Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !


आज गोरक्षनाथ प्रकटदिन

-----------------------------------------------

सनातनच्या ३६व्या संत पू. शालिनी 
नेनेआजी यांचा आज वाढदिवस

कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्‍न काय आहे ? या पुस्तकातील कॉ. पानसरे यांनी केलेल्या आरोपांचा संदर्भ अन्वेषण करतांना घ्यावा ! - हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेत डावीकडून सर्वश्री मधुकर नाझरे, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर,
शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे (छायाचित्रकार : श्री. गजानन नागपुरे, कोल्हापूर) 
  • कोल्हापूर विशेष अन्वेषण पथक आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर !
  • कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
        कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी या पत्रकार परिषदेच्या वृत्तात दिलेल्या माहितीत कुणाची अपकीर्ती (बदनामी) करण्याचा अथवा स्वामित्व हक्काचा भंग करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही; मात्र कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण होत असतांना काही त्रुटी राहून गेल्या असतील, तर त्या त्रुटी दूर होऊन अन्वेषण योग्य पद्धतीने होण्यासाठी आम्ही पोलिसांना हे सहकार्य करत आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. - संपादक
        कोल्हापूर, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील श्रमिक प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्‍न काय आहे ? या पुस्तकात कॉ. पानसरे यांचा येथील पथकर प्रकरणीच्या नेतृत्वाचा उल्लेख आहे. या पुस्तकात पथकरप्रश्‍नी राजकीय नेते, नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी पैसे घेतल्याविषयी धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. पोलिसांची अन्वेषणाची दिशा भरकटलेली आहे. कॉ. पानसरे प्रकरणातील योग्य मारेकर्‍यांपर्यंत पोचण्यासाठी पोलिसांनी या दिशेने अन्वेषण करावे, अशी मागणी सर्वश्री मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी आणि बाबासाहेब भोपळे यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी शाहू स्मारक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. हे तिघे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

भारताने प्रथम अणूबॉम्ब का वापरू नये ? - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

संरक्षणमंत्र्यांचा वस्तूनिष्ठ प्रश्‍न ! 
देशाच्या रक्षणासाठी आणि शत्रूला योग्य 
प्रकारचा धडा शिकवण्यासाठी केंद्रशासनाने 
त्यांना योग्य वाटते, ते पाऊल उचलणे गैर नाही !
       नवी देहली - भारताने आधी अण्वस्त्रांचा वापर न करण्याच्या धोरणात का अडकून रहायचे ? देशासाठी जेव्हा एखादा धोका निर्माण झालेला असेल, तेव्हा अशा जुन्या धोरणांविषयी नक्कीच विचार करता येणार नाही. आधीच ठरलेल्या धोरणानुसार वर्तन केले किंवा तुम्ही अण्वस्त्रांविषयीच्या एखाद्या भूमिकेवर कायम राहिलात, तर आपण अण्वस्त्राची शक्ती गमावून बसू असे मला वाटते, असे मत संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी स्पष्टपणे मांडले. त्याचवेळी हे आपले खासगी मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अणूचाचण्या केल्यानंतर भारताने अण्वस्त्रांचा वापर प्रथम करणार नाही, असे आश्‍वासन जगाला दिले होते.
       पर्रीकर पुढे म्हणाले की, कोणीही तुमच्याविषयी आधीच अंदाज लावू शकणार नाही. हा धोरणाचा एक भाग आहे; पण काही गोष्टी आधीच ठरलेल्या असायला हव्यात. त्यामुळे आपल्याला पुढे जात रहाता येते. आम्ही उत्तरदायी अण्वस्त्रधारी देश आहोत आणि दायित्वशून्यतेने आम्ही याचा वापर करणार नाही, असे आपण का म्हणून शकत नाही ?

नोटा रहित करण्याच्या निर्णयामुळे राहुल गांधी, केजरीवाल आदींना पोटदुखी का ? - भाजप

        नवी देहली - नोटा रहित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने मायावती, मुलायमसिंह यादव, अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांना पोटदुखी का ?, असा प्रश्‍न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. आर्थिक आणीबाणी म्हणणार्‍या मायावतींच्या बसपावर या निर्णयाने आणीबाणीची परिस्थिती ओढवल्याचे जाणवत आहे, अशी टीका त्यांनी केली. 
        शहा पुढे म्हणाले की, सपा, बसपा, आप आणि काँग्रेस या पक्षांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करून स्वतःचे पितळ उघडे पाडले आहे. या राजकीय पक्षांनी जनतेला आपला खरा चेहरा दाखवला आहे. २ दिवसांपासून राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया जनता बघते आहे. बनावट नोटा, अमली पदार्थ आणि हवालाचा कारभार करणार्‍यांना या निर्णयाने चाप बसला आहे; पण राजकीय पक्षांची उडालेली भंबेरी पाहून आम्ही चकीत आहोत. कालपर्यंत काळ्या पैशावर सरकारला प्रश्‍न करणारे आज एवढे का चिडले आहेत ? ही कुठली वेदना आहे ? राजकारण स्वच्छ व्हावे, देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा दूर व्हावा, यामुळे कुणाला पोटदुखी होतेय ?, असे प्रश्‍न शहा यानी केले. 
        सरकारच्या निर्णयाने जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे, याची आम्हाला कल्पना आहे; पण देशाच्या हितासाठी आणखी काही दिवस लोकांनी अडचणी सहन कराव्यात आणि सरकारला साथ द्यावी, असे आवाहन शहा यांनी जनतेला केले.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातील वादग्रस्त विधानांविषयी त्यांच्यावर अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्याकडून खटला प्रविष्ट !

       नवी देहली - भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या १९८०-१९९६ प्रक्षुब्ध वर्षे या पुस्तकात केलेल्या वादग्रस्त विधानांनी न्यायालयाची मानहानी होते, तसेच न्यायालयाच्या अधीन असलेल्या खटल्यावर परिणाम होऊ शकतो, या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन यांनी पटियाला न्यायालयात खटला दाखल केला आहे. 
       राष्ट्रपती मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार रामजन्मभूमी परिसरातील कुलुपे उघडण्यात आली होती, असे नमूद केले आहे. वस्तुत: जिल्हा न्यायाधीश श्री. के.एम्. पांडे यांनी १ फेब्रुवारी १९८६ या दिवशी दिलेल्या आदेशानुसार रामजन्मभूमी परिसरातील कुलुपे उघडण्यात आली होती, असे अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन यांचे म्हणणे आहे. तसेच राष्ट्रपती मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात बाबरी मशीद पडल्याने भारतियांच्या माना लाजेने खाली गेल्या, असे म्हटले आहे; मात्र भारतातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, तेव्हा मुखर्जी यांची मान लाजेने खाली गेली नाही का ?, असा प्रश्‍नही अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन यांनी उपस्थित केला आहे.

ट्रम्प यांच्या समर्थकांकडून मुसलमान महिलांवर आक्रमणे होत असल्याचा आरोप !

       न्यूयॉर्क - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प निवडून येताच त्यांच्या समर्थकांकडून मुसलमान महिलांवर आक्रमणे होऊ लागल्याचा आरोप मुसलमानांनी चालू केला आहे. मुसलमान महिलांची छेडछाड आणि त्यांचा हिजाब अन् बुरखा ओढण्यासारखे प्रकार चालू झाल्याचा आरोप मुसलमान महिलांनी केला आहे.
१. एका महिलेने आपण बाजारात खरेदीसाठी गेले असता एका मोठी टोपी घातलेल्या व्यक्तीने आपला हिजाब खेचला आणि घाबरलेली का दिसतेस, असा प्रश्‍न विचारला. त्यामुळे मी भयग्रस्त होऊन तातडीने कारमध्ये बसून त्वरित घरी आले, असा अनुभव फेसबूकवर पोस्ट केला आहे. 
२. मेहरीन नामक एका महिलेने मी एका रेल्वेस्थानकाच्या फलाटावर हिजाब परिधान करून जात असतांना एका श्‍वेतवर्णीय व्यक्तीने मला अडवले आणि आता तुमचे दिवस संपले, अशी धमकी दिल्याचे ट्विट केले आहे.
३. आता हिजाब परिधान करून जाणार्‍या महिलांची टवाळी करण्यापुरते हे मर्यादित राहिलेले नाही. सर्वच अश्‍वेतवर्णीय नागरिक भयभीत झाले आहेत. त्यांना आता अमेरिकेत सुरक्षिततेची खात्री राहिलेली नाही, असेही एका महिलेने ट्विट केले आहे.

जनता प्रदूषणामुळे रस्त्यावर मरावी, याची सरकार वाट पहात आहे का ? - सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न !

न्यायालयाने केवळ असे ताशेरे न ओढता 
संबंधितांना कठोर शिक्षा करावी, अशीच जनतेची इच्छा आहे !
      नवी देहली - जनता प्रदूषणामुळे रस्त्यावर मरावी, याची केंद्र सरकार वाट पहात आहे का, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने देहलीतील प्रदूषणाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना विचारला. या वेळी न्यायालयाला माहिती देण्यात आली की, देहलीत प्रदूषणाची माहिती घेण्यासाठी केवळ तीन केंद्रे आहेत. देहली एन्सीआर् भागात एकही केंद्र नाही. यावर न्यायालयाने येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत देहलीतील प्रदूषणाचा स्तर आणि त्यावर उपाययोजना याची माहिती देण्याचा आदेश दिला आहे.
      न्यायालयाने म्हटले की, सरकारने दिलेली माहिती अपूर्ण आहे. लोकांना श्‍वास घेण्यासही अडचण होत आहे. प्रदूषणाचा स्तर धोकादायक स्थितीत पोचला आहे आणि सरकारकडे कोणतीही योजना नाही. सरकारकडे योजना असली पाहिजे. सरकार कामचलाऊ काम करत आहे. सरकारच्या योजनेत प्रत्येक अधिकार्‍याचे दायित्व निश्‍चित झाले पाहिजे. प्रदूषण रोखण्यासाठी कोणते पाऊल उचलण्यात येणार आहेत, शाळा कधी बंद असणार, उद्योगधंदे कधी बंद असणार आणि वायूचा स्तर चांगला करण्यासाठी नेमके काय केले जाणार, हे सर्व सांगितले पाहिजे. (हे सर्व न्यायालयाला सांगावे लागते, तर प्रशासन नावाचा डोलारा कशाला हवा ? - संपादक)

गोव्यातील डिचोली गृहनिर्माण वसाहतीच्या समोरील अनधिकृत मद्यालयाला अखेर टाळे !

दैनिक सनातन प्रभातच्या वृत्ताची नोंद !
      डिचोली, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील गृहनिर्माण वसाहतीच्या समोर अनधिकृत मद्यालय शासकीय आदेशाला न जुमानता गेल्या दोन वर्षांपासून चालू आहे. या मद्यालयामुळे तेथे अपप्रकारांत वाढ झाली असून यामुळे वसाहतीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत, अशा आशयाचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीत १८ ऑक्टोबर २०१६ या दिवशी प्रसिद्ध झाले होते. शासनाने दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताची नोंद घेऊन १ नोव्हेंबर या दिवशी या अनधिकृत मद्यालयाला टाळे ठोकले आहे.

काश्मीरमध्ये फुटीरतवाद्यांनी एका रस्त्याला दिले आतंकवादी बुरहान वानी याचे नाव !

‘काश्मीरला सैन्याच्या कह्यात देऊन आतंकवादी आणि त्यांचे समर्थक यांचा 
निःपात करण्यासाठी मोकळीक देण्यात यावी’, अशीच जनतेची इच्छा आहे !
हे लक्षात घेऊन सरकारने आतंकवादाच्या विरोधात कठोर पावले उचलावीत !
     श्रीनगर - जम्मू-कश्मीरमधील त्राल भागातल्या एका रस्त्याला फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांकडून आतंकवादी बुरहान वानी याचे नाव देण्यात आले आहे. (फुटीरतावाद्यांना भारत सरकार आणखी किती दिवस असे मोकळे सोडणार आहे ? - संपादक) हुरियतचे नेते इम्तियाज अहमद रेशी यांनी याला दुजोरा दिला आहे. ‘नामकरण केलेला रस्ता त्रालला अवंतीपोरशी जोडतो’, असे रेशी यांनी सांगितले. बुरहान वानी याला ठार केल्यापासून काश्मीरमध्ये हिंसाचार आणि अशांतता चालू आहे. 
      दक्षिण कश्मीरमधील त्राल आणि आसपासच्या भागात वर्ष १९९० ते २००५ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आतंकवादी सक्रीय होते. आतंकवाद्यांच्या कारवायांमुळे त्रालला काश्मीरचे ‘कंधार’ म्हणत होते. मध्यंतरीच्या काळात परिस्थिती सावरत होती. आता हुरियतने रस्त्याचे नामांतर आतंकवाद्याच्या नावाने केल्यामुळे पुन्हा एकदा त्राल आणि आसपासच्या भागात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.कोलकाता येथील हिंदु तरुणाला सौदी अरेबियामध्ये गुलाम बनवण्यात आल्याचे उघड !

  • सौदी अरेबियामध्ये भारतियांचे शोषण केले जाते, हे जगजाहीर असतांना भारत सरकार ते रोखण्यासाठी कोणतेच उपाय योजत नाही, हे भारतियांचे दुर्दैव ! 
  • ही स्थिती हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) पालटण्यात येईल !
      कोलकाता - येथील जयंत बिस्वास नावाचा तरुण ऑटोमोबाईल इंजिनियरची पदवी प्राप्त करून नोकरीनिमित्त सौदी अरेबियात गेला होता; मात्र त्याला गुलाम म्हणून विकण्यात आल्याने त्याला त्याच्या मालकाकडे घरगड्याप्रमाणे काम करत रहावे लागत असल्याचे समोर आले आहे. दलालाने त्याला ऑटोमाबाईल क्षेत्रात काम देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले होते.

(म्हणे) ‘बुरहान वानी याला ठार करण्याऐवजी अटक करायला हवी होती !’ - प्रा. आर्.डी. शर्मा, कुलगुरु, जम्मू विद्यापीठ

      श्रीनगर - हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याला चकमकीत ठार मारण्याऐवजी अटक करायला हवी होती, असे मत जम्मू विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. आर्.डी. शर्मा यांनी मांडले आहे. बुरहान वानी याच्या मृत्यूमुळे राज्यातील विद्यार्थ्यांची हानी झाली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘काश्मीरमधील जनता आतंकवाद्यांचे समर्थन का करते, हे मलादेखील समजत नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले. (जम्मू विद्यापिठाचे कुलगुरु असूनही प्रा. शर्मा यांना काश्मिरी जनतेची मानसिकता ओळखता येऊ नये, हे दुर्दैवच म्हणायचे ! - संपादक)

विजय मल्ल्या फरारी आरोपी घोषित !

      मुंबई - आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने विजय मल्ल्या यांना फरारी आरोपी म्हणून घोषित केले. मल्ल्या यांची देशातील जंगम मालमत्ता जप्त करण्यासही न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला अनुमती दिली आहे. एखाद्याला आरोपी घोषित करण्यात आल्यावर न्यायालयाने त्याला घालून दिलेल्या मुदतीत त्याने न्यायालयासमोर उपस्थित राहणे अपेक्षित आहे; परंतु मल्ल्याकडून एकाही कायदेशीर प्रक्रियेला प्रतिसाद देण्यात आला नाही.

कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या प्रकरणी विजय दर्डा आणि अन्य आरोपींवर न्यायालयाकडून आरोप निश्‍चिती !

     नवी देहली - कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या प्रकरणी न्यायालयाने माजी खासदार विजय दर्डा, कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच्.सी. गुप्ता आणि अन्य आरोपींवरील आरोप निश्‍चित केले आहेत. या वेळी न्यायालयाने शिबू सोरेन आणि माजी मंत्री दसारी नारायण राव यांना आरोपी बनवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली.

गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त पाककडून ३ सहस्र शिखांना व्हिसा !

     नवी देहली - पाकिस्तानने ३ सहस्र ३१६ शीख तीर्थयात्रेकरूंना पाकमध्ये येण्यासाठी व्हिसा दिला आहे. पाकमधील लाहोरजवळ असणार्‍या ननकाना साहिब येथे गुरुनानक यांच्या प्रकाशपर्वामध्ये सहभाग घेण्यासाठी ते जाणार आहे. गुरुनानक यांचे हे जन्मस्थान आहे. १२ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत ही यात्रा असणार आहे.

मोठे चलन बंद झाल्याने गोव्यातील कॅसिनो व्यवसायाचे कंबरडे मोडले !

      पणजी, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - केंद्रशासनाने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काळ्या पैशांची उलाढाल होत असलेल्या गोव्यातील कॅसिनो व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे कॅसिनो व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. 
       कॅसिनोंमध्ये येणार्‍या लोकांवर केवळ क्रेडिट कार्डने खेळण्याची सक्ती करण्यात आली आहे, तसेच जे ग्राहक ५०० रुपयांच्या किंवा १ सहस्र रुपयांच्या नोटा वापरत असतील त्यांना जिंकल्यानंतर पुन्हा अशाच नोटा दिल्या जातील, असे कॅसिनो व्यवस्थापनाने कळवले आहे. यामुळे बरेचसे ग्राहक असंतुष्ट आहेत. अनेक जण कॅसिनोंमध्ये क्रेडिट कार्ड वापरत असल्यामुळे हा व्यवसाय काही प्रमाणात चालू आहे. गोव्यातील कॅसिनोंमध्ये प्रतिदिन शेकडो कोटींची उलाढाल होते. राज्य सरकारने अद्याप गेमिंग कमिशन नेमलेले नसल्याने या ठिकाणी नेमकी किती उलाढाल होते, याविषयी माहिती मिळत नाही.


मोठ्या नोटा रहित केल्यामुळे गोव्यातील निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर घटणार !

     पणजी, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या चलनी नोटा रहित करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात वर्ष २०१७ ला होणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशांच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर अंकुश बसणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रेटीक रिफॉर्म’च्या संघटनेच्या मते निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना मिळणारा ७५ टक्के निधी हा अज्ञातांकडून मिळणारा असतो.

बंदीची आणीबाणीशी तुलना करणे चुकीचे ! - भाजप

‘एन्डीटीव्ही’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील बंदीचे प्रकरण !
     पणजी, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील बंदीची आणीबाणीच्या काळाशी तुलना करणे चुकीचे आहे. राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील बंदी ही राष्ट्रहिताच्या दृष्टीने घालण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिले. ‘एन्डीटीव्ही’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने प्रथम बंदी आणली होती आणि नंतर बंदी आदेशावर स्थगिती आणण्यात आली आहे. या घटनेला अनुसरून काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भाजप शासन काळात देशातील लोकशाही काळ्या छायेखाली असल्याचे विधान केले होते. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय सचिव शर्मा बोलत होते.

म्हापसा, गोवा येथील भाजपचे नेते परेश रायकर यांचा गोवा सुरक्षा मंचमध्ये प्रवेश

     पणजी, ११ नोव्हेंबर (वार्ता.) -  भारतीय जनता पक्षाचे कार्यकारणी सदस्यपद तथा म्हापशाचे प्रसिद्ध उद्योजक परेश रायकर यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी रितसर गोवा सुरक्षा मंचमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांच्या समवेत २०० कार्यकर्ते उपस्थित होते. मंचाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी पुष्पहार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन रायकर यांची मंचामध्ये स्वागत केले. 
      भाजप सरकारने दूरदृष्टीकोन पाहून राज्यात विकास साधला; मात्र वचननाम्यातील वचने ते पूर्ण करू शकले नाही. मंचामध्ये प्रवेश करतांना आनंद होतो आहे; मात्र भाजपमधून बाहेर पडल्याचे दुःखही आहे, असे रायकर या वेळी म्हणाले.

(म्हणे) भोपाळ चकमकीत मुसलमानांच्या ८ कुटुंबांवर अन्याय ! - ओवैसी

मुसलमान नेते जिहादी आतंकवाद्यांची उघडपणे पाठराखण करतात; मात्र हिंदूंचे नेते हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी कधी रहात नाहीत !
     भुसावळ - भोपाळ येथील चकमक ही संशयास्पद होती. भोपाळ चकमकीत मुसलमानांच्या ८ कुटुंबांवर अन्याय झाला आहे. ते आतंकवादी आहेत कि नाहीत, हे न्यायालय ठरवणार आहे, अशा शब्दांत एम्आयएम् पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भोपाळ कारागृहातून पळून गेलेल्या सिमीच्या आतंकवाद्यांना पाठीशी घातले आहे. ते येथील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलत होते. (न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नसतांना कोणत्या आधारावर ओवैसी 'अन्याय झाला' म्हणत आहेत ? या सिमीच्या आतंकवाद्यांनी कोणते जनहितकारी कार्य केले होते ? - संपादक) 
ओवैसी पुढे म्हणाले, 

मंदिरांच्या अर्पणपेटीतील पैसा करमुक्त असेल ! - अर्थमंत्रालय

      नवी देहली - भक्तांनी अर्पणपेटी किंवा हुंडी यांमध्ये अर्पण केलेले पैसे मंदिर व्यवस्थापनांनी बँकांच्या खात्यामध्ये भरल्यास त्यावर कर लावला जाणार नाही. मंदिरांना अर्पण पेटीतील पैशांसाठी ही विशेष सूट देण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी कुठलीच मर्यादाही घालण्यात आलेली नाही, असे अर्थमंत्रालयातील महसूल सचिव हसमुख आधिया यांनी सांगितले. मंदिरांमध्ये विश्‍वस्त मंडळे असतात. त्यापैकी धर्मादाय विश्‍वस्त मंडळांना यामध्ये सूट देण्यात आलेली नाही. त्यांनी अर्पणदात्यांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे, असे ते पुढे म्हणाले.
      सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित केल्यानंतर अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या अधिकार्‍यांनी भक्तांकडून अशा नोटा स्वीकारण्यात येणार नसल्याची घोषणा केली आहे. त्या विषयीच्या सूचना कर्मचार्‍यांना देण्यात आल्या आहेत, असे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या अधिकार्‍याने सांगितले. 

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आजपासून उल्हासनगर येथे पाचव्या प्रांतीय हिंदु अधिवेशनाला प्रारंभ !

हिंदुहिताच्या कार्यक्रमांना बळकटी 
देण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि 
रायगड येथील विविध संघटनांचा सहभाग !
        ठाणे, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने हिंदूंचे राष्ट्रव्यापी संघटन आकार घेऊ लागले आहे. मागील ४ वर्षांच्या यशस्वी अधिवेशनानंतर या वर्षीही १२ आणि १३ नोव्हेंबर हे २ दिवस पाचव्या प्रांतीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन उल्हासनगर येथील चालिहा मंदिर सभागृह येथे होत आहे. या अधिवेशनामध्ये मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या संघटना संस्कृतीरक्षण, गोरक्षा, हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण, धर्मांतर आणि लव्ह जिहाद या समस्यांविषयी प्रबोधन आदी क्षेत्रांत कार्य करत आहेत. मागील ४ अधिवेशनांत निश्‍चित झालेल्या समान कृती कार्यक्रमांतून प्रेरणा घेऊन हिंदुहित आणि हिंदूूसंघटन यांविषयी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या अधिवेशनाद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली.

देशातील विद्यापिठे आणि महाविद्यालये यांतील उपाहारगृहांत जंक फूडच्या विक्रीवर बंदी !

स्तुत्य निर्णय !
     मुंबई - विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे आणि लठ्ठपणाची वाढती समस्या रोखणे, यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील विद्यापिठे अन् महाविद्यालये यांतील उपाहारगृहांमध्ये जंक फूडला बंदी घातली आहे, अशी माहिती आयोगाचे सचिव प्रा. डॉ. जसपाल संधू यांनी सर्व विद्यापिठांना पाठवलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. देशातील महाविद्यालयांतील उपाहारगृहामध्ये पिझ्झा, बर्गर यांसारखे जंक फूड मोठ्या प्रमाणावर विकले जाते. त्या पदार्थांमुळे विद्यार्थ्यांचे वजन अतीप्रमाणात वाढते, असा आरोग्यतज्ञांचा अहवाल आहे. त्याची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि त्याचे दुष्परिणाम यांविषयी जागृती करावी, विद्यार्थ्यांना पोषक आहार, व्यायाम यांविषयी समुपदेशन आणि मानसोपचार तज्ञांकडूनही मार्गदर्शन केले जावे, अशा सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. (भारतियांची प्राचीन आहारपद्धत आयुर्वेदातील आचारधर्मांनुसार आहे. भारतीय सात्त्विक आहारामुळे प्राकृतिक स्वास्थ्य तर लाभतेच, शिवाय त्याचे लठ्ठपणा वाढण्यासारखे दुष्परिणामही होत नाहीत ! त्यामुळे आता भारतीय आहारपद्धतीचा प्रसार करून विद्यार्थ्यांच्या समस्येवर उपाययोजना काढणे आवश्यक आहे ! - संपादक)

श्रीराम मंदिर संस्थानच्या भव्य रथोत्सवात जळगावनगरी भक्तीरसात न्हाली !

भावपूर्ण वातावरणात पारंपरिक रथोत्सव साजरा ! 
     जळगाव, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - जळगावनगरीचे ग्रामदैवत आणि वारकरी संप्रदायाची १४१ वर्षांची थोर परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने कार्तिकी प्रबोधिनी एकादशीनिमित्त आज श्रीराम रथोत्सव उत्साहात पार पडला. ११ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता काकडआरती, प्रभु श्रीरामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक होऊन सकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली.
 विविध धार्मिक कार्यक्रम
     सकाळी ७.३० ते ८.३० सांप्रदायिक पंचपदी भजन, त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी ९.३० वाजता श्रीरामरथाचे महापूजन, वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त आणि विद्यमान गादीपती, वहिवाटदार ह.भ.प. मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांच्या हस्ते आणि श्री शारदा वेदपाठशाळा अन् शहरातील समस्त ब्रह्मवृंद यांनी केलेल्या वेदमंत्रघोषात करण्यात आले. 

ओळखपत्राविना ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेऊ शकता ! - अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया

      नवी देहली - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये पैसे भरण्यासाठी किंवा ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा पालटून घेण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची किंवा त्याच्या छायांकित प्रतीची (झेरॉक्सची) आवश्यकता नाही, असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी केले आहे. तसेच २ सहस्र रुपयांच्या नोटा केवळ बँकेतच उपलब्ध होतील, त्या एटीएम्मधून मिळणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या. विदेशात रहाणार्‍या भारतियांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी स्वतः येण्याची आवश्यकता नाही. केवळ संबंधिताला पाठवत असल्याचे पत्र देणे बंधनकारक असेल, असेही त्या म्हणाल्या. 

धानोरा (जिल्हा जळगाव) येथे शेतकर्‍यांचे केळी फेक आंदोलन

अशा प्रकारे देवाने दिलेल्या अन्नाची नासाडी केल्यावर देव आपत्कालात ते देईल का ?
 जे शेतकरी मेहनतीने केळी पिकवतात, त्यांनीच असे आंदोलन करणे योग्य नव्हे. 
शेतकरी त्यांच्या मागण्या अन्य पद्धतीने करू शकतात. 
     जळगाव - केळीला बोर्डानुसार भाव मिळावा, बोर्डापेक्षा अल्प भावाने केळी कापू नये,केळीला किमान १ सहस्र रुपये हमी भाव मिळावा, केळी हे फळ म्हणून घोषित होऊन पीकविम्याचा फायदा मिळावा, तसेच कांद्याला प्रती क्विंटल २ सहस्र रुपये भाव मिळावा, कापसाला प्रति क्विंटल सहा सहस्र रुपये भाव मिळावा, तसेच अनेक व्यापारी शेतकर्‍यांच्या मालाचे पैसे बुडवतात त्यासाठी शासनाने कठोर कायदे करावेत या मागणीसाठी धानोरा येथील जळगाव महामार्गवर एक घंटा रास्ता बंद आंदोलन करून केळी फेक आंदोलन करण्यात आले. या वेळी सहस्रो रुपयांची केळी वाया गेली आणि रस्ताही अस्वच्छ झाला.

निवृत्ती वेतनधारकांनी न विसरता नोव्हेंबर मासात अधिकोषाला लाईफ सर्टिफिकेट द्यावे !

       ज्या शासकीय अथवा अन्य कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला निवृत्ती वेतन (पेन्शन) देण्यात येते, त्यांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात लाईफ सर्टिफिकेट द्यायचे असते आणि ते दिल्यानंतरच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन चालू राहू शकते. हे सर्टिफिकेट देण्यासाठी अधिकोषाच्या ज्या शाखेतून खाते उघडले आहे, तेथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या अधिकोषाची शाखा असल्यास तेथे आपल्या आधारकार्डाची मूळ आणि झेरॉक्स प्रत, तसेच पासबूक दाखवून लाईफ सर्टिफिकेट देता येते. (उदा. एखाद्याने निवृत्त वेतनासाठी ठाणे येथील अधिकोषातून खाते उघडले असेल आणि सध्या तो देहलीला वास्तव्याला असेल, तर देहली येथील त्या अधिकोषाच्या शाखेतूनही तो सर्टिफिकेट देऊ शकतो.) तरी नोव्हेंबर मासात लवकरात लवकर सर्टिफिकेट द्यावे.

सांगली महापालिका क्षेत्रातील १४५ अनधिकृत धार्मिक स्थळे स्थलांतर करण्यासाठी नोटिसा !

     सांगली, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - महापालिका क्षेत्रातील १४५ अनधिकृत धार्मिक स्थळांना स्थलांतर करण्याच्या संदर्भातील नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार करण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या स्थळांवर कारवाई करण्याच्या संदर्भात खुलासा मागवण्यात आला आहे. जे खुलासा करणार नाही त्यांच्यावर ३१ डिसेंबरपूर्वी या स्थळांवर कधीही कारवाई करण्यात येणार आहे. या नोटिसांमध्ये बहुसंख्य ही मंदिरे असून मशीद, मदरसा, तसेच चर्च यांनी संख्या अत्यंत अल्प आहे. 

पेट्रोल पंप, रेल्वे आदी ठिकाणी जुन्या नोटा वापरण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ !

देशात सर्वत्र टोलही माफ !
       नवी देहली - केंद्रसरकारने पुढील ३ दिवस रेल्वे, विमानतळ, शासकीय रुग्णालये, औषध दुकाने, पाणी आणि वीज देयके, शासकीय कर आणि बस प्रवास इत्यादीसाठी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची अनुमती मर्यादा वाढवली आहे. आता या कामांसाठी १४ नोव्हेंबरपर्यंत या नोटा स्वीकारल्या जातील. याव्यतिरिक्त १४ नोव्हेंबरपर्यंत देशात कोठेही टोल शुल्क घेतले जाणार नाही.

तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या माजी नगरसेवकासह १० जणांवर गुन्हा

पोलिसांचे खरे स्वरूप !
 तक्रार नोंदवण्यास उशीर करणारे आणि जनतेच्या जिवाशी खेळणारे पोलीस जनताद्रोहीच ! 
    कल्याण - किरकोळ वादातून अपहरण करून हॉकीस्टीक आणि लोखंडी सळया यांच्या साह्याने तरुणाला पुष्कळ मारहाण केल्याची घटना कल्याणच्या चिकणघर येथे घडली. या प्रकरणी मनसेचे माजी नगरसेवक उल्हास भोईर आणि त्यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असला, तरी २४ घंटे उलटूनही आरोपी हाती लागलेले नाहीत.

विरोधकांकडून संघ कार्यकर्त्यांवर होणार्‍या आक्रमणांना आळा घालावा ! - रा.स्व. संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ठराव

यासमवेत संघाने स्वतःजवळील काठ्यांचा वापर स्वरक्षणार्थ करायला हवा ! 
     संभाजीनगर, ११ नोव्हेंबर - ज्या प्रांतात हिंदुत्वाचा प्रभाव वाढत आहे, तेथे संघाच्या विरोधकांकडून संघ कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमणे केली जात आहेत. अशा हिंसेला आळा घालावा, अशी मागणी करणारा ठराव भाग्यनगर येथील कार्यकारी मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला, अशी माहिती रा.स्व. संघाचे प्रांत सहसंघचालक मधुकर दाजी जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. (देशात स्वतःच्या पक्षाचे सरकार असतांना अशी मागणी करावी लागणे, हे दुर्दैवाचे ! - संपादक) या वेळी संघाचे प्रांत प्रचारप्रमुख वामनराव देशपांडे, शहर प्रचारप्रमुख राजेश लेहेकर, प्रा. मोरेश्‍वर बर्दापूरकर आदी उपस्थित होते. 

रेल्वे प्रशासनाने प्रतीक्षासूचीचे प्रवासी देयक आरक्षण केंद्रावरून देण्याचे थांबवले !

काळा पैसा निर्माण होऊ न देणे आणि पारदर्शी कारभार,
यांसाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक आहे !
     मुंबई - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित झाल्यानंतर अनेकांनी नोटा पालटण्यासाठी रेल्वेचे आरक्षण केले अन् प्रतीक्षासूचीतील तिकिटे निश्‍चित (कन्फर्म) होण्यापूर्वीच रहित केली. हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रतीक्षासूचीतील रहित करण्यात आलेल्या तिकिटांची परतावा रक्कम आरक्षण केंद्रावरून मिळणार नसल्याचे घोषित केले आहे, तसेच ५० सहस्रांहून अधिक किमतीच्या तिकिटांचे आरक्षण करायचे असल्यास पॅनकार्ड क्रमांक देणे बंधनकारक केले आहे. काही जणांनी या माध्यमाचा उपयोग काळा पैसा पांढरा करण्यासाठी केल्यामुळे ९ नोव्हेंबरला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत पश्‍चिम रेल्वेमध्ये १ कोटी ८० लक्ष रुपये किमतीच्या तिकिटांचे आरक्षण झाले होते. (शासनाने राष्ट्रहितार्थ निर्णय घेतल्यानंतर जनतेने अशी उतावीळपणे केलेली कृती, हे भारतीय लोकशाहीचे अपयश आहे ! स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनंतरही जनतेतून या प्रकरणी उमटत असलेल्या प्रतिक्रिया ही भारतीय जनतेची वैचारिक अपरिपक्वताच ! - संपादक)

सातार्‍यात अपक्ष उमेदवार अज्ञात स्थळी, तर खर्चाचा तपशील न देणार्‍यांना नोटिसा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची निरर्थकता ! 
     सातारा, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - नगरपालिका निवणुकांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून कोणीही उमेदवार माघार घेत नसल्याने नगरपालिका लढत बहुरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यातच मनोमिलन तुटल्यामुळे अपक्ष उमेदवारांवर दबाव आणून त्यांचे स्थान निश्‍चित करण्याचा प्रयत्न प्रत्येक आघाडीकडून होणार, हे लक्षात घेऊन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार अज्ञात स्थळी निघून गेल्याचे लक्षात आले. काहींनी त्यांचेे भ्रमणभाष बंद करून ठेवल्याचेही समजले. 

नोटा बदलण्याला विरोध नाही, नागरिकांना होणारा त्रास थांबवा ! - उद्धव ठाकरे

     मुंबई, ११ नोव्हेंबर - काळा पैसा बाहेर येण्याविषयी कुणाचे दुमत नाही; मात्र ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा अचानक रहित केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. नोटा पालटण्याला विरोध नाही; पण नागरिकांना होणारा त्रास थांबवा. नोटा पालटण्याची मुदत वाढवा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर 'स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी '?, असा प्रश्‍न श्री. ठाकरे यांनी उपस्थित केला.

अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्या. काटजू यांना सुरक्षारक्षकांद्वारे बाहेर काढले !

       नवी देहली - केरळमधील सौम्या नावाच्या तरुणीवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निकालात त्रुटी असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अवमान नोटीस बजावली होती. या नोटिसीवरून काटजू ११ नोव्हेंबरला न्यायालयात उपस्थित राहिले आणि त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान दिले. मिस्टर (न्यायाधीश) गोगोई, मला धमकावू नका. तुम्हाला हवे ते तुम्ही करा. मी तुम्हाला घाबरत नाही, असे काटजू म्हणाले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने सुरक्षारक्षकांना पाचारण केले आणि काटजू यांना न्यायालयाबाहेर काढण्यास सांगितले, तसेच काटजू यांनी पुढील ६ आठवड्यांत नोटिशीला उत्तर द्यावे, असा आदेश न्यायालयाने दिला.

भारताला जगातील सर्वांत मुक्त अर्थव्यवस्था बनवायची आहे ! - पंतप्रधान मोदी

     टोकियो - भारताला जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी सुधारणा केल्या जात आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जपानच्या दौर्‍यावर असणारे पंतप्रधान मोदी येथील व्यावसायिकांंसमोर बोलत होते. 

ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकेचे वाईट दिवस चालू ! - इसिस आणि अल् कायदा

     न्यूयॉर्क - एकीकडे अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यावर काही घंट्यांतच अमेरिकेतील अनेक भागांत नागरिकांनी ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने केली, तर दुसरीकडे इसिस आणि अल् कायदा या जिहादी आतंकवादी संघटनांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. आता अमेरिकेचे वाईट दिवस चालू झाले आहेत. खुश व्हा. ट्रम्प यांच्या हातूनच अमेरिकेचा मृत्यू अटळ आहे, असे अल् कायदा समर्थक अल् मकालात याने ट्विट करून म्हटले आहे. 

राज्यात विविध महानगरपालिकांमध्ये कोट्यवधींचा कर जमा !

      पुणे, ११ नोव्हेंबर - पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर तसेच ठाणे अशा राज्यांतील विविध महानगरपालिकांमध्ये ८ घट्यांत ८२ कोटींहून अधिक रकमेचा कर जमा झाला आहे. मध्यरात्रीपर्यंत १२० कोटी अन्यत्रच्या महानगरपालिका, नगरपरिषदा येथेही लक्षावधी रुपयांचा कर जमा झाला. काळा पैसा, तसेच खोट्या नोटा यांना आळा घालण्यासाठी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या प्रचलित चलनी नोटांवर बंदी आणल्यानंतर नागरिकांमध्ये अस्वस्थता झाली, तरी या निर्णयाचा सकारात्मक परिणामही करभरणाच्या रूपाने पहायला मिळत आहे. थकलेला कर जमा करतांना जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याचे घोषित केल्यानंतर राज्यातील अनेक नागरिकांनी विविध कर जमा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रांगा लावल्या. रात्री उशिरा कर भरण्याची मुदत १४ नोव्हेंबर केल्याचे घोषित करण्यात आले आहे.

भारतातील राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रांची दु:स्थिती !

राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रे कार्यक्षमतेने चालवून शासनाने 
उच्च सांस्कृतिक वारसा समृद्ध करावा, ही हिंदूंची अपेक्षा आहे ! 
श्री. अनिल धीर
      हिंदु संस्कृतीचा अत्यंत उच्च वारसा लाभलेल्या भारतात सांस्कृतिक क्षेत्राची उपेक्षा होत आहे. शासनाचे विविध सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रे यांतील निष्क्रीयता, अधिकार्‍यांची रिक्त पदे यांविषयी या लेखात जाणून घेऊया. 
लेखक : श्री. अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच
१. केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाच्या विचारसरणीनुसार देशाच्या 
सांस्कृतिक केंद्रांचा प्राधान्यक्रम आणि विचारसरणीत पालट होणे
     देशामधील सत्तांतरानंतर शासनाद्वारे अनुदानित किंवा नियंत्रित असलेल्या सांस्कृतिक केंद्रांच्या प्राधान्यक्रमात किंवा विचारसरणीत नेहमी पालट होत असतो. या संघर्षाची सीमारेषा विविध शैक्षणिक संस्था, पुस्तकालये, संग्रहालये यांसारख्या सांस्कृतिक संस्थांमधून ओढली जात आहे. मोदी शासन सत्तेत आल्यावर अंदाजे १८ मासांत सांस्कृतिक मंत्रीमंडळाच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या ४२ स्वयंशासित केंद्रांना नियंत्रित करून त्यांच्यात पालट आणून त्यांना पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. यात भारतीय पुरातत्व विभाग, राष्ट्रीय अभिनय कला केंद्र, राष्ट्रीय संग्रहालय, कला क्षेत्र, भारतीय संग्रहालय, नेहरू स्मारक संग्रहालय आणि पुस्तकालय, भारताचे मानवशास्त्रीय मापन आणि राष्ट्रीय पुरातत्व विभागाचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्याचा ऑक्टोबर २०१६ या मासातील चौथ्या आठवड्याचा सनातन संस्थेच्या प्रसारकार्याचा आढावा !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
१. ‘प्रसाराच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याला जोडलेल्या धाराशिव जिल्ह्यातील भूम या गावात सनातन संस्थेच्या वतीने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा वितरणकक्ष लावण्यात आला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी एका जिज्ञासूने ३ आकाशकंदील घेऊन ते मंदिरात लावण्याची इच्छा व्यक्त केली.
२. दिवाळीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात ४५१ आकाशकंदिलांचे वितरण झाले.
३. सोलापूर येथील सोनीनगर भागात साधक आकाशकंदील देण्यासाठी जात असतांना त्यांच्या हातातील आकाशकंदील पाहून रस्त्यावरून जाणार्‍या दोन महिलांनी त्याविषयी विचारले. साधकांनी आकाशकंदिलाची माहिती आणि महत्त्व सांगितल्यावर त्या महिलांनी आकाशकंदील विकत घेतले.

हिंदुत्व बळकट करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र घडावा !

     भाजप-शिवसेना यांचे सरकार राज्यात सत्तेत येऊन दोन वर्षे नुकतीच पूर्ण झाली. या दोन वर्षांत सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी भाजप सरकार ‘महाराष्ट्र घडत आहे’ या घोषवाक्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोेचण्याचा प्रयत्न करत आहे. 
     या दोन वर्षांत मागील अनेक वर्षांपासून आघाडी सरकारने विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले, अनेक विकास प्रकल्प मार्गी लावले, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून ४ सहस्रांहून अधिक गावे दुष्काळमुक्त केली, अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले, तसेच सुशासन निर्माण करण्याचे प्रयत्न केले, अशा प्रकारे सरकारी कामांविषयी मंत्री आणि कार्यकर्ते भरभरून बोलतांना दिसतात. विकासकामांना मिळालेली गती स्तुत्य असून त्यासाठी सरकारचे जनतेच्या वतीने अभिनंदन आहेच; पण तरीही ज्या आशेने जनतेने सरकारला निवडून दिले, त्यासाठी विकासाच्या बरोबरीने; किंबहुना त्यापेक्षाही अधिक हिंदुत्व बळकट करण्याच्या जनतेच्या अपेक्षा आहेत.

पाश्‍चात्त्य संस्कृतीतील अनर्थांचे बीज जाळून टाकणे आवश्यक !

     आम्हा भारतियांचे आचरणच नव्हे, तर संवेदनादेखील पश्‍चिमी झाल्यामुळे आमच्यातील थोर व्यक्ती त्यांच्याच तालावर ताल धरतात, आणि त्याप्रमाणेच नाचतात.
       आमच्यावर अनर्थांचे मेघ बरसू लागले आहेत. आमच्या पूर्वजांनी त्यांच्या तपस्येतून निर्माण केलेल्या या पवित्र भारतभूमीत पश्‍चिमेतील जितके काही अनर्थ आहेत, त्या सर्वांचे बीज पेरले गेले आहेत. त्या सर्व बिजांना जाळून टाकणे हीच आमची भूमिका !

शिपायाकडे २ कोटी रुपये, तर नोकरशहा आणि नेते यांकडे किती असतील ?

भ्रष्टाचाराची भीषणता शाळकरी मुलांनाही माहिती असणे
     ‘जर शासकीय कचेरीतील चपराशाकडे (शिपायाकडे) २ कोटी रुपयांची अवैध संपत्ती, तर मग त्यांच्या वरिष्ठांकडे (साहेबांकडे) किती ? राजकीय नेत्यांकडे किती ? असा प्रश्‍न जर शिक्षकांनी तिसरी-चौथीतील मुलांना विचारला, तर मुले चटकन उत्तर देतील, ‘शेकडो सहस्रो कोटी !’ चपराशी हा शासन व्यवस्थेतील तळागाळातील कर्मचारी ! त्यांच्याकडे एवढी काळी माया असेल, तर त्याच्या वरच्या भ्रष्टांकडे नक्कीच काही पट अधिक असणार. साधा हिशोब आहे. सरळ गणित आहे.
ओडिशासारख्या अविकसित राज्यातील शिपायाकडे मिळालेली अवैध संपत्ती
     ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील उपुला गावचा रहिवासी भाग्यघर दास कटक हा जिल्हाधिकारी कार्यालयात चपराशी आहे. दक्षता विभागाने कटक याच्या निवासस्थानावर धाड घातली. त्याची संपत्ती (प्रॉपर्टी) पाहून दक्षता अधिकारीही चक्रावून गेले. त्याची जवळपास २ कोटी रुपयांची संपत्ती (प्रॉपर्टी), चार शाही बंगले, अर्धा किलो सोन्याचे दागिने, २ आलिशान कार, ४ मालट्रक आणि अन्य चीजवस्तू, महागडे फर्निचर, उपकरणे, लाखो रुपये रोख, अशी संपत्ती उघड झाली. ओडिशा हे भारतातील प्रगत राज्य मानले जात नाही. तेथील साधा शिपाई हा २ कोटी रुपये अवैध संपत्ती जमवतो, लाखो रुपये घरात ठेवतो, तर मग विकसित महाराष्ट्रात काय स्थिती असेल ?

धर्मांतरित हिंदूंना हिंदु धर्मात परत न घेणे, ही चूक आता तरी सुधारणार का ?

      ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेला इतिहाससिद्ध सिद्धांत आहे. या संकटावर मात करण्यासाठी परधर्मात गेलेल्या हिंदूंना शुद्ध करून परत हिंदु धर्मात आणणे, हाच मार्ग श्रेयस्कर ठरतो. परकियांनी जिंकलेली आपली राज्ये आपण युद्ध करून परत मिळवली; परंतु राज्ये परत मिळवल्यानंतर परकीय आक्रमणांनी बाटवलेल्या हिंदूंना मात्र आम्ही परत हिंदु करून घेतले नाही. ही ऐतिहासिक चूक झाली. या चुकीमुळेच इस्लामी आणि इंग्रजी सत्तेने बाटवलेले हिंदू आजही देश विभाजनाच्या कारवायांनी बळी पडत असलेले दिसतात !’’ - विक्रम सावरकर
     हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.’
- श्री श्री गुरुनागभूषण शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक
     भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल !
- श्री. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे महर्षींनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडावर शिवकवच म्हणून केलेल्या उपचारांचे सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले
     २९.८.२०१६ या दिवशी महर्षींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून दिलेल्या फलादेशानुसार सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या इमारतीला लागून असणार्‍या पारिजातकाच्या सुकत चाललेल्या वृक्षाजवळ सनातनच्या ३ पुरोहितांनी शिवकवच स्तोत्र म्हटले. या वेळी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहे. 
१. शिवकवचाचे पठण करण्यास सांगितलेल्या तिथीचे महत्त्व 
१ अ. शेवटचा श्रावणी सोमवार : श्रावणातील शेवटच्या सोमवारी शिवकवचाचे पठण झाल्यामुळे पारिजातकाच्या वृक्षाला आपतत्त्वात्मक शिवतत्त्वाचा विपुल प्रमाणात लाभ झाल्याचे जाणवले.
१ आ. सोमप्रदोष : प्रदोषकालात केलेल्या शिवोपासनेमुळे उपासना अधिक फलदायी होते. या दिवशी सोमवार असल्याने अनायसे सोमप्रदोषाचा योग साधला गेला. त्यामुळे अनेक पटींनी शिवाची कृपा पारिजातकाच्या वृक्षाला प्राप्त झाल्याचे जाणवले.

निसर्गाच्या माध्यमातून भगवंत देवद आश्रमावर करत असलेल्या कृपादृष्टीची काही उदाहरणे !

सौ. अश्‍विनी पवार
कु. स्नेहा झरकर
     ‘प.पू. पांडे महाराज आणि आश्रमातील संतांचे अस्तित्व यांमुळे आश्रमाच्या परिसरात चैतन्य जाणवत आहे. त्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. संतांमधील चैतन्याचा 
लाभ करून घेणारी झाडे !
     आश्रम परिसरातील फळझाडे आणि फुलझाडे यांच्याकडे पाहून मनाला आनंद वाटतो. आश्रम परिसरातील निसर्ग बोलका वाटतो. ही झाडे असलेल्या परिसरात प्रतिदिन प.पू. पांडे महाराज, तसेच अन्य संत फिरायला येत असतात. ‘त्यांच्यातील चैतन्याचा झाडेही खर्‍या अर्थाने लाभ करून घेत आहेत’, असे लक्षात येते.

विविध युगांत झालेला अवतारत्वाचा उल्लेख आणि प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. त्रेतायुग - श्रीरामावतार 
     त्रेतायुगातील या अवतारात श्रीरामाला ते अवतार असल्याचे आठवत नसे, उदा. भूमाता सीतेला आपल्या कुशीत घेऊन अंतर्धान पावल्यावर श्रीरामाला दुःख झाले आणि ते भूमातेवर कृद्ध होऊन तिला शाप देणार होते. तेव्हा ब्रह्माने त्यांना ते अवतार असल्याचे सांगितले. श्रीरामाने स्वतःच्या अवतारत्वाची जाणीव झाल्यावर भावना आवरल्या. 
२. द्वापरयुग - श्रीकृष्णावतार 
     द्वापरयुगात महाभारत युद्धानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जायला निघाले. तेव्हा त्यांची भेट एका ऋषींशी होते. ऋषी त्यांना म्हणतात, तुमची इच्छा असती, तर तुम्ही युद्ध थांबवले असते; परंतु तुम्ही तसे न करता युद्ध होऊ दिले. त्यामुळे मी तुम्हाला शाप देऊ इच्छितो. यावर भगवान श्रीकृष्ण ऋषींना म्हणतात, मी अवतार असल्यामुळे माझ्यावर तुमच्या शापाचा कोणताही परिणाम होणार नाही, तरीही तुम्ही शाप दिला, तर तुमची अधोगती होईल. भगवान श्रीकृष्णाने असे सांगून ऋषींना शाप देण्यापासून सावध केले.
      श्रीकृष्णाने गीतोपदेश करत असतांना अर्जुनाला विश्‍वरूपाचे दर्शन दिले होते.

आश्रम परिसरातील आंब्यांच्या झाडांना यंदाच्या वर्षी सहस्रो आंबे लागले !

     ‘आश्रमाच्या परिसरात आंब्याची ३ झाडे आहेत. प्रतिवर्षी या झाडांना मर्यादित संख्येने आंबे येतात. यंदाच्या वर्षी आंबे येण्याच्या काळात या ३ झाडांना एकूण ३ सहस्रांहून अधिक आंबे आले. या वर्षी आंब्यांचे माहेरघर असलेल्या रत्नागिरीतही आंब्यांचे पीक अल्प प्रमाणात आले. अकाली आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे मोहोर झडून गेलेे. विदेशात ज्या आंब्याच्या पेट्या पाठवण्यात आल्या, त्याही आंब्यांना विषाणू लागल्याचे कारण देत पुन्हा परत आल्या. 
     या पार्श्‍वभूमीवर देवद येथे केवळ तीन झाडांना एवढ्या संख्येने आंबे येणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेष म्हणजे आंबे अधिक संख्येने येण्यासाठी कोणतेही निराळे प्रयत्न केले नाहीत. केवळ १ - २ वेळाच आंब्याच्या मोहरावर कीड लागू नये; म्हणून जंतुनाशकाची फवारणी केली होती. देवद आश्रमात मोठ्या संख्येने आंबे उपलब्ध झाल्याने येथून अन्य सेवाकेंद्रे आणि आश्रम येथे आंबे पाठवण्यात आले. ‘या घटनेमागे देवद आश्रमात झालेल्या चैतन्यातील वाढ’, हे कारण असावे, असे मला जाणवले.’
- श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०१६)

रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडाला महर्षींच्या कृपेने पालवी फुटणे आणि या प्रसंगातून आनंद अनुभवता येणे

कु. तृप्ती गावडे
१. पारिजातकाचे वाळलेले झाड पाहून 
त्याला पालवी येणार नाही, असे वाटणे
     आश्रमाच्या इमारतीच्या जवळच असणार्‍या पारिजातकाच्या झाडाची सर्व पाने गळून पडली आणि झाड अचानक वाळले होते. पावसाळ्यात इतर झाडांना नवीन पालवी आली होती आणि त्यांची पाने मोठी होऊन ती टवटवीत झाली होती; पण पारिजातकाच्या झाडाला पालवी येईल, असे वाटत नव्हते. ते पूर्णपणे वाळलेले दिसत होते. 
२. पारिजातकाचे झाड आश्रमाच्या जवळ नसेल, 
असे होऊच शकत नाही, असे वाटणे 
      २६.९.२०१६ या दिवशी दुपारी २.३० वाजता मी सहज पारिजातकाच्या झाडाखाली ग्रंथ वाचायला बसले होते. मी सहज त्या झाडाकडे पाहिले. तेव्हा ते पूर्णपणे वाळले होते. (काही झाडांच्या संदर्भात असे लक्षात येते की, पावसाळ्यात जुनी पाने गळून नवीन पाने येतात. त्या वेळी त्या झाडाला पाहिल्यावर ओळखू येते की, याला काही दिवसांनी नवीन पालवी येईल.) पारिजातकाच्या झाडासंदर्भात अशी शाश्‍वती वाटत नव्हती. नंतर मी कल्पना केली की, हे झाड श्रीकृष्णाने पृथ्वीवर आणले आहे आणि या कलियुगात ते रामनाथी आश्रमाच्या जवळ आहे आणि पुढे ते नसेल, असे होऊच शकत नाही.

अकाल मृत्यूयोगामुुळे प.पू. डॉक्टरांना झालेले तीव्र शारीरिक त्रास आणि त्या गंभीर आजारपणाचा झाडांंवर उमटलेला पडसाद !

सद्गुरु (सौ.) बिंदा
सिंगबाळ
       २३ जुलै ते १ ऑगस्ट २०१६ या काळात प.पू. डॉक्टरांना अतिशय थकवा आणि ग्लानी होती, ताप येत होता, उलट्या होत होत्या, पुष्कळ चक्कर येत होती, तसेच त्यांची प्राणशक्ती ३१ टक्के इतकी न्यून झाली होती. 
        प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या जवळील तुळशीचे आणि अश्‍वत्थाचे (पिंपळाचे) रोप, तसेच आश्रमाच्या परिसरात असलेले पारिजातकाचे झाड यांच्यावरही या महामृत्यूयोगाचा विपरीत परिणाम झाला होता. या कालावधीत तुळशीचे रोप सुकून मेल्यामुळे दुसरे रोप लावावे लागले, तर अश्‍वत्थाच्या रोपाची तीन पाने गळून केवळ एकच पान शिल्लक राहिले होते. पारिजातकाच्या झाडाची पाने मलूल होऊन वाळत चालली होती आणि भर पावसाळ्यात करपल्यासारखी होऊन गळून पडत होती.
     आसपास असलेल्या अन्य झाडांचे एकही पान गळलेले नसतांना पारिजातकाचा दैवी वृक्ष आणि अश्‍वत्थ अन् तुळशीचे सात्त्विक रोप यांची मोठ्या प्रमाणात पानगळती होत होती. 
      प.पू. डॉक्टरांच्या महामृत्यूयोगाची तीव्रता आपल्यासारख्या पामरांना लक्षात येऊ शकत नाही. हे वृक्ष आणि रोप यांच्यावर झालेल्या या गंभीर परिणामांमुळे हे किती मोठे आक्रमण होते, त्याची कल्पना येते.
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०१६)

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्रीमती मीरा करी करत असलेली भावपूर्ण मानसपूजा !

श्रीमती मीरा करी
१. सभागृहाची सजावट
     ‘श्रीकृष्णाच्या पाद्यपूजेसाठी सभागृह सजलेले आहे. सभागृहात सर्वत्र झेंडूच्या फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांची तोरणे बांधलेली आहेत. सर्वत्र तुपाची निरांजने लावलेली आहेत. बाहेर अंगणात सुंदर रंगाच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. श्रीकृष्ण येण्याच्या मार्गावर फुलांचा गालीचा अंथरला आहे. सभागृहात ऋषिमुनी, साधू-संत आणि साधक श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी वाट पहात बसले आहेत. बाहेर सजीव म्हणजे वृक्षवल्ली, निर्जीव म्हणजे दगड, माती आदी श्रीकृष्णाच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात आहेत. 
२. व्यासपिठाची सजावट
      व्यासपिठावरील देवघर चमेली आणि रजनीगंधा या फुलांच्या हारांपासून सजवलेले आहे. व्यासपिठावर गालीचा अंथरलेला आहे. श्रीकृष्णासाठी रत्नजडित सिंहासन ठेवलेले आहे. सिंहासनाच्या बाजूला प.पू. गुरुदेवांसाठी अजून एक आसन ठेवलेले आहे. सिंहासनाच्या बाजूला ठेवलेल्या एका मोठी समईत दिवे प्रकाशाने तेवत आहेत.

तुळशीशी दैवी नाते जडल्यामुळे तुळशीच्या वाळलेल्या रोपाला पालवी फुटल्याच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

सौ. सारिका आय्या
१. नऊ वर्षांपासून तुळशीचे रोप टिकले असून 
तुळस वाळली, तरी काही दिवसांत पुन्हा पूर्ववत् होेणे 
आणि प्रतिदिन सकाळचा नामजप तुळशीसमोर बसून करणे 
अन् तिच्याशी बोलणे यांमुळे तिच्याशी एक दैवी नातेच जुळणे 
     पुण्यात पर्वतीला आमचे घर आहे. मला झाडांची फार आवड असल्यामुळे मी कुुंड्यांमध्ये मोगरा, ब्रह्मकमळ अशी काही फुलझाडे आणि ४ - ५ कुंड्यांमध्ये तुळस लावली होती. माझ्या लग्नानंतर लावलेले, म्हणजे ९ वर्षांपासूनचे तुळशीचे रोप अजूनही टिकले होते. एरव्ही तुळस इतके दिवस जगत नाही, असे म्हणतात; परंतु ही तुळस वाळली, तरी ती काही दिवसांत पूर्ववत् होते, असे लक्षात आले होते. मला आध्यात्मिक त्रास असल्यामुळे मी प्रतिदिन सकाळचा नामजप तुळशीसमोर बसूनच करत असेे, तसेच मी तिच्याशी बोलतही असे. त्यामुळे तुळशीशी एक दैवी नातेच जुळले होते. मी प्रतिदिन तिच्याजवळ माझे मन मोकळे करत असेे.

शांत आणि समजूतदार असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नवीन पनवेल येथील चि. ईश्‍वरी बळवंत पाठक (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे 
हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ईश्‍वरी बळवंत पाठक एक दैवी बालक आहे !
चि. ईश्‍वरी पाठक
      कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (१२.११.२०१६) या दिवशी चि. ईश्‍वरी बळवंत पाठक हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि अन्य कुटुंबीय यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

असे एक तरी कृत्य भारताने गेल्या ७० वर्षांत केले आहे का ?

पाकिस्तान भारतापेक्षा राजकारणात हुशार ! 
       पाकच्या आयएस्आय या गुप्तचर संघटनेने भारतातील शीख आतंकवाद्यांचे स्लीपर्स सेल (आतंकवादी कारवाया करणारा आणि आतंकवाद्यांना साहाय्य करणारा स्थानिक गट) कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. याद्वारे भारतात आतंकवादी आक्रमण घडवून आणण्याची आयएस्आयची योजना असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला गुप्तचर संघटनांकडून मिळाली आहे.

साधकांना महत्त्वाची सूचना

अर्पण, नियतकालिकांची वर्गणी 
किंवा वसुली स्वीकारतांना पुढेही वापरात 
असतील अशाच नोटा स्वीकाराव्यात !
      नव्याने लागू झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ५०० आणि १००० रुपयांच्या सध्या चलनात असलेल्या नोटा आता वापरता यायच्या नाहीत. त्यामुळे साधकांनी यापुढे अशा नोटा स्वीकारू नयेत. यापुढे साधकांनी अर्पण, नियतकालिकांची वर्गणी किंवा वसुली स्वीकारतांना धनादेश, डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात किंवा चलनामध्ये सध्या वापरात असलेल्या १००, ५०, २०, १० रुपयांच्या नोटा, तसेच नवीन चलनात येणार्‍या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात. 

सनातन गौरव विशेषांक

सनातनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त... 
साप्ताहिक सनातन प्रभातचा अंक
वर्ष १९ : अंक क्र. : २ (२४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१६)
विशेषांकात प्रसिद्ध करण्यात येणारे लेख
  • सनातनच्या २५ वर्षांच्या कार्याचे सिंहावलोकन
  • सनातनचे प्रचंड वेगाने वाढणारे प्रसारकार्य 
  • सनातनचे अद्वितीय आश्रम
  • संत, मान्यवर आणि हिंदुत्ववादी यांनी गौरवलेला सनातन परिवार
        ... यासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण !
सनातनचे अद्वितीय कार्य जाणून
घेण्यासाठी आपली मागणी आजच नोंदवा ! 
पृष्ठे २४, मूल्य ८ रुपये 
        वितरकांनी अतिरिक्त अंकांची मागणी १४ नोव्हेंबर २०१६ या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत ईआरपी प्रणालीत भरावी.

साधकांना सूचना

       पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी (१३.११.२०१६) रात्री ११.१८ वाजता
समाप्ती - कार्तिक पौर्णिमा (१४.११.२०१६) सायंकाळी ७.२२ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका ! 
        सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्ररक्षणासाठी सरकारने 
शत्रूला धडा शिकवावा, अशी अपेक्षा !
      भारताने आधी अण्वस्त्रांचा वापर न करण्याच्या धोरणात का अडकून रहायचे ? देशासाठी जेव्हा एखादा धोका निर्माण झालेला असेल, तेव्हा अशा जुन्या धोरणांविषयी नक्कीच विचार करणार नाही, असे मत संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी स्पष्टपणे मांडले.

जळगावमध्ये फौजदारास लाच घेतांना अटक

पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराची बजबजपुरी ! 
     जळगाव (वार्ता.) - येथील रामानंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रकाश काळे यांना २ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले. एका खाजगी वाहन चालकाला त्याच्यावरील अटक वॉरंट रहित करण्यासाठी त्यांनी लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पिंप्राळा भागातील भवानी मंदिराजवळ सापळा लावून काळे यांना पकडून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला. त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Anvastroka upyog pehle na karneki bhumikame Bharat kyu rahe ? - Saurakshan Mantri Parrikar
Rashtra Raksha hetu sarkar Pak ko sabak sikhaye, yah apeksha
जागो ! : अण्वस्त्रों का उपयोग पहले न करने की भूमिका में भारत क्यों रहे ? - संरक्षण मंत्री पर्रीकर
राष्ट्ररक्षा हेतु सरकार पाक को सबक सिखाए, यह अपेक्षा !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रकृती आणि पुरुष 
१ प्रकृतीचे भय गेले म्हणजे तो पुरुष झाला. मी कर्ता आहे, याचे ज्ञान पाहिजे. मी म्हणजे अहंकार धरला, तर ती प्रकृती.
भावार्थ : मी कर्ता आहे यातील मी हा पुरुषतत्त्वासंबंधी आहे. 
२. प्रकृतीधर्माप्रमाणे वृत्ती, याला प्रवृत्ती म्हणतात. निवृत्तीची प्रतिक्रिया प्रवृत्ती. निवृत्ती ही स्वयंसिद्ध आहे.
३. पुरुषाचे लक्ष आणि स्त्रीची दृष्टी : पुरुषाचे लक्ष हे त्याचे ध्येय असते, तर स्त्रीची दृष्टी परपुरुषाचे लक्ष आकृष्ट करते, म्हणजे प्रकृतीमुळे विकार येतात. लक्ष, रस इत्यादी म्हणजे विकार. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

श्रमाची कास धरा !
ईश्‍वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे 
निश्‍चितच पळून जातील; पण त्यासाठी श्रमाची कास धरा.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

नोटांचा तोटा !

संपादकीय
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाडसी आणि अचानक निर्णय घेऊन ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित करण्याचा निर्णय घोषित करून देशवासियांना सुखद; तर पाक, बांगलादेश अन् दाऊद इब्राहिम यांना दुःखद धक्का दिला. त्यांच्या या निर्णयाला जनतेनेही लगेच सकारात्मक प्रतिसाद देत समर्थन दिले; मात्र या निर्णयानंतर जनता गेल्या ३ दिवसांपासून खरोखरच काही समस्यांना सामोरे जात आहे. सरकारने या निर्णयानंतर एक दिवस बँका आणि २ दिवस एटीएम् बंद ठेवल्याने नागरिकांनी जे सहन केले ते त्यांनी देशहितासाठी सहन केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn