Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज वसुबारस

टिपू सुलतानच्या जयंतीला बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद विरोध करणार !

  • हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या आणि हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍या टिपू सुलतानचा कर्नाटकात उदो उदो होणे, ही काँग्रेसला सत्तेवर आणणार्‍या हिंदूंना शिक्षाच होय !
  • कर्नाटकात काँग्रेस सरकार टिपू सुलतानची जयंती साजरी करणार
         मंगळुरू (कर्नाटक) - कर्नाटकातील काँग्रेस सरकारने क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती १० नोव्हेंबरला शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना प्राणपणाने विरोध करतील, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे सहसचिव श्री. सुरेंद्र कुमार यांनी केले. ते बजरंग दलाच्या दक्षिण भारत प्रांतीय अधिवेशनाच्या निमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
         श्री. सुरेंद्र कुमार म्हणाले, टिपू सुलतान याने हिंदू आणि ख्रिस्ती यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्याची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करण्यास आम्ही तीव्र विरोध करू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतलेला निर्णय मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी आहे. त्यामुळे राज्यात अशांती निर्माण होईल. विश्‍व हिंदु परिषदेचे विभागीय संघटन सचिव श्री. गोपाल म्हणाले की, टिपू सुलतान याच्या जयंतीला विरोध करतांना प्राण गेले तरी पर्वा नाही.

हिंदुत्वाची नव्याने व्याख्या करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

       नवी देहली - हिंदुत्वाची नव्याने व्याख्या करावी, अशी मागणी करणारी याचिका कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाने २५ ऑक्टोबरला फेटाळून लावली. न्यायालयाने २१ वर्षांपूर्वी दिलेल्या निकालाची समीक्षा करण्याची मागणी यात करण्यात आली होती. सेटलवाड यांच्या व्यतिरिक्त शमसूल इस्लाम आणि दिलीप मंडल यांनी राजकारणापासून धर्माला वेगळे करण्याची मागणी केली होती. मुख्य न्यायमूर्ती टी.एस्. ठाकूर, न्या. मदन लोकूर, एस्.ए. शोब्दे, ए.के. गोयल, यू.यू. लळीत, धनंजय चंद्रचूड आणि एल्. नागेश्‍वर राव या न्यायमूर्तींच्या पिठाने ही याचिका फेटाळून लावली. हिंदुत्व ही जगण्याची शैली असून हिंदु हा कुठला धर्म नाही, असे वर्ष १९९५ मध्ये न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी आणि रमेश प्रभु या नेत्यांनी केलेल्या याचिकेवर मत व्यक्त केले होते. या निर्णयांतर्गत न्यायालयाने मनोहर जोशी यांची निवडणूक योग्य ठरवली होती. प्रचाराच्या वेळी मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र सर्वांत प्रथम हिंदु राज्य बनेल, असे म्हटले होते.

पाकच्या क्वेट्टा शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रावरील आत्मघातकी आक्रमणात ६१ जण ठार

पाकने निर्माण केलेला भस्मासुर 
आता त्याच्याच मानेवर बसला आहे !
        क्वेट्टा - पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर २४ ऑक्टोबरच्या रात्री २ आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी आक्रमणात ६१ जण ठार झाले आहेत, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. प्रथम या आतंकवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर स्वतःला उडवून दिले. या वेळी प्रशिक्षण केंद्रात सुमारे २५० जण उपस्थित होते.

देशातील ८७ ग्राहकांकडे बँकांचे तब्बल ८५ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज थकित !

एवढे पैसे कर्जदारांकडे थकित असतांना बँका झोपा 
काढत होत्या कि यात बँक अधिकार्‍यांचा लाभ होत असतो ? 
सामान्य कर्जदाराने कर्ज न फेडल्यास त्याच्या संपत्तीवर 
जप्ती आणणार्‍या बँका मोठ्या कर्जदारांकडे मात्र दुर्लक्ष 
करतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
         नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेकडे ५०० कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे कर्ज आहे, अशा लोकांची नावे मागितली होती. बँकेने दिलेल्या या नावांमध्ये ८७ जण असून त्यांच्याकडे बँकांचे ८५ सहस्र कोटी रुपये देणे असल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने या ८७ जणांची नावे सार्वजनिक करण्याचा आदेश दिला आहे. या वेळी न्यायालयाने म्हटले की, रिझर्व्ह बँकेने बँकांऐवजी देशाच्या भल्यासाठी काम केले पाहिजे.
         सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर म्हणाले की, आम्ही ५०० कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे कर्ज असणार्‍यांची नावे मागितली. १०० कोटी रुपयांच्या कर्जदारांची नावे मागितली असती, तर ही रक्कम एक लाख कोटीपर्यंत गेली असती.

लष्कर-ए-तोयबाने पाकमध्ये भित्तीपत्रके लावून उरी येथील आक्रमणाचे दायित्व स्वीकारले !

        गुजरनवाला (पाकिस्तान) - उरी (जम्मू-काश्मीर) येथे ज्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले, त्यातील एका आतंकवाद्यासाठी लष्कर-ए-तोयबा विशेष नमाजपठण करणार आहे, अशा आशयाची भित्तीपत्रके पाकच्या पंजाबमधील गुजरनवाला भागात लावण्यात आली आहेत आणि त्यात सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. हे भित्तीपत्रक म्हणजे उरी येथील आक्रमणात पाकमधील आतंकवाद्यांचा हात असल्याचा पुरावा आहे. ज्याच्यासाठी नमाजपठण करण्यात येणार आहे, त्या आतंकवाद्याचे नाव महंमद अनस उपाख्य अबू सिराका असे आहे. तो गुजरनवाला येथील रहिवासी होता. अबू सिराकाने १७७ हिंदु सैनिकांना ठार केले, असा खोटा प्रचार या भित्तीपत्रकामधून करण्यात येत आहे. लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद याचेही छायाचित्र या भित्तीपत्रकावर लावण्यात आले आहे.

फरीदाबाद (हरियाणा) आणि वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

प्रदूषण करणार्‍या 
फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी 

फरीदाबाद येथे आंदोलन करतांना धर्माभिमानी !

        फरीदाबाद (हरियाणा) - २३ ऑक्टोबर या दिवशी येथील वल्लभगडमधील सिटी पार्कमध्ये राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. बंगालच्या बीरभूमच्या कांगलापहार गावात नवरात्रोत्सवात दुर्गापूजा उत्सवाला मुसलमानांमुळे अनुमती नाकारण्यात आली. याचा विरोध करण्यासाठी, कोट्यवधी रुपयांची आर्थिक हानी करणार्‍या आणि प्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर बंदी आणणे, तसेच महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी कठोर कायदा बनवण्याची मागणी या आंदोलनाच्या वेळी करण्यात आली. या आंदोलनात गोमानव सेवा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकून चीनचे आर्थिक कंबरडे मोडा !

भांडुप येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिकांचे देशवासियांना आवाहन !
आंदोलन करतांना राष्ट्रप्रेमी 
     मुंबई, २५ ऑक्टोबर (वार्ता.) - चीन पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देऊन एकप्रकारे शत्रूराष्ट्राला साहाय्य करत आहे. शत्रूराष्ट्राला साहाय्य करणार्‍या चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून देशवासियांनी चीनचे आर्थिक कंबरडे मोडून टाकावे, असे आवाहन २२ ऑक्टोबर या दिवशी भांडुप येथील रेल्वेस्थानकावर झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केले. आंदोलनात श्री शिवकार्य प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्‍व हिंदू परिषद, भाजप, शिवसेना, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांचे पदाधिकारी, मुंबई येथील नेव्ही इंटरनॅशनल मुंबईचे जनरल सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर गुप्ता यांसह ३५ राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते.

वाराणसी येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

अंनिस याविषयी कधी कृती करणार कि केवळ हिंदूंना 
विरोध करणे, हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे ?
         वाराणसी - येथील भोजूबीर -सिंधोरा मार्गावरील मातृधाम आश्रमात भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून गावकर्‍यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन केली आहे. (ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराच्या विरोधात कृती करणारे अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी यांचे अभिनंदन ! - संपादक) त्याची नोंद घेऊन योग्य कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

पाकमध्ये ५ सहस्र १०० आतंकवाद्यांची खाती गोठवली !

आतंकवाद्यांच्या गोठवलेल्या खात्यांची 
संख्या इतकी, तर न गोठवलेल्या खात्यांची 
संख्या किती असेल, याची कल्पना करता येईल !
        इस्लामाबाद - पाक सरकारने आतंकवादाशी संबंधित असलेल्या ५ सहस्र १०० जणांची बँक खाती गोठवली आहेत. या खात्यांमध्ये एकूण ४० कोटी रुपये आहेत. यात जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझर याचेही खाते गोठवण्यात आले आहे.
        यातील १ सहस्र २०० जण हे आतंकवादविरोधी कायद्यांतर्गत अत्यंत धोकादायक म्हणून नोंद असलेल्या अ वर्गातील आहेत. सुमारे ३ सहस्र खाती खैबर पख्तुन्वा भागातील असून १ सहस्र ४४३ पंजाब, २२६ सिंध, १९३ बलुचिस्तान, १०६ गिलगीट-बाल्टिस्तान, तर २७ खाती इस्लामाबाद येथील बँकांतील आहेत. (यावरून संपूर्ण पाकमध्ये आतंकवाद पसरलेला आहे आणि याची माहिती पाककडे असल्यानेच इतक्या मोठ्या प्रमाणात खात्यांवर कारवाई करण्यात आली, हे उघड होते ! - संपादक)

मुझफ्फरपूर (बिहार) येथे महिला अभियंत्याला खुर्चीला बांधून जाळले !

क्रूरतेची परिसीमा 
गाठलेल्या बिहारमधील जंगलराज !
       मुझफ्फरपूर - बिहारच्या मुझफ्फरपूर येथे मनरेगा योजनेत अभियंता पदावर कार्यरत एका महिलेला खुर्चीला बांधून जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या महिला अभियंत्याचे नाव सरीतादेवी आहे. घटनास्थळाजवळ तिची चप्पल सापडल्याने जाळण्यात आलेली महिला सरीतादेवी असल्याचे उघड झाले. २३ ऑक्टोबरला रात्री येथील बजरंग विहार संकुलातील बांधकाम होत असलेल्या घरात ही घटना घडली. पोलिसांनी येथे आत्महत्या करत असल्याच्या संदर्भातील चिठ्ठी सापडली आहे. तिच्या आईने ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर (सेन्सॉर बोर्ड) पाश्‍चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव !

      मुंबई - हिंदी चित्रपटांमध्ये प्रणयदृश्य किंवा चुंबनदृश्य यांचा समावेश असल्यास त्यावर केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने कठोर भूमिकाच घेतल्याचे पहावयास मिळाले होते. अशी दृश्ये असलेले चित्रपटातील भाग मंडळाकडून वगळले जायचे किंवा त्यांना ए प्रमाणपत्र दिले जायचे; परंतु १२ चुंबनदृश्यांचा समावेश असलेल्या बेफिक्रे या हिंदी चित्रपटाच्या विज्ञापनाला मंडळाने युए प्रमाणपत्र दिले आहे.

एक पडदा चित्रपटगृहांचा ऐ दिल है मुश्किल चित्रपटावर बहिष्कारच !

सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा अभिनंदनीय निर्णय !
      मुंबई - पाकिस्तानी कलाकार असलेला ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट २८ ऑक्टोबर या दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे; परंतु एक पडदा (सिंगल स्क्रीन) चित्रपटगृहांचे मालक तो चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांची २४ ऑक्टोबर या दिवशी बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. 
     करण जोहरनिर्मित ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने विरोध केला होता. त्यानंतर लगेच सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने पाकिस्तानी कलाकार असलेला एकही चित्रपट दाखवणार नसल्याचे जाहीर केले होते. या कालावधीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे मनसेने आपला विरोध मागे घेत चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. असे असले, तरीही असोसिएशन स्वतःच्या निर्णयावर ठाम आहे.

आम्ही आमच्या अटी आणि वेळेनुसार काश्मीरमध्ये परतू !

काश्मीरमध्ये परत येण्याच्या हिजबुल मुजाहिदीनच्या आवाहनाला काश्मिरी हिंदूंचे उत्तर ! 
      श्रीनगर - आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनने काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागलेल्या काश्मिरी हिंदूंना परत येण्याचे आवाहन केले होते त्याला हिंदूंनी उत्तर दिले आहे. काश्मिरी पंडित कॉन्फरन्सचे (केपीसीचे) प्रमुख कुंदन काश्मिरी यांनी सांगितले की, आम्ही त्याचा प्रस्ताव पूर्णत: फेटाळून लावतो; कारण ऐतिहासिकरित्या काश्मीरचा काश्मिरी हिंदूंशीच संबंध आहे. तसेच फुटीरतावादी आणि आतंकवादी किंवा सीमेपलीकडे बसलेल्या त्यांच्या समर्थकांद्वारे बनवण्यात आलेल्या कार्यसूचीनुसार आम्ही परत येणार नाही. काश्मिरी हिंदू त्यांच्या अटी, परिस्थिती आणि निवड केलेल्या वेळेप्रमाणे खोर्‍यात परततील. 
      एका व्हिडियोद्वारे हिजबुलने वरील आवाहन केले होते. या व्हिडियोमध्ये हिजबुलचा स्वयंभू कमांडर जाकिर रशीद भट उर्फ मूसा याने हे आवाहन केले.


जपानमध्ये पर्यावरणाच्या शुद्धीसाठी भारतीय पुजार्‍यांकडून यज्ञ !

      टोकियो - जपानचे पर्यावरण शुद्ध करण्यासाठी २१ ऑक्टोबरपासून तेथे यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. हा यज्ञ ९ दिवस अखंड चालणार आहे. या यज्ञासाठी भारतातील पुजार्‍यांना बोलावण्यात आले आहे. पुजार्‍यांबरोबर १५ स्वयंपाकीही जपानला गेले आहेत.
१. जपानच्या माउंट फ्यूजीमध्ये साईं मां १०८ कुण्डीय महायज्ञ केला जात आहे. या यज्ञामध्ये भारत आणि अमेरिका येथील १२५ वैदिक विद्वान सहभागी झाले आहेत. हे अनुष्ठान महामंडलेश्‍वर साईं मां लक्ष्मी देवी यांच्या उपस्थित होत आहे.
२. विश्‍व कल्याणार्थ आणि शांती यांसाठी श्रीमत् नारायण त्रिपाद विभूत सुदर्शन सहित शतचण्डी महारुद्र यज्ञ केला जात आहे. यज्ञाच्या आयोजनाचा उद्देश भारत आणि जपान यांमधील राजकीय संबंध सुदृढ करणे, त्याचबरोबर आध्यात्मिक संबंध दृृढ करणे, असा आहे.

बलात्कार प्रकरणांत विविध देशांमध्ये देण्यात येणार्‍या शिक्षा !

जगात बलात्कार्‍यांना वर्षानुवर्षे शिक्षा न होणारा एकमेव 
देश भारत ! इतर देशांसारखे कठोर कायदे भारतात कधी होणार ?
      नवी देहली - इंडोनेशियामध्ये बलात्काराच्या विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार चालू आहे. या कायद्यानुसार दोषींना नपुंसक बनवण्याबरोबर त्यांच्या शरिरात महिलांचे हार्मोन्स सोडण्यात येणार आहेत. या अनुषंगाने विविध देशांत बलात्कार्‍यांना कोणती शिक्षा दिली जाते हे पुढे दिले आहे. 
१. भारतात बलात्काराच्या विरोधात कठोर कायदे असतीलही; मात्र आरोपींना शिक्षा होण्यासाठी अनेक वर्षे वाट पहावी लागते. 
२. चीनमध्ये बलात्काराच्या प्रकरणात शेकडो लोकांना फाशीची शिक्षा दिली गेली आहे. तसेच बलात्कार्‍याचे लिंग कापले जाते.
३. उत्तर कोरियात अशा आरोपींना थेट शिक्षा दिली जाते. त्यांच्या कायद्यात बलात्कार्‍यांच्या डोक्यात गोळ्या घालण्यापासून विविध क्रूर पद्धतीने मारण्याच्या तरतुदी आहेत.

बंगालमध्ये वासनांध धर्मांधाने हिंदु मुलीवर अ‍ॅसिड फेकून तिची हत्या केली !

अशा लिंगपिसाट धर्मांधांना शरीया कायद्यानुसार शिक्षा दिल्यास त्यांच्यावर वचक बसेल !
बंगालमध्ये कायद्याचे राज्य आहे का ?
      नाडीया (बंगाल) - जिल्ह्यातील दक्षिण गाझनापारा या गावी रहाणार्‍या १७ वर्षीय हिंदु मुलीने ३८ वर्षीय वयाच्या आणि ३ मुलांचा पिता असलेल्या इम्रान अली या धर्मांधाशी संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे इम्रानने तिच्यासह तिच्या आईवर अ‍ॅसिड फेकून त्यांना गंभीर घायाळ केले. यात पीडितेचा मृत्यू झाला असून तिची आई गंभीर घायाळ झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी इम्रान अली याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत. (आरोपीला यापूर्वीच्या गुन्ह्यांविषयी कठोर शिक्षा केली असती, तर एका युवतीवर प्राण गमावण्याची वेळ आली नसती ! - संपादक)

धर्माच्या नावाने मते मागणे अयोग्य ! - सर्वोच्च न्यायालय

धर्माच्या नावाखाली आरक्षण देणे आणि 
सुविधा देणेही अयोग्य आहे, हे राज्यकर्ते जाणतील का ?
      नवी देहली - राजकारण आणि धर्मकारण या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. राजकारणापासून धर्म दूरच ठेवायला पाहिजे. तसेच धर्माच्या नावाने मते मागणेही अयोग्य आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने नोंदवले. धर्मनिरपेक्षता हे आपल्या घटनेचे सर्वोच्च तत्त्व आहे. त्यामुळे राजकारण अन् धर्मकारण याची सरमिसळ होता कामा नये, अशी अपेक्षा मुख्य न्यायमूर्ती टी.एस्. ठाकुर यांनी व्यक्त केली. न्या. ठाकुर यांनी संसदेच्या नाकर्तेपणावरही ताशेरे ओढले. संसदेने गेल्या २० वर्षांत हे प्रकरण निकालात काढले नाही. या प्रकरणाचा आपल्या खंडपिठाकडूनच निवाडा व्हावा, असे त्यांना अपेक्षित असेल, अशी टीकाही न्या. ठाकुर यांनी केली.

तिहेरी तलाकमुळे मुसलमान महिलांचे शोषण होते ! - शिया पर्सनल लॉ बोर्ड

तिहेरी तलाक बंद करण्यास शिया पर्सनल लॉ बोर्डाचे समर्थन !
तिहेरी तलाकवरून मुसलमानांमध्ये मतभेद !
       नवी देहली - तिहेरी तलाक प्रथा बंद करण्याच्या सूत्राला शिया पर्सनल लॉ बोर्डाने समर्थन दिले आहे. एका श्‍वासात तीनदा तलाक म्हणून घटस्फोट घेणे योग्य असते, तर महंमद पैगंबर यांच्या काळातही असे तलाक झाले असते, असे बोर्डाचे प्रवक्ता मौलाना यासूब अब्बास यांनी म्हटले आहे. तलाकची ही पद्धत अयोग्य असून त्यामुळे मुसलमान महिलांचे शोषण होत आहे. एका श्‍वासात तीन वेळा तलाक म्हटल्यास संबंध संपुष्टात येईल, असे कुराण, हदीस किंवा कुठेही लिहिण्यात आलेले नाही, असेही अब्बास यांनी स्पष्ट केले आहे. अब्बास म्हणाले, आमच्याकडे निकाह आणि तलाक दोन्हीही साक्षीदारांच्या उपस्थितीत होतात. निकाहमध्ये साक्षीदार नसले, तर एकदा चालेल; मात्र तलाक साक्षीदारांच्या शिवाय होऊ शकत नाही. धर्माला योग्य पद्धतीने समोर ठेवले जात नसल्यामुळे इस्लाम अपकीर्त होत आहे.जयपूर येथील केंद्रीय कारागृहात जमिनीच्या आत लपवलेले ६ भ्रमणभाष संच जप्त !

  • कारागृहातील बंदीवान भ्रमणभाष संच वापरत असतांना पोलीस झोपले होते का ? 
  • पोलिसांच्या सहकार्यामुळेच ही कुकृत्ये चालतात, असे सामान्य जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
       जयपूर - येथील केंद्रीय कारागृहात पोलिसांनी हाती घेतलेल्या शोधमोहिमेच्या वेळी अनुमाने ६ भ्रमणभाष (मोबाईल) संच जप्त करण्यात आले. सर्व भ्रमणभाष संच चालू स्थितीत असून ते एका प्लॉस्टिकच्या पिशवीत घालून जमिनीच्या आत ठेवण्यात आले होते. मागील काही दिवसांमध्ये कारागृहात बाहेरून भ्रमणभाष संचांचे पॅकेट आत पोचवण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कारागृहातील जॅमर (कारागृहातील खोल्यांमध्ये भ्रमणभाषला रेंज मिळू नये; म्हणून केलेली व्यवस्था) योग्य पद्धतीने काम करत नाही. त्यामुळे शिक्षा भोगत असलेले कैदी आत राहून त्यांच्या टोळीतील सदस्यांशी भ्रमणभाषद्वारे संपर्क करून कारभार चालवतात. (गुन्हेगारी कारवायांचा अड्डा बनलेली कारागृहे ! यास उत्तरदायी असणार्‍या पोलिसांवर कारागृह प्रशासन काय कारवाई करणार ? - संपादक)

पाक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी ठाणे येथील चित्रपटगृहांना निवेदन !

डावीकडून सिनेवंडर चित्रपटगृहाचे व्यवस्थापक 
श्री. जतीन मल्होत्रा यांना निवेदन देतांना 
डॉ. आशिष देवळे, श्री. अतुल देव, श्री. देवेंद्र सोरटे
      ठाणे - पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेल्या अघोषित युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत नौपाडा, ठाणे येथील मल्हार चित्रपटगृह आणि तीन हात नाका, इटर्निटी मॉल मधील सिनेवंडर चित्रपटगृहांच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
     मल्हार चित्रपटगृहाचे व्यवस्थापक श्री. भगवान दिवाळे या वेळी म्हणाले, सिंगल स्क्रीन असोसिएशनने घेतलेल्या निर्णयानुसार पाक कलाकारांचा समावेश असलेले चित्रपट महाराष्ट्रातील ६०० सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्येे प्रदर्शित करण्यात येणार नाही. सिनेवंडर चित्रपटगृहाचे व्यवस्थापक श्री. जतीन मल्होत्रा यांनी समितीची या संदर्भातील सूत्रे संबंधित अधिकार्‍यांपर्यंत पोचवण्याचे आश्‍वासन दिले.

दिवाळीनिमित्त चॉकलेट, सुकामेवा यांच्यासमवेत शॅम्पेन हॅम्पर उपलब्ध

धर्मशिक्षणाचा अभाव आणि पाश्‍चात्त्य 
संस्कृतीचे अंधानुकरण यांच्या वाढत्या प्रभावाचे उदाहरण !
      मुंबई - दिवाळीच्या उत्सवात भेट देण्यासाठी मिठाई, चॉकलेट, फराळ आणि सुकामेवा यांचा पर्याय निवडला जातो. यंदा त्यात पेयाचीही भर पडली आहे. अनेक ठिकाणी भेटवस्तू म्हणून शॅम्पेन विक्रीस उपलब्ध झाले आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये आकर्षक सजावटीमध्ये अनेक प्रकारची शॅम्पेन हॅम्पर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. युरोप-अमेरिका आणि अन्य देशांमधून सण-उत्सव साजरे करतांना शॅम्पेन अथवा मद्य (वाइन) यांचा होणारा वापर आता दिवाळी सणातही स्थिरावू पहात आहे. सध्या विक्रीसाठी असलेल्या बहुतांश शॅम्पेन या फळांपासून बनवलेल्या आहेत. चीनमधील स्फोटात ७ जणांचा मृत्यू आणि ९४ घायाळ !

    बीजिंग - चीनच्या शांझी प्रांतातील शिनमिनमध्ये २४ ऑक्टोबरला झालेल्या एका स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला, तर ९४ जण घायाळ झाले. एका तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या घरामध्ये हा स्फोट झाला. यामुळे शेजारच्या इमारतींची हानी झाली. हा स्फोट कशामुळे झाला, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

थिरुवनंतपुरम् मेडिकल कॉलेजची मुलींना स्कर्ट आणि लेगिंग्ज परिधान करण्यास मनाई !

      थिरुवनंतपुरम् (केरळ) - शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाने विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नवीन ड्रेस कोड लागू केला आहे. याद्वारे त्यांना लेगिंग्ज आणि स्कर्ट परिधान करण्यास मनाई करत सर्वसाधारण कपडे परिधान करण्यास सांगितले आहे. यात चुडीदार आणि साडी परिधान करण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी मदुराईच्या वैद्यकीय महाविद्यालयानेही अशा प्रकारे ड्रेस कोड लागू केला होता.

संगणकाचे मूळ अथर्ववेदामध्ये ! - पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

      लक्ष्मणपुरी (लखनऊ) - संगणक, बायनरी पद्धती आणि गणिताच्या सोप्या पद्धती यांचे मूळ अथर्ववेदामध्ये आहे, असे प्रतिपादन पुरी पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे नुकतेच केले. लखनऊ विद्यापिठातील विद्यार्थ्यांना वेद या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. तसेच विज्ञान, इतिहास आणि विद्यार्थ्यांची यशस्वी कारकीर्द यांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
     शंकराचार्य पुढे म्हणाले, अथर्ववेदाला चमत्कारीक सूत्रांचा वेद म्हटला जातो. त्यात गणित अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. संशोधनासाठी वैदिक शास्त्राचा वापर केल्यास वैज्ञानिकांचे नावीन्यपूर्ण शोध आणि तंत्रज्ञान अधिक यशस्वी होऊ शकतात. राजकारणाविषयी शंकराचार्य म्हणाले की, वेदांमध्ये राजनीती याचा अर्थ राजकारण नाही, तर राज्यधर्म असा आहे. यात सुशासन, सुयोग्य वातावरण, आरोग्य, न्यायप्रणाली आणि कल्याण यांच्या दायित्वाचा उल्लेख आहे. आजच्या शिक्षणात राष्ट्रनिर्माणाचा विषयच नाही.पाकला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकार सिंधू नदीवर जलदगतीने सिंचन प्रकल्पांच्या योजना राबवणार !

      नवी देहली - भारतातून पाकमध्ये वाहणार्‍या नद्यांचे पाणी रोखून पाकला धडा शिकवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील अनुमाने २ लाख ५ सहस्र एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याच्या हेतूने सिंधू नदी खोर्‍यात ४ सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची योजना आखली आहे. सिंधू पाणी करारानुसार झेलमसह पाकच्या नियंत्रणाखाली असलेल्या नद्यांच्या पाण्याचा अधिकाधिक लाभ घेण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर आठवडाभरातच ही योजना आखण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नसल्याचे म्हटले होते. ४ सिंचन प्रकल्पांपैकी पुलवामातील त्राल सिंचन प्रकल्प, कारगिलमधील प्रकाचिक खोज कालवा; तसेच जम्मूच्या सांबा अन् कथुआतील मुख्य रावी कालव्याचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण हे ३ प्रकल्प या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. राजपोरा उपसा सिंचन हा चौथा प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.

सेल संचालकाला नग्न करून मारणार्‍यास अखंड हिंदू सेना ५१ सहस्र रुपयांचे पारितोषिक देणार !

उज्जैन येथे फॅक्ट्री ग्रेडेड सेलच्या विज्ञापनात महंमद अली जीना यांचे चित्र !
       उज्जैन (मध्यप्रदेश), २५ ऑक्टोबर (वार्ता.) - येथे फॅक्ट्री ग्रेडेड सेलच्या विज्ञापनात पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जीना यांचे चित्र लावल्याप्रकरणी सेलचे संचालक प्रणय शर्मा यांच्या विरोधात येथील श्री. जय कौशल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणी संचालक प्रणय शर्मा यांच्या विरोधात कलम १५३ (क) च्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी अखंड हिंदु सेनेचे अध्यक्ष श्री. रूपेश ठाकुर यांनी प्रणय शर्मा यांना नग्न करून मारहाण करणार्‍याला ५१ सहस्र रुपयांचे पारितोषिक घोषित केल्याचे वृत्त येथील सांज लोकस्वामी या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

इराकी आणि कुर्दिश सैन्यासह युरोपीय देशांनी पुकारलेल्या निर्णायक युद्धामुळे इसिसच्या आतंकवाद्यांची दाणादाण !

आता भारतानेही देशात लपलेले इसिसचे आतंकवादी 
अणि त्यांचे पाठीराखे यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे !
महिलांचा वेश परिधान करून इसिसच्या आतंकवाद्यांचे पलायन !
       मोसूल (इराक) - इराकमधील मोसूल शहर पुन्हा कह्यात घेण्यासाठी इराकी आणि कुर्दिश सैन्यासह युरोपीय देशांनी निर्णायक युद्ध पुकारले आहे. या युद्धामुळे इसिसच्या आतंकवाद्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे युद्धाचा सामना करायचे सोडून या संघटनेचे आतंकवादी जीव वाचवण्यासाठी महिलांचे कपडे घालून पळत सुटले आहेत. अशा प्रकारे पलायन करणार्‍या आतंकवाद्यांना कुर्दीश सैन्याने शहराच्या बाहेर कह्यात घेतले आहे. यात इसिसच्या मुख्य कमांडरचाही समावेश आहे. अजूनही ८ सहस्रांहून अधिक आतंकवादी मोसूलमध्ये असल्याचा अंदाज आहे. इसिसचा म्होरक्या अबु-बकर अल् बगदादी हा शहरातच अज्ञात स्थळी लपल्याचे म्हटले जात आहे. (निरपराध नागरिकांचे गळे चिरणारे इसिसचे आतंकवादी किती पळपुटे आहेत, हेच यावरून दिसून येते ! - संपादक)

अनिष्ट शक्तींचा प्रभाव दूर करण्याच्या नावाखाली इमामाकडून महिलेवर बलात्कार !

वासनांध मौलवी ! अशांना शरीया कायद्यानुसार शिक्षा
 देण्याची कोणी मागणी केल्यास त्यात चुकीचे काय ? 
      बिजनौर (उत्तरप्रदेश) - येथील जामा मस्जिद चाहसिरीच्या इमामाची एक ध्वनीचित्रफीत सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित झाली आहे. यात इमामासमवेत एक अर्धनग्न स्थितीत महिला असून ती इमामावर बलात्कार केल्याचा आरोप करत आहे. या वेळी काही जण या महिलेला मारहाण करत आहेत. या इमामाचे नाव अनवारूल हक असून ही ध्वनीचित्रफीत २२ ऑगस्ट २०१६ मध्ये बनवण्यात आली आहे. ध्वनीचित्रफितीत दिसणारी महिला मुझफ्फनगर येथे रहाणारी आहे. ही महिला आजारी होती आणि ती उपचारासाठी इमामाकडे गेली होती. तिच्यावर अनिष्ट शक्तींचा प्रभाव असल्याचे इमामाने तिला सांगितले होते.

(म्हणे) बाळ ठाकरे हे सर्वाधिक धूर्त नेते होते आणि ते नेहमी गुंडगिरी करत !

वाचाळ मार्कंडेय काटजू यांचे शिवसेनाप्रमुख 
बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक विधान !
      नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी ब्लॉगवर लेख लिहिला असून त्यामध्ये त्यांनी रास्कल (हरामखोर) बाळ ठाकरे असा उल्लेख केला आहे. बाळ ठाकरे हे सर्वाधिक धूर्त नेते होते. ते नेहमी गुंडगिरी करत होते, असेही त्यांनी म्हटले आहे. (उठसूट वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात रहायचे, एवढा एकच उद्योग काटजू यांना जमतो. या उलट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंच्या उत्कर्षासाठी प्रभावी कार्य केले. त्यांच्या नखाची तरी सर काटजू यांना आहे का ? शिवसेनाप्रमुखांना शिव्या घालणार्‍या काटजू यांच्यावर शासनाने त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे ! - संपादक)

पाकमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ; आक्रमणांमुळे सिंध सरकारचा निर्णय

भारतातील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ कधी होणार ?
     कराची - पाकच्या सिंध प्रांतातील हिंदू, शीख आणि ख्रिस्ती यांच्या प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात येणार असून यासाठी सिंध प्रांताकडून ४०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मंदिरे, चर्च, गुरुद्वारा यांच्या सुरक्षेसाठी ही रक्कम खर्च केली जाणार आहे. येथील प्रार्थनास्थळे आणि त्यांच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची खरेदी केली जाणार आहे. द डॉन या वृत्तपत्राने या संदर्भात वृत्त दिले आहे. या प्रयत्नांमुळे मंदिरांच्या सुरक्षेत वाढ होईल, असा विश्‍वास सिंध प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष साहाय्यक श्री. खाटुमल जीवन यांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो-झरदारी यांच्या सूचनेवरून हा प्रकल्प राबवला जात असल्याची माहिती अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. पाकमधील हैद्राबाद, लरकाना आणि इतर भागांमधील हिंदु प्रार्थनास्थळांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
     सिंध पोलिसांनी त्यांच्या अखत्यारीत अल्पसंख्यांकांची १ सहस्र २५३ प्रार्थनास्थळे असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये हिंदू, ख्रिस्ती, शीख धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांचा समावेश आहे. सिंध प्रांतात ७०३ मंदिरे, ५२३ चर्च आणि ६ गुरुद्वारे आहेत. या प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठी २ सहस्र ३१० पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

इटलीमध्ये पाद्य्राला १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी अटक !

वासनांध ख्रिस्ती धर्मगुरु !
        रोम - अघोरी शक्तींचा त्रास दूर करण्याच्या नावाखाली एक १२ वर्षीय मुलगी आणि इतर ४ महिला यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली इटलीच्या सिसिली राज्यातील पालेमो येथील ५९ वर्षीय पाद्य्राला अटक करण्यात आली आहे. (पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर कथित लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे वासनांध ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी ब्रही काढत नाहीत ! - संपादक) या प्रकरणी कर्नल साल्वादोर मुरातोर नावाच्या सैन्याधिकार्‍यालाही अटक करण्यात आली आहे. अघोरी शक्तींचे त्रास दूर करण्यासाठी पीडित महिलांना साहाय्य करण्याऐवजी चर्चचे पाद्री साल्वादोर अ‍ॅनेलो या महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप आहे.

आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर आणखी ३ नक्षलवादी ठार !

नक्षलवादाने पोखरलेला भारत !
        विजयवाडा (आंध्रप्रदेश) - आंध्रप्रदेश आणि ओडिशा यांच्या सीमेवर सुरक्षादलाने पुन्हा केलेल्या कारवाईत आणखी ३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. २४ ऑक्टोबरला करण्यात आलेल्या कारवाईत २४ नक्षलवादी ठार झाले होते. यात २ प्रमुख नक्षलवादी आणि ७ महिला नक्षलवादी यांचा समावेश होता.

सहनशील, समंजस आणि उपजतच देवाची ओढ असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नाशिक येथील चि. हिंदवी ज्ञानेश्‍वर भगुरे (वय १ वर्ष) !


     आश्‍विन कृष्ण पक्ष नवमी (२४.१०.२०१६) या दिवशी चि. हिंदवी ज्ञानेश्‍वर भगुरे हिचा प्रथम वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आई-बाबांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
१. जन्मापूर्वी 
१ अ. हनुमान चालीसा वाचणे : 'गर्भारपणात दुसरा मास (महिना) चालू असतांना 'हनुमान चालीसा वाचावी', असे मला वाटत असे. मग मी नियमित 'हनुमान चालीसा ' वाचू लागले. 

आसनगाव येथील महाविद्यालयात 'आतंकवादाचे भीषण सत्य' प्रदर्शन !

'एक भारत अभियान' चलो कश्मीरच्या निमित्ताने 
प्रदर्शन बघतांना विद्यार्थी
     आसनगाव (ठाणे), २५ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयात नॉलेज सिटी महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 'आतंकवादाचे भीषण सत्य' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराची 'आणि जग शांत झाले ... !' ही ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. या प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाचे श्री. शिवाजीराव जोंधळे यांनी केले होते. प्रदर्शनाचा लाभ २ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. 

प्रेमळ आणि मनमिळाऊ असलेला ५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. हृषिकेश संजय चव्हाण (वय ११ वर्षे) !

     ('वर्ष २०१० मध्ये कु. हृषिकेश याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के असल्याचे घोषित झाले.' - संकलक) आश्‍विन कृष्ण पक्ष नवमी (१४.१०.२०१४) या दिवशी कु. हृषिकेश चव्हाण याचा वाढदिवस झाला. 
१. 'कु. हृषिकेश शांत आणि प्रेमळ आहे. 
२. बुद्धीमान आणि सर्व कलांमध्ये प्रवीण 
     शाळेतील वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि मेहंदी स्पर्धा अशा सर्व स्पर्धांमध्ये कु. हृषिकेश याचा प्रतिवर्षी क्रमांक येतो. तो अभ्यासातही चांगला आहे. 'देवामुळे सर्व घडते', असे त्याला वाटते. त्याला संगीताची आवड आहे. त्याने कॅसिनो वाजवण्याचा वर्ग लावला आहे. त्यात त्याला देवाची गाणी वाजवण्यास आवडतात. 

सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती धर्मसभेनिमित्त आयोजित शिबिरात धर्माभिमान्यांचा धर्मसभा यशस्वी करण्याचा निर्धार !

गटचर्चेत सहभागी धर्माभिमानी
      सोलापूर, २५ ऑक्टोबर (वार्ता.) - येथे १४ नोव्हेंबर या दिवशी हरिभाई देवकरण प्रशालेत हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या प्रसाराची दिशा ठरवण्यासाठी २३ ऑक्टोबर या दिवशी येथे एकदिवसीय शिबिराचे आयोजित केले होते. या शिबिरात लातूर, बीड, अंबाजोगाई, धाराशिव, सोलापूर, बार्शी, फलटण यांसह अन्य ठिकाणाहून ५० धर्माभिमानी सहभागी झाले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी धर्मजागृती सभेच्या आयोजनामागील उद्देश सांगितला. सोलापूरचे समितीचे समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी धर्मप्रसार करतांना गुरुकृपायोगानुसार साधनेची आवश्यकता विशद केली, तर रणरागिणी शाखेच्या सौ. अलका व्हनमारे यांनी स्वभावदोष-निमूर्र्लनाचे महत्त्व सर्वांना सांगितले.

देहलीतील नया बाजार परिसरात स्फोटात एकाचा मृत्यू !

        नवी देहली - येथील चांदनी चौकाजवळील मशिदीजवळील नया बाजारात २५ ऑक्टोबरला झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ५ जण घायाळ झाले. पोलिसांनी या स्फोटाविषयी काहीच सांगितलेले नसले, तरी हा सिलिंडरचा स्फोट असल्याचे प्राथमिक अन्वेषणात समोर येत आहे.

धारावी (मुंबई) येथे मोहरमच्या मिरवणुकीमुळे पोलिसांनी नवरात्रीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीला अनुमती नाकारली !

हिंदूंना मूर्ती विसर्जनाला अनुमती नाकारणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?
      मुंबई, २५ ऑक्टोबर (वार्ता.) - यावर्षी दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी मोहरम असल्याने मुसलमान धर्मियांना ताजिया विसर्जनाला अडचण येऊ नये, यासाठी धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे कारण पुढे करत पोलिसांनी धारावी येथील १६ नवरात्रोत्सव मंडळांना देवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला अनुमती नाकारली होती. विशेष म्हणजे यांतील २ नवरात्रोत्सव मंडळे मूर्तीविसर्जन करत असलेल्या तलावांच्या ठिकाणी ताजिया विसर्जन नसतांना त्यांनाही पोलिसांनी मूर्तीविसर्जनाची अनुमती नाकारली. त्यामुळे येथील सर्व नवरात्रोत्सव मंडळांना नाईलाजास्तव मूर्तीविसर्जनासाठी १ दिवस थांबण्याची वेळ आली.

मिरज शहरात वसुबारसनिमित्त विविध ठिकाणी गोपूजनाच्या कार्यक्रमांना उपस्थित रहाण्याचे आवाहन !

    मिरज, २५ ऑक्टोबर (वार्ता.) - भारतीय परंपरा पुनर्जिवीत करणे आणि ती परंपरा टिकवणे हे सर्व भारतियांचे कर्तव्य आहे. यांसाठी मिरज शहरात प्रतिवर्षाप्रमाणे २६ ऑक्टोबर, वसुबारस या दिवशी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी गोपूजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम श्री सरपंच हरबा तालीम, श्री संभा तालीम (ब्राह्मणपुरी), पाटील हौद, मंगळवार पेठ, अंबाबाई मंदिर, शिवतीर्थ, कोकणे गल्ली, रेवणी गल्ली, बुधगाव वेस, नदीवेस माळी गल्ली, शिवाजीनगर, भारतनगर (१०० फुटी) या ठिकाणी गोरज मुहुर्तावर सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत होतील. तरी माता-भगिनी यांनी गोग्रास म्हणून प्रामुख्याने कडधान्य, डाळी व गूळ घेऊन येणे. 

सिव्हिक प्राईड संघटनेकडून चिनी वस्तूंच्या विरोधात आंदोलन !

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन 
चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे
आवाहन करतांना कार्यकर्ते
      पुणे, २५ ऑक्टोबर (वार्ता.) - विस्तारवादी चीन भारताशी छुपे युद्ध लढत आहे. भारताच्या विरोधात लढणार्‍या पाकिस्तानला साहाय्यही करत आहे. चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर निर्माण करत आहे. त्यामुळेच समस्त भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करत सिव्हिक प्राईड संघटनेच्या वतीने २३ ऑक्टोबर या दिवशी कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकजवळ निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी संघटनेचे प्रमुख श्री. सागर काशीद, शिवपुत्र क्षत्री यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
चिनी वस्तू कशी ओळखावी ? 
     वस्तूवर मेड इन चायना (Made in China) असे लिहिले असते. RPC / RBC म्हणजे रिपब्लिक ऑफ चीन असे लिहिले असेल अथवा उत्पादनावरील बारकोडच्या प्रारंभीचे पहिले ३ अंक ६९०, ६९१, ६९२, ६९३, ६९४, ६९५, ६९६, ६९७, ६९८, ६९९ असतील, तर त्या वस्तू चिनी बनावटीच्या वस्तू असतात.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव संमत !

      नवी मुंबई - येथील महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सर्वसाधारण सभेमध्ये अविश्‍वासाचा ठराव २५ ऑक्टोबर या दिवशी संमत करण्यात आला. हा ठराव १०५ विरुद्ध ६ मतांनी संमत झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृह नेते जयवंत सुतार यांनी हा ठराव मांडला. भाजपने तुकाराम मुंढे यांच्या बाजूने, तर राष्ट्र्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी अविश्‍वासाच्या बाजूने मतदान केले. सभेचे हे कामकाज चालू असतांना तुकाराम मुंढे स्वतः उपस्थित होते.

अकोला येथे दोन दिवसीय प्रांतीय हिंदु अधिवेशन !

मान्यवरांचे विविध विषयांवर मार्गदर्शन 
डावीकडून ह.भ.प. श्री. निलेश महाराज मते,
दीपप्रज्वलन करतांना पू. नंदकुमार जाधव
आणि श्री. श्रीकांत पिसोळकर
   अकोला - येथील खंडेलवाल भवनामध्ये दोन दिवसीय प्रांतीय हिंदु अधिवेशन पार पडले. अधिवेशनाचा शुभारंभ अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्‍वराला वंदन करून आणि संतांच्या कृपाशीर्वादाने झाला. समितीचे श्री. नरेश कोपेकर यांनी शंखनाद केला. सनातनचे पू. नंदकुमार जाधव, ह.भ.प. श्री निलेश महाराज मते आणि हिंदु जनजागृतीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदशास्त्र अभ्यासक श्री. यज्ञेश जोशी यांनी वेदमंत्रांचे पठण केले. समितीचे पुसद येथील डॉ. विनायक चिरडे यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी अधिवेशनाचा उद्देश विशद केला. ह.भ.प. श्री निलेश महाराज मते यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समर्पित भावाने कार्य करण्याचे महत्त्व सांगितले. सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधनेची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर गटचर्चा आयोजित करण्यात आली होती. श्री. गजानन अढाव आणि सौ. प्रतिभा जडी यांनी सामाजिक संकेतस्थळे आणि धर्मशिक्षण वर्ग यांच्या संदर्भात मार्गदर्शन केले.

नवीन कपडे परिधान करतांना तुम्ही ही काळजी घेता का ?

      मुंबई - दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारपेठा नव-नव्या कपड्यांनी बहरतांना दिसत आहेत. आजच्या घडीला रेडिमेड कपडे खरेदी करण्यास सर्वच लोक प्राधान्य देतांना दिसतात. पण हे नवे कपडेही आजाराला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकतात; कारण बर्‍याच जणांना नवीन कपडे न धुता परिधान करण्याची सवय असते. कपडे निर्मिती करणार्‍या एका आस्थापनाने केलेल्या संशोधनातून नवीन कपडे नेहमी धुवून वापरणे आवश्यक असते, अन्यथा त्यामुळे आजार होऊ शकतात, असे म्हटले आहे.

ठाणे जिल्ह्यात पोलीस ठाण्यात फटाक्यांची विक्री थांबवण्यासाठी निवेदने सादर !

    डोंबिवली, २६ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील विष्णूनगर पोलीस ठाण्यात, तसेच टिळकनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री. रमेश यादव यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी धर्माभिमानी श्री. प्रकाश झरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सूर्यकांत साळुंखे आणि सौ. वंदना चौधरी उपस्थित होत्या. 
    अंबरनाथ येथेही शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोडबोले यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी सौ. शिवानी भोईर आणि समितीच्या अधिवक्त्या सौ. किशोरी कुलकर्णी उपस्थित होत्या. निवेदन दिल्यानंतर चीनच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचे आश्‍वासन पोलिसांकडून देण्यात आले. तसेच सनातनचे कार्य म्हणजे चांगलेच असणार, असेही पोलिसांनी सांगितले. 
     मुंब्रा येथील धर्मशिक्षणवर्गातील मुलांनी फटाके विक्री करणार्‍या दुकानात जाऊन निवेदन दिले. ठाण्यातही अशा प्रकारचे देण्यात आले. 
कळवा येथे हिंदु जनजागृती समितीच्या 
वतीने महिलांसाठी दिवाळीनिमित्त व्याख्यान !
     कळवा - येथील जानकीनगर परिसरात रणरागिणी शाखेच्या वतीने महिलांसाठी दिवाळीचे आध्यात्मिक महत्त्व, लक्ष्मीपूजनाचे महत्त्व, तसेच फटाके फोडण्याचे दुष्परिणाम, त्यातून होणारी हानी यांविषयीचे मार्गदर्शन समितीच्या प्रवक्त्या सौ. सुनिता पाटील यांनी उपस्थित धर्मभिमानी महिलांना केले. या मार्गदर्शनाचा लाभ ३५ महिलांनी घेतला.
अंबरनाथ येथे पोलिसांना निवेदन देतांना कार्यकर्त्या
सौ. सुनीता पाटील मार्गदशन करतांना

जिवंत नागाच्या पूजेस अनुमती मिळेपर्यंत बत्तीस शिराळकरांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार !

     शिराळा (जिल्हा सांगली), २५ ऑक्टोबर (वार्ता.) - शिराळकरांना जोपर्यंत जिवंत नागांच्या पूजेस अनुमती मिळत नाही, तोपर्यंत येणार्‍या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे बत्तीस शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचे आवेदन दाखल झाले नाही. २९ ऑक्टोबर हा आवेदन दाखल करण्याचा अंतिम दिनांक आहे. तहसील कार्यालयानजीक असलेल्या हनुमान मंदिरात कोणी आल्यास त्यांचे प्रबोधन करण्यासाठी, तसेच नागपंचमी मंडळांची भूमिका समजावून सांगण्यासाठी येथील स्थानिक नेते मंडळी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठाण मांडून होती. हा उपक्रम आवेदन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू रहाणार असून त्याला प्रतिवाद वाढत आहे.

फलक प्रसिद्धीकरता

टिपू सुलतानची वंशज असणार्‍या काँग्रेसपासून देशाला मुक्त करा ! 
     कर्नाटकातील काँग्रेस सरकारने १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत हिंदुत्वनिष्ठ यास विरोध करत आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
 Karnatak ki Hindudweshi Congressi Sarkar 
Hinduonka sanhar karnewale Tipu Sultan ki Jayanti mananewali hai.
 -'Congress Mukt Bharat' ab bahut door nahi ! 

जागो ! :
कर्नाटक की हिन्दूद्वेषी कांग्रेसी सरकार 
हिन्दुआें का संहार करनेवाले टिपू सुलतान की जयंती मनानेवाली है !
- 'कांग्रेस मुक्त भारत' अब बहुत दूर नहीं !

(म्हणे) पाकिस्तानशी युद्ध हा पर्याय नाही; चर्चेने प्रश्‍न सोडवावेत !

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची शांतीची कबुतरे !
      चिंचवड (पुणे), २५ ऑक्टोबर - भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताणलेले संबंध पहाता पाकिस्तानशी युद्ध करणे, हा पर्याय ठरू शकत नाही, तर वाटाघाटी करून चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवायला हवेत. सर्जिकल स्ट्राईक अपवादात्मक परिस्थितीत ठीक आहे. आपण पाकिस्तानला वेगळ्या पातळीवर आपली शक्ती दाखवायला हवी, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले. येथील क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला त्यांनी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर भेट दिली. त्या वेळी एका कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. 
     या वेळी पाटील यांनी गुरुकुलममधील संगणक कक्ष, प्रयोगशाळा, गोशाळा आदींसह अन्य विभागांचीही पाहणी केली. या वेळी गुरुकुलममधील विद्यार्थ्यांनी मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, मनसेचे नगरसेवक अनंत कोर्‍हाळे, शिवसेना नगरसेविका सौ. अश्‍विनी चिंचवडे आदी उपस्थित होत्या.

५ नोव्हेंबर या दिवशी समीर गायकवाड यांच्यावरील आरोप निश्‍चितीची सुनावणी होणार !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण 
      कोल्हापूर, २५ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित म्हणून अटकेत असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चित करण्यास अद्यापही उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ नोव्हेंबर या दिवशी होईल. २५ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायाधिशांनी हा निर्णय घोषित केला. येथील जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी चालू आहे. श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन हे उपस्थित होते.

पुरो(अधो)गाम्यांच्या वैचारिक आतंकवादावर हिंदुत्वनिष्ठांकडून चोख प्रत्युत्तर !

       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून धर्मसत्तेला राजसत्तेपेक्षा अधिक प्राधान्य आहे, असे वक्तव्य केले होते. या संदर्भात १७ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीने चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी सूत्रसंचालक निखिल वागळे यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वागणूक देत स्टुडिओतून बाहेर जायला सांगितले होते. या घटनेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. या समवेतच धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुद्वेषाचा एककलमी कार्यक्रम चालवणार्‍यांच्या विरोधातही समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लेख अथवा कवितांच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहेत. आमच्या वाचकांसाठी त्या येथे देत आहोत. 
      सौजन्याची ऐशी-तैशी या लेखाद्वारे एका धर्माभिमान्याने एक प्रामाणिक राष्ट्रभक्त या नावाने निखिल वागळे आणि तत्सम हिंदुद्रोह्यांचा समाचार घेतला आहे. हा लेख व्हॉट्स ऍपवर व्हायरल झाला आहे.

सप्टेंबर २०१६ मधील राजस्थान राज्यातील हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा

१. ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन
अ. जयपूर येथे हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्यात २३.९.२०१६ ते २६.९.२०१६ या कालावधीत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
आ. राजस्थानमधील बिलाडा गावात पू. (सौ.) सुशीला मोदी यांनी ११.९.२०१६ या दिवशी ग्रंथ प्रदर्शन लावले.
इ. १४.९.२०१६ या दिवशी केलवाद गावातील कालका माताजी मंदिराच्या वार्षिक उत्सवात ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

स्वाध्याय आणि संस्काराच्या आधाराने नवीन राज्यव्यवस्थेची नितांत आवश्यकता !

      करवीरच्या नव्या शंकराचार्यांच्या गादीरोहण समारंभाप्रसंगी मावळते शंकराचार्य म्हणाले, लोकशाही ही अंतिम व्यवस्था नाही. स्वाध्याय आणि संस्काराच्या आधाराने नवीन राज्यव्यवस्था आणावी लागेल. त्यासाठी नवी स्मृती (कायदे संहिता) लिहावी लागेल. 
      आमच्या देशात आदि शंकराचार्यांच्या काळात जशी समाजस्थिती होती, तशी समाजस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.

तुमचे पोट दुखू लागले !

      पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांच्या संप्रदायाचे साधक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. मानव बुद्धदेव यांनी निखिल वागळे यांच्या संदर्भात लिहिलेली उपरोधिक कविता येथे देत आहोत.

अभय असो की अन्य कुठलाही असो वर्तक
कवी मानव राहील सदा निखीलजींचा समर्थक ।
म्हणू द्या लोकांना असभ्य आहेत निखील वागळे,
निखीलजी वागळे, तुम्ही बरोबर वागले ॥

लालफितीचा कारभार नागरिकांच्या मुळावर

      ३० जुलै २०१४ या दिवशी पुणे जिल्ह्यातील माळीण या गावी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५१ जणांचा बळी गेला. ही बातमी पसरताच तातडीने बचावकार्य चालू झाले. अपेक्षेप्रमाणे नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात घोषणाही केल्या गेल्या; पण दुर्दैवाने २ वर्षे उलटून गेली तरी अजूनपर्यंत या घोषणांची पूर्तता झालेली नाही.

इंग्रजी प्रबोधनाचे आंधळे अनुकरण !

      आज इंग्रजी प्रबोधनाचे आंधळे अनुकरण शिगेला पोचले आहे. चढते वाढते राक्षसी औद्योगीकरण, पाश्‍चात्त्य वळणाची शासन यंत्रणा आणि शिक्षण व्यवस्था, विज्ञान विषयक विचार, अर्थ विषयक ध्येय-धोरणे किंवा जीवनाचे कोणतेही घटक यांतून द्विधाचिंतनत्व, वैफल्याची भावना, मानसिक पराभूततेची धारणा, आम्हाला ग्रासून टाकते आहे.
     अंतर्मुख वृत्तीने या सर्वांचा मागोवा घेण्याच्या आड बाह्य परिस्थितीचे अडसर यायचे काहीच कारण नाही. प्रश्‍न आहे तो या विषयाविषयीच्या तळमळीचा ! जीवनाच्या सर्वांगीण आकलनाचा, आंतरिक ज्ञानाचा दिवा पेटवण्याचा, तो प्रज्वलीत करण्याचा ! प्रबोधन युग अवतरले, इंग्रजी राजवट आली आणि आधुनिक प्रबोधन युग आले, मग अध्यात्म, पारलौकिकता, आत्मवाद यांच्या जागी देहात्मवाद, विज्ञाननिष्ठा आली. मानवाच्या बौद्धिक कर्तृत्वावर नितांत श्रद्धा आली. व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुता हे प्रबोधन युगाचे परवलीचे शब्द झालेत. आज तो केवळ भ्याड, भेकड, कातडी बचावूच नव्हे तर डॅालर्स करता प्रसंगी देश सुद्धा विकायला तत्पर असतो. 
- संदर्भ : मासिक घनगर्जित, सप्टेंबर २०१२      काश्मीर समस्या, भाषावार प्रांतरचना, निधर्मीपणाचे खूळ ही भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांची कृपा (?) आहे. त्यानंतर झालेले गुलझारीलाल नंदा हे केवळ २ ते ६ मासांसाठी होते. त्यातही त्यांनी दंगलीच्या वेळी जिहाद्यांची बाजू घेतली. 
- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान भारतात हिंदूच अल्पसंख्यांक !

     देशातील एकूण हिंदूंपैकी २५ ते ३० टक्के हिंदू स्वत:ला धर्मनिरपेक्षतावादी अथवा साम्यवादी म्हणवून घेणे अधिक पसंत करत आहेत. इतर २५ ते ३० टक्के हिंदू जातीच्या आधारावर आरक्षण मिळण्यासाठी स्वत:ला वेगळे ठेवून आहेत. त्यामुळे या देशात हिंदूच खरे अल्पसंख्यांक आहेत. 
- पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.
      भारत स्वतंत्र असूनही जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवता येत नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. 
- अधिवक्ता विष्णु शंकर जैन, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू फ्रंट फॉर जस्टीस.

कितीही उपाय करूनही त्रास न्यून होत नसल्यास तो त्रास दूर होण्यासाठी तेवढा काळ जाऊ देणे, हाच उपाय असतो, हे लक्षात घ्या !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
     काही वेळा एखाद्या त्रासावर कितीही उपाय केले किंवा वेगवेगळे उपाय पालटून केले, तरी त्यांचा लाभ होत नाही. तेव्हा उपाय करत रहाणे आणि काळाची अनुकूलता येईपर्यंत वाट बघणे, हाच उपाय आपल्या हातात उरतो. म्हणजे तेवढा काळ जाऊ देणे हाच त्यावर उपाय असतो. प.पू. डॉक्टरही त्या वेळी सांगतात, अमुक घंटे लागतील किंवा अमुक दिवस लागतील; कारण ते काळासंदर्भात जाणू शकतात. अशा वेळी साधकही देवाला विचारून काय उत्तर येते ?, हे जाणून घेऊ शकतात.
     हे त्रास आपण समष्टी साधना करत असल्याने आपल्याला होत असतात. सनातनच्या आश्रमांतील साधकांनी हे अनेक वेळा अनुभवले आहे. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. काही कारण नसतांना आश्रमातील १० - १५ साधकांचे पोट दुखणे, त्यांचा एक हात पुष्कळ प्रमाणात दुखणे, त्यांना ताप येणे, असे त्रास होतात. अशा वेळी तुम्ही आजाराच्या संदर्भात वेगवेगळ्या चाचण्या करा, स्कॅनिंग करा; पण आजाराचे निदान काही होत नाही.
२. तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांनाही काही वेळा असाच अनुभव होतो. तो त्रास लवकर न्यून न होता काही घंट्यांनी न्यून होतो.

वास्तूतील त्रास वाढला आहे, असे लक्षात आल्यावर वास्तूभोवती त्वरित गेरू मातीचे मंडल काढा ! - महर्षि

महर्षींची शिकवण आणि कार्य !
     बर्‍याचदा आपल्याला अकस्मात् वातावरणातील दाब वाढल्यासारखा जाणवू लागतो. अनेकदा आपल्याभोवती नकारात्मक स्पंदने फिरत असल्याची जाणीव होऊ लागते, तसेच श्‍वास घेण्यास आपल्याला काहीतरी अडथळा आहे, असेही वाटू लागते. यातून आपल्यावर काही संकट येईल का ?, अशी चिंता निर्माण होते. यावर महर्षींनी उपाय सांगितला. ते म्हणाले, असे जेव्हा होईल, तेव्हा काळजी करू नका. त्वरित त्या वास्तूभोवती किंवा आश्रमाभोवती गेरू माती (लाल मातीचा एक प्रकार) पाण्यात कालवून त्याचे रांगोळीसारखे मंडल काढा. गेरूचे मंडल काढल्याने आश्रमाभोवती एक लक्ष्मणरेषाच निर्माण होईल आणि मग कुठलीही अनिष्ट शक्ती यातून आत प्रवेश करू शकणार नाही. प्रत्येक बुधवारी (प.पू. डॉक्टरांचा हा जन्मवार आहे; म्हणून महर्षींनी बुधवार सांगितला आहे.) रामनाथी आश्रमात हा उपाय चालू करा. (नवरात्र काळापासून रामनाथी आश्रमात हा उपाय चालू केला आहे.)

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे सनातन धर्माची पुनर्स्थापना होण्यासाठी नवचंडी यज्ञ !

     तुळजापूर (जिल्हा धाराशिव) - येथे प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात विविध संकल्पांची पूर्तता होण्यासाठी नवचंडी यज्ञ करण्यात आला. १९ ऑक्टोबरला सकाळी ८.३० वाजता चालू झालेल्या या यज्ञाची दुपारी ३.३० वाजता पूर्णाहुती होऊन सांगता झाली. या यज्ञाचे यजमानपद सनातनचे अंबाजोगाई येथील साधक श्री. धनंजय (बाळासाहेब) केंद्रे आणि त्यांच्या पत्नी सौ. योगिता केंद्रे यांनी भुषवले. या यज्ञाचे पौरोहित्य श्री. सुधेश हनुुमंताचार्य जेवळीकर यांनी केले.
     या वेळी प्रथम दुर्गासप्तशतीचे १० पाठ करण्यात आले, नंतर एका पाठाच्या वेळी हवन करण्यात आले. या यज्ञाच्या वेळी तुळजापूर शहरातील सनातनचे साधक उपस्थित होते.
     यज्ञाचे पौरोहित्य करण्यासाठी आलेले श्री. सुधेश हनुुमंताचार्य जेवळीकर म्हणाले, आता मी हिंदु राष्ट्र येण्यासाठी दोन घंटे जप करणार.
यज्ञस्थळी आहुती देतांना यजमान श्री. धनंजय (बाळासाहेब) केंद्रे आणि सौ. योगिता केंद्रे

प.पू. डॉक्टरांनी लिहिलेल्या चौकटीतून देवाकडे काय मागावे ?, याचे ज्ञान होणे

     १३.३.२०१६ या दिवशीच्या दैनिकातील देवाने आरोग्यदायी जीवन हवे कि हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय पूर्ण झालेले हवे ?, असे विचारले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना, असे उत्तर द्यावेसे वाटणारेे परात्पर गुरु डॉ. आठवले ! ही चौकट वाचून माझे पुढीलप्रमाणे चिंतन झाले.
१. प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्याकडे परीक्षेत उत्तीर्ण होऊ दे, अशी प्रार्थना करणे
     मी ७ वीला असतांना शालांत परीक्षा आणि केंद्र परीक्षा अशा दोन परीक्षा द्याव्या लागत. केंद्र परीक्षा महत्त्वाची मानली जायची. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांसमवेत मी पावसचे प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्याकडे गेले होते. त्या वेळी मी त्यांना म्हणाले, केंद्र परीक्षेत उत्तीर्ण होऊ दे. ही चूक माझ्या अलीकडेच ध्यानी आली. प.पू. डॉक्टर, कुठे गेल्यावर काय मागावे, याचे ज्ञान केवळ आपल्यामुळेच मिळाले.
२. देवाकडे संगणक शिकव अशी इच्छा व्यक्त करणे
     मी आश्रमात नवीनच होते. संगणकाविषयी मला काहीच ज्ञान नव्हते. टंकलेखन करण्याचा प्रयत्न करायचे; पण संगणक चालू करणे, बंद करणे, धारिका बनवणे, संचिका सिद्ध करणे इत्यादी अनेक गोष्टी सिद्ध करतांना सारखे साधकांचे साहाय्य घ्यावे लागत असे.

मनातील प्रश्‍नांना दैनिकातून उत्तर मिळणे आणि कृष्णाला स्वतःला जशी घडवायची आहे, तशी घडण्यासाठी प्रयत्न होऊन खरा आनंद अनुभवता येणे

कु. रजनी कुर्‍हे
१. समष्टी सेवा अध्यात्मातील माया आहे आणि त्याऐवजी
देवाशी एकरूप होण्याचे विचार येणे अन् दैनिकाच्या
माध्यमातून प.पू. डॉक्टरांनी ही स्वेच्छा असल्याचे सांगणे
     काही मासांपासून मनात सतत ही समष्टी सेवा आणि कार्य ही सगळी एकप्रकारे अध्यात्मातील मायाच आहे, असा विचार येऊन सेवा करत असतांना मनात सेवेच्या विचारांऐवजी मला देवाशीच लवकर एकरूप व्हायचे आहे, असे वाटायचे, तरीही देवाच्या कृपेने सेवा हे गुणसंवर्धनाचे आणि दोष अन् अहं निर्मूलनाचे माध्यम आहे; म्हणून मला सेवेकडे पहाता यायचे. मनाची ही स्थिती योग्य कि अयोग्य, हे मला कळत नव्हते. एक दिवशी कु. प्रियांका स्वामी हिचा दैनिक सनातन प्रभातमध्ये लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये कार्य ही जरी सात्त्विक माया असली, तरीही ती नको वाटणे, हीसुद्धा स्वेच्छाच झाली, असे एक वाक्य होते. त्या वेळी मला माझ्या प्रश्‍नाचे उत्तरच मिळाले आणि देवाचरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
२. स्वतःकडून असणार्‍या सात्त्विक अपेक्षा न्यून होऊन खरा आनंद अनुभवता येणे सेवा
हे केवळ माध्यम असून त्या माध्यमातून स्वतःला घडवायचे आहे, हे ध्येय सतत समोर रहाणे
     त्यानंतर प.पू. डॉक्टरांना मनातून प्रार्थना झाली की, आता आपल्या चरणांविना काही नको. हा जीव सर्वस्वी आपल्याला शरण आला आहे. त्याला जसे घडवायचे, तसे आपण घडवा; मात्र या जिवाला सतत आपल्या चरणांशी ठेवा. पूर्वी मनात हे व्हायला हवे, ते व्हायला हवे, अशा अपेक्षा असायच्या.

सकाळपासून पाय दुखत असतांना एका अनुभूतीसाठी संतांनी प्रसाद दिल्यावर चैतन्य मिळाल्याने प्रशिक्षण करूनही पाय न दुखणे

     सकाळपासून मला बरे वाटत नव्हते. माझे पाय पुष्कळ दुखत होते. मी सेवा करत असतांना पाय दुखायचे थांबायचे; पण नंतर परत दुखायला लागायचे. संध्याकाळी मी नामजप केल्यावरही तसेच झाले. मी प्रतिदिन प्रशिक्षण करायला जाते; पण आज पाय दुखत असल्यामुळे जाऊ नये, असा विचार आला. मला शंकराचार्यांच्या संदर्भात अनुभूती आली होती; म्हणून एका संतांकडून प्रसाद मिळाला. मला प्रसादातून एकदम चैतन्य मिळाले आणि नंतर प्रशिक्षण करूनही माझे पाय दुखले नाहीत.
- कु. नंदा नाईक (२९.११.२०१३)


स्थूलदेहाकडून होणार्‍या नामजपाचा परिणाम सूक्ष्मदेहावर होऊन दुखत असलेल्या भागातील त्रास उणावणे

     ५.५.२०१६ या दिवसापासून मला पाठदुखीचा त्रास चालू झाला. मला हा त्रास होत असतांना मी रुग्णाइत आहे, असे वाटतच नाही. मला सतत एक दृश्य दिसते. त्यात माझा स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह वेगवेगळे आहेत, असे दिसते. माझ्या स्थूलदेहाकडून जो नामजप होतो, त्याचा परिणाम सूक्ष्मदेहावर होऊन त्या भागातील त्रास उणावतो. प्रत्यक्षात शरिराचा जो भाग दुखत असतो, तेवढ्याच भागात मला जडपणा जाणवतो आणि शरिराच्या उर्वरित भागांत हलकेपणा जाणवतो. मी चालत असतांना मी हवेत तरंगत आहे, असे जाणवते. असे गेले १२ दिवस होत आहे. मधेच मला दम्याचा त्रास चालू झाल्यावर मला केवळ छातीत पुष्कळ जडपणा जाणवतो.
     या आधी मला त्रास होत असतांना माझ्या तोंडवळ्यावरून मी रुग्णाइत आहे, हे इतरांच्या लक्षात यायचे; परंतु या वेळी मला त्रास होत असतांनाही मी रुग्णाइत आहे, असे इतरांना जाणवलेच नाही.
- कु. नंदा सदानंद नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.५.२०१६)

कु. नंदा सदानंद नाईक यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती

कु. नंदा सदानंद नाईक
१. परिस्थिती स्वीकारल्यामुळे चांगले वाटणे
    सर्व साधक मला कशी आहेस ?, असे विचारायचे. तेव्हा मी मला जो काही त्रास होत असेल, तो सांगायचे. २५.८.२०१५ या दिवशी एका साधकाने मला विचारल्यावर मी माझ्या दुःखाचे कारण सांगत आहे, म्हणजे मी परिस्थिती आणि प्रारब्ध स्वीकारले नाही, हे माझ्या लक्षात आले. मग साधकांनी चौकशी केल्यावर काय सांगायचे ?, असा मला प्रश्‍न पडला. तेव्हा मी आनंदात आहे, असे सांगायचे ठरवले. या प्रसंगातून मी देहबुद्धीत अडकले आहे, असे वाटलेे. दुसर्‍या दिवसापासून मला आपोआप चांगले वाटायला लागले.
२. प्रार्थना केल्यानंतर अष्टदेवता समोर उभ्या राहून त्या जप पूर्ण होईपर्यंत
थांबून जप पूर्ण झाल्यानंतर नाहीशा होणे आणि अशीच अनुभूती रात्रीही येणे
     एकदा मी ध्यानमंदिरात दुपारी १२ वाजता मंत्रजप करायला बसले होते. मंत्रजपाला आरंभ करण्यापूर्वी मी प्रार्थना केली. त्या वेळी अष्टदेवता माझ्यासमोर उभ्या राहिल्याचे जाणवले. माझा मंत्रजप पूर्ण होईपर्यंत, म्हणजे जवळजवळ एक घंटा त्या माझ्यासमोर उभ्या असल्याचे मला जाणवले. मी कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर सर्व अष्टदेवता निघून गेल्या. त्या दिवशी माझा मंत्रजपही पुष्कळ चांगला झाला होता.

कृतज्ञता सदैव राहू दे अंतरी ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
     कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १३ वर्षे) हिने प.पू. डॉक्टरांच्या चरणी व्यक्त केलेली काव्यरूपी कृतज्ञता !
प.पू. डॉक्टरबाबा यांच्या कोमल चरणी ऐश्‍वर्याचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
बालपणापासून या मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवले ।
गुणरूपी सुंदर नक्षीने भावरूपी रत्नच जडवले ॥

मनातील इच्छा-आकांक्षा मागताक्षणी पुरवल्या ।
गुरुकुलासम शिक्षणपद्धतीने संस्कारित बालिका मज घडवले ॥
कु. ऐश्‍वर्या जोशी


अपेक्षा या मागे एकच त्यांची बनावे मी आदर्श गोपी ।
त्यासाठीच मजला योग्य मार्गदर्शन केले त्यांनी ॥

मोहमायेच्या पाशातूनी सोडवूनी उन्नतीसाठी दिल्या अनेक संधी ।
अनेक चुकांना क्षमा करूनी साधना सुलभ केली ॥

अहं-निर्मूलनाचे प्रयत्न सांगूनी मोक्षाची द्वारे मोकळी केली ।
निराशेतूनी बाहेर काढूनी मायेचे छत्र सर्वांना दिले

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली एस्.एस्.आर्.एफ्.ची अमेरिका येथील साधिका कु. मैत्रेयी काळे (वय १८ वर्षे) हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कु. मैत्रेयी काळे
उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली 
दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी !
१. इतरांना साहाय्य करणे 
      मला त्रास होत असतांना ती मला उपाय करण्यासाठी साहाय्य करते, तसेच माझ्या चुकांचे निरीक्षण करण्यातही साहाय्य करते.
२. सात्त्विक कपड्यांची आवड असणे 
     आम्ही तिच्यासाठी कपडे आणायला गेलो होतो, तेव्हा मला एक पोषाख आवडला; मात्र त्या कपड्यावर प्रामुख्याने काळा आणि इतर गडद रंग होते अन् तो महागही होता. मैत्रेयीने तो पोषाख न घेता सात्त्विक रंगाचा आणि फार महाग नसलेला घेतला.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ऐकू आलेले सतारीचे भावजागृती करणारे दैवी नाद !

श्री. राम होनप
१. ध्यानमंदिरात सतारीचा नाद ऐकू येणे
     रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात २३.३.२०१४ च्या रात्री १० ते १०.५० या कालावधीत सतारीचा नाद सतत ऐकू येत होता. ध्यानमंदिरात एखादा सतारवादक सतारीचा सराव करण्यासाठी बसला असावा, त्याप्रमाणे नाद स्पष्ट ऐकू येत होता. सतारीच्या नादाची गती संगीताच्या भाषेत सांगायचे, तर पूर्वी ऐकलेला सतारीचा नाद एकपटीत मानला, तर ध्यानमंदिरातील सतारीची गती चौपट होती.
१ अ. नादाचा परिणाम १. नाद ऐकतांना भावजागृती होत होती. मन उत्साहित होऊन साधनेला स्फूर्ती मिळत होती.
२. या नादाच्या माध्यमातून वाईट शक्तींशी सूक्ष्म-युद्ध चालू आहे, असे जाणवले.
३. नादाची गती पुष्कळ असणे
     ध्यान मंदिरात २४.३.२०१४ च्या रात्री १०.५० ते ११.१० या कालावधीत पुन्हा एकदा सतारीचा नाद सतत ऐकू आला. या नादाची गती पुष्कळ असून या गतीने मनुष्य सतारवादन करू शकणार नाही, असे लक्षात आले.
    सूक्ष्म-नादाच्या माध्यमातून सतारवादन ऐकणे ही अलौकिक घटना असून नाद ऐकण्याचे भाग्य प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मिळाले; म्हणून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०१४)

देवद आश्रमातील सात्त्विक आणि चैतन्यमय वातावरणाचा कामगारांवर झालेला परिणाम

श्री. रघुनाथ
श्री. असुराम
१. कामगारांनी साधकांप्रमाणे प्रार्थना
करून कामाला आरंभ करणे
     साधारण १ वर्षापासून देवद आश्रमात बांधकाम चालू आहे. या बांधकामासाठी कामाला येणारे श्री. असुराम, श्री. रघुनाथ, श्री. सीताराम आणि श्री. भास्कर हे चार कामगार कामाला आल्यावर साधकांप्रमाणे प्रार्थना करून कामाला आरंभ करतात. तसेच मधे मधे सर्वांसमवेत प्रार्थना करतात आणि विभागातील सेवा पूर्ण झाल्यावर पुन्हा आश्रमात जाऊन अन्य सेवा करतात.
२. कामातील विविधता आणि पालट यांचा कामगारांच्या
तोंडवळ्यावर कधीच त्रागा दिसत नाही.
श्री. भास्कर
श्री. सीताराम
३. घरी काम असूनही आश्रमातील
सेवेला प्राधान्य देणे
     एकदा ट्रकमधून साबणाचे खोके उतरवण्याची सेवा होती. आपल्याला हे काम करण्यासाठी कामगार मिळत नव्हते. यांना संपर्क केल्यावर त्यांना घरी काम असूनही ते चार जण आले आणि साबणाचे खोके उतरवून नंतर घरच्या कामाला गेले.
४. श्री. असुराम यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
४ अ. श्री. असुराम हे अन्य सेवेलाही येणे आणि ते विनामोबदला सेवा करत असल्याचे कळणे : २७.११.२०१५ या दिवशी मी पार्सल सेवेला जातांना साहाय्यक म्हणून श्री. असुराम वाहनात बसलेले पाहिले. त्यांच्याकडून जाणून घेतल्यावर कळले की, ते सेवेसाठी आले आहेत.

पू. (सौ.) आशालता सखदेव यांच्या देहत्यागापूर्वी आणि नंतर त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सौ. जयश्री हेगडे
     मी एक दिवस सनातनच्या रामनाथी आश्रमात ओळखीच्या एका साधिकेला भेटायला तिच्या खोलीत गेले होते. त्या खोलीमध्ये पू. सखदेवआजी रहात होत्या. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्या देवाच्या अनुसंधानात आहेत, असे मला जाणवले. आमच्या बोलण्याने त्यांना त्रास होऊ नये; म्हणून मी त्या साधिकेसमवेत थोडे बोलून बाहेर आले.
१. प्रतिदिन पू. आजींना मानस नमस्कार करणे, पू. आजींना भेटल्यावर त्यांनी
स्मितहास्य करणे आणि आश्रमात देवताच रहातात, असा विचार मनात येणे
     दुसर्‍या दिवशीपासून प्रतिदिन मी त्या खोलीमध्ये जातांना आणि येतांना पू. आजींना मानस नमस्कार करायचे. एक दिवस खोलीमध्ये जातांना कु. राजश्रीताई (पू. सखदेवआजींच्या कन्या) मला म्हणाल्या, तुम्ही पू. आजींना भेटू शकता. त्यावर मी सांगितले ,मला मराठी येत नाही. तेव्हा पू. आजींनी स्मितहास्य केले. असेे निर्मळ मंदस्मित मी यापूर्वी कधीही आणि कुठेही पाहिले नव्हते. त्या वेळी या आश्रमामध्ये सर्व देवताच रहातात, असा विचार माझ्या मनात आला आणि तो विचार पू. आजींनीच मला दिला, असे वाटले.
२. पू. आजींच्या भेटीनंतर सर्व संतांमध्ये देवतांचे रूप दिसणे आणि त्यामुळे आनंदी रहाता येणे
     या प्रसंगानंतर मला सर्व संतांमध्ये देवतांचे रूप दिसू लागले. मी सकारात्मक आणि आनंदी राहू लागले. एकदा पू. आजींनी मला प्रसाद दिला.

आध्यात्मिक उपायांमुळे पू. जयराम जोशीआजोबांना येत असलेला खोकला न्यून होणे

१. आधुनिक वैद्यांनी केलेल्या उपचारांनी खोकला बरा न होणे
     २१.७.२०१६ या दिवशी रात्री १० वाजता सनातनचे संत पू. जयराम जोशीआजोबा (पू. आबा) यांना खोकला येऊन ताप आला. पुष्कळ खोकला येत असल्याने त्यांनी ती रात्र बसून काढली. त्या वेळी पू. आबा प.पू. डॉक्टरांना सतत प्रार्थना करत होते. प.पू. डॉक्टर शक्ती देत आहेत, असे त्यांना वाटत होते. आधुनिक वैद्यांनी खोकला अल्प होण्यासाठी ८ दिवस औषधे दिली, तरीही खोकला न्यून झाला नाही.
२. मुद्रा करून नामजप करणे आणि दृष्ट काढणे या
आध्यात्मिक उपायांमुळे पू. आबांचा त्रास न्यून होणे
     ३१.७.२०१६ या दिवशी आध्यात्मिक त्रासामुळे खोकला येत असावा, असे वाटून एका संतांना विचारले असता त्यांनी नामजप आणि मुद्रा सांगून दृष्टही काढण्यास सांगितली.
    पहिल्या वेळी दृष्ट काढतांना पू. जोशीआबा आणि दृष्ट काढणारा साधक यांचेे डोके पुष्कळ जड झाले. त्यानंतर ४ दिवसांनी पुन्हा दृष्ट काढली. त्यानंतर प्रत्येक दोन दिवसांनंतर दृष्ट काढली. असे तीन वेळा केले. त्यानंतर पू. आबांचा त्रास न्यून होऊ लागला. आध्यात्मिक त्रासामुळे पू. आबांची प्राणशक्ती पुष्कळ न्यून झाली होती, तरी ते केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे स्थिर होते.
       हिंदु समाजाचा इतिहास पानोपानी ओरडून सांगतो की, अगोदर राजसत्ता हिंदूंच्या हातातून जाते, मग धर्म जातो आणि नंतर प्रदेश जातो. (साप्ताहिक राष्ट्र्रपर्व)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदूंनो, काळाप्रमाणे 
साधना पालटते, हे लक्षात घ्या !
        संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत गोदान देणे ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना गोदान देणे नव्हे, तर गोरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

आश्रमातील आणि प्रसारातील साधक यांना प्रीतीच्या फुलाने जोडणारे अन् सर्वांना आधार देणारे पू. जयराम जोशीआबा !

पू. जयराम जोशीआजोबा
     मी वैयक्तिक कामानिमित्त सांगलीला गेले, तेव्हा मिरज आश्रमात गेले होते. तेव्हा पू. जोशीआबांचा ४ घंटे सहवास लाभला. पूर्वी मी मिरज आश्रमात रहात होते, त्या वेळी आणि आता पू. जोशीआबांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
१. निरागसता
     पू. आबा माझी आणि देवद आश्रमातील साधकांची विचारपूस करत होते. तेव्हा पू. आबांचा आश्रम, साधक आणि संत यांच्याप्रती पुष्कळच निरागसभाव शिकायला मिळाला.
२. पू. आबांना सर्वकाही सांगू शकणे
     मी मिरज आश्रमात स्वागतकक्षात सेवा करतांना पू. आबाही तिथे सेवा करायचे. ते मला सोडण्यासाठी यायचे. त्या निमित्ताने माझी त्यांच्याशी पुष्कळ जवळीक झाली. मी त्यांना मला होणारे त्रास, अनुभूती आणि अन्य सर्वच सांगायचे.
३. आधार वाटणे
     पू. आबांनी माझा त्रास जवळून पाहिला आहे. त्यामुळे ते माझी पुष्कळ काळजी घ्यायचे. मलाही त्यांचा पुष्कळ आधार वाटून हे प.पू. डॉक्टरांचेे प्रेम आहे आणि तेच माझ्यासाठी हे सर्व करत आहेत, असे वाटून त्रासाशी लढण्यास बळ मिळायचे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
मायेचे आकर्षण 
     सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते. 
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

आज वसुबारस

गायीचे महत्त्व 
 प.पू. परशराम पांडे

     गायीचे दूध लहान मुलालासुद्धा पोषक असते. गायी जेव्हा वनात चरायला जातात, तेव्हा त्यांच्या अस्तित्वाने वातावरण चैतन्यमय होते, तसेच त्यांच्या चरणामुळे धुळीचे कण पवित्र होतात आणि भूमीला आनंद होतो. सर्व जगात गोवंशवृद्धी झाल्यास तिच्या पावित्र्यामुळे रज-तमाचा प्रभावसुद्धा उणावतो. यासाठी पूर्वी गोपालनाला फार महत्त्व प्राप्त झाले होते. दूध, दही आणि तूप यांचा सुकाळ होता. त्यामुळे प्रजासुद्धा सात्त्विक, धार्मिक आणि धष्टपुष्ट होती. गायीच्या चैतन्यशक्तीमुळेच गोपालनाला महत्त्व आहे. गोहत्या बंद झाल्यासच हे शक्य आहे ! - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.५.२०१६)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

श्रद्धेचे महत्त्व 
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. 
त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

उत्तरप्रदेशातील यादवी !

संपादकीय
       सत्तेसाठी राजकारणात कशा प्रकारे साठमारी चालते, मग ते भलेही आई-वडील-काका असे कोणतेही नाते असो, सारे काही असते ते खुर्चीसाठी, हे गेले काही दिवस समाजवादी पक्षात चालत असलेल्या वादातून समोर येत आहे. २४ ऑक्टोबरला समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्यासमोरच काका आणि मुख्यमंत्री असलेला मुलगा अखिलेश यांच्या समर्थकांत हाणामारी पहावयास मिळाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत मायावतींच्या भ्रष्ट-एक सत्ताकेंद्रित कारभाराला कंटाळून तेथील जनतेने मोठ्या अपेक्षेने आणि बहुमताने युवा नेते अखिलेश यांच्याकडे सत्ता सोपावली; मात्र गेल्या काही वर्षांतील कारभार पहाता जनहिताऐवजी समाजवादी पक्षाने स्वत:च्या तुंबड्याच कशा भरता येतील हेच पाहिले. यातूनच मग आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेची केंद्रे कुणाकडे ठेवायची यांसाठी सुंदोपसुंदी चालू झाली.

क्रिकेटचे शुद्धीकरण !

संपादकीय
       कोणाचेही वर्चस्व न जुमानता मनमानी कारभार करत बेलगाम होत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. निवृत्त न्यायाधीश लोढा समितीने सुचवलेल्या सुधारणांविषयक शिफारसी लागू करण्याविषयी राज्य क्रिकेट संघटना जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत बीसीसीआयने त्यांना कोणत्याही प्रकारचा निधी देऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच बीसीसीआयला दिला आहे. या आदेशाद्वारे बीसीसीआय आणि त्यांच्या संलग्न राज्य संघटना यांच्यातील सर्व आर्थिक व्यवहार गोठवण्यात आले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn