Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

आज पांडव पंचमी

भारताने सर्जिकल स्ट्राईक करूनही पाककडून ३०० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग !

सर्जिकल स्ट्राईक ऐवजी प्रत्यक्ष युद्ध करून पाकला नष्ट करणे,
हा भारताच्या सुरक्षेच्या आणि शांतीच्या दृष्टीने
परिणामकारक मार्ग आहे, हे सरकारला समजेल तो सुदिन !
    नवी देहली - उरी येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून २९ सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक करूनही पाकने ३०० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केल्याची माहिती शासकीय अधिकार्‍यांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. यापूर्वी वर्ष २०१५ मध्ये पाकने ४०५ वेळा शस्त्रसंधीचा भंग केला होता, तर यंदाच्या वर्षी केवळ जम्मूमध्येच पाकने २०० वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. सीमा सुरक्षा दल पाकच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत आहे. सीमावर्ती भागातील स्थानिक नागरिकांना इतरत्र सुरक्षित स्थळी हालवण्यात येत आहे. तसेच १०० शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.

लडाखमध्ये चीनच्या ५५ सैनिकांची घुसखोरी !

कुरापतखोर चीन !
  नवी देहली - लडाखच्या डेमचोक क्षेत्रात चीनचे सुमारे ५५ सैनिक घुसले आणि त्यांनी येथे चालू असलेल्या धरणाचे काम थांबवल्याची घटना नुकतीच घडली. या वेळी भारत-तिबेट सीमा पोलिसांनी आणि सैन्याने त्यांना विरोध केला; मात्र भारतीय सैन्याने अशी घटना घडल्याचे नाकारले आहे. डेमचोक येथे २०१४ मध्येही घुसखोरी झाली होती. हा भाग अत्यंत दुर्गम आहे. येथे भारताचे ७० सैनिक तैनात आहेत.

जिहादचे समर्थन करणार्‍या पॅरिसमधील ४ मशिदींवर बंदी !

   पॅरिस - फ्रान्स सरकारने पॅरिसमधील ४ मशिदी बंद करण्याचा आदेश दिला आहे. या मशिदींमधून जिहादी विचारसरणीचे समर्थन करण्यात येत होते, असे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या जिहादी आक्रमणानंतर येथे जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. (भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवाद असतांना आणि मशिदी अन् मदरसे यांतून जिहाद्यांना समर्थन, साहाय्य मिळत असतांना भारताने कधी त्यांच्यावर बंदी घातली नाही, हे लक्षात घ्या ! - संपादक)

केंद्र सरकारची एन्डीटीव्ही इंडिया वृत्तवाहिनीवर एक दिवसाची बंदी !

  • पठाणकोट येथील आक्रमणाचे वार्तांकन करतांना देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न !
  • देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या अशा वाहिन्यांवर कायमचीच बंदी घालायला हवी, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !
नवी देहली - जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचे अतिप्रमाणात वार्तार्ंकन करून देशाच्या सुरक्षेला धोका पोचवल्याप्रकरणी एन्डीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीला एक दिवस प्रक्षेपण बंद ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. एखाद्या खाजगी वाहिनीला अशा प्रकारचा आदेश दिला जाण्याची ही पहिलीच घटना आहे. ९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजल्यापासून वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण दिवसभरासाठी बंद रहाण्याची शक्यता आहे.
१. एन्डीटीव्हीने वायूदलाच्या तळावर मिग आणि लढाऊ विमाने, रॉकेट लाँचर्स, तोफगोळे, हेलिकॉप्टर्स आणि दारूगोळा यांचा ठावठिकाणा सांगणारे तपशीलवार वार्तांकन केले होते.

भारतीय सैन्याच्या आक्रमणापुढे पाक सैन्याने घेतली होती माघार !

    श्रीनगर - पाककडून सातत्याने गोळीबार करण्यात येत असतांना दिवाळीच्या दोन दिवस आधी भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. अखनूर सेक्टरमध्ये या वेळी पाकने गोळीबार केला होता. सीमा सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरात पाकने हार पत्करत पांढरे निशाण फडकवत गोळीबार थांबवण्याची विनंती केली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍याने सांगितले की, नेहमी बंदुकीची भाषा बोलणार्‍या पाकिस्तानी सैनिकांनी या वेळी चर्चा फक्त अधिकारी स्तरावर होऊ शकते, असे स्पष्ट संकेत दिले होते; मात्र यानंतरही पाकने भारताच्या चौक्यांवर आक्रमण चालूच ठेवले. ही पाकिस्तानची चाल असून जेव्हा कधी आपला पराभव होणार हे त्यांना दिसत असते, तेव्हा ते हार पत्करतात आणि शांततेची भाषा करतात. (पाकचे हे डावपेच भारतीय सैन्याला लक्षात आले हे बरे झाले, तसेच पाकचे डावपेच भारतीय सरकारला समजतील तो सुदिन ! - संपादक)

मनीष नागोरी याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

सुरेश बिजलानी खुनाची सुपारी घेतल्याचे प्रकरण
    कोल्हापूर, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - आर्थर रस्ता कारागृहात असलेला बांधकाम व्यावसायिक सुरेश बिजलानी यांच्या खुनाची सुपारी घेणारा मुख्य सूत्रधार मनीष नागोरी याला न्यायालयासमोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या पहारा पथकाला २ मासांपूर्वी या प्रकरणातील संशयित स्वप्नील फातले सापडला होता. त्याच्याकडे पिस्तुल, जिवंत काडतुसे सापडल्यानंतर अधिक चौकशी केली असता, नागोरी याच्या सांगण्यावरून त्याने मुंबई येथील बिजलानी नावाच्या बिल्डरचा खून करण्याची सुपारी घेतल्याचे सांगितले होते. या प्रकरणी फातले आणि नागोरी या दोघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट होता.

(म्हणे) ऑनलाईन मटका अड्डे आणि हातभट्ट्या चालू ठेवा ! - रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री

  • जनतेने जुगारी आणि मद्यपी बनावे, अशी इच्छा असलेल्या लोकप्रतिनिधींची निरर्थक लोकशाही आता पुरे ! जनतेला नीतीमान आणि आदर्श बनवणारे लोकप्रतिनिधी मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
    लोणावळा (जिल्हा पुणे) - अवैध धंद्यांमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात काम करतात. त्यामुळे हे अवैध धंदे बंद केले, तरी पुन्हा चालू होतात. अनेक ठिकाणी जे ऑनलाइन मटका अड्डे आहेत, त्यांना महालॉटरीच्या नावाने चालू ठेवावे. हातभट्ट्या लोकांना आवडतात; म्हणून त्या बंद होत नाहीत. त्यामुळे त्यांना इंग्रजी आणि देशी दारूप्रमाणे अनुमती द्यावी, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. लोणावळ्यात वॅक्स म्युझियममध्ये रामदास आठवले यांचा पुतळा ठेवला जाणार आहे. या कार्यक्रमानिमित्त ते लोणावळ्याला आले असता, त्यांनी ही मागणी केली. हे धंदे जर कायदेशीर केले, तर सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल, असेही ज्ञान त्यांनी या वेळी पाजळले. (महसुलासाठी जनतेला मद्यपी आणि जुगारी बनवू पहाणारे शासनकर्ते देशाला कधीतरी महासत्ता बनवतील का ? - संपादक)

काश्मीरमध्ये दंगलखोरांनी जाळलेल्या २७ शाळा श्री श्री रविशंकर पुन्हा बांधणार !

  • केवळ अशा शाळा बांधून उपयोग नाही. दंगलखोर पुन्हा त्या जाळून टाकणार नाहीत, याची निश्‍चिती काय ? त्यामुळे आधी शासनाने अशा शाळांच्या सुरक्षेचे दायित्व घ्यायला हवे !
नवी देहली - काश्मीरमधील हिंसाचाराच्या वेळी देशद्रोही दंगलखोरांनी जाळलेल्या २७ शाळा पुन्हा बांधून देण्याची सिद्धता आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी दाखवली आहे. त्यांनी बिहार अन् काश्मीर मधील त्यांचे प्रतिनिधी संजयकुमार सिंह यांच्यावर हे दायित्व सोपवले आहे. संजयकुमार सिंह हे लवकरच या शाळांची पाहणी करणार असून त्याचा अहवाल सादर करणार आहेत. येत्या २२ नोव्हेंबर या दिवशी देहलीत काश्मिरी नेत्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रविशंकर या वेळी काश्मिरी नेत्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. (देशद्रोही धर्मांध देशाच्या संपत्तीची हानी करतात तेव्हा ख्रिस्ती पाद्री किंवा मौलाना, इमाम साहाय्यासाठी येत नाही, तर हिंदूंचे संत पुढाकार घेतात ! - संपादक)

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंवरील धर्मांधांच्या आक्रमणानंतर हिंदु महासभेकडून हिंदूंना स्वसंरक्षणार्थ परवानाधारक शस्त्रे बाळगण्याचे आवाहन !

   अलीगड - काही दिवसांपूर्वी येथील बाबरी मंडी भागात धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याची घटना घडली होती. यात २ ठार, तर एक जण घायाळ झाला होता. या प्रकरणी हिंदु महासभेने हिंदूंना स्वसंरक्षणार्थ सिद्ध रहाण्याचे आवाहन केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हिंदु महासभेने यासाठी हिंदूंना तलवार, त्रिशूळ ही परवानाधारक शस्त्रे बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी हिंदु महासभा साहाय्य करील, असेही म्हटले आहे.
    या आवाहनावर मुसलमान संघटनांनी भाजप आणि संघ यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ते येथे तणाव निर्माण करत आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. उलट येथील हिंदूंना घाबरवले जात आहे, असे म्हटले आहे.

कानडी पोलिसांकडून घरात घुसून मराठी तरुणांना अटक !

  • कर्नाटक येथे कानडी दडपशाही चालूच !
  • मराठी माणसांच्या घरातील देवघरांची नासधूस !
     बेळगाव, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - १ नोव्हेंबर हा दिवस कर्नाटकातील मराठी भाषिक गावांमध्ये ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला. यामुळे चिडलेेल्या कानडी पोलिसांनी मराठी नागरिकांच्या घरात घुसून तरुणांना अटक केली, तसेच त्यांच्यावर विविध गुन्हे नोंदवले आहेत. घरातून अटक करत असतांना पोलिसांनी देवघरात घुसून देवघराची नासधूस करत मूर्ती भूमीवर फेकून दिल्या. (हे पोलीस जनतेचे रक्षक कि भक्षक ? मराठीद्वेषापोटी मराठी तरुणांना अटक करणारे आणि देवघराची नासधूस करणारे पोलीस आतंकवाद आणि गुन्हेगार यांपासून हिंदूंचे रक्षण करू शकतील का ? - संपादक) ‘काळा दिवस’ पाळला म्हणून बेळगावमधील १०० तरुणांना पोलिसांनी रात्री-बेरात्री अटक करून पुष्कळ मारहाण केली. त्यांना ‘कर्नाटकात आहात, तर कानडी होऊन रहा’, असा दमही देण्यात आला.

सांगे (गोवा) येथे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनाचे सर्वांकडून स्वागत, तर मडगाव बाजारपेठेत चिनी मालाची मागणी ३० टक्क्यांनी घटली !

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या राष्ट्रप्रेमी 
नागरिकांच्या आवाहनाला गोव्यात सकारात्मक प्रतिसाद !
      मडगाव, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - आतंकवादाला पोसणार्‍या पाकिस्तानला साहाय्य करणार्‍या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी राज्यातील अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी जनप्रबोधन चळवल आरंभली होती. राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या या आवाहनाला मडगाव बाजारपेठ आणि सांगे भागात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मडगाव बाजारपेठेत चिनी वस्तूंची मागणी या दीपावली उत्सवाच्या काळात ३० टक्क्यांनी घटल्याचे वृत्त दैनिक ‘गोवन् वार्ता’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे, तसेच सांगे परिसरात ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला’, या मागणीला दुकानदार आणि नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवल्याचे वृत्त दैनिक ‘नवप्रभा’ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

पोलिसांची गुंडगिरी ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार?
ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
कीर्तनकार ह.भ.प. गोपाल महाराज देवचंद महाले यांना
फौजदार तुकाराम साबळे यांच्याकडून भर रस्त्यात मारहाण !
जळगाव, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - पिंपळेसीम येथील ह.भ.प. गोपाल महाराज देवचंद महाले यांना फौजदार तुकाराम साबळे यांनी मारहाण करून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कारागृहात टाकण्याची धमकी दिली आहे. (असे गुंड मनोवृत्तीचे पोलीस फौजदार कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ? - संपादक) या संदर्भात ह.भ.प. गोपाल महाराजांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. (नाहक मारहाण करणार्‍या फौजदारांवर वरिष्ठ पोलीस अधिकारी त्वरित कारवाई करणार का ? - संपादक)

भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातील १६० पैकी ८० सुरक्षारक्षक मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकारी यांच्या सुरक्षेत असल्याचे उघड !

मध्यप्रदेशातील कारागृहांच्या सुरक्षेचे धिंडवडे !
    भोपाळ - ३० ऑक्टोबरला येथील मध्यवर्ती कारागृहातून सीमीचे ८ आतंकवादी पळून गेले होते. नंतर त्यांना चकमकीत ठार करण्यात आले, तरीही कारागृहातील सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार ३० ऑक्टोबरला कारागृहातील १६० सुरक्षारक्षकांपैकी ८० सुरक्षारक्षक मुख्यमंत्री, कारागृह मंत्री, माजी कारागृह मंत्री, मुख्य सचिव आणि अन्य अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. जर हे सुरक्षारक्षक कारागृहात असते, तर आतंकवादी पळू शकले नसते.

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी जिवंत पकडला !

    श्रीनगर - बारामुल्लाच्या सोपोरमध्ये पोलीस आणि सैन्य यांनी एका मोहिमेद्वारे लष्कर-ए-तोयबाच्या एका आतंकवाद्याला जिवंत पकडले आहे. येथे आणखी आतंकवादी असल्याची शक्यता असल्याने शोध मोहीम चालू आहे. (आता याला आयुष्यभर पोसण्यापेक्षा आणि कारागृहातून पळून जाण्याच्या शक्यतेमुळे त्याच्यावर तात्काळ खटला चालवून त्याला कठोर शिक्षा करा ! - संपादक)

पश्‍चिम उत्तरप्रदेशातून गेल्या १० वर्षांमध्ये १०० हून अधिक आतंकवाद्यांना अटक !

पकडलेल्या आतंकवाद्यांची संख्या इतकी आहे, तर न पकडलेल्या 
आतंकवाद्यांची किती असेल ? उत्तरप्रदेश दुसरे काश्मीर बनत चालले आहे, 
ही स्थिती लोकशाहीतील सरकारे थांबवू शकत नाहीत. त्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
      लक्ष्मणपुरी - आतंकवाद्यांनी पश्‍चिम उत्तरप्रदेशातील जिल्ह्यांमध्ये आश्रय घेऊन इतर राज्यांमध्ये घातपात घडवण्याच्या घटना अनेकदा सामोर्‍या आल्या आहेत. गेल्या एका दशकात उत्तरप्रदेशातून सुमारे १०० आतंकवादी पकडले गेले आहेत. भोपाळमध्ये चकमकीत मारला गेलेला सिमीचा आतंकवादी अमजद त्याचा सहकारी एजाजबरोबर याआधीही मध्यप्रदेशातील खांडवा येथील कारागृहातून पळून गेला होता. यानंतर त्याने उत्तरप्रदेशच्या बिजनौर येथे त्याचा तळ बनवला होता. सुरक्षायंत्रणांनी पकडल्यावर या आतंकवाद्यांनी खुलासा केला की, त्यांचे जाळे या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पसरले आहे.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे ५ नोव्हेंबरपर्यंत स्वाक्षरी अभियान !

धर्मातील सरकारच्या हस्तक्षेपाचा विरोध करण्यासाठी 
हिंदू कधी अशा पद्धतीने संघटितपणे प्रयत्न करतात का ?
तलाक आणि समान नागरी कायदा यासंबंधीच्या केंद्र सरकारच्या भूमिकेला विरोध
      नवी देहली - केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात तीन वेळा तलाक म्हणण्याला (तोंडी तलाकला) विरोध केला आहे. तसेच समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. या दोन्ही धोरणांच्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने १४ ऑक्टोबरपासून देशव्यापी स्वाक्षरी अभियान चालू केले होते. अभियानाला मिळणारा प्रतिसाद पाहून बोर्डाने हे अभियान ५ नोव्हेंबरपर्यंत चालू ठेवण्याचे ठरवले आहे. या अभियानांतर्गत मुसलमान या अर्जावर नाव, पत्ता आणि हस्ताक्षर करून इस्लामिक सेंटर ऑफ इंडियामध्ये जमा करत आहेत. आतापर्यंत एक लक्षाहून अधिक अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक अर्जामध्ये अधिकाधिक ७ जण मत नोंदवू शकतात.

गया (बिहार) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या १६ धर्मांधांपैकी तिघांना नागरिकांनी चोपले !

       गया (बिहार) - येथील मोचरिम गावात एका कार्यक्रमात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या १६ धर्मांधांपैकी तिघांना नागरिकांनी पकडून चोपल्याची घटना नुकतीच घडली. त्यांना रात्रभर बांधून ठेवण्यात आले होते. घोषणा देणारे धर्मांध ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित होते. पोलीस त्यांचे आतंकवाद्यांशी संबंध आहेत का, याची चौकशी करत आहेत.

आम्ही आतंकवादाचा निषेध करतो ! - नेपाळ

       काठमांडू - आम्ही सर्व प्रकारच्या आतंकवादाच्या विरोधात आहोत. कोणतेही कारण असले, तरी आतंकवाद हा आतंकवादच असतो. आम्ही याचा निषेध करतो. त्याविरोधात एकत्र येऊन कार्य केले पाहिजे. कोणत्याही देशाने त्याच्या भूमीचा वापर अन्य देशांच्या विरोधातील आतंकवादी कारवायांसाठी करू देऊ नये. त्याला नष्टच करायला हवे, असे परखड प्रतिपादन नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रकाश शरण महत यांनी केले. ते भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नेपाळ दौर्‍याच्या वेळी आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी मान्य केले की, सार्क देशांच्या संबंधांवर भारत-पाक यांच्यातील तणावाचा परिणाम होत आहे.

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे पतीने दिलेल्या तोंडी तलाकचा विरोध केल्यामुळे नातेवाइकांसमोरच पत्नीला अमानुष मारहाण !

     बहराईच - नवरा बायको यांच्यामधील भांडण मिटवण्यासाठी चालू असलेल्या चर्चेमध्येच कोतवाली क्षेत्रातील बंजारी मोड येथे रहाणारे साहिबे आलम आणि त्याच्या नातेवाइकांनी आलम याची पत्नी शीबा हिला लाथा-बुक्क्यांनी मारून तिची मरणासन्न अवस्था केली. एवढेच नाही, तर याला विरोध करणार्‍या शीबा यांच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली. शीबा हिची स्थिती नाजूक असून तिला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आलम आणि शीबा यांचे ६ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पोलिसांनी पती आणि सासरे यांच्यासह ४ जणांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. 
१. शीबा यांचे वडील अब्दुल वहीद यांनी दिलेल्या माहितीनुसार साहिबे आलम शीबाच्या कुटुंबियांकडे ५० सहस्त्र रुपये आणि दुचाकी गाडी यांची मागणी करत होता. 
२. वहीद यांनी आरोप केला की, आलमचे अन्य एका युवतीबरोबर अनैतिक संबंध होते. यामुळेच तिचा छळ केला जात होता. 
३. भांडण मिटवण्यासाठी शहरातील नाजिरपुरा मोहल्ल्यात सर्व नातेवाईक जमा झाले होते. या वेळी साहिबे आलम याने तीन वेळा तलाक म्हणत शीबाला तलाक दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ नोव्हेंबरला बेळगाव दौर्‍यावर !

      बेळगाव, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी १३ नोव्हेंबर या दिवशी बेळगाव दौर्‍यावर येणार आहेत. येथील केएल्ई संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभात सहभागी होण्यासाठी त्यांना संस्थेच्या वतीने निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या दौर्‍याचा अधिकृत कार्यक्रम लवकरच घोषित होईल, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. याचदिवशी पंतप्रधान पुणे येथील एका कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत.

टिपू सुलतानची जयंती साजरी करणे म्हणजे औरंगजेबाची जयंती साजरी केल्यासारखे होय ! - पद्मश्री पुरस्कारप्राप्त मोहनदास पै

      बेंगळुरू - टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय क्रूर आणि धर्मांध औरंगजेबाची जयंती साजरी करण्यासारखा आहे, अशी टीका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आणि पद्मश्रीप्राप्त श्री. टी.व्ही. मोहनदास पै यांनी केली आहे. संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पै पुढे म्हणाले की, टिपू धर्मांध राजा होता. त्याने लक्षावधी हिंदूंवर अत्याचार करून त्यांना ठार मारले आणि तितक्याच हिंदूंना धर्मांतरित केले. तसेच कोडगू आणि केरळमध्ये रहाणार्‍या कुर्ग वंशीय आणि ख्रिस्ती यांच्याही हत्या केल्या होत्या. त्याने येथील मंदिरे नष्ट केली होती.

पर्सनल लॉ’ हवा असणार्‍यांनी मतदानाचा अधिकार सोडून द्यावा ! - रा.स्व. संघ

       नवी देहली - धर्माच्या आधारे लोकांना ‘पर्सनल लॉ’ निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे; मात्र त्याच वेळी अशा लोकांनी लोकसभा आणि विधानसभा येथील निवडणुकीतील मतदानाच्या अधिकाराचा त्याग केला पाहिजे, असा विचार रा.स्व. संघाचे विचारवंत मा.गो. वैद्य यांनी मांडला आहे. मा.गो. वैद्य यांना केंद्र सरकारच्या विधी आयोगाकडून एक प्रश्‍नावली मिळाली आहे. त्याचे उत्तर देतांना वैद्य यांनी म्हटले की, जे लोक धर्माच्या आधारे समान नागरी संहितेचा विरोध करत आहेत, त्यांना अन्य थोडेसे पर्याय दिले पाहिजेत. सरकारनेही तातडीने विवाह आणि तलाक यांच्या संदर्भात समान कायदा बनवण्यासाठी विधेयक आणले पाहिजे. याद्वारे ‘तीन तलाक’ची समस्या कायमची संपवली पाहिजे.

जोधपूर येथे मुसलमानाने रस्त्यावर सर्वांसमोर पत्नीला तीनदा तलाक म्हणत घटस्फोट दिला !

महिलांच्या समानतेसाठी प्रसिद्धीलोलुप आंदोलने करणार्‍या 
तृप्ती देसाई आणि त्यांच्या तथाकथित महिला संघटना अशा पीडित 
महिलांवरील अन्यायाच्या विरोधात कधी आंदोलन करतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !
      जयपूर - जोधपूरमध्ये इरफान खान नावाच्या मुसलमानाने स्वतःची पत्नी फरहा खान हिला रस्त्यावरच उभे राहून तीन वेळ तलाक म्हणत तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. घराबाहेर रस्त्यावर सगळे लोक जमले असतांना त्यांच्यासमोरच इरफान खानने तलाक दिला आहे. याचे चित्रीकरणही करण्यात आले आहे. फरहा खान हिने तलाकचा विरोध केला असून तिने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फरहा खानने न्याय मिळवण्यासाठी सासरच्या घरासमोर धरणे आंदोलनही चालू केले आहे.

सौदी अरेबियामध्ये नववधूने सामाजिक संकेतस्थळावर विवाहाची छायाचित्रे अपलोड केल्याने पतीकडून तलाक !

तलाकसारखी बुरसटलेल्या प्रथेचे हे आहेत दुष्परिणाम ! 
भारतात मुसलमान महिलांच्या संदर्भात असे होवू नये यासाठी समान नागरी कायदा हवा !
      रियाध - सौदी अरेबियामध्ये विवाहाच्या २ घंट्यांतच पतीने त्याच्या नववधूला तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. वधूने विवाहाची छायाचित्रे स्नॅपचॅट या सामाजिक संकेतस्थळावर ठेवल्याने रागावलेल्या पतीने तलाक दिला. विवाहपूर्वीच या दोघांनी ‘विवाहाची छायाचित्रे किंवा व्हिडिओ संकेतस्थळावर ठेवू नये’, अशी एकमेकांना अट घातली होती. ही अट त्यांनी विवाहाच्या करारामध्येही लिहिली होती. सौदी अरेबियामध्ये अशा विविध प्रकारे तलाक देण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. नुकतेच एका घटनेत फरीद नावाच्या पतीने व्हॉटस अ‍ॅपद्वारेच तस्नीमा नावाच्या स्वतःच्या पत्नीला तलाक दिला.



पाश्‍चात्त्य देशांत महिलांच्या मद्यपानाची टक्केवारी पुरुषांच्या बरोबरीने ! - बीएम्जे ओपन मेडिकल जर्नलचा अहवाल

पाश्‍चात्त्यांच्या होत असलेल्या अंधानुकरणामुळे 
उद्या भारतातही अशीच स्थिती आल्यास आश्‍चर्य वाटू नये !
      सिडनी - बीएम्जे ओपन मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार नव्या पिढीतील महिला मद्य पिण्याविषयी पुरुषांच्या बरोबरीत आल्या आहेत. अहवालानुसार २० व्या शतकात महिलांच्या तुलनेत दारू पिणार्‍या पुरुषांची संख्या दुप्पट होती, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी वर्ष १९९१ ते २००१ च्या मध्ये जन्मलेल्या ४० लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. अहवालानुसार महिलांना मद्य प्यायल्यानंतर पुरुषांच्या तुलनेत अधिक त्रास होतो; कारण पुरुषांत मद्य पचवण्याची क्षमता महिलांच्या तुलनेत अधिक असते. सध्या धोकादायक पातळीवर मद्य प्राशन करणार्‍या पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत फक्त १.३ पटीने अधिक आहे. हा अभ्यास उत्तर अमेरिका आणि युरोप यांवर केंद्रित आहे; म्हणून हा पश्‍चिमेकडील पालटता प्रवाह दर्शवतो. संशोधक या अध्ययनाच्या आधारे हे स्पष्ट करू इच्छितात की, आता मद्य आणि मद्याशी संबंधित आरोग्याच्या समस्या केवळ पुरुषांपुरत्या मर्यादित ठेवता येणार नाहीत.

दक्षिण अमेरिका खंडातील चिली देशाला भूकंपाचा धक्का !

    नवी देहली - दक्षिण अमेरिका खंडातील चिली देशातील मध्य प्रांतात ४ नोव्हेंबरला रात्री ६.४ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. धक्क्यामुळे येथील इमारती हलल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ६७’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.’’ (दक्षिण अमेरिका खंडातील चिली देशातील मध्य प्रांतात ४ नोव्हेंबरला रात्री ६.४ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक) 

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या खटल्याची पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला !

 पुणे, ४ नोव्हेेंबर - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या खटल्याची पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर हे ४ नोव्हेंबर या दिवशी अनुपस्थित असल्याने अपर सत्र न्यायाधीश एम्. नासीर सलीम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी हा निर्णय झाला. या वेळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेचे अतिरिक्त सरकारी अधिवक्ता मनोज चालाडे, या प्रकरणात संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या बाजूने अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि अधिवक्ता नीता धावडे उपस्थित होते. या वेळी डॉ. तावडे यांनाही न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि युवा सेना आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेची ऋतिका इंगवले विजेती !

    कोल्हापूर, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - ‘आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन’ आणि युवा सेना कोल्हापूर यांच्या वतीने गणेशोत्सव काळात घेण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ बाप्पा स्पर्धे’त सर्वाधिक १ सहस्र ९८३ लाईक मिळवत ऋतिका इंगवले या विजेत्या ठरल्या आहेत, तर अधिवक्ता इंद्रजित चव्हाण १ सहस्र ५७ लाईक मिळवून उपविजेते ठरले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी युवा सेनेचे सर्वश्री ऋतुराज क्षीरसागर, पियुष चव्हाण, अविनाश कामते, चेतन शिंदे, सौरभ कुलकर्णी, अभिजित क्षीरसागर, ओमकार परमणे, कपिल सरनाईक आदी उपस्थित होते.

मुंबई शहरातील डेंग्यूचा पाचवा बळी

डेंग्यूमुळे होणारे वाढते मृत्यू रोखण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार का ?
    मुंबई - येथील २० वर्षीय विद्यार्थिनीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असून मुंबई शहरातील डेंग्यूचा हा पाचवा बळी आहे. ऑक्टोबर मासात येथे डेंग्यूच्या २२८ रुग्णांची नोंद झाली असून संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या ४ सहस्रांपर्यंत पोहोचली आहे. तर १० चिकनगुनियाचे रुग्णही आढळले आहेत. खाजगी रुग्णालयात ११ चिकनगुनिया आणि ४७ संशयित चिकनगुनियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तापाच्या रुग्णांची संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत वाढली असून ही संख्या १४ सहस्त्रांपर्यंत पोहोचली आहे. रुग्णांची संख्या पाहता पालिकेच्या कीटकनाशक विभागाच्यावतीने पाच सहस्त्रांहून अधिक घरांची तपासणी करण्यात आली आहे.

धर्मांधाने प्रेयसीसमवेत ६ मास राहून नंतर सोडून दिले

३ मासांनंतर बळजोरीने गर्भपात अमरावती येथे लव्ह जिहाद !
अमरावती - येथील धर्मांध साहिल शाह याने अन्य धर्मीय प्रेयसीसमवेत ६ मास राहून नंतर तिला सोडून दिले. पीडितेच्या तक्रारीनंतर साहिलविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.
    धर्मांध साहिल आणि त्याची प्रेयसी लग्न न करताच एकत्र रहात होते. ते दोघे एकाच आस्थापनात नोकरी करत होते. ती ३ मासांची गर्भवती असतांना साहिलने तिचा गर्भपात केला. त्याने लग्नासाठी टाळाटाळ करत होता. ६ मासांनी त्याने तिला सोडून दिले. प्रेयसी त्याच्या कुटुंबियांकडे त्याची चौकशी केली; मात्र त्यांनी तिला टाळले. याप्रकरणी प्रथम येथील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांनीही साहिलविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याचे टाळले. तिने पोलीस आयुक्तांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी गुन्हा प्रविष्ट करण्याचे
आदेश दिले.

तीर्थक्षेत्र आराखड्याची तांत्रिक पडताळणी चालू !

    कोल्हापूर, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील ७२ कोटी रुपयांच्या विकासकामांना गती येत आहे. फोर्ट्रेस आस्थापनाने सिद्ध केलेला एकूण २५५ कोटी रुपयांचा हा सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. आता त्याची पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून तांत्रिक पडताळणी चालू आहे. येत्या ८ दिवसांत पडताळणी पूर्ण झाल्यावर तो विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्वरित निविदा प्रक्रिया होईल.

चुनवरे, मालवण (सिंधुदुर्ग) येथे संतांच्या वंदनीय उपस्थितीत अन् भावपूर्ण वातावरणात परमविद्या महासरस्वती यागाची सांगता !

  मालवण - हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व विघ्ने दूर व्हावीत, हिंदु दूरचित्रवाहिनी आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय कार्यान्वित व्हावे, यांसह अन्य सतसंकल्प धरून तालुक्यातील खांबडवाडी, चुनवरे येथे रामस्वरूप गावडेस्वामींच्या परमपावन निवासस्थानाच्या परिसरात प.पू. रमेश महाराज यांनी २ नोव्हेंबरपासून आरंभलेल्या परमविद्या महासरस्वती यागाची ४ नोव्हेंबरला संतांच्या हस्ते पूर्णाहुती देऊन भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. ४ नोव्हेंबरला सकाळी नित्य धार्मिक विधी झाल्यानंतर उपस्थित संतांची पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर संत आणि भक्त यांच्या हस्ते यागात आहुती देण्यात आल्या. दुपारी संतांच्या हस्ते पूर्णाहुती देऊन यागाची सांगता झाली.

धर्मांध समाजसेवकाची सिमीच्या बैठकांना उपस्थित रहात असल्याची कबुली !

सर्व स्तरांतील धर्मांधांवर पोलीस कारवाई करत असतांना 
कांगावा करणारे लोकप्रतिनिधी आणि माध्यमे यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? 
मशिदी हे आतंकवादाचे अड्डे आहेत, हे अजून किती वेळा सिद्ध होणे आवश्यक आहे ?
     जळगाव - सिमी संघटनेच्या बैठका जळगाव येथील अक्सा मशिदीमध्ये होत होत्या. मी या बैठकांना उपस्थित असायचो, अशी कबुली फारूख शेख या तथाकथित धर्मांध समाजसेवकाने जिल्हा आणि सत्र न्यायालयात दिली आहे. (धर्मांध शिक्षक आणि समाजसेवकही आतंकवाद्यांशी संबंधित असतात, हेच यातून सिद्ध होते. त्यामुळे धर्मांधांना पोलीस आणि सैन्यात भरती करायचे का, याविषयी १०० वेळा विचार करावा, असे कुणाला वाटल्यास नवल ते काय ? असे देशद्राही मानसिकतेचे समाजसेवक समाजाची घोर फसवणूकच करत नाहीत का ?- संपादक) येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात न्यायमूर्ती ए.के. पटनी यांच्या न्यायालयात सिमी या आतंकवादी संघटनेवर खटला चालू आहे.

अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालणार

मुंबईतील ही पहिलीच वेळ !
    मुंबई - वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे हत्या प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा खटला सज्ञान म्हणून चालवण्यात येणार आहे. याची अनुमती ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने दिली आहे.
   देहलीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर सरकारकडून अल्पवयीन आरोपींच्या संदर्भात कायद्यात पालट करण्यात आला. या नव्या पालटामुळे अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे.

औषधांच्या ऑनलाईन विक्रीच्या विरोधात २३ नोव्हेंबरला राज्यव्यापी बंद

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचा निर्णय
वारंवार बंद पुकारावा लागू नये, यासाठी ऑनलाईन औषधविक्री
करणार्‍या संबंधितांवर शासन कारवाई का करत नाही ?
मुंबई - राज्य शासनाने ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घातलेली असतांनाही औषधांची ऑनलाइन विक्री चालू आहे. याविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने २३ नोव्हेंबरला राज्यव्यापी बंद पुकारला आहे. यात आठ लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि ८० लाख कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. या आधीही विक्रेत्यांनी बंद पुकारला होता.

चिनी फटाक्यामुळे ११ वर्षीय मुलाचा डोळा फुटला

  • शस्त्रकर्मासाठी ४० सहस्र व्यय आणि दृष्टी पुन्हा मिळण्यासाठी बुबुळ पालटावे लागणार
  • लोकहो, चिनी फटाक्यांच्या भयंकर दुष्परिणामांना सामोरे जाण्यापेक्षा आतातरी त्यांचा वापर टाळा !
    कोल्हापूर - चिनी फटाक्यांमधील पिस्तुलातून उडवलेले रॉकेट डोळ्यावर लागल्याने रितेश राहुल शेटे (वय ११ वर्षे) याचा उजवा डोळा फुटला. त्याच्या डोळ्यावर शस्त्रकर्म झाले असून १ मासानंतरच त्याला दिसत आहे कि नाही, हे स्पष्ट होईल. त्याच्या मित्राने रितेशच्या दिशेने पिस्तुल रोखून ते उडवले. त्यातील मिसाईल थेट त्याच्या डोळ्यावर फुटल्याने त्याला दिसेनासे झाले. वेदना होऊन डोळ्यांतून पाणी येत होते. आधुनिक वैद्यांनी फटाक्यामुळे बुबुळाच्या आतील पडद्याला (रेटिना) इजा पोहोचल्याने शस्त्रकर्म करण्यास सांगितले. त्यासाठी ४० सहस्र रुपये व्यय झाले.
   काही उपचारांमुळे ७० टक्के सुधारणा झाली असली, तरी दीड मासानंतर पुन्हा एकदा मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करावे लागणार आहे. ६ मासांनंतर बुबुळ पालटण्याचा विचार असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

मनमिळावू आणि प्रेमभाव असणार्‍या सौ. अलका ठाकरे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. अलका ठाकरे यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव
जळगाव - येथील सनातनच्या साधिका, तसेच मनमिळावू आणि प्रेमभाव असणार्‍या सौ. अलका ठाकरे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी घोषित केले. या वेळी उपस्थित साधकांची भावजागृती झाली. पू. जाधवकाका यांनी सौ. ठाकरे यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने हिंदवी स्वराज्याची स्मृती जागवली !

 सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती
दहिसर येथे दिवाळीनिमित्त 
सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती
    मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील संभाजीनगर, अशोकवन येथील बालमित्रमंडळ मैदानाजवळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (मुंबई विभाग) च्या वतीने दिवाळीनिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती सिद्ध करण्यात आली होती. या प्रदर्शनातून सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील सिंधुदुर्ग किल्ल्याची महत्त्वपूर्ण भूमिका लोकांसमोर मांडण्यात आली. यामुळे हिंदवी स्वराज्य स्थापनेची स्मृती जागृत झाल्याचे मत किल्ल्याला भेट देणार्‍यांपैकी अनेकांनी व्यक्त केले. ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत किल्ल्याची प्रतिकृती सर्वांना पहाण्यासाठी खुली होती. मनसेचे सरचिटणीस श्री. संजय घाडी यांसह स्थानिक रहिवासी, शिवप्रेमी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

शिवस्मारकामुळे पर्यावरणाला धोका नाही !

राज्य सरकारकडून केंद्रीय हरित लवादाला प्रतिज्ञापत्र
    मुंबई - अरबी समुद्रात बांधल्या जाणार्‍या शिवस्मारकामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने केंद्रीय हरित लवादाला पाठवले आहे. सरकारच्या या भूमिकेवर पर्यावरणवादी आणि मच्छिमार संघटना मात्र असंतुष्ट आहेत. ‘शिवस्मारकाच्या बांधकामामुळे अरबी समुद्रातल्या जैवविविधतेला धोका निर्माण होईल’, असा दावा करत पर्यावरणवाद्यांनी हरित लवादामध्ये याचिका प्रविष्ट केली होती. त्याच याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सरकारने वरील दावा केला.

हुताम्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाची जाणीव ठेवा ! - सैनिकांचे आवाहन

      बागणी (जिल्हा सांगली), ४ नोव्हेंबर (वार्ता.) - लष्करातील सैनिकांचा त्याग, शौर्य यांची जाणीव समाजाने ठेवावी. एखादा सैनिक हुतात्मा झाल्यावर समाजाला त्याची जाणीव होणार का, असे मत हुतात्मा नितीन कोळी यांच्या १७ मराठा रेजिमेंटमधील सहकारी सैनिकांनी केले. हुतात्मा नितीन कोळी आणि मनदीप सिंग यांना बागणी येथे आदरांजली वाहण्यात आली. त्या वेळी सैनिकांनी हे मत व्यक्त केले. 
     या वेळी हवालदार सचिन देशमुख, हवालदार शिवाजी हेरवाडे यांसह अन्य सैनिकांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजरा येथे १५ नोव्हेंबरला श्रीकार्तिकस्वामी यांचे दर्शन !

   आजरा (जिल्हा कोल्हापूर), ४ नोव्हेंबर (वार्ता.) - मंगळवार, १५ नोव्हेंबर या दिवशी कृत्तिका नक्षत्र पर्वणीवर १२ वर्षांनी आलेल्या कन्यागत महापर्वकालात सूर्योदयाच्यापूर्वी ब्राह्ममुहूर्त पूर्वकाली पहाटे ३ वाजता श्रीकार्तिकस्वामी दर्शन शुभारंभ होत आहे. निंगुडगे (तालुका आजरा) येथील दक्षिणकाशीतील अतिप्राचीन देवस्थान निंगुडगे बसवाण्णा मंदिर येथे या दिवशी दुपारी १.१७ वाजता दर्शनाचा पर्वणीकाल आहे. या वेळी भगवान श्रीकार्तिकस्वामी यांचे दर्शन घेतल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. तरी याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्रीविठ्ठलाचे २४ घंटे दर्शन !

      पंढरपूर, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - ११ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या कार्तिकी वारीच्या निमित्ताने १ नोव्हेंबरपासून श्रीविठ्ठलाचे २४ घंटे दर्शन चालू ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. कार्तिक यात्रेची सर्व सिद्धता पूर्ण होत आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक श्री. विलास महाजन यांनी दिली. कार्तिक यात्रेसाठी राज्यभरातून लक्षावधींच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे अधिकाधिक भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन मिळावे, यांसाठी चोवीस घंटे दर्शन चालू ठेवण्यात आले आहे.

विद्यावाचस्पती होण्यासाठी (पीएच्.डी.) लागणार्‍या प्रबंधांचा ‘ऑनलाइन’ बाजार जोमात !

शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण राज्य 
सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग कसे रोखणार ?
      पुणे, ४ नोव्हेंबर - एखाद्या विषयात सखोल संशोधन करणार्‍याला विद्यावाचस्पती पदवी मिळते. काही वर्षे ग्रंथालयांतील संदर्भ ग्रंथांची छाननी, मार्गदर्शकांच्या सूचना आणि आपल्या विषयात यापूर्वी झालेल्या संशोधनाला पुढे नेऊन त्या विषयात नव्या ज्ञानाची भर प्रबंधाद्वारे घातली जाणे अपेक्षित असते. असे असले, तरी विद्यावाचस्पती पदवी मिळवण्यासाठीची प्रक्रिया आता स्वस्त आणि सोपी बनली आहे. ही पदवी मिळण्यासाठी कोणत्याही विद्यापिठासाठी, कोणत्याही विद्या शाखेच्या जटील विषयांचे प्रबंध आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांसाठी शोधनिबंध विकणारी यंत्रणा निर्माण झाली आहे. त्याद्वारे १० ते १५ सहस्र रुपयांत सिद्ध केलेले प्रबंध आणि शोधनिबंध मिळू लागले आहेत. (असे प्रकार हे शिक्षण क्षेत्राला लज्जास्पद नव्हेत का ?- संपादक) यासंबंधीची विज्ञापने नामांकित आणि विश्‍वासार्ह संकेतस्थळांवर उघडपणे केली जात आहेत. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यातील सार्‍याच विद्यापिठांमधील विद्यार्थी त्या विज्ञापनांकडे आकर्षित होत असून शिक्षणाचे बाजारीकरण समोर येत आहे.

प्रत्येक आठवड्याला शिक्षकांना विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढून तो अपलोड करावा लागणार !

शिक्षण विभागाची हास्यास्पद आणि वरवरची उपाययोजना !
विद्यार्थ्यांच्या उपस्थिती पडताळणीसाठी शिक्षण विभागाचा उपाय
      पुणे, ४ नोव्हेंबर - शिक्षकांना प्रत्येक आठवड्याला वर्गातील विद्यार्थ्यांसमवेत ‘सेल्फी’ काढून तो ‘सरल’ या प्रणालीवर ‘अपलोड’ करावा लागणार आहे. जानेवारी २०१७ पासून शाळांतील प्रत्येक सोमवारच्या पहिल्या तासिकेच्या वेळी हा ‘सेल्फी’ काढावा लागणार आहे. विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते; परंतु प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्यच असतात. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाने ही उपाययोजना केली आहे. (अशाने विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल कशावरून ? - संपादक) ‘सेल्फी विथ स्टुडंट’ हा निर्णय केवळ शाळाबाह्य मुलांसाठी आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

यापुढे कचरा टाकणारे आणि अतिक्रमण करणारे यांच्यावर कठोर कारवाई ! - महापालिका आयुक्त

     सांगली, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - सोमवारपासून महापालिका क्षेत्रात अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात, तसेच कचरा करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अतिक्रमित असलेल्या हातगाड्या, दुचाकी-चारचाकी वाहने, तसेच अन्य कोणत्याही वस्तू पथकाने कह्यात घेतल्यावर त्या परत देण्यात येणार नाहीत. याविषयी अतिक्रमण काढतांना होणारा व्यय संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. तरी या संदर्भात नागरिक, व्यापारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

वाराणसी एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा २२ घंट्यांनंतरही न आल्याने ८०० प्रवासी खोळंबले

रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार !
पुणे रेल्वे स्थानकातील प्रकार 
      पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर वाराणसी एक्स्प्रेस नियोजित वेळेच्या २२ घंट्यांनंतरही न आल्याने जवळपास ८०० प्रवाशांचा खोळंबा झाला. याआधी गाडी १० घंटे उशिराने येणार असल्याचे माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती. या गाडीतून छटपूजेसाठी वाराणसीला जाणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे. गाडी स्थानकात आल्यानंतरही स्वच्छतेसाठी काही घंटे लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचे लक्षण !

मुंबईत पत्रकारांवर आक्रमण आणि मारहाण
     मुंबई - येथे पत्रकारांवर आक्रमण करण्यात आले असून बॉम्बे हाऊसबाहेर टाटाच्या सुरक्षारक्षकाकडून पत्रकारांना पुष्कळ मारहाणही करण्यात आली. टाटा समूहातून राजीनामा दिलेले सायरस मिस्त्री यांचे छायाचित्र काढण्यावरून हा वाद झाला. टाटाच्या सुरक्षारक्षकाकडून ‘मिड डे’चे छायाचित्रकार अतुल कांबळेंसह आणखी एकाला मारहाण करण्यात आली.

पारनेर येथे गटविकास अधिकार्‍यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

     पारनेर (जिल्हा नगर) - येथील गटविकास अधिकारी किशोर काळे यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कुरंद येथील ग्रामसेवक गवळी यांनी काळे यांच्याविरोधात तक्रार केली होती.



फलक प्रसिद्धीकरता

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍यांवर कायमचीच बंदी हवी !
   जानेवारी महिन्यात पठाणकोट येथील वायू दलाच्या तळावर झालेल्या जिहादी आक्रमणाचे अतिप्रमाणात वार्तांकन करून देशाच्या सुरक्षेला धोका पोचवल्याप्रकरणी ‘एन्डीटीव्ही इंडिया’ या वृत्तवाहिनीला एक दिवस प्रक्षेपण बंद ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : NDTV India ka Pathankot atanki akraman ka coverage apattijanak hone se sarkar dwara channelpar 1 dinka pratibandh.
Aiso par sthai pratibandh lage ! 

जागो ! : ‘एनडीटीवी इंडिया’ का पठानकोट आतंकी आक्रमण का कवरेज आपत्तिजनक होने से सरकार द्वारा चैनल पर १ दिन का प्रतिबंध.
ऐसों पर स्थाई प्रतिबंध लगेे !

नशीबवान ‘सिमी’वाले !

श्री. भाऊ तोरसेकर
     ३१ ऑक्टोबर या दिवशी भोपाळच्या कारागृतून पळ काढलेल्या सिमी या आतंकवादी संघटनेच्या ८ जिहाद्यांना पोलिसांनी चकमकीत ठार केले. या संदर्भात तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, पुरोगामी आणि राष्ट्रद्रोही मंडळींकडून लांगूलचालनाच्या नावाखाली गलिच्छ आणि समाजविघातक राजकारण केले जात आहे. सदर लेखाच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी अशा धर्मनिरपेक्षतावाद्यांचा अचूक शब्दांत बुरखा फाडला आहे. 
१. गुडघ्याला बाशिंग बांधून कोणतीच शहानिशा 
न करता स्वत:च निष्कर्ष काढणारी उतावीळ प्रसिद्धीमाध्यमे !
       भोपाळच्या घटनेनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि बातम्या आपण किती बारकाईने तपासून बघतो ? सोमवारी (३१ ऑक्टोबर या दिवशी) सकाळी ही बातमी आली, तेव्हा फटाफट मध्यप्रदेशच्या शासनाची निंदा करण्याची शर्यत चालू झाली. तिथे प्रशासन वा कारागृह व्यवस्था कशी ढिसाळ आहे; याचा जाब विचारला जाऊ लागला. ‘सिमी’चे अतिरेकी कसे चलाख आणि शासन कसे नालायक, हे सांगतांना प्रत्येकाची तर्कबुद्धी दुथडी भरून वहात होती; पण काही तासांतच ते सर्व अतिरेकी भोपाळ नजीकच्या एका गावात आढळले आणि चकमकीत मारले गेले, अशी बातमी आली आणि एकूणच माध्यमांचा नूर बदलला. त्यांना खोट्या चकमकीत मारल्यापासून, मुळातच पळून जायलाही शासनानेच साहाय्य केल्याचाही आरोप चालू झाला.

सिंधु समझोता (करार) - एक सुवर्णसंधी !

     पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी उरी येथील सैनिकी स्थळावर अचानक आक्रमण केल्याने १९ शूर सैनिकांना वीरगती प्राप्त झाली आणि पुनः हे उघड झाले की, आपला गुप्तचर विभाग हा माहिती मिळविण्यात कुठे तरी अल्प पडला. याची स्वीकृती स्वतः संरक्षणमंत्र्यांनी दिली. या आक्रमणानंतर भारत याचे प्रत्युत्तर देणार का ?, देणार तर कसे देणार ?, याचीच चर्चा सर्वत्र चालू असतांना आपल्या सरकारने एक धाडसी निर्णय घेतला आणि भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आतंकवादी आणि आतंकवादी स्थळे नष्ट केली (भारतीय सैनिकांना शतशः नमन !). याचसमवेत सरकारने पाकला जागतिक स्तरावर एकटे पाडण्याचा जो यशस्वी प्रयत्न केला आणि काही अंतर्गत निर्णय घेतले त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधु समझोता (करार) पुनर्विचार !

भेसळयुक्त दुधाचा वापर टाळून रोगांपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करूया !

श्री. प्रकाश मराठे

      लोकांसाठी गायीचे आणि म्हशीचे असे दूध उपलब्ध आहे. गायीच्या दुधातही देशी गायीचे दूध आणि जर्सी गायीचे दूध असे दोन प्रकार असतात. हल्लीच दूरदर्शनवाहिनीवर बातमी होती की, भारतात विकल्या जाणार्‍या दुधापैकी ५५ ते ६० टक्के दूध भेसळयुक्त असते. त्यामुळे ते आरोग्याला अपायकारक असते. राहिलेल्या ४० टक्के दुधापैकी ६० टक्के दूध जर्सी गायीचे असते. देशी गायीचे दूध आरोग्याला चांगले असते, तर जर्सी गायीचे दूध आरोग्याला अपायकारक असते. त्यामुळे कर्करोगासारखे रोग उद्भवू शकतात.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या प्रसारकार्याचा देहली राज्याचा ऑक्टोबर २०१६ मधील आढावा

१. नवरात्रोत्सवात होणार्‍या अपप्रकारांविषयी निवेदने 
आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून व्यापक प्रसार !
अ. ५.१०.२०१६ या दिवशी नोएडा शहर दंडाधिकारी यांना समितीचे कार्यकर्ते श्री. अरविंद गुप्ता आणि श्री. हरिकिशन शर्मा यांनी नवरात्रोत्सवात होणार्‍या अपप्रकारांविषयी निवेदन दिले.
आ. ३.१०.२०१६ या दिवशी देहली फेड ३, नोएडा येथील एका नवरात्रोत्सव मंडळाला नवरात्रोत्सवात होणार्‍या अपप्रकारांविषयी निवेदन देण्यात आले.
२. हस्तपत्रकांचे वितरण 
     नोएडा येथे समितीच्या कार्यकर्त्यांनी नवरात्रोत्सवाविषयी प्रबोधन करणार्‍या हस्तपत्रकांचे समाजात वितरण केले.

कुठे कुटुंबाच्या हितासाठी स्वतःला मारहाण होऊनही पुरुषाला उत्तरदायी न ठरवणार्‍या सोशिक भारतीय महिला, तर कुठे ‘खुट्ट’ झाले की, घटस्फोटाची भाषा करणार्‍या पाश्‍चात्त्य महिला !

      ‘महाराष्ट्रात सरासरी १७ प्रतिशत विवाहित स्त्रियांना त्यांच्या पतीकडून मारहाण केली जाते. आणखी ४ टक्के स्त्रियांना सासू-सासरे किंवा कुटुंबातील अन्य व्यक्ती, यांच्याकडून मारहाण होते किंवा शारीरिक यातना दिल्या जातात. कौटुंबिक हिंसाचार सहन कराव्या लागणार्‍या राज्यातील विवाहित स्त्रियांपैकी ९० प्रतिशत स्त्रियांवर हात उगारणारा त्यांचा पती असतो, असे ‘राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षणा’च्या अहवालावरून दिसून आले आहे. यांपैकी कोणत्याही एका कारणावरून पतीने मारहाण केली, तरी ‘त्यात त्यांचे काहीच चुकले नाही’, असे मानणार्‍या महिलांचे प्रमाण ७५ प्रतिशत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे.’

भारतीय शास्त्र आणि पाश्‍चात्त्य सिद्धांत !

     ‘न्या. वुड्रॉफच्या म्हणण्यानुसार, सुशिक्षित समाज पाश्‍चात्त्यांचा ‘मानसपुत्र’ झाला आहे. वस्तुत: आपल्या समस्यांचे स्वरूप काय आहे ? हे आपणच आपल्या शास्त्रीय दृष्टीने समजून घेतले पाहिजे. एखाद्या भांड्यातून पडलेल्या दाण्यांप्रमाणे पाश्‍चात्त्य सिद्धांत विखरत जातात. भारतीय शास्त्रे मात्र वृक्षाप्रमाणे असतात. त्यांची वाढ एकसंध असते.’
- डॉ. पानसे (त्रैमासिक प्रज्ञालोक, डिसेंबर १९८४)



शाळेत साधना करवून न घेतल्याचा हा परिणाम आहे !

   ‘गोव्यातील कैद्यांमधील गुन्हा सिद्ध झालेले निम्मे कैदी बलात्काराच्या गुन्ह्यात सहभागी आहेत, अशी माहिती ‘नॅशनल क्राईम रिकाडर्स ब्यूरो’ यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वर्ष २०१५ च्या एका अहवालात दिली आहे.’

महर्षींच्या दिव्य वाणीतून उलगडलेले कार्तिक पुत्रीच्या, म्हणजेच सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जन्माचे रहस्य !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. ‘कार्तिक पुत्रीचा जन्म गुरुकृपेने झाला’, असे महर्षींनी सांगणे
     ‘महर्षि म्हणतात, ‘येथे बसलेल्या कार्तिक पुत्रीच्या जन्माच्या वेळी उजाडताच दत्तजयंती होती. तिचा जन्म गुरुकृपेने झाला आणि प्रवासही गुरुकृपेनेच होत आहे. आज तिच्या जन्माचे रहस्य तिच्या आई-वडिलांसमोर सांगण्याची वेळ आली आहे.
    आता तुम्ही या देवांच्या सभेत बसला आहात. पुढील १२ मिनिटे पूर्ण लक्ष देऊन ऐका. येथे कार्तिकी पुत्रीचे आई-वडील (श्री. आणि सौ. परांजपे) आणि तिची मुलगी (पूर्वाश्रमीची सायली गाडगीळ) हे आले आहेत. आज तुम्हाला जे रहस्य सांगणार आहे, त्यातील मर्म हेच आहे की, ‘नास्तिक, आस्तिक आणि आध्यात्मिक व्यक्तींचे शरीर कसे असते ? त्यांचा जन्म कसा होतो ?’, हे तुम्हाला आज सारे जाणून घ्यायचे आहे.
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
२. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जन्माच्या वेळच्या
स्थूल आणि सूक्ष्म स्तरावर घडलेल्या घटना !
२ अ. हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, या कारणाने साक्षात् श्रीमत् नारायण (प.पू. डॉक्टर) पृथ्वीवर आले असल्याने सौ. शैलजा परांजपे यांचे पहिले कन्यारत्न देवाघरी गेल्यावर तीन लोकांतून आलेली देवी त्यांच्या गर्भात आल्याचे महर्षींनी सांगणे : सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आईंना (सौ. शैलजा परांजपे यांना) महर्षि म्हणतात, ‘तुम्हाला पुत्रभाग्य नाही. तिन्ही मुलीच आहेत. तुम्ही या सगळ्या सभेला सांगा, त्रिमूर्ती साक्षी आहेत की, ‘ही मुलगी तुमची कि कोणाची ?’ यावर त्या उत्तरल्या, ‘ती महर्षींची मुलगी आहे.’ तुम्ही दोघांनी (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आई-वडिलांनी) संसार केला. असे मूल जन्माला येणे ही भाग्याची गोष्ट !

‘ज्या आई-वडिलांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांची काळजी त्यांच्या म्हातारपणात हल्लीचे बरेच कृतघ्न तरुण घेत नाहीत. आई-वडिलांची काळजी न घेणारे देवाचे काही करतील का ?’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले








सनातनच्या गोव्यातील प्रसारकार्याविषयी आरंभीच्या काळात अनुभवलेले आणि रात्रंदिन अध्यात्मातील आनंद देणारे आयुष्यातील अविस्मरणीय दिवस !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. एकही साधक ‘साधना’ आणि ‘अध्यात्म’ या विषयांवर चार शब्दही
बोलण्याच्या क्षमतेचा नसणे, तरी गुरूंच्या कृपेमुळे साधकांनी
गावोगावी जाऊन मंदिरांतून साधनेविषयी प्रवचने करणे
     ‘वर्ष १९९५ मध्ये प.पू. डॉक्टरांनी मंदिरामंदिरांमधून धर्मप्रसार करण्यास सांगितले. त्या वेळी गोव्यात गावोगावी सनातन संस्थेच्या माध्यमातून प्रसार चालू झाला. आम्ही (श्री. आणि सौ. प्रकाश मराठे, श्री. आणि सौ. भरत नाईक अन् प्रमोद आणि कालीदास तुयेंकर, तसेच कधी कधी पणजीहूनही साहाय्याला येणारे साधक) एकत्र येऊन पणजी, पाळे आणि जवळच्या १० तेे १५ किलोमीटरच्या परिसरांतील प्रत्येक मंदिरात जाऊन तेथे प्राथमिक प्रवचन घेण्यास आरंभ केला. आमच्यापैकी एकही साधक समाजात जाऊन धर्म, साधना आणि अध्यात्म या विषयांवर चार शब्दही बोलण्याच्या क्षमतेचा नव्हता; पण ‘प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे, तर तेच सर्वकाही करून घेतील’, अशी श्रद्धा मात्र सर्वांचीच होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ‘काय सांगायचे ? कसे सांगायचे ?’, हे सर्व देवानेच शिकवले आणि देवानेच आमच्याकडून तसे बोलूनही घेतले.
२. प्रसाराच्या अंतर्गत प्रवचनाचे आयोजन करणे आणि त्या
सौ. शालिनी मराठे
प्रवचनात साधनेविषयी विविध सूत्रांची माहिती देणे
     आदल्या दिवशी गावात फिरायचे, प्रचार करायचा आणि दुसर्‍या दिवशी सोयीच्या वेळी, म्हणजे बहुधा संध्याकाळी ६ वाजल्यानंतर त्या गावातील मंदिरात सर्वांना बोलवायचे. तेथेच प्राथमिक प्रवचन घ्यायचे. प्रवचनाचा आरंभ प.पू. भक्तराज महाराजांच्या ‘प्रभु या मायाबाजारी...’ या भजनाने, तर शेवट ‘इतुके दे मजला’ या प्रार्थनेने व्हायचा. एक प्रवचन दोघे किंवा तिघे मिळून घेत असू.

मायेची ओढ नसणार्‍या, सेवाभावी आणि सदा आनंदी असणार्‍या ६२ प्रतिशत आध्यात्मिक पातळी असलेल्या रामनाथी आश्रमातील श्रीमती अन्नपूर्णा अंभोरेआजी (वय ८४ वर्षे) !

श्रीमती अन्नपूर्णा अंभोरेआजी
१. वाढदिवसाच्या दिवशी एका संतांना भेटल्याने श्रीमती अंभोरेआजींना आनंद होणे आणि संतांनी त्यांना सेवा न करता समष्टीसाठी नामजप करायला सांगणे
     ‘२६.९.२०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील स्वयंपाक विभागात सेवा करणार्‍या श्रीमती अन्नपूर्णा अंभोरेआजी (वय ८४ वर्षे) यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्या एका संतांना भेटायला गेल्या होत्या. भेट झाल्यानंतर आमच्या विभागासमोरून जातांना त्या पुष्कळ आनंदात होत्या; कारण संतांनी त्यांना ‘गोपाळकृष्णाची लहान मूर्ती, मूर्ती ठेवण्यासाठी चौरंग, मूर्तीचे अलंकार आणि हळद-कुंकू ठेवण्यासाठी दोन छोट्या डब्या’ अशी अनमोल भेट दिली होती. आजींनी ती भेट आम्हाला दाखवली. मी त्यांना विचारले, ‘‘संतांनी काय सांगितले ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘संत म्हणाले की, आता सेवा करायची नाही. समष्टीसाठी नामजपच करायचा किंवा वहीत नामजप लिहायचा.’’ वरील प्रसंगानंतर मला श्रीमती अंभोरेआजींचे पुष्कळ गुण आठवले.
२. श्रीमती अंभोरेआजींचे लक्षात आलेले गुण
२ अ. काटकसरी : आजी कधीही अनावश्यक खर्च करत नाहीत. त्यांना एखादी वस्तू हवी असेल, तर त्या वस्तूविषयी चौकशी करून आणि मूल्य (किंमत) परवडत असेल, तरच ती वस्तू विकत घेतात. वस्तू महाग असल्यास घेत नाहीत.
२ आ. नीटनेटकेपणा : आजींचे कपडे नेहमीच नीटनेटके आणि स्वच्छ असतात.
२ इ. निरोगी : आजींचे वय झालेले आहे, तरी या वयातही त्यांची प्रकृती चांगली आहे.
२ ई. चांगल्या सुगरण : अंभोरेआजी चांगला स्वयंपाक करतात. त्या मिरच्यांचा ठेचा करण्यात निपुण

‘प.पू. डॉक्टर श्रीकृष्ण नसल्याचे आणखीन एक विश्‍लेषण’ हे प.पू. डॉक्टरांनी लिहिलेले सूत्र वाचून साधकाच्या मनात आलेले विचार !

     ‘या लेखावरून साधक मला कसे हरवतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे; म्हणूनच मी नेहमी म्हणतो, ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात. मी हरलो !’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
     ‘२४.८.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये चौकट स्वरूपात प्रकाशित झालेले ‘प.पू. डॉक्टर श्रीकृष्ण नसल्याचे आणखीन एक विश्‍लेषण’ हे सूत्र वाचून मनात आलेले विचार लिहून देत आहे.
१. साधकांना आणि सनातनशी जोडलेल्यांना ईश्‍वराने प.पू. डॉक्टरांच्या रूपात अनुभूती दिल्याने त्यांची प.पू. डॉक्टरांवरच श्रद्धा असून त्यांच्यासाठी तेच ईश्‍वर असणे : भक्तांसाठी भाव तसा देव असतो. ज्या साधकांचा भाव ‘प.पू. म्हणजे श्रीकृष्ण असा आहे’, त्या साधकांसाठी श्रीकृष्ण प.पू. डॉक्टरांच्या रूपात आहे. त्या साधकांचा भाव पालटणे शक्य होणार नाही, तरीही ते साधक प.पू. डॉक्टरांची आज्ञा म्हणून भाव पालटण्यासाठी प्रयत्न करतीलही. प.पू. डॉक्टरांचा महिमा असा आहे, ‘जे साधक अजून सनातनशी जोडले गेले नाहीत; पण प.पू. डॉक्टरांविषयी त्यांना वेगवेगळ्या अनुभूती आल्याने त्यांचा प.पू. डॉक्टरांप्रती भाव आहे. काही साधक, संत प्रथम संपर्कातच सांगतात, ‘हे महाराज किंवा ही व्यक्ती माझ्या स्वप्नात आली होती किंवा आम्हाला साहाय्य केले होते. त्यांच्यासाठी प.पू. डॉक्टर म्हणजे साक्षात् ईश्‍वरच रहातील.
२. कलियुगात १०० टक्के श्रीकृष्णतत्त्व मिळणे अशक्य असल्याने कृष्णअंशरूपी प.पू. डॉक्टर हे साधकांसाठी श्रीकृष्णच असणे : ३०.८.२०१६ या दिवशी वरील चौकट मी पुन्हा वाचल्यावर मनात विचार आला, ‘प.पू. डॉक्टर म्हणतात, ‘मी श्रीकृष्ण नाही,.....’ आता कलियुगात १०० टक्के श्रीकृष्ण सगुण रूपात येणे शक्य नाही किंवा आमच्या छोट्या अडचणींसाठी त्या परमेश्‍वराला त्रास देण्याचा आपला हेतूही नाही.

मोक्षगुरु शिष्याला सिद्धीत न अडकवण्याची कारणे

श्री. राम होनप
     ‘साधकाला साधना करतांना ईश्‍वराची सूक्ष्म सृष्टी, सूक्ष्म लोकांची, तसेच देवतांची दर्शने होतात. या सर्व गोष्टी ईश्‍वराशी संबंधित असल्या, तरी येथे पहाणारा आणि दृश्य यांत भिन्नता आहे. त्यामुळे त्याला ‘सात्त्विक दृश्य माया’ म्हणतात; म्हणून मोक्षगुरु शिष्याला या गोष्टींत, म्हणजेच सिद्धीत न अडकता पुढची वाटचाल करण्यास सांगतात.’ - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.२.२०१६)

वार्ताहर-संपादक प्रशिक्षण शिबिरा’त शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. अजय केळकर
‘     ८ ते ११.१०.२०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘वार्ताहर-संपादक प्रशिक्षण शिबीर’ होते. या कालावधीत शिकायला मिळालेली सूत्रे देत आहे.
१. परिपूर्ण नियोजन
      साधक शिबिरात आल्यापासून परत जाईपर्यंत प्रत्येकाला काय हवे-नको, त्यांचा निवास, त्यांना अन्य काही अडचणी नाहीत ना ? ते कधी परत जाणार ? जातांना त्यांनी प्रसाद घेतला ना ? अशा प्रत्येक गोष्टीची चौकशी शिबिराचे आयोजन करणार्‍या साधकाने घेतली. श्री. विक्रम डोंगरे न थकता, न कंटाळता दिवस-रात्र ही सेवा करत होते. ‘कोणतेही नियोजन परिपूर्ण कसे करायचे’, हे शिबिरात शिकायला मिळाले.

भाऊबीजेच्या दिवशी साधक-भगिनीने पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाला एका साधक-भावाने दिलेले उत्तर !

‘ताई,
स्वभावदोष आणि अहं निर्मूलनी ।
भवसागर पार करून ।
लीन होण्या श्रीचरणी ।
साहाय्य करू एकामेकां क्षणोक्षणी ॥

हा संदेश पाठवल्यानंतर मनात पुढील विचारही आला.
 
आपण सारे बहीण-भाऊ ।
मोक्षप्राप्ती करूनी ।
श्रीकृष्णासमवेत हिंदु राष्ट्राचे गीत गाऊ ॥’

- श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.११.२०१६)


प्रेमळ, आज्ञाधारक आणि सेवेची तळमळ असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. समृद्ध चेऊलकर (वय १७ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे 
पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. समृद्ध चेऊलकर हा एक आहे !
कु. समृद्ध चेऊलकर
कु. समृद्ध चेऊलकर यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. वणीच्या श्री सप्तशृंगीदेवीने स्वप्नदृष्टांत 
दिल्याने आणि तिचे दर्शन घेतल्यानंतर पत्नी 
गरोदर राहिल्याने ‘समृद्ध हा देवीचाच प्रसाद आहे’, असे वाटणे 
      ‘आमच्या विवाहाला ३ वर्षे होऊनही आम्हाला मूल न झाल्याने आम्ही वैद्यकीय समादेश (सल्ला) घेतला. प्रत्यक्षात आम्ही कोणतेही औषध घेतले नव्हते. मुंबईतील धकाधकीच्या जीवनामुळे विश्रांती घेण्यासाठी आम्ही वरचेवर नाशिकला जात असू. एकदा नाशिकला गेल्यावर आम्ही वणीच्या श्री सप्तशृंगीदेवीचे दर्शन घ्यायचे ठरवले. वणी हे भारतातील साडे तीन शक्तीपिठांपैकी अर्धे शक्तीपीठ आहे. यापूर्वी मी कधीच या मंदिरात गेलो नव्हतो. मंदिरात जायच्या आदल्या रात्री सप्तशृंगीदेवी माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली, ‘मी तुला माझे कासव पाठवणार आहे. तू त्याची काळजी घे.’ दुसर्‍या दिवशी आम्ही सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर काही मासांनी (महिन्यांनी) माझी पत्नी योगिता गरोदर राहिली. त्यामुळे ‘समृद्ध’ हा देवीचाच प्रसाद आहे’, असे आम्ही मानतो.’ - श्री. प्रसाद चेऊलकर (समृद्धचे वडील)

मानसिक किंवा आध्यात्मिक त्रासांची तीव्रता न्यून होण्यासाठी नामजप करत स्वतःवरील काळ्या शक्तीचे आवरण काढा !

श्री. गिरिधर वझे
साधकांना सूचना !
१. महत्त्व
     ‘सध्या अनेक साधकांना होणार्‍या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढत आहे. केवळ नामजप किंवा आध्यात्मिक उपाय केल्यास स्वतःवरील काळ्या शक्तीचे आवरण दूर होऊन त्रास न्यून होण्यास काही कालावधी लागतो; पण नामजप करत शरिरावरील आवरण काढल्यामुळे त्रास न्यून होण्यास गती प्राप्त होऊन लवकर त्रास दूर होतो.
२. आवरण काढण्याची पद्धत
अ. आरंभी उपास्यदेवतेला प्रार्थना करावी.
आ. हाताच्या तळव्यावर सात्त्विक कापराची थोडी पूड वा विभूती घ्यावी आणि दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळावेत.
आ. शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रास होत असलेल्या स्थानांवरून किंवा डोक्यापासून पायांच्या तळव्यांपर्यंत दोन्ही हात (बोटांद्वारे चिकट पदार्थ खेचल्याप्रमाणे) फिरवावेत. अशा प्रकारे शरिराच्या समोरच्या आणि मागील अवयवांवरील काळ्या शक्तीचे आवरण काढावे.
इ. शरिरात त्रास जाणवणार्‍या अवयवांच्या (छाती, कटी इत्यादी) ठिकाणी हलकेपणा जाणवेपर्यंत त्या ठिकाणचे आवरण काढू शकतो.
३. काळ्या शक्तीचे आवरण काढतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे
अ. दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये निर्गुण तत्त्व आणि पाच बोटांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू अन् आकाश ही तत्त्वे असतात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे


सर्वत्रच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना

अपघाताचा दिवसेंदिवस उंचावणारा आलेख लक्षात घेऊन
वाहनांच्या संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा !
१. अनेकदा जाणीव करून देऊनही वाहनांच्या संदर्भातील
नियमांचे उल्लंघन करणारे दायित्वशून्य कार्यकर्ते !
  आतापर्यंत अनेकदा हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय सत्संगात वाहनांच्या संदर्भातील नियम पाळण्याविषयी चुका घेण्यात आल्या आहेत. आपत्काळ दिवसेंदिवस समीप येत असल्याने वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असतांनाही काही कार्यकर्त्यांकडून वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि अन्य कागदपत्रे समवेत न बाळगणे, दुचाकी चालवतांना शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणे, तर चारचाकी चालवतांना सीटबेल्ट न वापरणे, भ्रमणभाषवर बोलत, तसेच अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी गंभीर चुका वारंवार होत आहेत. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याने आतापर्यंत काही जणांना दंडही भरावा लागला आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
सतत वर्तमानकाळात रहाणे आम्ही कर्मधर्माला मानत नाही.
कर्म मागे, तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.
भावार्थ : ‘कर्म मागे’ म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. ‘धर्म आमच्या पुढे असतो’ म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. आम्ही ‘दोन्हीच्या मध्ये असतो’ म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचा शोध घेऊ नये ! 
खराखुरा सद्गुरु लाभणे, ही सुकृतावर आधारित गोष्ट आहे. 
आपल्या संचितानुसार योग्य वेळी सद्गुरूंची भेट होते. वृथा शोध घेऊ नये. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कालोचित कार्यक्रम !

संपादकीय
     गोवा राज्यात येत्या जानेवारी मासात ‘वन्दे मातरम्’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र तपोभूमी, कुंडईचे पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली, तसेच सद्गुरु फाऊंडेशन तथा सद्गुरु युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरुणांना देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांविषयी समाजात आस्था निर्माण व्हावी, असा व्यापक हेतू या आयोजनामागे आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn