे कामकाज प्रथम १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. १२ वाजल्यानंतर कामकाज चालू झाल्यानंतरही विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. राज्यसभाही दुपारी ३ नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. 
माजी पंतप्रधान 
मनमोहन सिंह यांचीही टीका !
        पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाल्यानंतरही मौन बाळगणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नोटाबंदीवरून संसदेत भाषण करत केंद्रसरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीला माझा विरोध नाही; मात्र त्यासाठी पूर्वसिद्धता करण्यात आली नाही. सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार आहे. तसेच विकासदर २ टक्क्यांपर्यंत अल्प होईल. या नोटाबंदीचा परिणाम जाणून घेण्यासाठी ५० दिवस वाट पहावी लागेल; मात्र १५ दिवसांमध्ये ५० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मला पंतप्रधानांना विचारायचे आहे की, जगात असे कोणत्या देशात होते की, लोक स्वतःचाच पैसा बँकेतून काढू शकत नाहीत ? त्यांना त्यांचेच पैसे काढण्यापासून रोखले जाते. लघु उद्योगांवर याचा सर्वाधिक वाईट परिणाम झाला आहे. नोटाबंदीचा हा निर्णय अतिशय वाईट पद्धतीने हाताळण्यात आला. रिझर्व्ह बँक आणि पंतप्रधान कार्यालय या प्रकारात सपशेल अपयशी ठरले आहेत. 

सरकारमध्ये धमक असेल, तर त्यांनी हलाल मांस, मातम अशा गोष्टींवर बंदी घालावी ! - अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

कर्नाटक राज्यात प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या
विरोधात हिंदु जनजागृती समितीची बेंगळुरू येथे पत्रकार परिषद !

डावीकडून माता रत्नाम्मा, डॉ. महर्षी आनंद गुरुजी,
श्री. मोहन गौडा, श्री. व्यंकटेश रेड्डी स्वामी, श्री शक्तिशांतानंद स्वामी,
श्री. रामाकोतेश्‍वरानंद स्वामी, श्री. रत्नकुमारस्वामी आणि श्री. नारायणाप्पा स्वामी

       बेंगळुरू - काँग्रेस सरकार म्हणते हिंदूंच्या प्रथा अंधश्रद्धा आहेत. त्यांनी यासाठी शृंगेरी, पेजावर, सिद्धगंगा या मठांच्या प्रमुखांशी चर्चा करावी. केवळ कायद्याची पदवी घेतल्याने व्यक्ती बुद्धीवंत होत नाही. राजकीय नेते एका वेळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या गोष्टी करतात आणि दुसर्‍या वेळी हातात लिंबू घेऊन वाईट शक्तींचे निर्मूलन करतात. हा निव्वळ ढोंगीपणा आहे, अशी टीका अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी केली. कर्नाटक राज्यात काँग्रेस सरकारकडून प्रस्तावित असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१६ ला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत नादागोकुल आश्रमाच्या माता रत्नाम्मा, श्री. रामाकोतेश्‍वरानंद स्वामी, श्री. रत्नकुमारस्वामी, श्री. व्यंकटेश रेड्डी स्वामी, सीताराम आश्रमाचे श्री. रामस्वामी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा आदींनी विषय मांडला. 

५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा पालटून घेण्यावर बंदी !

१५ डिसेंबरपर्यंत केवळ ५०० रुपयांच्या 
नोटा पेट्रोल पंप आदी ठिकाणी वापरता येतील !
      मुंबई - नोटाबंदीच्या घोषणेनंतर महत्त्वाच्या १७ सेवांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्यास अनुमती दिली होती. ही मुदत २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संपल्याचे घोषित केले. केवळ ५०० रुपयांच्या नोटा पेट्रोल पंप आदी ठिकाणी १५ डिसेंबरपर्यंत वापरण्याची अनुमती देण्यात आली आहे. १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून मिळणार नाहीत. या नोटा बँकेत भरता येतील, असा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 
      केंद्रीय, राज्य आणि व नगरपालिका शाळांमध्ये २००० रुपयांपर्यंतचे शुल्क भरण्यासाठी ५०० रुपयांच्या नोटा वापरता येणार आहेत. प्री-पेड मोबाईलचे ५०० रुपयांचे टॉप-अप करण्यासाठी जुन्या ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील, असेही निर्णय या वेळी घेण्यात आले. सहकारी ग्राहक भांडारातूनही एकाचवेळी ५ सहस्र रुपयांपर्यंतची खरेदी करता येणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आली आहे. मात्र, ३ ते १५ डिसेंबरपर्यंत टोलनाक्यांवर ५०० च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. 

नरेंद्र मोदी अ‍ॅपवरून ९० टक्के लोकांचे नोटाबंदीला समर्थन !

      नवी देहली - केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी अ‍ॅपवरून देशातील जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. या जनमताच्या प्रारंभिक निकालांमध्ये ९० टक्क्यांंहून अधिक लोकांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. या सर्वेक्षणात ५ लाख लोकांनी सहभाग नोंदवल्याचे मोदी यांनी ट्विटरवरून सांगितले. या सर्वेक्षणात ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यासंबंधीचे प्रश्‍न विचारण्यात आले होते.
१. देशात काळा पैसा असल्याचे ९८ टक्के लोकांचे म्हणणे आहे.
२. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात लढाई आवश्यक असल्याचे मत ९९ टक्के लोकांनी नोंदवले आहे. 
३. ९० टक्के लोकांनी सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. 
४. ९२ टक्के लोकांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मोदी सरकारचे प्रयत्न योग्य असल्याचे म्हटले आहे. 
५. ९० टक्के लोकांनी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. 
६. ९२ टक्के लोकांच्या मते या निर्णयामुळे काळे धन, भ्रष्टाचार आणि आतंकवाद यांवर नियंत्रण मिळवण्यास साहाय्य मिळेल, असे म्हटले आहे.

प्रा. वेलिंगकर यांना लक्ष्य केल्यास ‘भाभासुमं’ची तीव्र आंदोलनाची चेतावणी !

      पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - गोव्यात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे, यासाठी कटीबद्ध असलेल्या ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’चे (भाभासुमं) राज्य समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना विद्याप्रबोधिनी शिक्षण संस्थेतून काढून टाकण्याचा डाव आखल्याच्या आरोपावरून मंचने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका केली आहे. प्रा. वेलिंगकर यांच्या विरोधात अशी कोणतीही कृती केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी ‘भाभासुमं’ने दिली आहे.
     ‘भाभासुमं’च्या पदाधिकार्‍यांनी पुढे आरोप केला आहे की, गोव्यात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे, यासाठी उभारलेला माध्यम लढा संपवण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चर्च संस्थेशी संगनमत केले आहे.

काँग्रेस राज्यातील ४० मतदारसंघांत उमेदवार उभे करणार - दिग्विजय सिंह

गोवा विधानसभा निवडणूक २०१७
     पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - गोव्यात काँग्रेस महायुतीच्या विरोधात आहे. काँग्रेस राज्यातील ४० मतदारसंघांमधून निवडणूक लढवणार आहे. जर कोणाला काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवायची असेल, तर त्यांचे पक्षात स्वागत आहे, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी केले आहे. (असे आवाहन करून आयात केलेले उमेदवार उभे करावे लागण्याची नामुष्की काँग्रेसवर दिग्विजय सिंह यांच्यासारख्या आतंकवादी लादेन याला ‘लादेनजी’ म्हणणार्‍या नेत्यांमुळेच आली आहे. पक्षांतर्गत नेतृत्व नसलेल्या आणि भाड्याच्या उमेदवारांना उभे करणार्‍या काँग्रेसला गोव्याची जनता कशाला निवडून देईल ? - संपादक) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले.

हिंदु धर्मविरोधी टीका होत असल्याने दक्षिणायन परिषदेला विरोध ! - डॉ. मनोज सोलंकी, गोवा राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

मडगाव येथील दक्षिणायन परिषदेला झालेल्या 
विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर प्राईम वृत्तवाहिनीवर चर्चासत्र
चर्चासत्रात सहभागी झालेले
१. राजू नायक २. मोहनदास लोलयेकर
३. प्रकाश कामत आणि ४. डॉ. मनोज सोलंकी
      पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणार्‍या निधीवर नियंत्रण आणल्यानंतर देशात असहिष्णुता असल्याची ओरड चालू झाली आहे. अशी ओरड करणार्‍यांपैकी एक असलेले डॉ. गणेश देवी यांनी या दक्षिणायन परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे गोव्यातील आयोजक दत्ता नायक यांनी ब्राह्मणांवर हीन पातळीवर टीका करणारा लेख लिहिला आहे. यावरून या दक्षिणायन परिषदेत केवळ हिंदु धर्माच्या विरोधात एकांगी टीकेशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही, हे निश्‍चित आहे. त्यामुळेच या परिषदेला हिंदु जनजागृती समितीने विरोध केला आहे आणि या परिषदेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी ‘प्राईम’ वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत स्पष्ट केले.

विद्यमान सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झालाच नाही, असे म्हणू शकत नाही ! - मुख्यमंत्री पार्सेकर

मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार झाला असल्यास तो शोधून कारवाई करणे अपेक्षित !
      पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - साडेतीन वर्षांच्या खाण बंदीमुळे सरकारचा २० ते २२ टक्के महसूल बुडाला होता. असे असतांना आव्हानाला सामोरे जाऊन आम्ही सर्व योजना व्यवस्थितपणे जनतेपर्यंत पोचवल्या. असे असले तरी या कालावधीत विद्यमान सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झालाच नाही, असे ठामपणे म्हणू शकत नाही, अशी खंत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली. 
    दयानंदनगर-धारबांदोडा येथे संजीवनी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मोपा विमानतळ प्रकल्पाची नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी झाली आहे. मोपा प्रकल्प राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर प्रतिदिन सरकारच्या तिजोरीत ३७ टक्के अधिक महसूल जमा होणार आहे. मागील साडेचार वर्षांत राज्य आर्थिक संकटांशी सामना करत असतांनाही राज्याची आर्थिक घडी विस्कटू न देता यशस्वीपणे सरकारने वाटचाल केली आहे. कर्जरोख्यांच्या माध्यमातून विविध विकासकामे राबवली आहेत. अनेक लोककल्याणकारी योजना सरकारने आर्थिक घडी विस्कटू न देता राबवल्या आहेत.’’

(म्हणे) ‘पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात निर्माण केलेले वातावरण हे राजकीय लाभ उठवण्यासाठी उभारलेले एक षड्यंत्र !’

मोदी यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला, तेव्हा आझमी काही बोलल्याचे आठवत नाही !
शबाना आझमी यांचे पाकप्रेम !
     पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - उरी आतंकवादी आक्रमणानंतर पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात निर्माण केलेले वातावरण हे राजकीय लाभ घेण्यासाठी उभारलेले एक षड्यंत्र आहे, असा आरोप चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी यांनी केला. येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा’च्या एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी यांनी हा आरोप केला. (पाकिस्तानी कलाकारांना राष्ट्रप्रेमींचाच विरोध होता. मुसलमान कलाकारांना भारतात कितीही प्रसिद्धी मिळाली, तरी ते शत्रूराष्ट्र पाकविषयी संवेदनशील असतात. त्यांच्यातील धर्मांधतेमुळेच ते पाकमधील मुसलमान कलाकारांचे समर्थन करतात. - संपादक)

माध्यम सल्लागार समितीला ३ मासांची मुदत, निवडणुकीपूर्वी निर्णय होणे अशक्य

गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न !
     पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - शासनाने गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी प्राचार्य भास्कर नायक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या माध्यम सल्लागार समितीला तीन मासांची मुदत दिली आहे. (अशी अकार्यक्षम समिती काय करायची ? - संपादक) माध्यम सल्लागार समितीचा अहवाल फेब्रुवारी मासात प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याने आणि या काळात आचारसंहिता लागू होणार असल्याने निवडणुकीपूर्वी शासनाला याविषयी निर्णय घेणे कठीण होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

देशातील भाषांवरून होणार्‍या वादामुळे संस्कृत भाषा हरवत चालली आहे ! - जी. प्रभा, चित्रपट दिग्दर्शक

      पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - भाषावार प्रांत रचनेनंतर देशातील विविध भाषांनुसार विभाजित झालेल्या राज्यांमुळे भाषेवरून भांडणे चालली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषा हरवत चालली आहे, अशी खंत ‘इष्टी’ या संस्कृत चित्रपटाचे दिग्दर्शक जी. प्रभा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. इष्टी या संस्कृत चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इंडियन पॅनोरमा विभागाचा प्रारंभ झाला आहे. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सर्व शासकीय कार्यालये आणि अनुदानित संस्था यांतील कर्मचारी भरतीस आजपासून स्थगिती !

गोवा शासनाकडून सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पूर्वसिद्धता
     पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - गोवा शासनाकडून राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याची सिद्धता चालू करण्यात आली आहे. सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर शासकीय तिजोरीत निधीचा तुटवडा भासू नये, यासाठी राज्यातील सर्व शासकीय खाती आणि अनुदानित संस्था यांमधील कर्मचारी भरतीस २३ नोव्हेंबर २०१६ पासून स्थगिती देण्याचा आदेश शासनाने काढला आहे. 
    कार्मिक खात्याचे अतिरिक्त सचिव यतींद्र मराळकर यांनी याविषयीचा आदेश २२ नोव्हेंबर या दिवशी काढला आहे. सातवा आयोग लागू करतांना शासकीय तिजोरीत निधी असणे आवश्यक आहे. या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे या आदेशात म्हटले आहे. या आदेशात कर्मचारी भरतीसाठी अर्ज मागवणे, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, तसेच नेमणूकपत्र देणे आदी सर्व प्रक्रियांना स्थगिती देण्यास सांगितले आहे. शासनाकडून ५० टक्क्यांहून अधिक अनुदान दिले जात असलेल्या सर्व सार्वजनिक संस्थांसाठी हा नियम लागू असणार आहे.

(म्हणे) ‘समाज देवतांच्या आहारी गेला आहे !’

साम्यवादी डॉ. कुमार सप्तर्षी यांचा धर्मद्रोह !
      मडगाव, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - आजचा समाज देवतांच्या आहारी गेला आहे. (साम्यवादाच्या आहारी जाण्यापेक्षा देवतांच्या आहारी जाणे चांगलेच ! देवतांच्या आहारी जाऊन लाभच होईल ! - संपादक) गरिबांचे देव गरीब आणि श्रीमंतांचे देव गर्भश्रीमंत का ? या प्रश्‍नांची उत्तरे लोकांनी शोधायला हवी. आरत्यांमधून आपण देवाकडे भीक मागतो असा भास होत आहे. या विचारधारेत पालट व्हायला हवा, असे हिंदुद्वेषी उद्गार पुरो(अधो)गामी आणि साम्यवादी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी काढले. (आरत्यांमध्ये देवाची स्तुती असते. त्यातून देवतांचे चैतन्यच आरती म्हणणार्‍याला मिळते. तसेच सर्वशक्तीमान, दयाळू, कृपाळू देवाकडे दयेची, भक्तीची भीक मागण्यात लाज कसली ? कुमार सप्तर्षी यांच्यासारख्यांचा देवाकडे भीक मागण्यातही अहंकार आड येतो. स्वत:ला विचारवंत म्हणवणार्‍या पुरो(अधो)गाम्यांनी लोक त्यांच्या अधर्मी विचारधारेकडे आकृष्ट होण्याऐवजी देवाकडे का आकृष्ट होत आहेत ? याचा शोध घेतला पाहिजे ! - संपादक) येथे आयोजित एका कार्यक्रमात साम्यवादी डॉ. कुमार सप्तर्षी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना डॉ. कुमार सप्तर्षी यांनी हे धर्मद्वेषी उद्गार काढले. या वेळी पुरो (अधो)गामी रावसाहेब कसबे, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, पुरो(अधो)गामी दत्ता नाईक यांची उपस्थिती होती.

आता २ डिसेंबरपर्यंत टोलमाफ !

        नवी देहली - केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहतूक करणार्‍या आणि अन्य प्रवासी वाहनांना २ डिसेंबरपर्यंत टोलमाफ केले आहे. ही मुदत २४ नोव्हेंबरला संपत होती. ती आता वाढवण्यात आली आहे. सुट्या पैशांअभावी टोलवर वाहतूक कोंडी होत असल्याने हा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. 

७० वर्षांपासून लपवून ठेवलेला काळा पैसा बाहेर आणण्याचा प्रयत्न !

 • ७० वर्षे काळा पैसा बाहेर न काढणारी लोकशाहीला निरर्थक ठरवणारी सर्वपक्षीय सरकारे !
 • केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र !
       नवी देहली - केंद्र सरकारने नोटाबंदीच्या संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यात म्हटले आहे की, ७० वर्षांतील काळ्या पैशाचे ओझे दूर करण्याचा सरकारने याद्वारे प्रयत्न केला आहे. यात पुढे म्हटले आहे की, जगात विकासदराच्या केवळ ४ टक्के व्यवहार पैशांद्वारे होतो; मात्र आपल्या देशात हे प्रमाण १२ टक्के आहे. तो अल्प करून त्याला डिजिटल (क्रेडिट, डेबिट, धनादेश यांद्वारे व्यवहार) करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे काळा पैसा आणि बनावट नोटा बाहेर आले आहेत. 

'एल् अँड टी' आआस्थापनातून १४ सहस्र कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले !

आर्थिक मंदीचा परिणाम ! 
     मुंबई - देशातील सर्वांत मोठे अभियंता (इंजिनिअरिंग) आस्थापन 'लार्सन अँड टुब्रो'ने (एल् अँड टी) १४ सहस्र कर्मचार्‍यांना कमी केले आहे. आस्थापनाने एकूण कर्मचारी क्षमतेच्या ११.२ टक्के कर्मचार्‍यांना कमी केले असून आस्थापनाच्या वित्तीय सेवा (फायनॅन्शिअल सर्व्हिसेस) देणारा विभाग आणि खनिजे अन् धातू यांच्याशी संबंधित विभाग यांमधून ही कर्मचारी कपात केली आहे. सध्या घटलेली मागणी, तेलाचे न्यून झालेले दर आखाती देशांमधील मंदी या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाल्यामुळे कर्मचारी कपात केल्याचे आस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.

हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे ! - महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना, सोलापूर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबरला सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती सभा ! 
धर्मरक्षणासाठी कृतीशील होणार्‍या सर्वच शिवसैनिकांचे अभिनंदन ! 
उजवीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांना सभेचे निमंत्रण देतांना श्री. सुनील घनवट

बेडर समाजाचे अध्यक्ष श्री. सुनील कामठी श्री. सुनील घनवट (१) यांचा सत्कार करतांना
     सोलापूर, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - येथे ४ डिसेंबर २०१६ यादिवशी होणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आदेश शिवसेनेचे येथील जिल्हाप्रमुख श्री. महेश कोठे यांनी दिले. 'शिवसैनिकांचे हिंदु जनजागृती समितीला नेहमीच सहकार्य राहील', असे आश्‍वासनही त्यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने धर्मसभेचे निमंत्रण देण्यासाठी त्यांची भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, विनोद रसाळ आणि हिरालाल तिवारी उपस्थित होते. 
     ४ डिसेंबरला हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस कारवाईत कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडल्याने खळबळ !

नोटाबंदीचे प्रकरण
    सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवरील बंदी आणि जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही रक्कम सापडल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
वेंगुर्ले : दाभोलीनाका, वेंगुर्ले येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका बॉलेरो गाडीतून २ कोटी रुपयांची रक्कम पोलिसांनी कह्यात घेतली. अधिक चौकशी केल्यानंतर ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाची असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी गाडी सोडून दिली; मात्र खाजगी गाडीतून रक्कम का नेली जात होती ? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलगाव तिठा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या वेळी गाड्यांची तपासणी करतांना जिल्ह्यातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीत अनुमाने २५ लक्ष रुपयांची रक्कम सापडल्याने पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे. या रकमेत ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांचा समावेश होता. या रकमेची पोलिसांकडून कसून चौकशी चालू आहे. पोलिसांनी मिळालेली रक्कम जप्त करून आयकर विभाग आणि निवडणूक आयोग यांना याची माहिती दिली आहे.


मुंबईत पोलिसांची ४ सहस्र ६०० पदे रिक्त

केवळ पदे भरून नव्हे; तर कर्तव्यदक्ष पोलीसयंत्रणा निर्माण व्हावी, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे !
     मुंबई - आतंकवादी आक्रमणाचे मुख्य लक्ष असलेल्या मुंबईमध्ये शिपाई ते पोलीस निरीक्षक अशी ४ सहस्र ६०० पोलिसांची पदे रिक्त आहेत. २६ नोव्हेंबर २००८ च्या आतंकवादी आक्रमणानंतर सुरक्षाव्यवस्थेत आमूलाग्र पालट करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन काँग्रेस शासनाने केली होती; मात्र ८ वर्षे होऊनही त्यासाठी आवश्यक पोलीस भरती करण्यात आलेली नाही. (सुरक्षाव्यवस्थेसारख्या संवेदनशील विषयासाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती न करणे, यातून सरकारचे याविषयीचे गांभीर्य दिसून येते. यासाठी सरकार पुन्हा आतंकवादी आक्रमणाची वाट पहात आहे का ? - संपादक) अपुर्‍या पोलीस बळाचा नियमितच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे मत काही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

जीवनावश्यक ज्ञान मिळण्यासाठी गुरुकुल शिक्षण पद्धती आवश्यक ! - श्री. अभय भंडारी

      पुणे, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - सध्याच्या शिक्षणप्रणालीविषयी लोकांच्या मनात निरर्थक विचार टाकून विज्ञान, वाणिज्य आणि कला या शाखांचा विनाकारण उतरता क्रम लावला गेला आहे. अभियंत्याची पदवी घेतलेले अनेक तरुण रुग्णालयात कचरा उचलण्याची कामे करण्यासाठी जातात. ज्या शिक्षणाचा जीवनाशी काहीही संबंध नाही, असे शिक्षण सध्या दिले जात आहे. त्यावर गुरुकुल शिक्षण हाच पर्याय योग्य आहे, असे प्रतिपादन दिवंगत राजीव दीक्षित यांचे अनुयायी श्री.अभय भंडारी यांनी केले. दिवंगत राजीव दीक्षित यांच्या तिथीनुसार स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रबंधू राजीव दीक्षित प्रेरणा दिनाचे आयोजन २२ नोव्हेंबर या दिवशी येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी दिवंगत राजीव दीक्षित यांचे माता-पिता, व्यसनमुक्त योग संघाचे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या कराडकर, राजीवभाई आरोग्य मंदिरचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्रात स्वदेशी वस्तू तसेच परंपरा यांचा प्रचार-प्रसार करणारे सुभाष देशमुख, विजय वरुडकर, विनायक रायकर, डॉ. प्रताप कदम, राजेंद्र देवनीकर, बाळासाहेब खुळे, विवेकानंद चामले, प्रमोद बोर्गे, सुवर्ण यादव आणि ज्योती शहा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ भूमाता आणि राजीव दीक्षित यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. श्री. भंडारी पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांनी नगदी पीक (कॅश क्रॉप्स) ही संकल्पना झुगारून पारंपारिक शेती केली, तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. त्याचप्रमाणे मतदारांनी मतदानाचा पवित्र अधिकार काही रुपयांच्या मोहाने विकू नये. आपण देश बुडवणार्‍यांपैकी आहोत कि देश घडवणार्‍यांपैकी हा विचार करा. तीच राजीव दीक्षित यांना खरी श्रद्धांजली ठरेल. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने स्वर्गीय राजीव दीक्षित यांचे माता-पिता यांना श्री गणेशाचे चित्र असलेली धातूची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

रामाचे नाव न दिल्यास जनआंदोलन उभारू ! - निरंजन पाल, अध्यक्ष, वीर सेना

गोरेगाव आणि जोगेश्‍वरी रेल्वेमार्गातील नवीन 
रेल्वेस्थानकाला 'राम मंदिर रोड' नाव देण्याची वीर सेनेची मागणी ! 
डावीकडून सुनील कदम, निरंजन पाल आणि प्रभाकर भोसले

     मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार गावाच्या नावाने तेथील रेल्वेस्थानकाला नाव दिले जाते. 'गोरेगाव' या नावाने रेल्वेस्थानक अस्तित्वात आहे. त्यामुळे गोरेगाव आणि जोगेश्‍वरी रेल्वेमार्गाच्या दरम्यान नवीन होत असलेल्या रेल्वेस्थानकाचे नामकरण तो भाग ज्या नावाने ओळखला जातो, ते 'राम मंदिर रोड', हे नाव देण्यात यावे. जनमताचा आदर करून या रेल्वेस्थानकाला रामाचे नाव न दिल्यास जनआंदोलन उभारू, अशी चेतावणी वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी पत्रकार परिषदेत केली. गोरेगाव आणि जोगेश्‍वरी या रेल्वेमार्गाच्या मध्ये नवीन रेल्वेस्थानक होत आहे. २७ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभु यांच्या हस्ते या नवीन रेल्वेस्थानकाचे उद्घाटन आणि नामकरण विधी होणार आहे. या रेल्वेस्थानकाला 'राम मंदिर रोड', असे नाव द्यावे, या मागणीसाठी वीर सेनेच्या वतीने २४ नोव्हेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत श्री. पाल बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम उपस्थित होते. 

धुळे येथे धर्मरथात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

श्रीफळ वाढवतांना श्री. संजय गुजराथी
आणि समवेत महापौर सौ. कल्पना महाले
     धुळे - येथे धर्मरथात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. येथील महानगरपालिकेजवळील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ २४ नोव्हेंबर २०१६ या दिवशी दुपारी १२ वाजता धुळे महानगरपालिकेच्या महापौर सौ. कल्पना महाले यांच्या हस्ते धर्मरथाचे पूजन करण्यात आले. शिवसेना नगरसेवक श्री. संजय गुजराथी यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी भाजप युवा मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष श्री. कुणाल चौधरी उपस्थित होते. या वेळी स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत हेही उपस्थित होते. 

मंदिर व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य आध्यात्मिक क्षेत्रातीलच असावेत ! - ह.भ.प. सुहास वझे

      केळूस (सिंधुदुर्ग) - मंदिरांतील सर्व कार्यक्रम सात्त्विक आणि आध्यात्मिक व्हावेत. असे होण्यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य देवाचे भक्त आणि आध्यात्मिक क्षेत्रातीलच असावेत. गावागावांत जाऊन अशा मंदिरांमध्ये गावातील लोकांना एकत्र करून सामूहिक नामजप आयोजित करणे, ही काळाजी आवश्यकता आहे. श्रीमद्भागवत्, हनुमान चालिसा यांसारखे ग्रंथ वाचून देव, धर्म समजून घ्या, असे आवाहन गोवा येथील कीर्तनकार ह.भ.प. सुहास वझे यांनी वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथील श्री विठ्ठल मंदिरात आयोजित कीर्तन कार्यक्रमात केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दैनिक सनातन प्रभातच्या विशेषांक मालिकेची अमृतमयी पर्वणी !

परात्पर गुरु डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेषांक भाग ३
२७ नोव्हेंबर या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातच्या रंगीत विशेषांकात वाचा...
 • ज्ञानेश्‍वरमाऊलींचे पसायदान आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे महान कार्य यांतील साम्य दर्शवणारी काही सूत्रे !
 • सहस्रो वर्षांच्या कालपटलावर ठसा उमटवणारे अवतारी पुरुष : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
 • साधकांना योग्य दृष्टीकोन देऊन समष्टीचे कल्याण करणारे प.पू. डॉक्टर !
 • प.पू. गुरुमाऊलींच्या अमृत महोत्सव वर्षारंभदिनी श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांनी त्यांच्या चरणी वाहिलेली भावसुमनांजली !
 • आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अन्य वैशिष्ट्ये अन् प्रसंग !
पाने १०, मूल्य ५ रुपये
त्वरा करा ! अवतारस्वरूप असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांची
जीवनगाथा अनुभवण्याची संधी सोडू नका ! आपली मागणी आजच नोंदवा !

हिवाळी अधिवेशनानिमित्त जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीकडून माजी महसूलमंत्री आणि आमदार यांची भेट !

आमदारांकडून सकारात्मक प्रतिसाद 

     जळगाव, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - डिसेंबर २०१६ मध्ये होणार्‍या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने काही महत्त्वाचे प्रश्‍न विधानसभेत मांडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही आमदारांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्या वेळी आमदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगावचे समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. रवींद्र हेबाडे यांनी या भेटी घेतल्या. 

श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याच्यानिमित्ताने येणार्‍या वारकर्‍यांची संख्या न्यून झाली !

नोटाबंदीचा परिणाम ! 
     श्रीक्षेत्र आळंदी (पुणे), २४ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळा, म्हणजेच आळंदीची कार्तिकी यात्रा चालू आहे. या यात्रेच्या निमित्ताने प्रतीवर्षी लक्षावधीहून अधिक संख्येने येणार्‍या वारकर्‍यांची संख्या नोटाबंदी आणि सुट्या पैशांची चणचण यांमुळे ५० टक्क्यांंहून अधिक संख्येने न्यून झाल्याचे चित्र आहे. संत मुक्ताई, अन्य संतांच्या पालख्या आणि काही प्रमुख दिंड्यांचे आगमन झाल्याची माहिती श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांनी दिली. 

श्रीक्षेत्र आळंदी (पुणे) येथे होणार्‍या १२ व्या वारकरी महाअधिवेशनाच्या प्रसारास उत्स्फूर्त प्रतिसाद !

     पुणे, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी सेना, वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर या दिवशी श्रीक्षेत्र आळंदी येथे १२ वे वारकरी महाअधिवेशन आयोजित केले आहे. त्यानिमित्त करण्यात येणार्‍या प्रसाराला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या आळंदी येथे अनेक वैष्णवजण हरिनाम, भजन-कीर्तन आणि सार्थ श्री ज्ञानेश्‍वरीचे पारायण करणे यांमध्ये लीन झाले आहेत. विविध ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अधिवेशनाचा प्रसार करत आहेत. 

वायंगणी, तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पासाठीची भू-मोजणी पूर्ण

ग्रामस्थांचा विरोध कायम
     मालवण - सी-वर्ल्ड (समुद्री जग) प्रकल्पासाठी तालुक्यातील वायंगणी, तोंडवळी गावातील वायंगणी माळरान, तोंडवळी किनारपट्टीचा भाग आणि कालावल खाडीच्या किनारी भागांतील ४१७ एकर भूमीची १५ नोव्हेंबरला चालू झालेली भू मोजणी २१ नोव्हेंबरला पूर्ण झाली. या मोजणीच्या आधारे प्रकल्पास लागणार्‍या जागेचा नकाशा सिद्ध केला जाणार आहे. ग्रामस्थांनी भू मोजणीस विरोध केल्यानंतर पोलीस बंदोबस्तात मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

पोलिसांनी बांदा-दाणोली मार्गावर अवैध मद्यवाहतूक रोखली

      सावंतवाडी - बांदा-दाणोली मार्गावर २२ नोव्हेंबरला रात्री पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची होत असलेली अवैध वाहतूक रोखली. या कारवाईत पोलिसांनी दोघा जणांना कह्यात घेतले. या कारवाईत एकूण ३५ सहस्र ७५० रुपयांचे मद्य, तसेच २ लाख ९० सहस्र रुपये किमतीची दुचाकी आणि टेंपो या वाहनांसह एकूण ३ लाख २५ सहस्र ७५० रुपयांचे साहित्य कह्यात घेतले.

अशा बातम्या केवळ हिंदु राष्ट्रात नसतील !

      सोपोर (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यामधील चकमकीत एक पोलीस हुतात्मा झाला. सायंकाळी उशिरापर्यंत ही चकमक चालू होती.

ही आहे केंद्र सरकारची इंग्रजीची गुलामगिरी !

      बॉम्बे हायकोर्टाचे नामांतर मुंबई उच्च न्यायालय करण्याचे विधेयक केंद्र सरकारने अचानक मागे घेतले आहे. यामागील अधिकृत कारण समजू शकले नाही; परंतु कोलकाता उच्च न्यायालय असे नामकरण करण्यास कलकत्ता उच्च न्यायालय आणि बंगाल सरकार यांनी केलेल्या विरोधामुळे हे विधेयक मागे घ्यावे लागल्याचे कारण सांगितले जात आहे.

फलक प्रसिद्धीकरता

मध्यप्रदेशात सिमीच्या ठार झालेल्या आतंकवाद्यांना धर्मांधांनी हुतात्मा ठरवले !
     मध्यप्रदेशातील खांडवा कारागृहातून पळून गेलेल्या सिमीच्या ८ आतंकवाद्यांना ठार केल्यानंतर यातील ५ आतंकवाद्यांना खांडवा येथे दफन करण्यात आले होते. या ठिकाणी धर्मांधांनी कबर बांधून ते हुतात्मा असल्याचा शिलालेख लावला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Khandwa me mare gaye SIMI ke atankiyonki kabar par Hutatma aisa shilalekh lagaya gaya. - Age chalkar yaha darga banane se pahale sarkar jagegi kya ?

जागो ! : खांडवा में मारे गए सिमी के आतंकवादियों की कब्र बनाकर उन्हें हुतात्मा बतानेवाला शिलालेख लगाया गया ! - क्या यहां आगे दर्गाह बनने से पहले सरकार जागेेगी ?

कम्युनिस्ट पक्षाची (अ)वैचारिक दिशा आणि कृती !

१. कम्युनिस्टांची धूर्त लबाडी जाणा !
       ‘आजपर्यंत कम्युनिस्ट पक्षाविषयी पुष्कळ लिहिले गेले आहे. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने निर्माण झालेल्या, लेनिन आणि स्टॅलिनच्या कार्याने वाढलेल्या, तसेच माओच्या कृतीने प्रभावित झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला ‘क्रांती ही बंदुकीच्या नळीतून होते’, अशी नक्षलवादी सूत्रे आपली वाटावीत, यात आश्‍चर्य नाहीच. त्यांना भारतीय राष्ट्रवाद हा भांडवलशाहीचे अपत्य म्हणून क्रमांक एकचा शत्रू वाटावा, यातही त्यांच्या दृष्टीने काही वावगे नाही. कम्युनिस्टांची नीती ही सूक्तासूक्त न पहाता ‘एंडस् जस्टीफाय द मीनस्’ हेच वागणुकीचे धोरण असल्यामुळे आहे त्या व्यवस्थेत शिरकाव करून सत्ता काबीज करा आणि पुढे ती व्यवस्था समूळ मोडून काढा, हाच त्यांचा शिरस्ता आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांना आलेला पुळका हा त्याचाच भाग आहे.

हिंदूंचे ‘हिंदु राष्ट्र’ हवेच !

       भारतात ‘हिंदु’ हा शब्द जरी उच्चारला, तरी निधर्मी म्हणवणार्‍यांना पोटशूळ उठतो. सर्व वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांची गरळओक चालू होतेे. गांधींच्या पावलांवर पाऊल ठेवून गांधी-नेहरू घराण्यातील नेत्यांनी भारताला ‘निधर्मी’ करण्याचा जणू विडाच उचलला. आजमितीस भारतात हिंदुत्वाची विचारसरणी असणार्‍या पक्षाची सत्ता असली, तरी अद्यापपर्यंत तरी हिंदूंच्या परिस्थितीत म्हणावा तसा पालट झालेला नाही. हिंदु हितार्थ आता ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय आहे.

लांगूलचालनाची वृत्ती देशाच्या सुरक्षेच्या मुळावर

     सुरक्षिततेला प्रत्येक प्राणीमात्राचे स्वाभाविक प्रथम प्राधान्य असते; अगदी पशुपक्षीही याला अपवाद नाहीत. देवाने मनुष्याप्राण्याला बुद्धीचे वरदान दिल्याने मनुष्य स्वतःच्या जीवाच्या रक्षणासाठी त्याच्याही नकळत नानाविध उपाय योजत असतो. केवळ व्यक्तीच नाही, तर समाज आणि राष्ट्र यांच्या सुरक्षेसाठीही विविध विभाग आणि योजना कार्यरत असतात. जगभरातील देशांकडून राष्ट्राच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊन त्यासाठी विविध राष्ट्रहितैशी निर्णयही घेतले जातात; भले असे निर्णय कुणाच्या धार्मिक भावनांच्या विरोधात असले तरीही. भारत मात्र अशा गोष्टींविषयी ठोस निर्णय घेण्यात कचरत आहे.

मुंबई जिल्ह्याचा ऑक्टोबर २०१६ मासातील तिसर्‍या आठवड्याचा हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्याचा आढावा !

१. धर्माभिमान्यांचा धर्मकार्यातील सहभाग !
१ अ. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून फटाक्यांच्या विरोधात जनजागृती ! : ‘२३ ऑक्टोबर २०१६ या दिवशी चुनाभट्टीतील टाटानगर बसस्थानक, हिल रोड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. ‘देश संकटात असतांना फटाके वाजवून पैशांचा धूर करू नये’, ‘फटाक्यांच्या माध्यमातून होणारी देवतांची विटंबना रोखणे’, ‘चिनी फटाक्यांवर बहिष्कार घालणे’ आणि ‘दुर्ग-संवर्धन करण्याची मागणी करणे’ या विषयांवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी आझाद गल्ली येथील धर्माभिमानी युवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चुनाभट्टी सुधार समिती, विश्‍व हिंदू परिषद, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी संघटना सहभागी होत्या. चुनाभट्टी येथील आझाद गल्ली येथील धर्मशिक्षण वर्गातील युवकांना एकत्र करून या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे नियोजन केले. आंदोलनानंतर झालेल्या युवकांच्या बैठकीत प्रत्येक मासाला देश आणि धर्म यांसाठी जागृतीपर उपक्रम कार्यान्वित करण्याचा निर्धार करण्यात आला.

सद्गुरु राजेंद्रदादा,वाट पहातो आहे देवद आश्रम ।

देवद आश्रम साधिकेला म्हणाला,
करशील का एक सेवा । सांगतो मी एक निरोप ॥ १ ॥

सद्गुरु दादा कधी येणार । 
करमत नाही आम्हाला फार ॥ २ ॥

सत्संग असतो त्यांचा दिवस-रात्र ।
होतो त्यांच्या आठवणीने जागृत भाव ॥ ३ ॥
      या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक

सर्वकाही श्री गुरूंवर सोडणारे साधक !

     ‘साधक म्हणतात, ‘कृतज्ञता नहीं है हममें । फिर भी कृपा बरसाओ गुरुवर ।’, तर काही साधक म्हणतात, ‘आमची झोळी फाटकी आहे. तुम्हीच टाके घाला. दोराही तुम्हीच आणा, सुईपण आणा. आम्ही आपले भिकारी होऊन फिरू.’ 
- पुष्पांजली, बेळगाव (२३.११.२०१४, रात्री ११.३०)

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

    स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या ‘सर’ फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते, ‘‘सांभाळा ! या हिंदु-मुसलमानांच्या एकीच्या जाळ्यात सापडू नका ! आपणाला भिकारड्या हिंदूंशी एकी करून काय लाभ ? आपण इंग्रजांशी एकी करून आपला लाभ करून घेतला पाहिजे.’’
      त्यामुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाकरता हिंदुस्थानातील हिंदूंनी केलेले प्रयत्न हे जातीय आणि अराष्ट्रीय असूच शकत नाहीत.
(‘लोकजागर’, वर्ष २ रे, अंक ४०, १२ एप्रिल २०१३)

संपूर्ण देवद आश्रम म्हणे, या तुम्ही सत्वरी ।

सद्गुरु राजेंद्रदादा, पित्याविना घर जसे ।
तसा देवद आश्रम वाटू लागला ॥ १ ॥

आश्रमात जाता-येता आपसूकच नजरा ।
पहिल्या माळ्यावर वळू लागल्या ॥ २ ॥

खिडकीतून मिळणारा दृष्टीक्षेपरूपी आशीर्वाद ।
त्या नजरा चहूकडे शोधू लागल्या ॥ ३ ॥

साधकांनो, गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्या साधनेसाठी एवढे करतात; पण ‘आपण त्यांच्यासाठी काय करतो ?’, याचा विचार करा ! - पू. जयराम जोशीआजोबा


 • परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
 • पू. जयराम जोशीआजोबा यांनी रामनाथी आश्रमातील काही साधकांना केलेले मार्गदर्शन 
        १.११.२०१६ या दिवशी मिरज येथील सनातन आश्रमातील संत पू. जयराम जोशीआजोबा यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात काही साधकांना गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव वाढवण्यासंबंधी मार्गदर्शन केले. त्या प्रसंगी त्यांनी सांगितलेली सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत. 
१. मुलाला अकस्मात् हृदयविकाराचा झटका आल्यावर प.पू. डॉक्टरांच्या कृपेने योग्य वेळी सर्व प्रकारचे साहाय्य मिळून तो वाचणे : पुण्यामध्ये असतांना योगेशला (माझ्या मुलाला) अकस्मात् हृदयविकाराचा झटका आला होता. त्या वेळी तेथे त्याच्याजवळ कुणी नव्हते. अशा परिस्थितीत त्याला रुग्णालयात त्वरित भरती करून पुढील उपचार मिळाले. त्यामुळे तो त्या कठीण परिस्थितीतही वाचला. हे सर्व कुणी केले ? तर प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच सर्व झाले ! त्यांच्या कृपेमुळेच योग्य वेळी योगेशला त्याच्या मित्रांना दूरभाष करण्याचे सुचले आणि त्यांचे साहाय्य मिळून सर्व व्यवस्थित पार पडले. 

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे आणि देवद आश्रमातील साधक यांच्याकडून परभणी येथील साधिका सौ. कल्पना गड्डम यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

१. सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांनी तुमच्या साहित्याची बांधाबांध झाली का ?’, 
असे विचारल्यावर साधिकेने अंतर्मुख होऊन विचार करणे आणि ‘आश्रमातून 
जातांना तळमळ, भाव आणि चैतन्य आपल्यासमवेत घेऊन जायला पाहिजे’, 
असे देवाला अपेक्षित असून सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे हेच सुचवत असल्याची जाणीव होणे 
सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे
      १.६.२०१५ या दिवशी सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांनी मला ‘तुमच्या साहित्याची बांधाबांध (पॅकींग) झाली का ?’, असे विचारले. तेव्हा मी त्यावर स्थुलातून विचार करून ‘नाही झाली’, असे उत्तर दिले. दुसर्‍या वेळी त्यांनी प्रश्‍न विचारल्यावर मी ‘स्थुलातील वस्तूंची अर्धी बांधाबांध झाली’, असे उत्तर दिले. नंतर ‘त्यांच्या प्रश्‍नामागील नेमका भावार्थ काय असावा’, याचा अंतर्मुख होऊन विचार केल्यावर ‘मी आश्रमातून जातांना तळमळ, भाव आणि चैतन्य आपल्यासमवेत घेऊन जायला पाहिजे’, असे देवाला अपेक्षित आहे आणि सद्गुरु दादा हेच मला सुचवत आहेत’, याची जाणीव झाली. त्या क्षणी मी श्रीकृष्णाच्या चरणी क्षमायाचना करून कृतज्ञता व्यक्त केली.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी संतसेवेत असणार्‍या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) सुमन नाईक
      ११ ते १८.६.२०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन रामनाथी, गोवा येथील रामनाथी मंदिरात पार पडले. त्या कालावधीत संतसेवेत असणार्‍या साधकांना शिकायला मिळालेली सूत्र येथे देत आहोत. 
१. पू. (सौ.) सुमन नाईक, कपिलेश्‍वरी, गोवा. 
१ अ. संतसेवा करतांना क्षणाक्षणाला नियोजनात पालट होत असतांनाही साधकांनी तळमळीने अन् उत्साहाने संतसेवा केल्याचे अनुभवता येणे 
संतसेवा करणे ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला नियोजन पालटत असते. विविध संतांची विविध पथ्ये असतात. ऐन वेळी वेगळा पदार्थ बनवून द्यावा लागतो. अनेक वेळा वर-खाली करावे लागते, असे असूनही सर्वांच्या तोंडवळ्यावर आनंद दिसत होता. सर्व साधकांमध्ये तळमळ, उत्साह आणि चुकांविषयी खंत जाणवली. काही जणांमधे उतावळेपणा होता; परंतु सत्संगात हा भाग घेतल्यावर तो अल्प झाला. कक्षातील साधकांना १ मिनिटही बसायला मिळत नव्हते, तरी देवाने त्यांची पूर्ण क्षमता वापरून सेवा करवून घेतली. एकाही साधकाला दुसर्‍याविषयी विकल्प आल्याचे जाणवले नाही. सर्व जण मिळेल ती सेवा आनंदाने करत होते. कोणतीही चूक सांगितली, तरी प्रत्येक जण ती स्वीकारून पुढे चांगले करण्याचा प्रयत्न करत होता. मी सभास्थळी संतसेवा केली होती; परंतु खरी संतसेवा म्हणजे काय असते, हे मी इथे अनुभवले. त्यासाठी ईश्‍वरचरणी कोटी कोटी कृतज्ञता ! 

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे हे प.पू. डॉक्टरांचे स्थुलातील रूपच !

१. त्रास होत असतांना सद्गुरु राजेंद्रदादा यांचे दर्शन घडून त्रास उणावणे आणि 
‘ते प.पू. डॉक्टर आहेत’, असा विचार माझ्या मनात येऊन त्यांचे स्मरण होऊ लागणे 
     ‘१७ आणि १८.८.२०१६ या दिवशी ते माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली होती. तसेच १८.८.२०१६ च्या रात्री काही प्रमाणात त्रास अधिक वाढला. त्यामुळे माझी प्राणशक्ती पुष्कळ न्यून झाली होती. रात्री चांगली झोप होऊनही मी सकाळी उठल्यावर मला पुष्कळ थकवा जाणवत होता; म्हणून मी दुपारी १२ वाजेपर्यंत पडूनच होतो. मला उठता येत नव्हते. नंतर मी प.पू. डॉक्टरांचे स्मरण करून बसत-बसत खोलीतील केर काढत होतो. त्याच वेळी सद्गुरु राजेंद्रदादा आश्रमातील माझ्या खोलीकडे आले आणि माझ्याकडे बघून ते पुढे गेले. त्यानंतर मला पुष्कळ उत्साह जाणवू लागला. १ - २ मिनिटांतच मला त्रास देणार्‍या त्रासदायक शक्तीची शक्ती अल्प होऊन मला चालण्यासाठी शक्ती मिळाली. हे अनुभवतांना ‘सद्गुरु राजेंद्रदादा म्हणजे प.पू. डॉक्टर आहेत’, असा विचार माझ्या मनात आला आणि मला प.पू. डॉक्टरांऐवजी सद्गुरु राजेंद्रदादांचे स्मरण होत होते.

सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ यांनी प्रवास करून आणलेल्या संग्रहातील वस्तूंच्या सत्संगात राहिल्याने मन सकारात्मक आणि आनंदमय होणे

श्री. व्यंकटेश अय्यंगार
      ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ पूर्ण देशात लाखो किलोमीटर प्रवास करून पुष्कळ वस्तू घेऊन आल्या आहेत. त्या वस्तूंतील चैतन्याचा अनुभव घेण्याची संधी सर्व साधकांना मिळाली आहे. या वस्तूंसह सत्संगात उपस्थित रहाण्याचे भाग्य मला लाभले आहे. मी या सेवेसाठी आलो, तेव्हा ‘येथे मला येथे कोणती सेवा आहे ? मला काय शिकायला मिळणार ?’, असे चुकीचे विचार माझ्या मनात होते. त्या वस्तूंच्या सत्संगात राहू लागलो, तेव्हा माझे मन आपोआप सकारात्मक आणि आनंदमय होऊ लागले. मनाचा कल शुद्धतेकडे झाला. यासाठी मी गुरुचरणांचे कोटी कोटी वंदन करतो.’ 
 - श्री. व्यंकटेश अय्यंगार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०१६) 

गुरूंवरील श्रद्धेने दायित्वाचे शिवधनुष्य पेलविती ।

     श्रीगुरूंच्या कृपेने ताईसमवेत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. सेवेविषयी, साधकांप्रती भाव कसा हवा, परिपूर्ण सेवेचे मोल काय आणि या सर्वांसाठी प्रक्रिया राबवणे किती महत्त्वाचे आहे, याचे मूल्य ताईनेच आम्हाला लक्षात आणून दिले. ताई कशी आहे, हे तिला अनुभवतांनाच कळते. सर्व शब्दात मांडणे कठीण आहे; पण तरीही.... 
साधकांना पदोपदी आनंद देण्यासाठी ।
रात्रंदिवस धडपडणे, हीच तिची साधना ।
गुरूंचे मन जिंकण्याच्या ध्यासाने ।
परिपूर्ण सेवा, हीच तिची प्रकृती अन् ओळख ॥ १ ॥

अफाट कार्यक्षमता, प्रेमभाव असणार्‍या आणि सद्गुरु बिंदाताईंप्रमाणे स्वतःला घडवत असणार्‍या ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या सौ. अश्‍विनी पवार ! (वय २६ वर्षे)

सौ. अश्‍विनी पवार
     सनातनच्या देवद आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणारी सौ. अश्‍विनी अतुल पवार ही देवद आश्रमाचा आध्यात्मिक आधारस्तंभ आहे. तिच्यात अफाट कार्यक्षमता, प्रेमभाव, शिस्त, वेळेचा सदुपयोग करणे, निर्णयक्षमता, विचारण्याची वृत्ती असणे, इतरांचा विचार करणे अशा अनेक गुणांचे भांडार आहे. त्यांपैकी लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
१. संतांचे आज्ञापालन करणे 
     ‘एका संतांनी सौ. अश्‍विनीताईंना सांगितले होते, ‘‘सद्गुरु बिंदाताईंप्रमाणे बनून देवद आश्रम सांभाळायचा आहे.’’ त्याप्रमाणे त्यांनी देवद आश्रमाला रामनाथी आश्रमाप्रमाणे बनवण्याचे ध्येय ठेवले आहे आणि ते त्यांनी काही प्रमाणात साध्य करून दाखवले आहे.

मितभाषी, प्रेमळ आणि कृतज्ञताभाव असणारे पुणे येथील श्री. विजय मुठे (वय ७७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

१. बाबा काटकसरी, अतिशय प्रेमळ आणि मितभाषी आहेत. त्यांच्यात जिद्द आणि चिकाटी हे गुण आहेत.
२. बाबांनी केलेली साधना
अगदी लहान वयापासून बाबा दत्तगुरूंचे भक्त आहेत. आयुष्यात कित्येक कठीण प्रसंगांत दत्तभक्तीने तारून नेले असल्याच्या अनुभूती त्यांना ईश्‍वरी कृपेने आल्या आहेत.
३. परिस्थिती स्वीकारणे
बाबा ११ वर्षांचे असतांना त्यांच्या आईचे, म्हणजे माझ्या आजीचे निधन झाले. त्यानंतर स्वतःची परिस्थिती आणि भावाचे दायित्व यांविषयी कोणतेही गार्‍हाणे न करता परिस्थितीचा स्वीकार करून ते व्यावहारिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिले. प्रसंगी उपाशी राहूनही त्यांनी ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले. या सर्व गोष्टी आम्हाला आईकडून समजल्या. ते स्वतःहून कधीही याचा उल्लेख करत नाहीत.

‘देव’दर्शन कसे घडते ?

‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’ । 
याचा अर्थच असा आहे, सुष्ट-दुष्ट जगात असणारच ॥ १ ॥
नुसत्या सुष्टासाठी त्याला यायची जरूर काय ।
आणि नुसत्या दुष्टांना मारायचे त्याला कारण काय ॥ २ ॥
चोर चोराच्या घरी चोरी करतो का । 
दुष्टांचेही एक प्रकारे उपकारच नाहीत का ॥ ३ ॥
हिरण्यकश्यपुमुळेच प्रल्हादाला भगवंताचे दर्शन घडले । 
बळीला (टीप १) ‘अहं’मुळेच वामनाचे दर्शन घडले ।
कळले ना राणा, ‘देव’दर्शन कसे असे घडते ? होय ना ॥ ४ ॥
टीप १ : बळीराजाला
- पुष्पांजली, बेळगाव (मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा, २३.११.२०१४) 

आईच्या मृत्यूसमयी आध्यात्मिक उपाय आणि दत्ताचा नामजप करतांना आलेली अनुभूती

आईच्या मृत्यूसमयी तिच्या समोर दत्ताचे सात्त्विक चित्र धरून सर्व भावंडांनी वैखरीतून ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप केल्याने आईला शांतपणे मृत्यू येणे अन् त्यावरून आध्यात्मिक उपाय आणि दत्ताचा नामजप यांचे महत्त्व लक्षात येणे : ‘डिसेंबर २०१० मध्ये माझी आई रुग्णाईत असतांना तिला रुग्णालयात ठेवले होते. शेवटी औषधोपचारांचा परिणाम दिसत नसल्याने आधुनिक वैद्यांनी तिला घरी नेण्यास सांगितले. आम्ही सायंकाळी ५ वाजता तिला घरी आणले. थोड्या वेळाने तिला त्रास होऊ लागला आणि पुढे तो वाढत गेला. मग आम्ही आईजवळ सात्त्विक उदबत्ती लावली आणि आम्ही सर्व भावंडे (दोन भाऊ आणि मी) तिच्याजवळ बसून वैखरीतून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागलो. एका भावाने तिच्या डोक्यावर हात ठेवून नामजप करण्यास आरंभ केला. आम्ही तिच्यासमोर दत्तात्रेयाचे चित्र धरल्यावर ती त्याकडे पाहून ‘दत्त...दत्त’ असे म्हणू लागली. साधारण अर्ध्या घंट्याने तिची हालचाल हळूहळू बंद होऊ लागली. प्रथम डोळे बंद झाले. पुढे श्‍वास हळूहळू मंदावला. शेवटी ओठांची हालचाल न्यून होऊन बंद झाली. त्या वेळी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामाचे महत्त्व लक्षात आले. देवाच्या कृपेमुळे हे सर्व पहाता आले. त्यासाठी त्यानेच सर्व शक्ती दिली. देवाने शेवटच्या क्षणी आईकडून आणि आम्हा सर्वांचाही नामजप करून घेतला, यासाठी प.पू. गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’ 
- सौ. सुनंदा नंदकुमार जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२१.९.२०१६) 

वैज्ञानिक संशोधन आणि आध्यात्मिक संशोधन यांतील भेद

श्री. राम होनप
१. वैज्ञानिक संशोधन 
‘      एखाद्या विषयात विविध वैज्ञानिक प्रयोगांद्वारे विशिष्ट निष्कर्षाद्वारे सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न असणे
२. आध्यात्मिक संशोधन 
    ‘विविध विषयांचे अंतीम सत्य भगवंतच आहे’, हे ठाऊक असल्याने आध्यात्मिक संशोधनाद्वारे त्याची अनुभूती घेणे’
     ‘मनुष्याला ज्ञान मिळण्यापूर्वी ते सूक्ष्म असते. ज्ञान मनुष्याला प्राप्त होते, तेव्हा प्रथम शब्दरूपाने आणि नंतर वाक्यरचनेद्वारे ते पूर्णतः व्यक्त होते.’ 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०१६)

सेवेतील सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

    ‘वस्तूसंग्रहाची सेवा करतांना सेवेतील साधिकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे. 
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. व्यवस्थितपणा : तेथे प्रत्येक वस्तू नीटनेटकेपणे ठेवली जाते. वापरून झाल्यावर वस्तू पुन्हा व्यवस्थित जागेवर ठेवली जाते. प्रत्येक साधिका या नियमाचे काटेकोरपणे पालन करते.
१ आ. काटकसर : प्रत्येक साधिका पॉलीथीन कव्हर, कागद, खोका इत्यादी काळजीपूर्वक आणि आवश्यक तेवढेच वापरते. 
१ इ. दुसर्‍यांना साहाय्य करणे : प्रत्येक साधिका दुसर्‍यांना साहाय्य करण्यास तत्पर असते. सर्वांनी एकत्रितपणे प्रगती करण्याचा भाव प्रत्येकीच्या मनात असतो. त्या एकमेकांना त्यांच्या चुका साहाय्य करण्याच्या भूमिकेतून आणि मनापासून सांगतात.

साधना आणि सेवा यांची तळमळ अन् प.पू. डॉक्टरांवर नितांत श्रद्धा असणारा ५४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गोवा येथील कु. रिषभ राजेश कामतेकर (वय १० वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. रिषभ राजेश कामतेकर एक दैवी बालक आहे !
कु. रिषभ कामतेकर
     (‘कु. रिषभ वर्ष २०११ मध्ये उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आल्याचे घोषित केले होते.’ - संकलक)
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘ तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

सिंहगड रस्ता (पुणे) येथील श्री. विजय मुठे (वय ७७ वर्षे) यांनी गाठली ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी !

श्री. विजय मुठे (डावीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. कृष्णाजी पाटील
      पुणे, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - शांत, प्रेमळ, नम्र आणि मितभाषी असलेले सिंहगड रस्ता येथे रहाणारे श्री. विजय मुठे यांनी ६१ प्रतिशत स्तर प्राप्त केला.
     ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. वैभवी भोवर यांनी श्री. मुठेकाका जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले असल्याचे घोषित केले. हा सोहळा २३ नोव्हेंबर या दिवशी श्री. मुठेकाकांच्या घरी पार पडला. या सोहळ्याला श्री. मुठेकाका यांच्या धर्मपत्नी सौ. नीलिमा मुठे, स्नुषा सौ. सायली मुठे आणि नात कु. हरिषा उपस्थित होत्या. तसेच भाग्यनगर (तेलंगणा) येथील सनातनच्या साधिका आणि काकांच्या कन्या सौ. श्रुती आचार्य याही दूरभाषच्या माध्यमातून उपस्थित होत्या.

सद्भावाची सेवेची दिव्य येथ प्रचीती ।

श्री. उदयकुमार उपाध्ये
सद्भावाची सेवेची ही दिव्य येथ प्रचीती ।
दोन्ही कर जोडून जाहली कुंठीत आमुची मती ॥ धृ.॥
विनम्रतेने वलयांकित या श्‍वेत सरिता वाहती ।
खळखळणारे शुभ्र हास्य त्या मुखी नित्य दाविती ।
शीतलतेचा मोद मोद जणू भरून राहिला अंतरंगी ।
सद्भावाची सेवेची ही दिव्य येथ प्रचीती ॥ १ ॥
पूज्य पूज्य अन् परम पूज्य जे अद्वैताचे येथे ।
अनाहती आनंद नांदतो दिव्यत्वाचा जेथे ।
प्राणप्रतिष्ठा सनातनी ही सद्धर्माप्रती ।
सद्भावाची सेवेची ही दिव्य येथ प्रचीती ॥ २ ॥
परात्परे तत्परता ऐसी साधन शुचिता रुजली ।
सत्त्वगुणी मौक्तिके उधळूनी परंपरा नीत सजली ।
अनुभव हा अमृतात न्हाला आमुच्या हृदयाप्रती ।
सद्भावाची सेवेची ही दिव्य येथ प्रचीती ॥ ३ ॥

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. परशराम पांडे
१. ‘भगवंताने मला हा देह दिला, साधनेसाठी ही पृथ्वी दिली, सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या’, याची जाणीव ठेवायला हवी. त्याचबरोबर देहापासून आपल्याला त्रास होऊ नये, म्हणजेच त्यात गुंतता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी. सतत आनंदी रहाणे आणि निरपेक्षपणे ईश्‍वराची सेवा करत रहाणे, म्हणजे खरी साधना आहे. 
२. भगवंतासाठी मला प्रसन्न रहाणे आवश्यक आहे. यासाठी ‘त्याच्यावर सर्व सोपवणे आणि मी मुक्त होणे’, हाच उपाय आहे. हे भगवंताने गीतेतसुद्धा तसे सांगितले आहे. असे असतांना ‘मी त्याचे ऐकत नाही’, हे पाप आहे; म्हणून ‘त्याच्यावर सर्व भार सोडून आपल्या हातून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या समर्पण करून सुधारण्याचा प्रयत्न करत रहाणे’, हाच त्याच्यावरचा उपाय आहे. 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
       दिवाळीसाठी काही साधक आश्रमातून घरी गेले नाहीत. त्यांपैकी २ - ३ साधकांनी ‘‘आश्रमात वर्षभर दिवाळी असते, मग घरी कशाला जायचे ?’’, असे विचार व्यक्त केल्याचे समजले. असे विचार असणार्‍या काही साधकांना घरच्यांची इच्छा, म्हणजे परेच्छा म्हणून घरी जावे लागते.’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कोणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

प्रेम
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान

कोणतीही गोष्ट जगात दिसली पाहिजे, उदा. प्रेम हे जगात दिसले 
पाहिजे, दाखविले पाहिजे, मग त्यात वास्तविकता असो वा नसो.
     भावार्थ : जग आणि प्रेम हे प्रकृतीतील आहे. प्रेम कृतीतून दाखविता आले पाहिजे, नाहीतर दुसर्‍याला ते कळणार नाही. एकदा एका शिष्याकडे गेले असता, बाबांनी तेथे हातात माळ घेऊन जप केला. मग त्याच्या घरातील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली. वास्तविक बाबांच्या केवळ अस्तित्वानेच तसे झाले असते; पण अस्तित्वाचा परिणाम लोकांना दिसत नाही, तर हातात माळ धरून केलेला जप दिसतो, म्हणून बाबांनी तसे केले. या प्रसंगाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे बाबांनी हातात माळ घेऊन जप केल्याचे कुणी पाहिले नव्हते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सर्वकाही परमेश्‍वराच्या इच्छेने होते ! 

या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र अन् मानव यांचा जन्म आणि त्यांचे प्राप्तकार्य 
हे परमेश्‍वरी इच्छेनेच नियंत्रित आहेत’, हा विश्‍वास असला की, कुणाचाही द्वेष वाटत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


पाकला संपवाच !

संपादकीय
     पाकला संपवा एकदाचे’, असा विचार प्रत्येक भारतियाच्या मनामध्ये आहे आणि तो वेळोवेळी नव्हे, प्रतिदिनच प्रकट होत असतो. कारण पाककडून प्रतिदिन सीमेवर कुरापती काढण्याचा प्रकार घडत असतो. यात कधी भारतीय सैनिक, तर कधी नागरिक यांचा मृत्यू होत असतो. दोनच दिवसांपूर्वी पाक सैन्याने काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत घुसून ३ सैनिकांना ठार केले. यातील प्रभु सिंह नावाच्या सैनिकाच्या मृतदेहाचा शिरच्छेद करून त्याची विटंबना करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या भारतीय सैनिकांनी दुसर्‍याच दिवशी याच सेक्टरमधील सीमेवरील पाकच्या काही चौक्या उद्ध्वस्त केल्या. तसेच २ सैनिक आणि एक कॅप्टन यांना ठार केले. तसेच या आक्रमणात पाकव्याप्त काश्मीरमधील ४ नागरिकही ठार झाले. भारतीय सैनिकांनी ३ सैनिकांच्या हुतात्मा होण्याचा सूड उगवला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn