Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे ६१ वे संत पू. अनंत 
पाटीलआजोबा यांचा आज वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

गुरुनानक जयंती

------------------------------------------

कार्तिकस्वामी दर्शन

------------------------------------------

आज त्रिपुरारि पौर्णिमा

दिनविशेष


आज तुळशी विवाह समाप्ती

७० वर्षांचा रोग १७ महिन्यांमध्ये बरा करायचा आहे, मला ३० डिसेंबरपर्यंत मुदत द्या !

पंतप्रधान मोदी यांचे जनतेला आवाहन
        पणजी - मी देशासाठी घर आणि कुटुंब सोडले आहे. मी खुर्चीसाठी जन्माला आलेलो नाही. त्यामुळे खुर्चीसाठी देश चालवणार नाही. ७० वर्षांचा रोग १७ महिन्यांमध्ये बरा करायचा आहे. लोकांना होणार्‍या त्रासाची कल्पना आहे; मात्र देशवासियांनी ३० डिसेंबरपर्यंत मला मुदत द्यावी. हे ५० दिवस त्रास सहन करावा. त्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल. त्यानंतर देशाने कोणतीही शिक्षा दिली, तरी ती मला मान्य असेल, असे भावूक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ नोव्हेंबर या दिवशी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, तुये येथील इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर आणि गोवा शिपयार्डचा फेज ३ ए या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी झाली. या वेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या धनाविषयीच्या निर्णयासंदर्भातील विरोधकांच्या टीकेला वरील प्रकारे आक्रमक प्रत्युत्तर दिले. 
        सत्ता टिकावी म्हणून भ्रष्टाचाराशी तडजोड करणार नाही. काळेधन आणि भ्रष्टाचार मिटवण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे. यापुढे काळा पैसा जमवणार्‍यांच्या विरोधात अजून काही कठोर पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण भाषणात नरेंद्र मोदी दोन वेळा भावूक झाले. 

बँकेतून रोख रक्कम काढून घरात ठेवू नका ! - रिझर्व्ह बँकेचे नागरिकांना आवाहन

        नवी देहली - बँका आणि एटीएम्मधून वारंवार रोख रक्कम काढून घरात ठेवू नका, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने जनतेला केले आहे. 
        कमी मूल्याच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच रिझर्व्ह बँकेची देशातील कार्यालये आणि बँकांच्या एटीएम्मध्ये मोठ्या प्रमाणात नोटा उपलब्ध आहेत. त्यामुळे त्रस्त होण्याचे कोणतेही कारण नाही. तुम्ही हवी तेव्हा रोकड काढू शकता, असेही बँकेने तिच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. 
एटीएम्मध्ये नवीन ट्रे लावणार !
        एटीएम् बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. देशभरातील ४ सहस्र ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत येणार्‍या कार्यालयांमध्ये पुरेशी रक्कम आहे; पण नव्या नोटांसाठी एटीएम् मशीनमध्ये ट्रे लावण्यात आलेले नाहीत. त्यासाठी किमान २ आठवडे लागतील, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. नागरिकांनी सध्या बँकांमध्ये गर्दी करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी अधिकाधिक ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही जेटली यांनी केले आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आगप्रतिबंधक सुरक्षा व्यवस्थेची कार्यवाहीच नाही !

विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात 
घालणारे पुणे शिक्षण मंडळ !
        पुणे, १३ नोव्हेंबर - अग्निशामक उपकरणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये बसवण्याविषयीचा निर्णय होऊनही अद्याप ती उपकरणे शाळांमध्ये बसवण्याचे नियोजनच झालेले नसल्याचे उघड झाले आहे. (शिक्षण मंडळाचा भोंगळ आणि हलगर्जी कारभार ! - संपादक)
१. राज्य सरकारने प्रत्येक शाळांमध्ये आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था असणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर महानगरपालिकेने ३ वर्षांपूर्वी शिक्षण मंडळांच्या शाळांसाठी आग प्रतिबंधक उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा काढली. 
२. त्याप्रमाणे तशी उपकरणे खरेदी करून ती शाळांमध्ये बसवली होती. त्यानंतर विशिष्ट मुदतीत ती उपकरणे वापरली गेली नाहीत, तर ती निकामी होतात; म्हणून नवीन उपकरण बसवण्याऐवजी हायड्रंट यंत्रणा बसवण्याचा निर्णय झाला. त्यासाठी २ कोटी ३ लक्ष रुपयांची तरतूदही केली.
३. त्यानंतर १ वर्ष होऊनही या निविदांवर काहीही प्रक्रिया झालेली नाही. ज्या ठिकाणी सिलेंडर बसवण्यात आले होते, ते सिलेंडर आता निकामी झालेली असून त्यावर अद्यापही काही ठोस उपाययोजना झालेली नाही. 
४. पालिका अधीक्षक अभियंता आणि शिक्षण मंडळ प्रशासन प्रमुख यांना याविषयी विचारले असता त्यांनी याविषयी काहीच माहिती नाही, तरतूद अद्याप मिळाली नाही, अशी उत्तरे त्यांच्याकडून मिळाली. (दायित्वशून्य अधिकारी ! - संपादक)

नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांना ४६० कोटी रुपयांचा तोटा !

नक्षलवाद्यांच्या कारवाया न्यून होणार !
       नवी देहली - केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम काळा पैसा साठवून ठेवणार्‍यांवर झाला, त्याचबरोबर पाक आणि दाऊद इब्राहिम यांच्यावरही झाला आहे. त्यासमवेत भारतातील नक्षलवाद्यांनाही तो झाला आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार नक्षलवाद्यांना या निर्णयामुळे ४६० कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. यामुळे नक्षलवाद्यांच्या कारावायांमध्ये घट होेण्याची शक्यता आहे.
       गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार नक्षलवाद्यांना शस्त्र, गोळ्या, स्फोटके आदी साहित्य विकत घेण्यासमवेतच त्यांना देण्यात येणार्‍या पैशांवरही परिणाम झाला आहे.

दक्षिण भारतातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवा !

देहलीच्या जंतरमंतर येथील 
राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी !

आंदोलन करतांना धर्माभिमानी

        नवी देहली - दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांत गेल्या काही महिन्यांपासून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. येथील पोलीस या हत्या आणि आक्रमणे वैयक्तिक वादातून होत असल्याचे सांगत आहेत; मात्र नुकत्याच अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्याने मान्य केले की, या हत्यांमागे एक सुनियोजित आणि व्यापक षड्यंत्र आहे. तसेच त्याच्याकडे काही हिंदु नेत्यांची सूचीही सापडली आहे. त्यामुळे या हत्यांचे आणि आक्रमणांचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआयला) सोपवण्यात यावे, अशी मागणी येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलनाद्वारे करण्यात आली.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे प्राचार्यांचे शिफारसपत्र

शिक्षणक्षेत्राचा बाजार !
      पुणे, १३ नोव्हेंबर - अभियांत्रिकी परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीच शिफारसपत्र दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (प्राचार्यच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याविषयी सांगत असतील, तर शिक्षणक्षेत्र आणि विद्यार्थी यांचा दर्जा उंचावणार कधी ? अशा प्रकारांमुळेच पदवी असून लायक नसलेल्या विद्यार्थ्यांची फळी प्रतीवर्षी बाहेर पडत आहे. हे थांबवायचे असेल, तर मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धती त्यागून आदर्श गुरुकुल शिक्षणपद्धतीचा स्वीकार करणे आवश्यक आहे ! - संपादक) 
१. अभियांत्रिकी विद्याशाखेच्या निकालानंतर काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. त्याचा निकालही विद्यापिठाकडून लावण्यात आला.
२. तीन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात जाण्याची सोय असते; मात्र चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळत नाही. 

सांगवी (पुणे) येथे देवतेचे विडंबन करणारा फलक पालटला !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम !
       पुणे, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील गौरीशंकर टी कंपनी या दुकानावर लावलेला भगवान शंकराचे विडंबन करणारा फलक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन केल्यानंतर पालटला. 
१. श्री. पंडित किणीकर यांचा मालकीचे गौरीशंकर टी कंपनी हे दुकान असून येथे चहाचा किरकोळ आणि घाऊक व्यापार चालतो. 
२. दुकानावरील फलकावर भगवान शंकराच्या पिंडीतून चहा पडून त्याखाली ठेवलेल्या कपबशीत तो पडतांना दाखवला होता. 
३. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. पराग गोखले आणि धर्माभिमानी श्री. चंद्रकांत भोईटे यांनी त्या फलकाद्वारे विडंबन कसे होते, हे श्री. किणीकर यांना दर्शवून दिले. श्री. किणीकर यांनी ते स्वीकारून तत्परतेने फलकावरील विडंबनात्मक भाग पालटला. (तत्परतेने पालट करणारे असे हिंदू हीच हिंदु धर्माची शक्ती आहेत. - संपादक) तसेच चहाच्या पिशव्यांवर असणार्‍या चित्रावरही रंग देऊन त्यात पालट करू, असे सांगितले. 
४. या वेळी श्री. किणीकर यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली, तसेच ते दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले. 

दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक खोट्या नोटा शासनाधीन

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पहाणार्‍यांचे उगमस्थान शोधून ते कधी नष्ट करणार ?
      मुंबई - वर्ष २०१५ च्या राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार वर्ष २०१२ ते २०१४ या कालावधीत खोट्या नोटा शासनाधीन करण्यामध्ये दिल्लीनंतर महाराष्ट्र हा दुसर्‍या क्रमांकावर होता. 
१. पोलीस, अन्य तपास यंत्रणा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी त्या कालावधीत १२५ कोटी रुपयांच्या खोट्या नोटा शासनाधीन, तर ३ सहस्र ६५६ जणांना अटक केली होती. या प्रकरणांचा अन्वेषण प्रामुख्याने केंद्रीय अन्वेषण विभाग आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्याकडून करण्यात येतो.

राज्यातील १२१ सहकारी संस्थांवर आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणी फौजदारी कारवाई ! - सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी

सहकार क्षेत्रातील बजबजपुरी !
      पुणे, १३ नोव्हेंबर - राज्यातील विविध १२१ प्रकारच्या सहकारी संस्थांतील २०७ कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणी सहकार विभागाने फौजदारी कारवाई केल्याची माहिती सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली. (अपहाराला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होईपर्यंत सहकार विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. - संपादक)
१. सीकेपी सहकारी बँक, पार्श्‍वनाथ ग्रामीण बिगरशेती संस्था, इतर सहकारी बँका, पतसंस्था आणि विविध कार्यकारी संस्था यांचे वर्ष २०१४-१५ आणि वर्ष २०१५-१६ मध्ये लेखापरीक्षण केले होते. त्यात अपहार झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार या संस्थांवर कारवाई केली आहे. 
२. या प्रकरणी ६६९ पदाधिकारी आणि संचालक, १८० अधिकारी अन् कर्जदार, ४८८ इतर व्यक्ती यांच्यावर त्या त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांत गुन्हे प्रविष्ट केले आहेत.

काळा पैसा पांढरा करण्यासंदर्भातील गुगलवरील शोधात महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर

     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काळा पैसा पांढरा कसा करावा, या माहितीचा गुगलवर मोठ्या प्रमाणात शोध घेतला गेला. त्यामुळे काळ्या पैशांचा विषय गुगलवर ट्रेंडच बनला. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून काळा पैसा पांढरा करण्याविषयीची माहिती शोधणार्‍या भारतियांचे प्रमाण पुष्कळ असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर गुजरात, दुसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्र, तर तिसर्‍या क्रमांकावर हरियाणा हे राज्य होते. (आता तर सरकारचे काम अजूनच सोपे झाले. काळा पैसा पांढरा करण्याविषयीची माहिती शोधणार्‍यांना शोधून काढून सरकारने त्यांची चौकशी करावी ! - संपादक)

पोस्ट कार्यालय सांगितल्याप्रमाणे लवकर न उघडल्याने संतप्त तरुणांकडून दगडफेक

      भुसावळ, १३ नोव्हेंबर - येथील स्टेशन रस्त्यावरील मुख्य पोस्ट कार्यालय १० वाजेपर्यंत उघडले नसल्याच्या कारणावरून काही संतप्त तरुणांनी पोस्ट कार्यालयाच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे कार्यालयाच्या काचा फुटल्या. ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटण्यासाठी नागरिकांनी पोस्ट कार्यालयाजवळ गर्दी केली होती. नोटा पालटण्यासाठी पोस्ट कार्यालय आणि अधिकोष नियमित वेळेपेक्षा लवकर चालू होतील, असे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. कार्यालय बंद असल्याचे पाहून नागरिकांनी त्यांचा रोष प्रकट केला. कार्यालयात घुसून ते टेबल-खूर्ची यांचीही मोडतोड करण्यास आरंभ केल्यानेे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी तरुणांनी गोंधळ घालून आरडाओरडा केला. यामुळे पोस्ट ऑफीसमधील कर्मचारी भयभीत झाले होते. पोस्ट कार्यालयाने मात्र पत्रकारांना कामकाज ११ वाजल्याशिवाय चालू होत नसल्याने कार्यालय निर्धारित वेळेच्या आधी उघडता आले नाही, असे सांगितले. (शासनाने पोस्ट लवकर उघणार असे घोषित केले होते, तर त्यानुसार पोस्ट लवकर उघडणे अपेक्षित होते किंवा तसे जमणार नव्हते तर तशी सूचना त्यांनी लावणे अपेक्षित होते. - संपादक) या प्रकारानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

(म्हणे) नोटा पालटण्याचे पूर्वनियोजन आवश्यक होते !

५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित केल्याचे प्रकरण !
काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांचा विरोधासाठी विरोध
     पणजी, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - भाजप शासनाने चलनातून ५०० आणि १ सहस्र नोटा रहित करण्यापूर्वी पर्यायी नोटांची मुबलक प्रमाणात व्यवस्था करणे आवश्यक होते. यासंबंधी पूर्वतयारी करण्यास केंद्रशासन अल्प पडल्याने सामान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेले आहेत, असा आरोप अ.भा.काँग्रेसचे सरचिटणीस तथा गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी केला आहे. (१०० आणि ५०० रुपयांच्या नोटा आधीच मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये साठवून ठेवल्या असत्या, तर काहीतरी होणार आहे, याची चाहूल काळा पैसा साठवणार्‍यांना लागली असती. त्यामुळे केवळ २ सहस्र रुपयांच्या नवीन नोटाच पूर्वनियोजनात बँकांत पाठवण्यात आल्या. हे सर्वसामान्य नागरिकांना समजले; पण विरोधक मात्र सहकार्य करण्याऐवजी विरोधासाठी विरोध करत आहेत. - संपादक)

मोपा विमानतळ हे गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड !

     मोपा, गोवा येथे विमानतळ प्रकल्प होत आहे. गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात होणारा हा प्रकल्प गोवा राज्य, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचा भाग ठरणारा आहे. 
२५ वर्षांनंतर मिळत आहे मोपा विमानतळाला मूर्त स्वरूप 
     १९९० वर्षीपासून या मोपा विमानतळ उभारणीसाठी प्रयत्न चालू आहेत. तब्बल २५ वर्षांनंतर याला मूर्त स्वरूप मिळणार आहे. हा विमानतळ प्रकल्प प्रारंभीपासून वादात सापडला होता. या विमानतळामुळे गोव्यात चालू असलेला दाबोळी विमानतळ बंद केला जाईल, अशी भीती दाखवून दक्षिण गोव्यातील राजकीय पुढारी आणि काही नेते या मोपा विमानतळाला तीव्र विरोध करत होते. आंदोलने केल्याने राजकीय स्वरूप प्राप्त झालेला हा विमानतळ प्रकल्प होणार कि नाही, याविषयी अनिश्‍चितता निर्माण झाली होती. यासाठी बांद्यातूनही आंदोलन झाले होते.

सुट्या पैशांच्या अभावी नवीन २ सहस्र रुपयांची नोट ठरते आहे तापदायक !

     मुंबई - जुन्या नोटा अधिकोषात भरणा केल्यानंतर तेथे मिळणारी २ सहस्र रुपयांची नोट सुट्या पैशाच्या अभावी सर्वसामान्य नागरिकांना व्यय करण्यासाठी तापदायक ठरू लागली आहे. त्यामुळे २ सहस्र रुपयांची नोट घेण्यास कोण सिद्ध होत नाही आणि व्यय करण्यासाठी 'असून अडचण नसून खोळंबा', अशी विचित्र अवस्था सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. बाजारात १०० रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी व्यापारी २ सहस्र रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास सिद्ध नाहीत.

किरणोत्सवातील अडथळे दूर करण्याच्या आयुक्तांच्या सूचना !

श्री महालक्ष्मी देवीचा किरणोत्सव 
     कोल्हापूर, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - ९ नोव्हेंबरपासून श्री महालक्ष्मी किरणोत्सवाला प्रारंभ झाला होता. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मूर्तीच्या किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी ढगाळ वातावरण आणि सूर्यकिरणांची तीव्रता अल्प असल्याने केवळ मूर्तीच्या गळ्यापर्यंत सूर्याची किरणे पोचून ती लुप्त झाली. त्यामुळे अखेरच्या दिवशी किरणे मूर्तीच्या चेहर्‍यावर पडून किरणोत्सव पूर्ण होईल, ही अपेक्षा फोल ठरली. त्यानुसार पहिल्या दिवशी सूर्यकिरणे श्री महालक्ष्मी मूर्तीच्या चरणापर्यंत, दुसर्‍या दिवशी कमरेपर्यंत आणि तिसर्‍या दिवशी गळ्यापर्यंत आली होती.

बंगालच्या मालडा जिल्ह्यात काळा पैसेवाले गरिबांच्या खात्यात भरत आहेत पैसे !

      मालडा (बंगाल) - बंगालचा मालडा जिल्हा बनावट नोटांचे केंद्र मानले जाते. भारत-बांगलादेश सीमेजवळील या जिल्ह्यातील कालियाचाक, सुजापूर, मोजंपूर, बैश्‍नाबनगर इत्यादी भागांत बांगलादेशमधून बनावट नोटा घुसवल्या जातात. त्यामुळे हा भाग राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या रडारवर आहे. हे क्षेत्र काळा पैसेवाल्यांचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित केल्याचा निर्णय घेतल्याने मालडा जिल्ह्यातील श्रीमंत व्यापार्‍यांनी त्यांच्याकडील काळा पैसा येथील गरीब शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणे चालू केले आहे. गरीब शेतकर्‍यांच्या वापरात नसलेल्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भरण्यात येत आहे आणि त्याच्या बदल्यात या शेतकर्‍यांना २-३ सहस्र रुपये दिले जात आहेत. अशा प्रकारे मालडा जिल्ह्यात गरीब शेतकर्‍यांची बँक खाती विक्रीला काढण्यात आली आहेत.

राममंदिरासाठी भाजप कटीबद्ध ! - अमित शहा

केवळ कटीबद्ध राहून उपयोग नाही, 
तर कृतीशील होण्याची आवश्यकता आहे 
     लक्ष्मणपुरी - राममंदिराविषयी भाजपचे धोरण स्पष्ट आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाच्या निर्णयाने किंवा सर्वसंमतीने यावर निर्णय घेण्यात येईल. राममंदिराच्या उभारणीसाठी भाजप कटीबद्ध आहे, असे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे केले. डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी राममंदिराविषयी केलेल्या विधानाविषयी अमित शहा यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. डॉ. स्वामी यांनी डिसेंबर२०१६ पासून राममंदिर उभारण्यास प्रारंभ होईल, असे म्हटले आहे. 

पिंपरी (पुणे) येथे गोरक्षकांनी गोमांस घेऊन जाणार्‍या ३ धर्मांधांना केले पोलिसांच्या स्वाधीन

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणीची अपरिहार्यता दर्शवणारी घटना !
      पिंपरी, १३ नोव्हेंबर - येथील रहाटणी भागातील कोकणे चौक येथे मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जाणार्‍या ३ धर्मांधांना गोरक्षकांनी १२ नोव्हेंबर या दिवशी वाकड पोलिसांच्या स्वाधीन केले. 
१. तन्वीर अहमद याकीन अली शेख, जाकीर हुसेन अब्दुल हसन आणि सिराजद्दीन अन्सारी यारमहमंद अन्सारी हे तिघे एका मालवाहू टेम्पोतून भाजीपाल्याचे क्रेट लावून गोमांस घेऊन जात होते. 
२. अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे श्री. शिवशंकर स्वामी यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तो टेम्पो पकडला. त्या वेळी चालकाकडे चौकशी केली असता त्याने आरंभी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र नंतर टेम्पोत मांस असल्याचे सांगितले. 

जळगाव जिल्हा रुग्णालयात परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू !

नागरिकांच्या जीवनाचे मूल्य नसणारे रुग्णालयाचे संवेदनशून्य कर्मचारी ! 
     जळगाव, १३ नोव्हेंबर - येथील जिल्हा रुग्णालयातील एका परिचारिकच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्ण महिलेचा जीव गेला. त्यानंतर त्या परिचारिकेकडून रुग्णाच्या नातेवाइकांना हे प्रकरण मिटवण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात संताप व्यक्त करीत गोंधळ घातला. (असे निर्ढावलेले रुग्णालय कर्मचारी रुग्णांची काळजी घेऊ शकणार का ? प्रशासनाने अशांवर विनाविलंब कारवाई करून त्यांना बडतर्फ करणेच अपेक्षित ! - संपादक) 

राज्यातील विनाअनुदानित महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाकडे पाठ

    पुणे, १३ नोव्हेंबर - राज्यात १ सहस्र ७०९ विनाअनुदानित महाविद्यालये असून केवळ ११० महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून उर्वरित महाविद्यालयांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. (उच्च शिक्षण विभागाचे आदेश पालन न करणारी महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या सूचना घेत असेल कशावरून ? - संपादक) त्यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घेण्यास उच्च शिक्षण विभाग हतबल ठरत असल्याचे दिसून येत आहे. (याऐवजी त्या महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करायला हवी. - संपादक)
    राज्यात एकूण २८ शासकीय महाविद्यालयांपैकी २३ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन न केल्याने उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. त्या महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावे, असे उच्च शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. 

देशाचे सैनिक त्याग करतात, तर आपण का करू शकत नाही ? - योगऋषी रामदेवबाबा

       लक्ष्मणपुरी - देशाचे सैनिक ७-८ दिवस काही न खाता सीमेचे रक्षण करतात; मग आपण देशाचे नागरिक म्हणून थोडा त्रास सहन करू शकत नाही का ?, असा प्रश्‍न योगऋषी रामदेवबाबा यांनी केला आहे. २ सहस्र रुपयांच्या नोटा सरकारने चलनात आणू नयेत किंवा आणल्या तर त्या अल्प प्रमाणातच आणाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. मोदी सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे. लोकांना त्रास होत आहे, तो दूर करण्यासाठी सरकारचेसुद्धा प्रयत्न चालू आहेत. तेव्हा लोकांनी मोदी यांना दोष देऊ नये, असेही योगऋषी रामदेवबाबा म्हणाले.

मराठी बोला चळवळ संघटनेच्या प्रयत्नांमुळे नेरूळ रेल्वेस्थानकाचे मुख्य नाव मराठीत !

रेल्वे स्थानकाचे नाव मराठी भाषेत करण्यासाठी
प्रयत्न करणार्‍या मराठी बोला चळवळ संघटनेचे अभिनंदन !
महाराष्ट्रातच मराठीत नाव लिहिण्यासाठी असे निवेदन का
द्यावे लागते ? प्रशासनाने हे यापूर्वीच स्वतःहून करणे अपेक्षित होते !
१. नेरुल असे लिहिलेला जुना फलक
२. पालटलेला नवीन फलक
      नवी मुंबई, १३ नोव्हेंबर - हार्बर रेल्वे मार्गावरील नेरूळ रेल्वेस्थानकाच्या फलकांवरील मुख्य नाव नेरूल असे होते. ते मराठी भाषेत करण्यासाठी मराठी बोला चळवळ संघटनेने चालू केलेल्या मोहिमेचा परिणाम म्हणून रेल्वेस्थानकावरील फलकांवर मुख्य नाव नेरूळ असे केले आहे.
१. २ जून या दिवशी मराठी बोला चळवळ संघटनेने नेरूळ रेल्वेस्थानकाच्या फलकांवर मराठीत नाव देण्यासाठीची मोहीम चालू केली. संघटनेचे स्वप्नील बाम्हणे यांनी रेल्वेस्थानकावर प्राधान्याने मराठी भाषेत नाव लिहावे, असे निवेदन स्थानक प्रबंधकांकडे दिले. त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

(म्हणे) भविष्यात सरकार सामान्य शेतकर्‍यांवरही कर लावेल !

ज्यांच्या पक्षाने शेतकर्‍यांना देशोधडीला लावले त्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे फुकाचे बोल 
     सांगली, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - सध्या साखर कारखाने मोडीत काढण्याचे सरकारचे प्रयत्न चालू आहेत. हे कारखाने शेतकर्‍यांचे आहेत. शेतीची इतकी हानी होत आहे, तर हे राज्य नेमके कोणासाठी आहे, सरकार नेमके काय करत आहे ? यामुळे भविष्यात सामान्य शेतकर्‍यांवरही शासन कर लावेल, अशी भीती सामान्यांना वाटत आहे, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. (ज्यांच्यावर आदर्श प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना इतरांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार आहे का ? - संपादक) सांगलीत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
या प्रसंगी अन्य काही काँग्रेसी नेत्यांनी व्यक्त केलेली मते... 

पुणे रेल्वे स्थानकात प्रवासी आणि सुरक्षा कर्मचारी यांंमध्ये मारामारी

      पुणे, १३ नोव्हेंबर - रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी उत्तर भारतियांकडून पैशांची लूट करत असल्याच्या कारणावरून पुणे रेल्वे स्थानकामध्ये १२ नोव्हेंबरला रात्री उत्तर भारतीय प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी यांच्यामध्ये मारामारी झाली. यामध्ये धारदार शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आल्याने सुरक्षा दलाचा एक कर्मचारी गंभीररित्या घायाळ झाला आहे. या प्रसंगी गार्‍हाणे नोंदवण्याऐवजी २५ ते ३० जणांच्या जमावाने सुरक्षा कर्मचार्‍यांवर आक्रमण केले.

काश्मीरमध्ये पाकसाठी हेरगिरी करणार्‍या दोघांना अटक !

अशा देशद्रोह्यांवर तात्काळ खटला 
चालवून कठोरातील कठोर शिक्षा करायला हवी !
      जम्मू - काश्मीरच्या आर्एस् पुरा सेक्टरमधून पाकसाठी हेरगिरी करणार्‍या सतविंदर सिंह आणि दादू नावाच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ते व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पाकला माहिती पुरवत होते. हे दोघे सुचेतगड येथील सीमा भागात संशयास्पदरित्या फिरून तेथील छायाचित्रे काढत होते. सुरक्षादलांनी त्यांना कह्यात घेल्यावर ते भारतीय सैन्याची माहिती गोळा करून व्हॉटस अ‍ॅपवरून पाकला पाठवत असल्याचे उघड झाले.

शीला दीक्षित यांचा जावई इमरान याला अटक !

      नवी देहली - देहलीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे जावई सय्यद महंमद इमरान याला अटक करण्यात आली आहे. दीक्षित यांची कन्या लतिका आणि इमरान १० महिन्यांपूर्वीच विभक्त झाले आहेत. लतिका यांनी इमरानच्या विरोधात शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार केली होती. 

पंढरपूरसह सर्वच तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक ! चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार ! 
      पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १३ नोव्हेंबर (वार्ता.) तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याविषयी निर्णय घेऊ, असे सूतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कार्तिक वारीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी ते येथे आले होते. भाजप नेते बागल यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी वरील विधान केले. (शासनाने या इच्छाशक्तीला लवकरात लवकर कृतीची जोड देऊन तीर्थक्षेत्रांचे होत असलेले पावित्र्य राखावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे. - संपादक)
    चंद्रकांत पाटील अन्य एका प्रश्‍नाला उत्तर देतांना पुढे म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील घोटाळ्याविषयी सीआयडी चौकशी चालू असून जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

शेतकर्‍यांना कोणताही कर भरावा लागणार नाही ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

     पुणे, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - नोटा पालट करण्याच्या निर्णयामुळे आज अनेक जण शेतकर्‍यांना चुकीचे मार्गदर्शन करत आहेत. शेतकर्‍यांना कर भरावा लागणार आहे, असे सांगत आहेत. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. हा देश, सरकार आणि मी स्वतः शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजी करू नये, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येथील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित 'आंतरराष्ट्रीय ऊस मूल्य साखळी परिषदे'चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, केंद्रीय मानव संशोधन आणि विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, 

सहआयुक्तांसमवेत चौघांवर आरोपपत्र प्रविष्ट करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील मूर्ती घोटाळा प्रकरण 
     पिंपरी (पुणे), १३ नोव्हेंबर - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती घोटाळ्यासंबंधी सहआयुक्त दिलीप गावडे यांच्यासह ४ जणांवर येत्या १५ दिवसांत आरोपपत्र प्रविष्ट करण्याचे आदेश पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रशासनाला दिले आहेत. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी ही २८ जून या दिवशी पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतून मार्गस्थ झाली होती. पालखी सोहळ्याचे स्वागत म्हणून पालिकेच्या वतीने दिंडी प्रमुखांना चादर आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली होती. यंदाच्या वर्षी हा सन्मान चालू असतांना अनेक मूर्ती गायब होण्याचा अजब प्रकार घडला होता. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी द्विसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. तिचा अहवाल समोर आल्यानंतर भांडार विभाग दोषी असल्याचे उघड झाले. (समितीला अहवाल देण्यास लागलेला वेळ हे कूर्मगतीचे निदर्शक ! यामुळे संबंधित घोटाळेबाजांना पुरावे नष्ट करण्यास पुरेसा वेळ दिल्यासारखेच आहे. - संपादक)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही पाचशे आणि सहस्र रूपयांच्या नोटा केवळ जमा करण्याची सोय

केंद्र शासनाच्या वित्त विभागाचे शुद्धीपत्रक
     मुंबई, १३ नोव्हेंबर - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा आता राज्यातील मध्यवर्ती सहकारी अधिकोषांमध्येही जमा करण्यात येणार आहेत; मात्र त्या ठिकाणी नोटा पालटून मिळणार नाहीत. यासंदर्भात केंद्रीय वित्त विभागाने शुद्धीपत्रक काढले आहे.

जन-धन खात्यांचीही चौकशी होणार !

      नवी देहली - केंद्र सरकारने जनधन योजनेंतर्गत गरीब आणि सामान्य लोकांसाठी अधिकोषांत मोठ्या संख्येने खाती उघडली आहेत. नोटा रहित झाल्यानंतर या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या रकमांत पैसे जमा होऊ लागले आहेत. अचानक गरिबांच्या या खात्यांमध्ये मोठ्या रकमा कशा जमा झाल्या, याची चौकशी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. मंत्रालयाने इंडियन बँक्स असोसिएशनला याची विस्तृत माहिती देण्याचा आदेश दिला आहे. या खात्यांचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी केला असल्याचा सरकारला संशय असल्याने ही चौकशी होणार आहे. खात्यात पैसे जमा करण्यासाठी या गरिबांना काही रकमांचे आमिष दाखवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
      ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरच्या कालावधीतील या नोंदीची चौकशी केली जाणार आहे. 

जळगाव येथे लावलेले चित्रपटाचे अश्‍लील होर्डिंग काढून टाकण्यास भाग पाडले !

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात 
येणार्‍या धर्माभिमानी युवकाची अभिनंदनीय कृती !
     जळगाव, १३ नोव्हेंबर - येथील भर बाजारपेठेत असणार्‍या राजकमल चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात इश्क जुनून या चित्रपटाचे अश्‍लील होर्डिंग लावण्यात आले होते. हिंदु जनजागृतीच्या समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्माभिमानी श्री. विजय कासार यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्परतेने अश्‍लील होर्डिंग काढण्यासाठी प्रयत्न केले. याच भागात कार्तिकी एकादशीच्या निमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याचे लक्षात घेऊन श्री. कासार यांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊन अश्‍लील हार्डिंग हटवण्याची मागणी केली. श्री. कासार यांनी या घटनेची माहिती दिल्यावर त्यांचे मित्र सर्वश्री रूपेश पाली आणि राजू भोई हेही प्रबोधनासाठी आले. त्यानंतर व्यवस्थापकांनी सदर आक्षेपार्ह फलक तत्परतेने हटवला.
     सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. आदित्य धर्माधिकारी यांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना या संदर्भात विचारले असता, नागरिकांच्या विरोधामुळे आम्ही सदर पोस्टर काढून टाकले असून पुढेही ते लावणार नसल्याचे सांगितले. धर्मशिक्षणवर्गात मिळणार्‍या धर्मशिक्षणामुळेच ही कृती करण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावना श्री. विजय कासार यांनी व्यक्त केली.

हुपरी येथे लाच प्रकरणी २ पोलीस निलंबित !

भ्रष्टाचाराने पोखरलेले पोलीस खाते ! 
     हुपरी (जिल्हा कोल्हापूर), १३ नोव्हेंबर (वार्ता.) - १० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत सावंत आणि हवालदार अप्पालाल मेस्त्री या दोघांना सापळा रचून अटक केली. या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. हुपरी येथे एका तरुणाने २३ जून या दिवशी आत्महत्या केली होती. या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी साहाय्यक पोलीस शशिकांत सावंत यांनी संबंधितांकडे २५ सहस्र रुपयांची मागणी केली होती.

न्यूझिलंडला ७.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का !

     ख्राईस्टचर्च (न्यूझिलंड) - येथून ९५ कि.मी. अंतरावर असणार्‍या न्यूझिलंडमधील एका बेटाला सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.५ इतकी मोजण्यात आली. २०११ मध्ये ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या भूकंपात १८५ जणांचा मृत्यू झाला होता. 
 महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, "हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे". (न्यूझिलंडच्या बेटावर ७.५ तीव्रतेचा भुकंपाचा धक्का बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

पुणे येथे अमली पदार्थाची विक्री करणार्‍या नायजेरियन युवकाला अटक

      पुणे, १३ नोव्हेंबर - अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या नायजेरियन युवकाला गुन्हे शाखेच्या पथकाने कोरेगाव पार्क परिसरात अटक केली. त्याच्याकडून २० सहस्र रुपयांचे कोकेन आणि ७ सहस्र रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. मोसेज अलोका फ्रान्सेस असे अटक केलेल्या युवकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पुरो(अधो)गामी संघटनांनी केलेल्या वामन पुतळा दहनाचा ब्राह्मण समाजाकडून तीव्र निषेध !

जातीद्वेषापोटी इतिहासाचा चुकीचा अर्थ पसरवून अघोरी 
कृत्यांनी समाजात तेढ निर्माण करणारे असहिष्णूच नव्हेत का ?
जिल्हाधिकार्‍यांंना निवेदन
      जळगाव, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आणि समविचारी पुरो(अधो)गामी संघटना यांनी मिळून बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा पूजन आणि वामन पुतळा दहन यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. शहरातील काव्य रत्नावली चौकात भगवान वामन यांचा पुतळा जाळण्यात आला. (या संघटना निवळ ब्राह्मणद्वेषातून अशी घृणास्पद कृत्ये करून समाजात जातीयवाद वाढवण्यास खतपाणी घालतात. बळीराजा गरीब होता आणि ब्राह्मणाने त्याच्यावर अत्याचार केले अशा प्रकारे धादांत खोट्या इतिहासाचे भांडवल करून जातीद्वेष पसरवणार्‍या अशा संघटनांवर शासन योग्य ती कारवाई करेल का ? प्रत्यक्षात भगवंताने बळीराजाला पाताळात पाठवून त्याचा उद्धार केला आणि त्यागाने त्याच्या जीवनाला कलाटणी देऊन त्याच्यावर उपकारच केले, असा सत्य इतिहास आहे. - संपादक)

राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी हयातीच्या डिजिटल दाखल्यासाठी रजिस्ट्रेशन करावे ! - राहुल कदम

     सांगली, १३ नोव्हेंबर - राज्य शासकीय निवृत्ती धारक, तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना हयातीच्या डिजिटल दाखल्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तरी सर्व निवृत्ती धारकांनी लवकरात लवकर रजिस्टेशन करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी केले आहे. 
    रजिस्ट्रेशन करण्यासाठी केवळ १० रुपये शासकीय शुल्क आकारण्यात येणार आहे. हयातीच्या डिजिटल दाखल्यासाठी रजिस्ट्रेशन न केल्यास माहे डिसेंबर २०१६ चे निवृत्ती वेतन मिळण्यास विलंब होऊ शकतो, तसेच निवृत्ती वेतन जमा होणार नाही. याचसमवेत अधिकोषात जाऊन कोषागारागाराकडून प्राप्त झालेल्या सूचीवर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. सुविधा केंद्रामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी जाते वेळी आधार कार्डची छायांकित प्रत/अथवा क्रमांक, पी.पी.ओ. क्रमांक (निवृत्ती वेतन आदेश क्रमांक), मोबाईल (स्वत: जवळ असणे अपेक्षित), अधिकोष, त्याची शाखा, खातेक्रमांक (अधिकोष पासबुक) ही कागदपत्रे घेऊन येणे अनिवार्य आहे !

राजभाषा कायद्याचे प्रयोजन नेमके काय ?

  • गोव्यात कोकणी भाषा बहुसंख्येने बोलली जात असतांनाही गोव्यातील लोक मराठी राजभाषा व्हावी, यासाठी चळवळ राबवतात,
  • तर महाराष्ट्रात मातृभाषा मराठी असतांनाही तेथील शिक्षणाचे इंग्रजीकरण होत आहे ! महाराष्ट्रातील जनतेने गोमंतकियांकडून आता मराठीचे महत्त्व जाणावे !
श्री. मच्छिंद्र च्यारी
      मराठी राजभाषा समितीच्या वतीने रविवार, १३ नोव्हेंबर या दिवशी हेडगेवार शाळा मैदान, मळा, गोवा येथे मराठी निर्धार मेळावा पार पडला. गोव्यात कोकणी समवेत मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी गोव्यातील मराठीप्रेमींची मागणी आहे. या मागणीने गेल्या काही मासांत जोर धरला आहे. गोव्यातील सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मराठी भाषेतच होतात. त्यामुळे गोव्यातील बहुसंख्य हिंदु समाजाला या भाषेविषयी आत्मीयता आहे. ही भाषा गोव्यात टिकवून न ठेवल्यास भावी पिढी धर्म आणि संस्कृती यांपासून दूर जाईल. राजभाषा कायदा आणि मराठीला मिळणारी सापत्न वागणूक याविषयी मराठी राजभाषा समितीचे श्री. मच्छिंद्र च्यारी यांचा लेख येथे देत आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांच्या पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांचा घणाघात !

     मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचे पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशन १२ आणि १३ नोव्हेंबर या कालावधीत उल्हासनगर येथे होत आहे. त्याच्या प्रथम दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेले विचार येथे देत आहोत.
सत्र १ : धर्मावरील आघात रोखण्यासाठी केलेले कृतीशील प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांच्या शब्दांत
धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंनी अष्टावधानी व्हायला हवे ! 
- स्वप्नील यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
श्री स्वप्नील यादव
     परळ येथील पू. भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानात काही पुरोगामी महिलांनी सभेला विरोध करण्यासाठी पू. भिडेगुरुजी यांचा जातीवाचक उल्लेख करून मराठा आरक्षणाचे सूत्र उपस्थित केले. आम्ही त्यांना समर्पक उत्तर दिल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला. याविषयी एका वृत्तपत्राने काँग्रेसने पू. भिडे यांची सभा उधळून लावली असे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले. याविषयी संबंधित वृत्तपत्रांना आम्ही क्षमा मागायला भाग पाडले. ढोंगी प्रसारमाध्यमांद्वारे साम्यवादी आणि पुरोगामी हिंदुत्वाला विरोध करतात. अशा प्रकारे धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंनी अष्टावधानी व्हायला हवे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. स्वप्नील यादव यांनी केले. प्रसारमाध्यमांच्या हिंदुद्रोहाला संघटितपणे सनदशीर मार्गाने विरोध कसा करावा, याविषयी त्यांनी माहिती दिली.

नियमपालनाची ऐशीतैशी !

      गेल्या मासात पुणे वाहतूक शाखेच्या वतीने मोठा गाजावाजा करत शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक यांठिकाणी मानवी साखळी करून वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती अभियान राबवले गेले. त्यानंतरही एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी येणार्‍या प्रवाहाच्या विरोधात गाडी दामटवणे, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गाडी उभी करणे, वाहतूक नियंत्रक दिव्यांविषयीच्या नियमांचे पालन न करणे यांमध्ये उलट वाढच झाली आहे. त्यामुळे केवळ एक दिवसाच्या अभियानाच्या फार्सनंतर वाहतुकीचे पुन्हा येरे माझ्या मागल्या चालू झाले आहे.

धर्मांतर, हाच ख्रिस्त्यांचा रुग्णालये अन् शाळा उघडण्यामागील हेतू !

     माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी एकदा आसाम दौर्‍यात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालवलेल्या शाळा आणि रुग्णालये यांंना भेट दिली. त्या वेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले, या चांगल्या कार्याचा उपयोग तुम्ही धर्मांतरासाठी करू नका. त्यांच्यानंतर भाषण करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍याने त्याच्या भाषणात निःसंदिग्ध शब्दांत सांगितले, या सर्व कार्यामागे केवळ मानवहिताचीच प्रेरणा असती, तर मग आम्ही इतक्या दूरवर कशाला आलो असतो ? एवढा अमाप पैसा आम्ही कशाला व्यय केला असता ? प्रभु येशूच्या अनुयायांची संख्या वाढवणे, हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आम्ही येथे आलो आहोत.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक

देव आणि भक्त यांचा लपंडाव !

      भक्त वर्षानुवर्षे देवाला शोधत असतो आणि देव मायेच्या पाठी लपून बसलेला असतो. एक दिवस भक्त देवाला शोधतो. त्या वेळी दोघे समोरासमोर येतात. या वेळी भक्ताला देव भेटल्याचा आनंद होतो आणि भक्ताने पकडल्याचा देवाला आनंद मिळतो. देव आणि भक्त यांचा हा लपंडाव युगानयुगे चालू आहे. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.९.२०१५)
     हिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते ! 
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

भारतात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे स्मारक नसणे, हे दुर्दैवी !

     भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य प्राप्त होऊन ६९ वर्षार्ंचा कालावधी लोटला. वर्ष १९४७ पासून भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे सुमारे २५ सहस्र सैनिक युद्धे आणि आतंकवाद्यांच्या विरोधात लढतांना हुतात्मा झाले आहेत. प्रजासत्ताकदिनी ज्या देहलीतील इंडिया गेटवरील स्मारकावर श्रद्धांजली वाहण्यात येते, त्या ठिकाणी ब्रिटीश सैन्यात असतांना पहिले महायुद्ध आणि अफगाणिस्तानात झालेल्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावे आहेत; मात्र जे सैनिक स्वतंत्र भारताच्या सुरक्षेसाठी हुतात्मा झाले, त्यांच्यासाठी बांधण्यात येणारे स्मारक कागदावरच आहे.

साधकाच्या मनातील प्रश्‍नाचे योग्य उत्तर देऊन त्याला सकारात्मक करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. आठवले
१. प.पू. गुरुदेवांसह जेवण करतांना मनात 
मी व्यवहार सांभाळू कि साधना करू ? हा प्रश्‍न 
येणे आणि एका प्रसंगातून प.पू. गुरुदेवांनी तुम्ही 
व्यवहार आणि अध्यात्म एकाच वेळी करू शकता, असे सांगणे 
     प.पू. गुरुदेवांची महानता आणि सकारात्मकता दाखवणारा पुढील प्रसंग देत आहे. माझा मनगटी घड्याळांचे सुटे भाग सिद्ध करण्याचा व्यवसाय होता. हे भाग विकण्यासाठी मला १५ दिवसांतून एकदा बेंगळुरूहून मुंबईला जावे लागत असे. वर्ष १९९५ मधील एप्रिल किंवा मे मासात मी गुरुदेवांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. ती वेळ दुपारच्या जेवणाची असल्याने मला त्या वेळी प.पू. गुरुदेवांसमवेत जेवण करण्याचे भाग्य लाभले.

बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग आणि महागणपति होम यांवेळी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी

Add caption
    रामनाथी - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि साधकांवरील संकटांचे निवारण व्हावे, यांसाठी भृगू महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बगलामुखी याग (ब्रह्मास्त्र याग) करण्यात आला. या निमित्ताने १ मासभर १ लक्ष २५ सहस्र एवढा बगलामुखी मंत्राचा जप करण्यात आला. त्यानंतर त्याच्या दशांश म्हणजे १२ सहस्र ५०० या संख्येने चाफ्याच्या फुलांचे हवन ४ आणि ५ नोव्हेंबर या दिवशी करण्यात आले. तसेच सप्तर्षि जीवनाडीपट्टीतून महर्षींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे ६ नोव्हेंबर या दिवशी प.पू. डॉक्टरांचे जन्मनक्षत्र उत्तराषाढा या नक्षत्रावर विशेष महागणपतीहोम आणि ब्रह्मास्त्र याग करण्यात आला.

त्याग आणि सेवाभाव यांचे मूर्तीमंत उदाहरण असलेले अन् संसारात राहून साधना करून संतपद प्राप्त करणारे रायगड येथील पू. अनंत (तात्या) पाटील !

पू. अनंत (तात्या) पाटील
     रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रहाणारे पू. अनंत (तात्या) पाटील हे वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमेला संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ते ८३ वर्षांचे आहेत. ते वर्ष १९९४ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. सध्या ते समष्टीसाठी नामजप करतात. ते आदर्श कुटुंबप्रमुख आहेत. त्यांनी संसारात राहून साधना केली. आज कार्तिक पौणिमेला (१४.११.२०१६) त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त नागोठणे येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहेत.
पू. अनंत (तात्या) पाटील यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार 

कु. राजश्री सखदेव यांना आलेल्या अनुभूती

१. पू. सखदेवआजींच्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे दर्शन होणे
१ अ. पू. आजींना मानस नमस्कार केल्यावर त्यांच्या जागी प.पू. डॉक्टर दिसणे, नंतर डोळे दीपवणारा प्रकाश दिसणे, नंतर त्यांच्या शरिराची बाह्यरेखा दिसून त्यांच्या डोक्यावर प्रकाशाची सौम्य तिरीप दिसणे आणि ते तेज मानवाला पेलेल इतके असल्याचे देवाने सांगणे : ३.९.२०१६ (भाद्रपद शुक्ल पक्ष द्वितीया) या दिवशी माझा तिथीनुसार वाढदिवस होता. माझे आवरून झाल्यावर मी पू. सखदेवआजींना मानस नमस्कार करण्यासाठी हात जोडले. त्या वेळी मला त्या रामनाथी आश्रमातील त्यांच्या खोलीतील पलंगावर नेहमीप्रमाणे बसलेल्या दिसल्या. मी त्यांच्या चरणांवर डोके ठेवून साधना चांगली होण्यासाठी आशीर्वाद द्या. तुम्हीच माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करून घ्या, अशी प्रार्थना केली. त्यानंतर मी त्यांच्या तोंडवळ्याकडे पहात असतांना १ - २ सेकंद त्यांचा तोंडवळा दिसला. नंतर त्यांच्या तोंडवळ्याच्या जागी प.पू. डॉक्टरांचा तोंडवळा दिसू लागला.

श्री गणेशयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि गणेशयागाची जाणवलेली वैशिष्ट्ये

कु. तृप्ती गावडे
१. गणेशचतुर्थी नंतर घरून आश्रमात परत येत 
असतांना वाहनचालकाच्या वेगाने गाडी चालवण्यामुळे होणारा 
अपघात टळणे अन् त्यामुळे श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
     १३.९.२०१६ या दिवशी गणेश चतुर्थीनंतर मी घरून रामनाथी आश्रमात परत येत होते. तेव्हा गाडीत बसायला मला पुष्कळ भीती वाटत होती. गाडीत चढल्यावर मला बसायला जागाही नव्हती; म्हणून मी परत खाली उतरले. त्यानंतर मनात विचार आला, गर्दी असली, तरी आपण आताच जाऊया आणि मी पुन्हा तशीच गाडीत बसले. गाडीत बसल्यावर जयघोष आणि श्रीकृष्णाचा श्‍लोक मला प्रयत्नपूर्वक म्हणावा लागत होता. त्यानंतर वाहनचालक गाडी इतक्या वेगाने चालवत होता की, त्याचे त्याला भान नव्हते. त्यामुळे त्याचा प्रवाशांनाही त्रास होत होता. गोव्यात पोचतांना गाडीचा मोठा अपघात होणार होता; परंतु चालकाने जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला आणि माझी देवाला प्रार्थना झाली देवा, यातून तूच आम्हाला वाचवलेस. आश्रमात पोचल्यावर गणेशयाग चालू होता. माझे भीतीचे प्रमाण अल्प झाले होते. त्या वेळी माझ्या मनात या यागामुळेच आमच्यावरचे अपघाताचे संकट टळले, असा विचार आला आणि श्रीगणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

गुरुकार्याची तळमळ असलेल्या आणि व्यष्टी साधना गांभीर्याने करणार्‍या डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे !

डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे 
१. काकू पहाटे ५ ते रात्री १ वाजेपर्यंत साधना करतात. 
२. इतरांचा विचार करणे 
     एकदा काकू देवद आश्रमात जाण्यासाठी निघत होत्या. तेव्हा साहित्य अधिक असल्याने आम्ही ३ साधक काकूंना आगगाडी स्थानकावर (रेल्वे स्टेशनवर) सोडायला गेलो होतो. त्या वेळी काकूंना गुडघेदुखीचा त्रास असतांनाही त्यांनी आम्हाला साहित्य उचलायला साहाय्य केले.
३. व्यष्टी साधना गांभीर्याने आणि नियमित करणे
    काकूंना पुष्कळ आध्यात्मिक त्रास आहे, तरी त्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया मनापासून राबवतात. मिरज आश्रमात असतांनाही त्या गळ्यात त्यांच्या दोषांची पाटी घालतात. सेवेचा व्याप पुष्कळ असूनही त्या नियमित नामजप पूर्ण करतात.

बगलामुखी यागाच्या वेळी सौ. नेहा प्रभु यांना आलेल्या अनुभूती

सौ. नेहा प्रभु
१. त्रास होत असल्याने यज्ञस्थळी पूर्णवेळ थांबू नये, असे वाटणे : ९.१०.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या बगलामुखी यागाच्या वेळी मला सकाळपासून पुष्कळ त्रास होत होता. यज्ञस्थळी पूर्णवेळ थांबावे कि नाही, असा गोंधळ मनात होता. मला काय करावे ?, हे समजत नव्हते. 
२. गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे मी यज्ञस्थळी पूर्णवेळ बसू शकले. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
अ. सायंकाळच्या वेळी यज्ञस्थळी पुरोहित बगलामुखी देवीचे स्तोत्र म्हणत असतांना मला वातावरणात पिवळा प्रकाश पसरला आहे, असे दिसत होते. 
आ. मी अखंड चैतन्याचा स्रोत प्रक्षेपित होतांना पहात होते.

श्री गणेशयागाच्या वेळी चि. मुकुल प्रभु (वय ५ वर्षे) याला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

चि. मुकुल प्रभु
१. गणेशाचे विराट रूपात दर्शन होऊन 
अग्निनारायणाची मूर्ती दिसणे 
९.१०.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात श्री गणेशयाग झाला. मी मुकुलला विचारले, तुला काय अनुभूती आली ? त्या वेळी त्याने मला सांगितले, मी यज्ञस्थळी डोळे मिटून प्रार्थना करत असतांना मला गणेशाची आकाशाएवढी मूर्ती दिसली आणि मला अग्निनारायणाची मूर्तीही दिसली. 
२. गणेशबाप्पा आणि अग्निनारायण यांना समवेत 
रहाण्यास सांगितल्यावर त्यांचे हृदयात अस्तित्व जाणवणे
      तो पुढे म्हणाला, श्री गणेश त्याच्या लांब हाताने माझ्या गालावर प्रेमाने हात फिरवत मला म्हणाला, बाळा, काय करतोस ? मी म्हणालो, काही नाही. तूच माझे बाबा, काका आणि भाऊ. मी मुकुलला विचारले, तू खरंच असे म्हणालास का ? यावर मुकुल मला म्हणाला, आजी माझ्याकडून जी प्रार्थना करवून घेते, ते मी अनुभवत होतो. मला अग्निनारायणाच्या मूर्तीच्या हातातून पुष्कळ आगीची शस्त्रे सुटून अनिष्ट शक्तींना लागत असल्याचे जाणवले. तेव्हा माझ्याभोवती संरक्षणकवच निर्माण होत होते. गणेशबाप्पा आणि अग्निनारायण मला म्हणाले, तुझ्याभोवती संरक्षणकवच निर्माण झाले आहे. आता आम्ही जातो. तेव्हा मी म्हणालो, तुम्ही सतत माझ्या समवेत रहा. तेव्हा गणेश आणि अग्निनारायण यांनी माझ्या (मुकुलच्या) हृदयात प्रवेश केला. यामुळे मला पुष्कळ चैतन्य मिळाले आणि माझा देह स्वच्छ झाला.

५.११.२०१६ या दिवशी श्री बगलामुखी (ब्रह्मास्त्र) यज्ञाच्या वेळी सौ. वैशाली मुद्गल यांना आलेल्या अनुभूती

१. साधक-पुरोहित मंत्रपठण करतांना देवतांची शस्त्रे गतीमान होऊन 
आश्रमाभोवती संरक्षणकवच निर्माण करत आहेत, असे सूक्ष्मातून दिसणे
     ५.११.२०१६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात श्री बगलामुखी (ब्रह्मास्त्र) यज्ञ चालू असतांना मी तेथे नामजपाला बसले होते. यज्ञकुंडाच्या बाजूला रांगोळीने गदा, सुदर्शनचक्र, त्रिशूल इत्यादी शस्त्रे काढली होती. साधक-पुरोहित मंत्रपठण करतांना मला सूक्ष्मातून दिसले, त्या रांगोळीतील शस्त्रे सूक्ष्मातून गतीमान होऊन पुढे पुढे जात आहेत आणि संपूर्ण आश्रमाभोवती गोल गोल फिरून संरक्षणकवच निर्माण करत आहेत, तसेच त्या वेळी देवतांच्या शस्त्रांनी सर्व साधकांना आशीर्वादही दिला.

प्रेमळ, आनंदी स्वभावाची आणि श्रीरामाला भेटण्याची तीव्र तळमळ लागलेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी आश्रमातील कु. भक्ती रोहन मेहता (वय ४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे 
हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. भक्ती मेहता एक दैवी बालिका आहे !
कु. भक्ती मेहता
      (२०१४ मध्ये कु. भक्ती हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती. आता पातळी ६३ टक्के आहे. - संकलक)
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
      तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. स्पष्ट उच्चार
    भक्ती बोलायला शिकल्यापासून तिचे शब्दोेच्चार आणि बोलणे स्पष्ट आहे. ती कधीच बोबडे बोलली नाही.
१ आ. आकलनक्षमता आणि स्मरणशक्ती उत्तम 
१ आ १. सर्व गोष्टी स्मरणात असणे : अनेक मासांनंतर आम्ही घरी गेल्यावरही तिला सर्वकाही आठवते. शेजारी रहाणारे, घरात केलेले पालट आणि अन्य लहानसहान गोष्टी यांचे तिला स्मरण असते. आश्रमात अनेक साधक आहेत; पण बर्‍याच साधकांची नावे ती लक्षात ठेवते.

पुष्कळ अंगदुखी असल्याने आश्रमातील खोलीत झोपल्यावर एक साधिका पाय चेपून देत असल्याने जाग येणे, एक घंट्यानंतर अंगदुखी पूर्ण थांबणे आणि जाग आल्यावर पाय चेपून देणारी साधिका अगोदर खोलीत आलीच नसल्याचे कळणे

       २३.१.२०१६ या दिवशी माझे पाय आणि अंग पुष्कळ दुखत असल्याने मी रामनाथी आश्रमातील माझ्या खोलीत झोपले होते. झोपल्यानंतर अर्ध्या घंट्याने माझे पाय कोणीतरी चेपत असल्याने मला जाग आली. मी डोळे उघडून पाहिले. तर कु. तेजल पात्रीकर (खोलीत रहाणारी साधिका) माझे पाय चेपत होती. त्या वेळी मी अर्धी झोपेत आणि अर्धी जागी होती. अगं, असू दे, तेजल पाय नको दाबू, असे मी तिला सांगितले. ती म्हणाली, असू दे. तुला जरा बरे वाटेल ! नंतर मी तिला पुन्हा एकदा सांगितले आणि मला लगेचच झोप लागली. नंतर एक घंट्याने मला जाग आली. तेव्हा खोलीत कोणीच नव्हते. माझी अंगदुखी आणि पायदुखी थांबली होती. पाच मिनिटांनी तेजल खोलीत आली. त्या वेळी तिने वेगळे कपडे घातल्याचे दिसले; म्हणून मी तिला विचारले, तू मगाशी येऊन गेलीस ना ? ती म्हणाली, नाही, मी आत्ताच आले. यावरुन श्रीकृष्णच माझ्या सहाय्याला येऊन गेल्याचे जाणवले. 
- सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०१६)फटाके स्टॉलच्या परिसरातून कपडे खरेदीसाठी जावे लागणे, जाण्यास विलंब झाल्याने तेथून जातांना आग लागल्याचे एका व्यक्तीने सांगितल्यामुळे त्या परिसरातून सुखरूप बाहेर पडता येणे

      २९.१०.२०१६ या दिवशी मी आणि माझा लहान भाऊ दिवाळीसाठी कपडे खरेदी करण्यासाठी जाणार होतो. घरातून निघाल्यापासून पुष्कळ अडचणी येत गेल्याने ठरवलेल्या वेळेत आमचे कोणतेच काम होत नव्हते, उदा. एटीएम् मशिन बंद होते. घरी बाळाला झोका देण्यात अर्धा घंटा गेला. एटीएम् मधून पैसे काढण्यात १५ मिनिटे अधिक लागली. बँकेत १० मिनिटे अधिक लागली. त्यानंतर आम्ही कपडे खरेदी करण्यासाठी चारचाकीनेे जिल्हा परिषदेच्या मैदानातील फटाके स्टॉल असलेल्या मार्गावरून जाणार होतो. तेथील रस्त्यावरून चारचाकी आतमध्ये घेतल्यावर एक व्यक्ती पळत आली आणि म्हणाली, पुढे फटाके स्टॉलला आग लागत आहे. तुम्ही गाडी मागे घ्या. मी लगेचच गाडी मागे घेतली आणि आम्ही त्या परिसरातून बाहेर पडलो. थोड्या वेळेपूर्वी आम्ही तेथे असतो, तर आम्हीही त्या मैदानातील आगीच्या परिसरात अडकलो असतो.

सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर करून हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्याचा हिंदुत्ववाद्यांचा निर्धार

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांच्या पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्ववाद्यांकडून पुढील धर्मकार्याची दिशानिश्‍चिती ! 
     ठाणे, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - सध्या ट्विटर, फेसबुक, व्हॉटस् अप आदी सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. संपूर्ण जगात बातमी प्रसारित करण्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमे ही प्रभावी माध्यमे आहेत. त्यामुळे सामाजिक माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार हिंदुत्ववाद्यांनी प्रांतीय हिंदु अधिवेनाच्या दुसर्‍या दिवशीच्या सत्रात केला. १३ नोव्हेंबरला अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी 'सामाजिक प्रसारमाध्यांच्या माध्यमातून धर्मप्रसार करण्याचे महत्त्व आणि त्याचे नियोजन' हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चेत हिंदुत्ववाद्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन यामध्ये येणार्‍या अडचणी मोकळेपणाने मांडल्या. धर्मप्रसारासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर प्रभावीपणे कसा करता येईल, हे उपस्थित हिंदुत्वाद्यांनी जाणूून घेतले. यातून सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे धर्मप्रसार करण्याची पुढील दिशा ठरवण्यात आली. 

नव्या नोटा देण्यासंबंधी सहकारी अधिकोषांची अडवणूक करणार्‍या व्यापारी अधिकोषांचा निषेध

     पुणे, १३ नोव्हेंबर - नागरी सहकारी अधिकोषांकडे रोख रकमेचा तुटवडा असल्याने त्यांना नव्या नोटा देण्यासंबंधी त्यांची अडवणूक करणार्‍या व्यापारी अधिकोषांचा 'दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लिमिटेड'चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी एका पत्रकाद्वारे निषेध केला आहे. 
१. राज्यातील अनेक नागरी सहकारी अधिकोषांची खाती व्यापारी अधिकोषांमध्ये असल्याने त्यांना रोख रकमेसाठी याच अधिकोषांवरच अवलंबून रहावे लागते. 
२. असे असतांनाही व्यापारी अधिकोषांकडे पैशाची मागणी केली असता वैयक्तिक ग्राहकांना लागू असणारे नियम लावून त्यांनी केवळ १० सहस्र रुपये इतकीच रक्कम सहकारी अधिकोषांना देण्याची सिद्धता दर्शवली. त्यामुळे नागरी सहकारी अधिकोषांमधून रोख रकमेचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. (व्यापारी अधिकोषांची ही अयोग्य कृती समाजद्रोही वाटल्यास चुकीचे काय ? यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक लक्ष घालून कारवाई करेल का ? - संपादक) 

नाशिक येथील प्रतिभूती मुद्रणालयाने भारतीय रिझर्व्ह बँकेला ५०० रुपयांच्या नव्या नोटेची पहिली खेप पाठवली

     नाशिक - येथील प्रतिभूती मुद्रणालयाने भारतीय रिझर्व्ह बँकेला ५०० रुपयांच्या नव्या नोटेची पहिली खेप पाठवली आहे. १२ नोव्हेंबर या दिवशी रात्री उशिरा ५०० रुपयांच्या ५० लक्ष नव्या नोटा पाठवल्या आहेत. 
      मुद्रणालयाकडून १६ नोव्हेंबर या दिवशी ५०० रुपयांच्या आणखी ५० लक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेला पाठवण्यात येणार आहेत. सध्या मुद्रणालयात २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा छपाईची संख्या वाढवली आहे. नवीन ५०० ची नोट ही बाद केलेल्या ५०० च्या नोटेपेक्षा कमी आकाराची आहे. यापूर्वी एका शीटमध्ये ५०० च्या जुन्या ३६ नोटा छापल्या जात होत्या. आता नवीन ५०० च्या नोटा एका शीटमध्ये ५० नोटा छापल्या जात आहेत. (हाच भाग आधीच्या नोटेसंदर्भात केला असता, तर कागद आणि त्यासाठी लागणार्‍या वस्तूंची मोठ्या प्रमाणात बचत झाली असती. - संपादक)

नाशिक येथील प्रतिभूती मुद्रणालयाने भारतीय रिझर्व्ह बँकेला ५०० रुपयांच्या नव्या नोटेची पहिली खेप पाठवली

     नाशिक - येथील प्रतिभूती मुद्रणालयाने भारतीय रिझर्व्ह बँकेला ५०० रुपयांच्या नव्या नोटेची पहिली खेप पाठवली आहे. १२ नोव्हेंबर या दिवशी रात्री उशिरा ५०० रुपयांच्या ५० लक्ष नव्या नोटा पाठवल्या आहेत. 
      मुद्रणालयाकडून १६ नोव्हेंबर या दिवशी ५०० रुपयांच्या आणखी ५० लक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेला पाठवण्यात येणार आहेत. सध्या मुद्रणालयात २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा छपाईची संख्या वाढवली आहे. नवीन ५०० ची नोट ही बाद केलेल्या ५०० च्या नोटेपेक्षा कमी आकाराची आहे. यापूर्वी एका शीटमध्ये ५०० च्या जुन्या ३६ नोटा छापल्या जात होत्या. आता नवीन ५०० च्या नोटा एका शीटमध्ये ५० नोटा छापल्या जात आहेत. (हाच भाग आधीच्या नोटेसंदर्भात केला असता, तर कागद आणि त्यासाठी लागणार्‍या वस्तूंची मोठ्या प्रमाणात बचत झाली असती. - संपादक)

दोन सहस्र नवीन कोर्‍या नोटांद्वारे ३५ सहस्र रुपयांची लाच घेतांना वरिष्ठ लिपिकाला अटक !

काळा पैसा रोखण्यासाठी केलेली उपाययोजना कशी तात्पुरती आहे, हेच यावरून लक्षात येईल. त्यामुळे समाजाला धर्मशिक्षण देऊन समाज नीतीमान बनवणे, हाच यावरील अंतिम उपाय आहे ! 
      कोल्हापूर, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - एकीकडे पंतप्रधानांनी पाचशे आणि सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असतांना येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक चंद्रकांत सावर्डेकर यांना १३ नोव्हेंबर या दिवशी २ सहस्र रुपयांच्या नव्या कोर्‍या नोटांची ३५ सहस्र रुपयांची लाच घेतांना दसरा चौक येथे अटक करण्यात आली. विशेष म्हणजे नवीन नोटांच्या माध्यमातूनच लाच मिळावी, अशी त्यांनी अट घातली होती. या प्रकरणातील तक्रारदार लिपिक श्री. मनोहर जाधव यांनी राजमाने यांच्या मुख्याध्यापकपदी नियुक्तीसंदर्भातील प्रस्तावाची चौकशी केली असता ही नियुक्ती करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.

साधकांना सूचना

      पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी (१३.११.२०१६) रात्री ११.१८ वाजता
समाप्ती - कार्तिक पौर्णिमा (१४.११.२०१६) सायंकाळी ७.२२ वाजता
आज पौर्णिमा आहे.

फलक प्रसिद्धीकरता

सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणार्‍या 
काँग्रेसने हे का केले नाही ?
      केंद्र सरकारने काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे नक्षलवाद्यांचा ४६० कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांमध्ये घट होेण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Sarkarke Not-bandi ke nirnayse Naksaliyoko ४६० karodki bhari hani. Naksali Karvaiyonme aa sakti hai kami.
Gat ६ dashkome Congressne yah kyu nahi kiya?
जागो ! : सरकार के नोट-बंदी के निर्णय से नक्सलियों को ४६० करोड की भारी हानी. नक्सली कारवाइयों में आ सकती है कमी.
पोलीस प्रशासनाकडून कायदा पायदळी !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना 
       सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       एखाद्या धार्मिक संस्थेला कोणीतरी दिलेले पैसे पापाने मिळवलेले असल्यास ते व्यर्थ जातात, म्हणजे एखाद्या सेवेसाठी ते पैसे वापरले, तर त्या सेवेची फलनिष्पत्ती चांगली नसते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
योगी आणि भक्त
अ. मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते. 
आ. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी. 
भावार्थ : ध्यानयोग्याचे ध्यान संपले की, त्याचे अनुसंधान खंडित होते. ज्याचा नामजप श्‍वासोच्छ्वासावर होत असतो, म्हणजे नामाच्या ठिकाणी केवळ श्‍वासाची जाणीव असते, त्याचे श्‍वासाप्रमाणेच अखंड अनुसंधान असते. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

न्यूनगंड बाळगू नका !
आपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न 
बाळगता त्यांवर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

संरक्षणमंत्र्यांचे स्वागतार्ह विधान

संपादकीय
    पाकिस्तानच्या भूमीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याची धडाकेबाज कृती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात सैन्यदलाने करून दाखवली. केवळ एका सर्जिकल स्ट्राईकवर समाधान न मानता आतंकवाद्यांचे सर्व तळ उद्ध्वस्त करून शत्रूराष्ट्राची डोकेदुखी कायमची संपवली जावी, अशी राष्ट्रभक्तांची मनीषा असतांनाच पर्रीकर यांनी राष्ट्रप्रेमींना दिलासा देणारे अजून एक वक्तव्य केले. अर्थात् त्यांचे मत ही संरक्षण मंत्रालयाची अधिकृत भूमिका नसल्याचे त्यांनी लगेच स्पष्ट केले असले, तरी संरक्षण विभागाचा प्रमुख म्हणून वैयक्तिक स्तरावर का होईना काही ठोस भूमिका असणे आणि मांडणे, हेही अभिनंदनीय आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn