Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साहित्यातून आदर्श राष्ट्र आणि समाज घडू शकतो ! - नितीन गडकरी

पुणे, २० नोव्हेंबर (वार्ता.) - लोकांपर्यंत योग्य विचार पोचवण्यासाठी साहित्य महत्त्वाचे ठरते. साहित्यामध्ये सत्तेला नष्ट करण्याची शक्ती असते. भविष्याला दिशा देऊन ते समृद्ध करण्याचे कार्य साहित्य करते. साहित्य, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा यांमुळे मूल्याधिष्ठित समाज घडून आदर्श राष्ट्र आणि समाज घडू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सरहद या संस्थेच्या वतीने येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पहिले विश्वर पंजाबी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
 
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस पंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुरजीत पातर, अभिनेते धर्मेंद्र, माजी पोलीस महासंचालक एस.एस. वीर्क यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
या वेळी अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह उज्ज्वल डोसांझ, डॉ. ओबेरॉय, डॉ. त्रिलोचनसिंग, राजीई शिंदे, डॉ. केवल धीर यांना विश्वॉ पंजाबी गौरव पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साहित्याला भाषेचे बंधन असू नये. पंजाबी साहित्याने समाजाला चिरंतन विचार दिला आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून मंदिराच्या प्रांगणात गोहत्या आणि गोमांस भक्षण करून देवतांची विटंबना !

श्री श्री चतुर्मुख ब्रह्मा मंदिर
दादरी (उत्तरप्रदेश) येथील अखलाकच्या प्रकरणावरून गळे काढणारे आणि पुरस्कार परत 
रणारे बांगलादेशातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आघातांवर तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
      ढाका - येथील लांगलबांधस्थित श्री श्री चतुर्मुख ब्रह्मा मंदिराच्या प्रांगणात ११ नोव्हेंबर या दिवशी धर्मांधांनी २ गायींची हत्या केली आणि गोमांसाचे पदार्थांची पाहुण्यांना मेजवानी दिली.
१. मार्फत अली याने त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी नातेवाईक आणि मित्र यांना निमंत्रित करून वरील प्रकार केला.
२. मंदिराचे सेवक श्री. माधव चक्रवर्ती यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी नारायणगंज येथील बंदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली

बँकेच्या खात्यात एका दिवसाला ५० सहस्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरणार्‍यांना नोटिसा !

     मुंबई / इंदूर - नोटांवरील बंदीनंतर बँकांमध्ये एकाच दिवशी ५० सहस्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणार्‍यांना प्राप्तीकर विभागाने नोटीस पाठवायला प्रारंभ केला आहे. बंगालच्या सिलुगुडी आणि सिक्कीमची राजधानी गंगटोक येथील नागरिकांना अशा प्रकारच्या नोटिसा पाठवण्यात आल्याचे समोर येत आहे. या नागरिकांकडून पैसे जमा करण्याविषयीचे स्पष्टीकरण विचारण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बँका आणि टपाल कार्यालय यांना कोणत्याही खात्यामध्ये दिवसाला ५० सहस्र आणि ३० डिसेंबरपर्यंत अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास त्याची माहिती प्राप्तीकर विभागाला देण्याचे आदेश दिले होते. ३० डिसेंबरनंतर मोठ्या प्रमाणात नोटिसा पाठवल्या जाण्याची शक्यता आहे.

हिंदुद्वेषी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेस अनुमती देऊ नये आणि त्यांना सातारा जिल्हा प्रवेश बंदी करावी !

कराड शहर पोलीस अधीक्षकांना निवेदन देतांना धर्माभिमानी

कुरुंदवाड येथे पोलीस उपनिरीक्षक निवेदन स्वीकारतांना

 ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात निवेदन देतांना धर्माभिमानी

  • धर्मरक्षणासाठी संघटितपणे कृतीशील होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !
  • ईश्‍वरपूर आणि कराड येथील हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
      ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) आणि कराड (जिल्हा सातारा) - ईश्‍वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी ईश्‍वरपूर येथे, तसेच कराडमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुसलमीन (एम्.आय्.एम्.) या पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ओवैसी हे त्यांच्या भाषणांमधून वारंवार हिंदुद्वेषी आणि जातीय तेढ पसरवणारी वक्तव्ये करतात. त्यांच्या भाषणांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, तरी ओवैसी यांच्या सभेस अनुमती देऊ नये, असे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. गजानन पाटील, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री स्वप्नील माळी, प्रशांत पाटील, पृथ्वीराज पाटील, इंद्रजीत पाटील यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

दक्षिणायनमधील सनातनद्वेषी अविचारी टीका, हे पुरोगाम्यांचे वैचारिक अधःपतन ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

     मुंबई - गोव्यामध्ये तथाकथित पुरोगाम्यांचे दक्षिणायन अभियान १८ नोव्हेंबरपासून चालू झाले. याला उपस्थित बहुतांश वक्त्यांनी लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे बोलतांना सनातनला गाडा, अभिव्यक्तीविरोधी सनातनी राक्षसाचा वध करा, असे म्हणत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच गळा घोटला. बहुतांश वक्त्यांनी सनातनवर बिनबुडाचे आणि अविचारी आरोप करण्यातच धन्यता मानली. कोणताही पुरावा नाही, सनातनवर अद्याप एकही गुन्हा नाही, कोणत्याही न्यायालयाने अद्याप सनातन संस्थेला दोषी म्हटलेले नाही, तरीही हिंदुद्वेषामुळे सनातन संस्थेवर टीका करणे आणि सनातनला गाडण्याची भाषा करणे, हे पुरोगाम्यांचे वैचारिक अधःपतन होऊन ते किती हीन पातळीला गेले आहेत, हेच लक्षात येते, अशी परखड भूमिका एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी दक्षिणायन अभियानाविषयी मांडली.
     श्री. वर्तक यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सनातनने वापरलेल्या दुर्जनांचा नाश या शब्दांविषयी खूप आरडाओरड झाली; पण आज दक्षिणायनच्या पुरोगामी व्यासपिठावरून रावसाहेब कसबे यांनी सनातन विषारी आहे. या विषारी प्रकाराला गाडावेच लागते. अभिव्यक्तीच्या विरोधात असलेल्या या राक्षसांचा वध करणे आवश्यक आहे, असे म्हटले.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष ६२ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ५ महिने ११ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
     केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

आसाममध्ये उल्फा आतंकवाद्यांच्या आक्रमणात ३ सैनिक हुतात्मा, ४ घायाळ !

     नवी देहली - आसामच्या तिनसुकिया येथील पेंगरी येथे उल्फा आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे ३ सैनिक हुतात्मा झाले. आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात या सैनिकांचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. या आक्रमणात आणखी ४ सैनिकही घायाळ झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत आतंकवादी आणि सैनिक यांच्यात चकमक चालू होती. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) ही आसाममधील फुटीरतावादी संघटना आहे. केंद्रशासनाने या संघटनेवर वर्ष १९९० मध्ये बंदी घातली होती.


मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि तिबेटचे माजी पंतप्रधान रिनपोछे यांची हिंदु जनजागृती समिती आणि सनातनच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट !

भोपाळ येथील लोकमंथन कार्यक्रम 
श्री. शिवराजसिंह चौहान (डावीकडे)यांची भेट घेतांना श्री. रमेश शिंदे
तिबेटचे माजी पंतप्रधान श्री. रिनपोछे (डावीकडे) यांची भेट घेतांना श्री. चेतन राजहंस
     भोपाळ - येथे मध्यप्रदेश शासनातर्फे लोकमंथन : देश-काल-स्थितीया विषयावर विचारवंत आणि कार्यकर्ते यांचे नुकतेच एक संमेलन पार पडले. या वेळी देश-विदेशातील विचारवंतांनी यात सहभाग घेतला होता. यात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांचाही सहभाग होता. या वेळी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन त्यांना धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ भेट दिला.
     या संमेलनाच्या वेळी आलेल्या विविध मान्यवरांची समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली.

सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात गरळओक !

  • पुरो(अधो)गाम्यांच्या या सभेतील विधाने वाचल्यावर ‘दक्षिणायन अभियान’ हे ‘हिंदु धर्मविरोधी अभियान’ आहे, हे उघड होते !
  • पुरो(अधो)गाम्यांची मडगाव येथील दक्षिणायन अभियानाची सभा !
     मडगाव, १९ नोव्हेंबर (वार्ता.) - पुरो(अधो)गाम्यांच्या मडगाव येथील लोहिया मैदानात १९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या दक्षिणायन अभियानच्या सभेत सनातन वैदिक हिंदु धर्म, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सनातन संस्था यांविषयी गरळओक करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. हमीद दाभोलकर, मेधा पानसरे यांनी नेहमीप्रमाणे सनातन संस्थेविरोधात गरळओक केली. सूत्रसंचालक राजू नायक यांनी सनातन संस्थेविरोधात निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

भारतात २ कोटी बांगलादेशी मुसलमान घुसखोर रहातात ! - केंद्रशासनाची राज्यसभेत माहिती

सरकारने केवळ अशी माहिती न देता ‘या घुसखोरांना भारतातून अद्याप हाकलण्यात 
का आले नाही आणि आता हाकलण्यासाठी काय करण्यात येणार आहे’, याची माहिती द्यावी !
      नवी देहली - भारतात बांगलादेशमधून घुसखोरी करून आलेल्या विस्थापितांची (मुसलमानांची) संख्या २ कोटीपर्यंत पोचली आहे, अशी माहिती केंद्रशासनाने राज्यसभेत दिली. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येएवढी आहे. या आधीच्या काँग्रेस सरकारने वर्ष २००४ मध्ये हीच संख्या १ कोटी २० लाख असल्याचे म्हटले होते; मात्र हे निवेदन नंतर मागे घेण्यात आले. त्यानंतर घुसखोरांच्या संखेत ६७ टक्के वाढ झाल्याचे लक्षात आले आहे. (विदेशी घुसखोरांना हाकलून लावण्याऐवजी त्यांच्यात वाढ होऊ देणारे सरकार देशाचे रक्षण कसे करणार ? देशाच्या मुळावर येणार्‍या या घुसखोरांना हाकलण्यासाठी लोकशाहीतील सरकारे काही करणार नाहीत, त्यासाठी हिंदु राष्ट्रच (सनातन धर्म राज्यच) हवे ! - संपादक)

पुढील एक सहस्र वर्षेच पृथ्वी मानवाला रहाण्यासाठी उपयोगी असल्याने दुसर्‍या ग्रहाचा शोध घ्या ! - शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची चेतावणी

हिंदु धर्मानुसार साधना केली, तर आध्यात्मिक उन्नती 
होऊन भविष्यात काय होणार आहे, याची माहिती व्यक्तीला आधीच कळते, 
विज्ञानाद्वारे केलेल्या संशोधनातून अशी माहिती मिळण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे !
      लंडन - पृथ्वी अशक्त झाली आहे. चराचराचा भार तिला आता पेलवेनासा झाला आहे. आणखी एक सहस्र वर्षांनी मानवजातीला पृथ्वीवर रहाणे अशक्य होऊन जाईल. तेव्हा आताच सावध व्हा आणि वास्तव्यासाठी दुसरा ग्रह शोधा, अशी चेतावणी प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी दिली आहे. ते ऑक्सफर्ड युनियन डिबेटिंग सोसायटीमध्ये व्याख्यान देतांना बोलत होते.
     हॉकिंग पुढे म्हणाले, ‘‘कदाचित् पृथ्वी नामशेष व्हायला १० सहस्र वर्षेही लागू शकतात; पण १ सहस्र वर्षांतच ती मानवाला रहाण्यालायक रहाणार नाही एवढे मात्र निश्‍चित आहे. मानवातील माणुसकी, सभ्यता, चांगुलपणा हा दुनियेतला एक अमूल्य ठेवा आहे. त्याचे जतन व्हावे, असे वाटत असेल, तर मानवाला पृथ्वी सोडावीच लागेल. तसे केले, तरच पृथ्वी नष्ट झाली तरी मानवाचा चांगुलपणा नष्ट होण्याचा धोका उरणार नाही.’’
     मानवजातीपुढे पुढील शतकात वातावरणातील पालट आणि अण्वस्त्रांचा आतंकवाद ही दोन मोठी अरिष्टे उभी ठाकणार आहेत. त्यांचा निपटारा मानवाला करावा लागेल, असेही ते म्हणाले.(म्हणे) ‘भारत हिंदु राष्ट्र बनला, तर काश्मीर स्वतंत्र होईल !’ - फारूक अब्दुल्ला यांचे फुत्कार

काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे आणि 
ते पुढे हिंदु राष्ट्रातही रहाणार, हे अब्दुल्ला यांनी लक्षात ठेवावे !
       श्रीनगर - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जर भारताला हिंदु राष्ट्र म्हणत असतील, तर आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, काश्मीर हिंदु राष्ट्राचा भाग रहाणार नाही, त्याला वेगळे करण्यात येईल, असे देशद्रोही विधान नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी येथे केले. ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते. तसेच त्यांनी भागवत यांच्यावर राज्यघटनेच्या विरोधात बोलल्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली. 
     मोहन भागवत यांनी नुकतेच जम्मूमध्ये संघ स्वयंसेवकांसमोर बोलतांना ‘भारत हिंदु राष्ट्र आहे; कारण आपले पूर्वज हिंदु होते’, असे विधान केले होते. 
     अब्दुल्ला यांनी असेही स्पष्ट केले की, काश्मीर कधीही पाकचा भाग बनणार नाही. पाकमध्ये अद्यापही जमीनदारांकडे सर्व संपत्ती आहे आणि गरीब व्यक्तींची स्थिती दयनीय आहे.

पाककडे १३० ते १४० अण्वस्त्रे ! - अमेरिका

पाकच्या अण्वस्त्रांचा भारतावर वापर होण्यापूर्वीच पाकला नामशेष 
करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, अशीच भारतीय जनतेची इच्छा आहे !
      वॉशिंग्टन - पाककडे १३० ते १४० अण्वस्त्रे आहेत. त्याचबरोबर पाक एफ्-१६ आणि मिराज या लढाऊ विमानांमध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी काही पालट करत आहे, अशी माहिती अमेरिकेच्या शास्त्रज्ञांच्या अहवालाद्वारे समोर आली आहे. वर्ष १९९९ मध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने वर्ष २०२० पर्यंत पाककडे ६० ते ८० अण्वस्त्रे असतील, असा अंदाज व्यक्त केला होता.
       हेन्स एम्. क्रिस्टेन्सन आणि रॉबर्ट एस्. नोरिस या शास्त्रज्ञांनी उपग्रहाद्वारे मिळवलेल्या माहितीच्या आधारे बनवलेल्या या अहवालानुसार पाक आगामी १० वर्षांत अण्वस्त्रांचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहे. तो अणूशक्तीत जगातील तिसरा सर्वांत मोठा देश ठरू शकतो. पाककडे तोपर्यंत ३५० अण्वस्त्रे असतील.

पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्याची राज्यसभेच्या खासदाराची मागणी !

देशातील साडेसातशे खासदारांपैकी एकाच खासदाराला अशी मागणी करावीशी वाटली, 
हे लोकशाही निरर्थक असल्याचे निदर्शक आहे, असे कोणी म्हटल्यास चुकीचे कसे ठरेल ?
       नवी देहली - राज्यसभेचे खासदार राजीव चंद्रशेखर यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी खाजगी विधेयक सादर करत ‘शासनाने पाकिस्तानसमवेत असलेले सर्व करार रहित करावेत आणि पाकला आतंकवादी देश घोषित करावे’, अशी मागणी केली आहे. ‘पाक आतंकवादी देश असल्याचे आपण सार्‍या जगाला सांगतो; मात्र सरकार असे कधीच म्हणत नाही’, असेही चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. (सरकारला अजूनही ‘पाक भारताचा मित्र आहे’, असे वाटत आहे आणि त्यातून ते भारतीय सैनिक अन् जनता यांचा घात करत आहे ! - संपादक)वाकुलामाता मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचा तिरुपती देवस्थानचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम !

     भाग्यनगर - चित्तूर-तिरुपती रस्त्यावरील पेरुरू या गावात असलेल्या वाकुलामाता मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचा तिरुपती-तिरुमला देवस्थानने घेतलेला निर्णय हैदराबाद उच्च न्यायालयाने कायम केला. हे मंदिर श्रीकृष्णाची पालन करणारी आई यशोदामातेचे आहे. 
     हे प्राचीन मंदिर एका मोठ्या दगडावर वसलेले आहे; मात्र काही हितसंबंधी व्यक्तींनी मंदिराच्या जागेवर दगड खणण्याचे काम करणार्‍या कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळेल; म्हणून हे मंदिरच इतर ठिकाणी हालवावे, अशी विनंती देवस्थानला केली होती. त्याप्रमाणे या मंदिराचे स्थलांतर करण्याचा निर्णय तिरुपती-तिरुमला देवस्थानने वर्ष २००५ मध्ये घेतला होता; मात्र वर्ष २००९ मध्ये परत या निर्णयावर फेरविचार करून आहे तेथेच मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनंतपूर (आंध्रपदेश) येथे सरकारी रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने पत्नीने आजारी पतीला फरफटत नेले !

सरकारी रुग्णालयांच्या दयनीय स्थितीचा सर्वसामान्य 
लोकांना भोगावा लागणारा त्रास सरकारच्या कधी लक्षात येणार ?
      अनंतपूर (आंध्रप्रदेश) - अनंतपूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने पत्नीने पायाला दुखापत झालेल्या पतीला फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे. श्रीवाणी नावाच्या या महिलेला एका हाताने भिंतीचा आधार घेत दुसर्‍या हाताने पतीला ओढतओढत वरच्या मजल्यावर न्यावे लागले. या वेळी उपस्थितांपैकी कोणीही तिच्या साहाय्याला पुढे आले नाही. हे प्रकरण समोर येताच राज्य सरकारने या घटनेच्या तपासाचे आदेश देत, रुग्णालय व्यवस्थापनाला अधिक व्हिलचेअरची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
    पतीला नेहमी याच रुग्णालयात उपचारात आणत असून प्रत्येक वेळी येथे व्हिलचेअर उपलब्ध नसल्याचा अनुभव श्रीवाणी यांनी सांगितला.
    काही आठवड्यांपूर्वी ओडिशामध्ये एका आदिवासी व्यक्तीकडे शववाहिनीचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळून खांद्यावरून न्यावा लागला होता.५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्यासाठी नेपाळच्या सीमेवर समाजकंटकांचा गट सक्रीय !

      नवी देहली - भारतात ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर नेपाळमधील समाजकंटकांचा गट तेथील नागरिकांकडे असणार्‍या नोटा अवैधरित्या खपवण्यासाठी सक्रीय झाल्याने सीमेवरील बँकांनी नोटा पालटण्याची प्रक्रिया बंद केली आहे. तसेच भारत-नेपाळ यांच्यातील चलन पालटून घेण्याची सुविधाही बंद करण्यात आली आहे.
       भारत-नेपाळ सीमेवरील बँकांत नोटा जमा करणे आणि पालटून घेणे, यांसाठी नातेवाइकांच्या खात्यांचा वापर करण्यात येत आहे. गेल्या ८ दिवसांत येथे साडेतीन सहस्र कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. सरासरी प्रतिदिन ४३० कोटी रुपयांच्या नोटा जमा आणि पालटल्या जात आहेत. येथील सीतामढीमध्ये अधिक प्रमाणात नोटा पालटल्या आणि जमा केल्या जात आहेत.इराणमध्ये चर्चमधील ‘पवित्र’ दारू प्यायल्यामुळे ३ जणांना चाबकाच्या फटक्यांची शिक्षा !

      तेहरान (इराण) - इस्लाम सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या ३ जणांना इराणमध्ये चाबकाचे ८० फटके मारण्यात आले. त्यांनी चर्चमधली ‘पवित्र’ दारू प्यायल्याने त्यांना फटके मारण्यात आले. इराणमध्ये ख्रिस्त्यांना दारू पिण्यास बंदी नाही; मात्र इस्लाममधून धर्मांतर करण्यास बंदी आहे. यामुळे या तिघांना आधी अटक करण्यात आली होती. त्यानंतर कारागृहातून सुटून आल्यानंतर त्यांना दारू प्यायल्याची शिक्षा म्हणून चाबकाचे फटके मारण्यात आले. या तिघांनी कारावासाच्या शिक्षेविरुद्ध अपील केले होते; पण त्यांच्यावर आणखी गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले. इराणमध्ये परस्त्रीशी शारीरिक संबंध ठेवणे किंवा दारू पिणे हा गुन्हा मानला जातो आणि त्याच्यासाठी चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली जाते.

ब्राह्मण पुजारी पाहिजे.

     नागोठणे (जिल्हा रायगड) येथील प.प. टेंब्येस्वामी स्थानासाठी ब्राह्मण पुजारी हवा आहे.
सेवेचे स्वरूप : सकाळी ६ ते ८ या वेळेत काकड आरती, पंचामृत पूजा, आरती, अभिषेक वगैरे; दुपारी १२.३० ते १२.४५ या वेळेत नैवेद्य दाखवणे, प्रतिदिन सायंकाळी आरती, महिन्यातून एकदा ३ घंटे नामस्मरण आणि १ यज्ञ आदी सेवांसाठी पुजारी हवा आहे. सनातनचा साधक असल्यास प्राधान्य.
     या सेवा करण्यासाठी येणार्‍या पुजार्‍याची निवासाची व्यवस्था करण्यात येईल. इच्छुक पुजार्‍यांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा.
भ्रमणभाष क्रमांक : ९८८१६९६९१०, ८६००५५७०३८

धर्माभिमान्यांनी धर्मजागृती सभेत कृतीशील सहभागी होऊन सभा यशस्वी करावी ! - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

बैठकीत धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना श्री. सुनील घनवट

  • हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने...
  • कागल (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्माभिमान्यांची बैठक
       कागल, १९ नोव्हेंबर (वार्ता.) - देशात हिंदु धर्मावरील आणि हिंदूंवरील अत्याचारांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यकर्त्यांच्या मवाळ धोरणामुळे भारतातच हिंदूंना विस्थापित होऊन जीवन जगावे लागत आहे. आपल्यावरील अत्याचाराच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. हे संघटन कसे उभारायचे, याची माहिती जाणून घेण्यासाठी कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत धर्माभिमान्यांनी कृतीशील सहभाग घेऊन सभा यशस्वी करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. सभेनिमित्त १७ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ७ वाजता धर्माभिमान्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. 
       समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी सभेचा उद्देश आणि सभेला उपस्थित रहाणार्‍या वक्त्यांची सविस्तर माहिती दिली. बैठकीत हिंदुत्वनिष्ठ कशा प्रकारे सहकार्य करू शकतात, याविषयी चर्चा झाली. यानंतर ५ गावांमध्ये धर्माभिमान्यांच्या बैठकांचे आयोजन करणे, २ ठिकाणी होंर्डिग्ज लावणे आणि पत्रके वितरित करणे, अशा प्रकारे धर्माभिमान्यांनी सहभाग दर्शवला. 
सभेसाठी कृतीशील 
होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! 
क्षणचित्रे
१. शिवसेनेचे कागल शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी यांनी स्वतःच्या दुकानात बैठकीचे आयोजन केले. तसेच धर्मसभेच्या प्रचारात प्रतिदिन वेळ देण्याची इच्छा व्यक्त केली. 
२. श्री. अजय लोहार यांनी सभेच्या प्रसारासाठी स्वतःची दुचाकी उपलब्ध करून देण्याची सिद्धता दर्शवली. 
उपस्थित मान्यवर...
       वाहतूक सेनेचे सर्वश्री म्हाळू करीकट्टे (कागल), श्री शिवप्रतिष्ठानचे दिलीप पाटील आणि रामचंद्र पाटील (मौजे सांगाव), बजरंग दलाचे विनायक आवळे, भरत शेटे (कसबा सांगाव), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रणीत कुन्नर (कागल), भाजपचे शिरीषकुमार निगवे (रणदेवीवाडी), सचिन कांबळे (लिंगनूर), शिवसेनेचे प्रभाकर थोरात (कागल) आदी उपस्थित होते.

निर्णय फसला, तर देश खड्ड्यात जाईल !

नोटाबंदीच्या निर्णयावर 
राज ठाकरे यांचे टीकास्त्र !
       मुंबई - सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतांना आवश्यक सिद्धता केली नव्हती. त्यामुळे हा निर्णय फसला, तर देश खड्ड्यात जाईल. भविष्यात नेमके काय चांगले घडणार, हे पंतप्रधान मोदी यांनाही सांगता आलेले नाही, अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते १९ नोव्हेंबरला मुंबईत मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, 
१. नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना आपण कुठल्या दिशेने चाललोय, हे कळेनासे झाले आहे. सरकार प्रतिदिन बँकेतून पैसे काढण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या घोषणा आणि निर्णय जाहीर करत आहे. या निर्णयामुळे देशातील उद्योगधंदे कायमचे बंद होण्याची भीती आहेे. 
२. १२० कोटींच्या भारतात केवळ ४ टक्केच लोक आयकर भरतात. देशातील बहुतांश व्यवहार हे रोख पद्धतीने चालतात. त्यामुळे या रोख चलनाला काळा पैसा म्हणता येणार नाही. सरकारकडे काळ्या पैसेधारकांची नावे असतील, तर त्यांच्यावर धाडी का टाकण्यात आल्या नाहीत ? 

ओवैसी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालण्याच्या कार्यक्रमास अनुमती नाकारा !

  • असे हिंदु धर्माभिमानी सर्वत्र हवेत ! 
  • बजरंग दलाची निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी 
       कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) - येथे २० नोव्हेंबर या दिवशी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने खासदार ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दैनिक महान कार्य या वृत्तपत्रातील वृत्तानुसार कुरुंदवाडमधील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास त्यांच्या हस्ते पुष्पहार घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. हिंदु धर्माचा द्वेष नसानसात भिनलेल्या अशा व्यक्तीकडून छत्रपतींची होणारी ही विटंबना बजरंग दल कदापी सहन करणार नाही. तरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याच्या कार्यक्रमावर प्रशासनाने बंदी घालावी, अन्यथा बजरंगींना छत्रपतींच्या रक्षणासाठी आपल्या पद्धतीने पावले उचलावी लागतील. त्याचसमवेत ओवैसी यांच्या सभेसही अनुमती नाकारावी, असे निवेदन बजरंग दलाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सोळशे यांना देण्यात आले. या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मुतगेकर उपस्थित होते. निवेदन देतांना बजरंग दलाचे सर्वश्री मंदार पाचुकले, राहुल कडणे, अभिषेक पारनाईक, गौतम पाटील, दळवी, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उमेश लंबे उपस्थित होते. कुरुंदवाड येथे पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी वरील सर्वांसमवेत हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुनील साळुंखे आणि अलोक आलासे उपस्थित होते.

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात ३०० ग्रामसेवक संपावर !

     सांगली - ग्रामसेवकांवर होणारी आक्रमणे, खोट्या तक्रारी, सरकारी कर्मचार्‍यांना होणार्‍या मारहाणीचा गुन्हा अजामीनपात्र करावा, ग्रामसेवकांना ३ सहस्र रुपये प्रवास भत्ता वेतनासमवेत देण्यात यावा यांसह अन्य मागण्यांसाठी शासनाने प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने राज्यातील २५ सहस्र ग्रामसेवक संपावर गेले आहेत. यात सांगली जिल्ह्यातील ३०० ग्रामसेवकांनी सहभाग घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या चाव्या, शिक्के हे गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिली. (ग्रामसेवकांनी राष्ट्राचा विचार करत संपाऐवजी अन्य मार्गांचा अवलंब करणे आवश्यक आहे ! - संपादक)      या संदर्भात जाधव म्हणाले, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ नोव्हेंबरला पंचायत समितीसमोर, १० नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर, तर १५ नोव्हेंबरला विभागाय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ही आंदोलने राज्यव्यापी असूनही शासनाने त्याची नोंद न घेतल्याने बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही.

चिंचवड (पुणे) येथील क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या वाड्यात एक दिवा क्रांतीकारकांसाठी उपक्रम !

     चिंचवड - त्रिपुरारि पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आणि गुरुनानक जयंती यांचे औचित्य साधून क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या ऐतिहासिक चापेकर वाड्यात आम्ही चिंचवडकर विचार मंच आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव आणि कार्यकर्ता स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी एक दिवा क्रांतीकारकांसाठी हा उपक्रम घेण्यात आला.
     या कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीवीर चापेकर बंधूना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा कार्यवाह रवींद्र कळंबकर, धर्मजागरणचे प्रांत प्रमुख हेमंत हरहरे, टाटा मोटर्स एम्पलॉइज युनियनचे अध्यक्ष शिवाजी शेडगे आणि आम्ही चिंचवडकर विचार मंचचे अध्यक्ष अधिवक्ता मोरेश्‍वर शेडगे यांच्या हस्ते दिवे प्रज्वलित करण्यात आले. चापेकर वाडाच्या परिसरांत चापेकर बंधूची प्रतिमा असलेल्या रांगोळ्या काढून सर्वत्र दिवे लावण्यात आले. त्यामुळे चापेकर बंधूंच्या वाड्याचा परिसर उजळून निघाला. या उपक्रमाला ४० हून अधिक विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील १७ किल्ल्यांचे ३ डी मॅपींग करणार ! - सांस्कृतिक मंत्री श्री. तावडे

     मुंबई - येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आयोजित बैठकीत राज्यातील १४ प्रतिकृती किल्ले आणि ३ केंद्र संरक्षित किल्ल्यांचे ३ डी मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुढील आठवड्यात डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार !

अयोध्येतील राममंदिराचे प्रकरण
       नवी देहली - सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात अयोध्येतील राममंदिराच्या प्रकरणी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. न्यायालयाला डॉ. स्वामी यांची सूत्रे ऐकायची असल्याने ही सुनावणी करण्यात येणार आहे. सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर आणि न्यायमूर्ती अनिल दवे यांच्या खंडपिठासमोर डॉ. स्वामी यांनी शीघ्र आणि प्रतिदिन सुनावणीसाठी विनंती केल्यानंतर न्यायालयाने सुनावणीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण साडेपाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने या याचिकेवर प्रतिदिन सुनावणी व्हावी, असे डॉ. स्वामी यांनी सांगितले होते. डॉ. स्वामी यांनी अयोध्येत पाडलेल्या बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्याची अनुमती मागितली होती; तसेच त्यांनी रामजन्मभूमीविषयी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणार्‍या अनेक याचिकांवरही शीघ्र सुनावणी करण्याचा आदेश देण्याची विनंती केली होती.

दहावीनंतर दोन लक्ष विद्यार्थ्यांची गळती !

    पुणे - दहावीच्या परीक्षेनंतर साधारण २ लक्ष विद्यार्थी पुढील शिक्षण घेत नसल्याचे युडाएस् प्रणालीच्या माध्यमातून समोर आले आहे. गेल्या वर्षीही २ लक्ष ३९ सहस्र विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीला प्रवेश घेतला नव्हता. (विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी अत्यंत नीरस असलेला अभ्यासक्रम पालटणे आणि विद्यार्थ्यांना त्यांची रुची अन् क्षमता यांनुसार शिक्षण देणारी आनंददायी गुरुकुल पद्धत अवलंबणे आवश्यक! - संपादक)


जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आज पूर्वनियोजनाची बैठक !

स्थळ : यश प्लाझा, गोविंद रिक्शा थांब्याजवळ, जळगाव
वेळ : सायंकाळी ५

हिंदु धर्मजागृती सभेला शिवसेनेकडून सर्वतोपरी साहाय्य केले जाईल ! - राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

आमदार श्री. राजेश क्षीरसागर (उजवीकडे)
यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देतांना धर्माभिमानी

       कोल्हापूर, १९ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर या दिवशी भव्य हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे निमंत्रण येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांना समितीच्या कार्यकर्त्यांनी दिले. या वेळी सभेचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने होर्डिंग्ज लावले जाईल आणि शिवसैनिकही सभेत सहभागी होतील. सभेसाठी शिवसेनेकडून सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. समितीच्या शिष्टमंडळाने १८ नोव्हेंबर या दिवशी श्री. क्षीरसागर यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सर्वश्री सुनील घनवट, कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे, मधुकर नाझरे आदी या वेळी उपस्थित होते.

सनातनचे आश्रम उद्ध्वस्त करण्याची धमकी देणारे उपराकार लक्ष्मण माने यांची पोलीस चौकशी चालू

हिंदु विधीज्ञ परिषदेने 
केलेल्या तक्रारीचा परिणाम
      सातारा, १९ नोव्हेंबर (वार्ता.) - बलात्कारासारख्या आरोपात तीन महिने कारागृहात राहिलेले उपराकार लक्ष्मण माने यांची नुकतीच न्यायालयाने पुराव्याअभावी मुक्तता केली. खटल्यातून मुुक्त होताच माने यांनी त्यांच्या स्वत:च्या घरी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत माने यांनी सनातनचे आश्रम उद्ध्वस्त करणार, अशी धमकी दिली होती. माने यांच्या या जाहीर धमकीनंतर हिंदु विधीज्ञ परिषदेने सातारा येथील पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. अशाप्रकारे पत्रकार परिषद घेऊन धमक्या देणारे माने यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने आपल्या तक्रारीत केली होती. त्यावर सातार्‍याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून माने यांची चौकशी चालू करण्यात आली आहे. 

राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्क महसूलात ३७ टक्के घट !

नोटाबंदीच्या निर्णयाचे प्रकरण
     मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्क महसुलात ३७ टक्के घट झाली आहे. मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क यांतून सरकारला ५६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्रतिदिन मिळत असे. सध्या हे उत्पन्न ४२ कोटी रुपयांवर आले आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक एन्. रामास्वामी यांनी दिली.

श्री महालक्ष्मी मंदिराच्या २ दानपेट्यांतून ३० लाखांहून अधिक रुपये जमा !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
      कोल्हापूर, १९ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिरातील, मंदिराचा गाभारा आणि कासव चौकातील दानपेट्या उघडल्या असून यामध्ये ३० लाखांहून अधिक रुपये आढळून आले आहेत. केंद्र सरकारने मंदिरातील दानपेट्यांतील रक्कम ३० डिसेंबरपर्यंत अधिकोषात जमा करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत ९ दानपेट्यांत ५७ लक्ष २३ सहस्र ६७९ रुपये जमा झाले आहेत. आतापर्यंत ५०० रुपयांच्या नोटांची साडेसहा लक्ष रुपये रक्कम मिळाली, तर १००० रुपयांच्या नोटांची २ लक्ष रुपये रक्कम मिळाली आहे. नेपाळ आणि सिंगापूर येथील परकीय चलनाचाही यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

काही जणांना हिंदु शब्द उच्चारण्याचीही भीती वाटते ! - व्यंकय्या नायडू

      बेंगळुरू - काही जणांना हिंदु शब्द उच्चारला, तर आपल्यावर जातीयवादाचा शिक्का बसेल, अशी भीती वाटते. आपल्या देशाला हिंदुस्थान म्हणतात. हा हिंदुस्थान आहे आणि तो पाकिस्तान आहे, हे लक्षात घ्यावे, असे विधान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले. बेंगळुरूमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सनातनने हाक मारावी; आम्ही प्राणपणाने सेवा करू ! - पू. भिडेगुरुजी

      ‘सनातनचे कार्य अप्रतिम असून राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी अत्यंत तळमळीने झटणारी ही एकमेव संघटना आहे. आज जे कोणी छापत नाही, ते सनातन प्रभात छापते. प्रत्येकानेच सनातन प्रभातचे वाचन केले, तर त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य:स्थितीची जाणीव होईल. अन्य हिंदुत्वनिष्ठ नियतकालिके मी वाचत होतो; पण सनातन प्रभातपुढे आता सर्वच फिके वाटते. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने त्याग अन् समर्पण या भावाने सेवा करणारे साधक हेच सनातनचे बळ आहे. आम्हीही सनातनच्या समवेत आहोत. त्यांनी केव्हाही हाक मारावी, आम्ही सनातनच्या राष्ट्र आणि धर्मरक्षणाच्या कार्यात प्राणपणाने सेवा करण्यास सिद्ध आहोत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangladeshke Langalbandh gavme mandirke pranganme jihadiyodwara 2 gayoki hatya, gomaski dawat.
Hinduoki is durdashapar Hindusangathan hi ekmatra upay !

जागो ! : बांग्लादेश के लांगलबांध गांव में मंदिर के प्रांगण में जिहादियों द्वारा २ गायों की हत्या, गोमांस की दावत.
हिन्दुआें की इस दुर्दशा पर हिन्दू-संगठन ही एकमात्र उपाय !

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशमध्ये हिंदूंवरील आघात अव्याहतपणे चालूच !
     बांगलादेशच्या नारायणगंज जिल्ह्यातील लांगलबांध गावात श्री श्री चतुर्मुख ब्रह्मा मंदिराच्या प्रांगणात ११ नोव्हेंबर या दिवशी धर्मांधांनी २ गायींची हत्या केली आणि गोमांसाचे पदार्थ पाहुण्यांना मेजवानी म्हणून दिले.

आजचा वाढदिवस

चि. राधिका पवार
     ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकोला येथील चि. राधिका रमेश पवार हिचा आज कार्तिक कृष्ण सप्तमीला (२० नोव्हेंबर २०१६ या दिवशी) दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सनातन परिवाराकडून तिला अनेक शुभाशीर्वाद !
चि. राधिकाची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.


दुकाने आणि मॉल्स यांमधील स्वाईप यंत्रामधून पैसे काढता येणार !

       मुंबई - रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार आता देशभरातील दुकाने आणि मॉल्स यांतील स्वाईप यंत्रामधूनही नागरिकांना पैसे काढता येणार आहेत. यासाठी २ सहस्र रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. येत्या ३० डिसेंबरपर्यंत स्वाईप यंत्रामधून पैसे काढण्यावर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

सुरेगाव (जिल्हा हिंगोली) येथे विठ्ठल महाराज यांची अग्निप्रवेश करून जिवंत समाधी !

       सुरेगाव - जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव येथील विठ्ठल महाराज (वय वर्षे ६०) यांनी १९ नोव्हेंबरला पहाटे अग्निप्रवेश करत जिवंत समाधी घेतली. विठ्ठल महाराज हे गेल्या ५-६ वर्षांपासून येथील मारूतीच्या मंदिरातच रहात होते.

वाहतूक कार्यालयात २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा स्वीकारणार !

      मुंबई - राज्यातील सर्व वाहतूक कार्यालयांमध्ये ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ नोटा पालटून (बदलून) काळा पैसा संपणार नाही, हे सरकारला कसे कळत नाही ?

       ‘कोणी काळा पैसा मागण्यास धजावणार नाही’, असे केले, तरच काळा पैसा संपेल. यासाठी दोन मार्ग आहेत.
१. सर्वांकडून साधना करवून घेऊन त्यांना सात्त्विक बनवणे 
      हे होण्यासाठी २-३ पिढ्या साधनेचे संस्कार होणे आवश्यक असते. हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) असे असेल.
२. काळा पैसा मागणार्‍यांना तत्परतेने कठोर शिक्षा करणे
      असे केले, तर काळा पैसा मागण्यास कोणी धजावणार नाही. मग काळा पैसा भारतात असणारच नाही. काळा पैसा मागणार्‍यांना शोधून काढणे सोपे आहे. उदा. कोणतीही जागा किंवा सदनिका घेण्यासाठी गुप्तचर खात्यातील पोलिसांना पाठवून त्या व्यवहारातील काळा पैसा लगेच उघडकीस आणता येईल. सरकारने असा व्यवहार करणार्‍यांना तत्परतेने कठोर शिक्षा केली की, त्या व्यवहारात काळा पैसा असणार नाही. असे सर्वच व्यवहारांच्या संदर्भात करता येईल.

एवढी माहिती ज्ञात असूनही सरकार, एकही राजकीय पक्ष किंवा मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी इतकी वर्षे अशी मागणी केली नाही, हे लक्षात घ्या !

      ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांतून प्रेरणा घेत आतापर्यंत ५५ आतंकवादी सिद्ध झाले असल्याचे समोर आले आहे. यांपैकी काही धर्मांधांनी जगभरात आतंकवादी कारवाया केल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’शी संबंधितांनी भारतात आतापर्यंत ८०० हून अधिक जणांचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादाकडे वळवले असल्याची धक्कादायक माहितीही पोलीस अन्वेषणात समोर आली आहे.
     आतंकवादी कारवायांमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक शांतता बिघडवणार्‍या, तसेच धर्मांतरे घडवून धार्मिक तणाव निर्माण करणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांना तात्काळ अटक करावी, तसेच ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर बंदी घालावी. तसेच आतंकवाद रोखण्यासाठी ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी २ ऑगस्ट २०१६ या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेद्वारे केली होती.’ साम्यवाद्यांनी आतापर्यंत २५ लाख २० सहस्र लोकांची हत्या घडवून आणली आहे, तरी त्यांच्यावर बंदीची मागणी नाही आणि एकही हत्या न करणार्‍या सनातनवर बंदीची मागणी ?

     ‘साम्यवाद्यांचे धर्मावरील आक्रमण धर्मशक्तीमुळे रोखू शकलो. साम्यवादी तत्त्वप्रणालीमुळे हिंदु धर्माची फार मोठी हानी झाली आहे. साम्यवाद्यांनी आतापर्यंत २५ लाख २० सहस्र लोकांची हत्या घडवून आणली आहे.’ - अधिवक्ता श्री. विवेक सिंह, कर्नाटक उच्च न्यायालय
      सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक-कार्यकर्ते हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी समर्पित होऊन जे कार्य करत आहेत, ते केवळ अतुलनीय आहे. असे प्रयत्न करणारे साधक संततुल्य आहेत.’- श्री. जयनारायण सेन, उपाध्यक्ष, शास्त्र धर्म प्रचार सभा
‘      पाश्‍चात्त्य त्यांची विचारसरणी आपल्या लोकांवर लादत आहेत. ती दूर करण्यासाठी आपण चिंतन करून पत्रकारितेच्या माध्यमातून त्याविषयी लोकांना जागृत केले पाहिजे.’ - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

समाजाला अधोगतीकडे नेणारे सेन्सॉर बोर्ड !

      ‘गेल्या काही कालावधीत ‘उडता पंजाब’, ‘बार बार देखो’ आणि ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांमधील काही अश्‍लील दृश्ये केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) काढायला लावली होती. यामुळे सेन्सॉर बोर्डावर वारंवार टीका झाल्याने यापुढे चित्रपटातील अश्‍लील दृश्ये न हटवण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतला आहे. यासाठी श्याम बेनेगल यांच्या समितीची शिफारस सेन्सॉर बोर्डाने स्वीकारली आहे.’ (अश्‍लील चित्रपट आणि दृश्ये यांमुळे समाजात अनैतिकता वाढण्यास साहाय्य होत असतांना त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करणार्‍या सेन्सॉर बोर्डाने त्याला मान्यता देणे म्हणजे समाजाला अधोगतीकडे नेण्यास साहाय्य करणे होय ! - संपादक) सरकारी कार्यालयांतील असे कर्मचारी आणि अधिकारी, तसेच पोलीस अन् त्यांचे अधिकारी यांचे अनुभव कळवा !

१. उर्मट असल्याने ‘जनतेशी कसे बोलावे’, हे ज्ञात नसते.
२. जनतेच्या वेळेची किंमत नसते. भेटायला येण्याची वेळ ठरवली असूनही जनतेला कित्येक घंटे बसवून ठेवून मग भेटतात किंवा भेटतही नाहीत.
३. माणुसकीचा गंध नसतो.
४. जनतेला अनेक हेलपाटे घालायला लावतात. त्याचा परिणाम म्हणजे, ‘शेवटी कंटाळून जनता लाच देते.
५. नियमानुसार सर्व कागदपत्रे पूर्ण असली तरी, लाच घेण्यासाठी कागदपत्रांमध्ये हेतुतः त्रुटी काढल्या जातात.
६. अभ्यागतांना प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली कार्यालयातील वेगवेगळे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे पाठवून त्रस्त केले जाते आणि लाच देण्यास भाग पाडले जाते.’
       हिंदु राष्ट्रात त्यांना नोकरीवरून निलंबित करून वरील दोष जाईपर्यंत कारागृहात ठेवण्यात येईल.

फसवून रुग्णांकडून पैसे लुबाडणार्‍या डॉक्टरांची नावे कळवा !

       हल्ली अनेक डॉक्टर आवश्यकता नसली, तरी अनेक तपासण्या करण्यासाठी सांगतात, शस्त्रक्रियेची आवश्यकता नसतांनाही शस्त्रक्रिया करायला सांगतात. विशेषतः बाळाच्या जन्माच्या वेळी नैसर्गिक प्रसूती होणार असली, तरी शस्त्रक्रिया करायला सांगतात. हृदयरोग्याला आवश्यकता नसतांना बायपास शस्त्रक्रिया करण्यास सांगतात. एखादा रुग्ण मरण पावलेला असला, तरी त्याला काही दिवस अतीदक्षता विभागात ठेवतात. एखाद्या रुग्णाचा विमा आहे, असे समजल्यावर त्याच्यावर अनावश्यक महागडे उपचार करतात. अशा डॉक्टरांची नावे पुढील पत्त्यावर कळवा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / B सनातन आश्रम, रामनाथी-बांदिवडे, फोंडा, गोवा.
ई-मेल पत्ता : dspgoa1@gmail.com
चांगल्या डॉक्टरांना नम्र विनंती
     पैसे लुबाडणार्‍या डॉक्टरांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. ही तुमची साधना असेल. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल. साधकांमध्ये ‘नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा’ इत्यादी गुण येण्यासाठी त्यांना उत्तम आई-वडिलांप्रमाणे प्रत्यक्ष कृतीतून शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. सदर्‍याचा निघालेला एक दोरा साधकाने तीन दिवस लोंबत ठेवणे आणि चौथ्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) यांनी साधकाच्या सदर्‍याचा दोरा कापून कचरापेटीत टाकणे : १४ -१५ वर्षांपूर्वी एकदा मी घातलेल्या सदर्‍याचा एक दोरा खालच्या बाजूने अनेक दिवस लोंबत होता. मी सेवेनिमित्त प.पू. डॉक्टरांकडे गेल्यावरही माझ्या सदर्‍याचा तो दोरा लोंबत असे. त्यांनी ‘मी दोरा कापतो का ?’, याविषयी तीन दिवस वाट पाहिली. चौथ्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या अगदी जवळ बोलावले. ते आसंदीतून (खुर्चीतून) उठले आणि पटलाच्या खणामधून (ड्रॉवरमधून) त्यांनी एक कात्री काढली. नंतर त्यांनी स्वतःच माझ्या सदर्‍याचा तो दोरा कापला. तेव्हा मी त्यांच्याकडे तो दोरा मागितला; पण त्यांनी तो मला न देता स्वतःच कचरापेटीत टाकला. नंतर कात्री पुन्हा जागेवर ठेवून ते मला सहजतेने म्हणाले, ‘‘या आता !’’ 

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे केलेल्या तुळशीविवाहाचा वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे पूर्णपणे सुकलेल्या तुळशीवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

तुळशीविवाहासाठी सजवलेली
तुळस आणि बाळकृष्ण
१. प्रस्तावना आणि उद्देश
    ‘तुळस घरोघरी प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ पूजली जाते. देवतांना नैवेद्य दाखवतांना त्यावर तुळशीचे पान ठेवतात. तुळस श्रीविष्णूला अतीप्रिय आहे. श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशीविवाहाचा विधी आहे. हा विधी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी सायंकाळी करतात. ‘तुळशीविवाहाचा तुळशीवर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ११.११.२०१६ आणि १२.११.२०१६ या दिवशी गोव्यातील सनातन आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

एकत्र कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धत अंगीकारल्यामुळे झालेली अपरिमित हानी !

कु. मधुरा भोसले
     ५० वर्षांपूर्वीपर्यंत सगळीकडे एकत्र कुटुंब पद्धत होती. त्या काळी नोकरीसाठी एखाद्याला वेगळ्या गावी रहावे लागले, तरी मनाने तो कुटुंबासह असायचा. त्यामुळे सर्वजण आनंदी असायचे. आताची विभक्त कुटुंब पद्धत आणि पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धत यांची तुलना येथे दिली आहे. त्यावरून पुन्हा एकत्र कुटुंब पद्धतीकडे जाणे किती अत्यावश्यक आहे, हे लक्षात येईल.
    आतापर्यंत सर्वत्र चाळी होत्या. चाळीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीचा थोडातरी लाभ होत असे. आता सर्वत्र सदनिका (फ्लॅट) बांधण्यात येत असल्यामुळे तो लाभही आता मिळत नाही.

आगामी तिसर्‍या महायुद्धाचे स्वरूप, आपत्काळात नागरिकांसाठी सुरक्षित आश्रयस्थाने आणि करावयाचे आध्यात्मिक उपाय

श्री. राम होनप
      तिसर्‍या महायुद्धासंदर्भात श्री. राम होनप यांना मिळालेले ईश्‍वरी ज्ञान येथे देत आहोत. 
१. तिसर्‍या महायुद्धाच्या व्याख्या
१ अ. व्यावहारिकदृष्ट्या
१. ‘अपरिमित हानीचा उच्चांक, म्हणजे तिसरे महायुद्ध.
२. पृथ्वीच्या सर्वार्थाने हानीचा परमोच्च बिंदू, म्हणजे तिसरे महायुद्ध. 
१ आ. मानसिकदृष्ट्या 
     स्वार्थ, द्वेष आणि इतरांवर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती यांमुळे भिन्न देशांमधील लढाई, म्हणजे तिसरे महायुद्ध.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. प्रेमभाव
अ. ‘भोजनकक्षात भोजन करण्यास गेल्यावर पटलावर जागा नसल्याने तेथे बसलेल्या साधिका आम्हाला बसण्यास लगेच जागा देत होत्या. त्यांच्याकडून ‘प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे’ हे गुण शिकायला मिळाले.
आ. पू. सौरभदादांना कोणतेही साधक भेटायला आले, तरी ते प्रत्येक साधकाला ते प्रेमाने ‘या’ असे म्हणत होते आणि त्यांना आनंद होत होता. पू. दादा त्यांच्या आईंना ‘साधकांना खाऊ द्या’, असे सांगत होते. यातून त्यांचा प्रेमभाव हा गुण लक्षात आला.
‘‘      प.पू. डॉक्टर माऊली आम्हा साधकांसाठी किती करतात आणि आमची किती काळजी घेतात ! आपणही आपल्या सहसाधकांची अन् कुटुंबियांची काळजी निरपेक्षपणे आणि प्रेमभावाने घेतली पाहिजे’, याची जाणीव गुरुमाऊलीने साधकांच्या कृतीतून दाखवून दिली. साधकांतील प्रेमभाव हा गुण शिकायला मिळाला. 

आश्रमातील वास्तव्याने भाऊ आणि वहिनी यांच्या मनातील शंका आणि साधिकेच्या भविष्याविषयीची काळजी दूर होणे

         ‘कृष्णा, देवा, १७.९.२०१४ या दिवशी माझा भाऊ, वहिनी आणि भाचा मला आश्रमात भेटायला आले होते. मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करते, इतकेच त्यांना ठाऊक होते. मी नेमकी ‘काय साधना करते, सनातन संस्था कोणती साधना सांगते, सनातनचे कार्य काय आहे’, हे त्यांनी कधी जवळून पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनात अनेक शंका, प्रश्‍न, माझ्या भविष्याविषयीची काळजी आणि चिंता होती. ती आश्रम पाहून दूर झाली. 

जन्मकुंडली, हस्तसामुद्रिक आणि पदसामुद्रिक यांतील भेद

टीप १
     ‘प्रश्‍नकुंडली’ म्हणजे ज्योतिषाला प्रश्‍न विचारण्याच्या वेळी व्यक्तीच्या असलेल्या ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार मांडण्यात आलेली कुंडली.

नाडीपट्टीवरून भविष्य सांगतांना कर्मफलन्यायाचाच नव्हे, तर क्रियमाणकर्माचाही विचार केलेला असणे, त्यामुळे क्रियमाणकर्मामुळे मिळणार्‍या फलप्राप्तीचा काळ सरल्यानंतर भविष्य सांगितले जाणे आणि यावरून सप्तर्षींनी प्रारब्धकर्मासह क्रियमाणकर्मालाही महत्त्व दिल्याचे जाणवणे

     नाडी भविष्यात काही वेळा मर्यादित काळाचे, उदा. १ - २ वर्षांचे भविष्य सांगण्यात येते. पुढचे भविष्य विचारल्यास ‘पुढचे भविष्य १ - २ वर्षांनंतरच्या पुढच्या भेटीत सांगू’, असे सांगण्यात येते. याचा अर्थ त्या मधल्या १ - २ वर्षांच्या काळात व्यक्ती जे क्रियमाणकर्म करणार असेल, त्यानुसार तिचे पुढील भविष्य ठरणार असते.
     ‘नाडीपट्टीद्वारे जरी भविष्य वर्तवण्यात येत असले आणि भूतकाळात घडलेल्या घटनांचा संदर्भ सांगितला जात असला, तरी नाडीपट्टी ही प्रामुख्याने जिवाच्या वर्तमानस्थितीशी अधिक प्रमाणात संबंधित आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात भविष्य वर्तवतांना तिच्याकडून होणार्‍या क्रियमाणकर्माचाही विचार नाडीपट्टीमध्ये अंतर्भूत असतो. व्यक्तीच्या क्रियमाणकर्मामुळे तिच्या निकटच्या भविष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असेल, तर नाडीपट्टीमध्ये केवळ वर्तमानस्थितीपर्यंतचेच भविष्य वर्तवण्यात येते आणि भविष्यकाळातील क्रियमाणकर्मामुळे होणार्‍या फलप्राप्तीचा काळ सरल्यानंतर मग पुढचे भविष्य सांगितले जाते. यावरून सप्तर्षींनी ‘जिवाच्या जीवनाशी त्याच्या कर्माचा किती दृढ संबंध असतो’, हेच मानवजातीला यातून दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे सप्तर्षींना जिवाच्या भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही स्थितींचे ज्ञान असले, तरीही क्रियमाणकर्मामुळे प्राप्त होणार्‍या फलाविषयी वाटणारी उत्सुकता जिवामध्ये टिकून रहावी, यासाठी संपूर्ण भविष्य एकाच भेटीत न सांगता उर्वरित भविष्य पुढील भेटीत सांगतात. यावरून हेच लक्षात येते की, सप्तर्षींच्या दृष्टीने प्रारब्धकर्मापेक्षा क्रियमाणकर्म किती महत्त्वाचे आहे. मनुष्यानेही प्रारब्धकर्मापेक्षा क्रियमाणकर्माला अधिक महत्त्व दिले, तर त्याचे भविष्य पालटण्यास वेळ लागणार नाही.’ - कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०१६)

प्रतिकूल परिस्थितीत सर्वसामान्य व्यक्ती आणि सनातनचे साधक यांच्या वर्तनातील जाणवलेला भेद आणि त्याची कारणमीमांसा

श्री. संगम बोरकर
     ‘८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री केंद्रशासनाने राष्ट्रहितासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा रहित केल्या. तेव्हापासून वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सामाजिक प्रसारमाध्यमे या सर्व ठिकाणी हाच विषय चालू आहे. समाजातील अनेक व्यक्तींमध्ये अस्वस्थता, उतावळेपणा, भीती, अस्थिरता, तसेच अधिकोषांत रांगेत उभे रहावे लागत असल्यामुळे व्यक्त होणारी चिडचिड आणि प्रतिक्रिया अशा अनेक नकारात्मक गोष्टी या दिवसांत पहायला मिळाल्या.
     या सर्व स्थितीत ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयासाठी कार्यरत असलेले सनातनचे साधक मात्र स्थिर होते. न कोणी या विषयावर अधिक बोलत होते, न कोणावर या स्थितीचा परिणाम झाला. सर्व साधक त्यांची सेवा करण्यात मग्न होते. काही कालावधीसाठी निर्माण झालेल्या या प्रतिकूल स्थितीत सामान्य व्यक्ती आणि सनातनचे साधक यांच्या स्थितीतील भेद ईश्‍वराने लक्षात आणून दिला.

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या विषयावरील
ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
     सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४५०० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता ः तिसर्‍या महायुद्धाला काही वर्षांतच आरंभ होणार असल्यामुळे या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.
१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : हे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. कलियुगात पुढील शेकडो वर्षे आधुनिक विज्ञानाची भाषा प्रचलित रहाणार आहे. यासाठी हे ग्रंथ तुलनात्मक सारणी, टक्केवारी अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिले आहेत.
२. सध्याच्या काळात शब्दप्रमाण फारच थोडे लोक मानतात आणि बहुसंख्य त्यांना बुद्धीच्या स्तरावर का आणि कसे ? यांची उत्तरे मिळाली, तरच एखादे सूत्र मान्य करतात,

दरिद्री आणि गरीब यांतील भेद

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज 
यांचे अनमोल विचारधन !
१. दरिद्री 
‘       गरीब आणि दरिद्री यात भेद आहे. दरिद्री म्हणजे असाहाय्य, कमनशिबी, तीव्र प्रारब्ध असलेला, संकटांनी ग्रस्त असलेला, खायला-प्यायला नसलेला, हलाखीची परिस्थिती असलेला. त्या परिस्थितीत तो काहीच करू शकत नाही. ना स्वतःचे भले करू शकत, ना दुसर्‍याचे. 
२. गरीब 
       गरीब हा गुण आहे. गरीब खाऊन पिऊन सुखी, कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, कुणाला त्रास न देणारा. ‘गाय गरीब आहे’, असे आपण म्हणतो. ती आपणहून कुणाला त्रास देत नाही. हिंदु धर्मसुद्धा कुणावर विनाकारण आक्रमण करत नाही.’ 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.८.२०१६) 

सनातन संस्थेचे साधक आणि आम्ही एकच आहोत ! - डॉ. कौशिक मल्लिक, शास्त्र धर्म प्रचार सभा

     ‘सनातन संस्थेला भेटण्यापूर्वी आम्हाला माहीत नव्हते की, अशीही एक संस्था आहे, जी धर्मशास्त्राच्या आधारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सनातन संस्थेला भेटल्यानंतर आता वाटू लागले आहे की, संस्थेचे साधक आणि आम्ही एकच आहोत. परात्पर गुरु डॉ. आठवलेजी यांना भेटल्यानंतर आम्ही अनुभवले की, ‘गुरुतत्त्व एक आहे.’

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

    संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १२ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातन आश्रमांच्या नूतनीकरणाकरता पुढील 
साहित्याच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करा !
       ‘सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु धर्माच्या पुनर्प्रतिष्ठेसाठी अविरत झटणार्‍या साधकांची आध्यात्मिक शाळाच ! आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्यास आणि राष्ट्र-धर्माच्या कार्याला हातभार लावण्यासाठी इच्छुक साधक अन् धर्माभिमानी यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. रामनाथी आणि देवद येथील आश्रम, तसेच मंगळुरू (कर्नाटक) अन् कुडाळ येथील सेवाकेंद्रे यांचे नूतनीकरण (renovation) करणे चालू आहे. त्यासाठी पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे.

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
अमृत आणि विष

अमृतको जहरका डर होता है ।
भावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा जहर म्हणजे विष घेतले, तर आपण मरू कि काय, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      आरोपीला निर्दोष म्हणून सोडतांनाच न्यायाधिशांनी खोटे गुन्हे नोंदवणार्‍या पोलिसांकडून आणि शासकीय अधिवक्त्यांकडून हानीभरपाई वसूल करून ती निर्दोष व्यक्तीला द्यायला हवी आणि अशा पोलीस अधिकार्‍यांना अन् शासकीय अधिवक्त्यांना सेवेतून कायमचे निलंबित करून आजन्म तुरुंगवासाची शिक्षा द्यायला हवी ! हे प्रत्यक्षात येण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानाचे गोडवे गाणार्‍यांनो, ईश्‍वर जे करतो त्याच्या एक लक्षांश तरी तुम्हाला यंत्रांद्वारे करता येते का ?

१. ‘ईश्‍वराने बनवलेली पंचमहाभूते आणि त्यांच्यापासून बनवलेल्या कोट्यवधी निर्जीव वस्तू आणि जीव विज्ञानाला बनवता आले आहेत का ?
२. मानवाने बनवलेले एक तरी यंत्र ईश्‍वराने बनवलेल्या मानवापेक्षा सर्व बाबतींत श्रेष्ठ आहे का ? 
३. शरीर : ७० हून अधिक वर्षे प्रत्येक क्षण कार्यरत असणारे शरीर आणि त्याची पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये बनवता आली आहेत का ?
४. पंचसूक्ष्मज्ञानेंद्रिये : यांना जी जाणीव होते, त्याच्या लक्षांश तरी माहिती एका तरी यंत्राला सांगता येते का ? 
५. पंचसूक्ष्मकर्मेंद्रिये : ही जी कार्ये करतात, त्यातील एक तरी कार्य एका तरी यंत्राला करता येईल का ?
६. मन : मनाच्या वेगाच्या काही टक्के वेगाने जाणारे रॉकेट बनवता आले आहे का ? 
७. बुद्धी : बुद्धी जसा निर्णय घेते, तसा निर्णय घ्यायची क्षमता कोणत्या संगणकात आहे ? 
८. चित्त (अंतर्मन) : चित्तात माहितीचा जेवढा साठा असतो, त्याच्या काही टक्के तरी माहिती संगणकात साठवता येते का ?’ 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकांनी अहंकार बाळगू नये 
साधकांनी ‘मी, माझे, माझ्यासाठी’ हा अहंकार न ठेवल्यास हितावह ठरते. 
अहंकार हा साधकांच्या प्रगतीमधील फार मोठा अडथळा आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


चांगल्या दिवसांची नांदी !

संपादकीय
      देशभक्तीचे कार्य किती महान असते, हे भारतीय जनता चांगल्या प्रकारे जाणते. याचे कारण म्हणजे त्यांनी अथवा त्यांच्या पूर्वजांनी अनुभवलेली परकीय सत्तेची गुलामगिरी. सध्याचे गोवा राज्य विचारात घेता पोर्तुगिजांची गुलामगिरी गोमंतकियांना ठाऊक आहे, तर उर्वरित भारतियांना इंग्रजांची राजवट ठाऊक आहे. देशाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी अथक प्रयत्न केले, त्यांच्या हालअपेष्टा आणि भोग यांना यश येऊन देश स्वतंत्र झाला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn