Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भारताच्या अण्वस्त्रवाहक अग्नी-१ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी !

भारतीय शास्त्रज्ञ नवनवीन आणि परिणामकारक मारा करणारी
शस्त्रे बनवत आहेत; मात्र त्यांचा वापर करणारे भारताकडे नसल्याने त्यांचा उपयोग शून्यच ठरत आहे !
      चंडीपूर (ओडिशा) - २२ नोव्हेंबरला सकाळी स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहक अग्नी-१ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. येथील एकीकृत चाचणी केंद्रातून ही चाचणी करण्यात आल्याचे डीआर्डीओच्या वतीने घोषित करण्यात आले.
याआधी डीआर्डीओने २१ नोव्हेंबरला पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. अग्नी-१ हे १२ टन वजनाचे, १५ मीटर लांबीचे क्षेपणास्त्र सैन्याच्या सेवेत दाखल झाले आहे. घनरूप इंधनाचा वापर करून भूमीवरून भूमीवर आक्रमण करण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो.

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. भक्तराज महाराज यांचा आज महानिर्वाणदिन

अवैध शस्त्रविक्रेता संजय साडविलकर यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा प्रविष्ट करा !

  • दोषींवर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा घेणारे पू. भिडेगुरुजी यांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी घ्यावा ! वारंवार तक्रारी करूनही दोषींवर कोणतीही कारवाई न करणार्‍या पोलिसांवरही शासनाने कारवाई करावी, अशी हिंदूंची मागणी आहे !
  • पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची सांगली पोलीस अधीक्षकांकडे मागणी
  • संजय साडविलकर यांच्या विरोधात पाचवी तक्रार प्रविष्ट
        सांगली, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - कोल्हापूर येथील संजय साडविलकर यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्याची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केले आहेत. त्यांच्या विरोधात जिल्ह्यात चार पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. इतके असूनही संजय साडविलकर यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. तरी साडविलकर यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा प्रविष्ट करा, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे केली आहे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २१ नोव्हेंबर या दिवशी सांगली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यात आली. त्या वेळी ही मागणी पू. भिडेगुरुजी यांनी केली. या वेळी शिवसेना, भाजप आणि श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
        साडविलकर यांच्यावर तात्काळ प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्ट होणे अपेक्षित आहे. तो होईपर्यंत मी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाही. त्यासाठी पोलीस महासंचालकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मी हा विषय घेऊन जाणार आहे. या प्रकरणात आम्ही सनातन संस्थेच्या समवेत आहोत, असेही पू. भिडेगुरुजी यांनी या वेळी सांगितले. 

पाककडून ४३ भारतीय मच्छीमारांना अटक

बलुचिस्तानच्या नागरिकांची काळजी वहाणारे केंद्र 
सरकार भारतीय मच्छीमारांची काळजी कधी करणार ?
       नवी देहली / कोलंबो - पाकने ४३ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. सिंध प्रांताजवळ अटक करून त्यांना कराची येथे नेण्यात आले आहे. 
श्रीलंकेकडून ११ 
भारतीय मच्छीमारांना अटक !
       श्रीलंकेच्या नौदलाने ११ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. त्यांच्या नौकाही जप्त केल्या आहेत. हे मच्छीमार रामेश्‍वरम् येथील रहाणारे आहेत. हे मच्छीमार नेदुनतीवू बेटाजवळ मासे पकडत होते. १९ नोव्हेंबरच्या रात्री रामेश्‍वरम् येथून मासे पकडण्यासाठी साडेतीन सहस्र मच्छीमार ६३४ नौकांमधून समुद्रात गेले होते. 

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाची न्यूयॉर्क टाइम्सने संपादकीय लिहून नोंद घेतली !

       भारतातील किती वर्तमानपत्रांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाची नोंद घेतली आहे ? भारतातील वर्तमानपत्रांचे वाचक हिंदू असतांना तथाकथित निधर्मीवादाच्या नावाखाली भारतातील आणि विदेशातील हिंदूंवरील आक्रमणांकडे ते दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या ! अशा वर्तमानपत्रांवर बहिष्कारच घालायला हवा !
      न्यूयॉर्क (अमेरिका) - अमेरिकेचे प्रथितयश वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणाची एका संपादकीयमधून नोंद घेऊन बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर टीका केली आहे. गेल्या २ वर्षांपासून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. नुकतेच ३० ऑक्टोबर या दिवशी नसीरनगर येथे फेसबूकवरून इस्लाम धर्माचा कथित अवमान केल्याच्या घटनेवरून झालेल्या हिंसाचाराचा दाखला यात दिला गेला आहे. 
१. रसराज दास नावाच्या अशिक्षित हिंदु युवकाच्या नावे फेसबूकवर खोटे खाते उघडून त्यावर भगवान शिवाचे आणि मक्केचे चित्र प्रसारित केले; म्हणून सहस्रो मुसलमानांनी २० मंदिरे आणि हिंदूंच्या १०० हून अधिक घरांची हानी केली. शेवटी हा प्रकार ढाका येथून घडवण्यात आला, असे चौकशीत निष्पन्न झाल्याचे बांगलादेशच्या सैदुल हक या मंत्र्यांनी मान्य केले.

(म्हणे) ‘मोदी यांनी देशात आर्थिक आणीबाणी लागू केली !’

  • काँग्रेस आघाडी शासनाची सत्ता होती, त्या वेळी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी कोणतीही कृती न करणारे शरद पवार यांना मोदी यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे का ?
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका !
       मुंबई, २१ नोव्हेंबर - पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे मी स्वागत केले. भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि काळा पैसा बाहेर काढणे यांसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले होते; परंतु आज यामध्ये सामान्य जनताच भरडली जात आहे. मोदी यांनी देशात आर्थिक आणीबाणी लागू केली आहे, असे विधान माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घाटकोपर येथे २० नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या परिवर्तन सभेत ते बोलत होते. 
       पवार पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांची हानी होत आहे. सरकारने वेळेत काळजी घेतली नाही, तर दंगली आणि लुटालूट होईल, असे न्यायालयही सांगत आहे, याचा तरी विचार सरकारने करायला हवा. (इतकी वर्षे सत्ता उपभोगून काँग्रेस आघाडी शासनाने शेतकर्‍यांसाठी काही केले नाही, तसेच काँग्रेसच्या काळातही दंगली, लुटालूट आदी गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली, त्याविषयी पवार काही बालतील का ? - संपादक)

काश्मिरी पंडितांवरील अन्यायाच्या विरोधात देशभरातील हिंदूंचा पुढाकार भारावून टाकणारा ! - राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘युथ फॉर पनून कश्मीर’

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे ‘एक भारत 
अभियान - कश्मीर की ओर’च्या अंतर्गत सभा !

हिंदु धर्मजागृती सभेत सनातनचा ‘मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन
उपचार (भाग २)’ या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. निखिल
कनौजिया, श्री. राहुल कौल, श्री. रमेश शिंदे आणि श्री. आनंद जाखोटिया.

        जबलपूर, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - काश्मीर बळकावू पहाणार्‍या फुटीरतावाद्यांचे सरकार आज ऐकत असेल, तर आमचेही म्हणणे शासनाने ऐकावे; कारण काश्मीर आमची भूमी आहे. आम्हाला तेथे विनाअट केंद्रशासनाचे नियंत्रण असलेला स्वतंत्र भूभाग हवा. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अन्यायाविषयी पुष्कळ थोड्या लोकांना माहिती होते; पण आज हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देशभरातील हिंदूंमध्ये याविषयी जागृती झाली आहे. काश्मिरी पंडितांवरील (काश्मिरी हिंदूंवरील) अन्यायाच्या विरोधात देशभरातील हिंदूंचा हा पुढाकार भारावून टाकणारा आहे, असे प्रतिपादन ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे अध्यक्ष राहूल कौल यांनी केले. ते येथील ‘हॉटेल समदाडिया इन’च्या सभागृहात २० नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडलेल्या ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’च्या अंतर्गत हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित २०० युवकांना मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, हिंदू सेवा परिषद (जबलपूर)चे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी, शहराध्यक्ष श्री. निखिल कनौजिया आणि सनातन संस्थेचे श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते.

देशद्रोही झाकीर नाईक यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करा !

पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी !
आंदोलनाचे फेसबूकवरून प्रथमच थेट प्रसारण !
निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे
यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
    पुणे, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या आणि जाणीवपूर्वक धार्मिक द्वेष पसरवणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. हा निर्णय स्तुत्य असला, तरी एवढ्यावरच न थांबता केंद्र सरकारने फरार झालेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मुसक्या आवळून त्यांचे भारतात प्रत्यार्पण करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी १९ नोव्हेंबर या दिवशी येथील विधानभवनासमोर झालेल्या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात करण्यात आली. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे प्रथमच फेसबूकवरून थेट प्रसारण करण्यात आले. हे आंदोलन हिंदु जनजागृती समितीच्या फेसबुक पानावर ‘लाईव्ह’ दाखवण्यात आले. या माध्यमातून एकूण १९ सहस्र ६८ जणापर्यंत आंदोलनाचा विषय पोचला. त्यांपैकी ३ सहस्र ६४९ जणांनी आंदोलन ‘लाईव्ह’ पाहिले. त्यावर १ सहस्र ६१५ जणांनी आवडल्याच्या किंवा अन्य प्रतिक्रिया (‘लाइक’ किंवा अन्य कॅमेंट्स) दिल्या.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाचे आयोजन !

सनातनच्या प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू
      गाझियाबाद - येथील कवीनगरच्या रामलीला मैदानावर १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘आध्यात्मिक प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले आहे.
    १७ नोव्हेंबर या दिवशी पूज्य स्वामी अवधेशानंद गिरिजी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांविषयी माहिती देणारे ग्रंथ अन् फलक यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.

देशातून प्रतिवर्षी ४० कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त होतात !

बनावट नोटांचा व्यवहार करणार्‍यांना तत्परतेने पकडून 
त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली, तरच बनावट नोटांवर आळा बसेल !
     नवी देहली - देशामध्ये प्रतिवर्षी साधारणत: ४० कोटी रुपये मूल्याच्या ८-९ लाख बनावट नोटा पकडल्या जातात, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली. दुसरीकडे प्रतिवर्षी देशामध्ये सुमारे ७० कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटाघुसवल्या जातात.
      राष्ट्रीय गुन्हे नोंदणी मंडळाच्या आकडेवारीच्या आधारे जेटली यांनी माहिती देतांना सांगितले की, 
१. ‘वर्ष २०१३ मध्ये ८ लाख ४६ सहस्र ९६६ नोटा पकडल्या. त्यांचे एकूण मूल्य ४२.९० कोटी रुपये होते. 
२. वर्ष २०१४ मध्ये ४० कोटी लाख रुपये मूल्याच्या ८ लाख १ सहस्र ५२८ बनावट नोटा हस्तगत केल्या. 
३. २०१५ मध्ये हेच प्रमाण ४३ कोटी८३ लाख इतके होते. 
४. सापडलेल्या नोटांची संख्या होती एकूण ८ लाख ८६ सहस्र ५८. 
५. चालू वर्षी ३० सप्टेंबपर्यंत ५ लाख ७४ सहस्र १७६ नोटा सापडल्या असून त्याची किंमत २७ कोटी ७९ लाख रुपये आहे.

५१ टक्के नागरिक बंदीच्या बाजूने, तर केवळ ३ टक्के विरोधात !

नोटाबंदीवरील ‘इंडिया टुडे’चे सर्वेक्षण !
      नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका केली जात आहे; मात्र देशातील जनता या निर्णयावर अप्रसन्न नाही, असे ‘इंडिया टुडे’ या नियतकालिकाने स्थानिक पातळीवर, तसेच सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जवळपास २०० शहरांत घेतलेल्या या सर्वेक्षणात ९ सहस्र लोकांनी त्यांचे मत नोंदवले. यातील ३ टक्के लोकांनी ‘काळ्या पैशांच्या विरोधात लढण्यासाठी नोटाबंदी करणे, हा काय उपाय आहे का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला, तर सुमारे ५१ टक्के लोकांनी ‘हा निर्णय योग्य असून या निर्णयामुळे भारतात असणार्‍या काळ्या पैशावर आळा बसेल’, असे सांगितले आहे. २४ टक्के लोकांचे मत आहे की, ‘हा निर्णय योग्य असला, तरी कार्यवाही व्यवस्थित नाही. लोकांचे हाल होत आहेत. सरकारने यावर लवकरच उपाययोजना करावी.’ उर्वरित २४ टक्के लोकांना निर्णय योग्य वाटत असला, तरी त्यावरील कार्यवाही जेमतेम आहे, असे वाटत आहे.

मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांत निद्रानाश आणि रक्तदाब यांच्या औषधविक्रीत वाढ

कुमार्गाने पैसे मिळवून धनिक झालेल्यांच्या संदर्भात आणखी वेगळे काय होणार ? 
     मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणारे उच्चभ्रू लोक चिंतेत पडले आहेत. अनेकांची झोप उडाली असून काहींचा रक्तदाब वाढला आहे. मुंबईतील कुलाबा, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी यांसारख्या उच्चभ्रू वस्त्यांमधील औषधालयांमध्ये मागील काही दिवसांपासून निद्रानाश आणि रक्तदाब यांच्या औषधांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अभिनेता एजाज खान याला अटक आणि सुटका !

     मुंबई - दूरचित्रवाणी अभिनेता एजाज खान याला एका मॉडेलशी अश्‍लील संभाषण केल्याप्रकरणी आणि तिला अश्‍लील छायाचित्र पाठवल्याविषयी पोलिसांनी अटक केली; (हे आहे मुसलमान अभिनेत्यांचे खरे स्वरूप ! - संपादक) मात्र १० सहस्र रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली होती.

राष्ट्रद्रोही झाकीर नाईक यांच्या संस्थेच्या शाळांची खाती गोठवली !

     मुंबई - राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेकडे पैसा कुठून येत आहे, हे मुंबई पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी शोधत आहेत. १८ आणि १९ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांना संस्थेच्या आर्थिक उलाढालीविषयी संशयास्पद गोष्टी हाती लागल्याचे वृत्त आहे. या संस्थेच्या नावावर चालू असलेल्या शाळांची खाती गोठवण्यात आली आहेत. 

इंफाळ (मणीपूर) येथील ३ बॉम्बस्फोटांत एकाचा मृत्यू, तर २ पोलीस घायाळ !

पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट 
करू न शकणार्‍या सरकारने निदान ईशान्य 
भारतातील आतंकवाद तरी नष्ट करावा !
      इंफाळ - मणीपूरची राजधानी इंफाळमध्ये २० नोव्हेंबरला ३ बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर केंद्रीय राखीव पोलीसदलाचे २ पोलीस घायाळ झाले. आसाम रायफल्सच्या तळाजवळ एक स्फोट झाला. यात बिनोद राय नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. दुसरा स्फोट ऑल इंडिया रेडिओ परिसरात झाला. यात दोन पोलीस घायाळ झाले. तिसरा स्फोट एम्. सेक्टर येथील बीटी मार्गावर झाला. 

दुसर्‍याच्या बँक खात्यात जुन्या नोटा भरल्यास ७ वर्षांची शिक्षा !

       नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या रहित झालेल्या नोटा दुसर्‍याच्या बँक खात्यात जमा केल्याचे दिसून आल्यास खातेदार आणि पैसे भरणारा या दोघांविरुद्ध नव्याने लागू झालेल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायद्याद्वारे कारवाई करण्यात येईल, असे प्राप्तीकर विभागाने ठरवले आहे. या दोघांनाही ७ वर्षांची शिक्षा केली जाऊ शकते. तसेच भरणा केलेली रक्कम जप्त करण्यात येणार आहे. त्यावर बाजारमूल्याच्या २५ टक्के दंडही आकारण्यात येणार आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे खोट्या विवाह पत्रिका छापून अधिकोषातून पैसे काढले जात आहेत !

राजकीय नेत्यांचाच आदर्श घेऊन जनता भ्रष्टाचार करत आहे ! 
ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच (सनातन धर्म राज्यच) हवे ! 
     बरेली (उत्तरप्रदेश) - केंद्र सरकारने विवाहसोहळ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून अधिकोषांमधून वधू-वराच्या मातापित्यांपैकी एकाला एकाच वेळेस कागदपत्रे सादर करून अडीच लाख रुपये काढता येण्याची सवलत दिली आहे. मात्र या सवलतीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. खोट्या विवाहपत्रिका छापून अधिकोषातून अधिक पैसे काढले जात असल्याचा प्रकार बरेली येथील शाहमतगंज परिसरात निदर्शनास आला आहे. या ठिकाणी १५० ते २०० रुपयांच्या मोबदल्यात उघडपणे खोट्या पत्रिका छापल्या जात आहेत.

मुस्लिम बँकेच्या प्रस्तावाला शिवसेनेचा तीव्र विरोध !

     नवी देहली - मुसलमान समाजाच्या उन्नतीसाठी आता बिनव्याजी कर्ज देणारी बँक चालू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारसमोर ठेवला आहे. केंद्र सरकारच्या संमतीनंतर लवकरच सध्याच्या बँकांमध्येही तसा विभाग चालू करण्यात येईल. मात्र समान नागरी कायद्याच्या बाजूने असलेल्या राजकीय पक्षांनी त्याचा जोरदार विरोध चालू केला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या मित्र पक्ष शिवसेनेनेही या प्रस्तावाला जोरदार विरोध केला आहे. शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकात खैरे म्हणाले, ‘‘त्यापेक्षा समान नागरी कायदा करा. त्यामुळे सगळेच प्रश्‍न सुटतील. हे सगळं मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी चालू आहे का ?’’

आपापसांतील मतभेद, संप्रदाय आणि उपासना वैयक्तिक स्तरावर ठेवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित होऊया ! - ह.भ.प. अभयमहाराज सहस्रबुद्धे

चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन !
प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन
करतांना डावीकडून ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे,
डॉ. हेमंत चाळके आणि श्री. संजय जोशी 
      चिपळूण, २१ नोव्हेेंबर (वार्ता.) - आपण सर्वजण एका ध्येयाने प्रेरीत आहोत. ही प्रेरणा आपल्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिली आहे. हिंदूंचा एकमेव असलेला हिंदुस्थान हाच आपला देश आहे. सनातन हिंदु धर्म हा वैदिक हिंदु धर्म आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतु:सूत्रीवर हिंदु धर्म उभा आहे. हिंदु धर्माला संस्थापक नाही. हा एकमेव असा धर्म आहे ज्याला संस्कृतीही आहे. अन्य धर्मांना संस्कृती नाही, ते संस्कृतीहीन आहेत. प्रारंभी आपल्या धर्मातील सर्व संप्रदाय एकत्रित होते. मोगल आणि ब्रिटीश यांनी त्यांच्या नीतीने सर्व संप्रदायांना हिंदु धर्मापासून वेगळे केले. चिपळूण ही हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेची भूमी आहे. हिंदु जनजागृती समितीने हिंदु धर्मातील सर्व संप्रदाय एकत्रित यावेत, यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे.

आयुर्वेदाचा प्रसार सरकारमुळे नाही, तर आयुर्वेदप्रेमींमुळे होत आहे, हे लक्षात घ्या !

    ‘आयुर्वेद ही भारताची नैसर्गिक उपचारपद्धत आहे. ही उपचारपद्धत जगात सर्वत्र पसरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष मंत्रालयाची स्थापना केल्यामुळे आयुर्वेदाचा प्रसार होत आहे. या प्रसाराकडे भाजप सरकार बारकाईने लक्ष देत आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या वेळी केले.’’

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ
     अकोला - दक्षिण भारतातील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांची चौकशी सीबीआयकडे सोपवा आणि देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ आणि ‘पीस इंटरनॅशनल स्कूल’वर बंदी घाला, या विषयांवर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या कालावधीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नागरिकांनी स्वाक्षरी करून सहभाग दर्शवला. समितीचे श्री. धीरज राऊत यांनी स्थानिक दूरचित्रवाहिन्यांना मुलाखत दिली. श्री. श्यामसुंदर राजंदेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. आंदोलनात समितीचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक, तसेच धर्माभिमानी आणि वृतपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलनानंतर उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. 

(म्हणे) ‘साईबाबा संस्थानकडून खाजगी रुग्णालयांना निधी देण्यात यावा !’ - माजी नगरसेवक

     ठाणे, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री साईबाबा संस्थानकडून विमानतळासाठी १०० कोटी रुपये दिले जातात; मात्र रुग्णालयांना निधी देण्यात नियम आड येतो. खाजगी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण, डायलिसिस किंवा तत्सम आजारांवर उपचार घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांचे प्रमाण अधिक असते. संस्थानच्या नियमात पालट करून खाजगी रुग्णालयांनाही निधी देण्यात यावा, अशी मागणी येथील माजी नगरसेवक विलास ढमाले यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली. (सातत्याने हिंदूंच्या मंदिरांच्या संपत्तीवर डोळा असणारे लोकप्रतिनिधी ! मुंबईतील हाजी अली दर्ग्याच्या संपत्तीतून खाजगी रुग्णालयांना निधी देण्यात यावा, अशी मागणी विलास ढमाले करतील का ? - संपादक)

मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती बाळगणार्‍या अधिकार्‍यांची माहिती निनावी पत्राद्वारे द्या ! - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन

नागरिकांचे साहाय्य घेऊन तरी भ्रष्टाचार्‍यांना 
कठोर शासन होईल, याची निश्‍चिती कोण देणार ? 
     कोल्हापूर, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती बाळगणार्‍या अधिकार्‍यांची माहिती नागरिकांनी निनावी पत्राने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे द्यावी, असे आवाहन येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. उदय आफळे यांनी केले आहे. (इतकी वर्षे विभाग काय करत आहे ? - संपादक) येथील विविध गावांत शासकीय आणि निमशासकीय खात्यांतील काही मोठ्या अधिकार्‍यांनी काळ्या पैशांच्या जोरावर पुष्कळ संपत्ती मिळवल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभमूीवर असे आवाहन करण्यात आले. 

पंतप्रधान यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांचे कर्ज रहित करण्याचे आदेश द्यावेत ! - अधिवक्ता रेवण भोसले

हिंदु राष्ट्रात राष्ट्राची संपत्ती बुडवणारे नव्हे, 
तर त्याग करणारे राज्यकर्ते आणि जनता असेल ! 
     मुंबई, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - उद्योगपती विजय मल्ल्या यांचे अनुमाने ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज, तसेच अशा ६३ उद्योगपतींचे मिळून ७ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘राइट ऑफ’च्या नावाखाली रहित केले आहे. असे असेल, तर सर्व शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनता यांचे कर्जही रहित करण्याचे आदेश पंतप्रधानांनी द्यावेत, अशी मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष अधिवक्ता रेवण भोसले यांनी केली. या मागणीसाठी पक्षाच्या वतीने रिझर्व्ह बँकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (कर बुडवणार्‍या उद्योगपतींवर शासनाने वेळीच कारवाई केली असती, तर आज अशी वेळ आली नसती. - संपादक)

बोईसर (मुंबई) येथील श्री पद्मावती श्रीनिवास मंगल सोहळा

श्री पद्मावतीदेवी आणि श्रीदेव बालाजी यांच्या विवाह 
सोहळ्यासह धार्मिक विधींना सहस्रावधी भाविकांची उपस्थिती 
श्रीदेव बालाजीची पूजा
करतांना यजमान आणि ब्रह्मवृंद
     मुंबई, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - १९ नोव्हेंबर या दिवशी येथील सर्कस मैदान येथे सहस्रावधी भाविकांच्या उपस्थितीत श्री पद्मावती श्रीनिवास मंगल सोहळा पार पडला. या सोहळ्यात विविध धार्मिक विधींसह श्री पद्मावतीदेवी आणि श्रीदेव बालाजी यांचा विवाह पार पडला. या वेळी करण्यात आलेल्या ‘गोविंदा-गोविंदा’ या गजराने सर्व परिसरात भक्तीमय वातावरण पसरले. श्री पद्मावती श्रीनिवास मंगल महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला ६५ सहस्राहून अधिक भाविक उपस्थित होते. या अपूर्व सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण पसरले.

असा एकतरी राज्यकर्ता स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारताला लाभला आहे का ?

   राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण एकही सुट्टी घेणार नसल्याचे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केले आहे.’

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने १८ लक्ष खातेदार अडचणीत

या समस्येवर भारतीय रिझर्व्ह बँक आणि 
अर्थ मंत्रालय यांनी लवकरात लवकर मार्ग काढावा ! 
     नगर, २१ नोव्हेंबर - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित केल्यानंतर प्रारंभी ३ दिवस अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या खातेदारांनी मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा जमा केल्या. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मज्जाव केला. बँकेच्या विविध शाखांमध्ये जमा झालेले आणि अधिकोषाकडे असलेले असे एकूण ३०० कोटी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे अधिकोषाचे अधिकतम व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. (यावरून राज्यातील अन्य जिल्हा सहकारी अधिकोषांची स्थिती किती विदारक झाली असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) जिल्हा सहकारी बँकेचे जिल्ह्यातील १८ लक्ष खातेदार अडचणीत आहेत. त्यांपैकी १० लक्ष संख्येने वैयक्तिक शेतकरी कर्जदार सभासद आहेत.

राष्ट्र्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यासह अन्य व्यक्तींची संपत्ती शासनाधीन करा !

विशेष न्यायालयाचे आदेश 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील गैरव्यवहाराचे प्रकरण 
     मुंबई, २१ नोव्हेंबर - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यासह अन्य व्यक्तींची संपत्ती शासनाधीन करा, असा आदेश भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या विशेष न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला दिला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी कदम आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हे अन्वेषण विभागाने सप्टेंबर २०१५ मध्ये भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला होता. कदम हे महामंडळाचे अध्यक्ष असतांना गैरव्यवहार झाल्याचे तपासाच्या कालावधीत उघड झाले होते.

धर्मांधांकडून मुंबई पोलिसांवर तलवार आणि चॉपर यांच्या साहाय्याने आक्रमण !

जेथे पोलीसच असुरक्षित आहेत, 
तेथे जनतेच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा ! 
     मुंबई - येथील अँटॉप हिल भागातील संगमनगर झोपडपट्टीमध्ये भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर काही धर्मांधांनी तलवार आणि चॉपर यांच्या साहाय्याने आक्रमण केले. (धर्मांधांच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देऊ न शकणारे पोलीस ! - संपादक) पोलिसांनी धर्मांध फैय्याज उपाख्य फैज वसीम अहमद शेख, साजिद वसीम अहमद शेख, फैसल वसीम अहमद शेख आणि बन्नी वसीम अहमद शेख यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करत त्यांचा शोध चालू केला आहे. पोलिसांवर आक्रमण करून धर्मांध पसार झाले. आक्रमणात पोलीस उपनिरीक्षक संदीप माने, हवालदार शेख आणि हवालदार लोहारे घायाळ झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले.

नोटाबंदीचा निर्णय योग्य नसल्याचे दिसून आल्यास पुन्हा देशव्यापी आंदोलन ! - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

     पुणे, २१ नोव्हेंबर - मोदी सरकराने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय स्वागतार्ह असून त्याला माझा पाठिंबा आहे. या निर्णयाचा अनेकांना नाहक त्रास होत आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारतात कोणत्याही निर्णयाची कार्यवाही करतांना सामान्य नागरिकांना त्रास होतोच, तसा या निर्णयाचाही झाला आहे. दुःखाची दरी पार केल्याविना सुख दिसत नाही. काही लोक निर्णयाला विरोध करत असून त्यांचा चष्मा त्या रंगाचा असल्याने त्यांना नोटाबंदीतही तो रंग दिसत आहे. नोटाबंदी आणि त्याच्या बदलाचे परिणाम दिसायला ६ मास लागतील; परंतु हा निर्णय देशासाठी योग्य नसल्याचे दिसून आल्यास पुन्हा देहलीतील रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन करू, अशी चेतावणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

नोटाबंदीला विरोध म्हणजे देशद्रोह ! - योगऋषी रामदेवबाबा

     नवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणारे देशद्रोह करत आहेत, अशी टीका योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केली. साधूसंतांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे आतंकवाद्यांचा निधी बंद झाला आहे. यामध्ये सर्वाधिक हानी आतंकवाद्यांची झाली आहे. नक्षलवाद्यांच्या कारवायांनाही अटकाव बसला आहे. त्यांना पैसे येणे बंद झाले आहे. पाकिस्तानमधून बनावट नोटा येणेही बंद झाले आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकमधून मांस नेणार्‍या धर्मांधाला अटक

गोवंश कायद्याची कठोर अंमलबजावणी शासन 
का करत नाही, असा प्रश्‍न सामान्यांना सतावत आहे !
     मुंबई, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - १८ नोव्हेंबरला पहाटे नाशिक-पुणे महामार्गावरील हॉटेल पंचवटीसमोर गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. या प्रकरणी चालक शोएब मोहम्मद सिद्दीक (३८ वर्षे, रहाणार कुर्ला) या धर्मांधाला पोलिसांनी कह्यात घेतले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात सिद्दीक याच्या विरोधात प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या ट्रकमध्ये गोमांस असण्याची दाट शक्यता आहे. ट्रकमधून लाल पाणी पडत असल्याचे निदर्शनास आल्यावर बजरंग दलाचे कार्यकर्ते सर्वश्री विक्री वरंदळ आणि आकाश शिंदे यांनी हा ट्रक अडवला. सिद्दीक याने नाशिकच्या पशूवधगृहातून मांस घेऊन मुंबईला विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले; मात्र नाशिकहून थेट मुंबईला न जाता सिन्नरला आल्याने सिद्दीक याच्याविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.

धर्मजागृती सभेच्या पूर्वनियोजनाच्या बैठकीला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव येथे २५ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा 

     जळगाव - हिंदूबहूल देशात आज गोरक्षकांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत, देशद्रोही मात्र मुकाटपणे त्यांच्या विचारांचा प्रचार करत आहेत. उघडपणे होणारे हिंदू देवतांचे विडंबन, लव्ह जिहाद, धर्मांतर यांसारख्या राष्ट्र आणि समाजावर होणार्‍या आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक आहे. हिंदूंचे प्रभावी संघटन होण्यासाठीच २५ डिसेंबर या दिवशी जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या सेवेत सहभागी होऊन भगवंताची कृपा संपादन करण्याची संधी जळगावमधील धर्माभिमानी हिंदूंना उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पूर्वनियोजनाच्या बैठकीत केले. यश प्लाझा येथे झालेल्या या बैठकीचे प्रास्ताविक समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले, तर श्री. विजय पाटील यांनी धर्मसभेच्या प्रसाराचे व्यापक नियोजन उपस्थित हिंदूंना सांगितले. १८६ हून अधिक धर्माभिमान्यांनी बैठकीला चांगला प्रतिसाद देत सभेच्या संदर्भातील सर्वच सेवा वाटून घेतल्या. तसेच हिंदूंना संघटित करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणांची ‘न्यूयॉर्क टाइम्स’
दखल घेतो, तर भारतातील दैनिके दुर्लक्ष करतात !
    अमेरिकेचे प्रथितयश वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांची एका संपादकीयातून दखल घेऊन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर टीका केली आहे

(म्हणे) ‘हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर नाही !’

‘मानेवर सुरी ठेवली, तरी ‘भारतमाता की जय’ 
म्हणणार नाही’, असे म्हणणारे भारतद्वेषी असदुद्दीन ओवैसी 
     सातारा, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - आपला इतिहास आठवा, आपण कुणाचेही मिंधे नव्हतो. आज कोणीही उठतो आणि मुसलमानांना दोष देत सुटतो. माझ्या गरीब आणि निराधार मुसलमान बांधवांना कधी गोवंश हत्याबंदी, तर कधी आरक्षणाच्या सूत्रावरून नेहमीच सतावले जाते. दलितांना आता अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासाठी भांडावे लागत आहे. आतापर्यंत आपण घाबरत होतो, त्यामुळे असंघटित होतो. आता निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे. निश्‍चितच यापुढील काळात हिमतीने निर्णय घेतले जातील. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आमच्या पूर्वजांनी जे निर्णय घेतले, ते नेभळटपणाचे होते. हा देश आमचाही आहे. हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर नाही, असे उद्गार एम्.आय.एम्. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काढले. (मुघलांचा वारसा सांगणारे ओवैसी भारत भूमीवर त्यांच्या पूर्वजांनी आक्रमण करण्याअगोदर ही भूमी राम-कृष्णादी अवतारांची आहे, याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. अशाप्रकारे ते मुसलमानांना चिथावणी देऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवत नाही का ? - संपादक) 

पाकच्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा !

     श्रीनगर - राजौरी सेक्टरमध्ये पाकने केलेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला आहे. तसेच ३ सैनिक घायाळ झाले आहेत. २० नोव्हेंबरच्या रात्रीपासून भारतीय चौक्यांवर हा गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा चालू होता. २१ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत तो चालू होता. २९ सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाककडून गोळीबाराच्या २८६ घटना घडल्या आहेत. यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात १४ सैनिकांचा समावेश आहे. (‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर सरकारने पाकच्या विरोधात काहीच करायचे नाही, असे ठरवले आहे का ? - संपादक)

शेतकरी जुन्या नोटांद्वारे बियाणे खरेदी करू शकतात !

     नवी देहली - केंद्र सरकारने शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करण्यासाठी जुन्या नोटांचा वापर करण्याला अनुमती दिली आहे. यासाठी त्यांना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे. 
 ‘कॅश क्रेडिट’ आणि ‘ओव्हरड्राफ्ट’ खातेधारक ५० सहस्र रुपये काढू शकतात ! 
     रिझर्व्ह बँकेने ज्यांच्याकडे ‘कॅश क्रेडिट’ खाते आहे किंवा ‘ओव्हरड्राफ्ट’ खातेधारक आहेत त्यांना आठवड्याला ५० सहस्र रुपये रोकड काढण्याची मुभा देण्यात आली आहे. ही रक्कम २ सहस्र रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात मिळणार असून पर्सनल ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना मात्र ही मुभा नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वणी (यवतमाळ) येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने आरोग्य तपासणी


वणी (जिल्हा यवतमाळ) - येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. प्रवीण जाधव यांनी त्यांच्या ‘चिंतामणी क्लिनिक’ येथे, विनामूल्य आरोग्य तपासणी केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘अशा समाजकार्यात मला नियमितपणे सहभागी व्हायला आवडेल.’’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी न्यासाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

आज मुख्यमंत्र्यांची तासगाव येथे सभा !

    तासगाव, २१ नोव्हेंबर - तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची २२ नोव्हेंबर या दिवशी येथील वंदे मातरम् चौकात दुपारी १ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : America ke New York Times ne Bangladesh me Hinduomper ho rahe aghatomper sampadakiy likhkar awaj uthai ! - Bharat ke samachar patra kab jagenge ?
जागो ! : अमेरिका के ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ने बांग्लादेश में हिन्दुआेंपर हो रहे आघातों पर संपादकीय लिखकर आवाज उठाई ! - भारत के समाचारपत्र कब जागेंगे ?

मंदिरांचे अधिग्रहण, चर्च आणि मशिदींना संरक्षण ?

      निधर्मीपणाची बिरुदावली मिरवणार्‍या भारतात हिंदूंना नेहमीच लक्ष्य केले जातेे. सध्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात सर्वत्र चलनाचा तुटवडा आहे. सुट्या पैशांची चणचण निर्माण झाली असून ती दूर करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने, सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील दानपेट्यांतील रक्कम प्रतिदिन अधिकोषात जमा करण्यास सांगितले आहे. श्रीमंत देवस्थानांमध्ये पुष्कळ प्रमाणात पैसा अर्पण होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
      स्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म अन् स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे ! 

रिझर्व्ह बँक पुढे इस्लामी बँकांना ‘मुसलमानांना व्याजमुक्त कर्ज देण्याची’ अनुमती देईल आणि पुढे ते माफही करील, हे लक्षात घ्या !

      रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजमुक्त बँकिंग सेवा पुरवण्यासाठी शरीयतनुसार बँक व्यवहार प्रारंभ करावेत, असा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाला दिला आहे.

कॉन्व्हेंट’ शाळांमधील पाश्‍चात्त्य जीवनशैलीचे उदात्तीकरण करणार्‍या शिकवणीमुळे स्वतःच्या गरीब पालकांची विद्यार्थ्यांना लाज वाटणे

     ‘कॉन्व्हेंट’ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाश्‍चात्त्य चंगळवादी विचारसरणीकडे आकृष्ट केले जाते. या शाळांमधील चकचकीतपणा, परदेशातून येणार्‍या धनामुळे निर्माण झालेली श्रीमंती, तेथील ख्रिस्ती शिक्षकांचे शैलीदार बोलणे आणि वागणे, या सगळ्यांमुळे विद्यार्थी प्रभावित होतात. यांपैकी बर्‍याच विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी पदरमोड करून ‘कॉन्व्हेंट’ शाळेत घातले असते; मात्र शाळेतील अशा वातावरणामुळे या विद्यार्थ्यांना स्वतःच्या गरीब पालकांना शाळेत आणायची लाज वाटते. ही गोष्ट विविध मानसिक आणि सामाजिक समस्यांना जन्म देते.’
     पालकांनो, अशा शाळांमध्ये घालून तुमच्या पाल्याचे जीवन उद्ध्वस्त करायचे का, याचा निर्णय तुम्हीच घ्या !

भृगु महर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी रामनाथी आश्रमात काळभैरव यज्ञ !

      काळभैरवाष्टमी, २१.११.२०१६ या दिवशी भृगुनाडीवाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून भृगु महर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी रामनाथी आश्रमात काळभैरव यज्ञ करण्यात आला. या यज्ञापूर्वी आश्रमातील साधकांनी ७ ते २०.११.२०१६ या कालावधीत ‘ॐ क्लीं ह्रीं श्रीं कालभैरवाय नमः ।’ या जपाची १ लक्ष २५ सहस्र इतकी संख्या पूर्ण केली. या संख्येच्या दशांश संख्येने, म्हणजे १२ सहस्र ५०० आहुतींनी हवन करण्यात आले. हवनासाठी काळे तीळ आणि मोहरीचे तेल वापरण्यात आले.
     काळभैरव हा भगवान शिवाचा अंशावतार आहे. तो काशी या तीर्थक्षेत्राचा क्षेत्रसंरक्षक शिवगण आहे. संकटनिवारणासाठी आणि संरक्षक कवचाच्या प्राप्तीसाठी काळभैरवाची उपासना केली जाते.


प.पू. भक्तराज महाराज यांच्या सजीव छायाचित्रामध्ये जाणवलेले पालट आणि प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली वैशिष्ट्ये

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज 
महाराज यांच्या महानिर्वाणदिनाच्या निमित्ताने ...

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

        ‘१.३.२०१४ या दिवशी माझ्याकडे असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) छायाचित्रात पालट झाला आहे. प.पू. डॉक्टरांनी त्या संदर्भात सांगितलेली काही वैशिष्ट्ये पुढे देत आहे. 
१. छायाचित्रासंदर्भात 
साधिकेला जाणवलेले पालट
१ अ. प.पू. भक्तराज महाराजांनी सूक्ष्मातून येऊन उपाय केल्याचे जाणवणे : १५.४.२०१४ या दिवशी मला पुष्कळ त्रास होत होता, त्या वेळी खोलीत मी एकटीच होते. मला आकडी येण्याचा (फिट्स) त्रास होत असल्याने मला कोणाच्या तरी साहाय्याची आवश्यकता होती; पण माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हते. त्यामुळे मी प.पू. बाबांनाच आळवून हाक मारू लागले. तेव्हा प.पू. बाबांच्या छायाचित्रातील त्यांच्या हातांतून मला जणू काही आशीर्वादरूपी शक्तीच मिळू लागली. त्यानंतर ३ वेळा असा आवाज आला, ‘तू काही काळजी करू नकोस, मी आहे. मी तुझे सर्व काही करीन’, असे म्हणून त्यांनी मला त्यांच्या हातांनी पाणी पाजले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मला आकडीमुळे घेरी येऊन माझे डोके दुखत होते; म्हणून ते माझ्या उशाशी बसून माझ्या डोक्यावरून अतिशय प्रेमाने हात फिरवू लागले. त्यानंतर मला झोप लागली आणि सकाळी जाग आली. त्या वेळी प.पू. बाबांचे हे छायाचित्र माझ्या उशाशी होते. 

सनातनचे साधक आणि संत यांच्या प्रगतीसाठी झटणारे सनातनचे सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे !

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे 
१. साधक आणि संत यांना सत्संगाद्वारे मार्गदर्शन करणे
     ‘सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादा नेहमी आश्रमातील काही साधकांसह संतांचाही सत्संग घेतात. त्यामध्ये पू. दादांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जण प्रयत्न करून पुढे गेले. तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. दादांनी सद्गुरुपद गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी काही संतांनीही ‘पू. दादांनी आम्हाला कसे घडवले’, ते मनोगतातून व्यक्त केले. 
२. प्रसारकार्य आणि देवद आश्रम येथील साधकांना घडवणे
    सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादांनी प्रसारकार्याची घडी बसवण्यासाठी प्रयत्न केले आणि ते अजूनही तसे प्रयत्न करत आहेत. प्रसारातील अनेक साधकही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रयत्न करतात. देवद आश्रमातील सर्व साधकही सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादांसारख्या संतांच्या कृपाशीर्वादाखाली घडत आहे.

साधकांवर निरपेक्ष प्रेम करून त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे रंजन देसाई !

    ‘रंजन देसाई हे देवद आश्रमात असतांना काही वर्षे आम्ही एका खोलीत रहात होतो, तसेच ते सेवेसाठी माझ्याजवळ बसत असत. आमची वैयक्तिक आणि आध्यात्मिक स्तरावर मैत्री होती. बर्‍याचशा गोष्टी आम्ही एकमेकांना विचारून करत होतो. त्यांना मधुमेहाचा तीव्र त्रास होता, तसेच हृदयविकाराचाही त्रास होता. त्यांनी चार मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) हृदयविकारावर माधवबाग येथे आयुर्वेदिक उपचार घेतले होते. त्यानंतर आयुर्वेदिक औषधे, सकाळी चालणे, योगासने आणि पथ्याचे जेवण यांमुळे त्यांची प्रकृती सुधारली होती. रक्तातील साखरेचे प्रमाणही अल्प झाले होते. त्यांची मानसिक स्थितीही चांगली झाली होती; मात्र दोन मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) काही प्रसंगांमुळे त्यांचा मानसिक ताण वाढला. त्यामुळे त्यांच्या नित्य कर्मावरही परिणाम झाला. त्यांच्या पायाला सूज आली. त्यामुळे एक मासापूर्वी (महिन्यापूर्वी) माधवबाग येथे जाऊन त्यांच्या हृदयविकाराच्या चाचण्या करण्यात आल्या. ‘त्यांच्या हृदयाची रक्तपुरवठा करण्याची क्षमता २५ टक्क्यांवर आल्याने स्थिती नाजूक झालेली आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले आणि रुग्णालयात त्वरित उपचार करून घेण्यास सांगितले. त्यांनी त्यास प्राधान्य देण्याऐवजी इतरांचा विचार करून उपचार प्रलंबित ठेवले. ‘घरी जाऊन आल्यावर अन् दिवाळी साजरी होऊन परत आल्यावर उपचार करू’, असे त्यांनी ठरवले.

पिंगुळी (सिंधुदुर्ग) येथील सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे रंजन देसाई यांचे निधन

रंजन देसाई
 पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील मे. अरुणोदय मेटल इंडस्ट्रीज्चे मालक तथा सनातनचे साधक रंजन रघुनाथ देसाई (वय ६१ वर्षे) यांचे २० नोव्हेंबरला रात्री १२.१० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. कुडाळ एम्.आय.डी.सी. येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर २१ नोव्हेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी रंजन देसाई यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती.

गुरूंच्या मुखातून निघालेले शब्द हे ब्रह्मवाक्य असते, याची साधकाला आलेली प्रचीती !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
    ‘१९९९ या वर्षीच्या गुरुपौर्णिमेनंतर आम्ही जळगावचे काही साधक गुरुमाऊलींच्या (प.पू. डॉक्टरांच्या) मार्गदर्शनासाठी नाशिक येथे गेलो होतो. तेव्हा प.पू. डॉक्टर त्यांच्या मार्गदर्शनात म्हणाले होते, ‘‘या सौर मंडलात अनेक पृथ्वी असतील. आपल्याला पुढील काळात परग्रहावरही प्रसारासाठी जावे लागेल. तेथील मानव कोणत्या युगात आहे, हे आपल्याला ठाऊक नाही. ‘आपण रहात असलेल्या या पृथ्वीवरील मानव त्यांचे शत्रू नाहीत’, हे त्यांना तिथे जाऊन सांगावे लागेल.’’ त्या वेळी या बोलण्याकडे मी फारसे लक्ष दिले नव्हते.
    ‘सप्टेंबर २०१६ मध्ये ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीवर ‘परग्रहावरील जीव’ (एलियंस) या विषयावर माहिती सांगितली जात होती. परग्रहावरील जिवांनी पृथ्वीवर येऊन गायींना लक्ष्य केल्याची माहिती दृश्यपटाद्वारे (क्लीपद्वारे) दाखवण्यात येत होती. परग्रहांवर जीव असल्याचे अनेक पुरावे विदेशांतही मिळाले आहेत. सौर मंडळात नऊ ग्रहांव्यतिरिक्त पृथ्वीसारखा नवीन ग्रह शोधल्याचे ‘नासा’ने प्रसिद्ध केल्याचे वृत्तही वाचण्यात आले. त्या ठिकाणी पाणी आहे, असेही ‘नासा’ने म्हटले आहे. वरील घटनांवरून मला प.पू. डॉक्टरांनी नाशिक येथे केलेले मार्गदर्शन आठवले आणि ‘गुरूंच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य असते’, याची प्रचीती आली.’ - श्री. विजय पाटील, जळगाव (सप्टेंबर २०१६) 

सनातनचे पू. राजेंद्र शिंदे हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यावर त्यांना घातलेल्या हारामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मुखकमल दिसणे

     ‘१९.७.२०१६ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात झालेल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात सनातनचे पू. राजेंद्र शिंदे हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे घोषित केले गेले. त्या वेळी प.पू. पांडे महाराज यांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. नंतर त्या हारातील चैतन्याचा सर्व साधकांना लाभ व्हावा, या उद्देशाने तो हार भोजनकक्षात ठेवला होता. मी त्या हाराजवळ जाऊन ‘या हारात चैतन्य कसे शोधायचे ?’ असा विचार करत होते. त्याच क्षणी त्या हारात मला प.पू. डॉक्टरांचे मुखकमल दिसले.’ - कु. विजयालक्ष्मी चव्हाण, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.७.२०१६)

परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील पाण्याप्रतीचा सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांचा उत्कट भाव !

श्री. संदेश नाणोसकर
       ‘मे २०१६ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अंकानिमित्त मला रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात सेवा करण्याची संधी मिळाली. तेथून देवद आश्रमात निघण्याआधी ‘सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे (सद्गुरु राजेंद्रदादा) यांच्यासाठी काहीतरी घ्यावे’, असे मला वाटले. तेव्हा देवाने माझ्या मनात ‘रामनाथी आश्रमातील पाणी हे ‘तीर्थ’ म्हणून सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादांसाठी न्यावे’, असा विचार घातला. त्यानुसार मी लहान बाटलीतून रामनाथी आश्रमातील पाणी देवद आश्रमात नेले. ते सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादांना ते दिले. त्यांनी ते ८ दिवस वापरले. त्यांनी ते त्यांच्या पिण्याच्या पाण्यातही मिसळले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्मिता राजेंद्र कानडे यांना रामनाथी आश्रमात जाऊन आल्यावर नामजपामध्ये जाणवलेले पालट

१. नाम श्‍वासाला जोडणे
सौ. स्मिता कानडे
१ अ. श्‍वासाला नामजप जोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे झालेले लाभ : नामजप श्‍वासाला जोडला होता. त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळे येणारा विचार एक मिनिट येतो आणि तो आपोआप बंद होऊन परत नामजप चालू होतो. ‘प्रार्थना, शरणागती आणि कृतज्ञता शब्दातून व्यक्त करावी, असे वाटत नाही, नामातच सर्व काही आहे’, असे वाटते. 
१ आ. श्‍वास आणि नामजप हळूहळू मंद होऊन ‘नामही नाही’ आणि श्‍वास लयीत मंद होत असल्याचे जाणवणे : ‘नामजपात शब्द आणि आनंदाची अवस्था असते. काही काळ नामजप श्‍वासाला जोडून होतो. हळूहळू श्‍वास आणि नामजप मंद होतात. श्‍वास मंद मंद होतो, जाणवेनासा होतो आणि नामजपातील शब्द थांबतात. पुढे नामही नाही, अशी स्थिती असते. त्यानंतर श्‍वास लयीत आणि मंद होत असल्याचे जाणवते.
१ इ. नामजप शरिराच्या पोकळीत घुमत असून तो घेतांना शरिरात मंद ज्योत तेवत असल्याचे जाणवणे : ‘नामजप घेतांना तो काही वेळा शरिराच्या पोकळीत घुमत आहे’, असे जाणवते. तेव्हा श्‍वास चालू असतो; पण नामजप श्‍वासाला जोडून न रहाता तो बराच काळ घुमत रहातो, तो प्रयत्नपूर्वक थांबवावा लागतो. नामजप करतांना बर्‍याच वेळा शरिरात मंद ज्योत तेवत असतांना दिसते. 

प्राण आणि चैतन्य यांचा परिणाम

श्री. राम होनप
        ‘प्राणामुळे मनुष्याला आणि चैतन्यामुळे निर्जीव वस्तूला सजीवता प्राप्त होते. निर्जीव वस्तूत चैतन्य आल्यामुळे त्यात देवत्व येते. या अर्थाने वरील वाक्यात निर्जीव वस्तूसंबंधी ‘सजीवता’ हा शब्दप्रयोग केला आहे.’ 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०१६) 

अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या एका जिज्ञासूला आलेल्या अनुभूती !

       ‘मी रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात असलेले प.पू. भक्तराज महाराज यांचे चित्र पाहिल्यावर माझ्या डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत मागच्या बाजूने शरिरात वीज सळसळल्याप्रमाणे झाले. माझ्या अंगावर शहारे आले. माझी ही अवस्था बराच काळ टिकून होती. मला तेथून हलणे अशक्य झाले. मी निःशब्द झाले आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. 
       ‘मी ध्यानमंदिराच्या भिंतीला स्पर्श केल्यावर माझ्या दोन्ही हातांना हृदयाचे ठोके जाणवले. हे ठोके डाव्या हातापेक्षा उजव्या हाताला अधिक प्रमाणात जाणवत होते. ही माझ्यासाठी एक अद्भुत अनुभूती होती.’
- कु. अ‍ॅनाबेल मार्द्रोस, अमेरिका (२२.९.२०१५) 

सांगली येथील सौ. गौरी खिलारे यांना आलेल्या अनुभूती

सौ. गौरी खिलारे
१. आश्‍विन सप्तमीला अकस्मात श्रीदुर्गादेवीचा 
नामजप चालू होऊन श्रीदुर्गादेवीचे अस्तित्व जाणवणे आणि 
तिचे वाईट शक्तींचे निर्मूलन करण्याचे कार्य चालू असल्याचे जाणवणे
    ‘आश्‍विन सप्तमीला रात्री १२ वाजता मी नामजप करत होते. त्या वेळी माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप चालू होता आणि अकस्मात् नामजपात पालट होऊन श्रीदुर्गादेवीचा नामजप चालू झाला. तेव्हा त्या नामजपाने माझा भाव जागृत होऊन मला उत्साह आणि शक्ती मिळत होती. नामजप करतांना अचानक माझी जीभ बाहेर आली. थोड्या वेळाने ती आणखी पुढे आल्यावर मला माझ्यात पुष्कळ शक्ती जाणवत होती. तेव्हा ‘मी तिथे नसून श्रीदुर्गादेवी आहे आणि ती खोलीतील वाईट शक्तींवर सपासप वार करून त्यांना पळवून लावत आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवत होते. नंतर जीभ आत गेली आणि परत बाहेर आल्यावर ‘ती पूर्ण वास्तूतील वाईट शक्तींवर शस्त्रांनी वार करून त्यांचे निर्मूलन करत आहे’, असे मला जाणवले. असे तीन वेळा झाले. त्या वेळी माझे अस्तित्व नव्हते, तर देवीचे कार्य चालू होते. मी केवळ घडत असलेला प्रसंग पहात होते.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात झालेल्या श्री लक्ष्मीपूजनाचे सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले
१. श्री लक्ष्मीदेवीचे अस्तित्व जाणवून आनंद होणे
     ‘लक्ष्मीपूजनाचा विधी चालू होण्याआधीच ‘ध्यानमंदिरात अनेक देवता जमलेल्या आहेत’, असे जाणवत होते. श्री लक्ष्मीदेवीचे अस्तित्व जाणवून आनंद होत होता. 
२. प.पू. डॉक्टरांच्या रूपाने श्रीविष्णुच 
ध्यानमंदिरात आल्याचे जाणवणे
    लक्ष्मीपूजनाचा आरंभ होण्याआधी प.पू. डॉक्टर ध्यानमंदिरात आले, तेव्हा ‘त्यांच्या रूपाने श्रीविष्णुच लक्ष्मीपूजनाचा पूजनविधी निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी ध्यानमंदिरात आला आहे’, असे जाणवले.

सनातन-निर्मित ग्रंथांची पडताळणी सेवा करतांना त्यातून प्रक्षेपित होणार्‍या ईश्‍वरी शक्तीमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन एकाग्रतेने नामजप चालू होणे

       ‘एक दिवस माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. त्यामुळे माझे डोके जड झाले होते आणि मानही अतिशय दुखत होती. तेव्हा मला ‘सनातन सेवाकेंद्रा’त जाऊ नये’, असे वाटत होते आणि मला उत्साहसुद्धा जाणवत नव्हता, तरीही मी कोल्हापूर येथील सनातन सेवाकेंद्रात गेले. आरंभी माझी तशीच मानसिक स्थिती होती. त्यामुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास होत होते, तरीही तेथे मी सनातन-निर्मित ग्रंथांची पडताळणी सेवा चालू केली. थोड्या वेळाने मला ‘सनातनच्या ग्रंथामधून ईश्‍वरी शक्ती माझ्या शरिरात जात आहे’, असे जाणवू लागले. माझ्या मनातील नकारात्मक विचार अल्प होऊ लागले, मान दुखायची थांबली, संपूर्ण शरिरात हलकेपणा जाणवून मनाचा उत्साह वाढू लागला आणि सेवा एकाग्रतेने होऊन चैतन्य ग्रहण होत असल्याचे जाणवू लागले. तसेच माझा सतत नामजपही होऊ लागला.’ 
- सौ. कुसमा पाटील, कागल, कोल्हापूर. 

प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘देवा, तुझा असा कसा संसार’ या भजनाचे सूर स्वतःच्या हृदयातून ऐकायला येऊन ‘देवाची लीला’ अनुभवायला मिळणे

       ‘१५.७.२०१६ या दिवशी आषाढी एकादशी होती. मी नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० वाजता उठले आणि मला प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘देवा, तुझा असा कसा संसार’ या भजनाचे सूर ऐकू आले. त्या सुरांनी माझे मन प्रसन्न होऊन आनंदाने भरून गेले. ‘ही श्रीगुरुदेवांच्या आवडीची भजने कुणी लावली असतील ?’ याचा शोध मी घेऊ लागले. खोलीतील सर्व साधिका शांत झोपल्या होत्या. मग मी माझा भ्रमणभाष पाहिला, तर तोही बंद होता; पण स्वर अगदी जवळून ऐकायला येत होते. मी शांतपणे भजन ऐकत असतांना २ मिनिटांनी माझ्या लक्षात आले की, हे स्वर, माझ्या आतून ऐकू येत आहेत. तेव्हा मला आश्‍चर्य वाटून आनंदही झाला. तो आतून येणारा ध्वनी मी स्पष्टपणे प्रथमच ऐकत होते. ‘प्रत्यक्ष श्रीगुरुदेवच माझ्या हृदयात बसून भजन म्हणत आहेत आणि मी ते ऐकत आहे’, हा अपूर्व क्षण मी अनुभवत होते. देवा, ही सर्व तुझीच लीला आहे. भगवंता, माझी पात्रता नसतांनाही मला हे अनुभवायला दिलेस; म्हणून तुझ्या अमृतमय चरणी मी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’ 
- श्रीमती वासंती लावंघरे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.७.२०१६) 

सहनशील वृत्तीची आणि स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकोला येथील चि. राधिका रामेश्‍वर पवार (वय पावणेदोन वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. राधिका रामेश्‍वर पवार एक दैवी बालक आहे !
चि. राधिका पवार
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकोला येथील चि. राधिका रामेश्‍वर पवार हिचा कार्तिक कृष्ण सप्तमी (२० नोव्हेंबर २०१६ या दिवशी) दुसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

शिवाचा नामजप केल्याने दम्याचा त्रास उणावणे

       ‘जानेवारी-फेब्रुवारी २०१६ या दोन मासांत (महिन्यांत) मला दम्याचा तीव्र त्रास होत होता. औषधोपचार करूनही त्रास उणावत नव्हता. त्या कालावधीत मी एका ग्रंथाची अनुक्रमणिका सिद्ध करण्याची सेवा करत होते. त्यात ‘ॐ नमः शिवाय’ हा नामजप केल्याने दम्याचा त्रास उणावतो, असे माझ्या वाचनात आले. त्याप्रमाणे मी तो नामजप केला आणि माझा दम्याचा त्रास एका दिवसात ८० टक्क्यांनी उणावला.
       ‘येणार्‍या आपत्काळात औषधोपचार मिळणार नाही. त्या वेळी मंत्रोपचारांनी व्याधी जलद गतीने बर्‍या होऊ शकतात, हे मला वरील अनुभूतीतून शिकायला मिळाले.’ 
- सौ. सारिका कृष्णा आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

खरे शिक्षण कोणते ?
प.पू. परशराम पांडे
       ‘भगवंत जे करतो, ते केवळ न पहाता तसे करतो ते खरे ‘शिक्षण’; मात्र आज अनुभवसिद्ध माणसालाच अशिक्षित समजले जाते. सध्याचे शिक्षण म्हणजे ‘पुस्तकी ज्ञान’ हीच धारणा झाली आहे. तीच त्याची पदवी ठरते; मात्र जो अनुभवाने शिकतो, त्याला समाज अशिक्षित समजतो. भगवंताची प्रत्येक कृती विवेकाने पाहून आपणही तसे करणे, म्हणजे खरे शिक्षण. श्री. बापू लोंढे (सनातनचे एक साधक जे अशिक्षित आहेत; परंतु त्यांनी ६४ टक्के पातळी गाठली आहे.) खरे शिक्षित आहेत. आपणही शिक्षणाच्या चुकीच्या व्याख्येने वागलो आणि आपल्या मुलांनाही तेच शिकवतोय, म्हणजे अपराध करतोय !’ 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१०.२०१४) 

देवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीची स्वच्छता करतांना श्री. मोहनीश साळुंखे यांना आलेली अनुभूती !

       ‘देवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीची स्वच्छता करण्याची संधी मला मिळाली’, यासाठी मी कृतज्ञ आहे. ही सेवा करतांना मला पुष्कळ शांत आणि हलके जाणवत होते. ही सेवा झाल्यानंतर मी गाडीला पुढूून नमस्कार केला आणि गाडीत बाबा जेथे बसायचे, तेथे बघितले असता मला ‘बाबा प्रत्यक्ष बसले आहेत’, असे जाणवले अन् एकदम शांत वाटले. त्यांच्या आसंदीकडे पाहिल्यावर मला त्यांचेे पांढरे शुभ्र धोतर दिसत होते. नंतर त्यांच्या आसंदीतील छायाचित्राकडे बघितल्यावर मला तेथे पहिल्यांदा काही वेळ केवळ प.पू. रामकृष्ण परमहंस दिसत होते. नंतर काही वेळाने केवळ प.पू डॉक्टर दिसत होते. नंतर काही वेळाने थोडा वेळ प.पू. भक्तराज महाराज दिसत होते. त्यानंतर मी परत पाहिल्यावर काही वेळ प.पू. श्री अनंतानंद साईश दिसत होते. ही सर्व केवळ छायाचित्रे न दिसता त्यामध्ये जिवंतपणा जाणवत होता. ‘हे सर्व संत एकच आहेत’, असा मनात विचार येऊन मला पुष्कळ प्रसन्न वाटले. माझ्यात अनेक दोष असूनही प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे ही अनुभूती मला आली, त्याबद्दल हा छोटासा जीव त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’ 
- श्री. मोहनिश साळुंखे (वय २० वर्षे), कोथरुड, पुणे. (१६.१२.२०१५) 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

खरे समजून घेणे
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
सुनो सोचो समझो । सुनो समझो सोचो ।
भावार्थ : ‘सुनो’ म्हणजे ऐका, ‘सोचो’ म्हणजे विचार करा आणि ‘समझो’ म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत ‘सुनो सोचो समझो’ आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसर्‍या ओळीत ‘सुनो समझो सोचो’ आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर जिवाने ती गोष्ट समजून जाणे, त्याची अनुभूती घेणे आणि नंतर त्याविषयी विचार करणे. हे ब्रह्माच्या संदर्भात आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्‍वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्‍वाचे कोडे उलगडते !’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

नेहमी सत्संगात रहावे
व्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे, यावरून त्याची ओळख ठरते; 
म्हणूनच आपल्याभोवती सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तींचा वावर असेल, याची दक्षता कटाक्षाने घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


हिंदूंच्या देशात इस्लामी बँकिंग !

संपादकीय
     नोटाबंदीनंतर आता रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांमध्ये शरीयतनुसार इस्लामी बँक सेवा चालू करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. सध्या कार्यरत असणार्‍या बँकांमध्ये ‘इस्लामी खिडकी’ उघडण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे. प्रारंभी ही सेवा त्या मुसलमानांसाठी आहे, जे धर्माच्या नियमामुळे व्याज देणार्‍या बँकांमध्ये पैसे ठेवू इच्छित नाही. त्यांचा पैसा देशाच्या चलनात यावा; म्हणून रिझर्व्ह बँक हा प्रयत्न करत आहे; मात्र पुढे देशातील सर्व जनतेसाठीच योजना लागू करण्याचा विचार यात आहे. इस्लामी बँकिंग पद्धतीमध्ये व्याज दिले अथवा आकारले जात नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn