Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

श्रीपाद श्रीवल्लभ लुप्तदिन

पुढील ४ आठवड्यांत सनातन संस्थेवरील बंदीच्या संदर्भातील अंतिम भूमिका स्पष्ट करा !

मुंंबई उच्च न्यायालयाचे राज्य आणि केंद्र सरकारला आदेश 
     मुंबई, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन संस्थेवर तूर्तास तरी बंदी घालता येणार नाही. वर्ष २०११ मध्ये राज्य सरकारने सनातनवर बंदी घालण्याच्या संदर्भात दिलेल्या अहवालात पुरेशी माहिती नाही, असे केंद्र सरकारनेे मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या याचिकेवर २६ ऑक्टोबर या दिवशी येथील उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नाईक यांच्या खंडपिठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्ते विजय रोकडे यांच्या अधिवक्त्यांनी 'सनातन संस्था कायद्याचे पालन करत नाही, कायद्यावर त्यांचा विश्‍वास नाही, संस्था अध्यात्माची शिकवण देते. त्यामुळे संस्थेवर बंदी घालावी', अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने केली. या वेळी 'एवढी जुनी याचिका का प्रलंबित आहे ?' असाही प्रश्‍न न्यायालयाने विचारला. या प्रकरणी आता पुढील चार आठवड्यांत राज्य आणि केंद्र सरकारने आपली अंतिम भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 

सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांच्या विरोधात तक्रार करणार्‍या लोकांची चौकशी करण्याची हिंदु विधीज्ञ परिषदेची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

श्री. वर्तक यांनी कथित धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचे सांगत त्यांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट केल्याचे प्रकरण 
     मुंबई, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - 'पोलीस हिंदुत्ववादी संघटना आणि नेते यांची व्यक्तीगत माहिती ज्या प्रमाणे जमा करतात, त्या प्रमाणे दंगली करणार्‍या दंगलखोर धर्मांधांची माहितीही जमा करावी', अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून केली आहे. 'महाराष्ट्र १' या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी कथित धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचा कांगावा करत काही ठिकाणी अचानकपणे त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अधिवक्ता पुनाळेकर यांनी ही मागणी केली असून ती करणार्‍या लोकांचीही माहिती जमा करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

हरियाणामध्ये गोहत्येच्या गुन्ह्यांत ५१३ आरोपींपैकी ४२१ आरोपी मुसलमान !

दादरी (उत्तरप्रदेश) येथील अखलाकच्या मृत्यू प्रकरणात ऊर बडवणारे, गोरक्षकांना विरोध करणारे, कसायांना पाठीशी घालणारे, गोरक्षकांना समाजकंटक म्हणणारे याविषयी काही बोलणार नाहीत, कारण ते निधर्मी आहेत ! 
     चंडिगड - हरियाणामध्ये गोहत्या कायद्याच्या अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये ६ पैकी ५ आरोपी मुसलमान असल्याची माहिती समोर येत आहे. हरियाणामधील भाजप सरकारला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्‍वभूमीवर गोहत्या कायद्याच्या संदर्भातील माहिती समोर आली आहे. गेल्या ८ महिन्यांत येथील पोलिसांनी गायींची तस्करी आणि हत्या प्रकरणांतील गुन्ह्यांमध्ये एकूण ५१३ जणांविरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. यात जवळपास ४२१ मुसलमान, ८६ हिंदु आणि उर्वरित शीख नागरिकांचा समावेश आहे. गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन अ‍ॅक्ट २०१५ नुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंतची ही आकडेवारी पोलिसांनी एकत्रितपणे मांडली आहे. यातील अधिक प्रकरणे ही गो-तस्करीशी संबंधित असून काही गुन्हे गोहत्या आणि गोमांस विक्रीचे सुद्धा आहेत. 

पॅलेस्टाईनने जर इस्रायलच्या विरोधात युद्ध केले, तर ते त्याच्यासाठी अंतिम असेल ! - इस्रायल

भारत अशी धमकी पाकिस्तानला सहज देऊ शकतो ! इस्रायलकडून धमकी देण्याचे धाडस भारत शिकेल, तो सुदिन ! 
     जेरुसलेम - इस्रायलने पॅलेस्टाईनला धमकी दिली आहे की, जर त्याने म्हणजे पॅलेस्टाईनने इस्रायलच्या विरोधात युद्ध केले, तर ते त्यांचे शेवटचे युद्ध असेल; कारण इस्रायल त्याला संपूर्णपणे नष्ट करू पहात आहे. आमचा स्वतःहून युद्ध करण्याचा हेतू नाही, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री एविगदोर लिबरमॅन यांनी अल कुद्स या पॅलेस्टाईन दैनिकाला दिलेल्या वर्तमान पत्रातील मुलाखतीत म्हटले आहे.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या वेतनात तिप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव !

     नवी देहली - देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या वेतनात तिप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने बनवला आहे. ७ व्या वेतन आयोगामुळे मंत्रीमंडळाच्या सचिवांचे वेतन आणि या दोघांचे वेतन यांत एक लाखाहून अधिक रकमेची तफावत असल्याने हा प्रस्ताव बनवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमतीसाठी सादर करण्यात येणार आहे. 

उद्योग विकासात भारत १३० व्या क्रमांकावर ! - जागतिक बँक

भारताने केलेली प्रगती ! 
     वॉशिंग्टन - भारत उद्योग विकासात मागे असून १९० देशांच्या जागतिक क्रमवारीत तो १३० व्या क्रमांकावर आहे, असे जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या सूचीमध्ये म्हटले आहे. देशात अद्याप बांधकाम परवाना, कर्जप्राप्ती आणि आणखी काही परिमाणांविषयी सुधारणा न झाल्याचे बँकेने म्हटले आहे. गेल्या वर्षी भारत या सूचीमध्ये १३१ व्या स्थानावर होता. केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या या अहवालावर नाराजी व्यक्त करत देशात हाती घेण्यात आलेल्या १२ प्रमुख सुधारणा बँकेने गृहित न धरल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान या सूचीमध्ये १४४ व्या क्रमांकावर आहे. जगभरात न्यूझीलंड देशात सर्वाधिक पोषक वातावरण असून सिंगापूर या संदर्भात दुसर्‍या क्रमांकावर आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची खाण घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता !

     बेंगळुरू - चाळीस कोटी रुपयांच्या खाण लाचखोरी प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बी.एस्. येडियुरप्पा यांची विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने येडियुरप्पा यांच्यासोबत त्यांचे २ मुलगे, जावई आणि अन्य अधिकार्‍यांनाही सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. खाणकामांना अनुमती देण्यासाठी लाच स्वीकारल्याचे आरोप येडियुरप्पांवर करण्यात आले होते. ऑक्टोबर २०११ मध्ये त्यांना अटक करून बेंगळुरूतील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते; मात्र ३ आठवड्यांमध्येच त्यांची जामीनावर मुक्तता झाली होती. वरील निर्णयावर येडियुरप्पा म्हणाले की, मला न्याय मिळाला आहे.

हिलरी क्लिंटन यांच्या धोरणामुळे तिसरे महायुद्ध होईल ! - डोनाल्ड ट्रम्प

     वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या सिरीयाच्या संदर्भातील परराष्ट्र धोरणामुळे तिसरे महायुद्ध होईल, असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. जर तुम्ही सिरीयाविरुद्ध युद्ध पुकरायचे म्हटले, तर ते केवळ सिरीयासोबतचे युद्ध नसून सिरीया, रशिया आणि इराण सोबतचे युद्ध असेल. ते योग्य होईल का ?, असा प्रश्‍न ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.

भारताकडे ४९२ अणूबॉम्ब बनवण्याची क्षमता ! - पाक

भारताकडे सुरक्षाविषयक प्रचंड क्षमता आहे; मात्र त्याचा योग्य आणि अपेक्षित वापर करणार्‍यांची वानवा आहे, हे दुर्दैव आहे !
     इस्लामाबाद - पाकिस्तानच्या अणूतज्ञांच्या मते भारताकडे ४९२ अणूबॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि तांत्रिक क्षमता आहे, असा अहवाल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज, इस्लामाबाद येथील अणूतज्ञ ए. आझम, अहमद खान, महंमद अली आणि समीर खान यांनी हा अहवाल दिला आहे.

प्रत्येक भारतियाने राष्ट्रवाद जपला पाहिजे ! - दीप्तेश पाटील, हिंदु गोवंश रक्षा समिती

नालासोपारा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात 
पाक कलाकारांच्या चित्रपट प्रदर्शनाला राष्ट्रप्रेमी नागरिकांचा विरोध
आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्र आणि धर्म प्रेमी
      नालासोपारा, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - पाकच्या आतंकवादी कारवायांचा साधा निषेधही न नोंदवणार्‍या पाक कलाकारांचे चित्रपट या देशात प्रदर्शित होऊ न देणे हा राष्ट्रवाद आहे. हा राष्ट्रवाद प्रत्येक भारतियाने जोपासायला हवा, असे आवाहन हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील यांनी केले. २३ ऑक्टोबर या दिवशी नालासोपारा येथील संतोष भुवन येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.

भारताच्या प्रत्युत्तरात पाक सैन्याचे ३ सैनिक ठार !

भारताने आता प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवण्याऐवजी आक्रमण हाच संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे जाणून पाकला संपवावे ! 
    राजौरी - २५ ऑक्टोबरच्या रात्री आर्एस्पुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये पाक सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताचे ११ नागरिक घायाळ झाले. या वेळी भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ३ सैनिक ठार, तर ६ चौक्या उद्ध्वस्त झाल्या.

वाराणसीमध्ये अनधिकृत फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटात ५ जण ठार !

वाराणसीमध्ये अवैधपणे फटाक्यांचे कारखाने चालवले जातात, हे प्रशासन आणि पोलीस यांना माहीत नाही कि माहिती असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे ? 
     वाराणसी - येथील पितरकुंडा भागात अनधिकृतपणे चालवण्यात येणार्‍या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात ५ जण ठार झाले. यात २ महिलांचा समावेश आहे. तसेच ६ जण घायाळ झाले आहे. सरफराज, आमना, शबनम, जेबा आणि निम्मो अशी मृतांची नावे आहेत.

उत्तराखंडमध्ये व्हाईटनरवर बंदी !

     नैनिताल (उत्तराखंड) - व्हाईटनरचा प्रमाणापेक्षा अधिक वास घेतल्याने एका किशोरवयीन मुलावर मृत्यू ओढवला; त्यामुळे उत्तराखंडमध्ये व्हाईटनरवर संपूर्णपणे बंदी आणण्याचा आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची गंभीर नोंद घेत न्यायालयाने स्वत:हून याचिका प्रविष्ट करून घेतली. उच्च न्यायालयाने आयोडेक्स आणि फेविक्विक हे १८ वर्षांखालील मुलांना न विकण्याचेही निर्देश दिले आहेत. तसेच कोणत्याही अल्पवयीन मुलाला हुक्का क्लबमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सहज उपलब्धता, स्वस्त मूल्य आणि नशेचा पुरेसा आनंद मिळत असल्याचे वाटत असल्याने अल्पवयीन मुलांमध्ये अशा प्रकारचे व्यसन वाढत आहे.

जेएन्यूच्या वसतीगृहात मणीपुरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला !

     नवी देहली - येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) ब्रह्मपुत्र वसतीगृहात रहाणारा जे.आर्. फिलेमॉन या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. ३ दिवस त्याच्या खोलीत कोणी गेले नव्हते. खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने खोलीचे दार उघडल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

झारखंडच्या धनबाद जिल्ह्याचा सप्टेंबर २०१६ या मासाचा (चौथ्या आठवड्याचा) हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा

१. दाभोलकर खून प्रकरणात सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्र तावडे यांना केवळ संशयावरून अटक करून मारहाण करणे आणि सनातन संस्थेला अपकीर्त करणे, याविषयी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन ! : २२.९.२०१६ या दिवशी धनबाद येथील रणधीर वर्मा चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा विषय सनातनचे साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांना केवळ संशयाच्या आधारावर अटक करून मारहाण करणे, सनातन संस्थेला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करणे या प्रकरणात न्याय मिळावा, असा होता. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, समाजसेविका पूनम सिंह, समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. निशाली सिंह, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल आणि सनातन संस्थेच्या साधिका सौ. सोम गुप्ता यांच्यासह अनेक धर्माभिमानी उपस्थित राहिले.
२. २५.१०.२०१६ या दिवशी आसनसोल येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन झाले.देवता, तसेच राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या आणि चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला !

हिंदु जनजागृती समितीची पोलीस-प्रशासनाकडे मागणी 
       पुणे, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या बाजारात श्री लक्ष्मीदेवी, श्री विष्णू, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांसारखे राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची सर्रासपणे विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवता, तसेच राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या आणि चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस-प्रशासन यांना देण्यात येत आहे. फटाके फुटल्यानंतर फटाक्यावरील चित्राच्या चिंधड्या होऊन देवतांची घोर विटंबना, तसेच राष्ट्रपुरुषांचा अवमान होतो. त्यामुळे अशा फटाक्यांवर बंदी आणावी, फटाकेविक्रेत्यांवर निर्बंध आणून नागरिकांच्या धार्मिक भावना आणि राष्ट्रीय अस्मिता यांचा आदर राखावा, असे या निवेदनात म्हटले आहे. 
     भोरचे पोलीस उपअधीक्षक विलास यामावर, तसेच तहसीलदार वर्षा शिंगण पाटील यांना फटाक्यांवरील बंदीसंदर्भात निवेदन देण्यात आले. यामावर यांनी फटाक्यांवर देवतांची चित्रे छापणे अयोग्य असल्याचे सांगत या प्रकरणी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी प्रतापगड उत्सव समितीचे सर्वश्री विनायक काका सणस, धर्माभिमानी मनोज नाझीरकर, युवराज मगर, सतीश उगले, संतोष नाईकनवरे, देवेंद्र पांगारे, हिंदु जनजागृती समितीचे प्रा. विठ्ठल जाधव, श्री. विश्‍वजित चव्हाण उपस्थित होते.

राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! - संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेत डावीकडून बोलतांना सौ. मधुरा 
तोफखाने, श्री. संतोष देसाई, अधिवक्ता समीर 
पटवर्धन आणि श्री. दत्तात्रय रेठरेकर
     मिरज, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. भारतात दिवाळीच्या काळात सहस्रो कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात. देशावर ५७.२२ लक्ष कोटी रुपयांचे कर्ज असतांना, देश आर्थिक संकटात असतांना, कोट्यवधी जनतेला एक वेळचे अन्न मिळत नसतांना अशा प्रकारे प्रतीवर्षी सहस्रो कोटी रुपयांची उधळपट्टी करणे देशहिताच्या विरोधात आहे. हा पैसा राष्ट्रकार्यासाठी वापरल्यास देशातील अनेक समस्या सुटण्यास साहाय्य होईल; म्हणून शासनाने प्रदूषणकारी फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी केली. फटाके या विषयाच्या संदर्भात २४ ऑक्टोबर या दिवशी मिरज येथील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्र आणि धर्म कार्य करण्यासाठी कृतीशील होण्याचा पुणे येथील धर्माभिमान्यांचा निर्धार !

हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीत धर्मप्रेमींचा उत्साह अन् उत्स्फूर्त सहभाग ! 

     पुणे, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - काश्मिरी हिंदूंचे सन्मानाने पुनर्वसन व्हावे, तसेच त्यांच्यासाठी 'पनून कश्मीर' या स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती व्हावी, या उद्देशाने २३ ऑक्टोबर या दिवशी विराट हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. काश्मिरी हिंदूंच्या हक्कांसाठी आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेनंतर धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य करण्यासाठी प्रेरित झालेल्या युवकांना पुढील दिशा मिळावी, या उद्देशाने २५ ऑक्टोबर या दिवशी पुणे शहर आणि परिसरात ५ ठिकाणी आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीस उपस्थित धर्माभिमान्यांनी धर्म आणि राष्ट्र रक्षणार्थ कृतीशील योगदान देण्याचा निर्धार केला. 

जळगाव येथील व्यापार्‍यांचा चिनी मालावर बहिष्कार !

शत्रूराष्ट्राला धडा शिकवण्यासाठी पाऊल उचलणार्‍या 
व्यापार्‍यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या व्यापार्‍यांनी जळगाव
 येथील व्यापार्‍यांचा आदर्श घेऊन राष्ट्रप्रेमी भूमिका बजावावी ! 
     जळगाव - येथील व्यापारी महामंडळाने चिनी मालावर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. येथे व्यापारी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी बैठक घेऊन दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर चिनी मालाची खरेदी-विक्री करू नये. चीन हा देश पाकिस्तानच्या साहाय्यानेे भारतविरोधी कारवाया करत आहे. त्याला सर्वांचाच विरोध आहे. आपण आपला राग थेट सीमेवर युद्ध न करता चिनी मालाची खरेदी-विक्री बंद करूनही व्यक्त करू शकतो, अशी सूत्रे या बैठकीत मांडण्यात आली. या वेळी महामंडळाचे अध्यक्ष श्री. विजय काबरा आणि पदाधिकारी उपस्थित होते. 
     चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याने ६० कोटी रुपयांपर्यंत परिणाम होईल, असे सर्वांचे म्हणणे आहे. बहिष्कार टाकण्याच्या आंदोलनात ७० शहरातील ६० सहस्र व्यापारी सहभागी होणार असल्याचे व्यापारी महामंडळाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

श्री शिवकार्य प्रतिष्ठानच्या वतीने विक्रोळी पोलीस स्थानकात तक्रार प्रविष्ट

ऑल इंडिया इत्तेहादे मिल्लत काऊंसिलचे अध्यक्ष मौलाना तौकीर रजा 
यांनी हिंदु महिलांच्या संदर्भात केलेल्या संतापजनक वक्तव्याच्या विरोधाचे प्रकरण 
     मुंबई - येथील श्री शिवकार्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ऑल इंडिया इत्तेहादे मिल्लत काउंसिलचे अध्यक्ष मौलाना तौकीर रजा यांनी हिंदु महिलांच्या संदर्भात केलेल्या संतापजनक वक्तव्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 'हिंदु धर्मामध्ये एका महिलेला ५ पती असतात. तिला हेही ठाऊक नसते की, तिच्या मुलाचे वडील कोण आहेत', असे संतापजनक विधान ऑल इंडिया इत्तेहादे मिल्लत काऊन्सिलचे अध्यक्ष मौलाना तौकीर रजा यांनी बरेली येथे आयोजित सामाजिक एकता संमेलनात केले होते. 

राज्यात ५० सहस्र शिक्षकांची आवश्यकता !

राज्यात सर्व शिक्षण अभियानाच्या प्रगतीत राज्याची घसरण !
३ सहस्र ९७ शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक, तर १३ सहस्र ३१३ शाळा मुख्याध्यापकांविना चालू ! 
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी
      कोल्हापूर, २६ ऑक्टोबर - प्रगतीशील आणि शिक्षणाची गंगा मानल्या जाणार्‍या महाराष्ट्रातील शाळांची स्थिती दयनीय होत असून सर्व शिक्षण अभियानाच्या प्रगतीत राज्याची घसरण चालूच असल्याचे समोर आले आहे. राज्यात ४९ सहस्र ९६२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. २७ सहस्र ८४ प्राथमिक शाळांपैकी जवळजवळ ३ सहस्र ९७ शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक आहे, अशी आकडेवारी समर्थन या आर्थिक क्षेत्रात मूल्यमापन करणार्‍या संस्थेने घोषित केली आहे. विशेष म्हणजे १३ सहस्र ३१२ शाळा मुख्याध्यापकांच्या विना चालू आहेत.

बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी जलसंपदा विभागाचे ३ अधिकारी अटकेत !

भ्रष्टाचाराची बजबजपुरी झालेला जलसंपदा विभाग !
    ठाणे - राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोटाळ्यातील आरोपी असलेले कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश गोपाळ बाबर, कोकण प्रदेशाचे तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील, ठाणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे यांना २५ ऑक्टोबर या दिवशी अटक केली. तिघांना ठाणे विशेष न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

(म्हणे) धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येणे, हे देशासाठी घातक !

धर्माविषयी काडीचाही अभ्यास नसलेल्या
कॉम्रेड स्मिता पानसरे यांचे अज्ञानमूलक वक्तव्य !
     यवतमाळ - आपल्या देशात सध्या धार्मिकतेच्या नावाखाली भावनिक प्रश्‍नांवर रान माजवले जात आहे. लव्ह जिहाद, घरवापसी, गोहत्या बंदी आदी सूत्रे लोकांना मूलभूत प्रश्‍नांपासून दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक चर्चेत आणले जातात. म्हणूनच धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येणे, हे देशासाठी घातक आहे, असे मत कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी व्यक्त केले. येथील शिव महोत्सव समितीच्या वतीने येथील बाजोरिया लॉनमध्ये आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. या वेळी अध्यक्षस्थानी अधिवक्ता रजा हुसैन हैदरी आणि समितीचे अध्यक्ष अधिवक्ता नीलेश चौधरी उपस्थित होते.

ठाणे येथील मनसेच्या महिला शहराध्यक्षावर प्राणघातक आक्रमण

ठाण्यात पोलिसांचे अस्तित्व संपले आहे कि काय ?
     ठाणे, २६ ऑक्टोबर - येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्ष समीक्षा मार्कंडेय यांच्यावर २५ ऑक्टोबर या दिवशी २ अज्ञातांनी प्राणघातक आक्रमण केले. मार्कंडेय यांच्या डोक्यात रॉड घालून मारहाण केल्याने त्या गंभीररित्या घायाळ झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कल्याण येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची मालमत्ता कह्यात !

    कल्याण - येथील पालिकेचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी पालिका आयुक्त ई. रवीन्द्रन यांच्या आदेशानुसार काँग्रेसचे माजी नगरसेवक नवीन सिंग यांची मालमत्ता कह्यात घेतली आहे. डोंबिवली पश्‍चिम येथे त्यांच्याकडून मालमत्ता २७ लक्ष २८ सहस्र ८४१ रु. कर येणे बाकी होता. त्याच्या वसुलीसाठी वेळोवेळी पाठपुरावा घेऊन, तसेच जप्ती वॉरंट बजावूनही कर भरला जात नव्हता. त्यामुळे कारवाई करण्यात आली. (हे आहे भ्रष्ट काँग्रेसचे खरे स्वरूप ! - संपादक)

संस्कारधारा नित्यपाठ पुस्तकाच्या ४६ व्या आवृत्तीचे प्रकाशन !

     सातारा - समर्थ सदन येथे संस्कारधारा नित्यपाठ या पुस्तकाच्या ४६ व्या आवृत्तीचे प्रकाशन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाहक समर्थभक्त पू. मारुतीबुवा रामदासी आणि समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांचे हस्ते समर्थ मूर्तीपुढे करण्यात आले. यावेळी कौशिक प्रकाशनाचे प्रमुख श्री. अरुण गोडबोले, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
     या पुस्तकाविषयी माहिती देतांना श्री. अरुण गोडबोले म्हणाले की, १९ वर्षांपूर्वी डॉ. अच्युत गोडबोले यांनी आपल्या चि. चैतन्यच्या मुंजीमध्ये निमंत्रितांना फुले देण्याऐवजी स्तोत्रे, श्‍लोक आणि आरतीसंग्रह असणारे हे छोटेखानी पुस्तक देण्याची कल्पना मनात आणली. परिश्रम घेऊन संस्कारधारा नित्यपाठचे संकलन केले. आज ही ४६ वी आवृत्ती प्रकाशित करतांना आनंद होत आहे.

पूज्यपाद संतश्री आसारामबापू संप्रदायाकडून ४५० धर्मांतरित हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

धर्मरक्षणासाठी कृतीशील असणार्‍या पूज्यपाद 
संतश्री आसारामबापू संप्रदायातील साधकांचे अभिनंदन ! 
 झडपोली (जिल्हा पालघर) येथे ख्रिस्त्यांकडून आदिवासी कुटुंबियांचे धर्मांतर होत असल्याचे प्रकरण 

     पालघर, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील ख्रिस्त्यांनी आमिष दाखवून धर्मांतरित केलेल्या ४५० हिंदु कुटुंबियांना पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू संपद्रायाच्या वतीने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश देण्यात आला. २२ आणि २३ ऑक्टोबर या दिवशी हा कार्यक्रम पार पडला. संप्रदायाच्या भारतीय युवा शक्ती संघ १३० साधकांनी या कार्यक्रमात सेवा केली. प.पू. आसारामबापू संप्रदायाचे सर्वश्री सर्वेश चौरसिया, संदीप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

बेस्टकडून दिव्यांग व्यक्तींसाठी विनामूल्य बससेवा कार्यान्वित !

     मुंबई, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - दिव्यांग (दृष्टीहीन आणि ४० प्रतिशत किंवा त्याहून अधिक अस्थिव्यंग अपंग) व्यक्तींसाठी २० ऑक्टोबरपासून बसमधून विनामूल्य प्रवासाची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. यातून वातानुकूलित बससेवा वगळण्यात आली आहे. बससेवा कार्यान्वित असलेल्या बृहन्मुंबई महापालिका परिसर आणि लगतच्या शहरांमध्ये ही सुविधा असणार आहे. यासाठी लाभार्थींना बेस्ट उपक्रमाचे 'आर्.एफ्.आय्.डी.' स्मार्टकार्ड किंवा ओळखपत्र घेणे बंधनकारक आहे. या सेवेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍यांना त्यांना सोयीच्या बस आगारातील वाहतूक विभागीय कार्यालयामध्ये प्रपत्र, प्रमाणपत्राची छायांकित प्रत छायाचित्रासह सुट्टीचा वार वगळून सकाळी ९ ते दुपारी ४.३० या कार्यालयीन वेळेत सादर करता येईल.
फटाक्यांच्या दुकानांची पाहणी आणि अवैध 
दुकानांवर कारवाई करावी ! - मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश 
न्यायालयाला असे आदेश द्यावे लागणे, म्हणजे
 प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा यांचे अपयशच होय ! 
न्यायालयाने त्या दोन्ही यंत्रणांवर दंडात्मक कारवाई करावी, ही अपेक्षा ! 
     मुंबई - उत्सवांच्या जल्लोषात सुरक्षेचेही भान ठेवायला हवे. प्रत्येक फटाक्यांशी संबंधित नियमांचे पालन विक्रेत्यांकडून झाले पाहिजे. त्यासाठी राज्यातील महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी पथके सिद्ध करून प्रभागांतील फटाक्यांच्या दुकानांची पाहणी करावी. तसेच अवैधपणे लावलेल्या दुकानांवर कारवाई करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिले. नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लसुरे यांनी प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या खंडपिठापुढे २५ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले. 

माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे (पाटील) यांच्याकडून अनिल धीर आणि रमेश शिंदे यांचा सत्कार

डावीकडून श्री. रमेश शिंदे आणि श्री. अनिल धीर 
यांचा सत्कार करतांना श्री. चंद्रकात वारघडे
      पुणे - हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आणि ओडिशा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तथा भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांनी नुकतीच येथील माहिती सेवा समितीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. शिंदे आणि श्री. धीर यांनी माहिती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे (पाटील) यांच्याशी माहिती अधिकार कायदा वापरण्याच्या संदर्भात चर्चा केली. या वेळी माहिती सेवा समितीच्या वतीने श्री. वारघडे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हे समितीने प्रकाशित केलेले पुस्तक श्री. धीर आणि श्री. शिंदे यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला. समितीचे संस्थापक-अध्यक्ष श्री चंद्रकांत गोविंद वारघडे (पाटील)
निमगावजाळी शिवारात (जिल्हा नगर) गोमांस नेणार्‍या २ धर्मांधांना अटक

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता दर्शवणारी घटना !
५०० किलो गोमांस शासनाधीन (जप्त)
      संगमनेर (नगर), २६ ऑक्टोबर - संगमनेर-लोणी रस्त्याने भाग्यनगर येथे अवैधरित्या ५०० किलो गोमांस घेऊन जाणार्‍या अमजद हुसेन शेख आणि वाहनमालक गुफरान नसीर कुरेशी यांना पोलिसांनी आश्‍वी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करून अटक केली आहे. या वेळी पोलिसांनी मालवाहू वाहन आणि गोमांस असा ४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला आहे. 
संदर्भ - पुढारी

कासव विक्री बंदी असतांनाही मुंबई शहरातून कासव तस्करीच्या प्रकरणांमध्ये वाढ

कायद्याचा धाक संपल्याचे दर्शवणारी घटना !
      मुंबई - भारत आणि आशिया खंडात कासव या प्राण्याला आध्यात्मिक महत्त्व असल्याने त्याच्या विक्रीसाठी बंदी आहे. असे असतांना शहरातून कासव तस्करीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहार येथील तस्करांचा सहभाग असल्याची शक्यता यंत्रणांनी व्यक्त केली आहे. देशातील या तस्करांसाठी मुंबई ही प्रमुख बाजारपेठ असून येथून वर्षाला कोट्यवधी किमतीच्या ५० सहस्रांहून अधिक कासवांची तस्करी होत असल्याचा अंदाज मुंबईतील रॉ या प्राणीमित्र संघटनेचे पवन शर्मा यांसह अनेक प्राणीमित्रांनी व्यक्त केला आहे. 
      गेल्या एक मासात नवी मुंबईत २४, दादरला २२, दादरच्या रेल्वे स्थानकावर ७५, तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १९९ कासवे पकडण्यात आली. विमानतळावर पकडण्यात आलेल्या कासवांना दुबई येथे नेण्यात येणार होते. या पार्श्‍वभूमीवर देशातील तस्करांचा महाराष्ट्रातून होणारा हा चोरटा व्यापार रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी एकत्र येत विशेष मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.

नगर येथे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिसाला मारहाण !

राज्यातील असुरक्षित पोलीस !
     नगर, २६ ऑक्टोबर - पाथर्डी येथील अल्हनवाडी सोसायटीच्या निवडणुकीच्या वेळी बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी महादेव शिंदे यांना एका जमावाने पुष्कळ मारहाण केली. त्यात महादेव शिंदे घायाळ झाले आहेत. शिंदे यांनी मतदानासाठी आलेल्या एका जमावाला निवडणुकीसाठी रांगेतून या, असे सांगितले. त्याचा राग येऊन जमावातील काहींनी शिंदे यांना शिवीगाळ करत पोट आणि छाती या भागांवर लाथाबुक्यांनी मारहाण केली. (पोलिसांचा धाक संपल्याचेच लक्षण ! - संपादक) या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा प्रविष्ट केलेला असून कोणालाही अटक केलेली नाही.

कराड येथे पोलीस आणि प्रशासन यांना फटाक्यांच्या संदर्भात निवेदन

   कराड - फटाक्यांवरील चित्रांद्वारे हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची होणारी विटंबना रोखणे, अवैधपणे विक्री होणार्‍या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालणे या मागण्यांचे निवेदन कराड तहसीलदार, कराड तालुका ग्रामीण पोलीस, कराड शहर पोलीस यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

पै. विशालसिंग राजपूत मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन !

    मिरज, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - मिरज तालुका शिवसेनेचे पै. विशालसिंग राजपूत मित्र मंडळ आणि सांगली मिडीया सर्व्हिसेस यांच्या वतीने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची नाव नोंदणी मंगळवार पेठ, धाडस चौक, मिरज येथे करावी. या संदर्भात युवासेनेचे पै. कुबेरसिंग राजपूत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असून हे स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. यांसाठी नाममात्र १०१ रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९१५८९६६०५०, सी न्यूज कार्यालय ०२३३ - २३०११८८ येथे संपर्क साधावा.
    स्पर्धेअंती दीड सहस्र रुपये, एक सहस्र रुपये, सातशे रुपये, तसेच अन्य पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तरी अधिकाधिक युवकांनी यात नावनोंदणी करावी.

फलक प्रसिद्धीकरता

दादरी हत्याकांडावरून ऊर बडवणारे आता मात्र गप्पच बसणार !
     हरियाणामध्ये गोहत्या कायद्याच्या अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये ८२ टक्के आरोपी मुसलमान आहेत. गेल्या ८ महिन्यांत गायींची तस्करी आणि हत्या प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये ५१३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात जवळपास ४२१ मुसलमान आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Haryana me Gohatya kanoonke antargat apradh pravisht
hue ५१३ aropiyome se ४२१ aropi Musalman ! - Dadri
Hatyakandpar shor machanewale ab chup hi rahenge !

जागो !
 हरियाणा में गोहत्या प्रतिबंधक कानून के अंतर्गत पंजीकृत प्रकरणों में बंदी बनाए गए
५१३ आरोपियों में ४२१ मुसलमान ! - दादरी हत्याकांड पर शोर मचानेवाले अब चुप ही रहेंगे !

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांच्या प्रश्‍नांवर शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांच्याकडून असमाधानकारक उत्तरे !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
 दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी ८ आणि १६ नोव्हेंबरला !
     कोल्हापूर, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - न्यायालयाच्या आदेशानंतरही सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना पोलिसांनी त्यांच्या अधिवक्त्यांना का भेटू दिले नाही ? तसेच 'अटक केलेल्या आरोपींना प्रसारमाध्यमांसमोर उभे करू नये', असे शासनाचे परिपत्रक असतांनाही डॉ. तावडे यांना पोलिसांनीच प्रसारमाध्यमांसमोर का उभे केले ?, असा प्रश्‍न डॉ. तावडे यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना २६ ऑक्टोबर या दिवशी पुन्हा विचारला; मात्र या वेळीही शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांना या दोन्ही प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. श्री. समीर पटवर्धन यांनी १ घंटा जोरदार युक्तीवाद करतांना अधिवक्ता बुधले यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला; मात्र बहुतांश प्रश्‍नांची त्यांना उत्तरेच देता आली नाहीत. या दोन्ही सुनावण्या सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर झाल्या. त्यांनी ८ आणि १६ नोव्हेंबरपर्यंत या दोन्ही प्रकरणांची सुनावणी पुढे ढकलली. 

गडहिंग्लज येथे श्री दत्त मंदिरात 'दत्त' विषयावर प्रचवन !

     गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), २६ ऑक्टोबर (वार्ता.) - चेन्नेकुपी येथील दत्तमंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गुरुदेव दत्ताचे कार्य, त्यांचे गुरु आणि नामजपाचे महत्त्व या विषयावर श्री. अजित धुळाज यांनी प्रवचन दिले. याचा लाभ ५५ भक्तांनी घेतला.

पुणे पालिकेत सत्तेवर असलेल्या पक्षांनी जनतेचा भ्रमनिरास केला ! - शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील

शिवसेनेच्या वतीने परिवर्तन मोर्चाचे आयोजन 
      पुणे, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - पुणेकरांच्या मूलभूत प्रश्‍नांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून लढा देत आहे. पुणे महानगरपालिकेत सत्तेवर असलेल्या पक्षांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून शिवसेनेला निवडून देईल, असे प्रतिपादन शिवसेना खासदार श्री. शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केले. शिवसेना पुणे शहराच्या वतीने २५ ऑक्टोबर या दिवशी पुणे महानगरपालिकेवर परिवर्तन मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्च्याच्या सांगतेच्या प्रसंगी झालेल्या सभेच्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेना पुणे शहराप्रमुख माजी आमदार विनायक निम्हण, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहर संघटक श्याम देशपांडे, पालिका गटनेते अशोक हरणावळ आदींसह अनेक मान्यवर आणि शिवसेना नगरसेवक उपस्थित होते. या मोर्च्यात शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. 
      या वेळी विनायक निम्हण म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे. त्यांनी या कालावधीत नागरिकांच्या कोणत्याही समस्या सोडवलेल्या नाहीत, तर पालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. सत्ताधार्‍यांनी पुणेकरांना प्रत्येक वेळी आश्‍वासने दाखवत वेडे बनवले आहे. 
क्षणचित्र - आता बदला कारभारी सारे, पुण्यात वाहत आहेत, परिवर्तनाचे वारे असे बोधवाक्य परिवर्तन मोर्चामध्ये लावले होते.

ठाणे जिल्ह्यात पोलीस ठाण्यात फटाक्यांची विक्री थांबवण्यासाठी निवेदने सादर !

अंबरनाथ येथे पोलिसांना निवेदन देतांना कार्यकर्त्या
      डोंबिवली, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील विष्णूनगर पोलीस ठाण्यात, तसेच टिळकनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री. रमेश यादव यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी धर्माभिमानी श्री. प्रकाश झरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सूर्यकांत साळुंखे आणि सौ. वंदना चौधरी उपस्थित होत्या. 
       अंबरनाथ येथेही शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोडबोले यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन
सौ. सुनीता पाटील मार्गदशन करतांना
देतांना धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी सौ. शिवानी भोईर आणि समितीच्या अधिवक्त्या सौ. किशोरी कुलकर्णी उपस्थित होत्या. निवेदन दिल्यानंतर चीनच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचे आश्‍वासन पोलिसांकडून देण्यात आले. तसेच सनातनचे कार्य म्हणजे चांगलेच असणार, असेही पोलिसांनी सांगितले. 
      मुंब्रा येथील धर्मशिक्षणवर्गातील मुलांनी फटाके विक्री करणार्‍या दुकानात जाऊन निवेदन दिले. ठाण्यातही अशा प्रकारचे देण्यात आले.

जिल्ह्यातील गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड !

३० सहस्र रुपयांचे साहित्य आणि ३१ सहस्र लिटर कच्चे रसायन कह्यात !
     कोल्हापूर - जिल्ह्यात विविध ठिकाणी गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकून ३१ सहस्र लिटर कच्च्या रसायनासह ३० सहस्र रुपयांचे साहित्यही कह्यात घेतले. या वेळी मद्य बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जाळून नष्ट करण्यात आले. २४ ऑक्टोबर या दिवशी जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, हातकणंगले, करवीर आणि आजरा तालुक्यातील हातभट्टीवर गुन्हे शाखेने संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या साहाय्याने ही कारवाई केली. (हातभट्टीचालकांवर कठोर कारवाई न केल्याने ते जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा हातभट्टी चालू करतात. पुन्हा हातभट्टी चालू होणार नाही, अशा पद्धतीने पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी ! - संपादक) जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या वेळी मद्य बनवणार्‍या आरोपींना पकडण्यात आले.

काश्मीरची समस्या चिघळवणारे स्थानिक राजकीय पक्ष !

२७ ऑक्टोबरला असलेल्या काश्मीर विलीनीकरण दिनाच्या निमित्ताने...
२७ ऑक्टोबर हा दिवस काश्मीरचे भारतीय संघराज्यात 
विलीन झाल्याचा दिवस आहे. काश्मीरचे भारतात संपूर्णत: विलीनीकरण 
झालेले असले, तरी तेथील राज्यकर्ते मात्र तसे मानणारे नाहीत. हेच सांगणारा हा लेख...
१. काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक जवळ 
येताच आतंकवादी संघटनांना प्रसन्न करण्यासाठी राष्ट्रविरोधी 
वक्तव्यास प्रारंभ करणे, ही काश्मीरच्या नेत्यांची जुनी सवय ! 
     काश्मीरच्या नेत्यांची जुनी सवय आहे, राज्यात विधानसभेची निवडणूक जवळ येते, त्या त्या वेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रविरोधी वक्तव्यांना प्रारंभ करतात. नेते आपल्या वक्तव्यांद्वारे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या आतंकवादी संघटनांना दाखवू इच्छितात की, ते त्यांच्या विचारसरणीच्या जवळचे आहेत.

अर्णब गोस्वामी यांना बहिष्कृत करण्याचे (पुरोगामी) संपादक आणि पत्रकार यांचे आवाहन

पुरोगाम्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली !
श्री. भाऊ तोरसेकर
       गेल्या आठवड्यात टाइम्स नाऊ वाहिनीने मोहीम उघडल्याप्रमाणे देशातील पाखंडी सेक्युलर मंडळींची लक्तरे वेशीवर टांगली आणि डाव्यांचा धीर सुटलेला आहे; म्हणूनच सर्व सभ्यता सोडून त्या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बहिष्कृत करण्याचे खुले आवाहन काही संपादक वा नामवंत पत्रकारांनीच आरंभले. हा खरे तर विनोद होता. कारण त्याच काळात अर्णब जी आकडेवारी दाखवत होते, त्याला कोणी आक्षेप घेतला नाही. कारण तीच खरे तर अशा लोकांची खरी पोटदुखी होती. अर्णबने इंग्रजी वृत्तवाहिन्यांच्या ९३ टक्के प्रेक्षकांना खिशात टाकले आणि उरलेल्या ७ टक्क्यांतही ज्यांना एक टक्का प्रेक्षक मिळवता आलेला नाही त्यांनी अर्णबवर बहिष्काराची भाषा केलेली आहे. किती चमत्कारिक गोष्टी आहेत ना? ज्यांच्यावर देशातल्या ९९ टक्के इंग्रजी प्रेक्षकांनीच बहिष्कार घातला आहे. ते त्यालाच आवाहन करत आहेत, की ज्याच्याकडे झुंबड करून धावत सुटलाय त्याला बहिष्कृत करा.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधातील खटल्यातील साक्षीदारांवरील आक्रमणांचे रहस्य !

पूज्यपाद संतश्री
आसारामजी बापू
१. खोटा खटला पूज्य बापूंच्या नावे थोपवण्याचा विरोधकांचा डाव : षड्यंत्रकर्त्यांच्या आहारी गेलेला भोलानंद गुप्ता याने १६.३.२०१६ या दिवशी साक्षीदारांवर होत असलेल्या आक्रमणांमागील रहस्य उघडकीस आणतांना सूरत येथे सहस्रो लोकांसमक्ष येऊन म्हटले होते, षड्यंत्रकर्ते असे म्हणाले होते, गुप्ताजी ! पहा, तुम्ही फसलात किंवा आमच्यापैकी कुणीही पकडला गेला, तर आपण एकमेकांना गोळी मारू किंवा चाकूने वार करू. असे काही करून घेऊ अथवा करवू. मग आपण खटला बनवू आणि बापूंच्या नावे थोपवू, असा त्यांचा पूर्ण डाव होता. (व्हिडिओची यूट्यूबवरील लिंक - goo.gl/daQ3Tp) त्यांचा हा डाव सर्वजण पहातच आहेत.
२. साक्षीदारांच्या हत्या होण्यामागे बापूजींचे शत्रू ! : दैनिक जागरणमध्ये २६.७.२०१५ या दिवशी प्रसिद्ध झाले होते, कृपाल सिंह हत्या प्रकरणात आरोपी नारायण पांडे याने पोलिसांचे म्हणणे पूर्णतः खोडून काढले. त्याने सांगितले की, आसारामजी बापू कारागृहाच्या बाहेर येण्याचे दिवस जवळ आले होते. अगदी त्याच्याआधीच कृपालची हत्या करण्यात आली. यापूर्वीसुद्धा जामीन मिळण्याची स्थिती आल्यावर एका साक्षीदाराची हत्या करण्यात आली होती. यावरून स्पष्टच आहे की, बापूंचा कोणीतरी शत्रू संधीचा लाभ घेत आहे.
(संदर्भ : मासिक ऋषी प्रसाद, ऑगस्ट २०१५)

बालगुन्हेगारांच्या संख्येत वाढ !

    सध्याच्या चंगळवादी जीवनप्रणालीचा आता थेट लहान मुलांवर दुष्परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे भुरट्या चोर्‍यांपासून हत्या, बलात्काराचे गुन्हे इत्यादीही लहान वयाच्या मुलांकडून सर्रासपणे घडत आहेत. बालसुधारगृहातील बालगुन्हेगारांच्या वाढत्या संख्येवरून हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सामाजिक पातळीवर ही अत्यंत चिंतेची गोष्ट बनली आहे.

शिवरायांना अपेक्षित हिंदवी स्वराज्यास्तव मराठी लढू देत ।

सौ. वर्षा ठकार
आई जगदंबे, वाघ असूनही त्याचा विसर पडलेल्यांना ।
आरक्षण न घेता देशाच्या रक्षणास सिद्ध होऊ दे ॥ १ ॥ 

मराठी माणसाच्या मनात शिवरायांसारखी धर्मज्योत पेटू दे ।
मनगटात परत वीरश्री संचारू दे ।
शिवरायांना अपेक्षित हिंदवी स्वराज्यास्तव मराठे लढू देत ॥ २ ॥ 

आया-बायांना मराठी माणसांचा अभिमान वाटू दे ।
प्रत्येक घराघरांत पुनःश्‍च शिवबा जन्मू दे ।
त्याला साथ द्याया देशपांडे-मालुसरे येऊ देत ।
तेव्हाच अधर्मियांची पळता भुई थोडी होईल ॥ ३ ॥

राजसत्ता हाताशी असतांना सलोखा निर्माण करता न आलेली ख्रिस्ती धर्मसंस्था म्हणे, जगात शांती आणणार !

      ख्रिस्ती धर्मसंस्थेने धर्म समीक्षण सभा (इन्क्विझिशन) लादून गोवा राज्यातील संस्कृतीच देशोधडीला लावली. राजसत्ता मिळून स्थैर्य लाभल्यानंतरही ख्रिस्ती धर्मसंस्थेला येथे सलोखा निर्माण करता आला नाही. या धर्मसंस्थेच्या चर्चमधून येथील समाजजीवन, स्थानिक परंपरा आणि सहस्रो वर्षार्ंपासून चालत आलेली संस्कृती, यांचा अनादर केला गेला. गोमंतकीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळख असणार्‍या त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा यांनी तर गोवा राज्याचे पाश्‍चात्त्यीकरण चर्चने चालू केल्याचा ठपका ठेवला आहे.      सध्याच्या लोकप्रिय होण्याच्या काळात, अल्पसंख्य ब्राह्मणांचा नायनाट करणे अन् दलित आणि मुसलमान या बहुसंख्य गटांचा अनुनय करणे, हे राजकारण्यांचे उद्दिष्ट दिसते. - ब. स. येरकुंटवार (प्रज्ञालोक, सप्टेंबर १९८९) (ही स्थिती आता आणखीनही बिघडली आहे. - संकलक)

हिंदूंनो, भारतीय संस्कृतीची महती जाणून तिला पुनरूज्जीवीत करा !

       भारतीय लोक अत्यंत सुसंस्कृत, नीतीवान आणि सभ्य आहेत. जोपर्यंत आपण भारताच्या मूळ सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा मोडून काढत नाही, तोपर्यंत भारताला आपण जिंकू शकू, असे मला वाटत नाही. यासाठी भारताची शिक्षण पद्धती आणि त्यांची संस्कृती नष्ट करायला हवी, असा माझा प्रस्ताव आहे. विदेशी आणि इंग्रज लोक करतात तेच चांगले आहे आणि ते आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असा ज्या वेळी भारतातील लोक विचार करतील, त्या वेळी ते स्वतःचा स्वाभिमान आणि आपली संस्कृती गमावतील. तेव्हाच आम्हाला वाटते, तसे ते गुलाम राष्ट्र होतील.
- लॉर्ड मेकॉले (वर्ष १८३५ मध्ये ब्रिटिश संसदेत दिलेल्या भाषणातून) (संदर्भ : पाथेय कण, ऑगस्ट २०१५)

दहा वर्षे नियमित मंदिरात प्रार्थनेसाठी जाणारे माकड दगावणे

      प्रतिदिन नित्यनियमाने शिवमंदिरात प्रार्थनेसाठी जाणारे आणि लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेले एक माकड शिवमंदिरात मरण पावल्याची घटना नुकतीच उत्तर प्रदेशात घडली. या माकडाच्या अंत्यविधीसाठी जवळजवळ वीस सहस्र लोक उपस्थित होते. हे माकड वृद्धापकाळामुळे नैसर्गिकरित्या मरण पावल्याचे सांगण्यात आले. जवळजवळ गेली दहा वर्षे हे माकड प्रतिदिन सकाळी नियमितपणे शिवमंदिराजवळच्या झाडावरून खाली उतरत असे आणि मंदिरात हात जोडून उभे रहात असे. सदर मृत माकडाला गंगेच्या पाण्याने आंघोळ घालण्यात आली आणि नंतर त्याला यमुनेत सोडून देण्यात आले. (संदर्भ : श्री गजानन आशिष (मे १९९६))
याबद्दल बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ? 
माकडाला बुद्धी नाही; म्हणून त्याने तसे केले, असे बुद्धीप्रामाण्यवादी बहुधा म्हणतील !

नऊवारी साडीचे आध्यात्मिक महत्त्व !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. नऊवारी साडी नेसल्यानंतर लगेचच देहातील 
सर्व चक्रे उघडून संपूर्ण देह रोमांचित होत आहे, असे 
जाणवणे आणि देहाच्या रंध्रारंध्रातून सर्वत्र मोठ्या 
प्रमाणावर दैवी शक्ती प्रक्षेपित होत असल्याची अनुभूती येणे 
     महर्षींच्या सांगण्याप्रमाणे आम्ही रामनाथी आश्रमात बगलामुखी याग केला होता. त्या वेळी मी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. साडी नेसतांना माझा सारा देहच चैतन्याने न्हाऊन निघत आहे, असे मला जाणवू लागले. सार्‍या देहातच वीरश्री संचारल्यासारखे होऊ लागले आणि वाटले, आता मला या विश्‍वात कुणीच हरवू शकणार नाही. देहातील सर्व चक्रे जागृत होऊन माझ्या रोमारोमांतून दैवी शक्ती प्रक्षेपित होत आहे, असे वाटू लागले आणि खरंच, नऊवारी साडी नेसल्याने काय होऊ शकते, याची प्रत्यक्ष प्रचीती आली.

शक्तीचा आवेग (momentum of force) !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
प.पू. पांडे महाराज
१. जनित्रावर पडणार्‍या नदीच्या पाण्यामुळे वीज निर्माण होते; म्हणून आपणही स्वस्थ न बसता चालणे, खेळणे, व्यायाम करणे यांद्वारे कार्यक्षम रहावे.
२. श्रीगणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्यामुळे पवित्रके सर्वदूर पसरतात. गतीमानता असली पाहिजे. डबक्यात शक्तीचा आवेग (momentum of force) नसतो. त्यामुळे तेथे घाण साचून रहाते आणि ते दूषित होते.
३. काळी शक्ती स्वतःत साठून साठून संकुचितता निर्माण होते; म्हणून व्यापकता, व्यापक दृष्टी, म्हणजेच समष्टी साधना पहिजे. समष्टी साधनेने काळी शक्ती लवकर घटते. म्हणून डबके होऊ नये. प्रवाहित किंवा व्यापक व्हावे. 
४. जलप्रवाह (नद्या) या भूमीच्या नाड्या आहेत. झाडे हे केस आहेत. पर्वत तिचे अवयव आहेत. म्हणून जलप्रवाह (नद्या) शुद्ध ठेवल्या, तर तिची प्रकृती व्यवस्थित रहाते. 
५. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।, म्हणजे सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणार्‍यांना दूर करण्यासाठी हे शुद्धीकरणाचे बल (Force) आहे.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१०.२०१४)

आध्यात्मिक त्रास होत असतांना कोणत्या वेळी कोणती नीती उपयोगात आणायची, हे लक्षात घ्या !

Add caption
      साधकांना आध्यात्मिक त्रास होत असतांना उपाय सांगतेवेळी ज्या काही गोष्टी शिकता आल्या, त्यांतून उपायांची पुढील मार्गदर्शक तत्त्वे लक्षात आली. ती येथे देत आहे.
१. त्रास पूर्णपणे थांबेपर्यंत न्यास, मुद्रा आणि नामजप शोधून पुढचे पुढचे उपाय केव्हा चालू ठेवावेत ? : उपाय करू लागल्यावर त्रास न्यून होत असल्याचे लक्षण म्हणजे आरंभी आकाशतत्त्वाचा उपाय आला असेल, तर काही वेळ उपाय करून पुन्हा उपाय शोधल्यावर वायुतत्त्वाचा उपाय येतो आणि त्यानंतर काही वेळाने अग्नितत्त्वाचा उपाय येतो. अशा प्रकारे आरंभी आकाशतत्त्वाचा (निर्गुण तत्त्वाचा दर्शक) आवश्यक असलेला उपाय त्रास न्यून झाल्याने शेवटी अग्नितत्त्वाचा, म्हणजे सगुण-निर्गुण स्तराचा आवश्यक असतो. अशा वेळी त्रासाचे लक्षण पूर्णपणे थांबेपर्यंत उपाय करावेत.

प्रतिकूलतेतही गुरुसेवा झोकून देेेऊन करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश तांबे !

श्री. गणेश तांबे
१. सेवेसाठी सदैव तत्पर 
     दादा मासातील (महिन्यातील) २० ते २५ दिवस कामानिमित्त भारतभर दौर्‍यावरच असतात. आज राजस्थान, तर उद्या आंध्रप्रदेश असा त्यांचा दौरा चालू असतो. या परिस्थितीतही ते सतत आनंदी असतात. त्यांना कधीही भ्रमणभाष केला, तरी ते सेवेसाठी सदैव सिद्ध असतात. गेल्या ५ वर्षांत त्यांच्याकडून सेवा करायला जमणार नाही, असे क्वचितच मी ऐकले आहे.
२. गुरुकार्याची तळमळ 
      एकदा मी दादांना एका तातडीच्या सेवेनिमित्त भ्रमणभाष केला. तेव्हा दादा आगगाडीमधून प्रवास करत होते. दादांनी एका घंट्यात सेवा पूर्ण करून मला भ्रमणभाष केला. तेव्हा त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आले की, रेल्वेस्थानकावर उतरल्यावर फलाटावर बसून त्यांनी सेवा पूर्ण केली. रेल्वेस्थानकावर असूनसुद्धा ते म्हणाले, माझ्या सेवेत काही चुका झाल्या असतील, तर सांगा मी पूर्ण करून देऊ शकतो. या प्रसंगात दादांची गुरुकार्याप्रती एवढी तळमळ बघून भाव जागृत झाला आणि मी किती अल्प पडतो, याची जाणीव झाली.

भावपूर्ण दिवाळी कशी साजरी करावी ?

कु. स्वाती गायकवाड
१. गुरुमाऊलीचा साधकाच्या जीवनातील प्रवेश म्हणजे आनंदाची दिवाळी !
   अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो. रात्रीचा प्रवास करतांना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रेडियमवर प्रकाश पडल्यास ते आपल्याला पणत्यांसारखे भासतात. ते आपल्याला वाट दाखवतात. रस्त्यातील अडथळे आणि वळणे लक्षात आणून देतात; म्हणून आपला प्रवास सुखरूप होतो आणि आपण इच्छित स्थळी पोेचू शकतो. तसेच गुरुमाऊलीने आपला आध्यात्मिक प्रवास सुकर केला आहे. कुठे जायचे आहे ?, ते ध्येयही समोर ठेवले आहे. या साधनापथाच्या दोन्ही बाजूंना व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या पणत्या लावल्या आहेत. त्या पणत्यांच्या प्रकाशात आपला प्रवास गुरुदेव करवून घेत आहेत. तेच वळणे आणि अडथळे दाखवून देत आहेत. गुरुमाऊलीप्रती किती कृतज्ञता व्यक्त करावी ? खरंच या दिवाळीत आपण अंतर्मनात गुरूंप्रतीच्या कृतज्ञतेचे दीप लावूया. ज्या क्षणी गुरुमाऊलीने आपल्या जीवनात प्रवेश केला, त्या क्षणापासून साधकाच्या जीवनात आनंदाची दिवाळी चालू झाली. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य श्रीगुरुचरणांशी जोडून आनंद घेऊया.

इतरांचा विचार करणार्‍या आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असणार्‍या कु. कल्याणी गांगण, कु. सोनल जोशी अन् कु. पूनम साळुंके !

कु. कल्याणी गांगण
मी, कु. कल्याणी गांगण,
     कु. सोनल जोशी आणि कु. पूनम साळुंके अशा चौघीजणी एकाच खोलीत रहातो. या तिघींची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे. 
१. समष्टीची हानी होऊ नये, अशी तळमळ 
असणारी कु. कल्याणी गांगण ! 
१ अ. व्यवस्थितपणा : ताईमध्ये व्यवस्थितपणा हा गुण आहे. ती खोलीत किंवा सेवा करतो तेथे कुठे जळमटे किंवा कचरा दिसल्यास लगेच केर काढते. तिला कुठेही साहित्य अव्यवस्थित ठेवल्याचे आढळल्यास ती तत्परतेने ते व्यवस्थित ठेवते. मी साहित्य अव्यवस्थित ठेवले असल्यास ती मला प्रेमाने सांगून माझ्याकडून ते व्यवस्थित ठेवून घेते. खोली गुरुदेवांना अपेक्षित अशी स्वच्छ आणि व्यवस्थित राहील, याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असते.

साधिकेला मनुष्य जीवनातील श्रीगुरूंचे स्थान स्पष्ट करणारा लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचल्यानंतर सुचलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सौ. कमलिनी कुंडले
       ५.१०.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या पू. (सौ.) भावना शिंदे यांनी (पू. भावनाताईंनी) मनुष्य जीवनातील श्रीगुरूंचे स्थान या आशयाचा अन्य धर्मीय साधकाच्या अनुभूतींविषयी लिहिलेला लेख वाचला. त्या वेळी मला सुचलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. श्रीगुरु आणि संत हेच मोक्षप्राप्तीसाठी 
तळमळणार्‍या जिवांचे आधारवड असणे 
     हा लेख वाचल्यावर गुरुतत्त्व किती दयाळू, कृपाळू आणि व्यापक आहेे, हे लक्षात आले. म्हणूनच स्वानुभवाचे बोल सांगतांना संत म्हणतात -
गुरु थोर कि देव थोर म्हणावा । नमस्कार आधी कोणा करावा ॥ 
मना माझीया गुरु थोर वाटे । 
जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ॥ 
     त्यातून ते मनुष्य जीवनातील श्रीगुरूंचे माहात्म्यच समाजाला सांगत असतात. असे श्रीगुरु आणि संत हेच मोक्षप्राप्तीसाठी तळमळणार्‍या जिवांचे आधारवड आहेत. त्यांच्या चरणी अनंत अनंत कोटी कृतज्ञता !

अनेक कलागुण अंगी असलेली, श्रीकृष्णाचे साहाय्य घेऊन गांभीर्याने व्यष्टी साधना करणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मिरज आश्रमातील बालसाधिका कु. ऐश्‍वर्या योगेश जोशी (वय १३ वर्षे) !

कु. ऐश्‍वर्या जोशी
उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला 
आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी !
        १. विविध कलागुण 
१ अ. सुवाच्च अक्षर : पूर्वी ऐश्‍वर्याचे अक्षर चांगले नव्हते. आता ते वळणदार होऊन तिचा व्यवस्थितपणाही वाढला आहे. सत्संगाची सूत्रे ती भरभर आणि मुद्देसूदपणे लिहून घेते.
१ आ. एकाग्रतेने आणि जलद गतीने वाचन करणे : तिची वाचनाची गती अधिक आहे. २०० ते ३०० पानांचा ग्रंथ ती २ - ३ घंट्यांत वाचते. तिला संत, क्रांतीकारक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा आणि ग्रंथ वाचायला जास्त आवडतात. यामध्ये ती इतकी एकाग्र होते की, त्या वेळेस तहान-भूकही विसरलेली असते.

भोळ्या भावाने श्री गुरूंचे मन जिंकणारे सनातनचे ५१ वे संतरत्न पू. जयराम जोशी यांचा प.पू. डॉक्टरांवरील अतूट श्रद्धेच्या बळावर शीघ्र गतीने झालेला साधनेचा प्रवास !

पू. जयराम जोशीआजोबा
सनातनचे संत पू. जयराम जोशी यांनी भोळा भाव आणि प.पू. डॉक्टरांवरील अतूट श्रद्धा या बळावर शीघ्रातीशीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती केली. वर्ष २०१० पर्यंत ते गृहस्थाश्रमातील कर्तव्ये पूर्ण करत होते आणि पत्नीचे अकस्मात् निधन झाल्यामुळे ते रामनाथी आश्रमात रहाण्यास आले. सात्त्विक, सेवाभावी वृत्ती अन् आज्ञापालन या गुणांद्वारे त्यांनी केवळ ८ - ९ मासांत (वर्ष २०११ मध्ये) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली. भोळ्या भावाने श्री गुरूंचे मन जिंकणार्‍या पू. आबांनी वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेला संतपदही प्राप्त केले आणि सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ५१ वे संतरत्न म्हणून ते सन्मानित झाले.
    पुढे दिलेला साधक ते संत हा त्यांचा साधनाप्रवास कु. प्रियांका लोटलीकर यांनी उलगडला आहे. यातून पू. जोशीआबांच्या अनेक गुणांचा परिचय होतो, तसेच कठीण प्रसंगी ईश्‍वरावरील निष्ठा कशी अतूट असली पाहिजे, हेही शिकायला मिळते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे
विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


देव माझी गुरुमाऊली ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
कु. प्रियांका कदम
देव माझी गुरुमाऊली, 
तीच माझे सर्वस्व ।
साक्षात् सामावले तिच्यात 
श्रीविष्णूचे अंशत्व ॥ १ ॥

देवा, सदा राहो 
आम्ही तुझ्या चरणी ।
हीच प्रार्थना करते गुरुराया 
तव कोमल चरणी ॥ २ ॥

आतापर्यंतच्या चुकांसाठी करावे देवा आता क्षमस्व ।
सर्व साधकांवर कृपा करण्यास तू तर आहेस समर्थ ॥ ३ ॥
     प.पू. डॉक्टरांना भावपूर्ण नमस्कार !
- कु. प्रियांका भागवत कदम (वय १९ वर्षे), सातारा (३०.५.२०१६)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा एकांत 
माणूस कुठेही गेला, तरी त्याला इतर कुठलेही नसेल; पण स्वतःच्या शरिराचे 
बंधन राहीलच; म्हणून शारीरिक आणि सांसारिक विचारांपासून मुक्त होणे, हाच खरा एकांत !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कोत्या विचारांची अडगळ !

संपादकीय
      प्रत्यक्षात समान नागरी कायद्यांतर्गत तलाकाचे सूत्र येत असतांना तीन तलाक आणि समान नागरी कायदा ही वेगवेगळी सूत्रे आहेत, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. देशातील कोणताही कायदा, कोणताही पर्सनल लॉ हा घटनेला अनुसरूनच असायला हवा, असेही त्यांनी म्हटले. तोंडी तलाक पद्धतीमुळे मुसलमान महिला अतिशय त्रस्त आहेत. त्यांच्यापैकी काही जणी भीतीला दूर ठेवून न्यायालयात पोचल्या आहेत. त्या महिलांना असे पाऊल का उचलावे लागते, याचा विचार झालेला दिसत नाही; किंबहुना त्यांचे मत विचारात घेतले जात नाही, हीच त्यांची मुख्य तक्रार आहे. याविषयी विचारमंथन न करता तिहेरी तलाक धर्माचे महत्त्वपूर्ण अंग कसे आहे, यावरच मत व्यक्त करण्यावर मुसलमानांकडून भर दिला जात आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn