Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकचे ३ सैनिक ठार, तर अनेक चौक्या उद्ध्वस्त !

  • आक्रमण हा संरक्षणाचा योग्य मार्ग आहे, हे सरकारला कधी कळणार ? भारताचे सैनिक हुतात्मा झाल्यानंतर होणारी कारवाई आधीच का केली जात नाही ? 
  • सैनिकाच्या मृतदेहाच्या विटंबनेनंतर भारतीय सैन्याची कारवाई !
       नवी देहली - काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये ३ भारतीय सैनिकांना ठार करून त्यातील एका सैनिकाचा शिरच्छेद करण्याच्या घटनेनंतर भारतीय सैनिकांनी याच सेक्टरमध्ये केलेल्या आक्रमणात पाकचे ३ सैनिक ठार झाले आहेत. यात एका अधिकार्‍याचाही समावेश आहे. तसेच काही चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या. दुसरीकडे पाकने त्याचे ११ नागरिक ठार झाल्याचा दावा केला आहे. यात एका रुग्णवाहिकेवर भारताने आक्रमण केल्याचा आरोप केला आहे. पाकने केलेल्या आक्रमणात प्रभूसिंह (वय २५ वर्षे), के. कुशवाह (वय ३१ वर्षे) आणि शशांक के. सिंह यांना ठार करण्यात आले होते. त्यातील प्रभूसिंह यांच्या मृतदेहाचा शिरच्छेद करण्यात आला.
       भारताने २३ नोव्हेंबरला सकाळी लवात आणि नकयाला येथील टाटा पानी क्षेत्रातील पाकच्या चौक्यांवर जोरदार गोळीबार केला. उखळी तोफा आणि मशीनगन्सच्या साहाय्याने आक्रमण करण्यात आले. यात पाक सैन्याची ठाणी उद्ध्वस्त करण्यात आली. दुसरीकडे पाकनेही पूंछ, राजौरी, भिंबर आणि माछिल सेक्टरमध्ये गोळीबार केला. भिंबर गलीमध्ये झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक घायाळ झाले.

पेप्सी, कोकाकोला, माऊंटन ड्यू, स्प्राईट आणि सेव्हन अप शीतपेयांमध्ये विषारी घटक ! - केंद्र सरकारची माहिती

हे इतक्या वर्षांत केंद्रातील सरकारांच्या लक्षात का आले नाही 
कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, याचीही चौकशी 
झाली पाहिजे; कारण हा जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे !
        नवी देहली - पेप्सी, कोकाकोला, माऊंटन ड्यू, स्प्राईट आणि सेव्हन अप या शीतपेयांमध्ये जड धातू, जस्त, कॅडियम आणि क्रोमियम आढळून आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी राज्यसभेत दिली. 
      राज्यसभेच्या एका सदस्याने विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना कुलस्ते म्हणाले की, ड्रग टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्डाने वरील ५ शीतपेयांचे नमुने बाजारपेठेतून घेतले होते. त्यानंतर कोलकत्याच्या नॅशनल टेस्ट हाऊसमध्ये हे नमुने पाठवण्यात आले. या शीतपेयांमध्ये विषारी पदार्थ असल्याचे या तपासण्यांमध्ये आढळून आले.

झारखंड विधानसभेत आमदारांकडून तोडफोड !

  • विरोधासाठी अवैध मार्गांचा वापर करून जनतेच्या करातून चालवण्यात येणार्‍या विधानसभेचे कामकाज रोखणार्‍या आणि सभागृहातील वस्तूंची हानी करणार्‍या सदस्यांकडून याचा व्यय वसूल केला पाहिजे !
  • अध्यक्षांवर खुर्ची फेकली, ध्वनीक्षेपक तोडले !
        रांची (झारखंड) - झारखंड विधानसभेमध्ये २३ नोव्हेंबरला सीएन्टी आणि एस्पीटी विधेयकामध्ये संशोधन करण्याच्या सूत्रावरून गदारोळ झाला. या वेळी झारखंडमुक्ती मोर्चाच्या आमदारांनी खुर्ची आणि ध्वनीक्षेपक तोडले. तसेच विधानसभाध्यक्ष दिनेश उरांव यांच्यावर खुर्चीद्वारे आक्रमण केले. तसेच त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेली विधेयकाची प्रत फाडण्यात आली. झारखंडमुक्ती मोर्चाचे आमदार सौस सुरीन आणि काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांची सुरक्षारक्षकांशी धक्काबुक्की झाली. विरोधी पक्षांच्या आमदारांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षाबरोबर दोन हात करण्यास आम्ही सिद्ध आहोत; मात्र विधेयक सादर होऊ देणार नाही. या घटनेनंतर कामकाज स्थगित करण्यात आले. ३ मे या दिवशी सीएन्टी (छोटानागपूर टेनंसी अ‍ॅक्ट) आणि एस्पीटी (संथाल परगना टेनंसी) या विधेयकांमध्ये संशोधन करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाने संमत केला होता. या कायद्यामुळे आदिवासी भूमी मालकाला त्याच्या भूमीचे परिवर्तन करण्यात अधिकार मिळणार आहे. भूमीचा उपयोग शेतीव्यतिरिक्त व्यावसायिक कामासाठीही करण्यात येणार आहे. आतापर्यंत आदिवासी त्यांची भूमी कोणालाही विकू शकत नव्हते. या कायद्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याच्या अंतर्गतच ही भूमी विकू शकतात.

हिंदूंचा छळ चालूच राहिल्यास ३० वर्षांनी बांगलादेशात हिंदू रहाणार नाहीत ! - प्रा. अब्दुल बरकत

      जे बांगलादेशातील एका मुसलमान प्राध्यापकाच्या लक्षात येते, ते भारतातील एकाही शासनकर्त्याच्या, लेखकाच्या आणि पत्रकाराच्या लक्षात येत नाही, हे लक्षात घ्या ! अखलाकच्या प्रकरणात मात्र हेच लेखक आणि पत्रकार पुरस्कार परत करण्यासाठी सर्वार्ंत पुढे होते !
      ढाका - धार्मिक अत्याचारांमुळे देश सोडून जाणार्‍या हिंदूंचे लोंढे चालूच राहिले, तर ३० वर्षांनी बांगलादेशात एकही हिंदु नागरिक नावाला शिल्लक रहाणार नाही, असा निष्कर्ष ढाका विद्यापिठातील प्रा. अब्दुल बरकत यांनी काढला आहे. 
      प्रा. अब्दुल बरकत यांनी पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ रिफॉर्मिंग अ‍ॅग्रीकल्चर, लॅण्ड अ‍ॅण्ड वॉटरबॉडिज इन बांगलादेश या पुस्तकात हा निष्कर्ष मांडल्याचे वृत्त ढाका ट्रिब्युन वृत्तपत्राने दिले आहे. या पुस्तकाचे १९ नोव्हेंबरला ढाका विद्यापिठात प्रकाशन झाले.

संजय साडविलकर यांच्यासह तिघांनी बनावट भक्तमंडळ स्थापन करून भक्तांकडून देणग्या घेतल्या !

  • अनेक अवैध कृत्ये उघड होऊनही संजय साडविलकर यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना पाठीशी घालणार्‍या पोलिसांवर सरकार कारवाई करणार का ?
  • अवैध शस्त्रविक्रेता संजय साडविलकर यांचे आणखी एक अवैध कृत्य उघड !
  • बनावट भक्तमंडळावर फौजदारी कारवाई करण्याचा न्यायालयाचा आदेश !
        कोल्हापूर, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - संजय साडविलकर यांसह तिघांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात असलेल्या दत्त मंदिराच्या आवारात अनधिकृतरित्या श्री दत्तात्रय देव मठ संस्थान भिक्षास्थान भक्तमंडळ नावाची बनावट संस्था स्थापन केली आहे. या भक्तमंडळाची बनावट नोंदणी करून भक्तांकडून देणगी घेतल्याविषयी फौजदारी गुन्हा प्रविष्ट करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर्.व्ही. सपाटे यांनी दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ डिसेंबर या दिवशी होणार आहे. तक्रारदाराच्या वतीने अधिवक्ता श्री. ए.आर्. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
        (यापूर्वी संजय साडविलकर यांच्या विरोधात अवैधरित्या रिव्हॉल्व्हर, पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे असे गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्या विरोधात सांगली जिल्ह्यात ५ तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत.

घराघरातील वाढते कलह थांबवण्याचे सामर्थ्य रामायणाच्या शिकवणीत ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे
      उज्जैैन, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - आज शिक्षणातून आपल्यासमोर रामाचा आदर्श ठेवला जात नाही. पूर्वी रामायणाच्या कथा वडीलधार्‍यांकडून सांगितल्या जात. त्यामुळे सर्व परिस्थितींमध्ये श्रीरामाप्रमाणे आदर्शपणे कसे वागायला हवे, याचे संस्कार सर्वांवर होत होते. रामायणाची शिकवण न मिळाल्यानेच आज घरातील कलह वाढले आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला रामायणाचा आदर्श युवकांसमोर ठेवावा लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते येथील ‘पुरुषोत्तम सागर’च्या घाटावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. येथील ‘सादर वन्दे’ या संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक कुराणचा अभ्यास करण्यास भाग पाडण्याचा आणि विद्यार्थ्यांचे यज्ञोपवीत तोडून टाकण्याचा प्रकार !

केरळ विश्‍वविद्यालयाच्या महाविद्यालयातील 
महंमदअली जिन्हा या प्राध्यापकाचा हिंदुद्वेष !
     मुसलमान कोणत्याही पदावर गेले, तरी ते प्रथम मुसलमान असतात, हे अनेकदा समोर आले आहे, याचेच हे आणखी एक उदाहरण ! अशांकडून कधीतरी निधर्मीवाद जोपासला जाईल का आणि हिंदूंनी तरी त्यांच्याशी तो कसा ठेवावा ?
  थिरूवनंतपुरम् - थिरूवनंतपुरम् विश्‍वविद्यालयाच्या महाविद्यालयातील महंमदअली जिन्हा हे इस्लामी इतिहास विषयाचे प्राध्यापक हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक कुराणचा अभ्यास करणे भाग पाडतात, तसेच विद्यार्थिनींना कुराणचे वाचन करण्याची सक्ती करतात, अशी लेखी तक्रार विद्यार्थ्यांच्या एका गटाने विश्‍वविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली आहे.

देशात आतापर्यंत इसिसचे ५० आतंकवादी अटकेत !

देशात सहस्रो जिहादी गुप्त कारवाया 
करत असतांना केवळ ५० जणांना अटक 
करणारे सरकार आतंकवाद कसा नष्ट करणार ! 
        नवी देहली - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए) आणि राज्यांतील पोलीस यंत्रणा यांनी केलेल्या संयुक्त अन्वेषणामध्ये आतापर्यंत देशातून इसिसच्या ६८ आतंकवाद्यांना कह्यात घेतले आहे, तर ५० जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत दिली. ५० पैकी ११ महाराष्ट्रातील आहेत. उत्तराखंडमध्ये ४, बिहारमध्ये १, कर्नाटकात ७, तेलंगणात ११, केरळात ६ आणि तमिळनाडूत २ आतंकवाद्यांना अटक केल्याचे त्यांनी म्हटले. इसिसचा कट्टरतावाद रुजवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर ते करत असल्याचे तपासात दिसून आले, असेही अहिर म्हणाले. 

केरळमधील ‘क्षेत्रभूमी संरक्षक वेदी भारत’ संघटनेचा उद्ध्वस्त मंदिरे पुनरुज्जीवित करण्याचा स्तुत्य उपक्रम !

      मलाप्पुरम् (केरळ) - ‘क्षेत्रभूमी संरक्षक वेदी भारत’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने केरळ राज्यातील इस्लामी आक्रमणात उद्ध्वस्त झालेली मंदिरे पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘लाईट ए लॅम्प’ (एक पणती पेटवूया) या नावाखाली एका उपक्रमास प्रारंभ केला आहे. त्यासाठी सर्वप्रथम केरळ राज्यातील मुसलमानबहुल जिल्हा मलाप्पुरम् याची निवड करण्यात आली आहे.
१. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे क्रूरकर्मा टिपू सुलतान याने मलबार भागात आक्रमण करून ४०० हून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती. तसेच लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर केले होते. हिंदु महिलांवर बलात्कार आणि अत्याचार करून त्यांना लैंगिक गुलाम केले होते. या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या मंदिरांत प्रामुख्याने थीरुनावया, थाळी महादेव इत्यादी मंदिरांचा समावेश आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करणार्‍यांनी दुसर्‍या देशात जावे ! - अमेरिकेचे न्यायाधीश जॉन जज प्रीमोमो

      वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यावर अनेक लोकांनी त्यांना विरोध केला होता. काही ठिकाणी अल्प-अधिक प्रमाणात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांना राष्ट्रपती बनवण्यास विरोध करणार्‍यांनी दुसर्‍या देशात जावे, असे अमेरिकेतील जॉन प्रीमोमो या न्यायाधिशांनी म्हटले आहे. मत दिलेले असेल किंवा नसेल; पण ट्रम्पच अमेरिकेतील सर्व नागरिकांचे भावी राष्ट्रपती आहेत, असेही ते म्हणाले. तसेच जॉन यांनी ट्रम्प यांच्या विरोधात धरणे आंदोलनाच्या वेळी अमेरिकेचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा अवमान करणार्‍यांवरही टीका केली आहे. जॉन यांच्या या विधानाचा निषेध करत नागरिकांनी त्यांना पदावरून काढण्याची मागणी केली आहे.

जगभरात प्रतीवर्षी १०० वाघांची शिकार होते !

भारतात प्रतीवर्षी दिवसाढवळ्या सहस्रो गोहत्या होत आहेत, ते रोखण्यासाठी कोणतेही ठोस 
आणि परिणामकारक उपाय होत नाहीत, तेथे जंगलात अभावाने असलेल्या वाघांना कोण वाचवणार ?
      हनोई - वाघांच्या शिकारीच्या विरोधात जगभरात कडक कायदे असूनही प्रतिवर्षी सुमारे १०० वाघांची शिकार केली जात असल्याचे समोर आले आहे. येथे चालू असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय वन्यजीव परिषदे’त ही माहिती देण्यात आली. वाघांची दयनीय स्थिती दर्शवणारा अहवाल येथे घोषित करण्यात आला आहे. ही परिषद दोन दिवस चालणार आहे. वाघांची मोठ्या प्रमाणात तस्करीदेखील केली जाते. त्याला रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची वेळ आली आहे. याविषयी परिषदेत विचारविनिमय होणार आहे. काही देशांतील भ्रष्ट प्रशासनामुळेच शिकार आणि तस्करी यांसारख्या गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाघ दुर्मिळ होत चालले असल्याचे मत या परिषदेत व्यक्त करण्यात आले.


नव्या नोटांवरील देवनागरी लिपीच्या वापरावर आक्षेप : याचिका प्रविष्ट !

     चेन्नई - केंद्र सरकारच्या वतीने नव्या नोटांवर देवनागरी लिपीमध्ये चलनाचे मूल्य छापले आहे. राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे नोटांवर कोणत्याही परिस्थितीत देवनागरी लिपीत चलनाचे मूल्य प्रसिद्ध करता येत नाही. या तरतुदीचा आधार घेऊन मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. के.पी.टी. गणेशन् असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते मूळचे मदुराईचे रहिवासी आहेत. देशातील नोटांवर देवनागरी लिपीमध्ये मूल्य प्रसिद्ध करणे, हा राज्यघटनेचा अपमान आहे. त्यामुळे २ सहस्र रुपयांच्या नोटा अवैध असल्याचे केंद्राने घोषित करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

कानपूर रेल्वे अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन

प्रत्येक अपघातानंतर समिती स्थापन करण्याचा सोपस्कार पार 
पाडणारे नव्हे, तर अपघात होऊच नये, यासाठी उपाययोजना काढणारे प्रशासन हवे !
      कानपूर (उत्तरप्रदेश) - पाटणा एक्स्प्रेस रुळावरून घसरून नुकत्याच झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीसाठी झाशी विभागाच्या पोलीस उपाधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या अपघाताच्या प्रकरणी रेल्वेच्या झाशी विभागाच्या विभागीय व्यवस्थापकांची बदली करण्यात आली असून ५ वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. रेल्वेचे महासंचालक गोपाल गुप्ता यांनी ही माहिती दिली. या अपघातात १४८ जणांना प्राण गमावावे लागले होते. या अपघाताप्रकरणी, अज्ञात रेल्वे कर्मचार्‍यांच्या विरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे, दुसर्‍याच्या जीवास वा सुरक्षेस धोका निर्माण करणे आदींसाठी जीआर्पी पोलीस ठाण्यात प्रथमदर्शन अहवाल नोंदवण्यात आला आहे. अपघातामागे रूळ तुटल्याचे कारण आहे का, याविषयी विचारले असता, तसा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले. या घटनेमागे आतंकवाद्यांचा हात असल्याचा किंवा स्फोट झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नसून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच ठोस सांगता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घरातील स्नानगृहही आता ‘बुलेटप्रूफ !’

तेलंगणमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची 
मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही स्वीकृतीच म्हणायची का ? असे नेते जनहित काय साधणार ?
     भाग्यनगर (हैदराबाद) - झेड प्लस सुरक्षा, पूर्ण सुरक्षित कार आणि एखाद्या तटबंदी किल्ल्यासारखे घर एवढी सुरक्षा असतांना तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आता त्यांच्या घरातील स्नानगृहही ‘बुलेटप्रूफ’ करून घेतले आहे. राव यांच्या नव्या घरात तयार करण्यात आलेले हे ‘बुलेटप्रूफ बाथरूम’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राव यांचे घर १ लाख स्क्वेअर फूट इतके आहे. घराच्या सर्व खिडक्या आणि ‘व्हेंटिलेटर’ यांवर ‘बुलेटप्रूफ’ काचा लावण्यात आल्या आहेत. ‘बुलेटप्रूफ स्नानगृहाचे समर्थन करतांना तेलंगणचे एक पोलीस अधिकारी म्हणाले, ‘‘कोणत्याही प्रकारचा धोका वेळीच टाळायला हवा. मुख्यमंत्र्याच्या या सरकारी बंगल्यावर आता व्यय (खर्च) होईल; पण त्यांच्या सुरक्षेवर होणारा व्ययही त्यामुळे वाचणार आहे.’’

इसिसच्या आतंकवाद्याच्या शिष्यवृत्तीसाठी झाकीर नाईक यांच्या संस्थेकडून पैसे !

हे समजेपर्यंत गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या ? अशा आणखी 
किती संस्थांकडून इसिसच्या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा 
करण्यात आला, याचा आतातरी शोध घेण्यात येणार आहे का ?
       नवी देहली - झाकीर नाईक यांच्या आता बंदी घालण्यात आलेल्या इस्लामिक रिसर्च फाऊन्डेेशन या संस्थेकडून इसिसचा २४ वर्षीय आतंकवादी अबु अनस याला ८० सहस रुपये शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आले होती, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अन्वेषणातून मिळाली आहे. यावरून झाकीर यांचे इसिसशीही संबंध असल्याचे उघडकीस आले आहे.
       अनस जेव्हा इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सिरीयाला जाण्याच्या सिद्धतेत होता, तेव्हा हे पैसे त्याच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले होते. त्याने इस्लामिक रिसर्च फाऊन्डेेशनच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आणि त्याला त्यानंतर मुंबईत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. अनसला जानेवारीत राजस्थानहून अटक करण्यात आली. या महत्त्वाच्या पुराव्यामुळे आता सरकारला झाकीर यांच्या विरोधात आतंकवादविरोधी कायद्याच्या कलमान्वये कारवाई करता येणार आहे. अनस फाऊन्डेेशनच्या नियमित संपर्कात होता. त्याच्या आयसीआयसीआय बँक खात्यात हे पैसे हस्तांतरित करण्यात आले.

अंनिसवर बंदी घालायला हवी ! - ह.भ.प. किसनमहाराज साखरे

        पुणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर आणि श्याम मानव यांच्याशी श्रद्धा अन् अंधश्रद्धा यांविषयी अनेक वेळा चर्चा करूनही कोणताही लाभ नाही; परंतु ते लोक ऐकणारे नाहीत. ते धर्माची हानी करतात. त्यामुळे अंनिसवर बंदी घालायला हवी, असे मत आळंदी येथील ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि अन्य कार्यकर्ते यांनी ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांची त्यांच्या आश्रमात भेट घेतली. या वेळी त्यांना श्रीक्षेत्र आळंदी येथे २६ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या १२ व्या वारकरी महाअधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 
        ह.भ.प. किसनमहाराज साखरे पुढे म्हणाले, धर्मावर आघात होत असतांना आपण शांत राहून चालणार नाही. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आज प्रत्येकाला आवश्यकता आहे. तुमच्या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला १० सहस्रांची लाच घेतांना पकडले

   कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील पालिका शिक्षण मंडळातील कनिष्ठ अभियंत्याला १० सहस्रांची लाच घेतांना आज पकडण्यात आले आहे. केलेल्या कामाची नोंद मोजमाप वहीमध्ये करण्यासाठी प्रकाश चौधरी यांनी संबंधित तक्रारदाराकडे ८५ सहस्र रुपयांची मागणी केली होती. त्याचा पहिला हफ्ता म्हणून १० सहस्र रुपये स्वीकारतांना चौधरी यांना ठाणे लाचलुचपत खात्याने पकडले. या प्रकरणी चौधरी यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अन्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (सातत्याने उघडकीस होणार्‍या लाचखोरीच्या घटना म्हणजे महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालल्याचे लक्षण ! सरकार भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढणार का ? - संपादक)

पुणे येथे अतिक्रमणविरोधी कारवाईत जप्त केलेल्या देवतांच्या मूर्ती भंगल्या !

पुणे महानगरपालिका प्रशासनाचा धर्मद्रोही कारभार ! 
पालिकेच्या विरोधात पोलीस तक्रार 
     हिंदूंच्या प्रभावी संघटनाच्या अभावीच पालिकेकडून देवतांच्या मूर्ती निष्काळजीपणे हाताळून धर्मभावना दुखवण्याचे धाडस केले जाते. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी प्रशासनाने असे धाडस कधी केले आहे का ? हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांचे रक्षण होण्यासाठी प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! 
     पुणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पुण्यातील १४ मंदिरांवर कारवाई करून श्री गणेश आणि अन्य देवतांच्या मूर्ती, तसेच दागिन्यांसह ऐवज जप्त (शासनाधीन) केला होता. त्या मूर्ती परत मिळवण्यासाठी गेलेल्या मंडळाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना श्री गणेशाच्या मूर्ती भंग पावल्याचे आढळून आले. (पालिकेने अशीच कारवाई अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी केली असती का ? - संपादक) या प्रकरणी अतिक्रमणविरोधी विभागाच्या उपायुक्त सौ. संध्या गागरे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये २२ नोव्हेंबर या दिवशी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. 

तपासाच्या वेळकाढूपणावरून केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि विशेष अन्वेषण पथक यांना उच्च न्यायालयाने पुन्हा फटकारले !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरण 
केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सहसंचालकांना पुढच्या
 सुनावणीच्या वेळी अहवालासह उपस्थित रहाण्याचा आदेश ! 
     मुंबई, २३ नोव्हेंबर - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास कधी संपणार ? केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) तपासामध्ये वेळकाढूपणा करून न्यायालयाचा वेळ घालवत आहे. सीबीआय गुन्हेगारांना पकडू शकत नाही, हे खेदजनक आहे. हा प्रश्‍न एका कुटुंबाचा नसून समाजाचा आहे. त्यामुळे १६ डिसेंबरला होणार्‍या पुढील सुनावणीच्या वेळी यंत्रणेच्या सहसंचालकांनी तपासाच्या अहवालासह उपस्थित रहावे, असा आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाने यंत्रणेला फटकारले. २३ नोव्हेंबर या दिवशी दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती कुलाबावाला यांच्या खंडपिठापुढे झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले. या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. 

आणखी बलिदान देऊ; पण संयुक्त महाराष्ट्र करणारच !

बेळगावातील महामेळाव्यात मराठी बांधवांचा निर्धार !
 
महामेळाव्याचे उद्घाटन करतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे
     बेळगाव, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - कितीही अत्याचार करा, आकाशपाताळ एक करू. प्रसंगी आणखी हुतात्मे होतील; पण बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवार यांसह संयुक्त महाराष्ट्र करणारच, असा निर्धार २१ नोव्हेंबर या दिवशी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर झालेल्या महामेळाव्यात मराठी भाषिकांनी केला. या वेळी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मुंबईवर जसा मराठी ध्वज फडकवला, तसेच येथेही होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. यापुढे सीमाभागात एकाही मराठी माणसावर अत्याचार झाला, तर चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील कन्नडिगांना घरात घुसून मारण्यास मागेपुढे पहाणार नाही, अशी चेतावणी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे यांनी दिली.

महानगरपालिकेकडून झालेल्या टॅब वाटपामध्ये ५० कोटी रुपयांचा घोटाळा

मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे चौकशीची मागणी
कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून टॅब देणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित काय साधणार ?
      मुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - फेब्रुवारी २०१६ पर्यंत मुंबई महानगरपालिकेतील १९ सहस्र २७१ विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यामध्ये ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा एस्आयटीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या प्रकरणी महानगरपालिका आणि कंत्राटदार यांना एका मासात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर आणि न्या. एम्. एस्. सोनक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली.

विद्वेषी शिक्षण देणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस स्कूलवर तात्काळ बंदी घालावी !

नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील धर्माभिमान्यांची मागणी 
आंदोलनात सहभागी धर्माभिमानी
     नागपूर - केंद्र शासनाने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF) वर ५ वर्षांची बंदी घालण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. त्याच जोडीला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, विद्वेषी शिक्षण देणार्‍या पीस स्कूलवरही तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी येथे २२ नोव्हेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. मंगला पागनीस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले.

श्रीक्षेत्र आळंदी येथे १२ वे वारकरी महाअधिवेशन

   श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी सेना, वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित
अधिवेशनातील प्रमुख विषय 
  •  अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चौकशी करावी आणि बंदी घालावी !
  •  राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करावी !
  •  राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूसंघटन !
स्थळ - श्री संत मोतीराम महाराज फळेकर फड, गोपाळपुरा, श्रीक्षेत्र आळंदी, जिल्हा पुणे.
वार आणि दिनांक : शनिवार, २६ नोव्हेंबर २०१६
वेळ : दुपारी १

काही दिवसांतच निर्णय पालटणारे सक्षम आहेत का ? भारतात कोणी सक्षम मिळत नाही का ?

    अधिकोष किंवा टपाल कार्यालय येथे ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेतांना पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आदी ओळखपत्रांची मूळ प्रत आणि त्यांची छायांकित प्रत (झेरॉक्स कॉपी) दाखवणे बंधनकारक होते; मात्र आता रिझर्व्ह बँकेने छायांकित प्रत दाखवण्याचा नियम रहित केला आहे. केवळ मूळ प्रत दाखवावी, असे घोषित केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी हाच आदेश आपल्या पक्षातील कार्यकर्ते आणि सरकारी कर्मचारी यांना द्यावा !

    समाजातील सर्वांत अधिक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र आहे. याच क्षेत्राद्वारे भविष्याचा वेध घेणारा समाज निर्माण होणार आहे. शिक्षकांनी निरपेक्षपणे प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीने ज्ञानदान केल्यास चांगले फळ मिळेल, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले. वाळपई (गोवा) येथे आयोजित २ दिवसीय गोवा बालशिक्षण परिषदेच्या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

नर्‍हे (पुणे) येथे भागवत सप्ताह समाप्ती

   पुणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील नर्‍हे भागातील सुविधा अंबर सोसायटीमध्ये १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. अच्युत आराध्ये यांचे घरी श्री. गणेश लक्ष्मणराव वैद्य यांनी सार्थ एकनाथी भागवत वाचन आणि गोरखपूर संहिता यांचे वाचन केले. श्री. वैद्य यांनी भागवताचे १२ स्कंद अत्यंत रसाळपणे मांडतांना भगवान श्रीकृष्णाचा जन्म आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलणे आदी भाग अतिशय सुंदर रितीने सांगितला. सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी पोथीची यजमानांंच्या डोक्यावरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने सांगता झाली. या वेळी सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी उपस्थित होत्या. सप्ताहाचा एकूण ३० जणांनी लाभ घेतला.

पुण्यातील १६ वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांनी कामचुकारपणा केल्याने शिक्षा म्हणून स्थानांतर

स्थानांतराऐवजी कर्मचार्‍यांची वर्तणूक सुधारेल अशी शिक्षा करणे अपेक्षित ! 
     पुणे, २३ नोव्हेंबर - शहरातील चौकांमध्ये वाहतूक नियमन न करता टंगळमंगळ केल्याने १६ वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांना शिक्षा म्हणून अन्य विभागांत स्थानांतर केले आहे. (स्थानांतराची शिक्षा म्हणजे, त्या कर्मचार्‍यांना अन्यत्र तसे वागण्याची मुभा दिल्यासारखेच आहे ! तसेच इतरांना त्यांच्या कामचुकारपणामुळे त्रास होणार नाही कशावरून ? - संपादक) ही कारवाई वाहतूक पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी केली आहे. मुंढे यांनी गेल्या २ दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची उपस्थिती घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये जे कर्मचारी वाहतूक नियमन न करता आढळले, त्यांच्यावर ही कारवाई केली. (यावरून पोलिसांनाही कायद्याचा धाक राहिला नाही, असे म्हटल्यास चुकीचे काय ? - संपादक)

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडून जुन्या नोटा स्वीकारण्यास खाजगी रुग्णालयाचा नकार !

धनादेश देऊन भावाचा मृतदेह घेतला कह्यात ! 
     मंगळुरु (कर्नाटक) - नोटाबंदीच्या निर्णयामुळे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना त्यांच्या भावाचे निधन झाल्यावर त्याचा मृतदेह कह्यात घेतांना खाजगी रुग्णालयाने जुन्या नोटा घेण्यास नकार दिला. त्यामुळे धनादेश देऊन रुग्णालयाचे देयक देऊन मृतदेह कह्यात घ्यावा लागल्याची घटना घडली आहे. काविळ झाल्याने त्यांचा भाऊ भास्कर याचा या रुग्णालयात मृत्यू झाला होता. उपचाराचे ६० सहस्र रुपयांचे देयक होते. या वेळी गौडा यांनी, २४ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालयांनी जुन्या नोटा स्वीकाराव्यात असा आदेश आहे, असे सांगूनही नोटा घेण्यात आल्या नाहीत. प्रत्यक्षात हा नियम केवळ सरकारी रुग्णालयांसाठी आहे. गौडा यांना याची कल्पना नव्हती. (रुग्णालयाचे देयक देण्यासाठीचे चलन सारखेच असतांना आणि मोठ्या नोटांचा प्रश्‍न सर्वांना सारखाच असतांना सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय असा भेद सरकारने कशाला केला ? - संपादक)
     जर रुग्णालये जुन्या नोटा घेत नसतील, तर सर्वसामान्य लोकांना किती त्रास होत असेल, याची मला कल्पना आली, असे गौडा यानंतर म्हणाले

नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना २१ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य !

     नवी देहली - नोटाबंदीमुळे अडचणींचा सामना करणार्‍या सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना २१ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य घोषित करण्यात आले आहे. 
     केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास म्हणाले की, सर्व जिल्हा बँकांना समान स्वरूपात रकमेचे वाटप होईल, याची काळजी घेण्याचा सल्ला नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक यांना देण्यात आला आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतीकर्ज आणि इतर गोष्टी नाबार्डच्या माध्यमातून पुरवण्यात येतील. ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही प्रकारच्या डेबिट कार्ड व्यवहारावर कुठलाही सेवा कर आकारला जाणार नाही. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत दूरभाषवरून केलेल्या बँकेच्या व्यवहारावरही कोणताही सेवा कर लागणार नसल्याचे दास यांनी स्पष्ट केले.

रेल्वेमार्गावर सोडलेल्या सांडपाण्यामुळे मुंबईतील ४० ठिकाणी धोकादायक स्थिती

     मुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड या दरम्यान ठिकठिकाणी रेल्वेमार्गावर सोडलेल्या सांडपाण्यामुळे चिखल साचून मुंबईतील ४० ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे, असे रेल्वे विभागातील एका अधिकार्‍याने सांगितले. 

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची खाती गोठवण्याचा आदेश

       मुंबई - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची खाती गोठवण्यात यावीत, अशा आदेशाचे पत्र अधिकोषांना दिले आहे. तसेच संस्थेची संकेतस्थळे ब्लॉक करण्यात यावीत, असेही गृहमंत्रालयाला दुसर्‍यांदा पत्राद्वारे सांगितले आहे. (पहिल्या वेळी सांगून सर्व संकेतस्थळे ब्लॉक झाली नाहीत का, हेही पहायला हवे ! - संपादक) नुकतीच बंदी घातलेल्या या संस्थेच्या मुंबईतील कार्यालयांची तपासणी चालू होती. सध्या डॉ. नाईक यांच्या फेसबूक, ट्विटर, यूट्यूबवरील चिथावणीखोर चित्रफितींवर बंदी घालण्यासाठी अन्वेषण यंत्रणा प्रयत्नशील असून यासाठी अमेरिकी यंत्रणांचे साहाय्य घेण्याची शक्यता आहे.

सांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे ! - ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे

संभाजीनगर येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन
ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे
      संभाजीनगर, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - फाटलेल्या नोटांप्रमाणे आज आपल्या हिंदु धर्माची स्थिती झाली आहे. ती पालटण्यासाठीच आपल्या साधू-संतांप्रमाणे संघटन करण्याची वेळ आली आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संप्रदाय आणि संघटना यांना एकत्र यावेच लागेल, सांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांनी केले. ते महावीर भवन येथे संपन्न झालेल्या प्रांतीय हिंदू अधिवेशनात बोलत होते. संभाजीनगर, नगर आणि जालना या जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन घेण्यात आले. व्यासपिठावर धर्मयोद्धा संघटनाचे उपाध्यक्ष श्री. कैलास कुर्‍हाडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख आणि कु. प्रियांका लोणे उपस्थित होत्या. या अधिवेशनाला ५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी उपस्थित होते.

शासनाच्या विरोधात ३०२ कलमांतर्गत गुन्हा का प्रविष्ट करू नये ? - राधाकृष्ण विखे-पाटील

आरोप-प्रत्यारोपात अडकलेले नेते कधीतरी देशाचे हित साधतील का ?

      मुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षात असतांना शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी शासनाच्या विरोधात ३०२ कलमाच्या अंतर्गत खुनाचा गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली होती. त्याच अनुषंगाने आज नोटाबंदीच्या बळीसाठी शासनाला दोषी ठरवावे लागेल. शासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा आणि नियोजनशून्य कारभार यांमुळे राज्यात नोटाबंदीच्या बळींची संख्या सतत वाढत आहे. यासाठी शासनाच्या विरोधात ३०२ कलमाच्या अंतर्गत गुन्हा का प्रविष्ट करू नये, असा प्रश्‍न विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. नोटाबंदीच्या त्रासाला कंटाळून नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील स्टेट बँकेचे माजी कर्मचारी अनंत बापट यांनी आत्महत्या केल्याची, तसेच नव्या नोटांसाठी पुणे येथील रुबी रुग्णालयाने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे नवजात बाळ दगावले, अशी वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर विखे-पाटील बोलत होते.

धर्मांधाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि अमानुष अत्याचार

      ठाणे, २३ नोव्हेंबर - भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका धर्मांधाने चार वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून या घटनेनंतर निजामपुरा पोलीस ठाण्यात आयसान अन्सारी यांच्यावर कलम ३७६ आणि पोक्सा अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

अकार्यक्षमांची समितीत निवड का करतात ?

    गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम सल्लागार समितीने मुदतवाढ मागितली आहे. या प्रस्तावावर शासन पुढील काही दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे. शासनाने प्रा. भास्कर नायक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या माध्यम सल्लागार समितीची मुदत १५ नोव्हेंबरला संपुष्टात आली. समितीने आतापर्यंत एकूण ७ तालुक्यांमध्ये बैठका घेतल्या असून उर्वरित ७ तालुक्यांमध्ये बैठका होणे बाकी आहे. बैठका पूर्ण झाल्यानंतर दक्षिण आणि उत्तर गोवा अशा २ ठिकाणी सार्वजनिक सुनावण्या घेण्यात येतील. यासाठी समितीला आणखी ३ मासांची मुदतवाढ हवी आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अकार्यक्षमतेच्या विरोधात अभाविपचे आसूड आंदोलन !

अशा प्रकारे आंदोलन करावे लागणे, हे विद्यापिठासाठी लज्जास्पद ! 
आंदोलन करतांना अभाविपचे कार्यकर्ते
     पुणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.)- यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पडताळतांना पुष्कळ चुका केल्या. (उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विद्यापिठाकडे तज्ञ शिक्षक नाहीत का ? - संपादक) या विरोधात अभाविपच्या वतीने २२ नोव्हेंबरला विद्यापिठामध्ये आसूड आंदोलन करण्यात आले. या वेळी पोतराजाच्या वेशातील २ कार्यकर्त्यांनी परीक्षा विभागावर आसूड ओढले. या आंदोलनाला ३५ हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा विभागाचे नियंत्रक अशोक चव्हाण यांनी '५ दिवसांच्या आत चुका सुधारू', असे लिखित आश्‍वासन दिले. (५ दिवसांमध्ये जर चुका दुरुस्त होण्यासारख्या होत्या, तर विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ का आणली ? - संपादक) 

नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ विद्यालयातील २ विद्यार्थ्यांनी १० वीच्या उत्तरपत्रिका जाळल्या !

     नवीन पनवेल - सेंट जोसेफ विद्यालयात दहावीच्या उत्तरपत्रिका जाळल्याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. ते अल्पवयीन असल्याने त्यांना कर्जत येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले. 

शासन पूर्ण स्थिर आहे ! - मुख्यमंत्री

     कोल्हापूर, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - नोटाबंदीच्या निर्णयाच्या कार्यवाहीवरून केंद्र सरकारवर टीका होत असतांनाच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शासन आता पूर्ण स्थिर आहे, असे २३ नोव्हेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. नगरपालिकांमधील प्रचार दौर्‍यासाठी मुख्यमंत्री २२ नोव्हेंबर या दिवशी इचलकरंजी येथे आले होते. 

भारतीय रिझर्व्ह बँकेला संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपिठाची नोटीस

जिल्हा सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास बंदी केल्याचे प्रकरण 
     संभाजीनगर, २३ नोव्हेंबर - जिल्हा सहकारी बँकांना ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. त्या विरोधातील याचिकेच्या सुनावणीच्या वेळी संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांना खंडपिठाने नोटीस बजावली. 

धर्मादाय उपायुक्तांच्या माध्यमातून रुबी हॉल रुग्णालयाची चौकशी !

      पुणे, २३ नोव्हेंबर - नवजात बाळावर उपचारासाठी रोख रक्कम न भरल्याच्या कारणाने रुबी हॉल रुग्णालयाने उपचार केले नव्हते. त्यामुळे बाळ दगावले. या प्रकरणाची चौकशी धर्मादाय उपायुक्त नितीन जाधव यांच्या माध्यमातून केली जाणार असून त्याचा अहवाल १ दिवसांत सादर करण्याचे आदेश सहधर्मादाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि अन्य समाजसेवी कार्यकर्त्यांनी कचरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याविषयी २१ नोव्हेंबर या दिवशी निवेदन दिले. त्या वेळी कचरे यांनी ही माहिती दिली.

प्रवाशांची संख्या घटल्याने राज्य परिवहन मंडळाचे २३ कोटी रुपयांचे नुकसान

   मुंबई - सुट्ट्या आणि जुन्या नोटांवर बंदी आणल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये घट झाली आहे. महामंडळाने १४ नोव्हेंबरपर्यंत अतिरिक्त उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले होते; परंतु त्यात वाढ होण्याऐवजी महामंडळाला २३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुणे येथे साहित्य संमेलन अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्यावर अज्ञातांकडून शाईफेक

     पुणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - डोंबिवली येथे होणार्‍या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी शाई फेकल्याची घटना घडली. दुचाकीवरून तोंड झाकून आलेल्या त्या २ अज्ञातांकडून डॉ. घुमटकर यांना 'तुमचे पुरोगामी विचारांचे नाटक बंद करा. अन्यथा तुमचेच नाटक करू', अशी धमकीही दिली आहे. ही घटना २३ नोव्हेंबर या दिवशी येथील वैकुंठ स्मशानभूमीजवळ घडली. या वेळी डॉ. घुमटकर यांनी सांगितले की, मी बहुजन विचारांचा साहित्यिक असून निवडणुकीत उभा असल्यानेच हे आक्रमण झाले आहे.

नोटाबंदीच्या विरोधात १३ विरोधी पक्षांच्या २०० खासदारांचे संसद भवनाबाहेर धरणे आंदोलन !

देशाच्या भल्यासाठी कधी विरोधी पक्ष एकत्र येतात का ? 
     नवी देहली - नोटाबंदीच्या विरोधात १३ विरोधी पक्षांच्या २०० खासदारांनी २३ नोव्हेंबरला संसद भवनाच्या आवारातील गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. सुमारे तासभर या खासदारांनी हातात फलक घेऊन निषेधाच्या घोषणा दिल्या. 
     धरणे आंदोलनात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, जनतादल संयुक्तचे नेते शरद यादव, कम्युनिस्ट नेते डी. राजा यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी सहभाग नोंदवला. 
     नोटाबंदीविरोधात विरोधकांनी गदारोळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे, तर लोकसभेच कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. याविषयावरील स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष करत आहेत.

६ दिवसांत शिर्डी येथे श्री साईंच्या दानपेटीत २ कोटी ३२ लक्ष रुपयांचे अर्पण

     शिर्डी (जिल्हा नगर), २३ नोव्हेंबर - येथील श्री साईबाबा संस्थानच्या दानपेटीत २ कोटी ३२ लक्ष रुपयांचे अर्पण जमा झाले आहे. त्या अर्पणामध्ये जुन्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटेसमवेत नव्या चलनांचाही समावेश आहे. जुन्या ५०० रुपयांच्या ९ सहस्र २१८, तर १ सहस्रच्या ३ सहस्र २५० नोटा दानपेटीत जमा झाल्या आहेत. तसेच नव्या २ सहस्र रुपयांच्या नोटा ९९९, तर ५०० च्या ५१ नोटा दानपेटीत मिळाल्या आहेत.

शालेय वयातच विद्यार्थ्यांवर नैतिक मूल्यांची शिकवण रुजावी ! - डॉ. एस्.पी. काणे

     पुणे, २३ नोव्हेंबर - शालेय विद्यार्थी संस्कारक्षम आणि अनुकरणप्रिय असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासह त्यांना जीवनमूल्यांची शिकवण दिली पाहिजे. या वयातच नैतिक मूल्ये रुजवणे आवश्यक असते. त्यातूनच आदर्शवादी आणि यशस्वी युवक घडू शकतात, असे मत राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. एस्.पी. काणे यांनी व्यक्त केले. विश्‍वशांती केंद्र (आळंदी) यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या 'वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तीमत्त्व विकास प्रमाणपत्र परीक्षा-२०१६'मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा सोहळा एम्आयटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

'एटीएम् व्हॅन'मधील पैसे लुटण्याचा प्रयत्न

     मुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - या दिवशी सकाळी वांद्रे येथील आयसीआयसीआय बँकेच्या 'एटीएम्' जवळ 'एटीएम् व्हॅन'मधील रोकड लुटण्याचा प्रयत्न २ चोरट्यांनी केला. चोरट्यांनी सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवला; मात्र सुरक्षारक्षकाने बंदूक काढल्यावर चोरट्यांनी पळ काढला. (कायदा-सुव्यवस्थेची दु:स्थिती ! - संपादक)

झाकीर नाईकची गठडी वळली !

श्री. भाऊ तोरसेकर
१. मुंबई पोलिसांनी डॉ. झाकीर नाईक 
यांच्याविषयी माहिती देऊनही कारवाई नाही !
      ‘देशात सगळीकडे नव्या नोटा मिळवण्याची गडबड चालू असतांना डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊन्डेशन’ या संस्थेवर बंदी घालणारा निर्णय पचून गेला आहे, अन्यथा एव्हाना त्यावरून किती गदारोळ माजला असता ? ‘धार्मिक पक्षपात’ किंवा ‘हिंदुत्वाची अरेरावी’ असाही आरोप मोदी सरकारवर होऊ शकला असता. मध्यंतरी बांगलादेशची राजधानी ढाका येथे मोठी घातपाती घटना घडलेली होती. त्यात गुंतलेले जिहादी पकडले गेले आणि ते सुशिक्षित असल्याने खळबळ उडाली होती. त्यांचा तपास चालू झाला आणि झाकीर नाईक यांच्या भानगडी उजेडात आल्या. ‘आम्ही जिहादची प्रेरणा नाईक यांच्या भाषणातून घेतली’, असे ढाक्यातील या जिहादींनी सांगितले.

भारतीय मुद्रांवर (नोटांवर) केवळ गांधींचेच चित्र छापण्याचा कोणताही नियम नाही !

     ‘भारताचे टपाल खाते गांधी यांच्या व्यतिरिक्त अन्य महत्त्वाच्या व्यक्तींच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ म्हणून टपाल तिकिटे प्रचलित करत असते; परंतु भारतीय मुद्रांमध्ये आतापर्यंत केवळ गांधी यांनाच स्थान मिळाले आहे. याविषयी भारतीय महिलांमध्ये अजूनही जागरूकतेची उणीव आहे, असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे.

रेल्वे रुळांची सुरक्षितता !

     रेल्वेमार्गास गेलेले तडे हे इंदूर-पाटणा एक्स्प्रेसच्या अपघातामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी झाल्यानंतर या विषयीचे अधिक पैलू उजेडात येतील. प्रवास तो मग विमान, बस किंवा रेल्वे यांचा असो तो सुरक्षितच होईल, याकडे लक्ष देणे त्या सेवा देणार्‍यांचे दायित्व असते. तडा गेलेले रूळ प्रवाशांचे बळी तर घेतातच त्याचप्रमाणे मोठा आर्थिक फटकाही देतात. रुळांच्या साहाय्याने रेल्वे धावत असते. त्यामुळे रुळांच्या मजबुतीविषयी सतर्कता बाळगायला हवी, याची आठवण करून द्यावी लागणे दुर्दैवी आहे. रुळांवरून प्रवास करणारी जनतेची कोट्यवधींची सार्वजनिक संपत्ती असलेली अशी ही रेल्वे सहस्रो प्रवाशांना घेऊन धावत असते. योग्य सेवा देत त्यांच्या जीविताचे रक्षण करणे रेल्वेचेच दायित्व बनते. असे असतांना रेल्वेचे रूळ हे त्रुटींविरहितच असायला हवेत.

रतन टाटा यांचे काही राष्ट्रहितैषी निर्णय !

टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी घेतलेले काही राष्ट्रहितैषी निर्णय पुढीलप्रमाणे.
१. देशविरोधी विधान करणार्‍या आमीर खान यांच्याशी सडेतोड व्यवहार !
     ‘काही मासांपूर्वी अभिनेता आमीर खान यांनी देशविरोधी विधान केले होते. त्यानंतर टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी स्वत: संस्थेच्या करण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या विज्ञापनांमधून आमीर खान यांना काढून टाकले.
२. जेएन्यूतील व्यक्तीला संस्थेत काम न देण्याच निर्णय !
      देहलीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यू) घडलेल्या देशद्रोही घटनांमुळे दुखावलेले रतन टाटा यांनी त्यांच्या सर्व संस्थांमध्ये यापुढे जेएन्यूतील व्यक्तीला काम न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

मुंबई जिल्ह्याचा नोव्हेंबर २०१६ मासातील पहिल्या सप्ताहाचा हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा !

विविध उपक्रमांद्वारे धर्माभिमान्यांचा धर्मकार्यात अनुकरणीय सहभाग !
१. पत्रलेखनाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म जागृती
    ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१६ या सप्ताहात राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील पत्रे विविध १४ (८ मराठी, ५ हिंदी आणि १ गुजराती) मराठी, हिंदी आणि गुजराती वृत्तपत्रांना पाठवली गेली. यातील ४९ मराठी आणि ३२ हिंदी पत्रे प्रसिद्ध झाली. श्री. जयेश राणे यांनी रुग्णाईत असूनही या सप्ताहात पत्रलेखनाच्या सेवेसाठी विशेष प्रयत्न केले, तसेच इतरांनाही त्यासाठी साहाय्य केले.
२. दीपावलीच्या कालावधीत फटाके फोडण्याच्या
विरोधात प्रबोधन, तर वसुबारसच्या निमित्ताने गोपूजन
      नालासोपारा येथे ‘फटाके रोखा; प्रदूषण टाळा’ मोहिमेअंतर्गत फटाक्यांच्या ३२ दुकानांत निवेदन देण्यात आले, तसेच फटाके विक्रेत्यांचे प्रबोधन करण्यात आले. विरार येथे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. २७ ऑक्टोबर या दिवशी वसुबारसचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील अनेक हिंदूंनी यानिमित्ताने एकत्र येऊन गाय आणि वासरू यांची पूजा केली. या सेवेत स्थानिक धर्माभिमानी सर्वश्री प्रसाद काळे, भालचंद्र नागटिळक, सतीश सिंग, अविनाश रॉय, जितेंद्र हजारे, नीलेश खोकाणी, मुनिंद्र दुबे, जोशीगुरुजी, प्रदीप दुबे, जयेश धोंडे आणि दीप्तेश पाटील यांनी सहभाग घेतला होता.

फलक प्रसिद्धीकरता

लोकहो, पुढील ३० वर्षांत बांगलादेशमध्ये एकही हिंदू शिल्लक रहाणार नाही, हे जाणा !
    धार्मिक अत्याचारांमुळे हिंदूंचे पलायन चालूच राहिले, तर ३० वर्षांनी बांगलादेशात एकही हिंदू नागरिक नावाला शिल्लक रहाणार नाही, असा निष्कर्ष ढाका विद्यापिठातील प्रा. अब्दुल बरकत यांनी काढला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Prf. Abdul Barkat ne kaha, Agale 30 varshome Bangladesh me ekbhi Hindu nahi rahega!
70 varshome kuch na karnewala Bharat ab to kush kadam Uthayega ?
जागो ! : प्रो. अब्दुल बरकत ने कहा, अगले ३० वर्षो में बांग्लादेश में एक भी हिन्दू नहीं रहेगा !
७० वर्षों में कुछ न करनेवाला भारत अब तो कुछ कदम उठाएगा ?

तुळशीविवाह म्हणजे आत्मा-परमात्मा यांच्या मीलनाचा उत्सव !

१. परमेश्‍वरच (श्रीकृष्णच) प्रत्येक जिवाचा खरा 
पती असल्याचा मनात विचार येणे आणि त्या वेळी प्रार्थना 
केल्यावर तुळशीमातेने गुणरूपी अलंकारांची नावे सुचवणे

सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांचे देवद आश्रमातील प्रतिरूप असणार्‍या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार !

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे
      महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या आणि देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या आध्यात्मिक आधारस्तंभ असणार्‍या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांचा कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी, म्हणजेच २४.११.२०१६ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांनी टिपलेली सौ. अश्‍विनी यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
   सौ. अश्‍विनी पवार यांना 
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक  शुभेच्छा !
      सौ. अश्‍विनी अतुल पवार साधारण ३ वर्षांपूर्वी देवद आश्रमात आल्या. तेव्हा वय लहान (२३ वर्षे) आणि अनुभव अल्प होता. त्यांनी आश्रमातील साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पुष्कळ कष्ट घेतले. ‘साधकांची साधना व्हावी’, म्हणून व्यष्टी साधनेचे आढावे चालू केले. सातत्याने सत्संग घेऊन साधकांना योग्य दृष्टीकोन दिले. त्यामुळे आज आश्रमात साधकांच्या साधनेची घडी छान बसली आहे. सध्या देवद आश्रमातील चैतन्य वाढले आहे. याचे पूर्ण श्रेय सौ. अश्‍विनीताई यांना जाते. माझ्या लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

सौ. अश्‍विनीताई असे देवद आश्रमाची आध्यात्मिक आई !

सौ. अश्‍विनीताईची आहे तीव्र तळमळ ।
श्रीगुरुंना अपेक्षित असाच घडवण्यास देवद आश्रम ॥ १ ॥

तिचा निर्मळ भाव आणि कोमल हास्य ।
यांनी जवळ घेते आणि देते श्रीगुरुमाऊलीची ऊब ॥ २ ॥

आहे तिच्यात क्षात्रवृत्ती; म्हणूनच दोष आणि अहं ।
घालवण्यास तत्पर असते सदैव ती ॥ ३ ॥

सौ. अश्‍विनीताई शिवबासम घडवते आम्हा साधकांस ।

   ‘२५ आणि २६.४.२०१५ या दिवशी सौ. अश्‍विनी पवार यांनी देवद येथील सनातन आश्रमातील स्वयंपाकघरातील साधकांच्या सत्संग घेतला. त्यात मला पूर्णतः शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊन पुष्कळ शिकायला मिळाले. त्या वेळी देवाने मला सौ. अश्‍विनीताईंची पुढील गुणवैशिष्ट्ये लक्षात आणून दिली. 
घेई अश्‍विनीताई साधकांचा सत्संग ।
वातावरणात पसरे आनंदीआनंद ॥ १ ॥

जिजामातेने घडवले जसे शिवबास ।
तसे अश्‍विनीताई घडवते आम्हा साधकांस ॥ २ ॥

पू. जाधवकाकांच्या निरपेक्ष प्रेमाचे आम्ही झालो साक्षीदार ।

पू. नंदकुमार जाधव
    सनातनचे पू. नंदकुमार जाधव (पू. काका) यांनी साधनेत केलेल्या साहाय्यामुळे आम्हाला रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात यायला मिळाले आणि आम्हाला संत आणि साधक यांचे दर्शन झाले; म्हणून मी पू. काकांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करीन, तेवढी अल्पच आहे. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी निवास केलेल्या खोलीत १५.११.२०१६ या दिवशी नामजप करायला बसले होते. तेव्हा माझा नामजप बंद झाला आणि मला पू. काकांविषयी कृतज्ञता वाटून पुढील काव्यपंक्ती सुचल्या.
आईच्या मायेने सांभाळले आम्हाला ।
पित्याच्या काळजीने जपले आम्हाला ।
भावंडाप्रमाणे प्रेम देऊनी दिला आधार ।
पू. काकांच्या निरपेक्ष प्रेमाचे आम्ही झालो साक्षीदार ॥ १ ॥
शिकवूनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया केला उद्धार ।
दिला आनंद अथांग आणि अमर्याद ।

तळमळीने साधना करणार्‍या आणि देवावरील दृढ श्रद्धेमुळे मुलीला पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणार्‍या मुलुंड येथील सौ. आशा गंगाधरे !

सौ. आशा गंगाधरे
१. काटकसरीपणा 
          ‘आईकडे पैसे असले, तरी तिने कधीच ते अनावश्यक व्यय केला नाही आणि आम्हालाही कधी करू दिला नाही. ती पूर्वी नोकरी करायची, तेव्हा ती एक घंटा रेल्वेचा प्रवास करून घरी यायची. स्टेशनपासून घर साधारणपणे चालत २० तेे ३० मिनिटांच्या अंतरावर आहे; पण फार क्वचितच तिने रिक्शाने प्रवास केला. पैसे वाचवण्यासाठी ती चालतच घरी यायची. 
२. पती नगरसेवक 
असूनही साधे राहाणीमान असणे 
          ‘वडील नगरसेवक आहेत, याचा तिला कधीच गर्व वाटला नाही. तिचे राहणीमान पुष्कळ साधे आहे. तिच्या बहिणी आणि इतर नातेवाईक तिला सांगत असतात, ‘‘तू केशरचनेत पालट कर. चांगल्या साड्या वापर.’’ परंतु तिला हे कधीच पटले नाही आणि तिने कधी तसे रहाण्याचा प्रयत्नही केला नाही. 
३. नम्रता 
          ‘माझे वडील मुलुंडमध्ये नगरसेवक आहेत. पुष्कळ जण त्यांना ओळखतात. त्यामुळे आई समाजात अर्पण गोळा करायला किंवा विज्ञापन आणायला जायची, तेव्हा लोकांना आश्‍चर्य वाटायचे आणि तिचा असा नम्रपणा पाहून त्यांना साधना जाणून घेण्याची उत्सुकता वाटायची. 

साधकांमध्ये साधनेची तीव्र तळमळ निर्माण करणार्‍या देवद आश्रमातील साधकांच्या आध्यात्मिक आई सौ. अश्‍विनी पवार !

कु. मनीषा शिंदे
१. ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तळमळ 
      ‘सौ. अश्‍विनीताईला ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तळमळ आहे. ताई साधकांना प्रसंगानुरूप चुका सांगते. साधकाची एखाद्या प्रसंगात चूक झाल्यास ताई यातून त्याच्या ‘साधनेची कशी हानी होत आहे ? कसे प्रयत्न करायला हवेत ?’ हे योग्य शब्दांत सांगते. 
२. साधकांना घडवण्याची प्रक्रिया
२ अ. अचूक निरीक्षणक्षमता : ताईने एका सत्संगात मला माझ्यातील ‘प्रतिमा जोपासणे’ या अहंच्या पैलूची जाणीव करून दिली. मला त्यावर मात करता येत नव्हती. ताईने वेळोवेळी त्याची जाणीव करून दिल्यामुळे माझ्यात साधनेचे बीज रूजले जाऊन मन स्थिर होण्यास साहाय्य झाले. सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांंनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसाठी मनाची सिद्धता करवून घेतली. नंतर अश्‍विनीताईने सत्संगात ‘प्रतिमा जोपासणे आणि प्रांजळपणा नसणे’ या स्वभावदोषांमुळे मला सत्संगात बसू नये असे सांगितले. त्यानंतर माझ्यात पालट होऊन मी प्रांजळपणे चिंतन सांगू लागल्यामुळे मला सत्संगाचा लाभ करून घेता आला. साधकांना त्यांच्या चुका सांगता येऊन त्यांना साहाय्य करता आले. त्यामुळे माझ्या आनंदात वाढ होऊन माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली.
       ‘मनुष्याला संगणकातील विशिष्ट प्रकाश योजनेद्वारे पडद्यावरील अक्षरे, चित्र आणि त्यांचा आकार इत्यादी विविध पैलूंचे ज्ञान होते, त्याप्रमाणे ईश्‍वरीय ज्ञानरूपी प्रकाशाने साधकाला भगवंताचे गुण, त्याचे स्वरूप आणि कार्य करण्याची पद्धत इत्यादी अनेक पैलूंचे ज्ञान होते.’ 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.९.२०१६)

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील श्री महालक्ष्मीदेवीचे छायाचित्र आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती यांच्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांची कुलदेवी श्री योगेश्‍वरीदेवी हिचे दर्शन होणे

      ‘१३.९.२०१६ या दिवशी ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना ध्यानमंदिरातील श्री महालक्ष्मीदेवीचे छायाचित्र आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती यांच्या ठिकाणी मला ४५ मिनिटे प.पू. डॉक्टरांची कुलदेवी श्री योगेश्‍वरीदेवी हिचे दर्शन झाले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद वाटून भावजागृती होत होती. नामजप करतांना मला मधेच उठून बाहेर जावे लागले. ध्यानमंदिरामध्ये परत आल्यावरही मला श्री योगेश्‍वरीदेवी दिसत होती. हे लिखाण करत असतांना भावजागृती होत होती.’ 
- सौ. रेखा माणगावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०१६) 

नीतीशून्य आणि संस्कृतीद्रोही दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम आणि चित्रपट !

पू. संदीप आळशी
      ‘सध्याच्या काळात दूरचित्रवाहिन्यांवरील बर्‍याच कार्यक्रमांत, तसेच चित्रपटांतही कौटुंबिक कलह, एकमेकांविषयी ईर्षा आणि सूडभावना, स्वतःची पत्नी असतांनाही परस्त्रीसह प्रेमसंबंध इत्यादी दाखवले जाते. अशा नीतीशून्य, अविवेकी आणि संस्कृतीद्रोही कार्यक्रमांचा परिणाम मोठ्यांसह लहानांवरही होतो. याला कारणीभूत असणार्‍या दूरचित्रवाहिन्या, चित्रपट-निर्माते आदींसह घराघरांत असे कार्यक्रम पहाणारे आणि लहानांनाही ते पाहू देणारे स्वतःच्याच हाताने स्वतःचे पाप वाढवत असून राष्ट्रालाही अधःपतित करत आहेत. शासनव्यवस्था धर्माधिष्ठित नसल्याचाच हा परिपाक आहे. भावी हिंदु राष्ट्रात केवळ नीतीमत्ता, संस्कृतीनिष्ठता, धर्म आणि साधना यांचे संस्कार करणारे कार्यक्रमच दूरचित्रवाहिन्यांवर आणि चित्रपटांत दाखवले जातील.’ - (पू.) संदीप आळशी

बालपणापासूनच प.पू. भक्तराज महाराज यांची ओढ असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कॅनडामधील व्हॅन्कुअर येथील एस्.एस्.आर्.एफ्.ची कु. नीला (वय ५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे 
पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. नीला ही एक दैवी बालक आहे !
कु. नीला
      २४.११.२०१६ या दिवशी कॅनडामधील व्हॅन्कुअर येथील एस्.एस्.आर्.एफ्.ची कु. नीला (वय ५ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत होत.
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
    यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
कु. नीला हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. परशराम पांडे
साधकांचे प्रयत्न 
तळमळीने व्हायला पाहिजेत !
‘       ऊर्जाकेंद्राचा कोळसा न्यून पडतोय. मधली उपकेंद्रे वाढवायला पाहिजेत. ‘ऊर्जाकेंद्र म्हणजे रामनाथी आश्रमातील प.पू. डॉक्टरांचा कक्ष. उपकेंद्र म्हणजे विभागसेवक, केंद्रसेवक इत्यादी. कोळसा न्यून पडतोय, म्हणजे साधकांचे प्रयत्न तळमळीने व्हायला पाहिजेत.’
नामस्मरण करत 
केलेल्या कृतीचा परिणाम
‘        नामस्मरण करत केलेल्या कृतीचा, कर्माचा परिणाम वातावरणावर होतो, त्या कर्मावर होतो आणि पुन्हा त्या व्यक्तीवरही होतो; म्हणून सतत नामस्मरण करावे.’
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१०.२०१४) 

मैं बालक तेरा प्रभु । आया तेरे द्वार ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
मैं बालक तेरा प्रभु । आया तेरे द्वार ।
गुरुचरण सेवा मिलती रहे । ऐसा दो वरदान ॥ १ ॥
सांसों में है नाम तेरा । धडकन में है तेरा प्यार ।
चित्त में है चितचोर । बार-बार करूं प्रणाम ॥ २ ॥
नाम, साधना, सत्सेवा से ही । मन को मिलता चैन ।
कण-कण में मेरा सांवरा । दर्शन करते नैन ॥ ३ ॥
गुरु चरण में चारों धाम । सत्सेवा, विश्राम ।
सत्संंग में है कृष्णकन्हैया । कर दे पूरत काम ॥ ४ ॥
श्रीकृष्ण नाम से मिलती है शांति । कृष्ण नाम सुखधाम ।
कृष्ण भजन गा ले ओ मनवा । हो जाए बेडा पार ॥ ५ ॥
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी, म्हणजे धर्मद्रोही !
        डॉक्टर, वकील यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना का ? कसे ? विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर त्यांच्या मनात का ? कसे ?, असे प्रश्‍न निर्माणहोतात ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
तीर्थयात्रा
     पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।
      भावार्थ : इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं । म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्‍वराच्या भेटीपेक्षा भेट होणार यात जास्त आनंद आहे.
 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संतांचा आदर करा !
सत्पुरुष आणि संत यांच्याविषयी आदर बाळगावा. ते परमेश्‍वराचे प्रेषित आणि 
प्रतिनिधी असतात. त्यांचा जन्म मानवी कल्याणासाठी आणि शोषितांच्या उद्वारासाठी असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)अकबराचे उदात्तीकरण थांबवा !

संपादकीय
      भारत ही शूरवीरांची भूमी ! अनेक तेजस्वी हिंदु राजांनी त्यांचा पराक्रम प्रकट करत भारतावर वेळोवेळी आलेले जिहादी आक्रमकांचे संकट परतवले. अनेक परकीय आक्रमकांनी भारतात येऊन धुडघूस घालत मंदिरे, हिंदु स्त्रिया यांना भ्रष्ट केले. या आक्रमणांनी जनता त्रस्त असतांना इतिहासाच्या विविध कालखंडात हिंदु योद्ध्यांनी क्षात्रतेजाचे प्रकटीकरण करत हिंदु धर्माचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, महाराणा प्रताप, बुंदेल केसरी महाराजा छत्रसाल, महाराजा भोज, गुरु गोविंद सिंह, कृष्णदेव राय आदी पराक्रमी राजांची सूची देता येईल. त्यांनी देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने कार्य केले. हिंदूंचा असा गौरवशाली इतिहास असतांना सरकारला मात्र इस्लामी आक्रमकांचेच उदात्तीकरण करण्याची दुर्बुद्धी झाली आहे. सरकारला चक्क अकबर हा पराक्रमी राजा असल्याचा साक्षात्कार झाला आहे. अकबर ‘महान’ असल्याची धारणा अनेक कथित बुद्धीवादी, सर्वधर्मसमभाववाले आणि हिंदुविरोधक आदींना आहेच; पण या पंक्तीत हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या शासनानेही जाऊन बसणे आश्‍चर्यकारक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn