Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी काय पावले उचललीत ?

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न
     नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित केल्यानंतर त्या पालटून देतांना नागरिकांची गैरसोय आणि असुविधा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने काय उपाययोजना केल्या, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचा आदेश अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने सरकारच्या या नोटा रहित करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सरकारच्या या निर्णयाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील आदेश दिला आहे. सरकारची ही कृती पूर्वनियोजित होती, त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने या वेळी सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.
     न्यायालयाने पुढे म्हटले की, ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा असलेल्या प्रत्येकाकडे काळा पैसा असल्याचे चित्र रंगवले जाऊ नये.
     अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार १० नोव्हेंबरपासून बँक खात्यांमध्ये ३.२५ लाख कोटी जमा झाले असून येत्या काही दिवसांत ११ लाख कोटी रुपये बँक खात्यांमध्ये जमा होतील

राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेवर ५ वर्षांची बंदी !

     नवी देहली - आतंकवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर ५ वर्षांची बंदी घातली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बांगलादेश येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी डॉ. झाकीर यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन बॉम्बस्फोट केल्याचे सांगितले होते. तसेच डॉ. झाकीर यांच्या संस्थेला मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो, अशी माहिती मिळाली होती.
     महाराष्ट्राच्या गृहखात्याने केंद्रीय गृहखात्याला डॉ. झाकीर यांच्या संस्थेविषयी माहिती कळवली होती.
     हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर यांच्या विरोधात गेले अनेक वर्षे आंदोलने, पत्रकार परिषदा घेऊन जनजागृती केली होती, तसेच अटक करण्याची मागणी केली होती.

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारच्या मुसलमान लांगूलचालनाच्या विरोधात हिंदूंचा प्रचंड मोर्चा !

हिंदूंनो, तुमच्या वरील अन्याय दूर होण्यासाठी हा
संघटित लढा व्यापक करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
      कोलकाता - बंगालमधील हिंदु जागरण मंच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या दक्षिण बंगाल शाखेच्या वतीने, बंगाल सरकारने हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करावे आणि मुसलमानांचे लांगूलचालन बंद करावे, तसेच हिंदूंवर होणारे अत्याचार रोखावे, या मागण्यांसाठी १२ नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात आला होता. या निषेधमोर्च्यात सुमारे २० सहस्रांहून अधिक हिंदूंनी सहभाग घेतला, असे हिंदु जागरण मंच या संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.
     या मोर्च्याचा प्रारंभ कॉलेज चौकात होऊन राणी राशमोनी मार्गावर त्याचे भव्य सभेत रूपांतर झाले. बंगालमधील जिहादी देशविरोधी कारवाया करत आहेत, जातीय दंगली भडकवून हिंदूंवर आक्रमणे करत आहेत आणि त्यांना ममता बॅनर्जी यांचे सरकार समर्थन देत आहे, अशी सर्वच वक्त्यांकडून या सभेत टीका करण्यात आली.
     काही दिवसांपूर्वीच मुसलमानांनी तृणमूल काँग्रेसचे आमदार, खासदार यांच्या समर्थनाने एक जाहीर सभा घेऊन त्यात केंद्र सरकारच्या समान नागरी कायद्याच्या विरोधात आंदोलन केले होते. शासनाने सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या विरुद्ध शपथपत्र प्रविष्ट केले होते, त्यालाही मुसलमानांनी विरोध केला होता. या सभेत केंद्र सरकारने समान नागरी कायद्याच्या दृष्टीने चालवलेल्या प्रयत्नांना समर्थन देण्यात आले.

(म्हणे) शिधावाटप दुकानाबाहेरील रांगेतही मृत्यू होऊ शकतो ! - भाजप उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांचे असंवेदनशील विधान !

     भोपाळ - शिधावाटप दुकानाच्या रांगेतही मृत्यू येऊ शकतो, असे असंवेदनशील विधान भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी केले आहे. नोटा बदलण्यासाठी लागलेल्या रांगा, जनतेला सोसावा लागणारा त्रास आणि या रांगेतच झालेला वृद्ध व्यक्तीचा मृत्यू यांमुळे जनतेत निराशा आहे. याविषयी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेच्या वेळी विनय सहस्रबुद्धे यांना विचारले असता त्यांनी वरील विधान केले. या विधानाचा अर्थ वेगळाच निघत असल्याने सारवासारव करतांना ते म्हणाले की, रांग कसलीही असली, तरी ती त्रासदायकच असते, असे आपल्याला म्हणायचे होते. नियम मोडून पैसे चारून कामे करून घेणार्‍यांपेक्षा, नियमानुसार वागणार्‍यांना अधिक त्रास सहन करावा लागतो.
     सहस्रबुद्धे यांच्या विधानावर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. भाजपला सत्तेचा गर्व झाला आहे. जनतेच्या भोळेपणाचा लाभ घेणारा हा पक्ष पुढच्या निवडणुकीत वाचाळपणामुळे आपटेल, अशी टीका एका काँग्रेसी नेत्याने केली. या विधानासाठी सहस्रबुद्धे यांनी क्षमा मागावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

निखिल वागळे यांचे महाराष्ट्र १च्या संपादकपदाचे त्यागपत्र !

सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांना दिलेल्या
अपमानास्पद वागणुकीचा फटका बसल्याची चर्चा
     मुंबई - महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे यांनी वृत्तवाहिनीच्या संपादकपदाचे त्यागपत्र दिले आहे. ही माहिती वागळे यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर दिली आहे. मी सुरक्षित आहे. महाराष्ट्र १चा राजीनामा दिला आहेे. पत्रकारिता चालूच राहील, असे वागळे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
     काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीवर झालेल्या एका चर्चासत्रात त्यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वागणूक देत कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितले होते. याची देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती आणि अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. ही घटना झाल्यावर त्याच्या दुसर्‍या दिवसापासून वागळे वाहिनीवर दिसले नाहीत. ते काही दिवस सुट्टीवर गेल्याची चर्चा होती.

उद्यापर्यंत थांबा, निर्णय कळेल ! - संजय राऊत, खासदार, शिवसेना

नोटबंदीमुळे नागरिकांना येणार्‍या अडचणींचे प्रकरण
     मुंबई - देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. पाचशे आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करणे, हा राजकीय विषय नसून, सव्वाशे कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. उद्यापर्यंत थांबा, निर्णय कळेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी नोटबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना येणार्‍या अडचणींविषयी मत व्यक्त करतांना केले.
श्री. राऊत पुढे म्हणाले की,
१. या प्रश्‍नावर सर्वांचे दरवाजे ठोठावून जर जनतेला न्याय मिळणार असेल, तर त्यासाठी शिवसेनेची सिद्धता आहे.
२. ममता बॅनर्जींसमवेत उद्धवजींची चर्चा चालू आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर हा प्रकार सध्या चालू आहे. ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची लढाई नाही. ही जनतेची लढाई आहे.
३. ममता बॅनर्जींसोबत राष्ट्रपतींकडे जायला हरकत काय ? आम्ही मोदींच्या विरोधात नाही, तर जनतेच्या हितासाठी ममता बॅनर्जी यांच्यासोबत जाऊ शकतो.
४. जिल्हा बँकेवरची बंदी अन्यायकारक आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांचा पैसा जिल्हा बँकेत आहे.

गुजरातमधील हिर्‍यांच्या व्यापार्‍याने ६ सहस्र कोटी रुपयांचा काळा पैसा जमा केला !

     नवी देहली - सुरतमधील हिरे व्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ सहस्र कोटी रुपयांचा काळा पैसा असणार्‍या जुन्या नोटा जमा केल्याची माहिती समोर येत आहे. ते यावर ३० टक्के दराने १ सहस्र ८०० कोटी रुपये कर आणि २०० टक्के दंड, असे एकूण ५ सहस्र ४०० कोटी रुपयेही देणार आहेत. लालजीभाई पटेल यांनीच नरेंद्र मोदी यांचे नाव असलेला सूट ४ कोटी ३० लक्ष रुपयांना विकत घेतला होता. हा सूट विकत घेऊन त्यांनी त्यांचे नाव गिनिज बूकमध्येही नोंदवले होते.
     लालजी पटेल यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना दिवाळीमध्ये बोनस म्हणून सदनिका आणि चारचाकी गाड्या दिल्या होत्या. पटेल मोदी यांचे समर्थक मानले जातात. त्यांनी पंतप्रधानांच्या बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ अभियानाअंतर्गत देशातील १० सहस्र मुलींना निवडून त्यांच्या शिक्षणासाठी २०० कोटी रुपये दिले होते.
मी ६ सहस्र कोटी रुपये बँकेत भरलेच नाहीत ! - लालजी पटेल यांचा खुलासा
     मी हिर्‍यांचा व्यापारी आहे. तसेच आयात-निर्यातीच्या व्यापारातदेखील सक्रीय आहे; मात्र ६ सहस्र कोटी रुपयांची रोकड बँकेत जमा केल्याची माहिती चुकीची आहे, असे लालजी पटेल यांनी म्हटले आहे.

ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाल्यावर मुसलमानांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी येण्याची शक्यता !

     वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी २०१७ या दिवशी शपथ घेतल्यानंतर अमेरिकेत मुसलमानांवर प्रवेशबंदी करण्याच्या दिशेने वाटचाल चालू होईल, असे म्हटले जात आहे. ट्रम्प यांच्या तज्ञ पथकाने या संदर्भात १० सूत्री योजना बनवली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
     ट्रम्प यांच्या पथकाने सांगितले की, मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बनवणे, काही देशांचा व्हिसा निलंबित करणे आणि कायद्यामध्ये अमेरिकेत येण्याजाण्यावरील कलमांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. या व्यतिरिक्त अमेरिकेत अवैधपणे रहाणार्‍या लोकांना देशातून हाकलण्यात येणार आहे. यामुळे भारतातून गेलेल्या अनेक लोकांना सामना करावा लागणार आहे, असे म्हटले जात आहे.

सप्टेंबर महिन्यात बँकांमध्ये जमा झालेले ६ लक्ष कोटी कोणाचे ? - काँग्रेसचा केंद्र सरकारला प्रश्‍न

     नवी देहली - सप्टेंबर २०१६ या महिन्यात देशातील विविध बँकांमध्ये ५ लक्ष ८८ सहस्र ६०० कोटी रुपये जमा करण्यात आले. यातून ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याच्या निर्णयाची पूर्वसूचना केंद्र सरकारने भाजप तसेच त्याच्या विश्‍वासातील लोकांना दिल्यामुळेच ही वाढ झाली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच गेल्या ६ मासांतील भाजपचे ६ नोव्हेंबरपर्यंतचे सारे बँक व्यवहार उघड करण्यात यावेत, अशी मागणीही काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
     स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनीही केला आहे. संयुक्त संसदीय समिती स्थापन करून कोणाच्या खात्यात किती पैसा जमा झाला याची चौकशी करण्याची मागणी संसदेत काँग्रेस करेल, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सांगितले.

करचुकवेगिरी करणारे काँग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांना ५७ कोटी रुपयांचा दंड !

काँग्रेससहित इतर राजकीय पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या आर्थिक स्थितीची
चौकशी करण्यात आली पाहिजे आणि ती जनतेसमोर उघड केली पाहिजे !
     नवी देहली - काँग्रेसचे प्रवक्ता आणि अधिवक्ते असणारे अभिषेक मनु सिंघवी यांना आयकर विभागाने ५७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सिंघवी यांनी त्यांच्या कार्यालयावर खर्च करण्यात आलेल्या पैशांविषयी पुरावे सादर न केल्याने हा दंड ठोठवण्यात आला आहे; मात्र त्यावर राजस्थान उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सिंघवी यांनी २०१०-११ आणि २०१२-१३ मध्ये त्यांच्या मिळकतीमध्ये ९१ कोटी ९५ लक्ष रुपये अल्प दाखवले होते.

(म्हणे) जागतिक मंदीच्या काळात काळ्या पैशांमुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला साहाय्य मिळाले ! - अखिलेश यादव यांचा शोध

     लक्ष्मणपुरी - मी स्पष्ट करू इच्छितो की, काळा पैसा निर्माण होऊ नये; मात्र आर्थिक विशेषतज्ञांच्या मते जागतिक मंदीच्या काळात काळ्या पैशांमुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला साहाय्य मिळाले. मंदीचा भारतावर प्रभाव पडू शकला नाही, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी येथे केले. अखिलेश यादव यांनी या विशेषतज्ञांची नावे मात्र सांगितली नाहीत.
     गरिबांच्या विरोधी असणार्‍या या निर्णयामुळे केंद्र सरकारला सत्ताच्युत व्हावे लागेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली. नोटा रहीत करण्याच्या निर्णयामुळे काळ्या पैशांवर रोख लागणार नाही. श्रीमंत लोक २ सहस्र रुपयांच्या नोटेची वाट पहात आहेत, असेही ते म्हणाले. -

ट्रम्प यांच्याशी माझे सलोख्याचे संबंध ! - पंतप्रधान मोदी

    नवी देहली - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझा चांगला सलोखा आहे. यामुळे आगामी काळात ट्रम्प यांचा कल कायम भारताच्या बाजूने असेल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. डेमोक्रॅट पक्षाचे बराक ओबामा असोत कि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प, भारताच्या विषयी अमेरिकेची भूमिका मैत्रीपूर्णच राहिली आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी नेत्यांसाठी मेजवानीचे आयोजन केले होते. या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि त्याचे पडसाद या सूत्रावर अनौपचारीक चर्चा झाली. त्या वेळी मोदी यांनी ट्रम्प यांच्याविषयी त्यांची भूमिका मांडली.

तीनदा तलाक देऊन वेश्याव्यवसायात ढकललेल्या मुसलमान महिलेची हिंदु धर्मात येण्याची इच्छा !

महिलांच्या समानतेसाठी प्रसिद्धीलोलुप आंदोलन करणार्‍या तृप्ती देसाई 
आणि त्यांच्या संघटना अशा महिलांसाठी काही करत नाहीत, हे लक्षात घ्या !
     नवी देहली - उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील एका मुसलमान महिलेस तिच्या पतीने तीनदा तलाक देऊन वेश्याव्यवसायात ढकलल्याने निराश झालेल्या महिलेने हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. 
     एका वृत्तवाहिनीस मुलाखत देतांना महिलेने सांगितले की, तिच्या पतीने तिला रागाच्या भरात तीनदा तलाक दिल्याचे मान्य केले; मात्र परत तिच्याशी संसार थाटण्याची सिद्धता दर्शवली. तसे करण्यापूर्वी इस्लामी शरियाप्रमाणे त्या महिलेला एका परपुरुषाशी विवाह करून शारीरिक संबंध जोडणे आवश्यक आहे; म्हणून या महिलेच्या पतीने तिला त्याच्या एका मित्राकडे पाठवले.
       तीन मासांनंतर ती महिला जुन्या पतीकडे परत आली असता त्याने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला, उलट तिला वेश्याव्यवसायात ढकलले. त्यामुळे कंटाळलेल्या महिलेने स्थानिक ‘जय शिवसेना’ या हिंदु संघटनेशी संपर्क साधून हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा दर्शवली. जय शिवसेना या संघटनेने तिला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेत वर्णद्वेषाच्या घटनांत प्रचंड वाढ !

     वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्या देशात निग्रो (अश्‍वेत), मेक्सिकन आणि मुसलमान समुदायाच्या लोकांविरुद्ध द्वेष व्यक्त करण्याच्या २०० हून अधिक घटना घडल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने दिली आहे. प्रत्यक्षात अशा तर्‍हेच्या घटनांची संख्या कित्येक पटीने असण्याची शक्यता आहे. या घटनांत गुंडगिरी, धमक्या आणि ट्रम्प यांच्या विजयावर आधारित टोमणे यांचा समावेश आहे.
     विशेषत: निग्रो आणि विस्थापित लोकांना या त्रासाचा सामना अधिक करावा लागतो. त्यांना त्यांच्या देशात परत जाण्याची धमकी दिली जाते. मुसलमान महिलांना देश सोडून जाण्यास सांगण्यात येते, नकाब काढण्यास सांगण्यात येते. या सर्व घटना गोर्‍या लोकांच्या मानसिकतेतून निर्माण झाल्या आहेत. त्यात महिलाही आघाडीवर आहेत. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रसारात सहभागी झालेले नेते या अमेरिकन गोर्‍यांना चिथावत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे स्वयंसेवी संस्थेने सांगितले. या संस्थेने प्रसारमाध्यमे आणि त्यांच्या कार्यालयात आलेल्या तक्रारीवरून ही आकडेवारी सिद्ध केली आहे.

अमेरिकेत मुसलमान शिक्षिकेला हिजाब वापरण्यावरून धमकी !

‘पुरोगामी’ अमेरिकेतील असहिष्णुता !
     वॉशिंग्टन - येथे एका २४ वर्षीय मुसलमान शिक्षिका मेराह टेली हिला चिठ्ठी मिळाली असून त्यात म्हटले आहे की, तुम्ही वापरत असलेला हिजाब आता सहन केला जाणार नाही. तुम्ही याला तुमच्या गळ्याला बांधून फाशी का घेत नाही ? मेराहने ही चिठ्ठी तिच्या फेसबूक पानावर पोस्ट केली आहे. हिजाबला विरोध होणार्‍या अनेक घटना अमेरिकेत सध्या घडल्या आहेत.

इटलीत हिजाब काढण्यास नकार दिल्याने मुसलमान महिलेस अडीच लाख रुपयांचा दंड

     रोम (इटली) - इटलीतील सॅन व्हिटो अल टग्लिमेन्टो या शहरात एका ४० वर्षीय मुसलमान महिलेने हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) काढण्यास नकार दिल्याने तिला अडीच लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. इटलीतील न्यायालयाने आधी या महिलेस देशाच्या कायद्याचे पालन न केल्याविषयी ४ मासांचा कारावास ठोठावला होता; मात्र नंतर हा निर्णय पालटून अडीच लाख रुपयांचा दंड आणि २५ सहस्र रुपये न्यायालयीन खर्चापोटी भरण्यास सांगितले. 
    गेल्या मासात सॅन व्हिटो अल टग्लिमेन्टो या शहराच्या नगर परिषद सभागृहात ही महिला हिजाब घालून आली होती. तेथील महापौराने तिला हिजाब काढण्याची वेळोवेळी विनंती केली; मात्र तिने हिजाब काढण्यास नकार दिला. या हिजाबमधून त्या महिलेचे केवळ डोळेच दिसत होते. पोलिसांना बोलावून या महिलेला सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.बँकेत बनावट नोटा चालवणार्‍या महिलेस पोलिसांनी अटक केली

     कोझिकोडे (केरळ) - केरळच्या मलाप्पुरम् जिल्ह्यातील कोन्डोत्ती येथील स्टेट बँकेत ३७ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा चालवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मरीयम्मा नावाच्या एका मध्यमवयीन महिलेस पोलिसांनी अटक केली.
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरीयम्मा ही ५६ वर्षे वयाची महिला बँकेत ४९ सहस्र ५०० रुपयांचे चलन घेऊन तिच्या खात्यात भरण्यास आली. यापैकी १ सहस्र रुपये चलनाच्या ३७ सहस्र रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे बँक अधिकार्‍यांना आढळून आले. बँकेच्या व्यवस्थापकाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलेला अटक केली. महिलेची दोन्ही मुले आखाती देशात नोकरीस आहेत. त्यांनी घराचे बांधकाम करण्यासाठी हवालाद्वारे हे पैसे पाठवल्याचे मरीयम्मा हिने सांगितले.

भारतात ७ कोटी महिला भूक दाबण्यासाठी तंबाखू चघळतात !

भुकेमुळे जनतेला व्यसनाधीन बनवणारी आतापर्यंतची सरकारे लोकशाही निरर्थक ठरवतात !
     नवी देहली - भारतात १५ वर्षे वयापासून ते वृद्ध पर्यंतच्या ७ कोटी महिला भूक दाबण्यासाठी तंबाखू चघळघात, अशी माहिती एका अहवालाद्वारे समोर आली आहे. यातील शारीरिक श्रमाचे काम करणार्‍या महिलांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटना, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, हीलिस सेक्षारिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल तथा प्रिव्हेन्शन आणि अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने भारत सरकारने ही माहिती गोळा करून अहवाल बनवला आहे. 
      तोंड आणि गळा यांच्या कर्करोगाच्या समस्येविषयी या अहवालात म्हटले आहे की, प्रत्येक वर्षी ८५ सहस्र पुरुष आणि ३४ सहस्र महिलांना हा आजार होत असल्याचे समोर येते. यातील ९० टक्के लोकांनी तंबाखूचे सेवन केल्याची माहिती मिळते.नाणेटंचाईमुळे त्रस्त झालेल्या ख्रिस्त्यांना साहाय्य म्हणून चर्चने देणगी पेट्या उघड्या केल्या !

     एर्नाकुलम् (केरळ) - एर्नाकुलम् जिल्ह्यातील सेंट मार्टिन पोरेस चर्चच्या धर्मगुरूने नाणेटंचाईमुळे त्रस्त झालेल्या ख्रिस्त्यांच्या साहाय्यासाठी चर्चमध्ये ठेवलेल्या देणगी पेट्यातून पाहिजे तेवढे पैसे घेऊन जाण्याची मुभा चर्चला भेट देणार्‍या ख्रिस्त्यांना उपलब्ध करून दिली. (यामागेही धर्मांतराचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही ! - संपादक)
    या चर्चच्या कार्यक्षेत्रात २०० ख्रिस्ती कुटुंबे येतात. त्यातील अनेक गरीब असून त्यांच्याकडे बँकेची खाती नाहीत अथवा त्यांना ए.टी.एम्. यंत्रणा चालवण्याचे ज्ञान नाही. हे सर्व लोक ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने अडचणीचा सामना करत होते. हे बघून चर्चने हा निर्णय घेतला. या देणगी पेट्यातून पाहिजे तेवढे पैसे घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच शक्य होईल तेव्हा हे पैसे परत करण्याचीही सूट देण्यात आली आहे. आता या पेट्यांत केवळ ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटाच शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन !

     सेऊल (दक्षिण कोरिया) - दक्षिण कोरियामध्ये राष्ट्रपती पार्क ग्वेन यांच्या त्यागपत्रासाठी अडीच लाखांहून अधिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्यांनी राष्ट्रपतींच्या मुख्य कार्यालयावर मोर्चाही काढला. पार्क यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी सूट दिली होती, असा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.

जपानमध्येही हिंदु देवतांची पूजा केली जाते !

    नवी देहली - जपानमध्ये ब्रह्मा, गणेश, गरुड, वायु, वरुण आदी हिंदु देवतांची पूजा केली जाते. नुकतेच देहलीमध्ये छायाचित्रकार बेनॉय बहल यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येथे लावण्यात आले होते. त्यातून याची झलक दिसून आली. 
     बेनॉय यांच्यामते हिंदीतील काही शब्द जपानी भाषेतही वापरले जातात. उदाहरणार्थ ‘सेवा’ हा शब्द जपानी भाषेत त्याच अर्थाने वापरण्यात येतो. जपानमध्ये कोणत्याही प्रार्थनेचे अन्य भाषेत भाषांतर केले जात नाही. कारण त्यामुळे त्या प्रार्थनेतील शक्ती आणि त्याचा प्रभाव न्यून होईल, अशी त्यांची धारणा आहे. 
    जपानमध्ये सरस्वतीदेवीचे अनेक मंदिरे आहेत. तसेच संस्कृतमध्ये लिहिण्यात आलेली पांडू लिपी अनेक घरात आढळते. येथे ५ व्या शतकातील संस्कृत भाषेतील ‘सिद्धम’ नावाची पोथी अजूनही पहायला मिळते. जपानी भाषा ‘काना’ यात संस्कृतचे अनेक शब्द आहेत. कानाची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे. 
    जपानमधील मुख्य दूध आस्थापनाचे नाव ‘सुजाता’ आहे. या आस्थपानच्या अधिकार्‍याने सांगितले की, भगवान बुद्ध यांना निर्वाणाच्या वेळी ज्या युवतीने खीर खाण्यास दिली होती, तिचे नाव ‘सुजाता’ होते.

चीनमधून भारतात येणार्‍या औषधांवर केंद्र सरकारचे लक्ष !

     नवी देहली - चीनमधून भारतात येणारी औषधे, तसेच त्यासाठी लागणारा कच्चा माल यांवर केंद्र सरकारकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. भारताच्या सर्व बंदरांवरील पडताळणी अधिक कडक करण्यात आली आहे. (चीनच्या एकूण साहित्यांची गुणवत्ता सुमार असल्याने औषधांसह प्रत्येक वस्तूवर बंदी घालावी ! - संपादक) ‘सेंट्रल ड्रग्स स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’चे (‘सीडीएस्सीओ’चे) अधिकारी यावर लक्ष ठेवत आहेत. चीनकडून येणार्‍या औषधांमध्ये भेसळ आणि वाईट गुणवत्तेची औषधे जप्त करण्यात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात प्रतिवर्षी १८ सहस्र कोटी रुपयांच्या औषधांची आयात केली जाते. यातील ६० टक्के औषधे चीनमधून येतात. त्याव्यतिरिक्त अमेरिका, इटली, जपान आणि युरोपमधील अन्य काही देश येथूनही औषधे येतात.हिंदु जनजागृती समितीकडून हुब्बळ्ळी येथे ‘व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान

     हुब्बळ्ळी (कर्नाटक) - हुब्बळ्ळी येथे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. हुब्बळ्ळी महिला महाविद्यालय आणि ज्ञानगंगा संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या कु. नागमणी आचार यांनी ‘व्यक्तीमत्त्व विकास’ आणि ‘मुलांमध्ये गुणवृद्धी’ यांविषयी मार्गदर्शन केले. १८० शिक्षकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

हिंदूंच्या वर्तमान दुःस्थितीमागे धर्मशिक्षणाचा अभाव हेच मूळ कारण ! - श्री. चित्तरंजन सुराल, हिंदु जनजागृती समिती

धुबडी (आसाम) येथे गोपाष्टमी साजरी !
मार्गदर्शन करतांना श्री. चित्तरंजन सुराल
        धुबडी (आसाम), १५ नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदूंच्या वर्तमान दुःस्थितीमागे धर्मशिक्षणाचा अभाव हेच मूळ कारण आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्याद्वारे धर्माचरण करून त्यांना संघटित करण्याची आवश्यकता आहे. या संघटित शक्तीद्वारेच राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती पालटता येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व अन् उत्तर-पूर्व भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी येथे केले. येथील काली बाडीमध्ये नुकतीच गोपाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. त्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. या वेळी रामकृष्ण विवेकानंद आश्रम, देवघर, झारखंडमधील स्वामी सुकृपानंद, कर्नाटकतील श्रीराम सेनेचे संघटनमंत्री श्री. गंगाधर कुलकर्णी आणि गुवाहाटीतील भारत रक्षा मंचचे श्री. नीरज श्रीवास्तव यांनीही मार्गदर्शन केले.

गदग (कर्नाटक) येथे राष्ट्रोत्थान विद्याकेंद्रांतील पालकांना हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन

मार्गदर्शन करतांना सौ. संगीता जानू
आणि उपस्थित पालक
    हजरीबोम्मानहळ्ळी (कर्नाटक) - कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातील हजरीबोम्मानहळ्ळी येथे राष्ट्रोत्थान विद्याकेंद्रांच्या पालकांसाठी १० आणि ११ नोव्हेंबर असे २ दिवस एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संगीता जानू यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात व्यक्तीमत्त्व विकास, आनंदी जीवनासाठी अध्यात्म, साधना, धर्मशिक्षण यांविषयी माहिती दिली. 
क्षणचित्रे 
१. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
२. काही महिलांनी धर्मशिक्षणवर्ग आयोजित करण्याची मागणी केली.
३. धर्मशिक्षणातून कुंकू लावण्याचे महत्त्व लक्षात आल्याने दुसर्‍या दिवशी कार्यक्रमाला येतांना १५ महिला टीकली ऐवजी कुंकू लावून आल्या होत्या.

(म्हणे) देवस्थानचा पैसा विद्यापिठांकडे वळवल्यास शासकीय अनुदानाची आवश्यकता भासणार नाही !

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांचे अभ्यासहीन वक्तव्य !
हिंदूंनी देवस्थानांत श्रद्धेने अर्पण केलेला पैसा हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी, 
तसेच अन्य धार्मिक कार्यांसाठीच वापरला जायला हवा ! हिंदूंना धर्मशिक्षणच
नसल्यामुळे हा धर्मद्रोह आहे, हेही त्यांच्या लक्षात येत नाही !
     पुणे - तिरुपती बालाजी मंदिर देवस्थानचा पैसा एका विश्‍वविद्यालयाला दिला जातो. त्याप्रमाणे शिर्डी आणि पंढरपूर देवस्थान यांना मिळणारा पैसा अशाच पद्धतीने विद्यापिठांकडे वळवला, तर एकाही विद्यापिठाला शासकीय अनुदानाची आवश्यकता भासणार नाही, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी केले. (विद्यापिठांना पैसे उभारण्यासाठी अन्य अनेक मार्ग उपलब्ध असतांना त्याकडे दुर्लक्ष करून हिंदूंच्या मंदिरांच्या संपत्तीवर डोळा ठेवण्याची सध्या टूमच आली आहे ! - संपादक) अंजली पब्लिकेशन हाऊसच्या वतीने गझलकार दीपक करंदीकर लिखित अभिनव श्री व्यंकटेश माहात्म्य या ओवीबद्ध पोथीचे प्रकाशन डॉ. कामत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संत साहित्याचे अभ्यासक वा.ल. मंजुळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाशक आनंद साने हेही उपस्थित होते.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी संचालक असलेल्या अ‍ॅकॅडमीकडून विद्यार्थ्याच्या वडिलांची फसवणूक

राहुल गांधी यांचे खरे स्वरूप !
     पुणे - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी संचालक असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असतांना विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या येथील सोहेल अन्सारी या विद्यार्थ्याच्या वडिलांची फसवणूक झाली आहे. शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाची रक्कम परत देण्याचे आश्‍वासन राहुल गांधी यांनी पाळले नाही. (राहुल गांधी यांना याविषयी काय म्हणायचे आहे? - संपादक) या प्रकरणी या विद्यार्थ्याचे वडील जहिरुद्दीन अन्सारी यांनी आत्मदहनाची चेतावणी पत्रकार परिषदेत दिली आहे.
१. जाहिरूद्दीन अन्सारी नामक व्यक्तीने मुलाच्या म्हणजेच सोहेल अन्सारी याच्या शिक्षणासाठी अधिकोषातून शैक्षणिक कर्ज घेतले होते.
२. सोहेलचे प्रशिक्षण चालू असतांना वर्ष २०१३ मध्ये त्याचे अपघाती निधन झाले. त्यासंबंधी अन्सारी यांनी अपघाताचा अहवाल संस्थेकडे मागितला असता तो ही त्यांना मिळाला नाही.
३. त्या घटनेनंतर अन्सारी यांनी संस्थेकडे शैक्षणिक शुल्क परत मागितले. त्यासाठी त्यांना मुख्य संचालक राहुल गांधी यांना भेटण्यास सांगितले.
४. या प्रकरणी अन्सारी यांना आमदार आणि खासदार यांच्याकडे न्याय मागूनही मिळाला नाही. लवकर न्याय न मिळाल्यास त्यांनी आत्मदहन करण्याची चेतावणी दिली आहे.

१५ हून अधिक चुकीच्या गतीरोधकांवर महापालिकेचा हातोडा !

     संभाजीनगर - निकष डावलून आणि चुकीच्या पद्धतीने केलेले शहरातील गतीरोधक महापालिकेने उखडण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या दोन दिवसांत १५ हून अधिक गतीरोधक तोडण्यात आले असून नवीन गतीरोधक टाकण्याचे काम यापुढे वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊनच केले जाणार आहे. चुकीच्या पद्धतीने गतीरोधक बनवणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले. अयोग्य गतीरोधकांमुळे दोन जणांचे जीव गेल्यानंतर महापालिका उपाययोजना काढत आहे. (गतीरोधकांच्या कामांवर देखरेख का ठेवली नाही, याचे स्पष्टीकरण संबंधित अधिकार्‍यांनी द्यावे. पुष्कळ हानी झाल्यावर जागे होणारे प्रशासनच शहराच्या दूरवस्थेला कारणीभूत आहे. कार्यतत्पर आणि जनताभिमुख प्रशासनासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य
आहे ! - संपादक)

नोटांवरील बंदीमुळे वसई (जिल्हा ठाणे) येथील पतसंस्था अडचणीत

     वसई - ९ नोव्हेंबरपासून बंदी असलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास मनाई असतांनाही येथील तालुक्यातील अनेक पतसंस्थांनी त्या स्वीकारल्या. त्यानंतर ११ नोव्हेंबर या दिवशी सहकार खात्याने त्याविषयी पत्र पाठवून पतसंस्थांना बंदी असलेल्या नोटा स्वीकारण्याची सूचना दिली; मात्र जमा करून घेतलेल्या नोटांविषयी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. पतसंस्था उघडी ठेवायची कि बंद ठेवायची, हे कोणीच सांगत नसल्याने आता पतसंस्था त्यांच्या बँकर्स असलेल्या विविध बँकांकडे पैशासाठी विनवणी करत आहेत. रिझर्व्ह बँकेचे निर्देश असल्याने नोटा स्वीकारूनही त्या पालटून देण्यात पतपेढ्यांना अडचण येत आहे.

महिलांचा आदर न राखल्यानेच सलमान खानची मुलाखत घेण्याचे टाळले ! - अमीन सयानी

     पुणे - निवेदक म्हणून मी आरंभीच्या काळात अनेक कलावंतांच्या मुलाखती घेतल्या; पण त्यामध्ये सलमान खानची मुलाखत घेतली नाही. कारण त्या काळात तो मुलींना त्रास देत असे. मी नेहमी महिलांचा आदर राखत आलो आहे. सलमान खानने त्या काळी महिलांचा आदर न राखल्यानेच त्याची मुलाखत घेण्याचे टाळले, असे प्रतिपादन प्रसिद्ध संवादक, निवेदक आणि सूत्रधार अमीन सयानी यांनी केले. १२ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या एका कार्यक्रमात सयानी यांना पु.ल.देशपांडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
     ते पुढे म्हणाले की, साहित्य क्षेत्रात पु.ल. देशपांडे यांचे कार्य अतुलनीय आहे. निवेदक म्हणून आकाशवाणीवर काम करत असतांना त्यांचे कार्यक्रम पाहून नेहमीच शिकण्यास मिळाले. ते माझे आदर्श असल्याने त्यांच्याच नावाने पुरस्कार मिळणे, हे माझ्यासाठी भाग्याचे आहे.

इंग्रजी ही जगाची भाषा असल्याचे सांगून लोकांचे ब्रेनवॉश केले जाते ! - प्रा. अनिल गोरे

     पुणे - गेल्या काही दशकांपासून भारतामध्ये भाषेच्या संदर्भात अनावश्यक बाऊ करण्यात आला. इंग्रजीविषयी महाराष्ट्रातील वातावरणही गढूळ झाले आहे. इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याचे सांगून लोकांचे ब्रेनवॉश करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मराठी काका अशी ओळख असलेले प्रा. अनिल गोरे यांनी केले. इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात मुलांचा प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या पालकांसाठी येथील रामभाऊ म्हाळगी अभ्यासिकेमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या मेळाव्याला ५० हून अधिक पालक उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की,
१. पालकही इंग्रजी भाषेमुळे भारावून जाऊन मुलांवर ती भाषा लादत आहेत. इंग्रजी ही पोट भरणारी भाषा आहे, हा अपसमजही पालकांनी दूर करावा. चीनमधील लोकांना इंग्रजी येत नसतांनाही ते भरपूर पैसे कमावतात. जगातील बहुतेक देशांत मातृभाषेचा वापर होतो. म्हणून पालकांनी मातृभाषेविषयी आत्मविश्‍वास ठेवावा आणि मुलांना मराठी शाळेमध्ये घालावे.
२. इंग्रजी ही ४ सहस्र भाषांचे मिश्रण असल्याने ती आकलन होण्यासाठी तेवढ्या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. मिश्रभाषिक मजकूर मनावर परिणामकारकपणे ठसत नसल्याने इंग्रजीतून शिकणार्‍या मुलांना अभ्यासासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. या उलट मराठी भाषेतील संधी मधून शब्दांची जडणघडण होत असल्याने ती लवकर आकलन होते.
३. इंग्रजी माध्यमातील शाळांना देणगी देण्यापेक्षा त्या पैशांची बचत करून मुलांना अन्य खेळ शिकण्याची संधी उपलब्ध करून देता येईल. यासाठी पालकांनी मराठी भाषेविषयी अभिमान बाळगावा.

१ डिसेंबरपूर्वी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करण्याच्या सूचना !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
     कोल्हापूर, १५ नोव्हेंबर (वार्ता.) - राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (एस्आयटी) अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी १३ आणि १४ नोव्हेंबर या दिवशी कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या अन्वेषणाचा आढावा पोलीस अधिकार्‍यांकडून घेतला. कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील सनातनचे साधक आणि दुसरे संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या विरोधात ९० दिवसांच्या आत म्हणजे १ डिसेंबरपूर्वी दोषारोपपत्र सत्र न्यायालयात प्रविष्ट करा आणि दोषारोपपत्रात दोष अथवा त्रुटी राहू देऊ नका, अशा सूचना त्यांनी या वेळी पोलीस अधिकार्‍यांना केल्या. 

आसामला भूकंपाचा धक्का !

     गुवाहाटी - आसामसहित ईशान्य भारतातील काही राज्यांना १५ नोव्हेंबरच्या सकाळी भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.० इतकी मोजण्यात आली. यात जीवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती उपलब्ध झालेली नाही. या भूकंपाचे केंद्र करीमगंज जिल्ह्यात होते. भूकंपाविषयी तज्ञांच्या मते आसाम, अरुणाचलप्रदेश, मेघालय, मणीपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि नागालॅण्ड या राज्यांत जगभरातील भूकंपप्रवण असणार्‍या क्षेत्रांपैकी ६ वे मोठे क्षेत्र आहे. 
 महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे 
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या 'नाडीवाचन क्रमांक ६७' मध्ये महर्षि म्हणतात, "हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे." (ईशान्य भारतातील राज्यांना १५ नोव्हेंबरच्या सकाळी ५.० तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

खारेगाव रस्त्यावर (ठाणे) १३ पट लाभ मिळवूनही ठेकेदारांकडून अद्याप पथकरवसुली चालूच

     ठाणे - खारेगाव रस्त्यावर जुन्या कशेळी पुलालगत ४ लेनसह दोन लेनचा पूल उभारून पथकरवसुली करणार्‍या मे.आयडीयल रोड बिल्डर्स या आस्थापनाने १३ पट लाभ मिळवूनही अद्याप पथकरवसुली चालूच ठेवली आहे. येथील श्री. चंद्रहास तावडे यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली. या ठेकेदाराने पथकर वसुलीच्या कराराचा भंग केला असून शासनाचीही फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही टोलवसुली कायमची बंद करावी, यासाठी श्री. तावडे यांनी शासनाला निवेदन दिले आहे. (नागरिकांचे आर्थिक शोषण करणारी पथकरवसुली रहित करण्यासाठी मुख्यमंत्री लक्ष घालतील का ? गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय्य टोलधाड रहित करण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून जनतेला चांगले दिवस दाखवावेत, ही अपेक्षा ! - संपादक)
माहिती अधिकारात उघड झालेली धक्कादायक माहिती

१. वर्ष १९९५ मध्ये जुन्या कशेळी पुलालगत २५.९२४ कि.मी.लांबीच्या रस्त्याचे बांधा-वापरा-हस्तांतरीत करा (बीओटी) तत्त्वावर १७ कोटींचे कंत्राट मे. आयडीयल आस्थापनाला देऊन खारेगाव रस्त्यावरील पथकरवसुलीचा परवाना देण्यात आला. १९९७ मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर २००५ पर्यंत पथकर वसूल करण्यात येणार होता.
२. या संदर्भात वर्ष १९९८-९९ ते २००१ पर्यंत किती पथकरवसुली झाली याची माहितीच शासनाकडे उपलब्ध नसल्याची माहिती उघडकीस आली. (तत्कालीन सरकारचा अनागोंदी कारभार ! पथकर वसुलीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा राज्यात अस्तित्वात आहे कि नाही ? - संपादक) जानेवारी २००१ पासून मार्च २००५ पर्यंत ६१ कोटी ४७ लाख ८१ सहस्र इतका पथकर वसूल झाल्याचे ठेकेदाराने शासनास कळवले.
३. या रस्त्याचे पुन:श्‍च नूतनीकरण करण्यासाठी सप्टेंबर १९९८ मध्ये दुसरा करार करून या कामाची किंमत ६९ कोटी ३० लाख इतकी ठरविण्यात आली. ही किंमत जून २०१७ पर्यंत पथकराद्वारे वसूल करायची होती. याप्रमाणे प्रकल्प किंमत एकत्रित केल्यास या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण ८६ कोटी ३१ लाख इतका खर्च कंत्राटदाराने केला.

जुन्या रहित केलेल्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा सहकारी अधिकोषांना मज्जाव

या निर्णयामुळे निर्माण होणार्‍या अडचणींना उत्तरदायी कोण ? 
     मुंबई - चलनातून रहित केलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास देशभरातील जिल्हा सहकारी अधिकोषांना भारतीय रिझर्व्ह बँकेने १४ नोव्हेंबर या दिवशी अचानक मज्जाव केला. जिल्हा अधिकोषांवर नोटा पालटण्यासंबंधी बंदी आली असली, तरी राज्य सहकारी अधिकोषांना जुन्या नोटा स्वीकारण्याची अनुमती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक यांची खाती त्याच अधिकोषांमध्ये असल्याने त्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. 

दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींच्या अधिकोषात अधिक रक्कम जमा झाल्यास त्यांचे 'बीपीएल्' कार्ड रहित होणार !

     मुंबई - दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींच्या अधिकोषाच्या खात्यात ३९ सहस्र रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा झालेले आढळल्यास त्यांचे बीपीएल् (बिलो प्रॉव्हर्टी लाईन) कार्ड रहित होणार आहे म्हणजेच त्यांचे नाव दारिद्य्ररेषेच्या गटातून रहित होणार आहे. ५०० आणि १००० यांच्या जुन्या नोटा भरण्यासाठी अडीच लाखांपर्यंतच अनुमती आहे. त्याच्यावर रक्कम गेल्यास त्यांच्या रकमेची चौकशी होणार आहे. त्यामुळे अनेक जण दारिद्य्ररेषेखालील म्हणजे 'बीपीएल्' कार्डधारकांच्या खात्यात पैसे भरत आहेत. त्यामुळे वरील निर्णय केंद्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 
     ज्यांचे वार्षिक उत्पन्न १२ सहस्रांंच्या आत आहे (म्हणजे जे दारिद्य्ररेषेखाली आहेत), त्यांनाच या कार्डाचा लाभ मिळतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयोवृद्ध आईने रांगेत उभे राहून नोटा पालटल्या !

     गुजरात, १५ नोव्हेंबर - देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वयोवृद्ध आई हिराबेन मोदी यांनी १५ नोव्हेंबरला सर्वसामान्यांप्रमाणे अधिकोषाबाहेर रांग लावून जुन्या नोटा पालटून घेतल्या. गांधीनगर परिसरातील रायसेन परिसरातील 'ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स' येथे हिराबेन यांनी या नोटा पालटल्या. हिराबेन यांनी ४ सहस्र ५०० रुपयांच्या नोटा पालटून घेतल्या. या माध्यमातून हिराबेन मोदी यांनी देशातील सर्वांसमोरच आदर्श निर्माण केला आहे. या संदर्भातील चलध्वनीफीती सर्वत्र प्रसारित होत असून लोक त्यांचे कौतुक करत आहेत.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

जुन्या नोटा न स्वीकारण्याचे प्रकरण 
     पालघर, १५ नोव्हेंबर (वार्ता.) - शासकीय निर्देशानुसार जिल्ह्यातील अधिकोष, पेट्रोल पंप, औषधालये, खाजगी आणि शासकीय रुग्णालये येथे ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारणे बंधनकारक आहे. त्या न स्वीकारणार्‍यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नियंत्रणकक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. अशा प्रकारचा कक्ष पालघर जिह्यातही कार्यान्वित झाला आहे. तक्रार नोंदवतांना संबंधित संस्था अथवा व्यक्ती यांचे नाव, गाव, तालुका आणि संपर्क क्रमांक लिहावयाचा आहे. नियंत्रणकक्ष क्र. ०२५२५-२९७४७४ आणि पोलीस नियंत्रण कक्ष क्र. ०२५२५-२९७००४, ९७३०८११११९ या क्रमांकांवर तक्रार करता येणार आहे.

नोटा पालटण्यासाठी ओळखीच्या पुराव्यांचा होत आहे अपवापर

काळा पैसा असलेल्यांच्या या क्लृप्त्यांना केंद्र शासन कसा आळा घालणार ? 
     पुणे, १५ नोव्हेंबर - भ्रमणभाष आस्थापने, खाजगी संस्था यांना 'ओळखीचा पुरावा' म्हणून दिलेले आधार कार्ड आणि स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड) यांच्या छायांकित प्रतींचा परस्पर वापर करणे आणि त्याद्वारे अधिकोष अधिकार्‍यांच्या संगनमताने जुन्या नोटा पालटून घेण्याचे अपप्रकार चालू झाले आहेत. (काळा पैसा निर्माण करणार्‍यांची वृत्ती पालटण्यासाठी धर्मशिक्षण देणे आणि कठोर शासन करणे किती आवश्यक आहे, हेच पुन्हा सिद्ध होते. - संपादक) या माध्यमातून सरकारी यंत्रणांना फसवण्याचा प्रकार चालू झाला आहे. 

तुळजापूर येथे सहा कोटी रुपयांची रक्कम कह्यात

या प्रकरणाची अधिक चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! 
     तुळजापूर (जिल्हा धाराशिव) - परभणीहून सांगलीकडे पैसे घेऊन जाणार्‍या वाहनातून ६ कोटी रुपयांची रक्कम कह्यात घेण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या पथकाने ही कारवाई केल्याचे समजते; मात्र ही रक्कम सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची असून परभणी, मानवत शाखेतून सांगलीकडे घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे.

जालना येथे ३० लक्ष रुपयांहून अधिक रोख रक्कम शासनाधीन

निवडणुकांचे बाजारीकरण आणि लोकशाहीचे अपयश दर्शवणारी घटना ! 
     जालना, १५ नोव्हेंबर - नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील निवडणूक विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने २ ठिकाणी केलेल्या कारवाईत ३० लक्ष ७० सहस्र रुपयांची रोख रक्कम शासनाधीन केली आहे. जालना-संभाजीनगर मार्गावरील पथकर नाक्याजवळ वाहन पडताळणी करतांना जालन्याकडे जाणार्‍या एका गाडीत आणि अन्य एका कारवाईत ही रक्कम सापडली. या प्रकरणी संबंधितांवर पोलिसांनी गुन्हे प्रविष्ट केले आहेत.

नथुराम गोडसे पुण्यतिथी कार्यक्रमास पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत अनुमती नाकारली !

हिंदुत्ववाद्यांच्या मृत्यूनंतरही काही ना काही कारण 
काढून त्यांचा कार्यक्रम घेण्यास अडथळा आणणे निषेधार्ह ! 
     जळगाव, १५ नोव्हेंबर (वार्ता.)- येथे हिंदु महासभेच्या वतीने नथुराम गोडसे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी हिंदु महासभेचे पदाधिकारी श्री. नारायणशेठ अग्रवाल हे शहर पोलीस ठाण्यात पुण्यतिथीच्या कार्यक्रमाची अनुमती मागण्यास गेले असता पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत अनुमती नाकारली. हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजलीसाठी होता.

सोलापूर येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांध रिक्शाचालकाकडून वाहतूक पोलीस शिपायाला मारहाण

कायद्याचा धाक नसल्याने उद्दाम झालेले धर्मांध ! 
     सोलापूर - येथील अवैध प्रवासी वाहतूक करणारा धर्मांध रिक्शाचालक बिलाल महंमद याने त्याला अडवणार्‍या वाहतूक नियंत्रण शाखेच्या हिंदु पोलीस शिपायाला पुष्कळ मारहाण करून घायाळ केले. या प्रकरणी धर्मांधाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. शिपायाने धर्मांधाला अडवून 'पुढे आयुक्तांचे घर असल्याने अवैध प्रवासी वाहतूक करू नको', असे सांगितले. त्यावर बिलालने शिपायासमवेत वाद घातला. या घटनेचे एका व्यक्तीने चित्रीकरण केले. त्यानंतर पोलिसांनी बिलालला कह्यात घेतले.

मुंबई विद्यापिठाकडे प्रतिवर्षी येणारी सरासरी ३०० प्रमाणपत्रे खोटी !

खोट्या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून होणारा 
शैक्षणिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकार कोणते उपाय योजणार आहे ? 
     मुंबई - प्रत्येक वर्षी मुंबई विद्यापिठाकडे साधारणपणे २५ सहस्र प्रमाणपत्रे ही खाजगी आस्थापने, अन्य देशातील आस्थापने, व्हिसा मिळवणे या आणि अन्य कारणांच्या पडताळणीसाठी येतात. त्यांची छाननी केल्यावर प्रतिवर्षी त्यातील सरासरी ३०० प्रमाणपत्रे खोटी असल्याचे निदर्शनास आले आहे. (यावरून कायद्याचा धाक संपला आहे, असे वाटल्यास चूक ते काय ? - संपादक) ही माहिती मुंबई विद्यापिठाने विहार दुर्वे यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे.
१. विद्यापिठाकडे यंदा ऑक्टोबर २०१६ पर्यंत एकूण २७८ प्रमाणपत्रे खोटी आढळली. ती पोलिसांकडे चौकशीसाठी पाठवली आहेत. या प्रकरणांचा पाठपुरावा विद्यापिठांकडून होत नसल्याने त्याच्या मुळाशी जाणे शक्य झालेले नाही. (विद्यापिठाची निष्क्रीयता ! - संपादक)

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Aykar vibhagne Congress Pravakta Abhishek Manu Singhvipar lagaya 57 karod rupayoka dand.
Kya Notbandike Congressi virodh ke peeche ka yah ek karan hai?

जागो ! : आयकर विभाग ने कांग्रेस प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी पर लगाया ५७ करोड रुपयों का दंड.
क्या नोटबंदी के कांग्रेसी विरोध के पीछे का यह एक कारण है ?

फलक प्रसिद्धीकरता

नोटबंदीच्या काँग्रेसी विरोधामागील प्रातिनिधिक कारण ?
     काँग्रेसचे प्रवक्ता आणि अधिवक्ते असणारे अभिषेक मनु सिंघवी यांना आयकर विभागाने ५७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सिंघवी यांनी २०१०-११ आणि २०१२-१३ मध्ये त्यांच्या मिळकतीमध्ये ९१ कोटी ९५ लाख रुपये अल्प दाखवले होते.


अचानक केलेली शुल्कवाढ ख्रिस्ती शाळेच्या मुख्याध्यापकांकडून रहित !

शिवसेना आणि युवा सेना यांच्या आक्रमकतेचा परिणाम
 विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी कृतीशील होणारी शिवसेना आणि युवा सेना यांचे अभिनंदन ! 
शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देतांना युवा सेनेचे पदाधिकारी
     कोल्हापूर, १५ नोव्हेंबर (वार्ता.) - शिवाजी पार्क येथील 'सेव्हन्थ डे' या ख्रिस्ती शाळेने इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात अचानक वाढ केली. (पालकांनो, ख्रिस्ती शाळेची पैसे उकळण्याची मनोवृत्ती जाणा ! - संपादक) यासंबंधीच्या तक्रारी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्याकडे आल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार १५ नोव्हेंबर या दिवशी युवा सेनेच्या वतीने 'सेव्हन्थ डे' शाळेच्या समोर निदर्शने करून प्रशासनाला शुल्कवाढीविषयी खडसवण्यात आले. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड यांनी शुल्कवाढ रहित केली. पालकांनी युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले. 

काश्मीर प्रश्‍न सुटला, तरी पाकिस्तान खोड्या करण्याचे थांबवणार नाही ! - निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर

जे एका निवृत्त अधिकार्‍याला कळते, ते सरकारला का कळत नाही ? 
     पुणे, १५ नोव्हेंबर - काश्मीर प्रश्‍न सुटला, तरी पाकिस्तान खोड्या करण्याचे थांबवणार नाही. पाकिस्तान हा विश्‍वास ठेवण्यासारखा देश नाही, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी व्यक्त केले. शब्दसखी संस्थेच्या वतीने 'काश्मीर प्रश्‍न - समज आणि गैरसमज' या विषयावर १४ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. 

अचानक केलेली शुल्कवाढ ख्रिस्ती शाळेच्या मुख्याध्यापकांकडून रहित !

शिवसेना आणि युवा सेना यांच्या आक्रमकतेचा परिणाम
 विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी कृतीशील होणारी शिवसेना आणि युवा सेना यांचे अभिनंदन ! 
शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देतांना युवा सेनेचे पदाधिकारी
     कोल्हापूर, १५ नोव्हेंबर (वार्ता.) - शिवाजी पार्क येथील 'सेव्हन्थ डे' या ख्रिस्ती शाळेने इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात अचानक वाढ केली. (पालकांनो, ख्रिस्ती शाळेची पैसे उकळण्याची मनोवृत्ती जाणा ! - संपादक) यासंबंधीच्या तक्रारी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्याकडे आल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार १५ नोव्हेंबर या दिवशी युवा सेनेच्या वतीने 'सेव्हन्थ डे' शाळेच्या समोर निदर्शने करून प्रशासनाला शुल्कवाढीविषयी खडसवण्यात आले. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड यांनी शुल्कवाढ रहित केली. पालकांनी युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले. 

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक !

     संगमनेर (जिल्हा नगर) - येथे ११ गायींना हत्येसाठी आणणार्‍या धर्मांधावर गुन्हा प्रविष्ट संगमनेर, १५ नोव्हेंबर - येथील ११ गायींना हत्येसाठी आणणार्‍या धर्मांध मुद्दस्सर अब्दुल करीम याच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. त्याच्या वाड्यातून १४ नोव्हेंबरला पोलिसांनी गायींची सुटका केली. गायींना सायखिंडी येथील पांजरपोळमध्ये सोडण्यात आले. संगमनेरमध्ये यापूर्वीही गायींची हत्या करणे आणि हत्येसाठी आणलेल्या गायी सोडवणे, अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. (याचा अर्थ धर्मांधांना गोवंश हत्याबंदी कायद्याचा धाकच राहिलेला नाही. - संपादक)

नगर येथे अल्पवयीन मुलीला झाडाला बांधून विनयभंग आणि शस्त्राने वार

महिलांसाठी असुरक्षित नगर जिल्हा ! 
     बेलवंडी (जिल्हा नगर), १५ नोव्हेंबर - येथील शिवारातील हंगा नदीच्या तीरावर १४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता एका शाळकरी अल्पवयीन मुलीला ३ बुरखाधारी युवकांनी झाडाला बांधून तिचा विनयभंग केला. तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचे कपडे फाडले. (अशा क्रूर वासनांधांना कठोर शासन केल्याविना या घटनांना आळा बसणार नाही ! - संपादक) या प्रकरणी नगर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 
१. काही दिवसांपूर्वी मुलीच्या चुलत्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये एका चिठ्ठीत 'दिवाळीनंतर तुमच्या मुली शाळेत पाठवल्यास त्यांचा घातपात करू', अशी चेतावणी दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच हा प्रकार घडला. 
२. या प्रकरणी मुलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन वांगडे यांची भेट घेऊन या प्रकरणाचा त्वरित छडा लावण्याची मागणी केली आणि मुलींच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली.

काश्मीर प्रश्‍न सुटला, तरी पाकिस्तान खोड्या करण्याचे थांबवणार नाही ! - निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर

जे एका निवृत्त अधिकार्‍याला कळते, ते सरकारला का कळत नाही ? 
     पुणे, १५ नोव्हेंबर - काश्मीर प्रश्‍न सुटला, तरी पाकिस्तान खोड्या करण्याचे थांबवणार नाही. पाकिस्तान हा विश्‍वास ठेवण्यासारखा देश नाही, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी व्यक्त केले. शब्दसखी संस्थेच्या वतीने 'काश्मीर प्रश्‍न - समज आणि गैरसमज' या विषयावर १४ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. 

भारतातील राष्ट्रीय संग्रहालयांची असलेली गंभीर दुरवस्था !

श्री. अनिल धीर
      संग्रहालये म्हणजे भावी पिढीसाठी जणू जिवंत इतिहासच ! स्वत:च्या देशाचा इतिहास जपण्यासाठी आणि त्याद्वारे भावी पिढीमध्ये स्वधर्म अन् संस्कृती यांचा अभिमान रूजवण्यासाठी आज जगभरातील सर्व देश धडपडत आहेत. तथापि ज्या देशामध्ये रामकृष्णादि असे साक्षात् श्री महाविष्णुचे अवतार होऊन गेले आणि ज्या देशाला सहस्रो वर्षांची गौरवशाली परंपरा अन् जाज्ज्वल्य इतिहास आहे, तो भारत देश मात्र दुर्दैवाने अपवाद राहिला आहे. सध्या देशातील संग्रहालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ही दुरवस्था पाहून ही संग्रहालये म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत कि उदासीनतेच्या, असा प्रश्‍न कोणत्याही इतिहासप्रेमी मनाला पडल्याशिवाय रहाणार नाही. संग्रहालयांची ही दुरवस्था पालटण्याची आवश्यकता आहे. इतिहासाची अशी हेळसांड हिंदु राष्ट्रात कदापि होणार नाही !

चिनी ड्रॅगनचे भारतासमोरील आव्हान !

ब्रिगेडियर (निवृत्त)
हेमंत महाजन
‘    जागतिक पटलावरील चीनच्या उदयामुळे भारतापुढे उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा आढावा घेत उपाययोजनांची चर्चा करण्याची आवश्यकता आहे. 
१. चीनसमवेतचा सीमावाद !
    पहिले आव्हान आहे ते दोन्ही देशांतील सीमावाद सोडवण्याचे ! जागतिक शक्ती-संतुलन, राष्ट्रीय शक्ती आणि राष्ट्रीय प्राथमिक हित यासंबंधी स्वत:विषयीच्या आकलनातून चीनची सीमा प्रश्‍नावरची भूमिका निर्धारित होत आली आहे. ढोबळमानाने, वर्ष १९५० च्या दशकात भारताच्या पूर्व क्षेत्रातील विवादित भाग भारताने ठेवावा आणि भारताच्या उत्तर क्षेत्रातील विवादित भाग चीनला मिळावा, असे चीनचे म्हणणे होते. त्यानंतरच्या दोन दशकांमध्ये चीनने संपूर्ण विवादित भागांवर आग्रही हक्क सांगण्याचे धोरण अवलंबले होते. वर्ष १९७८ मध्ये मात्र डेंग शिओपिंग यांनी चीनचा शांततापूर्ण उदय घडवून आणण्याचा संकल्प केल्यानंतर सीमाप्रश्‍न सोडवण्यासाठी चीनने पुन्हा देवाणघेवाणीच्या सूत्राचा पुरस्कार केला.

आत्मकेंद्रीतपणा सोडून राष्ट्रहित जोपासा !

     सध्या सर्वत्र सरकारने काळ्या पैशांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची चर्चा होत आहे. सरकारने कालबाह्य ठरवलेल्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेतांना त्रास सहन करावा लागला तरी चालेल; पण काळ्या पैशाच्या रूपाने देशाला लागलेली कीड समूळ नष्ट व्हायला हवी, अशी देशवासियांची उत्स्फूर्त आणि प्रामाणिक भावना असणेे आवश्यक आहे. सरकारच्या या निर्णयावर लोकांकडून उमटलेल्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्या. काळा पैसा बाळगणार्‍या सर्वांवर वचक राहून भ्रष्टाचाराला आळा बसणे अपेक्षित आहे. पाकिस्तानावरील सर्जिकल स्ट्राइक आणि आता काळ्या पैशांविरोधात छेडलेले आंदोलन यांमुळे सर्वसामान्यांच्या अपेक्षा शासनाकडून उंचावल्या आहेत, दीर्घकाळ सत्ता उपभोगून काँग्रेसने जनतेची लूट केली. त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारच्या या निर्णयाचा आधार वाटत आहे.

पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा ऑक्टोबर २०१६ या मासातील शेवटच्या आठवड्याचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा !

१. पुणे जिल्हा
१ अ. २३.१०.२०१६ या दिवशी झालेल्या 
हिंदु धर्मजागृती सभेनंतरचा प्रतिसाद 
१. ‘श्री. युवराज पवळे यांनी ‘इस्कॉन’ आणि ‘श्री संप्रदाय’ यांच्या साधकांना संपर्क केला असता ‘इस्कॉन’ आणि ‘श्री संप्रदाय’ यांचे साधक म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. त्यांचे कार्य काळाला अनुरूप असे चालू आहे. हिंदु धर्मजागृती सभा चांगली झाली. आमच्या मुलांना १९.१.२०१७ या दिवशी असलेल्या ‘चलो कश्मीर’ अभियानामध्ये सहभागी होण्यास सांगतो.
२. धर्माभिमानी श्री. मगर यांना हिंदु धर्मजागृती सभा आणि त्यात मांडलेले विषय आवडले. सभा पाहून त्यांना समितीचे कार्य आवडले. त्यांची समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा आहे. काही उपक्रम असतील, तर त्यासाठी त्यांनी बोलावण्यास सांगितले आहे. ते धर्मशिक्षणवर्गात यायलाही सिद्ध आहेत.

लोकहो, जागे व्हाल, तरच जगाल !

      ‘देशातील गरीबांना प्रतीदिनच्या खाण्यापिण्याचीच गरज असते, तो त्या पलीकडे विचार करू शकत नाही. श्रीमंतांना महागाईची काहीच झळ पोचू शकत नाही. तेव्हा देश बदलण्याचे काम हे प्रामुख्याने देशातील मध्यमवर्गीयांनाच करावे लागते ! म्हणूनच मध्यमवर्गीयांनी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! ज्या देशातील मध्यमवर्गीय अन्यायाविरूद्ध संघर्ष करतो, तोच देश प्रगती करू शकतो, हे सिद्ध झाले आहे !’
- श्री. अशोक मेहता (दैनिक ‘लोकजागर’, १२.२.२०१६)
     भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची आवश्यकता आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल ! - श्री. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे

सुशिक्षित बेरोजगारांची सेना निर्माण करणारी सध्याची शिक्षणपद्धती !

     ‘शिक्षण सम्राटांनी त्यांच्या धंदेवाईक शिक्षण संस्थांमधून कुचकामी शिक्षण देऊन समाजाच्या हाती ज्ञानाऐवजी निरर्थक पदव्यांची भंडारे दिली आहेत. अशिक्षित बेरोजगारांच्या जागी आता सुशिक्षित बेरोजगारांची सेना आम्ही सिद्ध केली.’ 
- श्री. अभय भंडारी, विटा, सांगली (साप्ताहिक ‘वज्रधारी’, वर्ष ७ वे, अंक २५, २५ जुलै ते ३१ जुलै २०१३)

विवाह झाल्यानंतर यजमान आणि साधक यांच्या माध्यमातून ईश्‍वराने साधनेत पदोपदी साहाय्य केल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

सौ. सानिका सिंह
१. विवाहातील विधींच्या वेळी पुरोहितांनी 
वडिलांचे नाव घेण्यास सांगितल्यावर संतांचे नाव घेणे आणि 
त्याच वेळी त्या संतांनी आठवण काढली असल्याचे साधकांने सांगणे 
     ‘अनेक समस्यांनंतर श्रीहरीच्या कृपेने एखादा चमत्कार व्हावा, तसा माझा विवाह एका साधकाशी झाला. विवाहाच्या विधींच्या वेळी पुरोहितांनी वडिलांचे नाव घेण्यास सांगितल्यानंतर माझ्या मुखातून एका संतांचे नाव आले. साधकाने नंतर मला सांगितले, ‘‘जवळजवळ त्याच वेळी ते संत तुझ्याविषयी विचारत होते.’’ माझ्यासारख्या जिवाची देवाला आठवण झाल्याबद्दल हे प्रभु, तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

अनपेक्षित अडथळे येऊनही श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या कृपेने बेलग्रेड (युरोप) येथील साधकांनी गुरुपौर्णिमेची सेवा पूर्ण करणे

१. अपुर्‍या साधकसंख्येत गुरुपौर्णिमेच्या सेवांचे नियोजन करावे लागणे 
     ‘या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या कालावधीत बेलग्रेड येथील काही साधक झाग्रेब येथे झालेल्या कार्यशाळेसाठी गेले असल्याने ते गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री (१८.७.२०१६) उशिरा पोचले. काही साधकांना तीव्र आध्यात्मिक त्रास होत असल्याने ते सेवा करू शकत नव्हते. त्यामुळे अल्प साधकसंख्येत गुरुपौर्णिमेच्या सेवांचे नियोजन करण्यात आले.

श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेच्या वेळी सेवा करतांना श्री. शशिकांत टोणपे यांना आलेल्या अनुभूती

श्री. शशिकांत टोणपे
१. ७ घंटे उभे राहून सेवा केल्यावर पाय दुखू लागल्याने बळ मिळण्यासाठी प्रार्थना केल्यावर श्री गणेश डोक्यावर प्रेमाने सोंड फिरवतांना दिसणे आणि त्यानंतर रात्री ३ वाजेपर्यंत पाय न दुखणे : १५.९.२०१६ या दिवशी श्री मोरया घाट, चिंचवड येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेत सेवा करतांना लष्कर-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता देविदास शिंदे १२ घंटे, तर अन्य साधक १० घंटे उभे होते. ६ ते ७ घंटे उभे राहून सेवा केल्यावर माझे पाय दुखू लागले. मी बळ मिळण्यासाठी डोळे बंद करून प्रार्थना करू लागलो. इतर वेळी श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुमाऊली त्यांचे चरण डोळ्यांसमोर येतात. या वेळी मात्र श्री गणेश माझ्या आणि श्री. शिंदे यांच्या डोक्यावर प्रेमाने सोंड फिरवतांना दिसला. त्यानंतर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि रात्री ३ वाजेपर्यंत माझे पाय दुखलेच नाहीत.
२. एका मंडळातील मुलांनी मूर्तीचे विसर्जन न करताच निघून जाणे आणि श्री. शिंदे यांनी मूर्ती विसर्जन करणार्‍या मुलांचे प्र्र्रबोधन केल्यावर ते मूर्तीच्या विसर्जनास सिद्ध होणे : एक मंडळातील मुले श्री गणेशाची मूर्ती घाटावर ठेवून विसर्जन न करता निघून गेली. त्याबद्दल श्री. शिंदे यांना आणि मला पुष्कळ खंत वाटत होती. त्या वेळी रात्रीचे २.३० वाजले होते. मूर्ती विसर्जन करणारी स्थानिक मुलेही निघून गेली. एक मंडळाच्या मुलांनी विसर्जन न केलेली ती मूर्ती पाहिली.

श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेच्या वेळी सेवा करतांना लष्कर-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता देवदास शिंदे यांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये

अधिवक्ता देवदास शिंदे
११ आणि १५.९.२०१६ या दिवशी श्री मोरया घाट, चिंचवड येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम होती. या मोहिमेत लष्कर-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता देवदास शिंदे हे सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत सेवा करतांना त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. उत्तम शारीरिक क्षमता
   श्री. शिंदे यांचे वय ५० वर्षे आहे. त्यांची प्रकृती स्थूल असूनही उत्तम आहे. ११.९.२०१६ या दिवशी ८ घंटे, तर १५.९.२०१६ या दिवशी १२ घंटे उभे राहून ते सेवा करत होते. दोन्ही दिवस सेवा करतांना आमचे पाय दुखू लागले. त्यांची सेवेची तळमळ एवढी होती की, त्यांना इतका वेळ उभे राहिलेले पाहून आम्हाला सेवा करण्यासाठी बळ मिळत होते.
२. नम्रता
   श्री गणेशमूती विसर्जन मोहिमेची सेवा करतांना श्री. देवदास शिंदे यांची प्रथमच भेट झाली, तरी त्यांनी पुष्कळ वाकून नमस्कार केला. श्री गणेशाच्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करणार्‍या हिंदूंना ते वाकून नमस्कार करत होते. त्या वेळी नम्र कसे असायला हवे, हे लक्षात आले.

स्वप्नात विशालकाय मनुष्यरूपातील १ आणि पक्षीरूपातील ५ - ६ गरुड दिसणे अन् श्रीविष्णु आणि त्याचे वाहन गरुड यांच्या सध्याच्या काळातील कार्याविषयी ज्ञान मिळणे

 
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
३१.१०.२०१६ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. या स्वप्नात एक विशालकाय गरुड मनुष्यरूपात दिसला. हा गरुड मनुष्यरूपात उभा राहून उडायला लागला. (पक्षी आडवे उडतात, हा गरुड उभा उडत होता.) तो वर जायला लागल्यानंतर अवकाशात ५ - ६ पक्षीरूपातील शुभ्र रंगाचे गरुड भ्रमण करतांना दिसले. त्यानंतर स्वप्नातच श्रीहरि विष्णूचे वाहन असलेल्या या गरुडाविषयी भगवंताने पुढील ज्ञान दिले.
   मनुष्य देह हे वाहन, तर त्याचा चालक आत्मा असतो. त्याप्रमाणे माझा देह हा विष्णुअवतार श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले यांचे वाहन, म्हणजे गरुडासम आहे. बाह्यस्वरूप देहावर स्वार होऊन स्वस्वरूप श्रीगुरु (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले) हे प्रत्यक्ष कार्यरत आहेत. तेच कर्तेकरविते आहेत. जसे श्रीहरि गरुडावर आरूढ होऊन ब्रह्मांडे भ्रमण करत कार्य करतात, तसे श्रीगुरु माझ्या देहरूपी गरुडावर आरूढ होऊन त्यांचे धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहेत.

स्थुलातून देवीचे तत्त्व कसे कार्यरत असते, याची अनुभूती सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या माध्यमातून येणे

कु. तृप्ती गावडे
१. मनाची स्थिती नकारात्मक असतांना ध्यानमंदिरात
जाऊन देवीला त्याविषयी सर्व सांगणे
    काही दिवसांपूर्वी माझ्या मनाची स्थिती नकारात्मक होती. त्याचा माझ्या साधनेवरही परिणाम होऊन मला त्रासही होत होता. त्यामुळे माझ्या तोंडवळ्यावरचा आनंद अल्प झाला होता. त्यातून बाहेर कसे पडायचे ?, ते मला कळत नव्हते. मग मी ध्यानमंदिरात देवीच्या समोर जाऊन रडतच देवीशी बोलले, माझा आनंद कुठे गेला ? माझा असा तोंडवळा बघून तुला आनंद होतो का गं आई ? तुझी तृप्ती अशी निरुत्साही नसते ना ? मग तूच मला आनंदी बनव ना ! त्यानंतर मी झोपायला गेले.
२. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी भेटायला बोलावल्यावर त्यांना मनाची स्थिती सांगणे,
देवीला आधीच सर्व सांगितल्याचे त्यांना ठाऊक नसतांनाही त्यांनी ध्यानमंदिरात देवीसमोर बसून
सर्व विचार लिहून काढण्यास सांगणे, तेव्हा स्थुलातून देवीचे तत्त्व कसे कार्यरत असते, ते समजणे
    दुसर्‍या दिवशी सद्गुरु (सौ.) ताईंनी एका साधिकेकडे निरोप पाठवला की, तृप्तीला मी बोलावले म्हणून सांगा. मी त्यांना भेटायला गेल्यावर पू. ताई माझ्या जवळ आल्या. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि पुष्कळ प्रेमाने विचारले, काय झाले ? माझ्या मनातील नकारात्मकतेच्या वेदना त्यांना जाणवल्या. मग मी त्यांना माझी सगळी स्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी मला सांगितले, आता ध्यानमंदिरात जा. देवीसमोर बस आणि हे विचार लिहून काढ. नंतर पुन्हा माझ्याकडे ये. तेव्हा मला आश्‍चर्य वाटले की, वरील सगळा भाग मी मनातून देवीशी बोलले होते आणि हे कोणाला सांगितलेही नव्हते. मग त्यांना कसे कळले की, मी हे देवीशी बोलले होते ? त्यानंतर त्यांनी मला देवीसमोर बसूनच ते लिहायला सांगितले. पू. ताईंनीच देवीसारखे प्रेम, वासल्यभाव आणि प्रीती अनुभवायला देऊन माझ्या मनाची नकारात्मक स्थिती घालवून आनंदाची निर्मिती केली. तेव्हा देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली की, देवीला मनातून हाक मारली, तरी ती स्थुलातून (सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या माध्यमातून) कशी कार्यरत असते, ते तिने अनुभवायला दिले.
३. ध्यानमंदिरात डोळे मिटून देवीला सत्संगात घ्यायचा भावप्रयोग सांगणे,
तेव्हा देवीच्या आवाजासारखा आवाज ऐकू येणे आणि डोळे उघडल्यावर
तो सद्गुरु (सौ.) बिंदाताई तेथे असल्याचे कळणे अन् पुष्कळ आनंद होणे
   एकदा मी अशीच ध्यानमंदिरात देवीसमोर बसले होते. देवीला विचारत होते की, आज सत्संगामध्ये कोणता भावप्रयोग घेऊ ? आणि एक भावप्रयोग मी डोळे मिटून मनातून देवीला सांगत होते. त्यानंतर मला ध्यानमंदिरात देवीच्या आवाजासारखा आवाज ऐकू आला; म्हणून मी डोळे उघडले. तेव्हा सद्गुरु बिंदाताई ध्यानमंदिरात एका साधिकेशी सेवेसंदर्भात बोलत होत्या. त्या वेळी मला जाणवत होते, मी त्यांना पहाते आणि त्यांचा आवाज माझ्या कानी पडतो. हा क्षण अनुभवतांना पुष्कळ सारा आनंद घेता येत होता.
- कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०१६)

कु. भाग्यश्री लोळसुरे यांनी प.पू. डॉक्टरांना लिहिलेले कृतज्ञता पत्र !

परम पूजनीय गुरुमाऊलीस,

शिरसाष्टांग नमस्कार !
प.पू. डॉक्टर, मी काढलेली श्रीकृष्णाची चित्रे तुम्हाला आवडल्याचे समजले. यानंतर आश्रमातून आलेला प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र पाहिले अन् माझ्या मनात कृतज्ञताभाव जागृत झाला. श्रीकृष्णाचे चित्र पहाताच त्याला घट्ट मिठी मारावी, असे मला वाटते. त्याला सोडून एक क्षणही जात नाही. हे चित्र पाहिल्यानंतर मला संत मीराबाईचे पुढील भजन आठवले.
 
वस्तु अमोलक दी मेरे सतगुरु किरपा कर अपनायो ।
पायो जी मैंने राम रतन धन पायो ॥
प.पू. डॉक्टर, मी तुमच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.
- कृष्णसखी, कु. भाग्यश्री लोळसुरे, निपाणी, जिल्हा बेळगाव.

निर्मळ मनाची, शिकण्याची वृत्ती असलेली आणि बालसाधकांना योग्य दृष्टीकोन देणारी त्यांची आवडती ताई : ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १२ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे 
हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ऐश्‍वर्या जोशी एक दैवी बालक आहे !
कु. ऐश्‍वर्या जोशी
      कार्तिक कृष्ण पक्ष द्वितीया (१६.११.२०१६) या दिवशी कु. ऐश्‍वर्या जोशी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रामनाथी आश्रमातील बालसाधकांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
      ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
      यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
कु. ऐश्‍वर्या जोशी हिला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त आशीर्वाद !

साधना करण्यासंदर्भातील स्वेच्छा ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असणे !

   साधनेत सांगतात, स्वेच्छा नको. प्रथम सर्व परेच्छेने करण्यास शिका. नंतर ईश्‍वरेच्छा काय आहे ते कळेल आणि त्यानुसार सर्व करा. असे जरी असले, तरी साधना करण्यासाठी सर्वस्व सोडण्याचा विचार करण्याची स्वेच्छा झाली, तरी ती योग्यच आहे. ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देवाने भेट दिला देव । कृतज्ञता देवापाशी ॥

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
   प.पू. डॉक्टर, आश्रमातून आलेला प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र आमच्यासाठी खरंच अतिशय अनमोल आहे. त्यासाठी तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ही कृतज्ञता मी माझ्या तोडक्या-मोडक्या शब्दांतून मांडण्याचा येथे प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावी आणि काही चूक झाली असल्यास क्षमा करावी, ही प्रार्थना. 

मागायचे असे काही, आता उरलेच नाही ।
मागण्याच्या आधीच तू, दिलेस सर्वकाही ॥ १ ॥

कर्नाटकातील साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा असणारे आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी झटणारे सद्गुरु (श्री.) सत्यवान कदम !

सद्गुरु (श्री.) सत्यवान कदम
१. सद्गुरु (श्री.) सत्यवानदादा म्हणजे अव्यक्त शक्ती, चैतन्य आणि प्रेमभाव
यांचे स्वरूप असून त्यांच्या अस्तित्वाने कर्नाटकातील साधकांना त्याचा लाभ होणे
    गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकातील साधकांना सद्गुरु (श्री.) सत्यवानदादांचे अस्तित्व आणि मार्गदर्शन यांचा लाभ मिळत आहे. हे कर्नाटकातील साधकांचे महत्भाग्य आहे. आज कर्नाटकातील साधकांची आध्यात्मिक उन्नती आणि धर्मप्रसाराच्या कार्यात ज्याप्रमाणे सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादांमुळे प्रेरणा मिळाली, त्याचप्रमाणे सद्गुरु (श्री.) सत्यवानदादांचे कर्नाटकातील साधकांवरील कृपाशीर्वाद, प्रेमभाव आणि साधकांच्या उन्नतीची तीव्र इच्छाही साधक साधनेत पुढे-पुढे जाण्यास कारणीभूत झाली आहे. भारताचे संरक्षण आणि हिंदु धर्म टिकून रहाण्यास हिमालयातील ऋषी-मुनींची साधना अन् त्यांची कृपादृष्टी हे प्रमुख कारण आहे, असा धर्मग्रंथांत उल्लेख आहे. हे सूक्ष्म असल्याने समाजाच्या लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरु (श्री.) सत्यवानदादांचे साधकांवरील अव्यक्त प्रेम आणि कृपाशीर्वाद यांची शक्ती आज कर्नाटकातील साधकांना अनुभवता येत आहे, असे मला वाटते. साधकांच्या प्रगतीसाठी झटणारे सद्गुरु (श्री.) सत्यवानदादा आणि संत यांच्या चरणी कितीही कृतज्ञता अर्पण केली, तरी ती न्यून पडेल. अशा रीतीने साधकांसाठी संरक्षणाची भक्कम भिंत उभारणारे प.पू. गुरुदेव आणि संतांच्या चरणी कोटी कोटी नमन ! 

सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या प्रबोधनाचे फलक हिंदु धर्मजागृती सभांच्या प्रदर्शनात लावा !

      हिंदु धर्मजागृती समिती द्वारे आयोजित हिंदु धर्मजागृती सभांना येणार्‍या समाजप्रेमी, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांना सध्याची सामाजिक दु:स्थिती लक्षात यावी, तसेच ही दु:स्थिती पालटण्यासाठी समाज कृतीशील व्हावा या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीतर्फे सामाजिक समस्यांविषयी प्रबोधन करणारे फलक बनवण्यात आले आहेत. हिंदु धर्मजागृती सभांतील व्याख्यानाला अनुसरून शिक्षण, आरोग्य आदी सामाजिक समस्यांच्या संदर्भातील २.२५ ३ या आकारातील १ आणि ६ ४ फूट आकारातील ४ फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रदर्शनातील अन्य फलकांसोबत हे फलकही धर्मजागृती सभांच्या प्रदर्शनांत लावावेत, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

दत्तजयंतीविषयी प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

     दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रबोधन करणारे पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर ठेवण्यात आले आहे.
१. ए-५ (पाठपोट) आकारातील प्रबोधनपर हस्तपत्रक
२. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी २.२५ X ३.५ फूट आकारातील १ फ्लेक्स फलक
या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
व्यावहारिक प्रश्‍न आणि संत
     संत उत्स्फूर्तपणे बोलतात ते खरे. एखाद्याच्या प्रश्‍नाला लगेच उत्तर दिले तर ते खरे समजायचे, थोड्या वेळाने दिले तर ते खोटे असू शकते. एखाद्याने प्रश्‍न विचारल्यावर संत उत्तर देतात, ते बहुधा त्याला बरे वाटावे असे असते. (हे उत्तर बिंब- प्रतिबिंब या न्यायाने असते; म्हणजे त्याला जे उत्तर हवे असते (बिंब), त्याचे प्रतिबिंब संतांच्या मनात पडून ते त्याप्रमाणे सांगतात.) संतांना व्यवहारातील प्रश्‍नांविषयी, म्हणजे मायेविषयी, काहीही सांगायला आवडत नाही. संत अध्यात्मविषयक प्रश्‍नांची उत्तरे आवडीने सांगतात आणि ती कधीच चुकीची असत नाहीत.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदूंनो, साधना करून ईश्‍वराचा आशीर्वाद मिळवल्यावरच
हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, हे लक्षात घ्या !
     ईश्‍वराच्या आशीर्वादाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्‍वराच्या आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. यासाठी हिंदूंनो, साधना करून ईश्‍वराचा आशीर्वाद मिळवा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे !
भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, 
म्हणजे त्याच्याही नकळत त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

‘समष्टी’ गुणांची वृद्धी हवी !

संपादकीय
      पाचशे आणि एक सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित केल्यानंतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यांनी गोव्यात केलेल्या भाषणात नागरिकांकडे ३० डिसेंबरपर्यंत मुदत मागितली आहे. या काळात टप्प्याटप्प्यांनी नोटांचा तुटवडा भरून काढणे आणि त्या बँकांना उपलब्ध करून देणे यांवर त्यांचा भर असणार आहे. सर्वपक्षीय राज्यकर्ते आणि काही प्रसारमाध्यमे यांनी मोदी यांच्या या निर्णयाला विरोध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला; मात्र गेले काही दिवस मोदी यांना सामाजिक संकेतस्थळे आणि अन्य माध्यमे यांद्वारे मिळत असलेला प्रतिसाद पहाता ‘जनता खंबीरपणे त्यांच्या मागे उभी आहे’, हे लक्षात येते. मागील काही दिवस अधिकोषांसमोर असलेल्या मोठमोठ्या रांगा, नागरिकांना होत असलेल्या अडचणींविषयी बरेच लिहिले-बोलले गेले. हे सर्व होतांना त्रास होत असल्याचे जरी जनतेने सांगितले असले, तरी शासनाच्या या निर्णयाचे सामान्य जनतेने स्वागतच केले. यावरून काही सूत्रे अधोरेखित होतात. राष्ट्रहितासाठी शासनाने कठोर निर्णय घेतल्यास जनता त्याचे नक्कीच स्वागत करील आणि प्रसंगी त्रास भोगण्यासही सिद्ध आहे, हे आता स्पष्ट झाले; मात्र असे करतांना आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी, याविषयी नागरिकांचे प्रबोधन करावे लागणार, हेही तितकेच खरे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn